Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘देवस्थान जमिनीवरील अतिक्रमणे काढणार’

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

'पुढील महिन्यात दर्शन मंडप व टॉयलेट ब्लॉकच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असून २५ कोटी निधीव्यतिरिक्त देवस्थान समिती स्वतंत्र १० ते १२ कोटींची विकासकामे करणार आहे. यामध्ये काळभैरव मंदिर स्लॅब दुरुस्ती, नगारखाना, शिखर गळती, दीपमाळ दुरुस्ती, आदी कामे केली जाणार आहेत. देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमणे काढली जाणार आहेत,' असे प्रतिपादन देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले.

जोतिबा विकास आराखड्यांतर्गत मंजूर झालेल्या २५ कोटी निधीअंतर्गत विकासकामांच्या नियोजित जागेची पाहणी पश्चिम महाराष्द्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि तहसीलदार गणेश शिंदे यांनी केली, यावेळी ते बोलत होते.

जोतिबा डोंगरावर दुपारी एक वाजता देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जोतिबा मंदिर परिसरातील चोपडाई तीर्थ कुंड येथे नियोजित दर्शन मंडप जागेची पाहणी केली. यावेळी आर्किटेक्ट राजेद्र सावंत यांनी दर्शन मंडपाच्या रचनेचा आराखडा दाखविला. यावेळी त्यांनी आकर्षक दगडी बांधकाम, कलाकुसर, सोलर सिस्टिम, रॅम्प, हिरकणी कक्ष, वैदिक हॉल, देवस्थान कार्यालय, आरोग्य यंत्रणा, आदी सुविधा दर्शन मंडपमध्ये असणार असल्याची माहिती दिली. पहिल्या टप्यातील २५ कोटी रुपयांच्या विकासकामाना मंजुरी मिळाली आहे. दर्शन मंडप आणि टॉयलेट ब्लॉकच्या कामाची निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. या कामाचा ठेका कोणत्या विकसकाला द्यावयाचा याबाबत निर्णय प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे.

पाहणीवेळी देवस्थान समितीचे सचिव संजय पवार, सदस्य संगीता खाडे, शिवाजी जाधव, कोडोलीचे सपोनि नंदकुमार झाडे, सरपंच रिया सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

फोटो आहे..

जोतिबा मंदिर परिसरात नियोजित दर्शन मंडप जागेची पाहणी करताना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व देवस्थान समितीचे सदस्य.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्यात साखरेसाठी बँका कर्ज देणार

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMt

कोल्हापूर

राज्य सहकारी बँकेने निर्यात साखरेसाठी शॉर्ट मार्जिनमधील ८०० ते १००० रुपये रक्कमेसाठी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे साखर निर्यातीचा मार्ग मोकळा होणार असला तरी कारखान्यांना १४ टक्के व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. परदेशात साखर निर्यात केल्यानंतर देशातील साखरेचा साठा कमी होऊन दर वाढण्यास मदत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मागील दोन वर्षात साखरेचे बंपर उत्पादन झाल्याने देशात गतहंगामातील ३२० लाख टन साखरेचा साठा शिल्लक आहे. यंदाच्या हंगामात देशात साखरेचे ३१० लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारातील दर प्रतिक्विंटल ३००० हजार रुपयांवरुन दोन हजार रुपयांवर उतरला आहे. शिल्लक साखरेचा साठा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कारखान्यांना ५० लाख टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति क्विंटल साखरेचा दर २००० ते २१०० रुपये आहे. गतवर्षी बँकांनी प्रतिक्विंटल साखरेमागे ३००० रुपये कर्ज कारखान्यांना दिले आहे. कर्जापोटी कारखान्यांची साखर बँकांकडे तारण आहे. कर्जाची परतफेड केल्याशिवाय बँकाकडून साखर निर्यातीस परवानगी मिळत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील साखर विक्रीतून मिळणारा दर आणि बँकेकडून दिलेले कर्जाच्या रक्कमेत ८०० ते १००० रुपयांचे शॉर्टमार्जिन होत आहे. त्यामुळे साखर निर्यातीचा प्रश्न रेंगाळलेला होता.

शिल्लक साखर निर्यात करण्यासाठी राज्य बँकेने धोरण जाहीर केले आहे. साखर निर्यात करण्यासाठी शॉर्ट मार्जिनमुळे होणारा ८०० ते १००० रुपयांचा जो दुरावा निर्माण होत आहे, त्या रक्कमेसाठी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. एक वर्षाच्या मुदतीने १४ टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार आहे. तसेच या कर्जाच्या वसुलीसाठी सध्या उत्पादित होणाऱ्या प्रत्येक साखरेच्या पोत्यामागे शंभर रुपये कापून घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने साखर निर्यात करण्यासाठी राज्याला १५ लाख ३८ हजार टनाचा कोटा दिला आहे. या कोट्यापैकी कोल्हापूर विभागातील ३६ कारखान्यांना साडेपाच लाख टन साखर निर्यात करावी लागणार आहे. राज्य बँकेने दिलेल्या अध्यादेशानंतर जिल्हा बँकही निर्यात साखरेसाठी कर्ज देणार आहे. साखर निर्यात करण्यासाठी कारखान्यांनी अनुदानाची मागणी केली असताना राज्य बँकेने कर्ज देण्याचे मार्गदर्शन केल्याने कर्जापोटी कारखान्यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

.............

ऊसबिले सोमवारी मिळणार ?

एकरकमी एफआरपी देण्यासाठी अडचणी येत असल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपीचे तुकडे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाने सोमवारी पहिली उचल २४०० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची शक्यता आहे. एकरकमी एफआरपी देण्यासाठी पैसेच नसल्याने हा निर्णय घेतला जात असल्याचा दावा कारखान्यांकडून केला जात आहे. कायद्याने एकरकमी एफआरपी देणे बंधनकारक असले तरी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने पहिली उचल देण्याचा कारखान्यांनी निर्णय घेतला आहे. सरकारने कारवाई केली तरी कायदेशीर लढाई लढण्यासाठी कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेतला जात आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने शेतकऱ्यांचा रोष न पत्करता दोन टप्प्यात एफआरपी देण्यासाठी कारखानदारांकडून शेतकऱ्यांची मानसिकता तयार केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅशनल ब्लॅक पँथरचाजि. प. समोर ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील तळसंदे, जोतिबा-वाडी रत्नागिरी ग्रामपंचायतीमध्ये गैरकारभार झाला आहे. यातील दोषींवर कारवाईस ग्रामपंचायत विभागाचे वरिष्ठ अधिकारी सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे. त्याच्या निषेधार्थ येथील नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीतर्फे शुक्रवारी दिवसभर हलगीच्या ठेक्यावर लक्ष वेधले. जिल्हा परिषदेसमोर त्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

पँथर पार्टीच्या निवेदनात म्हटले आहे, तळसंदे ग्रामसेवक अतुल इरनाक, लिपीक महादेव चव्हाण यांनी अधिकाराचा गैरवापर करत घरकुल योजनेतील निधीवर दरोडा टाकला. गटविकास अधिकाऱ्यांची सही नसताना प्रस्ताव मंजूर करून सरकारची फसवणूक केली. सहायक प्रकल्प अधिकारी एस. डी. पानारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल ग्रामपंचायत प्रशासनाकडे दिले. मात्र अधिकारी दोषींना पाठिशी घालत कारवाई करीत नाहीत. वाडीरत्नागिरीतील राष्ट्रीय पेयजलची नळपाणी पुरवठा योजना रेंगाळली आहे. या कामातील ठेकेदार हेतूपुरस्करपणे बदलले. बदलेलेल्या ठेकेदाराने काम निकृष्ट दर्जाचे करून भ्रष्टाचार केला. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याकडे ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.

आंदोलनात डॉ. सुनील पाटील, अमित पावले, सॅमसन शिर्के, विकास चोपडे, चंद्रकांत चौगुले, उमेश चांदणे, आदी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाईपलाईनप्रश्नी सुनावले

$
0
0

ठेकेदार, कन्सलटंट व पाणीपुरवठा विभाग सदस्यांकडून धारेवर

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या थेट पाईपलाईन योजनेच्या परवानगीसाठी वन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी युनिटी कन्सलटंट कंपनी, पाणीपुरवठा विभाग पाठपुरावा करत नाही. पाईपलाईनच्या स्टेटिंगसाठी अधिकारी भेट देत नाहीत. जॅकवेलच्या कामासाठी अद्याप सुरुवात झालेली नसून शहराच्या भावी पिढीचा प्रश्न गांभीर्याने घ्या,' असे खडे बोल थेट पाईपलाईन योजनेचा आढावा घेण्यासाठी बोलवलेल्या बैठकीत नगरसेवकांनी केला. प्रशासनाकडून बोळवण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर महापौर सरिता मोरे यांनी योजनेची चार दिवसांत पाहणी करण्याबरोबर एक महिन्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना केल्या. योजनेचे काम असमाधानकारक असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.

गेल्या चार दिवसांपासून शहरात रखडलेल्या प्रश्नांबाबत महापौर मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी बैठकींचा सपाटा लावला आहे. आढावा बैठक, राजर्षी शाहू समाधीस्थळ सुशोभीकरणांबाबत बैठक घेतल्यानंतर शुक्रवारी स्थायी समिती सभागृहात काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाबाबत आढावा घेतला. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी पाणीपुरवाठा विभागाचे जलअभियंता सुरेश कुलकर्णी, समन्वयक बी. एम. कुंभार, कन्सलंटट राजेंद्र हासबे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत कारभाराचे वाभाडे काढले.

उपमहापौर शेटे म्हणाले, ' वन्य विभागाच्या क्षेत्रातून जाणाऱ्या पाईपलाईनसाठी पाठपुरावा केला का? कन्सलटंट कंपनीला आतापर्यंत एक कोटी ३९ लाख रुपये फी दिली आहे. कन्सलंटटने परवान्यासाठी किती प्रयत्न केले. कंपनीकडे तज्ज्ञ मनुष्यबळ आहे का? कंपनीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केलेला आराखडा चोरुन नेला असून त्याद्वारेच काम सुरु आहे. ठेकेदारांप्रमाणे कन्सलटंट कंपनीलाही दंड करा. कन्सलटंट कंपनी आणि पाणीपुरवठा विभागाच्या मिलिभगतीतून जनतेच्या पैशावर डल्ला मारत आहात.'

कन्सलटंट कंपनीला विचारलेल्या प्रश्नावर कुलकर्णी उत्तरे देत असताना प्रा. जयंत पाटील यांनी कंपनीची वकिली कशाला करता असा संतप्त प्रश्न विचारला. ते म्हणाले, 'कंपनीने दोन वर्षात सुकाणू समितीची एकदाही बैठक घेतलेली नाही. वन विभागीची परवानगी नव्हती तर काम कशाला सुरु केले. कंपनीला परवानगीची माहिती नव्हती का, शहराच्या महत्त्वाच्या बैठकीला आयुक्त उपस्थित का नाहीत. पुढील बैठक त्यांच्या उपस्थित घ्या.' नगरसेवक अजित ठाणेकर यांनी ४५० कोटी योजनेचा खेळ झाला असल्याचा आरोप केला.

जलअभियंता कुलकर्णी योजनेची माहिती देताना म्हणाले, 'वन विभागाच्या परवानगीसाठी त्रुटी दूर करुन प्रस्ताव दिला आहे. ३९ किमी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून लवकरच एअर व्हॉल्व बसवण्यात येणार आहे. धरणातील पाणी दीड मीटर खाली गेल्यानंतर जॅकवेलच्या कामाला सुरुवात होईल. जॅकवेलसाठी मारलेल्या खड्ड्यातील पाणी सबमर्सिबल पंपाने काढून जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. चार ते साडेचार वर्षात जॅकवेलचे काम पाण्याच्या लेव्हलला आल्यानंतर पावसाळ्यातही काम सुरु ठेवता येईल. त्यामुळे डिसेंबर २०१९ अखेर थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवाठा सुरु होईल.' यावेळी जेकेसी कंपनीचे प्रोजेक्ट इन्चार्ज राजेंद्र माळी यांनी कामाची माहिती दिली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती अशोक जाधव, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा, जयेश जाधव, रामदास गायकवाड, विवेक कदम, विजय मोहिते आदी उपस्थित होते.

.............................

चौकट

मुलगा बिले तयार करणार वडिल मंजुरी देणार

गेल्या चार वर्षांपासून थेट पाईपलाईनचे काम संथगतीने सुरु आहे. योजनेचे समन्वयक बी. एम. कुंभार यांचा मुलगा अनिष कन्सलटंट कंपनीमध्ये कार्यरत असल्याचे निदर्शनास आणून देत उपमहापौर शेटे यांनी मुलगा बिले तयार कणार आणि वडील मंजुरी देणार असा गंभीर आरोप केला. आरोप सुरु असताना कुंभार मोबाइलमध्ये व्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर भावी पिढीचा प्रश्न गांभीर्याने घ्या, असे सुनावत ज्याप्रमाणे कन्सलटंट कंपनीची बिले काढता तशी कामाची जबाबदारीही घेण्याची सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबनूर हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील प्रगती इतर संस्थांना मार्गदर्शक आहे. सर्वांना विश्वासात घेऊन, भ्रष्टाचार मुक्त कारभार हेच संस्थेच्या यशाचे गमक आहे,' असे प्रतिपादन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले यांनी केले.

कबनूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, प्राथमिक विद्यामंदिरातर्फे आयोजित संयुक्त पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. पंचगंगा साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक पी. एम. पाटील, आदित्य पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, विविध शालेय सांस्कृतिक स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शीतल कुंभार, अनिकेत उपाध्ये, डॉ. सुहास पाटील, संस्थेचे सचिव सुभाष काडाप्पा यांची भाषणे झाली.

मुख्याध्यापक बी. बी. मगदूम यांनी प्रास्ताविक केले. संगीता चव्हाण व उमेश बरगाले यांनी सूत्रसंचालन केले. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया नीरजे यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजाराम वाकरेकर, माजी अध्यक्ष सुरेंद्र केटकाळे, खजिनदार सुधाकर झोले, संचालक एम. के. पाटील, महावीर केटकाळे, जवाहरनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. के. जमादार, साजणी हायस्कूलचे मुख्याध्यापक किरण कांबळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडेकर यांना पीएचडी

$
0
0

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील मजले येथील जयवंत माध्यमिक विद्यालयातील शिक्षक सचिन हिंदुराव कोंडेकर यांना शिवाजी विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे. त्यांनी 'कोल्हापूर राज्यातील कला व स्थापत्याचा इतिहास (इ.स.१७१० ते इ.स.१९४९)' या विषयावरील प्रबंध सादर केला होता. त्यांना अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. निरंजन कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह मााने, कार्याध्यक्ष विकास माने व शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र म्हैशाळे यांचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅपी स्ट्रीटची धमाल उद्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कॅलिग्राफीपासून ते चित्रकारीतेपर्यंत आणि बालपणीतील हरवलेल्या खेळांपासून ते थरार आणणाऱ्या मर्दानी खेळापर्यंतची प्रात्यक्षिके पाहण्याची संधी देणारा हॅपी स्ट्रीट उपक्रमाला रविवारपासून (ता. ६) सुरुवात होत आहे. अल्हाददायी सकाळच्या वातावरणात धमाल उडवणाऱ्या हॅपी स्ट्रीटचे उद्घाटन महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. गाणी, डान्स, मिमिक्री, एकपात्री अशा कलांमध्ये पारंगत असलेल्या हौशी कलाकारांसाठी येथे खास मंच मिळणार असून 'स्वच्छ कोल्हापूर...सुंदर कोल्हापूर' हा संदेशही देण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी टायटल स्पॉन्सर संजय घोडावत ग्रुप, पॉवर्ड बाय स्पॉन्सर दी आयडियल कन्स्ट्रक्शन, श्री ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल पार्टनर, एफ ३ जीम हे फिटनेस पार्टनर लगेज पार्टनर कॅरी बॅग्ज हे आहेत.

हॉकी स्टेडियम ते आयटी पार्क रस्त्यावर रविवारी सकाळी सात वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हॅपी स्ट्रीटला सुरुवात होईल. तुरुणाईला थिरकायला लावणारा आणि ज्येष्ठांना जुन्या आठवणीत रममाण करणाऱ्या हॅपी स्ट्रीटची त्यामुळेच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळेच नव्या वर्षातील पहिला रविवार 'हॅपी संडे' बनवण्यासाठी अवघे शहर सज्ज झाले आहे. महाराष्ट्र टाइम्स आणि हॅपी स्ट्रीट हे समीकरणच बनले आहे. जानेवारी महिन्याच्या प्रत्येक रविवारी होणाऱ्या हॅपी स्ट्रीटमध्ये हौशी कलाकारांना नियमितपणे व्यासपीठ मिळाले आहे. पुन्हा एकदा आपले कलागुण सादर करण्याची संधी नव्या वर्षाच्या पहिल्या रविवारी हॅपी स्ट्रीटच्या माध्यमातून मिळणार आहे. गाणी, डान्स, अभिनय, मिमिक्री या रंगमचीय आविष्कारासोबत आठवणीतील खेळ, साहसी प्रात्यक्षिके, मर्दाना खेळ आणि पथनाट सादर करण्याची संधी कलाकारांना मिळणार आहे.

कुटुंबीयांसह मौजमजेची लयलूट करता येणाऱ्या या उपक्रमात हजारो कोल्हापूरकर सहभागी होऊन आनंद द्विगुणित करतात. बालपणातील आठवणींना उजाळा देत पुन्हा लहान होण्याची संधी या स्ट्रीटवर मिळते. लाठीकाठी, स्वसंरक्षण, मर्दानी खेळ, विटी-दांडू, सागरगोट्या, जिबली, भातुकली, गोट्या, भोवरा, लंगडी, टायर फिरविणे, आंधळी कोशिंबीर यासह स्केटिंग, सायकलिंग, रस्सीखेच, लांबउडी अशा अनेक खेळांची रेलचेल हॅपी स्ट्रीटवर असणार आहे. तसेच प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी बचपन गल्ली हे या उपक्रमाचे आकर्षण असेल. कलाकारांना नव्या व्यासपीठावरुन ओळख खरण्यासाठी येथे स्टेज परफॉर्मन्सचे आयोजन केले जाते. गाणी, नकला, वादन, नृत्य आणि मिमिक्रीतून आपला कलाविष्कार दाखवता येईल. त्यासाठी वयाची किंवा प्रवेश शुल्काची कोणतीही अट नसणार आहे.

उद्घाटन समारंभास शहर उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, किरण नकाते, सुनील पाटील, संभाजी जाधव, नगरसेविका वृषाली कदम, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, माधुरी नकाते, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

स्वच्छ कोल्हापूरचा संदेश

हॅपी स्ट्रीटच्या माध्यमातून 'स्वच्छ कोल्हापूर...सुंदर कोल्हापूर' संकल्पना राबवण्यात येणार आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत प्रत्येकाच्या अंगी शहर स्वच्छतेचा नवा विचार रुजवण्यात येणार आहे. हॅपी स्ट्रीटमध्ये सहभागी होणारे अनेक कलाकार स्वच्छता फलक घेऊन सहभागी होणार आहेत. तसेच हॅपी स्ट्रीटचा कार्यक्रम संपल्यांतर संपूर्ण परिसर सार्वजनिक मंडळाकडून स्वच्छ केला जाणार आहे. स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेस बळकटी द्यावी.

सहभागासाठी नोंदणी आवश्यक

हॅपी स्ट्रीटमध्ये धम्माल व स्टेज परफॉर्मन्स दाखवण्यासाठी कलाकारांना सहभागाची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या कलाकारांना परफॉर्मन्स दाखवण्याची संधी मिळणार आहे. नोंदणीबरोबरच हॅपी स्ट्रीटमध्ये ऐनवेळी येणाऱ्या कार्यकर्त्यांनाही सहभागाची संधी देण्यात येईल.

सहभागी संस्था

कोल्हापूर डान्स असोसिएशन, कोल्हापूर

शिवसंस्कार प्रतिष्ठान : मर्दानी खेळ

एफ ३ जीम : फिटनेस एरिना

जिव्हाळा हास्य योगा परिवार : योगा एरिना

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन, पेठवडगाव : मल्लखांब

वनिता ढवळे : बचपन गल्ली

गो बियाँड द लिमिटस् : पारंपरिक खेळ

एस. के. रोलर स्केटिंग अकॅडमी : स्केटिंग एरिना

कोल्हापूर आर्ट फाउंडेशन व विविध कला संस्था : आर्ट एरिना

शाखंबरी नेलस् अँड ब्युटी : मेहंदी व नेल आर्ट

विजयकुमार सोनी : माइंड गेम्स्

वूशू असोसिएशन : महिला संरक्षण

व्हाइट आर्मी : अपातकालिन मार्गदर्शन व रस्ता सुरक्षा

समिट अॅडव्हेंचर व हिल रायडर्स् फाउंडेशन : झीप लाइन

अखिल भारतीय भूलतज्ज्ञ संस्था

रोहन कालेकर : टॅटू

प्रसाद इव्हेंट्स : सेल्फी पॉइंट व कार्टुन्स

राजेंद्र हंकारे : कॅलिग्राफी

हॅपी स्ट्रीटमध्ये दरवर्षी सहभागी कलाकार व नागरिकांना धम्माल करण्याची संधी मिळते. खुले व्यासपीठ असल्यामुळे सर्वांना कलागुण दाखवता येतात. कलासादरीकरण करताना अनेकजण झीप लाइन या साहसी क्रीडाप्रकाराची मजा लुटतात. साहसी क्रीडा प्रकाराबाबत युवकांचा कल वाढवण्यासाठी आम्ही सहभागी होणार आहे.

प्रमोद पाटील, हिल रायडर्स् फाउंडेशन

सकाळच्या अल्हादायक वातावरणात कार्यक्रमांचे उत्कृष्ट संयोजन केले जाते. हॅपी स्ट्रीटच्या माध्यमातून नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळते. अबालवृद्ध सहभागी होत असल्याने एक चैतन्य निर्माण होते. महाराष्ट्र टाइम्सचा स्तुत्य उपक्रम असल्याने रविवारची सकाळ अधिक आनंददायी बनते.

प्राचार्य सुरेश पोतदार, कलानिकेतन महाविद्यालय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अण्वस्त्रापेक्षा मानवतावादाची गरज

$
0
0

अण्वस्त्रापेक्षा मानवतावादाची गरज

डॉ. कुझनिक यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'अमेरिका जगात शांतता, न्याय, मानवता प्रस्थापित करणारा देश आहे, असे जगाला वाटत असले तरी प्रत्यक्षात वसाहतवाद, शोषणाला खतपाणी घालण्याचे काम या देशाने केले आहे. आज संपूर्ण जग एका धोक्याच्या उंबरठ्यावर उभे असून, जगाला अण्वस्त्रापेक्षा शांतता, मानवातावादाची जास्त गरज आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे,' असे मत वॉशिंग्टन विद्यापीठातील अणु अभ्यासक डॉ. पीटर कुझनिक यांनी व्यक्त केले.

सोलापूर विद्यापीठाच्या वतीने शुक्रवारी, ४ जानेवारी २०१९ रोजी सकाळी अकरा वाजता अमेरिकेचा कथित इतिहास आणि आण्विक ऊर्जा संकल्पना या विषयी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी डॉ. कुझनिक बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर विदयापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस होत्या.

डॉ. कुझनिक म्हणाले, 'अमेरिकेने ठरवले असते तर हा देश पहिले आणि दुसरे महायुद्ध थांबवू शकला असता. मात्र तसे केले गेले नाही. आता तर जगातील नऊ देशांकडे आण्विक शस्त्रे निर्माण झाली आहे, त्यामुळे सारे जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभे आहे. खरे तर जगात दारिद्र्य, पर्यावरणाचा ऱ्हास हे अधिक महत्वाचे प्रश्न आहेत, मात्र त्याकडे कोणाचे लक्ष नाही. जगातील तापमान दोन अंशाने वाढले आहे, या पुढच्या काळात ते पाच अंशाने वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे जगाचा बराचसा भूभाग पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. अशा महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन शांतता, मानवतावादाचा पुरस्कार करणाऱ्या नेत्‍त्वाची जगाला गरज आहे. भारत देश हा महात्मा गांधी या अहिंसेचे तत्वाज्ञान जगाला सांगणाऱ्या महामानवाचा देश आहे. त्यामुळे भारतातील लोकांनी मानवतावादासाठी एकत्र यावे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमेदवारी अर्ज दाखलकरण्याची प्रक्रिया सुरू

$
0
0

उमेदवारी अर्ज दाखल

करण्याची प्रक्रिया सुरू

कराड :

मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ऑनलाइन नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी केवळ दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी, दोन जानेवारी रोजी ऑनलाइन नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवशी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. अर्ज दाखल प्रक्रियेस उमेदवारांनी थंडा प्रतिसाद दिला आहे. शुक्रवारी प्रभाग क्रमांक ७ व ८ साठी सर्वसाधारण प्रवर्गातून अनुक्रमे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

..........

कराड,पाटणमध्ये थंडीचा उद्रेक:मध्यरात्रीपर्यंत पेटू लागल्या शेकोट्या

कराड :

कराडसह पाटण तालुक्यामध्ये पारा कमालीचा घसरला आहे. थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. कराड व पाटण शहरांसह तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत शेकोट्या पेटत आहेत.

नागरिका दिवसाही स्वेटर, कानटोप्या घालूनच बाहेर पडावे लागत आहे. सध्या रात्रीच्या वेळी तापमान पंधरा अंश सेल्शियसपेक्षाही कमी होत आहे. त्यामुळे वयोवृद्ध, आजारी व्यक्ती, महिलांना ही थंडी त्रासदायक ठरू लागली आहे, ग्रामीण व शहरी भागांत ठिकठिकाणी मध्यरात्रीपर्यंत शेकोट्या पेटवल्या जात आहेत. थंडी गहू, खपली, हरभरा या पिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या पिकांची वाढ चांगली होण्यास मदत होत आहे.

ओळ

कराड तालुक्यातील उत्तर तांबवे या गावात रात्रीच्या वेळी पेटविलेली शेकोटी व त्या भोवती रंगलेला गप्पांचा फड.

.......

दोघांवर गुन्हा

कराड :

एका विवाहित महिलेच्या घरातील बाथरूममध्ये पेन कॅमेरा लावून महिलेचे स्नान करतानाचे चित्रिकरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शंकर राजेंद्र मोहिते (रा. मसूर) व देवा सदाशिव मोहिते (रा. वडोली, निळेश्वर) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी उंब्रज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या बाबत पिडीत विवाहित महिलेने गुरूवारी रात्री उशीरा उंब्रज पोलिसात तक्रर दिली आहे.

पिडीत महिलेच्या पतीचा पाणी विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी असलेल्या गाडीवर चालक शंकर मोहिते चालक म्हणून कामास आहे. सदरचा कामगार हा दररोज सकाळी अकरा वाजता कामावर जाण्यासाठी संबंधिताच्या घरी येत असतो. बुधवारी सकाळी कामगार शंकर मोहिते पिडीतेच्या घरी आला असता संबंधित महिला घरात एकटीच होती. या वेळी संशयित आरोपीने मला एकाने दोन बल्ब दिले आहेत, ते बाथरूममध्ये लावू का? अशी तिच्याकडे विचारणा केली. महिलेने त्याला बल्ब लावण्यास संमती दिली. संशयित आरोपी बाथरूममध्ये बल्ब बसवून परत गेला. तपासाअंती तो बल्ब नसून, पेन कॅमेरा असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तो कॅमेरा मोबाईलला जोडून पाहिला असता, त्यात चित्रीकरण झालेले दिसून आले.

..............

माऊली जमदाडेने

मारले पाटणचे कुस्ती मैदान

कराड :

माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पाटण येथील बैल बाजार मैदानात गुरुवारी दुपारी झालेल्या जंगी कुस्त्यांच्या मैदानात कोल्हापूरचा पैलवान माऊली जमदाडे याने योगेश पवार याला 'बॅक थ्रो' डावावर चितपट करून पाटणचे कुस्ती मैदान मारले. महिलांच्या कुस्तीत चाफळच्या समृद्धी पाटील हिने विजय मिळविला.

जालना येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावणारा बाला रफीक हा काही कारणास्तव मैदानात उपस्थित न राहिल्याने कुस्ती शौकीनांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, त्याची सल निघाली. प्रथम क्रमांकासाठी माऊली जमदाडे विरूद्ध योगेश पवार यांच्यात अटीतटीचा सामना पहावयास मिळाला. सुरूवातीला घिस्सा डावावर योगेश पवारला चितपट करण्याचा प्रयत्न माऊली जमदाडे याने केला. मात्र, तो प्रयत्न फसला. तद्‌नंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांतच माऊली जमदाडे याने योगेश पवारला बॅक थ्रो डावावर चितपट करत पाटणचे ऐतिहासिक मैदान मारले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राहुल गांधींच्याअभिनंदनाचा ठराव

$
0
0

राहुल गांधींच्या

अभिनंदनाचा ठराव

सोलापूर : भाजपची सत्ता असलेल्या सोलापूर महापालिकेच्या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव एकमताने झाला. निमित्त होते छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने मिळवलेल्या यशा निमित्त दाखल झालेल्या प्रस्तावाचे. काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी हा प्रस्ताव दिला होता. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी झालेल्या आणि मिनी लोकसभा निवडणूक म्हणून संबोधल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत छत्तीसगड, राजस्थान व मध्य प्रदेशया राज्यात काँग्रेसने उल्लेखनीय यश मिळवले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला निश्चित फायदा होईल. या निकालामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल व मनोधैर्य वाढले आहे. या घवघवीत यशा बद्दल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे व काँग्रेस कार्यकर्त्यांचे ही सभा अभिनंदन करीत आहे, असा प्रस्ताव होता. त्यास एकमताने मंजुरी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ अध्यक्षांचा राजीनामा

$
0
0

सिंगल फोटो

अध्यक्षपदाची संधी ज्येष्ठांना की नवा चेहरा देणार, याबाबत उत्सुकता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बारा संचालकांच्या बंडानंतर नेते मंडळीच्या आदेशावरुन जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास पाटील यांनी तब्बल पावणेचार वर्षांनी आपल्या पदाचा संचालक मंडळीच्या बैठकीत राजीनामा दिला. नवीन अध्यक्षपदासाठी १४ किंवा १५ जानेवारीला निवड प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. 'गोकुळ'चे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, पी.एन. पाटील ज्येष्ठांना संधी देणार की नवीन चेहरा देणार याकडे संचालकांचे लक्ष लागले आहे.

गोकुळ शिरगांव येथील दूध संघाच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी सभा झाली. विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा होऊन मंजूर दिली. त्यानंतर ऐनवेळचा ठराव म्हणून कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर यांनी अध्यक्षांचा राजीनामा संचालक मंडळापुढे मांडला. सभेत एकमुखाने राजीनामा मंजूर करण्यात आला. त्यानंतर पाटील यांनी पावणेचार वर्षांच्या कालावधीत सहकार्य केल्याबद्दल महाडिक, पी.एन. पाटील या नेत्यांसह सर्व संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

राजीनामा मंजूर झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यासाठी संघाने पुणे येथील प्राधिकरणाकडे निवडणूक कार्यक्रमासाठी संपर्क साधला आहे. शनिवारी (ता. ५) प्राधिकरणाकडे अर्ज देण्यात येणार आहे. प्राधिकरणाकडून १४ किंवा १५ जानेवारीला अध्यक्षपदासाठी निवडणूकीची तारीख देण्यात येईल. दरम्यान, अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

अरुण नरके वगळता सर्व संचालकांची अध्यक्ष होण्याची इच्छा असली तरी महाडिक व पाटील हे अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार आहेत. अध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर सर्व संचालक एकाच पॅनेलचे आहेत, अशी भावना संचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पण संचालक मंडळात महाडिक व पी.एन. अशी फूट पडली असल्याने अध्यक्षपदासाठी ज्येष्ठांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. रविंद्र आपटे, अरुण डोंगळे, रणजित पाटील यांना पूर्वी संधी मिळाली आहे. त्यामुळे पी.एन. पाटील यांच्याकडून पी.डी.धुंदरे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. ज्येष्ठांना वगळल्यास धैर्यशील देसाई, अमरिश घाटगे, बाळासो खाडे यांनाही लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

...............

तीन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होणार निवड

२०१९ मध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहे. तर २०२० मध्ये 'गोकुळ'ची निवडणूक होणार आहे. सव्वा वर्षात तीन निवडणुकांना महाडिक व पीएन यांना सामोरे जावे लागणार असल्याने नेत्यांना अध्यक्षपदाच्या नावावर सहमती होण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दोन्ही नेत्यांना मदत होणाऱ्या ज्येष्ठ संचालकांची निवड अध्यक्षपदासाठी केली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.

..............

संचालक असमाधानी ...

विश्वास पाटील यांनी अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर सर्व संचालकांचे आभार मानले. पण त्यांनी पावणेचार वर्षात घेतलेल्या कोणत्याच निर्णयाबद्दल संचालकांनी कौतुक केले नाही. राजीनाम्यानंतर अध्यक्षांचे आभार मानण्याचे संकेत आहेत. पण एकाही संचालकाने अध्यक्षांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी भाषण केले नसल्याने त्यांच्या कारकीर्दीबद्दल संचालक असमाधानी असल्याची चर्चा सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे उमेदवार महाडिकच

$
0
0

महाडिक फोटो वापरणे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून खासदार धनंजय महाडिक यांचे नाव निश्चित करण्यात आले असल्याचे समजते. त्याची अधिकृत घोषणा येत्या पंधरा दिवसानंतर करण्याचे संकेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले. मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा करून त्यांच्यातील वादावर पडदा टाकल्याने महाडिक यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

कोल्हापूर लोकसभेच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी पवारांनी जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी प्रत्येकाची भूमिका जाणून घेतली. काहींनी महाडिक यांना विरोध केला, पण पक्ष देईल तो आदेश मान्य करण्याची ग्वाहीही दिली. महाडिक व मुश्रीफ यांनी लोकसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगितले. पर्याय नसेल तर आपण लढू, असे मुश्रीफांनी स्पष्ट केले. पण महाडिक यांनी आपण राष्ट्रवादीतूनच लढणार असल्याचे सांगितल्याने सध्या तरी त्यांनाच प्राधान्य देण्याची चिन्हे आहेत. पवारांची पहिली पसंती महाडिकच आहेत, त्यामुळे त्यांना संसदेत पक्षाचे उपनेते करण्यात आले. कोल्हापूर दौऱ्यात महाडिक यांनाच उमेदवारी देण्याचे संकेत दिले गेले. यामुळे शुक्रवारच्या बैठकीत सर्वांची मते जाणून घेतल्यानंतर महाडिक यांनाच उमेदवारी देण्याबाबत निर्णय झाल्याचे समजते. पण त्याची अधिकृत घोषणा आणखी पंधरा दिवसानंतरच होण्याची शक्यता आहे.

महाडिक यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा विरोध होणार हे निश्चित आहे. पण पवारांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. शिवाय डॉ. डी.वाय. पाटील यांना पक्षात घेऊन विरोधाची धार कमी करण्याची व्यवस्था केली आहे. माजी आमदार पी.एन. पाटील यांची महाडिक यांच्या उमेदवारीला संमती आहे. 'गोकुळ'च्या राजकारणात आमदार मुश्रीफ व प्रा. संजय मंडलिकांनी टोकाचा विरोध केल्याने पी.एन.यांचा त्यांना उघड विरोध आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी महाडिक यांना प्राधान्य दिल्याचे समजते. यामुळे महाडिक यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

............

चौकट

हातकणंगले स्वाभिमानीलाच

दोन्ही काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात हातकणंगलेची जागा राष्ट्रवादीकडे आहे. पण पक्षाने ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. पवारांच्या कोल्हापूर दौऱ्यात तसे स्पष्ट संकेत मिळाले. कोल्हापूर मतदारसंघाचा आढावा घेताना हातकणंगलेची चर्चा घेण्याचेही टाळण्यात आले. यावरून हा मतदारसंघ मित्रपक्षाला देण्याचा निर्णय झाल्याचेच स्पष्ट होते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी जागा वाटपाचे सर्व अधिकार पवारांना दिल्याने हा तिढा सुटण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत पाणीपट्टी दंडावर ५० टक्के सूट

$
0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थकीत पाणीपट्टीवर दंड आकारण्याचा निर्णय महापालिकेनेच घेतलेला आहे. त्यामुळे दंडामध्ये सवलत देण्याचा अधिकार महापलिकेला आहे. परिमाणी कोणतीही कायदेशीर अडचण येणार नसल्याचा अभिप्राय विधी विभागाने दिला असल्याने पाणीपट्टी थकबाकीवर ५० टक्के सूट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीमध्ये थकीत पाणीपट्टी बिलाच्या दंडामध्ये सवलत देणाऱ्या निर्भय योजनेबाबत चर्चा झाली. त्यानंतर दंडामध्ये सूट देण्यावर शिक्कामोर्तब झाले.

शहर पाणीपुरवठा विभागाची ४३ कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. थकीत पाणीपट्टीवर १५ कोटी दंडाची आकारणी महापालिकेने केली आहे. त्यामुळे दंडामध्ये ५० टक्के सवलत देणारा प्रस्ताव विभागाने आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे पाठवला आहे. प्रस्तावाबाबत सविता घोरपडे यांनी विधी विभागाचा अभिप्राय घेतला आहे का, अशी विचारणा केली. तर डॉ. संदीप नेजदार यांनी झोपडपट्टी कार्डधारकांना शंभर टक्के सवलत देण्याची मागणी केली.

सभापती आशिष ढवळे म्हणाले, 'दौलतनगर येथील मैदानावर नियमित खेळण्यास जाणाऱ्या युवकाचे डेंगीने निधन झाले. मैदानाशेजारी अस्वच्छता असल्याने डेंगीचा फैलाव होत आहे. डेंगीला रोखण्यासाठी केवळ घरांची स्वच्छता केली जात असून मैदानाशेजारी नाले, गटर्स साफ करावेत.' डेंगीचा फैलाव रोखण्यासाठी सर्वत्र औषध फवारणी करणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

सत्यजीत कदम व प्रतीक्षा पाटील यांनी अमृत योजनेतंर्गत पिण्याच्या पाईपलाईनचे काम कधी सुरु होणार, अशी विचारणा केली. तर नेजदार व पाटील यांनी अमृतमधील ड्रेनेज जेथे कामे सुरु आहेत, त्यामधील बचत रकमेतील कामे त्याच प्रभागात करण्याची सूचना केली. त्यावर 'अमृत योजनेतील पिण्याच्या पाईप २० जानेवारीपर्यंत येणार आहेत. त्यानंतर कामाला सुरुवात होईल. ड्रेनेज लाईनचे काम जेथे सुरु आहे, तेथील गल्लीबोळात लाईन टाकण्यासाठी सदस्य मागणी करत आहेत. पण प्रथम डीपीआर मंजुरीप्रमाणे कामे केली जातील. त्यानंतरच सेव्हिंग रकमेतून अग्रक्रमाने कामे केली जातील,' असे प्रशासनाने स्पष्ट केले.

सभापती ढवळे व कविता माने म्हणाले, ' शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण रखडले आहे. ऐतिहासिक पुतळा आणखी किती दिवस बंदिस्थ ठेवणार आहात. रखडलेली कामे त्वरीत पूर्ण घेऊन सुशोभीकरणामध्ये नेमकी कोणती कामे होणार, त्याची फलकाद्वारे माहिती द्या.' याबाबत 'सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून फक्त मेटलमधील डिझाईनचे काम शिल्लक असल्याचे प्रशासनाने सांगितले.

.....................

चौकट

महापालिकेचा आंधळा कारभार

गेल्या अनेक वर्षांपासून बाबूभाई परिख पुलाशेजारील रस्ता उखडला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर रस्ता तयार केला. पण पिण्याच्या पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याची पुन्हा खोदाई केली. लाईन टाकण्यासाठी रस्त्याचा बाजूला जागा असताना रस्ता मध्यभागी खोदला जात असल्याने स्थायीच्या बैठकीत सदस्यांनी संताप व्यक्त केला. 'रस्त्यासाठी निधी आणायचा आणि पाणीपुरवठा विभागाने परस्पर खोदायचा हे बरोबर नाही,' असा संतपा संजय मोहिते यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवालांचे आंदोलन सुरूच

$
0
0

कोल्हापूर : कोतवालांना चुतर्थश्रेणी द्यावी, या मागणीप्रश्नी दोन दिवस मंत्रालयात बैठक झाली. मात्र याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार कोतवाल संघटनेने केला आहे. तीस दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलन तीव्र होत आहे. आंदोलनात राजेंद्र पुजारी, भरत पोवार, संजय जाधव, विष्णू चव्हाण आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणेत आज शिबिर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

वारणानगर येथे ५ आणि ६ जानेवारीला किसानपुत्र आंदोलनाचे सहावे राज्यस्तरीय शिबिर आयोजित केल्याची माहिती किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते मकरंद डोईजड यांनी पत्रकार परिषदेत दिली. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या 'शेतकरी भवन' सभागृहात शिबिराचे आयोजन केले असून, शिबिराचे उद्घाटन वारणा उद्योग समूहाचे नेते डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते ५ जानेवारीला होणार

आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मजुरीवाढीच्या निषेधार्थ यंत्रमागधारकांचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मजुरीवाढ जाहीर करू नये, अशी विनंती करूनही यंत्रमाग कामगारांसाठी सहा पैसे मजुरीवाढ जाहीर केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी यंत्रमागधारक संघटनांच्या वतीने सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. कामगार कार्यालयासमोर जोरदार शंखध्वनी करत निदर्शने करण्यात आली. तसेच सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना मजुरीवाढीच्या अनुषंगाने सन २०१३ मध्ये केलेला संयुक्त करार रद्द केल्याचा ठराव आणि निवेदन देण्यात आले.

सहायक कामगार आयुक्त कार्यालयसमोर जमलेल्या यंत्रमागधारकांनी मजुरीवाढीच्या निषेधार्थ जोरदार शंखध्वनी करत कार्यालयाच्या दारातच ठिय्या मारला. यावेळी आंदोलकांना कार्यालयात सोडण्यावरून आंदोलक व पोलिस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. अखेर पोलिसांनी केवळ शिष्टमंडळाला कार्यालयात जाण्याची परवानगी दिली. मात्र, यंत्रमागधारकांनी सहायक कामगार आयुक्तांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारावे अशी भमिका घेतली. अखेरीस शिष्टमंडळाने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांची भेट घेत २८ फेब्रुवारी २०१३ रोजी मजुरीवाढीसंदर्भात यंत्रमाग कामगार संघटना व यंत्रमागधारक संघटना प्रतिनिधी यांच्यात झालेला करार रद्द करण्यासंदर्भात केलेला ठराव गुरव यांना दिला. त्यावर गुरव यांनी आंदोलकांसमोर येत भावना सरकारला कळवण्याचे आश्‍वासन दिले.

आंदोलनात सतीश कोष्टी, विनय महाजन, विश्‍वनाथ मेटे, धर्मराज जाधव, रफिक खानापुरे, बाळू नार्वेकर, दत्तात्रय कनोजे, सुनील मेटे, सचिन भुत्ते, बंडोपंत लाड, पांडुरंग नलवडे यांच्यासह यंत्रमागधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटल फलकांसह हातगाड्या हटवल्या

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिका प्रशासनाने अतिक्रमण मोहीम अधिक तीव्र केली. शुक्रवारी लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, गाडी अड्डा परिसरातील अतिक्रमण हटवले. या कारवाईत २५ जाहिरात फलक, ३० बॅनर्स, तीन डिजिटल फलक व तीन फेरीवल्यांच्या हातगाड्या हटवल्या. दरम्यान, गाडी अड्ड्यातील कारवाईनंतर अड्ड्याकडे जाणारे प्रवेशद्वार मुरुम टाकून अडवण्यात आले.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकांकडून चारही विभागीय कार्यालयाच्यावतीने दररोज विविध विभागात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. शुक्रवारी छत्रपती शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयाच्यावतीने छत्रपती शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी गाडी अड्डा, कोंडाओळ, फोर्ड कॉर्नर, परमाळे सायकल कंपनी, रवी बँक, ढवण भट्टी, बिंदू चौक परिसरात कारवाईचा बडगा उगारला. कारवाईत पथकातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर मांडलेले साहित्य जप्त केले. तसेच अनधिकृत व विनापरवाना केबिन्स, होर्डिंग्ज, बॅनर्स व जाहिरात फलक हटवले.

दरम्यान, गाडी अड्ड्याचा विनापरवाना पार्किंगसाठी वापर केला जात असल्याने पथकाने कडक कारवाई करत येथील सर्व अतिक्रमणे हटवली. वारंवार अड्ड्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने जेसीबीच्या सहायाने गाडी अड्ड्याचे प्रवेशद्वार मुरुम टाकून अडवण्यात आले.

उपशहर अभियंता एस. के. माने, अतिक्रमण विभाग प्रमुख पंडित पोवार, कनिष्ठ अभियंता निवास पोवार, मुकादम उमेश माने यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक कारवाईत सहभागी झाले होते. विनापरवाना अतिक्रमण हटविण्याची कारवाई चालूच राहणार असून संबधितांनी अतिक्रमणे काढून घ्यावीत असे, आवाहन करत महापालिकेने मालमत्ता विद्रुपण अधिनियम नुसार फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीचे संकलन

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सिद्धार्थ नगर, टाउन हॉल येथील नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधीस्थळाचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. समाधीस्थळावर बसवण्यात आलेल्या मेघडंबरीमध्ये दगडी पेटीत राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली मृदा (माती) व विविध साहित्य ठेवण्यात येणार आहे. पन्हाळा लॉज (खोतवाडी, मुंबई) येथे शाहू महाराजांचे निधन झाले. त्या ठिकाणची माती शुक्रवारी माजी महापौर आर. के. पोवार व माजी नगरसेवक आदिल फरास यांनी जमा केली. अनेक ठिकाणचे साहित्य व माती यापुढेही संकलित केली जाणार आहे.

नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळाचे सुशोभीकरण सुरु आहे. समाधीस्थळावर जुलै महिन्यात मेघडंबरी बसवण्यात आली असून संपूर्ण समाधीस्थळ सुशोभीकरणास सुरुवात झाली आहे. समाधी परिसरात फूटपाथ, लँडस्केप व लाईट सुविधा बसवण्यात येणार आहे. सुशोभीकरणामध्ये येथील मेघडंबरी प्रमुख आकर्षण आहे. मेघडंबरीमध्ये बसवण्यात येणाऱ्या दगडीपेटीत शाहूंचा स्पर्श झालेल्या राधानगरी धरण, वसतिगृह, रेल्वे स्टेशन, पन्हाळा, सोनतळी, जुना राजवाडा, शाहू मिल आदी ठिकाणांची माती संकलित करण्यात येणार आहे. राजर्षी शाहूंचे सहा मे १९२२ रोजी मुंबई येथील खोतवाडीतील पन्हाळा लॉजमध्ये निधन झाले होते. याठिकाणची माती शुक्रवारी पोवार व फरास यांनी संकलित केली. यावेळी सलिम गजबर, समीर पखाली, आकाश उगवे आदी उपस्थित होते.

....................

चौकट

बुधवारी महासभा

राजर्षी शाहू समाधीस्थळ सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असले, तरी उर्वरीत कामासाठी ७० लाखांच्या निधीची तातडीने गरज आहे. निधीची तरतूद करण्यासाठी महापालिकेची महासभा (ता. ९) सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू सभागृहात होणार आहे. सभेत निधी त्वरीत देण्याचा ठराव केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गूळ क्लस्टर’ची फरफट

$
0
0

म.टा. अजेंडा... लोगो

सरकारी अनास्थेमुळे योजना दहा वर्षे रखडली, पालकत्व घेण्याची गरज

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

वार्षिक सव्वादोनशे कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि कोल्हापूरचे नाव जगभर करणाऱ्या गूळ उद्योगाकडे सरकारच्या होणाऱ्या अनास्थेमुळे गूळ क्लस्टर योजना गेली दहा वर्षे रखडली आहे. आघाडी आणि युती सरकारच्या मंत्र्यांनी गूळ क्लस्टर योजना कार्यान्वित करण्यासाठी फक्त घोषणाच केल्या, पण त्यासाठी इच्छाशक्ती दाखवली नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषीमंत्रीपद असल्याने त्यांनी गूळ क्लस्टरला गती देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गुळाचा गोडवा जगाला कळावा यासाठी १९१३ मध्ये शाहूपुरी येथे गुळाची बाजारपेठ स्थापन केली. स्वातंत्र्यानंतर ही बाजारपेठ मार्केटयार्ड येथील प्रशस्त जागेत स्थलांतरीत झाली. गुळाचा गोडवा आणि दर्जामुळे अल्पावधीत देशातील सर्वात मोठी गुळाची बाजारपेठ म्हणून कोल्हापूरची ओळख झाली. गुजराती कुटुंबात रोज २०० ग्रॅम गुळाचा वापर स्वयंपाकात होत असल्याने ९० टक्के गूळ गुजरातला जातो. पाच टक्के गूळ मुंबई, कर्नाटक, गोवा तर पाच टक्के गुळाची परदेशात निर्यात होते. सध्या कोल्हापूरच्या गुळामध्ये सव्वादोनशे कोटी रुपयांची उलाढाल होत आहे.

मात्र सध्या गूळ विक्रीतून उत्पादन खर्च निघत नसल्याने गूळ उत्पादकांची संख्या कमी होऊ लागली आहे. वीस वर्षापूर्वी जिल्ह्यात गुऱ्हाळघराची संख्या १२०० इतकी होती. पण मजुरांची कमतरता व गुळाला मिळणारा कमी दर यामुळे गुऱ्हाळघरांची संख्या रोडावली असून सध्या १५० ते २०० गुऱ्हाळघरे सुरु आहेत. त्यावर ५० ते ६० हजार लोकांची उपजिविका सुरु आहे. भविष्यात गुळाची मागणी वाढणार असून या उद्योगातील उलाढाल लक्षात घेऊन गुळाचा दर्जा वाढावा यासाठी गूळ क्लस्टरची घोषणा आघाडी सरकारच्या काळात झाली. केंद्र सरकारने गूळ क्लस्टरला मंजुरी दिली. राजर्षी शाहू गूळ खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय समिती गेली दहा वर्षे गूळ क्लस्टरसाठी प्रयत्न करत आहेत.

गुळाचे संशोधन, उत्पादन, मानांकन, दर्जा ठरवण्यासाठी गूळ क्लस्टर योजना फायदेशीर आहे. ही योजना एकाच छताखाली सुरु व्हावी यासाठी कागल तालुक्यातील बेले गावातील जागा निश्चित केली. ही जागा शहरापासून लांब असून समितीने जागेला मंजुरी दिली आहे. दरम्यान, कागल येथील औद्योगिक वसाहतीतही क्लस्टरसाठी जागेची मागणी करण्यात आली. त्यासाठी संस्थेने रक्कमही भरली व कंपनीची स्थापनाही केली. आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून समितीने एमआयडीसीसाठी जागेसाठी पाठपुरावा केला. शिवाजी विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला. शास्त्रीय पद्धतीने गूळ निर्मिती करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजी विभागाने परिश्रम घेऊन आराखडा केला. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला. पण गूळ क्लस्टरसाठी एमआयडीसीत जागा नसल्याचे कळवल्याने गूळ क्लस्टरला खीळ बसली.

गेल्या चार वर्षात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गूळ क्लस्टर योजना कार्यान्वित करण्याच्या घोषणा केल्या. मुंबईत गूळ क्लस्टरसाठी स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. पण घोषणा व आश्वासने हवेत विरुन गेली. सरकाकडून योजनेला चालना देण्याबाबत प्रयत्न झालेले नाहीत. सध्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कृषीमंत्रीपद असल्याने त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

गूळ क्लस्टर योजना कार्यान्वित झाली असती तर गुळाचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन झाली असती. गूळ तयार करताना हायड्रोपावडरचा वापर केला जातो. तसेच गुळाला पिवळसर रंग येण्यासाठी रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो. कर्नाटकातील उत्पादक साखरेचा वापर करुन गूळ तयार करतात. हा गूळ कोल्हापूरच्या नावाने खपवला जात असल्याने गुळाच्या दर्जाला धक्का पोचण्याची शक्यता आहे. गुळाचा दर्जा चांगला राखण्यासाठी प्रयोगशाळेची अत्यंत गरज आहे. तसेच गुळाचा समावेश निर्यात झोनमध्ये करण्यासाठी प्रयत्न करता आले असते. शास्त्रोक्त पद्धतीने गूळ करण्यासाठी उत्पादकांना प्रशिक्षणही देता आले असते. सेंद्रिय गुळाला मोठी मागणी असून हा गूळ तयार करण्यासाठी संशोधन, प्रशिक्षणाची गरज गूळ क्लस्टरच्या माध्यमातून पूर्ण झाली असती. पण सरकारच्या उदासीनतेमुळे गूळ क्लस्टर योजनेवर पाणी सोडण्याची मानसिकता होऊ लागली आहे. भविष्यातील गुळाची मागणी लक्षात घेवून गूळ क्लस्टर योजना कार्यान्वित होण्यासाठी सरकारने पालकत्व स्वीकारण्यााठी पुढे आले पाहिजे.

......................

बाजार समितीत वार्षिक सरासरी गुळाची आवक

२२ लाख ५ हजार ७१५ रवे

नोंदणीकृत गुऱ्हाळघरे

१२५०

हंगामात सुरु असलेली गुऱ्हाळघरे

१५० ते २००

सर्वाधिक दर (क्विंटल)

६००१ रुपये

सर्वात कमी दर (क्विंटल)

२९००

वार्षिक उलाढाल

२२६ कोटी २६ लाख ९३ हजार १५० रुपये

.........................................

१०५

गूळ व्यापारी

४५ ते ५०

अडते

१२०

तोलाईदार

३५०

हमाल

.................

गूळ निर्यात

९० टक्के

गुजरातला

५ टक्के

मुंबई, कोकण व इतर

५ टक्के

परदेशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावर टँकर जळाला

$
0
0

महामार्गावर टँकर जळाला

सातारा

खंडाळा तालुक्यातील एमआयडीसीमध्ये केमिकल घेऊन आलेला टँकर राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पलटी झाला. या नंतर टँकरला अचानक लागलेल्या आगीत हा टँकर जळून खाक झाला. या आगीमुळे महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. शुक्रवारी सकाळी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

खंडाळा एमआयडीसीमध्ये एशियन पेंटमध्ये केमिकल घेऊन आलेला टँकरल (क्र. जीजे १२ बीव्ही २६८२) सर्विस रोडच्या ठिकाणी अचानक पलटी होऊन आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाला तीस फूट उंच गेल्या होत्या. त्यामुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. टँकरमध्ये कोणते केमिकल होते. या सदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही.

.......

श्री सेवागिरी महाराजांच्या

रथोत्सवाला सुरुवात

सातारा

सेवागिरी महाराज की जय आणि ओम नमो नारायणाच्या जयघोषात पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांच्या रथोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. रथोत्सवासाठी लाखो भाविक पुसेगावात दाखल झाले आहेत.

पहाटे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव आणि विश्वस्तांच्या हस्ते महाराजांच्या संजीवन समाधीची विधीवत पूजा करण्यात आली. पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार उदयनराजे भोसले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आमदार शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, नितीन बानुगडे पाटील यांच्यासह सर्व विश्वस्तांच्या हस्ते मानाच्या रथाचे पूजन करण्यात आले. भाविक मोठ्या भक्तीभावाने रथावर बेल, फुले, नारळ आणि नोटांच्या माळा अर्पण करीत आहेत.

.........

डोक्यात पारंबी पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

सातारा

जावळी तालुक्यातील म्हसवे गावातील ऐतिहासिक वडाचे झाड पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील कमला निमकर बालभवन या शाळेची सहल शुक्रवारी सकाळी आली होती. या वेळी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११) पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी वडाच्या पारंब्याशी खेळत असताना त्याच्या डोक्यात वडाच्या झाडाची पारंबी पडली. त्यातच त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

म्हसवे गाव वडाचे म्हसवे म्हणून प्रसिद्ध आहे. वड पाहण्यासाठी गावामध्ये शालेय सहली दर वर्षी येतात. फलटण तालुक्यातील कमला निमकर शाळेतील चार शिक्षक तीस विद्यार्थ्यांची सहल घेऊन शुक्रवारी म्हसवे गावात आले होते. सहलीतील मुले वडाच्या पारंब्यांबरोबर खेळत असतानाच प्रज्वलच्या डोक्यात जोरात पारंबी पडली. पारंबी पडताच इतर मुलांनी आरडाओरडा सुरू केला. शिक्षकांनी त्याला तत्काळ कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर प्रज्वला मृत घोषीत केले. दरम्यान, येथील वडाचे झाड वनविभागाच्या अखत्यारित येते. येथे मोठ्या प्रमाणात सहली येत असतात तरीही या ठिकाणी वनविभागाचा एकही कर्मचारी नसतो. त्यामुळे येथील सुरक्षेस व घडलेल्या घटनेस वनविभागच जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

..............

एफआरपीसाठी कारखान्यांना नोटीस : खोत

कृषी राज्यमंत्री ससदाभाऊ खोत यांची सौम्य भूमिका

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'राज्यात गेल्या चार वर्षांत ऊसदरासाठी कोठेही आंदोलन झाले नाही. काही साखर कारखान्यांनी आता ऊसबिले दिली असून, ज्यांनी दिली नाहीत त्यांना नोटीस देण्यात आली आहे. उर्वरित कारखान्यांनाही एफआरपी द्यावी लागेल,' अशी काहीशी सौम्य भूमिका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत घेतली. दरम्यान, या वेळी त्यांनी १५ डिसेंबरनंतर बाजारात आलेल्या कांद्यालाही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, असेही खोत म्हणाले.

सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपच्या वतीने सुरू असणाऱ्या सीएम चषक क्रीडा व कला महोत्सवाच्या अनुषंगाने या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

महोत्सवाची माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी मंत्री सदाभाऊ खोत यांना साखर कारखान्यांनी 'एफआरपी' दिली नसल्याचे सांगितले. त्यावर मंत्री खोत म्हणाले, 'केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ८५०० कोटी आणि ४ हजार कोटी असे दोन वेळा पॅकेज दिले आहे. गेल्या ६० वर्षांत साखरेचा दर निश्चित नव्हता. आता मात्र साखरेची किंमत २९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. काही साखर कारखान्यांनी बिले देण्यास सुरुवात केली आहे. जे देत नाहीत त्यांना साखर आयुक्त कार्यालयाने नोटीस काढली आहे. एफआरपी देण्यासाठी राज्य सरकारने नेहमीच मदत केली. साखर अधिक निर्यात कशी होईल, यासाठी धोरण आखू. तसेच शेतकऱ्यांना अधिक पैसे कसे मिळतील, हे पाहिले जाईल. कारखान्यांनीही इतर उपपदार्थ निर्मितीकडे वळावे.'

कांद्याला देणार अनुदान

कांद्याला दर कमी आहे. विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप अनुदान ही मिळाले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर मंत्री खोत म्हणाले, 'पूर्वी एकट्या नाशिक जिल्ह्यात ६० ते ६५ टक्के कांदा उत्पादन होत होते. त्यामुळे राज्याची गरज भागत होती; पण आता इतर राज्येही कांदा पीक घेत आहेत. मध्यप्रदेश, कर्नाटकात कांद्याचे उत्पादन दुप्पट झाले आहे. आपल्याकडे उत्पादन घटले आहे. आपला कांदा इतर राज्यात गेला नाही. त्यामुळे कांद्याचे दर पडले असले तरी प्रती किलो दोन रुपये अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी १५० कोटी रुपये देणार आहोत. १५ डिसेंबरनंतर बाजारात आलेल्या कांद्यालाही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. चाळीत किती कांदा साठवून ठेवला आहे, त्याचाही आढावा सुरू असून, गेल्या साडेतीन वर्षांत २७२ कोटी रुपये कांदा चाळीसाठी देण्यात आल्याचे खोत म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images