Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘लोकमंगल’ची खाती गोठविणार?

$
0
0

सहकारमंत्री सुभाष देशमुखांना नोटीस

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा न्यायालयाच्या आदेश न पाळल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल समूहाचे म्युच्युअल फंड आणि डी मॅट खाते गोठविण्याची नोटीस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाने (सेबी) शुक्रवारी दिली. तसेच, देणे असलेल्या ७४ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी देशमुख यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

गुंतवणूकदारांचे ७४ कोटी रुपये तीन महिन्यांत परत करण्याचे आदेश सेबीने १६ मे २०१८ रोजी दिले होते. मात्र, मागील सहा महिन्यांपासून लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरच दिले नाही. लोकमंगलचे डी-मॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्याची नोटीस सेबीने दिली आहे. लोकमंगल अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीसमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुरन्ना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस देण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन नाही : देशमुख

'लोकमंगलने सेबीने सांगितलेल्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही. सेबीने तीन महिन्यांत पैसे परत करण्याची प्रक्रिया करावी, असे आदेश दिले होते. ती प्रक्रिया आम्ही पाळली आहे. ज्यांना शेअर्स परत घ्यायचे आहेत, त्यांनी परत घ्यावेत, अशी नोटीस देशभरातील सर्व दैनिकांत आम्ही दिली तसेच ज्यांनी ज्यांनी पैसे मागितले त्यांना पैसे दिलेत. साधारण २० ते २५ कोटी परत दिले आहेत आणि भविष्यातही ती रक्कम परत देत आहोत,' अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.

'राज्यातील सर्वच साखर कारखान्यांनी अशाच पद्धतीने शेअर्स जमा केले आहेत, मग आमच्यावरच कारवाई का? हे कळत नाही,' असा सवालही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 'लोकमंगलची खाती गोठवण्याचे आदेश बँकांना दिले असले तरी मी कोणाचेही शोषण करणार नाही. सेबीच्या नियमानुसार वर्षाला केवळ ५० सभासद बनवता येतात. आम्ही मात्र जास्त सभासद केले आहेत, म्हणून कारवाईचे आदेश दिले होते. सेबीच्या नियमानुसार केवळ ५० सभासद बनवता येतात. मात्र अनवधानाने आम्ही जास्त सभासद केले आहेत. साधारण २० ते २५ कोटी परत दिले आहेत. माझे काही चुकले असेल तर लोक मला माफ करणार नाहीत,' असेही सुभाष देशमुख म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर: आंबेवाडी रोडवर अपघात; ९ मुले जखमी

$
0
0

कोल्हापूर :

सहलीसाठी पन्हाळा येथे जाणारी क्रुझर गाडी आंबेवाडी चिखली फाटा येथे पलटी झाल्याने ९ मुले जखमी झाली. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यामध्ये दोन मुले गंभीर असून ७ जण जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंबलाईवाडी येथील लाठीकाठी प्रशिक्षणाचा ग्रुप सहलीसाठी पन्हाळा येथे जात होता. चिखली फाटा येथे चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने क्रुझर गाडी रस्त्याच्यापलीकडे उलटली. रस्त्यापासून ही गाडी सुमारे दहा ते पंधरा फूट फरफरट गेली. या अपघातात ९ मुले जखमी झाली असून सर्व मुले ११ ते १४ वयोगटातील आहेत. अचानक झालेल्या घटनेने रस्त्यावरील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निपाणीजवळ तवंदी घाटात अपघात; सहा ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

पुणे-बेंगळरू राष्ट्रीय महामार्गावर स्तवनिधी (तवंदी) घाटात कार आणि ट्रकच्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले. सायंकाळी साडेचार वाजता हा अपघात घडला. सर्व मृत कागल तालुक्यातील मुरगूड येथील आहेत. प्राथमिक माहितीनुसार एका बालकासह चार पुरुष आणि एका महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.

तवंदी घाटात हॉटेल अमरसमोर हा अपघात झाला. बेळगावहून मुंबईकडे जाणार्‍या ट्रकच्या चालकाचा ताबा सुटला. ट्रक विरुद्ध बाजूला जाऊन बेळगावकडे निघालेल्या कारवर उलटला. अपघातानंतर सुमारे दोनशे फूट कार फरपटत गेली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दिलावर जमादार, रेहाना जमादार, जुनेद खान जमादार, आफरिन जमादार आणि आयान जमादार अशी मृतांची नावे आहेत.

मृतदेहांचा चेंदामेंदा झाल्याने ओळख पटण्यास विलंब झाला. घटनास्थळी बेळगावचे जिल्हा पोलिस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनीही घटनास्थळी भेट दिली. ट्रकमधील जखमींना महात्मा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ अध्यक्ष निवडणूक अधिकारीपदी डॉ. देशमुख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) नूतन अध्यक्ष निवडीसाठी सहकार प्राधिकरणाने सहायक दुग्ध विकास अधिकारी डॉ. गजेंद्र देशमुख यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सहकार प्राधिकरण पुणेचे सचिव यशवंत गिरी यांनी आदेश काढले आहेत.

शुक्रवारी विश्वास पाटील यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी पुण्यातील सहकार प्राधिकरणाकडे आज पाठविण्यात आला. नवीन अध्यक्ष निवडीसाठी प्राधिकरणाने डॉ. देशमुख यांची नियुक्ती केली. देशमुख यांनी गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. १४ किंवा १५ जानेवारीला अध्यक्ष निवडीसाठी बैठक घेण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३७८ कोटीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत २०१९-२०२० या वर्षासाठी ३७८ कोटीच्या प्रस्तावास कार्यकारी समितीने छाननी करून जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेसाठी शिफारस केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, समितीचे सदस्य राजाराम शिपुगडे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रमुख उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.

आजच्या बैठकीत सर्वसाधारण योजनेसाठी २६३ कोटी चार लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ११३ कोटी ४१ लाख रुपये आणि ओटीएसटीसाठी एक कोटी ९० लाखाच्या तरतूदीचा समावेश आहे. आराखड्यात विविध विभागाकडील जवळपास १३९ योजनांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठराव व शिफारस करुन प्रस्तावित वार्षिक योजना आराखडे जिल्हा नियेाजन समितीकडे पाठवण्याची सूचना यावेळी करण्यात आली. राज्य व्हीजन २०३० नुसार आवश्यक बाबींचा विचार करून आराखडा तयार करण्यास कार्यकारी समितीने प्राधान्य दिले आहे. यामध्ये कृषी व संलग्न सेवा,उद्योग,पायाभूत सुविधा, सामाजिक व सामूहिक सेवा आणि जबाबदार व पारदर्शक प्रशासन हे पाच स्तंभ धोरण स्वीकारले आहे. कृषी, वन,सामाजिक वनीकरण, लघु पाटबंधारे, इतर रस्ते, ग्रामीण रस्ते, ग्रामीण विकास, पर्यटन,शाळांची विशेष दुरुस्ती,तंत्रशिक्षण, क्रीडा,आरेाग्य, ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, नगरविकास, महिला व बालविकास, सरकारी महाविद्यालयांचा विकास,व्यवसाय शिक्षण, आयटीआय अशा विविध योजनांच्या तरतुदींबाबतही कार्यकारी समितीने जिल्हा नियोजन समितीला शिफारस केली आहे.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०१८-२०१९ या वर्षासाठी जिल्ह्यास उपलब्ध झालेला निधी शंभर टक्के खर्च करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सर्व विभागांना दिले. निधी खर्च करण्यामध्ये टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीची सभा १४ जानेवारीला

जिल्हा नियोजन समितीची सोमवारी (७) होणारी सभा अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून ही सभा आता १४ जानेवारीला आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी तीन वाजता सभा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नल मिळाला, वाट खडतर

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

@gurubalmaliMT

कोल्हापूर : 'धनंजय'च माझा उमेदवार म्हणत पक्षाध्यक्ष शरद पवारांनी महाडिक यांच्या लोकसभा उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला असला तरी विजयाचा मार्ग खडतर आहे. गेल्या साडेचार वर्षांत भाजपशी जवळीकता साधलेल्या खासदार धनंजय महाडिक यांना भाजपबरोबरच राष्ट्रवादातील प्रमुख नेत्यांशी लढावे लागणार आहे. त्यामुळे 'दिल्लीचा आशीर्वाद, गल्लीचा विरोध' या विचित्र कोंडीत सापडलेल्या खासदारांची अवस्था अर्जुनासारखी झाली आहे. बदलेल्या परिस्थितीत भाजपचे कमळ हातात धरलेल्या स्वकियांविरोधात लढत पुन्हा एकदा वादळात दिवा लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून दहा वर्षांपूर्वी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी, म्हणून पाच दिग्गज इच्छुक होते. तेव्हा महाडिक यांना उमेदवारी मिळाली नाही. पण पाच वर्षांपूर्वी फारशी स्पर्धा नसल्याने त्यांना सहजपणे उमेदवारी मिळाली. मोदी लाटेत विजयासाठी झगडावे लागले. तरीही वादळात दिवा लावत ते विजयी झाले. त्यामुळे यावेळी उमेदवारीवर हक्क त्यांचाच होता. शिवाय प्रबळ स्पर्धकही नाही. अशी स्थिती असतानाही गेले चार पाच महिने त्यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. चार वर्षांत पक्षापेक्षा स्वत:ची सोय अधिक पाहिल्याचा त्रास आज होत आहे. देशपातळीवर दोन वेळा नंबर वन म्हणून बहुमान मिळवलेल्या खासदाराला आज पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी धडपडावे लागत आहे. विशेष म्हणजे राज्य आणि देश पातळीवरील पक्षाचे सर्व नेते सोबत असूनही स्थानिकांच्या विरोधामुळे त्यांच्या उमेदवारीविषयी सांशकता निर्माण झाल्याचे चित्र आहे.

महाडिक खासदार झाल्यानंतर राष्ट्रवादीला ताकद मिळणार अशी अपेक्षा होती. पण लोकसभेत ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्यांचा पैरा फेडण्याच्या नादात त्यांनी पक्षाकडे दुर्लक्ष केले. दुसरीकडे काका महादेवराव महाडिकांनी अप्रत्यक्षरित्या भाजपचा झेंडा घेतला. हा झेंडाच खासदारांना राष्ट्रवादीचे काम करण्यास मोठा अडथळा ठरला. यामुळे विधानसभेपासून ते महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत सर्वच ठिकाणी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन खासदार रणांगणात उतरले नाहीत. नेमकी हीच बाब नेत्यापासून कार्यकर्त्यापर्यंत सर्वांनाच खटकली, त्यामुळे त्यांना उमेदवारीसाठी विरोध होऊ लागला आहे. त्यांच्याएवढा प्रबळ उमेदवार आज तरी पक्षाकडे निश्चित नाही. आमदार मुश्रीफांनी शड्डू मारला असला तरी त्यांचा उद्देश वेगळा आहे. प्रा. संजय मंडलिक गळाला लागणार नाहीत याची खात्री त्यांना झाल्यानंतर महाडिकांची कोंडी करण्यासाठीच त्यांनी रिंगणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली. पण तोपर्यंत पवारांनी त्यांचा उमेदवार ठरवल्याने त्यांची अडचण होणार आहे.

महाडिक आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील स्नेह जरा जास्तच आहे. यामुळे ते कमळ हातात घेतील, अशी चर्चा होती. पण युती होण्याची चिन्हे अधिक आहेत, त्यामुळे जागा सेनेला जाणार असल्याने प्रा. संजय मंडलिक यांच्या रूपाने त्यांचा उमेदवारही ठरलेला आहे. यातून भाजपचा रस्ता सोपा राहिला नाही. शिवाय पवारांनी पक्षाचे उपनेतेपद देऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाडिक यांचे संसदेतील काम अतिशय कौतुकास्पद आहे. राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून दिल्लीत त्यांनी आपली वेगळी प्रतिमा निर्माण केली. गल्लीत पक्षाकडे दुर्लक्ष झाले असले तरी दिल्लीत मात्र दोन वेळा नंबर वन खासदार म्हणून त्यांचा गौरव झाला. यामुळे पवारांच्या मनातील उमेदवार म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे. गल्लीत कितीही विरोध झाला तरी ते महाडिकांच्या पदरातच आपले वजन टाकतील यात शंका नाही. जिल्ह्यातील नेत्यांचे ऐकून दहा वर्षापूर्वी महाडिकांना त्यांनी उमेदवारी नाकारली, पण त्या गोंधळात राष्ट्रवादीने हातची जागा गमावली.हा अनुभव पाहता फारसे फेरबदल अपेक्षित नाहीत.

हसम मुश्रीफ, के. पी. पाटील, आर. के. पोवार यांचा महाडिक यांना विरोध आहे. पण पवारांच्या आदेशापुढे कुणाचे काही चालत नाही. यातून त्यांचा विरोध मावळेल. पण मनापासून झोकून देऊन काम करणे आणि दबावातून प्रचार करणे यामध्ये नक्कीच फरक असतो. तो अनुभव येऊ नये यासाठी पवारांना प्रयत्न करावे लागतील. मागील वेळी काँग्रेसने एकदिलाने साथ दिली, ती अवस्था सध्या नाही. यामुळे स्वकिय आणि मित्रपक्ष यांच्या विरोधाने महाडिक यांची वाटचाल खडतर होणार आहे. अनेकदा उघड विरोध, उघड शत्रू परवडतो, पण सोबत राहून विरोधात काम केल्यास काटे टोचल्याशिवाय राहत नाहीत. दिल्लीतून आशीर्वाद मिळणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढे गल्लीतून पाठिंबा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे उमेदवारी मिळाल्यानंतर महाडिक यांना झगडावे लागणार आहे ते या पाठिंब्यासाठी.

काका, भाऊ, वहिणी भाजपचे

दोन्ही दरडीवर हात ठेवून वाटचाल करणाऱ्या महाडिकांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना विजयासाठी स्वकियांच्या विरोधातच लढावे लागणार आहे. कारण समोर भाजपप्रेमी काका, भाऊ, वहिणी आहेत. तर गेल्या चार वर्षांपासून भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याशी त्यांचा घरोबा आहे. या सगळ्यांसोबत लढायचे म्हणजे त्यांना कसरत करावी लागणार आहे. भाजप काहीही करून तगडा उमेदवार देण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत हसन मुश्रीफ यांनी बजावलेली कृष्णाची भूमिका या निवडणुकीत कोण बजावणार याची उत्सुकता लागली आहे. काही जण केवळ सोबत असतील पण मनाने काय करतील याचा नेम नाही. त्यामुळे महाडिकांच्या विजयाचा रस्ता खाचखळग्यांचा आहे. प्रा. संजय मंडलिक यांच्या विरोधातच त्यांना पुन्हा लढावे लागणार आहे. यावेळी मंडलिकांना बोनस मताचा आधार मिळणार आहे. ही बोनस मते कुणाची हे सांगायला नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण काहींचे ध्येय ठरले आहे. त्यामध्ये बदल होण्याची शक्यता नाही. अशा 'ध्येय'वाद्यांची संख्या वाढली तर ते महाडिकांना महागात पडणार आहे. महाडिक यांची जिल्ह्यात ताकद आहे. संघटनेची ताकद आहे. गोकुळ सारखी संस्था सोबत आहे. अरुंधती महाडिक यांनी विणलेले महिला शक्तीचे जाळे आहे. साडे चार वर्षात केलेल्या कामाची शिदोरी आहे. या बळावर त्यांची वाटचाल सुखकर होणार की काहींच्या विरोधाने त्यामध्ये काटे पेरणार हे ठरवण्यास फार काळ लागणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गीत रामायण

$
0
0

शब्दस्वरातून उलगडले 'गीत रामायण'

वारणा बाल वाद्यवृंदाचे बहारदार सादरीकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लहान मुलांचा बहारदार गायन आविष्कार, रामभक्तीच्या साद घालणाऱ्या रचना, गीत गायन-निवेदनातून उलगडणारे रामचरित्र आणि भावभक्तीच्या या सोहळ्यात देहभान हरपून तल्लीन झालेला रसिक प्रेक्षक असा माहोल शनिवारी सायंकाळी केशवराव भोसले नाट्यगृहाने अनुभवला. वारणा बाल वाद्यवृंदच्या शालेय कलाकारांच्या कलाविष्काराचा व शब्दस्वरांचा अनमोल नजराणा रसिकांसाठी वेगळी आनंदानुभूती ठरली.

श्री वारणा सहकारी विविध उद्योग व शिक्षण समूहनिर्मित या कार्यक्रमाच्या मध्यंतराला संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला आणि शाळकरी मुलांच्या कलेला शाबासकीची थाप दिली. गीतकार ग. दि. माडगूळकर व संगीतकार सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या शब्दस्वरांनी बहरलेल्या या कार्यक्रमाचे वारणा बाल वाद्यवृंदाने वेगळ्या ढंगात सादरीकरण केले. पाचवी ते नववीतील जवळपास तीस विद्यार्थ्यांचा समावेश होता.

वारणा उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. विनय कोरे, श्रीमती शोभा कोरे यांची निर्मिती व संगीतकार विजय पाठक यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. वाद्यवृंदाने 'गीत रामायण'मधील ५६ पैकी १६ गीतांचे सादरीकरण केले. 'गा बाळांनो रामायण, स्वयें श्री राम प्रभू ऐकती, शरयू तीरावरी अयोध्या, राम जन्मला गं सखे, रामाविन राजपदी कोन बसतो, माता न तू वैरिणी' या गीतातून रामायणातील एकेक प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागले. निवेदक जीवनकुमार शिंदे यांचे प्रत्येक गीताच्या सादरीकरणाअगोरच्या प्रसंगानुरूप निवेदन हे कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. दोन तासांहून अधिक काळ रंगलेल्या या कार्यक्रमात बालचमूंच्या स्वरांनी रसिक मंत्रमुग्ध झाले.

००००

कलाकारीला मोठ्यांची दाद

कार्यक्रमासाठी गदिमांचे धाकटे चिरंजीव शरतकुमार माडगूळकर व नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विनय कोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. दरम्यान, रसिक प्रेक्षकांसह राजकीय व सहकारातील मंडळींनी या कार्यक्रमाचा आस्वाद लुटला. आमदार हसन मुश्रीफ, आमदार अमल महाडिक, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, महापौर सरिता मोरे, माजी आमदार राजीव आवळे, श्रीमती शोभा कोरे, वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, स्नेहा कोरे, शुभलक्ष्मी कोरे, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रताप पाटील, वारणा दूध संघाचे व्यवस्थापक मोहन येडूरकर, वारणा बझारचे शरद महाजन, एन. एच. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅक पँथर पार्टीचे ठिय्या आंदोलन

$
0
0

कोल्हापूर : तळसंदे येथील तत्कालीन ग्रामसेवक अतुल नारायण इरनाक व लिपिक महादेव चव्हाण यांनी घरकुल योजनेत गैरकारभार केला असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तसेच वाडी रत्नागिरी येथील नळपाणीपुरवठा योजनेची चौकशी व्हावी यासाठी नॅशनल ब्लॅक पँथर पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात डॉ. सुनील पाटील, अमित पावले, सॅमसन शिर्के, विकास चोपडे, उमेश चांदणे, शंकर कांबळे, कृष्णात चव्हाण आदींचा समावेश आहे. कार्यकर्त्यांनी हलगी, घुमके, डफ ही पारंपरिक वाद्ये वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शानूर मुजावर यांचे निधन

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

सामाजिक, शैक्षणिक व मनोरंजन क्षेत्रात सक्रिय असणारे कसबा बावडा येथील शानूर अकबर मुजावर (वय ३८) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. कदमवाडी येथे स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कदमवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. ते 'राज सरकार' नावाने ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. जियारत विधी सोमवारी (ता.७) आहे.

मुजावर हे श्री महाकाली सामाजिक न्यासचे संस्थापक अध्यक्ष होते. त्या माध्यमातून त्यांनी अनेक कॅन्सर व हृदयरुग्णांना मोठी मदत केली. त्यांनी सार्वजनिक मंडळे, नवोदित क्रीडा खेळाडूंना मार्गदर्शन करून आर्थिक सहाय्य केले. गेल्यावर्षी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यास त्यांनी आर्थिक मदत केली होती. ते माथाडी कामगार संघ, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष, तर श्री महाकाली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, शिवशाही आघाडीचे अध्यक्ष, हसन मुश्रीफ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष होते. महाहीट २४ मराठी वाहिनी तसेच महेक फिल्म या संस्थाही त्यांनी स्थापन केल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्थायी’चे घमासान सुरू

$
0
0

महापालिका लोगो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी समितीमधील नऊ सदस्य निवृत्त होत असून, त्यामध्ये सभापती आशीष ढवळे यांचाही समावेश आहे. नव्या नऊ सदस्यांची १८ जानेवारीला होणाऱ्या महासभेत निवड होणार असून जानेवारीअखेर सभापती निवडीचे घमासान होणार आहे. महापौर निवडीचा धुरळा खाली बसतो न बसतो तोच पुन्हा स्थायी सभापतींची निवड होणार आहे. परिणामी सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-ताराराणी अशा राजकीय संघर्ष उफाळून येणार आहे.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपला आहे, तर काँग्रेसच्या सदस्या दीपा मगदूम यांनी राजीनामा दिला आहे. परिणामी समितीतील नऊ सदस्यांची निवड महासभेत होणार आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन तर ताराराणी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे, तर राष्ट्रवादीचे अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण अपात्र ठरले आहेत. महापालिकेतील संख्याबळानुसार काँग्रेसचे चार नवीन सदस्य स्थायीमध्ये दाखल होणार आहेत. तर भाजप, राष्ट्रवादी प्रत्येकी दोन व ताराराणी आघाडीचा एक सदस्य स्थायीमध्ये प्रवेश करणार आहे. स्थायीमध्ये संधी मिळण्यासाठी नगरसेवकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

जानेवारीअखरे सभापतिपदाची निवडणूक होत आहे. निवडणुकीमध्ये ऐनवेळी दीपा मगदूम यांचे पद जात वैधता प्रमाणपत्रामुळे अपात्र होण्याची शक्यता आहे. परिणामी राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसकडूनही पद जाऊ नये, यासाठी त्यांचा राजीनामा घेऊन नव्या सदस्याची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीप्रमाणे 'स्थायी' सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी घमासान सुरू झाले आहे. त्यानुसार सत्तारुढ व विरोधी आघाडीकडून सावध, पण आक्रमक हालाचाली सुरु झाल्या आहेत.

००००

चौकट

स्थायी समितीतील बलाबल

काँग्रेस : ७

राष्ट्रवादी : ३

ताराराणी आघाडी : ४

भाजप : ३

शिवसेना : १

एकूण सदस्य : १८

...................

चौकट..

निवृत्त होणारे पक्षनिहाय सदस्य

सभापती आशीष ढवळे व सुनंदा मोहिते (भाजप)

कविता माने (ताराराणी आघाडी)

डॉ. संदीप नेजदार, राहुल माने, छाया पोवार (काँग्रेस)

मेघा पाटील (राष्ट्रवादी)

अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण अपात्र

रिक्त जागेवर काँग्रेस व राष्ट्रवादीमधून प्रत्येकी एक सदस्य येणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्रिवेणी’त रंगला भाव-नाट्यगीतांचा गोडवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मनाला भावणारी गीते, प्रेमाच्या हळुवार भावना टिपणारी सिनेगीतांनी रसिक मनाला भुरळ घातली. रसिकाग्रणी मदनमोहन लोहिया यांच्या स्मृतिदिनानिमित्त आायेजित संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 'त्रिवेणी' कार्यक्रमात रसिकांनी भावगीते व नाट्यगीतांचा गोडवा चाखला.

गायक श्रीरंग भावे (मुंबई), स्वरूपा बर्वे (पुणे) आणि गौरी कुलकर्णी (कोल्हापूर) यांनी महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला.

तीनही कलाकारांनी एकत्र 'गीत रामायण' व 'वेद मंत्राहून आम्हा' हे गीत सादर करत रसिकांची मने जिंकली. मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचतर्फे तीन दिवसीय संगीत महोत्सव भरवला आहे. गीतकार ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम आयोजित केला आहे. राम गणेश गडकरी सभागृह येथे महोत्सव सुरू आहे.

दरम्यान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी १५ ते ३५ वयोगटातील राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत स्पर्धा झाली. यामध्ये ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला, तर 'त्रिवेणी' कार्यक्रमात श्रीरंग भावेने सादर केलेल्या 'संथ वाहते कृष्णामाई, देव नाही देव्हाऱ्यात, कानडा राजा पंढरीचा' या गीतांनी वातावरण भावभक्तीमय बनले. गौरी कुलकर्णीने 'तुझ्या मनात कुणीतरी, आदिमाया अंबाबाई, जाळीमंधी पिकली करंवदं'अशा वेगवेगळ्या ढंगाची गाणी सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या कलाकारांना आशय कुलकर्णीने तबला, सौरभ शिपूरकरने हार्मोनियम, विक्रम पाटीलने की बोर्ड, सचिन जगतापने बासरी, केदार गुळवणीने व्हायोलिन, स्वप्निल साळोखेने साइड रिदम तर राजू ढोले यांनी ढोलकी साथ केली. महेश्वरी गोखले यांनी सूत्रसंचालन केले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गडकोट संवर्धनासाठी १५० कोटी निधी द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग यांची भेट घेऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी १५० कोटी रुपयांची मागणी केली. रायगड विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर हा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन सिंग यांनी दिले.

खासदार संभाजीराजे यांनी निधीची मागणी करताना वित्त आयोगाला देशातील पर्यटनवाढीसाठी राज्यातील गडकिल्ले महत्त्वाची भूमिका बजावत असल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना किल्ल्यांना मोठे महत्त्व दिले. गडकोटांचा ऐतिहासिक वैभव जपण्याची गरज असून, शिवरायांच्या पराक्रमाचा वारसा भावी पिढीला कळण्यासाठी गडकोटांचे संवर्धन होण्याची गरज आहे. काही किल्ल्यांची तटबंदी ढासळत चालली आहे. वेळीच दुरुस्ती केली नाहीत तर कालौघात ऐतिहासिक वैभव नष्ट होण्याचा धोका आहे. विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडचा विकास सुरू आहे. रायगडच्या धर्तीवर राज्यातील काही किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी तत्काळ स्वरुपात दीडशे कोटी रुपये देण्यात यावेत.'

सिंग यांनी एकाच वेळी सर्व किल्ल्यांच्या संवर्धनाच्या निधी देण्यास अडचणी येणार असल्याचे सांगून टप्याटप्याने किल्ल्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची उद्या बैठक

$
0
0

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित परिवर्तन यात्रा २७ जानेवारी रोजी कोल्हापुरात येणार आहे. यात्रेच्या नियोजनासाठी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची सोमवारी (ता.७) बैठक आयोजित केली आहे. ताराबाई पार्क येथील पक्ष कार्यालयात दुपारी ३.३० वाजता बैठक होणार आहे. आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजनाची बैठक होणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकुसरीच्या वस्तू, पुरणपोळी अन् भाकरी खर्डा

$
0
0

फोटो अमित गद्रे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या विविध भागांतील महिला बचत गटांचा सहभाग, बचत गटांनी उत्पादित केलेल्या पदार्थांच्या व कलाकुसरीच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनासाठी भरविलेल्या ताराराणी महोत्सवाला शनिवारी प्रारंभ झाला. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित महोत्सवात आजरा घनसाळ ते पुरणपोळी, भाकरी खर्डा अशा वैविध्यपूर्ण स्टॉलचा समावेश आहे. प्रदर्शन नऊ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तू थेट ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महोत्सव आयोजित केला आहे. महोत्सवात वस्तू व खाद्यपदार्थांचे मिळून १६० हून अधिक स्टॉल आहेत. महिला स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू हे महोत्सवाचे आकर्षण आहे. यामध्ये कलाकुसरीच्या वस्तूंचा समावेश आहे. प्रदर्शनात बचत गटांनी उत्पादित गृहोपयोगी वस्तू, सेंद्रिय गूळ, आजरा घनसाळ तांदूळ, विविध प्रकारची लोणची पापड विक्रीच्या स्टॉल्स आहेत.

दरम्यान, रविवारी (ता.६) सकाळी अकरा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी 'राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार २०१७-१८'चे वितरण होईल. दत्तवाड येथील कृष्णावेणी स्वयंसहाय्यता समूह, मालवे येथील श्री महालक्ष्मी स्वयंसहाय्यता समूह आणि राशिवडे येथील ज्वालामालिनी स्वयंसहाय्यता समूहाला पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे.

००००

खवय्यांसाठी पर्वणी

ताराराणी महोत्सवात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल खवय्यांसाठी पर्वणी आहे. शाकाहारी व मांसाहारी पदार्थांचे मिळून ५० स्टॉल आहेत. वाकरे येथील आयान महिला बचत गटांनी १० रुपयांत पुरणपोळी उपलब्ध केली आहे. भाजरीची भाकरी, दही खर्डा, थाली पिठासह विविध प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पदार्थ खवय्यांसाठी पर्वणी ठरणारे आहेत.

००००

महिला बचत गटाच्या उत्पादित वस्तूंना मार्केट उपलब्ध व्हावे, हा उद्देश ठेवून महोत्सव आयोजित केला आहे. जिल्ह्याच्या विविध भागांतील १५० हून अधिक बचत गटांचा समावेश आहे. महोत्सवात जवळपास पन्नास लाख रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. नागरिकांनी महोत्सवाला भेट देऊन बचत गटांनी उत्पादित वस्तूंची खरेदी करावी.

सुषमा देसाई, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण व विकास यंत्रणा

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकणंगले अनुकूल, पण लढणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हातकणंगले लोकसभा मतदारसंघ माझ्यासाठी अनुकूल आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेटवर्क, सहकाराचे जाळे यामुळे मतदारसंघाशी, नागरिकांसोबत माझा निकटचा संबंध आहे. मात्र सद्यस्थितीत लोकसभा निवडणूक लढविण्याचा विचार नाही. एवढ्या लवकर खासदारकीसाठी मी इच्छुक नसल्याचे जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री डॉ. विनय कोरे यांनी स्पष्ट केले. मात्र लोकसभा निवडणुकीत जनसुराज्य पक्षाची निश्चितच महत्त्वाची भूमिका असणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

वारणा उद्योग समुहातर्फे कोल्हापूर येथे शनिवारी सायंकाळी आयोजित एका कार्यक्रमाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मध्यंतरी भाजपकडून कोरे यांच्या नावाची चर्चा होती. त्या संदर्भात कोरे म्हणाले, 'हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी असा अडीच महिन्यापूर्वी प्रचंड आग्रह झाला. हा मतदारसंघ खूप जवळचा आणि माझ्यासाठी अनुकूल असा आहे. मात्र सद्यस्थितीत लोकसभेची निवडणूक लढविण्याचा माझा इरादा नाही.'

'सद्यस्थितीला जनसुराज्य शक्ती पक्ष हा जिल्हा आणि राज्य पातळीवर भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आहे. लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची चर्चा आहे. हा मतदारसंघ कुणाच्या वाट्याला येणार, भाजप कोणती जागा सोडणार, सेना कुठे दावा करणार हे सारे अजून अस्पष्ट आहे. युतीच्या निवडणुकीसंदर्भात राज्य पातळीवर धोरण ठरल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. मात्र जनसुराज्य शक्ती पक्ष लोकसभा निवडणूक लढविणार नसला तरी एक पक्ष म्हणून निवडणुकीत निश्चितच भूमिका महत्त्वाची राहील.'

मानेंसोबत जुना स्नेह

माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी कोरे यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. त्या भेटीविषयी विचारले असता कोरे म्हणाले, 'माझी व त्यांची भेट झाली नाही. मात्र ते मला येऊन भेटू शकतात, चर्चा होऊ शकते. त्यांच्यासोबत जुना स्नेह आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अपघातात शालेय विद्यार्थी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मर्दानी खेळाची प्रात्याक्षिके दाखविण्यासाठी पन्हाळ्याकडे चाललेल्या टेंबलाईवाडी येथील खेळाडूंचे वाहन उलटून चिखली फाटा (ता. करवीर) येथे झालेल्या अपघातात सहा विद्यार्थिनीसह चालक जखमी झाला. यापैकी दोन मुलांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीला चुकविण्याच्या प्रयत्नात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्याजकडेला सुमारे १५ फूट खोल खड्यात कोसळले. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

स्नेहल मुकेश लोट (वय १४), स्नेहल संदीप शिंगारे (वय १४), साहील भंडारी ( ८), मयुरी गुरव (१४), प्राची तोडकर ( १४), समृद्धी कांबळे (१४) आणि क्रुझरचालक स्वप्नील संजय भोसले (वय ४३, रा. सर्व टेंबलाईवाडी) अशी जखमींची नावे आहेत. स्नेहल व साहील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

टेंबलाईवाडी येथील राजे संभाजी मैदानी आखाड्याचे खेळाडू किल्ले पन्हाळगडावर मर्दानी खेळाची प्रात्याक्षिके दाखविण्यासाठी जात होते. चिखली फाटा येथे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रोडपासून सुमारे दहा फूट अंतरावर फरफटत जवळच्या सुमारे १५ फूट खड्यात उलटी झाली. यामध्ये सहा विद्यार्थिनी जखमी झाले. करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंबलाईवाडी येथील राजे संभाजी मैदान आखाडा अकॅडमीचे प्रमुख दीपक धनवडे यांनी मर्दानी खेळाचे प्रशिक्षण, प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी एक दिवसाची पन्हाळा येथे सहली आयोजित केली होती. त्यामध्ये या परिसरातील शालेय विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. दोन वाहने आणि पाच दुचाकीवरून एकूण ३० जण शनिवारी सकाळी आठ वाजता निघाले. रजपूतवाडीपासून काही अंतरावर चिखली फाटा येथे भरधाव वाहनाच्या पुढे दुचाकीस्वार अचानक आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने वाहन एक बाजूला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रोडजवळ असलेल्या सुमारे १५ फूट खड्यात उलटली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून सीपीआरमध्ये दाखल केले. पोलिस निरीक्षक सुनील पाटील, सहायक फौजदार ठाणेकर, पोलिस नाईक धर्मेंद्र बगाडे यांच्यासह पथक दाखल झाले.

सीपीआरमध्ये गर्दी

अपघाताची माहिती विद्यार्थांनीच्या पालकांना कळाल्यानंतर सीपीआरमध्ये मोठी गर्दी झाली. त्यांच्यासोबत असलेली काही वाहने पन्हाळा वाघबीळ घाटापर्यंत गेली होती. त्या वाहनांतील प्रशिक्षक आणि काही विद्यार्थी सीपीआरमध्ये आले. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना पाहून अनेक पालकांना अश्रू अनावर झाले.

ब्लॅक स्पॉटवर अपघात

डिसेंबर महिन्यातच या रोडवर तवेरा गाडी रेडेहोहात बुडून चार जणांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने संरक्षक कठडे बांधलेले नाहीत. गेल्या वर्षभरात कोल्हापूर ते पन्हाळा रोडवर २० जणांचा जीव गमवावा लागला आहे. वाघबीळ घाट, रेडेडोह, नलवडे बंगला, चिखली फाटा या परिसरात अपघात घडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडलिक एकनिष्ठ राहीले तर सेनेचे खासदार होतील

$
0
0

आमदार क्षीरसागर यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात भाजपने पैशाच्या जोरावर नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. जि. प. अध्यक्ष त्यांचा आहे. काही नगरपालिकाही ताब्यात आहेत. आगामी निवडणुकीतही भाजप पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर करणार आहे. मात्र कोल्हापूर जिल्हा शिवसेनेला मानणारा आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका कधीही लागू शकतात. हे गृहीत धरून तयारी केली पाहिजे', असे प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. 'संजय मंडलिक एकनिष्ठ राहिले तर ते शिवसेनेचे खासदार होतील', असेही त्यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शिवसेना पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. परिवहनमंत्री व शिवसेना नेते दिवाकर रावते, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने मंडलिक यांना उमेदवारी दिली. त्यांच्यासाठी मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. मात्र ते काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संपर्कात अधिक असतात. याची जाणीव त्यांना करून दिली आहे. आता सेनेचे सहा आमदार आहेत. चांगले वातावरण आहे. त्यामुळे मंडलिकांनी शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्यास ते खासदार होतील. माझ्या मतदारसंघात 'चाणक्य' या खासगी कंपनीची नियुक्त करून दहा हजार नविन मतदार नोंदणी करून घेतली आहे. शहराच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवला आहे. यामुळे येत्या विधानसभेसाठी काहीही अडचण नाही. लोकसभेलाही मताधिक्य मिळेल.'

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, 'करवीर विधानसभा मतदारसंघात काट्याची टक्कर असते. अंतर्गत वादामुळे तीन जि. प. सदस्यांचा कमी मतांनी पराभव झाला. विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार कोण असणार, त्यावर राजकीय समीकरण बदलेल. भाजप उमेदवारामुळे काही प्रमाणात सेनेला फटका बसू शकतो.'

...

मंत्री रावतेंचा चिमटा

जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पदाधिकाऱ्यांना मोबाइल बंद करण्याची विनंती केली. त्यावर मंत्री रावते यांनी जवळ बसलेल्या आमदार क्षीरसागर यांना तुमचा मोबाइल बंद आहे का, अशी विचारणा केली. त्यांनी सुरू असल्याचे सांगितले. क्षीरसागर यांनी आपल्या स्वतंत्र गटाची स्थापना केली आहे, असाही टोलाही रावते यांनी लगावला. तर शिवसेनेचे विद्यमान आमदार नरके यांनी करवीरमधून तुम्ही द्याल तो उमेदवार निवडून येईल, असे सांगताच एकच हशा पिकला. पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेना पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0

लोकसभेसाठी कामाला लागण्याचे मंत्री रावते यांचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मतदारसंघात गेल्या निवडणुकीत विरोधकांना किती मते मिळाली, आपल्या उमेदवाराला कमी मते का पडली, याचा अभ्यास करा. केवळ पारंपरिक पदे मिळाली म्हणून भूषवू नका. मोघम अहवाल देऊ नका, वास्तव मांडा', अशा कडक शब्दांत शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. कागल विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना आंदोलनाची मोठी हौस असते, ते रोज आंदोलन करतात, अशा कानपिचक्या दिल्या. दरम्यान, प्रसंगी स्वतंत्र लढण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे, असा आदेशही त्यांनी दिला.

लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि ममता दिनानिमित्त आयोजित शहर, जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहात ही बैठक झाली. बैठकीत मंत्री रावते यांनी जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला. भाजपशी युती करून लढले तर काय होईल आणि स्वतंत्रपणे लढल्यास किती यश मिळेल याची चाचपणी करतानाच त्यांनी केवळ पदेच भूषवणाऱ्या पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

मंत्री रावते म्हणाले, 'कोल्हापूर दक्षिणमध्ये सेनेची ताकद असेल तर गेल्यावेळी मतदान का कमी पडले, या मतदारसंघात भाजप आता उमेदवार देणार आहे का, दिल्यास शिवसेनेवर काय परिणाम होईल, याचा अभ्यास पदाधिकाऱ्यांनी करावा. इचलकरंजीतील पदाधिकाऱ्यांनी वस्त्रोद्योग कामगारांचे प्रश्न ऐरणीवर आणले नाहीत. यापुढील काळात लक्ष द्यावे. दिवंगत बाबा कुपेकर यांचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. चंदगडच्या आमदार त्यांच्या पत्नी आहेत. त्यांची मुलगी सध्या सक्रिय आहेत. त्याही रिंगणात राहतील. भाजपमधून कोण लढणार याचीही माहिती घ्यावी.'

दरम्यान, कागल तालुका प्रमुख संभाजी भोकरे यांच्या कामकाजाविरोधात रावते यांनी नाराजी व्यक्त केली. केवळ पद आहे, अभ्यास नाही, असे त्यांना सुनावले. कागलमधून मुश्रीफ लढणार आहेत का, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. यावेळी संपर्क नेते अरूण दुधवडकर यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस आमदार राजेश क्षीरसागर, डॉ. सुजीत मिणचेकर, चंद्रदीप नरके, संजय पवार, विजय देवणे, धैर्यशील माने, हर्षल सुर्वे, सुजीत चव्हाण यांच्यासह शहर, जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

......

चौकट

आमदार डॉ. मिणचेकरांबाबत तक्रार

आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी भाषणात निवडणुकीतील बुथ पातळीवरील प्रतिनिधी निवडीसंबंधी मला कुणीही सांगितले नाही, अशी तक्रार केली. त्याचवेळी हातकणंगले उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुका प्रमुख बाजीराव पाटील यांनी आक्षेप घेतला. डॉ. मिणचेकर आमचा मोबाइल घेत नाहीत, डायव्हर्ट करून ठेवतात. त्यांच्या कार्यालयात जाऊन माहिती दिली. त्याची पोहच आमच्याकडे आहे', असा खुलासा घेतला.

...............

कुपेकर घराण्यालाच विरोध का ?

चंदगड विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या ताकदीची माहिती उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी दिली. त्यांनी कुपेकरांच्या घराणेशाहीला मतदार कंटाळलेत. यामुळे शिवसेनेला चांगली संधी आहे, असे स्पष्ट केले. यावर कुपेकर कुटुंबाची घराणेशाही असेल तर शिवसेनेकडून संग्राम कुपेकर विधानसभेला चालणार का, असा प्रश्न मंत्री रावते यांची विचारला. यावेळी उपस्थित संग्राम कुपेकर अवाक झाले. 'चंदगड मतदारसंघात पक्ष वाढला आहे. प्रत्येकवेळी आम्ही चांगले काम करतो, निवडणुकीत दुसराच सेनापती असतो. असे करू नका', असे आवाहन प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले.

.........

बोगस पदाधिकारी तपासा

पदाधिकारी म्हणून नेमलेले किती बोगस आहेत, ते तपासा, अशी मागणी मंत्री रावते यांच्याकडे एका युवा शिवसैनिकाने बैठकीतच केली. तर इचलकरंजी विधानसभा संपर्कप्रमुख मनीष धामापूरकर यांनी आढावा घेताना देशात भाजपविरोधी वातावरण आहे, असे सांगताच त्यावर रावते यांनी राजकीय विश्लेषक होऊ नका, स्थानिक परिस्थिती सांगा, असे सुनावले.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत ७० हजारांची चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

बंद घरातील तिजोरी उचकटून चोरट्यांनी सोन्याचे गंठण, अंगठी, कानातील रिंगा आणि ५० हजारांची रोकड असा सुमारे ७० हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना येथील गावभागातील आवाडे बोळात घडली. याबाबत विरूपाक्ष धनपाल कित्तुरे यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कित्तुरे कुटुंबीयांसमवेत गावभाागात वास्तव्यास आहेत. संपूर्ण कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी जाणार असल्याने त्यांनी घराला कुलूप लावून बंद केले होते. रविवारी सकाळी ते परतले असता घरातील तिजोरी व आतील ड्रॉव्हर उचकटून ५० हजारांची रोकड, सोन्याचे गंठण, अंगठी, कानातील रिंगा तसेच गळ्यातील चांदीचे दागिने असा सुमारे ७० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे निदर्शनास आले. याबाबत कित्तुरे यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यूथ बँकेतील ‘गोकुळ’चा भरणा बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध वितरकांनी यूथ बँकेत रक्कमेचा भरणा करु नये, असे आदेश जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दिले आहेत. यूथ बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणल्याने गोकुळ व यूथ बँकेतील व्यवहाराला खंड पडला आहे.

कोल्हापूर शहरात गोकुळचे ३०० ते ४०० वितरक आहेत. वितरकांनी यूथ बँक व पार्श्वनाथ बँकेत रक्कम भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोकुळकडून दूधाचा पुरवठा होतो. तसेच गोकुळचे कर्मचारी, वाहतूक ठेकेदारांची बिलेही यूथ बँकेत जमा होतात. पण गेल्या काही दिवसांत बँकेकडून कर्जवसुलीवर मर्यादा आल्याने एनपीएचचे प्रमाण १० टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने निर्बंध आल्याने गोकुळने दूध वितरकांना यूथ बँकेत पैसे भरुन नयेत, असा आदेश दिला आहे. त्यामुळे रविवारी वितरकांनी पार्श्वनाथ बँकेत रक्कम भरली. वितरकांचे पैसे भरुन घेण्यासाठी दोन्ही बँकांचे कामकाज सुट्टी दिवशी सुरु होते.

चार वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाल्यावर बँकेने कर्जवसुलीवर भर आणून एनपीएचे प्रमाण कमी आणले होते. बँकेचे सर्व संचालक उद्योजक व तज्ज्ञ असल्याने तीन महिन्यात कर्ज वसुली करुन एनपीएचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. यूथ बँक राजकीय व सहकारातील नेत्यांशी संबधित असल्याने कर्ज वसुलीसाठी सामूहिक प्रयत्न केले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images