Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नांदणी मठाचे उत्तराधिकारी सम्मेद यांना क्षुल्लक दिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी सम्मेद यांचा क्षुल्लक दिक्षा विधी शेडबाळ (ता. अथणी) येथे संपन्न झाला. शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य श्री १०८ देवसेन महाराज यांच्याहस्ते दिक्षा विधी संस्कार करण्यात आले. यावेळी बालब्रम्हचारी सम्मेद यांनी आपल्या पांढर्‍या वस्त्राचा त्याग करुन भगवे वस्त्र परिधान केले. संस्कार विधीनंतर त्यांचे प.पू. क्षुल्लक १०५ जयसेन महाराज असे नामकरण करण्यात आले.

आचार्य देवसेन महाराज म्हणाले, 'समाजातील सम्मेद हा हिरा शोधून तुमच्या स्वाधीन केला आहे. नांदणी येथील जिनसेन मठ हे जैन धर्मातील आद्य धर्मपीठ आहे. जैन धर्मातील परंपरेचे रक्षण करा व भट्टारकांना सहकार्य करा,' असे त्यांनी आवाहन केले. उपस्थित सर्वच श्रावक श्राविकांनी हात उंचावून सहकार्याचे अभिवचन दिले.

सकाळी ९ वाजता बालब्रम्हचारी सम्मेद यांचे केशलोचन झाले. श्रावक अवस्थेत असताना स्वत:च्या हातून अनावधानाने झालेल्या चुकाबद्दल त्यांनी क्षमायाचना केली व आचार्य देवसेन महाराज यांच्याकडे दिक्षा देण्याची विनंती केली. त्यानंतर दिक्षा विधीचे संस्कार करण्यात आले. त्यांना आचार्य श्री व सवालधारकांच्या हस्ते पिंच्छी, कमंडलू, जपमाळ, शास्त्र आणि वस्त्र अर्पण करुन अष्टमुल गुणांचे पालन करण्याविषयी गुरुंनी आशिर्वाद दिले. या दिक्षा विधी सोहळ्यासाठी अनेक महाराज, आर्यिका व मान्यवर तसेच दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील हजारो श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.

फोटो ओळ-

आचार्य देवसेन महाराज यांच्या उपस्थितीत प.पू. क्षुल्लक जयसेन महाराज यांना कमंडलू अर्पण करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील व मान्यवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज कीर्तन सोहळा

$
0
0

कोल्हापूर: येथील हभप हरी रामा पाटील व देवकाबाई हरी पाटील यांच्या स्मरणार्थ रविवारी (ता.१६) एक दिवसीय ग्रंथराज व श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय अठरावा तसेच अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. साने गुरूजी वसाहत, अपराध कॉलनी येथील विठाई बंगला येथे दिवसभर हा कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये ह्रषिकेश वासकर यांचे प्रवचन व गोपाळआण्णा तुकाराम वासकर यांचे कीर्तन होणार आहे. यामध्ये सकाळी आठ ते बारा ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी तीन ते साडे चार गाथा भजन, सायंकाळी पाच वाजता प्रवचन, सायंकाळी सात वाजता किर्तन व रात्री नऊ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील डेकोरेटर्सचे तुकाराम हरी पाटील यांनी केले आहे. दरम्यान, तुकाराम पाटील यांनी त्यांच्या मंगसुळी या मूळ गावी विठ्ठल रूक्मीणीचे मंदिर बांधले असून तेथे सात वर्षापासून अखंड वीणासेवा सुरू आहे. तेथेही दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेडसगावतील तलावात मृत अर्भक आढळले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे गाव तलावातील पाण्यात शनिवारी सकाळी नवजात मृत अर्भक आढळले. स्त्री जातीचे हे अर्भक असून साधारण दोन दिवसांचे असल्याचे अनुमान स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. व्ही. जठार यांनी घटनेचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी हे मृत अर्भक दुपारी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. याबाबत शाहूवाडी पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. भेडसगाव (ता. शाहूवाडी) येथे मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक अंगाई तलाव आहे. शनिवारी सकाळी साडेआकराच्या सुमारास शाळकरी विद्यार्थ्यांना तलावातील पाण्यावर अर्भक दिसले. गावकामगार पोलिस पाटील तांबे यांनी शाहूवाडी पोलिसांना याची माहिती दिली. स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाडवी यांनी घटनास्थळी पाहणी केली. अर्भकाच्या मारेकऱ्यांना लवकरच अटक करू असे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिमांचा मूक मोर्चा

$
0
0

मुस्लिमांचा मूक मोर्चा

सोलापूर :

समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पार्क चौकातून सुरूवात झाली. पार्क चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्या नंतर या मोर्चाचे रूपांतर धरणे आंदोलनात झाले.

या मोर्चात शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही मुस्लिम बांधव, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणा मान्य करूनच समाजाला दहा टक्के आरक्षण मिळावे. लोकसंख्येच्या तुलनेत ते गरजेचे आहे, असे मत एमआयएम पक्षाचे तौफिक शेख यांनी मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेडपीच्या शिक्षकाला अमेरिकास्थित नॅशनल जियोग्राफिकचा पुरस्कार

$
0
0

झेडपीच्या शिक्षकाला अमेरिकास्थित

नॅशनल जियोग्राफिकचा पुरस्कार

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकास्थित नॅशनल जिओग्राफिक सोसायटीच्या वतीने दिला जाणारा 'नॅशनल जिओग्राफिक इंनोव्हेंटिव्ह एज्युकेटर,' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची एक्सप्लोलर फेलोशिप, प्रमाणपत्र व मानचिन्ह, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जैवविविधता व पर्यावरण संरक्षण या क्षेत्रात तंत्रज्ञान वापरून मुलांमध्ये पर्यावरण संरक्षणविषयक जाणीव जागृती निर्माण केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातील २८ देशांतील ९० शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून, भारतातील ३ जणांना हा पुरस्कार मिळणार आहे.

डिसले यांनी राबवलेल्या 'अराउंड द वर्ल्ड,' या प्रोजेक्टकरिता त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यांमध्ये आकुंभे गावातील झेडपीच्या शाळेची निवड करण्यात आली होती. या अंतर्गत गावाचे पर्यावरण रिपोर्ट कार्ड तयार करून पर्यावरण दृष्टीने अधिक समृद्धता आणण्यासाठी व्यापक कृती कार्यक्रम राबवला गेला. गावातील एकूण झाडांची संख्या, गावचे एकूण क्षेत्रफळ, दुचाकी व चार चाकी वाहनांची संख्या आदी माहिती संकलित करून ३३ टक्के वन क्षेत्र निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान वापरण्यात आले. गावातील जुन्या झाडांची कत्तल होऊ नये या करीता त्या झाडांवर क्यूआर कोड टॅग लावण्यात आले. त्यामुळे झाड तोडण्याचा प्रयत्न केला असता, रेड अलर्ट मेसेज मुलांच्या मोबाइलवर जातो. गावातील मुले अशा झाडाचा शोध घेऊन त्या व्यक्तीला पाच रोपे देत असत. या कृती कार्यक्रमामुळे गावातील २६ टक्के असणारे वन क्षेत्र मागील ५ वर्षांत ३३ वर पोहचले आहे. उपक्रमाच्या माध्यमातून पाठ्यपुस्तकातील ज्ञान दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापरण्यात मुलांनी विशेष कल दाखवला. मागील वर्षी रशिया, इटली व फिनलँडमधील शाळांनी हा उपक्रम राबविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड स्वच्छता दौड

$
0
0

कराड स्वच्छता दौड

कराड :

विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवरती विजय दिवस समारोह समिती आणि येथील नगरपालिकेच्या वतीने शनिवारी सकाळी कराड स्वच्छता दौड काढण्यात आली. त्यामध्ये विजय दिवस समारोह समितीचे व पालिकेचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, शहर व परिसरातील शाळांतील सुमारे शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनींनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दत्त चौकातून कराड स्वच्छता दौडीस येथील नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी हिवरा झेंडा दाखवल्यानंतर प्रारंभ झाला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सैन्य दलात अधिकारीपदावर रुजू झालेले हर्षवर्धन मोहिते, सांस्कृतिक कार्याबद्दल मिनल ढापरे यांचा तर खेळाडू केदार साळुंखे, आदर्श विद्यार्थीनी सबाह सय्यद आणि विजय दिवस समीतीच्या वतीने आयोजित गणराया अॅवार्डचेही वितरण करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपात्र नगरसेवकप्रकरणी आज सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षांतर बंदी कायद्यामुळे अपात्र ठरलेल्या महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सोमवारी (ता. १७) सुनावणी होणार आहे. अपात्रतेला स्थगिती न मिळाल्यास दोन्ही प्रभागांत पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे.

डिसेंबर २०१७मध्ये झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये पक्षाचा व्हीप डावलून चव्हाण आणि पिरजादे यांनी भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार आशिष ढवळे यांना मतदान केले. दोन नगरसेवक विरोधी गटात गेल्याने पक्षाच्या उमेदवार मेघा पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. पक्षविरोधी मतदान केल्याने गटनेते सुनील पाटील यांनी दोघांविरोधात विभागीय आयुक्तांकडे त्यांचे नगरसेवक पद अपात्र ठरवावे अशी मागणी केली होती. मात्र तक्रार केल्यानंतर आठ महिन्यांनी विभागीय आयुक्तांनी कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच सुनावणीसाठी नोटिसाही दिल्या नाहीत. परिणामी नुकत्याच झालेल्या महापौर निवडीपूर्वी गटनेते पाटील यांनी तक्रार मागे घेतली. पण विभागीय आयुक्तांनी दोन्ही नगरसेवकांना पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवले. या निर्णयामुळे चव्हाण व पिरजादे यांना महापौर निवडीवेळी मतदान करता आले नाही. परिणामी अपात्रतेला आव्हान देणारी याचिका चव्हाण व पिरजादे यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निकालावरच दोन्ही नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरबीआय विरोधात सहकारी बँकांनी उठाव करावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नागरी व सहकारी बँकांबाबत रिझर्व्ह बँकेचा दृष्टिकोन कधीच सकारात्मक नव्हता. त्यामुळे सहकारी बँकांनी स्वत:तील न्यूनगंडाला मूठमाती देऊन आधुनिकतेची कास धरावी. रिझर्व्ह बँकेने एनपीए किती वाढला हे न पाहता बँकेचा नफा किती वाढला हे लक्षात घेतले पाहिजे. एनपीएचे धोरण बदलण्याची वेळ आली आहे. सहकारी बँकांनी एकत्र येऊन रिझर्व्ह बँकेकडून लादल्या जाणाऱ्या नियंत्रणाविरोधात उठाव करावा,' असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केले. कर्नाड्स बँकिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित 'सहकारी बँकांच्या सक्षमीकरणासाठी' या विषयावरील चर्चासत्रात अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.

'पहिल्या पंचवार्षिक योजनेत ग्रामपंचायत, शिक्षण आणि सहकारी संस्था ही प्रमुख विकासची सूत्रे होती,' असे सांगून अध्यक्ष विद्याधर अनास्कर म्हणाले, 'भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागातील जनतेला बँका, पतसंस्थांच्या माध्यमातून बँकिंगकडे वळविण्यात सहकाराने मोठे कार्य केले आहे.

सहकारी बँकांनी कामकाजातील त्रूटी दूर करुन कामात वेगाने बदल केले पाहिजेत. संचालक व कर्मचाऱ्यांनी बँकिंगचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. ठेवीदारांना बँकेच्या स्थितीची सातत्याने माहिती देऊन विश्वासात घ्यावे. छोटे कर्जदार हेच ग्राहक असून त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. संचालक मंडळाने गटतट विसरुन बँकेची बदनामी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.'

'रिझर्व्ह बँक राष्ट्रीय बँकांना सहकार्य करते तर सहकारी बँकांबाबत दुजाभाव ठेवते,' असे सांगून राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड म्हणाले, 'आरबीआयने सहकारी बँकांबाबत काढलेले निष्कर्ष गांभीर्याने घेऊन स्वत:मध्ये बदल घडवून आणले पाहिजेत. बँकांनी आधुनिकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वेगाने केला पाहिजे. सर्वसाधारण सभेत सभासद, ठेवीदारांची उपस्थिती वाढवताना त्यामध्ये बँकिंगवर गंभीर चर्चा घडवून आणली पाहिजे. आरबीआयची मदत मिळणार नाही हे लक्षात घेऊन सहकारी बँकांनी स्वत: सक्षम झाले पाहिजे.'

निवृत्त अप्पर सहायक आयुक्त दिनेश ओऊळकर म्हणाले, 'सहकारी बँकांत सरासरी ठेवींचे प्रमाणे दहा हजार असून कर्जाचे प्रमाण ८० हजार आहे. हे प्रमाण राष्ट्रीय बँकांपेक्षा जास्त आहे. सहकाराचे उत्कृष्ट काम असताना रिझर्व्ह बँकेकडून होणाऱ्या निर्बंधांविरोधात राज्य सरकारने प्रतिवाद केला पाहिजे. आजही जिल्हा बँका पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०० ते ११० टक्के पूर्ण करतात तर राष्ट्रीयकृत बँका ५१ टक्के उद्दिष्ट गाठतात. त्याचा फटका ग्रामीण भागाला बसत आहे. पीक कर्ज वाटपातून दीड ते दोन टक्के तोटा होत असताना जिल्हा बँका सामाजिक बांधिलकी जपत असल्याने नागरी व सहकारी बँकांनी आपल्या ठेवी जिल्हा बँकेत ठेवाव्यात.'

डॉ. विजय ककडे यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी सहकारी बँकांचा मोठा वाटा आहे, असे मत व्यक्त केले. किरण कर्नाड यांनी प्रास्ताविक केले. माधवी कर्नाड यांनी आभार मानले.

गोकुळची सभा तीन मिनिटांत कशी?

'गोकुळची सभा तीन मिनिटांत कशी होते? असा सवाल करत 'हे सहकाराला अपेक्षित नाही' असे परखड मत राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केले. 'सर्वसाधारण सभा या परिणामकारक झाल्या पाहिजेत. सहकारी संस्था व बँका सभासदांच्या मालकीच्या असून त्यावर राजकीय पक्षांचा शिक्का मारता कामा नये. राजकारणात सहकार हवा. पण सहकारात राजकारण असता कामा नये. संस्थांना राजकीय कुंपण असले पाहिजे. पण कुंपणानेच शेत खाता कामा नये याचीही काळजी घेतली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्याला दहा हजार कोटींचे पॅकेज

$
0
0

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाशर्वभूमीवर सातारा जिल्ह्यासाठी दहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर करून आनंदाची बातमी दिली आहे. येत्या २३ डिसेंबर रोजी येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री डिजिटल कळ दाबून एकाच वेळी सहा महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन करणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी या वेळी उपस्थिती राहणार आहेत, अशी माहिती पावसकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदणी मठाचे उत्तराधिकारी सम्मेद यांना क्षुल्लक दिक्षा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य यांचे उत्तराधिकारी बालब्रम्हचारी सम्मेद यांचा क्षुल्लक दिक्षा विधी शेडबाळ (ता. अथणी) येथे संपन्न झाला. शांतमूर्ती वात्सल्य रत्नाकर आचार्य श्री १०८ देवसेन महाराज यांच्याहस्ते दिक्षा विधी संस्कार करण्यात आले. यावेळी बालब्रम्हचारी सम्मेद यांनी आपल्या पांढर्‍या वस्त्राचा त्याग करुन भगवे वस्त्र परिधान केले. संस्कार विधीनंतर त्यांचे प.पू. क्षुल्लक १०५ जयसेन महाराज असे नामकरण करण्यात आले.

आचार्य देवसेन महाराज म्हणाले, 'समाजातील सम्मेद हा हिरा शोधून तुमच्या स्वाधीन केला आहे. नांदणी येथील जिनसेन मठ हे जैन धर्मातील आद्य धर्मपीठ आहे. जैन धर्मातील परंपरेचे रक्षण करा व भट्टारकांना सहकार्य करा,' असे त्यांनी आवाहन केले. उपस्थित सर्वच श्रावक श्राविकांनी हात उंचावून सहकार्याचे अभिवचन दिले.

सकाळी ९ वाजता बालब्रम्हचारी सम्मेद यांचे केशलोचन झाले. श्रावक अवस्थेत असताना स्वत:च्या हातून अनावधानाने झालेल्या चुकाबद्दल त्यांनी क्षमायाचना केली व आचार्य देवसेन महाराज यांच्याकडे दिक्षा देण्याची विनंती केली. त्यानंतर दिक्षा विधीचे संस्कार करण्यात आले. त्यांना आचार्य श्री व सवालधारकांच्या हस्ते पिंच्छी, कमंडलू, जपमाळ, शास्त्र आणि वस्त्र अर्पण करुन अष्टमुल गुणांचे पालन करण्याविषयी गुरुंनी आशिर्वाद दिले. या दिक्षा विधी सोहळ्यासाठी अनेक महाराज, आर्यिका व मान्यवर तसेच दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील हजारो श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.

फोटो -

आचार्य देवसेन महाराज यांच्या उपस्थितीत प.पू. क्षुल्लक जयसेन महाराज यांना कमंडलू अर्पण करताना माजी मंत्री प्रकाश आवाडे, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील व मान्यवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या सावनीला हार्मोनियमसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वयाच्या चौथ्या वर्षापासून हार्मोनियम वादन करत कलाप्रेमींची वाहवा मिळवणाऱ्या सावनी राजप्रसाद धर्माधिकारी या अकरा वर्षीय कलाकाराला केंद्र सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. शास्त्रीय संगीत क्षेत्रात कलाकारांची नवी पिढी तयार व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे राष्ट्रीय स्तरावर दिली जाते. तिला वयाच्या २१ व्या वर्षीपर्यंत दरमहा २५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

कोल्हापुरातील प्रसिध्द हार्मोनियम आणि तबलावादक राजप्रसाद धर्माधिकारी यांची सावनी ही मुलगी आहे. सध्या ती अॅड. पी. आर. मुंडरगी प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिकत आहे. वडिलांकडून तिला वादनकलेचा वारसा लाभला. वडिलांकडे, वयाच्या चौथ्या वर्षापासून ती हार्मोनियम वादनाची तालीम शिकायला सुरुवात केली. हार्मोनियमसोबत तबला वादनाची आवड जपली आहे. गेल्यावर्षी पुणे येथे झालेल्या 'इंटरनॅशल कि बोर्ड फेस्टिव्हल,' आणि 'भवितव्य'महोत्सवात सहभाग घेतला होता. दरम्यान शिष्यवृत्तीसाठी मंत्रालयाकडून मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई अशा विविध विभागांतर्गत कलाकारांच्या सादरीकरणानंतर निवड प्रक्रिया झाली.

'सावनीची राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी लहान वयात निवड झाली हे आमच्यासाठी कौतुकास्पद आहे. खरे तर, या शिष्यवृत्तीसाठी आयोजित सादरीकरणात देशभरातून हजारो वादक कलाकार सहभागी असतात. राष्ट्रीय शिष्यवृत्ती, नामवंताचे सेमिनार यामुळे तिच्यातील टँलेंटला आणखी वाव मिळेल' अशी प्रतिक्रिया तिचे वडील, प्रसिद्ध हार्मोनियम वादक राजप्रसाद धर्माधिकारी यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यमशील समाजासाठी राजर्षी शाहू मराठा महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजासाठीच्या आरक्षणाची मागणी मान्य झाल्यानंतर आता मराठा समाज उद्यमशील बनावा यासाठी राज्यात प्रथमच २३ ते २६ जानेवारी या कालावधीत दसरा चौकात राजर्षी शाहू मराठा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन या संस्थांनी आयोजित केलेल्या बैठकीत महोत्सवाची घोषणा करण्यात आली. महोत्सवात महिला, युवक, शेती, उद्योगासंबधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, शस्त्रात्र प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शनासह विविध उपक्रमांचा समावेश केला जाणार आहे.

दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात महोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक झाली. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी महोत्सवाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, 'मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, तो उद्योगशील बनावा यासाठी महोत्सवात प्रगतशील उद्योजक, शेतकरी, नव उद्योजकांना मार्गदर्शन करतील. महिला व युवकांना शिक्षण, करिअरचे मार्गदर्शन व्हावे यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. मराठा संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहे. मराठा उद्योजकांचे १०० स्टॉल महोत्सवात मांडण्यात येतील.'

उत्तम जाधव यांनी करिअर व व्यावसायिक मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्याची तर मिलिंद ढवळे यांनी शस्त्रात्र प्रदर्शन भरवण्याची सूचना केली. शैलजा भोसले यांनी समाजातील महिला घरकामामुळे कार्यक्रमास येत नसल्याने पुरुषांनी महोत्सवात महिलांची उपस्थिती असावी यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घरापासून सुरुवात करुन पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले. महोत्सव यशस्वी होण्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी सुरू करण्याची सूचना चंद्रकांत चव्हाण यांनी केली.

आरोग्य जाणीव जागृतीसाठी महोत्सवात आरोग्य तज्ज्ञांची व्याख्याने घेण्याची सूचना डॉ. संदीप पाटील यांनी केली. प्रा. सी. डी. गायकवाड म्हणाले, 'महोत्सवाची सुंदर कल्पना असली तरी त्यांचे योग्य नियोजन व्हावे यासाठी सुकाणू समिती नियुक्ती करावी. महोत्सवाची सुरुवात दिंडीने करावी.' प्रताप साळुंखे यांनी मराठा समाजातील मान्यवर कलाकार, खेळाडू, शास्त्रज्ञ, साहित्यीकांचा सत्कार करण्याची सूचना केली. यावेळी डॉ. आनंद पाटील, शशिकांत पाटील, संग्रामसिंह निंबाळकर, नितीन पाटील, मिलिंद ढवळे पाटील, इंद्रजीत माने, सरदार पाटील, शिवाजी मोरे, प्रकाश पाटील, मंगल कुऱ्हाडे, मारुती जाधव, दीपा डोणे आदी उपस्थित होते. अवधूत पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नरुले यांच्या ग्रंथास तीन पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर: डॉ. श्रीकांत नरुले यांच्या 'जगदीश खेबूडकरांच्या लावण्या' या समीक्षा ग्रंथास पद्मगंधा प्रतिष्ठानचा समीक्षा विभागाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. याशिवाय अंकुर साहित्य मंडळ, भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता ‘आजरा’ने राज्यात चमकावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

राज्य आणि देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत संगणकीय आणि डिजिटल प्रणालीचा वापर अनिवार्य बनला आहे. यानुसार प्रशिक्षण देऊन नागरिकांना तत्पर सेवा-सुविधा देण्याचे शासनाचे नियोजन आहे. यासाठी तालुका ते जिल्हा स्तरावर कार्यरत शासकीय यंत्रणांच्या मूल्यांकनात आजरा तालुक्याने संगणकीय उतारे आणि दाखले देण्यात अग्रेसर स्थान पटकावले आहे. राज्यात अशा पहिल्या पाच तालुक्यात कोल्हापूरचे चार तालुके समाविष्ट आहेत. त्यामुळे आजरा तालुक्याने आपली ही भरारी राज्यात कायम राखावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केली.

शासनाच्या 'सुवर्णजयंती महाराजस्व' अभियानांतर्गत आयोजित विस्तारीत समाधान योजना समारंभ आणि येथील महसूल विभागाच्या प्रमुख या नात्याने येथील तहसीलदार अनिता देशमुख यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या येथील जुन्या तहसील इमारतीमधील 'दृष्टीक्षेपातील आजरा दालन' च्या उद्धाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. सुभेदार बोलत होते. प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार अनिता देशमुख, सभापती रचना होलम, आजरा नगरपंचायत अध्यक्षा जोत्स्ना चराटी प्रमुख उपस्थित होते.

सुभेदार म्हणाले, भारत लोकशाही प्रधान देश आहे. इथे प्रजासत्ताक शासन- प्रशासन व्यवस्था आहे. याचा अर्थ भारतीय प्रजा सार्वभौम आहे. त्यांच्या आत्यंतिक महत्वाच्या गरजा दूर व्हाव्यात, कोणत्याही अडचणी अथवा समस्या त्यात असू नयेत. विशेषतः शासकीय दाखले आणि उतारे मिळविण्यासाठी हेलपाटे मारायला लागू नये, म्हणून सुवर्णजयंती महाराजस्व अभियानांतर्गत 'शासन आपल्या दारी' हे प्रशासकीय अभियान राबविले जात आहे. आणि ते कमालीचे यशस्वी ठरले असून अनेक गरजूंना अत्यावश्यक दाखले विनासायास मिळण्याची सोय झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गरजुना त्याचा लाभ होत असल्याचे प्रतिपादन सुभेदार यांनी केले.

यावेळी अनेक गरजूंना दाखले वितरित करण्यात आले. यावेळी 'दृष्टीक्षेपातील आजरा' दालनाचे उदघाटन श्री. सुभेदार यांनी केले. हे दालन केवळ आजरा तालुकवासीयच नव्हे तर आजरा-कोकण व गोवा मार्गावरील पर्यटकांना मार्गदर्शक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी आवंडी ग्रामस्थांच्या गज-नृत्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. तालुक्यातील विविध स्तरावरील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक तहसीलदार श्रीमती देशमुख यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुंभी’ला उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार प्रदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेचा महाराष्ट्राच्या दक्षिण विभागातून सन २०१७-१८करिता उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी कारखान्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कुंभी कारखान्याचे चेअरमन, आमदार चंद्रदीप नरके यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी व्हाइस चेअरमन अॅड. बाजीराव शेलार, सर्व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस उपस्थित होते.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही देशातील ऊस संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. संस्थेमार्फत साखर कारखान्यांना मार्गदर्शन तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट साखर कारखाना, ऊस भूषण, विकास, पर्यावरण संवर्धन, आर्थिक व्यवस्थापन इत्यादी पुरस्कार दिले जातात. कार्यक्रमास नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, साखर संघाचे माजी अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, नॅशनल फेडरेशनचे माजी अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे, साखर संघ अध्यक्ष जयप्रकाश साळुंके, रोहित पवार, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.

फोटो

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता दितीय क्रमांक पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते स्वीकारताना कुंभी कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके. शेजारी अॅड. बाजीराव शेलार, संचालक मंडळ व कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टोमॅटोच्या दरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकीकडे फळभाज्या व पालेभाज्या स्वस्त झाल्या असताना, टोमॅटोच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली आहे. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील विक्रेत्यांकडून भाज्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत असल्याने दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

गेले तीन ते चार महिने टोमॅटोचे दर गडगडले होते. मात्र रविवारी दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली. टोमॅटोची प्रतिकिलो २० रुपये दराने विक्री सुरू होती. रविवारी मार्केट यार्डात गोव्यातील भाजी व्यापाऱ्यांकडून मोठी खरेदी झाल्याने दरवाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ख्रिसमस व न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने सॅलडची मागणी वाढली असल्याने टोमॅटोसह बीट, काकडीच्या मागणीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टोमॅटोव्यतिरिक्त वांगी, वरणा, कारले, घेवडा, मटार दोडक्याचा दर प्रतिकिलो ४० रुपये होता. काही विक्रेत्यांनी वांग्याची प्रतिकिलो ३० रुपये दराने विक्री केली. भेंडीचा दर प्रतिकिलो ४० तर गवारीचा दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपये होता. कोबी पाच ते दहा रुपयांना एक नग तर फ्लॉवरचा प्रतिगड्डा १० ते २० रुपये होता. मेथी, पोकळा, चाकवत, कांदा पात, शेपू, करडई, पालक या पालेभाज्यांचा दर प्रति पेंढी दहा रुपये असा होता. कोथंबिरीची लहान पेंढी पाच रुपयांना तर मोठ्या पेंढीचा दर २० रुपये होता. बाजारात हरभऱ्याचे आगमन झाले असून प्रति पेंडी दहा रुपये असा दर होता. फळांचीही आवक वाढली आहे. सफरचंद, मोसंबी, संत्री, चिकू, अंजीर, बोरे, पपई ही फळे बाजारात आली असून प्रतिकिलो ४० ते ८० रुपये दराने विक्री होत आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी ३० ते ४०

टोमॅटो २०

भेंडी ५०

ढबू ३० ते ४०

गवार ७० ते ८०

दोडका ४०

कारली ४०

वरणा ३० ते ४०

ओली मिरची ३० ते ४०

फ्लॉवर १० ते २५ रुपये नग

कोबी ५ ते १० रुपये नग

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

कांदा १० ते २०

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी १०

कांदा पात १०

कोथिंबीर १०

पोकळा १०

पालक १०

शेपू १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद ६० ते १८०

डाळिंब ४० ते ६०

संत्री ३० ते ८०

मोसंबी ३० ते ८०

बोरं २० ते ४०

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी ३० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हायटेक’ उद्योगाची दिशा

$
0
0

फोटो आहेत

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राने आपल्या क्षमतेत वाढ करत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. अनेक नामांकित कंपन्यामध्ये येथील फाउड्री उद्योगामध्ये तयार झालेल्या वस्तूंचा वापर केला जातो. येथील संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करता यावा यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून हायटेक मशिनरी आणि पॉवर टुल्सचा समावेश केला आहे. जगभरातील नामांकित कंपन्यांच्या औद्योगिक क्षेत्रात वापर होणाऱ्या मशिनरीमुळे येथील उद्योगाला प्रदर्शनामुळे हायटेक दिशा मिळेल.

हायड्रोलिक व इलेक्ट्रिक लिफ्ट, एअर कॉम्प्रेसर, लेजर कटिंग अँड बेडिंग, पॅकिंग मशिन्सचा समावेश प्रदर्शनामध्ये केला आहे. शाहूपुरी जिमखाना येथे शनिवारपासून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने 'वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन २०१८' प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे. रविवार सुटीची पर्वणी साधत अनेकांनी प्रदर्शनाला भेट देऊन औद्योगिक क्षेत्रातील होणारे बदल जाणून घेतले. स्थानिक उद्योजकांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली करून देण्यासाठी प्रदर्शन चांगलेच उपयोगी ठरत आहे.

अनेक फाउंड्री उद्योगामध्ये जास्त वजनाच्या वस्तू उचलताना अधिक मनुष्यबळ लागते. आशा हायड्रोलिक व इलेक्ट्रिक लिफ्टचा वापर उत्तमप्रकारे केला जाऊ शकतो. येथील उद्योगाला मदतशीर ठरेल आशा ५०० किलो ते दीड टन क्षमता वाहून नेऊ शकेल आशा लिफ्टचा समावेश आहे. थ्री फेज व बॅटरीवर चालणाऱ्या लिफ्ट तब्बल दहा फुटापर्यंत उचलले जाऊ शकते. या लिफ्टचा वापर फाउंड्री, टेक्सटाइल, अॅटो व फूट इंडस्ट्रीमध्ये होऊ शकतो. ड्रील मशिन्स, ग्रायंडर, कटर, वेल्डिंगचा औद्योगिक क्षेत्रात वापर वाढला आहे. कमीतकमी मनुष्यबळात या साधनाचा वापर करताना गहाळ होण्याची शक्यता असते. यासाठी इनसर्ट टुल्स मॅनेज बॉक्स प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आला आहे. संपूर्ण बॉक्स अॅटोमिशनवर कार्यरत असल्याने प्रत्येक टुल्सची नोंद संगणकाद्वारे केली जाते.

येथील शेतकरी अत्याधुनिक पद्धतीने शेती करत असताना पूरक उद्योगाकडेही आकर्षित होऊ लागला आहे. त्यामुळे जॅम, जेली, मध, गूळ, काकवी असे अनेक पदार्थांची विक्री पॅकबंदमध्ये होऊ आहे. मनुष्यबळाद्वारे पॅकिंग करताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. आशा पदार्थांचे पॅकिंग त्याच्या वजनानुसार करण्यासाठी पॅकिंग व विलिंग मशिन प्रदर्शात ठेवले आहे. त्याचा वापर विशेषत: महागड्या आशा ड्रायफूटच्या वजनासाठी होऊ शकतो. मोबाइल स्क्रीनप्रमाणे मशिनमधील स्क्रीनवर वजन निश्चित केल्यानंतर अल्पवधीत पॅकिंग तयार होते. जपानची नामांकित कंपनी मित्सुबिशीचे पीएलसी, सर्वो, व्हीपीडी, स्कॅडा, सीएनसी असे अनेक प्रोडक्ट आहेत. त्यामध्ये रोबटची भर पडली आहे. कोणत्याही मनुष्यबळाशिवाय रोबटच्या सहायाने वजनदार वस्तून इंडस्ट्रीमध्ये पीक अँड प्लेस करु शकतो.

धावपळीच्या जीवनात अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. योग, ध्यान धारणा यातून मन:शांती मिळवताना अनेकजण मशिनवर एक्सरसाइज करतात. आशा व्यक्तींसाठी अनेक अत्याधुनिक मशिन्स प्रदर्शनामध्ये आहेत. अॅक्युप्रेशर करणारी मसाज चेअर प्रदर्शनात आकर्षण ठरत आहे.

आकर्षक घरासाठी...

बंगला असो फ्लॅट इंटिरीअर डिझाईनला महत्त्व प्राप्त झाले आहे. बंगल्याचा हॉल अधिक आकर्षक करण्यासाठी अनेकांचा कल दिसून येतो. हॉल सजवण्यासाठी फोम, स्टेन, ग्रेनाईड, अॅल्युमिनियम व कॉपरचा वापर करून सजावट केली जाते. या सर्वप्रकारच्या वस्तूंचे आकर्षक कटिंग आणि बेडिंग संगणकाच्या मदतीने केले जाते. याच मशिन्सद्वारे अॅक्रॅलिक व युव्ही प्रिटिंग केले जाते. तर वडूवर इम्बोसिस करण्यासाठी या मशिनचा वापर करुन हॉल अधिक आकर्षक होऊ शकतो.

औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या बदलाची माहिती येथील प्रदर्शनातून मिळाली. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना आशा प्रदर्शनाची आवश्यकता असते. यातून करिअरला दिशा मिळेल. भविष्यातील औद्योगिक क्षेत्रातील संधीचा शोध घेताना प्रदर्शनातील माहिती आणी वस्तूंची मदत होईल.

सुधांशू वाईंगडे, विद्यार्थी

कमीतकमी मनुष्यबळामध्ये औद्योगिक क्षेत्रात काम करण्याला प्राधान्य दिले जात आहे. अत्याधुनिक मशिनरीचा वापर करताना फायद्यामध्ये अधिक वाढ होते. आशा मशिनची प्रात्यक्षिकांसह पाहणी करता आली. पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये भर पडली.

पूजा भोसले, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन वसुली थांबवा, अन्यथा मंत्रालयावर धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एमएससीआयटी प्रशिक्षण पूर्ण करूनही विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व वेतनवाढीमध्ये कपात केली जात आहे. राज्य सरकारच्या विविध विभागाच्या या निर्णयामुळे शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागातील कर्मचारी, लिपिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सरकारने तत्काळ वसुली थांबविण्याबाबत आदेश काढला नाही राज्यभरातील एक लाखाहून अधिक कर्मचारी मंत्रालयावर धडक देतील, असा इशारा विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला.

सरकारी कर्मचाऱ्यांना एमएससीआयटी प्रशिक्षण पूर्ण करण्याची मुदत २००७ पर्यंत होती. मुदतीत प्रशिक्षण पूर्ण न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढीव वेतन कपात करण्याचा निर्णय झाला. त्याला विरोध केल्यानंतर व मंत्र्यांशी चर्चेनंतर वेतनवाढीतील रकमेच्या वसुलीला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्याची ग्वाही दिली. मात्र सरकारी आदेश न झाल्यामुळे पगारातून वसुली सुरू आहे. जिल्ह्यातील सुमारे २५०० शिक्षक, आरोग्य विभागातील ३०० कर्मचारी, शंभरहून अधिक ग्रामसेवक आणि लिपिकांच्या वेतनवाढीतील रकमेची वसुली संबंधित विभागाकडून सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नव्याने वेतनवाढीची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. कर्मचाऱ्यांना फटका बसत असल्यामुळे आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी धनंजय जाधव, एम. आर. पाटील, के. आर. किरुळकर, विजय पाटील, बी. डी.चौगुले, राजाराम वरुटे, सुरेश सुतार, प्रवीण मुळीक, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदलत्या बाजारपेठेचे ज्ञान महत्त्वाचे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एसी रुममध्ये बसून व्यवसायाची वृद्धी होत नाही. तर उद्योग विस्तारासाठी अविरत कष्ट, नवनवीन कल्पना, बदलत्या बाजारपेठेचे ज्ञान आणि ग्राहक, पुरवठादारांच्या अडचणी जाणून घेऊन त्या दूर करण्याचे कौशल्य ही चतु:सूत्री उपयुक्त ठरते' असा सल्ला व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ प्रा. परिमल मर्चंट यांनी दिला. इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजतर्फे व्यापारी, उद्योजक व उद्योगपतीसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. उद्योगपती सचिन मेनन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रेसिडेन्सी क्लबमधील सभागृहात रविवारी कार्यशाळा झाली.

याप्रसंगी प्रा. मर्चंट यांनी 'खर्च वाचवा, नफा वाढवा' हा मूलमंत्र घेऊन अधिकाधिक नफा कसा मिळवायचा यासंदर्भात वेगवेगळ्या टीप्स दिल्या.

'व्यवसायात कच्चा मालाचा पुरवठा करणारी व्यक्ती आणि उत्पादित माल खरेदी करणारा ग्राहक हे दोघे महत्वाचे आहेत. व्यावसायिकांनी निव्वळ व्यापारातील नफ्यावर लक्ष न ठेवता या दोन्ही घटकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत'असे नमूद करून प्रा. मर्चंट म्हणाले, 'व्यापार, व्यवसायात प्रगती करायची असेल तर मोठे ध्येय ठेवा. नुकसान झाल्यास खचू नका, पुन्हा नव्याने उभे राहा. मोठी स्वप्ने पाहिल्याने आपसूकपणे एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो. उद्योग, व्यवसाय करताना तुमचे ध्येय निश्चित हवे. स्वत:मधील क्षमता ओळखायला हव्यात. नकारात्मक गोष्टींना कधीही मनात स्थान देऊ नको. सकारात्मक विचार नव निर्मितीला चालना देतात. व्यवसायात चढ-उतार येत असतात. काही वेळेला फटका बसतो. नुकसान सोसावे लागते. अशा वेळी सारे संपले असे समजून गर्भगळीत हाण्याऐवजी पुन्हा नेटाने व्यापार, व्यवसाय केला पाहिजे. स्पर्धेत खचून न जाता, आत्मविश्वासाने सामोरे जायला हवे. माणसाला अनुभवातून शहाणपण लाभते. बिझनेसमधील समस्या, अडचणी, त्यातील टप्पे, चढउतार यासंदर्भात मुलांशी चर्चा करा. भविष्यकाळात तो उत्तम बिझनेसमॅन घडू शकेल. व्यवसायाच्या उन्नतीसाठी कष्ट करण्याची शिकवण मिळेल. या माध्यमातून बिझनेसमॅनची जडणघडण होत असते.'

क्लबच्या अध्यक्षा ममता झंवर यांनी स्वागत केले. उपाध्यक्षा विणा ढोली यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सचिव वर्षा चौगुले यांनी आभार मानले. क्लबच्या खजानिस सपना झंवर, मुग्धा केतकर, दिपाली तायवडे पाटील, नूतन पाटील, पल्लवी मूग, अंजली पाटील, पल्लवी शंभरगी, सुवर्णा गांधी, शमा मालाणी आदी उपस्थित होते. कार्यशाळेत कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, बेळगाव येथील व्यावसायिक, उद्योजक सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीच्या पैसाफंड बँकेचे पुरस्कार जाहीर

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील नावाजलेल्या पैसाफंड शेतकी सहकारी बँक व लोकसेवक आ. बा. नाईक सार्वजनिक विश्वस्त निधीमार्फत प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे घोषणा करण्यात आली. बँकेचे अध्यक्ष आण्णासाहेब भोजे, कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पुरस्कार जाहीर केले. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगरला आदर्श सहकारी संस्था पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा पैसाफंड बँकेचे संस्थापक कार्यकारी संचालक आ. बा. नाईक यांचा ३७ वा स्मृतीदिन व अध्यक्ष एल. वाय. पाटील यांचा चौथा स्मृतीदिन अशा संयुक्त समारंभामध्ये शुक्रवारी (ता. २१ डिसेंबर) होईल.

अन्य पुरस्कारांत आदर्श सहकार व्यवस्थापक म्हणून गोकुळचे महाव्यवस्थापक रजनीकांत शाह, आदर्श समाजसेवक म्हणून कोल्हापुरातील सुनील इंद्रजित कांबळे, साळोखेनगर, आदर्श शेतकरी म्हणून यळगूड येथील आप्पासाहेब हरीबा झुंजार, आदर्श कल्पक उद्योजक म्हणून वनिता अॅग्रोकेम प्रा. लि. टाकवडे, शिरोळ, आदर्श प्राथमिक शिक्षक म्हणून कोल्हापुरातील ज्ञानदीप विद्यामंदिरच्या सुजाता शामराव पाटील, आदर्श माध्यमिक शिक्षक म्हणून इचलकरंजीच्या तात्यासाहेब मुसळे हायस्कूलचे मुख्याध्यापक रामचंद्र केशव निमणकर, विशेष कार्यगौरव पुरस्कार राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा बहेन यांना देण्यात येणार आहेत. संस्थेत २५ वर्षे सेवा पूर्ण केलेले बँकेचे कर्मचारी तुळशीदास पालके, कर्ज अधिकारी मुख्य शाखा, हुपरी आदींचा समावेश आहे.

पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, नगराध्यक्षा जयश्री गाट आदी उपस्थित राहतील.

पत्रकार परिषदेसाठी शामराव गायकवाड, आण्णासाहेब पाटील, कल्लाप्पाण्णा गाठ, के. डी. धनवडे, श्रीकांत नाईक, शिवाजी पाटील, एस. एच. रजपूत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images