Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मोदी सरकार थापेबाज

$
0
0

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा हल्लाबोल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारमध्ये लोकांचे प्रश्न सोडविण्याची धमक नाही. साडेचार वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारने निव्वळ घोषणाबाजी, थापेबाजी करत लोकांची दिशाभूल केली. सरकारच्या नाकर्तेपणामुळे थेट पाइपलाइन योजना आणि पंचगंगा नदी प्रदूषणाचा कार्यक्रम रखडला. कोल्हापुरात नव्याने एकही उद्योग प्रकल्प सुरू झाला नाही. अशा भ्रष्ट सरकारला सत्तेवरुन हटवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला विकासाच्या पातळीवर नंबर एकचे राज्य बनविण्यासाठी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीला विजयी करा,'असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापुरातील मुस्कॉन लॉन येथे निर्धार परिवर्तन सभेचे आयोजन केले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

अजित पवार म्हणाले म्हणाले,'वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार, प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर १५ लाख रुपयांची ठेव, गॅस सिलिंडर व पेट्रोलपासून जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरले आहे. पंतप्रधान मोदी राफेलप्रश्नी संसदेत उत्तर देत नसल्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. संपूर्ण राज्य दुष्काळने होरपळत आहे. आरक्षणाचे गाजर दाखवून सरकार लोकांना फसवत आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेंतर्गत ५६ टक्के रक्कम जाहीरातबाजीवर खर्च केली आहे. '

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विविध घोषणांची चित्रफित दाखवित फसलेल्या योजनांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'पालकमंत्री पाटील यांनी २०१७ मध्ये खड्डेमुक्त रस्त्याची घोषणा केली होती. दोन वर्षानंतरही रस्त्याची स्थिती सुधारली नाही.' खासदार धनंजय महाडिक म्हणाले,' सरकारने नागरिकांना खोटी आश्वासने दिली. सरकारवर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, वकील कुठलाच घटक समाधानी नाही. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकांसारखी वागत आहे. आम्ही गेल्या पाच वर्षात शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक केली.'भविष्यात याच पद्धतीने काम करणार आहे.' शहराध्यक्ष आर. के.पोवार यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, माजी आमदार के. पी.पाटील, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, महिला आघाडीच्या संगीता खाडे, जहिदा मुजावर, युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आदी उपस्थित होते.

.....

सत्तेच्या मस्तीच्या अंत्ययात्रेची सुरुवात

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'मुख्यमंत्री फसवणीस' असा केला. ते म्हणाले, 'भाजप सरकारच्या सत्तेच्या मस्तीच्या अंत्ययात्रेची सुरुवात परिवर्तन यात्रेद्वारे झाली आहे. राज्य मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी महापुरुषांच्या फोटो छपाईत घोटाळा केला. सरकारी मुद्रणालयात सात रुपयांना फोटो उपलब्ध व्हायचे मात्र तावडेंनी १७०० रुपयांना ही छायाचित्रे खरेदी केली. माझ्या आरोपात तथ्य नसेल तर मी फाशी घ्यायला तयार आहे. पाच मंत्रीपदांसाठी शिवसेना लाचार बनली आहे. राज्यातील नागरिक दुष्काळात होरपळत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्यावारी करत आहेत.'

.......

खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. अजित पवार भाषणाला उभे राहिल्यावर पुन्हा एकदा 'एकच खासदार...धनंजय महाडिक'ची घोषणा टिपेला पोहचली. पवार यांनी हस्तक्षेप करत 'कुणीही भाषण सुरू असताना घोषणा द्यावयाच्या नाहीत. हा प्रकार मला आवडत नाही. योग्य उमेदवाराला तिकीट देऊन निवडून आणण्यासाठी मी आलोय. कार्यकर्त्यांनी हलक्या कानाचे राहू नये. तसेच कुणीही गाफील राहू नका. यापूर्वी जे झाले ते गंगेला मिळाले. पक्षाचे नेते जे उमेदवार देतील त्यांना निवडून देऊन ताकद वाढवा,'असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हात उंचावून एकोप्याने लढण्याची ग्वाही

$
0
0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन यात्रेतंर्गत मुस्कॉन लॉन येथे झालेल्या सभेत नेत्यांनी हात उंचावून एकोप्याने लढण्याची ग्वाही दिली. यावेळी डावीकडून आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर सरिता मोरे, आर.के.पोवार, के.पी.पाटील, ए.वाय.पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अजित पवार, धनंजय महाडिक, जयंत पाटील, अशोक जांभळे, मानसिंगराव गायकवाड आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिजित कुदळे दोन वर्षे हद्दपार

$
0
0

कोल्हापूर

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अभिजीत माणिकराव कुदळे (वय २५, रा. पाण्याचा खजिना, नंगीवल्ली चौक, मंगळवार पेठ) याला जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करण्यात आले . पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे यांनी कुदळे याला जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपार करावे, असा प्रस्ताव करवीर प्रातांधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यानुसार प्रातांधिकाऱ्यांनी हद्दपारीचा आदेश दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाला लिंकचा अडथळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व राज्य सरकारच्या नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरातील फेरीवाल्यांचे मोबाईल अॅपद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात झाली. मात्र सर्वेक्षणादरम्यान फेरीवाल्यांचे मोबाईल क्रमांक आधार लिंकिंग नसल्याने सर्व्हेला अडथळा निर्माण झाला आहे. सर्व्हेला जेवढी दिरंगाई होईल, तेवढी दिरंगाई फेरीवाला झोन निश्चित करण्यासाठी होणार आहे.

मागील एक महिन्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे. फेरीवाल्यांचा सर्व्हे न करता कारवाई सुरू असल्याने विविध पक्ष, संघटना मोहिमेला विरोध करत आहेत. त्यामुळेच झोन निश्चित करण्याची मागणी फेरीवाल्यांकडून केली जात आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून फेरीवाला २०१७ च्या अंमलबजावणीनुसार फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. त्यासाठी राज्य सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून मोबाईल अॅप विकसित केले. मात्र अॅपमध्ये काही त्रुटी असल्यामुळे सर्व्हेच्या कामात खोडा निर्माण झाला होता. या त्रुटी दूर करण्यात आल्या.

त्रुटी दूर झाल्यानंतर शुक्रवारपासून (ता. २५) सर्वेक्षणाला सुरुवात झाली. त्यानुसार मध्यवर्ती बसस्थान व महाद्वार रोड येथे सर्वेक्षण करताना मोबाईल क्रमांक आधार कार्डला जोडलेला नसल्याने सर्वेक्षणामध्ये अडथळा निर्माण होत आहे. शहरात सुमारे आठ हजार फेरीवाले असल्याने सर्व्हे दिरंगाई होण्याची शक्यता आहे. सर्व्हेला दिरंगाई झाल्यास झोन निश्चित करताना प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागली.

त्यामुळेच सर्वेक्षणापूर्वी मोबाईल क्रमांक आधार कार्डला जोडण्याबरोबरच रेशनकार्ड, अपंगत्वाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सोबत ठेवण्याचे आवाहन इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुधवारी संगीत कार्यक्रम

$
0
0

कोल्हापूर : येथील आविष्कार क्रिएशन्सच्या वतीने बुधवारी (ता. ३०)केशवराव भोसले नाट्यगृह येथे गायक मोहम्मद अजीज यांना संगीतमय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. इचलकरंजी, गोकाक, रत्नागिरी, मिरज येथील नामवंत गायक यामध्ये सहभागी होणार आहेत. रात्री साडे नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत आयुष गार्डन करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'सेवा रुग्णालयातील आयुष गार्डन हा उपक्रम खूप चांगला असून वृक्षांची नावे लिहून त्यांचे औषधी महत्व तसेच कोणत्या आजारावर त्याचा उपयोग होतो याची माहिती दिल्याने नागरिकांत याचा चांगला प्रचार व प्रसार होईल. अशा प्रकारची आयुष गार्डन जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत सर्व ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत साकारली जातील' अशी घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केली. ते सेवा रुग्णालयातील आयुष निदान व उपचार शिबिराच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक होत्या.

शिबिरानिमित्त रुग्णालयात आयुर्वेदिक उपचारासाठी दररोजच्या वापरातील घरातील मसाले व परसबागेतील झाडांच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

सीईओ मित्तल म्हणाले, 'सेवा रुग्णालयात पंचकर्म सुविधा सुरू व्हावी यासाठी जे मनुष्यबळ लागेल, त्याचा विचार करून सोशल फंडच्या माध्यमातून मार्चपर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सरकारी रुग्णालयांनी योग शिबिर वर्षभर आयोजित करण्याचा प्रयत्न करावा.'

निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक म्हणाल्या, 'लोकांचा ओढा आयुष उपचाराकडे वाढत असल्याने त्याचा योग्य व जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी आमचा विभाग प्रयत्नशील राहील. सेवा रुग्णालय हे नुसतेच रुग्णालय नसून येथे येणाऱ्या प्रत्येक घटकाची काळजीपूर्वक सेवा देणारी सरकारची आरोग्य विभागाची संस्था आहे.'

शिबिरात आयुर्वेदिकमध्ये मधुमेह तर होमिओपॅथीकमध्ये मुतखड्याबाबतचे उपचार करण्यात आले. कार्यक्रमास 'आयुष'चे डॉ. सारिका पाटील, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. सुलेखा साळोखे, डॉ. दीपाली देसाई, डॉ. अशफाक मुजावर, डॉ. प्रताप नाळे यांच्यासह डॉ. बी. एस. थोरात, डॉ. दिलीप वाडकर, डॉ. सुदर्शन पाटील, डॉ. राघवेंद्र पोटे, डॉ. डी. जी. तांबीरे, डॉ. चंद्रकांत माने उपस्थितीत होते. अधीक्षक डॉ. उमेश कदम यांनी स्वागत केले. जिल्हा आयुष अधिकारी दादा सोनवणे यांनी आभार मानले. डॉ सुनेत्रा शिराळे यांनी सूत्रसंचलन केले.

फोटो

सेवा रुग्णालयातील आयुष निदान व उपचार शिबिरानिमित्त परसबागेतील झाडांच्या माहितीचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी घेतली. यावेळी अधीक्षक डॉ. उमेश कदम, डॉ. सारिका पाटील, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. अशफाक मुजावर आदी.

फोटो : राहुल मगदूम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळी नदी बचाव आंदोलन कृती समितीचा पुढाकार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

तालुक्यातील शाळी नदी बचाव आंदोलन कृती समितीच्यावतीने नदी प्रदूषणमुक्तीसाठी आयोजित शाळी नदी उगम (पालेश्वर धरण) ते शाळी-कडवी नदी संगम (कोपार्डे) क्षेत्राची परिक्रमा पूर्ण केली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी मोहिमेचे स्वागत करून शाळी नदी प्रदूषणमुक्ती अभियानास सहकार्याचे वचन दिले.

मलकापूर शहर व परिसरातील शाळी नदी बचाव आंदोलन कृती समितीच्या कार्यर्त्यांनी पालेश्वर लघू पाटबंधारे धरणाखालील शाळी नदी उगमस्थळी जलपूजन व आरती करून आरंभलेल्या मोटारसायकल रॅलीद्वारे माण, पेरळे, उचत, येळाणे, मलकापूर व कोपार्डे या गावांना भेटी देत प्रबोधनात्मक परिक्रमा पूर्ण केली. यादरम्यान दहा-बारा गावांना शेती व पिण्याचे पाणी पुरविणारी जीवनदायीनी ठरणारी शाळी नदी मानवनिर्मित प्रदूषण स्तोत्रांनी गटारगंगा बनली असल्याचे वास्तव पटवून देताना मलमूत्र मिश्रित सांडपाणी, घनकचरा, मृत जनावरे असे प्रदूषण थांबविण्याचे आवाहन केले. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन कृती समितीचे प्रमुख सुधाकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना केले.

रॅलीच्या मार्गावर माण येथे सरपंच आक्काताई खाके, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील-माणकर, परळे विद्यामंदिर येथे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी, तसेच उचत ग्रामस्थांनी कृती समितीचे स्वागत केले. मलकापूर शहरातील सुभाष चौकात नागरिकांना प्रबोधनपर शपथ देऊन शाळी नदीच्या प्रदूषण मुक्तीचा निर्धार करण्यात आला. येळाणे परिसरातील शाळी नदीवरील के. टी. वेअर गृहाजवळ पदयात्रेने आलेल्या कार्यकर्त्यांनी मोहिमेची सांगता केली. सुधाकर पाटील, शेकाप तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमाने, अनिकेत हिरवे, दस्तगीर आत्तार, नगरसेवक किरण घोटणे, रोहित जांभळे, येळाणेचे सरपंच मधुकर पाटील, प्रल्हाद पळसे, अमोल नागवेकर, शौकत कळेकर, योगेश खटावकर, सुधाकर मिरजकर, विकास तांदळे, दिनेश पडवळ आदींनी या प्रबोधनपर परिक्रमा मोहिमेत सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानगाळ्यांच्या मालकीवरुन प्रशासनाची कोंडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मध्यवर्ती चौकातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पिछाडीस असलेल्या २८ दुकानगाळ्यांची मालकी व त्याच्या भाडे वसूलीवरुन काँग्रेस व राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रश्‍नांची सरबत्ती करत प्रशासनाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. त्यावर नगराध्यक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशीच्या सूचना केल्या. तर ईदगाह मैदान जागेचे आरक्षण बदलण्याचा विषय पुढील सभेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

विषयपत्रिकेवरील विविध १६ व ऐनवेळचे ५ अशा २१ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगराध्या अलका स्वामी यांनी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेच्या प्रारंभीच काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी ऐनवेळची विषयपत्रिका सभा सुरू होण्यापूर्वी दोन तास अगोदर मिळणे आवश्यक असल्याचे सांगत सभागृहात विषयपत्रिका मिळत असल्याने त्या विषयाचा नगरसेवकांनी अभ्यास केव्हा करायचा? असा सवाल उपस्थित केला. ऐनवेळच्या विषयांत धोरणात्मक आर्थिक विषय घेऊ नये असे स्पष्ट करून त्याबाबत हरकत घेतली. उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी, लोकसभेची आचारसंहिता लागणार असल्याने आणि महत्वाचे विषय असल्याने हे विषय घेतल्याच खुलासा केला.

नगरसेवक संजय केंगार यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पिछाडीस असलेल्या २८ दुकानगाळ्यासंदर्भात सवाल उपस्थित करत त्यांची नेमकी मालकी कोणाची, गाळ्याची भाडेपट्टी कोण वसूल करतो याचा खुलासा करण्याची मागणी केली. इस्टेट विभागप्रमुख सी. डी. पवार यांनी त्या संदर्भातील कोणत्याही प्रकारची नोंद नगरपालिकेकडे नसल्याचा धक्कादायक खुलासा केला. गाळ्यांचा बेकायदेशीरपणे वापर होत असून त्या मंडळींना कुणाचा आशिर्वाद आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यावरून मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे यांनी प्रश्‍नांची सरबत्ती करत प्रशासनाला धारेवर धरले. नगराध्यक्षा स्वामी यांनी, या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना केल्या. ईदगाह मैदान जागेवरील 'एक्स्टेशन टू ईदगाह' हे नामानिधान बदलून त्याऐवजी 'झोपडपट्टी पुनर्वसन' असे करण्याच्या विषयावर चर्चा झालीच नाही. सत्तारूढ गटानेच हा विषय पुढील सभेत घेण्याचा निर्णय घेतला. तर अन्य विषयांवर फारशी चर्चा न होता त्यांना मंजूरी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कागलमध्ये महाडिकांचे भाषण रोखले

$
0
0

\B \Bमुश्रीफांचे नाव भाषणात न घेतल्याने \Bराष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\B

म. टा. वृत्तसेवा, कागल

'परिवर्तन झालेच पाहिजे' असा नारा देत एकत्र आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कागल येथील निर्धार परिवर्तन रॅलीच्या पहिल्याच सभेत पक्षातील गटबाजीचे दर्शन घडले. खासदार धनंजय महाडिक यांनी भाषणात आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव न घेतल्याने मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांनी महाडिकांच्या भाषणावेळी गोंधळ घातला. त्यामुळे महाडिक यांना भाषण थांबवून खाली बसावे लागले. आमदार मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दम देत थांत बसवले आणि खासदारांना पुन्हा भाषणासाठी माईकजवळ नेले. पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पुढ्यातच हा प्रकार घडला. नंतर महाडिकांनी दिलगिरी व्यक्त करत भाषणाचा समारोप केला.

शहरात सकाळी पक्षातर्फे परिवर्तन रॅलीअंतर्गत पहिल्याच सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान खासदार धनंजय महाडिक भाषणाला उभे राहिले. त्यांनी भाषणात आमदार मुश्रीफ यांचा उल्लेख केला नाही. हे लक्षात येताच व्यासपीठासमोरच असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. महाडिक यांनी उपस्थितांची नावे घेताना 'कागलचे लाडके आमदार' असा उल्लेख करून पुढे जयंत पाटील यांचे नाव घेतले. मुश्रीफ यांचे नाव त्यांनी न घेतल्याने कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे महाडिक हे माईकपासून लांब गेले.

यावेळी आमदार मुश्रीफ हे माईक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी समोर आले. दरम्यान, महाडिक आपल्या आसनाकडे निघून गेले. त्यांना भाषण थांबवून बाजूला बसण्याची वेळ आली. गोंधळ वाढल्याने अजित पवार कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी जागेवरून पुढे आले. हे लक्षात येताच समोर आलेल्या मुश्रीफ यांनी 'मी सांगतो, एकानेही आवाज करायचा नाही' असा दम कार्यकर्त्यांना दिला. 'निवडणुकीत मुन्ना महाडिकांनाच आपण शंभर टक्के मते देऊन निवडून आणायचे आहे' अशी तंबीही मुश्रीफ यांनी दिली. त्यानंतर महाडिक यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना पुन्हा भाषणाला उभे राहण्याची विनंती केली. महाडिक पुन्हा भाषण करण्यास राजी होत नव्हते. त्यावेळी बाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी महाडिकांच्या हाताला धरुन त्यांना माईकजवळ आणले.

नंतर भाषणावेळी महाडिक यांनी 'तुमचे व आमचे नेते आमदार मुश्रीफ साहेब' असा उल्लेख केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. भाषणात महाडिक यांनी भाजपच्या सरकारचा फसव्या योजनांचा समाचार घेतला. शेवटी 'गेल्या साडेचार वर्षात माझ्याकडून राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत काही मने दुखावली असल्यास जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो' असे सांगत आपल्या भाषणाचा समारोप केला.

...

अजित पवार यांची हात जोडून विनंती

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणात कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. ते म्हणाले, 'शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील, महिलांच्या असुरक्षिततेचे चित्र बदलायचे असेल तर आपल्याला आपल्या विचारांची माणसे शरद पवारांसोबत निवडून द्यावी लागतील. त्यामुळे मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की, शरद पवार कोल्हापूरमध्ये जो उमेदवार देतील, मग ते धनंजय महाडिक जरी असतील तरी त्यांच्याच पाठीशी आपण ठाम राहू. भाजपच्या शेतकरीविरोधी सरकारला घालविण्यासाठी सर्वांनी राष्ट्रवादीलाच मदत करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवाहरनगरात चार ठिकाणी घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवाहरनगर सिरात मोहल्ला परिसरात चार ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी अंदाजे बारा तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. सोमवारी पहाटे ही घटना उघडकीस आली.

सकाळी परिसरातील नागरिकांना चार घरांचे कडीकोयंडे उचकटून चोरी झाल्याचे लक्षात आले.

सिरात मोहल्ला येथील रिक्षाचालक इर्शाद मेहबूब बेपारी यांची पत्नी आजारी असून त्या विश्रांतीसाठी माहेरी गेल्या आहेत. त्यांना भेटण्यासाठी बेपारी गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश करुन तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख सात हजार रुपये चोरुन नेले. खत्री लॉन म्हाडा कॉलनीतील मुस्ताक फकरुद्दीन सय्यद यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने चोरल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. सय्यद हे रिक्षा व्यावसायिक असून ते कुटुंबासह हज यात्रेला गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातून किती दागिने व रक्कम गेली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. रजिया दिलावर आटपाडे आणि कृष्णात बाटे यांची घरेही चोरट्यांनी फोडली आहेत. दोन्ही घरातून दागिने व रोख रक्कम चोरीला गेली आहे. चोरी झालेल्या चारही घरातील कुटुंबांची परिस्थिती गरीब असल्याने सर्वजण हतबल झाले आहेत.

चोरीच्या घटनेची माहिती कळताच राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी मेहत्तर यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून माहिती घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायीसह महिला बालकल्याण सभापती निवड आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी, महिला बालकल्याण समिती व गांधी मैदान विभागीय कार्यालय प्रभाग समितीच्या सभापतीपदासाठी मंगळवारी (ता. २९) निवड होत आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ तथा पिठासन अधिकारी म्हणून अमन मित्तल काम पाहणार आहेत.

स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेस आघाडीचे शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी अनुराधा खेडकर तर प्रभाग समिती सभापतीपदी रिना कांबळे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र तरीही स्थायी सभापतीपदासाठी भाजप-ताराराणी आघाडी कोणत्याही क्षणी चमत्कार करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी झालेल्या स्थायी समिती सभापतीपदी भाजप-ताराराणी आघाडीचे आशीष ढवळे नाट्यमयरित्या विराजमान झाले होते. सत्तारुढ गटाला गाफील ठेवत विरोधी आघाडीने राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांना फोडत सत्ता काबीज केली. त्यानंतर झालेल्या दोन महापौर निवडीत सत्तारुढ गटाने आपला गट मजबूत ठेवत सत्ता कायम ठेवली. पक्षीय बलाबल पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीला स्थायीची सत्ता राखण्यात अडचण दिसत नसली, तरी भाजप-ताराराणी आघाडीच्या सावध हालचाली सुरू आहेत. त्यामुळेच शिवसेनेच्या एका सदस्याला चांगलेच महत्त्व प्राप्त झाले आहे. परिणामी आजच्या निवडीत विरोधी आघाडीचे उमेदवार राजाराम गायकवाड कोणता चमत्कार घडवतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

स्थायीप्रमाणे महिला बालकल्याण समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या अनुराधा खेडकर विरुद्ध भाजपच्या अश्विनी बारामते अशी लढत होत आहे. दोन्ही सभापती निवडीसाठी नगरसेवकांच्या पातळीवर शांतता दिसत असली, तरी भाजप-ताराराणी आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मोर्चेबांधणीनंतरच खरी चुरस निर्माण होणार आहे. प्रभाग समिती सभापतीपदासाठी रिना कांबळे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाध्यक्ष आवाडेंनी घेतली प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट

$
0
0

जिल्हाध्यक्ष आवाडेंनी घेतली प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देऊ, असा विश्‍वास नूतन जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दिला. आवाडे यांनी सोमवारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट घेतली.

काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची नुकतीच निवड झाली. त्यानंतर आवाडे यांनी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. खासदार चव्हाण यांनी आवाडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर उभयंतामध्ये चर्चा झाली. चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा गड पुन्हा काँग्रेसलाच मिळवून देण्यासाठी पक्ष बळकट करावा असे सांगितले. तर गमावलेला बालेकिल्ला पुनश्‍च काँग्रेसच्या हक्काचा होईल असा विश्‍वास आवाडे यांनी यावेळी दिला.

आमदार सतेज पाटील, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस प्रकाश सातपुते, तौफिक मुल्लाणी, माजी मंत्री अब्दुल सत्तार, इचलकरंजी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, रामदास कोळी, नरसिंह पारीक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारच्या धडकेत पेंटरचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे बेंगळुरु महामार्गावर उचगाव (ता. करवीर) येथे रस्ता ओलांडत असताना भरधाव कारच्या धडकेत रमजान राजू इनामदार (वय १७, रा. सिद्धेश्वर शाळेजवळ, विक्रमनगर) या पेंटरचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अपघात झाला.

रमजान हा सकाळी उचगाव येथे पेटिंग करण्यासाठी गेला होता. काम आटोपून घरी येत असताना सूर्यदीप हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असताना भरघाव कारच्या धडकेत तो रस्त्यावर कोसळला. त्याच्या डोक्यासह हातापायाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत ठोकर दिलेल्या कारमधून त्याला सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. रमजानच्या मृत्यूची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्याची आई व बहिणीने फोडलेला हंबरडा ह्रदय पिळवटून टाकणारा होता.

रमजानच्या घरची परिस्थिती हलाखीची असून दोन महिन्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. तो आणि आई दोघेच घरी रहात होते. घरची जबाबदारी लहानपणी अंगावर पडल्याने तो पेटिंग करण्यासाठी जात होता. सोमवारी सकाळी जेवण करुन तो कामावर गेला होता. पण सायंकाळी अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने त्याची आई व बहिणीला मोठा धक्का बसला आहे. परिसरातील नगरसेवक कमलाकर भोपळे व कार्यकर्त्यांनी इनामदार कुटुंबाचे सात्वंन केले. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद्मावतीचा सेट जाळणाऱ्यांनाबंगेराकडून प्रशिक्षण?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला राजेश देरन्ना बंगेरा (वय ५०, रा. बेंगळुरु, कर्नाटक) याने मसाई पठारावरील 'पद्मावती' चित्रपटाचा सेट जाळण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना पेट्रोल बाँम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. १४ मार्च २०१७ रोजी रात्री पन्हाळ्याजवळील मसाई पठारावर 'पद्मावती' या चित्रपटाचा सेट जाळण्यात आला होता.

बंगेरा याने घातक शस्त्रात्राचे प्रशिक्षण दिल्याची माहिती लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चौकशीदरम्यान पुढे आली आहे. तो मार्शल आर्ट बरोबरच पिस्तुल चालवणे, पेट्रोल बाँब तयार करण्याचे प्रशिक्षण देत होता. 'पद्मावती' चित्रपटाचा सेट जाळलेल्या ठिकाणी पंचनामा करताना पोलिसांना पेट्रोल बाँबचे अवशेष मिळाले होते. त्यामध्ये बाटल्या, वाती, रासायनिक पदार्थांचा समावेश होता. फॉरेन्सिक लॅबने पेट्रोल बाँबसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू वापरल्या असल्याचा अहवाल दिला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात अज्ञात ५० जणांवर आरोप दाखल केला आहे. पण हल्लेखोरांकडे पेट्रोल बाँब कसे आले, याचा तपास पोलिस करत होते. लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित बंगेरा हा पेट्रोल बाँब तयार करण्यात निष्णात असल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने त्याला २५ जानेवारी रोजी अटक केली.

कोर्टाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. रविवारी (ता.२७) त्याला मसाई पठार परिसरात फिरवण्यात आले. तसेच त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. यापूर्वी तो कोल्हापूर शहर परिसरात आला होता, असे चौकशीत पुढे आले आहे. तो कट्टर हिंदूत्ववादी कार्यकर्ता असल्याची माहितीही पुढे आली आहे. हिंदू धर्माबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे अशी त्याची धारणा होती. 'पद्मावती' चित्रपटात चुकीचे चित्रिकरण झाल्याचा समज त्यावेळी झाला होता. करणी सेनेने उत्तर भारतात आंदोलन केले होते. त्यामुळे 'पद्मावती' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अडथळा आणण्यासाठी ज्या संघटना प्रयत्न करत होत्या, त्यांच्याशी त्याचा संबध आला आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. मसाई पठारवर 'पद्मावती' चित्रपटासाठी उभारण्यात आलेला सेट जाळण्यासाठी पेट्रोल बाँबचा वापर करण्यात आल्याचे सिद्ध झाले आहे. पद्मावतीचा सेट जाळण्यासाठी बंगेराने प्रशिक्षण दिलेल्या व्यक्तींनीच पेट्रोल बाँब तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. बंगेराने शहर व जिल्ह्यातील कोणत्या संघटनांना पेट्रोल बाँब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते याचा तपास पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा तारळेत उपजिल्हा रुग्णालय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

'कसबा तारळे (ता. राधानगरी) पंचक्रोशीतील नागरिकांच्या मागणीवरून उपजिल्हा रुग्णालय मंजूर करीत असून लवकरच त्याचा पायाभरणी करणार आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हे रुग्णालय मातांना गिफ्ट देत आहे'असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. शाहीर विशारद आझाद नायकवडी रौप्यमहोत्सवी गौरव समिती आणि कसबा तारळे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'हिंदवी स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊनी शिवाजी महाराजांना घडविले. काळ बदलला असून आजच्या मातांनी आपल्या मुलांना सुसंस्कारित व कर्तृत्ववान करण्यासाठी राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांना घडवावे.'

सुरुवातीला कर्तृत्ववान मातांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. गुडाळेश्वर हायस्कूलच्या मुलींनी सादर केलेली लेझीम प्रात्यक्षिके नेत्रदीपक होती. वीरमाता आनंदीबाई पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील कर्तृत्ववान माता वीरमाता आनंदी महादेव पाटील (बेलेवाडी मासा), लक्ष्मीबाई सीताराम पाटील (तिटवे), बीनाबी आदम शेख (सोलापूर), शांताबाई यादव (गडहिंग्लज), डॉ. भारती वैशंपायन (कोल्हापूर), छाया महादेव पिंगळे (कसबा बावडा), रेहाना बाबलाल तासीलदार (सोळांकूर), रत्नमाला भगवान हिर्डेकर (कोल्हापूर), आनंदी चंद्रकांत जाधव (आणाजे), इंदूबाई बाबूराव टिपूगडे (राशिवडे), शैलजा राजवर्धन कोसंबी (कोल्हापूर), शांताबाई गणपती रोकडे (तारळे खुर्द), मालती मधुकर पोतदार (कसबा तारळे), शांताबाई अरुण चव्हाण (कोल्हापूर), आयेशा बंकट थोडगे (तिसंगी), राधाबाई किसन गुंजन (कसबा तारळे) या सोळा मातांना पालकमंत्र्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांचे शिल्प, साडी, चोळी व शाल देऊन आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केले.

गौरव समिती, ग्रामस्थांच्यावतीनेही प्रमिला पापालाल नायकवडी ( कसबा तारळे) यांच्यासह शाहीर विशारद आझाद नायकवडी, चिंतामणी मुसळे तसेच नायकवडी कुटुंबियांचाही गौरव करण्यात आला. ऋतुजा पाटील, आनंदीबाई पाटील, क्रांतिकुमार पाटील आदींची भाषणे झाली. गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, विनय पाटील, सरपंच अशोक कांबळे, उपसरपंच मेघा पाटील, बंकट थोडगे, दत्तात्रय पाटील, संजयसिंह पाटील, शिवाजीराव पाटील, रवींद्र पाटील, व्ही. टी. जाधव, एम. डी. पाटील आदी उपस्थित होते. डॉ. सत्यजित कोसंबी यांनी सूत्रसंचालन केले. अरुण पाटील यांनी आभार मानले.

फोटो

तारळे येथे आदर्श मातांचा सत्कार करताना पालकमंत्रई चंद्रकांत पाटील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुनाळ-काटेभोगावला गव्याचे दर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पुनाळ (ता. पन्हाळा) येथील शिवारात व परीसरातील शेतकऱ्यांना आज सकाळीच गव्याचे दर्शन झाले. त्यामुळे परीसरात भीतीचे वातावरण आहे. सकाळी साडेसहा वाजता माजनाळ-पुनाळ मार्गावरील बोरलेचा ओढा येथे गव्याने दर्शन दिले.

लकाळी सात वाजता पुनाळ-कळे मुख्य मार्ग ओलांडून गवा काटेभोगावच्या दिशेने गेला. सकाळी नऊ वाजल्यापासून बारावाजेपर्यंत काटेभोगाव -वाळवेकरवाडीतील लोकांनी गव्याला हुसकावून लावले. गव्याला पहाण्यासाठी मुलांसह महिला व ग्रामस्थांनी गर्दी केली. गलक्याने बिथरलेला गवा तसाच पुढे शेतातून बाजारभोगावच्या दिशेने गेला. सध्या डोंगरातही ओला चारा नसल्याने शेतवडीतून गवा मानवी वस्तीकडे येत आहे. पण गव्याने सुदैवाने कोणावरही हल्ला केलेला नाही. पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील झोपडपट्टीतील घरे होणार नियमित

$
0
0

महापालिकेचा लोगो वापरावा

........

पान ५ अॅंकर

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet@Appasaheb_MT

राज्य सरकारच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेंतर्गत शहरातील घोषित झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल उपलब्ध करुन देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. राज्य सरकारच्या जागेवरील घोषित १८ झोपडपट्टींपैकी पहिल्या टप्प्यात टाकाळा येथील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे उपलब्ध देण्याचा आराखडा महापालिकेने तयार केला आहे. महापालिकेकडून हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या समितीपुढे मंजुरीसाठी या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. आराखड्याला मंजुरी मिळाल्यास घराच्या बांधकामासाठी प्रत्येकी २,५०,००० रुपयांचा अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.

सरकारी जागेवरील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. समिती सचिवपदी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तर निमंत्रित सदस्यपदी महापाालिका आयुक्त, सहायक संचालक नगररचना विभाग व बिंदू चौक येथील नगररचना कार्यालयातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी सदस्यपदी आहेत.

महापालिकेने टाकाळा येथील झोपडपट्टी विकसित करण्याचा पायलट प्रोजेक्ट निश्चित आहे. या परिसरातील आशा कॉलनी येथे घोषित झोपडपट्टी आहे. येथे ४३ कुटुंबे आहेत. 'प्रधानमंत्री आवास योजनें'तर्गत संबंधित कुटुंबांना वैयक्तिक स्वरुपातील घरकुल बांधकामासाठी अडीच लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे. महापालिकेने या झोपडपट्टीचा सर्व्हे पूर्ण केला आहे. नागरिकांनी सकारात्मकता दर्शविली आहे. आयुक्त अभिजित चौधरी, आवास योजना प्रकल्पाचे समन्वयक व उपशहर अभियंता रमेश मस्कर यांच्यामध्ये चर्चा झाली असून त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या कार्यालयाने प्रस्ताव तयार केला आहे.

सरकारी जागेवरील बांधकामे नियमित होताना, 'सर्वांसाठी घर'योजनेंतर्गत अनुदानाचा लाभही मिळणार आहे. मात्र यासाठी सरकारने काही नियमावली निश्चित केली आहे. अतिक्रमण केलेली जागा ही रहिवास वापरासाठी असायला पाहिजे. शेड, गोडावून किंवा दुकान असेल तर बांधकाम नियमित होणार नाही. एक जानेवारी २०११ किंवा त्यापूर्वी झालेली बांधकामे नियमितीकरणासाठी पात्र ठरतील. टाकाळा येथील झोपडपट्टी विकसित झाल्यावर अन्य घोषित झोपडपट्टीधारकांना या योजनेंतर्गत पक्की घरे उपलब्ध करता येतील यादृष्टीने महापालिका प्रशासन विचार करत आहे.

........................

शहरातील झोपडपट्टीवर एक दृष्टीक्षेप

राज्य सरकारच्या जागेवरील झोपडपट्ट्या : २१

(यापैकी घोषित झोपडपट्ट्या १८)

खासगी जागेवरील झोपडपट्ट्या : ११

महापालिकेच्या जागेवरील झोपडपट्ट्या : ३१

केंद्र सरकारच्या जागेवरील झोपडपट्टी : १

एकूण झोपडपट्ट्या : ६४

.................................

शहरातील झोपडपट्टीधारकांची अंदाजित लोकसंख्या : २,१०,०००

शहरातील झोपडपट्टीतील कुटुंब संख्या अंदाजित : १६,४००

महापालिकेकडून १२४०० झोपडपट्टीतील कुटुंबींयाचा सर्व्हे

...........................

चौकट

बोंद्रेनगर झोपडपट्टीसाठी डीपीआर तयार

बोंद्रेनगर झोपडपट्टीत ८० झोपड्या आहेत. या झोपड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी महापालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडा तयार केला आहे. नवीन घरांच्या बांधकामासाठी सर्वांसाठी घर योजनेंतर्गत प्रत्येकाला अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळू शकते. उर्वरित रक्कम संबंधित झोपडपट्टीधारकांनी उभी करावयाची आहे. वित्तीय संस्थेच्या सहकार्याने अथवा सीएसआर फंड वापरुन येथील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे बांधून देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. दोन वित्तीय संस्थांशी चर्चा झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटक अपघातात सोलापुरातील ३ जण जागीच ठार

$
0
0

सोलापूरः

कर्नाटकमधील होर्ती गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापुरातील धोत्री गावचे डॉक्टर आणि अन्य दोघं जण जागीच ठार झाले. हे सर्व जण कर्नाटकात उपचारासाठी जात होते, अशी माहिती मिळाली आहे.

डॉ. वैजिनाथ विश्वनाथ दरेकर (वय ३५), अमोल मल्लापा नंदणगे (वय २८), आणि त्यांची पत्नी अश्विनी अमोल नंदणगे (वय २६) अशी मृतांची नावे आहेत. डॉ. दरेकर आणि नंदणगे दाम्पत्य मारुती सुझुकी स्विफ्ट कारमधून दक्षिण सोलापुरातील धोत्री या गावाहून कर्नाटकात उपचारासाठी निघाले होते. कर्नाटकातील होर्ती गावाजवळ आले असता, समोरून येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये कारमधील डॉक्टर आणि नंदणगे दाम्पत्य जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता की, कराच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला. डॉक्टर आणि त्या दाम्पत्याचे मृतदेह कारमध्येच अडकून पडले होते. अपघातानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालकांनी मदत केली. मात्र, वेळ निघून गेली होती. ट्रकचालक अपघातानंतर फरार झाला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला.

दरम्यान, कर्नाटकात झालेल्या या भीषण अपघाताची माहिती धोत्री गावात समजताच डॉ. दरेकर आणि नंदणगे कुटुंबीय आणि धोत्री गावावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीचा कडाका कायम

$
0
0

कोल्हापूर

सलग तिसऱ्या दिवशी शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण व थंडीचा नागरिकांना सामना करावा लागला. दिवसभर ढगाळ व दमट वातावरण होते. बोचरे वारे वाहत असल्याने दिवसभर थंडी जाणवत राहिली. दमट हवामानामुळे जिल्ह्याच्या किमान तापमानात घट झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत थंडीची तीव्रता जाणवत होती. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातील काही भागात गेल्या आठवड्यात पाऊस झाला. अवकाळी पाऊस,उत्तरेकडून वाहणारे वारे यामुळे गेल्या तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने खोटी आश्‍वासने देवून जनतेला फसविले आहे. शेतकऱ्यांना शत्रू मानून त्यांना देशोधडीला लावण्याचा भाजपाचा इरादा आहे. सर्वच बाबींमध्ये सरकार अपयशी ठरलेले आहे. येत्या निवडणुकीत फसव्या भाजप सरकारला उलथवून टाका आणि परिवर्तन घडवा' असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रा सोमवारी सायंकाळी शिरोळ येथे आली. येथे आझाद मंडळाच्या मैदानावरील सभेवेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, 'भाजप सरकारच्या भूलथापांना बळी पडायचे नाही. कर्जमाफी, जीएसटी, आरक्षण, बेरोजगारी आदी प्रश्‍नांवर खोटी आणि दिशाभूल करणारी आश्‍वासने देऊन सरकारने जनतेला झुलवत ठेवले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने फसवी कर्जमाफी करुन शेतकर्‍यांना कर्जाच्या खाईत लोटले आहे. शिरोळ नगरपरिषदेत अमरसिंह पाटील यांना विजयी करून येथील जनतेने राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविला आहे. तोच झेंडा राज्यात आणि देशात फडकावून परिवर्तनाचा निर्धार करा.'

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, 'पक्षाची निर्धार परिवर्तन यात्रा भाजपाच्या सत्तेच्या मस्तीची अंतीम यात्रा आहे. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणून आग पाखडणार्‍या भाजपने आत्मपरिक्षण करावे.'

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'भाजप सरकारने २०१४मध्ये दिलेली आश्‍वासने पाळली आहेत का? १५ लाख रुपये कुणाच्या खात्यावर जमा झाले? शेतकर्‍यांची कर्जमाफी सरसकट झाली का? महिला सुरक्षित आहेत का? पंतप्रधान २ कोटी युवकांना रोजगार देणार होते. त्याचे काय झाले? याची उत्तरे मिळायला हवीत.

नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी स्वागत केले. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

आधी शिरोळचा

उमेदवार ठरवू

माजी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, 'राष्ट्रवादी पक्षाचे शिरोळ तालुक्याचे नेते राजेंद्र पाटील यांचे सहकार, शिक्षण, उद्योग आणि कारखानदारीमधील कार्य उत्तुंग आणि आदर्शवत आहे. त्यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकांची मते मिळाली आहेत. शिरोळ विधानसभेचा उमेदवार निवडल्याशिवाय मी माझा बारामती विधानसभेचा अर्ज दाखल करणार नाही.' तर आमदार हसन मुश्रीफ यांनी सभेच्या नियोजनाबद्दल राजेंद्र पाटील यांचे कौतुक करीत 'आधी लोकसभा जिंकायच्या आहेत. नंतर विधानसभा आहेत. विधानसभेचा आमदार हा तुमच्या मनातीलच असेल, याची चिंता करु नका' असे सूतोवाच केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images