Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मिरज...

$
0
0

मिरजेतील मुस्लिम बांधवानी 'ते' दागिने केले परत!

अजूनही माणूसकी जिवंत असल्याचा प्रत्यय, नातेवाईक गहिवरले

मिरज : पती-पत्नीच्या घरगुती भांडणातून पती घरातून पत्नीच्या दागिन्यांसह बाहेर पडून मिरजेतील मिरासाहेब दर्ग्यात आला. तो झोपला असता जवळच अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली पिशवी आणि दागिने, पैसे पाहून पोलिसांच्या मदतीने 'त्या' व्यक्तीच्या नातेवाइकांकडे सहा तोळ्याचे दागिने आणि 19 हजाराची रोकड स्वाधीन केली. तेव्हा मौल्यवान दागिन्यासह पैसे परत करणार्या मुस्लीम समाजातील बांधवांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करुन भरल्या डोळ्यांनी आपल्या मामाला भाच्याने त्यांच्या गावी नेले .

या सुखद घटनेची अधिक माहिती जाणून घेतली.

गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील टिपुकुर्ली हे छोटेसे गाव. या गावातील रहिवासी आदिनाथ बाबूराव उपाध्ये यांचे आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाले. ते मानसिक तणावाखाली असल्याने या भांडणाच्या रागातून पत्नीला न सांगता पतीने आपल्या दुचाकीसह घर सोडले, बाहेर पडताच मिरजेकडे यायला निघाले. येताना त्यानी पत्नीचे सहा तोळ्याचे दागिने आणि १९ हजारांची रोकड बरोबर घेतली होती.

दरम्यान रात्री रुकडीजवळ आल्यानंतर काही वाटमारी करणाऱ्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची चेन काढून घेतली. ते घाबरून तसेच मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यात आले. मध्यरात्र झाल्याने दर्गा परिसरात झोपलेले असताना दर्ग्यातील तौफिक मुतवल्ली आणि फैय्याज पटेल यांच्या नजरेस ही अनोळखी व्यक्ती आणि सोबत असलेल्या पिशवीतील दागिने आणि पैसे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले दिसले. त्यामुळे अधिक चौकशीसाठी आदिनाथ उपाध्ये यांना उठवून चौकशी करून शहर पोलिस ठाण्यात आणले आणि पोलिसांना या व्यक्तीबद्दल सांगितले. उपाध्ये यांच्याजवळ असलेल्या मोबाइलवरून शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी येथील मेहुणे काका उपाध्ये आणि भाचा सौरभ उपाध्ये यांना सकाळी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभ उपाध्ये पोलिस ठाण्यात आल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असगर शरीकमसलत, हुसेन मुतवल्ली, सर्फराज सनदी आदी कार्यकाऱ्यांनी पोलिस हवालदार बळीराम पवार आणि त्यांच्या सहकार्याने सहा तोळ्यांचे दागिने आणि १९ हजार ३०० रुपये असा ऐवज आदिनाथ उपाध्ये यांच्यासह भाचा सौरभ उपाध्ये यांच्याकडे सुपूर्द केला. अगदी मध्यरात्री अनोळखी ठिकाणी असूनही मिरजेतील मुस्लिम बांधवांनी रात्रभर धावपळ करून संपर्क साधून मामासह दागिने आणि रोख रक्कम परत केल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करताना सौरभ उपाध्ये यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. या सुखद घटनेमुळे अजूनही समाजात आपुलकी, जिव्हाळा कायम असल्याचे पाहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज युवा ऊर्जा मेळावा

$
0
0

चंदगड : चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतील युवकांसाठी रमेशराव रेडेकर फाउंडेशनच्या वतीने शनिवारी (ता.१२) दुपारी बारा वाजता स्वामी विवेकानंद जयंती `राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधुन `युवा ऊर्जा` मेळाव्याचे आयोजन केले आहे. कॉलेज रोडवरील सोयरिक मंगल कार्यालयात होणाऱ्या या मेळाव्याला तिन्ही तालुक्यांतील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफधारकांना घरपोच सेवा देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रॉव्हिडंट फंड कार्यालयात पीएफधारकांना फेऱ्या घालायला लागू नयेत यासाठी डिजिटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत सर्व पीएफ खाती आधार खात्याशी जोडण्यासाठी कोल्हापूर कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. तीन लाख १४ हजार खात्यांपैकी दोन हजार १४ खात्यांचे आधार लिकिंग झाले आहे. त्यामुळे घरच्या घरी मोबाइलवरुन पीएफची खात्याची माहिती मिळणे अथवा क्लेम करणे सोपे झाले आहे. कोल्हापूर विभागीय भविष्य निर्वाह कार्यालयाचे आयुक्त सौरभ सुमन प्रसाद यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना ही माहिती दिली. आगामी काळात पीएफधारकांना घरपोच सेवा देण्याचे नियोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

नव वर्षातील संकल्पाबाबत आयुक्त प्रसाद म्हणाले, 'आमच्या विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी कारखाने, सहकारी, खासगी संस्थातील तीन लाख १४ हजार कर्मचाऱ्यांकडून पीएफ जमा करून घेतला जातो. पीएफधारकांना कार्यालयात न येता, घरच्याघरी सुविधा मिळावी यासाठी डिजिटल इंडिया अंतर्गत ऑनलाइन सुविधा दिली जात आहे. त्यासाठी प्रत्येक पीएफधारकांच्या युनिव्हर्सल अकाउंटशी आधारकार्ड जोडले जात आहे. कोल्हापूर विभागात तीन लाख १४ हजार पीएफधारकांपैकी दोन लाख १४ पीएफधारक आधारशी जोडले गेले आहेत. शिल्लक एक लाख पीएफधारक पुढील दीड ते दोन महिन्यात जोडले जातील.'

'ज्या पीएफधारकांनी आधारकार्डशी जोडणी केलेली नाही, त्यांनी लवकर आधारकार्ड लिंक करावे,' असे आवाहन करुन आयुक्त प्रसाद म्हणाले, 'आधारकार्डशी अकाऊंड लिंक झाल्यावर पीएफधारकाला मोबाइलवर पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे जमा झाले?, आपल्या पगारातून कापून घेतलेले पैसे मालकाने जमा केले आहेत की नाहीत हे पहायला मिळणार आहे. पीएफ खात्यावरील रक्कमेवर कर्जासाठी अर्जही करता येणे शक्य आहे. एका संस्था सोडून दुसऱ्या संस्थेत नोकरी केली तरी पीएफ अकाउंट नंबर आधारक्रमांकाशी जोडले जाणार असल्याने कर्मचाऱ्याचे खाते पुढे सुरू राहणार आहे. तसेच त्याची सेवा खंडीत न होता तो कर्मचारी पेन्शनसाठी पात्र राहण्यास मदत होणार आहे. उमंग अॅप अथवा थेट भविष्य निर्वाह निधीच्या वेबसाईटवरुन जाऊन पीएफधारक आपल्या खात्याची माहिती घरबसल्या बघू शकणार आहेत.'

'कोल्हापूर कार्यालयाने पेन्शनधारकांचे डिजिटल साइड सर्टिफिकेट करण्यात आघाडी घेतली आहे,' असे सांगून आयुक्त प्रसाद म्हणाले, 'दरवर्षी पेन्शनधारकांना हयातीचा दाखला द्यावा लागतो. पण आधारकार्डशी लिंक झाल्यावर घरातून मोबाइलवर अथवा सेतू केंद्रात जाऊन थंम्बद्वारे हयातीचा पुरावा देता येणार आहे. जिल्ह्यातील एक लाख ५१ हजार पेन्शनधारकांपैकी एक लाख २२ हजार पेन्शनधारकांचे डिजिटल साइड सर्टिफिकेट करण्यात आले आहे. एक एप्रिल २०१८पासून ६५ हजार पेन्शनधारकांनी क्लेम केले. त्यापैकी ६० हजार क्लेम ऑनलाइ झाले. यावरुन कोल्हापूर विभागाने चांगली आघाडी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. ऑनलाइन सुविधेमुळे पीएफधारकांचे वेळ व श्रम वाचले आहेत.'

'एकीकडे पेन्शनधारकांना सुविधा देत असताना ज्या कंपन्याचे मालक पीएफधारकांच्या खात्यावर रक्कम भरत नाही त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जात आहे,' अशी माहिती आयुक्त प्रसाद यांनी दिली. ते म्हणाले, 'गेल्यावर्षी ४२ संस्थांवर फौजदारीच्या तक्रारी दाखल केल्या असून पाच संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. काही संस्थांनी पीएफ कर्मचाऱ्यांच्या खात्यावर १२ कोटी ५६ लाख रुपये भरले नाहीत. आम्ही कारवाईचा बडगा उगारल्यावर साडेचार कोटी रुपये वसूल केला आहे.'

लोगो : संकल्प २०१९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापुरात घरकुल धनादेशांचे वाटप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

मलकापूर नगरपरिषदेच्या हद्दीतील बेघर लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेतून मंजूर सरकारी निधीच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले. पालिका सभागृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषद बांधकाम सभापती सर्जेराव पाटील यांच्या हस्ते एकूण १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपयांचे हे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

यावेळी सभापती सर्जेराव पाटील यांनी संबंधितांना घरकुलाबाबत सूचना करताना लाभार्थ्यांनी निकषांप्रमाणे चांगले बांधकाम करून घेण्याचा सल्लाही दिला, तर मुख्याधिकारी शीला पाटील यांनी लाभार्थ्यांना घरकुल बांधकामाचे निकष व निधीबाबत मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष अमोल केसरकर यांनी आतापर्यंत वीस लाभार्थ्यांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळवून दिल्याचे सांगताना उर्वरित गरजू लाभार्थ्यांनाही लवकरच घरकुल योजनेचा लाभ मिळेल असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, विरोधी पक्षनेते बाबासाहेब पाटील, नगरसेवक दिलीप गांधी, मानसिंग कांबळे, नगरसेविका कोकरे-देसाई, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपीचे तुकडे, २३०० रुपये जमा

$
0
0

स्वाभिमानीला निर्णय अमान्य, संघर्ष उडण्याची चिन्हे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडले असून शुक्रवारी जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी प्रतिटन २३०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला. एफआरपीची शिल्लक सरासरी ५०० रुपयांची रक्कम कशी देणार हे कारखानदारांनी स्पष्ट न केल्याने त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एफआरपीचे तुकडे पाडल्यास जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यापूर्वी दिला असल्याने पुढील काळात संघर्ष उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे पाडून ८०:२० नुसार बिले देण्याची तयारी दर्शवली होती. पण त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध दर्शवला. ज्या दिवशी तुकडे पाडून एफआरपी जमा होईल, त्यावेळी सर्व कारखाने बंद पाडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कारखान्यांनी माघार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी (ता. ८) जिल्ह्यातील कारखानदारांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. कारखानदारांकडून एफआरपीसाठी कमी पडलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी किंवा साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपयांवरुन ३४०० रुपये करावा, अशी मागणी करण्यात आली. साखर कारखानदारांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण दोन दिवसांत राज्य सरकारकडून कोणतीच घोषणा न झाल्याने अखेर कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे पाडण्याचा निर्णय घेतला.

शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत राजाराम, दूधगंगा बिद्री, भोगावती, गडहिंग्लज, आजरा, मंडलिक, दत्त शिरोळ या कारखान्यांनी २३०० रुपयांचा उसाचा पहिला हप्ता जमा केला. ३० नोव्हेंबरपर्यंत गाळप झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहेत. राज्य बँकेकडून कर्ज घेतलेल्या कुंभी, जवाहर, शाहू कारखान्यांची बिले सोमवारी (ता. १४) जमा होणार आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांनी २२३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून ६३२ कोटी एफआरपी थकीत होती. २३०० रुपये पहिल्या हप्ताप्रमाणे ५०० कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. डिसेंबर २०१८ अखेर राज्यातील १८८ कारखान्यांची ३५५७ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३६ सहकारी साखर कारखानदारांकडून दोन महिन्यांची तब्बल १७०० रुपये एफआरपी थकीत आहे.

...

कोट

'एकरकमी एफआरपी जमा करण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. पण कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे पाडले असून ते आम्हाला मान्य नाही. या निर्णयाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील. कायदेशीर व रस्त्यांवरील लढाई आम्हाला लढावी लागेल.

राजू शेट्टी, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलाचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाचे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण करा. कोणत्याही परिस्थितीत काम बंद होऊ देऊ नका. तसे झाल्यास अधिकारीच त्याला जबाबदार असतील असा इशारा शुक्रवारी सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिला. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय कांडगावे यांना निवेदन देण्यात आले.

दीर्घकाळ रेंगाळलेल्या पर्यायी शिवाजी पुलाचे काम जनतेच्या रेट्यामुळे पुन्हा सुरू आहे. 'आसमास' कंपनी काम करीत आहे. ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामाच्या बिलासाठी प्रशासनाकडे ठेकेदार कंपनी पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासन बिल देण्यास टाळाटाळ करीत आहे. बिल न दिल्यास काम बंद होण्याचा धोका आहे. त्यामुळे शिष्टमंडळाने अभियंता कांडगावे यांची भेट घेऊन चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत फेब्रुवारीअखेर काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कांडगावे यांना बिल देऊन वेळेत काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला जात आहे, असे सांगितले. शिष्टमंडळात बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अशोक पवार, संभाजी जगदाळे, रमेश मोरे, सुनील पाटील, सुभाष देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदर्श जर्मनीला अखेर ‘मोक्का’

$
0
0

फोटो - आदर्श जर्मनी..

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

अल्पवयीन असल्याचा फायदा उठवत खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी, हाणामाऱ्या असे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि बाल सुधारगृहातून पलायन केलेल्या जर्मनी टोळीचा म्होरक्या आदर्श शेखर जाधव ऊर्फ जर्मनी (वय १९ रा. कबनूर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने निपाणी येथून ताब्यात घेतले. त्याच्यासह टोळीवर पुणे येथील विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

पोलिसांनी आदर्शसह त्याचे भाऊ अविनाश व आनंद जर्मनी यांच्यावर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतु तो अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात केली होती. अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत ही टोळी सतत गुन्हे करत असल्याने शहर आणि परिसरात जर्मनी टोळीची मोठी दहशत निर्माण झाली होती.

००००

००००

तानाजी पोवार इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष

फोटो -

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

उपनगराध्यक्षपदासाठी भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांचा एकमेव अर्ज आल्याने उपनगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत निवडीची घोषणा करण्यात आली. निवडीनंतर गुलालांची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत पोवार समर्थकांनी जल्लोष साजरा केला. सरिता आवळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवारी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित केली होती. त्यामध्ये एकमात्र अर्ज आल्याने उपनगराध्यक्षपदी तानाजी पोवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या नोटिसीनंतर ‘जनता’चा घरफाळा जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स स्टोअर्सकडे (जनता बझार) थकीत असलेल्या घरफाळ्याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी भाडेकरुला नोटीस बजवाल्यानंतर सुमारे दीड कोटी रुपयांचा घरफाळा जमा करण्यात आला. मात्र अद्याप वरुणतीर्थ वेस (गांधी मैदान) येथील इमारतीचा चार लाखांचा घरफाळा थकीत असल्याचे समोर आले आहे.

जनता बझारला महापालिकेच्या चार ठिकाणच्या इमारती 'बांधा वापरा व हस्तांतरीत करा' तत्वाखाली भाड्याने दिल्या आहेत. राजारामपुरी, रुईकर कॉलनी, गांधी मैदान येथे या महापालिकेच्या इमारती आहेत. इमारती भाड्याने देताना पोटकूळ नेमायचे नाही यांसह अन्य अटी व शर्ती दिल्या होत्या. तरीही जनता बझारने पोटकूळ नेमले आहे. याबाबत महापालिकेने कोणतीही कारवाई न करता करार आणखी ३० वर्षांसाठी वाढविला आहे. मात्र, भाडेकरार वाढविल्यानंतर जनता बझारच्या सर्व इमारतींचा घरफाळा थकीत गेला आहे.

थकीत घरफाळ्यासाठी महापालिकेने अनेकवेळा पत्रव्यवहार करुनही पोटकूळ असलेल्या भाडेकरुने घरफाळा भरलेला नव्हता. मात्र आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारत नोटीस बजावल्यानंतर राजारामपुरी व रुईकर कॉलनी येथील इमारतीचा सुमारे दीड कोटींचा थकीत घरफाळा संबंधितांनी जमा केला. मात्र, नोटीस देऊनही गांधी मैदान येथील इमारतीचा सुमारे चार लाखांचा घरफाळा अद्यपाही जमा झालेला नाही. सर्वसामान्य व्यक्तींचा घरफाळा थकीत गेल्यानंतर कारवाईचा बडगा उगारणारी महापालिका यंत्रणा धनदांडग्या आणि राजकीय आश्रय असलेल्या संस्थांना अभय देत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

नोटीस दिल्यानंतर चार दिवसांपूर्वी जनता बझारच्या भाडेकरुने घरफाळा जमा केला. अद्याप वरुणतीर्थ वेस येथील इमारतीचा घरफाळा जमा केलेला नाही.

- दिवाकर कारंडे, करनिर्धारक

लोगो : महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूर: गुप्तधनासाठी मंगळवेढ्याच्या प्रतीकचा नरबळी

$
0
0

सोलापूर:

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील प्रतीक शिवशरण या नऊ वर्षांच्या मुलाची हत्या हा नरबळीचाच प्रकार आहे. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींची शारिरीक व्याधीतून सुटका करण्यासाठी आणि गुप्तधनासाठी आरोपीनं प्रतीकचा नरबळी दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रतीक मधुकर शिवशरण (वय ९) या शाळकरी मुलाचे २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते. सहाव्या दिवशी माचणूर गावच्या शिवारात ऊसाच्या फडात प्रतीकचा मृतदेह सापडला होता. त्याच्या डोक्याचे केस काढलेले होते आणि डावा पाय कापला होता. तेथेच हिरव्या रंगाची चोळी, बांगड्याही सापडल्या होत्या. त्यामुळं हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय बळावला होता. त्याआधारे पोलिसांनी तपास केला. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देण्यासाठी आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रतीकची हत्या हा नरबळीच आहे. विधीसाठी टप्प्याटप्प्यानं त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गुन्ह्यातील तिसरा आरोपी नानासाहेब डोके याला अटक करण्यात आली आहे. तो संत दामाजी साखर कारखान्याचा माजी संचालक आहे. स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींची शारिरीक व्याधीतून सुटका करण्यासाठी आणि गुप्तधनासाठी त्यानं प्रतीकचा बळी घेतला, अशी माहिती त्यांनी दिली. भरत शिवशरण या मांत्रिकाच्या मदतीनं त्यानं प्रतीकची हत्या केली. तर एका अल्पवयीन आरोपीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठुरायाचे ऑनलाईन दर्शन झाले विकतचे

$
0
0

पंढरपूर :

विठुरायाच्या ऑनलाईन दर्शनाला १०० रुपये आकारण्याचा निर्णय मंदिर समितीने आजच्या बैठकीत घेतला आहे. भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत होत आहे. देशभरातून येणारे बहुतांश उच्य व मध्यमवर्गीय भाविक विठुरायाच्या दर्शनाला येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग करुन पंढरपूरमध्ये येत असतात. बुकिंगमुळे आतापर्यंत भाविकाना फुकट झटपट दर्शनाचा लाभ मिळत असे.

काही मंडळी या ऑनलाइन बुकिंग व्यवहारात गैरप्रकार करुन पैसे मिळवायचा उद्योग करीत. वर्षभरातील काही गर्दीचे दिवस वगळता ३३० दिवस रोज सरासरी दोन हजार भाविक हे ऑनलाईन दर्शन घेत असतात. मंदिराच्या आजच्या निर्णयामुळे यापुढे ऑनलाईन दर्शनासाठी १०० रुपये द्यावे लागणार आहेत. यामुळे मंदिराच्या उत्पन्नात वर्षाला ८ ते १० कोटी रुपयाची वाढ होणार आहे . या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकाना काहीच त्रास होणार नसल्याने भाविकांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे . मात्र याचसोबत फुकटची घुसखोरी करुन दर्शनासाठी येणार्या VIP लोकांकडूनही पैसे वसुल करण्याचा निर्णय मंदिर समितीने घ्यावा अशी मागणी भाविकांकडून होत आहे. या व्यवस्थेतून मिळणाऱ्या जादा पैशातून भाविकांसाठी विकास कामे करणे मंदिर समितीला शक्य होणार आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाप्रश्नी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

$
0
0

कोल्हापूर:

सीमाप्रश्नी सुप्रिम कोर्टात महाराष्ट्राची भूमिका सक्षमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, यासाठी उद्या, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ठोस कार्यवाही न केल्यास ११ फेब्रुवारीपासून मुंबईत त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.

कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवेळी चार दिवसांपूर्वी राज्य सरकारची भूमिका मांडणारे महत्त्वाचे वकील हरिष साळवे उपस्थित राहू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील मध्यवर्ती एकीकरण समितीचे शिष्टमंडळ पवारांना भेटले. या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मनोहर किणीकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

सीमाप्रश्नाच्या सुनावणीत कर्नाटक सरकारचे वकील भक्कमपणे बाजू मांडत आहेत, पण महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या दोन वकिलांच्या निधनानंतर नवीन वकीलही नियुक्त केले नाहीत. यामुळे नवीन वकील नियुक्तीसाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने पवारांना सांगितले. साळवे यांच्याशी चर्चा करण्याची विनंती त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर तातडीने म्हणजे सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांना सीमाभागातील शिष्टमंडळासह भेटण्याची ग्वाही पवारांनी दिली.

दरम्यान, कोर्टात लागणारे सर्व कागदपत्रे देऊनही सरकार भूमिका मांडत नसल्याची तक्रार दळवी यांनी केली. येत्या १० फेब्रुवारीपर्यंत जर सरकारने ठोस कार्यवाही केली नाही तर ११ फेब्रुवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामंडळाची सभा शांततेत पार पाडण्याचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची सभेत अनेक विषयावर संचालकांना जाब विचारतानाच सभा शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय सभासदांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी होते.

येत्या २७ जानेवारी रोजी महामंडळाची सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. सभेत ऐनवेळी प्रश्न न विचारता दोन दिवसांत अध्यक्षांना प्रश्नांची यादी देण्याचे ठरले. सभा सतत गोंधळात होत असल्याने महामंडळाची बदनामी होते. ते टाळण्यासाठी सभा शांततेत पार पाडण्याचा निर्णय झाला. महामंडळाचा शाखाविस्तार का केला?, घटनेप्रमाणे कामकाज चालते का?, चित्रनगरी पूर्णक्षमतेने सुरू करण्यात महामंडळ पाठपुरावा का करत नाही?, कलाकार मानधनाच्या प्रश्नांत लक्ष का घातले जात नाही? असे काही प्रश्न सभेत विचारण्यात येणार आहेत. त्याची यादी अध्यक्षांना देण्यात येणार आहे. दरम्यान, सचिवांनी दिलेला राजीनामा मंजूर करू नये अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

यावेळी अर्जुन नलवडे, अशोक जाधव, बाबा पार्टे, छाया सांगावकर, रूपाली पाटील, जहिदा मुजावर, आकाराम पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभीकडून तोडफोड

$
0
0

सांगली जिल्ह्यातही आंदोलन तीव्र

टीम मटा

उसाची एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शनिवारी आक्रमक झाले. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांच्या अनेक गट कार्यालयाची मोडतोड करण्याबरोबरच काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी कार्यालये पेटवून दिली. अनेक ठिकाणी ऊसवाहतूक रोखण्यात आली. संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्याने ऊस वाहतूक बंद ठेवावी लागली. जोपर्यंत एकरकमी एफआरपी दिली जात नाही, तोपर्यंत गट कार्यालये सुरू करू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

उसाची एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरुवातीपासूनची मागणी आहे. एफआरपीमध्ये मोडतोड केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता. मात्र शुक्रवारी कारखान्यांनी उसाची पहिली उचल केवळ २३०० रुपयेच जमा केल्याने शनिवारी कार्यकर्ते संतप्त झाले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र केले.

जयसिंगपूर येथे संतप्त कार्यकर्त्यांनी दत्त, जवाहर व गुरूदत्त साखर कारखान्याची कार्यालये फोडली. तेथील साहित्याची मोडतोड केली. कर्मचाऱ्यांना किरकोळ धक्काबुक्कीचे प्रकारही घडले. कुरूंदवाड येथेही कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले.

सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता दिसून आली. क्रांती साखर कारखान्याचे घोगाव, ता. पलूस येथील आणि कृष्णा साखर कारखान्याचे रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा येथील गट ऑफिसही पेटवून देण्यात आले. 'कृष्णा'च्या रेठरे हरणाक्ष येथील गट कार्यालयाला लावलेल्या आगीत फर्निचर भक्ष्यस्थानी पडले. काही कागदपत्रेही जाळण्यात आली. 'स्वाभिमानी'चे वाळवा तालुका आध्यक्ष भागवत जाधव यांनी एफआरपी कायदा मोडून कारखाने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करत असतील तर ते खपवून घेणार नाही, ठरल्याप्रमाणे विनाकपात एफआरपी मिळाली मिळाली पाहिजे, असा इशारा दिला.

म्हैसाळ येथील चार कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांनाही टाळे ठोकण्यात आले. तेथील वसंतदादा कारखाना चालविणाऱ्या दत्त इंडिया कंपनी, मोहनराव शिंदे कारखाना आरग, शिवशक्ती शुगर, सौंदत्ती आणि कागवाड शुगर या कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळे ठोकले. कारखान्यांची कार्यालये बंद करण्याचा धडाका संघटनेने लावल्याने ऊस वाहतूक थांबवावी लागली. आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या पेक्षाही तीव' आंदोलनाचा ईशारा दिलेला आहे.

.. .. ..

ही मोगलाई आहे का? : खोत

ऊसदरप्रश्नी केंद्र सरकार मदत करणार आहे. तरीही काहींनी आंदोलन सुरू केले आहे. उठसूठ आंदोलन करायला ही काय मोगलाई आहे का? असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाव न घेता मारला. सरकारकडून साखर कारखान्यांना मदत व्हावी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहवाल पाठवला आहे. त्यामुळे केंद्राकडून लवकरच मदत मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्या मदतीची वाट न पाहता सध्या आंदोलन सुरू आहे.

.. .. ..

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिक महाविद्यालयात चोरीचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

मुरगूड (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे शटर व दरवाजाची कडी कापून डीव्हीआर, ट्यूबॉन कंपनीच्या चार बॅटऱ्या असे ५२ हजारांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी ग्रंथालयातून बाहेर काढले. मात्र, चोरट्यांना पोलिसांचा संशय आल्याने साहित्य टाकून पळून गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध मुरगूड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या ग्रंथालयात शुक्रवारी दुपारी चार ते शनिवार सकाळी आठपूर्वी अज्ञात चोरट्यांनी शटर व दरवाजाची कडी कापून डीव्हीआर (१२ हजार), ४० हजार किमतीच्या चार बॅटऱ्या असा ५२ हजारांचा माल चोरून नेण्यासाठी ग्रंथालयाबाहेर काढला. मात्र, पोलिसांचा संशय आल्याने गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल व लोखंडी हातोडी, पाना, हेक्सा ब्लेड असे साहित्य टाकून तेथून पळून गेले . याबाबतची फिर्याद ग्रंथपाल तानाजी सातपुते यांनी पोलिसात दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वयात घट केल्याने पीएसआय परीक्षेत उमेदवारांना फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी पोलिस उप निरीक्षक पदासाठी खेळाडूंच्या कोट्यातील मागावर्गीय उमेदवारांच्या वयात घट केल्याने उमेदवारांना फटका बसणार आहे. प्राविण्य प्राप्त खेळाडूंची वयोमर्यादा ३९वरुन ३६ केली आहे.

आयोगाने सामान्य प्रशासन विभाग, राज्य कर निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक पदासाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीत पोलिस उप निरीक्षक पदासाठी प्राविण्यप्राप्त खेळाडूंसाठी मागासवर्गीय गटातील उमेदवारांना वयाची अट ३६ वर्षे ठेवली आहे. २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी ही अट ३९ वर्षे होती. गेल्यावर्षी संधी हुकलेल्या खेळाडूंनी यंदा परीक्षेसाठी तयारी सुरू केली असताना वयाची अट ३६ केल्याचे लक्षात आले. त्यामुळे अनेक खेळाडूंची संधी हुकणार आहे. २४ मार्च रोजी पूर्वपरीक्षा होणार असून उपनिरीक्षक पदासाठी ४९६ पदे आहेत. मागासवर्ग गटासाठी ७९ पदे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजमाता जिजाऊना अभिवादन

$
0
0

राजमाता जिजाऊना अभिवादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूल येथील राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. महापौर सरिता मोरे यांनी जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी वैशाली क्षीरसागर, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंह जाधव, केएमसी कॉलेजचे प्राचार्य सुरेश गवळी, मुख्याध्यापिका अंजली जाधव, अॅड. संजयकुमार गायकवाड, किशोर घाडगे, अॅड. संगीता तांबे, प्रभावती इनामदार, किशोरी स्वामी, वैशाली पसारे, सुनीता सूर्यवंशी, प्रमोदिनी हर्डिकर, शोभा कोळी, गीता भोसले, अॅड. संगीता तांबे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विचारांचा मधुघट रिता होणार नाही’

$
0
0

डॉ. एन. डी. पाटील यांचा प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्काराने सन्मान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रात काम करताना प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी नेहमीच सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळवून दिला. सीमा बांधवाच्या लढ्यात अद्याप यश आले नसल्याचे त्यांच्यामध्ये अस्वस्थता असली तरी त्यांनी मराठी भाषिकांना प्रेमाचा ओलावा नेहमीच दिला. आगामी काळातही समाजमन तयार करण्याची जबाबदारी ते समर्थपणे पेलतील. विचारांचा मधुघट कधी रिता होणार नाही' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. त्यासाठी पवार यांनी त्यांच्या दीर्घआयुष्याची प्रार्थनाही केली.

शिवाजी विद्यापीठातर्फे डॉ. एन. डी. पाटील यांचा प्राचार्य डॉ. रा. कृ. कणबरकर पुरस्काराने गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे होते. सरोज पाटील, रयत परिवारातील मान्यवरांच्या उपस्थितीत लोककला केंद्राच्या सभागृहात भावपूर्ण वातावरणात पुरस्कार वितरण झाले. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व दीड लाखांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप होते. पवार यांच्या हस्ते डॉ. पाटील यांचा गौरव झाला.

शरद पवार म्हणाले, 'डॉ. पाटील यांनी आजपर्यंत समाजातील शेवटच्या घटकाचे अश्रू पुसण्याचे काम केले. कधीही वैयक्तिक स्वार्थ पाहिला नाही. संकुचित विचार केला नाही. शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी वर्गासाठी ते झटत आहेत. त्यांनी कधीही विचारांशी प्रतारणा केली नाही. त्यांचे विचार नव्या पिढीला प्रेरणादायी ठरतील. ज्या काळात शिक्षण ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी होती, त्यावेळी त्यांनी शिक्षणाची कास धरली. जिद्द आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आशीर्वाद लाभल्याने ते उच्च विद्याविभूषित झाले. सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतल्यानंतर शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी त्यांनी संघर्षाची भूमिका कायम ठेवली. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघर्षाची भूमिका मांडली.'

आठवणींना उजाळा देताना प्रा. डॉ. पाटील म्हणाले, 'गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अत्यंत खालवली. शरीरातील सोडियमचे प्रमाण नको तितक्या पातळीपर्यंत घटल्याचा परिणाम स्मरणशक्तीवर झाला. त्यामुळे भेटायला येणारे अनेकजणांनी मला ओळखलं का? असे विचारल्यानंतर वेदना होत होत्या. पण, दोन जानेवारीला विद्यापीठातील वि. रा. शिंदे जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात औपचारिक भाषण केले. त्या भाषणामुळे आजचे बळ मिळाले. गेल्यावेळी प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार रयत संस्थेला मिळाल्यानंतर तो स्वीकारण्याचे भाग्य मला मिळाले. आता पुन्हा हा पुरस्कार स्वीकारण्याचे भाग्य लाभले. कणबरकरांचे आणि माझे संबंध वडिलभावाचे होते. त्यामुळे पुरस्काराचा नम्रतापूर्वक स्वीकार करतो.'

कुलगुरु डॉ. शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. पवार यांच्या हस्ते शारदाबाई गोविंद पवार अध्यासन केंद्राच्यावतीने डॉ. भारती पाटील संपादीत 'कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्रिया' पुस्तकाचे व विद्यापीठाच्या दैनंदिनीचे प्रकाशन करण्यात आले. गौरव समारंभास प्र-कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. नमिता खोत यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. भारती पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. पी. ए. खोत यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

व्हीप काढण्याचा कधी प्रयत्न केला नाही

'डॉ. पाटील हे मोठ्या बहिणीचे पती असल्याने नात्याने ते मेहूणे लागतात. वयाने लहान असूनही मी मंत्रीपदावर असताना ते विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे अनेकदा कठिण प्रसंगातून जावे लागले. पण आमचा 'व्हीप' कधी त्यांच्यावर चालला नाही आणि काढण्याचा प्रयत्नही केला नाही' असे पवार यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

'यावर याचिका चालत नाही'

एन. डी. पाटील यांचे भाषण नेहमी अत्यंत मुद्देसूद असते. आजही गौरव समारंभावेळी तसेच भाषण सुरू होते. मात्र भाषण लांबल्याचे लक्षात आल्यावर सरोज पाटील (माई) यांनी त्यांना थांबविण्यासाठी कागद देताच, 'यावर याचिका चालत नाही' असे डॉ. पाटील म्हणताच सभागृह पुन्हा हास्यकल्लोळात बुडाले.

गुरूंबद्दल कृतज्ञता

डॉ. पाटील यांनी शैक्षणिक वाटचालीत पांडुरंग परीट गुरुजी आणि महाविद्यालयीन शिक्षणात रामकृष्ण खैरमोडे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभल्याचे स्पष्ट करत कृतज्ञता व्यक्त केली. खैरमोडे यांचे आष्टा येथील महाविद्यालयामध्ये स्मारक म्हणून स्मृतीमंदिर उभारण्यासाठी पुरस्काराचा दीड लाखांचा धनादेश 'रयत'चे अध्यक्ष पवार यांच्याकडे सुपूर्द करत उर्वरीत दहा लाखांचा निधी देण्याची विनंती केली. पवार यांनीही मनोगतानंतर दीड लाखांचा धनादेश चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्याकडे देत उर्वरीत दहा लाखांचा निधी देण्याची घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजरी, राळ्याच्या तांदळाला मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भोगी सणासाठी बाजारपेठेत बाजरी आणि बाजरीचे पीठ, राळ्याच्या तांदळाला मागणी वाढली आहे. शेंगतेलाच्या दरात प्रतिकिलो तीन रुपयांनी तर पांढऱ्या वाटाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. तीळ, गूळ, तीळगूळ खरेदी जोरात सुरू आहे. ग्राहकांकडून मागणी वाढल्याने याची उलाढाल जास्त आहे.

पुढील आठवड्यात सोमवारी भोगी, मंगळवारी सक्रांत तर बुधवारी किक्रांत हे सण येतात. भोगीला बाजरीची भाकरी केली जात असल्याने बाजरीची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. बाजरीचा दर प्रतिकिलो २८ रुपये आहे. बाजरीच्या पीठाला मागणी असल्याने प्रतिकिलो ४० रुपये दराने विक्री सुरू होती. राळ्याचा भात फक्त भोगी सणादिवशी केला जात असल्याने राळ्याच्या तांदळाची विक्री प्रतिकिलो १०० रुपये दराने झाली. पोह्याच्या दरात एक रुपयाने घट झाली असून प्रतिकिलो ४० रुपये दर झाला आहे. शेंगतेलाच्या दरात प्रतिकिलो तीन रुपये वाढ झाली असून तो १२५वरुन १२८ रुपयांवर दर पोहोचला आहे. गुळाची आवक जास्त झाल्याने दर प्रतिकिलो ४५ ते ५० रुपयांवर स्थिर आहे. पांढऱ्या वाटाण्याची आवक घटल्याने दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो ५८ रुपयांवरुन ६८ रुपये दर झाला आहे.

किराणा दर (प्रतिकलो, रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३४ ते ३६ .

शेंगदाणा : ९० ते १००

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४५ ते ५०

शाबूदाणा : ५६

वरी : ७२ ते ८०

डाळीचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

तूरडाळ : ७० ते ७६

मूगडाळ: ८४ ते ८८

उडीद डाळ: ८० ते ८४

हरभरा डाळ : ७२

मसूर डाळ ६४

मसूर: ७० ते १२०

चवळी : ८०रु.

हिरवा वाटाणा : ९६ .

काळा वाटाणा: ६० ते ६४

पांढरा वाटाणा : ६८

मटकी: ९० ते १००

छोले : ८० ते १००

ज्वारी दर (प्रतिकिलो, रुपयांत)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : २८ ते ३४

हायब्रीड ज्वारी :२८ ते ३०

बाजरी : २८ रु. ४०

नाचणी : ३६

तेलाचे दर (प्रतिकलो, रुपयांत)

शेंगतेल : १२८

सरकी तेल: ८८ .

खोबरेल : १८० ते २४०

सूर्यफूल: ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो, रुपयांत)

तीळ : २००

जिरे : २८० .

खसखस : ८००

खोबरे : १८० ते २०० .

वेलदोडे : २०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्तथरारक हॉर्स शोचा थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वेगाने धावणारे देखणे जातिवंत घोडे, त्यांच्या चित्तथरारक कसरती, उधळणाऱ्या घोड्यांवर लीलया हुकूमत गाजवणारे जॉकी अशा सळसळत्या उत्साही वातावरणात रविवारी येथील पोलो मैदानावर 'रॉयल कोल्हापूर हॉर्स शोला' प्रारंभ झाला. कोल्हापूर इक्वेस्टेरिअन असोसिएशनतर्फे तीन दिवसीय हॉर्स शोचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, कर्नल आर. एस. लेहल, सुहासिनीदेवी घाटगे, नवोदिता घाटगे, किरण पाटील, रणजित शहा, गिरीश कामत, विशाल बिष्णोई, प्रथम मेहता, रुदय छेडा यांच्या उपस्थितीत रॉयल हॉर्स शोचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज्यातील पुणे, मुंबई, अकलूज, सातारा, लोणी, कोल्हापूर या ठिकाणांहून ७० घोड्यासह १५० खेळाडू सहभागी झाले आहेत.

हॉर्स शोचा पहिला दिवस लक्षवेधी चित्तथरारक कसरतीने गाजला. यावेळी विविध प्रकारात अश्वांची चपळता आणि त्यांचा रुबाबदार डौल उपस्थितांना अनुभवायला मिळाला. शो जम्पिंग, पोल बेंडिंग, ट्रोटिंग रेस, या क्रीडा प्रकारात स्पर्धेचा पहिला दिवस पार पडला.

गटनिहाय विजेते

शो जम्पिंग टॉप स्कोर (खुला गट) : के. व्ही. सिंग (पुणे), सागर गामा (दिग्विजय प्रतिष्ठान), क्वीस दलाल (पुणे).

शो जम्पिंग टॉप स्कोर (ज्युनियर) : प्रीतम रात्रा (द राईड टू लिव्ह अकॅडमी), यशवर्धन ठाकूर (पुणे), किरण आखाडे (द राइड टू लिव्ह अकॅडमी).

पोल बेंडिंग (१४ वर्षाखालील) : विधी सावंत (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), ज्योतिरादित्य सुर्वे (प्रायव्हेट राईडर), सोमनाथ करपे (नरके पन्हाळा पब्लिक स्कूल).

शो जम्पिंग टॉप स्कोर (मुले) : स्तुती वाधवा (केडर ईक्वेस्टेरिअन सेंटर), श्लोक झुनझुनवाला (जापालुपे ईक्वेस्टेरिअन सेंटर), शुभम बिरादार (ग्रीन फिंगर स्कूल).

पोल बिल्डिंग (१४ वर्षावरील) : ऋतुराज शिंदे (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), आर्यन यादव, देवांग रासने (सौ. विजयादेवी यादव इंग्लिश मीडियम स्कूल).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता दल राष्ट्रवादीसोबत?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनता दलाची ताकद राष्ट्रवादी पक्षाला मिळावी यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार हे रविवारी पक्षाचे नेते श्रीपतराव शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. पवार कोल्हापुरात दाखल झाले असून रात्री त्यांनी काही नेत्यांशी राजकीय चर्चा केल्याचे समजते.

नियोजनप्रमाणे पवार हे कडोली येथून वाहनाने बेळगाव विमानतळावर जाऊन तेथून विमानाने कोल्हापूरला येणार होते. पण यात बराच वेळ जाणार असल्याचे लक्षात येताच ते वाहनानेच कोल्हापूरला आले. सायंकाळी पाच वाजता त्यांचे हॉटेल पंचशील येथे आगमन झाले. तेथे त्यांच्या स्वागताला गर्दी झाली होती. यावेळी महापौर सरिता मोरे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, राजू लाटकर, प्रताप माने, आदिल फरास यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सीमाप्रश्नी बेळगाव येथील एकीकरण समितीबरोबरच कोल्हापूरच्या नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांच्या हस्ते विद्यापीठात प्रा. एन. डी. पाटील यांना रा. कृ. कणबरकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विद्यापीठातील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते येथे नातेवाईकांच्या घरी गेले. त्यानंतर काही नेत्यांशी त्यांनी चर्चा केल्याचे समजते. रविवारी सकाळी नऊ वाजता ते गडहिंग्लजला रवाना होणार आहेत. तेथे नगरपालिकेचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर ते शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. गडहिंग्लज परिसरात जनता दलाचा मोठा गट आहे. तो नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेससोबत असला तरी साखर कारखान्यात भाजपबरोबर आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला या गटाची ताकद मिळावी यासाठी या भेटीत चर्चा होणार आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या घरीदेखील ते भेट देणार आहेत. या भेटीत विधानसभेच्या उमेदवारीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images