Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सतेज पाटील गोकुळच्या सभेत अनधिकृतपणे घुसले

0
0

गोकुळ सत्ताधारी सभासदांचा आरोप, दुग्ध निंबधकांना निवेदन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाची ३० सप्टेंबरची सर्वसाधारण सभा कायदेशीरपणेच झाली असून मल्टिस्टेटसह सर्व विषय आवाजी मताने मंजूर झाले आहेत. सभा सुरू असतानाच आमदार सतेज पाटील यांच्यासह इतर दोन लोकप्रतिनिधी अनधिकृतपणे सभेत घुसले व सभा उधळण्याचा प्रयत्न केला. मात्र तेच सभेसंबंधी गैरसमज पसरवत आहेत. त्यांच्या राजकीय दबावाला बळी न पडता स्वच्छ अहवाल वरिष्ठांकडे पाठवावा, अशा मागणीचे निवेदन सत्ताधारी सभासद शिष्टमंडळातर्फे दुग्धचे सहायक निबंधक डॉ. राजेंद्र देशमुख यांना बुधवारी देण्यात आले.

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आमदार सतेज पाटील यांनी १७ ऑक्टोबरला निबंधक कार्यालयात येऊन सभेसंबंधी निवेदन दिले आहे. ते अहवालासंबंधी दबाव आणत आहेत. मात्र सभा कायदेशीर झाली आहे. बारकोड पाहून सभासदांना आत सोडण्यात आले होते. सभास्थळी जागा पुरेशी होती. नियोजनानुसार सकाळी ११ वाजता कामकाजाला सुरूवात झाली. अध्यक्षांनी प्रास्ताविकात शांततेचे आवाहन केले होते. संघाच्या कार्यकारी संचालकांनी पत्रिकेवरील विषय वाचण्यास प्रारंभ केले. मात्र विरोधकांनी गोंधळ घातला. दरम्यानच्या काळात सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. अशी वस्तुस्थिती असताना आमदार पाटील यांच्यासह इतर दोन लोकप्रतिनिधी दबाव टाकून सभेचा चुकीचा अहवाल तयार करण्यास निबंधकाना सांगत असल्याचे कळाले. राजकीय हेतूने ते गैरसमज पसरवत आहेत. याकडे दुर्लक्ष करून योग्य तो अहवाल द्यावा.

निवेदन देताना एस. डी. जरग, मकरंद बोराडे, सुकुमार पाटील, श्रीकांत पाटील, सचिन पाटील, बाळ माने, संभाजी महाडिक, अरविंद शिरगावे, धीरज डोंगळे आदी उपस्थित होते.

-------------------

गोकुळ मोडणाऱ्यांना ठेचू

'विरोधकांनी सभेत जाणीवपूर्वक गोंधळ घातला. सभा कायदेशीर झाली असताना चुकीचा अहवाल देण्यासाठी दबाव आणत आहेत. मात्र गोकुळच्या दुधासारखा स्वच्छ अहवाल द्यावा', अशी मागणी शिष्टमंडळातील तानाजी पाटील यांनी केली. तर 'विरोधकांनी खोडसाळपणे सभेच्या ठिकाणी मोडतोड केली. सहकाराला काळीमा फासण्याचे कृत्य त्यांनी केले. गोकुळ या मातृसंस्थेला मोडू देणार नाही', असा इशारा बी. आर. पाटील यांनी दिला.

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रंकाळ्याचे दुखणे कायम

0
0

संवर्धनासह सुशोभिकरण, ड्रेनेज लाइनचे काम अपुरेच

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलावाचे प्रदूषण रोखून पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी २००६ पासून विविध विकासकामांसाठी ९८ कोटी ६५ लाखांचा निधी मिळाला. पण रंकाळा संवर्धनासह सुशोभिकरण, ड्रेनेज लाइनचे काम अपुरे असल्याने रंकाळा तलाव प्रदूषणाचे दुखणे कायम राहिले. मूळ दुखण्यावर प्रथम मलमपट्टी करण्याची आवश्यकता असताना, केवळ संवर्धनाच्या नावाखाली कोट्यवधींचा निधी खर्ची पडत आहेत. तर विविध योजनांच्या माध्यमातून आणखी निधीची घोषणा केली जात असली, तरी मूळ प्रश्न प्रलंबितच पडत आहे.

ऐतिहासिक रंकाळा १३५ वर्षापूर्वी बांधला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने रंकाळा चौपाटी, संध्यामठ, टॉवर, नंदी देवालय, धुण्याची चावी बांधण्यात आली. विलोभनीय सौंदर्यामुळे तलाव पर्यटकांचे आकर्षण बनला. जिल्ह्यासह राज्यातील पर्यटकांची वर्दळ वाढली. मात्र शहरीकरणाचा वेग वाढत गेल्यानंतर तलावाच्या दक्षिण बाजूला अनेक उपनगरांची निर्मिती झाली. वस्ती वाढत असताना निर्माण होणारे सांडपाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेकने स्वतंत्र व्यवस्था उभी केली नाही. परिणामी तलावातील पाणी प्रदूषित होऊ लागले.

पाणी प्रदूषणात वाढ होत गेल्यानंतर तलावाला जलपर्णीचा विळखा पडला. त्यामुळे तलावातील जलचरांचे अस्तित्व धोक्यात येवू लागले. मासे, कासव मृतावस्थेत वारंवार आढळून येवू लागले. यातून रंकाळ्याचे संवर्धन आणि प्रदूषणमुक्तीचा विषय ऐरणीवर आला. राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेतून प्रथम आठ कोटी ६५ लाखांचा निधी मिळाला. निधीतून तलावाच्या सौंदर्यात भर टाकणारी कामे केली, पण प्रदूषणाचे दुखणे कायम राहिले. प्रदूषण कमी करण्यासाठी युआयडीएसएस योजनेतून दहा कोटींचा निधी ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी मिळाला. जाऊळाचा गणपती ते राज कपूर पुतळ्यापर्यंतच्या कामासाठी तब्बल पाच वर्षाचा कालावधी लागला. परिणामी प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढतच गेले. अमृत हरित पट्टा योजनेतून मिळालेल्या दहा कोटी निधीतून चौपटी व उद्यानांची निर्मिती केली. पण रंकाळ्याच्या स्थितीत काहीही सुधारणा झाली नाही.

कणेरकर नगर, क्रांतीसिंह नाना पाटील नगर, जिवबा नाना पार्क, आपटेनगर, रंकाळा तलाव प्रभागातील सर्व सांडपाणी तलावात येत असल्याने पाणी प्रदूषण रोखण्यात महापालिकेला अद्यापही यश आलेले नाही. या सर्व प्रभागात ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अमृत योजनेतील सुमारे ५८ कोटी निधीची तरतूद केली आहे. पण कामाला किती कालावधी लागणार आहे, हे निश्चित नसल्याने प्रदुषणाचे दुखणे कायम राहणार आहे.

.................................

चौकट

रंकाळ्यात शाम सोसायटीकडून येणाऱ्या नाल्याचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळते. सांडपाणी रोखण्यासाठी राज कपूर पुतळा ते जाऊळाचा गणपतीपर्यंत ड्रेनेजलाइन टाकली. पण पावसाळ्यात नाल्यातून येणारे पाणी आणि ड्रेनेज लाइनच्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने सांडपाणी थेट रंकाळ्यात येते. त्याचा परिणाम नंतर दिसून येत असल्याने पाण्याला हिरवा रंग प्राप्त होण्याबरोबर जलचर मृतावस्थेत आढळून येत आहेत. त्याच बरोबर रंकाळा परिक्षेत्रातील सांडपाणी रोखण्यासाठी ४० टक्के भागात ड्रेनेज लाइन टाकली असून ६० टक्के भागात काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रंकाळा प्रदूषणाचे दुखणे कायम राहणार आहे.

.........................................

चौकट

रंकाळ्यासाठी मिळालेला आतापर्यंतचा निधी

राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजना : आठ कोटी ६५ लाख

युआयडीएसएस : दहा कोटी

अमृत योजना (ड्रेनेज लाइन) : ५८ कोटी

अमृत हरितपट्टा : दहा कोटी

चौपाटी विकास : चार कोटी

एकूण निधी : ९८ कोटी ६५ लाख

................

चौकट

निधीतून झालेली कामे

निसर्ग माहिती केंद्र

संरक्षक भिंत

पाच लाखांच्या प्रत्येकी दोन बोटी

धोबी घाट

गणेश विसर्जन कुंड

ड्रेनेज लाइन ४० टक्के काम पूर्ण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिंह यांना मदत

0
0

कोल्हापूर : पैलवान हिंदकेसरी दिनानाथसिंह प्रोस्टेट ग्रंथीवाढ व फुफ्फुसाच्या व्याधीने त्रस्त असून समाजातील अनेक क्रीडाप्रेमींनी त्यांच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गंगावेस तालमीतील मल्लांनी त्यांच्या उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत केली. अनेक नामांकित मल्लांना अस्मान दाखवणारे पैलवान दिनानाथसिंह यांचा कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रात मोठा वाटा आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. त्यांना वैद्यकीय खर्चासाठी मदतीची गरज होती. याबाबत प्रसारमाध्यमातून बातम्या आल्यानंतर समाजातील विविध स्तरातून मदतीसाठी हात पुढे सरसावले आहेत. गंगावेस तालमीतील पैलवानांनी एकत्र येऊन दिनानाथसिंह यांची भेट घेत रोख रक्कम त्यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी सचिन जामदार, योगेश बोंबाळे, माउली जमदाडे यांच्यासह गंगावेस तालमीतील पैलवान उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीतील बेमुदत उपोषण मागे

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील नगरपरिषदेच्या नऊ कर्मचाऱ्यांना कामकाजात समाविष्ट करून घेण्याबाबत सरकारच्या निदर्शनास आणून देण्यास मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी त्यांची खातेनिहाय चौकशी करावी आणि कर्मचाऱ्यांना ताबडतोब कामावर रुजू करून घेण्यासाठी सुरू केलेले बेमुदत उपोषण मागे घेतले. मंगळवारी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावाप्रमाणे कर्मचाऱ्यांचे समावेशन करून घेण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे लेखी पत्र नगराध्यक्षा जयश्री गाट, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, पक्षप्रतोद भरत लठ्ठे, दौलत पाटील यांनी दिल्यानंतर नितीन काकडे, संजय पाटील, सचिन यादव, सचिन गायकवाड, तुळशीराम गजरे यांनी उपोषण मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडावत पॉलिटेक्निकला ‘एनबीए’ मानांकन

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

शैक्षणिक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनासाठी सर्वोच्च व प्रतिष्ठित असलेल्या नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रीडेशन अर्थातच एनबीए समितीकडून संजय घोडावत पॉलिटेक्नीकच्या सर्व शाखांना एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. अवघ्या ६ वर्षांत एनबीएकडून सर्व शाखांना मानांकन प्राप्त झालेली घोडावत पॉलीटेक्नीक ही महाराष्ट्रातील पहिलीच संस्था आहे.

घोडावत समुहाच्या मेकॅनिकल इंजिनीअरिंग, सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनीकेशन इंजिनीअरिंग आणि कम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग या शाखांना एनबीए मानांकन प्राप्त झाले आहे. एनबीए समितीने ७ ते १० सप्टेंबर या कालावधीत घोडावत पॉलिटेक्नीकच्या सर्व शैक्षणिक कामकाज, भौतिक सुविधा व कागदपत्रांची तपासणी केली होती. नुकतेच विजया दशमीदरम्यांना एनबीएकडून संस्थेला मानांकन मिळाल्याचे पत्र मिळाले.

समितीने प्रामुख्याने टिचिंग लर्निंग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट्स फीडबॅक, आऊटकम बेस्ड एज्युकेशन, सीओ-पीओ मॅपिंग, प्लेसमेंट, कॉमन फॅसिलिटी अशा विविध गोष्टींचे निकष तपासले होते. यापूर्वी घोडावत पॉलिटेक्नीकला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून इलेक्ट्रिकल मशीन लॅबला राज्यातील प्रथम क्रमांकाची लॅब म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता. यावर्षी घोडावत पॉलिटेक्नीकला टुडे रिसर्च अँड रेटिंग्स संस्थेमार्फत बेस्ट अपकमिंग पॉलिटेक्नीक इन महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून सर्व शाखांना उत्कृष्ट दर्जाही मिळाला आहे. नॉलेज रिव्ह्यू मासिकाकडून भारतातील टॉप टेन पॉलिटेक्नीकमधील एक असा गौरवही झाला आहे. मूल्यांकन यशस्वी करण्यासाठी संस्थेचे एनबीए समन्वयक प्रा. नरेश कांबळे, यांसह समन्वयक, विभागप्रमुख, शिक्षकांचे सहकार्य लाभले. विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. व्ही. ए. रायकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

याबाबत विश्वस्त भोसले म्हणाले, 'गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य संस्था करत आहे. हे यश पॉलीटेक्नीकच्या प्रत्येक घटकाचे आहे. संजय घोडावत यांनी प्राचार्य विराट गिरी यांच्यावर दाखविलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्नधान्य भेसळीला हवा चाप

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दिवाळी सणाच्या पूर्वतयारीसाठी घरोघरी धांदल सुरू झाली आहे. बाजारपेठेत व्यापारी, दुकानदारांनी स्टॉल्स सजवले आहेत. सणासुदीच्या काळात अन्नधान्याची मोठी खरेदी होते. या काळात भेसळीच्या प्रकारांनाही जोर चढतो. अन्नधान्यांत भेसळ करून बक्कळ कमाई केली जाते. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकाने, गोडाऊन्स, खाद्यपदार्थ तयार करणारी ठिकाणे, अन्नधान्य विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी सुरू आहे. पण, या विभागाची यंत्रणा तोकडी असल्याने भेसळीचे पदार्थ ग्राहकांच्या माथी मारले जातात. त्यासाठी ग्राहकांना सजग रहावे लागणार आहे.

दर्जेदार धान्य, डाळी न वापरता कमी दर्जाचे, सडक्या वस्तू वापरुन रवा, आटा, मैदा, बेसन तयार केल्याचा संशय आल्यास ग्राहकांना तक्रार करता येते. पॅकिंगवर कंपनीचे नाव, तारीख नसणे, खाद्यतेल, तूप, पनीर, मलई, खवा, तयार फराळ, मिठायांसह किराणा मालाबाबत संशय आल्यास तक्रार करता येते. जिथे अन्नपदार्थ तयार केले जातात, साठवणूक अथवा विक्री केली जाते अशी ठिकाणी भेसळ होत असल्याची तक्रार करता येते.

इथे करा तक्रार

ग्राहकाला तक्रार निनावी अथवा लेखी करता येते. कोल्हापुरातील सुभाष रोडवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी अथवा तोंडी तक्रार करता येते. तसेच सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, रघुकूल बिल्डिंग, सुभाष रोड या पत्त्यावर पत्र पाठवूनही तक्रार करता येते. कार्यालयातील ०२३१-२६४०५७३ आणि २६४१०९१ या टेलिफोन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तुम्ही तक्रार नोंदवू शकता. ग्राहकाला ऑनलाइन fdakolhapur@gmail.com या इमेलवर तक्रार देता येते. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गुप्त ठेवले जाते.

अशी होते तपासणी

ग्राहकांच्या तक्रारींनंतर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मालाची तपासणी करणे बंधनकारक आहे. वस्तूंचे उत्पादन, विक्री होत असेल तर संबंधित पदार्थाचे, वस्तूचे नमुने घेतले जातात. हे नमुने पुणे येथील सरकारी प्रयोगशाळा अथवा वाय. पी. पोवार नगरातील प्रयोगशाळेत पाठवले जातात. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई केली जाते.

कारवाईचे स्वरुप

कमी मानांकनाचे पदार्थ वापरून त्याची दर्जेदार पदार्थ म्हणून विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. जर पदार्थांमध्ये हानीकारक घटक असतील तर थेट पुण्यातील कोर्टात खटले दाखल केले जातात.

जर भेसळीबद्दल संशय आल्यास ग्राहक, नागरीक लेखी, तोंडी अथवा ऑनलाइन तक्रार करू शकतात. त्यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जाईल. दिवाळी सणाच्या काळात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्न औषधे सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. भेसळ ओळखण्यासाठी त्या-त्या पदार्थांची प्रयोगशाळेत तपासणी आवश्यक आहे. ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

- मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग

सहा महिन्यांतील कारवाया (१ एप्रिल ते ३० सप्टेंबरअखेर)

- सहा महिन्यांत एकूण २३ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करून सात जणांवर खटले दाखल करण्यात आला आहे.

- १४५ नमुने घेऊन ३२ व्यापाऱ्यांवर कमी मानांकनाचे साहित्य वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली. अन्नपदार्थांमध्ये शरीराला अपायकारक पदार्थ वापरल्याबद्दल नऊ जणांवर खटले दाखल करण्यात आले आहेत.

- पुण्यात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांमध्ये २३ व्यापाऱ्यांना एक लाख ३९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

- १६ ठिकाणी कारवायांत अधिकाऱ्यांनी जाग्यावरच एक लाख २५ हजार रुपये दंड वसूल केला.

- दोन ठिकाणी धाडी टाकून चार लाखांचा माल जप्त केला. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत.

- उघड्यावर पदार्थ विकणे, अस्वच्छ जागेवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून १ लाख १७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

०००००

000

(मूळ कॉपी)

अन्न धान्यात भेसळीबद्दल अशी करा तक्रार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी सण साजरा करण्यासाठी सर्वत्र धामधूम सुरु आहे. बाजारपेठेत व्यापारी, दुकानदार, विक्रेते ग्राहकांची प्रतिक्षा करत आहेत. अन्न धान्याची मोठी खरेदी विक्री होणार असल्याने काही व्यापारी अन्न धान्यात भेसळ करुन बक्कळ कमाई करतात. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकाने, गोडाऊन, खाद्य पदार्थ तयार करणारी ठिकाणे, अन्न धान्य विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी सुरु आहे. पण या विभागाची यंत्रणा तोकडी असल्याने भेसळीची पदार्थ ग्राहकांच्या माथ्यावर मारले जातात. त्यासाठी ग्राहकांना सजग रहावे लागणार आहे. अन्न धान्यातील भेसळीबाबत संशय आल्यास तक्रार करता येणे शक्य आहे. अन्न धान्य भेसळीबाबत तक्रार कशी करायची, कारवाईची प्रक्रिया कशी केली जाते, अन्न धान्य विभागाकडून कोणत्या कारवाया झाल्या, याचा 'मटा गाईड' च्या माध्यमातून घेतलेला आढावा

००००

भेसळ असणारे अन्न धान्य पदार्थ

दर्जेदार धान्य, डाळी न वापरता कमी दर्जाचे व सडके अन्नधान्य वापरुन रवा, आटा,मैदान बेसन तयार केल्याचा संशय आल्यास ग्राहकाला तक्रार करता येते. पॅकिंगवर कंपनीचे नाव, पॅकिंगची तारीख नसणे, तसेच खाद्य तेल, तूप, पनीर, मलई, खवा, तयार फराळ, मिठाईसह सर्व अन्न धान्याबाबत संशय आल्यास तक्रार करता येते. जिथे अन्नपदार्थ तयार केले जातात. साठवले जातात, विक्री केली जाते अशी ठिकाणी भेसळ होत असल्याची माहिती नागरिकांना कळाली तर तक्रार करु शकतात.

००००

तक्रारीचे स्वरुप व साधने

ग्राहकाला तक्रार निनावी अथवा लेखी करता येते. ग्राहक सुभाष रोड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात जाऊन लेखी अथवा तोंडी तक्रार करु शकतात. तसेच सहाय्यक आयुक्त अन्न धान्य औषध प्रशासन, रघुकुल बिल्डिंग, सुभाष रोड या पत्त्यावर पत्र पाठवू शकतात. कार्यालयातील ०२३१,२६४०५७३ आणि ०२३१,२६४१०९१ या टेलिफोन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदवू शकतात. ग्राहकाला ऑनलाईनवर fdakolhapur@gmail.com वर तक्रार देता येते. तक्रारदाराची इच्छा असल्यास नाव गुप्त ठेवले जाते.

०००००

अशी होते अन्न तपासणी

तक्रारीनंतर अन्न सुरक्षा अधिकारी घटनास्थळी जातात. तिथे अन्नधान्याचे नमुने घेतले जातात. हे नमुने पुणे येथील सरकारी प्रयोगशाळा अथवा वाय.पी. पोवार नगर येथील प्रयोगशाळेत पाठवले जातात. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई केली जाते.

००००

कारवाईचे स्वरुप

कमी मानांकनाचे पदार्थ वापरुन दर्जेदार पदार्थ म्हणून विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यापारी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. जर पदार्थात हानीकारक पदार्थ असतील तर थेट पुण्यातील कोर्टात खटले दाखल केले जातात.

०००००

अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाई अशा

(१ एप्रिल ते ३० सप्टेंबर पर्यंत)

१४५ नमुने घेऊन ३२ व्यापाऱ्यांवर कमी मानांकनाचे साहित्य वापरल्याबद्दल कारवाई करण्यात आली तर नऊ जणांवर शरीराला अपायकारक पदार्थ वापरल्याबद्दल खटले दाखल करण्यात आले आहेत.

०००००

पुण्यात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात २३ व्यापाऱ्यांना एक लाख ३९ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

०००००

१६ ठिकाणी झालेल्या कारवाईत अधिकाऱ्यांनी जागेवरच एक लाख २५ हजार रुपये दंड वसूल केला.

००००

दोन ठिकाणी धाडी टाकून चार लाखाचा माल जप्त केला. त्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले.

००००

उघड्यावर पदार्थ विकणे, अस्वच्छतेबद्दल खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांकडून एक लाख १७ हजार रुपये दंड वसूल.

००००

सहा महिन्यात २३ लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त. सात जणांवर खटले दाखल.

०००००

भेसळ ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत तपासणी आवश्यक आहे. जर भेसळीबद्दल संशय आल्यास ते लेखी, तोंडी, अथवा ऑनलाईनद्वारे तक्रार करु शकतात. त्यांच्या तक्रारीची ताबडतोब दखल घेतली जाईल. दिवाळी सणात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने अन्न औषधे सुरक्षा रक्षक तपासणी करत आहेत.

मोहन केंबळकर, सहाय्यक आयुक्त, अन्न, औषध प्रशासन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरः पाण्यासाठी शेतकरी चढले टॉवरवर

0
0

पंढरपूर

नीरा उजव्या कालव्यातून तिसंगी सोनके तलावात वारंवार पाठपुरावा करूनही पाणी न सोडल्याने आज सकाळपासून कॅनॉलमधील टॉवरवर चढून शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे.

पंढरपूर तालुक्यातील ब्रिटीशकालीन तिसंगी सोनके तलाव नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने भरून घेतला जातो. मात्र यावर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. या तलावावर १४ गावांचा पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची व्यवस्था अवलंबून असून अधिकाऱ्यांच्या गहाळ कारभारामुळे या परिसरात सध्या भीषण पाणीटंचाई सुरू आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणी न सोडल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. आज सकाळी शेतकरी ७ वाजल्यापासून टॉवरवर चढून बसले असून बाकीचे कालव्यात येऊन बसल्याने पोलीस प्रशासनाने बंदोबस्त वाढविला आहे. तलावात पाणी आल्याशिवाय खाली न उतरण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृत्तपत्र एजंट, विक्रेत्यांचा नोव्हेंबरमध्ये जिल्हा मेळावा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना सलग्न सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्यावतीने कल्याणकारी मंडळ माहिती व राज्य संघटना सदस्य नोंदणीसाठी मिरज तालुक्यातील एजंट वृत्तपत्र विक्रेत्यांची बैठक शुक्रवारी (ता. २६ आक्टोबर) होणार असुन पुढील आठवड्यात आटपाडी, खानापूर-विटा, जत व कवठेमहांकाळ तालुक्यातील बैठक होणार आहे. त्यानंतर वृत्तपत्र एजंट व विक्रेते यांचा राज्य संघटनेच्या मार्गदर्शनखाली जिल्हा मेळावा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, राज्य संघटना संचालक मारुती नवलाई, संघटक सचिन चोपडे, जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप, कार्याध्यक्ष शिवाजी काकडे, सरचिटणीस विशाल रासनकर यांनी ही माहिती दिली.

संघटनेच्यावतीने पलुस, कडेगाव, वाळवा, शिराळा व इस्लामपूर येथे बैठका संपन्न झाल्या. पदाधिकारी निवडीही झाल्या आहेत. उर्वरित तालुके व शहरांच्या बैठका, पदाधिकारी निवड झाल्यानंतर जिल्हा मेळावा व जिल्हा संघटना ग्रामीण विभाग पदाधिकारी व स्वतंत्र कार्यकारणी निवडी घेण्यात येणार आहेत. सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता बांधवांच्यासाठी अनेक योजना व उपक्रम राबवले जात आहेत. आज संघटनेच्या माध्यमातून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. गेली २० वर्षे राज्य संघटनेसोबत राहून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी शासनास कल्याणकारी मंडळ जाहीर करण्यास भाग पाडले आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे. सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या बैठकीस उपस्थित राहून आपल्या प्रगतीच्या मार्गात सहभागी व्हा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

अधिक माहितीसाठी विकास सूर्यवंशी मारुती नवलाई , सचिन चोपडे , प्रशांत जगताप , शिवाजी काकडे , चंद्रकांत जोशी, सुरेश धोत्रे (पलुस) व तानाजी जाधव, संदीप माळी तासगाव, आप्पासाहेब बोंगाणे, अरविंद काळे, अधिक माळी, इस्लामपूरचे धनंजय राजहंस, कमलाकर भांबुरे, शिवाजी जाधव (वाळवा), दत्तात्रय पाटील, नितिन गायकवाड, हंबीरराव कोरे (शिराळा), बापू पवार (जत) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


येलूर तलाठ्याचा पंटर लाच स्वीकारताना जाळयात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वडिलोपार्जित जमिनीचे अधिकार अभिलेखात नाव नोंद करून नवीन सात-बारा देण्यासाठी लाच स्वीकारताना शाहूवाडी तालुक्यातील येलूर येथील तलाठी देवराज सुमित्र पवार याचा पंटर राम शामराव बसरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंटरला पकडण्याचे समजताच तलाठी पवार हे फरारी झाले. मलकापूर येथील तलाठी कार्यालयातच पंटरला लाच स्वीकारताना पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली.

येलूर येथील संबंधीत तक्रारदार कुटुंबाने वडिलोपार्जित जमिनीचे अधिकार अभिलेखात नाव नोंद करून घेण्यासाठी रितसर अर्ज केला होता. या कामासाठी तलाठी पवार याने चार हजार रुपयांची मागणी केली होती. या कामासाठी पंटर बसरे याच्याकडे संपर्क साधावा असे त्याने संबंधीतास सांगितले होते. संबंधित कुटुंबातील सदस्यांनी बसरे याच्याशी संपर्क साधल्यावर त्याने ३००० रुपयांत काम करुन देण्याची तडजोड केली. त्याबाबत तक्रारदारांनी तलाठी पवार याच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचला. मलकापूर येथील तलाठी कार्यालयात पंटर बसरेला संबधितांकडून १५०० रुपयांची स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. बसरे लाच स्वीकारताना तलाठी पवार कार्यालयाबाहेर गेले होते. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सिद्धगिरी’ मध्ये न्यूरो नेव्हिगेशन सिस्टमचे लोकार्पण

0
0

बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती उपलब्ध करण्याचे सरसंघचालकांचे आवाहन

म. टा. वृत्तसेवा, कागल

'रूग्णाला काय लागते ते ओळखून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी. या स्वरूपातील चिकित्सा पद्धती प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी असावी. देशाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी औषधे ही भारतीय उत्पादकांकडून घ्या, परदेशी औषधांचे आकर्षण सोडून द्या', असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरूवारी श्रीक्षेत्र सिद्धगिरी मठ येथे केले.

कणेरी येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील सिद्धगिरी अॅडव्हान्सड न्यूरो सायन्स अँड रिसर्च युनिट (संस्कार) विभागातील नव्या 'न्युरोनेव्हिगेशन सिस्टीम' या मशीन प्रणालीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. सिद्धगिरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी, सरसहकार्यवाहक भागय्या, प्रांतचालक नानाजी जाधव, संस्कार विभागाचे प्रमुख न्यूरो सर्जन डॉ.शिवशंकर मरजक्के , धर्मादाय उपायुक्त शशिकांत हेर्लेकर, अखिल भारतीय ग्रामविकास प्रकल्पाचे प्रमुख डॉ. दिनेश यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा झाला.

सरसंघचालक भागवत म्हणाले, 'अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आता आरोग्य आणि शिक्षणही निकडीचे बनले आहे. आरोग्य सुविधा, वैद्यकीय शिक्षण खर्चिक बनले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी झालेल्या खर्चाच्या तुलनेत कमाई करण्यासाठी अनेकजण ग्रामीण भागातील असूनही शहरात जाऊन दवाखाने सुरू करतात. त्यामुळे ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अशा स्थितीत उपचारपद्धतीचा अभिनिवेष सोडून देऊन ज्या विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्या एकाच छताखाली आणून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. उत्तम आणि स्वस्त औषधे आपला देश जगाला देतो. त्याला जनतेने प्रतिसाद द्यावा. '

सरसहकार्यवाह भागय्या म्हणाले, 'सिद्धगिरी मठ हा समाजाला जागृत करण्याचे काम करीत आहे. जीवनाला योग्य दिशा देण्याची साधना येथे होत आहे. वैद्यकीय सेवा ही समाजाची आराधना आहे.'

काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, 'सामाजिक सेवा विभाग व वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांसाठी भविष्यात सिद्धगिरी हॉस्पिटल नो कॅश काउंटर सुरू करणार आहे.' यावेळी ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या दिग्विजय मोहिते(कोल्हापूर) या रूग्णाचे वडील लक्ष्मण मोहिते यांनी न्यूरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के व त्यांच्या टीमचे मनोगतातून आभार व्यक्त केले. तसेच संस्कार विभागातील मेंदू व मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया झालेल्या ५० लहान मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी प्रास्ताविक केले. अक्षय नलवडे-जहागिरदार यांनी सूत्रसंचलन केले. भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर यांनी आभार मानले.

.......................

चौकट

काय आहे न्युरो नेव्हिगेशन सुविधा

पूर्णपणे भारतीय बनावटीची ही मशीन मेंदू आणि मणक्याच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी उपयोगी पडणार आहे. आजाराचे नेमके ठिकाण आणि योग्य दिशेने जाण्यासाठी ही मशीन मदत करते. यामुळे ऑपरेशनचा पन्नास टक्के वेळ वाचणार आहे. शिवाय कवटीच्या हाडाचे घ्यावे लागणारे छेद सुद्धा कमी होतील. ऑपरेशन करताना होणाऱ्या इतर दुखापती वाचतील. रुग्ण कमी वेळेत बरा होईल. देशात केवळ १५० ठिकाणी शहरात असणारी ही मशीन ग्रामीण भागातील पहिलीच कणेरी मठ येथे आहे. भविष्यात याद्वारे कान,नाक, घसा अशा सर्व शस्त्रक्रिया रोबोटद्वारे करणेही शक्य होणार असल्याचे न्युरो सर्जन मरजक्के यांनी आपल्या भाषण सांगितले.

........................

फोटो- कणेरी (ता.करवीर) येथे न्युरोनेव्हिगेशन सिस्टीम या मशीन प्रणालीचे लोकार्पण करताना सरसंघचालक मोहन भागवत ,मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी, सरसहकार्यवाहक भागय्या , प्रांतचालक नानाजी जाधव, डॉ. शिवशंकर मरजक्के , धर्मादाय उपायुक्त शशिकांत हेर्लेकर, डॉ. दिनेश आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावसाठी नव्याने ‘वॉटर मॅनेजमेंट’

0
0

नव्या वर्षात रोज पाणी वितरणाचा प्रस्ताव, गावठाणसह उपनगरात सर्व्हे सुरू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरालगतचे गाव आणि चार दिवसातून पाणी पुरवठा हे पाचगावमधील सध्याचे चित्र. पावसाळा असो की उन्हाळा पाचगाववासियांना पाणी टंचाई ही नित्याची बाब बनली आहे. मात्र येत्या सहा महिन्यात हे चित्र बदलून रोज अर्धा तास पाणी पुरवठा करण्यासाठी हालचाली वेगावल्या आहेत. गावची लोकसंख्या, नवीन कॉलन्या, सध्याचा पाणीपुरवठा, नळ कनेक्शन अशा सर्व घटकांचा सर्व्हे सुरू आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी)व महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करुन २६ जानेवारीपासून नियमित पाणी वितरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाय नवीन सहा लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रस्तावित केली. एमजीपीतर्फे पाण्याच्या टाकीचे ४९ लाख रुपयांचे इस्टीमेट तयार केले आहे. जिल्हा परिषदेमार्फत निविदा प्रक्रिया राबवून टाकीच्या कामाला प्रारंभ होईल. शहरालगतच्या गावात रोज प्रतिमाणसी ७० लिटर पाणी पुरवठा करण्याचे सरकारी निकष आहेत. पाचगावमध्ये रोज प्रतिमाणसी ६५ लिटर पाणी पुरवठा झाला पाहिजे यादृष्टीने नवीन आराखडा बनविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात पाचगावचा झपाट्याने विस्तार झाला.गावठाण वगळून सुमारे ६५ नवीन कॉलन्या झाल्या आहेत.

या साऱ्या परिसराला नियमित पाणी पुरवठा करण्याच्या योजनेसंदर्भात आमदार अमल महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, सरपंच संग्राम पाटील, उपसरपंच संग्राम पोवाळकर यांच्यासह एमजीपी व करवीर पंचायत समितीचे शाखा अभियंते यांची संयुक्त बैठक झाली. नियमित पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक निधी व अन्य सहकार्याची ग्वाही आमदार महाडिक यांनी दिली. ग्रामसेवक बी.डी.शिंदे म्हणाले, 'सर्व्हेत एकूण लोकसंख्या, नळसंख्या, सध्याच्या पाणी पुरवठ्याची माहिती संकलित होईल. पाइपलाइन गळती तपासली जाणार आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व्हे पूर्ण करुन अहवाल बनविला जाईल.'

............

पाण्याची गरज सोळा लाख लिटरची

पाचगावची लोकसंख्या तीस हजाराच्या आसपास आहे. रोज सोळा लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे पाणी साठवणुकीची सोय नाही. यामुळे सध्या अकरा लाख लिटरपर्यंत पाणी उपसा करुन वितरीत केले जाते. होतो. सध्या तीन लाख ७५ हजार व चार लाख ७५ हजार लिटर क्षमतेच्या दोन पाण्याच्या टाक्या आहेत. 'एमजीपी'ने जादा पाणी पुरवठा सुरू केल्यास साठवणुकीसाठी नवीन पाण्याची टाकी गरजेची आहे. तीन टाक्या कार्यान्वित झाल्यास पाणी टंचाई संपुष्टात येईल असे यंत्रणेचे म्हणणे आहे.

...........................

कोट

' जिल्हा परिषद, एमजीपी, महापालिका, ग्रामपंचायत अशा सर्व घटकांना एकत्र आणून पाणी वाटपाचे नियोजन, पाइपलाइन गळती, पंप मशिनरीची कामे करण्यात येतील. २६ जानेवारीपासून नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी कामांना सुरुवात केली आहे. मोरेवाडी आर.के. नगर, पाचगावच्या पाणी पुरवठ्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करुन निधी मिळवू.

अमल महाडिक,आमदार

.............

पाचगावच्या पश्चिम भागात नवीन पाण्याच्या टाकीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. पाणी टंचाईवरील उपाय योजनेसाठी सध्या सर्व्हे सुरू आहे. ज्या लोकांनी अनधिकृतपणे नळ कनेक्शन जोडले असतील त्यांनी ३१ ऑक्टोबरपूर्वी ग्रामपंचायतीला कळवून ते कनेक्शन रितसर करुन घ्यावेत. एक नोव्हेंबरपासून बोगस नळ कनेक्शन तपासणी मोहिम होणार आहे.

संग्राम पाटील, सरपंच, पाचगाव

.............................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केवळ १०२६ ठराव, बाकीचे कुठे आहेत?

0
0

गोकुळ बचाव कृती समितीचा सत्ताधाऱ्यांना सवाल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सत्ताधारी मंडळींकडून आमदार सतेज पाटील यांच्यावर होणाऱ्या बिनबुडाच्या आरोपांचा गोकुळ बचाव कृती समितीने एका पत्रकाद्वारे निषेध केला आहे. २७५० ठराव आहेत असा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सहाय्यक दूध निबंधकांना निवेदन देताना फक्त १०२६ ठराव का आणले, बाकीचे ठराव कुठे गेले?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

पत्रकात असे म्हटले आहे की, मल्टिस्टेटला विरोध होत असल्याने सत्ताधाऱ्यांकडून पाटील यांच्यावर आरोप केले जात आहेत. बुधवारी सत्ताधारी मंडळींच्या १०२६ ठरावधारकांनी पदुमच्या सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. गोकुळच्या वार्षिक सभेचा अहवाल देण्यासाठी सतेज पाटील यांनी सहाय्यक निबंधकावर दबाव टाकल्याचा आरोप करत संघाची बदनामी थांबवण्याची मागणी केली होती. संचालक मंडळाचा अवास्तव खर्च आणि स्कॉर्पिओ घेऊन फिरण्याने संघाची बदनामी होत आहे. सभेचा खरा अहवाल पाठवल्यास दूध उत्पादकांना न्याय मिळणार असून त्यामुळे संघाची बदनामी होणार नाही. बचाव समितीकडे मल्टिस्टेटला विरोध करणारे १८३६ ठराव असून ठरावधारकांनी लेखी म्हणणे जिल्हा दूग्ध निबंधक, पुणे विभागीय निबंधकांनाही सादर केले आहेत.

सभा बेकायदेशीर झाल्याने सत्ताधारी मंडळींच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मल्टिस्टेटला विरोध करणाऱ्या सभासदांची बाजू मांडणाऱ्या आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांच्याबाबत सत्ताधारी बेताल वक्तव्य करत आहेत. सभेचा परिपूर्ण आणि खरा अहवाल सादर करावा अशी मागणी बचाव समितीने केला आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची दमदाटी व दबाव अधिकाऱ्यांवर आणलेला नाही. गतवर्षीच्या सभेत गोंधळ झाला असताना संघाच्या संबधित नेत्यांनी सभेचे विषय मंजूर केले. याबाबत सभा गुंडाळल्याबाबत गतवर्षी तक्रार केली असतानाही इतिवृत्ताप्रमाणे सभा झाल्याचा अहवाल अधिकाऱ्यांनी दिला होता. पुन्हा असा प्रकार होऊ नये म्हणून आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली समितीने निवेदन दिले. सत्ताधारी मंडळींनी संघाची हजारो कोटींची मालमत्ता परराज्यातील आणि परजिल्ह्यातील आपल्या आप्तस्वकीयांच्या आणि बगलबच्च्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

पत्रकावर माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, गोकुळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले, किरणसिंह पाटील, किशोर पाटील यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलावात बुडणाऱ्या मुलाला पोलिसाने वाचवले

0
0

म. टा. वृत्तसेवा वारणानगर

कोडोली (ता. पन्हाळा) येथील दत्तमठी समोरील तलावात बुडणाऱ्या पार्थ तानाजी पाटील या पाच वर्षाच्या बालकाला कोडोली पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल किशोर पाटील यांनी तलावात उडी घेऊन वाचवले. किशोर पाटील याच्या धाडसाबद्दल जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सभेच्या बंदोबस्तावेळी पोलिस कॉन्स्टेबल किशोर पाटील व विनायक पाटील हे सभा स्थळास लागून असलेल्या तलावाशेजारी लावलेल्या मोटारी काढत होते. यावेळी चार मुले तलावातील मोहरीवर खेळत होती. त्यापैकी ५ वर्षाचा मुलगा पार्थ खेळताना त्या मोहरीवरून तलावात पडला. तो बुडत असल्याचे किशोर पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी तलावात उडी मारली. पार्थला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. पाटील यांच्या शौर्याची दखल घेत जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अप्पर पोलिस प्रमुख श्रीनिवास घाडगे, शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधिक्षक आर. आर. पाटील, जयसिंगपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे, कोडोलीचे सपोनि संजीव झाडे यांनीही पाटील यांचे अभिनंदन केलेपोलिस कॉन्स्टेबल किशोर पाटील हे रत्नागिरी जिल्ह्यात गणपतपुळे चौकीवर कार्यरत असताना त्यांनी समुद्रात बुडणाऱ्या तीन पर्यटक भाविकांचे प्राण वाचवले आहेत. पार्थ हा जाखले येथील आहे. तो वैभवनगरात मामा अभिजित चव्हाण यांच्याकडे रहातो. चव्हाण-पाटील कुटुंबीयांनी किशोर पाटील यांचे आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशवाडीत मशिदीतील पंचाचा धक्काबुक्कीत मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

गणेशवाडी (ता. शिरोळ) येथे मशिदीच्या वहिवाटीच्या रस्त्यावर घराच्या दरवाजाची चौकट लावण्याच्या कारणावरून वादावादी झाली. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीनंतर मशिदीचे पंच अब्दुल उमर मोमीन (वय ४५) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मोमीन यांच्या मृत्यूस कारणीभूत असणार्‍या मोहन जमादार व त्यांच्या पत्नीला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. तब्बल पाच तासांहून अधिक काळ मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको केला. सायंकाळी संतप्त जमावाने मोहन जमादार यांचे अतिक्रमीत हॉटेल व घरावर हल्ला केला. हॉटेल, बेकरीचे साहित्य रस्त्यावर फेकण्यात आले. निषेध नोंदवून गावात कडकडीत बंदही पाळण्यात आला.

गणेशवाडीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहन निलब, जयसिंगपूरचे उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, कुरुंदवाडचे निरीक्षक चंद्रकांत निरवडे, शिरोळचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, जयसिंगपूरचे सहायक निरीक्षक शहाजी निकम यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न केला. मोठ्या पोलिस बंदोबस्तामुळे गावास छावणीचे स्वरुप आले. या घटनेची फिर्याद जुबेर अब्दुल मोमीन यांनी कुरूंदवाड पोलिसात दिली. पोलिसांनी मोहन जमादार यास ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेशवाडी येथे मशिदीच्या मिळकतीलगत मोहन जमादार यांचे घर आहे. मशिदीच्या वहिवाटीच्या रस्त्यावर जमादार यांनी शौचालय व हॉटेल बेकरीचे अतिक्रमण केले होते. बुधवारी रात्री जमादार हे मशिदीच्या बाजूला दरवाजाची चौकट बांधकाम करत असल्याचे मशिदीच्या पंच कमिटीच्या निदर्शनास आल्यानंतर वाद झाला. हा वाद पुन्हा गुरुवारी सकाळी ७ वाजता उफाळून आला. या वादावादीचे धक्काबुक्कीत रुपांतर झाले. धक्काबुक्कीत जखमी झालेले पंच अब्दुल मोमीन यांना मिरज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती गणेशवाडीत वार्‍यासारखी पसरताच घटनास्थळी मुस्लिम समाज बांधवांसह ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

संतप्त ग्रामस्थांनी जमादार यांच्या घरावर हल्ला चढवत घराची मोडतोड करून एका मोटारसायकलीवर दगडफेक केली. हॉटेल बेकरीतील आणि घरातील प्रापंचिक साहित्य रस्त्यावर फेकून जाळपोळ केली. मोमीन यांचा मृतदेह शवविच्छेदन दफनविधीसाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी जमादार व त्यांच्या पत्नीला अटक केल्याशिवाय दफनविधी करणार नाही अशी भूमिका घेतली. जमादार यांच्या घरासमोर मृतदेह ठेवून रास्ता रोको केला. मृतदेह तब्बल पाच तासांहून अधिक काळ रस्त्यावर ठेवला होता. दरम्यान पोलिस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांनी संबंधित आरोपींना अटक केली असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जमादार यास अटक झाल्याची खात्री पटल्यानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. गणेशवाडीत सध्या तणावपूर्ण वातावरण असल्याने मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पाराशर हाउसिंग सोसायटीकडून वसुली करावी’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

श्री पाराशर को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीने २०१४ ते २०१७ या कालावधीत पारगाव येथे बेकायदेशीररित्या बाजार बैठक कराच्या नावाखाली तीन लाख रुपयांची वसुली केली आहे. येत्या १५ दिवसांत या रकमेची वसुली करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी इंजिनीअर प्रभाकर साळुंखे यांनी केली आहे.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्याकडे निवेदन देऊन संबंधितावर कारवाई झाली नाही तर कोर्टात दाद मागण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. साळुंखे यांनी पत्रकात म्हटले आहे, 'सरकारी अनुदानातून सुमारे २५ लाख रुपये खर्चून आठवडा बाजार ओट्याचे बांधकाम केले आहे. दरम्यान पाराशर हाउसिंग सोसायटीने २०१४-१७ या कालावधीत ग्रामपंचायत व अन्य सरकारी यंत्रणेकडून कसलीही परवानगी न घेता बाजार बैठक कर वसूल केला आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कसलीही कार्यवाही झाली नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली नाही. गतवर्षी झालेल्या लिलाव पद्धतीची चौकशी झाली पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अनुदान नको, धान्यच द्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

रेशनवर धान्याऐवजी लाभार्थ्याच्या खात्यावर रोख अनुदान जमा करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात रेशन धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने भुदरगड तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 'रेशनवर धान्य द्या, गोरगरीब जनतेला अन्न द्या' अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

गेल्या कित्येक वर्षापासून रेशन व्यवस्था सुरू असून लाभार्थ्यांना धान्य दिले जाते. २१ ऑगस्टला राज्य शासनाने आदेश काढून रोख अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सर्वसामान्यांचा तोंडचा घास काढून घेतला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज भुदरगड तालुक्यातील रास्त भाव धान्य व केरोसीन दुकान संघटनेच्यावतीने निषेध फेरी काढून तहसीलदार अमरदीप वाकडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि संघटनेचे अध्यक्ष प्रविणसिंह सावंत, राजन पाटील, महादेव मेंगाणे, शशिकांत नलवडे, सदानंद पाटील आदींसह तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू कारखाना विक्रमी दर देईल’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'पश्चिम महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर जिल्हा एफआरपीप्रमाणे ऊस दर देतो. हायकोर्टाच्या निर्णयाशिवाय दर निश्चित केला जात नाही. मात्र, छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद आणि दिवंगत राजेंच्या निर्णयानुसारच दर देण्याची प्रथा मी अखंडपणे चालवत आहे. सभासदांच्या सहकार्यानेच आजपर्यंतचे गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने पार पाडले आहेत. चालू हंगामाही शेतकरी सभासदांच्या सहकार्यानेच दहा लाख गाळपाचे उद्दीष्ट पूर्ण करेल,' असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी केले.

छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या ३९व्या गळीत शुभारंभ समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाला. यावेळी गव्हाणी व मोळी पूजन समरजितसिंह घाटगे व संचालक मंडळ यांच्या हस्ते करण्यात आले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ' कारखान्यात राजकारण विरहीत कामकाज चालते. गुंठ्यापासून ते कितीही एकर असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यास मी केंद्रबिंदू मानतो. शेती विभागाच्या पाळीपत्रकाप्रमाणेच ऊस तोडीचा कार्यक्रम राबविला जाईल. त्यात कोणताही हस्तक्षेप होणार नाही. चेअरमनचाही ऊस कार्यक्रम पत्रकाप्रमाणेच गळीतास जाईल. कोणत्याही पुढाऱ्याचे न ऐकता ठरल्या पत्रकानुसारच तोडणी कार्यक्रम राबविण्याचा आहे. यात बदल करण्याचा अधिकार कोणालाच नाही.'

'सभासदांनी माध्यमाद्वारे येणाऱ्या ऊस दराची तुलना करू नये. गुजरात व उत्तरप्रतेशमध्ये दर जादा असतो. मात्र ऊस तोडणी अथवा अन्य बाबींचा विचार केला तर तफावत भरपूर राहते. एफआरपीप्रमाणेच दर देण्याची परंपरा शाहू साखर कारखान्याची आहे. याहीवर्षी विक्रमी दर दिला जाईल. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस कारखान्यास पाठवून उद्दीष्टपूर्तीसाठी सहकार्य करावे.'

कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी स्वागत केले. संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनय कोरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

कोडोलीतील रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी कष्टकरी परीषदेसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी येथे बुधवारी माजी मंत्री विनय कोरे यांची चर्चा झाली. 'वारणा'च्या विश्रामगृहावर साखर कारखानदारीतील अडीअडचणी आणि उपाययोजनांसंदर्भात त्यांनी चर्चा केली. साखर उद्योग व शेतकरी सक्षम करण्यासाठी आवश्यक सकारात्मक उपाय करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री दिलखुलास कार्यक्रमात नागरिकांनी विविध विषयांवर मागणी केली होती. या संदर्भातील लवकरच मुख्यमंत्री दालनात लवकरच बैठक घेण्याचे अश्वासन दिले. वारणानगरातील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिवनेरी क्रीडांगणावर हेलिकॉप्टरने आगमन झाले. यावेळी वारणा विविध उद्योग समूहाच्यावतीने माजी मंत्री कोरे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर वारणा कारखान्याच्या विश्रामगृहावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारणा परीसरातील नागरिकांची निवेदने स्विकारली. माजी मंत्री कोरे यांनी साखर उद्योगातील अडचणींची माहिती दिली. किमान किफायतशीर दर २९०० रुपयांवरून ३१०० रुपये करावा, पेट्रोल कंपन्याची पीएसओची अट शिथील करावी, साखर निर्यातीला अनुदान मिळावे,

केंद्र शासनाचे जोपर्यत अनुदान मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीयिकृत बँकांच्या धोरणाप्रमाणे सहकारी क्षेत्रातील बँकांनाही साखर उद्योगाला कर्ज पुरवठा करण्याविषयी शासनाने नाबार्डला निर्देश द्यावेत अशा मागण्या केल्या. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम उपस्थित होते.

फोटो ओळी

वारणानगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करताना वारणा समुहाचे प्रमुख माजी मंत्री विनय कोरे. सोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, विश्वास जाधव.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर हंगामात इच्छुकांची कसोटी

0
0

उसाला मिळणारा दर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ठरणार कळीचा मुद्दा

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

फोटो....... धनंजय महाडिक, संजय मंडलिक ,राजू शेट्टी

कोल्हापूर

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांची साखर हंगामात मोठी कसोटी लागणार आहे. उसाला मिळणारा दर, साखर अनुदान, परदेशात साखर निर्यात, ऊस उत्पदकांच्या खात्यावर रक्कम जमा करणे आणि निवडणुकीत प्रचारासाठी वेळेपूर्वी ऊस हंगाम संपवण्याचे आव्हान इच्छुकांपुढे असणार आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये एप्रिल किंवा मे महिन्यात तर विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचे अध्यक्ष,संचालक निवडणुकीसाठी गुडघ्याला बांशिग बांधून तयार आहेत. उसाला जादा भाव मिळावा यासाठी खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रणशिंग फुंकले आहे. सदाभाऊंनी तर एफआरपी अधिक २०० रुपये जादा दर मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात केली आहे. त्यामुळे शनिवारी (ता.२७) खासदार शेट्टी किती दर मागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेट्टी व खोत यांच्यात लोकसभेचा सामना रंगणार असल्याने दोघांचीही कसोटी लागणार आहे.

खासदार धनंजय महाडिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पुन्हा नशीब आजमवणार आहेत. ते सोलापूर जिल्ह्यातील भीमा कारखान्याचे अध्यक्ष आहेत. कारखान्याचा हंगाम आणि आणि निवडणुकीसाठी रणनिती, प्रचार अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागणार आहे. महाडिक यांच्याविरोधात प्रा. संजय मंडलिक हे प्रमुख उमेदवार असण्याची शक्यता असून ते हमिदवाडा कारखान्याचे अध्यक्ष आहेत. ऊस उत्पादकांना जादा दर देऊन खूष करण्याचे त्यांचे धोरण असणार आहे. तसेच लवकर हंगाम संपवून कारखान्याची यंत्रणाही प्रचार यंत्रणेसाठी लावण्यासाठी प्रयत्न राहणार आहेत.

करवीर तालुक्यात आमदार चंद्रदीप नरके हे कुंभी कारखान्याचे तर माजी आमदार पी.एन. पाटील हे भोगावती कारखान्याचे अध्यक्ष आहेत. दोघेही गेल्या दोन निवडणुकीत पारंपरिक उमेदवार म्हणून लढत आहेत. कुंभीची रिकव्हरी भोगावतीपेक्षा जास्त असल्याने दोन्ही कारखान्यांचा दर किती असणार हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी उसाला ३५०० रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी पी.एन. यांनी केल्याने त्यांना जादा दर देण्यासाठी नैतिक दबाव राहणार आहे.

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आमदार सतेज पाटील व आमदार अमल महाडिक हे साखर कारखान्यांशी संबधित आहेत. आमदार पाटील यांचा कारखाना गगनबावडा तालुक्यात आहे. कारखाना जरी मतदारसंघात नसला तरी निवडणुकीसाठी यंत्रणा राबवण्यासाठी फायदा होऊ शकतो. महाडिक यांचे वडील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात कसबा बावडा येथील राजाराम कारखाना आहे. कारखान्याच्या माध्यमातून ते मुलाच्या राजकारणासाठी मतदारसंघात मदत करु शकतात.

राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्यात मुश्रीफ, मंडलिक आणि घाटगे यांचे कारखाने आहेत. आमदार मुश्रीफ यांचा खासगी कारखाना आहे तर संजय मंडलिक आणि समरजित घाटगे दोघेही सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. दर देण्यात शाहू साखर कारखान्याचा राज्यात मोठा बोलबाला आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तीनही साखर कारखान्यांत जादा दर देण्यात स्पर्धा लागण्याची शक्यता आहे.

बिद्री कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के.पी. पाटील असून त्यांचे मेहुणे ए.वाय. पाटील हे देखील कारखान्याचे संचालक आहेत. दोघेही राधानगरी विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे उसाला मिळणाऱ्या दराचा फायदा 'के.पीं'.ना की 'ए.वाय.' ना मिळणार हे निवडणुकीत कळणार आहे. पन्हाळा मतदारसंघातील विनय कोरे व इचलकरंजी मतदारसंघातील प्रकाश आवाडे हे दोघेही कारखान्यांशी संबधित असल्याने त्यांना कारखान्याचा माध्यमातून निवडणुकीसाठी चांगला फायदा होणार आहे. शिरोळ तालुक्यात 'दत्त'चे गणपतराव पाटील, 'शरद'चे राजेंद्र पाटील, 'दत्त'चे संचालक अनिल यादव हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तसेच स्वाभिमानीचे सावकार मादनाईक रिंगणात असणार आहेत. इच्छुक मंडळी ऊस व साखर कारखान्याशी संबधित असल्याने त्यांची कसोटी लागणार आहे.

.....................

विधानसभा मतदारसंघ , संभाव्य उमेदवार, कंसात कारखाना

करवीर आमदार नरके (कुंभी), पी. एन.पाटील (भोगावती)

कोल्हापूर दक्षिण आमदार सतेज पाटील (डी.वाय. पाटील), आमदार अमल महाडिक (राजाराम)

कागल आमदार हसन मुश्रीफ ( घोरपडे), प्रा. संजय मंडलिक, ( हमिदवाडा) समरजित घाटगे (शाहू)

राधानगरी के.पी. पाटील, ए.वाय. पाटील (दूधगंगा)

इचलकरंजी प्रकाश आवाडे (जवाहर)

पन्हाळा विनय कोरे (वारणा)

शिरोळ गणपतराव पाटील (दत्त), राजेंद्र यड्रावकर (शरद), अनिल यादव (दत्त)

..................................................

लोकसभा मतदारसंघ

कोल्हापूर खासदार धनंजय महाडिक, (भीमा), प्रा. संजय मंडलिक, (हमिदवाडा)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनापती कापशीत दरासाठी उसाचे ट्रॅक्टर अडवले

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी चौकात शिवसेनेने ऊस दरासाठी आंदोलन केले. गुरुवारी सायंकाळी सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर अडविण्यात आले. उसाला ३६०० रुपयांची उचल मिळालीच पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात आले.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांनी नेतृत्व केले. भोकरे म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी उसाचा दर जाहीर केला नाही. कारखानदार त्यावर बोलायला तयार नाहीत. सोयाबीनला हमी भावाप्रमाणे दर मिळत नाही. व्यापार्‍यांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यावर्षी उसाची उचल ३६०० रुपये आणि अंतिम दर चार हजार रुपये मिळालाच पाहिजे. जर गुजरातमध्ये चार हजार रुपये प्रतिटन दर मिळत असेल आणि कर्नाटक मधील कारखाने बांधावर ३२०० रुपये द्यायला तयार आहेत. मग येथील शेतकऱ्यांना ३६०० रुपयांची उचल का मिळत नाही. शेतकऱ्यांना विनंती अशी आहे की उसाला चांगला भाव मिळेपर्यंत ऊस तोड देऊ नये. ट्रॅक्टर चालकांनी उद्यापासून रस्त्यावर ट्रॅक्टर दिसणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी विनंती आहे. अन्यथा अड्ड्यावर येऊन ट्रॅक्टर फोडले जातील. तेव्हा होणाऱ्या नुकसानीला तेच जबाबदार राहतील.' यावेळी अशोक पाटील, राजेंद्र येजरे, अवधूत पाटील, दत्तात्रय साळुंके, दिग्विजय पाटील, दत्तात्रय साळुंके, आदी उपस्थित होते.

सेनापती कापशी : ऊस दरासाठी रास्ता रोको करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, अशोक पाटील, अवधूत पाटील राजेंद्र, दत्तात्रय साळुंके, आदी. (छायाचित्र : सार्थक फोटो सेनापती कापशी)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images