Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्रतापगड झाला शिवमय; शिवप्रताप दिन साजरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

ढोल ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणारा आवाज, हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक आणि अलोट गर्दीच्या उत्साहात शुक्रवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.

शुक्रवारी पहाटेपासूनच मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिवप्रेमींनी परिसर भारुन गेला होता. सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आयकर विभागाचे सहसंचालक (कोल्हापूर परिक्षेत्र) पुर्णेश गुरुरानी, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पूजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पुराणीक नरहर हडप गुरुजी आणि विजय हवलदार यांनी पौरोहित्य केले. त्या नंतर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते आई भवानीची आरती करण्यात आली.

भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, स्वराज्य मराठा ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला. पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. शिवपुतळ्यावरील ध्वजस्तंभावर जिल्हाधिकारी सिंघल यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रतापगड झाला शिवमय; शिवप्रताप दिन साजरा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

ढोल ताशांचा रोमांचकारी गजर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, तुताऱ्यांचा रोमांच उभा करणारा आवाज, हेलिकॉप्टरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, शिवकालीन धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक आणि अलोट गर्दीच्या उत्साहात शुक्रवारी किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला.

शुक्रवारी पहाटेपासूनच मंगलमय वातावरणाने आणि हजारो शिवप्रेमींनी परिसर भारुन गेला होता. सकाळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, आयकर विभागाचे सहसंचालक (कोल्हापूर परिक्षेत्र) पुर्णेश गुरुरानी, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची मंत्रोच्चाराच्या गजरात षोडशोपचार पूजा बांधण्यात आली. भवानी मातेचे पुराणीक नरहर हडप गुरुजी आणि विजय हवलदार यांनी पौरोहित्य केले. त्या नंतर जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते आई भवानीची आरती करण्यात आली.

भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहण कुंभरोशीचे सरपंच रविकांत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. छत्रपतींची मूर्ती असलेल्या या पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली, वाडा कुंभरोशीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचे लेझीम- तुताऱ्या, स्वराज्य मराठा ढोल ताशा पथक, काठीवर चालणारी मुले, आई भवानी मातेचा व शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घेाषणांनी मिरवणूक मार्ग दुमदूमून गेला. पालखीचे शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर जिल्हाधिकारी सिंघल यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. शिवपुतळ्यावरील ध्वजस्तंभावर जिल्हाधिकारी सिंघल यांनी भगव्याचे ध्वजारोहण केले.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजुराचा मृत्यू

$
0
0

सातारा

भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या गोदामावरून पडल्याने किकली (ता. वाई) येथील सुहास गणपत महामुनी (वय ४०) यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेची प्राथमिक नोंद सातारा शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

किकली येथील सुहास महामुनी गुरुवारी किसन वीर कारखान्याच्या आवारात असणाऱ्या साखरेच्या गोदामांची दुरुस्ती करण्यासाठी गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास ते गोदामावरील पत्र्यावर चढून दुरुस्तीचे काम करीत होते. काम करीत असतानाच गोदामाचा पत्रा तुटला आणि महामुनी वरून गोदामात खाली कोसळले. पत्रा तुटून महामुनी खाली पडल्याचे त्यांच्यासोबत असणाऱ्या इतरांच्या लक्षात आले. तातडीने त्यांना कारखान्याच्या रुग्णवाहिकेतून गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, महामुनी यांना मृत घोषित करण्यात आले.

.....

आगवणेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार

छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा :

स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले फलटण येथील सुविधा हॉस्पिटल येथे आले होते. त्या वेळी श्रीमंत उदयनराजे म्हणाले, 'दिगंबर आगवणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा येथे काही कार्यक्रमानिमित्त येणार आहेत. त्या वेळी आगवणे यांच्याविषयी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून लवकरात लवकर आगवणे यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मार्ग काढणार आहोत.'

स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे गेल्या काही दिवसांपूर्वी फलटण येथील अधिकारी गृहासमोर त्यांच्या काही मागण्या घेऊन उपोषणास बसले होते. उपोषणाच्या सहाव्या दिवशी पोलिस प्रशासनामध्ये थोडीफार चकमक झाली ती झाल्यानंतर आगवणे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर दिगंबर आगवणे यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांची तब्येत सुधारू लागल्यानंतर त्यांना फलटण येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये गेल्या आठवड्यात दाखल केले. दिगंबर आगवणे फलटण येथे उपचार घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधीसाठी मंत्रालयात उपोषण

$
0
0

कोटसाठी भूपाल शेटेंचा फोटो जोडला आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेवर काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता असल्याने निधी देण्यास राज्य सरकारने नेहमीच दुजाभाव केला. तीन वर्षात सरकारकडून केवळ दोन कोटी ५९ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. अपुऱ्या निधीमुळे शहराचा विकास खुंटला आहे. शहराला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त निधीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. तरीही निधी न दिल्यास एक महिन्यानंतर प्रसंगी मंत्रालयात जाऊन उपोषण करणार असल्याचे नूतन महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांनी स्पष्ट केले. महापौरपदी निवड झाल्यानंतर मोरे यांनी शुक्रवारी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयाला भेट दिली.

महापौर मोरे म्हणाल्या, 'अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला असताना अद्याप एक रुपयाचीही निधी सरकारकडून मिळालेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे राज्यात सरकार असताना शहर विकासासाठी १,२०० कोटींचा निधी दिला. मात्र सध्याचे सरकार महापालिकेवर भाजपची सत्ता नसल्यामुळे निधी देण्यास कुचराई करत आहे. याउलट नागपूर महापालिकेला २,४०० कोटींचा निधी दिला आहे. ज्या महापालिका व नगरपालिकेवर भाजप-शिवसेनेची सत्ता आहे, तेथे जास्त निधी वितरित करताना कोल्हापूर महापालिकेला मात्र तीन वर्षात केवळ दोन कोटी ५९ लाखांचा निधी दिला आहे. सरकारकडून निधीच मिळत नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे.'

'तीर्थक्षेत्र विकास आराखडा, थेट पाइपलाइन, राजर्षी शाहू समाधीस्थळ सुशोभीकरण, नगरोत्थान योजना मार्गी लावण्यासाठी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी लवकरच पत्रव्यवहार करणार आहे. जकात बंद झाल्यानंतर महापालिकेला एलबीटीच्या हप्त्यावर विसंबून राहावे लागते. एलबीटीसह जीएसटी परतावा देण्यास सरकार विलंब करत आहे. महापालिकेला नियमित परतावा मिळण्याबरोबरच निधीसाठी पत्रव्यवहार केल्यानंतरही निधी न मिळाल्यास प्रसंगी मंत्रालयात जाऊन उपोषण करणार असल्याचे महापौर मोरे यांनी सांगितले.' त्यांच्यासोबत सभागृह नेते दिलीप पोवार, अभिजीत जाधव, जनसंपर्क अधिकारी मोहन सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

...............................

चौकट

सत्कार समारंभाला देणार फाटा

पक्षाच्या धोरणानुसार आणि लोकसभेच्या आचारसंहितेमुळे महापौर, उपमहापौर यांना अल्पकाळ मिळणार आहे. पदाधिकारी निवडीनंतर अनेकवेळा सत्कार आणि उद्घाटन समारंभात बहुतांशी वेळ जातो. शहराच्या विकासासाठी अशा समारंभाना फाटा देण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. जास्तीतजास्त वेळ जनतेला देवून प्रश्नांची सोडवणूक केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ...................

चौकट

तर शहर उजळले असते ...

'स्थायी समितीमध्ये सत्ताबदल होऊन भाजपची सत्ता आली. मात्र त्यानंतर एकही रुपयाचा निधी आला नसून नवीन कोणत्याही कामांचा शुभारंभ भाजपच्या सभापतींनी केलेला नाही. जनतेचा कौल मान्य करुन सत्तेपासून दूर राहण्याऐवजी घोडेबाजारात रक्कम वापरली. हीच रक्कम शहराच्या विकासासाठी वापरली असती, तर शहर उजळून निघाले असते', असा टोला सभागृह नेते दिलीप पोवार यांनी लगावला.

.........................

कोट

'अल्पकाळात जनतेची कामे करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. शहरातील प्रत्येक समस्यांची निर्गत करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल. प्रलंबित प्रश्न मार्गी लावून आमची कारकीर्द दैदिप्यमान करू.

भूपाल शेटे, उपमहापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इमारत पायाभरणी आज

$
0
0

कोल्हापूर

खासदार संजय काकडे यांच्या खासदार फंडातून कॉमर्स कॉलेज प्रभागात उभारण्यात आलेल्या डॉ. झाकीर हुसेन ऊर्दू शाळेच्या दोन मजली इमारतीचा पायाभरणी समारंभ शनिवारी (ता. १५) सायंकाळी ४.३० वाजता सुसरबाग येथे होणार आहे. पायाभरणी समारंभ माजी केंद्रीय मंत्री सी. एम. इब्राहिम यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थान श्रीमंत छत्रपती शाहू महाराज भूषवणार आहेत. यावेळी महापौर सरिता मोरे व उपमहापौर भूपाल शेटे यांच्या सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी प्रतिमा पाटील, अशोक जाधव, सुरेखा शहा, राहुल चव्हाण, दिलीप पोवार, शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील, प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, गणी आजरेकर आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांना तीन दिवस सुट्टी, दोन दिवस संप

$
0
0

कोल्हापूर

पुढील आठवड्यात बँकांना तीन दिवस सुट्ट्या असून दोन दिवस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप असल्याने बँका एकूण पाच दिवस बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

अखिल भारतीय बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेनेने शुक्रवारी (ता.२१) एक दिवस संपाची घोषणा केली आहे. अधिकारी संपात सहभागी होणार असल्याने बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. शनिवारी (ता.२२) व रविवारी (ता. २३) सलग दोन दिवस बँकांना चौथा शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे. सोमवारी (ता.२४) बँका सुरु राहणार असल्या तरी तीन दिवस बँकाचे काम होणार नसल्याने कामकाजावर ताण पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही बँकांनी स्वत:च्या अधिकारात सोमवारी सुट्टी घेतली आहे. मंगळवारी (ता.२५) ख्रिसमसनिमित्त बँकेला सुट्टी आहे. बुधवारी (२६) देशव्यापी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बंदची हाक दिली असल्याने बँका बंद राहणार आहेत. तीन दिवस सुट्ट्या व दोन दिवस संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा आधार घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंडाची भाषा चालणार नाही

$
0
0

महाडिक, पीएननी गोकुळ संचालकांना खडसावले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बंडाची भाषा कोणी केली, बंडांची भाषा करणाऱ्यांनी हात वर करावेत. आम्ही असताना गोकुळमध्ये बंडाची भाषा चालणार नाही', अशा शब्दांत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि पी.एन. पाटील यांनी संचालकांना खडसावले. अध्यक्षपदासाठी बदल होईल, पण त्यासाठी वेळ लागेल असे सांगण्यासही नेते विसरले नाहीत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अथवा नव्या वर्षात नवीन अध्यक्षपद निवड होण्याचे संकेतही त्यांनी दिले.

जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील हे पावणेचार वर्षे अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. त्यामुळे नवीन व्यक्तीला अध्यक्षपदासाठी संधी द्यावी, अशी सूचना यापूर्वी महाडिक व पाटील यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन ज्येष्ठ संचालकांनी केली होती. पण नेत्यांनी दुर्लक्ष केल्याने बारा संचालकांनी एकत्र येत अध्यक्ष बदलावेत या मागणीसाठी बंडाचा पवित्रा घेतला. त्यामुळे गोकुळमध्ये खळबळ उडाली. शुक्रवारी सर्व संचालकांची मते जाणून घेण्याचे नेत्यांनी मान्य केले.

त्यानुसार शुक्रवारी बोर्ड मिटिंगला जाण्यापूर्वी संचालकांची मते जाणून घेण्यासाठी ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालयात महाडिक व पी.एन. स्वतंत्रपणे आले. सर्व संचालकांना एकत्र बोलावून महाडिक व पी.एन. यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. बंडाची भाषा कुणी केली त्यांनी हात वर करावेत, इथे बंडाची भाषा चालणार नाही. जोपर्यंत महाडिक, पी.एन. नेतृत्व करतील तोपर्यंत तेच अध्यक्षपदाची निवड करतील असे स्पष्ट केले.

त्यावर अध्यक्ष बदलाचा अधिकार नेत्यांचाच आहे, असे सर्व संचालकांनी स्पष्ट केले. आजअखेर दोन ते तीन वर्षांनी अध्यक्ष बदलला आहे. विश्वास पाटील यांना आमचा विरोध नाही. अध्यक्षपदावर पाटील हे पावणेचार वर्षे झाली असल्यामुळे आम्ही यापूर्वी नेते मंडळींना भेटून सूचना केली आहे. बंड आम्ही करुच शकत नाही, असा पवित्रा संचालकांनी घेतला. संचालकांच्या या खुलाशावर नेत्यांनी १२ संचालकांनी बंड केले अशी बातमी बाहेर जातीच कशी, असा प्रश्न केल्यावर संचालकांनी सारवासारवीचा प्रयत्न केला. डोंगळे यांना पावणे तीन वर्षे तर आपटे, विश्वास पाटील, रणजित पाटील यांना दोन वर्षे संधी मिळाली होती. फक्त अरुण नरकेच अनेक वर्षे अध्यक्ष होते. दर दोन ते तीन वर्षांनी अध्यक्ष बदलतो. पण यावेळी अपरिहार्य कारणामुळे बदलले नसल्याचे खुलासा नेत्यांनी केला.

.............

अध्यक्ष काँग्रेसचाच

बंडाची भाषा चालणार नाही, असा दम दिला असला तरी नवीन अध्यक्ष कोण असावा यासाठी महाडिक व पीएन चाचपणी करत आहेत. नवीन अध्यक्ष हा काँग्रेसची विचारसरणी मानणाराच असावा, याकडे लक्ष देण्यात येत आहे. बहुतांशी संचालक काँग्रेस विचारांशी बांधिलकी ठेवणारे असले तरी काही संचालक भाजपशी जवळीक साधत असल्याने त्यांचा अध्यक्षपदासाठी विचार केला जाणार नसल्याचे नेत्यांनी संकेत दिले आहेत. महाडिक व पी.एन यांच्याजवळच्या संचालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गूळ सौदे पूर्ववत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुळाचे सौदे बंद पाडल्याबद्दल संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी बाजार समितीला टाळे ठोकल्याच्या घटनेनंतर शुक्रवारी गुळाचे सौदे पुन्हा सुरु झाले. सरासरी प्रतिक्विंटल ३३०० ते ३४०० दर मिळाला. गूळ सौदे पुन्हा सुरु झाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, बाजार समितीच्यावतीने गूळ उत्पादक शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदारांची सोमवारी (ता. २४) बैठक होण्याची शक्यता आहे.

मार्केट यार्ड येथील गुळाच्या बाजारपेठेत गेले तीन दिवस व्यापारी, अडते, आणि हमालांतील वादामुळे सौद्यांमध्ये अनियमितता आली होती. त्याचा फटका गूळ उत्पादकांना बसत होता. अनेक शेतकऱ्यांच्या गुळाच्या गाड्या मार्केटयार्डात थांबल्या असताना सौदे काढण्यासाठी गुरुवारी व्यापारी, अडते, हमाल न फिरकल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी मार्केटयार्डची तीनही प्रवेशद्वारे बंद करताना बाजार समितीला टाळे ठोकले. सभापती बाबासाहेब लाड यांच्यासह संचालकांनी व्यापारी व गूळ उत्पादकांत चर्चा घडवून पुन्हा सौदे सुरु केले.शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा सौदे सुरु झाले. आज ७५ हजार गुळांची विक्री झाली. प्रतिक्विंटल ३३०० ते ३४०० रुपये दर मिळाला. या हंगामात दोन महिन्यात आठ हजार ३४ हजार क्विंटल गुळाची आवक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजर्षी शाहू व्याख्यानमाला बुधवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त भास्करराव जाधव वाचनालयाच्यावतीने राजर्षी शाहू व्याख्यानमालेला बुधवार(ता. १९) पासून सुरुवात होणार आहे. केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ५.३० वाजता व्याख्यानमाला होईल. व्याख्यानमालेचे उद्घाटन महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते व आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती उपायुक्त मंगेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उपायुक्त शिंदे म्हणाले, 'साहित्य, देशाची संरक्षण व्यवस्था, शहर विकास आणि विनोद अशा सर्व प्रकारच्या विषयांचा व्याख्यानमालेत समावेश केला आहे. १९ ते २३ डिसेंबरअखेर चालणाऱ्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प पुणे येथील निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे हे 'भारताची संरक्षण सज्जता आणि शेजारील देश' या विषयावर गुंफणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे 'मला उमजलेले पु. ल.' या विषयावर गुरूवारी व्याख्यान देणार आहेत. शुक्रवारी ज्येष्ठ लेखक शिरीष कणेकर हे 'गप्पा तुमच्याशी' या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. तर शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे जीवन व कार्य' विषयावर प्राचार्य यशवंत पाटणे शनिवारी व्याख्यान देणार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास झुलपेची निवड

$
0
0

कोल्हापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये विकास झुलपे यांनी ५१ किलो ग्रीक रोमन वजन गटात सुवर्णपदक प्राप्त केले. सतरा वर्षाखालील गटात त्यांनी हे विजेतेपद पटकावले. नवी दिल्ली येथे १४ ते १९ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संघातून तो प्रतिनिधित्व करणार आहे. तो मोतीबाग तालमीत सराव करत असून त्याला रुस्तूम ए हिंद दादू चौगुले, अॅड. महादेवराव आडगुळे, पी. जी. पाटील, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने यांचे प्रोत्साहन लाभले. प्रशिक्षक कृष्णात पाटील, प्रवीण कोंडावळे यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिराचे अधिकारी नव्या समितीकडे द्यावेत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारने, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व्यवस्थापन समितीची स्थापना करून मंदिराबाबतचे सर्व अधिकारी नव्या समितीकडे द्यावेत, अशी मागणी पुजारी हटाव कृती समितीचे दिलीप देसाई यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागणीचे निवेदन फॅक्सद्वारे दिल्याचे त्यांनी सांगितले. निवेदनात म्हटले आहे, 'राज्य सरकारकडून करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर अधिनियम करून आठ महिने उलटले. अद्यापही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. परिणामी मंदिरात देवस्थान व्यवस्थापन समिती व पुजाऱ्यांची मनमानी सुरू आहे. मंदिरातून पुजारी हटले नाहीत. बेकायदेशीररित्या नोकर भरती सुरू आहे. आता देवस्थान व्यवस्थापन समिती अंबाबाईची मूर्ती बदलण्याची भाषा करत आहे. वास्तविक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष व सदस्यांना अंबाबाई मंदिराबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. कायद्यानुसार स्थापण्यात येणाऱ्या नव्या समितीनेच मूर्ती अभ्यासक, धर्मशास्त्र अभ्यासक आणि भक्तांचा विचार घेऊन मूर्ती बदलाबाबत निर्णय घ्यावा.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळी समाजाचा २३ ला मेळावा

$
0
0

कोल्हापूर : शिरोळ तालुका वीरशैव माळी समाजाच्यावतीने रविवारी (ता. २३)वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कुरूंदवाड येथील जैन सांस्कृतिक भवन येथे सकाळी दहा वाजता हा मेळावा होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन तासगाव पंचायत समितीच्या सभापती बबाताई माळी यांच्या हस्ते व मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन मोहन माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव माळी, 'गोकुळ'चे संचालक अनिल यादव, नगराध्यक्ष जयराम पाटील, गणपतराव बेळकूड, जनाबाई माळी हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाचे अध्यक्ष सूर्यकांत माळी, उपाध्यक्ष रावसाहेब माळी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शस्त्र प्रदर्शनला कराडकरांचा प्रतिसाद

$
0
0

विजय दिवस समाहोरास शोभायात्रेने प्रारंभ

म. टा. वृत्तसेवा, कराड

विजय दिवस समारोहास शुक्रवारी शोभा यात्रेने प्रारंभ झाला. त्या नंतर विजय दिवस समारोह समितीने आयोजित केलेले शस्त्रास्त्र प्रदर्शनाचेही उद्‌घाटन करण्यात आले. प्रदर्शनात यंदा शिवाजी महाराजांच्या समकालीन शस्त्रांचेही प्रदर्शन भरवण्यात आले असून, त्याला विद्यार्थ्यांसह प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

विजय दिवस चौकातून शोभायात्रेस नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील, डॉ. अशोकराव गुजर यांच्यासह विजय दिवस समितीच्या सदस्यांच्या हस्ते सकाळी प्रारंभ झाला. वाद्यांच्या गजरात शोभायात्रेस प्रारंभ झाला. यंदा शोभायात्रा महात्मा गांधीना समर्पित करण्यात आल्याने शहर व परिसरातील शाळांनी महात्मा गांधींच्या जीवनकार्यावर चित्ररथ तयार केले होते. शहरातील यशवंत हायस्कूल, संत तुकाराम हायस्कूल, हुसेन कासम दानेकरी ऍग्लो उर्दू स्कूल, दिगंबर काशिनाथ पालकर शाळा, पालिकेच्या शाळांनी महात्मा गांधींच्या जीवनावरील चित्ररथ तयार केले होते. एंजल्स इंटरनॅशनल स्कूलचे झांजपथक विविध शाळांचे एनसीसीचे पथक, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, साईबाबा आदींच्या वेशभूषा केलेले कलाकार सहभागी झाले होते.

विजय दिवस चौकातून सुरू झालेली शोभायात्रा मुख्य रस्त्याने कृष्णा नाका मार्गे कन्या शाळेसमोरुन चावडी चौक, तेथून आझाद चौक मार्गे दत्त चौकातून बसस्थानकासमोरून शोभायात्रा पुन्हा विजय दिवस चौकात नेण्यात आली. तेथे यात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

........

शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन

यंदाच्या शस्त्रास्त्र प्रदर्शनात शिवाजी महाराजांच्या समकालीन शस्त्रांचेही प्रदर्शन भरवण्यात आले आहे. लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन संध्या पाटील,नगरसेवक सौरभ पाटील यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात पुणे येथील शंभुराजे मैदानी खेळ विकास मंचच्या वतीने शिवाजी महाराजांच्या काळातील समकालीन शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. कट्यार, ढाल, कोयता, भाले, तलवार, तोफा, बीछवा, वाघनखे आदींसह अन्य शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. शस्त्र प्रदर्शनात छोट्या तोफा, रडार, बंदुका यासह अन्य शस्त्रे ठेवण्यात आली आहेत.

.........

शस्त्र प्रदर्शनाला विद्यार्थ्यांसह प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

................

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतल्या मुलाखती

कराड :

मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी होऊ इच्छुक असणाऱ्या राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या मुलाखती पक्षाचे नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतल्या. या वेळी कराड दक्षिण महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा विद्याताई थोरवडे उपस्थित होत्या.

दरम्यान, मलकापूर नगरपरिषदेचे एकूण ९ प्रभाग असून, त्यामध्ये १९ नगरसेवक आहेत. या सर्व प्रभागनिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती चव्हाण यांनी घेतल्या. उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, सामाजिक कार्य, मलकापूर शहराची माहिती, उमेदवारांचा लोकसंपर्क तसेच उमेदवारांनी निवड झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कामासाठी वेळ देण्याची तयारी इत्यादी बाबींची उमेदवारांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांना मार्गदर्शन केले. चव्हाण यांनी महिला उमेदवारांशी थेट सुसंवाद साधल्यामुळे व सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

........................

..............

कुमार साहित्य, कवी संमेलनाचे आयोजन

कराड :

श्रीमंत नागोजीराव पाटणकर स्मारक वाचनालयाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या रविवारी, १६ रोजी पुणे विभाग ग्रंथालय संघ व सातारा जिल्हा ग्रंथालय संघाचे ४६वे वार्षिक अधिवेशनाचे होणार आहे. या अधिवेशनादरम्यान विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सोमवारी, १७ रोजी सातारा जिल्हा परिषद व सातारा वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने कुमार साहित्य व कवी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब देसाई कॉलेजच्या प्रांगणात ग्रंथालय संघाचे अधिवेशन व कुमार साहित्य आणि कवी संमेलन होणार आहे, अशी माहिती श्रीराम देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर व वाचनालयाचे अध्यक्ष विलास क्षीरसागर यांनी दिली आहे.

.........

उदयनराजे जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

कराड :

पुणे-मिरज-लोंढा या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन रेल्वे प्रशासनाकडून बेकायदा व बळजबरीने केले जात आहे. त्यातच रेल्वेच्या हद्दी संदर्भातील कोणतीही कागदपत्रे रेल्वे विभाग सादर करीत नसल्याने शेतकऱ्यांना आपली किती जमीन रेल्वेसाठी संपादित होणार आहे, हे समजत नाही. शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे यांनी रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले होते. बेकायदा जमीन मोजणीस हरकत घेतली होती, त्यामुळे रेल्वे भूसंपादनाचे काम ठप्प झाले आहे. या प्रश्नी आता खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन शुक्रवारी पुणे येथे रेल्वे अधिकारी व रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी प्रतिनिधी यांची बैठक घेतली. आता भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सॉफ्टबॉल स्पर्धेत रोटे कॉलेजचे यश

$
0
0

कोल्हापूर : नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरशालेय १९ वर्षाखालील सॉफ्टबॉल स्पर्धेत महावीर कॉलेजच्या बी. एम. रोटे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवला. ह्रषिकेश जाधव, अजय बिंद, आकाश कदम, रोहित पाटील, आदित्य माणगावे, अभिषेक संकपाळ, सौरभ माने, संकेत लडकत, ओंकार पाटील, शिवाजी बनसोडे, अभिषेक मिश्रा, संकेत माने अशी विजेत्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. त्यांना अरुणा डिग्रजे, डॉ. रोहित पाटील, डॉ. बाबासाहेब उलपे, संदीप लंबे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेब्रुवारीत आंतरराष्ट्रीयचित्रपट महोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे ७ ते १४ फेब्रुवारीअखेर ७ व्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा पहिल्यांदाच महोत्सव लक्ष्मीपुरीतील आयनॉक्स मल्टिप्लेक्समध्ये होईल', अशी माहिती महोत्सवाचे संचालक दिलीप बापट यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

बापट म्हणाले, 'सहा वर्षांपासून हा महोत्सव घेतला जातो. प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये महोत्सव होत असतो. मात्र यावर्षी विविध कारणांनी दोन महिने उशिर झाला. दिवसेंदिवस चित्रपट निर्मितीमधील तंत्रज्ञानात झपाट्याने बदल होत आहे. यासंबंधी प्रेक्षकांना माहिती होण्यासाठी महोत्सवात लघुपट आणि माय मराठी चित्रपट दाखवण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १० जानेवारीपूर्वी www.kalamaharshi.org या वेबसाईटवर ऑनलाइनवर विहित नमुन्यातील अर्ज भरावे. महोत्सवासंबंधीची सविस्तर माहितीही या बेवसाईटवर उपलब्ध आहे. स्पर्धेतील शॉर्ट फिल्म अधिकाअधिक ३० मिनिटांपर्यंतच असणे बंधनकारक आहे. विषयाचे बंधन नाही. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार रोख बक्षिसे देण्यात येईल.' पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, उदय कुलकर्णी, मनीष राजगोळकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाखले देण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली असून नोकरी व शिक्षणासाठी दाखले काढण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र कक्ष स्थापून अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सकल मराठा शौर्य पीठाचे समन्वयक राजू सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

'मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर समाजात जातीय तेढ माजवण्याचे अनेक प्रयत्न होत आहेत', असा आरोप प्रा. मधुकर पाटील यांनी यावेळी केला. यावेळी मराठा समाज व पाटील आडनावाबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या 'उपरा'कार लक्ष्मण माने यांचा आणि दहावीच्या संस्कृतच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांविषयी चुकीचे लिखाण करणाऱ्या लातूर येथील लेखकाचा निषेध करण्यात आला. मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला.

पत्रकार परिषदेला चंद्रकांत पाटील, बाळ घाटगे, संपतराव चव्हाण, शिवराजसिंह गायकवाड, सुनीता पाटील, बाबा महाडिक, सुवर्णा मिठारी, सुधा सरनाईक, अनिता जाधव, पूजा पाटील, लता जगताप आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११०० कोटींवर ढपला मारण्याचा सरकारचा डाव

$
0
0

बांधकाम कामगार नेते कॉ. पुजारी यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्य सरकारच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकामाच्या उपकरातून ७५०० कोटी रुपये जमा असून या रक्कमेतून ११०० कोटी रुपये ढापण्याचा भाजप महायुती सरकारचा डाव आहे', असा आरोप राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक कॉ. शंकर पुजारी यांनी पत्रकार परिषदेत केला. बांधकाम कामगारांच्या मूलभूत मागण्यासाठी गुरुवारी (ता. २०) मुंबईतील बांद्रा येथील कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील कामगारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

कॉ. पुजारी म्हणाले,' कल्याणकारी मंडळाकडे ७५०० कोटी रुपये असून आठ वर्षात बांधकाम कामगारांसाठी फक्त ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. चार वर्षात ४०० पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला असताना कामगारांच्या विधवा महिलांना मंडळाने घोषित केलेली दोन लाख रुपयांची रक्कम मिळालेली नाही. बांधकाम कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये देण्याची महत्वाची योजना गुंडाळून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यासाठी कामगारांना प्रिमियम भरण्याची अट घातली आहे. पण एकाही कामगाराने प्रिमियम न भरल्याने विमा रक्कम मिळालेली नाही. अटल विश्वकर्मा योजनेत ११ लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे, पण त्याचा लाभ कामगारांना झालेला नाही. कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्यातील नोंदणी झालेल्या एक लाख कामगारांना घरे बांधण्यात येतील अशी घोषणा केली होती. पण एकाही कामगारांस घर दिलेले नाही अथवा त्यासाठी कर्ज दिलेले नाही. उलट या कल्याणकारी मंडळातून ११०० कोटी रुपये हडप करण्याचा डाव केला आहे. पोषण आहारासाठी ३०० कोटी, कामगार केंद्रासाठी ३०० तर कामगारांना सुरक्षा साधणे देण्यासाठी साडेचारशे कोटी रुपये देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील कामगारांना पोषण आहार देणे अशक्य नसतानाही सरकार आपल्या एजंटांना काम देण्यासाठी ही योजना आखत आहे. तसेच कामगारांना सुरक्षा साधने देण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची असताना सरकार सुरक्षा साधण्याच्या नावाखाली साडेचारशे कोटी रुपये हडप करण्याचा डाव आखत आहे.' पत्रकार परिषदेला भरमा कांबळे, रघुनाथ देशिंगे, शिवाजी मगदूम, आनंदा गुरव, मोहन गिरी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषद भरतीत मराठा समाजास ४८ जागा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'येथील जिल्हा परिषद मेगा भरतीसाठी रिक्त ५६६ जागांपैकी ४८ जागा मराठा समाजाला दिलेल्या 'एसइबीसी' आरक्षित जागेसाठी असतील. उर्वरित जागा खुल्यासह विविध संवर्गासह राखीव असणार आहेत. पुढील चार दिवसात संवर्गनिहाय रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता इतर अटीसंबंधीची जाहिरात प्रसिध्द होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी सुरू आहे', अशी माहिती सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांनी पत्रकारांना दिली.

मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरकारने नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली. जि. प. मधील विविध विभागात रिक्त जागांची बिंदूनामावली निश्चित करण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन अर्ज स्वीकारणे आणि परीक्षा घेण्याचे नियोजन सरकारी पातळीवर होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात जि. प. तील रिक्त जागा निश्चित केल्या. त्यात एकूण ६७७ जागा रिक्त असल्याचे निदर्शनास आले. त्यातील पदोन्नती, अनुकंपातून १११ जागा भरण्यात येणार आहेत. ५६६ सरळभरतीने निवड होणार आहे. त्यासाठी तयार केलेल्या बिंदू नामावलीत सर्वाधिक जागा खुल्या आणि ओबीसी प्रवर्गासाठी मिळणार आहेत.

पदनिहाय रिक्त जागा आणि कंसात एसइबीसीसाठीच्या जागा अशा : औषध निमाण अधिकारी ११ (१), वरिष्ठ सहायक लेखा ५(१), पुरूष आरोग्य सेवक १३८ (११), आरोग्य सेविका २९६ (२४), अंगणवाडी पर्यवेक्षिका ४४ (३), कृषी विस्तार अधिकारी २ (०), वरिष्ठ सहायक २ (०), पशुधन पर्यवेक्षक ४ (१), कनिष्ठ अभियंता स्थापत्य ९ (२), सांख्यिकी विस्तार अधिकारी २ (०), पंचायत विस्तार अधिकारी १ (०), लेघुलेखक निम्म श्रेणी १ (०), कनिष्ठ लेखाधिकारी १ (०), कंत्राटी ग्रामसेवक १४ (३), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ३५ (२), कनिष्ठ यांत्रिकी १ (०).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांच्या निधीतून मामाच्या गावात शाळा

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

मामाच्या गावाची प्रत्येकालाच ओढ असते. मामाच्या गावातील लहानपणीच्या अनेक आठवणी मनात रुंजी घालतात. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मामाच्या गावातील आठवणी जपताना पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावाला खासदार निधीतून कोट्यवधी रुपयांची भेट दिली आहे. त्या निधीतून जिल्हा परिषदेची अद्ययावत शाळा, कम्प्युटर लॅब आणि प्रयोगशाळा होणार आहे. एक कोटी २५ लाखांच्या प्रस्तावित कामांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे.

गोलिवडे एक हजाराहून अधिक लोकवस्तीचे गाव आहे. पवारांनी जानेवारी २०१८ मध्ये गावाला भेट दिली होती. गोलिवडे त्यांचे आजोळ. त्यांच्या मातोश्री शारदाबाई पवार या गोलिवडेच्या भोसले कुटुंबीयांतील. दरम्यान दौऱ्याप्रसंगी पवारांनी शाळेविषयी चौकशी केली. पहिली ते सातवीपर्यंत भरणाऱ्या विद्यामंदिराची इमारत जुनी आहे. इमारतीला ठिकठिकाणी तडे गेल्याचे समजले. पवारांनी शाळेची इमारत अद्ययावत, प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब आणि अभ्यासिकेसाठी अर्थसाह्य करण्याचे ठरवले. त्यांच्याकडून नव्या इमारतीसाठी आवश्यक निधी उपलब्ध केला असून त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यामुळे नजीकच्या काळात इमारत बांधकामाला प्रारंभ होणार आहे.

याशिवाय राष्ट्रवादीचे राज्यसभा सदस्य डी. पी. त्रिपाठी यांच्या निधीतून गावासाठी बहुउद्देशीय सभागृह बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. सभागृहाच्या बांधकामाचा सुमारे ६५ लाखाचा आराखडा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बहुउद्देशीय सभागृहासाठी निविदा आणि अन्य प्रक्रिया राबवली जाईल. पवारांच्या खासदार निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळेची नवी इमारत, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब आणि स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्य प्रसाद खोबरे यांनी गोलिवडे विद्यामंदिराला पवारांचे नाव देण्याबाबत ठराव मांडला होता.

ग्रामस्थांशी चर्चा, आदर्श शाळांची पाहणी

त्यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, केडीसी बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी गोलिवडेला भेट देऊन सरपंच, सदस्यांसह ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जनार्दन अतिग्रे, सरदार चेचर, कृष्णात जाधव, गोपाळ चेचर, अर्जुन पाटील, संजय पाटील, बाबासो शिपुगडे, दिलीप पाटील, रवी शिंदे, युवराज कोंढरे आदींनी पुणे जिल्ह्यातील आदर्श शाळा पाहणीसाठी दौरा केला.

. .. ..

एक कोटी २५ लाखांच्या कामाला प्रशासकीय मान्यता

बहुउद्देशीय सभागृहाचा ६५ लाखाचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता प्रक्रियेत

शाळा इमारत बांधकामासाठी जि. प. बांधकाम विभागाकडून निविदा प्रक्रिया

.. .. . ....

खासदार शरद पवार यांच्या खासदार निधीतून गोलिवडेतील शाळेची इमारत आणि इतर बांधकामाच्या सुमारे सव्वा कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात पत्र प्राप्त झाले आहे. जि. प. स्तरावर सध्या तांत्रिक प्रक्रियेचे काम सुरू आहे. स्थायी समिती सभेसमोर विषय मांडून निविदा प्रक्रिया राबवली जाईल.

तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग (जि. प.)

. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राम मंदिर आस्मितेचा विषय

$
0
0

राम मंदिर आस्मितेचा विषय

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'राम मंदिर हा कोणत्या पक्षाचा किंवा राजकीय विषय नव्हे, तर तो देशाच्या आस्मितेचा विषय आहे,' असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. २४ डिसेंबर रोजी पंढरपुरातील चंद्रभागा मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंदू सभा होणार आहे़ त्या निमित्त मैदानाची आणि तयारीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी पंढरपुरात आले होते़ तेव्हा सरकारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, 'राम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांनी आयोध्यात सभा घेतली़ बाहेरील राज्यातही चांगला प्रतिसाद मिळाला़ या सभेची देशाने दखल घेतली़ त्या नंतर पंढरपुरात सभा होणार आहे़ ही सभा ऐतिहासिक आणि न भूतो न भविष्यती अशीच होईल़ मैदानाची पाहणी केल्यानंतर मैदान मोठे तर आहेच पण तेही कमी पडेल, असे वाटते़ शिवसेनेला एक धार्मिक अधिष्ठान लाभलेले आहे़ त्यामुळे राम मंदिर हा हिंदूच्या अस्मितेचा विषय आहे़ हे मंदिर व्हावे ही शिवसेनेची भूमिका आहे. पंढरपूरचा पांडुरंग कष्टकरी, शेतकरी, कामगार, गोर-गरिबांचा देव आहे़ मुंबईतही बहुसंख्य कामगार आहेत़ देवांचे आणि कष्टकऱ्यांचे आशीर्वाद घेऊन निवडणुकीसाठी सज्ज राहणार आहोत़ सेना सत्तेत असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक राहिली आहे़ सेनेच्या दबावामुळेच आता पंतप्रधान चार लाख कोटी शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याच्या तयारीत आहेत़ झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी शिवसेना सतर्क झाली आहे़ '

सेनेच्या पाठींब्यामु‌ळेच सरकार स्थिर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा-सेनेची युती होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या बाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, 'शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राज्यात सरकार सुस्थितीत आहे़ त्यांना विचार करूनच बोलावे लागते़ तीन राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आली विशेषत: मध्य प्रदेशात सेनेच्या उमेदवारांमुळे भाजपचे काही उमेदवार थोड्या फार मतांनी पराभूत झाले आहेत. कोणाला पाडण्यासाठी आम्ही लढलो नाही, तर शिवसेनेचा विस्तार अन्य राज्यातही व्हावा, म्हणून आम्ही उमेदवार उभे केले होते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images