Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मराठा दाखल्यांसाठी स्वतंत्र खिडकीची मागणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल कार्यालयात मराठा जातीचे दाखले मिळविण्यासाठी एकच झुबंड उडाली आहे. तहसिल कार्यालयामध्ये मराठा समाजातील तरुणांनी दाखले मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. लवकर दाखले मिळविण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे दाखल्यांसाठी स्वतंत्र खिडकीची मागणी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाने केली आहे.

तहसील कार्यालयात पाटगाव, वेंगरुळ, मिणचे भागातील अनेक मराठा नागरीकांनी अर्ज केले आहेत. तसेच तहसिलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही या वाढत्या गर्दीमुळे दाखले देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याबरोबर राज्य शासनाने अनेक ठिकाणी शासकीय पदे भरण्यासाठी तयारी केली असल्यामुळे समाजातील बेरोजगार तरुण दाखले लवकर मिळविण्यासाठी धडपडत आहेत. या सर्व गोष्टीची नोंद घेऊन सकल मराठा समाजाने भुदरगडचे तहसिलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे मराठा जातीच्या दाखल्यासाठी स्वतंत्र खिडकिची, स्वतंत्र व्यवस्थेची मागणी केली. निवेदन देताना समन्वयक समितीचे नंदकुमार शिंदे, मच्छिंद्र मुगडे, शैलेश गुंड, अलकेश कांदळकर, शशीकांत पाटील, संदीप देसाई, तुकाराम देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोटारीच्या धडकेत तलाठी गंभीर जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

पाल घाटात मोटारसायकल व डस्टर मोटार यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायलकलस्वार तलाठी गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी गाडीचालक डॉ. गिरीष खोत (रा. पाल) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पाल येथून मोटारसायकलस्वार (एमएच ०९ बीएच ४६३५) गारगोटीकडे येत होते. तर डस्टर मोटार (एमएच ०९ डीएम ८९६२) मोटार गारगोटीकडून विद्यावर्धिनी इन्स्टीट्यूटकडे जात होती. दरम्यान एका वळणावर मोटारचालक अचानकपणे उजवीकडे वळल्याने मोटारसायलस्वार व मोटारीची धडक होऊन झालेल्या अपघातात तलाठी अमोल गुरव (वय ३१ रा. मडिलगे बुद्रुक, ता. भुदरगड) गंभीर जखमी झाले. यामध्ये गुरव यांच्या पायास गंभीर दुखापत झाली. यावेळी चालकाने मोटार सोडून पलायन केले. किशोर गुरव यांनी पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी डॉ. गिरीष खोत (रा. पाल) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक भिकाजी देसाई तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अदिल फरास यांची निवड

$
0
0

कोल्हापूर : राष्ट्रवादी पक्षाने शहरी भागातील प्रश्न सोडवण्यासाठी व पक्षबांधणीसाठी राज्य पातळीवर समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये कोल्हापूरातून अदिल फरास तर सांगलीचे सुरेश पाटील यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाने खासदार वंदना चव्हाण व उपाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सतरा सदस्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये राज्यातील प्रत्येक शहरातील एका नेत्याला संधी देण्यात आली आहे. यामध्ये माजी नगरसेवक फरास यांचा समावेश आहे.

फोटो वापरणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त ६८ तलाठीजागांसाठी भरती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील तलाठ्यांच्या रिक्त ६० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय बिंदूनामावली (रोष्टर) निश्चित करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मराठा समाजासाठीच्या 'एसइबीसी' प्रवर्गासाठी किती जागा आरक्षित आहेत, हे समोर येणार आहे.

मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत १६ टक्के आरक्षण जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच नोकर भरतीची प्रक्रिया होत आहे. त्यासाठी विभागनिहाय रिक्त जागांचे जिल्हा पातळीवर रोष्टर तयार केले जात आहे. जिल्हा महसूल प्रशासन गेले आठ दिवस याबाबत माहिती तयार करीत आहे. हे काम अंतिम टप्यात आहे. दोन तालुक्यांतून माहिती उपलब्ध झाल्यानंतर संवर्गनिहाय रिक्त जागा किती असतील, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिनी सिनेटोनप्रश्नी राज्यमंत्र्यांच्या आदेशाला स्थगिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालिनी सिनेटोनची जागा विकसीत करण्याच्या प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली. सिनेटोनची जागा विकसकाला परत देण्याचे आदेश राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिले होते. त्याला स्थगिती देणारे पत्र नगरविकास विभागाच्या अवर

सचिवांनी महापालिका प्रशासनाला पाठवले. ते सोमवारी मिळाले. जागेचा वस्तूनिष्ठ अहवाल त्वरित पाठवण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यामुळे सिनेटोनचे अस्तित्व कायम राखण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या लढ्याला यश आल्याचे मानले जात आहे.

कोल्हापूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यातील शालिनी सिनेस्टोनच्या रि. स. क्र. ११०४ मधील भूखंड पाच आणि सहा क्रमांकाच्या जागेच्या विकासासाठी महापालिकेच्या महासभेने नामंजुरी दिली होती. त्यानंतर या जागेचे विकसक चांगदेव घुमरे यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे जून २०१७ मध्ये अपील केले होते. दरम्यानच्या काळात सुनावणी होऊन राज्यमंत्र्यांनी निकाल राखून ठेवला होता.

विकसकाने बांधकामासाठी परवाना मागितलेला भूखंड वारसास्थळात समाविष्ट करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रस्ताव सादर केला होता. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवलेल्या या प्रस्तावाबाबत महापालिका प्रशासनाने पाठपुरावा केला नाही. याबाबत महापालिकेच्या सभेत प्रशासनाला नगरसेवकांनी धारेवर धरले होते. शालिनी सिनेटोनप्रश्नी प्रशासन योग्य पाठपुरावा करत नसल्याचा परिणाम सुनावणीवर झाला.

राज्यमंत्री पाटील यांनी विकसकाचे अपिल निकालात काढताना राखीव भूखंड विकसित करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेला त्वरित परवानगी देण्याचे आदेशही ५ नोव्हेंबरला दिले होते. राज्यमंत्र्याच्या आदेशामुळे सिनेटोनच्या जागेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. राज्यमंत्र्यांविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे आंदोलन सुरु असताना महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी मंगळवारी (ता. ४) मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या दिवशी नगरविकास विभागाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्याबाबतचा स्थगिती आदेश सोमवारी नगरविकास विभागाचे अवर सचिवांनी महापालिकेला दिला. स्थगिती देण्याबरोबरच संपूर्ण भूखंडाचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीला त्रास देणाऱ्या डॉक्टरला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंधरा लाख रुपयांसाठी डॉक्टर पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या डॉ. शेखर रामचंद्र भिसे (वय २६, मधुबन सोसायटी, राजारामपुरी) याला एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. या प्रकरणी पिडीत विवाहितेने अकोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. तिच्या फिर्यादीनुसार पती शेखर व सासरे रामचंद्र भिसे यांना अकोला पोलिसांनी पुणे येथील सारसबागेतून ताब्यात घेतले होते. त्यांना कोर्टात हजर केले असता, पतीला पोलिस कोठडी तर सासऱ्यांना जामीन मिळाला.

एमडी असलेल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी डॉ. शेखर याने पत्नीचा मानसिक व शारीरिक छळ सुरु केला. तसेच सासरकडील मंडळींनी १५ लाख रुपयांच्या हुंड्यासाठी छळ केल्याचे पिडीत डॉक्टर पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. पिडीता ही अकोला येथील रहिवासी असून तिने बी.एच.एम.एस. ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली आहे. त्यांचा आणि डॉ. शेखरचा विवाह जीवनसाथी कॉम या संकेतस्थळावरुन जुळून आला.

२३ जानेवारी २०१७ रोजी त्यांचा कोल्हापुरात विवाह झाला. सासरकडील अटीनुसार लग्नाचा संपूर्ण खर्च पिडीतेच्या आईने केला. डॉक्टर पती, पत्नीना एक वर्षाचा मुलगा आहे. लग्नानंतर सुरुवातीच्या काही दिवसानंतर सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी छळ सुरू केला. मेडिकल कॉलेजची महागडी फी पिडीतेच्या आईने भरावी, त्यासाठी शेतसुध्दा विकावे असा तगादा सासरकडील मंडळींनी लावला. त्या त्रासाला कंटाळून तिने पोलिसात फिर्याद दिली. सासरे रामचंद्र, शिक्षिका असलेल्या सासू अलका, नणंद पल्लवी आवळे, गौरी फासगे, सायली मोरे, मावस सासू दमयंती यांनी सामूहिकपणे मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४० जागांबाबत एकमत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'आगामी लोकसभा निवडणूका काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांनी एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ४८ जागांपैकी ४० जागांबाबत एकमत झाले आहे. उर्वरित आठ जागांसाठी बुधवारी, १९ डिसेंबरला मुंबईत आघाडीची बैठक होणार आहे,' असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सोमवारी स्पष्ट केले.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात खासदार राजू शेट्टी यांना पाठींबा दिला आहात काय? या प्रश्नांवर त्यांनी हा निर्णय एकट्या राष्ट्रवादीचा नाही काँग्रेससोबत विचारविनीमय करूनच यावर शिक्कामोर्तब होईल, असे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर यांनीही आघाडीत सहभागी व्हावे, यासाठी चर्चा सुरु असून, त्यांना एमआयएमने बाहेरुन पाठींबा दिला आहे, अशी चर्चा आहे. मतविभाजन टाळण्यासाठी सर्वच समाविचारी पक्षांची आघाडी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पवार म्हणाले, 'स्थानिक गटबाजीचा राष्ट्रवादीला फटका बसत असला तर त्याचा विचार करू. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वच राजकीय पक्षांत गटबाजी आहे. राज्यातील ऊस व दूध उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांचे प्रश्‍न गंभीर झाले आहेत. साखरेचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपये आहे. तो आणखी वाढवावा, अशी मागणी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. साखरेची मागणी व पुरवठा लक्षात घेऊन कारखान्यांचा साखर विक्रीचा कोटा निश्‍चित केला पाहिजे. सरकार बघ्याच्या भूमिकेत आहे. जबाबदार मंत्री काहीच उत्तरे देत नाहीत. केवळ जनतेला फसवण्याचा उद्योग सरकारकडून होत आहे.'

इचलकरंजीत मदन कारंडे-अशोक जांभळे यांच्या गटबाजीमुळे राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होत असल्याच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात आघाड्या होत असतात, कोल्हापूर जिल्हा परिषदेत आमची सत्ता असताना खासदार शेट्टी यांच्याशी आघाडी केली होती. त्यामुळे स्थानिक गटबाजीचा फटका बसत असला तरी त्याचा आम्ही विचार करु, असे ते म्हणाले.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रिग कामगार जखमी

$
0
0

कोल्हापूर

पाचगाव येथील रेणुका मंदिराजवळील आप्पाज पार्क येथे इमारतीचे बांधकाम सुरू असताना पाय घसरुन पडल्याने सेंट्रिग कामगार जखमी झाला. महादेव दिलीप सुतार (वय ३५, माळवाडी पाचगाव) असे जखमीचे नाव आहे. सोमवारी सकाळी झालेल्या घटनेत त्यांच्या डोक्याला व हातापायाला इजा पोहचली आहे. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सामोपचारातच पक्षकारांचे हित’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , गगनबावडा

'लोकांनी आपापसातील तंटे समझोता करून मिटवल्यास पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचून सामाजिक स्थैर्य लाभण्यास मदत होईल' असे प्रतिपादन कळे-खेरिवडे न्यायालयाच्या न्यायाधीश एस. एस. व्ही. जंगमस्वामी यांनी केले. पनोरे (ता. पन्हाळा ) येथे लहू बाळा परितकर महाविद्यालय व तालुका विधी सेवा समितीच्यातर्फे आयोजित 'कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन' या विषयावर आयोजित शिबिरात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मारुती परितकर होते.

कार्यक्रमात कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी वर्धन यांनी 'एड्स' या विषयावर, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी 'रँगिंग व सायबर क्राईम' या विषयावर, पी. एच. पाटील यांनी 'लैंगिक हिंसाचार', अॅड. पी .एच. पाटील यांनी 'विकलांगांसाठी असणारे कायदे' या विषयावर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक बी. व्ही. पांडव, कृष्णात सोनार, पोलिस पाटील धनाजी गुरव ,विश्वास पाटील, ज्ञानदेव पाटील, दिनकर चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन पाटील, पी. जी. चौगुले, ए. ए. पाटील, ए. डी.आंबटकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ शिरगावमध्ये एकाला मारहाण

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गोकुळ शिरगाव येथे गैरसमजुतीतून रविवारी रात्री मारहाणीची घटना घडली. यामध्ये विनोदकुमाार सीताराम यादव (वय ३०) जखमी झाले आहेत. यादव यांचे मूळ गाव बिहार राज्यातील सिमरा हे आहे. सध्या ते कणेरीवाडी ते भाड्याच्या घरात राहतात.

दरम्यान मारहाणीप्रकरणी कणेरीवाडी येथील किरण धनाजी बुगडे व धनाजी बुगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी किरण बुगडे हा इंडोकॉन कंपनीला कामाला होता. त्याने १५ दिवसांपूर्वी कंपनीतील काम सोडले आहे. रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास इंडोकॉन कंपनीच्या मागील गेटजवळ किरण व धनाजी बुगडेने शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच काठीने डोक्यावर प्रहार केला. यामध्ये फिर्यादी यादव गंभीर जखमी झाला. मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी पुन्हा फोन करुन धमकावल्याची तक्रार फिर्यादीने दिली आहे. या प्रकरणी कुणाला अटक झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकजण जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील भामटे गावात घरासमोरील उंबराचे झाड तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाला मारहाण झाली. यामध्ये अर्जुन ग्णपती देसाई (वय ६१) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात हिंदुराव गणपती देसाई (वय ५५) व सागर हिंदुराव देसाई (वय ३५ ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी अर्जुन देसाई यांच्या घरासमोरील उंबरा झाड हिंदुराव देसाई याने तोडले. त्याचा जाब विचारला असता वादावादी झाली. यावेळी अर्जुन यांना कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता भाजून जखमी

$
0
0

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील म्हाळुंगे येथे स्टोव्हचा भडका उडून नवविवाहिता ऐश्वर्या उमेश सातपुते (वय २१) भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सातपुते या स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका उडला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जवानांच्या कुटुंबीयांचे धाडस देशाचे भाग्य’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'ज्या वेळी देशावर परकीय आक्रमणाची परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी महाराष्ट्रातील जवानांनी केलेली कामगिरी अतुलनीय आहे. १९७१ व कारगील युद्धात महाराष्ट्रातील जवानांनी केलेल्या शौर्याला तोड नाही. युद्धात शहीद झालेल्या जवानांचे कुटुंबीय दुःख न करता त्याचा गर्व बाळगतात तसेच सेवेत असलेल्या जवानांबद्दलही कुटुंबीय अभिमान बाळगतात. जवानांच्या कुटुंबातील लोकांच्या मनाचा मोठेपणा म्हणजे मोठे धाडस आहे. शहिदांच्या कुटुंबीयांचे धाडस देशाचे भाग्य आहे' असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केले. करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील आजी-माजी सैनिक बहुउद्देशीय कल्याण मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, 'आपले सैनिक डोळ्यात तेल घालून, अहोरात्र पहारा देत देशाचे शत्रू, अतिरेक्यांपासून संरक्षण करत आहेत. ध्वजदिनाचे कोल्हापूर जिल्ह्याने १०५ टक्के उदिष्ट पूर्ण केले आहे. आजी-माजी सैनिकांच्या शासकिय सोयीसवलतीतील अडचणी दूर करून त्यांना लाभ देण्यास आपण बांधील आहे.'

कुंभी कासारी परिसर आजी-माजी सैनिक बहुउद्देशिय कल्याण मंडळाचे अध्यक्ष शिवाजी देसाई म्हणाले, 'कोपार्डे गावाने या मंडळासाठी दोन गुंठे जागा देत सैनिकांना सहकार्य केले आहे. आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबातील व्यक्तींना शैक्षणिक, सामाजिक व शासकीय आधार मिळावा हा उद्देश आहे.'

कोपार्डेच्या सरपंच रुपाली पाटील, उपसरपंच व्ही. जी. पाटील, पोलिस पाटील जालंदर जामदार, मंडल अधिकारी अविनाश वायचळ, अर्जुन मुगडे, विलास बचाटे, बबन खापणे, मधुकर खांबे, बाळासाहेब शिंदे, भगवान अडिसरे, विलास नाईक, परशुराम खाडे, लालासाहेब पाटील, निवृत्ती जाधव, अनिल पाटील, सुनील वडाम, सुलोचना मगदूम, सुनीता पाटील, हिंदुराव पाटील आदी उपस्थित होते. मनोहर पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पायात चप्पल, शर्ट इन केलेला नाही असा गबाळा पोशाख. नेहमी अशी ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी सोमवारी ड्रेसकोड सक्तीमुळे टकाटक दिसून आले. लव्हेंडर कलरचा शर्ट, ग्रे कलरची पँट, कमरेला पट्टा, पायात पॉलिश केलेले बूट अशा पॉश वेशातील पुरुष कर्मचारी तर लाल पदराची ऑफव्हाइट साडी परिधान केलेल्या महिला कर्मचारी, शिपायांचा ग्रे रंगांचा ड्रेस असा ड्रेसकोड कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. हा पोशाख पाहून ग्राहकांना सुखद धक्का बसला.

सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना मदत करणारी हक्काची बँक म्हणून जिल्हा बँकेकडे पाहिले जाते. राष्ट्रीय बँकांत आधुनिकतेचे वारे वाहू लागले असून जिल्हा बँकेत आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर सुरू झाला आहे. वर्षापूर्वी जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत एका सभासदाने राष्ट्रीयिकृत बँकांशी स्पर्धा करताना जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड लागू करावा, अशी मागणी केली होती. यावेळी अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी ड्रेसकोड लागू करण्याचे आश्वासन दिले. पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती.

नोव्हेंबर महिन्यात दिवाळीआधी तब्बल ११ वर्षानंतर कर्मचाऱ्यांना १२ टक्के बोनस जाहीर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडची आठवण करुन दिली. त्यानंतर व्यवस्थापनाने ड्रेसकोड निश्चित केला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने ड्रेस शिऊन घेतले तर शिपायांना बँकेकडून कापड देण्यात आले. ड्रेस तयार झाल्यानंतर सोमवारपासून त्याची अंमलबजावणी केली. बँकेच्या १९१ शाखांतील १४४१ कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोडचे पालन केले. शाहूपुरीतील जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत तीनशेहून अधिक कर्मचारी ड्रेसकोडमध्ये होते. बँकेच्या एमडी, बँक मॅनेजरांनाही ड्रेस कोड लागू केला असून त्यांना टाय घालण्याची अट घातली आहे.

ड्रेसकोडसाठी कर्मचाऱ्यांनी स्वत: आचारसंहिता तयार केली आहे. ड्रेसकोड न पाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना शंभर रुपये दंड केला आहे. तीनवेळा दंड भरल्यानंतर चौथ्यावेळी कर्मचाऱ्यांना हजर करुन घेताना बिनपिगारी रजा मांडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने आयकार्ड गळ्यात घालणे सक्तीचे केले आहे. ड्रेसकोडच्या निर्णयाबाबत काही कर्मचाऱ्यांकडून थोडा विरोध होत असला तरी ग्राहकाकंडून स्वागत होत आहे. ग्राहकांना कर्मचारी व व्यवस्थापक ओळखणे सोपे झाले आहे.

ड्रेसकोडमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांत एकीची भावना होण्यास मदत होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांत आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल.

- ए. बी. माने, मुख्य कार्यकारी अधिकारी, केडीसीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवोदय विद्यालयात रँगिंगचा प्रकार उघड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,कागल

कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात रँगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. पालकांनी विद्यालयात येऊन शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले आणि इथल्या ढिसाळ नियोजनावर त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना येथीलच अकरावीच्या विद्यार्थ्यांनी जबर मारहाण केली. काठी, रॉड, विटा, चप्पल, झाडूने अंगावर वळ उठेपयर्यंत त्यांना मारहाण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त पालकांनी आपली मुले घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, विद्यालय प्रशासनाने मारहाणीत संशयित असणार्‍या अकरावीच्या सात विद्यार्थ्यांना आणि मारहाण झालेल्या दहा विद्यार्थ्यांना घरी जाण्यास परवानगी दिली आहे.

अकरावीतील सात विद्यार्थी सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना चार ते पाच दिवसांपासून किरकोळ कारणावरून त्यांच्या खोलीत जाऊन रात्री १० ते मध्यरात्री २ या वेळेत बेदम मारहाण करीत होते. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या दोन्ही गटांत धुसफूस सुरू होती. ही बाब विद्यार्थ्यांनी फोनवरून पालकांना सांगितली. पालकांनी रविवारी विद्यालयात येऊन संबंधित शिक्षक व विद्यार्थ्यांना चांगलेच धारेवर धरले. प्राचार्य श्रीनिवास राव व इतर शिक्षकांनी पालकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तथापि पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. संतप्त पालक प्राचार्यांच्याही अंगावर धावून गेले. आज सर्व पालकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना भेटून निवेदन दिले.

दरम्यान ,पालकांसमोरही अकरावीतील मारहाण करणारे संशयित विद्यार्थी अरेरावीच्या सुरातच बोलत होते. 'आम्हाला दाखले दिले तरी चालतील. मात्र तुमचे पालक गेल्यानंतर तुम्हाला बदडणारच' अशी अरेरावीची भाषा विद्यार्थ्यांनी वापरल्याचे पालकांनी सांगितले. सोमवारी दिवसभर पालकांची ये-जा सुरू होती. विद्यालयात रात्री दहा नंतर सुरक्षारक्षक नेमावेत, इमारतीच्या भोवती कडक पहारा ठेवावा, प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक चोवीस तास ठेवावा, प्रशासनाचा वचक असावा अशा मागण्या पालकांनी केल्या. रँगिंगचा प्रकार गेल्या किती दिवसांपासून सुरू आहे याबाबतची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, या सर्व प्रकाराबाबत प्राचार्य के. श्रीनिवास राव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'घडलेला मारहाणीचा प्रकार खरा आहे. परंतु रॅगिंग झालेले नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. जे विद्यार्थी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.'

अशी होतेय रॅगिंग

विद्यालयात गेल्या आठवड्यापासून मारहाणीचा प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु दोन महिन्यांपासून अकरावीचे विद्यार्थी नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पाणी आणून द्या, पेन आणा, माझा अभ्यास पूर्ण कर अशा पद्धतीने त्रास देत असल्याचे मुलांनी 'मटा'शी बोलताना सांगतले. विद्यालयाने 'चपाती संपली, ब्रेड खा' असे सांगितल्यावर अकरावीच्या मुलांनी ब्रेड खाण्यास सर्व विद्यार्थ्यांना मनाई केली. परंतु भुकेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे न ऐकता ब्रेड खाल्ला. शिवाय बाथरुममध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे नाव लिहिले. यातूनच खुन्नस वाढून मारहाणीचा प्रकार घडला असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मध्यरात्री मारहाण

विद्यालयात एकून ४६२ विद्यार्थी आहेत. ४४ शिक्षक व कर्मचारी आहेत. मुलामुलींसाठी मिळून १२ हाऊस आहेत. रात्री दहा वाजता हाऊस बंद होतात आणि रेक्टर आपल्या रुममध्ये जातात. याचाच फायदा घेऊन अकरावीच्या मुलांनी रात्री दहानंतर इतर वर्गातील मुलांना मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सव्वा लाखाच्या मद्यसाठासह चार चाकी वाहन जप्त

$
0
0

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी गगनबावड्याजवळ सव्वा लाख रुपये किंमतीच्या अवैध मद्यसाठा व मद्याची वाहतूक करणारे चारचाकी वाहन मिळून ५,२०,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मद्याची वाहतूक करण्यासाठी किंमती चारचाकी वाहनाचा वापर केला होता. याप्रकरणी अक्षय अरविंद खटावकर (वय २४ वर्षे, रा.राजापूर,जि.रत्नागिरी) याला अटक करण्यात आली.

नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारुची बेकायदा वाहतूक होण्याची शक्यता असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने गगनबावडा ते कोल्हापूर मार्गावर तपासणी मोहिम सुरू केली आहे. भरारी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गगनबावडा हद्दीतील एका रिसॉर्टच्या समोर मद्याची वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकला.यामध्ये १,२०,००० किंमतीचे मद्य जप्त करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.एस.साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, जवान सुहास वरुटे, जयसिंग खुटावळे, सुखदेव सिद, दिलीप दांगट, मोहन पाटील, वाहनचालक दिपक कापसे यांनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोगावती कारखान्यावर स्वामी समर्थ पालखीचे पूजन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे भोगावती साखर कारखाना कार्यस्थळावर आगमन झाले. यावेळी मूर्ती व पालखीचे पूजन कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आरती करण्यात आली. जेष्ठ संचालक कृष्णराव किरूळकर, हिंदुराव चौगले, कार्यकारी संचालक के. एस. चौगले, बाजीराव पाटील, राजेंद्र मगदूम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सर्जराव पाटील उपस्थित होते. महाप्रसादाचा दोन हजारावर भाविकांनी लाभ घेतला.

फोटो -

शाहूनगर परिते येथे स्वामी समर्थ पालखी पूजनप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील, कार्यकारी संचालक के. एस. चौगले आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा सेनेच्या माध्यमातून भगिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

'नव निरोगी महाराष्ट्र घडवण्यासाठी युवा सेनेची पाऊले पडत आहेत. त्यामुळे युवकांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आजच्या युगात स्वरक्षण महत्वाचे आहे. शाळा व महाविद्यालयातील युवतींना स्वरक्षणाचे धडे घ्यावेत. तरुणांवर आज आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. युवा सेनेच्या माध्यमातुन राज्यातील भगिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण राबवणार आहे' असे प्रतिपादन शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. शिनोळी (ता. चंदगड) येथे शिवसंवाद दौऱ्यानिमित्य आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी स्वागत केले. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या चंदगड तालुक्यात युवकांमध्ये शिवसेनेविषयी प्रचंड उत्साह असून यावेळी विधानसभेला शिवसेनेचा आमदार विजयी होईल असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी शिनोळी येथे चंदगड तालुका शिवसेनेच्या जनसपंर्क कार्यालयाचे व महाआरोग्य शिबिराचे उद्घघाटन अदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, प्रा. संजय मंडलिक, सहसंपर्क प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, सरपंच नम्रता पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश शिरोळकर, रंजना शित्रे, श्वेता नाईक, शांता जाधव, संज्योती मळवीकर, अनिल दळवी, अशोक मनवाडकर, अजित खांडेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. अकलाख मुजावर यांनी सूत्रसचांलन केले. प्रताप उर्फ पिनू पाटील यांनी आभार मानले.

फोटो

शिनोळी (ता. चंदगड) येथे महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे. शेजारी प्रा. संजय मंडलिक, संग्राम कुपेकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, प्रभाकर खांडेकर आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हीव्हीपॅटचे गावनिहाय प्रात्यक्षिक

$
0
0

कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २० डिसेंबरपासून पुढील महिनाभर जिल्ह्यात ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांचे गावनिहाय प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत ते बोलत होते. सुभेदार म्हणाले, 'मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवडणूक यंत्राची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. यासाठी विशेष मोहिम राबवण्यात येत आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील गावनिहाय कार्यक्रम निश्चित केला जाईल. मोहिमेत निवडणूक प्रशासनाने लोकांच्या शंकांचे निरसन करावे.' निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी प्रात्यक्षिक मोहिमेची माहिती दिली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, अरविंद लाटकर, अविनाश हदगल, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार उपस्थित होते. निवडणूक तहसिलदार शैलजा पाटील यांनी आभार मानले.

---------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसच्या धडकेत दोघे गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा कोल्हापूर रस्त्यावर ब्रेक फेल झालेल्या एसटी बसच्या धडकेत कारमधील दोघे गंभीर जखमी झाले. राजेंद्र विष्णू पाटील (वय ४८, रा. कोडोली, ता. पन्हाळा), सर्जेराव भाऊ कांबळे (४८, रा. वारणा ता. पन्हाळा) अशी जखमींची नावे आहेत. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला.

पन्हाळ्याहून कोल्हापूकडे निघालेल्या एसटी बसचा ब्रेक नलवडे बंगल्याजवळ फेल झाला. बसची धडक कोल्हापूरहून वाघबिळकडे निघालेल्या कारला बसली. त्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेवर असलेल्या उंचवट्यावर नेल्याने बस थांबली. कारमधील दोघे आणि बसमधील चौघा जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले. गंभीर जखमी पाटील व कांबळे यांना त्यांच्या नातेवाईकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तर बसमधील प्रवाशांना किरकोळ जखमी झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. चालक समीर गफूर नदाफ (वय ४५, रा. कोडोली), वाहक विकास शामराव पाटील (४४ रा. आंबवडे) यांनी सीपीआर पोलिस चौकीत अपघाताची माहिती दिली. करवीर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images