Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हुपरीत निषेध मोर्चा

$
0
0

हातकणंगले : काश्मीरमधील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शिवसेना हुपरी शहर यांच्यावतीने शहरातून मोर्चा काढून पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नेते, मुस्लिम समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणांनी शहरवासीयांनी परिसर दणाणून सोडला होता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज कराड बंद

$
0
0

आज कराड बंद

कराड

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज, शनिवारी कराड बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच शनिवारी सकाळी अकरा वाजता शहरातील दत्त चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शहरातून सर्वसमावेशक मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संध्यादेवींना उमेदवारी द्या

$
0
0

म.टा. वृत्तसेवा गडहिंग्लज

'खासदार धनंजय महाडिक यांनी जनतेच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी कधीच मतदारसंघात फिरले नाहीत. उलट मित्रपक्षांचे खच्चीकरण करत भाजपची ताकद वाढविली. त्यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आमदार संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी द्यावी व चंदगड विधानसभा मित्रपक्षांना सोडावा,' अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व गडहिंग्लज पंचायत समिती उपसभापती विद्याधर गुरबे यांनी पत्रकार परिषदेत केली.

गुरबे यांनी विद्यमान खासदार महाडिक यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'मित्रपक्षाने आघाडीधर्म पाळला म्हणून त्यांचा विजय झाला. त्याने आपल्या पदाचा उपयोग मित्रपक्षांच्या खच्चीकरणासाठीच केला. ज्या पक्षाविरुद्ध त्यांना जनतेने निवडून दिले त्या भाजपला त्यांनी रसद पुरविली. विधानसभेत भाजपचे आमदार त्यांचे भाऊ, विधानपरिषदेत भाजपचा मदतीने काका आमदार, कोल्हापूर महानगरपालिकेत भाजपच्या साथीने ताराराणी आघाडी, जिल्हा परिषदेत वहिनी भाजपच्याच अध्यक्ष, त्यामुळे खासदार म्हणजे सोयीचा फिरता रंगमंच आहे.

संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदारांनी संसदेत विक्रमी प्रश्न विचारल्याचे सांगतात पण प्रश्न सोडविले किती? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मित्र पक्षांची मदत घेऊन मित्रपक्षाला त्रास देणाऱ्या महाडिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्यास ही जागा गमावण्याची शक्यता आहे. चंदगड, गडहिंग्लज विभागात त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी असल्याने त्यांच्याऐवजी संध्यादेवी कुपेकरांना लोकसभेत संधी द्यावी.'

दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी जिल्ह्यातले अनेक प्रश्न मार्गी लावले. संसदेत ते फारसे बोलले नसले तरी मंडलिक साहेब तळागाळातले कार्यकर्ते होते. त्यांच्याप्रमाणेच बाबासाहेब कुपेकर यांनी राजकारण केले. गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात तीन वेळा आमदार, चंदगडमधून एकदा आमदारकी, विधानसभेचे अध्यक्ष व मंत्रिपद शिवाय राष्ट्रवादीशी निष्ठा ठेवून केलेले काम असे कुपेकर घराण्याचे योगदान लक्षात घेता संध्यादेवींना लोकसभेत संधी मिळाली पाहिजे. त्यांना उमेदवारी दिल्यास भविष्यातील आघाडीच्या राजकारणात चंदगड विधानसभा मित्रपक्षाला देता येईल, असे गुरबे म्हणाले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजऱ्यात ग्रामसेविकेस धक्काबुक्की, एकावर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

वडिलोपार्जित घर नावावर नोंदविले नाही, या कारणारून ग्रामसेविकेस धक्काबुक्की करून ग्रामपंचायत बैठकीचे इतिवृत्त पळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा एकावर गुन्हा नोंदविण्यात आला. चांदेवाडी (ता. आजरा) ग्रामपंचायत कार्यालयात ही घटना घडली. त्यानुसार येथील लहू चंद्रकांत सावरतकर (रा. चांदेवाडी) याच्यावर आजरा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत ग्रामसेविका कांचन साताप्पा चव्हाण (रा. बारवे, ता. भुदरगड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

चांदेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गुरुवारी मासिक बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी सावरतकर याने वडिलांच्या नावावरील घर स्वतःच्या नावावर नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. पण बैठकीत याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे बैठक संपल्यावर ग्रामसेविका चव्हाण यांना याबाबत विचारणा करत धक्काबुक्की केली. तसेच ग्रामपंचायत बैठकीचे इतिवृत्त पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

सावरतकर यांच्या वडिलांच्या नावावरील घराचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. सावरतकरच्या दोघा चुलत्यांनी घराच्या मालकीहक्काबाबतच्या मृत्युपत्राबाबत न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे संबंधित घराबाबत कोणतीही कार्यवाही होऊ शकत नसल्याचे स्पष्टीकरण चव्हाण व चांदेवाडीचे सरपंच प्रभाकर कुंभार यांनी फिर्यादीत केला आहे. त्यामुळे याप्रकरणी सावरतकरवर गुन्हा नोंद केला आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात मुस्लिम बांधवांकडून निषेध

$
0
0

सोलापुरात मुस्लिम बांधवांकडून निषेध

सोलापूर :

विजापूर वेस येथे राणी लक्ष्मीबाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवांनी हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली. आत्मघातकी हल्लेखोर काश्मिरी युवक आदिल दार याचे छायाचित्र लावून विरोधात घोषणा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपशिंगेत आज बंदकाश्मीरमधील घटनेनंतर गावात सुन्न वातावरण

$
0
0

अपशिंगेत आज बंद

सातारा

सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या अपशिंगे गाव हल्ल्याचे वृत्त येताच सुन्न झाले होते. सीआरपीएफमध्ये गावातील सुमारे ४० जवान कार्यरत आहेत. सैनिकांच्या कुटुंबीयातही अस्वस्थता होती. सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी संपर्क साधण्यासाठी गावातील लोकांची फोनाफोनी सुरू होती. या घटनेचा कोणताही राजकीय मुद्दा न करता अतिरेक्यांचा कायमचा बीमोड होण्याची गरज आहे, असे मत ही गावकऱ्यांनी व्यक्त केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी आज, शनिवारी बंद पाळण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनायक काळे एन्काउंटरची न्यायालयीन चौकशी करा

$
0
0

सोलापूर :

'सोलापुरातील पारधी समाजाचा कार्यकर्ता विनायक काळे याचा सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बनावट एन्काउंटर केला आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा,' अशी मागणी भटक्या विमुक्त राष्ट्रीय आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केली आहे. शुक्रवारी सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विनायक काळे याला पोलिसांनी बंदुकीच्या गोळीने ठार मारले आहे. या संदर्भात पोलिसांनी केलेला खुलासा व मृत कुटुंबीयांसह आप्तेष्ठांकडून मिळालेली माहिती यामध्ये विसंगती दिसून येते. पोलिसांनी विनायकला चोर, दरोडेखोर व आक्रमक गुन्हेगार म्हंटले आहे. खऱ्या अर्थाने विनायकच्या संपूर्ण जीवनात त्याच्या विरोधात कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही, त्याच्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. स्वतःच्या मालकी हक्काच्या वाहनाने प्रवासी वाहतूक करण्याचा त्याचा व्यवसाय होता. बंदुकीची गोळी लागून विनायक जखमी झाला किंवा मेला, असे पोलिस सांगत असले तरी त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जबर मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत. त्यामुळे विनायकचा मृत्यू संशयास्पद असून, त्याचा पोलिसांनी एन्काउंटरच केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या दिशा निर्देशानुसार प्रथम ३०२ कलमाखाली नोंदवून न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी रेणके यांनी केली आहे. दरम्यान, काळे याच्या मारेकऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी सोमवारी, १८ फेब्रुवारी रोजी पारधी समाज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात आज मूक फेरी

$
0
0

\Bसाताऱ्यात आज मूक फेरी

\Bपुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी साताऱ्यात आज, शनिवारी सायंकाळी सात वाजता गांधी मैदान येथून निषेध मूक फेरीचे आयोजन केले आहे. ही निषेध फेरी गांधी मैदान-मोती चौक-कर्मवीर भाऊराव पाटील पथ (खालचा रास्ता) मार्गे पोवई नाका येथे येऊन छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी श्रद्धांजली वाहिली जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘न्यूट्रियन्ट’चा दावा कोर्टाने फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखान्या भाड्याने देण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या न्यूट्रियन्टस् अॅग्रो फ्रुट्स कंपनीचा दावा दिवाणी कोर्टाचे प्रमुख न्यायाधीशांनी फेटाळला. त्यामुळे कारखाना भाड्याने देण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

जिल्हा बँकेने दौलत कारखाना न्यूट्रियन्टस् कंपनीला ४५ वर्षे मुदतीने भाडेतत्वावर चालवण्यास दिला होता. कंपनीने करारानुसार ५० टक्के रक्कम भरली. उर्वरीत रक्कम पाच हप्त्यांत भरण्याचा करार होता. कंपनीने २५ मार्च २०१८ रोजी पहिला हप्ता न भरल्याने बँकेने कंपनीसोबतचा करार रद्द केला. बँकेच्या निर्णयाविरोधात कंपनीने जिल्हा दिवाणी कोर्टात दावा दाखल केला. कोर्टाने बँकेला पहिल्या हप्त्याची रक्कम भरण्यास एक महिन्याची मुदत दिली होती. पण मुदतीत रक्कम न दिल्याने कंपनीशी झालेला करार रद्द केला. त्यावर कंपनीने पुन्हा कोर्टात अर्ज दाखल केल्यावर तो नाकारण्यात आला. बँकेने २१ डिसेंबर २०१८ रोजी कारखाना ताब्यात घेऊन चार जानेवारी २०१९ रोजी कारखाना भाड्याने देण्याची प्रक्रिया सुरू केली. बँकेने कारखाना भाड्याने देण्यासाठी निविदा जाहीरात प्रसिद्ध केली. त्याला कंपनीने पुन्हा जिल्हा कोर्टात अर्ज दाखल केला. या दाव्यावर सुनावणी होऊन न्यूट्रियन्टस् कंपनीचा दावा फेटाळण्यात आला. कोर्टाच्या निर्णयामुळे कारखाना भाड्याने देण्याच्या निविदेवर निर्णय घेण्यातील अडथळा दूर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उशिरा आलेल्या अधिकाऱ्यांना उभे राहण्याची शिक्षा

$
0
0

महापौर, उपमहापौरांची आक्रमक भूमिका;

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पांजरपोळ औद्योगिक वसाहतीमधील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आयोजित बैठकीला महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी वेळेत उपस्थित न राहिल्याने महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांचा पारा चढला. त्यांनी, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, उपशहर अभियंता आर. के. जाधव आणि उपशहर अभियंता अरुण गुजर यांनी बैठक संपेपर्यंत उभे राहण्याची शिक्षा सुनावली. वेळेत बैठकीला उपस्थित राहणार नसाल तर, पदावर राहण्यास लायक नाही अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले.

दरम्यान, पांजरपोळ औद्योगिक वसाहतमधील रस्ता दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्याचे बैठकीत ठरले. शहरातील लघू औद्योगिक वसाहतीत पांजरपोळ औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. भागातील पायाभूत सुविधांची पूर्तता करावी यासाठी पांजरपोळ औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यानुसार महापौर व उपमहापौरांनी शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता बैठकीचे आयोजन केले होते. महापौर, पदाधिकाऱ्यांसह असोसिएशनचे पदाधिकारी शरद तांबट व अन्य उद्योजक महापौर कार्यालयात उपस्थित होते. मात्र, बैठकीबाबत पूर्वकल्पना देऊनही एकही अधिकारी सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत बैठकीला हजर राहिले नाहीत. यावेळी पदाधिकाऱ्यांनी, आयुक्त अभिजित चौधरी यांच्याशी संपर्क साधून 'अधिकारी बैठकीकडे वारंवार पाठ फिरवित आहेत. त्यांना वेळेची शिस्त लावा' असे सांगितले. तेव्हा आयुक्तांनी, 'अधिकाऱ्यांना सूचना केल्या जातील. त्यानंतरही त्यांच्या कामकाजात फरक पडला नाही तर निश्चित कारवाई करू' अशी ग्वाही दिली.

अधिकाऱ्यांची झाडाझडती

दरम्यान अतिरिक्त आयुक्त पाटणकर, शहर अभियंता सरनोबत, मुख्य लेखापरीक्षक आंधळे, उपशहर अभियंता जाधव व गुजर हे महापौर कार्यालयात आले. महापौरांनी चारही अधिकाऱ्यांना उशिरा आल्याबद्दल खडे बोल सुनावले. अधिकाऱ्यांनी कामकाजात सुधारणा करावी. पुन्हा असा प्रकार घडला तर यापुढे प्रशासनासोबत बैठका घेण्याविषयी विचार करावा लागेल असा इशारा दिला. 'नागरिक कामासाठी तिष्ठत उभे राहतात, बैठकीला वेळेवर राहत नसाल तर पदावर काम करण्यास लायक आहात का? याचाही विचार करा? अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याचे सांगण्यात आले. उपमहापौर शेटे यांनी 'नागरिकांच्या करांतून जमणाऱ्या पैशांतून अधिकाऱ्यांचा पगार होतो. अधिकाऱ्यांनी या गोष्टीचे भान बाळगावे' अशा शब्दांत संबंधित अधिकाऱ्यांना सुनावले. इस्टेट विभागाचे प्रमुख प्रमोद बराले हे बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यांना बैठकीला आत प्रवेशही देऊ नका असेही शेटे यांनी बजावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मान्यता घ्या, गायकवाडांचा पुतळा उभारु

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्याविषयी आदर आहे. ताराबाई पार्कातील कारंडे मळा येथील उद्यान परिसरातील त्यांच्या नावाचा फलक हटविलेला नाही. महापौर व गायकवाड कुटुंबीयांनी ताराबाई पार्क रेसिडेन्शीयल असोसिएशन्ससोबत चर्चा करुन, पुतळा उभारणीला मंजुरी घ्यावी. खासदार गायकवाड यांचा उद्यानात पुतळा उभारू' असे स्पष्टीकरण ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, रेसिडेन्शीयल व असोसिएशन्सचे अध्यक्ष व नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी केला.

ताराबाई पार्कातील या उद्यानाच्या नामकरणावरुन महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीतील राजकारण तापले आहे. उद्यान विकसित करताना येथे 'आकार गार्डन केएसबीपी' असा फलक लावला आहे. त्याला सत्ताधारी काँग्रेस आघाडीने जोरदार आक्षेप घेतला. २०१४ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत खासदार गायकवाड यांचे नाव या उद्यानाला देण्याचा सदस्य ठराव झाला होता. त्या ठरावाला सत्यजित कदम हेच सूचक होते हे काँग्रेस आघाडीने निदर्शनास आणले आहे.

याबाबत गटनेते कदम, नगरसेवक शिरोळकर म्हणाले, 'खासदार गायकवाड यांचा पुतळा उभारणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मान्यता दिली आहे. सुमारे १८ हजार ५०० चौरस फूट जागेवर लोकवर्गणीतून उद्यान विकसित केले आहे. 'आकार' या संकल्पनेचा अवलंब करुन वेगवेगळ्या डिझाइन केले आहे. तसा सदस्य ठराव होता. ऑफीस प्रस्ताव झाला नाही. शिवाय त्यावेळेच्या ठरावावर आता सह्या आणि शिक्के मारण्याचा प्रकार झाला आहे. उद्यानाच्या नामफलकाच्या अनावरणाला तत्कालिन विधासभा सभापती बाबासाहेब कुपेकर हजर नव्हते. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी खोटी माहिती देत आहेत. महापालिकेच्या इस्टेट विभागाने १५ फेब्रुवारी २०११ मध्ये रितसर नोंदणी करुन ही जागा ताराबाई पार्क रेसिडेन्शीयल असोसिएशन्सला २९ वर्षांच्या भाडेकराराने दिली आहे. लोकवर्गणीतून लाखो रुपये खर्चून उद्यान विकसित केले आहे. येथील माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड उद्यान हा फलक काढलेला नाही. '

केएसबीपी म्हणते...

'माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही. त्यांच्या कामाविषयी केएसबीपीला आदर आहे. आकार उद्यान हे नाव तेथे असणाऱ्या खेळणी व लहान मुलांना भूमितीचे प्रकार माहित होण्याच्या दृष्टीने दिले आहे. उद्यानाचे जुने नाव तसेच कायम आहे. महापौर व आयुक्तांनी परवानगी दिल्यास दिवंगत खासदार गायकवाड यांचा पुतळा स्वखर्चाने उभारू' असे पत्रक कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्पचे (केएसबीपी) प्रमुख सुजय पित्रे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केआयटीतर्फे ३ मार्चला ‘अभिग्यान’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे दरवर्षीप्रमाणेच यंदाही 'अभिग्यान' या संवादरूपी विचारमंथनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य व्ही. व्ही. कार्जिन्नी व प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. हॉटेल सयाजी येथे तीन मार्च रोजी होणाऱ्या अभिग्यानमध्ये आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे, डेटा अॅनालिस्ट ख्रिस्तीयन फ्रान्झ, प्रभाकर देवधर यांसह नामवंत वक्ते, उद्योजक विद्यार्थ्यांशी संवाद साधवणार आहेत.

प्राचार्य कार्जिन्नी म्हणाले, 'गेली सहावर्षे हा उपक्रम सुरू आहे. या वर्षी सीपीसी या जगद्विख्यात कंपनीचे कार्यकारी संचालक ख्रिस्तीयन फ्रान्झ बर्लिनहून येथे येत आहेत. डब्ल्यूएचओ, संयुक्त राष्ट्र संघासारखे मोठे क्लायंट असणारे ख्रिस्तीयन फ्रान्झ डेटा ऍनालिसिस क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. राजीव गांधीच्या काळातील पंतप्रधानांचे इलेक्ट्रॉनिक्स विषयाचे सल्लागार प्रभाकर देवधर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, 'पूर्णब्रह्म' ही महाराष्ट्रीयन फूड चेन सुरू करणाऱ्या जयंती कथाळे यादेखील अभिग्यानच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. केआयटी अभियांत्रिकीमहाविद्यालयातील 'वॉक विथ वर्ल्ड' ही विद्यार्थी समिती कार्यक्रमाचे संयोजन करत आहे.'

यावेळी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष अभिषेक कुलकर्णी, 'अभिग्यान'चे प्रमुख निखिल पाटील आणि प्रीतम सपाटे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्रनगरात ‘मैत्र बालवाचनालय’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लहान वयातच वाचनाची आवड लागावी, मुलांनी शाळा शिकताना प्रयत्नपूर्वक ती जोपासावी यासाठी पाच प्राध्यापक आणि दोन निवृत्त शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी एकत्र येऊन राजेंद्रनगरात 'मैत्र बालवाचनालय' स्थापन केले आहे. वाचनासोबतच मुलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.

डॉ. दिलीप माळी, डॉ. मंजुषा देशपांडे आणि डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी 'सार्थ शिक्षण संस्था' स्थापन केली आहे. संस्थेच्या माध्यमातून साहित्यिक आणि व्यक्तिमत्व विकास विषयक कार्यक्रम राबवून मुलांची जडणघडण करण्याचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 'मैत्र बालवाचनालय' आणि 'मौज बालभवन' सुरू करण्यात येणार आहे. राजेंद्रनगरातील कोल्हापूर पब्लिक स्कूलजवळील डॉ. करेकट्टी यांच्या 'स्वरश्री' बंगला येथे वाचनालय होणार आहे.

संस्थेच्या या उपक्रमांत डॉ. राजाराम गुरव, प्रताप मनपाडळेकर, डॉ. सतीश लोटके, डॉ. मनोहर वासवानी यांनी सहभाग घेतला आहे. या सातजणांनी एकत्र येऊन वाचनालयसाठी आवश्यक साहित्य जमविले आहे. त्यांना परिसरातील नागरिकांची साथ लाभली आहे. आतापर्यंत ५५० पुस्तके जमा केली आहेत. नॅशनल बॅक स्ट्रटकडून १५०० पुस्तके मागवली आहेत. वाचनालय आणि बालभवनचे रविवारी (ता. १७) सायंकाळी पाच वाजता उद्घाटन होणार आहे. प्रा. डॉ. माया पंडित यांच्या हस्ते आणि गोविंदराव यशवंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन कार्यक्रम होणार आहे.

लहान मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. वर्षभर साहित्यिक विषयक उपक्रम, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. पारंपरिक खेळ, व्यायाम, संगीत, कला नाट्य कार्यक्रम होणार आहेत.

- डॉ. तृप्ती करेकट्टी

लोगो : गुडन्यूज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या शहराचा सोमवारी पाणीपुरवठा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे सोमवारी (ता. १८) कावळा नाका येथील पाण्याच्या टाकीखालील पाइपलाइन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या विविध भागांना पाणीपुरवठा होणार नाही.

यामध्ये न्यू शाहूपुरी, विचारेमाळ, लिशा हॉटेल परिसर, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, मुक्तसैनिक वसाहत, रुईकर कॉलनी, महाडिक माळ, शिवाजी पार्क, मार्केट यार्ड, लोणार वसाहत, राजीव गांधी वसाहत, शाहू मिल कॉलनी परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. भागातील नागरिकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठा विभागातर्फे टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन आहे. मंगळवारपासून (ता. १९) पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल अशी माहिती जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परभणीच्या शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी या प्रश्नांवर चर्चा करुन प्रश्न सोडवला जाईल, अशी भूमिका किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी घेतल्यावर कोल्हापुरात आलेल्या परभणीच्या शेतकऱ्यांनी शनिवारी दुपारी ठिय्या आंदोलन स्थगित केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलनासाठी शेतकरी आले होते. पण, पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडून काढल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी काल सायंकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला होता.

परभणी तालुक्यातील ६१ हजार शेतकऱ्यांचे ५५ हजार हेक्टरमधील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची भरपाई मिळावी यासाठी संबधित शेतकऱ्यांनी विमा कंपन्या आणि सरकारकडे पाठपुरावा केला. पण भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने कृषीमंत्र्यांचा पदभार असलेल्या पालकमंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर तीन ऑक्टोबरला उपोषण केले. पालकमंत्री पाटील यांनी १० ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक आयोजित करून नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. पण त्याची कार्यवाही न झाल्याने काल शुक्रवारी दुपारी परभरणीहून रेल्वेने शेतकरी कोल्हापुरात आले. त्यांनी कावळा नाका येथील पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. मात्र तीन वाजता पोलिसांनी बळाचा वापर करुन आंदोलकांना ताब्यात घेतले आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोडले. त्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर महावीर गार्डनच्या संरक्षक भिंतीजवळ ठिय्या मारला.

किसान सभेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री आंदोलकाच्या भोजणाची व्यवस्था केली. आज शनिवारी सकाळी किसान सभेचे डॉ. अजित नवले, आमदार जे. पी. गावित, केंद्रीय अध्यक्ष अशोक ढवळे यांनी आंदोलकांशी संपर्क साधला. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक असून त्यावेळी नुकसान भरपाईचा मुद्द्यावर चर्चा केली जाईल, असे सांगून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर स्थानिक नेते डॉ. सुभाष जाधव यांच्या उपस्थितीत आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर सर्व शेतकरी परभणीला रेल्वेने रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तरप्रदेश उपमुख्यमंत्री सोमवारी कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सोमवारी (ता. १८) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हॉटेल पॅव्हेलियन येथे दुपारी साडेतीन वाजता 'भारत के मन की बात' या कार्यक्रमास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मौर्य हे दुपारी तीनच्या सुमारास विमानाने कोल्हापुरात येणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता पॅव्हेलियन हॉटेल येथे भारत के मन की बात कार्यक्रमास उपस्थित राहून भाजपमधील शेतकरी नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे, गोकुळचे संचालक बाबा देसाई उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आज, शनिवारी दुपारी शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. अर्ध्या तासानंतर पोलिसांच्या विनंतीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनानंतर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती.

वाढीव मानधन त्वरीत द्यावे, अंगणवाडी सेविकांना १५०० रुपये तर मदतनिसांना ७५० रुपये मानधन वाढ द्यावी, मे महिन्यात पगारी सुट्टी द्यावी या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने टाऊन हॉल येथून मोर्चास सुरुवात झाली. 'मुंबईच्या बबल्या काय म्हणतोय, वेतन द्यायला नाही म्हणतोय,' 'एक रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले या बेपत्ता' अशा घोषणा अंगणवाडी सेविकांनी दिल्या. शिवाजी चौकात अंगणवाडी सेविकांनी रस्त्यावर ठिय्या मारून आंदोलन केले. यावेळी कॉम्रेड नामदेवराव गावडे आणि सतीशचंद्र कांबळे यांची भाषणे झाली. निवृत्त कर्मचाऱ्यांतून सुपरवायझरची पदे तात्काळ भरावी, नोकरीवर हजर झाल्याचे लेखी पत्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावे, पगाराएवढा बोनस द्यावा, ऑनलाइनची कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देऊ नयेत, अशा मागण्या करण्यात आल्या.

आंदोलनात शुभांगी पाटील, सुनंदा खाडे, मीना पोवार, शकुंतला पाटील, भारती बोलाईकर, जयश्री पोवार, वंदना चोपडे यांच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआरमधील कोयना इमारतीच्या बाल विभागात ऑक्सिजनच्या सिलिंडरला गळती लागून स्फोट झाला. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सिलिंडर हटवल्याने अनर्थ टळला. हा प्रकार शुक्रवारी (ता. १५) रात्री उशिरा घडला. या घटनेने पुन्हा एकदा सीपीआरमधील फायर ऑडिट आणि सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना इमारतीत बालरोग विभागाच्या तळमजल्यावर ऑक्सिजन सिलिंडरच्या टाक्या ठेवल्या जातात. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक यातील एका टाकीतून ऑक्सिजनची गळती सुरू झाली. काही वळाने स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने सीपीआरमधील रुग्ण व त्यांचे नातेवाईक घाबरले. कर्मचाऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेऊन पाहणी केली असता, ऑक्सिजन सिलिंडरची गळती सुरू असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने या घटनेची वर्दी अग्निशामक दलाला दिली. दरम्यान, अग्निशामक दलाचे जवान येईपर्यंत सीपीआरमधील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आगप्रतिबंधक यंत्राने फवारे मारून परिस्थिती नियंत्रणात आणली होती. लक्ष्मीपुरी व कावळा नाका येथील आग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन सिलिंडर हटवून गळती बंद केली.

दरम्यान, सीपीआरमधील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे फायर ऑडिट झाली नसल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वारंवार सूचना देऊनही सीपीआर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. चुकून आग लागली असती तर, सीपीआरमध्ये मोठा अनर्थ घडला असता, त्यामुळे त्वरित सीपीआरमधील तांत्रिक तपासणी आणि फायर ऑडिट होणे गरजेचे असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेतदोन युवकांचा मृत्यू

$
0
0

वाहनाच्या धडकेत

दोन युवकांचा मृत्यू

सोलापूर :

सोलापूर-विजापूर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटारसायकलवरील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास सोरेगावनजीक घडली. ओंकार शिवानंद मेहता (वय ३० रा. सिद्धेश्वरनगर) आणि त्याचा मित्र सचिन विश्वनाथ बाळगी (वय २५, राहणार बेघर सोसायटी इंदिरा नगर) अशी मृतांची नावे आहेत. मृत दोघे मित्र एमएच-१३-सीसी-३०३१ मोटार सायकलवरून सोरेगावहून सोलापूरला येत होते. त्यांच्या दुचाकीला पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाची धडक बसली. गंभीर अवस्थेत ते रस्त्याच्या कडेला पडले होते. पोलिसांनी दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी सरकारी रुग्णालय दाखल केले, असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात आज राज्य मापाडी परिषद

$
0
0

सोलापुरात आज

राज्य मापाडी परिषद

सोलापूर :

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगारांची राज्यव्यापी परिषद आज, रविवारी सोलापूर येथील वि. गु. शिवदारे मंगल कार्यालय येथे आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली आहे. पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मापाडी कामगारांची परिषद आम्ही सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख व कामगार मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हमाल भवनचे उद्घाटन होणार आहे. परिषदेस राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, असेही शिवाजीराव शिंदे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images