Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वेटलिफ्टिंगलमध्ये प्रतीक्षा साठेला रौप्यपदक

$
0
0

फोटो..

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

खेलो इंडिया स्पर्धेत येथील व्यंकटराव हायस्कूलची विद्यार्थिनी प्रतीक्षा बाळू साठे हिने वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. या स्पर्धा पुणे येथे सुरू आहेत. प्रतीक्षाला मिळालेल्या या पदकाने इचलकरंजीच्या क्रीडा परंपरेत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

प्रतीक्षा येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिकत असून दत्तनगर-कबनूरमध्ये राहते. वेटलिफ्टिंगमध्ये भवितव्य घडविण्याचा ध्यास घेतलेल्या प्रतीक्षाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कुरुंदवाड येथील हर्क्युलस जिममध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप पाटील, विजय पाटील, विश्‍वनाथ माळी, रवी चव्हाण, टारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. दिल्लीत झालेल्या पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळविले होते. ४९ किलो वजनी गटामध्ये प्रतीक्षाने ६२ किलो स्नेच व ७९ किलो क्लिन अ‍ॅण्ड जर्क असे एकूण १४१ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. प्रतीक्षाचे आई-वडील शिलाईकाम करतात, तर भाऊ यंत्रमाग कामगार आहे. तिच्या यशाने कबनूर परिसरात जल्लोष करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गो ग्रीन वीज बिलास सवलत

$
0
0

कोल्हापूर : वीजबिल भरण्यासाठी छापील बिलाऐवजी ईमेल व एसएमएसचा पर्याय स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महावितरणने दहा रुपये सवलत जाहीर केली आहे. एका महिन्यात राज्यातील सुमारे २१ हजाार ग्राहकांनी सवलतीचा लाभ घेतला आहे. अन्य ग्राहकांनीही या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. वीजबिल ऑनलाइन पाहण्यासाठी ग्राहकांना मोबाइल अॅप व www.mahadiscom.in या संकेतस्थळावर विविध पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. शिवाय महावितरणतर्फे ग्राहकांना छापील वीजबिलही उपलब्ध करुन देण्यात येते. जे ग्राहक गो ग्रीन सुविधेचा पर्याय निवडतात अशा ग्राहकांना महावितरणने एक डिसेंबर २०१८ पासून प्रतिबिल दहा रुपये सवलत दिली आहे. ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांना साठ कोटी निधी देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक विस्तारणे आणि उच्च दर्जाचे रस्ते तयार करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जिल्ह्यातील ९६ किलोमीटरचे रस्ते तयार करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ६० कोटी रुपये खर्चुन हे रस्ते तयार होणार आहे. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्नातून ४२ किलोमीटर रस्त्यांचा समावेश केला असून यामध्ये १५ कोटी रुपयांचा निधी आणला आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे ग्रामीण भागातील रस्ते चांगले होण्यास सुरवात झाली. जिल्ह्यातील एकूण ९६ किलोमीटरचे रस्ते या योजनेतून करण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी प्रयत्न सुरू केले होते. यामध्ये ४२ किलोमीटरच्या रस्त्यांचा ही समावेश केला. त्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत संशोधन व विकास या अंतर्गत ही मंजूरी दिली. यामध्ये ५१ रस्त्यांचा समावेश आहे. पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील रस्त्यांचा दर्जा सुधारणे, नविन रस्ते करणे, पुलांची उभारणी करणे अशा विविध कामांसाठी विशेष लक्ष देऊन मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. यातून ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सर्वाधिक फायदा होत असून दळणवळण अधिक गतीने सुरू होण्यास मदत होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

sharad pawar : केंद्राचे १० टक्के आरक्षण नेमके कोणाला?

$
0
0

कोल्हापूर

केंद्र सरकारने लागू केलेले दहा टक्के आरक्षण नेमके कुणासाठी? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला केला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षणाचा कायदा सरकारने केला आहे. या आरक्षणावर आता विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.

सवर्णांना दहा टक्के आरक्षण केंद्र सरकारने लागू केले आहे. या आरक्षणावरुन देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणी याचं समर्थन करतंय. तर कुणी विरोध. कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांच्या आरक्षणाबद्दल साशंकता व्यक्त केली. आर्थिक मागास आरक्षण कोर्टात टिकेल का? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला. तसंच पंतप्रधान कोण होईल, हे आता ठरवणं चुकीचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

चित्रपट पाहून कोणी मत देत नाही

शिवसेनेचे नेते संजय राऊत हे १४ तारखेला 'ठाकरे' सिनेमाबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत, असं पवार म्हणाले. सध्या 'ठाकरे', 'द अॅक्सिडेंटल प्रायमिनिस्टर' आणि 'पीएम नरेंद्र मोदी' हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यातील तुम्ही कोणता चित्रपट बघणार असा प्रश्न पत्रकारांनी पवारांना केला. 'मी गेल्या ४० वर्षात कुठलाही चित्रपट बघितला. समाजातील बहुतेक क्षेत्रामध्ये फिरत असल्याने चित्रपट बघण्याची गरज पडली नाही. पण चित्रपट बघून कुणी मत देत नाही, असं 'टिप्पणी शरद पवारांनी यावेळी केली.

पंतप्रधान मोदींची जुमलेबाजी सुरू आहे. देशात त्यांच्याविरोधात असंतोष आणि संतप्त वातावरण आहे. त्यामुळे अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भाजपचा पराभव झाला. जनतेमध्ये सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे, असं पवार म्हणाले. लोकसभेसाठी राज्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत ३ नव्हे ८ जागांवर तिढा आहे, अशी माहिती पवारांनी दिली. एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाच्या वंचित आघाडीबाबतही पवारांनी मत व्यक्त केलं. ओवेसी वगळून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती करण्यावर पक्षात चर्चा सुरू आहे, असं शरद पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार शेट्टींसह पदाधिकाऱ्यांचे मोबइल टॅप

$
0
0

कोल्हापूर:

भाजप अध्यक्ष अमित शहांचा कोल्हापूर, सांगली दौरा, एफआरपी आंदोलन आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॅप केले जात आहेत. त्यामुळे स्वाभिमानीचे आंदोलन गनिमीकाव्याने केले जात आहे.

कृषी पंपाची अन्यायी वीज दरवाढ, थकीत एफआरपीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, या मागणीसाठी शेट्टीनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेट दिला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २४ जानेवारी रोजी कोल्हापूर सांगली दौऱ्यावर येत आहेत. शहा यांचा दौरा सुरळीत व्हावा, असे वाटत असेल तर त्याआधी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असे आव्हान दोन दिवसांपूर्वी शेट्टी यांनी मार्केटयार्ड येथील मेळाव्यात दिले होते. त्यानंतर पोलिसांनी शेट्टी व पदाधिकाऱ्यांचे मोबाईल टॅप करण्यास सुरुवात केली आहे.

एफआरपीचे तुकडे करुन कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर २३०० रुपये जमा केल्यानंतर स्वाभिमानीने आंदोलन सुरु केले आहे. पण ज्या ठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आंदोलन करायला जातात त्या ठिकाणी पोलिस अगोदरच हजर असतात. त्यामुळे पोलिसांकडून मोबाइल टॅप होत असल्याचा संशय शेट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांना आला. मोबाइल टॅप होतील याची खातरजमा करण्यासाठी शेट्टी यांनी आंदोलन कुठे करायचे याचे संदेश कार्यकर्त्यांना दिल्यानंतर कार्यकर्ते पोचण्यापूर्वी पोलिस आंदोलनस्थळी येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीचे संदेश देऊन पोलिसांचा कात्रजचा घाट दाखवण्यास सुरुवात केली आहे. एफआरपीप्रश्नी आंदोलनाची तीव्रता वाढली असल्याने सांकेतिक शब्दातून संदेश दिले जात आहेत.

सोमवारी (ता. १४) जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला शेट्टी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच नियोजन मंडळातील स्वाभिमानीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शेट्टी व स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली जात आहे.


'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असून त्यांच्या आदेशाने माझे व पदाधिकाऱ्यांचे मोबाइल टॅप केले जात आहेत. सरकारने आमच्यावर पाळत ठेवली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आमची लढाई सुरुच राहणार आहे.
-राजू शेट्टी, खासदार

'खासदार राजू शेट्टी हे लोकप्रतिनिधी आहेत. शेट्टी व स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांचे मोबाइल टॅप केले जात नाहीत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून नियमानुसार बंदोबस्त दिला जात आहे.
-डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांचे धरणे

$
0
0

रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नागरिकांचे धरणे

कराड :

शेरे-संजयनगर (ता. कराड) येथे मिरज-पुणे रेल्वेमार्गाच्या प्रस्तावित रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासन घरांसह जमीन संपादन करीत आहे. याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शनिवारपासून संजयनगर येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

मिरज-पुणे रेल्वेमार्गावरील शेणोली येथील रेल्वे स्टेशनलगत असलेल्या संजयनगर (शेरे) येथील सर्वे नंबर १२४मधील ५० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या जमीन व घरांवरती रेल्वे दुहेरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पासाठी रेल्वे विभाग हक्क सांगत आहे. रेल्वे विभागाने लोहमार्ग रुंदीकरणासाठी प्रकल्पाची हद्द निश्चित केली आहे. मात्र, हा सर्वे नंबर आरक्षित असतानाही या प्रस्तावित कामासाठी घरकुल व गावठाण धारकांवर जबरदस्तीने अन्याय केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरम्यान, संजयनगर येथील आंदोलनस्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, समन्वय समितीचे डॉ. मदने यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला.

...............

अपघातात एक ठार

कराड :

कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील कोळेवाडी (ता. कराड) येथील रस्त्याकडेला असलेल्या बस थांब्यावर वडाप जीप व मोटरसायकलची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. दीपक रतन घाडगे, (२४) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे. कराड-ढेबेवाडी रस्त्यावरील कोळेवाडी बस थांब्यावरती शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वडाप ही घटना झाली. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीच्या ७३ जणांवर तोडफोडप्रकरणी गुन्हा

$
0
0

जयसिंगपूर : दत्त साखर कारखान्याच्या येथील कार्यालयाचे कुलूप तोडून आतील साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ७३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शेती विभागप्रमुख विलास पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अनिल ऊर्फ सावकर बाळू मादनाईक (उदगाव), शंकर विष्णू नाळे, शैलेश प्रकाश चौगुले, सागर सुकुमार मादनाईक, आशीष अशोक समगे, अमित अरविंद सांगले, शैलेश गजानन आडके, संदीपकुमार महावीर बेडगे (सर्व रा.जयसिंगपूर), ऋतुराज सावंत देसाई (संभाजीपूर), रामचंद्र केरबा शिंदे (दानोळी), जवाहर नाभिराज चौगुले (उदगाव), सागर देवगोंडा चिपरगे (उमळवाड), कलगोंडा खंजिरे पाटील (नांदणी) यांच्यासह इतर ६० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी दुपारी सव्वादोन वाजता येथील चौदाव्या गल्लीतील दत्त साखर कारखान्याच्या विभागीय शेती कार्यालयासमोर जमून एफआरपी जमा करा, अशा घोषणा दिल्या. कार्यालयाचे कुलूप तोडून आतील साहित्याची मोडतोड करून २७ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप सरकारची सत्ता उलथवू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

'धनगर समाजाला आरक्षणासाठी सत्तर वर्षे अनेक सत्ताधारी मंडळींनी फसवले. आता पुन्हा तीच कारणे देऊन फसविण्यासाठी सज्ज झालेल्या भाजप सरकारच्या बुडाखाली जाळ लावणे गरजेचे असून, प्रस्थापित राजकारण्यांची लंका आता जाळायची वेळ आली आहे. भाजप सरकारला समाजाने भीक न घालता फक्त धनगर समाजाच्या मतांमुळे सत्तेवर आलेल्या मग्रूर सरकारने समाजाला महिन्याभरात एसटी आरक्षणाचा दाखला न दिल्यास सरकारविरोधी आरपारची लढाई सुरूच राहील,' असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीनाथ पाडळकर यांनी दिला.

पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे धनगर समाजाच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या धनगर समाज आरक्षण परिषदेत ते बोलत होते.

पाडळकर म्हणाले, 'काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा भाजपची मंडळी खोटी आणि लबाड आहेत. या सत्ताधारी भाजपला सत्तेत पुन्हा यायची स्वप्ने पडू लागली आहेत. धनगर आरक्षणाची लढाई कोल्हापुरातून सुरू झाली असून, ती आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेला मतदानाचा अधिकार वापरून बटन दाबून निर्ढावलेल्या भाजपला धडा शिकवायची वेळ आली आहे.'

समाजाचे नेते उत्तमराव जानकर म्हणाले, 'समाजाच्या आरक्षणाचा लढा जिंकायचा आहे. सर्वच सरकारनी आरक्षणासाठी वेळोवेळी धनगर समाजाची फसवणूक केली असून, ती अजूनही सुरूच आहे. त्यामुळे ही समाजक्रांतीची लढाई आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहील. आता समाजाने आरक्षण मिळाले नाही तर 'अब की बार.. नक्कीच मोदी फरार' या घोषवाक्यांनी भाजपचा नायनाट करण्यासाठी समाजाने सज्ज राहावे.'

यावेळी धनगर समाज बांधवांनी सरकारविरोधी घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. यावेळी गोपीचंद पडकळकर यांच्या हस्ते धनगर समाजाच्या उपस्थित नेत्यांना यशवंत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आरक्षण परिषदेसाठी संदीप कारंडे, उपसरपंच धुळा डावरे, सिद्राम भाणसे, लक्ष्मण पुजारी, राणोजी पुजारी, नारायण मोठे, बाबूराव हजारे, नागेश पुजारी, राजू दलवाई, तात्यासाहेब हराळे, कृष्णात शेळके, स्वप्निल नांगरे, अभिजित कोळेकर, आदीसह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते. संदीप कारंडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकरकमी एफआरपीचे गमक शेट्टींकडून समजावून घेवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँकांकडून मिळालेल्या कर्जातून इतर देणी भागवून साखर कारखानदार एफआरपी देतात. मात्र यंदा साखर उद्योग अडचणीत असल्याने एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही. तरीही एफआरपीची सर्व रक्कम एकावेळी देता येते, असे खासदार राजू शेट्टी म्हणत असतील तर त्यांची भेट घेऊन ती कशी देता येते, हे समजून घेणार असल्याचा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लगावला.

विविध कार्यक्रमांनिमित्त पवार दोन दिवस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भूमिका मांडली. एफआरपीचे तुकडे केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन पेटले आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, 'उत्पादित साखर कारखानदार वर्षभर विकतात. त्यातून उपलब्ध झालेले पैसे ते उत्पादकांना देतात. यामुळे एकरकमी एफआरपी मागणे गैर आहे. कारखानदारांनी जादा कर्ज काढून एफआरपी देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना व्याज द्यावे लागते. त्याचा अप्रत्यक्ष फटका उत्पादकांनाही बसतो. यामुळेच कारखानदारी आर्थिक संकटात सापडली.'

........

चौकट

गडकरींचे मुक्तचिंतन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, साखर नदीत ओतली पाहिजे, असे म्हटले होते. यावर पवार म्हणाले, 'गडकरी माझे चांगले मित्र आहेत. बोलण्यात त्यांचा हातखंडा आहे. मुक्तचिंतनातून त्यांनी असे बोलले असावे. सहवीज, इथेनॉल निर्मिती करणारे नागपुरातील कारखाने किती दर देतात, हेही स्पष्ट होणे गरजेचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार मुश्रीफ उत्तम संघटक

$
0
0

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, उमेदवारीबाबत संभ्रम कायम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमदार हसन मुश्रीफ उत्तम संघटक आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणारा आणि मोठी ताकद असलेला हा नेता आहे. पक्षात त्यांच्या मताला मोठी किमंत असून राज्याच्या मंत्रीमंडळासाठी ते उपयुक्त आहेत. लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी दावेदारी दाखल केली असली, तरी त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल,' असे शरद पवार यांनी रविवारी कोल्हापुरात स्पष्ट केले. त्याचबरोबर कोल्हापूरसह सातारा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत पक्षाने निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यपातळीवर लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत असताना कोल्हापूर मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन मात्र चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. मुंबई येथील पक्षाच्या बैठकीत मुश्रीफ यांनी लोकसभेसाठी उमेदवारीची मागणी करत खळबळ उडवून दिली होती. मात्र पवार यांनी रविवारी मास लीडर असलेले मुश्रीफ मंत्रीमंडळासाठी उपयुक्त असल्याचे स्पष्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला. मात्र लोकसभेचा उमेदवार कोण याबाबत संभ्रम कायम ठेवला आहे.

पवार म्हणाले, 'मुश्रीफ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मताला पक्षात मोठी किमंत आहे. मात्र कोणत्या व्यक्तीचा नेमका कोठे चांगला उपयोग होईल, संसदेत अधिक योगदान कोण देऊ शकेल याचाही विचार करावा लागतो. मुश्रीफ हे मास लीडर आहेत. त्यामुळे त्यांचा राज्याच्या मंत्रीमंडळात पर्यायाने जिल्ह्याला अधिक फायदा होईल. मात्र त्यासाठी त्यांच्याशी चर्चा करावी लागेल.'

पानिपत येथील मराठा शौर्य दिन कार्यक्रमात भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, 'पाच राज्यांतील निवडणूक निकालामुळे त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे अशा स्वरुपाची वक्तव्ये केली जात असतील. कदाचित कोल्हापूर येथून त्यांच्या ज्ञानात भर घातली गेली असेल.'

......................

चौकट

महाडिक, मुश्रीफ यांचे सांत्वन

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने महाडिक यांच्याबाबत मुश्रीफ यांनी अनेकवेळा नाराजी व्यक्त केली आहे. तसेच पक्षाकडे लोकसभेची उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये अलीकडच्या काळात बेबनाव निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत दोन्ही नेत्यांमधील संघर्ष कमी करण्यासाठी पक्षाध्यक्ष पवार कोणती भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असताना पवार यांनी सकाळी महाडिक यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या चुलत्यांच्या निधनाबद्दल सात्वंन केले. त्यानंतर ते थेट महाडिक यांना घेऊनच आमदार मुश्रीफांचे सात्वंन करण्यासाठी कागलला रवाना झाले. दोन्ही नेते समोरासमोर आल्याने या घटनेची राजकीय क्षेत्रात दिवसभर चर्चा सुरू होती.

.......................

डॉ. डी. वाय. पाटील मार्गदर्शक बनतील ...

'गेल्या वर्षभरापासून पक्षाच्या सदस्यत्वासाठी डॉ. डी.वाय. पाटील विचारणा करत होते. पक्षकामाचा त्रास नको, म्हणून त्यांना नको म्हणून सांगितले होते. पण आपल्या अनुपस्थितीत पुणे येथे काकडे यांच्याकडे पक्ष सदस्यत्व फॉर्मवर त्यांनी स्वाक्षरी केली. त्यांचे सार्वजनीक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग काम आहे. त्यामुळे पक्षातील त्यांची भूमिका हितचिंतक व मार्गदर्शकाची असेल', असे पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॉयल हॉर्स रायडिंगचा थरार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाखो रुपये किंमतीच्या घोड्यांवर मांड टाकून आपल्या कौशल्यपूर्ण हॉर्स रायडिंगने पोलो मैदानावर घोडेस्वारांनी दाखवलेल्या थराराने 'रॉयल कोल्हापूर हॉर्स शो' मध्ये जान आणली. अवघ्या ४५ सेकंदात दीड फूट उंचीचे अडथळे सहज पार करणारा शो जंपिंग, वेगवान घोडेस्वारी करत भाल्याने टिपलेल्या खुंट्याचा टेंट पिंगिंग, घोडेस्वारी करत जिलेबी तोडणे, बकेटमध्ये बॉल फेकण्याच्या खेळाने दर्दी व नवागत प्रेक्षकांना खूष केले.

न्यू पॅलेसच्या आवारातील विशाल पोलो मैदानावर राज्यभरातील हॉर्स रायडरनी रविवारची सकाळ गाजवली. सोमवारी स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. सकाळच्या सत्रात ओपन, बिगिनर आणि चिल्ड्रेन गटातील रायडरनी सहभाग घेतला. ४५ सेकंदांमध्ये ७० सेंटीमीटर ते दोन ते अडीच फुटाचे अडथळे घोडीस्वारी करत पार केले. ट्रॉटिंग रेसमध्ये घोडा वेगाने न पळवता दुडक्या चालीने कौशल्य आजमावताना घोडेस्वारांची चांगलीच दमछाक झाली.

दुपारच्या सत्रात टेंट पिगिंगचा थरार अनुभवायला मिळाला. शंभर मीटरचे अंतर वेगाने कापताना शेवटच्या टप्प्यात भाल्याने खुंट्या टिपण्याच्या कौशल्याला उपस्थितांकडून दाद मिळाली. तर घोडेस्वारी करत टांगलेली जिलेबी खाण्याच्या गेमने मजा आणली. बॉल अॅन्ड बकेट खेळताना वेगाने घोडेस्वारी करत बकेटमध्ये अचूक बॉल टाकताना घोडेस्वारांना आपले कौशल्य पणास लावायला लागत होते. काही रायडरनी फेकलेले बॉल बकेटमधून बाहेर आल्याने त्यांना पेनाल्टी बसली.

रविवारी झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील १५ शाळांसह प्रायव्हेट क्लब, दिग्विजय प्रतिष्ठान, द राईट टू लिव्ह अॅकॅडमी, जॅप लॅट इक्वेस्ट्रियन या क्लबचे सदस्य सहभागी झाले. क्लबकडून परदेशातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेस श्रीमंत शाहू छत्रपती, राज्य इक्वेस्टेरियनच्या अध्यक्षा नीता नेहलानी, प्रविणसिंह घाटगे, संदीप नरके, अमर कारंडे आदी उपस्थित होते.

...

रिद्धी, प्रदीप, ज्योतिरादित्य, मलिहा चमकले

रविवारी रिद्धी देशपांडे, प्रदीप गुरव, ज्योतिरादित्य सुर्वे, मलिहा लाकवाडा यांनी स्पर्धेत चमक दाखवली. रिद्धीने शो जंपिगमध्ये, प्रदीप आणि ज्योतिरादित्यने बॉल अॅन्ड बकेटमध्ये तर मलिहाने इक्विटेशन क्लासमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

...

स्पर्धेचा निकाल

शो जंपिंग नॉर्मल, खुला गट ; रिद्धी देशपांडे (सिडार इक्वेस्ट्रियम सेंटर), स्वप्निल साने, सागर गामा (दोघे दिग्विजय प्रतिष्ठान).

बॉल अॅन्ड बकेट, बिगिनर गट : प्रदीप गुरव (सिद्धगिरी गुरुकुलम), रोहीत वाघ (दिग्विजय प्रतिष्ठान), कुणाल पोळ (प्रायव्हेट रायडर), बॉल अॅन्ड बकेट, १४ वयोगट : ज्योतिरादित्य सुर्वे (प्रायव्हेट रायडर), हर्षवर्धन मडके (विजयादेवी यादव इंग्लिश मेडियम स्कूल), जुई शिंदे (सिद्धगिरी गुरुकुलम ).

इक्विटेशन क्लास, चिल्ड्रन : मलिहा लाकडवाला, आयान शेख (दोघेही, द राईड टू लिव्ह अॅकॅडमी), श्रेयस वाघ (गुरुशिल्प मिलिटरी स्कूल, सातारा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारांविरोधात प्राप्तीकर खात्याकडे तक्रार करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एफआरपी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खासदार राजू शेट्टी सोमवारी (ता.१४) साखर आयुक्तांची भेट घेऊन कारखान्यांची साखर जप्त करुन तिचा लिलाव करावा, अशी मागणी करणार आहेत. त्याचबरोबर कारखानदारांच्या विरोधात प्राप्तीकर खात्याकडे पुरावे देणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळलेले भाव, देशातंर्गत बाजारपेठेत न होणार साखरेचा उठाव आणि बँकांकडून मिळणाऱ्या कर्जातून एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याचे कारखानदारांनी स्पष्ट केले आहे. तर एकरकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. कारखानदारांनी एफआरपीचे तुकडे पाडून प्रतिटन पहिला हप्ता २३०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली आहे. कारखानदारांच्या निर्णयाविरोधात उद्रेक सुरु झाला आहे. सांगली, सातारा, सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांच्या कार्यालयांना टाळे लावले जात आहेत. सातारा, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांची काही गट कार्यालयेही पेटवून दिली गेली आहेत.

या पार्श्वभूमीवर खासदार शेट्टी म्हणाले, 'कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. हंगाम सुरु होताना कारखानदारांनीही एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. कारखान्यांनी कायदा मोडला असल्याने सोमवारी पुण्यात साखर आयुक्तांची भेट घेणार असून त्यांना एफआरपीचे तुकडे केल्याचे पुरावे सादर केले जाणार आहेत. कारखान्यांची साखर जप्त करुन सरकारने लिलाव करावा. स्वाभिमानीकडून प्रतिक्विंटल २९०० रुपयांनी साखर खरेदी करण्याची तयारी आहे. २९०० रुपयापेक्षा जास्त रक्कमेने एखाद्या व्यापाऱ्याने खरेदी केली तर त्याला द्यावी. लिलावातील रक्कमेतून शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्यावी, अशी मागणी साखर आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.' कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी यापुढे पावले उचलली जातील, असे सांगून खासदार शेट्टी म्हणाले, 'गेल्या दहा ते पंधरा वर्षात कारखानदारांच्या संपत्तीचे पुरावे आम्ही जमा केले आहेत. हे पुरावे आम्ही प्राप्तीकर खात्याला देणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवर्णांच्या आरक्षणाबाबत साशंकता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यघटनेनुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित केली आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय संसदेत बहुमताने घेतला असला तरी तो कोर्टाच्या कसोटीवर टिकणार नसल्याचे विधीज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यामुळे सवर्णाच्या आरक्षणावर मला सांशकता आहे,' असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केले. आरक्षण हाही 'चुनावी जुमला' आहे, असा टोला पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

पवार म्हणाले, 'केंद्र सरकारच्या कामगिरीवर जनतेत अस्वस्थता आणि संतप्त भावना आहेत. या भावना पाच राज्यांतील मतपेटीतून व्यक्त झाल्या. त्यामुळे खडबडून जागे झालेले सरकार पावणेपाच वर्षात न घेतलेले निर्णय घेण्याचा सपाटा लावत आहे. यातून त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. या निर्णयाने एकूण आरक्षण ५० टक्क्यापेक्षा जास्त होणार आहे. घटनेचा मूळ ढाचा बदलण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचे सुप्रीम कोर्टातील विविध निवाड्यावेळी स्पष्ट झाले आहे. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटके विमुक्त आदींचे आरक्षण टिकेल. त्याला धक्का लागणार नाही. पण सवर्ण आरक्षण टिकेल असे मला वाटत नाही.'

'जीएसटी कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा होईल का? या प्रश्नावर पवार म्हणाले, 'गेल्या दहा दिवसांत औद्योगिक उत्पादन घटल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हा निर्णय विचारपूर्वक घेतला होता. सध्यस्थितीत जीएसटी लागू करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतलेला नाही. त्यामुळे जीएसटी कमी करण्याचा निर्णयाचा फायदा होणार नाही. मुख्यमंत्री परिषदेत याबाबत सर्वच राज्यकर्त्यांनी आवाज उठवला होता. पण, त्याकडे दुर्लक्ष केले. पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर सरकारला जीएसटी कमी करण्याची उपरती झाली,' असा टोला पवार यांनी लगावला.

. .. .. ...

मुश्रीफ राज्यातच

आमदार हसन मुश्रीफ उत्तम संघटक आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करणारा आणि मोठी ताकद असलेला हा नेता आहे. पक्षात त्यांच्या मताला मोठी किंमत आहे. राज्याच्या मंत्रिमंडळासाठी ते उपयुक्त आहेत. लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी दावेदारी केली असली, तरी त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

.. .. .. ..

शेट्टींकडून समजून घेऊ...

यंदा साखर उद्योग अडचणीत असल्याने एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही. तरीही एफआरपीची सर्व रक्कम एकावेळी देता येते, असे खासदार राजू शेट्टी म्हणत असतील तर त्यांची भेट घेऊन ती कशी देता येते, हे समजून घेईन, असा टोला पवार यांनी लगावला.

.. .. ..

एका व्यक्तीवर जनमत आजमावणार नाही

जागा वाटपाबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्यपातळीवरही चर्चा सुरू आहेत. ज्या राज्यात ज्या पक्षाची ताकद असेल तेथे आघाडीचा निर्णय होईल. पण, त्यासाठी पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही एका व्यक्तीला पुढे करुन मतदारांपुढे जाणार नाही, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

.. .. .

काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकत्रित कॅम्पेनिंग

लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपाचा प्रश्न निकालात निघाली आहे. अडचण असलेल्या ठिकाणी राज्यातील नेते निर्णय घेतील. त्यामुळे जागावाटपाचा मुद्दा राहिलेला नाही. ३१ जानेवारीला सुरू होणारे अधिवेशन सहा दिवसाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे अनेक निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित कॅपेनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सुरुवात औरंगाबाद, नागपूर, नाशिक येथून होणार आहे. कोणत्याही स्थितीत ओवेसी विचारधारेबरोबर जाणार नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टॉक टाईम राजू शेट्टी

$
0
0

सरकारने साखर विकून एफआरपी द्यावी

०००

एफआरपीचे तुकडे पाडून कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिक्विंटल २३०० रुपये जमा केले आहेत. एकरकमी एफआरपी द्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या कार्यालयांना शेतकऱ्यांकडून टाळे ठोकले जात आहेत. सांगली जिल्ह्यात दोन कारखान्यांची कार्यालये पेटविण्यात आली आहेत. स्वाभिमानीच्या एफआरपी प्रश्नावर खासदार राजू शेट्टी यांच्याशी सतीश घाटगे यांनी साधलेला संवाद.

००००

प्रश्न : एफआरपीचे तुकडे पाडल्याबद्दल तुमचे मत काय?

कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक आहेत. त्यामुळे कारखानदारांना एफआरपीचे तुकडे पाडण्याचा निर्णय शेतकरी कधीच मान्य करणार नाहीत. ऊस हंगाम सुरू होण्यापूर्वी आम्ही एफआरपी अधिक २०० रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी कारखानदारांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना एकरकमी एफआरपी देण्याचे मान्य केले होते. त्यावेळी साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपये होता. आजही तोच दर आहे. त्यामुळे कारखानदारांनी एकरकमी एफआरपी दिलीच पाहिजे.

०००

प्रश्न : कारखानदारांविरोधात यापुढे तुमची भूमिका कोणती असेल ?

ऊस गळितास गेल्यानंतर १४ दिवसांत एफआरपी न दिल्याने आम्ही यापूर्वीच प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे तक्रारी केल्या असून, त्यांनी कारखानदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. आता एफआरपीचे तुकडे पाडल्याने कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी साखर आयुक्तांकडे करणार आहे. एफआरपीची जी शिल्लक रक्कम आहे, ती देण्यासाठी सरकारने कारखान्यांची साखर जप्त करून सरकारने लिलाव करावा, अशी मागणी करणार आहे. लिलावात स्वाभिमानी २९०० रुपये दराने साखर खरेदी करण्यास तयार आहे. जर प्रतिक्विंटल २९०० रुपयांपेक्षा जादा दराने एखादा व्यापारी खरेदी करणार असेल त्याला सरकारने साखर विकावी. या विक्रीतून येणारी रक्कम सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी.

०००

प्रश्न : कारखानदारांविरोधात आंदोलन छेडणार का ?

एफआरपीचे तुकडे पाडल्याने शेतकऱ्यांच्या उद्रेक सुरू आहे. आम्ही न्याय्य मार्गाने राज्य व केंद्र सरकारकडे दाद मागणार आहेत. सरकार व कारखानदार एक झाले असून, शेतकऱ्याला अडचणीत आणत आहेत. कारखानदारांनी यापूर्वी मोठी संपत्ती जमा केली आहे. त्यांच्या संपत्तीचे आपल्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे प्राप्तिकर खात्याला सादर केले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे कुठे जातात हे जनतेच्या लक्षात येईल.

०००

प्रश्न : विरोधी पक्ष एफआरपीप्रश्नी आवाज का उठवत नाहीत?

खरेतर, राज्यात विरोधी पक्ष आहेत का, अशी शंका येत आहे. एकरकमी एफआरपी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनाच फक्त आंदोलन करत आहेत. साखर उद्योग अडचणीत आल्याचे कारखानदार सांगत आले आहेत. पण विधिमंडळात त्यावर विरोधी पक्ष आवाज उठवत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. विरोधी पक्षांचा दबाव नसल्याने पंजाब व उत्तरप्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात उसाला सरकारकडून अनुदान मिळत नाही.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख, माने, की जाधव?

$
0
0

फोटो आहेत..

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसह आठ सदस्य निवृत्त होत आहेत. रिक्त पदांवर शुक्रवारी (ता.१८) होणाऱ्या महासभेत निवड होणार आहे. नव्या निवडीत काँग्रेसकडून गटनेते शारंगधर देशमुख, राहुल माने व प्रतापसिंह जाधव यांची नावे चर्चेत आली आहेत. सभापतिपदावर तिघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, सभापतिपदाची माळ गळ्यात घालताना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची किनार लाभणार आहे.

स्थायी समिती सभापतिपद पुढील वर्षासाठी सत्तेच्या फॉर्म्युलानुसार काँग्रेसकडे राहणार आहे. स्थायीतील निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांची निवड शुक्रवारच्या महासभेत होईल. त्यासाठी सर्वच पक्षांतील इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसच्या चार सदस्यांचा समावेश असून यामध्ये माने यांचाही समावेश आहे. समितीमध्ये जाण्यासाठी इच्छुक नगरसेवक नेत्यांची भेट घेत असले, तरी यामध्ये देशमुख, जाधव व माने यांची वर्णी निश्चित मानली जात आहे. सदस्यपदाबरोबरच सभापती पदासाठीही त्यांची नावे आघाडीवर असल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

महापालिकेचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या स्थायी सभापतिपदासाठी प्रचंड उत्सुकता लागली आहे, पण सभापतिपदासाठी निवड करताना लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केली जाईल. तीनही नगरसेवक आमदार सतेज पाटील यांचे कट्टर समर्थक असल्याने एका नावावर शिक्कामोर्तब करताना आमदार पाटील यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे. देशमुख व माने यांचा संपूर्ण तर जाधव यांच्या प्रभागातील काही भाग दक्षिण मतदारसंघात येत असल्याने सभापतिपदावर 'दक्षिण'मधील नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेत राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेस आघाडी एकसंध असल्याने सभापतिपदाचे नाव निश्चित करताना फारशी नाराजी उमटणार नाही. मात्र, विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या सावध हालचालीवर त्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. नव्या बलाबलानुसार काँग्रेस-राष्ट्रवादीचे आठ व भाजप-ताराराणीचे सात सदस्य असल्याने पुन्हा एकदा चमत्कार करण्यासाठी विरोधी आघाडी प्रयत्नशील राहणार का? याचे उत्तर लवरच मिळेल. महापौर निवडीनंतर लगेचच स्थायी समिती सभापतीची निवड होणार असल्याने पुन्हा एकदा महापालिकेचे राजकारण ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे.

०००

चौकट...

काठावरील नगरसेवक धास्तावले

गेल्या वर्षीच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीच्या अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांनी व्हीप डावलून पक्षाविरोधी मतदान केले. त्यामुळे भाजप-ताराराणीला सभापतिपदाची संधी मिळाली. पण त्यानंतर राष्ट्रवादीने पक्षांतर बंदी कायद्यानुसार सदस्यत्व अपात्र ठरवण्याची मागणी केली. ऐन महापौर निवडीवेळी दोघांनाही प्रथम विभागीय आयुक्त व त्यानंतर हाय कोर्टाने अपात्र ठरवले. त्यामुळे विरोधात मतदान केले, तर पद अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने काठावरील नगरसेवक चांगलेच धास्तावले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीला अद्याप २२ महिन्यांचा अवधी असल्याने अशी जोखीम नगरसेवक घेतील का? अशीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

०००००

स्थायीतील बलाबल

काँग्रेस : ६

राष्ट्रवादी : २

भाजप : ३

ताराराणी : ४

शिवसेना : १

एकूण : १६

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा

$
0
0

प्रकल्पग्रस्तांचा अर्धनग्न मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, सातारा

शेतकऱ्यांची जमीन भूसंपादनातून वगळण्यात यावी, या क्षेत्रावरील शिक्के काढण्यात यावेत, संपादित जमिनीला योग्य भाव मिळावा आदी मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. 'जय जवान जय किसान, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,' अशी घोषणाबाजी करीत खंडाळा एमआयडीसी टप्पा क्रमांक १, २, ३ मधील दहा गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अर्धनग्न अवस्थेत खंडाळ्यातून मंत्रालयापर्यंत (मुंबई) पायी मोर्चा सुरू केला आहे. न्याय न मिळाल्यास २० फेब्रुवारी रोजी नीरा नदीत जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

खंडाळा तालुक्यातील एमआयडीसीच्या टप्पाक्र. १, २ व ३ मध्ये केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, म्हावशी, मोर्वे, भादे व अहिरे आदी गावांतील शेतजमीन संपादित करण्यात येत आहे. अनेक शेतकऱ्यांचा याला विरोध आहे. या विरोधात अनेकदा तक्रारी व आंदोलने करूनही राज्य सरकारने काहीच केले नाही. सरकारच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शनिवारपासून अर्धनग्न मोर्चा सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीसाठी प्रयत्न अन्यथा स्वबळावरः दानवे

$
0
0

कोल्हापूर

भाजप, शिवसेनेत युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह समविचारी पक्षाशी युती करुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र जे सोबत येणार नाहीत, विरोधात जातील त्यांना आडवे करण्याची ताकत पक्षात आहे. युती न झाल्यास लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढल्या जातील. संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकण्याची तयारी पक्षाने केली आहे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना दिला. त्याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अन्य प्रश्नांना बगल देत पत्रकार परिषद आटोपती घेतली.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने मतदारसंघनिहाय आढावा बैठका सुरू केल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी आतापर्यंत विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मुंबईसह ३६ मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला आहे. सोमवारी ते कोल्हापूर दौऱ्यावर होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत त्यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चाचपणी केली.

युतीचा निर्णय दिल्लीत नव्हे तर मुंबईत होईल. शिवसेनेसोबत युती करण्यासाठी चर्चेला तयारी दाखविताना त्यांनी काँग्रेसच्या आघाडीच्या राजकारणावर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या नेत्यांपेक्षा देशात अन्य कुठलाही नेता मोठा होऊ नये ही काँग्रेसची मानसिकता आहे. त्या मानसिकतेतूनच एक गरीब पंतप्रधान झाला या रागापोटी मोदींवर टीका करत आहेत. सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान होऊ शकतो हे काँग्रेसला मान्य नाही. भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसने कितीही आघाड्या केल्या, पक्ष एकत्र आले तरी संघटना आणि विकास कामांच्या बळावर भाजप पुन्हा जिंकणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवाडे गटाच्या सहकार्याने हुपरीत भाजपचा उपनगराध्यक्ष

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भरतराव आण्णासाहेब लठ्ठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्ष जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांची विशेष सभेत निवड झाली. यावेळी भरतराव लठ्ठे यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढून गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा केला.

दरम्यान, उपनगराध्यक्ष निवडीसाठी मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापले होते. यामध्ये भाजपच्या आण्णासाहेब शेंडूरे व महावीर गाट यांच्या दोन गटात ईर्ष्या असताना आवाडे गटाच्या सहकार्याने लठ्ठे यांना संधी मिळाली. इच्छुक असलेले नगरसेवक संदीप वाईंगडे व शिवसेनेचे दोन नगरसेवक फक्त सही करुन सभागृहातून तत्काळ निघून गेले.

विशेष सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे भरतराव लठ्ठे व ताराराणी आघाडीचे सूरज बेडगे यांनी अर्ज दाखल केला होता. नंतर बेडगे यांनी माघार घेतली. लठ्ठे यांच्या अर्जाला दौलतराव पाटील सूचक तर संदीप वाईंगडे हे अनुमोदक होते. भरतराव लठ्ठे यांचा एकमेव अर्ज राहिल्यामुळे नगराध्यक्षा जयश्री गाट यांनी त्यांची निवड जाहीर केली. मुख्याधिकारी तानाजी नरळे, नगरसेवक दौलतराव पाटील, गणेश वाईंगडे, अमेय जाधव, जयकुमार माळगे, बाळासाहेब मुधाळे, रफिक मुल्ला, अमजद नदाफ, नगरसेविका ऋतुजा गोंधळी, सुप्रिया पालकर, माया रावण, रेवती पाटील, सपना नलवडे, लक्ष्मी साळोखे, पूनम पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राशिवडे ग्रामपंचायत सदस्य सागर धुंदरे यांचे पद अपात्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राशिवडे (ता. राधानगरी) ग्रामपंचायत हद्दीत आजोबांनी केलेल्या अतिक्रमणाच्या कारणावरून येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सागर पांडुरंग धुंदरे यांना ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अपात्र ठरविले. माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश पाटील व मोहन धुंदरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राशिवडे ग्रामपंचायत सदस्य धुंदरे यांच्या आजोबांनी गट क्रमांक १३३५ मध्ये अतिक्रमण केले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे केशव आबा पाटील व मोहन तुकाराम धुंदरे यांनी तक्रार दाखल केली होती. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी पुणे आयुक्त कार्यालय आणि मुंबई उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाकडेही केशव आबा पाटील यांनी तक्रार दाखल करून सागर धुंदरे यांच्या विरोधात दाद मागितली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने धुंदरे यांनी स्वतः अतिक्रमण केले नसल्याने त्यांचे बाजूने निकाल देऊन त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी पात्र ठरविले. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा धुंदरे यांच्या बाजूचा हा निकाल तीन न्यायाधिशांच्या खंडपीठाने चुकीचा ठरवून रद्द केला. त्यामुळे धुंदरे ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरले आहेत. परिणामी न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला यापुढे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाग घेता येणार नाही, अशी माहिती अविनाश पाटील यांनी दिली.

पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य प्रा. विनय पाटील, सरपंच कृष्णात पोवार, माजी सरपंच अतुल पाटील, माजी सदस्य राजेंद्र पाटील व संजय डकरे, ग्रा. पं. सदस्य राजाराम कांबळे, संपत धुंदरे, सागर पाटील, प्रकाश धुंदरे, विजय लुगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

विकासकामात आघाडीवर राहणार

'जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालाची प्रत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे याबद्दल आताच बोलणे उचित ठरणार नाही. माझ्या ग्रामपंचायत सदस्यपदाचा निर्णय काहीही झाला असला तरीही मी गावातील विकासकामांत आघाडीवर राहणार आहे. माझ्या ग्रामपंचायत सदस्य अपात्रतेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करुन विरोधक पर्यायाने राशिवडे गावाचे नुकसानच करीत आहेत' असे सागर धुंदरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बड्याचीवाडी गावसभेत हद्दवाढ मंजूर... मंजूर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा गडहिंग्लज

गेली चाळीस वर्षे प्रलंबित असणारा, अनेक अडचणींवर मात करीत अंतिम टप्प्यात आलेला गडहिंग्लज शहर हद्दवाढीसंदर्भात बड्याचीवाडी गावसभेत आवाजी मतदानाने ठराव मंजूर झाला आणि हद्दवाढीचा विषय निकाली निघाला. पोलिस बंदोबस्तात आणि तणावपूर्ण वातावरणात बड्याचीवाडी येथे सरपंच सचिन कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेली चाळीस वर्षे प्रलंबित आहे. शहराभोवती विस्तारलेला सारा भाग बड्याचीवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो. ग्रामपंचायतीचा भौगोलिक विस्तार जास्त आहे. अत्यल्प अनुदानामुळे ही ग्रामपंचायत विस्तारित परिसराला नागरी सुविधा देण्यात कमी पडते. त्यामुळे परिसरातल्या लोकांनी गडहिंग्लज शहरात आपला समावेश व्हावा अशी वारंवार मागणी केली आहे. शहरात हद्दवाढीसंदर्भात सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करून म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर हा प्रश्न पोहोचला. त्यामुळे या प्रश्नावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या.

दरम्यान, बड्याचीवाडी ग्रामस्थांनी हद्दवाढीला विरोध दर्शवत गावसभेची मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करून पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ३ जानेवारी रोजीच्या आदेशाने हद्दवाढप्रश्नी गावसभा बोलाविण्याचे निर्देश ग्रामपंचायतीला दिले. त्याला अनुसरून सोमवारी झालेल्या गावसभेत ग्रामसेवक अर्जुन रेडेकर यांनी नोटीस वाचन केले. सरपंच सचिन कोळेकर यांनी गडहिंग्लज शहर हद्दवाढ विषय मंजूर करायचा का? असा प्रश्न विचारतात उपस्थित ग्रामस्थांनी मंजूर... मंजूर... घोषणा देऊन हद्दवाढीला समर्थन दिले.

दरम्यान ग्रामस्थांच्यावतीने अशोक खोत आदींनी यावर विस्तृत चर्चा करा असे म्हणत व्यासपीठाकडे धाव घेतली. दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांसमोर आले आणि गोंधळाला सुरुवात झाली. याचा फायदा घेत सरपंच कोळेकर आणि ग्रामसेवक रेडेकर हे दोघेही इतिवृत्त घेऊन सभेतून निघून गेले. तर ग्रामसेवकांना जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आले. वातावरण तणावपूर्ण झाले असताना पोलिस हस्तक्षेपाने तणाव निवळला. हद्दवाढीला समर्थन देण्यासाठी गडिंग्लज शहर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गावसभेच्या ठिकाणी आले होते. खुद्द समरजित घाटगे यांनी गावसभेला उपस्थित राहून हद्दवाढ ठराव मंजूर करा असे आवाहन केले होते. हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक डॉ. एम. एस. बेळगुद्री, रमजान आत्तार यांच्यासह काही नगरसेवकही सभेच्या ठिकाणी हजर होते.

ग्रामस्थांचा आक्षेप... समर्थक-विरोधक आमनेसामने

दरम्यान ग्रामस्थांच्यावतीने या विषयावर विस्तृत चर्चा करा अशी मागणी करण्यात आली. दोन्ही बाजूचे समर्थक एकमेकांसमोर आल्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली. त्यावेळी सरपंच आणि ग्रामसेवक हे दोघेही इतिवृत्त घेऊन तेथून निघून गेले. ग्रामसेवकांना जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ एकत्र आल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तणाव निवळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images