Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहकारमंत्र्यांच्या मुलासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

खोटी कागदपत्रे सादर करून दूध भुकटी प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटींचे अनुदान लाटल्याप्रकरणी लोकमंगलचे सर्वेसर्वा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र व लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्हचे अध्यक्ष रोहन देशमुख, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांच्यासह नऊ संचालकांवर सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशाह शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले आणि भीमाशंकर सिद्राम नरसगोंडे, अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. सोलापूरचे दुग्ध विकास अधिकारी पांडुरंग दादू येडगे यांनी या बाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे अवर सचिव राजेश गोविल यांच्या सहीने राज्याचे दुग्ध विकास आयुक्त यांना एक पत्र देऊन सोलापूरचे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांनी या प्रकरणी तातडीने स्थानिक पोलिसात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्या नुसार सहकार मंत्र्यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्यासह ९ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांनी सरकारची सुमारे १२ कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जुगारअड्ड्यावर छापा

$
0
0

कोल्हापूर : कदमवाडीतील समता हायस्कूलच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास शहर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून ९ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ५ हजार १०० रूपये जप्त करण्यात आले. विठ्ठल डोईफोडे, विजय गावडे, लक्ष्मण बावणे, सुरेश आवळे, राजू जानकर, राकेश आग्रे , आयाज पटवेगार , निखिल रणपिसे , मनोज पाटोळे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमच्या खात्यावर पैसे जमा करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील रमणमळा परिसरातील वनविभागाच्या कार्यालयासमोर रस्त्यावरच चांदोली अभयारण्यग्रस्तांनी बुधवारी दुसऱ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. आंदोलनाच्या रेट्यामुळे वनप्रशासन हडबडून जागे झाले असून, अभयारण्यग्रस्तांसाठीचे सरकारकडून आलेले ४ कोटी २२ लाख ३० हजार चांदोलीतील युनियन बँकेच्या खात्यावर जमा केले. मात्र, जोपर्यंत खात्यावर पैसे जमा होत नाही, तोपर्यंत श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.

दुपारी आंदोलनस्थळी मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी भेट दिली. ते म्हणाले, 'चांदोली अभयारण्यात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना उदरनिर्वाह भत्ता, शौचालय बांधकाम अनुदान, जमीन संपादनापोटीचे पैसे कराड येथील वन कार्यालयात जमा आहेत. मात्र, ते अभयारण्यग्रस्तांच्या नावावर जमा करण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे येथे आंदोलन करण्यात येत आहे. पैसे खात्यावर जमा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील.'

बुधवारी कार्यालयात अधिकारी आल्यानंतर पैसे खात्यावर जमा करण्याचा आदेश मिळेल, अशी आंदोलकांना आशा होती. मात्र, पुन्हा वनप्रशासनाचा लालफितीचा अनुभव त्यांना आला. केवळ बँकेत पैसे जमा करून आंदोलन स्थगित करण्याची विनंती प्रशासनाने केली. मात्र, विनंती धुडकावत आंदोलन कायम ठेवल्याने प्रशासनाला धावाधाव करावी लागत आहे. आंदोलनात मारुती पाटील, डी. के. बोडके, नजीर चौगले, पांडुरंग पोवार, आनंदा आमकर, भगवान झोरे, आदम पटेल, आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राम मंदिर आणि रामराज्यही हवे’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'आयोध्येत राममंदिर उभारण्यास कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. पण त्याबरोबर देशात रामराज्यही असणे गरजेचे आहे,' असे मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केले.

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन बुधवारी साजरा करण्यात आला. काँग्रेस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी आवाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते.

देशात सध्या देशभरात राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला आहे. त्याचा संदर्भ घेत आवाडे म्हणाले, 'गेल्या चार वर्षांत केंद्रात व राज्यात भाजप सरकारने केलेल्या कारभाराचा पाढा वाचला जाऊ लागला आहे. पण आपले अपयश लपविण्यासाठी भाजपने राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हायलाच हवे याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पण त्याचबरोबर देशात रामराज्यही असायला हवे. रामाच्या नावाने राजकारण करून जनतेला फसविण्याचे दिवस आता गेले आहेत. त्यासाठी सर्वांनी एकजूट होऊन भाजपला धडा शिकवावा. निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्ववादाचा मुद्दा पुढे करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. विकासाचे सर्व मुद्दे फोल ठरले असून, अच्छे दिनाचे स्वप्नही भंगले आहे. म्हणूनच भाजप सरकार ज्या ज्या वेळी हा विषय काढेल तेव्हा सर्वांनी त्यांना रोजगाराचे आणि अच्छे दिनाचे प्रश्‍न विचारा.'

अहमद मुजावर यांनी स्वागत केले. याप्रसंगी सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, राजू बोंद्रे, नरसिंह पारिक, आनंदा कोरे, बाळू जाधव, रामदास कोळी, रंगा लाखे, दयानंद शेटके, अनिल शिकलगार, अजित मिणेकर, सुखदेव माळकरी, सुवर्णा लाड आदींसह पदाधिकारी, विविध सेलप्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूमुळे बावडा परिसरात घबराट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , कसबा बावडा

कसबा बावड्यात यापूर्वी काविळ, मलेरिया, डेंगी आदी रोगांची साथ हमखास उद्भवायची. आता यामध्ये स्वाइन फ्लूची भर पडली आहे . एकाच आठवड्यात स्वाइन फ्लूने बावड्यातील पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिका वेळोवेळी औषध फवारणी करत नसल्याने तसेच जवळ असणाऱ्या कचरा प्रकल्पामुळे प्रचंड अस्वच्छता व डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरातील १५ तर ग्रामीण भागातील ३२ जणांना अशा एकूण ४७ जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे.

बावडा परिसरातील आनंद स्वरूप पार्क येथे राहणाऱ्या निवृत्त सहाय्यक फौजदार सर्जेराव साळुंखे यांना १४ नोव्हेंबरच्या दरम्यान शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या पत्नी शकुंतला साळुंखे यांनाही रुग्णालयात दाखल केले. एकाच आठवड्यात साळुंखे दाम्पत्याचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या तीव्र असंतोषानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणीला सुरुवात केली. पण दोघाजणांच्या मृत्यूनंतर यंत्रणा तत्परता दाखवत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. बावडा परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असल्यामुळे या परिसरात सातत्याने औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, महापालिकेकडे असणाऱ्या पूर्वीच्या वापरातील १० लिटर औषध फवारणी पंपाने संपूर्ण प्रभागात दोन दिवसांत फवारणी पूर्ण होत नव्हती. उर्वरीत भागात फवारणीसाठी पंधरा दिवस वाट पहावी लागत होती. पण नुकतेच घेतलेले पण अद्याप वापरात न काढलेले नवीन पंप १६ लिटरचे असून हे पंप वापरण्यास अतिशय सोपे व हलके असल्याने संपूर्ण एका प्रभागातील औषध फवारणी दीड दिवसात पूर्ण होऊ शकते. पण त्यासाठी या पंपांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर खरेदी केलेले पंप लवकरात लवकर वापरात काढण्याची गरज आहे.

.............

चौकट

१ जानेवारी ते २५ नोव्हेंबरदरम्यान

आढळलेले रुग्ण ....

शहर - ६४

ग्रामीण - १२९

एकूण १९३

......................

बरे झालेले रुग्ण

शहर - ५०

ग्रामीण - १४

एकूण - १४४

.....................

स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालेले रुग्ण

शहर - १५

ग्रामीण - ३२

एकूण - ४७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी खर्च केलेला रस्ता दाखवा

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कदमवाडी येथील रि. स. नं. २१६ च्या खासगी जमिनीमध्ये आमदार निधीतून रस्ते, गटर्स बांधण्यात आले आहेत. वैयक्तिक स्वरुपाच्या रेखांकनामध्ये सरकारी निधीचा वापर करणे चुकीचे असल्याचे महापालिका सभागृहात निदर्शनास आणून दिले. आमदार राजेश क्षीरसागर यांनी निधीचा गैर वापर केला असताना ते वैयक्तिक स्वरुपाची टिका करुन मूळ विषयाला बगल देत आहेत', असा आरोप नगरसेवक सत्यजीत कदम यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत केला. ७५ लाखांच्या सरकारी निधीतील रस्ता गायब झालेला असताना मी वैफलग्रस्त झाल्याची टिका आमदार करत आहेत. त्यांनी माझ्या आरोग्याची अथवा राजकीय कारकिर्दीची काळजी करुन नये, असा टोला लगावत निधी खर्च केलेला रस्ता दाखवण्याचे जाहीर आव्हान कदम यांनी क्षीरसागरांना दिले.

कदम म्हणाले, 'कदमवाडी येथील तात्पुरते रेखांकन मंजूर असलेल्या खासगी जागेत ७५ लाखांचा आमदार निधी खर्च झाल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. प्रत्यक्षात संबंधित विकसकाने रस्ते व गटर्स बांधणीसाठी ९० लाख रुपये खर्च केले. त्याबाबतचा तपशील आयकर विभागाला दिलेल्या कागदपत्रात दाखवला असताना पुन्हा ७५ लाखांचा आमदार निधी कसा खर्चा केला?, या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी आमदार क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकांतून टीका करुन मूळ मुद्याला बगल दिली. त्यांनी वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आमदार निधीतून झालेला रस्ता दाखवावा, त्याचबरोबर बांधकाम विभागाकडून उचलेल्या बिलांचा हिशोब द्यावा.'

माजी महापौर सुनील कदम म्हणाले, 'कदमवाडी येथील हनुमान मंदिर ते प्रितम पार्कमध्ये अंतर्गत रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे तसेच याच मार्गावर अंतर्गत गटर्स व चॅनेल बांधण्यासाठी महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी २६ नोव्हेंबर २०१० रोजी ना हरकत प्रमाणपत्र तर १५ ऑक्टोबर २०१३ रोजी देखभालीसाठी हमीपत्र दिले आहे. ज्या भागात शेती आहे, तसेच एकही घर नाही, अशा परिसरात नागरिकांची मागणी दाखवून रस्ता केल्याचे दाखविण्यात आले आहे. तर संबंधित विकसकाने या जागेवर स्वखर्चातून रस्ता केल्याचे हमीपत्र लेआउट मंजुरीदरम्यान दिले आहे. त्यामुळे आमदार क्षीरसागरांचा ७५ लाखांचा निधी गेला कोठे? कदमवाडीत येणाऱ्या चार प्रभागांत आमदारांनी किती निधी खर्च केला, ते सांगावे. त्यांची ओळख फक्त पोस्टरवरुनच येथील नागरिकांना आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत विद्युत वाहिनीला मनपाचा ‘खो’

$
0
0

कामाला मंजुरी देण्यास मनपाची दिरंगाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यास महापालिकेने महावितरणकडे १२ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच रस्ते खोदाईला अद्याप महापालिकेने परवानगी दिली नसल्याचे लेखी उत्तर बुधवारी ऊर्जामंत्री चंद्रशेकर बावनकुळे यांनी दिले. याबाबत आमदार अमल महाडिक यांनी लेखी प्रश्न विचारले होते. ऊर्जामंत्र्याच्या या लेखी खुलाशामुळे भूमिगत विद्युत वाहिनीला 'खो' बसत असल्याचे स्पष्ट होत आहे.

शहरातील धोकादायक विजेच्या तारा व भूमिगत विद्युत वाहिनीबाबत आमदार महाडिक यांनी लेखी प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत लेखी खुलासा बावनकुळे यांनी केला. ते म्हणाले, 'कोल्हापूर शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत २०.८६ कोटी निधी मंजूर झाला. मात्र महापालिकेने रस्ते खोदाई व दुरुस्तीसाठी महावितरणकडे १२ कोटीची मागणी करत ऑगस्ट २०१८ मध्ये रस्ते खोदाईस परवानगी नाकारली. त्यामुळे महापालिकेला मिळालेला निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे.'

दरम्यान, शहरातील सेफ सिटी टप्पा दोन प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र यासाठी अद्याप निधी उपलब्ध झालेला नाही. निधी त्वरीत उपलब्ध करुन सेफ सिटी प्रकल्प मार्गी लावावा अशी, मागणी आमदार महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. त्यावर फडणवीस यांनी तातडीने निधी देण्याचे संबंधित विभागाला आदेश दिले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भागीरथी युवती मंचचीविक्रमनगरात शाखा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भागीरथी महिला संस्थेच्या भागीरथी युवती मंचच्या ५४ व्या शाखेचे विक्रमनगर येथे उद्घाटन झाले. संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या तेजस्विनी पाटील, संगीता पोवार, आकांक्ष लाखे, भक्ती पोवार, श्रद्धा मत्ते यांचा सत्कार झाला. यावेळी शाखेच्या अध्यक्षा प्रियांका तिरुके, उपाध्यक्षा ऋतुजा मत्ते, शिवानी गवळी, संजना पालकर, शीतल तिरुके, रुपाली पालकर, चंद्रकला सिद्धनेर्ले, रेखा मगर, सारिका तिरुके आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यशवंत कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची हिरमोड

$
0
0

यशवंत कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची हिरमोड

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराडमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागील पंधरा वर्षांपासून यशवंत कृषी प्रदर्शन आयोजित केले जात आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी भरवलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन म्हणून त्याला प्रसिद्धी ही देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ते नावारूपालाही आले. मात्र, यंदा या प्रदर्शनाचा दर्जा घसरला असून, आयोजकांनी त्याला पूर्णपणे व्यावसायिक स्वरूप दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी प्रदर्शनात सध्या शेतकऱ्यांची फरफट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

यंदाच्या प्रदर्शनाला शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केट आवारात सुरुवात करण्यात आली. गेल्या पाच दिवसांपासून चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये बाजार समितीकडून शेतकऱ्यांना मोफत शंभर स्टॉल देण्याची घोषणा केली होती. मात्र, फार कमी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या नावावरील बरेच स्टॉल व्यवसायिकांनी बळकावले. त्याचबरोबर प्रदर्शनामध्ये विविध व्यावसायिक, दुकानदारांचे स्टॉल, चैनीच्या वस्तू, खाद्य पदार्थ, कपडे, चप्पल, दुचाकी, चारचाकी वाहणांच्या कंपन्यांचे स्टॉल, खेळणी, प्लॅट, फर्निचर, शोभेच्या वस्तू व कृषी प्रदर्शनामध्ये अन्य अनावश्यक गोष्टींचे स्टॉल लावण्यात आले आहेत. ज्यांचा शेतीशी संबंध नाही, असे स्टॉल जास्त आहेत. त्यामुळे प्रदर्शनात शेतकऱ्यांऐवजी शहरी, नोकरदार, व्यावसायिक, उद्योगपतींचीच जास्त गर्दी असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातून शेतीविषयक ज्ञान, मार्गदर्शन व शेतीपूरक साहित्याची खरेदी करण्याच्या उद्देशाने आलेल्या शेतकऱ्यांची प्रदर्शन पाहून निराशा होत आहे.

ठेकेदाराला जबाबदारी दिल्याने गोंधळ

प्रदर्शनाची जबाबदारी संबंधित ठेकेदाराला देण्यात आली आहे. मात्र, ठेकेदाराने शेतकरी व लोकांच्या सोयींकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्या तुंबड्या भरण्यासाठी व्यापारी, व्यावसायिकांच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवण्यावर जास्त भर दिला आहे. त्यामुळे प्रदर्शन मंडप उभारणी, प्रदर्शन पाहण्यास लोकांना जाण्यासाठीचा मार्ग, स्टॉलची उभारणी, अत्यावश्यक सेवा, महिलांसाठी स्वच्छता गृह, महिला व बालकांची सुरक्षितता, आपत्कालीन मार्ग, प्रथोमोपचारासाठीच्या सोयी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यामध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रदर्शन स्थळानजीक खासगी पार्किंगच्या माध्यमातून लोकांची आर्थिक लूट होत आहे.

शेतीविषयक ज्ञान, पिकांच्या विविध प्रगत जाती, पिकांचे नियोजन, उत्पादन वाढीसंदर्भात मार्गदर्शन, शेती पूरक व्यवसाय, वाढीव दूध उत्पादन, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, ठिबक सिंचन, गांढूळ खत निर्मितीसह शेतीविषयक विविध सरकारी योजनांची माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात आले आहेत. मात्र, त्याचा शेतकऱ्यांना फारसा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रदर्शनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

.........

कोट

कराड कृषी उत्पन्न बाजार समितीने यंदा प्रदर्शनाचे टेंडर खासगी ठेकेदाराला दिले होते. नियोजनाची जबाबदारी ठेकदारावर होती. ठेकेदाराने या प्रदर्शनामध्ये कृषी विषयक बाबींना प्राधान्य देणे गरजेचे होते. या बाबत बाजार समिती गांभीर्याने विचार करून, सर्वांच्या सूचना विचारात घेऊन निश्चित बदल करेल.

मोहनराव माने, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्र्यांच्या मुलासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

खोटी कागदपत्रे सादर करून दूध भुकटी प्रकल्पासाठी सुमारे पाच कोटींचे अनुदान लाटल्याप्रकरणी लोकमंगलचे सर्वेसर्वा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे पुत्र व लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्हचे अध्यक्ष रोहन देशमुख, शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर यांच्यासह नऊ संचालकांवर सोलापुरातील सदर बझार पोलिस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन सुभाष देशमुख, रामराजे राजेसाहेब पाटील, अविनाश लक्ष्मण महागावकर, प्रकाश वैजनाथ लातुरे, सचिन पंचप्पा कल्याणशेट्टी, बशीर बादशाह शेख, मुरारी सारंग शिंदे, हरिभाऊ धनाजी चौगुले आणि भीमाशंकर सिद्राम नरसगोंडे, अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. सोलापूरचे दुग्ध विकास अधिकारी पांडुरंग दादू येडगे यांनी या बाबतची फिर्याद पोलिस ठाण्यात दिली आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे अवर सचिव राजेश गोविल यांच्या सहीने राज्याचे दुग्ध विकास आयुक्त यांना एक पत्र देऊन सोलापूरचे जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांनी या प्रकरणी तातडीने स्थानिक पोलिसात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्या नुसार सहकार मंत्र्यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्यासह ९ संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्वांनी सरकारची सुमारे १२ कोटी ४० लाखांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत फलकांवर पालिकेची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील अनधिकृत डिजीटल फलकावर बुधवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा बडगा उगारला. दिवसभर अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करत २० अनधिकृत फलक हटवले. कारवाई केलेल्या फलकांमध्ये आजी, माजी आमदारांच्या वाढदिवसाच्या फलकांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांत वाढदिवसाचे फलक शहरात मोठ्याप्रमाणात लावण्यात आले होते. यासाठी महापालिकेची परवानगी घेऊन तर काही ठिकाणी अनधिकृत फलक उभारले होते. परवानगी घेतलेल्या फलकांची मुदत संपल्यानंतरही ते हटवले नसल्याने बुधवारी फलक हटाव मोहीम राबवण्यात आली. यामध्ये शहरातील २० फलक पोलिस बंदोबस्तात हटवण्यात आले. यावेळी काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले, पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कारवाई सुरळीत पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी महिलांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु

$
0
0

पंढरपूर: मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळग्रस्त १४ गावांच्या पाण्यासाठी आता महिलांनी कंबर कसली असून गेल्या चार दिवसापासून जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी निर्मनुष्य अशा शिरानंदगीच्या तलावावर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी असलेल्या ४५ गावातील शिरानंदगी सह इतर १४ गावांना म्हैसाळ योजनेच्या पाचव्या टप्प्यातून पाणी मिळणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही गावे अजूनही पाण्यापासून वंचित राहिल्याने अखेर शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी काही महिलांच्या साथीने शिरानंदगीच्या तळ्याच्या काठीच बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. गेल्या चार दिवसापासून या महिला अशा थंडीच्या वातावरणात आणि निर्मनुष्य अशा जंगली भागात तळ्याकाठी आंदोलन करीत असताना संवेदनाशून्य फडणवीस सरकार यांची साधी दाखलाही घेण्यास तयार नसून अजूनही अधिकारी केवळ या महिलांना टोलवाटोलवीची उत्तरे देत आहेत. आपल्या कायदेशीर मागण्यासाठी अशा अडचणीच्या ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून महिला दिवस रात्र ठिय्या आंदोलन करीत असताना शासन आणि प्रशासनाचा बेजबाबदारपणा हा त्यांची महिलांबाबतची मानसिकता दाखवित असून पाणी आल्याशिवाय आम्ही येथून उठणार नसल्याचे आंदोलक शैला गोडसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीरियल किलर डॉक्टरला येरवड्यात हलवले

$
0
0

कोल्हापूर :

वाईतील सीरियल किलर डॉ. संतोष गुलाबराव पोळ याची आज कोल्हापुरातील कळंबा कारागृहातून पुणे येथील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

प्रशासकीय कारण देऊन सकाळी साडेदहा वाजता पोळला कळंबा कारागृहातून हलविण्यात आले. सातारा येथील फसवणूक प्रकरणी संतोष पोळला सातारा कोर्टासमोर हजर करून तेथून येरवडा येथे पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले.

पोळ हा पिस्तूल घेऊन कारागृहात फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी चौकशी करण्यात आली असता हे पिस्तूल त्याने पुठ्ठा, साबण आणि फेव्हिकॉलपासून तयार केले होते व त्यामागे कारागृहाला बदनाम करण्याचा त्याचा डाव होता, असे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कारागृहात मोबाइल कसा आला, याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नसून कारागृहातील दहा ते बारा संशयित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चौकशीचा सहा पानांचा गोपनीय अहवाल शुक्रवारी (ता. ३०) गृहखात्याकडे देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अटल पेन्शन योजनेत एक लाख लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजना समाजातील असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी चांगली आहे. जिल्ह्यात या योजनेतून येत्या मार्चअखेर एक लाख लाभार्थी करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी बुधवारी दिली.

जिल्हास्तरीय बँकर्स समिती, जिल्हा अग्रणी बँकेतर्फे आयोजित अटल पेन्शन योजना 'नागरिकता पसंती अभियान' उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सरकारी विश्रामगृहात कार्यक्रम झाला.

शिंदे म्हणाले, 'अटल योजना जिल्ह्यातील शेवटच्या घटकांपर्यत पोहचवण्यासाठी बँकांनी प्रभावीपणे काम करावे. बँकांच्या सर्व शाखा, ग्राहक केंद्र चालकांनी सहकार्य करावे. कष्टकरी, श्रमजीवी वर्गास वृद्धापकाळात योजनेतून आधार मिळेल. त्यासाठी १८ ते ४० वयोगटातील लोकांनी योजनेत सहभागी व्हावे. आतापर्यंत योजनेतर्गंत जिल्ह्यातील २३ हजार, ६३८ जणांनी खाती उघडली आहेत.

जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने म्हणाले, 'बँकेत भरलेल्या रक्कमेच्या प्रमाणात वयाच्या ६० वर्षानंतर एक, दोन, तीन, चार, पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळेल. राज्यस्तरीय बँकर्स समितीचे सदस्य तथा महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक बी. किशोरकुमार, बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय व्यवस्थापक नितीन देशपांडे, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक नंदू नाईक, स्टेट बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक बळीराम नाकवा, युनियन बँकेच्या क्षेत्रीय व्यवस्थापिका सुचित्रा नारकर, फेडरल बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक अजित देशपांडे, आयडीबीआयचे क्षेत्रीय व्यवस्थापक अमित वालिया यांनीही योजनेविषयी माहिती दिली. यावेळी बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिपक महेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले पुण्यतिथी साजरी

$
0
0

कोल्हापूर: येथील स. म. लोहिया हायस्कूलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक एस. एस. चव्हाण, एस. पी. कुलकर्णी, ए. डी. भोई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. विद्यार्थी अनिश जोशी व मधुसुदन मुसळे यांची महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर भाषणे झाली. यावेळी उपमुख्याध्यापक एम. बी. वाघमारे, पर्यवेक्षक आर. वाय. पावार, आर. जी. देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन शिक्षिका एस. बी. पाटील यांनी कले. सूत्रसंचालन निमिष पोतनीस, अथर्व तेलंग यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. आता त्यांच्या चारित्र्यावरील डाग पुसला जात आहे. विशेषत: तरुणांना त्यांचा जाज्वल्य इतिहास अधिक आकर्षित करत आहे. त्यांची कर्तबगारी तरुणांना प्रेरणादायी आहे.'असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. ईस्माइल पठाण यांनी केले.

शेतकरी सहकारी संघातर्फे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आयोजित केले होते. 'छत्रपती संभाजी महाराज'हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. संघाचे संचालक व्यंकाप्पा भोसले अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड दिलीप पवार यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. पठाण म्हणाले, 'पराक्रमात आणि राज्यकारभारात छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तसूभरही कमी नव्हते. सलग नऊ वर्षे ते कुतुबशाही, आदिलशाही, मुघल, फ्रेंच, इंग्रज अशा सहा शत्रूंशी एकाकी लढत होते. त्यांचा थेट स्वभाव काही जणांच्या दृष्टीने अडचणीत आणणारा ठरल्याने त्यांच्याबद्दल बखरीतून जाणीवपूर्वक बदनामीकारक लिखाण झाले. नाटककार, कादंबरीकारांनी त्यात भर टाकली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मराठाा इतिहासकारांनी सर्व कागदपत्रांचे संशोधन करुन खरा इतिहास पुढे आणला. त्यात वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांचे मोलाचे योगदान आहे.'

उमेश भोर यांनी सूत्रसंचालन केले. दीपक निंबाळकर यांनी आभार मानले. यावेळी संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर, कॉम्रेड सुभाष वाणी, अॅड. बळवंत पोवार, संभाजीराव जगदाळे, भरत लाटकर, अरुण पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप-शिवसेनेचा जल्लोष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मंजूर झाल्याची घोषणानंतर शहरात भाजप व शिवसेनेने स्वतंत्रपणे फटाक्यांची आतषबाजी करत साखर, पेढे वाटून जल्लोष केला.

दुपारी आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर बिंदू चौकात भाजपचे कार्यकर्ते जमू लागले. बिंदू चौकातील महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भाजप नेते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. नंतर नागरिकांना साखर, पेढे वाटले. शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली काढण्यात आली. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. महिला कार्यकर्त्यांनी ढोल वाजवत फुगडीचा फेर धरला. त्यावर भाजप कार्यकर्त्यांचे पाय थिरकू लागले. जाधव व देसाई यांना खांद्यावर उचलून घेत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विजयाच्या घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या.

यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव म्हणाले, 'राज्य सरकार व पालकमंत्री पाटील यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची काळजी न करता अभ्यास करून मराठा समाजाला टिकाऊ आरक्षण दिले आहे. पालकमंत्र्यांनी प्रश्न सोडवला तर हत्तीवरुन मिरवणूक काढू अशी विरोधक टीका करतात. आज पालकमंत्र्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवला असल्याने विरोधकांनी त्यांची मिरवणूक काढण्याचे धाडस दाखवावे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याने त्याचे आम्ही श्रेय घेणारच. आम्ही फटाके उडवून, मिठाई वाटून जल्लोष साजरा करू.'

सरचिटणीस विजय जाधव, उपाध्यक्ष राहुल चिकोडे, माणिक पाटील, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, चंद्रकांत घाटगे, सुरेश जरग, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, श्रीकांत घुंटे, दिलीप मेत्राणी, सयाजी आळवेकर, हर्षद कुंभोजकर, भारती जोशी, किशोरी स्वामी, वैशाली पसारे सहभागी होते.

दसरा चौकात

सेनेचा जल्लोष

आरक्षण मंजूर झाल्याचे जाहीर होताच शिवसेनेच्यावतीने दसरा चौकात जल्लोष करण्यात आला. माजी नगरसेवक रविकिरण इंगवले आणि ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते साखर, पेढे वाटण्यात आले. शिवसैनिकांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा दिल्या. जनता बाजारचे अध्यक्ष उदय पोवार, जयवंत हारुगले, सुनील जाधव, पद्माकर कापसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस. आर. पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालगावमध्ये दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, मिरज

मिरज-पंढरपूर रोडवरील मालगाव हद्दीत गुरुवारी मध्यरात्री दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यात सोने, चांदीचे दागिने, पाच मोबाइल आणि रोख रक्कम असा सुमारे दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवला. दरोडेखोर सात ते आठजण असावेत असा अंदाज आहे. शेजारीच माळी वस्तीवरील घरातील लोक जागे झाल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी पळ काढला. या दरोड्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, गुरुवारी रात्री एक ते दीडच्या दरम्यान दरोडेखोरांनी मिरज-पंढरपूर रस्त्यावरील मरुधर हॉटेलच्या पुढील बाजूस असलेल्या राधाकृष्ण फार्म हाऊसमधील कामगार रमेश बापूसाहेब सूर्यवंशी व कोमल रमेश सूर्यवंशी यांच्या घराचा दरवाजा दगडाने फोडून घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी रमेश यांच्या गळ्याला तलवार लावून पत्नी कोमल हिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून दागिने व पैशांची मागणी करत ठार मारण्याची धमकी दिली. शस्त्राचा धाक दाखवून मंगळसूत्र, अंगठी, पैंजण, तोडे व रोख सहा हजार रुपये लुटले.

शेजारील चव्हाण वस्तीवरील विजय चंद्रशेखर चव्हाण आणि नंदकुमार अप्पासाहेब चव्हाण यांच्या घरावरही दरोडेखोरांनी हल्ला करून ठार मारण्याची धमकी देत तलवार, चाकूचा धाक दाखवला. तिजोरीतील आणि अंगावरील दागिने काढून घेतले. चंद्रशेखर चव्हाण याला मारहाण करून त्याच्या आई-वडिलांना चाकूचा धाक दाखवून दागिने व पैसे काढून घेतले. तर चुलते नंदकुमार चव्हाण यांच्या घराचा दरवाजा दगडाने फोडून घरात ठेवलेल्या पंधरा हजार रुपयांसह दागिन्यांची लूट केली. दोन्ही ठिकाणी दरोडेखोरांनी काढून घेतलेले पाच ते सहा मोबाइल चव्हाण यांच्या शेततळ्यात आणि शेतात फेकून दिले.

दरोड्याची माहिती समजताच मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक निरीक्षक समाधान बेले यांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांचे पथकाला पाचारण केले. घटनास्थळी पहाणी करून पंचनामा केला. अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाच्या घोषणेनंतर कोल्हापुरात आनंदोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करुन भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्रपणे जल्लोष साजरा केला. आरक्षणाच्या लढाईत अग्रेसर असलेल्या सकल मराठा समाजाने राज्य सरकारच्या घोषणेचे स्वागत करताना जल्लोषाला फाटा देऊन आंदोलनातील ४२ हुतात्म्यांना अभिवादन केले. दरम्यान, आरक्षण मागणीसाठी गेले दोन दिवस बेमुदत उपोषणास बसलेल्या सचिन तोडकर, मनीष महागावकर यांनी उपोषण सोडले.

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य सरकारला अहवाल सादर केल्यानंतर मराठा आरक्षणाच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष होते. गुरुवारी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजपकडून शहरात जल्लोषाची तयारी सुरु झाली. बिंदू चौकात पक्षाचे कार्यकर्ते जमू लागले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नागरिकांना पेढे साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावर मोटार सायकल रॅली काढली. दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. चौकात ढोल ताशांच्या गजरात महिलांनी फुगडीचा फेर धरला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी नृत्य करत आनंद व्यक्त केला. यावेळी राहुल चिकोडे, विजय जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेच्यावतीने दसरा चौकात ऋतुराज क्षीरसागर आणि माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्या हस्ते साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष केला. तर सकल मराठा समाजाच्यावतीने आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्या ४२ जणांना मेणबत्त्या प्रज्वलित करुन आदराजंली वाहण्यात आली. मराठा समाजाने ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली होती. पण सरकारने स्वतंत्र्य कोट्यातून आरक्षण दिल्याने मराठा समाजाने ५० टक्के आरक्षणाची लढाई जिंकली असली तरी आरक्षण कोर्टात टिकावे, आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन सुरुच राहील, अशी प्रतिक्रिया समन्वयक वसंतराव मुळीक यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धवलक्रांतीत नरकेंचे योगदान

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर जिल्ह्यात घडलेल्या धवलक्रांतीमध्ये अरुण नरके यांचे मोठे योगदान आहे. गेल्या पन्नास वर्षांत त्यांनी सहकार, बँकिग, शिक्षण अशा प्रत्येक क्षेत्रात स्वत:चा अमीट ठसा उमटविला. प्रयोगशील शेतकरी म्हणून वेगळी ओळख निर्माण करताना त्यांनी गोकुळच्या विकासात मोलाचा वाटा उचलला. गोकुळचा पसारा मोठा आहे. त्याकडे इतर पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे; पण नरके यांनी 'गोकुळ'मध्ये लक्ष द्यावे. सध्याच्या कालखंडात त्यांच्या मार्गदर्शनाची गोकुळला खरी गरज आहे,' अशा शब्दांत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

'गोकुळ'चे ज्येष्ठ संचालक आणि इंडियन डेअरी असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस गुरुवारी साजरा झाला. वाढदिवस समितीतर्फे सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांच्या गर्दीने दुधाळी मैदान फुलले. चांदीची गाय-वासरू मूर्ती, शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार झाला. राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नरके यांनी अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहित करण्यासाठी क्रीडा संस्था स्थापण्याची व एक कोटी रुपयांचा निधी जमविण्याची घोषणा केली.

नरके म्हणाले, 'आयुष्यात मी जे काही करू शकलो ते गोकुळमुळे. माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील यांचा पाठिंबा मोलाचा ठरला. माझ्या वाटचालीत यशवंत एकनाथ पाटील, आनंदराव पाटील-चुयेकर, संजयसिंह गायकवाड, बंधू शशिकांत यांचे मार्गदर्शन लाभले. वर्गीस कुरियन यांचा सहवास लाभला. वडिलांच्या इच्छेनुसार शेती, सहकार आणि खेळात रमलो. गोकुळ, यूथ बँक, खरेदी-विक्री संघ अशा विविध संस्थांत काम करताना सामान्यांचा विकास हे सूत्र ठेवले. शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून इंडियन डेअरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी झालेली निवड हा आनंदाचा क्षण होता.'

प्रमुख पाहुणे डॉ. बोरसे म्हणाले, 'नरके यांच्या जीवनकार्यावर आधारित 'गोकुळगाथा' पुस्तक निर्मितीदरम्यान त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंचे दर्शन घडले. अध्यक्षपदाच्या दहा वर्षांच्या काळात त्यांनी गोकुळच्या व्यवसायवृद्धीसह समाज घटकाची उन्नती हे ध्येय ठेवले.'

अरुण नरके फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र उबेरॉय यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, माजी आमदार संजय घाटगे, बाळ पाटणकर, विश्वास जाधव, सुरेश पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.

०००

खेळासाठी एक कोटीचा ट्रस्ट

अमृतमहोत्सवी समारंभात अरुण नरके यांनी क्रीडा संस्था स्थापण्याची व त्यासाठी एक कोटी निधी संकलनाची संकल्पना मांडली. ते म्हणाले, 'ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण, संधी दिल्यास राष्ट्रीय, आंतरराष्ट्र्रीय स्तरावर ते कोल्हापूरचे नाव उंचावतील. अशा खेळाडूंसाठी क्रीडा संस्था स्थापण्याचे माझे स्वप्न आहे. या संस्थेत गोकुळ, अरुण नरके फाउंडेशन आणि कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. क्रीडा संस्थेसाठी एक कोटी रुपयांचा निधी जमविला जाईल. त्यासाठी एक रुपयापासून एक कोटी रुपयांपर्यंतचा निधी स्वीकारायला मी तयार आहे.' दरम्यान, त्यांच्या मित्र परिवाराने ट्रस्टसाठी १५ लाख रुपये जमवले.

०००

पत्नीच्या आठवणीने भावूक

सत्काराप्रसंगी नरके यांनी आपल्या वाटचालीत वडील डी. सी. नरके व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची मोठी साथ लाभली. पत्नी सुनीताने मला खूप मोठा आधार दिला. सामाजिक कामासाठी ताकद दिली. विविध संस्थांत काम करत असल्यामुळे मी कुटुंबाकडे फार वेळ देऊ शकलो नाही, ही खंत कायम सतावते, हे सांगताना नरके यांचे डोळे पाणावले. दरम्यान, सत्कार सोहळ्याप्रसंगी नरके कुटुंबीयांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. याप्रसंगी मुलगा चेतन नरके, पुतण्या अजित नरके, जयश्री नरके, राजलक्ष्मी नरके, शिल्पा नरके, स्निग्धा नरके, देवराज नरके, ऐश्वर्या नरके, सत्यशील नरके, आदी कुटुंबीय उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images