Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिवाजी मार्केट बकाल

$
0
0

फोटो आहेत

कोल्हापूर टाइम्स टीम

कचरा उठाव करण्यास खासगी ठेकेदाराचे होणारे दुर्लक्ष, सुरक्षारक्षकांची वाणवा आणि साफसफाईअभावी स्वच्छतागृहातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे महापालिकेशेजारी असलेले छत्रपती शिवाजी मार्केट बकाल झाले आहे. या इमारतीतील भाजी मंडईत दिवसा आणि रात्रीही प्रेमी युगलांचा वावर असतो. रात्रीच्या ही जागा मद्यपींचा हक्काचा बार बनल्यासारखी आहे. या इमारतीत महापालिकेचा इस्टेट विभाग, पाणीबिल भरणा केंद्र, प्राथमिक शिक्षण विभाग आणि अन्य महत्त्वाची कार्यालयेही आहेत.

महापालिकेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी मार्केट. सुपर मार्केटचा दर्जा असलेल्या मार्केटमध्ये तब्बल २२० दुकानगाळे आहेत. त्याचबरोबर विस्तीर्ण अशा भाजी मंडईसह महापालिकेची शिक्षण, पाणी, इस्टेट अशी महत्त्वाची कार्यालये आहेत. महापालिकेची कार्यालये वगळता मार्केटमधील इतरठिकाणी मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

यापूर्वी मार्केटमधील कचरा उठाव आणि स्वच्छता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमित केली जात होती. पण गेल्या काही महिन्यांपासून खासगी ठेकेदराला कचरा उठाव करण्यास परवानगी दिल्याने येथून नियमित कचरा उठवा केला जात नाही. ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि स्वच्छतागृहातून सुटलेल्या दुर्गंधीमुळे नाक मुठीत घेऊनच चालावे लागते. या इमारतीच्या अनेक भिंती पान, गुटखा खाऊन रंगवल्या आहेत.

मार्केटमध्ये एकीकडे स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले असताना भाजी मंडईमध्ये व्यापारी नसल्याने प्रेमी युगलांसह भटक्यांचा दिवसभर वावर सुरू असतो. शहरातील मध्यवस्तीत असलेले या मार्केटमधील काही भाग बंदिस्त असल्याने प्रेमी युगुलांना कोणीही हटकत नाहीत. काही व्यापाऱ्यांनी त्यांना हटकले असता वादावादी होत असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

दिवसभर प्रेमी युगुलांचा असलेला वावर रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. रात्री आठनंतर या इमारतीचा ताबा मद्यपी घेतात. मध्यंतरी पोलिसांनी ओपन बारवर कारवाई केल्यामुळे महापालिकेच्या इमारतींमध्ये मद्यंपींचा अड्डा भरत आहे. अनेकदा येथे रस्सामंडळही होत असल्याने येथे रिकाम्या वाट्या, ग्लास, पत्रावळ्यांचे ढीग पडलेले असतात. महापालिकेने येथे कार्यालयांसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. सुरक्षारक्षक केवळ कार्यालयांची देखरेख करतात, पण इतर ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने बिनबोभाटपणे जेवणावळीसह इतर अवैद्य प्रकार सुरू असतात. येथील व्यापाऱ्यांनी अनेकवेळा प्रशासनाच्या याबाबतची माहिती दिली. पण याकडे फारशा गांभीर्याने प्रशासनाने पाहिलेले नाही. मार्केटमधील अंतर्गत सुविधांचा असा बोजवारा उडाल्याने पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये थेट पाणी येते. चप्पल लाइन येथील गटर बुजल्यामुळे पावसाचे पाणी येत असल्याचे अनेकवेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. पण त्याकडेही दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यामध्ये तर मार्केटमध्ये दुर्गंधीमध्ये अधिक वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

३८ वर्षांत मार्केटला एकदाही रंगरंगोटी नाही

गाळेधारकांच्या डिपॉझिटमधून मार्केटची उभारणी झाली. सुपर मार्केटचा दर्जा असलेल्या या मार्केटमध्ये पिण्याच्या पाण्यासह स्वतंत्र स्वच्छता गृह असणे अपेक्षित आहे. पण अशी कोणतीही सुविधा नसताना भाडे आकारणी मात्र सुपर मार्केटप्रमाणे केली जाते. जमा होणाऱ्या भाड्यातून ३८ वर्षांत एकादाही मार्केटची रंगरंगोटी केली नसल्याचा आरोप दुकानगाळेधारक करत आहेत.

भाजी मार्केटच्या पाच हजार स्क्वेअर फुटात केवळ सहा ते सात व्यापारी आहेत. रस्त्यावर भाजीपाला विक्री सुरू असल्याने येथील व्यापाऱ्यांची संख्या रोडवली आहे. परिणामी येथे प्रेमी युगलांवर वाढला आहे. तर रात्रीच्यावेळी मार्केट मद्यपींचा अड्डाच बनून जातो.

समीर बागवान, विक्रेते

भाड्याचा दहा टक्के निधी देखभार दुरुस्तीसाठी राखीव ठेवला जातो. राखीव निधी मार्केटच्या कामासाठी वापरला जात नाही. चप्पल लाइनची गटर बुजल्यामुळे पावसाचे पाणी थेट मार्केटमध्ये येत आहे.

बबन महाजन, दुकान गाळा मालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शिरोळ’ ठरणार वादाचा केंद्रबिंदू

$
0
0

नगरपालिका निकालाने विधानसभेला होणार सर्वच पक्षांची कोंडी

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

पाच फोटो वापरणे

कोल्हापूर

दोन्ही काँग्रेससह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकत्र येवून शिरोळ नगरपालिकेवर झेंडा फडकावला. त्यांचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. पण, विधानसभा निवडणुकीत आघाडी अथवा युती करण्याची वेळ आल्यास जागा द्यायची कुणाला? असा प्रश्न सर्वच पक्षांना पडणार आहे. सर्वांचीच ताकद असल्याने आणि उमेदवारही सज्ज असल्याने प्रत्येकजण जागेवर हक्क सांगणार आहे. यामुळे जिल्ह्यात शिरोळ मतदारसंघ वादाचा केंद्रबिंदू ठरणार हे निश्चित आहे. साहजिकच नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

गतवेळी भाजप बरोबर असलेल्या स्वाभिमानी संघटनेने दोन वर्षांपूर्वी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही काँग्रेसच्या महाआघाडीत सहभागी होण्याच्या दृष्टीने या संघटनेची पावले पडत आहेत. वंचित विकास आघाडी करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पहिला पर्याय निवडण्याची दाट शक्यता आहे. त्याची पहिली पायरी म्हणून त्यांनी शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसबरोबर आघाडी केली. नगराध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय घेतला. आघाडीचा झेंडा फडकल्याने पहिला प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे हाच प्रयोग ते आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत करणार का याची उत्सुकता लागली आहे. लोकसभेला हे शक्य आहे. कारण यासाठी दोन्ही काँग्रेसकडे सध्या तरी प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळे खासदार शेट्टी यांना पाठिंबा देण्याच्या मानसिकतेत दोन्ही पक्ष आहेत. हातकणंगले लोकसभा संघटनेला देऊन त्या बदल्यात राज्यभर शेतकरी संघटनेची ताकद दोन्ही काँग्रेसला मिळवण्याबाबत चर्चा सुरू आहे.

नगरपालिकेतील प्रयोग यशस्वी झाला असला तरी विधानसभेला मात्र आघाडी करण्यात अडचणींचा डोंगर आहे. कारण या मतदारसंघात पाचही पक्षांची ताकद चांगली आहे. सर्वांची तयारी जोरात आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाचे उमेदवार निश्चित आहेत. यामुळे इतरांसाठी त्याग करायला कुणीच तयार होण्याची शक्यता नाही. दोन्ही काँग्रेस आणि स्वाभिमानीची युती झाल्यास या जागेवर तीनही पक्ष हक्क सांगणार यात शंका नाही. राष्ट्रवादीच्या वतीने राजेंद्र पाटील यड्रावकरांची उमेदवारी नव्याने जाहीर करण्याची गरज नाही. ते रिंगणात असणारच आहेत. स्वाभिमानीच्या वतीने सावकर मादनाईक लढतील हे खासदारांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने झालेल्या मेळाव्यात काँग्रेसची उमेदवारी गणपतराव पाटील यांना देण्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी उमदेवारीच जाहीर केल्याने थांबणार कोण आणि थांबवायचे कुणाला हा प्रश्न प्रत्येक पक्षासमोर आहे.

जी अवस्था आघाडीची आहे, तीच युतीची देखील आहे. भाजप व शिवसेनेची युती झाल्यास दोन्ही पक्ष मतदारसंघावर दावा करतील. उल्हास पाटील हे सेनेचे विद्यमान आमदार असल्याने ते रिंगणात असणार आहेत. पण उमेदवारीचा शब्द देवून हातात 'कमळ' दिलेल्या अनिल यादव यांना उमेदवारी नाकारण्याचे धाडस भाजप करण्याची शक्यता नाही. यामुळे राज्यात आघाडी होवो अथवा युती होवो. शिरोळ मतदारसंघ यामध्ये अडचणीचा ठरणार हे नक्की आहे. आघाडी झाली तर यशस्वी होता येते हे आघाडीने सिद्ध् केले आहे. पण ती करताना बळी कुणाचा द्यायचा हा प्रश्न प्रत्येक नेत्याला पडणार आहे. नगरपालिकेने यशाचा मंत्र दिला असला तरी नेत्यांची कोंडी देखील केली आहे.

...........

चौकट

पक्ष आणि संभाव्य उमेदवार

काँग्रेस गणपतराव पाटील

राष्ट्रवादी राजेंद्र पाटील यड्रावकर

भाजप अनिल यादव

शिवसेना उल्हास पाटील

स्वाभिमानी शेतकरी संघटना अनिल मादनाईक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्याय मिळेपर्यंत ‘हायड्रॉस पावडर’च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुऱ्हाळघरासाठी लागणाऱ्या सर्व केमिकल व गूळ तयार करताना मिसळली जाणारी हायड्रॉस पावडर विक्रीवर बंदी घातली असल्यास सरकारने पर्यायी पावडर तयार करून द्यावी. जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत हायड्रॉस पावडर वापरण्याचा निर्धार गुऱ्हाळघर मालकांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाने हायड्रॉस पावडर विक्रीवर बंदी घालण्यासंदर्भात कसलाच आदेश काढला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मार्केट यार्ड येथील सभागृहात बुधवारी सकाळी गुऱ्हाळघर मालकांची बैठक झाली. बैठकीला विविध भागातील गुऱ्हाळघर मालक उपस्थित होते. बैठकीनंतर सायंकाळी गुऱ्हाळघर मालकांच्या शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांची भेट घेतली. दरम्यान, बाजार समिती सभापती कृष्णात पाटील यांनी याप्रश्नी आपण शेतकरी व गुऱ्हाळघर मालकांसोबत असल्याची ग्वाही दिली.

कोल्हापुरी गुळात फार पावडर असते हा अपप्रचार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईच्या भीतीपोटी विक्रेत्यांनी हायड्रॉस पावडरची विक्री बंद केली आहे. गुऱ्हाळघरांना सुरुवात होत असतानाच पावडर विक्री बंद झाल्यामुळे त्याचा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सांगितले. बाबासाहेब पाटील म्हणाले, 'सध्या हायड्रॉस पावडर मिळत नसल्यामुळे अनेक गुऱ्हाळघरे बंद आहेत. गूळ उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. आर्थिक गणित सुटले नाही तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. हायड्रॉस पावडरमुळे गुळाला रंग प्राप्त होतो. योग्य त्या प्रमाणात पावडरचा वापर करण्यात येतो.'

बैठकीला रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घाटगे, विजय जाधव तळाशी, युवराज धोंडिराम पाटील, सर्जेराव शिवाजी जाधव, शंकर श्रीपती व्हरगे, दीपक रामचंद्र पाटील, अविनाश मारुती कदम आदी उपस्थित होते.

००००

अन्न व औषध प्रशासन विभागाने हायड्रॉस पावडर विक्रीच्या अनुषंगाने दुकानदारांना कुठल्याच स्वरूपातील कसलेही आदेश काढले नाहीत. तसेच विभागामार्फत गुऱ्हाळघर मालकांनाही नोटिसा काढल्याचे वृत्तही चुकीचे आहे.

मोहन केंबळकर, सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन....

$
0
0

मारुती भालेकर

शाहूवाडी : सरुड (ता. शाहूवाडी) येथील मारुती आबा भालेकर (वय ७०) यांचे निधन झाले. शिवसेना शाहूवाडी तालुका महिला आघाडीप्रमुख अलका भालेकर यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२५) आहे.

००००

दत्तू पवार

शिराळा : बांबवडे (ता. शिराळा) येथील दत्तू बाबू पवार (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२५) आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर वितरकांनी घेतली खासदार महाडिक यांची भेट

$
0
0

गोकुळ वितरकांनी

घेतली खासदारांची भेट

कोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) शहरातील वितरकांनी कमिशन वाढीसाठी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेतली. कमिशन वाढीसाठी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील व संचालक मंडळाशी चर्चा करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी दूध वितरकांच्या पाठिशी राहण्याचे आश्वासन महाडिक यांनी दिले. कमिशनवाढीसाठी सोमवारी (ता. २२) वितरकांनी एक दिवसाचा संप केला होता. २७ ऑक्टोबरपर्यंत वितरण वाढीचा निर्णय न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अमृत’ मधील मलई वाटपावरुन धुसफूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात अमृत योजनेतून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीच्या कामासाठी महापालिकेच्या नगरसेवकांनी मलईदार कमाई केली. मात्र कमाईवाटा एकसमान नसल्याने नगरसेवकांमध्ये अतंर्गत धुसफूस सुरू झाली आहे. मलईची पाकिटे हातात मिळाल्यानंतर धुसफूस सुरू असल्याची चर्चा चांगलीच रंगत आहे.

शहरात अमृत योजनेंतर्गत ३४५ किमीची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यासाठी १०८ कोटींचा निधी मिळाला. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. फेब्रुवारी २०१८ मध्ये अत्यंत गडबडीत एका कंपनीला जादा दराची निविदा देण्यात आली. मात्र निविदा देताना पडद्याआड सेटलमेंट झाली होती. महापालिकेच्या प्रत्येक कामात आघाडीवर असणाऱ्या प्रमुखांनी ही सेटलमेंट घडवून आणली. त्यानुसार प्रत्येकाला वाटा विभागून देण्यावर एकमत झाले. एरवी पक्षीय राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करणारी मंडळी या व्यवहारामध्ये आघाडीवर होती.

ठरल्याप्रमाणे ठेकेदारांकडून रक्कम मिळाल्यावर त्याची समान विभागणी न केल्याने मलईचा किस्सा चर्चेला आला. ५० हजारांपासून तीन लाखांपर्यंतची पाकिटे संबंधितांच्या पदानुसार देण्यात आली आहेत. पण ज्यांना कमी रक्कम मिळाली ते नाराज झाल्याने संपूर्ण प्रकारच चव्हाट्यावर आले आहे. प्रमुख सेवकांनी आपला वाटा अधिक ठेवल्याने काहींनी थेट नाराजी व्यक्त केली आहे. तरीही दिवाळीच्या तोंडावर कमाई झाल्याने अनेकजण आनंदी असल्याचीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावाला नियमित पाणी पुरवठा

$
0
0

पाचगाव पाणीप्रश्न

सोडवणुकीसाठी हालचाली

कोल्हापूर टाइम्स टीम

पाचगावमधील पाणी प्रश्नाची कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पाणीगळती, खराब पाइपलाइन, पाणी साठवणूक अशा विविध प्रश्नासंदर्भात आमदार अमल महाडिक व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. सध्या पाचगावाला पाच दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. डिसेंबर महिन्यानंतर दररोज पाणी पुरवठा करण्यासंबंधी चर्चा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी अधिकाऱ्यांना त्या अनुषंगाने सूचना केल्या. बैठकीत पाणी वितरण प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासंदर्भात नियोजन करण्याचे ठरले. शहरालगत असलेल्या पाचगावमध्ये नागरिकीकरण वाढले आहे. पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेत बैठक झाली. याप्रसंगी सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच संग्राम पोवाळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार नोंदणीत सर्व्हरची आडकाठी

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : मतदार यादीत नवीन नाव नोंदवणे, कमी करणे, नावात, पत्त्यात दुरुस्तीसाठी केवळ सात दिवस शिल्लक आहेत. अशा टप्प्यात नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टलच्या सर्व्हरचा वेग मंदावला आहे. अनेकवेळा सर्व्हर हँग होत आहे. परिणामी ऑनलाइन मतदार नोंदणीत आडकाठी येत आहे. अशाप्रकारच्या लालफितीने नवमतदार सर्वाधिक त्रस्त झाला आहे. १८ ते १९ वयोगटातील १ लाख २२ हजार ३८१ पैकी केवळ १२ हजार ७२९ जण ऑनलाइनकडे वळल्याने नोंदणीचा टक्का घसरला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी शुद्धिकरण, अद्ययावतीकरणच्या अंतिम टप्यातील काम एक सप्टेंबरपासून सुरू आहे. ३१ ऑक्टोबरअखेर यासाठीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर बीएलओतर्फे अर्ज भरून घेण्याची व्यवस्था केली आहे. इंटरनेटची सुविधा असल्यास घरबसल्या www.nvsp.in या संकेतस्थळावरूनही नाव नोंदवता येते. मात्र, संकेतस्थळावरील सर्व्हरचा वेग कमी आहे. तासनतास ताटकळत बसावे लागते. यामुळे एक जानेवारी २०१९ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या सर्व पात्र व्यक्तींची नावे यादीत आणणे आव्हानात्मक बनले आहे. पात्र मतदार संख्येच्या तुलनेत निवडणूक यंत्रणा कमी आहे. ऑनलाइन यंत्रणा गतिमान झाली तरच नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. त्यासाठी सर्व्हरची गती वाढवावी, तांत्रिक अडचणी दूर कराव्यात असे वेळोवेळी आयोग आणि नॅशनल पोर्टल यंत्रणेकडे जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा केला आहे. मात्र, जैसे थे परिस्थिती आहे. त्याचा सर्वाधिक फटका १८ ते १९ वयोगटातील तंत्रज्ञान वापरण्यात आघाडीवर असलेल्या नवमतदारांना बसला आहे. मोठ्या उत्साहात संकेतस्थळावर ते जातात. अर्ध्यापर्यंत अर्ज भरल्यानंतर वेग कमी होतो. त्यांची निराशा होते आहे. म्हणूनच ऑनलाइन नाव नोंदविणाऱ्यांची संख्या घटली. ज्यांना शक्य आहे, ते बीएलओकडे जाऊन अर्ज देत आहेत. नोकरी, व्यवसायामुळे हे शक्य नसलेले नाव नोंदणीकडे पाठ फिरवत आहेत.

००००

चार टप्प्यांत पडताळणी

निवडणूक आयोगाच्या www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्जासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांची पहिल्यांदा बीएलओ, पर्यवेक्षक, सहायक मतदान निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी पडताळणी करतात. त्यानंतर पात्र असल्यास यादीत नावाचा सामावेश केला जातो. चुकीची कागदपत्रे अपलोड केल्याचे निदर्शनास आल्यास अर्ज फेटाळला जातो. प्रारूप मतदार यादीत नाव असल्याची खात्री करण्यासाठी http://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे लागते. मात्र, दोन्ही संकेतस्थळांचा वेग कमी आहे.

०००

शेवटचा रविवार

जन्म पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला अथवा बोनाफाइड, ग्रामसेवक किंवा तलाठ्याच्या सहीचा रहिवासी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट साइज एक फोटो, कुटुंबातील एकाच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स, सासरकडे नाव नोंदण्यासाठी माहेरच्या गावात मतदारयादीत नाव असेल तर ते कमी केल्याचा आणि नसेल तर तसा दाखला, पतीच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स, असल्यास लग्नपत्रिका अशी कागदपत्रे नाव नोंदविण्यासाठी आवश्यक आहे. २८ ऑक्टोबरच्या रविवारी सर्व मतदान केंद्रांवर बीएलओ बसून अर्ज स्वीकारतील. ही शेवटची संधी गमावू नये, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केली आहे.

००००

इचलकरंजी पहिले

विधानसभा मतदारसंघनिहाय ऑफलाइन आणि कंसात ऑनलाइन नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या अशी : कोल्हापूर दक्षिण ४३१७ (४४३८), कोल्हापूर उत्तर ४६५६ (८३६), करवीर २३६३ (४६१), चंदगड ५९२६ (६५३), राधानगरी ४६३१ (४१४), कागल ३२२१ (६१३), शाहूवाडी ३६०४ (१७४), हातकणंगले ३५३४ (८७३), इचलकरंजी २०३० (३३८३), शिरोळ ४२१५ (८८४). जिल्ह्यात फक्त इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन अर्ज अधिक दाखल झाले आहेत. सर्वांत कमी नोंद शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात झाली आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हमीभाव वाढवण्याची शिफारस करणार

$
0
0

एफआरपी अधिक २०० रुपयांची परिषदेत मागणी

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ

एफआरपीची पूर्ण रक्कम देणार

निवडणुकांमुळे आंदोलने हाणारच

स्वामीनाथन आयोगाचा अहवाल त्यांनी धूळ खात ठेवला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उसाला अपेक्षित दर देता यावा यासाठी साखरेचा हमीभाव प्रतिकिलो २९ रुपयांवरून ३१ रुपये करण्याची शिफारस केंद्राकडे केली जाईल. त्याचबरोबर शिल्लक साखरेचा प्रश्न मिटवण्यासाठी निर्यातीचे धोरण आखले जाईल,' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. रयत क्रांती संघटनेची शेतकरी कष्टकरी परिषद बुधवारी (ता. २४) कोडोलीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, या परिषदेत कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी या गळीत हंगामात उसाला प्रतिटन एफआरपी अधिक २०० रुपये मिळावेत, अशी मागणी केली. सरकारने ऊस उत्पादकांना अपेक्षित न्याय न दिल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा इशाराही खोत यांनी दिला. यावर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासान मुख्यमंत्र्यांनी दिले.

रविवारी जयसिंगपुरात स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आयोजित केलेल्या कोडोलीतील परिषदेस मोठी गर्दी झाली होती. या गर्दीच्या साक्षीने मंत्री सदाभाऊ खोत यांनी लोकसभेच्या उमेदवारीचे रणशिंग फुंकले.

या परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या परिषदेतील ठरावांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल. वेळप्रसंगी तिजोरीवर ताण पडला तरी शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेऊ. आज कच्ची साखर निर्यात करण्याचा मोठी संधी आपल्याकडे आहे. मात्र, त्यामध्ये तांत्रिक अडचण आहे. बँकांकडे साखर तारण असल्यामुळे बँका तयार होत नाहीत. पण, त्यासाठी स्वतंत्र धोरण ठरवून निर्णय घेऊ. साखर निर्यातीमुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतील. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ९० टक्के एफआरपी दिली. यापुढेही संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या हातात गेल्याशिवाय स्वस्‍थ बसणार नाही. देशाच्या इतिहासात पहिल्यांदा प्रतिक्विंटल २९०० रूपये साखरेचा भाव निश्चित केला. आता ३१०० रुपयांसाठी केंद्राकडे शिफारस करू. मात्र, डब्बल ढोलकी वाजवणारी काही मंडळी आपल्यात आहेत, त्यांनी राजकारण न करता या निर्णयांना पाठिंबा द्यावा. उसदराबाबत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील.'

खोत म्हणाले, 'आजवर सरकारविरोधात आंदोलने केली. लाठ्याकाठ्या झेलून आणि तुरुंगवास भोगून दर मिळवला. पहिल्यांदाच सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि महसूलमंत्री शेतकऱ्यांच्या व्यासपीठावर आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागणार नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. यापुढेही घेतले जातील. केंद्र सरकारने साखरेचा दर २९ रुपये निश्चित केला आहे. हा दर ३२ रुपये करावा, अशी आमची मागणी आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे दरासाठी आंदोलन होणारच. मात्र,आंदोलन करणारे दर ठरवत नाहीत. दर ठरवणारे आणि देणारेही आमच्यासोबत आहेत. यंदाच्या गळीत हंगामात शेतकऱ्याला एफआरपी अधिक २०० रुपये दर मिळावा. शेतकऱ्यांना अपेक्षित निर्णय न झाल्यास माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन.'

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार शिवाजीराव नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके, आदी उपस्थित होते.

.. .. ..

शिवसेना हा भाजपचा जुना मित्रपक्ष आहे. दोन्ही पक्षांची विचारधारा सारखी आहे. त्यामुळे २०१९च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका युती करून लढविल्या जातील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वृत्तवाहिनीशी बोलताना

.. .. ..

'दुष्काळ'वर शब्दच्छल नको

भयावह दुष्काळी स्थिती असताना विरोधकांकडून राजकारण सुरु आहे. सरकारने दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. तत्कालीन आघाडी सरकारने दुष्काळ शब्द उडविला. परंतू आम्ही तो शब्द पुन्हा वापरुन उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे कुणी शब्दच्छल करु नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पवार यांना सांगलीत बोलताना लगावला.

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.कडून लोहारांची चौकशी कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावरील कार्यमुक्त कारवाईला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणने (मॅट) स्थगिती दिल्यामुळे ते गुरुवारी (ता. २५) पुन्हा कार्यालयात रुजू होणार आहेत. 'मॅट'ने त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती दिली असली तरी प्रशासनाने नेमलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीकडून चौकशी कायम राहणार आहे.

'मॅट'च्या आदेशानंतरही प्रशासनही सावधगिरी बाळगून आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील काही सदस्यांचा लोहार यांच्या कामकाज पद्धतीविषयी तीव्र आक्षेप आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर सदस्य आणि त्यांच्यातील वाद कुठले वळण घेणार याकडे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या चौकशीचा ठराव झाला होता. चौकशी समितीची शुक्रवारी बैठक होणार आहे. त्या बैठकीत या सगळया बाबीची चर्चा होणार आहे. शिवाय त्यांच्या विरोधात दाखल ७० तक्रारींची एक नोव्हेंबरपासून सुनावणी होणार असल्याचे चौकशी समितीने म्हटले आहे. सर्वसाधारण सभेने सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव करुनही ते कार्यालयात दोन, तीनदा हजर होते.

यावरून सदस्यांनी अध्यक्ष शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे हा सभागृहाचा अवमान असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने पाच ऑक्टोबर रोजी त्यांना कार्यमुक्त केले होते. शिक्षण संचालक कार्यालयाने त्यांना प्रभारी शिक्षण उपसंचालकपदातून कार्यमुक्त केले होते. मात्र 'मॅट'च्या आदेशामुळे शिक्षणाधिकारीपदासह शिक्षण उपसंचालकपदाचा कार्यभारही ते स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदकेसरी दिनानाथसिंहांना तीन लाखाची मदत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दीनानाथ सिंह यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्यावतीने तीन लाखांचा धनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांनी कुस्तीक्षेत्राला नवी दिशा दिली असून कित्येक पैलवान घडविले आहेत. त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार मिळवून कुस्तीक्षेत्राचे नाव जगभर पोहोचविण्यात मोलाची कामगिरी केली आहे. राज्यातील हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीचा सरकारकडून निश्चिपणे पाठपुरावा करू. दीनानाथ सिंह यांना आवश्यकतेनुसार वैद्यकीय सहाय्य केले जाईल.'

दीनानाथ सिंह यांच्या पत्नी नगीना, मुलगा अभय आणि निर्भय यांच्यासह मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे जिल्ह्याचे समन्वयक विजय जाधव, पणनचे विशेष लेखा परिक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावमध्ये दिव्यांग उन्नती अभियान

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग उन्नती अभियान अंतर्गत ओळखपत्र नोंदणी करण्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामााला सुरुवात झाली. पाचगाव येथे ९५ लाभार्थ्यांचे फॉर्म भरुन वेबसाइटवर ऑनलाइन करण्यात आले. संबंधित लाभार्थ्यांना सीपीआर हॉस्पिटल येथे तपासणीसाठी बोलावून त्यांना युडीआयडी कार्ड लवकरच दिले जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. पाचगाव ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन केले होते. दिव्यांग लाभार्थ्यांचे फॉर्म भरण्यात आले. तसेच त्यांना विविध योजनेसंबधी मार्गदर्शन केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले. सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच संग्राम पोवाळकर, प्रकाश टोणपे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरसंघचालक, महसूलमंत्र्यांत खलबते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कणेरी मठावर विविध कार्यक्रम सुरू आहेत. या दरम्यान बुधवारी त्यांच्याशी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुमारे अर्धा तास बंद खोलीत खलबते केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. दरम्यान, भागवत यांचा दौरा विविध कार्यक्रमांसाठी असला तरी यावेळी राजकीय विषयांवर गुप्तगू झाल्याने या दौऱ्याला महत्व आले आहे.

सरसंघचालक भागवत मंगळवारी रात्री कणेरी मठावर पाहोचले. सकाळी 'लखपती शेती' पाहून त्यांनी काडसिद्धेश्वर महाराजांच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्यानंतर देशभरात सेंद्रिय शेतीचा प्रयोग करणाऱ्या पन्नास संस्थांच्या प्रतिनिधींना त्यांनी मार्गदर्शन केले. दुपारी त्यांच्या हस्ते कारागीर विद्यापीठाचे भूमिपूजन, आरोग्यधाम चिकित्सालय आणि उद्यानाची पाहणी झाली. त्यानंतर सायंकाळी प्रवचनाला उपस्थित राहून संवाद साधला. विशेष पोलिस बंदोबस्त असला तरी काही कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. यामुळे अनेकांनी त्यांची भेट घेतली.

दुपारी एक वाजता महसूलमंत्री पाटील मठावर आले. तेव्हा भागवत यांचे व्याख्यान सुरू होते. जेवणानंतर ते विश्रांतीसाठी जात असतानाच 'थोडे बोलायचे आहे,' अशी विनंती मंत्री पाटील यांनी केली. तेव्हा अन्नछत्राजवळील एका खोलीत चर्चा करण्याचे ठरले. त्यांच्यासोबत असलेले काडसिद्धेश्वर महाराजही तेथून बाहेर पडले. माजी ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनीही लांब राहणे पसंत केले. अर्धा तास दोघांत चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बराच वेळ राजकीय चर्चा झाल्याचे समजते. संघ परिवारात मंत्री पाटील यांचा वावर वरिष्ठ पातळीवर आहे. त्यांनी सरसंघचालकांना राज्यभरातील परिस्थितीची माहिती दिल्याचे समजते.

.. .. ..

अनेक वर्षे सरसंघचालकांसमेवत काम केले आहे. त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा झाली. मात्र ही राजकीय चर्चा नव्हती.

चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर पुन्हा भरकटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगलीहून कोडोलीकडे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर सायंकाळी पुन्हा भरकटले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमस्थळी नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा पोहोचले.

मुख्यमंत्री दिवसभर सांगलीत होते. बैठक संपल्यानंतर सव्वा चार वाजता ते कवलापूर मैदानातून हेलिकॉप्टरने कोडोलीकडे निघाले. यावेळी त्यांच्यासमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख होते. लोकेशन मिळत नसल्याने हेलिकॉप्टर अर्धा तास कोल्हापूर शहरावर चकरा मारत होते. शेवटी जिल्हाध्यक्ष देशमुख यांनी कोडोलीची दिशा दाखवल्यानंतर ते वारणा येथील हेलिपॅडवर उतरवण्यात आले. यामुळे कार्यक्रमास पोहोचण्यास मुख्यमंत्र्यांना उशीर झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात लाख टन गाळपाचे ‘ओलम’चे (हेमरस) उदिष्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

'ओलमच्या यशात शेतकरी व कामगारांचे फार मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात हेमरस कारखाना सहभागी होऊन कार्य करत आहे. त्यामुळे दरवर्षी ऊस गाळपात चढता क्रम मिळवला आहे. या वर्षीही शेतकऱ्यांच्या सहकार्यावरच सात लाख टन ऊस गाळपाचे उदिष्ट निश्चित केले आहे' असे प्रतिपादन ओलम कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी केले. राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम अॅग्रो (हेमरस) या कारखान्याच्या नवव्या गळीत हंगाम शुभांरभ प्रसंगी ते बोलत होते. यावर्षी ऊसावर हुमणी व मावा रोगाचा प्रार्दुभाव झाला आहे. उत्पादन कमी झाले तरी शेतकऱ्यांना मदतीचा हात देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भरत कुंडल म्हणाले, 'ओलमने गेल्यावर्षीच्या गाळपास आलेल्या ऊसाला विभागातील इतर कारखान्यांपेक्षा जादा दर दिलेला आहे. यावर्षीही एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर देणार आहे.' शेती अधिकारी सुधीर पाटील यांच्या हस्ते वजनकाट्याचे पूजन करण्यात आले. कुंडल, पी. देवराजलु, राजगोळी बुद्रुकचे सरपंच मावळेश्वर कुंभार, राजगोळी खुर्द सरपंच शिवाजी सडाके, सरपंच सुरेश हंजी (शिवापूर), सरपंच शालण कांबळे (कुदनुर) आदींच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकून गळीताचा शुभारंभ करण्यात आला. एच. आर. प्रमुख सतीश भोसले यांनी स्वागत केले. अनिल पाटील यांनी आभार मानले. यावेळी कामगार, शेतकरी, तोडणी वाहतुकदार उपस्थित होते.

तीनशे ऐंशी रुपये देणार

'सन २०१६-१७ गाळपास आलेल्या ऊसाला एफआरपीप्रमाणे रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली आहे. ऊर्वरीत शिल्लक रक्कम प्रतीटन तिनशे ऐंशी रुपये महिनाभरात दोन टप्यांत देणार आहे' असे भरत कुंडल यांनी यावेळी सांगितले.

फोटो :

राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील ओलम अॅग्रो (हेमरस) या कारखान्याच्या नवव्या गळीत हंगामाचा शुभांरभ करताना भरत कुंडल, पी. देवराजलू, मावळेश्वर कुंभार, शिवाजी सडाके, सुरेश हंजी आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्पोर्ट्स पानासाठी इचलकरंजी

$
0
0

कबड्डीपटू ओंकार खानाज

याला मदतीची गरज

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

नोव्हेंबर महिन्यात मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी इचलकरंजीतील खेळाडू ओंकार रवींद्र खानाज याची भारतीय संघात निवड झाली आहे. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. दानशूर व्यक्तींना त्याला साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तो डायनॅमिक स्पोर्टस् क्लबचा खेळाडू आहे. १२ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत मलेशिया याठिकाणी स्टुडंट ऑलिम्पिक संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होत आहे. यासाठी २२ वर्षाखालील भारतीय संघात ओंकारची निवड झाली आहे. गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघातर्फे खेळणाऱ्या ओंकारने कर्णधारपदाची जबाबदारी पेलत चमकदार कामगिरी केली होती. मलेशिया येथील स्पर्धेसाठी १ लाख रुपये फी असून ओंकारच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला मदतीची गरज आहे. त्यासाठी शहरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, संघटनांनी त्याला आर्थिक बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी

रोहन कोरे याची निवड

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

डायनॅमिक स्पोर्ट्स क्बलचा खेळाडू रोहन बापूसाहेब कोरे यांची शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली आहे. रोहन गोविंदराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असून राजस्थान येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. गेल्यावर्षी आंध्रप्रदेश येथील स्पर्धेनंतर यंदा सलग दुसऱ्यांदा त्याची या स्पर्धेसाठी राज्य संघात निवड झाली आहे. गेल्यावर्षी राज्य संघाला उपविजेते मिळाले होते. त्यामध्ये रोहनने मोलाची कामगिरी बजावली होती. त्यानंतर नवी दिल्ली येथील खेलो इंडिया स्पर्धेताही त्याची निवड झाली होती. त्यावेळी राज्य संघाकडून त्याने सुवर्णपदक मिळविले होते.

शालेय बॉक्सिंग स्पर्धेत

श्रेयस लिपारेला सुवर्ण

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत येथील श्रेयस कृष्णात लिपारे याने सुवर्णपदक पटकविले. गेल्या महिन्यात झालेल्या कोल्हापूर जिल्हा ओपन बॉक्सिंग स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळविले होते. कोल्हापुरातील राजोपाध्यायनगर येथील महानगरपालिकेच्या बॉक्सिंग हॉलमध्ये जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा झाली. यामध्ये ५२ ते ५४ या वजन गटात श्रेयसने दमदार कामगिरीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना चितपट करून सुवर्णपदक मिळविले. त्याला प्रशिक्षक सागर चव्हाण यांचे मोलाचे मागदर्शन लाभले. दिशा इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक प्रविण मोहिते, आई-वडिलांचे प्रोत्साहन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा नवा पॅटर्न

$
0
0

सेंद्रिय शेतीच गरजेची असल्याचे सरसंघचालक भागवत यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, कागल

'संस्कृतीपेक्षा बाजारातील दराला महत्व आले आहे, यामुळे शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचा नवा पॅटर्न येत आहे. हा धोकादायक पॅटर्न रोखण्यासाठी आणि जमीनीचा पोत सुधारून देशाचा विकास होण्यासाठी सेंद्रिय शेती आवश्यकच आहे,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

कणेरी मठ (ता. करवीर) येथे अक्षय परिवारातर्फे आयोजित सेंद्रीय शेतीवीषयक राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी तसेच देशभरातील सेंद्रिय शेतीवर काम करणाऱ्या ५० संस्थांचे १०० निमंत्रक प्रतिनिधी उपस्थित होते.

सरसंघचालक भागवत म्हणाले, 'मनुष्य दिवसेंदिवस स्वार्थी होत आहे. तो स्वत:च्या फायद्यासाठी अन्नसाखळी तोडतो आणि शेतजमिनीकडे दुर्लक्ष करतो. मनुष्य ज्या प्रमाणे श्वासोच्छ्वास करतो त्याप्रमाणे माती सुद्धा श्वास घेते. मनुष्याला जसे ऊन, वारा, पाऊस, रोग यापासून संरक्षणाची गरज आहे, तसे मातीचे सुद्धा संरक्षण होणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजांनी ही संपत्ती पुढील पिढीकडे जशी जिवंत सोपवली तशी आपणसुद्धा तिचा सांभाळ करून येणाऱ्या पिढीला ती जिवंत स्थितीतच सोपवली पाहिजे. यामुळे अमूल्य अशा मातीच्या थरांचे आपोआप जतन आणि संवर्धन होऊन मातीचा पोत टिकून राहील. जमिनीचा पोत टिकला तर देशाची संपती म्हणजे मानवी आरोग्य टिकून राहील.'

ते पुढे म्हणाले, 'रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला आहे. शेती उत्पन्नात घट आणि शेती उत्पादन खर्च वाढू लागला. आधुनिक बियाण्यांमुळे पारंपरिक बियाण्यांच्या जाती नष्ट होऊ लागल्या. शेतकऱ्यांनी स्वत:च्या तसेच राष्ट्राच्या हिताचा विचार करून सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आणि सर्वांच्याच फायद्याचे आहे. भारतात शेतीमुळे अनेकांना रोजगार मिळतो, त्यामुळे कृषीव्यवस्था टिकणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी जैविक शेती करणे ही काळाची गरज आहे. एक इंच मातीचा थर निर्माण करण्यास निसर्गाला बरीच वर्ष लागतात. परंतु मानवाच्या स्वार्थी, हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे हा थर नाहीसा होण्याची शक्यता आहे.'

अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, 'देशाचे आरोग्य बिघडले असून दवाखान्यांची संख्या वाढत आहे. याला कारणीभूत म्हणजे जमिनीचे बिघडत चाललेले आरोग्य होय. आपल्या देशात अभियांत्रिकीची २४ हजार कॉलेज आहेत तर ८० कोटी लोकांसाठी फक्त ६७० कृषीची कॉलेज आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अन्न आणि पाणी जमिनितूनच येतात, त्यामुळे जमिनीचे संवर्धन होणे गरजेचे आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशी लांबली, कारवाई लटकली

$
0
0

विद्यापीठाचा लोगो वापरावा...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी निगडीत पदवी प्रमाणपत्रावरील सहीचा घोळ आणि दुबार छपाई प्रकरणाचा चौकशी अहवाल रखडला आहे. चौकशी समितीने तीन महिन्याच्या कालावधीत अहवाल सादर करावयाचा होता. कालमर्यादा ओलांडली तरी अद्याप चौकशी अहवाल पूर्ण झाला नाही. परिणामी कारवाई लटकली आहे.

या साऱ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील, अमित कुलकर्णी व डॉ. कणसे यांची त्रिसदस्यीय समिती नेमली होती. डॉ. पाटील या चौकशी समितीच्या अध्यक्षा आहेत. समितीने या संदर्भात वेगवेगळ्या पातळीवर चौकशी केली आहे. कागदपत्रे मागावून घेतली आहेत. चौकशी संदर्भात अजून माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे चौकशी महिनाभर लांबण्याची चिन्हे आहेत.

शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षान्त समारंभ १८ मार्च रोजी झाला. तत्पूर्वी विद्यापीठात पदवी प्रमाणपत्रावरील सहीचे प्रकरण गाजले. विद्यापीठातील अधिकाऱ्यांतील कुरघोडीच्या राजकारणामुळे नियमाला फाटा देऊन प्रमाणपत्र तयार केले. प्रमाणपत्रावर कुलगुरू आणि कुलसचिवांची स्वाक्षरी अत्यावश्यक असते. मात्र यंदा, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या स्वाक्षरीची तब्बल २५ हजार प्रमाणपत्रे छापली. पदवी प्रमाणपत्राच्या निर्मितीत नियमांना फाटा देण्याच्या प्रकारावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.

प्रशासनाने अखेर ही सारी प्रमाणपत्रे रद्द करुन घाईगडबडीत नव्याने प्रमाणपत्रे छापली. या गोंधळात स्नातकांना 'ब्लॅक व्हाईट'मध्ये प्रमाणपत्रे देण्यात आली. शिवाय प्रमाणपत्रावर असंख्य चुका झाल्या. ठराविक लोकांच्या अट्टहासामुळे विद्यापीठाला पंधरा लाख रुपयांहून अधिक आर्थिक फटका बसला. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याप्रश्नी आंदोलन केले. 'अभाविप'च्या कार्यकर्त्यांनी १७ जुलै रोजी प्रमाणपत्रातील घोळावरुन कुलगुरूंना घेराव घातला. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून चौकशीची मागणी केली होती.

कुलसचिव विलास नांदवडेकर यांनी व्यवस्थापन परिषद समिती सदस्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची व तीन महिन्यात अहवाल सादर करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही दिली होती. ऑक्टोबर महिन्यात समितीची स्थापना करुन तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला. पण पदवी प्रमाणपत्रातील घोळाचा चौकशी अहवाल अजून सादर झालेला नाही. या संदर्भात कुलसचिव नांदवडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर चौकशी समिती सदस्य कुलकर्णी यांनी जास्त बोलणे टाळले.

..............

कोट

'चौकशी समितीचे काम सुरू आहे. चौकशीच्या अनुषंगाने नवनवीन माहिती गोळा केली जात आहे. आठवडाभरात सगळे काम पूर्ण करुन अहवाल सादर केला जाईल.

डॉ. भारती पाटील, अध्यक्ष, चौकशी समिती

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वांची उन्नती करतो तो धर्म

$
0
0

कणेरी मठ येथे सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा, कागल

'समाज सर्वांगसुंदर, उन्नत बनविण्याकरीता जी जी कर्तव्ये करावी लागतात, त्याला धर्म असे म्हणतात. सेवा हा त्यातलाच एक भाग आहे. म्हणूनच योगी अरविंदांनी सनातन धर्म हीच भारताची राष्ट्रीयता असल्याचे म्हटले आहे. आपल्या देशात देव आणि देश वेगळे करता येत नाहीत. आपल्याकडे त्याग आणि चारित्र्यालाही खूप महत्त्व आहे. सगळ्यांना जोडून ठेवतो, सगळ्यांची उन्नती करतो तो म्हणजे धर्म', असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

कणेरी मठ (ता.करवीर) येथे कारागीर विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी , सरसहसंघचालक भागय्या, भारतीय ग्रामविकास प्रमुख डॉ.दिनेश, रायबरेलीचे राजा कौशाल्यसिंह ,लुपिन फाऊंडेशनचे योगेश प्रभू, बसंत कुमार आदी प्रमुख उपस्थित होते.

सरसंघचालक भागवत म्हणाले, 'जीवनाला पूर्णत्वाकडे नेण्याचे दोन पैलू आहेत. आपण परमेश्वराचे रूप आहोत व जगात सर्वत्र परमेश्वर आहे. ही भावना ठेवून जगात जनार्दन शोधावा. एकांतात साधना आणि लोकांतात सेवा परोपकार ठेवल्यास मनामध्ये जागृतता निर्माण होवून समाजाचे हित होते. केवळ भौतिक उन्नतीने मार्ग सापडत नाही. धर्माने वागणाऱ्यांचे समाजात बळ वाढविण्याची गरज आहे. देशप्रेम असणाऱ्यांच्या पाठीशी राहणे आपले कर्तव्य आहे.' आपल्या देशात कुटुंब युनिट आहे व्यक्ती नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले, 'तानाजी मालुसरे, वीर सावरकर आणि चाफेकर बंधूंना कुटुंबाने विरोध केला नाही म्हणूनच धर्माचे संरक्षण झाले.'

भारत हा अध्यात्माकरिता प्रयोजन असणारा देश आहे. त्यामुळे आपल्याला जगाला धर्म द्यायचा आहे. कारण सुविधा परदेशात असल्या तरी सुख ,समाधान आणि शांती भारतातच आहे, असे सांगून भागवत म्हणाले, 'देव कुठे आहे विचारण्यापेक्षा देव कुठे नाही ते सांगा. जागृती असणाऱ्याला देव सर्वत्र दिसतो. देशासाठी काम करणाऱ्या गांधीजी आणि टिळक यांनीही कधी देव सोडला नाही. हिंदू हीच आपल्या समाजाची ओळख आहे. आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या पूर्वजांचा गौरव ही आपली संस्कृती आहे. या समाजातील मतभेद दूर करण्यासाठी मनातूनच विषमता दूर करण्याची आवश्यकता आहे. वैयक्तिक प्रतिष्ठेपेक्षा देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची असते. विविधतेला भेद दृष्टीने पाहू नका, समतेच्या दृष्टीकोनातून पाहा. नुसत्या कायद्याने समरसता येत नाही, त्यासाठी मनातून विषमता नाहिशी होणे गरजेचे असते.'

............

ओळी

कणेरी मठ येथे कारागीर विद्यापीठाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत. यावेळी उपस्थित अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी, सरसहसंघचालक भागय्या ,डॉ. दिनेश, रायबरेलीचे राजा कौशल्यसिंह, बसंत कुमार आदी.

छायाचित्र -रघुनाथ पाटील,गोरंबे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कीर्तीकुमारला दोन सुवर्ण

$
0
0

कीर्तीकुमारला दोन सुवर्ण

चंदगड : शिवाजी विद्यापीठात झालेल्या आंतर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाचा खेळाडू कीर्तीकुमार जयप्रकाश बेनके याने थाळीफेक व गोळाफेक या क्रीडा प्रकारांत सुवर्णपदकांसह शिवाजी विद्यापीठाची वैयक्तिक चॅम्पियनशीप पटकावली. कल्लाप्पा जयवंत कांबळे याने २० किलोमीटर चालणे रौप्यपदक पटकावले. कीर्तीकुमार याची मेंगलोर विद्यापीठ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झालेले आहे. त्याला प्राचार्य डॉ. पी आर. पाटील यांचे प्रोत्साहन आणि क्रिडा संचालक प्रा. एस. एम. पाटील, प्रा. बी. सी. शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images