Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘मनुग्राप’ला जनरल चॅम्पियनशिप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आजीबाईचा सोनेरी बटवा'अंतर्गत जिल्ह्यात ५० ठिकाणी औषधी वनस्पतींच्या लागवडीची संकल्पना पर्यावरणीयदृष्ट्या स्तुत्य आहे. गार्डन्स क्लब व जिल्हा परिषदेमार्फत येत्या दोन वर्षांत या संकल्पनेला मूर्त रूप दिले जाईल. स्वच्छ पर्यावरण व जैवविविधता संवर्धनासाठी नमामि पंचगंगा हा उपक्रम सुरू केला असून, गार्डन्स क्लबने यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावे,' असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले.

गार्डन्स क्लबतर्फे आयोजित ४८ व्या पुष्प प्रदर्शनाचा बक्षीस समारंभ रविवारी सायंकाळी झाला. यंदाच्या पुष्प प्रदर्शनाचे जनरल चॅम्पियनशिप मनुग्राप ग्रुप शिरोलीने पटकावले. गोकुळचे संचालक अरुण नरके अध्यक्षस्थानी होते. रोटरी क्लब ऑफ हेरिटेजचे अध्यक्ष हर्षवर्धन तायवाडे-पाटील, दीपाली तायवाडे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन विजेत्यांचा गौरव झाला. महापालिकेच्या सहकार्याने ताराबाई पार्क परिसरातील ताराराणी गार्डन येथे पुष्प प्रदर्शन भरविले होते.

दरम्यान, सकाळच्या सत्रात 'मला आवडणारी फुले' या विषयावर चित्रकला स्पर्धा झाली. क्लबच्या माजी अध्यक्षा धनश्री पाटील म्हणाल्या, 'येत्या दोन वर्षांनी गार्डन्स क्लब सुवर्णमहोत्सव साजरा करणार आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून क्लबतर्फे 'आजीबाईचा सोनेरी बटवा' संकल्पनेंतर्गत ठिकठिकाणी औषधी वनस्पतींची लागवड करण्याचा संकल्प आहे. संकल्पनेची रूपरेषा तयार केली असून जिल्हा परिषदेने शाळा व विविध कार्यालय परिसरात अंमलबजावणी करावी. यासाठीचा आराखडा जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर करत आहे.'

क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष शशिकांत कदम, खजानिस राज अथणे यांनी स्वागत केले. पल्लवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंजली पाटील, सुनिती देशमुख, प्राजक्ता चरणे, स्मिता अथणे, संगीता सांडव, नीता शिंदे, सुनिता पाटील, संगीता सावर्डेकर, आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

००००

मनुग्राफ, आजरा सूतगिरणी, गोकुळ विजेते

मनुग्राफ ग्रुप शिरोलीने पुष्प प्रदर्शनाचे जनरल चॅम्पियनशिप पटकावले. कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथील किर्लोस्कर ग्रुपला 'गार्डन ऑफ द इअर' पुरस्काराने गौरविण्यात आले. भास्कर शिंदे (गार्डन ऑफ द इअर, वैयक्तिक प्रकार), संकेत सोपान पाटील (गार्डन ऑफ द इअर, मालक गट) विजेते ठरले. उद्यान स्पर्धेतील अन्य निकालात 'किंग ऑफ द शो'चे मानकरी आजरा येथील अण्णा-भाऊ सहकारी सूतगिरणीच्या गुलाब पुष्पाने पटकावला. गोकुळ दूध संघाच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना परिसरातील उद्यान 'क्वीन ऑफ द शो' ठरले. संजय घोडावत ग्रुपलाही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हापूस आंबा बाजारात दाखल

$
0
0

हापूस आंबा बाजारात दाखल

कोल्हापूर टाइम्स टीम

कोकणातील हापूस आंबा बाजारात दाखल झाला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दहा बॉक्स आले असून सव्वा डझन बॉक्सची किंमत एक हजार रुपये इतकी आहे.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हापूस आंब्याचे आगमन होते. आज आलेला आंबा हा मुंबईहून आला असून देवगड आंबा पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार मुंबईहून आंबा मागवण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात फळांची मोठ्या प्रमाणात आवक होते. आज बाजार समितीत मोठ्या प्रमाणात फळांची आवक झाली आहे. त्यामध्ये कैरी,, मोसंबी, संत्री, चिक्कू, पेरु, सफरचंद, डाळिंब, अंजीर, हनुमान फळ, सीताफळ, अननस, कलिंगडे, बोरे, पपई, आवळा, वसई केळी, टरबूज, रामफळ, स्ट्राबेरी या फळांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीची ७ जागा लढण्याची तयारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन्ही काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी निश्चित झाली आहे. दोन्ही काँग्रेस चाळीस जागा लढवणार आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार आहेत. मात्र स्वाभिमानीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यातील हातकणंगलेची जागा मिळणार आहे. दुसरी जागा बुलडाणा की वर्धा याबाबत चर्चा सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्याचे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात स्पष्ट केले. या आघाडीत शेकाप, माकप, भाकप, काही शेतकरी संघटना यांच्यासह अन्य काही मित्रपक्षांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही काँग्रेसमधील जागावाटपाचा विषय जवळपास मिटला आहे. साधारणपणे चाळीस जागा हे पक्ष लढवणार आहेत. उर्वरित आठ जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. त्यात स्वाभिमानी संघटना हा प्रमुख मित्रपक्ष असणार आहे. या संघटनेने सात जागा लढवण्याची तयारी केली आहे. पण, त्यांना दोन जागा देण्याबाबत हालचाली सुरु आहेत.

स्वाभिमानीने हातकणंगलेसह सांगली, बुलडाणा, वर्धा, धुळे, नंदूरबार आणि माढा या सात जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. त्यांच्याकडे या जागेवर प्रबळ उमेदवार असल्याचा संघटनेचा दावा आहे. यातील हातकणंगलेची जागा खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडल्याचे पवारांनी जवळजवळ जाहीरच केले. येथे कै. बाळासाहेब माने गटाचा विरोध असला तरी त्याकडे दुर्लक्ष करत पवारांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टींना ही जागा दिली. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी बुलडाणा लोकसभेची जागा मिळावी, अशी संघटनेची मागणी आहे. या दोन जागा संघटनेला मिळण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत ही संघटना लोकसभेला युतीबरोबर तर विधानसभेला भाजपबरोबर होती. युतीने हातकणंगले आणि माढा या दोन जागा दिल्या होत्या. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते पाटील विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे ती जागा संघटनेला मिळणार नाही. त्याऐवजी बुलडाणा मतदारसंघ देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानीला लोकसभेच्या दोन जागा देण्याचे निश्चित झाल्याचे समजते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभेच्या राज्यातील सात जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबत सध्या चर्चा सुरू असली तरी जागांबाबत मात्र कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी प्रयत्न राहतील.

रवीकांत तुपकर, प्रदेश युवक अध्यक्ष, स्वाभिमानी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारी चित्रपट महोत्सव

$
0
0

कोल्हापूर : झी गुरुकुल मल्टीपर्पज फाऊंडेशन व बॉम्बे फिल्म कॅफे स्टुडिओतर्फे शुक्रवारी (ता. ३०) राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट महोत्सव व समाजगौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला आहे. अभिनेत्री देविका दफ्तरदार व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शाहू स्मारक भवनात सकाळी दहा ते सायंकाळी पाच यावेळेत कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात जलतरणपटू वीरधवल खाडे, इतिहास अभ्यासक डॉ. मंजुश्री पवार, डॉ. मंगेश सूर्यवंशी यांना समाजगौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सुनील शिंदे व सुरेंद्र सूर्य यांनी पत्रकाव्दारे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धैर्यशील माने शिवधनुष्य उचलणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

'गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्यावर अन्याय केला. पक्षाचे नेते शरद पवार यांनीही दिलेला शब्द पाळला नाही. ज्यांच्याविरोधात यापूर्वी आम्ही आंदोलन केली, त्यांच्याबरोबर पक्षाचे जेष्ठ नेते बंद खोलीत चर्चा करतात हे विदारक चित्र सहन होत नाही. त्यामुळे माने गटाची ताकद दाखविण्यासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे राजकीय शिवधनुष्य उचलणार आहेत' अशी माहीती माजी खासदार निवेदीता माने यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. यंत्रमागधारक संघटना समन्वय समितीच्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी माने या इचलकरंजीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे नुकतेच कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्याशी बंद खोलीत चर्चा करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी पक्षासाठी सोडण्याबाबतचे सूतोवाच केले होते. या पार्श्‍वभूमीवर माने गटाने या मतदारसंघात खासदार शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

'या मतदारसंघात माजी खासदार दिवंगत बाळासाहेब माने यांना मानणारा मोठा गट सक्रीय आहे. त्यामुळे आजही गटाची मोठी ताकद आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते माने गटाला गृहीतच धरत नसल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत आमचा गट राष्ट्रवादीपासून अलिप्त असेल. हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असताना गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला देत माजी खासदार कल्लाप्पा आवाडे यांना उमेदवारी दिली गेली. त्यावेळीचे खासदार पवार यांनी मला विधानपरिषदेवर घेण्याचा शब्द दिला होता. तोही त्यांनी पाळला नाही. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीकडून माने गटाला सातत्याने डावलले जात आहे. त्यामुळे गटाची ताकद दाखविण्यासाठी २०१९च्या निवडणूक रिंगणात धैर्यशील माने हे नक्की उतरतील.'

माजी खासदार माने म्हणाल्या, 'माने गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते आजमावली असता संघर्ष करण्याची सर्वांनीच तयारी दाखवली आहे. त्यामुळे धैर्यशिल माने यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे आणि प्रत्येक गोष्टींचे मार्केटिंग करण्याची सवय लागलेल्या खासदार शेट्टी यांचा ढोंगीपणा मोडून काढण्यासाठी यावेळी राजकीय शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतला आहे.'

यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, ताराराणी आघाडीचे नेते सागर चाळके, शिवसेना शहराध्यक्ष सयाजी चव्हाण उपस्थित होते.

खासदार शेट्टींवर टीका

'हातकणंगले मतदारसंघात अनेक आंदोलने झाली. शेतकरी, यंत्रमागधारक, कामगारांसाठी आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही कधीच त्याचे मार्केटिंग केले नाही. प्रत्येक आंदोलनाचे मार्केटिंग करुन भावनिक मुद्दा करणाऱ्यांची पळताभुई केल्याशिवाय राहणार नाही', असा इशारा निवेदिता माने यांनी खासदार शेट्टी यांचा नामोल्लेख न करता दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती

$
0
0

मुंबईत विरोध, कोल्हापुरात स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा कोल्हापूर दौऱ्याप्रसंगी शहर आणि जिल्ह्यातील नेते सर्किट हाऊसवर एकवटलेले. या नेत्यामध्ये पक्षाच्या शहराच्या आजी-माजी अध्यक्षांचा समावेश होता. 'साहेबां'च्या सोबत जिल्ह्याचे खासदारही कराडपासून मोटारीत आहेत अशी वार्ता सर्किट हाऊस परिसरात पसरली. पक्षाचे नेते स्वागताच्या तयारीत असताना आजी-माजी अध्यक्षांची मात्र घालमेल सुरू झाली. कारण खासदारकीच्या लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत त्यांनी खासदारांना विरोध केला होता. 'ज्यांना मुंबईत विरोध केला, त्यांचे कोल्हापुरात स्वागत करण्याची पाळी' त्यांच्यावर आली. मात्र साहेबांचा वाहनांचा ताफा येण्याअगोदरच खासदार सर्किट हाऊसवर पोहचले. त्यामुळे काहींना हायसे वाटले. खासदार आल्याचे दिसताच एक विद्यमान पदाधिकारी 'झालं गेलं गंगेला मिळालं' असे म्हणत स्वागत करायला पुढे धावले. हस्तांदोलन करत गप्पा गोष्टी सुरू केल्या. एका पदाधिकाऱ्याच्यासोयीच्या 'पॉवर'नीतीची चर्चा मात्र कार्यकर्त्यांत रंगली.

आप्पासाहेब माळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरण मोहीम सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोवर व रुबेला लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ सोमवारी प्रभात फेरीने झाला. जिल्हा परिषदेने याचे आयोजन केले होते. फेरीत शहरातील विविध शाळांतील मुलांनी सहभाग घेतला. लसीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील नऊ लाख बालकांना डोस दिला जाणार आहे.

छत्रपती शाहू विद्यालय, दादासाहेब मगदूम हायस्कूल, एस्तेर पॅटर्न हायस्कूल, दत्ताबाळ स्कूल, नेहरू हायस्कूल, यशवंतराव भाऊराव पाटील हायस्कूल, छत्रपती राजाराम हायस्कूल, बड्स इंग्लिश मीडियम स्कूलमधील जवळपास ७०० मुलांचा फेरीत समावेश होता. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर पेट्रोल पंप, दसरा चौक मार्गे सीपीआर अशी रॅली निघाली.

दरम्यान जिपमधील राजर्षी शाहू सभागृहात अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. प्रशासनामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ गर्भसंस्कार योजनेचे उद्घाटन झाले. योजनेच्या प्रसिध्दीसाठी जानकी हॉस्पिटलच्या डॉ. गीता पिल्ले यांच्यामार्फत ५००० पोस्टर्स देण्यात आले. बच्चनवेडे ग्रुपतर्फे निवेदने तयार केली आहेत. तर महेश शेटे यांनी गर्भसंस्कार योजनेची माहिती दिली. उपक्रमाला रोटरी व लायन्स क्लबने सहकार्य केले आहे.

कार्यक्रमाला कोल्हापूर मंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. पी. पी. धारुरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, आशा उबाळे, नोडल अधिकारी ज्योती पाटील, डॉ. हेमंत खरनारे, डॉ. ज्योती लांडगे आदी उपस्थित होते. जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. एफ. ए. देसाई यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आंदोलकांना रोखले

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी मुंबईला निघालेला सकल मराठा समाजाचा गाडी मोर्चा पोलिसांनी बळाचा वापर करून शिरोली टोल नाक्यावर अडवला. यावेळी पोलिस व आंदोलकांत झटापटही झाली. संतप्त आंदोलकांनी यावेळी पोलिस प्रशासनावर दडपशाहीचा आरोप करताना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्याचा निषेध करत शंखध्वनी केला. दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाच्यावतीने मंगळवारपासून (ता. २७) दसरा चौकात ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली.

सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, प्रताप नाईक यांना रविवारी (ता. २५) पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेनंतरही कार्यकर्त्यांनी मुंबईला गाडी मोर्चा नेण्याचा निर्धार केला होता. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मोर्चा काढण्याची घोषणा केली असल्याने पोलिस प्रशासनानेही काळजी घेतली होती. सकाळी साडेपाच वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केल्याने दसरा चौकाला छावणीचे रुप आले होते. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक तानाजी सावंत, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर आंदोलनावर लक्ष ठेऊन होते.

सकाळी साडेआठ वाजल्यापासून कार्यकर्ते जमू लागले. सव्वा नऊ वाजता पहिली कार चौकात आली. त्यानंतर कारची रांग लागली. पोलिस प्रत्येक कारचे नंबर टिपून घेत होते. मुख्य समन्यवयाच्या गैरहजेरीतही स्वप्निल पार्टे, सचिन खेडकर, अवधूत पाटील, गणी आजरेकर, बबन रानगे, शशिकांत पाटील, भैय्या माने, जयेश कदम मोर्चाचे नियोजन करत होते. 'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' घोषणा देण्यात आल्या. शाहीर दिलीप सावंत यांनी गाडी मोर्चावरील पोवाडा गाऊन सरकारला इशारा दिला. ११ वाजण्याच्या सुमारास चारचाकी वाहनांनी दसरा चौक फुलून केला होता.

अकरा वाजता राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन 'चलो मुंबई' चा नारा देत वाहने मुंबईकडे निघाली. वाहनांच्या पुढे प्रमुख कार्यकर्त्यांनी चालत सरकारविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर ताराराणी चौकात कार्यकर्ते वाहनात बसले व सर्व वाहने वेगाने मुंबईकडे निघाली. पण शिरोली टोल नाक्याजवळ पोलिसांनी गाडी मोर्चा अडवला. मुंबई २६/११ च्या हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत असून पोलिसांनी हायअॅलर्ट दिला आहे. त्यामुळे मुंबईत गाडी मोर्चा नेता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना आम्ही अभिवादन केले आहे. सरकार मराठा आरक्षण देण्यास विलंब करत असल्याने वाहने सोडवण्याची विनंती केली. पण पोलिसांनी नकार देत सर्व कार्यकर्त्यांना मुस्कान लॉनमध्ये नेण्यासाठी बळाचा वापर सुरू केला. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्याच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा निषेध करताना कार्यकर्त्यांनी शंखध्वनी केला. पोलिसांनी बळाचा वापर करत सर्व कार्यकर्त्यांना वाहनासह ताब्यात घेतले.

आंदोलनात शैलजा भोसले, तेजस्विनी नलवडे, उषा लांडे, मंगल कुराडे, प्रज्ञा जाधव, नेहा मुळीक, शंकरराव शेळके, कमलाकर जगदाळे, उत्तम जाधव, गौरव पाटील, किशोर माने, ऋतुराज माने, आनंदराव लांडे, संतोष घाटगे सहभागी झाले होते.

खासदार महाडिक आंदोलनात सहभागी

कावळा नाका येथे खासदार धनंजय महाडिक, नगरसेवक सत्यजित कदम आंदोलनाला पाठिंबा देण्यास सहभागी झाले. कार्यकर्त्यासमवेत ते काही काळ चालले व निघून गेले. मनपाचे परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, पक्षप्रतोद दिलीप पोवार, नगरसेवक तौफिक मुल्लांनी यांनी दसरा चौकात येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

पोलिसांचा आंदोलकांना चकवा

गाडी मोर्चा किणी टोल नाका येथे अडवणार अशी पोलिसांनी हवा केली होती. पण राष्ट्रीय महामार्गावर कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरात शिरोली टोल नाक्याजवळ पोलिसांनी मोर्चा अडवला. दसरा चौक आणि शिरोली नाक्याजवळ मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने छावणीचे स्वरुप आले होते. शिरोली नाक्यावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे मोर्चावर लक्ष ठेऊन होते.

अटक केलेले समन्वयकांना सोडले

दरम्यान रविवारी अटक केलेल्या मुळीक, सावंत, देसाई, सुर्वे, नाईक यांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना रात्री त्यांना तिलारी जवळील जंगलातील गेस्ट हाऊसमध्ये ठेवले होते. त्यांना अटक न करता त्यांना स्थानबद्ध केल्याचा पोलिसांनी दावा केला. मोर्चा अडवल्यानंतर त्यांना दुपारी त्यांना अलंकार हॉल येथे सोडण्यात आले.

तोडकरांची प्राणांतिक उपोषणाची घोषणा

मोर्चा अडवल्यानंतर समन्वयक सचिन तोडकर यांनी मंगळवारपासून आरक्षणाची मागणी पूर्ण होईपर्यंत प्राणांतिक उपोषणाची घोषणा केली तर स्वप्निल पार्टे यांनी उद्यापासून ठिय्या आंदोलनाची घोषणा केली. एका मंत्र्याच्या आदेशावरुन पोलिसांनी मोर्चा अडवल्याचा आरोप पार्टे यांनी केला तर सरकार आरक्षणाचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शाहीर दिलीप सावंत यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार फंडाचा गैरवापर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कदमवाडी येथील पाच एकर आरक्षित जागवेर सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार फंडातून ७० लाखांची रस्ते व गटर्स बांधणी केली. मात्र, विकासकाने आयकर विभागाला पाठविलेल्या पत्रात ९० लाख रुपये खर्चून ही कामे केल्याचे कळविले आहे. त्यामुळे आमदार फंडाचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट होत आहे. आमदार फंडातून केलेल्या रस्त्याची पुन्हा खोदाई केली असून तत्कालीन उपायुक्त गणेश देशमुख यांनी आरक्षण बदलून रेखांकन मंजूर केल्याचा असल्याचा आरोप करत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक सत्यजित कदम यांनी सोमवारी महापालिका सभेत केली.

नगरसेवक कदम यांनी सभागृहात माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहिती सादर करून नगररचना विभागावर (टीपी) प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र टीपी विभागासह, शहर अभियंत्यांची कदम यांच्यासह नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना चांगलीच भंबेरी उडाली.

नगरसेवक कदम म्हणाले, 'कदमवाडी येथली जागेचा विकास करण्यासाठी २००८ मध्ये टीपी विभागाने रेखांकन मंजूर केले. रेखांकन मंजुरीनंतर प्रथम विकासकाने रस्ते व गटर्स बांधणे करणे आवश्यक आहे. पण मंजूर जागेवर सार्वजनिक विभागाच्यवतीने आमदार फंडातून ७० लाखांची विकासकामे केली. हुनमाननगर व स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता दाखवला. प्रत्यक्षात ही जागा पूरबाधित क्षेत्र असताना तत्कालीन उपायुक्त देशमुख यांनी आरक्षणामध्ये बदल करून विकासकामे केली. रस्ते व गटर बांधणीसाठी ९० लाख रुपये खर्च केल्याचे संबंधित विकासकाने आयकर विभागाला पाठवलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. त्यामुळे आमदार फंडाचा बेकायदेशीर वापर केल्याचे स्पष्ट होते.'

'जेथे पावसाचे पाणी येथे लोकवस्ती नाही तेथे रस्ते व गटर्स केले आहेत. चुकीच्या पद्धतीने रेखांकनाला मंजुरी दिली असून तयार केलेला डीपी रस्त्याची पुन्हा खोदाई केला असल्याचे निदर्शनास आणून दिले. अधिकारी पत्र देवूनही माहिती देत नसल्याने आरटीआयखाली माहिती घेतली असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.' यावेळी काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी नगरसेवकांना आरटीआयचा वापर का करावा लागतो. प्रशासन त्यांच्या पत्रावर का माहिती देत नाही? असा प्रश्न उपस्थित केला. भूपाल शेटे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

'तत्कालीन उपायुक्त देशमुख यांनी आयुक्त पदाचा गैरवापर करुन रेखांकन मंजूर केले आहे. त्यांच्यासह रेखांकन मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करण्याची मागणी नगरसेवक सुनील कदम यांनी केली.' 'रस्त्याची खोदाई केल्याबद्दल विभागीय कार्यालयाच्यावतीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे,' अशी माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.' त्यानंतर बेकायदेशीर रेखांकन व आमदार फंडाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर बोंद्रे यांनी प्रशासनाला दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांचा प्रचारासाठी वापर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील पाच राज्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक तोंडावर आल्याने पक्षाच्या प्रचारासाठी भाजपने सरकारी आणि खासगी मिळकतींच्या भिंतीचा आधार घेतला. पक्षाचे कमळ हे चिन्ह सर्वत्र पोहोचवण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या भिंतीवर ऑईलपेंटने रेखाटले आहे. पक्षाच्या प्रचारासाठी सरकारी कार्यालयांच्या वापर केला असल्याने, राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेने मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यातंर्गत याविरोधात गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीला अद्याप सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. विविध माध्यमांतून जाहिराती केल्या जात आहेत. फलक, बॅनर, पक्षाची चिन्हे ठिकठिकाणी लावण्यास सुरुवात झाली असून यामध्ये सत्तारुढ भाजप सरकारने आघाडी घेतली आहे. विशेषत: सरकारने केलेल्या कामांचे जाहिरात फलक लावले जात असताना सोमवारी पक्षाचे चिन्ह असलेले कमळ चिन्ह शहरात विविध ठिकाणी ऑइलपेंटने रेखाटण्यात आले.

सर्वसामान्यांपर्यंत पक्षाचे चिन्ह पोहोवण्यासाठी मात्र अनेक सरकारी आणि खासगी घरांच्या भिंतीचा वापर करण्यात आला. विशेषत: सरकारी कार्यालयांच्या भिंतीचा वापर केल्याने चोहोबाजूंनी टीका होऊ लागली आहे. सरकारी कार्यालयांचा राजकीय पक्षांसाठी वापर करण्यास मनाई असताना या मनाईचे उल्लंघन झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अनेक खासगी मालकीच्या भिंतीवर कमळ काढल्याने नागरिक असंतोष व्यक्त करत आहेत. महापालिका क्षेत्रात विनापरवाना जाहिरात प्रसिद्ध केल्यास महापालिका मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५नुसार फौजदारी दाखल करण्याची तरतूद आहे. या कायद्यातील तरतुदीच्या आधारे संबंधीतांवर गुन्हा नोंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परिणामी, पक्षाच्या चिन्हावरुन राजकीय वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

कमळ रेखाटायचे कोठे?

दरम्यान, निवडणुकीची शक्यता गृहीत धरुन प्रत्येक मोक्याच्या दहा ठिकाणी कमळ चिन्ह रेखाटण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरुन स्थानिक कार्यकर्त्यांना मिळाले असल्याची चर्चा आहे. मात्र अशी चिन्हे रेखाटताना कार्यकर्त्यांनी चक्क सरकारी कार्यालयांच्या भिंतीचा आधार घेतला आहे. परिणामी यावर चोहोबाजुंनी टीका होऊ लागल्याने आहे. परिणामी उर्वरीत 'कमळ' रेखाटायचे कोठे? असा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विश्वविक्रमाने शहिदांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील सहा वर्षीय केदार साळुंखे याने सोमवारी सांगली ते कोल्हापूर ५५ किलोमीटरचे अंतर ३ तास ३८ मिनिटांत स्केटिंगने पूर्ण करून विश्वविक्रमाची नोंद केली. एशिया पॅसिफिक बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, चाईल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (ग्लोबल) त्याची नोंद झाली. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यातील शहीद पोलिस अधिकारी, पोलिस, नागरिकांना मानवंदना देण्यासाठी व आदरांजली वाहण्यासाठी त्याने स्केटींग केले. देशातील शांततेसाठी 'स्टॉप टेररिझम' हा संदेशही त्याने दिला.

केदार याने सकाळी साडेसहा वाजता सांगली येथील अशोक कामटे विश्रामगृहातून स्केटिंगला सुरूवात केली. कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात तो १० वाजून ८ मिनिटांनी पोहोचला. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी त्याचे स्वागत केले. झांजपथक, पोलिस बँड वाजवून त्याला सलामी दिली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पोलिस उद्यानात महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते त्याचा सत्कार झाला.

यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील म्हणाले, 'केदारने राबविलेला विक्रम कौतुकास्पद आहे. येथील मातीच्या कणाकणात शौर्य आहे. बलिदानाची गाथा आहे. छोटा असूनही त्याने केलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे.'

महापौर बोंद्रे यांनी केदारने स्टॉप टेररिझमचा संदेश स्केटिंगमधून देत जागृती केल्याचे सांगितले. चाइल्ड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निरीक्षक मनमोहन रावत म्हणाले, 'केदारने ब्रेकअपसाठी लागणारे ४२.१९५ किलोमीटरचे अंतर २ तास ४२ तर ३ तास ३८ मिनिटांत ५५ किलोमीटर अंतर पार केले. हा अहवाल लिम्का, गिनीज बुक रेकॉर्डसाठी पाठवण्यात येणार आहे.'

प्रशिक्षक महेश कदम म्हणाले, 'केदार रोज चार ते साडेचार तास नियमित सराव करतो. त्याने या विक्रमातून २२७ देशांत आपले नाव केले आहे. त्याने या उपक्रमांतून राजर्षी शाहू महाराजांचे नाव उज्वल केले.'

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापौर शोभा बोंद्रे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, तेजस्विनी कदम, धनश्री कदम, डॉ. सरदार जाधव, अमोल कोरगावकर, राज कोरगावकर, आकाश कोरगावकर यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सागर बगाडे यांनी सूत्रसंचालन केले.

केदारचे आई-वडिल पोलिस खात्यात

केदार अडीच वर्षाचा असल्यापासून स्केटींगचे प्रशिक्षण घेतो. तो व्हिबग्योर शाळेत पहिलीत शिकतो. त्याची आई स्वाती गायकवाड- साळुंखे या उपअधीक्षक तर वडील विजय हे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आहेत. साळुंखे यांचे मूळ गाव कराड तालुक्यातील किवळ आहे. मात्र, ते गेल्या सहा वर्षांपासून येथेच राहतात. गेल्यावर्षी केदारने कोल्हापूर-अंजनी-सांगली अशा १०५ किलोमीटरच्या स्केटिंग रॅलीत सहभाग घेतला होता. त्याने आतापर्यंत ४ गोल्ड, ६ सिल्वर, दोन ब्राँझ मेडल मिळविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसवरील हल्याप्रकरणी निष्पाप लोकांवरील गुन्हे चौकशी अंती मागे घेण्यात येतील : मुख्यमंत्री

$
0
0

पोलिसवरील हल्याप्रकरणी निष्पाप लोकांवरील गुन्हे चौकशी अंती मागे घेण्यात येतील : मुख्यमंत्री

सातारा

स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण आणि त्यांनी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाची तसेच त्या नंतर फलटण शहर पोलिस ठाण्यावर झालेल्या दगडफेकी संदर्भात सखोल चौकशी करू. आवश्यकता वाटल्यास सीआईडी चौकशी करण्याचीही तयारी आहे. पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी निष्पाप लोकांवरील गुन्हे चौकशी अंती मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

कराड विमानतळावर फलटणमधील सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटण्यासाठी गेले होते. त्या वेळी ते बोलत होते. स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी विविध मागण्यासंदर्भात प्रांत कार्यालयाबाहेर सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशी पोलिस आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या निषेधार्थ विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फलटण शहर पोलिस ठाण्यावर केलेल्या दगडफेकी प्रकरणी आगवणे समर्थककांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये अनेक निष्पाप लोकांना गोवण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी व दिगंबर आगवणे यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी फलटण तालुक्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने कराड येथे फडणवीस यांची भेट घेतली.

.........

शहीद ओंबळेंचे

स्मारक लालफितीत

सातारा

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला परतवून लावताना शहीद झालेले सातारा जिल्ह्यातील केडंबे गावचे सुपुत्र तुकाराम ओंबळे यांचा सोमवारी दहावा स्मृतिदिन साजरा होत आहे. दहा वर्षे झाली तरी या हुतात्म्याचे स्मारक अद्याप लाल फितीतच अडकले आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ हातात लाठी घेऊन तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाबवर झडप घालून त्याला जीवंत पकडले होते. या वेळी कसाबने केलेल्या गोळीबारात तुकाराम ओंबळे शहीद झाले होते. त्यांच्या या अतुलनीय शौर्यामुळे पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आला होता.

हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या मूळगावी म्हणजेच सातारा तालुक्यातील केडंबे (ता. जावली) या गावी भव्य स्मारक उभारण्याचे आश्‍वासन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने दिले होते. मात्र, ते कागदावरच राहिले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रशासकीय अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून, हे स्मारक सरकारच्या लाल फितीत अडकल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

ओंबळे यांच्या शौर्याला भारतासह अमेरिकेतील कॉँग्रेसमध्ये अभिवादन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेने गिरगाव चौपाटीवर त्यांचे स्मारक उभारले आहे. राजस्थानमधील एका तेल विहिरीला ही शहीद ओंबळे यांचे नाव देण्यात आले आहे. त्यांना मरणोत्तर अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आले. परंतु, महाराष्ट्र सरकारने या स्मारकासाठी अद्याप कोणतीच ठोस पाऊले उचललेली नाहीत. त्यांचे हे शौर्य युवा पिढीला प्रेरणादायी आहे. त्यांचे हे कार्य तसेच आदर्शवत स्मारक त्यांच्या मूळ केडंबे गावी व्हावे, अशी मागणी कुटुंबियांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माफीसोबत राजीनामा हवा

$
0
0

फोटो आहे...

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापुरातील उद्योजक, कारखानदार प्रामाणिकपणे वीज बिलाचा भरणा करतात. तेव्हा राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठकांना उद्योजक, कारखानदारांना बदमाश म्हणण्याचा अधिकार काय? महावितरण कंपनीच खरी दरोडेखोर आहे. पाठकांनी उद्योजकांची माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवू 'असा आक्रमक पवित्रा उद्योजकांनी घेतला. ताराबाई पार्क येथील महावितरणच्या कार्यालयासमोर विविध औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधीनी एकत्र येऊन पाठक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केले.

'महावितरण'ची मनमानी कायम राहिल्यास, प्रसंगी बिले भरणार नाही, असा इशाराही दिला. वीज दरवाढीवरून महावितरणचा धिक्कार केला. महावितरणचे अधीक्षक अभियंता शैलेंद्र राठोर यांना वीज दरवाढ, स्थिर आकार, पॉवर फॅक्टर पेनल्टी रद्द करण्याबाबत निवेदन दिले. वीज दरवाढ, फायलींचा निपटाराप्रश्नी प्रश्नांचा भडिमार केला. याप्रसंगी उद्योगव्यवसायाठी आवश्यक वीज पुरवठा १५ दिवसांत केला जाईल, असे राठोर यांनी सांगितले.

'आयआयएफ'चे अध्यक्ष सुरेश चौगुले, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, 'मॅक'चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, 'गोशिमा'चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, 'स्मॅक'चे अतुल पाटील, इंजिनीअरिंग असोसिएशनचे उपाध्यध्यक्ष अतुल आरवाडे, उद्योजक चंद्रकांत जाधव आदींच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास १०० हून अधिक उद्योजक महावितरणच्या कार्यालयासमोर जमले. पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक, कारखानदार प्रामाणिकपणे वीज बिलाचा भरणा करतात. याउलट विदर्भ, मराठवाडा परिसरात वीज चोरी, थकबाकीचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधितांना पाठीशी घालण्याचा उद्योग सुरू आहे. महावितरणच खरी दरोडेखोर आहे असा आरोपच उद्योजकांनी केला.

हरिश्चंद्र धोत्रे, चंद्रकांत जाधव यांनी, 'पाठक हे नॉन टेक्निशियन आहेत, त्यांना तांत्रिक बाबीवर बोलण्याचा व उद्योजकांना बदमाश म्हणण्याचा काय अधिकार पोहचतो?' अशी विचारण केली. कपॅसिटर्स बसविणे हे कायदेशीर असताना पाठक त्याला बेकायदेशीर ठरवित आहेत. उद्योजकांची बदनामी करत आहेत, त्यांनी माफी मागावी आणि संचालकपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उदय दुधाणे, प्रदीप कापडिया यांनी केली. कपॅसिटर्स बसविणे कायदेशीर आहे की नाही अशी विचारणा अधीक्षक अभियंता राठोर यांना केल्यावर त्यांनी नियमानुसार असल्याचे नमूद केले. तसेच उद्योजकांच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करू असे आश्वासन दिले.

याप्रसंगी शिवाजीराव पोवार, सुरेंद्र जैन, सचिन शिरगावकर, मोहन कुशिरे, अजित आजरी, श्रीकांत पोतनीस, संजय पेंडसे, डी.डी.पाटील आदींचा समावेश होता.

फायलींचा निपटरा करा, अन्यथा आंदोलन

अधिक्षक अभियंता राठोर यांच्या टेबलावरील फायलींचा निपटारा जलदगतीने होत नाही. हा विषय गांभीर्याने घ्या. कोल्हापुरात उद्रेक झाल्यास त्याचे लोण राज्यभर पसरते, असा इशारा उदय दुधाणे यांनी दिला. त्यावर राठोर यांनी उद्योजकांच्या प्रश्नासंदर्भात फालयींचा जलदगतीने निपटारा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीचे सभापतीपाटील यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील यांनी आज सोमवारी जिल्हा निबंधक अरुण काकडे यांच्याकडे राजीनामा सादर केला. उद्या (मंगळवारी) राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असून त्यानंतर नवीन सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

बाजार समितीवर राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेकाप, आमदार सतेज पाटील, चंद्रदीप नरके या गटाची सत्ता आहे. दरवर्षी एका गटाला रोटेशन पद्धतीने सभापती व उपसभापती देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. सभापती पाटील यांना आघाडीने दिलेली मुदत संपल्याने त्यांनी घरगुती कारणावरून राजीनामा दिला आहे. २०१५ मध्ये बाजार समितीवर सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्या वर्षी जनसुराज्यचे पांडुरंग खुडे तर दुसऱ्या वर्षी राष्ट्रवादीचे सर्जेराव पाटील यांना सभापतीपदाची संधी मिळाली होती. तिसऱ्या वर्षी राष्ट्रवादीकडून संधी मिळालेले कृष्णात पाटील मुश्रीफ गटाचे आहेत. सलग दोन वर्षे राष्ट्रवादीला सभापतीपदाची संधी मिळाल्याने यंदा जनसुराज्यला संधी मिळणार की सतेज पाटील गटाला याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. जनसुराज्यकडून बाबासाहेब लाड तर सतेज पाटील गटाकडून विलास साठे, दशरथ माने यांच्या नावांची चर्चा सुरु आहे. सभापतिपदाचा निर्णय आमदार मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके यांच्यासह माजी आमदार विनय कोरे, संपतराव पवार घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंगणापूर बंधाऱ्यावर मृत माशांचा खच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

गेल्या सहा-सात दिवसांपासून भोगावती नदीपात्रातील दूषित पाणी शिंगणापूर बंधाऱ्यावर आल्यामुळे सोमवारी सकाळपासून शिंगणापूर बंधाऱ्यातील पाण्यात मासे तरंगत असल्याचे निदर्शनास येताच ते पकडण्यासाठी मासेमारांची व हे मासे पाहण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली होती. दूषित पाण्यामुळे मासे मोठ्या प्रमाणात बंधाऱ्यावर वाहून आले होते. यातील मृत माशांचा थर पाण्यावर तरंगत असलेले काही लोकांना दिसताच माशे पाहण्यासाठी अनेकांनी बंधाऱ्याकडे धाव घेतली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रखडलेल्या प्रकल्पांबाबत आमदारांचे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील रखडलेल्या आंबेओहळ, नागनवाडी, उचंगी पाटबंधारे प्रकल्पांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सोमवारी विधानभवनासमोर जोरदार निदर्शन केली. गेल्या आठवड्यात 'महाराष्ट्र टाइम्स'ने कोल्हापूर जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांबाबत वृत्तमालिका प्रसिध्दी केली होती. त्याची दखल घेऊन त्यांनी हे आंदोलन केले.

'मटा'ने २० ते २३ नोव्हेंबर या कालावधीत वृत्तमालिकेद्वारे जिल्ह्यातील कोणता पाटबंधारे प्रकल्प कशामुळे रखडला आहे? आता किती निधीची गरज आहे? याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेवर प्रकाशझोत टाकला होता. त्याचे पडसाद विधानभवनाच्या अधिवेशनावेळी उमटले. कागल, चंदगड विधानसभा मतदारसंघातील आंबेओहोळ, नागनवाडी, उचंगी या पाटबंधारे प्रकल्पांच्या छायाचित्राच्या डिजिटल फलकासह त्यांनी आंदोलन केले. फलकावरील 'जिव्हाळ्याचे पाटबंधारे प्रकल्प रखडले. मग निधी वळविला कुणीकडे?, हक्काच्या बारा टीएमसीपैकी एक थेंबही अडविता आला नाही. ही कसली कर्तबगारी?' असा फलकांवर मजकूर होता. तर प्रकल्पांच्या अर्धवट स्थितीतील फोटो यावेळी लक्ष वेधून घेत होते. आमदार मुश्रीफ, कुपेकर आणि पाटील यांनी विधानसभवनाच्या पायऱ्यांवर थांबून निदर्शने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजी बंदला चांगला प्रतिसाद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी वीज दर सवलत मिळावी, पॉवर फॅक्टर पेनल्टी व वीजदर वाढ रद्द करावी, वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करावी व कामगार कल्याण मंडळाची स्थापनी करावी यासह विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या इचलकरंजी बंदला सोमवारी चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळपासून शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. परिणामी वस्त्रनगरीतील यंत्रमागाचा खडखडाट ठप्प झाला होता. दरम्यान, यंत्रमागधारक संघटना समन्वय समितीच्यावतीने प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. सरकारने तातडीने प्रश्‍नांची सोडवणूक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

यंत्रमाग व्यवसाय गेल्या चार वर्षांपासून विविध अडचणीतून मार्गक्रमण करत आहे. या व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही शासनाकडून काहीच अंमलबजावणी होत नसल्याने वस्त्रोद्योगाला स्थैर्य लाभण्यासाठी आवश्यक उपाययोजना व विविध मागण्यांसाठी यंत्रमागधारक समन्वय समितीने २६ नोव्हेंबर रोजी राज्यभर लाक्षणिक बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी इचलकरंजी बंदची हाक देण्यात आली होती.

येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार श्रीमती निवेदीता माने व विविध यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधींच्या नेतृत्त्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरुन फिरुन मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर आल्यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, शेती पाठोपाठ रोजगार देणारा उद्योग म्हणून वस्त्रोद्योगाला महत्व आहे. गत चार वर्षापासून देशभरातील वस्त्रोद्योग आर्थिक मंदीतून वाटचाल करीत आहे. राज्यासह शहरातील ६० टक्के यंत्रमाग बंद पडले असून उर्वरीत यंत्रमाग आर्थिक नुकसान सोसून सुरु आहेत. तर काम नसल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने वेळोवेळी घोषणा केल्या. परंतु त्याची आजतागायत काहीच अंमलबजावणी झालेली नाही. यंत्रमाग चालला तर गाव चालेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण अशीच परिस्थिती राहिल्यास संपूर्ण गाव ठप्प होईल. या व्यवसायाला कायमस्वरुपी स्थैर्य लाभण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समितीने निश्‍चित केलेल्या मागण्याबाबत सरकारने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामध्ये वीज दरात १ रुपया प्रतियुनिट सवलतीच्या घोषणेची अंमलबजावणी व्हावी, १ सप्टेंबर २०१८पासून लागू केलेली वीज दरवाढ रद्द करावी, पॉवर फॅक्टर पेनल्टी रद्द करावी, साध्या यंत्रमागाच्या सर्व प्रकारच्या कर्जासाठी ७ टक्के व्याज सवलत मिळावी, शासनाने जाहीर केलेल्या वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करावी आणि कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी मदन कारंडे, अशोक स्वामी, सतिश कोष्टी, विनय महाजन, विश्‍वनाथ मेटे, दीपक राशिनकर, मिश्रीलाल जाजू, राजगोंडा पाटील, महादेव गौड, सयाजी चव्हाण, चंद्रकांत पाटील, सागर चाळके, शशांक बावचकर, विकास चौगुले, अजित जाधव, सदा मलाबादे, प्रकाश मोरबाळे आदींसह विविध यंत्रमागधारक संघटनांच्या प्रतिनिधींसह इचलकरंजी, कबनूर, कोरोची, रेंदाळ, हुपरी, कुरुंदवाड भागातील यंत्रमागधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोटारयासकल रॅली

दरम्यान, इचलकरंजी बंदला सर्वच स्तरातून चांगला प्रतिसाद लाभला. बंदच्या पार्श्‍वभूमीवर यंत्रमागधारक संघटनांचे प्रतिनिधींनी गावातून मोटरसायकल रॅली काढून सर्वांना बंदचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद मिळाल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा

$
0
0

साहित्य संस्कृती लोगोसह घ्यावी

.. .. ..

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील सामाजिक व कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनोरंजन मंडळ आणि श्री दगडूलाल मर्दा चॅरिटेबल अ‍ॅण्ड रिसर्च फौंडेशन व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे हे विसावे वर्ष आहे.

स्पर्धा इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात २७ ते ३० डिसेंबर २०१८ या कालावधीत होणार आहे. स्पर्धेमधील विजेत्यांना अनुक्रमे २०,००० रूपये, १५,००० आणि १०,००० रूपये व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ ५,००० रूपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, स्त्री आणि पुरूष अभिनयासाठीही स्वतंत्र तीन रोख बक्षीसे आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नवीन लेखन, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत व नेपथ्य इत्यादी तांत्रिक विभागांसाठीही स्वतंत्र ३० वैयक्तिक रोख पारितोषिके आणि प्रशस्तिपत्रे दिली जाणार आहेत. स्पर्धेतील अभिनय पुरस्कार दिवंगत करूणा यशवंत देव यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येतील. प्रवेश अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत आहे. इच्छुक स्पर्धक संघांनी, अध्यक्ष-मनोरंजन मंडळ, दाते मळा, सुंदर बागेजवळ, इचलकरंजी-४१६११५. (भ्रमणध्वनी-९८५०५८८८२५, ८२३७५२२५२२) येथे संपर्क साधावा.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवि पानसरे व्याख्यानमालाचार डिसेंबरपासून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीप

येथील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे ४ ते १० डिसेंबर दरम्यान कॉ. अवि पानसरे व्याख्यानमालेअंतर्गत 'नवभांडवलशाही'या विषयाला अनुसरून विविध विषयांवर सात दिवस राज्यातील तज्ज्ञ वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात रोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होईल. सलग १७ वर्षे लोकवर्गणीतून चालणारी ही राज्यातील एकमेव व्याख्यानमाला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. रणसुभे म्हणाले, 'नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात नवीन भांडवलशाही फोफावली. ती नफेखारीवर आधारलेली असून सामाजिक बांधिलकी न मानणारी आहे. प्रचंड सांस्कृतिक दहशत निर्माण करण्यात आली आहे. नवे विचार येऊ नये, जुन्याचे मूल्यमापन होऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य, शिक्षणाचे खासगीकरण झपाट्याने केले जात आहे. सरकारी गुंतवणूक कमी केली. वास्तव चित्र लिहिण्यास लेखक तर चालू घडामोडींवर परखड भाष्य करण्यास विचारवंत घाबरत आहेत. त्यांनी जिवाची भीती वाटते. सरकारचा माध्यमांवर प्रभाव असल्याने वस्तुस्थिती जनतेसमोर येत नाही. यासंबंधी समाजात जागृती होण्यासाठी यंदा नवभांडवलशाही हा विषय निवडला आहे. पत्रकार परिषदेस एस. बी. पाटील, आनंदराव परुळेकर, अरुण पाटील, दिलीप चव्हाण, के. डी. खुर्द, आय. बी. मुनशी आदी उपस्थित होते.

वक्ते आणि विषय

वक्ते विषय अध्यक्ष

कॉ. अजित अभ्यंकर (पुणे) नवभांडवलशाही कॉ. दिलीप पवार

विवेक कोरडे (मुंबई) शिक्षण व बेरोजगारी प्रा. आनंद मेणसे

दत्ता नाईक (गोवा) सांस्कृतिक दहशतवाद डॉ. राजन गवस

श्रीरंजन आवटे (पुणे) सोशल मिडियाचा गैरवापर डॉ. शरद नावरे

अनंत बागाईतकर (दिल्ली) प्रसार माध्यमे व राजसत्ता शरद कारखानीस

डॉ. अनंत फडके (पुणे) आरोग्याचे खासगीकरण डॉ. जे. एफ. पाटील

डॉ. श्रीनिवास खांदेवाले (नागपूर) नवभांडवलशाहीचे धोके डॉ. अशोक चौसाळकर

८ डिसेंबरला पुस्तक प्रकाशन

ज्येष्ठ पत्रकार बागाईतकर यांनी लिहिलेल्या 'प्रसार माध्यमे, राजसत्ता आणि सद्यस्थिी'या पुस्तकाचे प्रकाशन ८ डिसेंबर रोजी होणार आहे. या पुस्तकात वाचकासमोर, प्रेक्षकासमोर खऱ्या बातम्या येऊ नये, यासाठी सरकार कशी पद्धतीने दबाव टाकते, खऱ्या, निर्भिडपणे बातमी देणाऱ्या पत्रकाराची कशी नोकरी धोक्यात आणली जाते, यासंबंधीचे लिखान आहे, असे प्रा. रणसुभे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी - कवाळे गँगमध्ये राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी येथे वर्चस्ववादातून एसटी गँग आणि कवाळे गटात सोमवारी रात्री बाराच्या सुमारास प्रचंड धुमश्चक्री झाली. दोन्ही गटांकडून झालेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठे नुकसान झाले. मारहाणीत अर्जुन जगन्नाथ बुचडे (वय ३०, रा. राजारामपुरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोन्ही गटांनी तलवार, लोखंडी गजांचा वापर करत धुडगूस घातल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, यांप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यासाठी राजारामपुरी पोलिस ठाण्यामध्ये दोन्ही गटांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

पोलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार 'गेल्या काही वर्षांपासून राजारामपुरी परिसरात वर्चस्ववादातून एसटी गँग व कवाळे गटात वारंवार भांडणे, मारामाऱ्या सुरू आहेत. सोमवारी रात्री याच वादातून दोन्ही गटांतील युवकांमध्ये जोरदार मारामारी झाली. तलवारी व लोखंडी गज घेऊन एकमेकांचा पाठलाग करत तरुणांनी दगडफेकही केली. अचानक झालेल्या या प्रकाराने आणि दगडफेकीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे नागरिकांनी तेथेच वाहने टाकून पलायन केले. या प्रकाराची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवले. मारहाणीत जखमी झालेल्या बुचडेला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images