Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वेतन वसुलीला स्थगिती मिळवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एमएससीआयटी प्रशिक्षण मुदतीत पूर्ण केले नसल्याच्या कारणावरुन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीतील रकमेत कपात केली जात आहे. त्यामुळे हजारो कर्मचाऱ्यांना आर्थिफ फटका बसत आहे. वेतन वसुलीला आठवडाभरात कायमस्वरुपी स्थगिती मिळावी आणि त्या संदर्भातील आदेश तत्काळ निघावा यासाठी प्रयत्न करू' अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिली. रविवारी आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनात कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व सर्व संवर्ग संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, ग्रामसेवक संघटना, व सर्व शिक्षक संघटनांतर्फे एमएससीआयटी प्रशिक्षण आणि वेतन वसुली यासंदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मेळावा झाला.

मेळाव्यात 'वेतन वसुलीला कायमस्वरुपी स्थगिती मिळावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशारा विविध कर्मचारी संघटनांनी दिला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला न्याय मिळावा म्हणून आमदार आबिटकर यांनी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार आबिटकर यांनी एमएससीआयटी प्रशिक्षणप्रश्नी आठवडाभरात मंत्रालयात संबंधित विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन कायमस्वरुपी तोडगा काढू असे सांगितले.

आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष एम. एम. पाटील म्हणाले, 'एमएससीआयटी प्रशिक्षणप्रश्नी वेतन वसुलीला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय झाला. पण कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतनवाढीतील रकमेच्या वसुली संदर्भात नोटीसा दिल्या आहेत. लाखो रुपयांचा फटका बसत आहे. याप्रश्नी लवकर सामान्य प्रशासन विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि ग्राम विकास विभागाच्या मुख्य सचिवांची एकत्रित बैठक घेऊन वेतन वसुली थांबविण्याचा आदेश निघावा.'

याप्रसंगी ग्रामसेवक संघटनेचे के. आर. किरुळकर, शिक्षक संघटनेचे मोहन भोसले यांची भाषणे झाली. शिक्षक संघटनेचे राजाराम वरुटे यांनी प्रास्ताविक केले. कर्मचारी युनियनचे धनंजय जाधव यांनी स्वागत केले. याप्रसंगी एम. आर. पाटील, बी. डी. चौगुले, विजय पाटील, सुरेश सुतार, प्रविण मुळीक, अल्ताफ शेख, रवि पाटील, सुरेश कोळी, प्रमोद तौंदकर, रामदास झेंडे प्रमुख उपस्थित होते.

निर्णय घ्यायला भाग पाडू

आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरुण खरमाटे म्हणाले, 'एमएससीआयटी प्रशिक्षण प्रश्नी कर्मचाऱ्यांना नाहक त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रशासनातील काही मंडळी यामध्ये आडकाठी आणत आहेत. जाणूनबुजून त्रास देण्याचा खटाटोप चालू राहिल्यास राज्यभर आंदोलन छेडू. त्यामुळे प्रशासनाला काम करणे मुश्किल होईल. कर्मचाऱ्यांच्या बळावर योग्य निर्णय घ्यायला प्रशासनाला भाग पाडू.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘आई-वडिलांच्या वेदनांची जाणीव ठेवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पुस्तकांचा सहवास आणि जीवनातील अनुभव माणसाला खूप काही शिकवतात. साहित्यात खूप मोठी ताकत असून समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक बनतो. अस्सल अनुभवावर आधारित साहित्य निर्मिती वाचकांच्या मनाला भिडते. उत्तम लिखाणासाठी उत्तम वाचन आवश्यक आहे. त्या सोबतीला संवादकौशल्य गरजेचा आहे' अशा शब्दांत निवृत्त शिक्षण सहसंचालक संपत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वाचन लेखनाचे महत्व सांगितले. जीवनात कितीही उत्तुंग यश मिळवलात तरी आईचे दु:ख आणि वडिलांच्या वेदनांची जाणीव ठेवा' असा सल्लाही त्यांनी दिला. बालकुमार साहित्य सभेतर्फे रविवारी पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. प्राचार्य जीवन साळोखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवाजी पार्कातील मुख्याध्यापक संघाच्या सभागृहात कार्यक्रम झाला.

निवृत्त सहसंचालक गायकवाड यांनी भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, सानेगुरुजी यांच्या जीवनचरित्रातील दाखले दिले. 'थोरामोठ्यांच्या जीवनात पुस्तकांनी आमूलाग्र बदल केले. मानवी उत्कर्षात पुस्त्कांचे मोल मोठे आहे. लोकमान्य टिळकांनी विवाहात हुंडा नाकारुन त्याऐवजी पुस्तके भेटरुपात स्वीकारली होती. शिक्षण आणि साहित्यातून माणसाला जीवनाची दिशा सापडते' असे ते म्हणाले.

डॉ. आनंद गुरव म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे. शिक्षक विद्यार्थ्याला नेहमी सदमार्ग दाखवित असतो. सच्चेपणा, सकारात्मक दृष्टिकोन आणि नवनिर्मितीची शिकवण देणारा गुरुस्थानी असतो.'

प्राचार्य जीवन साळोखे म्हणाले, 'मानवी जीवनात संवाद व समन्वय कमी होत आहे. त्यामुळे समाजात विविध समस्या निर्माण होत आहेत. संवाद आणि समन्वयासाठी साहित्य महत्वाचे माध्यम आहे. साहित्यामुळे व्यक्तिमत्व फुलते. बालकुमार साहित्य सभेने भाषा शुद्धिकरणासाठी पुढाकार घ्यावा. शाळेतही याचे प्रयोग व्हावेत.'

उमरगाव येथील बालकवी बालाजी इंगळे यांच्या 'रंगीत रंगीत फूल', मुंबईचे रमेश तांबे यांच्या 'धमाल गोष्टी', वाचनकट्टाचे युवराज कदम संपादित 'पुस्तकाचा गाव' आणि ज्योती कपिले यांच्या 'कोडी झाली नाटुकली' या बालनाटिकेसाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अनघा हिरे यांच्या 'गिडूची शाळा' या पुस्तकाला व सुनिता बोर्डे यांच्या 'भाकरीचा बंगला'या कवितासंग्रहाला पुरस्कार देण्यात आला. लेखन, कथालेखन, संवादलेखन, स्वरचित कवितालेखन स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव झाला.

बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष बाळ पोतदार व कार्यवाह मिलिंद कोपार्डेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. नसीम जमादार, प्रणिता तेली यांनी सूत्रसंचालन केले. परशराम आंबी यांनी आभार मानले. साहित्यिक शाम कुरळे, गोविंद गोडबोले, डॉ. मा. ग. गुरव, मनोहर मोहिते, डॉ. श्रीकांत पाटील, प्रकाश पाटील, सुमन कुरळे, उपकुलसचिव व्ही. एन. शिंदे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतूतूचा डाव मांडायला हवे आता दातृत्वाचे बळ

$
0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

शालेय वयात खेळाची आवड असल्याने कबड्डीमध्ये करिअर करण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यादृष्टीने वाटचाल चालू असताना नियतीला त्याची घोडदौड मान्य नव्हती. आजरा तालुक्यातील पेरणोली येथील युवा कबड्डीपटू संदीप ज्ञानदेव हावलदार याचा पेरणोली आजरा रोडवर गंभीर अपघात झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या संदीपची कोल्हापुरातील सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज सुरू आहे. त्याच्या डोक्याला जबरी मार बसला असून त्याच्यावर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. उपचाराचा खर्च लाखाच्या घरात आहे. एका नवोदित कबड्डीपटूला वाचवण्यासाठी समाजाच्या दातृत्वाची गरज आहे.

संदीप आणि त्याचा मित्र अनिकेत भोकरे हे गुरुवारी (ता. १३)रोजी दुचाकीवरून जात असताना पेरणोली आजरा रस्त्यावर उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकीमध्ये अपघात झाला. यामध्ये संदीपचा मित्र अनिकेत जागीच ठार झाला. यामध्ये संदीपच्या डोक्याला तसेच जबड्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली. त्याच्यावर तत्काळ एक शस्त्रक्रिया करण्यात आली. आणखीन एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र उपचारासाठी लागणारा खर्च चार ते पाच लाखाच्या आसपास असल्याने एवढे पैसे कुठून आणायचे या विवंचनेत त्याचे पालक आहेत.

संदीप व त्याचा मित्र अनिकेत सार्वजनिक कामात नेहमी पुढे असत. संदीपला कबड्डी खेळात विशेष रस आहे. नुकत्याच शिवाजी विद्यापीठात झालेल्या विद्यापीठ स्तरीय कबड्डी स्पर्धेत त्याने भाग घेतला होता. तसेच प्रो कबड्डी स्पर्धेत सहभागी होण्याच्या दृष्टीने त्याचा सराव चालू होता. कलाशाखेतील तिसऱ्या वर्षात शिकत असलेला संदीप कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये काम करू शिक्षण पूर्ण करत आहे. कबड्डी स्पर्धेत सहभाग घेत त्याने सैन्यदलात भरती होण्यासाठी सराव सुरू ठेवला होता. मितभाषी आणि स्वभावाने शांत असणाऱ्या संदीपचे भविष्य अपघाताने झाकोळले गेले आहे. संदीपचे वडील हृदयविकाराचे रुग्ण असून गावांमध्ये चहाची टपरी चालवतात. तर आई तुटपुंजी शेती करून संसाराचा गाडा चालवते. अचानक ओढवलेल्या या अपघाताने हवालदार कुटुंबीय मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक आघातातून सावरण्याकरिता प्रयत्न करत आहेत. याकामी समाजाने मदतीचा हात दिल्यास एका नवोदित कबड्डीपटूला पुन्हा हुतुतूचा डाव मांडता येणार आहे. यासाठी आकाश धनाजी सुतार, स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आजरा, खाते क्रमांक ३७५८०८०७७६७, आयएफएससी कोड: एसबीआय ००११४३४ या खाते क्रमांकावर आर्थिक सहकार्य करता येईल.

संदीपच्या मेंदूच्या आवरणाला मोठ्या प्रमाणात इजा पोहचली आहे. तसेच कवटीला फ्रॅक्चर आहे. त्याच्यावर तत्काळ एक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र धोका अजूनही कायम आहे.

डॉ. अविनाश उपाध्ये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेच्यावतीने वीरमाता, वीरपितांचा सत्कार

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातिर्थी पडलेल्या वीर जवानांच्या तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागात सेवा बजावित असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा महापालिकेच्यावतीने शनिवारी कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते सत्कार केला.

सत्कार मूर्तीमध्ये ऊर्मिला मरळे, सुनील कांबळे, सत्यवान रावराणे, कांचनदेवी भोसले, माणिक वालकर, श्रीमती सुनीता देसाई, आनंदी उलपे, मनीषा सूर्यवंशी, व्यंकोजी शिंदे, शांता चिले, जाई जाधव, संजय खामकर, पार्वतीबाई माने, अंजनी पाटील यांचा समावेश होता.

यानंतर स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ सर्व्हेक्षण २०१९ भारत सरकार व प्रसारण मंत्रालय फिल्ड आऊटरीच ब्युरो कोल्हापूर विभागाअंतर्गत शालेय चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्याचा बक्षीस वितरण समारंभ महापौर मोरे यांच्या हस्ते केला. यामध्ये प्राथमिकस्तर चित्रकला स्पर्धेमधील पहिले तीन विजेते : हर्षवर्धन माने (विमला गोयंका इंग्लिश स्कूल), सदिया इरशाद पठाण (डॉ.झाकीर हुसेन उर्दू मराठी स्कूल), कुणाल कांबळे (शाहू प्राथमिक विद्यालय), निबंध स्पर्धा : अमर पाटील (मनपा महात्मा फुले विद्यालय), आदित्य गुरव (आण्णासो शिंदे विद्यालय), विकास पाटील (विद्यामंदीर शाहुपूरी). माध्यमिक स्तर चित्रकला स्पर्धा : राधा पारकर (होली क्रॉस), वरद साळोखे (विमला गोयंका स्कूल), आशिया पटवेगार (होली क्रॉस), तन्वीर नाइकवडी (ओरियंटल स्कूल). निबंध स्पर्धा राजनंदीनी जरग (महाराष्ट्र हायस्कूल), स्वर्णिका कराळे (पद्माराजे हायस्कूल), यल्लवा आंबी (वि.स.खांडेकर) यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला.

यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर भूपाल शेटे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, सभागृहनेता दिलीप पोवार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालेय पोषण आहार योजना अस्थिर वाटेवर?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

सरकारी शाळेंचा स्तर सर्वच बाबतीत उंचावत असल्याचे सरकार आणि संबंधित यंत्रणेकडून कितीही दावे केले जात असले तरी या दाव्यांना तडे गेल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. शालेय पोषण आहार योजनेबाबतही असाच काहीसा प्रकार सुरू असल्याने राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मध्यान भोजन पुरविणारी ही सरकारची महत्वाकांक्षी योजना कुठेतरी अस्थिर वाटेवर असल्याचे स्पष्ट होत आहे. योजनेसाठी धान्य सोडून अन्य पूरक साहित्य (धान्यादी) पुरवठा ठप्प झाल्याने शालेय पोषण आहार योजना मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीला डोईजड ठरू लागली आहे. पोषण आहार योजना पुढे नियमित सुरू ठेवण्याच्या हट्टापायी हे साहित्य खरेदी करण्याची मुख्याध्यापकांवर सक्ती केली गेली आहे. शिक्षण विभागाकडून तशा आशयाचे आदेश शाळेंना मिळाले आहेत. सरकारच्या या बेजबाबदार धोरणाला प्राथमिक शिक्षक संघटनांनी मात्र तीव्र विरोध दर्शविला आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषद तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजने अंतर्गत मध्यान भोजन दिले जाते. यासाठी सरकारकडून तांदूळ, डाळ, कडधान्ये, तेल, तिखट, मीठ तसेच मसाला आदी साहित्य शाळांना पुरवठा केला जातो. तर गॅस, भाजीपाला आणि अन्य पूरक साहित्यासाठी इयत्ता पहली ते पाचवी पर्यंत प्रति विद्यार्थि १ रुपये ५१ पैसे तसेच ६ वी ते ८ वी पर्यंत प्रति विद्यार्थि २ रुपये १८ पैसे प्रमाणे शाळांना अनुदान दिले जाते. स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाते. हा शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम महिला बचत गटांना देण्याचे सरकारी निर्देश असले तरी आहार शिजविण्याच्या बदल्यात मिळणाऱ्या अत्यल्प अनुदानामुळे बचत गट ही जबाबदारी स्वीकारण्यास सहसा तयार होत नाहीत. परंतु विद्यार्थ्यांना पोषण आहार देणे बंधनकारक असल्याने नाईलाजाने का होईना स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीला स्वयंपाकी नेमून ही पोषण आहार योजना सुरू ठेवावी लागत आहे. तर योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी मुख्यध्यापकांना रेटावी लागत आहे.

शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी पोषण आहार संबंधी साहित्य पुरवठा कराराची पूर्तता होणे अपेक्षित असताना अद्यापही असा करारच झालेला नाही. महिन्याभरात कराराप्रमाणे ही योजना सुरळीत होईल असे यंत्रणेकडून सांगितले जात असले तरी प्रत्येक वर्षीचा अनुभव यापेक्षा वेगळा नाही. गेल्या वर्षीही या कराराची वेळेत पूर्तता झाली नव्हती. यामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा असताना त्याच त्या चुकांची पुनरावृत्ती कशासाठी ? असा प्रश्नही शिक्षण वर्तुळातून सद्या उपस्थित होत आहे.

योजनेच्या नियोजनातील ढिसाळपणाचा कळस म्हणजे शिधा (धान्य) वगळता पोषण आहारासाठी अन्य धान्यादी साहित्य पुरवठा करणाऱ्या संबंधित एजन्सीचा करार संपला असताना तसेच नवीन काराराची पूर्तता झाली नसल्याने शाळांना याआधी पुरवठा केलेले पोषण आहार साहित्यही संपले आहे. आतातर तांदूळ वगळता अन्य साहित्याचा पुरवठाही ठप्प झाला आहे. तरीही पोषण आहर योजना नियमित चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहार साहित्य खरेदी करण्याची शाळा मुख्याध्यापकांना सक्ती करण्यात आली आहे. या साहित्य खरेदीचा जमा-खर्च सादर केल्यानंतरच पोषण आहार शिजविण्याचे अनुदान दिले जाईल असे फर्माणही प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातून प्रत्येक शाळेला धाडण्यात आले आहे.

मुख्याध्यापकांच्या खिशाला भार

आता अनुदानाची रक्कमही वेळेत मिळत नसल्याची तक्रार मुख्याध्यापकांकडून वेळोवेळी केली जाते. पोषण आहार साहित्य खरेदीसाठी मुख्याध्यापकांना प्रत्येक महिन्याकाठी सरासरी २० ते ३० हजार रुपये खर्च करावे लागतात. शिवाय अनुदान रक्कमही चार-पाच महिन्यानंतर उपलब्ध होते. इतके दिवस स्वयंपाकी उधारीवर काम करीत नाही. साहजिकच मुख्याध्यापकांच्या खिशाला हा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे. सरकारच्या या धोरणाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनांनी पोषण आहार साहित्याचा पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिनीची जागा वाचवू

$
0
0

कोल्हापूर: शालिनी सिनेटोनच्या जागेबाबत चित्रपट रसिक व येथील जनतेच्या भावना जुळल्या आहेत. भावनांची दखल घेत शालिनी सिनेटोनची जागा वाचवण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन नूतन महापौर सरिता मोरे यांनी दिले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्यावतीने खरी कॉर्नर येथील मानस्तंभाजवळ नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार शुक्रवारी करण्यात आला.

उपमहापौर भूपाल शेटे म्हणाले, 'येणाऱ्या महासभेत विकसकाशी हातमिळवणी करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचा पर्दापाश केल्याशिवाय गप्प बसणार नाही.' यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने शालिनी सिनेटोनबाबत महापौर मोरे यांना निवेदन दिले. सत्कार समारंभास नगरसेवक किरण नकाते, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, विजयाताई पेंटर, ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, संचालक सतीश बीडकर, रणजित जाधव, शरद चव्हाण, राजाराम जाधव, शाम केणे, मिलिंद अष्टेकर, सुरेंद्र पन्हाळकर, अर्जुन नलवडे, अरुण चोपदार आदी उपस्थित होते. ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी स्वागत केले. धनाजी यमकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दोन कर्मचारी ठार

$
0
0

अपघात अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दोन कर्मचारी ठार

सोलापूर :

तुंगत (ता. पंढरपूर) येथे मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर बोलेरो जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातात श्री विठ्ठल अर्थात स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोन कर्मचारी ठार झाले, तर स्वेरीचे ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी मिरजेला हलवण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे स्वेरी महाविद्यालयावर शोककळा पसरली आहे.

स्वेरीचे ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे यांना मोहोळ येथून घेऊन बोलेरो जीप पंढरपूरकडे येत होती. दरम्यान, तुंगत येथील जुन्या टोलनाक्याच्या पुढील बाजूस आल्यानंतर रस्त्यात कुत्रे आडवे आले. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा जीप वरील ताबा सुटला आणि जीप बाजूच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात चालक सागर लोंढे जागीच ठार झाला, तर प्रशांत पाटोळे यास सोलापूरला उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. या अपघातात दादासाहेब रोंगे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मिरजेला हलवण्यात आले आहे. दादासाहेब रोंगे यांची प्रकृती स्थिर असल्याचे निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात थंडीने गारठून दोघा फिरस्त्यांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कडाक्याच्या थंडीमुळे कोल्हापुरात शनिवारी रात्री दोन जणांना जीव गमवावा लागला. थंडीचा पारा पंधरा अंशांवर असल्याने लक्ष्मीपुरी कोंबडी बाजारातील दोन फिरस्त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. खंडेराव दिनकरराव कारंडे (वय ६१, रा. नंदवाळ फाटा, कोल्हापूर) असे एका मृत फिरस्त्याने नाव आहे. तर दुसऱ्या फिरस्त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. दोन्ही फिरस्ते गेले चार ते पाच दिवस अशक्त होते. गुरुवारी आणि शुक्रवारी दोन दिवस रात्री थंडीचा कडाका वाढल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरी कोंबडी बाजार परिसरात गेल्या महिन्याभरापासून ६० ते ६५ वयोगटातील दोघे फिरस्ते वास्तव्याला होते. परिसरातील फेरीवाले, वडापावच्या हातगाड्यावर भीक मागून त्यांचा दररोजचा उदरनिर्वाह सुरु होता. नागरिकांनी दिलेले कपडे आणि अपुरे अंथरुन घेऊन कोंबडी बाजार परिसरातील दुकानांच्या पायऱ्यांवर ते झोपत होते. शनिवारी रात्री कडाक्याची थंडी होती. रात्री दोघेही परिसरातील दुकानांच्या पायऱ्यावर झोपले होते. कडाक्याची थंडी असूनही त्यांच्या अंगावर पुरेसे पांघरुण नव्हते. रविवारी सकाळी कोंबडी बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला. फिरस्त्यांची काहीही हालचाल जाणवत नसल्याने काही व्यापारी आणि ग्राहकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नसल्याने स्थानिक दुकानदारांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या ठिकाणी लक्ष्मीपुरी पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. पैकी एकाच्या खिशात सापडलेल्या आधारकार्डवरुन एकाचे खंडेराव कारंडे असे त्याचे नाव समजले. दुसऱ्या फिरस्त्याची अद्याप ओळख पटलेली नाहीत. पोलिस त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे. पायरीवर झोपलेल्या अवस्थेत त्यांचा थंडीने गारठून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘ पारा २० अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीमुळे शरीरातील नसा गोठू शकतात. श्वासही मंद होऊ शकतो. अंगावर कपडे नसल्यास थंडीमुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असू शकते. गेले काही दिवस थंडी असल्याने या दोघांच्या मृत्यूचे ते कारणही ठरू शकते.

- डॉ. विजय बरगे, सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक, सीपीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारकरी वाटावेत म्हणून चक्क टोप्या वाटल्या

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

मुख्यमंत्र्याना खुश करण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. म्हणूनच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यक्रमाला वारकरी उपस्थित होते हे दाखवण्यासाठी मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले यांनी वेगळीच शक्कल लढवली. पण त्यांचं बिंग फुटलंच.

मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उपस्थितांना चक्क गांधी टोप्यांचं वाटप करण्यात आलं. आपल्या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्धी मिळावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या भोसले यांनी थेट कराडवरुन मर्जीतल्या पत्रकारांची आणि कार्यकर्त्यांची फौज आणली आहे. मात्र, कार्यक्रमापूर्वीच टोप्यांचे वाटप सुरू झाल्याने याची विचारणा करताच सगळे वारकरी दिसावेत, असं उत्तर देत कार्यकर्त्यानं अतुल भोसले यांचे बिंग फोडलं.

दरम्यान, पोलीसांच्या अतिरेकाचा वारकरी संतानाही फटका बसला. प्रत्येक वारकऱ्याला रुमाल उघडून दाखवायला लागला. यामुळे पोलीस सुरक्षेचा अतिरेक करीत असल्याने वारकरीही हैराण झाले आणि नाराज झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा छळ करणारा डॉक्टर ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉक्टर पत्नीकडे १५ लाख रुपयांचा हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करून अनैसर्गिंक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी डॉ. शेखर रामचंद्र भिसे (वय २६ , रा. मधुबन सोसायटी, फ्लॅट क्रमांक ८, राजारामपुरी १३ वी गल्ली) याच्यावर अकोला पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. घटस्फोट मागण्यासाठी आलेला पती आणि सासरा रामचंद्र भिसे यांना पुणे येथील सारसबागेतून ताब्यात घेतल्याचे समजते. तर सासू अलका रामचंद्र भिसे, नणंद पल्लवी रुपेश आवळे ( जिव्हाळा हाउसिंग सोसायटी, गाडीतळ, पुणे),गौरी अमोल फासगे (भैरोबा अपार्टमेंट, नांदेड सिटी), सायली प्रसाद मोरे, मावस सासू दमयंती अरुण भिसे (पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , डॉ. भिसे बेळगाव येथील एका इन्स्टिट्यूटमध्ये कार्डियोलॉजिस्ट आहे. एका संकेतस्थळाच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. त्यांचा विवाह २३ जानेवारी, २०१७ मध्ये झाला. त्यांना एक वर्षाचा मुलगा आहे. दरम्यान, एम. डी. असलेल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यात पत्नीचा अडथळा होत असल्याने त्याने शारिरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यासाठी अनैसर्गिक लैंगिक अत्याचारही केला. तसेच पत्नीकडे १५ लाख रुपये माहेरहून आणण्याचा तगादा लावला. पत्नीचे माहेर अकोला असून ती बीएचएमएस पदवीधारक आहे. विवाहाच्या वेळी पती वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाला शिकत होता. त्याचे दरवर्षी व्यवस्थापन कोट्याचे सुमारे ३६ लाख रुपये शुल्क होते. हे शुल्क पत्नीने माहेरुहून आणावे, असा तगादा लावत भिसे याने वारंवार पैशाची मागणी केली. या पैकी काही लाख रुपये पत्नीच्या माहेरच्या मंडळीनी दिले. मात्र उर्वरित पैसे देण्यासाठी पुन्हा त्याने तगादा लावला. सासरा एका जीवन विमा निगम कंपनीतून विकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाला असून सासू शिक्षिका आहे. सासरच्या जाचाला कंटाळून संबंधित विवाहिता जून २०१८ मध्ये माहेरी आली. त्या वेळी पतीने अकोला येथे जाऊन हिऱ्याची अंगठी आणि सोन्याची चेन जबरदस्तीने हिसकावून घेतली. या सर्व प्रकारानंतर पत्नीने अकोला पोलिसांत तक्रार दाखल केली. घटस्फोट घेण्यासाठी पुणे येथे आलेला पती आणि सासरा यांना ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडार समाजाचा आरक्षणप्रश्न निकाली काढू: CM

$
0
0

सोलापूर:

वडार समाज आज हलाखीचं जीवन जगत आहे. या वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढणार आहे, असं जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापुरातील समाजाच्या मेळाव्यात दिलं. समाजाच्या वस्त्यांची जागा त्यांच्याच मालकीची होणार, अशी घोषणाही त्यांनी केली.

सोलापुरात आज वडार समाजाचा मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही उपस्थित होते. फडणवीस यांनी यावेळी वडार समाजाच्या आरक्षणाबाबत मोठी घोषणा केली. वडार समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू, असं ते म्हणाले. पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय पुढे जाऊ शकत नाही, तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथही वडार समाजाशिवाय कसा पुढे जाईल? असं म्हणत हे सरकार या समाजाच्या पाठिशी कायम उभं आहे, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

गेल्या ७० वर्षांपासून हा समाज विविध समस्यांचा सामना करतोय. त्यांच्या वेदना आणि दुःख दूर करणं आमचं कर्तव्य आहे. इदाते समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब झालं तर त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल. त्यासाठी प्रयत्न करा, अशी विनंती फडणवीस यांनी आठवलेंना केली. वडार समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्व जण प्रयत्न करू, असं सांगून बेघरांना घरे देणार असून वस्त्यांची जागा त्यांच्या मालकीची होईल अशी व्यवस्था निर्माण करू, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. वडार समाजाच्या व्यवसायासाठी १०० कोटी रुपये देणार आहे. समाज आणि सरकार यांच्यात व्यवस्था उभी राहिली पाहिजे. त्यामार्फत सरकारचे निर्णय या समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. यासाठी महाराष्ट्र समन्वय समितीची घोषणा करत असून विजय चौगुले यांना अध्यक्ष समितीचे अध्यक्ष करतो. तसंच त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल, असंही त्यांनी जाहीर केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रॅगिंग’प्रश्नी चौकशी समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल येथील जवाहर नवोदय विद्यालयातील रॅगिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी दोन दिवसांत अहवाल देण्याचे आदेश प्राचार्य श्रीनिवास राव यांना दिले. समितीमध्ये पलूसचे प्राचार्य अशोक साळी, सिंधुदुर्गचे श्रीजित बाबू यांचा समावेश आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत दोषींवर कारवाईची मागणी केली.

विद्यालयातील ११ वीच्या सात विद्यार्थ्यांनी सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी अमानुष मारहाण केली. हा प्रकार १४ डिसेंबरला रात्री १० ते १ च्या सुमारास घडला. लाथबुक्या, काठ्या आणि रॉडनी विद्यार्थ्यांना मारहाण झाली. त्यामुळे विद्यार्थी भीतीच्या छायेत आहेत. त्या सात विद्यार्थ्यांपासून मुलांच्या जिविताला धोका आहे. मुलांच्या अंगावर उठलेल्या व्रणांचे फोटोही काही पालकांनी दाखवले. यामुळे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. दरम्यान, गुणवत्तेत राज्यात नावलौकिक असणाऱ्या शाळेत रॅगिंगचा असा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. संबंधित मुलांच्या पालकांनी प्राचार्यांच्या परवानगीने मुलांना घरी नेले.

रॅगिंगविरोधी स्वतंत्र कायदा आहे. प्रत्येक शाळेत यासंबंधीचे जागृती फलक, हेल्पलाइन क्रमांक दर्शनी भागात लावणे सक्तीचे आहे. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती कार्यरत असणे आवश्यक आहे. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी शाळास्तरावर करण्याकडे प्राचार्यांनी दुर्लक्ष केल्यानेच मुलांना रॉडने मारहाण करण्यापर्यंत मजल गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

.. .. .

या प्रकरणात चौकशी समिती नेमली आहे. सर्व दोषींवर कडक कारवाई होईल. कुणाचीही गय केली जाणार नाही. विद्यालयात चुकीचे प्रकार घडू नयेत, यावर लक्ष देण्याची जबाबदारी प्राचार्य आणि रेक्टरची आहे.

अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

.. ..

प्राचार्य आंध्र प्रदेशातील आहेत. त्यांना स्थानिक भाषा येत नाही. रॅगिंगविरोधी उपाययोजनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. वसतिगृहातील रेक्टरही रात्री वास्तव्यास नसतात. यामुळे मारहाणीसारखा गंभीर प्रकरण घडले. यातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे.

अविनाश माने, पालक

.. .. ..

अधीक्षक काय करीत होते?

सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना हे सात विद्यार्थी दोन महिने सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. १४ डिसेंबरला रात्री हे सातजण विद्यार्थ्यांना मारहाण करीत होते. विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी अधीक्षक काय करीत होते, रॅगिंगच्या प्रकाराकडे प्राचार्य राव यांनी का दुर्लक्ष केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भादोले येथे अपघातात युवक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

भादोले (ता. हातकणंगले) येथे दुचाकी मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक युवक जागीच ठार झाला. अक्षय उत्तम कदम (वय १९, रा. भादोले) असे त्याचे नाव आहे. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला असून याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, भादोले येथील अक्षय कदम हा सोमवारी सायंकाळी आपल्या दुचाकी मोटारसायकलीवरुन पेठवडगावहून गावी परतत होता. दरम्यान बिरदेव मंदिरासमोर आल्यानंतर आष्ट्याकडून येणाऱ्या एका दुचाकीची त्याची समोरासमोर जोरदार धडक झाली. या झालेल्या अपघातात अक्षयच्या डोक्याला जोरदार मार बसून अतिरक्तस्त्राव झाल्याने तो जागीच मृत झाला. रात्री उशिरा अक्षयचे शवविच्छेदन पारगाव ग्रामीण रुग्णालयात करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अक्षय हा एकुलता होता. त्याच्या अपघाती मृत्यूने आई-वडिलांनी घटनास्थळी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघाताची नोंद पेठवडगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयित सुर्यवंशीला मुंबईला हलविले

$
0
0

पानसरे हत्या तपास ... लोगो

आरोपी वासुदेव सुर्यवंशीला मुंबईला हलविले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एसआयटीने अटक केलेला संशयित आरोपी वासुदेव भगवान सुर्यवंशी (वय २९, रा. करकी, मुक्ताईनगर, जळगाव) याला तपास पथकाने पुढील तपासासाठी मुंबईला हलविले. दरम्यान, या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथकाकडून आणखी दोघांना अटक होण्याची शक्यता आहे.

एसआयटीच्या पथकाने एक डिसेंबर रोजी सुर्यवंशी व भरत जयवंत कुरणे (वय ३७, रा. बेळगाव) या दोघांना अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर कळंबा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवले होते. सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार सुर्यवंशीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर कुरणेला मंगळवारी बेंगळुरुला हलविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यासाठी तपास पथकाच्या हालचाली वेगावल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली की अटक होणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी घसरुन जखमी

$
0
0

कोल्हापूर

शहरात ठिकठिकाणी दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले आहेत. यामध्ये कदमवाडी येथील सचिन दत्तात्रय खोत, शिंगणापूर येथील तानाजी महादेव मर्दाने आणि शाहूवाडी तालुक्यातील साळशी येथील सुभाष जयवंत पाटील हे जखमी झाले . त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिझनेस एक्सलन्स पुरस्काराने उद्योगपती घोडावत यांचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन व संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांना नवभारत टाइम्सकडून 'बिझनेस एक्सलन्स' या पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. घोडावत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. उद्योग व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

घोडावत यांनी उद्योग क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे. त्यांनी एफएमसीजी, विंड टर्बाइन, रिअल इस्टेट, टेक्स्टाइल, एव्हिएशन, फ्लोरीकल्चर इत्यादी क्षेत्रात यशस्वी उद्योजकाची भूमिका बजावली आहे.

या यशाबद्दल बोलताना घोडावत म्हणाले, 'या ग्रुपने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार उत्पादनावर भर देऊन ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. यशाला कोणताच शॉर्टकट नाही. जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर यश दूर नाही. उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक व देश प्रगती नक्कीच साधता येईल. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे' असे सांगत त्यांनी या यशाचे श्रेय ग्रुपमधील प्रत्येक घटकाला दिले.

घोडावत यांना आजवर शिक्षण, उद्योग, कोर्पोरेट व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या उद्योग व शिक्षण क्षेत्राच्या यशस्वी वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणीत युवक जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मानलेली बहीण व मित्रांमध्ये बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंडचे नाते असल्याच्या संशयावरुन दहा ते बाराजणांनी एका तरुणाला मारहाण करण्याची घटना रविवारी रात्री शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिराजवळ घडली. यामध्ये तारकेश संतोष पाटील (वय २३, आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ) हा जखमी झाला .

मारहाणप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अमोल चव्हाण, अखिल पाटील, सुजित वाईंगडे, रणवीर यादव व अन्य सात ते आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तारकेश पाटील व आरोपी अमोल चव्हाण यांनी एका मुलीला बहिण मानले होते. दरम्यान, तारकेश पाटील व संबंधित मुलगी हे बॉयफ्रेंड व गर्लफ्रेंड असल्याचा संशय आरोपी अमोल चव्हाणला आला. त्याने अन्य दहा ते बाराजणांच्या मदतीने रविवारी रात्री याबाबत तारकेशला शिवाजी मंदिर परिसरात विचारणा केली. वाद वाढत जाऊन संबंधितांनी तारकेशला शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारामारीत डोक्यात लोखंडी रॉडचा मार बसल्याने तारकेश जखमी झाला . या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाटमारी करणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शहापूर परिसरात वाटमारी करणार्‍या दोघांना पकडण्यात शहापूर पोलिसांना यश आले आहे. संतोष संभाजी कोळी (वय २५) व संदीप भाऊसाहेब पाटील (३५ दोघे रा. जांभळी ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३५ हजार रुपयांची सोन्याची चेन व गुन्ह्यातील मोटारसायकल असा ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ७ डिसेंबर रोजी वाटमारीची घटना घडली होती.

गणेशनगर परिसरातील राहुल दुंडाप्पा वाघोजी (वय २८) यांचा पानपट्टीचा व्यवसाय आहे. ७ डिसेंबर रोजी दुपारी ते शहापूरकडे निघाले असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा अनोळखी व्यक्तींनी वाघोजी यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबविले. पत्ता सांगत असताना मोटारसायकलवर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाघोजी यांनी मोटारसायकल तेथेच टाकून पळण्यास सुरुवात केली. परंतु त्या अनोळखी व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून वाघोजी यांच्या गळ्यातील चेन घेऊन मोटारसायकलवरुन पलायन केले. याप्रकरणी वाघोची यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली होती. तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणात जांभळी येथील व्यक्तींची माहिती मिळाल्यानंतर पथकाने दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची चोरीची कबुली दिली असून चोरीतील मुद्देमालही हस्तगत केला. ही कारवाई पोलिस निरिक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली. दोघांना न्यायालयासमार हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस पाटलाच्या अटकेसाठी कवठेसारमध्ये ग्रामस्थ रस्त्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या निलंबित पोलिस पाटील नंदकुमार पाटील यास तत्काळ अटक करा या मागणीसाठी कवठेसार (ता. शिरोळ) येथे ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. संशयितास अटक करण्याची ग्वाही पोलिस उपनिरीक्षक किरण दिडवाघ यांनी दिल्यानंतर आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले.

पोलिस पाटील नंदकुमार पाटील याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल आहे. त्याचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे त्याच्या अटकेच्या कारवाईसाठी ग्रामस्थांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आंदोलक ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आले. शीतल आवळे, अमोल आवळे यांनी निलंबित पोलिस पाटलांच्या कारनाम्याचा पाढा वाचला. पोलिसांना संशयित सापडत नाही, याचे गौडबंगाल काय असा सवाल केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक किरण दिडवाघ यांनी तपासाबाबत माहिती दिली. येत्या दोन दिवसांत तपास अधिकारी पोलिस उपअधिक्षक सूरज गुरव यांच्याशी चर्चा घडवून आणण्याबरोबरच लवकर संशयितास अटक करण्याची ग्वाही दिली. या आश्वासनानंतर आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. हवालदार संजय नाईक, सागर सूर्यवंशी, पोलीस पाटील प्रशांत नेजकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माथाडी कामगारांच्या मजूरी वाढप्रश्नी बुधवारी बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

येथील माथाडी कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे सूत आवक व कापडाची जावक मंदावल्यामुळे कापड बाजारात आर्थिक टंचाई जाणवत आहे. या संपात मध्यस्थी करावी यासाठी काही कारखानदारांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेतली.

दरम्यान, प्रांताधिकारी शिंगटे यांनी या प्रश्नी बुधवारी (ता. १९ )बैठक आयोजित केली आहे. वस्त्रोद्योगात काम करणाऱ्या माथाडी कामगारांना सहायक कामगार आयुक्तांनी केलेली मजुरीवाढ मान्य नाही म्हणून वाहतूकदार संघटना कृती समितीने यामध्ये हस्ततक्षे करावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयातील निकालाप्रमाणे कामगारांना मजूरीवाढ द्यावी. तोपर्यंत जुन्या दरानेच मजुरीवाढ घ्यावी, अशी भमिका समितीची आहे. दरम्यान, सूताची टंचाई व कापडाची जावक थंडावल्याने कारखानदार हवालदिल झाले आहेत. आता बुधवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांच्या नजरा आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images