Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शरद पवार उद्या कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (ता. १२) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस ते जिल्ह्यात असून लोकसभेच्या राजकीय जुळवाजुळवीसाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. जनता दलाचे श्रीपतराव शिंदे यांच्याशी ते चर्चा करणार असल्याने गडहिंग्लज परिसरात त्यांचा लोकसभेला मदत होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात दोन वेळा पवार कोल्हापुरात होते. दौऱ्यात राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करत त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीची पेरणी केली. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. आता पुन्हा ते कोल्हापुरात येत आहेत. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माजी कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर हे पुरस्कार जाहीर झाला आहे. तो पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या दौऱ्यातील हा प्रमुख कार्यक्रम असला तरी दोन दिवस अन्य कार्यक्रम होणार असून त्यातून लोकसभेची जोडणी होण्याची शक्यता आहे.

पवार शनिवारी सकाळी विमानाने बेळगावला येतील. सकाळी दहा वाजता कोडोली येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर ते दुपारी अडीच वाजता विमानाने कोल्हापुरात येतील. चार वाजता शाहू समाधीस्थळाला भेट देतील. पाच वाजता शिवाजी विद्यापीठात प्रा. पाटील यांना पुरस्कार प्रदान कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. रात्री कोल्हापुरात त्यांचा मुक्काम आहे. यावेळी ते काही नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत लोकसभेची जुळवाजुळव असणार आहे.

दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी ते गडहिंग्लजला जाणार आहेत. तेथे नगरपालिकेच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. विशेष म्हणजे जनता दलाचे शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या गटाची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळेच पवारांची ही भेट आहे. त्यानंतर ते संध्यादेवी कुपेकर यांच्या कानडेवाडी येथील निवासस्थानी ते उपस्थित राहतील. तेथून ते कोल्हापुरात परतणार असून विमानाने मुंबईला जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उधारीच्या खुराकावर सुवर्णपदकाला गवसणी

$
0
0

Digambar.Shingote@timesgroup.com

Tweet:@DshingoteMT

पुणे : कोल्हापूरच्या १३ वर्षीय निकिता सुनील कमलाकरने 'खेलो इंडिया यूथ गेम्स'मधील वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश मिळविले. सरावाला जाण्यासाठी रोजचे दहा-बारा किलोमीटर सायकलिंग आणि उधारीच्या खुराकावर निकिताने ही सोनेरी कामगिरी केली आहे.

शिवछत्रपती क्रीडानगरीतील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या ४५ किलो गटात निकिताने स्नॅचमध्ये ५२ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये ७१ किलो असे एकूण १२३ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तमिळनाडूच्या रितिकाने एकूण ११९ किलो वजन उचलत रौप्य, तर आंध्र प्रदेशच्या ज्योतीने ब्रॉन्झ मिळविले.

या यशानंतर निकिताचे वडिल पांडुरंग आणि आई अनिता यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. निकिताच्या आई अनिता म्हणाल्या, 'निकिता खूप जिद्दी आणि मेहनती आहे. शिरोळ तालुक्यातील तेरवाडमध्ये आम्ही राहतो. तेथून रोज ती तीन-चार किलोमीटर सायकलवरून सकाळी आणि सायंकाळी कुरुंदवाडला सरावाला जाते. तेथे हरक्यूलस जिममध्ये सराव करते. सरावात ती खंड पडू देत नाही. खेळातच तिनं करिअर करावे, अशी आमची इच्छा आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. दुसऱ्याच्या शेतावर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मीही नर्स म्हणून काम करते. मात्र, अनेकदा अडचणी येतात. त्यावेळी आम्ही उधारीवर खुराक घेतो. मग जसे पैसे येतील, तशी परतफेड होते. मात्र, तिला वेळेला आम्ही काही कमी पडू देत नाही. तिही कष्टाचे चिज करतेय. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो. तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवावे, अशी इच्छा आहे. तिची मेहनत आणि जिद्द पाहता ती नक्कीच हे यश मिळवेल, असा आम्हाला विश्वास आहे.'

निकिता म्हणाली, 'साने गुरुजी विद्यालयात चंदू माळी सरांनी तीन वर्षांपूर्वी माझी निवड केली. राष्ट्रीय स्तरावरचे हे माझे दुसरे सुवर्ण आहे. गेल्यावर्षी मी स्कूल नॅशनलला सुवर्णपदक पटकावले. खेलो इंडियात प्रथमच सहभागी झाले आणि सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे खूप आनंद झाला आहे.'

०००

पदकासाठी भात बंद

मुंबईच्या सौम्या दळवीने खेलो इंडिया यूथ गेम्समधील वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णयश मिळविले. मात्र, या यशासाठी सौम्याने स्वतःवर अनेक बंधने घातली होती. वजन वाढू नये, यासाठी तिने महिनाभर भात खाण्याचे टाळले. हा निर्णय तिच्यासाठी फलदायी ठरला आणि तिने सोनेरी कामगिरी केली. १७ वर्षांखालील मुलींच्या ४० किलो गटात १३ वर्षीय सौम्याने एकूण १११ किलो वजन उचलून सुवर्ण पटकावले. गेल्याच महिन्यात सौम्याने नागपूरला झालेल्या यूथ नॅशनल्समध्ये सोनेरी कामगिरी केली होती. तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या दृढ निश्चयाने ती पुण्यात दाखल झाली आणि खेलो इंडियात पहिले-वहिले सुवर्णपदक पटकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला गुडघे टेकायला लावू

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कृषिपंपाच्या अन्यायी वीज दरवाढीविरोधात सरकारसोबत चार बैठका झाल्या. मात्र, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे त्यातून काहीच निर्णय झाला नाही. आजवर सरकारसोबत पुष्कळ चर्चा झाली, आता वीज दरवाढ रद्दसाठी रस्त्यावर उतरून अंतिम लढाईसाठी सज्ज व्हा. प्रचंड ताकदीने 'चक्का जाम' आंदोलन करून सरकारला गुडघे टेकायला लावू,' असा निर्धार ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय शेतकरी मेळाव्यात झाला.

सहकारी पाणीपुरवठा संस्था व खासगी कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाच्या अन्यायी वीज दरवाढीविरोधात सर्वपक्षांतर्फे २१ जानेवारीला शिरोली पंचगंगा नदी पुलावर रास्ता रोको होणार आहे. आंदोलनाच्या तयारीसाठी महाराष्ट्र राज्य व कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनर्फे मार्केट यार्ड येथे गुरुवारी मेळावा झाला. याप्रसंगी मान्यवरांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह सरकारवर टीकेची झोड उठविली.

डॉ. पाटील म्हणाले, 'सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात ताबडतोब मार्ग काढावा. वीज दरवाढीच्या विरोधात २१ तारखेला कोणत्याही परिस्थितीत आंदोलन होणारच. आता आश्वासनावर काही भागणार नाही. दुष्काळी परिस्थितीमध्ये वीज कनेक्शन खंडित करण्याचा प्रयत्न झाल्यास खपवून घेणार नाही.'

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'सरकारची प्रश्न सोडविण्याची मानसिकता दिसत नाही. वीज प्रश्नावरून शेतीसह उद्योगव्यवसायांची कोंडी झाली आहे. प्रकल्प बंद पडत आहेत. महाराष्ट्रात नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकार याप्रश्नाकडे गांभीर्याने कधी पाहणार? वीजदरवाढप्रश्नी सरकारला धडकी भरेल असे आंदोलन करू. यामध्ये राष्ट्रवादी पक्ष ताकदीने उतरेल.' वारणा बचाव कृती समितीचे महादेव धनवडे यांनी दरवाढ रद्द न झाल्यास सरकारविरोधात असहकार आंदोलन करू. शेतसारा, पाणीपट्टी, लाइट बिल न भरण्याबाबत सर्वसंमतीने निर्णय घेऊ असे सांगितले. मारुती जाधव तळाशीकर म्हणाले, 'चार साडेचार वर्षापूर्वी 'कमल का फूल, बडी भूल'असा प्रकार घडला. शेतकऱ्यांना भरडणाऱ्या या सरकारला येत्या निवडणुकीत धडा शिकवण्याचा निश्चय करू.' याप्रसंगी माजी आमदार संपतराव पवार पाटील, बाबासाहेब पाटील भुयेकर, आर.जी.तांबे, शेकापचे कुमार जाधव, बाजार समितीचे विलास साठे यांची भाषणे झाली. रणजित जाधव यांनी सूत्रसंचालन केले. फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी प्रास्ताविक केले.

०००

स्वाभिमानी पूर्ण ताकदीनिशी उतरणार

खासदार राजू शेट्टी यांनी चक्का जाम आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे सांगितले. तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या कारखानदारांना सळो की पळो करून सोडू असा इशारा दिला. पुणे येथे २८ जानेवारीला साखर आयुक्त कार्यालयावर हजारोंचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

महावितरणमधील भ्रष्टाचाराला सचिव व मुख्यमंत्र्याचे संरक्षण

वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, 'गेल्या साडेतीन वर्षांत तिपटीने विजेचे दर वाढले. महावितरण कंपनीत मोठा भ्रष्टाचार आहे. वीज गळतीच्या नावाखाली महावितरणमध्ये १० हजार ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार होतो. याला ऊर्जा खात्याच्या सचिवापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सगळेजण संरक्षण देत आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार शेट्टींचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषिपंपाची अन्यायी वीज दरवाढ, थकीत एफआरपीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिला आहे. 'भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे २४ जानेवारी रोजी कोल्हापूर-सांगलीच्या दौऱ्यावर आहेत, सरकारला त्यांचा दौरा सुरळीत व्हावा असे वाटत असेल तर त्याआधी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी' असे आव्हानच खासदार शेट्टी यांनी दिले. कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला. ग्राहकांवर वीज दरवाढ लादणारे सरकार हे व्यापारी व दलालाच्या प्रवृत्तीचे असल्याचा टोलाही शेट्टींनी लगाविला.

खासदार शेट्टी म्हणाले, 'समाजातील सर्वच घटकांची फसवणूक करणे हेच सरकारची खासियत बनली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. ऊस बिलावरुन शेतकरी आंदोलन करीत आहेत. वीज दरवाढीविरोधात सातत्याने संघर्ष सुरू आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घ्यावी. भाजप नेत्यांसह मुख्यमंत्र्यांचे अमित शहा हे 'डॉन' आहेत. शहा व मुख्यमंत्री फडणवीस हे २४ तारखेला कोल्हापूर, सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत. शहा यांना कोल्हापुरात येऊ न देण्याचा ठरविले तर ते याप्रश्नी सरकारला नक्कीच जाब विचारतील. मुख्यमंत्र्यांना याप्रश्नी त्यांच्यासमोर हिशेब द्यावा लागेल. पक्षाध्यक्षांचा दौरा सुरळीत पार पाडायचा असेल तर प्रश्न सोडवा.'

राज्यकर्त्यावर आसूड ओढताना शेट्टी म्हणाले, 'सत्यशोधन समितीचा अहवाल प्रकाशित झाल्यास काळेबेरे बाहेर पडेल ही भीती राज्यकर्त्यांना आहे. या सरकारला अर्ज, विनंत्यांची भाषा कळत नाही. खतांच्या किंमती वाढल्या आहेत. शेतमालाला हमीभाव नाही. उत्पन्न घटत आहे. अशा विचित्र स्थितीत शेतकऱ्यांनी शेती करायची कशी? सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर त्यांच्यासमोर सरकार हतबल होते. मग शेतकऱ्यांना का न्याय मिळत नाही? सरकारला कोल्हापुरी हिसका दाखवावा लागेल. शेतकऱ्यांची ताकत दाखवावी लागेल.'

वीज चोरणारे विधानसभेत गेलेत

'कारखान्यांतून खरेदी करणाऱ्या वीजेचे दर कमी आणि ग्राहकांना वितरित करावयाच्या वीजेचे दर जास्त हा काय प्रकार आहे. अशा कारभारामुळे हे सरकार आहे की दलाल, व्यापारी?' असा प्रश्न उपस्थित करून खासदार शेट्टी यांनी 'सरकारकडून कुणाच्या घशात पैसे घालण्याचे उद्योग सुरू आहेत?' अशी विचारणा केली. 'वीजचोरांना कसलीही शिक्षा होत नाही. आता तर वीजचोरी करणारेही विधानसभेत पोहोचलेत' अशा शब्दांत शेट्टींनी सरकार व त्यामध्ये सहभागी एका आमदारावरही तोफ डागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गगनगडावर १७ला उरुस

$
0
0

गगनबावडा : गगनबावडा येथील हजरतवली गैबीसाहेब व श्री विठ्ठलाईदेवीचा उरुस गुरुवारी (ता.१७) आहे. या निमित्ताने गगनगडावरील गैबी दर्गा व विठ्ठलाईदेवीच्या चौथऱ्याची साफसफाई आणि रंग रंगोटी तसेच विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या दिवशी दुपारी तीन वाजता गलेफ मिरवणूक, रात्री आठ वाजता गलेफ अर्पण, त्यानंतर श्री विठ्ठलाईदेवीचा ओटी भरणी तसेच भाविकांसाठी महाप्रसाद वाटप होणार आहे. बुधवारी संधल चढविण्यात येणार आहे. उरसाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती देवस्थानचे पुजारी रफिक काझी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिन्याकाठी दीड कोटींची जेनेरिक औषधांचा खप

$
0
0

sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर : गेल्या दोन वर्षांत औषधोपचारावरील खर्चात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, ब्रँडेड औषधांपेक्षा ३० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत स्वस्त जेनेरिक औषधे बाजारपेठेत उपलब्ध झाल्याने त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात कोल्हापुरातील रुग्णांना झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात महिन्याला दीड कोटी रुपयांची, तर राज्यात ३० ते ३५ कोटी रुपयांची जेनेरिक औषधे विकली जातात.

रुग्णांना स्वस्त दरातील आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने औषधांच्या किमती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पावले उचलली जात आहेत. या माध्यमातून सरकारने दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली आहेत. शहरात जेनेरिक औषधांचे विविध दुकाने सुरू आहेत. या माध्यमातून गरजू व्यक्तींना माफक दरात औषधे उपलब्ध होत आहेत.

जेनेरिक औषधे म्हणजे काय?

जेनेरिक औषध म्हणजे मूळ औषध किंवा त्या औषधाचे मूळ नाव होय. म्हणजेच जेनेरिक औषध व ब्रँडेड औषध त्यातील मुख्य घटक सारखेच असतात. ब्रँडेड औषधाला व्यापारी कंपन्यांनी दिलेले एक आकर्षक नाव असते. उदा. पॅरासिटॅमॉल हे जेनेरिक नाव आहे. मात्र, व्यापारी कंपन्या तेच औषध क्रोसिन नावाने विकतात. जेनेरिक औषधावरील संशोधनाचा खर्च कंपनीने पेटंटच्या काळात वसूल केलेला असतो. जेनेरिक औषधनिर्मितीचा खर्च कमी येत असल्याने मूळ ब्रँडेड औषधापेक्षा ती किमतीने कमी असतात. देशात सुमारे ९०० जेनेरिक औषधांपासून बनविलेली ६० हजार ब्रँडेड औषधे विकली जातात.

दीर्घकालीन आजारासाठी फायदेशीर

मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकारासाठी लागणाऱ्या औषधांना सर्वाधिक मागणी आहे. दीर्घकालीन चालणाऱ्या आजारांसाठी जेनेरिक औषधे फायद्याची ठरत आहेत. एचआयव्हीवर प्रभावी ठरणाऱ्या 'इफावीर' या औषधाची बाजारपेठेत २२०० रुपये किंमत आहे, तर तेच औषध जेनेरिकमध्ये एक हजार रुपयांना, तर ट्रायडो नावाच्या औषधाची बाजारपेठेतील किंमत तीन हजार, तर जेनेरिक औषधाची किंमत १५०० रुपये आहे. कॅन्सरवर उपयुक्त असणाऱ्या इमॅनिटी औषधाची बाजारपेठेतील किंमत २८०० रुपये असून, जेनेरिक औषध दुकानात ते ७०० रुपयांना उपलब्ध होते. दीर्घकाळ औषध घ्यावे लागणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जेनेरिक औषधे फायदेशीर ठरत आहेत.

गुणवत्तेत तडजोड नाही

अनेकदा जेनेरिक औषधे प्रभावी नसल्याचे रुग्णांमध्ये गैरसमज पसरवले जातात. मात्र, ब्रँडेड औषधाइतकीच गुणवत्ता जेनरिक औषधांमध्ये असते. जेनेरिक औषधे एफडीएच्या नियमानुसार बनवली जात असल्याने गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जात नाही. भारतातून परदेशात दरवर्षी जवळपास ४५ हजार कोटी रुपयांची औषधे पाठवली जातात. त्यामुळे जेनेरिक औषधांच्या निर्मितीबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. जेनेरिक औषधे ब्रँडेड औषधांइतकीच प्रभावी ठरतात.

०००

कोट...

जेनेरिक औषधे सरकारने निर्धारित केलेल्या नियमानुसार बनवली जातात. त्यामुळे त्यात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. वेळोवेळी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तपासणीत जेनेरिक औषधांच्या गुणवत्ता आणि दर्जाबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळलेले नाही.

एस. के. महिंद्रकर, औषध निरीक्षक

०००

सर्वसामान्य रुग्णांसाठी जेनेरिक औषधे वरदान ठरत आहेत. त्यामुळे दीर्घ आजारांवरील औषधोपचाराचा खर्च कमी होत आहे. मात्र, काहीवेळा अज्ञानापोटी गैरसमज पसरवले जातात. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध असलेल्या जेनेरिक औषधांना प्राधान्य द्यावे.

शिवाजी मोठे, जेनरिक औषध विक्रेता

०००

मला उच्च रक्तदाबाची समस्या असल्याने नियमितपणे औषधे घ्यावी लागतात. अनेकदा औषधांचा वाढणारा खर्च परवडत नाही. मात्र, जेनेरिक औषधांमुळे महिन्याला येणाऱ्या खर्चात बचत झाली आहे.

आक्काताई पाटील, ग्राहक

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनशेत मालकी लालफितीत

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : गावपातळीवरील महसूल, ग्रामप्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे जिल्ह्यातील २००५ कुटुंबांचे वनशेतीच्या मालकीचे प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित आहेत. गावातील राजकीय गटबाजी, ग्रामसेवक, प्रांताधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष ही त्याची प्रमुख कारणे आहेत. परिणामी कायद्याने मालकी देण्याची तरतूद असतानाही ते वंचित राहिले आहेत. त्या कुटुंबांना वन प्रशासनाच्या कारवाईच्या धाकात राहावे लागले आहे.

अनुसूचित जमाती व इतर पांरपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) कायद्याद्वारे पिढ्यानपिढ्या चरितार्थासाठी कसत असलेली वनशेतजमीन त्या कुटुंबांच्या नावे करता येते. कोणत्याही जातीचे कुटुंब असले तरी या कायद्यानुसार पात्र असल्यास जमीन देता येते. त्याचा फायदा धनगरवाड्यांना सर्वाधिक होऊ शकतो. म्हणून जिल्हा महसूल प्रशासनाने वनजमीन असलेल्या ग्रामपंचायतींना आवाहन केले.

आलेल्या प्रस्तावांची छाननी करण्यात आली. पात्र प्रस्ताव मंजूर करून एका कुटुंबास अधिकाधिक चार हेक्टर शेतजमीन देण्यात आली. मात्र, अनेक कुटुंबांचे प्रस्ताव आलेले नाहीत. शिक्षणाचा अभाव असल्याने ही कुटुंबे थेट प्रशासन, लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचलेली नाहीत. अशी जमीन अनेक पिढ्या कसत असूनही त्यांना तिची मालकी मिळालेली नाही. करवीर, चंदगड, आजरा, शाहूवाडी तालुक्यांतील वनजमीन असलेल्या गावांतील कूरघोडीच्या राजकारणाने मालकीहक्क मिळत नाही. ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन प्रस्ताव देणे आवश्यक आहे. अनास्था दाखविणारे ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांवर कारवाई होऊ शकते.

०००००

सर्वाधिक कुटुंबे चंदगडमध्ये

वनहक्क जमिनीच्या मालकीचे प्रलंबित प्रस्ताव तालुकानिहाय असे : करवीर :२१६, गगनबावडा : ६७, राधानगरी : ३४०, भुदरगड :१८१, आजरा : १०३, चंदगड : ८३१, पन्हाळा : १२१, शाहूवाडी :१२५, इचलकरंजी :२१.

०००००

७४४ कुटुंबांना मालकी

७४४ कुटुंबांना वनजमिनीची मालकी मिळाली आहे. चंदगड-गडहिंग्लज प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्वाधिक २३८ कुटुंबे आहेत. त्यापाठोपाठ कागल - राधानगरी प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील कुटुंबे आहेत. जिल्हास्तरावरील समितीकडे एकूण १०५३ प्रस्ताव प्राप्त झाले. परिपूर्ण ७४४ प्रस्ताव मान्य झाले. उर्वरित १०५२ प्रस्ताव अमान्य करण्यात आले. अमान्य कुटुंबांची फाइल जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, ग्रामपंचायत कार्यालयात फिरत आहे.

०००

१२ समाजमंदिरेही

१२ समाजमंदिरे, ३४ पाणी योजना, १९ विद्युत, दूरसंचार, १६ रस्ते, ६ शाळाही वनजमिनीत बांधल्या आहेत. ही बांधकामेही कायम करण्याची तरतूद आहे. संबंधित ग्रामपंचायतीने यासाठी प्रस्ताव देणे गरजेचे आहे. पण यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित प्रयत्न केलेले नाही. वनप्रशासन कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून ही अतिक्रमणे हटवत नाहीत, हे वास्तव आहे.

००००

१२३४

एकूण महसुली गावे

५५७

वन जमिनींच्या गावांची संख्या

वन जमिनीच्या नगरपालिकांची संख्या

५२४

वनहक्क समित्यांची संख्या

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षाचालकांचे आजपासून आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने १६ वर्षांवरील रिक्षा स्क्रॅप कराव्यात, असा आदेश काढला आहे. त्यास महाराष्ट्र वाहतूक आणि रिक्षा चालक सेनेने तीव्र विरोध केला. याविरोधात शुक्रवार (ता.११) पासून विविध टप्प्यांत आंदोलन केले जाईल, अशी माहिती चालक सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जाधव, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

भोसले म्हणाले, शुक्रवारी दुपारी बारा वाजता मुख्य बसस्थानक परिसरातील रिक्षा स्टॉपवर सरकारच्या परिपत्रकाची होळी करण्यात येईल. १८ जानेवारीला दुपारी बारा वाजता दाभोळकर कॉर्नर चौकात रस्ता रोको आंदोलन, २१ रोजी बिंदू चौकात परिपत्रकाविरोधात दहा हजार सह्यांची मोहीम, २८ रोजी दुपारी एक वाजता सह्यांचे पत्रक जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना देण्यात येईल. १ फेब्रुवारीला प्रादेशिक परिवहन कार्यालयावर रिक्षांसह मोर्चा काढण्यात येणार आहे. दसरा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चाला प्रारंभ होईल.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२६ जानेवारीला रिक्षा सौंदर्य स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र रिक्षा चालक सेनाप्रणित निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळातर्फे २६ जानेवारीला रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. जुन्या आणि नविन अशा दोन गटात स्पर्धा होतील. यातील विजेत्यांना रोख बक्षिसांसह 'कोल्हापूर रिक्षा सुंदरी' प्रमाणपत्र, चांदीचे पदक, मानाचा फेटा देऊन सन्मान करण्यात येईल. चालक सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

जिल्हाप्रमुख जाधव म्हणाले, 'सन २०१४ पूर्वीच्या रिक्षाचा एक गट आणि २०१९ पर्यंत दुसरा गट अशा विभागात स्पर्धा होतील. यातील विजेत्यांना ११००१, ९००१, ७००१, ५००१ अशी रोख बक्षीसे अनुक्रमे दिली जातील. सहभागी रिक्षा चालकांचा लकी ड्रॉ काढून २५ रिक्षांचा एक वर्षाचा अपघातील विमा उतरवण्यात येणार आहे. याशिवाय प्रामाणिक रिक्षा चालक, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, अनाथ मुलांना गणवेश वाटप केले जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारांची आज पुन्हा बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकरकमी एफआरपी देण्यासाठी राज्य सरकारने ५०० रुपये अनुदान न दिल्यास किंवा केंद्र सरकारने साखरेचा दर २९०० रुपयांवरुन ३४०० रुपये न केल्यास जिल्ह्यातील कारखानदारांनी कारखाने बंद करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. याबाबतची बैठक शुक्रवारी (ता ११) घेण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला होता. या बैठकीबाबत कारखानदारांकडून गुप्तता पाळली जात आहे.

राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची मंगळवारी (ता. ८) भेट घेतली होती. यावेळी कारखानदारांनी निवेदन देऊन एफआरपी देण्यात पाचशे रुपये कमी पडत असल्याने सरकारने अनुदान द्यावे. अन्यथा साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपयेवरुन ३४०० रुपये करावी अशी मागणी केली होती. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात पंतप्रधानाकडे कारखानदारांच्या मागणीबाबत विनंती करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सोलापूर दौऱ्यात मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख होते. मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची साखर उद्योगाबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता आहे. पण एफआरपीबाबत राज्य सरकारकडून कोणतीच हालचाल झालेली नसल्याने कारखानदार आणि शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे.

साखर हंगाम सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. मात्र एकाही कारखान्याने शेतकऱ्याच्या खात्यावर एफआरपी जमा केली नाही. कारखान्याकडून एफआरपीचे ८०:२० अशी तुकडे करुन बिल देण्याची तयारी आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपी देण्याची मागणी केली आहे. एफआरपीचे तुकडे पाडल्यास कारखाने बंद पाडले जातील, असा इशारा दिला आहे. सरकारकडून कारखानदारांना मदतीचे आश्वासन मिळत नसल्याने कारखाने सुरु ठेवायचे की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी बैठक घेण्याची घोषणा केली आहे. पण या बैठकीबाबत गुप्तता पाळली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी साहित्यावर कोल्हापुरी मोहोर

$
0
0

कोल्हापूर:
कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या लेखकांचे मराठी साहित्यात मोठे योगदान आहे. वि. स. खांडेकरांपासून ते थेट युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे यांच्यापर्यंत अनेकांनी आपल्या लेखनीने मराठी साहित्य समृद्ध केले. राज्य सरकारने जाहीर केलेल्या वाङ्मय पुरस्कारात पुन्हा एकदा कोल्हापुरातील साहित्यिकांनी मोहोर उमटवली. एकूण मराठी साहित्यविश्वात कथा, कविता, समीक्षा आणि अन्य वाङमयप्रकारात कोल्हापूरच्या लेखकांचा दबदबा आहे.
कोल्हापूर आणि कुस्तीचा जितका घनिष्ठ संबंध आहे, तितकाच कोल्हापूर आणि साहित्याचाही आहे. कोल्हापुरातील साहित्यिकांचा उल्लेख केल्याशिवाय मराठी साहित्य विश्वाचा आढावा पूर्ण होऊ शकत नाही. कोल्हापूरच्या मातीत घडलेले आणि वाढलेले वि. स. खांडेकर, ना. सी. फडके यांच्या साहित्याचे मराठी मनावरील गारुड आजही कायम आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत, कादंबरीकार रणजित देसाई, कथाकार शंकर पाटील, ग्रामीण साहित्याच्या कक्षा रुंदावणारे आनंद यादव, मराठी कादंबरी विश्व समृद्ध करणारे विश्वास पाटील, ग्रामजीवनाबरोबरच वंचितांच्या, महिलांच्या जगण्याला स्वर प्राप्त करून देणारे राजन गवस, चंद्रकुमार नलगे यांच्यासह सुनीलकुमार लवटे, रफीक सूरज यांच्यासह अनेक लेखकांची मोठी यादी आहे. या लेखकांच्या कसदार वाङ्मय निर्मितीमुळे मराठी साहित्यविश्व समृद्ध झाले. हाच वारसा कोल्हापूरसह परिसरातील नवलेखकांची पिढी समर्थपणे पुढे चालवत आहे.
गावपांढरीचे वास्तव साहित्यात चित्रित करणारे कृष्णात खोत यांची चिंतनशील लेखनी मराठी साहित्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. त्यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला नुकताच राज्य सरकारने वाङ्मय पुरस्कार जाहीर केला. नामदेव माळी यांचे ‘चला लिहूया’ हे पुस्तक नवख्या लेखकांना लिहिते करणारे आहे. माळी यांच्यासह डॉ. जयसिंगराव पवार यांच्या ‘शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज’ या पुस्तकाची दखल राज्य सरकारने घेतली. या दोन्ही पुस्तकांना नुकताच राज्य सरकारचा वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला. यापूर्वी प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या ‘समाजभाषा विज्ञान आणि मराठी कादंबरी’ या पुस्तकानेही राज्य पुरस्कारात बाजी मारली. किरण गुरव, प्रा. प्रकाश पवार, प्रा. शैलजा मंडले यांच्याही पुस्तकांची दखल राज्य सरकारने घेतली. प्रा. धम्मपाल रत्नाकर यांची ‘विस्कट’ कादंबरी, रफिक सूरज यांचा ‘सोंग घेऊन हा पोर’ या कविता संग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरला. गेल्या सात-आठ वर्षांत या पुस्तकांनी पुरस्कारांवर मोहोर उमटवली.
मराठी साहित्य विश्वात सातत्याने दर्जेदार लेखन करणारे नाव म्हणून चंद्रकुमार नलगे यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांच्या कादंबऱ्या आणि ललितलेखन पुरस्कारांच्याही पलिकडले ठरते. कवितेच्या क्षेत्रात विजय चोरमारे यांचे योगदान मोठे आहे. गेल्यावर्षी युवा साहित्य अकादमी पुरस्कारातही कोल्हापुरातील लेखकाचे नाव झळकले. नवनाथ गोरे हे सांगली जिल्ह्यातील जतचे असले तरी, त्यांची ‘फेसाटी’ कादंबरी शिवाजी विद्यापीठातच आकाराला आली. साहित्यसंमेलने, वाङ्मयीन चर्चासत्रांमध्ये कोल्हापुरातील अनेक सिद्धहस्त लेखक, समीक्षक, संशोधकांचा दबदबा आहे. कथाकार आप्पासाहेब खोत, बाबा परीट, कवी विनोद कांबळे, नीलेश शेळके, अनुवादक सुप्रिया वकील, सोनाली नवांगुळ, आदींची लेखनी वाचकांची वाङ्मयीन अभिरुची वाढवत आहे.

वाचन कट्ट्यासह लेखकांची भेट
वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कोल्हापुरात सातत्याने अभिनव उपक्रम सुरू असतात. युवराज कदम यांच्या वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिन्यातून दोनदा ‘वाचनकट्टा’ हा उपक्रम राबवून नवीन पुस्तकांसह लेखकांसोबत चर्चा घडवली जाते. अक्षरदालनचा ‘अक्षरगप्पा’ हा उपक्रमही नियमित सुरू आहे. लेखक आणि वाचकांना एकत्र आणून साहित्यवृद्धीची चर्चा या उपक्रमांमधून घडते. याशिवाय शाळा, महाविद्यालयांमध्येही नवोपक्रम सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहगल यांच्या भाषणाचे सांगलीत रविवारी वाचन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मिळालेले निमंत्रण नंतर नाकारण्यात आलेल्या ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या अध्यक्षीय भाषणाचे जाहीर वाचन सांगलीत रविवारी, १३ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्रोही साहित्य, सांस्कृतिक चळवळीचे डॉ. बाबुराव गुरव यांनी दिली.

'इंग्रजी साहित्यिक असणाऱ्या नयनतारा सहगल या पंडित नेहरु यांच्या भाची आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाही सहगल यांनी बंडाचे निशाण फडकावले होते. अलीकडील काळात असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून पुरस्कारवापसीचे पहिले पाऊल त्यांनीच उचचले होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हेही स्वतःला पुरोगामी म्हणवून घेतात. असे असताना सहगल यांचे भाषण हातात पडल्यावर त्या नकोशा का झाल्या?,' असा सवाल करून गुरव म्हणाले, 'हा जोखडबंद व्यवस्थेचा परिणाम आहे. एक प्रकारचा दहशतवाद आणि सरकारच्या दादागिरीचा परिणाम आहे. साहित्यिक, कलावंत यांनी सत्ता कोणाची आहे, समोर कोण किती ताकदवान आहे, याचा विचार न करता ठोस भूमिका घेऊन व्यक्त झाले पाहिजे. संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनीही आपली भूमिका जाहीर केली पाहिजे.'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ पुढाकार घेऊन सहगल यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा सन्मानाने उद्घाटनाला बोलवून महाराष्ट्राची बेअब्रू रोखावी, अशी मागणीही गुरव यांनी केली आहे. सांगलीत रविवारी होणाऱ्या सहगल यांच्या भाषणाच्या जाहीर वाचनाच्या कार्यक्रमाला सर्व साहित्यिक, साहित्यप्रेमींनी आणि नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अ‍ॅड. के. डी. शिंदे, विकास मगदूम, नामदेव करगणे, विजय कोगनुळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरूणाई लिहितेय, वाचतेय सोशल मीडियावर

$
0
0


कोल्हापूर :
सोशल मीडियाचा वापर वाढल्याने तरुण पिढी साहित्यापासून दुरावेल, अशी भीती व्यक्त केली जात होती. मात्र सोशल मीडियाच अभिव्यक्तीचं हक्काचे साधन बनल्याने तरुणाई त्यावर वाचू आणि मुक्तपणे लिहू लागली आहे. फेसबुक पेज, ब्लॉग्ज, ऑनलाइन पोर्टल, व्हाट्स अॅप, टेलिग्राम, विकिपीडिया, ई-बुक अशा माध्यमातून तरुणाई लिहिती झाली आहे.
सोशल मीडियात क्रांती झाल्यावर तरुणाईचा पुस्तकांशी येणारा संबंध कमी येईल, असे अनेक मतप्रवाह होते. मात्र हे सर्व समज मागे टाकत तरुणाईने नव्या स्टाईलने, आगळ्यावेगळ्या ढंगात सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म वापरून लिहायला सुरुवात केली. सोशल मीडियावरील ‘युथच्या’ लेखनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मराठी साहित्यातील तरुणाईचे योगदान वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे अभिव्यक्तीचे नवे साधन म्हणून सोशल मीडियाकडे पाहिले जात आहे.

विविध साहित्य प्रकारांत लेखन
सोशल मीडियावर मुक्तहस्ते लेखन करण्याची मुभा मिळाल्याने तरुणाई साहित्यातील विविध प्रकारात लेखन करत आहे. यामध्ये कथा, भयकथा, कविता, प्रवासवर्णन, रोजच्या आयुष्यातील आलेले अनुभव, व्यक्तीचित्रे, स्फुटलेखन, खाद्य, संस्कृती, परंपरा, तरुणाईच्या समस्या, तंत्रज्ञानाचे नवे बदल, प्रेम,पुराण असे विषय हाताळले जात आहेत. यामध्ये विशिष्ट धाटणीचं लिखाण करण्यावर तरुणाईचा अधिक भर आहे. तरुणाईच्या दैनंदिन आयुष्यात झालेले बदल त्याच्या लेखनातून उतरत आहेत. त्या अनुभवाची मांडणी करून लवकरात लवकर हजारो जणांपर्यंत पोहोचवण्याची सोय उपलब्ध झाल्याने लिहिणाऱ्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे

‘डिजिटल ॲक्टिव्ह’ तरुणाई
प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड आणि आयओएस यूजर प्रणाली असलेले मोबाइल दिसतात. फेसबुक, ट्विटर ब्लॉग्स. विकिपीडिया अशा सर्वच माध्यमावर तरुणाई ॲक्टिव्ह दिसते. दिवसभरातील तरुणाईचा मोबाइलवरील ‘स्क्रीन ऑन टाइम’ दिवसेंदिवस वाढतो आहे. डिजिटल ॲक्टिव असलेली तरुणाई कोणत्याही घटनेचे तत्काळ वर्णन करून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात पुढे आहे. त्यामुळे प्रसंग घडला की लगेच त्याची मांडणी करून ती लगोलग पोस्ट केली जाते.

सोपी भाषा आणि सहजसुलभता
सोशल मीडियावर लिहिताना तरुणही कोणत्याही एका चौकटीत न अडकता मुक्तहस्ते लिहित असल्याने त्याला सामान्य वाचकांचा मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. साधी भाषा, मांडणीतील वेगळेपणा तसेच लेखनाच्या पारंपरिक चौकटी मोडण्याचे धारिष्ट्य असल्याने सोशल मीडियावरील लेखनाला वाचकांची दाद मिळते आहे. अनेकदा ग्रामीण भागातील बोलीभाषेत केले जाणाऱ्या लेखन साहित्याचे सोशल मीडियावर अधिक कौतुक होते. या लेखनाला तिथल्या तिथेच वाचकांची प्रतिक्रिया मिळत असल्याने स्वयंमूल्यमापनाला जागा मिळते.

सोशल मीडियावरही ‘साहित्य संमेलन’
सोशल मीडियावर लिहिणारी लेखक नव तरुणाई एकमेकांच्या संपर्कात असते. दर्जेदार लिहिणाऱ्यांचा मोठा समूह तयार होत असून या माध्यमातून काही तरुणांनी सोशल मीडियावर लिहिणाऱ्या लेखकांसाठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते. तसेच सातत्यपूर्ण लेखन करणारे अनेक तरुण लेखक एकमेकांना भेटून विचार विनिमय करतात. अनेकदा सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक आपल्या वाचकांना भेटण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करतात. यामुळे लेखक आणि वाचक यांच्यामध्ये ‘कनेक्टिव्हिटी’ वाढण्यास मदत झाली आहे. कन्टेन्ट चांगला असल्यास लोकप्रिय पेजला दररोज आवर्जून भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे

युनिकोडमुळे लिहिणे सोपे
इंटरनेटवर मराठी भाषेचा वापर वाढण्यामागे युनिकोडचा मोठा हातभार आहे. सर्वसामान्य युजर्सला मराठी भाषेमध्ये टाईप करणे सहज सोपे झाले आहे. गूगल इंडिकच्या माध्यमातून मोबाइलवर अचूकरित्या टायपिंग करता येते त्यामुळे तत्काळ लेखन करून ते सोशल मीडियावर पोस्ट करणे सोपे झाले आहे. मराठीतील विविध फॉन्ट सहज उपलब्ध झाल्याने लेखनासाठी अडथळा ठरणारी ‘टायपिंग’ची समस्या निकालात निघाली आहे. तसेच मोबाइलसाठी ‘वाईस कमांड’ ही नवीन संकल्पना अस्तित्वात आल्याने टायपिंग करणे सुलभ झाले आहे.


फेसबुक, ब्लॉगसारख्या जनमाध्यमावर अनेक कल्पक नव अभ्यासक तरुण विविध विषयावर वेगवेगळ्या शैलीत,थेट लिखाण करत आहेत. या लिहत्या नवलेखकांनी आपला एक वाचक वर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर वैचारिक लेखनाची एक नवी मोठी फळी ही तयार होत आहे. तसेच विविध किस्से, कथा-कविता, ललित, प्रवास वर्णने, राजकीय-सामाजिक घडामोडी अशा विविध विषयावर युवा लेखक लिहते होत आहेत. सोशल मीडियाचे क्षेत्र येत्या काळात अधिक विस्तारले जाणार असुन अभिव्यक्तीच्या माध्यमाबरोबरच दर्जेदार लिहणाऱ्या नवलेखकांसाठी रोजगार व प्रसिद्धीचे नवे अवकाश प्राप्त करुन देणारे क्षेत्र ठरणार आहे.
मतीन शेख, ब्लॉग लेखक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४६ हजार ‘मिलेनियम इअर व्होटर’

$
0
0

एकविसावे शतकप्रारंभ वर्षात जन्म, लोकसभेसाठी पहिल्यांदाच मतदान करणार

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

एकविसावे शतक प्रारंभीवर्ष म्हणजेच २००० साली जन्मलेले ४६ हजार ८६३ 'मिलेनियम इअर व्होटर' मतदार जिल्ह्यात आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी यादीतील नावासाठी त्यांनी अर्ज केले आहेत. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावण्याची संधी त्यांना मिळणार आहे. जिल्ह्यात हे नवमतदार अर्धा लाखांच्या आसपास असल्याने उमेदवारांच्या विजयाच्या कौलातही त्यांचे महत्व राहणार आहे.

गेल्या चार महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावतीकरणाचे काम निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन करीत आहे. नविन मतदार नोंदणी, मयत आणि स्थलांतर मतदारांची नावे वगळण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहिमही राबवण्यात आली. मोहिमेत १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मुलामुलीचे नाव मतदारयादीत येण्यासाठी निवडणूक प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. शहर, जिल्ह्यातील कॉलेजमध्ये जावून ८ हजार नवमतदारांचे अर्ज भरून घेण्यात आले. ऑनलाईन आणि ऑफलाईन असे एकूण ४६ हजार ८६३ जणांचे अर्ज प्रशासनाकडे दाखल झाले. हे सर्व मतदार १८ ते १९ वर्षे वयोगटातील आहेत. त्यांचा जन्म २००० साली झाला आहे. नव्या शतकातील या मतदारांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग वाढण्यासाठी जागृतीचे कार्यक्रम प्रशासन राबवत आहे. त्यांची मतेही निर्णायक ठरणार असल्याने इच्छुक उमेदवार या मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

...

सर्वाधिक शाहूवाडी तालुक्यात

१८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची विधानसभा मतदारसंघनिहाय संख्या अशी : चंदगड : ६०००, राधानगरी : ४०९२, कागल : ४७३२, कोल्हापूर दक्षिण : ४५२०, करवीर : ४३५८, कोल्हापूर उत्तर : ३४९०, शाहूवाडी : ७७२७, हातकणंगले : ५३४६, इचलकरंजी : ५९१२, शिरोळ : ६०३२.

-------------------

कोट

'१८ ते १९ वयोगटातील जिल्ह्यातील ४६ हजारांवर मुला, मुलींनी मतदारयादीत नाव सामावेशासाठी अर्ज केले आहेत. कॉलेजमध्ये जाऊन मतदार अर्ज घेणे तसेच प्रभावी जागृती केल्याने मोठ्या संख्येने अर्ज आले आहेत. अर्जांची छाननी केली जात आहे. पात्र असलेल्यांना येत्या लोकसभेसाठी मतदान करता येईल.

स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी, निवडणूक विभाग

...

चौकट

मिलेनिमय व्होटरर्स

१ जानेवारी २००० साली जन्मलेल्या आणि १ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांना 'मिलेनियम व्होटर्स' (सहस्त्रक मतदार) असे निवडणूक आयोग संबोधते. त्यामुळे २००० साली जन्मलेले आणि २०१८ साली १८ वर्षे पूर्ण झालेले युवक युवती 'मिलेनियम इअर व्होटर' ठरले आहेत. या नवमतदारांची दखल निवडणूक प्रशासनासह सर्वच इच्छुकांनी घेतली आहे. तरूणांचे मतदान विजयापर्यंत जाण्याचा मार्ग सुकर करणार असल्याने उमेदवारांची यावेळी त्यांच्यावर विशेष 'लक्ष्य' राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खासगी दलालांना हाकलून लावा’

$
0
0

कोल्हापूर : 'काम बंदच्या आंदोलनाची तीव्रता जाणवण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या महसूल प्रशासनातील खासगी दलालांना हाकलून लावा, अशा मागणीचे निवेदन जिल्हा कोतवाल संघटनेतर्फे शुक्रवारी तहसीलदारांना देण्यात आले. कोतवालांनी काम बंद केल्याने तलाठी, सर्कल कामासाठी खासगी दलालांचा वापर करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जोपर्यंत चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत कोतवालांचे ठिय्या आंदेालन सुरूच राहील, असेही कोतवाल संघटनेचे राजेंद्र पुजारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रदूषणमुक्तीसाठी ‘टायगर बायो फिल्टर’

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी आता 'टायगर बायो फिल्टर' पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. पुणे येथील प्रायमूव्ह कंपनीने हा शुद्धिकरण आराखडा बनविला आहे. नदीकाठावरील विशेषत: करवीर तालुक्यातील अकरा गावांत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी जिल्हा परिषद प्रशासानने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी उपलब्ध निधीतील सात कोटी रुपयांच्या वापराला परवानगी व सांडपाणी प्रकल्पासाठी २० कोटी रुपयांचा आराखडा सादर केला आहे.

सर्वाधिक प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश आहे. नदीच्या पाणी प्रदूषणाची तीव्रता वाढल्यामुळे हायकोर्टाने जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेला उपाययोजनेच्या सक्त सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी पुढाकार घेऊन नदी प्रदूषणासाठी 'नमामि पंचगंगा'उपक्रम सुरू केला आहे. पंचगंगा नदीकाठावर ३६ गावांतील सांडपाणी थेट नदीत मिसळते. ३६ पैकी प्रत्यक्ष कारणीभूत असणाऱ्या ११ ग्रामपंचायतीमधील सांडपाणी व्यवस्थापनसाठी पुण्याच्या प्रायमूव्ह संस्थेने सविस्तर प्रकल्प आराखडा बनविला आहे. यामध्ये टायगर बायो फिल्टरवर आधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प प्रस्तावित केला आहे.

'टायगर बायो फिल्टर' पद्धतीनुसार उपाययोजनांची अंमलबजावणी करुन पंचगंगा नदी काठावरील सर्व गावांतील सांडपाणी व्यवस्थापन होणार आहे. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, हणमंतवाडी, शिंगणापूर, आंबेवाडी, वडणगे, गांधीनगर, वळिवडे, चिंचवाड, वसगडे, उचगाव आणि शिये गावात सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहे.

या गावांतील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंदाजपत्रकास मान्यता, तसेच उपाययोजनेसाठी 'स्वच्छ भारत मिशन'मधून सांडपाणी व्यवस्थापन निधीतून २७ कोटी सात लाख रुपयांच्या खर्चास मान्यता मिळावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे.

००००

सात कोटी निधीच्या मान्यतेसाठी प्रयत्न

स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाते. अनुदान वितरित करून जवळपास सात कोटी रुपये शिल्लक आहेत. शौचालय बांधणीसाठी त्या निधीचा विनियोग करणे बंधनकारक आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने त्या निधीचा वापर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी तो निधी खर्च करण्यास मान्यता मिळावी यासाठी प्रशासन पाठपुरावा करत आहे.

००००

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय बांधणीचा शिल्लक निधीचा विनियोग सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पासाठी मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सरकारने निधीच्या खर्चाला मान्यता दिली तर पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीच्या कार्याला चालना मिळेल.

प्रियदर्शिनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग

०००

राज्यपातळीवर नऊ सदस्यीय समिती

सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शक नियमावली तयार करण्यासाठी राज्य सरकारने नऊ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव शाम लाल गोयल हे समितीचे प्रमुख आहेत. यामध्ये नाशिक, अहमदनगर जिल्ह्यासह कोल्हापूर जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांचा समावेश आहे.

०००

वीस कोटींचा प्रस्ताव

जिल्हा परिषद प्रशासनाने नदीकाठावरील सर्व गावांत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. त्याचा डीपीआर तयार केला आहे. सुमारे २० कोटी रुपयांचा आराखडा असून जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला हा प्रस्ताव सादर केला आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांनी महात्मागांधी समजून घ्यावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशात आणि परदेशात महात्मा गांधीजींचा जन्मदिवस अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र, अनेकजण त्यांच्याबद्दल गैरसमजही पसरवत आहेत. यामुळे तरुणांनी महात्मा गांधींना समजून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास करावा,' असे प्रतिपादन गांधी अभ्यासक संदीप बर्वे यांनी केले.

आरती फाउंडेशनतर्फे शुक्रवारी आरती पाटील स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. 'गांधी आणि आजचा तरुण' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रिन्स शिवाजी बोर्डिंगचे संचालक प्रा. विजय पाटील अध्यक्षस्थानी होते. येथील शाहू स्मारक भवनात व्याख्यान झाले.

बर्वे म्हणाले, 'समाजात कोणत्याही प्रसंगाला विधायक प्रतिक्रिया देण्याचे विचार गांधींनी दिले. त्यांच्या अनेक पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर व्यक्तिगत जीवनातही आत्मपरीक्षण करण्याची सवय लागते. दक्षिण आफ्रिकेतील त्यांची वर्णभेदाविरोधातील लढाई गाजली. रेल्वेच्या फर्स्ट क्लासमध्ये बसल्यानंतर ते काळे आहेत म्हणून त्यांचे साहित्य गोऱ्यांनी फेकले. त्यावेळी काही गोऱ्यांनी गांधीजींची बाजू घेतली. याचा अर्थ त्यांनी व्यक्तिगत न घेता सामाजिक घेतला. वर्णभेद नाहीसा करण्यासाठी लढले. अनेक समाज परिवर्तनपर लढे अहिंसा, शांततेच्या मार्गाने यशस्वी केले. शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून दिला. आजही त्यांचे लढे जगभरात आदर्शवत मानले जातात.'

अंजली पोवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अॅड. बी. एम. पाटील, टी. पी. पाटील, विनय पाटील, आर. के. जोशी, आदी उपस्थित होते. प्रसाद पाटील यांनी आभार मानले.

०००

गायीवरून लोक मारले

गांधींच्या अहिंसेला मानणाऱ्या देशात गेल्या पाच वर्षांत गोहत्येवरून अनेक लोकांना मारले. हिंसा केली, ही खेदाची बाब आहे. महात्मा गांधी यांची जडणघडण पुण्यात झाली. याच शहरातील नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली, ही शोकांतिका आहे, असे त्यांनी सांगितले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलम हटवण्याचे काम अद्यापही सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी पुतळा सुशोभीकरणांतर्गत उभारण्यात आलेला कॉलम काढण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते. ब्रेकरच्या मदतीने कॉलम काढून मूळ ढाचा न बदलता सुशोभिकरण करण्यात येणार आहे. कॉलम हटविण्याबरोबर चारही बाजूंनी लावलेले पत्रे निम्म्या उंचीपर्यंत कमी करण्यात आले.

गेल्या अनेक महिन्यांपासून शहराच्या मध्यवस्तीतील छत्रपती शिवाजी चौकात शिवाजी पुतळ्याचे सुशोभीकरण सुरू आहे. पुतळ्याभोवती पत्रे उभे करण्यात आल्याने कामाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. चबुतऱ्याची उंची वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळताच, त्याला स्वातंत्र्यसैनिक संघटना, सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. चबुतऱ्याची उंची न वाढवता सुशोभिकरण करावे, पुतळ्यासमोर उभा केलेला कॉलम काढण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी अन्य अधिकाऱ्यांसह पाहणी केली. पाहणीवेळी आयुक्तांनी पुतळ्यासमोरील कॉलम हटवण्याचे आदेश दिल्यानंतर तातडीने कॉलम हटवण्यास सुरूवात झाली. कॉलम काढण्याचे काम शुक्रवारी दिवसभर सुरू होते. पुतळ्याचा दर्शनी भाग वगळता सभोवती उभा केलेले पत्रे निम्यापर्यंत हटविण्यात आले. शनिवारी कॉलम काढण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकचालक लूटप्रकरणी तिघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पुणे-बेंगळुरू महामार्गावर अंबप फाटा येथे ट्रकचालकाच्या लूट प्रकरणातील तीन संशयित आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून कालिया लारिन्झ भोसले (वय २५) व सुकुमार लारिन्झ भोसले (वय २३, दोघे रा. कोडोली, ता. पन्हाळा) अशी त्यांची नावे आहेत.

९ जानेवारीला पहाटेच्या सुमारास महामार्गावरील अंबप फाट्याच्या सर्व्हिस रोडवर थांबलेल्या ट्रक ड्रायव्हरसह क्लिनरला चाकूचा धाक दाखवून पाचजणांच्या टोळीने लुटले होते. त्यांनी त्यांच्याकडील तीन हजारांची रोकड, मोबाइल असा मुद्देमाल घेऊन पलायन केले होते. याप्रकरणी क्लिनर सिध्दू ऊर्फ शिवानंद राममिलन यादव (वय २० रा. सुकुलपुरा उत्तरप्रदेश) याने वडगाव पोलिसांत फिर्याद दिली होती. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी यांना या गुन्ह्यातील तीन संशयित वाठारनजीक महामार्गावर थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन संशयास्पद फिरणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी ट्रकचालकाला लुटल्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. यापूर्वीच वडगाव पोलिसांनी या गुन्ह्यात ललकार लौलक पवार (रा. यदगेमाळ, ता. मिरज) व करण दिलीप काळे (रा. धुळगाव, ता. तासगाव) यांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेटलिफ्टिंगमध्ये प्रतीक्षाला रौप्यपदक

$
0
0

फोटो..

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

खेलो इंडिया स्पर्धेत येथील व्यंकटराव हायस्कूलची विद्यार्थिनी प्रतीक्षा बाळू साठे हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. या स्पर्धा पुणे येथे सुरू आहेत. प्रतीक्षाला मिळालेल्या या पदकाने इचलकरंजीच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

प्रतीक्षा येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिकत असून दत्तनगर-कबनूरमध्ये राहते. वेटलिफ्टिंगमध्ये भवितव्य घडविण्याचा ध्यास घेतलेल्या प्रतीक्षाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कुरुंदवाड येथील हर्क्युलस जिममध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप पाटील, विजय पाटील, विश्‍वनाथ माळी, रवी चव्हाण, टारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. दिल्लीत झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले होते. ४९ किलो वजनी गटामध्ये प्रतीक्षाने ६२ किलो स्नेच व ७९ किलो क्लिन अ‍ॅण्ड जर्क असे एकूण १४१ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. प्रतीक्षाचे आई-वडील शिलाईकाम करतात, तर भाऊ यंत्रमाग कामगार आहे. तिच्या यशाने कबनूर परिसरात जल्लोष करण्यात आला. वेटलिफ्टिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images