Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

समाजाकडून अभिवादन, सेना-भाजपचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने गुरुवारी हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर सकल मराठा समाजाने आरक्षणच्या लढ्यात बलिदान दिलेल्या ४२ जणांना अभिवादन केले. तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाके फोडून आरक्षणाच्या निर्णयाचा जल्लोष केला. राज्य सरकारने दुपारी विधानसभा व विधानपरिषदेत मराठा आरक्षण विधेयक पटलावर ठेवल्यानंतर ते एकमताने मंजूर करण्यात आले. त्यानंतर सकल मराठा समाजाने 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देत सायंकाळी दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ मेणबत्त्या प्रज्वलित करुन आंदोलनात बलिदान दिलेल्या ४२ जणांना आदरांजली वाहिली. तर भाजपचे कार्यकर्ते दुपारीच रस्त्यावर उतरले. त्यांनी बिंदू चौक आणि दसरा चौकात साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केला. शिवसेनेनेही दसरा चौकात जल्लोष केला.

मराठा समाजाचे हुतात्मांना अभिवादन

राज्य सरकारने मराठा आरक्षणाची घोषणा केल्यानंतर सकल मराठा समाजाने जल्लोष साजरा न करता आरक्षणाच्या प्रश्नी बलिदान दिलेल्या राज्यातील ४२ कार्यकर्त्यांना मेणबत्त्या प्रज्वलीत करून अभिवादन केले. आरक्षणाची लढाई ५० टक्के जिंकली असून पुढची ५० टक्के लढाईसाठी यापुढे लढा देऊ असा निर्धार यावेळी करण्यात आला.

दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला कार्यकर्त्यांनी अभिवादन करण्यात आले. यावेळी समन्वयक वसंत मुळीक म्हणाले, 'राज्य सरकारच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. कोल्हापूर ही आरक्षणाची नगरी आहे. समाजातील तरुणांनी बलिदान दिले आहे. आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर आणि कोर्टात दीर्घकाळ लढा दिला.'

इंद्रजित सावंत म्हणाले, 'गेली तीस-चाळीस वर्षे लढाई देऊन आज आपण एक छोटी पायरी चढलो आहोत. मागासवर्ग आयोगाकडे एक लाख ८७ हजार निवेदने देऊन समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी केली होती. आघाडी सरकारने समाजाला दिलेले आरक्षण सहा महिने टिकले होते. या सरकारनेही स्वतंत्र कोट्यातून आरक्षण दिले आहे. ओबीसींतून आरक्षण न दिल्याने आज ५० टक्के विजय मिळवला आहे असे म्हणावे लागले.'

हर्षल सुर्वे म्हणाले, 'समाजाने ओबीसीमध्ये टक्का वाढवावा केलेली मागणी मान्य झालेली नाही. आजच्या निर्णयाने समाजाला राज्यातील नोकऱ्यांत फायदा होणार आहे. पण केंद्रीय स्तरावरील परीक्षांत फायदा होणार नाही. तसेच हे आरक्षण टिकावे यासाठी समाजाला रस्त्यावरील लढाईबरोबर कोर्टात वकिलांची फौज ठेवावी लागणार आहे.'

मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर यांनी १६ टक्के आरक्षणामुळे मराठा समाजाला सवलती मिळतील अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी स्वप्निल पार्टे, सचिन तोडकर, शाहीर दिलीप सावंत, प्रदीप जाधव, दुर्गेश लिंग्रस, अवधूत पाटील, शशिकांत पाटील, शैलजा भोसले, नेहा मुळीक यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तोडकर, महागावकर यांनी उपोषण सोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यावर सकल मराठा समाज आंदोलनाचे समन्वयक सचिन तोडकर आणि मनिष महागावकर यांनी उपोषण सोडले. मंगळवारपासून दोघे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ उपोषणास बसले होते. यावेळी नगसेवक शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील, प्रताप जाधव, माजी नगरसेवक बाबा पार्टे, अजित राऊत, अनिल कदम, जयेश कदम, बार असोसिएशन माजी अध्यक्ष अॅड शिवाजीराव राणे, अजित मोहिते, गणी आजरेकर, शिवसेना शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, कमलाकर जगदाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळा गेस्ट हाऊसची चौकशी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पन्हाळा येथील विश्रामगृह भाडेतत्वावर देण्यावरून निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी सहा सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीने जिल्हा परिषद सदस्य, ठेकेदार या सर्वांशी चर्चा करुन आठ दिवसांत अहवाल द्यावयाचा आहे. जि. प. च्या स्थायी समितीची गुरुवारी झालेल्या सभेत हा विषय गाजला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

चौकशी समितीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे, सदस्य अरुण इंगवले, राजवर्धन नाईक निंबाळकर, युवराज पाटील यांचा समावेश आहे. पन्हाळा येथील जिल्हा परिषदेच्या मालकीचे विश्रामगृह भाडेतत्वावर देण्याच्या निर्णय वादग्रस्त ठरला आहे. यामागे राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्षातील तालुक्यातील राजकारणातून हा प्रश्न पुढे आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे ठेकेदारांनी भाडेतत्त्वाचा करार झाल्यानंतर विश्रामगृहाचे नूतनीकरण केले आहे.

'स्थायी'सभेत बांधकाम व समाजकल्याण सभापतींनी, ठेकेदारांनी विश्रामगृहाच्या नूतनीकरणासाठी परवानगी घेतली होती, विनापरवाना नूतनीकरण कसे केले असा सवाल उपस्थित केला. शिवाय ३६ सदस्यांनी एकत्रितपणे भाडेतत्वावर देण्याच्या निर्णयाला विरोध केला असल्याचे निदर्शनास आणले. विश्रामगृह भाडेतत्वावर चालवायला देण्यावरुन सभेत जोरदार चर्चा झाली. अध्यक्षा महाडिक यांनी याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील विविध योजनेंसंदर्भातील चर्चेत शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, राहुल आवाडे, जयवंत शिंपी, राहुल पाटील, युवराज पाटील, कल्लाप्पाण्णा भोगण, संध्याराणी बेडगे यांनी सहभाग घेतला.

सभागृह मोठे की अधिकारी

सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावात प्रशासनाकडून परस्पर बदल केले जातात. सभेतील ठरावावर अध्यक्षा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची सही झाल्यानंतर पुन्हा त्या ठरावाशी छेडछाड करण्याचा अधिकार अधिकाऱ्यांना कुणी दिला. सभागृह मोठे आहे की अधिकारी असा सवाल सदस्य अरुण इंगवले यांनी केला. ठरावात बदल केल्याप्रकरणी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यावर अध्यक्षांनी सभागृहातील ठरावाच्या अंमलबजावणी करताना सदस्यांशी चर्चा करावी, अशी सूचना प्रशासनाला केली. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने किचकट प्रक्रिया थांबवावी. नागरिकांना कागदपत्रासाठी हेलपाटे मारायला लावू नये अशी सूचना केली. सीईओ अमन मित्तल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना

महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या कामकाजाविषयी आक्षेप नोंदविले. सदस्यांनी माहिती विचारल्यावर त्या उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यांना एखादे काम सुचविल्यानंतर नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतात हे सभेत मगदूम यांनी निदर्शनास आणले. आंतरजिल्हा बदलीवेळी चुकीची माहिती देणारे शिक्षक आणि शिक्षक समायोजन अतंर्गत सहा शिक्षक कामावर हजर झाले नाहीत, त्यांच्यावर काय कारवाई केली असा प्रश्न उपस्थित झाला. आंतरजिल्हा बदलीप्रकरणी नोटिसा पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर प्रशासनाने दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी’ने मध्यप्रदेशात रेल्वे रोखली

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दिल्लीतील संसद घेराव आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी मध्यप्रदेशातील रतलाम स्टेशनवर एक तास रेल्वे अडवून धरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करताच रेल्वे अधिकारी, प्रशासन हडबडून जागे झाले. तातडीने आंदोलनस्थळी ते दाखल झाले. पुढे येणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथील स्टेशनवर रेल्वेत पाण्यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे आंदोलन मागे घेतले. 'स्वाभिमानी एक्सप्रेक्स' रेल्वे पुन्हा मार्गस्थ झाली.

संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव मिळण्याचा कायदा संसदेत मंजूर करावा, यासाठी विशेष अधिवेशन बोलवावे यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी संसदेला घेराव आंदोलनात होणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते, शेतकरी मिरजहून बुधवारी सकाळी १० वाजता रेल्वेने दिल्लीकडे मार्गस्थ झाले. पुण्याजवळील सासवड येथे सायंकाळी साडे चार वाजता पोहचले. तेथे ट्रॅक मिळला नसल्याने दोन तास रेल्वे थांबली. यामुळे संतप्त शेतकरी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत सासवड स्टेशनवरील रेल्वे रूळावर उतरले. त्यानंतर प्रशासनाने ट्रॅक उपलब्ध करून दिला. रेल्वे मार्गस्थ झाली.

दरम्यान, रेल्व अंतर्गंत स्वच्छता नाही. स्वच्छतागृहांची दुर्गंधी सुटली, पाणी भरले नाही, यामुळे कार्यकर्ते, महिला आंदोलक अस्वस्थ झाल्या. रेल्वे प्रशासनास पाणी उपलब्ध करून देण्यासंबंधी वारंवार विनंती केली. त्यांनी दुर्लक्ष केले. पाणी नसल्याने स्वयंपाक, चहा, नाष्ट करता येईना. यामुळे रतलाम स्टेशनवर गुरुवारी १० ते ११ यावेळेत आंदोलनकांनी स्वाभिमानी रेल्वे रोखून धरली. परिणामी मागून येणाऱ्या सर्व रेल्वेचा मार्ग बंद झाला. मोदी, सरकार, रेल्वे प्रशासनाविरोधात अखंड घोषणाबाजी सुरू ठेवली. त्वरित स्टेशनमास्तरसह इतर अधिकारी येऊन रेल्वेत पाणी देण्याचे आणि स्वच्छता करण्याचे आश्वासन दिले.

मध्यरात्री दिल्लीत पोहचणार

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातून रेल्वे, खासगी बसने निघालेले शेतकरी, आंदोलक मध्यरात्री दिल्लीतील रामलिला मैदानात पोहचणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष, भारतीय किसानसभेच्या नेतृत्वाखालीही शेतकरी जात आहेत.

शेतकऱ्यांनी स्वत:कडील पैशांनी रेल्वे बुक केली. प्रशासनाने रेल्वेत पाण्यासह इतर मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक होते. वारंवार विनंती करूनही रेल्वेत पाणी भरले नाही. स्वच्छतागृहांची स्वच्छता केली नाही. जाणीवपूर्वक प्रशासन सुविधा देत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे मध्यप्रदेशातील रतलाम येथे कार्यकर्त्यांनी एक तास रेल रोको आंदोलन केले.

राजू तळसंगी, रेल्वेतील आंदोलक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुणवंतांना पाठबळ द्या

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

'समाजातील चांगल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना पुढे आणली पाहिजेत. युवा पिढीने समाजातील आदर्शवादी व्यक्तींना पाठबळ दिले, तर समाजातील बहुतांशी समस्यांची निर्गत होईल,' असे मत इचलकरंजी विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी केले. कसबा बावडा येथील युवा मंडळे, राजाराम हायस्कूलचे माजी विद्यार्थी संघ व कै. शहाजी मासाळ फाउंडेशनच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व यशस्वी मान्यवरांच्या सत्कार समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी जयसिंगपूरचे पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे होते.

घाडगे म्हणाले, 'समाजात अनेक चांगल्या व वाईट प्रवृत्ती असतात. परंतु त्यामधील चांगल्या व्यक्तींचा प्रयत्नामुळे समाज प्रगतिपथावर मार्गक्रमण करत असतो. सद्य:स्थितीतील माध्यमक्रांतीमुळे युवकांना प्रत्येक क्षेत्रात करिअर निवडीच्या संधी निर्माण झाल्या आहेत. युवकांनी या संधी शोध घेऊन करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.'

अध्यक्षस्थानावरुन बोलताना पिंगळे म्हणाले, 'समाजात वाईट प्रवृत्ती असली, तरी चांगल्या व्यक्तींची संख्या मोठी आहे. अशा व्यक्तींच्या सहवासामुळे युवकांमध्ये अमुलाग्र बदल घडून येतात. आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे सकारात्मक प्रवृत्ती वाढून कर्तबाग युवक घडतात. अशा कर्तबगारीतून संकटांना सामोरे जाण्याची प्रेरणा मिळून चांगले करिअर घडते.'

यावेळी राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिकारी गणपत पिंगळे, दत्तात्रय मासाळ, सरपंच सचिन चौगले, मृणाल कांबळे, अहिल्या चव्हाण, सिद्धी जाधव, तनिष्का शिंदे, संतोष मिठारी आदींचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या चर्चा

$
0
0

कोल्हापूर: सातव्या वेतन आयोग लागू करण्याची मागणीसाठी मुख्य वित्त सचिवाबरोबर एक डिसेंबरला चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी दिली. खासगी प्राथमिक सेवक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, पतसंस्थेचे चेअरमन आनंदा हिरुगडे, शहराध्यक्ष अनिल सरक आदींनी काटकर यांची भेट घेतली. रसाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 'शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण सचिवासोबत बैठक घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याचे ठरले. मुख्य वित्त सचिवाबरोबर एक डिसेंबरला चर्चा होणार असल्याने येत्या जानेवारीपासून सातवा वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिसऱ्या दिवशीही ठिय्याच

$
0
0

कोल्हापूर : येथील रमणमळा परिसरात वन विभागाच्या कार्यालयासमोर गुरुवारी तिसऱ्या दिवशीही चांदोली अभयारण्यग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरूच राहिले. आंदोलनस्थळी कोणत्याही मूलभूत सुविधा नसल्याने वृद्ध महिला, आंदोलकांची हेळसांड होत आहे. दिवसभर मागण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी एकाही वन अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली नाही. बाधित अभयारण्यग्रस्तांसाठी सरकारकडून ४ कोटी २२ लाख ३० हजार वन विभागाकडे वर्ग झाले आहेत. मात्र, वनप्रशासनाच्या गलथान कारभारामुळे संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. यामुळे श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली वन कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. आंदोलनात मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगले, पांडुरंग पोवार आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार क्लबवर छापा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

येथील नवव्या गल्लीत सारंग कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्या क्लबवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत रोख ३५ हजार रुपये, पाच मोटारसायकली, १९ मोबाइल संच असा अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी वीसजणांना ताब्यात घेतले आहे.

सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकला. यावेळी तीन पानी जुगार खेळत असल्याचे आढळून आल्याने महावीर तात्या पाटील, अरविंद तिप्पाण्णा मिरजे, दशरथ गणपती गाडीवडर (सर्व रा. चिपरी), ईर्शाद अब्बास मुल्ला, भीमराव कृष्णा कलकुटगी (दोघेही रा. सांगली), गौस फक्रुद्दिन शेख, महावीर जिनेंद्र आरवाडे, गुंडाप्पा पोवार, अशोक हुलगाप्पा भोसले, धर्मराज श्रीपती माळी, बबलू खलिफा, समशेर कादर पेंढारी, दुर्गाप्पा कात्याप्पा वैदू, दत्ता शिवाजी जाधव, लखन स्वामी शिर्के, दिलीप काट्याप्पा वैदू , मारुती अंबाजी साळुंखे (सर्व रा. जयसिंगपूर), सुनील रविकांत कलकुटगी (रा.शेडबाळ, ता. अथणी), सुनील रामचंद्र पाटील (रा. कवठेगुलंद), दरगोंडा शंकर पाटील (रा. उमळवाड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सहायक निरीक्षक नामदेव शिंदे, उपनिरीक्षक सुरेश नलवडे, सहाय्यक फौजदार बजरंग माने, साजीद कुरणे, साजीद मुल्ला, गोरखनाथ नाईक, ज्ञानेश्वर काळेल, विक्रम चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाघमारे टोळीवर मोक्का लागणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील गुंड देवेंद्र रमेश वाघमारे टोळीवर मोक्का लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत टोळीप्रमुख वाघमारेसह सहा गुंडांवर मोक्कांतर्गत कारवाई होणार आहे. मोक्का कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. शहर व जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मिळून २१ गुन्हे संबंधित गुन्हेगारांवर नोंद आहेत. वाटमारी, मारामारी, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांखाली त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

मोक्कांतर्गत कारवाईमध्ये टोळीप्रमुख वाघमारेसह आकाश बाबासाहेब बिरजे, लखन चंद्रकांत देवकुळे, सागर पिसे यांच्यावर कारवाई होणार आहे. शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अमृतकर यांनी आठवडाभरापूर्वी वाघमारे टोळीला मोक्का लावण्यासंदर्भातील प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून हा प्रस्ताव मंजुरीसाठी गुरुवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला आहे. पोलिस प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगाराविरोधातील कारवाई तीव्र केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येची धमकी देणारा पोलीस बेपत्ता

$
0
0

पंढरपूर

अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून थेट सोशल मीडियात आत्महत्येची धमकीपत्र देणारा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील कर्मचारी राहुल जगताप दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. यामुळे पोलीस विभाग हादरला आहे.

पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व एक कर्मचारी वारंवार त्रास देतात. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, असं पत्र कॉन्स्टेबल राहुल जगताप यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलं होतं. यानंतर तो गेल्या दोन दिवसापांसून बेपत्ता असल्याचं त्याच्या कुटुंबीयांनी सांगितलं. पोलिसांनी जगतापचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्याप त्याचा कोणताही ठावठिकाणा मिळालेला नाही. जगताप याचा मोबाइल देखील दोन दिवसापासून नॉट रिचेबल आहे.

पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांमधील तणाव आणि बेबनाव या नित्याच्याच गोष्टी असल्या तरी एखाद्या कर्मचाऱ्याने थेट सोशल मीडियावर आत्महत्या करीत असल्याचं पत्र व्हायरल केल्याने याची चर्चा जिल्हाभर सुरू झाली आहे. राहुल जगताप हा वयाने लहान असून त्याला पत्नी आणि लहान मुलगा आहे. अशा स्थितीत त्याचा अजूनही शोध लागत नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत. दरम्यान जगताप याचा शोध सुरू असून तो सापडल्यावर त्याच्याकडून माहिती घेऊन अहवाल गृहविभागाला दिला जाणार आहे. यात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवाडे यांनी सांगितलं.

66879228

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्याचे आज जंगी स्वागत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रिमंडळात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे भाजपच्यावतीने आज शनिवारी जंगी स्वागत होणार आहे. दुपारी तीन वाजता सायबर चौकातून स्वागत रॅली काढण्यात येणार आहे.

विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गुरुवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे अध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. या निर्णयानंतर पालकमंत्र्यांचे शनिवारी दुपारी तीन वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार असून कोल्हापूरकरांच्यावतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर सायबर चौकातून शहरातील प्रमुख मार्गावरुन मोटारसायकल व कारची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. रॅली मार्गावर पालकमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करणार आहेत. रॅलीचा मार्ग विमानतळ, सायबर चौक, राजारामपुरी मारुती मंदिर, जनता बाजार चौक, बागल चौक, उमा टॉकीज, रिलायन्स मॉल, टायटन शोरुम, दसरा चौक, सीपीआर चौक, महानगरपालिका, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळावेस, तटाकडील तालीम, निवृत्ती चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी असा असून बिंदु चौकात रॅलीचे विसर्जन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा कारागृहाचा सुरक्षारक्षक निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा कारागृहातील सुरक्षारक्षक राकेश शिवाजी पवार ( वय ३०, रा. माळेगाव, ता. बारामती, जि. पुणे) याला कारागृह प्रशासनाने शुक्रवारी तडकाफडकी निलंबित केले. वाईतील सीरियल किलर आणि कळंबा कारागृहातील कैदी डॉ. संतोष पोळ (रा. धोम. ता. वाई) याला मोबाइल पुरविल्याच्या संशयावरुन पश्चिम विभागाच्या उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी अन्य सहा प्रशिक्षणार्थी सुरक्षारक्षकांची चौकशी सुरु आहे. त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्याची शक्यता आहे.

न्यायालयीन कोठडीतील कैदी डॉ. पोळने कारागृहात खोटे पिस्तूल तयार करून २७ नोव्हेंबरला व्हॉट्स अॅपवरुन क्लिप व्हायरल केल्याने कळंबा कारागृह प्रशासन हडबडले होते. पोळकडे केलेल्या चौकशीत पिस्तूल खोटे असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी उपमहानिरीक्षक साठे यांनी कारागृहातील संशयित दहाजणांची चौकशी करुन अहवाल तयार केला होता. तो अप्पर कारागृह महासंचालक राजवर्धन यांच्याकडे सादर केला जाणार असल्याचे महानिरीक्षक साठे यांनी सांगितले.

या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

कारागृह अधीक्षक शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाइल प्रकरणात कारागृहातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात आले. पोळच्या बरॅककडे जाणाऱ्या दहा ते बारा कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली. कारागृहातील विविध कार्यक्रमात पोळ याच्यासोबत कोणते कर्मचारी, अधिकारी आणि अन्य कैदी होते याचीही कसून चौकशी करण्यात आली. यात सुरक्षारक्षक पवारने पोळला छुप्या मार्गाने मदत केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले. त्याचे वर्तन सुरुवातीपासून संशयास्पद होते. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणात आणखी पाच प्रशिक्षणार्थी सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. पवार जून २०१८ मध्ये कळंबा कारागृहात रूजू झाला आहे. त्याची एकूण दहा वर्षांची सेवा झाली आहे. त्याची सोलापूर कारागृहातून कळंबा कारागृहात बदली झाली असून दीड वर्षापासून कळंबा कारागृह सेवेत आहे. दरम्यान, पोळची रवानगी दोन दिवसांपूर्वी येरवडा कारागृहात झाली आहे.

.. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलअभियंत्यांना परत पाठवा

$
0
0

स्थायी समिती सभेत सूचना, जलवाहिनी दुरुस्ती, मळीमिश्रीत पाण्यावरुन पाणीपुरवठा विभाग धारेवर

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाइपलाइन दुरुस्तीसाठी फोन केल्यानंतर जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांचा फोन बंद असतो. भोगावती कारखान्यामुळे शहरात दुषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला, त्या कारखान्यावर कोणती कारवाई केली, अशी प्रश्नांची सरबत्ती करत पाइपलाइन दुरुस्ती कामाची पूर्तता होत नसेल, तर कुलकर्णी यांना पुन्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पाठवा, अशी सूचना स्थायी समिती बैठकीत सदस्य अफजल पिरजादे यांनी केली. अन्य सदस्यांनीही पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली. तसेच थकीत पाणी बिलांबाबत धोरण ठरवण्याची सूचना केली.

दोन महिन्यांपूर्वी शहरात झालेल्या पाणीपुरवठा नियोजनातील त्रुटी काही प्रमाणात कमी झाल्या असल्या, तरी अद्याप काही प्रभागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदी मळीमिश्रीत झाल्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठक उमटले.

दीपा मगदूम म्हणाल्या, 'मुख्य जलवाहिनीसह अनेक उपजलवाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. लिकेजमधून पाण्याची नासाडी होत असल्याने त्याचा हिशोब ठेवावा. जलवाहिनी दुरुस्ती करताना उपजलवाहिन्यांची दुरुस्ती त्वरीत करावी.' तर डॉ. संदीप नेजदार यांनी पाणीपुरवठा खंडीत केल्यानंतर परस्पर कनेक्शन जोडून घेतले जाते, त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना केली.

संभाजीनगर येथील एअर व्हॉल्वचे काम सुरू असून शनिवारी दुपारपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे पाणी सोडण्यात येईल. तसेच कावळा नाका येथील दुरुस्तीसाठी ठेकेदाराला तीन महिन्याची मुदत दिली असल्याचा खुलासा प्रशासनाने केला.

अफजल पिरजादे म्हणाले,' शहरात अनेक ठिकाणच्या गळती काढण्यासाठी जलअभियंता कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधल्यास त्यांचा फोन बंद असतो. पंचगंगा नदीचे पाणी मळीमिश्रीत होऊन शहरात दुषित व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला. याबाबत शहर पाणीपुरवठा विभागाने कोणतीच कार्यवाही केली नाही, त्यामुळे कुलकर्णी यांना पुन्हा त्यांच्या मूळ विभागाकडे परत पाठवावे.' यावर रजेवर असल्याने फोन बंद असल्याचे स्पष्टीकरण देत यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

गोवर व रुबेला लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवल्याबद्दल भाग्यश्री शेटके यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. पण सभापती आशिष ढवळे यांनी लसीकरण मोहिमेदरम्यान रिअॅक्शन येत आहे, याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, अशी विचारणा केली.' लसीकरणादरम्यान रिअॅक्शन येऊ शकते, अशी शक्यता सरकारने गृहीत धरली असून, त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक ठेवण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

......................

चौकट

पार्किंगसाठी बुधवारी बैठक

व्हिनस कॉर्नर येथील गाडी अड्ड्यात ट्रॅव्हल्स पार्किंग करण्यासाठी स्थायी समितीमध्ये चर्चा झाली . चर्चेनुसार महापालिका प्रशासनाने शहर वाहतूक विभाग आणि ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. याबाबत पुन्हा बुधवारी (ता. ५) बैठक होणार आहे. बैठकीत गाडी अड्ड्यातील पार्किंगचा निर्णय झाल्यानंतर दाभोळकर कॉर्नर येथील वाहतूक कोंडी कमी होण्याची शक्यता आहे.

.........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंद्रीय शेतीचा गणपतराव पाटील यांचा ध्यास स्तुत्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून परिसराचे नंदनवन करण्याचा ध्यास घेतला आहे. क्षारपड शेतजमीन पिकाऊ करण्याबरोबरच सेंद्रीय शेतीसाठी ते प्रयत्नशील आहेत. सेंद्रीय साखर उत्पादन करणारा कारखाना म्हणून दत्तचा नावलौकीक होईल,' असे प्रतिपादन अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी केले. शिरोळ येथे दत्त साखर कारखान्यात सेंद्रीय साखर पोत्यांचे पूजन व उच्चांकी ऊस उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी दत्त साखरचे अध्यक्ष गणपतराव पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे प्रमुख उपस्थित होते.

काडसिध्देश्‍वर स्वामी पुढे म्हणाले, गणपतराव पाटील यांनी फळबागा, मातीविना शेती, हरितगृह उत्तम रितीने सुरू ठेवून नव्या पिढीसमोर आदर्श ठेवला आहे.'

अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे म्हणाले, 'सेंद्रीय शेती ही काळाची गरज आहे. यामुळे भविष्यात सेंद्रीय शेतीशिवाय पर्याय नाही. गणपतराव पाटील यांच्याकडून शेतीतील नवनवे प्रयोग पहायला मिळतात.'

गणपतराव पाटील म्हणाले, 'तालुक्यात अतिपाणी आाणि रासायनिक खतांचा अतिवापर यामुळे शेतीसह मानवी जीवनावर परिणाम होत आहे. यामुळे शिरोळ तालुक्यात सेंद्रिय शेतीसाठी जागृती केली. तालुक्यात क्षारपडमुक्तीचा आम्ही विडा उचलेला आहे. यास शेतकर्‍यांचा प्रतिसाद आहे.'

सेंद्रिय शेती केलेल्या ज्योतीकुमार पाटील (कागवाड), कलगौंडा पाटील (दानवाड), गजानन गिरमल (चाँद शिरदवाड) तसेच चवगोंडा पाटील, भरत सुतार, कमल तलवार, कृष्णा मोटे, महादेव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी टाकळी बोलवाडचे मठाधीपती शिवदेव स्वामी, नितेश ओझा, नंदूआण्णा माणगावकर, आण्णासाहेब पाटील, शिरोळ पंचायत समिती सभापती अर्चना चौगुले, उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक रणजित कदम, बाबासाहेब पाटील, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, विश्‍वनाथ माने, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, इंद्रजित पाटील, रावसाहेब नाईक, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील, महेंद्र बागे, संचालिका यशोदा कोळी, उपस्थित होते. शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा यांनी आभार मानले.

फोटो

शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यात सेंद्रीय साखर पोती पूजनप्रसंगी काडसिध्देश्‍वर स्वामी, शिवदेव स्वामी, अप्पर अधिक्षक श्रीनिवास घाडगे, गणपतराव पाटील व मान्यवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटका घेणाऱ्या पंधरा जणांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील अवधूत आखाडा परिसरात घरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्या पथकाने छापा टाकून मटका घेणाऱ्या १५ जणांना रंगेहात पकडले. कारवाईत रोख ३८९४ रुपयांसह ६ मोटारसायकली, २४ मोबाइल व अन्य साहित्य असा सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरमालक प्रमोद शिरढोणे व अड्डाचालक समीर जमादार या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून दोघेही फरारी आहेत. मध्यवस्तीतील मटका अड्ड्यावरील कारवाईने खळबळ उडाली आहे.

गावभागातील अवधूत आखाडा येथील एका घरात मटका घेतला जात असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक बिरादार यांना मिळाली. गुरुवारी रात्री त्यांच्या पथकाने छापा टाकला. प्रमोद शिरढोणे याच्या मालकीच्या घरात अड्डा सुरू असल्याचे दिसले. छाप्यावेळी मोबाइलवरुन मटका घेत असलेल्या शशिकांत वसंत घडवीर (वय ५९ रा. वेताळपेठ), जावेद पापालाल मोमीन (३३ संग्राम चौक घोडकेनगर), दत्तात्रय चंद्रकांत पाटील (३१ रा. मंगळवारपेठ), अमीत जवाहर शहा (३७ रा. स्वामी मळा), मधूकर विष्णू कांबळे (४७ रा. आंबेडकर चौक चंदूर), समरजीत शिवाजी पाटील (३१ रा. अवधूत आखाडा), महमंदजुबेर आलम मुल्ला (३३ रा. शेळके गल्ली कुरूंदवाड), निलेश आप्पासाहेब पाटील (२९ रा. जैन बस्ती), आप्पासाहेब भाऊसो पाटील (३३ रा. खाडगल्ली), अजय बाळासो जाधव (२२ रा. सारवान बोळ), सागर दत्तात्रय गिरगावे (२७ रा. त्रिशुल चौक), मंगेश चंद्रकांत गडकरी (२० रा. पाटीलवाडा), आकाश दत्तात्रय चंदूरे (२५ रा. त्रिशुल चौक), चंद्रकांत धोंडीराम चंदूरे (४२ रा. त्रिशुल चौक), हारुण गुलाब मुजावर (३० रा. अवधूत आखाडा) या पंधरा जणांना अटक केली. कारवाईत एकूण ३ लाख २ हजार १९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घरमालक प्रमोद शिरढोणे व मटका अड्डाचालक समीर जमादार हे दोघे फरारी झाले आहेत. कारवाईनंतर रात्री उशीरापर्यंत गावभाग पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारणा योजनेची निविदा रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

बहुचर्चित व राजकीय कुरघोड्यांमुळे रखडलेली वारणा नदी उद्भव धरुन पाणीपुरवठा योजनेसाठी मागविण्यात आलेली कामाची निविदा रद्द करण्याची नामुष्की सत्तारुढ गटावर आली. मुदतीत काम सुरू न झाल्याने निधी सरकारला परत जाणार असल्याने हे काम आता रखडण्याची चिन्हे आहेत. यांसह नगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्याच्या सुधारीत अंदाजपत्रक मंजूर करणे, आरक्षण बदलणे आदी विषयांवरुन सत्तारुढ आणि विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. तर शहापूर तलावात खाजगी पद्धतीने बोटिंग सुरू करण्याच्या विषय सत्तारुढ गटाने बहुमताच्या जोरावर मंजूर करुन घेतला.

विविध ४५ आणि ऐनवेळच्या ५ अशा ५० विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शनिवारी बोलविलेली सर्वसाधारण सभा चार तास चालली. सभेचे कामकाज सुरु होताच काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी सभेचा अजेंडा काढण्यास पालिकेने घाई का केली? असा सवाल उपस्थित करुन रात्री सभेचा अजेंडा वाटण्यात आला. तेव्हा हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत आक्षेप घेतला. त्यावर सभाध्यक्षा स्वामी यांनी याबाबत पुढील काळात खबरदारी घेऊ असे स्पष्ट केले.

शाहू आघाडीचे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी २९ ऑक्टोबरच्या सभेत अग्निशमन दलासंदर्भातील कामासाठी ९ लाख २६ हजार रुपयांच्या कामांना मंजूरी दिली असताना शहरातील विविध कामांसाठी १२६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याचा ठराव करण्यात आला. ज्या विषयावर चर्चा झाली नाही, त्या विषयाचा ठराव कसा झाला? चर्चा एकावर अन् ठराव दुसऱ्यावर करीत असेल तर सभा कशासाठी आयोजित केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला.

वारणा नदी उद्भव धरुन पाणीपुरवठा योजनेसाठी मागविण्यात आलेल्या कामाच्या निविदेची मुदत संपल्याने ही निविदा रद्द करण्याच्या विषयावर विरोधी काँग्रेस व शाहू विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सत्तारुढ गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल चोपडे यांनी 'पाण्यासारख्या गंभीर विषयाची निविदा रद्द करण्याची वेळ आली. पंचगंगा नदीची वाईट अवस्था असताना कृष्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने निधी देण्याचे आश्वासन दिले. सहा महिने उलटले तरी कोणतीच कार्यवाही नाही. वारणा योजनेचे काम सुरू व्हावे यासाठी खासदार राजू शेट्टी, राजेंद्र पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यातून मार्गही निघेल. तत्पूर्वी कृष्णा योजनेच्या दुरुस्तीचे काम केव्हा सुरू होणार' असा सवाल केला. यावर भाजपाचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी वारणा व कृष्णा योजनेच्या कामासाठी आमदार सुरेश हाळवणकर प्रयत्नशील असून लवकरच यामधून मार्ग निघेल असे सांगितले. यावरुन सत्तारुढ व विरोधी गटात चांगलीच शाब्दिक खडाजंगी उडाली. आमदार, खासदारांवर टीका झाल्याने सभागृहात गोंधळ उडाला.

नगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील नव्या सभागृहाच्या बांधकामाचे सुधारित २ कोटी ५३ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकावर विठ्ठल चोपडे यांनी आक्षेप घेत पूर्वी केलेल्या २.४९ कोटीच्या अंदाजपत्रकामध्ये सभागृहाचे बांधकाम धरले होते की नाही याचा खुलासा करण्याची मागणी केली. यावर नगरअभियंता बापूसाहेब चौधरी यांनी सभागृहाच्या बांधकामासह इतर गोष्टींचा उल्लेख केला होता. परंतु सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याचा खुलासा केला. चोपडे यांनी मग निधी कशावर खर्च केला?, मक्तेदार सुदर्शन पाटील यांनी कामात नगरपरिषदेची दिशाभूल केल्याचे सांगत सुधारीत २ कोटी ५३ लाखाच्या अंदाजपत्रकामुळे पालिकेचे नुकसान होणार असल्याचे सांगितले. या विषयावरही जोरदार खडाजंगी उडाली. या विषयावर समिती नेमण्याचा निर्णय झाला. विविध जागांवरील आरक्षणे उठविण्याचे चार विषय सत्तारुढ गटाने नियोजन समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर ते सभागृहासमोर आणावेत अशी चर्चा होऊन ते पुढील सभेत घेण्याचे ठरले. तर शहापूरातील भू संपादनाच्या विषयावर चर्चा होऊन तो मंजूर करण्यात आला. शहापूर खाणीत खाजगी बोटींग सुविधा सुरू करण्याच्या विषयाला चोपडे यांनी विरोध केला. ही खण नगरपालिका मालकीच्या जागेत नसताना त्याठिकाणी बोटिंग सुविधेचा विषय सभागृहात घेणे हे बेकायदेशीर आहे. ही जागा नगरपालिकेने ताब्यात घ्यावी आणि त्यानंतरच बोटींगचा विषय आणावा असे सांगितले. त्यावर पक्षप्रतोद पोवार यांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित न करता शहराच्या विकासासाठी हा विषय मंजूर करा. जिल्हाधिकाऱ्यांनी खाण सुशोभिकरणाबाबत पालिकेला सूचना दिल्या आहेत. खाणीची जागा पालिकेच्या ताब्यात घेण्यासाठी आमदार हाळवणकर प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यावर विरोधकांचे समाधान न झाल्याने अखेर हा विषय मतदानाला घेऊन तो सत्तारुढ गटाने २४ विरुध्द १२ अशा बहुमताने तो मंजूर केला.

नगरसेविका अनिता कांबळे यांचा सभात्याग

नगरपरिषदेच्यावतीने कोणालाही विश्वासात न घेता बौध्दविहार परिसरात एसटीपी प्रकल्पाचे काम केले जात आहे. हा बौद्ध समाजावर अन्याय असून हे काम तातडीने थांबविण्याची मागणी करत राजर्षि शाहू आघाडीच्या नगरसेविका अनिता कांबळे यांनी प्रशासनाच्या कृतीचा निषेध करत सभात्याग केला.

मुख्याधिकारी संतापले

एसटीपी प्रकल्पाबाबत सभागृहात चर्चा सुरु असताना विरोधी सदस्यांनी नगरसेवकांना विश्वासात न घेता पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाचे काम सुरू केल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर सत्तारुढ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा दबाव असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी काम सुरू केल्याचे सांगून या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी सदस्यांनी यावर मुख्याधिकार्‍यांनी खुलासा करावा अशी मागणी करताच मुख्याधिकारी दीपक पाटील संतापले. काम करायचे की नाही हे नगराध्यक्षांनी स्पष्ट सांगावे असे म्हणत त्यांचा पारा चढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध दारू अड्डयांवर शाहूवाडी पोलिसांचा छापा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्गालगत ठमकेवाडीफाटा (ता. शाहूवाडी) येथील संग्राम लॉजच्या तळमजल्यात चालणाऱ्या अवैध दारू अड्यावर शाहुवाडीचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी छापा टाकून देशी-विदेशी कंपन्यांची दारू, बिअर व रोख रक्कम मिळून १३ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित जागा मालकासह चौघांविरुद्ध मुंबई मद्यनिषेध अधिनियम ३८६/१८ अंतर्गत विविध कलामांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक व्ही. एन. जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी आठच्या सुमारास शाहूवाडी पोलिस ठाण्याकडे निघालेले निरीक्षक मनोहर रानामळे व पो. कॉन्स्टेबल भरत मोळके हे बांबवडे-गोगवे दरम्यानच्या ठमकेवाडीफाटा येथील संशयित क्लबच्या चौकशीसाठी संग्राम लॉजमध्ये गेले असता लॉजच्या इमारतीच्या तळमजल्यावर दारुचा अड्डा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अड्डाचालक दिलीप हिंदुराव शेळके, (रा. डोणोली, ता. शाहूवाडी) याच्याकडे रानमाळे यांनी अधिक चौकशी केल्यानंतर हा अवैध दारू व्यवसाय समोर आला. बांबवडे दुरक्षेत्राचे उपनिरीक्षक शशिकांत गिरी, सहाय्यक फौजदार पवार, हवालदार सुधीर अपराध, विश्वास चिले, धनाजी सराटे, माणीक पटील यांना पाचारण करून रानमाळे यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून जागामालक गामा बाळू ठमके (रा. ठमकेवाडी, ता. शाहूवाडी), अड्डाचालक दिलीप शेळके, व्यवस्थापक सिद्धेश दिलीप जाधव (वय २३, रा. ठामकेवडी, ता. शाहूवाडी), ग्राहक अक्षय तुकाराम पाटील (वय २१) यांच्याविरोधात गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लच्या हिताआड कुणाला येऊ देणार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'मला गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीत राजकारण करायचे असते तर सध्या येथे जनता दलाची सत्ता असल्याने मी निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करू शकलो असतो. परंतु चांगल्या कार्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. या हद्दवाढीला राजकीयसह कोणत्याही मार्गाने विरोध करणारा या शहराचा विरोधक असेल. गडहिंग्लच्या हिताआड कुणाला येऊ देणार नाही' असा इशारा 'म्हाडा'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिला.

गडहिंग्लज नगरपरिषद आणि बड्याचीवाडीच्या नागरीकांच्यावतीने हद्दवाढीच्या उद्घोषणेबाबत घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीला २७ तारखेलाच अधिकृत मंजुरी मिळाली असे म्हणता येईल, असे सांगून घाटगे म्हणाले, 'आज या व्यासपीठावर सर्वपक्षीय लोक आहेत. मग तक्रारी हरकती कोण करणार? जाणून-बुजून राजकारणातून तक्रार होणार असेल तर याची जबाबदारी गडहिंग्लजकरांनीच घ्यावी. इतर तक्रारींची समजूत काढणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे हद्दवाढीची अंतिम घोषणा ही लवकरच करू. बड्याचीवाडी गावाशिवाय हद्दवाढ झालीच नसती. त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. राजकीय विषय बाजूला ठेवू. या प्रक्रियेत मी एक निमित्त आहे. २०१९साठी ही उठाठेव असल्याचा आरोपही होईल. पण मला याचे श्रेय नको.

अशाच पद्धतीने तुमचा विश्वास जिंकण्याची संधी द्या.'

नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, 'गडहिंग्लजची हद्दवाढ ही काळाची गरज होती. त्यामुळे परिसराचा विकास खुंटला होता. आमदार मुश्रीफांसह आम्ही सर्व नेत्यांना भेटलो. परंतु समरजितसिंह घाटगे यांना भेटल्यानंतर त्यांनी याची उद्घोषणा करेपर्यंत जी गती घेतली, त्यावरून आम्हाला खात्री आहे की येत्या काळात घाटगे शहराचा विकास करू शकतील.'

हद्दवाढ कृती समितीचे निमंत्रक रमजान अत्तार म्हणाले, 'केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी गडहिंग्लजचा हद्दवाढीचा प्रश्न रखडला. परंतु आमदारपद नसतानाही घाटगेंनी इथल्या नागरिकांच्या वेदनेला फुंकर घालण्याचे काम केले.'

मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास हद्दवाढ कृती समिती अध्यक्ष एम. एस. बेळगुद्री, सभापती जयश्री तेली, मन्सूर मुल्ला, प्रकाश पाटील, बड्याचीवाडीचे सरपंच सतीश कोळेकर आदी उपस्थित होते. राजेंद्र तारळे आदी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रेड युनियनची निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध पक्ष, शेतकरी संघटनांच्यावतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिल्लीत संसदेला घालण्यात आलेल्या घेराओला पाठिंबा देण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, भारतीय कामगार संघटनेने शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे दिल्लीत संसदेला घेराव आंदोलन झाले. त्याला पाठिंबा देण्यासाठी करण्यात आलेल्या निदर्शनात ट्रेड युनियनचे कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार, ए. बी. पाटील, दत्ता माने, सुभाष जाधव, आबा डोंगरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंजूर कामांच्या प्रोसिडिंगसाठी हुपरीत नगरसेविकेचा रुद्रावतार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील नगरपरिषदेच्या यापूर्वीच्या पाच सर्वसाधारण सभांत मंजूर केलेल्या कामांचे प्रोसिडिंग नगरसेवकांना तत्काळ मिळाले पाहिजे. त्याशिवाय सभा सुरु करू नये असा आक्रमक पवित्रा नगरसेविका रेवती पाटील यांनी घेतलेल्या रुद्रावताराने सभा काही काळ तहकूब करण्यात आली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. काही वेळात प्रोसिडिंगची सर्व कागदपत्रे नगरसेविका पाटील यांना उपलब्ध करुन दिल्यानंतर सभेस सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री गाट या होत्या.

उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे,मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यालयीन निरीक्षक रामचंद्र मुधाळे यांनी सभेच्या विषय पत्रिकेचे वाचन केले. नवीन पाणीपुरवठा कनेक्शनच्या जोडणीची आकारणी निश्चिती करण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना नगरसेवक अमर गजरे यांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या जलकुंभात पाणी सोडण्यासाठी पाइपलाइन टाकावी अशी मागणी केली. नंतर महिला बालकल्याण विभागामार्फत प्रशिक्षण कार्यक्रम घेणे, शहरातील अंगणवाडी खोल्यांचे भाडे अदा करणे, नगरपरिषदेच्या मालकीच्या पाणी टँकर, मैला उपसा, बांधकाम परवाना, इतर सुविधांच्या सेवा शुल्क ठरविणे, गट नं. ८४६/अ १ मधील खुली जागा प्रधानमंत्री आवास योजना व इतर विकास कामांसाठी वापरणे, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंर्तगत सन २०१७-१८ या साला करीता प्रभाग ३,५,६ मधील मंजूर विकास कामांबाबत चर्चा, शाहू तालिम बांधकामासाठी जागेचा ताबा मिळणे आदी विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

सभेला भाजपा पक्षप्रतोद भरत लठ्ठे, दौलतराव पाटील, सूरज बेडगे, बाळासाहेब मुधाळे, नगरसेवक अमेय जाधव, अमर गजरे, रफिक मुल्ला, अमजद नदाफ, नगरसेविका ऋतुजा गोंधळी, लक्ष्मी साळोखे, सुप्रिया पालकर, अनिता मधाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images