Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दत्तजयंती उत्सव सुरू

$
0
0

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मार्गदर्शनानुसार श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आझाद चौक येथील दत्त भिक्षालिंग स्थान मंदिरामध्ये शुक्रवारपासून जयंती उत्सवाला सुरुवात झाली. शुक्रवार ते शनिवार (ता. २२) पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शुक्रवारपासून दररोज रात्री भाव व भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहे. जयंती उत्सवकाळात पहाटे सहा वाजता रुद्राभिषेक, गुरुचरित्र वाचन, महापूजा व आरती, तर सायंकाळी कीर्तन आणि रात्री नऊ वाजता भाव व भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी (ता. २२) श्रींचा जन्मकाळ सोहळा पार पडल्यानंतर रात्री आठ वाजता पालखी सोहळा पार पडणार आहे. तर रविवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता नगरप्रदक्षिणा व दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अस्वच्छतेचे आगर

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : भाऊसिंगजी रोडवरील करवीर पंचायत समिती इमारतीमधील सर्वच विभागांत प्रचंड अस्वच्छता आहे. अनेक ठिकाणी इमारतीची पडझड झाली असून छतावरील पत्रे लोंबकळत आहेत. 'कार्यालय नव्हे गोडाऊनच' असचे चित्र दिसते. जिल्ह्यात सर्वात मोठी आणि शहरातील पंचायत समिती कार्यालयाची इतकी वाईट अवस्था असताना लोकप्रतिनिधी काय करतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पंचायत समितीची स्थापना १९६५ मध्ये झाली. त्यापासून ग्रामपंचायत, कृषी, बांधकाम, आरोग्य, शिक्षण आदी विभागासह गटविकास अधिकारी, सभापती, उपसभापती कक्ष, सभागृह या इमारतीत आहे. इमारत, परिसराच्या जागेचे मूळ मालक विजयसिंह घाटगे (रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) आहेत. घाटगे यांनी भाडेकराराने दिलेल्या इमारतीत कार्यालये आहेत. अजूनही दरमहा १५०० रुपये नाममात्र भाडे प्रशासन त्यांना देते. मात्र मालकांनी जागा ताब्यात घेण्याची मागणी केल्यानंतर निर्माण झालेला वाद २०११ मध्ये न्यायालयात गेला. सरकारला निधी खर्च करून नवीन इमारत बांधता आलेली नाही.

या इमारतीच्या देखभाल, दुरूस्ती, डागडुजी करण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी छतावरील अनेक पत्रे गंजलेले आहेत. खिडक्या तुटल्या आहेत. अनेक विभागातील फरशा निघाल्या आहेत. फायली ठेवण्यासाठी जागा नसल्याने अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात. नादुरूस्त साहित्य जागा मिळेल त्या ठिकाणी टाकण्यात आले आहे. भिंतीजवळ गवत आहे. डास उत्पत्तीचे अड्डे निर्माण झालेत. कागदांचा कचरा परिसरात रोज जाळला जातो. त्याचा धूर दिवसभर घुटमळत असतो.

महिला स्वच्छतागृह

महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठीच्या स्वच्छतागृहातून दुर्गंधी सुटली आहे. दार मोडल्याने त्याचा वापर करणे गैरसोयीचे ठरत आहे. यावरून महिलांच्या आत्मसन्माबद्दल प्रशासन किती जागृत आहे, हे पुढे येते. स्वच्छ भारत मोहिमेतर्गंत लोकांना स्वच्छतेचे डोस पाजणारे प्रशासनच स्वच्छतेबद्दल उदासीन असल्याचे दिसते. पुरूष स्वच्छतागृहाची वाईट अवस्था आहे. खेडोपाड्यांतून कामानिमत्त आलेले शेतकरी इतर अभ्यागत स्वच्छतागृहातील डर्टी पिक्चर पाहून आणि दुर्गंधी सहन न झाल्याने निसर्गाच्या सानिध्यात विधी उरकताना दिसतात.

कोपरे, खिडक्यांचे गज रंगलेले

सर्वच विभागातील खिडक्यांचे गज पान, तंबाखू, मावा, गुटखा खाऊन थुंकल्याने रंगलेत. कोपऱ्यात, टेबल, खुर्चीजवळ फायलींचा ढिगारा आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात धूळीचा थर साचला आहे. निर्गत केलेल्या फाईल, अनावश्यक वस्तू, सळ्या, लोखंड, नादुरूस्त संगणक, फॅन, खुर्च्या कृषी विभागात एका बाजूला ठेवल्या आहेत. कोणत्याही क्षणी ते कोसळतील अशा अवस्थेतून एकावर एक रचून ठेवले आहेत.

पंचायत समिती भाड्याच्या इमारतीत आहे. मूळ मालक आणि प्रशासनातील वाद न्यायालयात आहे. यामुळे कायमस्वरूपी चांगली इमारत बांधता येत नाही. हा वाद तडजोडीने सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जागेचा वाद मिटवून चांगली, सुसज्ज इमारत बांधण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घ्यावा. दरम्यान, इमारत दुरूस्तीसाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे २० लाख निधीची मागणी केली आहे.

राजेंद्र सूर्यवंशी, सभापती, करवीर पंचायत समिती

समितीच्या मूळ इमारतीचा ढाचाच गोडाऊनसारखा आहे. त्यामुळे अंतर्गंत, बाह्य सजावट, देखभाल, दुरूस्ती करण्यावर मर्यादा येतात. कार्यालय भाड्याच्या इमारतीत आहे. मालक आणि प्रशासनातील वाद न्यायालयात आहे. परिणामी कायमस्वरूपी इमारत बांधकाम करता येत नाही. नियमित स्वच्छतेच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध आहे. इमारत दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासंबंधी सभागृहात एकमताने निर्णय होत नसल्याने प्रशासनाची अडचण होत आहे.

सचिन घाडगे, गटविकास अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'उजनी'च्या पाण्यावर संशोधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, पुणे/इंदापूर

पुणे, सोलापूर आणि नगर या जिल्ह्यांसह मराठवाड्याला वरदान ठरणाऱ्या उजनी जलाशयाचे पाणी मानवी मैलायुक्त झाले असून, ते आरोग्यास अपायकारक ठरत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर सध्या सोलापूर विद्यापीठाकडून उजनीच्या पाण्यावर संशोधन हाती घेण्यात आले आहे. उजनीच्या पाण्यामुळे विविध आजार होत असल्याचे प्रकार समोर येत असल्याच्या धर्तीवर हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार उजनीतील पाणी मानवी आरोग्य आणि शेतीसाठी अपायकारक असल्याचे निष्कर्ष आहेत.

असा काढणार निष्कर्ष
सोलापूर विद्यापीठातील संशोधकांनी उजनी धरणातील पाण्याचे आठ नमुने संकलित केले आहेत. एका पथकाने पाण्याचे रासायनिक पृथक्करण केले. त्यामुळे पाण्यात डिझाल ऑक्सिजन, बायोकेमिकल ऑक्सिजन, केमिकल ऑक्सिजन डिमांड, नायट्रेट आणि सल्फेटचे प्रमाण किती आहे, ते समोर येणार आहे.

मासेमारी धोक्यात
सध्या उजनी जलाशयावर मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालते. मासेमारीदरम्यान दहा वर्षांपूर्वी विविध प्रजातींचे मासे सापडत होते. मात्र, सध्या ‘चिलापी’ हा अस्वच्छ पाण्यात आढळणारा मासा मुबलक प्रमाणात आढळत आहे. त्याचप्रमाणे इतर माशांसाठी कर्दनकाळ असणाऱ्या मांगूर प्रजातीच्या माशांचे प्रमाण वाढल्याने येथील पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.

उजनी जलाशयातील प्रदूषणामुळे कर्करोगासारख्या रोगाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती धक्कादायक आहे. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यावर प्रशासनाकडून योग्य कार्यवाही करण्यात येईल.

- सोनाली मेटकरी, तहसीलदार, इंदापूर


उजनी जलाशयाने प्रदूषणाची पातळी ओलांडली असून, त्यामुळे जैवविविधतेची साखळी तोडली जात आहे. राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. प्रदूषणामुळे माशांच्या जवळपास पन्नास ते साठ प्रजाती नामशेष झाल्या आहेत.

- भरत मल्लाव, अध्यक्ष, अंबिका मत्स्यमार संस्था, भिगवण


भिगवणसह करमाळा, दौंड, इंदापूर तालुक्यातील अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी सरकारने योग्य ते प्रयत्न करावेत; अन्यथा उजनी जलाशय परिसरातील गावांमध्ये रोगराई पसरण्याचा धोका आहे.

- लता रामहरी चोपडे, सरपंच, भिगवण


तीन जिल्ह्यांतील पाण्याची तपासणी

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाण्यावर सोलापूर विद्यापीठाचे संशोधन सुरू आहे. त्यातून तेथील पाण्याचा मानवी आरोग्य आणि निसर्गावर होणारा परिणाम समोर येईल. प्रयोगासाठी सोलापूर, पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी दोन आणि नगर जिल्ह्यातील एका गावाची निवड करण्यात येणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीत हे संशोधन करण्यात येईल. सोलापूर विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र संकुलात पाण्याची तपासणी होणार आहे. उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील ५१ गावे आणि ४७ हजार कुटुंबे बाधित झाली आहेत. यातील पाच गावे आणि २३५ कुटुंबांचे सर्वेक्षण सोलापूर विद्यापीठाकडून केले जाणार आहे. संशोधनाची मुख्य जबाबदारी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांच्याकडे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मी कोणालाही घाबरत नाही: छगन भुजबळ

$
0
0

पंढरपूर ( सुनील दिवाण )

माझ्यावर किती जरी केसेस टाकल्या तरी माझे तोंड कोणी बंद करु शकणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केले. आयुष्यात आजवर अनेक टक्केटोणपे खाल्लेत अनेक चढ उतार पाहिलेत. हा छगन भुजबळ कोणालाच भीत नाही असे सांगत त्यांनी हिंदीतील एक शेर ऐकवला.

सांगोला येथे माळी समाजाच्या राज्यव्यापी आधिवेशनासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. जेलमधून बाहेर आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून भुजबळ यांनी मोदी आणि फडणवीस सरकारवर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. यामुळे आपल्याला भीती वाटत नाही का असे विचारल्यावर भुजबळ यांनी मोदी सरकारची वाभाडे काढले. नुकताच लागलेला निकाल हा देशातील विविध भागातील राज्यांचा असून सर्वच ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झालाय असे सांगत आता कितीही लाख कोटीची कर्जमाफी दिली तरी जनता यांना साफ केल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे मॅच्युअर नेते असुन असंगाशी संग योग्य नसल्याचे ते जाणतात असे सांगत ते योग्य निर्णय घेतील असा टोला लगावला. देशातील ७० वर्षापासून सुरु असलेल्या न्यायालये, सीबीआय , रिजर्व बॅंक या सारख्या संस्थांची मोदी यांनी वाट लावली असून आता हे सर्व पाहणारी जनता यांना केंद्र आणि राज्याच्या सत्तेतून हद्दपार करेल असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पद कपात केल्यास विद्यापीठ बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठातील पदांचा आकृतीबंध ठरविताना विद्यमान पदांमधून तीस टक्के पदे कपात करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होणार आहे. सरकारने पद कपातीचे धोरण मागे न घेतल्यास राज्यातील सर्व विद्यापीठे बंद करण्यासह तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. राज्यातील अकृषी विद्यीपीठीय कर्मचाऱ्यांच्या तीन शिखर संघटनांच्या प्रतिनिधींची मुंबईत शनिवारी बैठक झाली. तीत हा इशारा देण्यात आला.

सरकारच्या पद कपातीच्या धोरणाला विरोध आणि विद्यापीठीय कर्मचाऱ्यांचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी राज्यभरातील विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या तिन्ही संघटना एकवटल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी परिसरातील सर फिरोजशहा मेहता भवनच्या सभागृहात ही बैठक झाली. यावेळी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र विद्यापीठ अधिकारी फोरमचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुंबई विद्यापीठ कर्मचारी संघाने बैठकीचे आयोजन केले होते.

सरकारी स्तरावरुन विद्यापीठीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याच प्रकार सुरू आहे. दुसरीकडे वेतनत्रुटीरहित वेतन संरचना लागू करणे, सामूहिक सेवा प्रवेश नियम लागू करणे, रिक्त पदे भरण्यास अनुमती देण्याबाबत उच्च शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या बैठकीत झाला. कर्मचाऱ्यांच्या तीनही संघटनांच्या महासंघांची मिळून एक कृती समितीही यावेळी स्थापन करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा

दरम्यान, शिवाजी विद्यापीठातील विविध योजना, बांधकाम विषयक प्रकल्प आणि पदमान्यतेसंदर्भात उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिवाजी विद्यापीठातील अधिकाऱ्यांत मुंबईत चर्चा झाली. विद्यापीठ स्वनिधी व विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत उपलब्ध निधीतून होणारी पदभरती हा या चर्चेचा मुख्य विषय होता. शिक्षण विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, अवर सचिव विजय साबळे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक अजय साळी बैठकीला उपस्थित होते. दरम्यान शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकारने निधीची घोषणा केली होती. त्या निधीसंदर्भात वित्त विभागाच्या अधिकाऱ्यासमेवत नजीकच्या काळात बैठक घेण्याचे ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आकाशात उडणारे जमिनीवर आलेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिले राम मंदिर-मग सरकार असा नारा दिला आहे. खुपिरेत या धार्मिक कार्यक्रमामुळे दिवाळीच साजरी होत आहे. ग्रामदैवत हनुमान मंदिराची उभारणी ही राम मंदिराची सुरुवात म्हणायला हरकत नाही. नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणूक निकालावरून लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होतील असे वाटत नाही. या निकालामुळे आकाशात उडणारे जमिनीवर आलेत' अशी टीका ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली. करवीर तालुक्यातील खुपिरे येथे १० कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या मारुती मंदीर व प्रशस्त ग्रामपंचायत भवनचे उद्घाटन, छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रदीप नरके हे होते.

ग्रामीण विकास राज्यमंत्री दादा भुसे म्हणाले, 'आमदार नरके हे सभागृहात शिवसेनेच्यावतीने शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मांडत असतात. ग्रामीण भागातही शहराप्रमाणे योजना मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आमदार नरकेंचे कार्य अतिशय चांगले सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या करवीरसाठी ५ कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर करत आहे.'

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, 'खुपिरे गावाला आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा निधी विविध कामांसाठी दिला आहे. गावातील भावकीचा राग माझ्यावर काढू नका. सर्वांनी गटतट विसरून एकत्र या. '

सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांचे भाषण झाले. कार्यक्रमास कुंभी बॅंकेचे चेअरमन अजित नरके, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, जि. प. सदस्या कोमल मिसाळ, कुंभीचे कारखान्याचे संचालक संजय पाटील, पं.स. सदस्या यशोदा पाटील, सरपंच तानाजी पाटील, तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील, उपस्थित होते. युवराज पाटील यांनी स्वागत केले. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच सुनीता पाटील यांनी आभार मानले.

गायरानवरील घरे नियमित होणार

'ग्रामीण भागातील गावठाण व गायरानवरील २०११पूर्वीची सर्व अतिक्रमित घरे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याद्वारे ५०० स्केअर फुटांपर्यंतची बांधकामे मोफत तर ५०० ते २००० स्केअर फुटापर्यंत रेडिनेकर दराप्रमाणे दिली जातील' अशी घोषणा राज्यमंत्री भुसे यांनी केली.

महाडिकांचा पुरस्कार खाजगी संस्थेचा

'कोल्हापूरचे खासदार स्वतःच्या पुरस्काराचा जो गवगवा करत आहेत, तो गवगवा म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असा प्रकार आहे. संसदेकडून असा कोणताही पुरस्कार धनंजय महाडिक यांना मिळाला नसून तो एका खाजगी संस्थेचा पुरस्कार आहे. त्यामुळे त्यांनी संसदेत विचारलेले किती प्रश्न कोल्हापूरचे सोडविले? बास्केट ब्रीज कुठे आहे?, विमानतळाचे सुरळीत कधी लागणार?, शिवाजी पूल पूर्ण कधी करणार हे सांगावे? असे आव्हान प्रा. संजय मंडलिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांना दिले.

फोटो

खुपिरे (ता. करवीर) येथील नूतन ग्रामपंचायत भवनचे उद्घाटन करताना ग्रामीण विकास राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार चंद्रदीप नरके, संजय मंडलिक, संजय पाटील, यशोदा पाटील, सरपंच तानाजी पाटील, उपसरपंच सुनीता पाटील व मान्यवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठ तपासतेय गुळाचा दर्जा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी , कोल्हापूर

कोल्हापूरचा गूळ जगाच्या बाजारपेठेत जाताना त्याचा दर्जा उत्तम असावा, येथील उत्पादन क्षेत्राचा पाया आहे. ग्राहकाला चांगल्या प्रतीचा गूळ मिळावा, जेणेकरून कोल्हापूरच्या गूळ निर्मिती परंपरा व ओळख टिकून राहील यासाठी गूळ संशोधन केंद्राच्यावतीने काम सुरू आहे. या पंक्तीत शिवाजी विद्यापीठातील तज्ज्ञ संशोधकांनी आपले सहयोगी पाऊल टाकले आहे. राहुरी कृषी विद्यापीठ संलग्न शाहू गूळ संशोधन केंद्र व शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने कोल्हापूरच्या गुळाचे दर्जात्मक परिक्षण करण्याचे काम सुरु आहे.

जेव्हा एखाद्या शहरातील पदार्थ जगाच्या व्यावसायिक बाजारपेठेत पाठवण्यासाठी उत्पादित केला जातो, तेव्हा त्यामध्ये भेसळ होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे असते. या व्यावसायिक तत्वानुसार चव रंग घटक या आधारे गुळाचा दर्जा तपासला जातो. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री नॅनो सायन्स या विभागातील तज्ज्ञ संशोधकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. गूळ निर्मितीनंतर संशोधन व परीक्षणाद्वारे दर्जा निश्चितीमध्ये अधिकृत टॅग मिळालेला गूळ हा देश व जगाच्या बाजारपेठेत अव्वल ठरण्यास मदत होत आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठातील शास्त्रीय उपकरणे व प्रयोगशाळांचा वापर केला जात आहे. शास्त्रीय परीक्षणासाठी तज्ज्ञ संशोधकांच्या योगदानामुळे गेल्या काही वर्षात दर्जेदार गूळ जागतिक बाजारपेठेत पोहोचला आहे. भविष्यात शिवाजी विद्यापीठाकडे गूळ परीक्षणासाठी स्वतंत्र उपकरणांनी परिपूर्ण कक्ष असावा असे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूद आवश्यक आहे. याबाबत प्रस्ताव देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेमुळे उद्योगांसमोर समस्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची परिस्थिती फारसी दिलासादायक नाही. वीज दरवाढ गंभीर समस्या बनली असल्याने येथील उद्योजकाला अडचणीतून मार्गक्रमण करावे लागते. राज्यातील उद्योजकांना देशपातळीवर पोहोचण्याची संधी असताना त्यांच्या मागे अडथळे निर्माण होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी वीज दरवाढीचा प्रश्न तडीस लावू,' असा विश्वास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने शाहूपुरी जिमखाना येथे शनिवारपासून सुरू झालेल्या 'वेस्टर्न महाराष्ट्र कनव्हर्जन २०१८' या इंडस्ट्रीअल व मशिनरी प्रदर्शन आणि परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

अध्यक्ष मंडलेचा म्हणाले, 'सर्वसमावेशक उद्योजकांचा वेध घेण्यासाठी चेंबर नेहमीच प्रयत्नशील आहे. राज्यातील उद्योजकांना देशपातळीवर संधी उपलब्ध करून देण्यासाठी चेंबरने नेहमीच पुढाकार घेतला. आंतरराष्ट्रीयस्तरावर जाण्यासाठी सर्व घटनांना एकत्र करुन संधीचा ऊहापोह करत असताना, उद्योजकांना वीज दरवाढीला सामोरे जावे लागते. विशेष: पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांची स्थिती फारशी चांगली नसताना वीज दरवाढीचा झटका बसला आहे. वीजपुरवठा करणारी कंपनी राज्य सरकारतंर्गत येत असल्याने दरवाढीचा प्रश्न जटील बनला आहे. दर्जेदार वीज निर्मिती करणे, प्रमुख काम असताना कंपनीमधील त्रुटीचा फटका ग्राहकांना बसत आहे. वीज दरवाढ कंपनीवर आधारित असल्याने दरवाढ ग्राहकांवर लादली जाते. ही दरवाढ उद्योजकांना मारक असून दरवाढीच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी २० रोजी बैठक घेऊन विचारविनिमय करून सरकारी स्तरावर प्रयत्न करणार आहे.'

महापौर मोरे म्हणाल्या, 'शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने परिषद व प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योगजगताला भरभराटी आणण्यात मोलाचे योगदान दिले आहे. युवा उद्योजक घडवण्यास चेंबरचे बहुमोल योगदान आहे.'

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण म्हणाले, 'कोल्हापूर हे सर्वात जुने औद्योगिक क्षेत्र असले, तरी उद्योग क्षेत्राचे अपेक्षित विस्तारीकरण झालेले नाही. भविष्यात उद्योग वाढीसाठी भूसंपादनाला विशेष महत्त्व दिले जाईल.'

'महाराष्ट्र चेंबर राज्यातील उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन देत असून त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना निश्चितीच होईल,' असे मत चेंबरचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.'चेंबरचे माजी उपाध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाच्या माहिती पत्रकाचे व अमर वझलकर व अनिरुद्ध देशपांडे यांच्या 'चक्रव्यूह' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटन समारंभास चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, अमित कामत, जयेश ओसवाल, महावीर गाठ, उमेश दाशरथी, कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे, शुभांगी तिरोडकर, सीमा शहा, सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर प्रवीण तपारिया, मॅनेजर अजित बिरवाडकर, आनंद माने आदी उपस्थित होते.

उद्योजकांचे असहकार आंदोलन

'शेतकरी, उद्योजक सद्य:स्थितीत संकटातून मार्गक्रमण करत असताना उद्योजकांना वीज दरवाढीचा झटका बसला आहे. वीज नियामक आयोगाने सुचवलेल्या शिफारसीनुसार दरवाढीचा निर्णय घेतला असला, तरी सरकाच्या इशाऱ्यानुसारच आयोगाचे कामकाज चालते. दरवाढीविरोधात कायदेशीर मार्गाने आंदोलन सुरू असताना वाढीव वीज बिलाचा भरणा न करता असहकार आंदोलन करणार आहे,' अशी माहिती मंडलेचा यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवाढीबाबत सरकारसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले,'वीज नियामक आयोगाच्या माध्यमातून महावितरण दरवाढीचे प्रस्ताव सरकारला सादर करते. औद्योगिक क्षेत्रासाठी दरवाढ करताना प्राप्त परिस्थितीचा आढावा घेऊन आयोग दरवाढीची शिफारस करते. मात्र सध्या लागू होणारी दरवाढ ही पाच वर्षासाठी असल्याने उद्योजकांनी दरवाढीला विरोध केला. दरवाढीच्या निर्णयानंतर झालेल्या सुनावणीमध्ये औद्योगिक क्षेत्राशी संबंधीत संघटनांनी विरोध केला. संघटनांचा विरोध डावलून आयोगाने शिफारस केल्यानुसार सरकारने दरवाढीचा निर्णय घेतला. दर्जेदार वीज निर्मिती करणे हे मुख्य काम कंपनीचे आहे. त्यामध्ये काही त्रुटीही असू शकतात. मात्र या त्रुटींचा भार व्यापार, उद्योजक व ग्राहकांवर टाकणे हे संयुक्तीक नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अध्यक्ष निवड जानेवारीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

१२ संचालकांनी केलेल्या बंडामुळे अखेर नेतेमंडळींना नमते घ्यावे लागल्याने जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. पुढील प्रक्रिया झाल्यानंतर जानेवारी महिन्यातच अध्यक्ष निवड होणार आहे. अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, रणजित पाटील, पी. डी. धुंदरे यांची नावे आघाडीवर आहेत.

शुक्रवारी संचालक मंडळाच्या बैठकीपूर्वी महाडिक व पी.एन. यांनी बंडाची भाषा करणाऱ्या संचालकांना चांगलेच सुनावले होते. पण सर्व संचालकांनी बंडाची भाषा केला नसल्याचा खुलासा केला होता. गोकुळमध्ये आम्ही दोघेच निर्णय घेणार, असे महाडिक यांनी बजावले असले तरी बंडखोरांची बाजू भक्कम असल्याची कुणकुण लागल्याने अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी रात्री आमदार महाडिक यांच्याकडे राजीनामा दिला. बंडखोरांचे बळ वाढले असल्याने त्याचा फटका आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बसू नये, यासाठी राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरू आहे. पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही, असा दावा महाडिक व पी. एन. पाटील यांनी केला असला तरी अध्यक्ष पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळीच संघाचे वाहन वापरणे बंद केले आहे.

एकीकडे नेते मंडळींनी बंडाची भाषा बोलणाऱ्या संचालकांना दम दिला असला तरी रोष वाढू नये याची काळजी घेताना अध्यक्षांचा राजीनामा घेतला आहे. अध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन अध्यक्षपदासाठी संचालक आपटे, डोंगळे, धुंदरे, देसाई, विश्वास जाधव यांची नावे आघाडीवर आहे. नेत्यांचे एकमत झालेल्या संचालकांच्या गळ्यात अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत नेते मंडळींना लाभ होऊ शकतो, अशाच व्यक्तीला अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. जर ज्येष्ठ संचालकांना विरोध झाला तर नवीन संचालकाला संधी मिळू शकते. त्यामध्ये धैर्यशील देसाई, बाळासाहेब खाडे यांनाही संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२८ डिसेंबरच्या सभेत राजीनाम्यावर शिक्कामोर्तब

अध्यक्षांनी राजीनामा महाडिक यांच्याकडे दिला आहे. कार्यकारी संचालक हा राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करणार आहेत. संचालक मंडळाची सभा २८ डिसेंबरला होणार आहे. अध्यक्षांचा राजीनामा १४ डिसेंबरच्या सभेत की २८ डिसेंबरच्या सभेत मंजूर करुन घ्यायचा याचा निर्णय नेते मंडळी घेणार आहेत. २८च्या सभेत राजीनामा मंजूर झाल्यानंतर पुण्यातील दूग्ध विभागाच्या प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे नवीन अध्यक्षांची निवडणूक जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

नेत्यांकडून राजीनाम्याचा इन्कार

अध्यक्ष पाटील यांनी महाडिक यांच्याकडे शुक्रवारी रात्री राजीनामा दिला. पण पाटील यांनी दिलेले पत्र राजीनाम्याचे नसून पावणेचार वर्षे नेते मंडळींनी काम करण्याची संधी दिल्याचे आभाराचे पत्र आहे, असा दावा केला जात आहे. अध्यक्षांनी राजीनामा दिलेला नाही असे महाडिक व पीएन यांनी सांगितले. गोकुळमध्ये दर दोन वर्षांनी अध्यक्षपद बदलले जाते. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्षपदाबाबत दोघे मिळून निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य नाट्य स्पर्धेत ‘ऱ्हासपर्व’ प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून परिवर्तन कला फाउडेशन या संस्थेच्या 'ऱ्हासपर्व' या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने शनिवारी आहे. तसेच इचलकरंजीतील निष्पाप कला निकेतन सेवा संस्थेच्या 'दो बजनिए' या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाले. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. आजरा येथील कृषीदूत कृषी विज्ञान या संस्थेच्या 'अक्कड बक्कड' या नाटकासाठी तृतीय पारितोषिक जाहीर झाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे कोल्हापुरात १५ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत केशवराव भोसले नाट्यगृह येथे झालेल्या या स्पर्धेत एकूण २४ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. त्यामध्ये 'ऱ्हासपर्व'ला प्रथम क्रमांक मिळाले. याशिवाय या नाटकाला दिग्दर्शन, अभिनय व रंगभूषा या विभागातही पारितोषिक मिळाले. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे कोल्हापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे : दिग्दर्शन: प्रथम: किरणसिंह चव्हाण (ऱ्हासपर्व), द्वितीय: पारितोषिक यशोधन गडकरी (दो बजनिए), प्रकाश योजना: प्रथम: कपिल मुळे (कॅलिगुला), द्वितीय : अनिल सोनटक्के (दो बजनिए), नेपथ्य : प्रतापराव डांगरे (दो बजनिए), द्वितीय : केदार कुलकर्णी (अक्कड बक्कड), रंगभूषा : प्रथम पारितोषिक शंकर टोपले (महंत), द्वितीय : सदानंद सूर्यवंशी (ऱ्हासपर्व), उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक: जितेंद्र देशपांडे (कॅलिगुला) व स्नेहल बुरसे (ऱ्हासपर्व), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे: याज्ञसेनी घोरपडे (ती फुलराणी), वृषाली केळकर (अक्कड बक्कड), कृतिका टेकाळे (अखेरचा सवाल), अंकिता कदम (नूर मोहम्मद साठे), शीतल रावत (एका गर्भाशयाची गोष्ट), डॉ. श्रद्धानंद ठाकूर (अक्कड बक्कड), अनिरुद्ध भागवत (दो बजनिए), अरुण दळवी (वरचा मजला रिकामा) चंद्रशेखर फडणीस (महंत), निलेश अवटी (अवध्य). स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मनोहर धोत्रे, शरद गायकवाड आणि पुरूषोत्तम देशपांडे यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडल अधिकाऱ्यासह तलाठ्यावर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सरकारी कागदपत्रात बेकायदेशीर बदल करून फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूरचे तत्कालीन मंडल अधिकारी एन. बी. बाणदार व तलाठी शंकर सुतार यांच्याविरूध्द जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तलाठी अमोल आनंदा जाधव यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सन २००८ मध्ये मंडलअधिकारी बाणदार व तलाठी सुतार यांनी त्यांच्या व अन्य जणांच्या फायद्याकरिता अधिकारपदाचा गैरवापर केला. सरकारच्या मूळ दस्ताऐवजामध्ये बदल करून खोटी कागदपत्रे तयार केली. पहिला फेरफार नोंदविला असताना त्याच क्रमाकांचा दुसरा फेरफार नोंद करून सर्व्हे क्रमांक १८४/७ च्या उतार्‍यामध्ये फेरफार क्रमांक ८७४९प्रमाणे नोंद केली. तसेच सर्व्हे क्रमांक १८४/४ अ, १८४/ब व १८४/क असे नविन सातबारा तयार करून सरकारची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तलाठी जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तत्कालीन मंडल अधिकारी बाणदार व तलाठी सुतार यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात आणखी तिघांचा समावेश असल्याचे समजते. सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ दाम्पत्याच्या कोठडीत वाढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

सावर्डी (ता. शाहूवाडी) येथे अवघ्या दोन महिन्यांच्या मुलीला कीटकनाशक पाजून ठार मारणाऱ्या जयश्री प्रकाश पाडावे व प्रकाश बंडू पाडावे निर्दयी आई-वडिलांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सोमवारपर्यंत वाढ केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रानमाळे यांनी दिली. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी दोघांना पुन्हा शाहूवाडी-मलकापूर न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने आरोपींची कोठडी वाढविण्याची केलेली मागणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी मंजूर केली. दुसरीही मुलगीच झाल्याच्या रागातून पाडावे दाम्पत्याने तिला थिमेट पाजून ठार मारल्याचे तपासात उघड झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविधतेतून राष्ट्रीय एकतेचे दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यार्थ्यांनी परिधान केलेल्या वैशिष्टयपूर्ण वेशभूषा, विविध प्रातांच्या लोकसंस्कृतीवर आधारित सजीव देखावे, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष अशा जल्लोषी वातावरणात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचा उद्घाटन सोहळा रंगला. राज्य आणि देशाच्या विविध प्रातांतून एकवटलेल्या तरुणांनी विविध संस्कृतीचे सादरीकरण करताना ऐक्याचे दर्शन घडवले.

विद्यार्थ्यांच्या सळसळत्या उत्साहात रंगलेल्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळयात जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी 'कोल्हापूरच्या मातीतून देशभक्तीची शिकवण व विधायक कार्यासाठी नव उर्जा लाभेल. त्या बळावर विद्यार्थी मित्रांनो, स्वत:चा व्यक्तिमत्व विकास घडवा आणि राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे.' अशा शब्दांत युवक युवतींमध्ये स्फुलिंग चेतवले. राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालनालय पुणे आणि शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते.

विद्यापीठातील भाषाभवन सभागृहात शनिवारी सायंकाळी शिबिराचा उद्घाटन सोहळ्याचा कार्यक्रम रंगला. याप्रसंगी शिबिराच्या डायरीचे व प्रा. चांगदेव बंडगर, प्रा. प्रवीण साळुंखे लिखित 'राष्ट्रीय सेवा योजना : संकल्पना व युवक विकास' पुस्तकाचे प्रकाशन झाले. पोलिस अधीक्षक देशमुख म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा कोल्हापूरला लाभला आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात हे शहर 'आयकॉन'म्हणून ओळखले जाते. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे तरुणाईच्या विधायक दृष्टिकोनाचा व रचनात्मक कार्याचा आविष्कार आहे. विद्यार्थ्यांच्या श्रमशक्तीतून गावोगावी झालेल्या रचनात्मक कार्यामुळे राष्ट्रीय सेवा योजनेची नवी ओळख बनली आहे. शिबिरामुळे वेगवेगळया प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान होईल. यामुळे सांघिक भावना आणि राष्ट्रीय एकतेची भावना आणखी वृद्धिंगंत होण्यास मदत होईल.' याप्रसंगी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, वित्त व लेखाअधिकारी व्ही.टी.पाटील, शैक्षणिक सल्लागार प्राचार्य डी.आर.मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिरवणुकीने भरला उद्घाटन सोहळ्यात रंग

उद्घाटन सोहळयाच्या प्रारंभी विद्यापीठातील मुख्य इमारतीपासून मिरवणूक निघाली. विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वेशभूषा, विविध प्रांताच्या लोकसंस्कृतीवर आधारित सजीव देखावे आणि सासनकाठी हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. सहभागी विद्यार्थ्यांनी कोल्हापुरी फेटे परिधान केले होते. हलगीचा ठेका व पारंपरिक वाद्यांच्या तालावर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी नृत्याचा फेर धरला. राष्ट्रीय सेवा योजना पुणे विभागाचे संचालक डी. कार्तिकेयन, प्रभारी कुलसचिव व्ही. एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. डी. के. गायकवाड, सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणूक निघाली. १५ ते २१ डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. शिबिरात राज्य आणि देशातील मिळून १३ विद्यापीठातील शेकडो विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फायलींची पडताळणी सुरू

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या संदर्भातील तक्रारींची पडताळणी प्रशासनाने सुरू केली आहे. तक्रारदारांच्या तक्रारी आणि त्या प्रकरणाशी निगडीत फायलींची तपासणी करण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे. या विभागाकडून प्रत्येक फायलीची तपासणी होणार आहे. पथकात तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान लोहारांच्या चौकशीसाठी नेमलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीने तीन टप्प्यात तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्या तक्रारीनुसार फायली तपासून वस्तुस्थिती पाहिली जाणार आहे. त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या स्वरुपाच्या तक्रारी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही हा विषय गाजला होता. सदस्यांनी त्यांच्यावर पदमान्यता, शिक्षकमान्यतेसाठी अडवणूक, आर्थिक आरोपही केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रिय गुळाकडे वाढतोय कल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रासायनिक गुळामुळे आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता वाढल्याने ग्राहकांकडून सेंद्रिय गुळाची मागणी वाढू लागली आहे. जिल्ह्यातील अनेक उत्पादकांनी शुद्ध सेंद्रिय गूळ तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या गुळाचे उत्पादन वाढू लागले असले तरी सेंद्रिय गुळाला प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने यंत्रणा राबविणे अपेक्षित आहे. तसे झाल्यास या गुळाची निर्यात परदेशात होऊ शकते.

गूळ तयार करताना रासायिनक पदार्थांचा वापर केला जातो. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. रासायनिक पदार्थांचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने जो गूळ तयार केला जातो, तो केमिकलमुक्त म्हणून गूळ ओळखला जातो. हा गूळ तयार करण्याआधीच याची सुरूवात होते. गूळ तयार करण्यासाठी उत्पादित केल्या जात असलेल्या ऊसाच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर टाळला जातो. त्यामुळे अलिकडच्या काळात सेंद्रिय गुळाची मागणी वाढत आहे. सेंद्रिय पद्धतीने ऊस शेती करून केमिकलचा वापराविना तयार केलेल्या गुळापासून सेंद्रिय गूळ तयार केला जातो.

गुळाला पिवळा रंग येण्यासाठी बहूतांश गुऱ्हाळघरात गुळवे सल्फर पावडरचा वापर करतात. मेटानिल यलो पावडर, सोडियम बायकार्बोनेट, झेडएफएफ, सोडियम हायड्रोफॉस्फेट, कॅल्शियम कार्बोनेट अशा रसायनांचा वापर केला जातो. मात्र रासायनिक पदार्थांचा वापर करुन तयार केलेला गूळ खाल्यास शरीरावर त्याचे अपायकारक परिणाम होतात. बाजारात ग्राहकांकडून पिवळा रंग पाहून गूळ खरेदी केला जातो. त्यामुळे व्यापारी गूळ खरेदी करताना पिवळ्या रंगाला अधिक पसंती देतात. केमिकलविरहित, पारंपरिक पद्धतीने गूळ तयार करताना भेंडी, चुना यांचा वापर केला जातो. या गुळाचा रंग पिवळा नसतो. त्यामुळे ग्राहक याकडे पाठ फिरवतात. पण ग्राहकांत जागृती होऊ लागल्याने रसायनविरहित अथवा सेंद्रिय गुळाची मागणी वाढू लागली आहे.

सेंद्रिय गूळ तयार करण्याची सुरुवात ऊस लागवडीपासून होते. उसाचे उत्पादन घेताना कोणत्याही रासायनियक खतांचा वापर केला जात नाही. गांडुळखत, शेण खत, लिंबोळी खतांचा वापर केला जातो. सलग दोन वर्षे अशा उसाची लागवड झाल्यानंतर तिसऱ्यावर्षी उत्पादन केलेल्या उसापासून केमिकल न वापरता तयार झालेला गूळ सेंद्रिय म्हणून ओळखला जातो. बाजारात या गुळाचा दर ६० ते ७० रुपये आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहरांत सेंद्रिय गुळाला मागणी असल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहे. सेंद्रिय गुळापासून तयार केलेल्या पावडरला मोठी मागणी आहे. पण सेंद्रिय गुळाचे सर्टिफिकेट देणारी यंत्रणा कृषी विभागाने कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे उत्पादकांना सेंद्रिय गूळ मॉलमध्ये विक्रीस तसेच परदेशात निर्यात करताना अडचणी येत आहेत. सेंद्रिय गुळाचे उत्पादन, विक्री यांच्या नियोजनाच्या स्तरावर सरकारकडून पुढाकार घेतला जाण्याची गरज आहे.

सेंद्रिय गुळाचे फायदे

- पचनक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त

- गुळात मॅग्नेशिअम असल्याने स्नायू बळकट होतात

- गुळाचे सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढून रक्तदाबावर नियंत्रण राहते

- सेंद्रिय गुळात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने अॅनिमिया रुग्णांसाठी उपयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गूळ दरात घसरण

$
0
0

दर घसरणीमुळे तोट्याचा उद्योग

युवराज पाटील, कुडित्रे

यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात जशी खडतर सुरू आहे, त्याहीपेक्षा बिकट स्थिती गूळ हंगामाची आहे. दरामध्ये होणारी घसरण ही गुऱ्हाळघर मालकांबरोबरच उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. उसाची लागण ते गूळ उत्पादनापर्यंत शेतकऱ्यांना येणारा खर्च आणि बाजारात गुळाला प्रतिक्विंटल दर यात सद्यस्थितीला शेतकऱ्यांना एका आदणामागे ११०० ते १२०० रुपयांचा भुर्दंड बसत आहे. या आर्थिक तोट्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरवली आहे. परिणामी जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांना घरघर लागली आहे. गुऱ्हाळघरांची संख्या १५०च्या आसपास येऊन ठेपली आहे.

आंतरराष्ट्रीय ब्रॅंडचा दर्जा प्राप्त झालेला कोल्हापुरी गूळ सध्या व्यवसायातील अडचणींमुळे पुरता धोक्यात आला आहे. सुरुवातीला हंगामाच्या मुहूर्तावर सौदे काढताना दराचा जो फुगवटा तयार होतो, तो नंतरच्या काही दिवसांत कमालीचा घटतो. गूळ उत्पादनासाठी गुऱ्हाळघरात एका आधणासाठी दोन टन उस लागतो. त्यातून २०० ते २५० किलो गूळ तयार होतो. सध्या बाजारपेठेत सरासरी प्रतिक्विंटल २९०० ते ३४०० रुपये दर मिळतो. प्रत्यक्षात शेतकऱ्याला एका आदणामागे वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे आदींसह ८००० ते ८५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे मिळणारे उत्पन्न ६००० ते ६५०० रुपयांपर्यंतच आहे. एका आदणामागे ११०० ते १२०० रुपयांचा तोटा होत आहे.

सरकारने साखरेला किमान आधारभूत किंमत जाहीर केल्यामुळे २९०० रुपयांच्या खाली साखर विकता येत नाही. गुळाच्या दराला कोणतीही शाश्वती नाही. शेतकरी गूळ उत्पादित करतो. मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानीपणावर गुळाचा दर ठरत असल्याने बाजार समितीत शेतकऱ्यांची खूपच अवहेलना होताना दिसते. व्यापाऱ्यांकडून दर पाडून होणारी खरेदी ही शेतकऱ्यांचे खच्चीकरण करणारी ठरत आहे. बदली गुळाच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूटच होत असते. व्यापाऱ्यांच्या कावेबाजीवर शासनाची भूमिका 'नरो वा कुंजरो वा' अशीच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

साखर कारखान्याला ऊस घातला तर एफाआरपीनुसार प्रतिटन २८०० ते २९०० रुपये दर मिळतो. मात्र गूळ दरातील घसरणीमुळे एक टनाला सर्व खर्च धरून फक्त १७०० ते १८०० रुपयेच मिळत आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी गुऱ्हाळघरांकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या हंगामात बाजार समितीत नोव्हेंबरअखेरचा विचार केला तर गुळाची उलाढाल सुमारे १६ कोटींनी घटल्याचे चित्र आहे. दर मिळत नसल्याने जिल्ह्यात १० वर्षांपूर्वी, सन २०००पर्यंत असलेली गुऱ्हाळघरांची संख्या १५०पर्यंत कमी झाला आहे. भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यात गुऱ्हाळघरे शोधायची वेळ येईल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४ साखर कारखान्यांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोव्हेंबर अखेर गाळप केलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे रक्कम न दिल्याप्रकरणी प्रादेशिक साखर सहसंचालक विभागाने कोल्हापूर विभागातील १४ साखर कारखान्यांना नोटीस बजावली आहे. विभागातील ७५४ कोटी रुपये एफआरपी थकीत असून व्याजासह शेतकऱ्यांना पैसे देण्याचे आदेश दिले असून त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत (ता. १८) देण्याचे आदेश दिले आहेत. कारवाई केलेल्या यादीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी सात कारखान्यांचा समावेश आहे.

ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांनी एफआरपीनुसार उत्पादकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा कायदा आहे. पण कोल्हापूर व सांगली विभागातील कारखान्याकडे सुमारे ७५४ कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रयत क्रांती संघटनेने एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी केली होती. पण एकरकमी एफआरपी देणे अशक्य असल्याचे सांगत कारखानदारांनी जिल्ह्यातील कारखाने बंद ठेवले होते. अखेर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढल्यानंतर कारखाने सुरू झाले. १२ नोव्हेंबरला जिल्हयातील सर्व कारखान्यांनी गाळप सुरू केले. नोव्हेंबर अखेर जिल्ह्यातील कारखान्यांनी ३५ लाख टन उसाचे गाळप केले आहे. कारखाने सुरू होऊन एक महिना उलटूनही एफआरपी जमा न झाल्याने साखर आयुक्तांच्या आदेशानुसार प्रादेशिक साखर सह संचालकांनी बडगा उचलला असून नोटिसा पाठवल्या आहेत. पहिल्या टप्यात नोव्हेंबरअखेर एफआरपी न देणाऱ्या १४ कारखान्यांना नोटीस पाठवल्या आहेत. अन्य कारखान्यांना पुढील आठवड्यात नोटिसा पाठवण्यात येणार आहेत. नोव्हेंबरची थकीत एफआरपी व्याजासह देऊन त्याचा अहवाल घेऊन उपस्थित रहावे, असा आदेश साखर सह संचालकांनी काढला आहे.

नोटिसा दिलेले कारखाने

कोल्हापूर : जवाहर (हुपरी), दूधगंगा वेदगंगा (बिद्री), ओलम अॅग्रो (राजगोळी), दत्त (शिरोळ), शरद (नरंदे), छत्रपती शाहू (कागल).

सांगली : सोनहिरा, राजारामबापू (युनिट साखराळे), राजारामबापू (युनिट वाटेगाव), राजारामबापू (कारंदवाडी), हुतात्मा किसन, क्रांती कुंडल (कुंडल), दत्त इंडिया (सांगली)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूंनी समानतेचा पाया रचला

$
0
0

कर्नाटकचे आमदार सी. एम. इब्राहिम यांचे प्रतिपादन

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कर्नाटकात १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी उज्ज्वल कार्य केले, त्याच पद्धतीचे कार्य राजर्षी शाहू महाराज यांनी केले. सर्वधर्म समभाव तत्वानुसार वसतिगृहांची निर्मिती करून अखंड देशात त्यांनी समानतेचा पाया रचला,' असे गौरवोद्गार कर्नाटकचे आमदार सी. एम. इब्राहिम यांनी काढले.

खासदार संजय काकडे यांच्या निधीतून कॉमर्स कॉलेज प्रभागात उभारण्यात येणाऱ्या डॉ. झाकीर हुसेन ऊर्दू शाळेच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज तर महापौर सरिता मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार इब्राहिम म्हणाले, 'कर्नाटक सरकारने दलितांना २५ लाख घरे दिली. प्रतिमहा ३० किलो रेशन मोफत दिले जात असून शेतकऱ्यांना लिटरमागे पाच रुपये अनुदान दिले जाते. मुलींना 'केजी टू पीजी' पर्यंतचे शिक्षण मोफत दिले जात आहे. पण आशा स्वरुपाच्या कार्याला शाहू महाराज यांनी संस्थांनकाळात सुरुवात केली होती. दलितांना त्यांचा नेता देण्याचे महान कार्य केले. देशात सद्य:स्थितीत व्यापारी मनोवृत्ती वाढीस लागत आहे. ज्या देशाचा कारभार व्यापाऱ्याचा हातात असतो, तेथील जनता भिकारी होतो. आशीच स्थिती सध्या देशाची झाली आहे. त्याला सर्वस्वी विद्यमान सरकार जबाबदार आहे.'

महापौर मोरे म्हणाल्या, 'शाहू महाराजांनी वसतिगृहे बांधली. वसतिगृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य मुलांना शिक्षणाची कवाडे खुली झाली. गोरगरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची प्रक्रिया कायमपणे सुरू ठेवताना महापालिकेकडून सर्वोपोतरी मदत आहे.'

यावेळी कर्नाटकमध्ये साजरी करण्यात येणाऱ्या शिवजयंती उत्सवासाठी आमदार इब्राहिम यांनी श्रीमंत छत्रपती शाहू यांना निमंत्रण दिले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, उपमहापौर भूपाल शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रतिमा पाटील, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, शिक्षण सभापती आशोक जाधव, नगरसेविका निलोफर आजरेकर, गुलाबराव घोरपडे, दुर्वास कदम, विजय खाडे, मुख्याध्यापिका यास्मिन पेटेकर आदी उपस्थित होते. गणी आजरेकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२३ डिसेंबरला बैठक

$
0
0

कोल्हापूर: शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे १९ फेब्रुवारी, २०१८ शिवजयंती साजरी करण्यासाठी रविवारी (ता. २३) सायंकाळी सहा वाजता शिवाजी तरुण मंडळाच्या हॉलमध्ये बैठक बोलवली आहे. बैठकीस पेठेतील सर्व तालीम, संस्था, मंडळे व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपाालिकेविरोधात इचलकरंजीत निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

पे अँड यूज शौचालयाचे सांडपाणी निर्गतसाठी योग्य व्यवस्था नसल्याने सांडपाणी रस्त्यावर पसरुन भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. नगरपालिकेकडे वारंवार मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शनिवारी भागातील नागरिकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करीत निषेध नोंदविला.

शांतीनगर भागातील लाखेनगर, जाधवमळा परिसरात असलेल्या सार्वजनिक तसेच पे अ‍ॅन्ड युज शौचालयांची दूरवस्था होत चालली आहे. यासह रस्त्याच्याकडेला असलेल्या फिरत्या शौचालयातील मैलायुक्त सांडपाण्याचे योग्यरितीने निर्गत व्हावी यासाठी कोणतीही सुविधा याठिकाणी नाही. या भागातील ड्रेनेजचीही दूरवस्था झाल्याने मैलायुक्त सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावरुन वाहते. परिसरातील घरासमोरुनच मैला वाहत असल्याने भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षापणाने परिसरात मलेरिया, डेंगी, स्वाइन फ्लूसारखे साथीचे आजार फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या संदर्भात भागातील नगरसेवकांसह नागरिकांनी सातत्याने नगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन योग्य ती सुविधा करण्याची मागणी केली आहे. पण गंभीर गोष्टीकडेही प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. एखादा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशानसाच्या दुर्लक्षपणाचा निषेध नोंदवत भागातील नागरिकांनी भागात निदर्शने केली. नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर सांडपाण्याच्या निचर्‍यासाठी व्यवस्था न केल्यास नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images