Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जागा मिळेना, घराचे स्वप्न पूर्ण होईना

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

Tweet@gurubalmaliMT

कोल्हापूर : सरकारी भूखंडांवरील अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यासाठी रेडीरेकनरच्या दहा ते पंचवीस टक्के रक्कम भरून घेण्याचे धोरण ठरले. झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा शब्द देत महापालिकेने सरकारकडून जमिनी घेतल्या. आता झोपड्या हटणार, तेथे घरकूल होणार असे वातावरण तयार झाले. त्याचा हजार घरांचा आराखडा तयार झाला, नव्या घरात जाण्याचे स्वप्न रंगू लागले. पण, तीन वर्षे झाली तरी जागा झोपडपट्टीधारकांच्या नावावर भूखंड करण्याची प्रक्रिया काही केल्या पुढे सरकेना. महापालिकेचा हा आडमुठेपणा राजेंद्रनगरातील अनधिकृत झोपड्या वाढवण्यास कारणीभूत ठरत आहे.

कोल्हापूर शहरात ७२ झोपडपट्ट्या आहेत. त्यातील ४४ घोषित असल्या तरी इतर मात्र अनधिकृत आहेत. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी विविध भागांतील झोपड्या हटवून त्या राजेंद्रनगर येथे हलवण्यात आल्या. त्यामुळे नागाळा पार्क, महावीर कॉलेज, फुलेवाडी, तुतूची बाग, गवत मंडई, कसबा बावडा यांसह बारा जागा झोपडपट्टीमुक्त झाल्या. सध्या राजेंद्रनगरातील चाळीस एकर जागेत सध्या सतराशे अधिकृत तर हजारावर अनधिकृत झोपड्या आहेत. त्या हटवून तेथे घरकुल योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने सरकारकडून जमीन घेतली. ही जागा जोपर्यंत त्या झोपडपट्टीधारकांच्या नावावर होत नाही, तोपर्यंत तेथे सरकारी योजनेतंर्गत घरे बांधता येत नाहीत. त्यानुसार आराखडा तयार करून भूखंड नावावर होण्यासाठी गेले तीन वर्षे झोपडपट्टीधारक महापालिकेत चकरा मारत आहेत. पण तेथे फाइल काही हलेना अशी स्थिती आहे.

राजेंद्रनगरात प्रधानमंत्री आवास योजना योजनेतंर्गत हजारावर घरे बांधण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा तयार आहे. येथील लोकांना प्रत्येकी केवळ सहा लाखात घरे मिळणार आहेत. त्यामध्ये अडीच लाखांचे अनुदान तर साडेतीन लाख रुपये कर्ज मिळणार आहे. लाभार्थ्यांची यादी तयार आहे. पण त्यांच्या नावावर जोपर्यंत भूखंड होणार नाही, तोपर्यंत त्यांना अनुदान मिळणार नाही. आराखडा तयार झाल्याने अनेकांना घर मिळणार म्हणून आनंद झाला. पण, त्यांचा हा आनंद क्षणभंगूर ठरला आहे. शहरात वाल्मिकी आंबेडकर व लोकआवास योजनेतून शाहू सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक सौदागर कांबळे यांनी ७१५ घरे बांधली आहेत. नव्या घरकुल योजनेसाठी ते पाठपुरावा करत आहेत. पण महापालिका अधिकाऱ्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने ही योजना रखडली. त्यामुळे झोपडीऐवजी घरात राहण्याचे या भागातील लोकांचे स्वप्न लांबत आहे. याशिवाय रिकामी जागा दिसत असल्याने येथे अनाधिकृत झोपड्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही वर्षात येथे तब्बल हजारावर लोकांनी अतिक्रमण केले, ही स्थिती अशीच राहिली तर हे अतिक्रमण आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेचे दुर्लक्ष

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील जागांचे प्रॉपर्टी कार्ड देण्याची घोषणा केली. तसा निर्णय यापूर्वीच झाला आहे. रेडीरेकनरच्या केवळ दहा ते पंचवीस टक्के रक्कम भरून सरकारी जमीनीवरील अतिक्रमणधारकांना मालक करण्याची सरकारची योजना आहे. 'म्हाडा'च्या पुढाकारानेदेखील येथे घरकुल बांधण्यात येणार आहे. पण महापालिका यामध्ये रस दाखवत नसल्याने अतिक्रमणधारकांची संख्या वाढण्यास मदत होत आहे.

७२

शहरातील एकूण झोपडपट्ट्या

४४

घोषित झोपडपट्ट्या

१९

सरकारी जागांवरील झोपडपट्ट्या

२६

महापालिकेच्या जागांवरील झोपडपट्ट्या

खासगी मालकीच्या जागांवरील झोपडपट्ट्या

१७७८

प्रॉपर्टी कार्ड मिळालेले झोपडपट्टीधारक

१३०००

प्रॉपर्टी कार्डपासून वंचित झोपडपट्टीधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात कॅम्प घ्या

$
0
0

कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेमधील त्रुटी दुरुस्ती राज्यस्तरावर पुणे येथे एकाच ठिकाणी करण्याऐवजी असे कॅम्प प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घ्यावेत अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहायक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांच्याकडे केली. शिष्टमंडळात आनंदा हिरुगडे, शहराध्यक्ष अनिल सरक, कार्याध्यक्ष अनिल खोत, विकास कांबळे, अरुण गोते, आप्पासाहेब वागरे, शीतल वडगावे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपला धडकी भरवू

$
0
0

कोल्हापूर: अखिल भारतीय किसान संघर्ष समितीतर्फे ३० नोव्हेंबरला देशभरातील शेतकरी दिल्लीत संसदेवर धडक मारणार आहेत. हा मोर्चा केंद्रातील भाजप सरकारला धडकी भरविणारा असेल, असा आयोजकांचा दावा आहे. दोन महिन्यांपासून याची तयारी सुरू आहे. बुधवारी (ता.२८) सकाळी नऊ वाजता मिरज येथून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील दोन हजार शेतकरी खास रेल्वेने रवाना होतील. खासगी मिनीबससह इतर वाहनांनी शेतकरी जात आहेत. या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीचे समन्वयक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या साधलेला संवाद.

प्रश्न : मोर्चात देशभरातून किती शेतकरी सहभागी होतील ?

पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह महाराष्ट्रातून ३५ हजारांवर तर देशभरातील १८ राज्यांतील पाच लाखांवर शेतकरी मोर्चात सहभागी होतील. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू, केरळ, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, बिहार, ओरिसा, पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांतून शेतकरी मोठ्या संख्येने येतील. अनेक राज्यांतून शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत.

प्रश्न : मोर्चाद्वारे कोणत्या मागण्या करणार आहात?

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. शेतमालाला हमीभाव नाही, अशा परिस्थितीत कर्जाचा बोजा कसा कमी करावा, या विवंचनेने तो आत्महत्या करीत आहे. त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, शेती उत्पादनास दीडपट हमीभाव मिळावा, जीएसटीप्रमाणे बळिराजाच्या महत्त्वाच्या दोन विधेयकांसाठी विशेष अधिवेशन घ्यावे, अशा प्रमुख मागण्या आहेत.

स्वाभिमानी एक्स्प्रेक्स कधी सुटणार?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी स्वत:च्या पैशांतून मिरजेहून स्वतंत्र रेल्वे बुक केली. स्वाभिमानी एक्स्प्रेस नावाने ही रेल्वे २८ नोव्हेंबरला निघेल. मोर्चा संपल्यानंतर १ डिसेंबरला रेल्वेचा परतीचा प्रवास सुरू होईल. २० खासगी बसनेही शेतकरी जात आहेत.

मोर्चा कोठून निघणार, कोण नेतृत्व करणार?

३० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता रामलीला मैदानापासून मोर्चा संसदेच्या दिशेने निघेल. रितसर परवानगी घेतली आहे. तरीही जिथे पोलिस अडवतील तेथेचे ठिय्या आंदोलन होईल. ज्येष्ठ सामाजिक नेत्या मेधा पाटकर, व्ही. एम. सिंग, योगेंद्र यादव, माजी खासदार हनन मौला, डॉ. सुनीलम, कोडीहळी चंद्रशेखर, आयाकन्नू, कविता कुरबेट्टी, अखिल गोगई, आदी नेतृत्व करतील.

किती राजकीय पक्षांचा पाठिंबा, कोण नेते सहभागी होतील ?

महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, डाव्या पक्षांसह देशातील २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. २०७ शेतकरी संघटनांचा सक्रिय सहभाग आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शरद पवार, अहमद पटेल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, नितीशकुमार, रामविलास पासवान, शरद यादव, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, जयललिता, चंद्राबाबू नायडू, फारूक अब्दुला, ममता बॅनर्जी असे नेते उपस्थित राहणार आहेत.

सरकारवरील दबावगट कसा राखणार ?

मागण्या मान्य करण्यासाठी लोकशाही मार्गाने सरकारवरील दबाव गट कायम राखणार आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीची दोन विधेयके मंजूर करावीत, त्यासाठी राज्यातील ३ हजार ग्रामपंचायतींनी ठराव केले. २५ लाख शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन पंतप्रधान, राष्ट्रपतींना पाठविले. यामुळे स्वतंत्र अधिवेशन घेऊन दोन विधेयके मंजूर करावीत. सन २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरच व्हावी, बळिराजांसाठीच्या विधेयकाचा सामावेश सर्वच पक्षांनी जाहीरनाम्यात घ्यावा. हे न करणारे शेतकरीविरोधी आहेत, हे आपोआप स्पष्ट होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओबीसी कोट्यातून आरक्षण द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारने ओबीसी कोट्याला धक्का न लावता कोटा वाढवून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी सकल मराठा समाजाने मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. विधीमंडळात आरक्षण कायदा मंजूर झाल्यावर जल्लोष न करण्याचे आवाहनही करण्यात आले. तसेच आरक्षण मागणीसाठी राज्यभर लढा सुरु असून त्याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने घेऊ नये असा इशाराही देण्यात आला. सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचे समन्वयक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषेदत भूमिका स्पष्ट केली.

इतिहास संशोधक सावंत म्हणाले, 'राज्यातील सकल मराठा समाजाने मागासवर्ग आयोगाकडे ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली होती. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला स्वतंत्र्य कोट्यातून आरक्षण देण्याची घोषणा केली. यापूर्वीही काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे समितीच्या आधारे मराठा समाजाला स्वतंत्र कोट्यातून आरक्षण दिले होते. पण, हे आरक्षण कोर्टात टिकू शकले नाही. मागील सरकारप्रमाणे विद्यमान राज्य सरकार स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देत आहे. सरकार समाजाची फसवणूक करत आहे.

तेलंगणातील मुस्लिम समाजाने स्वतंत्र कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी केली असता भाजपचे अध्यक्ष अमित शहा स्वतंत्र्य कोट्यातून ५० टक्क्यांवर आरक्षण देता येत नाही, असे निवडणूकीच्या जाहीर प्रचार सभेत सांगत आहेत. मग शहा यांच्याच पक्षाचे सरकार महाराष्ट्रात असल्याने त्यांनी स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसे देणार हे स्पष्ट करावे.'

'मराठा ओबीसी, मराठा कुणबी अशी फूट पाडण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे', असा आरोप सावंत यांनी केला. सरकारच्या पे-रोलवरील मराठा व ओबीसी समाजातील नेतेमंडळी भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण कसे देणार? हे सरकारने सभागृहासमोर स्पष्ट केले पाहिजे असे ते म्हणाले.

वसंतराव मुळीक म्हणाले, 'मागासवर्ग आयोगाने मराठा समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचा अहवाल दिला आहे. समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे.' 'मराठा आरक्षण विधेयकाचे आरक्षण कायद्यात रुपांतर झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होईपर्यंत आंदोलन सुरू राहील,' असे दिलीप देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी हर्षल सुर्वे, प्रताप नाईक, अवधूत पाटील उपस्थित होते.

आंदोलनात सहभागी होणार

'मराठा समाजाचा मुंबईला जाणार गाडी मोर्चा पोलिसांनी अडवला. प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतले. तरीही कसबा बावड्यातील सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन वाहनातून कोल्हापुरातील कार्यकर्ते आझाद मैदान आंदोलनात सहभागी होणार आहे. यापुढे गनिमी कावा करुन कार्यकर्ते मुंबईला रवाना होतील,' असे समन्वयाकांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची उमेदवारी हुकल्याच्या वैफल्यातून कदम यांचे आरोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमदार निधीसाठी शिफारस करतात. निधी मंजुरीचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने होतात. मात्र आमदार निधी खासगी रेखांकनासाठी खर्च झाल्याचा आरोप नगरसेवक सत्यजित कदम यांनी केला आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे हे आरोप त्यांनी केले असून उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपची उमेदवारी मिळणार नसल्याच्या वैफल्यातून ते आरोप करीत आहेत' असा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. कदम यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे असे आमदारांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत कदमवाडी येथील पाच एकर खासगी जागेतील रेखांकनामध्ये क्षीरसागर यांच्या आमदार फंडाचा गैरवापर करून विकासकामे केल्याचा आरोप नगरसेवक सत्यजित कदम यांनी केला होता. या आरोपाला आमदार क्षीरसागर यांनी 'घोसाळकर' अशी उपमा देत प्रसिद्धीपत्रकातून त्याला प्रत्यूत्तर दिले आहे. याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 'कदम हे कोल्हापूर उत्तरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अन्य उमेदवार जाहीर केल्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन बिनबुडाचे आरोप करत आहेत. आमदारांचा स्थानिक विकास निधी हा जिल्हा नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने मंजूर होतो. आमदारांनी सुचविलेली कामे मंजूर करून निधी वितरीत करण्याचे अधिकार नियोजन समितीला आहेत. माझा मतदारसंघ महानगरपालिकेशी निगडीत असल्याने महापालिकेकडून विकासकामांचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात येते. त्यानंतर या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यावर कंत्राटदार नेमला जातो. या सर्व कामावर सार्वजनिक विभागाचे पूर्ण लक्ष असल्याने यामध्ये घोटाळा किंवा भ्रष्टाचार होऊ शकत नाही. स्वत: भ्रष्टाचारामध्ये गुंतलेल्या कदम यांनी आत्मपरीक्षण करून आरोप करावेत' असा सल्लाही पत्रकात दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ

$
0
0

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोवर व रुबेला प्रतिबंध लसीकरण मोहिमेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी नऊ ते १५ वर्षांच्या आतील बालकांसाठी लसीकरण मोहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात २४८ शाळांत मिळून ७२ हजार ७९२ बालकांना लस देण्यात आली.

जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन आणि महापालिकेने लसीकरण मोहिमेची तयारी केली आहे. पाच आठवडे ही मोहीम सुरू राहणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत मंगळवारी २४८ शाळांमध्ये लसीकरण मोहीम झाली. जिल्हा आरोग्य विभागातर्फे लसीकरण मोहिमेसाठी पाच हजार कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे.

महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर येथे लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी रोगांविषयी माहिती दिली. उपायुक्त मंगेश शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. एकात्मिक बाल विकास योजनेचे प्रमुख नितीन मस्के यांनी लसीकरणात शंभर टक्के बालकांना सहभागी करण्याबाबतचे आवाहन केले. प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. गीता पिलाई यांनी लसीकरण मोहिमेची जागृती करणाऱ्या पोस्टर वितरीत केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

नगरसेविका गीता गुरव, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जाधव, सहायक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, पद्मजा पाटील, डॉ. ज्योती लांडगे प्रमुख उपस्थित होते. मुख्याध्यापक उत्तम गुरव यांनी प्रास्ताविक केले. सविता जमदाडे, सरिता सुतार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रूपाली यादव यांनी आभार मानले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे ठार

$
0
0

दोन फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर चुये फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे सेंट्रिंग कर्मचारी ठार झाले. रोहित साताप्पा शिंदे (वय २६) व माणिक विष्णू पाटील (३२, दोघे रा. कावणे, ता. करवीर) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. अपघात मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अपघाताबाबत माहिती अशी : रोहित व माणिक हे दोघे सेंट्रिंग कामगार असून, मंगळवारी सकाळी ते कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. काम आटोपून दोघे मोटारसायकलवरून गावी जात होते. चुये फाटा परिसरात नव्याने होणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यात हे दोघेही गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना दोघे जखमी अवस्थेत दिसले. त्यांची ओळख पटल्यावर कावणे गावात अपघाताची माहिती देण्यात आली. त्यानंतर तातडीने कावणे ग्रामस्थ अपघातस्थळी आले. त्यांनी दोघांना सीपीआर हॉस्पिटल उपचारास दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले.

माणिक यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे, तर रोहित आई-वडिलांना एकुलता होता. दोघांचेही आई-वडील शेतकरी असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. अपघाताची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदाची निवडणूक सात डिसेंबरनंतर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या महापौर शोभा बोंद्रे यांनी सोमवारी राजीनामा दिल्याने नतून महापौर निवडीसाठी प्रशासनाने पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली. महापालिकेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या स्वाक्षरीने विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी निवडणूक कार्यक्रम पाठवला. या पत्रव्यवहारानुसार सात डिसेंबरनंतर नूतन महापौर निवड होण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये ठरलेल्या फॉर्म्यूलानुसार सोमवारी झालेल्या महासभेत महापौर बोंद्रे यांनी राजीनामा दिला. त्याचबरोबर उपमहापौरांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने नवीन महापौर निवडीसाठी प्रशासकीय हालचाली गतीमान केल्या. मंगळवारी महापालिका प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया सुरु केली आहे. जिल्हाधिकारी सुभेदार यांच्या स्वाक्षरीने विभागीय आयुक्तांकडे निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी पाठवलेल्या पत्रानुसार सात किंवा दहा डिसेंबरपर्यंत महापौर निवड होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कडाक्याच्या थंडीत अभयारण्यग्रस्तांचा ठिय्या

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वन विभागातील प्रशासनाच्या दिरंगाई, गलथान कारभारामुळे सरकारकडून आलेल्या निधीचे वाटप न झाल्याने चांदोली अभयारण्यग्रस्तांनी मंगळवारपासून रमणमळा येथील वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. कडाक्याच्या थंडीत, सकाळी येताना घराकडून आणलेल्या चटणी, भाजी, भाकरी खाऊन रस्त्यावरच त्यांनी रात्र काढली. श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली आंदोलन होत आहे.

आंदोलनासंबंधी आधी निवेदन देऊनही मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन दिवसभर गैरहजर राहिले. परिणामी त्यांच्या कामकाजाविरोधात आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील अभयारण्यग्रस्तांना उदरनिर्वाह भत्ता, शेतजमीन, घरे, शौचालय अनुदानापोटी ४ कोटी २२ लाख रुपये सरकारकडून वनविभागाकडे आले आहेत. ते संबंधित प्रकल्पग्रस्तांना वाटपासंबंधी अधिकाऱ्यांशी अनेकवेळा बैठक झाल्या. कराड व येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निधी वितरित करण्यात सातत्याने दिरंगाई होत आहे. याच्या निषेधार्थ महावीर गार्डनपासून दुपारी बारा वाजता अभयारण्यग्रस्तांचा मोर्चा निघाला.

वनविभागाच्या कामकाजाविरोधात घोषणा देत आंदोलक कार्यालयावर धडकले. तेथे मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या मारला. श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाप्रमुख मारुती पाटील, संपत देसाई, नजीर चौगुले यांनी भाषणात सरकार आणि वन प्रशासनावर जोरदार टीका केली. जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन स्थगित केले जाणार नाही, प्रसंगी अधिकाऱ्यांना कार्यालयातच कोंडू, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनात अशेाक पाटील, वसंत पाटील यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

०००

बेन असतात कधी?

धरणग्रस्तांनी कार्यालयासमोर कुटुंबासह ठिय्या मारला. तरीही मुख्य वनसंरक्षक उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे धरणग्रस्तांना रस्त्यावरच ठिय्या मारून झोपावे लागले. बेन सामान्य लोक, प्रकल्पग्रस्तांनाही अनेकवेळा भेटत नाहीत. स्वीय सहायक साहेब नाहीत, असे सांगत वेळ मारून नेतात. त्यामुळे बेन असतात कुठेष असा प्रश्न उपस्थित होत आहे.

०००

विनंती धुडकावली

ठिय्या आंदोलन सुरू झाल्यानंतर बेन यांनी मोबाइलवरून प्रकल्पग्रस्तांशी संपर्क साधला. आश्वासन देत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी विनंती धुडकावून आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे बेन यांचा आंदोलन गुंडाळण्याचा प्रयत्न फसला.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन...

$
0
0

बाबूराव वायदंडे

वारणानगर : येथील बाबूराव आबा वायदंडे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परीवार आहे. पत्रकार आनंदा वायदंडे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२९) सकाळी १० वाजता बिरदेवनगर येथे आहे.

०००

भागिरथी पोवार

वारणानगर : कोडोली (ता. पन्हाळा) येथील भागिरथी शामराव पोवार (वय ८२) यांचे निधन झाले. यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक रवींद्र पोवार व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी सुभाष पोवार यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता.२८) आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिंगणापूर, फुलेवाडीकरांना खड्ड्यांचा त्रास

$
0
0

फाट्यापासून नाक्यापर्यंतचा रस्ता खराब, महापालिकेसह सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष

युवराज पाटील, कुडित्रे

कोल्हापूरचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या शिंगणापूर फाटा ते फुलेवाडी नाक्यापर्यंतच्या कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या मार्गावरून कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यांतून मार्ग काढत आत प्रवेश करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे याठिकाणी वाहतूक कोंडी आणि अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जीवघेण्या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत असल्याने खड्डे बुजवणार कधी? असा उद्विग्न सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.

कोल्हापूर शहरालगतच्या शिंगणापूर फाट्यावर व कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील फुलेवाडी नाक्याजवळच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्यानंतर काहीप्रमाणात खड्डे बुजवले. पण जलवाहिनी दुरुस्तीसाठी पुन्हा रस्त्याची खोदाई करण्यात आली. परिणामी पूर्वीपेक्षा जास्त खड्डे या मार्गावर झाले आहेत. त्यामुळे वाहनधकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याची दुरावस्था झालेली असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जाग आलेली नाही.

पावसाळ्याबरोबर येथील रस्त्यावर नेहमीच पाणी वाहत असल्याने खड्ड्यामध्ये वाढच होत आहे. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे येथे खड्ड्यांचे ग्रहणच लागले आहे ते ग्रहण सुटण्यासाठी कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.

कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावरील तसेच करवीरच्या पश्चिम भागातील लोकांची वाहतूक कोल्हापूर येण्यासाठी याच मार्गांवरून होत असते. दररोज हजारो लहान-मोठ्या वाहनांची ये-जा सुरू असते. पावसाळा संपतो न् संपतो तोवर शिंगणापूर पाइपलाइन गळतीच्या दुरुस्तीसाठी या ठिकाणी एका खासगी कंपनीकडून रस्त्याची खोदाई करण्यात आली. मात्र, अद्याप या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे खड्ड्यांचा पिछा काही सुटलेला नाही.

सार्वजनिक बांधकामच्या

कामाचा सुमार दर्जा

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी नुकताच आणला आहे. पण राज्यमार्गासह अनेक लहान, मोठ्या रस्त्यांच्या कामातील सुमार दर्जामुळे नवीन केलेल्या रस्त्यांवरही खड्डे पडताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी आणलेला हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळेझाकपणामुळे असा खड्ड्यातच जाणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

पाइपलाइनची गळती काढण्यासाठी येथे रस्त्याची खुदाई करण्यात आली होती. अद्यापही पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. खुदाई केलेला रस्ता करून देणे ही संबंधित जेकेसी कंपनीची जबाबदारी आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बोलणे झाले असून लवकर काम पूर्ण करण्यात येईल.

- राहुल माने, नगरसेवक

कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावरील वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावर खड्डे असल्याने अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. खोदाई केलेल्या रस्त्याचे डांबरीकरण त्वरीत संबंधीत कंपनीने करावे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानेही याकडे तातडीने लक्ष द्यावे.

- राजेंद्र सूर्यवंशी, सभापती, पंचायत समिती करवीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शालिनी स्टुडिओचे अस्तित्व संपणार?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालिनी स्टुडिओच्या ५४ एकर जागेपैकी ४८ एकर भूखंडाचा यापूर्वीच विकास केला असून उर्वरीत भूखंडाचा ऐतिहासिक वारसास्थळामध्ये समावेश करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू होते. मात्र स्टुडिओचा उर्वरीत भूखंड विकसित करण्यासाठी नगरविकास विभागाकडे दाखल केलेले विकसकाचे अपील मान्य केले आहे. भूखंड विकसित करण्यासाठी महापालिकेला मुंजरी देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे शालिनी स्टुडिओचे अस्तित्व संपण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, याबाबत अखिल भारतीय चित्रपट महामंडळ फेरयाचिका दाखल करणार आहे.

शालिनी स्टुडिओचा ए वॉर्डातील रि.स.नं. ११०४ पैकी क्रमांक पाच व सहा या दोन भूखंडांचा ऐतिहासिक वारसास्थळामध्ये (ग्रेड तीन) समावेश करण्यासाठी मार्च २०१७ मध्ये महापालिकेने नगरसविकास विभागाला पत्र दिले. याबाबत नगरविकस विभागाकडे सुनावणी सुरू होती. दोन्ही भूखंड शालिनी स्टुडिओसाठी राखीव असल्याचे म्हणणे महापालिकेचे होते. भूखंडाचे मालक देवासचे महाराज या जागेचे मूळ मालक असून त्यांच्या वटमुख्यत्यारनेही दोन्ही भूखंड स्टुडिओचे राखीव असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करून उर्वरीत जागेच्या विकासासाठी परवानगी घेतली होती.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकसकाने उर्वरीत भूखंड विकसित करण्यासंबंधी ठराव आला. प्रत्यक्षात ठराव मंजुरीची आवश्यकता असताना महासभेने ठराव नामंजूर केला. परिणामी विकसकाला अपील करण्याची संधी मिळाली. विकसकाने नगररचना विभागाकडे अपील दाखल केल्यानंतर सुनावणी सुरुवात झाली. दरम्यान या भूखंडावर आरक्षण टाकण्याचा ठराव सभेत मंजूर झाला. तसेच ऐतिहासिक वारसा पाडल्याबद्दल विकसकावर गुन्हा दाखल केला. मात्र, सुनावणीदरम्यान महापालिकेचा विधी विभाग किंवा प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित रहात नसल्याने आयुक्तांनी सुनावणीला उपस्थित रहावे अशी मागणी नगरसेवक भूपाल शेटे यांनी महासभेत केली. चित्रपट महामंडळानेही भूखंड विकसित करण्यास विरोध केला.

लोकभावना तीव्र असताना नगरविकास विभागाकडे सादर केलेले विकसकाचे अपील पाच नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत मान्य केले. परिणामी विकसकाला भूखंड विकसित करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे शालिनी स्टुडिओचे अस्तित्व संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे.

माहिती अधिकारातून माहिती

याबाबत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा यांनी माहितीच्या अधिकारांन्वये नगररचना विभागाकडे माहिती मागवल्यानंतर विकसकाचे अपील मान्य केल्याचे समोर आले आहे. नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे उर्वरीत जागेच्या रुपाने किमान स्टुडिओच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा राहतील, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या कलाप्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे.

'शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये त्याचा समावेश करण्याची मागणी महापालिकेने केली. पण पत्रव्यवहार करण्यापलिकडे महापालिकेने काही केले नाही. त्यामुळे ऐतिहासिक वारसास्थळाचा विषय बाजूला पडला. स्टुडिओसंबंधीचा नामंजूर ठराव फेरप्रस्ताव प्रशासनाने आणल्याने स्टुडिओचे अस्तित्व संपुष्टात येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

- भूपाल शेटे, नगरसेवक

चित्रपट महामंडळ फेरयाचिका दाखल करणार

महापालिकेच्या काही नगरसेवकांसह शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी नगरसेविका व महामंडळाच्या सदस्या सुरेखा शहा प्रयत्न करीत आहेत. विकसकाने दाखल केलेल्या याचिकेच्या दाव्याबाबत माहिती अधिकारात माहिती घेतल्यानंतर त्यांना विकसकाचे अपील मान्य केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी फेरयाचिकेबाबत महामंडळाकडे पाठपुरावा सुरू केला असून मंगळवारी अनेक पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

कोट

जयप्रभा स्टुडिओप्रमाणे शालिनी स्टुडिओची अवस्था होऊ नये, यासाठी प्रयत्न आहेत. पण प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे विकासकाचे अपील मान्य करुन भूखंड विकास करण्यासाठी महापालिकेला सूचना केली आहे. नगरविकास विभागाच्या निर्णयाविरोधात फेर याचिका दाखल करणार आहे.

- सुरेखा शहा, महिला व बालकल्याण सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्केटिंग स्पर्धेत यश

$
0
0

स्केटिंग स्पर्धेत यश

दोन फोटो

कोल्हापूर : पुणे येथे झालेल्या राज्यस्तरिय रोलर गेम स्कटिंग स्पर्धेत शांतीनगर येथील लिटील हार्ट प्री प्रायमरी स्कूलने दोन पदके मिळवली. या शाळेचा विद्यार्थी अर्णव पाटील याने सुवर्ण तर सोहम सातार्डेकर याने ब्राँझ पदक मिळवले. त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका अमृता पाटील यांचे प्रोत्साहन तर जयराम जाधव यांचे प्रशिक्षण मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठूरायाची प्रक्षाळ पूजा सुरू

$
0
0

विठूरायाची प्रक्षाळ पूजा सुरू

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

कार्तिकी यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांना सलग १६ दिवस अहोरात्र दर्शन देत उभ्या असलेल्या परब्रह्म पांडुरंगाला मंगळवारपासून नियमित विश्रांती मिळणार आहे. देवाच्या राजोपचाराला मंगळवारी प्रक्षाळ पूजेनंतर सुरुवात झाली. देवाचा थकवा आणि शिणवट घालविण्यासाठी प्रक्षाळ पूजा करायची शेकडो वर्षाची परंपरा आहे.

मंगळवारी भल्या पहाटेपासून विठूरायाच्या चरणाला भाविकांनी लिंबू आणि साखर चोळून दर्शन घेण्यास सुरूवात केली. या नंतर संपूर्ण मंदिर धुऊन स्वच्छ करण्यात आले. पहाटेपासून पुण्यातील एका भक्तांना विठूरायाची राऊळी फळे आणि फुलांचा वापर करीत अतिशय आकर्षक पद्धतीने सजविली आहे. दुपारी देवाच्या प्रक्षाळ पूजेस सुरुवात झाली. या पूजेत पारंपरिक पद्धतीने ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत मंत्रपठण करीत देवाला गरम पाण्याने रुद्राभिषेक करण्यात आला.

रुद्र आवर्तनाच्या जयघोषात देवाला दही, मध, साखर आणि शेवटी दुधाचा अभिषेक शंखातून करण्यात आला. पंचामृत स्नान झाल्यावर देवाला गरम केशर पाण्याने स्नान घालण्यात आले. यामुळे देवाच्या थकलेल्या शरीराचा शिणवटा दूर होण्यास मदत होते, अशी भावना वारकरी संप्रदायात आहे. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठूरायाची राऊळी चक्क फळे आणि फुलांच्या मदतीने सजविण्यात आली होती. विठूरायाच्या गाभाऱ्यात अननस, संत्री, मोसंबी, सफरचंद, चिकू अशा विविध प्रकारच्या फळांचा या सजावटीत वापर करण्यात आला होता. दुपारी देवाला दही-दुधासह पंचामृत स्नानाचा आभिषेक करण्यात आला. या नंतर पंच पक्वान्नांचा महानैवेद्य दाखविल्यावर भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले. सायंकाळी देवाला ठेवणीतल्या पोषाखात सजवून पारंपरिक मौल्यवान दागिन्यात मढविण्यात आले होते. रात्री झोपण्यापूर्वी २१ प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतीचा वापर करून तयार केलला काढा विठूरायाला दिला जातो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लजच्या हद्दवाढीला मंजुरी

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कागल

गडहिंग्लज नगरपालिकेच्या हद्दीलगत असलेल्या बड्याचीवाडीचा परिसर नगरपालिकेत सामावून घेऊन शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न कित्येक वर्षे प्रलंबित होता. त्यासाठी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे आणि गडहिंग्लज हद्दवाढ कृती समिती शिष्टमंडळाने सरकारकडे याप्रश्नी पाठपुरावा केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हद्दवाढीची उद्घोषणा मंगळवारी मंत्रालयात केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजित घाटगे प्रमुख उपस्थित होते. हद्दवाढीच्या निर्णयाने कृती समिती व घाटगे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून, गडहिंग्लज शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.

गडहिंग्लज शहरासभोवती असणाऱ्या २५ ते ३० वसाहती बड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीत येतात. बड्याचीवाडी हे मूळ गाव गडहिंग्लज शहरापासून चार कि.मी.वर आहे. हा गडहिंग्लज शहराच्या हद्दीला लागून असल्याने या भागातील नागरिकांना सर्वच गोष्टींसाठी शहरातच यावे लागते. तसेच हा भाग जिल्हा परिषद हद्दीत असल्याने या भागातील वसाहतीत पाणी, गटार, स्वच्छता, दिवाबत्ती, आदी नागरी सुविधांची व्यवस्था करणे पालिकेला शक्य होत नाही. त्यामुळे बड्याचीवाडीचा काही भाग नगरपालिकेत समाविष्ट करावा, या मागणीसाठी समरजितसिंह घाटगे आग्रही होते. त्यांच्याच पुढाकाराने महिन्याभरापूर्वी मुंबई बैठक झाली होती. त्यानुसार आवश्यक त्या शिफारशींसह प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने त्यांनी हद्दवाढीची उद्घोषणा केली.

हद्दवाढीमुळे बड्याचीवाडी ग्रामपंचायतीतील सुमारे ६.२५ स्क्वेअर किलोमीटरपैकी ४.६ स्क्वेअर कि.मी.चा परिसर गडहिंग्लज नगरपरिषदेला जोडला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे गडहिंग्लज परिसरात फटाके वाजवून स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याबाबत बोलताना हद्दवाढ कृती समितीचे अध्यक्ष एम. एस. बेळगुद्री म्हणाले, 'गडहिंग्लजच्या बाजूच्या उपनगरांना दैनंदिन नागरी समस्यांना दररोज सामोरे जावे लागत होते. आता उद्घोषणा झाल्याने यावेळी शहराची हद्दवाढ होणार हे निश्चित झाले आहे. कारण यामधील ९० टक्के त्रुटी आता संपलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना नगरपालिकेच्या आवश्यक सुविधा मिळणार याची खात्री झाली आहे. कित्येक वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न घाटगे यांनी शेवटच्या टप्प्यात तडीस नेला.'

२००६ नंतर पूर्तता

यापूर्वी २००६ मध्ये अशाच पद्धतीने हद्दवाढीची उद्घोषणा झाली होती; परंतु यावर येणाऱ्या हरकती आणि तक्रारींना विलंब झाल्याने हद्दवाढ बारगळली होती, परंतु आता यातील त्रुटी दूर झाल्या असून, यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवून त्याला तातडीने मंजुरी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोट...

गडहिंग्लज शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न गेली सत्तर वर्षे प्रलंबित होता. त्यामुळे येथील नागरिकांची हद्दवाढीबाबत आग्रही मागणी होती. यासाठी प्रयत्न करताना मला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांने मोलाचे सहकार्य लाभले. त्यामुळेच आज मी हा प्रश्न तडीस नेल्याचे समाधान आहे.

समरजितसिंह घाटगे, अध्यक्ष, पुणे म्हाडा

कोट...

शहराच्या विकासाच्या दृष्टीने हद्दवाढ गरजेचीच होती. हद्दवाढ कृती समिती आणि सर्वांचीच ही आग्रही मागणी होती. परंतु सर्वपक्षीय नेत्यांना भेटून या काळात समरजितसिंह घाटगे यांनी आग्रही भूमिका घेतली. हद्दवाढीच्या निर्णयाने गडहिंग्लजच्या विकासाचा एक नवीन अध्याय सुरू होईल.

स्वाती कोरे, नगराध्यक्षा, गडहिंग्लज नगरपालिका

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिंगणापूर बंधाऱ्यात दुसऱ्या दिवशीही मासे मृत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील येथील शिंगणापूर बंधाऱ्याजवळ दूषीत पाण्यामुळे मंगळवारी दुसऱ्या दिवशीही मृत मासे तरंगत राहिले. ते घेऊन जाण्यासाठी खवय्यांची वर्दळ वाढली. मात्र हे मासे नेमक्या कोणत्या कारणाने मृत होत आहेत? याबाबत महाष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रशासन सध्यातरी अनभिज्ञ आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी रत्नागिरीतील प्रयोगशाळेत पाठवले आहे. अहवाल आल्यानंतर नेमके करण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे मृत माशांबाबतचे गूढ वाढले आहे.

दरम्यान, पंचगंगा खोऱ्यातील साखर कारखान्यांनी पेंटवॉशचे पाणी नदीत टॅँकरने ओतले असावे, परिसरात पडलेली मळी, पेंटवॉश अवकाळी पावसाने नदीत मिसळली असावी, मासे पकडण्यासाठी रसायनाचा वापर करण्यात येत असावे अशी प्राथमिक शक्यता पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. भोगावती नदीवरील हळदी, बहिरेश्वर, कोगे बंधाऱ्यावर २३ आणि २४ नोव्हेंबरला मासे मृत झाल्याचे परिसरातील नागरिकांना दिसून आले. त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचे नमुने घेतले. त्यांनी परिसरातील भोगावतीसह इतर साखर कारखान्यांना भेट दिली. मळीमिश्रीत पाणी बाहेर पडते का? त्याची खात्री केली. मात्र तसे काही दिसून आलेले नाही.

सोमवारी शिंगणापूर बंधाऱ्याजवळील मासे मृत झाले. दुसऱ्या दिवशीही पुन्हा मासे मृतच झाले. याचे नेमके कारण प्रदूषण मंडळाच्या प्रशासनाकडेही नाही.

भोगावती, पंचगंगा नदीतील मासे मृत कशामुळे झाले याचे नेमके कारण शोधण्यासाठी चार दिवस प्रयत्न सुरू आहेत घटनास्थळी भेट देऊन पाण्याचे नमुने घेतले. त्याचा अहवाल आल्यानंतर कारण समोर येईल. प्राथमिक टप्यात तरी साखर कारखान्यांतून मळीमिश्रीत पाणी मिसळत नसल्याचे दिसते.

- प्रशांत गायकवाड, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत मासे मृत झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. पंचगंगा खोऱ्यातील साखर कारखान्यांतून रसायनमिश्रीत किंवा पेंटवॉश बाहेर सोडले का त्याची पाहणी केली. मात्र, तसे आढळलेले नाही. म्हणून मासे मृत कशामुळे होत आहेत, याचे कारण अस्पष्ट आहे. पाणी तपासणी अहवाल आल्यानंतर कारण स्पष्ट होईल.

- उदय गायकवाड, पर्यावरण तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

$
0
0

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र : विजय जाधव

००००

भाजपचीच कसोटी !

००००

काँग्रेस-राष्ट्रवादीने कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागांवरील लोकसभेचे उमेदवार निश्चित करत पहिला टप्पा पूर्ण करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूरची लढत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांच्यातच होण्याची चिन्हे आहेत. मात्र, खासदार धनंजय महाडिक यांनी वेगळा निर्णय घेतला तरच समीकरणे बदलणार आहेत!

00000

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात धडक मारली. सत्तेच्या महालात मश्गुल असलेल्या या आघाडीला मतदारांनी घरात बसवले. पश्चिम महाराष्ट्रातील हा पराभव जिव्हारी लागणारा होता. सांगलीचा स्व. वसंतदादांचा गड 'युती'ने घेतला. सांगलीची लोकसभा भाजपकडे जाणे हा काँग्रेसला मोठा धक्का होता. पश्चिम महाराष्ट्रात राजकारण उभे करताना भाजपने 'फोडा आणि राज्य करा' नीती परिणामकारपणे वापरली. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेले संजय पाटील कमळाच्या चिन्हावर खासदार झाले. विधानसभेलाही या पक्षाला चांगला शिरकाव करता आला. कोल्हापूर जिल्ह्यात एकाच्या दोन जागा झाल्या. सांगलीतही चांगले यश मिळाले. विशेष म्हणजे किरकोळ अपवाद वगळता हे सर्व विद्यमान आमदार आणि खासदार पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले होते.

येत्या निवडणुकीतही दक्षिण महाराष्ट्राची जबाबदारी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे. 'शतप्रतिशत भाजप'ची घोषणा त्यांनी अलीकडे अनेकदा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व दहाही मतदारसंघांत कमळ फुलविण्याचा त्यांचा निर्धार आहे. शिवसेनेशी युती होणार काय, हा कळीचा प्रश्न आजच्या घडीला महत्त्वाचा असला आणि उद्धव ठाकरे यांच्या अयोध्यावारीनंतर हा गुंता आणखीनच वाढला आहे. शिवसेनेसमोर सहा जागा राखण्याचे आव्हान आहे. युती झाल्यास उर्वरित चार मतदारसंघांसाठी भाजपला काम करावे लागणार आहे. यासाठी दोन्ही तातडीच्या योजना भाजपने तयार करून ठेवल्या आहेत. याआधी दोनवेळा चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग घेत त्यांना जनतेत जाण्याचे धडे दिले. निवडणूकपूर्व प्रचाराचा कानमंत्र दिला. त्यांनी शिवसेनेसोबत टोकाचे मतभेद होणार नाहीत याची दक्षता घेतली आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत गेली तीन वर्षे सुरू असलेला संघर्ष थांबविला आहे. 'कोल्हापूर लोकसभेला धनंजय महाडिक खासदार असतील, तर अमल महाडिक मंत्री असतील,' असे सांगतांना आगामी निवडणुकांच्या राजकारणाची आपली भिस्त महाडिक यांच्यावर असणार असे संकेत त्यांनी दिले असले आणि हे निमंत्रण राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदारांनी धुडकावले नसले तरी राष्ट्रवादीतील ताज्या घडामोडींनुसार भाजपला नव्याने तयारीला लागावे लागेल असेच चित्र आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा डाव भाजपवरच उलटविण्याची तयारी सुरू केली असून, पवार यांचा परवाचा दौरा त्याचाच एक भाग होता, निमित्त काहीही असले तरी, हे आता स्पष्ट झाले आहे. भाजप महाडिक यांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसला असल्याने लोकसभेला मैदानात उतरू शकेल असा उमेदवार पक्षाने अजून उघड केला नाही. याचाच अर्थ सेनेबरोबर युती होण्याचीच चिन्हे आहेत.

दोन उमेदवार निश्चित

शरद पवार यांनी भाजप नेत्यांची खेळी ओळखून धनंजय महाडिक यांचा भाजपचा मार्ग प्रयत्नपूर्वक रोखला आहे. महाडिक राष्ट्रवादीचे उमेदवार असणार काय, याबद्दलची संदिग्धता संपवली आहे. यामुळे चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना राष्ट्रवादीत आणून त्यांना उमेदवारी देण्याचा महाडिक विरोधकांचा डाव फसला आहे. मंडलिक शिवसेनेचेच उमेदवार असतील, त्यांना महाडिकविरोधकांचे बळ मिळेल, असे दिसते. यामुळे महाडिक विरुद्ध मंडलिक अशी तुंबळ लढाई होण्याचीच शक्यता अधिक. काँग्रेस-राष्ट्रवादी युती झाली तरी यावेळी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची जुन्या चुका नव्याने करायची तयारी दिसत नाही. यावेळी त्यांनी थेट आणि टोकाची भूमिका 'गोकुळ'च्या संघर्षापासून घेतली आहे. मात्र, राजकारण आणि निवडणुकीत काहीच खरे असत नाही. माणुसकी आणि आपुलकीच्या भिंती कधी बोलू लागतील सांगता यायचे नाही!

चंद्रकांत पाटील यांनी गेल्या चार वर्षांत जोरदार मुसंडी मारत पक्षबांधणी करण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काबीज केल्या. पक्षकार्यकर्त्यांना सर्वप्रकारचे बळ ते पुरवत असतात. महामंडळे, समित्या, राज्यसभा अशा नियुक्त्या करत स्थानिक नेते-कार्यकर्त्यांची फौज त्यांनी तयार केली आहे. मात्र, दोन-तीन उमेदवार वगळता निवडून येण्याची तयारी असणारे चेहरे आजही पक्षाकडे नाहीत, हे वास्तव आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेनेतील बेदिलीवरच त्यांचे निवडणुकीचे राजकारण चालणार आहे. मात्र, यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर आव्हान असेल ते भाजप-शिवसेनेचेच, आघाडी अस्तित्वासाठी, तर युती सत्ता राखण्यासाठी निकराने लढेल. आघाडीच्या नेत्यांना आता सत्तेपासून बाहेर राहिल्याच्या झळ बसू लागल्या आहेत.

युतीचे आव्हान ओळखूनच भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने तयारी चालविली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्याशी आघाडीने केलेली गट्टी त्याचाच भाग आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोठा हातभार आघाडीला मिळेल. राज्यसरकारच्या धोरणांबद्दल शेतकरी वर्गातील अस्वस्थता हेरण्याचे आणि त्यावर स्वाभिमानीचा उतारा मिळवण्याचे काम आघाडीने केले आहे. भाजपने सदाभाऊ खोत यांना अलगदपणे बाजूला काढत याची सलामी दिली होती. आता या राजकारणाचा दुसरा भाग सुरू होईल. शेट्टी याचे उट्टे कसे काढणार की सदाभाऊ त्यांना झुंजवणार पाहावे लागेल. खासदार शेट्टींनी आपली जागा सुरक्षित करून घेतली असली तरी त्यांना धक्के देण्याचे राजकारण शिजत आहे.

विरोधाची तयारी

जनसंघर्ष यात्रा, हल्लाबोल यात्रेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या चार महिन्यांपासून निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या आणि त्यांचे प्रश्न यावर तयार झालेल्या वातावरणावर स्वार होण्याची या पक्षांची धडपड आहे. या वातावरणाचा राजकीय फायदा उठवायची संघटित ताकद या पक्षांकडे नाही, हीच सत्ताधाऱ्यांसाठी जमेची बाजू. मात्र, गेल्या लोकसभा-विधानसभेपेक्षा यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून बेफिकिरी होणार नाही, असे त्यांच्या मोर्चेबांधणीवरून दिसते. यातील पहिला टप्पा नेत्यांमधील अंतर्गत मतभेद मिटविण्याचा आहे. एका बाजूला पक्षांतर्गत गटबाजी संपविणे आणि परस्परविरोधात लढण्याच्या तयारीत असलेल्या दोन्ही पक्षांच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांना एकत्रित लढायला तयार करणे या दोन आव्हानांना हे पक्ष कसे सामोरे जातात पाहावे लागेल.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, अजित पवार यांचे अलीकडे वाढलेले दौरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील यांचे दौरे यातून या दोन्ही पक्षांनी गेलेल्या जागा परत मिळविण्यासाठी वर्षभरापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजप-सेनेला रोखायचे हा एककलमी कार्यक्रम या पक्षांनी हाती घेतला आहे. स्वत: शरद पवार यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणी केली आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवाराची अनिश्चितता संपविल्याने आणि काँग्रेसने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया न देता हा कोल्हापूरचा तोडगा मान्य केला आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसचे गट सोबत राहतील, याची दक्षता घ्यायला सुरुवात केली आहे. पवार यांनी खासदार शेट्टी, काँग्रेसचे इच्छुक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने यांच्याशी चर्चा करून हातकणंगलेत शेट्टींना हिरवा कंदील दाखविला. इचलकरंजी, हातकणंगले आणि शिरोळचे चित्र काय राहणार याची माहिती घेतली. कोल्हापुरात खासदार महाडिक यांना सोबत ठेवले. महाडिक यांची संसदेतील कामगिरी आणि निवडून येण्याची तयारी या दोन्ही बाबतीत शरद पवार समाधानी असल्याचे सांगितले जाते. महाडिक यांना पक्षातून विरोध असला तरी हक्काची जागा आणि उमेदवार सोडायचा नाही, असे धोरण ठेवत त्यांच्या उमेदवारीवर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभेच्या या दोन जागांचा निकाल लावत त्यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांची उमेदवारी हातात असणारे खासदार महाडिक आता कोणाला कसा ठेंगा दाखविणार, हे महत्त्वाचे ठरेल. येत्या दोन -तीन महिन्यांत राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहणार यावरच सर्वकाही अवलंबून असेल!

शिवसेनेबरोबरची अधांतरी युती, काँग्रेस-राष्ट्रवादीची एकजूट आणि कोल्हापूरसाठी हक्काचा उमेदवार ठरत नसल्याने भाजपची कसोटी लागली आहे. हातकणंगलेत रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी उमेदवारीची घोषणा केल्याने भाजपची सुटका झाली आहे. मात्र, कोल्हापुरात महाडिक यांच्याविरोधात काम करण्याची वेळ पालकमंत्र्यांवर येण्याची शक्यताच अधिक आहे.

00000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहार यांच्याविरोधातप्रशासनाचे प्रतिज्ञापत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावरील कारवाईच्या अनुषंगाने प्रशासनाने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणमध्ये (मॅट) प्रतिज्ञापत्र सादर केले. 'मॅट'मध्ये मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान शिक्षणाधिकारी लोहार आणि जिल्हा परिशदेच्या वकिलांनी युक्तीवाद केला. 'मॅट'मध्ये दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. पुढील सुनावणी १८ डिसेंबर रोजी घेण्यात येईल असे सांगण्यात आले.

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने ११ सप्टेंबर रोजी लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशीचा ठराव केला. प्रशासनाने त्यांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली. त्यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईविरोधात लोहार यांनी ऑक्टोबरमध्ये 'मॅट'मध्ये धाव घेतली. प्रशासनाकडून चुकीच्या पध्दतीने कारवाई झाल्याचे निदर्शनास आणले होते. सीईओंना कारवाईचे अधिकार नसल्याचे म्हणणे मांडले होते. 'मॅट'ने कारवाईला स्थगिती दिल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू झाले.

दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनाकडून नियुक्त चौकशी समितीकडून त्यांची चौकशी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाला. याप्रसंगी प्रशासनाकडून युक्तीवाद करताना वकिलांनी सभागृहाचा ठराव, सदस्यांनी नोंदविलेले आक्षेप, चौकशी समितीची नियुक्ती, समितीसमोर प्राप्त झालेल्या तक्रारी या संदर्भात जवळपास ३२ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले. शिक्षक मान्यता, वेतन प्रस्ताव, पदोन्नतीसंदर्भात तक्रारदारांनी तक्रारी नोंदविल्या आहेत. त्याचाही प्रतिज्ञापत्रात समावेश आहे. लोहार यांच्याकडून युक्तीवाद करताना त्यांच्यावरील आरोपांचे खंडन करण्यात आले. तसेच प्रशासनाकडून कारवाई चुकीच्या पध्दतीने झाल्याचे निदर्शनास आणल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा कारागृहातील कैद्याकडे पिस्तूल?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाईतील सीरियल किलर डॉ. संतोष गुलाबराव पोळ याचा कळंबा कारागृहात पिस्तूल घेऊन फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सात खून केल्याच्या प्रकरणात पोळ न्यायालयीन कोठडीत आहे. पोळने आठ मिनिटाच्या सहा क्लिप व्हायरल केल्या असून पिस्तूल आणि मोबाइलसाठी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. विशेष म्हणजे पिस्तुलाचे प्रात्याक्षिक दाखविण्यापर्यंतची ही क्लिप आहे. या प्रकाराने कारागृहाची सुरक्षा पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

कारागृह प्रशासनाने हे पिस्तूल बनावट असल्याचा दावा केला आहे. कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे मंगळवारी रात्री कोल्हापुरात दाखल झाल्या असून बुधवारी (ता. २८) त्या या प्रकाराची चौकशी करणार आहेत.

पोळ 'अंडा सेल' क्रमांक २ मध्ये आहे. पिस्तूल रात्रीच्या सुमारास दाखवतानाची ही क्लिप व्हायरल झाली. ती कारागृह प्रशासन अधिकाऱ्यांनी पाहिल्यानंतर खळबळ उडाली. कारागृहात मोबाइल बंदी असतानाही पोळने मोबाइलवरुन सहा मिनिटांच्या आठ क्लिप्स कशा बनविल्या, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

वाई हत्याकांडातील सहआरोपी आणि माफीची साक्षीदार ज्योती मांडरेने हे पिस्तूल कारागृह सुभेदार राजाराम कोळी यांच्याकडे दिले. त्यांनी ती वरिष्ठ तुरुंगाधिकारी चंद्रकांत आवळे यांच्याकडे दिली असून, त्यासाठी पैसे घेतल्याचे पोळने म्हटले आहे. कारागृहातील खोलीत दाखल झाल्यानंतर बॉक्समधून ही पिस्तूल काढून ती पोळ दाखवत असल्याचा हा व्हिडिओ आहे. काही खून प्रकरणात पोलिसांनी मला सहकार्य केले. मात्र त्यांनी केवळ आपल्यालाच या प्रकरणात अडकविल्याचा आरोप पोळने क्लिपमध्ये केलाआहे. सहा क्लिपमध्ये कारागृहात आणलेले पिस्तूल, खोलीत सुरु असलेले लिखाण, कागदपत्रे, बॉक्स आणि मोबाइल, पिस्तूलासाठी मदत केलेल्या सहकाऱ्यांची नावे घेतली आहेत.

.. .. ..

दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई

घडलेल्या प्रकाराची माहिती कारागृह प्रशासनाने दिली आहे. त्याची गांभीर्याने चौकशी केली जाणार आहे. कारागृहात मोबाइल, पिस्तूल आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. बुधवारी प्रशासनासह पोळकडून वस्तुस्थितीची माहिती घेऊ, त्याला प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्याचे चौकशीत आढळल्यास संबंधितावरही कारवाई केली जाईल, असे कारागृह महानिरीक्षक स्वाती साठे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, माथेफिरु पोळचा पोलिस आणि कारागृह प्रशासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले. व्हिडीओत दाखविलेली पिस्तूल बनावट आहे. कारागृहात मोबाइल कसा आला, त्याची चौकशी केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार मुश्रीफ, कुपेकर यांचे खराब रस्त्यांसाठी आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर यांनी यांनी कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. दोन्ही मतदारसंघांत विरोधी आमदार असल्याने सरकारकडून निधी देण्यात दुजाभाव केला आहे. त्यामुळेच रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा आरोप मुश्रीफ यांनी यावेळी केला.

विकासकामांना निधी न देणाऱ्या राज्य सरकार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी दिल्या. मुश्रीफ व कुपेकर यांनी कागल व चंदगड मतदारसंघातील खड्ड्यांचे छायाचित्र असलेला फलक हाती धरला होता. त्यावर 'खड्डेच खड्डे चोहीकडे, मग रस्ते गेले कुणीकडे'? अशी विचारणा करताना 'हे रस्त्यातील खड्डे नव्हेत, तर हे आहेत खड्ड्यांतील रस्ते' असा उपरोधात्मक निषेधही फलकावर नोंदविलेला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images