Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सेंट्रिंग कामगाराला मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा गडहिंग्लज

कामावरून घरी परतणाऱ्या सागर चंद्रकांत शिंदे या सेंट्रिंग कामगाराला तिघांनी बेदम मारहाण केली. गिजवणे येथील या घटनेने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी तुषार प्रकाश कांबळे, अजय कांबळे, शंकर कांबळे (सर्व रा. गिजवणे) या संशयितांवर गडहिंग्लज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. सागर शिंदे कामावरून घरी परतत असताना त्याची मोटरसायकल अडवून, 'तू आम्हाला विचारणार कोण?' असा जाब विचारत तिघांनी फायबरच्या पाइपने बेदम मारहाण केली. मारहाण करून व शिंदे याला गंभीर जखमी करून तिघेही पळून गेले. जखमी सागर शिंदे याला कोल्हापूरला सीपीआरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे गिजवणे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिस उपअधीक्षक अनिल कदम, प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक साळुंखे यांनी परिस्थिती हाताळत वातावरण बिघडू दिले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अन् मृत्यूने त्याला झोपेतच गाठले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

पेट्रोल पंपावर थांबलेल्या ट्रकखाली झोपलेल्या तरुणाच्या अंगावरून ट्रक गेल्याने झालेल्या दुर्दैवी अपघातात एकजण जागीच ठार झाला. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गालगतच्या शिवसमर्थ पेट्रोल पंपावर ही घटना घडली. सुनील राजाराम पाटील (वय ३०, रा. पिशवी पैकी खोतवाडी, ता. शाहूवाडी) असे मृत तरुणाचे नाव असून शाहूवाडी पोलिसांत अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पिशवीपैकी खोतवाडी (ता. शाहूवाडी) येथील सुनील पाटील हा पत्नीला माहेरी सोडून मलकापूरहून बांबवडेच्या दिशेने मोटारसायकलवरून गावाकडे परतत होता. वाटेत त्याच्या मोटारसायकलमधील पेट्रोल संपले. पेट्रोल भरण्यासाठी तो मोटारसायकल घेऊन बांबवडेतील कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गालगतच्या शिवसमर्थ पेट्रोल पंपावर पोहचला. पण रात्री बंद पंपावर पेट्रोल न मिळाल्याने व गावाकडे जाण्याचा पर्याय नसल्याने मोटारसायकल तेथेच थांबवून सुनील येथेच थांबलेल्या एका अवजड ट्रकखाली झोपला. पहाटे पावणेचारच्या सुमारास संबंधीत ट्रकचालक हा अवजड ट्रक सुरू करून पंपावरून पुढील प्रवासाला निघून गेला. यावेळी झोपलेल्या सुनीलचा चिरडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेराद्वारे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. दत्तात्रय खंडागळे या कर्मचाऱ्याने घटनेची पोलिसांत फिर्याद दिली. कोळसा वाहतूक करणारा हा ट्रक असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. त्याचा शोध सुरू आहे. बांबवडे दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार एम. के. पवार हे तपास करीत आहेत.

दरम्यान ट्रकखाली चिरडून ठार झालेला सुनील पाटील हा कोल्हापूर परिसरातील औद्योगिक वसाहतीत हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करीत होता. त्याच्यामागे पत्नी, लहान मुलगा व मुलगी, शेतकरी आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. सुनीलच्या अकाली अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर अपक्ष लढण्याची डोंगळे यांची घोषणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

'काँग्रेसचे तिकीट मिळाले तर पक्षामार्फत आणि न मिळल्यास विधानसभेला अपक्ष लढू' असे प्रतिपादन गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी केले. राधानगरी दूध उत्पादक पतसंस्थेच्या २४व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी छत्रपती राजाराम साखर कारखान्याचे संचालक सुधाकर साळुंखे होते.

'विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. पुढच्या वर्षी होणारी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढणार आहे' असे डोंगळे यांनी यावेळी जाहीर केले. चेअरमन डी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात तालुक्यातील लाभार्थींना गॅस वाटप करण्यात आला. वर्षाला संस्थेस एकावन्न लाखाचा नफा मिळविणारी तालुक्यातील रकमेव संस्था आहे असे पाटील यांनी सांगितले. यावेळी व्हाइस चेअरमन चंद्रकांत पाटील, उदय पाटील, कुंडलिक पाटील, के. द. पाटील, रामभाऊ काशीद, राजू चव्हाण, राजेंद्र चौगले आदी उपस्थित होते. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळोखे, सुनीता पाटील (मालवे), मंदाकिनी पाटील, सारिका पताडे, अशोक पाटील, संभाजी कांबळे, स्वाती पुंगावकर आदींचा सत्कार करण्यात आला. रवी कदम यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी आणण्यात माजी सभापतींना अपयश

$
0
0

नूतन स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गेल्या वर्षीच्या निवडणुकीत स्थायी समिती सभापतीपद भाजपने मिळवले. पण वर्षभरात राज्य सरकारकडून निधी मिळाला नाही. पालकमंत्री जिल्ह्यातील असूनही निधी आणण्यात सभापतींना अपयश आले ' असा आरोप करत भविष्यातही सरकारकडून निधी मिळणार नाही. त्यामुळे शहराच्या पर्यटनवाढीसाठी बीओटी तत्वावर प्रकल्प कार्यन्वित करुन पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न राहील,' अशी माहिती स्थायी समितीचे नूतन सभापती शारंगधर देशमुख यांनी दिली. सभापतीपदी विजय मिळवल्यानंतर ते पत्रकार बैठकीत बोलत होते.

सभापती देशमुख म्हणाले, 'वर्षभराच्या कारकीर्दीत माजी सभापतींना सरकारकडून निधी आणण्यात अपयश आले. पालकमंत्री जिल्ह्यातील असताना महापालिकेला निधी मिळाला नाही. सत्तारुढ आघाडीच्यावतीने निधीसाठी पालकमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन निधीची मागणी केली. पण भविष्यातही निधी मिळणार नाही. याउलट तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी महापालिकेसाठी भरघोस निधी दिला. राज्य सरकारकडून निधी मिळणार नसल्याने बीओटीतत्वावर प्रकल्प विकसित करण्यात येतील.'

'दरवर्षी शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असली, तरी त्यांचे एक दिवसाचे पर्यटन होते. पर्यटकांचा शहरात मुक्काम वाढून आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी हुतात्मा पार्क किंवा महावीर गार्डन विकसित करण्यात येईल. तसेच सेव्हन डी थिअटर बांधून पर्यटनवृद्धीचा प्रयत्न करणार आहे,' असेही देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राधानगरीसाठी माझी उमेदवारी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

'राधानगरी विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार आहे. गोरगरिबांचा प्रतिनिधी म्हणून मतदार माझी निवड करतील' असा विश्वास ओमसाई उद्योग समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील-कौलवकर यांनी व्यक्त केला. सावर्धन (ता. राधानगरी) येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ए. वाय. पाटील-कुंभारवाडीकर होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'गेली पन्नास वर्षात मुबलक पाणी जमीन असूनही तालुक्याची प्रगती झालेली नाही. एकही औद्योगिक प्रकल्प उभारता आलेला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. निवडणुकीत गुलाबी स्वप्ने दाखविणाऱ्या घरंदाज राजकीय नेत्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे. आणखी किती वर्षे फसवणूक करणार? असा सवालही आहे.'

शिवाजी रेडेकर यांनी स्वागत केले. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. ए. वाय. पाटील, शिवाजी रेडेकर, उदय पाटील, लखन साबळे, मारुती भोसले, विश्वास पाटील, अक्षय कानडे, संजय असणेकर, राजेंद्र पाटील आदींची भाषणे झालीत. सुधाकर पाटील, ओम पठाडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. स्वप्नील जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचे वर्चस्व कायम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या स्थायी समिती, महिला बालकल्याण व प्रभाग समिती सभापतिपदाच्या मंगळवारी झालेल्या निवडीत सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने वर्चस्व कायम राखले. विरोधी भाजप-ताराराणीच्या आव्हानातील हवा काढत सत्ता कायम राखल्यानंतर महापालिका चौकात जल्लोषाला उधाण आले. ढोल-ताश्यांचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची मुक्त उधळण करत नगरसेवकांसह समर्थकांनी ठेका धरला. निवडीमध्ये सत्तारुढ आघाडीला शिवसेनेचा पाठिंबा कायम असल्याचा संदेशही निवडीच्या निमित्ताने पुन्हा मिळाला.

महापालिकेचे आर्थिक सत्ताकेंद्र आणि विकास प्रकल्पामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या स्थायी समिती सभापतिपदावर काँग्रेस आघाडीचे शारंगधर देशमुख विजयी झाले. गतवर्षी झालेल्या निवडीमध्ये बहुमत असूनही सत्तारुढ गटाला भाजप-ताराराणी धक्का देत स्थायी सभापतिपद खेचून घेतले होते. त्यामुळे 'स्थायी'च्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पक्षीय बलाबल आणि सेनेचा पाठिंबा असल्याने विजय निश्चित मानला जात होता. तरीही कोणताही दगाफटका होऊ नये, यासाठी स्थायीचे सर्व सदस्य गोवा येथे सहलीसाठी गेले होते. गोवा येथून सर्व सदस्य सोमवारी रात्री बेळगाव येथे मुक्कामास आले. तर विरोधी आघाडीच्या सदस्यांचा कोल्हापुरातच मुक्काम होता. सत्तारुढ गटाचे सर्व सदस्य व नगरसेवक आमदार सतेज पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयात सकाळी दाखल झाले. समितीचे सर्व सदस्य पिवळे तर इतर नगरसेवक गुलाबी रंगाचे फेटे परिधान करून महापालिकेत दाखल झाले. ऋतुराज पाटील, राजू लाटकर यांच्यासमवेत सभापतिपदाचे उमेदवार शारंगधर देशमुख दाखल झाले. तत्पुर्वीच विरोधी आघाडीचे सदस्य सभागृहात पोहोचले. त्यानंतर महिला बालकल्याण समिती सभापतिपदाच्या उमेदवार अनुराधा खेडकर दाखल झाल्या. यावेळी आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच निवडीपूर्वी ढोल-ताशांच्या लवाजमा तयार ठेवला होता.

प्रथम पीठासन अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक झाली. अपेक्षेप्रमाणे देशमुख विजयी झाल्यानंतर जल्लोषाला सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या महिला बालकल्याण समिती सभापतीपदीही अनुराधा खेडकर विजयी झाल्यानंतर जल्लोषाला उधाण आले. त्यानंतर दोन्ही सभापतींची वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या.

यावेळी महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, महेश सावंत, मोहन सालपे, सचिन पाटील, विनायक फाळके, डॉ. संदिप नेजदार, दिलीप पोवार, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, आदिल फरास, नंदकुमार मोरे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी अभिनंदन केले.

नगरसेवकांनी घेतला धसका

गेल्या वर्षी झालेल्या स्थायी समिती निवडीमध्ये भाजप-ताराराणी आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांना फोडत सभापतिपद मिळवले. निवडी दरम्यान मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा शहरात वर्षभर सुरू होती. पण नंतर झालेल्या घडामोडीत फुटीर नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांचे पक्षातंर बंदी कायद्यानुसार पद अपात्र ठरले. त्यामुळे आजच्या निवडीत अशी जोखीम घेतल्यास नगरसेवकपद अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने समितीतील सदस्यांनी विरोधी आघाडीच्या चर्चेतही सहभाग घेतला नसल्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती.

आमदार सुमन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यालय प्रवेश

महापालिकेच्या स्थायी, महिला बालकल्याण व प्रभाग समिती सभापतिपदाची निवड पार पाडली. प्रथम 'स्थायी'मध्ये अपेक्षेप्रमाणे सत्तारुढ आघाडीने विजय मिळवल्यानंतर महापालिकेत रांगोळी काढण्यात आली. तर स्थायी समितीच्या सभापती कक्षाला फुलांची सजावट केली. निवडीनंतर तासाभरात तासगावच्या आमदार सुमनताई पाटील महापालिकेत दाखल झाल्या. त्यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. नतून सभापती देशमुख यांनी आमदार पाटील यांच्या प्रमुख उपस्थित कार्यालयात प्रवेश केला.

देशमुख दुसऱ्यांदा स्थायी सभापती

स्थायी सभापतिपदी देशमुख यांची दुसऱ्यांदा निवड झाली. २०१२-१३ मध्ये स्थायी सभापतिपद भूषविले होते. काँग्रेसचे गटनेते असलेले देशमुखांची प्रशासनावर चांगलीच पकड मिळवली आहे. तसेच काँग्रेसचा गट एकसंध ठेवण्यात त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच त्यांना दुसऱ्यांदा सभापतिपदाची संधी मिळाली. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पदाला चांगलेच महत्त्व प्राप्त होणार असल्याने पक्ष नेतृत्वाने त्यांची सभापतिपदाची जबाबदारी सोपवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शौचालय रंगवा’ मोहिमेत सीईओ, बीडीओंचा प्रत्यक्ष सहभाग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

कोल्हापूर जिल्हा परिषदेने २८ जानेवारी रोजी एक दिवस शौचालयासाठी हा उपक्रम हाती घेतला. मोहिमेंतर्गत करवीर तालुक्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश भोसले यांनी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी आपापल्या गावात प्रत्यक्ष सहभाग घेतला.

केंद्र व राज्य शासनाने १ ते ३१ जानेवारी या कालावधीत स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन केले आहे. या मोहिमेला लोकचळवळीच्या माध्यमातून गती देणेसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने सोमवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावागावात लोकसहभागातून शौचालय रंगविण्यासंदर्भात मोहीम राबवली. हिरवडे खालसा येथे पंचायत समिती सदस्या सविता राजाराम पाटील, सडोली दुमाला येथे जिल्हा परिषद सदस्या शिल्पा चेतन पाटील, कांचनवाडी येथे माजी उपसभापती विजय भोसले, पीरवाडी येथे आश्विनी कृष्णा धोत्रे यांनी या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

फोटो

'एक दिवस शौचालयासाठी' मोहिमेत वळीवडे (ता. करवीर) येथे प्रत्यक्ष सहभाग घेताना सीईओ अमन मित्तल, करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाडगे व आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीधर्माचा नारा वाऱ्यावर

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शरद पवार आणि राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्म पाळावाच लागेल, असा नारा आणि इशारा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून दिला जात आहे. हा नारा देताना पक्षातील मनभेद आणि मतभेद व्यासपीठावर दिसू लागल्याने पक्ष धर्माचे काय, याची चिंता आता राज्यस्तरीय नेत्यांनी सतावू लागली आहे. आमदार हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांच्यातील मतभेदाराची दरी, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षात सुरू असलेल्या गटबाजीने नेत्यांवरील संकट मात्र वाढत आहे.

दोन्ही काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी झाल्यात जमा आहे. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला तर हातकणंगलेची जागा स्वाभिमानीला देण्याचा निर्णय कधीच झाला आहे. तेथील उमेदवारही ठरले आहेत. पक्ष देईल त्या उमेदवाराच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहा, आघाडी धर्म पाळा, असे आवाहन करत प्रचाराला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीने परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने प्रचाराचा नारळ फोडलेला आहे. तर काँग्रेसने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी प्रकाश आवाडे यांना देत कामाला लागा असा संदेश दिला आहे. लोकसभेसाठी दोन्ही पक्षाचे नेते सज्ज आहेत. पण पहिल्याच घासाला मिठाचा खडा लागावा अशी या दोन्ही पक्षांची अवस्था झाली आहे. कारण दोन्ही पक्षांचे नेते आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन करताना त्यांच्याच पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आघाडी धर्म पाळण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. या मनस्थितीचा पुरावाही मिळत आहे.

राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आमदार हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी खासदार धनंजय महाडिक यांना भाषण करण्यापासून रोखले. ही अचानक उमटलेली प्रतिक्रिया नव्हती. त्यामागे दोन गटांतील राजकारण आहे. आता ते शांत होण्याऐवजी त्याला धार येत आहे. पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणायचेच, असा निर्धार व्यासपीठावर होत आहे, पण प्रत्यक्षात व्यासपीठासमोरच्या कार्यकर्त्यांची तशी मानसिकता दिसत नाही. अजूनही पक्षापेक्षा गट, नेता यालाच प्राधान्य दिले जात आहे. जे पक्षाच्या वाढीला धोकादायक आहे. निवडणूक आली की, पक्ष आणि इतरवेळी गट या नेत्यांच्या समीकरणाचेच पडसाद आज उमटताना दिसत आहेत. मुश्रीफ आणि महाडिक यांच्यातील मतभेद न मिटल्याचाच हा पुरावा आहे. महिन्याभरात हे मनभेद मिटवून ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आव्हान काँग्रेससह राष्ट्रवादीसमोर आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे, मात्र अजूनही राष्ट्रवादीतील मतभेद मिटायला तयार नाहीत. पक्षातील नेते एकमेकांच्या उलटे असताना मित्रपक्षांनी आघाडी धर्म पाळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाचा धर्म पाळून मित्रपक्षासमोर नैतिक दबाव तयार करण्याची आवश्यकता आहे. जी गोष्ट राष्ट्रवादीची तीच काँग्रेसची आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून प्रकाश आवाडे यांच्या खांद्यावर जबाबदारी दिल्यानंतर चार दिवसांत मतभेदच जास्त दिसले. माजी जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांची स्वागताला असलेली अनुपस्थिती, अभिनंदनाच्या वर्षावात त्यांचा टाळलेला फोटो हे सारे त्याचेच द्योतक आहे. आवळे, आवाडे व सतेज पाटील एक होताना पी.एन. गटाला विरोध करण्याचा प्रयत्न होणार यात शंका नाही. त्याची सुरूवातही झाली आहे. पक्षातच एकमेकांना मदत न करण्याची यापूर्वीचीच भूमिका कायम राहिली. त्यामुळे राष्ट्रवादीला मदत करत आघाडी धर्म पाळण्याची अपेक्षा फार दूर आहे, प्रथम पक्षातील मतभेद मिटवण्याचेच मोठे आव्हान आहे.

..........

चौकट

निवडणुकीत वेगळे काय होणार ...

आम्ही सारे एक आहोत, हे दाखवण्यासाठी कोल्हापुरात झालेल्या परिवर्तन मेळाव्यात सर्व नेत्यांनी हातात हात घालून ते उंचावले, पण शेजारी शेजारी उभे राहूनही पक्षाच्या आजी माजी जिल्हाध्यक्षांनी हातात हात देण्याचे टाळले. मग के.पी. पाटील व ए.वाय. पाटील यांच्यातील मतभेद मिटले असे कसे म्हणायचे, पक्षाचा खासदार मोठा कार्यक्रम घेतो, तिकडे पक्षाचा एकही नेता, नगरसेवक फिरकत नाही, तरीही सारे एकदिलाने कामाला लागतील असे म्हणायचे का ? नेत्यांच्या समोर एकीचा फार्स देखील होत नसेल तर निवडणुकीत काय होणार हे वेगळे सांगायची गरज नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचायत सशक्तीकरणमध्ये जिप राज्यात अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंडित दिनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यामध्ये अव्वल ठरली आहे. पंचायत सशक्तीकरण पुरस्कार व नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभेत राज्यस्तरावर गौरविलेल्या संस्थांना नवी दिल्ली येथे एप्रिल महिन्यात सन्मानित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय पथकाद्वारे जिल्हा परिषदेची सात ते नऊ फेब्रुवारी या कालावधीत पडताळणी होणार आहे. केंद्रीय स्तरावरील निवड प्रक्रियेसाठी राज्यातून कोल्हापूर जिल्हा परिषदेची एकमेव शिफारस झाली आहे.

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कमिटीमार्फत डिसेंबर २०१८ मध्ये जिल्हा परिषदेच्या कामकाजाची, योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली होती. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची पूर्तता, विविध कमिट्यांचे कामकाज, सदस्यांचा सहभाग अशा विविध बाबी विचारात घेतल्या होत्या. पंचायत सशक्तीकरणमध्ये राज्यस्तरावर जिल्हा परिषद उत्कृष्ट ठरल्यामुळे केंद्रीय स्तरासाठी शिफारस करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या ग्राम विकास विभागातर्फे मंगळवारी जिल्हा परिषद प्रशासनाला या संदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. केंद्रीय पथकास आवश्यक कागदपत्रे, सरकारच्या विविध योजनांचे निर्णय, परिपत्रके तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत अधिनियमांच्या अद्ययावत इंग्रजी प्रती उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत.

दरम्यान सातारा आणि सांगली जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींना नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील बानवडी ग्रामपंचायत व सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील अंकलखोप ग्रामपंचायतीचा समावेश आहे. केंद्रीय पथक सातारा जिल्ह्यात एक व दोन फेब्रुवारी तर सांगली जिल्ह्यात तीन व सहा फेब्रुवारी या कालावधीत पडताळणी करणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्र्यांनी जातीयवादी बोलणे योग्य नाही

$
0
0

जयंत पाटील यांचा चंद्रकांत पाटलांना टीका

कोल्हापूर टाइम्स टीम

'मंत्रिमंडळातील मंत्र्याने जातीयवादी बोलणे योग्य नाही. मराठा समाजाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनेही आरक्षण दिले होते, पण भाजप सरकारला ते टिकवता आले नाही. म्हणून त्यांचा द्रविडी प्राणायम सुरू आहे,'असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.

जालना येथील भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत महसूलमंत्री पाटील यांनी मराठा समाजाला मराठा मुख्यमंत्र्यांनी नव्हे तर ब्राह्मण मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिले, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पाटील यांनी जातीयवादी बोलणे योग्य नाही, अशा शब्दांत टीका केली. तसेच मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टवादी पार्टी अशी टीका केली होती, त्यावर बोलताना त्यांनी म्हणाले, 'अशा वक्तव्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही. भाजपकडे गेली साडे चार वर्षे सत्ता आहे, त्यांना आरोप का सिद्ध केले नाहीत?' अशी विचारणाही केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा अतिक्रमणे जाळून टाकू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहराला अतिक्रमणाचा विळखा वाढत चालला असून मुख्य मार्गावर वाहतूक कोंडीसह अपघाताच्या घटना घडत आहेत. ही अतिक्रमणे तातडीने न हटविली गेल्यास ती जाळून टाकू असा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेच्यावतीने देण्यात आला आहे. वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात मंगळवारी नगरपालिकेवर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

इचलकरंजी येथील मुख्य मार्गासह सर्वच रस्त्याच्या दुतर्फा आणि जागा मिळेल त्याठिकाणी अतिक्रमणे वाढत चालली आहेत. या अतिक्रमणांविरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढत असतानाही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. मोक्याच्या ठिकाणी अतिक्रमण करून हातगाडे, छोट्या टपऱ्या बसविल्या जात आहेत. त्यामुळे ठाण मांडून बसलेली ही अतिक्रमणे हटवण्याची मागणी होत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र वाहतूकसेनेच्यावतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख महादेव गौड, शहरप्रमुख सयाजी चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्षा अलका स्वामी, मुख्याधिकारी दिपक पाटील यांची भेट घेतली. यावेळी चर्चेत अतिक्रमणे तातडीने हटविण्याचे ठरले. शिष्टमंडळात नगरसेविका उमा गौड, संगिता आलासे, रामभाऊ पाटील, विजय देवकर, शिवानंद हिरेमठ, विजय देवकर, संजय पाटील, दत्ता साळुंखे, विजय जोशी, गुंडू विठ्ठाण्णा, राजू नेजे, आशिष कविशील आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमर्शिअल बँकेच्या कार्यालयाचे नुतनीकरण

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व अद्ययावत बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दि कमर्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या शाहुपूरी येथील प्रधान कार्यालय व मुख्य शाखेचा नूतनीकरण समारंभ बँकेचे चेअरमन राजेंद्र डकरे यांच्या हस्ते झाले. शनिवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बँकेच्या प्रधान कार्यालयाचे नुतनीकरण झाल्याने ग्राहकांना आरटीजीएस, एनइएफटी, मोबाइल बँकिंग आदी सुविधा त्वरित पुरवताना अत्याधुनिक संगणक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. बदलामुळे ग्राहकांना कमीत-कमी वेळेत बँकिंग व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. तसेच आधुनिक आणि नुतनीकरणामुळे बँकेच्या कर्मचारी वर्गाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

समारंभास कोल्हापूर अर्बन बँकेचे चेअरमन उमेश निगडे, संचालक शिरीष कणेरकर, मधुसूदन सावंत, यशवंतराव साळोखे, विश्वास काटकर, जयसिंगराव माने, सुमित्रादेवी शिंदे, अॅड. शामराव शिंदे सत्यशोधक बँकेचे चेअरमन सुलोचना नायकवडी, हर्षद शेठ, सीईओ राजीव रणदिवे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील सर्व शाळा डिजिटल करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा परिषदेतील सर्व शाळेतील वर्ग खोल्या नजीकच्या काळात डिजिटल केल्या जातील' अशी ग्वाही शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक गगनबावडा तालुक्यातील कोदे खुर्द विद्यामंदिर येथे झाली. दरम्यान, कस्तुरबा गांधी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये वाणिज्य विभाग सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली. पालकांनी सदस्यांची भेट घेऊन निवेदनही सादर केले.

जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांनी लोकसहभागातून कोदे खुर्द विद्यामंदिर विकसित केले आहे. या डिजिटल शाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिक्षण समितीच्या बैठकीत अन्य विषयांवर चर्चा झाली. यामध्ये 'डॉ. जे. पी. नाईक माझी शाळा...समृद्ध शाळा'अभियान स्पर्धेचा बक्षीस समारंभ फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे ठरले.

केंद्रप्रमुख, तालुकाप्रमुख आणि जिल्हास्तरावर स्पर्धा होत असून विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे. यासंदर्भात चर्चा झाली. चर्चेत सदस्य भगवान पाटील, वंदना जाधव, विनय पाटील, प्रियांका पाटील, स्मिता शेंडुरे, प्रा. अनिता चौगुले आदी उपस्थित होते. दरम्यान राधानगरी तालुक्यातील कोदे तर्फ मानेवाडी आणि गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील शाळा जिल्हा परिषदेतर्फे चालविण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे सदस्य विनय पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खानापूर-एरंडोळ रस्ताप्रश्नी नुकसानभरपाईची मागणी

$
0
0

आजरा : आजरा तालुक्यातील खानापूर ते लाटगाव व एरंडोळ दरम्यान सध्या रस्ता बांधणी काम सुरू आहे. मात्र या मार्गालगतच्या शेतकऱ्यांना कोणतीही माहिती अथवा नोटीस न देता हे काम सुरू आहे. या गावातील शेतकऱ्यांनी या आधीच चित्री प्रकल्पास जमिनी दिल्याने त्यांच्यावर अल्पभूधारक होण्याची वेळ आलेली आहे. असे असताना पुन्हा त्यांच्यावर नुकसान सोसण्याची वेळ येणे चुकीचे आहे. संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा आजरा शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार यांनी निवेदनातून दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सहिनीशी याबाबतचे निवेदन आजरा तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदार-शेतकऱ्यांत सरकारचा भांडणे लावतेय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'भाजप सरकार गेल्या साडेचार वर्षांत शेतीच्या मालाच्या दीडपट हमीभाव व शेती, उद्योग यासह सर्वच क्षेत्रात अपयशी ठरले असून साखर उद्योग अडचणीत आणून कारखानदारी देशोधडीला लावण्याचे काम होत आहे. कारखानदारी अडचणीत असताना चांगल्या साखर कारखान्यांना नोटिसा काढून एफआरपीच्या तिढ्यात अडकवून कारखानदार व शेतकऱ्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग सरकार करत आहे' असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जवाहर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी केला. हुपरी (ता. हातकणंगले) येथे जवाहर शेतकरी साखर कारखाना कार्यस्थळी कार्यकर्त्यांच्यावतीने आयोजित सत्कार सोहळा व कारखान्यांच्या १२ लाख ३० हजार साखर पोत्यांचे पूजन अशा संयुक्त कार्यक्रमात आवाडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे हे होते.

नूतन अध्यक्ष आवाडे म्हणाले, 'साखरेचे दर मोठ्या प्रमाणात उतरले असताना राज्य सरकारने कोणतीही मदत अद्याप केलेली नाही. साखर उद्योगावर संक्रांत आली आहे. एफआरपी देणे गरजेचे असताना सरकारच्या कुचकामी धोरणांमुळे कारखानदारीसमोर अडचणी आहेत. यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही यावर्षी उसाला २३०० रुपये दर देण्यात येईल. फक्त साखर कारखानदारांना टार्गेट करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. इचलकरंजीच्या वस्त्रोद्योग व्यवसायाला घरघर लागली असून उद्योजकांना यंत्रमाग भंगारात विकण्यास सरकार भाग पाडत आहे. या भाजपला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकीत जिल्हा काँग्रेसमय होणार असून खासदार व सहा आमदार काँग्रेसचे असणार असतील.'

नूतन जिल्हा अध्यक्ष आवाडे यांची जवाहर साखर कारखाना कार्यस्थळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल-ताशांच्या निदादात जल्लोषी वातावरण मिरवणूक काढण्यात आली. कर्नाटक प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष माजी आमदार वीरकुमार पाटील, विलास खानविलकर, मोहन भंडारे, पी. एम. पाटील, शामराव कुलकर्णी आदींची मनोगते व्यक्त केली. इंदुमती आवाडे, किशोरी आवाडे, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, तालुकाध्यक्ष भगवान जाधव, पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, जि. प. सदस्य राहुल आवाडे, बंडा माने आदी उपस्थित होते.

मागील वर्षीचा १२५चा हप्ता देणार

'साखर कारखानदारी अडचणीत असलीतरी चालू वर्षाची एफआरपीचे २३०० रुपये बुधवारी खात्यावर जमा होणार. मागील तिसऱ्या हप्त्याचे १२५ रुपये लवकरच देणार आहे' असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जप्त केलेला वाळू वाहतुकीचा ट्रक लंपास १

$
0
0

जप्त केलेला वाळू वाहतुकीचा ट्रक लंपास

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रक महसूल विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला. मात्र हा ट्रक चोरट्यांनी तहसिल कार्यालयाच्या आवारातून लंपास केला. सोमवारी रात्री ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, २५ जानेवारी रोजी नृसिंहवाडी -औरवाड मार्गावर विनापरवाना वाळू वाहतूक करणारा ट्रक (एमएच ५० - ७४७५) मंडल अधिकारी बबन पाटील, तलाठी सुशील कुराडे, गावकामगार पोलिस पाटील यांच्या पथकाने पकडला. यावेळी ट्रकचालकाने आपले नाव सचिन दादासो जगताप (रा. करोली ता. मंगळवेढा जि. सोलापूर) असे सांगितले. महसूल विभागाने पंचनामा करून ट्रक ताब्यात घेतला होता. हा ट्रक शिरोळ तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसमोर लावण्यात आला होता. ट्रकची चावी महसूल विभागाने आपल्या ताब्यात ठेवली होती. सोमवारी रात्री चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने वाळूने भरलेला ट्रक लंपास केला. ट्रक चोरीस गेल्याचे निदर्शनास येताच या घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरदे खिंडीत एकाची आत्महत्या

$
0
0

हातकणंगले : नरेंद्र (ता. हातकणंगले) येथील खिंडीत एका ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. ही व्यक्ती कर्नाटकातील बोरगाव येथील असल्याचे समजते. त्याचे नाव समजू शकले नाही. याबाबत हातकणंगले पोलिसांत नोंद झाली आहे. नरंदे खिंडीत अज्ञात व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. तेथील एका झाडाखाली टीव्हीएस मोपेड दुचाकी आढळून आली. मृतदेह उत्तरतपासणीसाठी हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवून पोलिस मृताच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. पोलिस हवालदार कोरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत पडून जंगली गव्याचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

कातळेवाडी (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीतील शेत विहिरीमध्ये मृतावस्थेतील गवा आढळून आला. शेतमालक बापू तुका पाटील हे मंगळवारी सकाळी विहिरीकडे गेल्यानंतर ही घटना त्यांच्या निदर्शनास आली.

पाटील यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर सहायक वनरक्षक विजय गोसावी, मलकापूर परिक्षेत्र वनाधिकारी नंदकुमार नलवडे हे वनपाल, वनरक्षक आदी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने व जेसीबीच्या साहाय्याने सुमारे वीस फूट खोल विहिरीतून मृत गव्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. गव्यांचा मुक्त संचार असणाऱ्या पेंडाखळे वनपरिक्षेत्रांतर्गत नांदारी, माळापुडे वनहद्दीपासून अवघ्या अडीचशे मीटर अंतरावर ही विहिर आहे. रात्रीच्या अंधारात विहिरीत पडलेल्या या पाच वर्षे वयाच्या गव्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला. तालुका पशुधन अधिकारी डॉ. सातपुते यांच्या देखरेखीखाली सहाय्यक मेढे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृत गव्याचे पेंडाखळे वनहद्दीत अज्ञातस्थळी उशिरा दहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित, दिव्यांग, परित्यक्तांचा आजरा तहसिलवर मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यामध्ये वंचित अपंग, विधवा, परित्यक्त्या, निराधार आणि देवदासींनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजरा तहसिल कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला.

छत्रपती शिवाजी पुतळ्यापासून मोर्चाला सुरवात करण्यात आली. संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली शहरातील मुख्य बाजारपेठ, संभाजी चौक आदी मार्गाने मोर्चा तहसिल कार्यालयावर आला. शासन व प्रशासनाच्या धोरणाबाबत घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेमध्ये झाले.

देसाई म्हणाले, 'शासकिय अधिकाऱ्यांना दोन महिने पगार दिला नाही तर मोर्चा निघतो. पण या गरिब आणि सर्वार्थाने वंचित विधवा, दिव्यांग आणि निराधार परीतक्त्या महिलांना दोन महिने झाले तरीही शासनमान्य पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळे देशात राबणाऱ्या, मातीत हात घातल्याशिवाय पोटाला काहीही न मिळू शकत नसलेल्या आणि शेणा-मातीत काम करणाऱ्या निराधार महिला वर्गाची ही पिळवणूक आहे.'

डॉ. नवनाथ शिंदे, संघटनेचे कार्यकर्ते नारायण भंडागे, प्रकाश मोरस्कर, सरिता कांबळे, बबन चौगुले आदींसह निधीच्या प्रतीक्षेतील महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणी तरुणास कारावास

$
0
0

जयसिंगपूर : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी यड्राव (ता. शिरोळ) येथील तरुणास जयसिंगपूरचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. शिंदे यांनी एक वर्ष कारावास व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. तुषार महादेव कांबळे (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, १४ जुलै २०१६ रोजी पीडित महिला घरात एकटी असल्याचे पाहून तुषारने घरात घुसून तिचा विनयभंग केला. यानंतर पीडित महिलेचा पती जाब विचारण्यासाठी गेला असता, पोलिसात जाल तर ठार मारीन अशी धमकी आरोपी तुषारने दिली होती. नंतर पीडित महिलेने शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पी. ए. देशमुख यांनी केला. नंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. जयसिंगपूर न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. आरोपीने कशाचीही तमा व भीती न बाळगता कृत्य केल्याचा युक्तीवाद सरकारी वकिल सूर्यकांत मिरजे यांनी केला. त्यानंतर न्यायालयाने कांबळे याला एक वर्षाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images