Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रिक्षा संघटनांनी मुजवले खड्डे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शहरातील सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी वर्गणी काढून शहापूर ते थोरात चौक या रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून मुजविले. नवरात्रीचे औचित्य साधत दुर्गामातेने नगरपरिषद व लोकप्रतिनिधींना सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना केली. या अनोख्या आंदोलनाची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.

थोरात चौक ते शहापूर हा नेहमी वर्दळीचा रस्ता. पण या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्यावरील खड्डे मुजवावेत अशी मागणी रिक्षा चालक संघटनांसह परिसरातील नागरिकांतून सातत्याने केली जात आहे. खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होण्यासह वाहनांचा बिघाड व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. मागणी करुनही नगरपरिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष होऊ लागल्याने इचलकरंजी विद्यार्थी वाहतूक संघासह शहरातील विविध रिक्षा संघटना प्रतिनिधींनी वर्गणी काढून जमा झालेल्या वर्गणीतून या रस्त्यावरील खड्डे मुजविले. यावेळी रिक्षा संघटना प्रतिनिधींनी नगरपरिषद प्रशासनासह लोकप्रतिनिधींच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करत नवरात्रीच्या निमित्ताने तरी प्रशासनला जाग यावी यासाठी हा मार्ग अवलंबिल्याचे सांगितले. आंदोलनात नंदा साळुंखे, मन्सूर सावनूरकर, लियाक गोलंदाज, दशरथ मोहिते, अनिल बमण्णावर, सचिन मस्के, खलिल हिप्परी, बजरंग संगपान यांच्यासह महाराष्ट्र रिक्षा चालक संघटना, विद्यार्थी वाहतूक संघटना, इंदिरा ऑटो रिक्षा संघटना, छत्रपती शिवाजी चौक एसटी स्टँड संघटना, शहापूर रिक्षा संघटना, विक्रमनगर रिक्षा मालक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गारगोटी राष्ट्रवादीकडून वीज बिलांची होळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

भुदरगड़ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने वीज दरवाढ व भारनियमनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. वाढत्या वीजबिलांची होळी वीज वितरणाच्या मुख्य कार्यालयासमोर करण्यात आली. गारगोटी येथे महावितरण कंपनीने केलेली भरमसाठ दरवाढ घरगुती वीज व शेती वीज तसेच भारनियमन कमी करा या मागणीचे निवेदन गारगोटी अभियंता पोवार यांना देण्यात आले.व आंदोलन करण्यात आले. उपकार्यकारी अधिकारी पोवार यांना घेरावा घालण्यात आला. यावेळी महावितरणच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार म्हणाले, 'चांगला महसूल देणाऱ्या कोल्हापूर जिल्हयात भारनियमन चुकीच्या पद्धतीने सुरू असुन महावितरण या बाबी न थांबविल्यास आम्हाला पायातील हातात घ्यावे लागेल.' कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले, 'नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली तोच महावितरणने भारनियमनाला सुरूवात केली आहे. सत्तेत आल्यानंतर लवकरच महाराष्ट्र भारनियमनमुक्त करण्याचे खोटे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने आता सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. भारनियमन तत्काळ बंद करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने लवकरच जिल्हाभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.'

युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष मेंगाणे यांचे भाषण झाले. बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, के. ना. पाटील, सर्जेराव देसाई, शहर अध्यक्ष शरद मोरे, धनाजीराव देसाई, पंडितराव केणे, मोतेश बारदेस्कर, पांडुरंग सोरटे, विलासराव झोरे, प्रकाश डेळेकर, विजय आबिटकर, शेखर देसाई, मधुकर पाटील, रवींद्र वायदंडे, पी. एस. कांबळे, माजी उपसभापती शिवाजीराव देसाई, रेगडे, सचिन पाटील, अनिल पाटील, जयवंत गोरे, प्रशांत गुरव, आण्णा पाटील, अशोक साठे, अशोक यादव उपस्थित होते.

फोटो : गारगोटी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वीज वितरण कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करताना विश्वनाथ कुंभार, रणजितसिंह पाटील, संतोष मेंगाणे , मधुकर देसाई, पंडितराव केणे आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूत खरेदी फसवणूक तपासाबाबत न्यायालयाचे ताशेरे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

सूत खरेदीतील फसवणुकप्रकरणी अटक केलेल्या तिघांना मंगळवारी आणखी एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. प्रविण कुंभार, उमेश खोचगे व नंदकुमार सुळ अशी संशयितांची नांवे आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात त्रुटी असल्याने न्यायालयाने पोलिसांच्या तपासाच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत ताशेरे ओढले. सूत दलाल उमेश खोचगे याच्या मध्यस्थीमधून यंत्रमागधारक सचिन शेळके यांनी सोहनी टेक्स्टाईल या फर्ममधून सूताची बाचकी खरेदी केली होती. पण मागणी करूनही सूत अथवा त्याची रक्कम देण्यास खोचगे याच्याकडून टाळाटाळ केली जाऊ लागल्याने शेळके यांनी २ लाख ४५ हजार १६० रुपयांची फसवणूक प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी खोचगे याच्यासह नंदकुमार सूळ व प्रविण कुंभार यांना अटक केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. या प्रकरणात १५ सूताची बाचकी जप्त केल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर सांगितले. परंतु या संदर्भातील जबाब, पंचनामा याची कोणतीही कागदपत्रे सादर न केल्याने तसेच तपास कामात त्रुटी आढळून आल्याने न्यायालयाने तपासाबाबत ताशेरे ओढत खडे बोल सुनावले. याबाबतची माहिती संशयितांच्या वकिलांनी दिली. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी संविधान सन्मान यात्रा कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समता, सहिष्णुता व धर्मनिरपेक्षतेचा जागर करीत संविधान सन्मान यात्रेला सुरुवात झाली आहे. यात्रा सोमवारी (ता. २२) कोल्हापुरात दाखल होणार आहे. दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शाहू स्मारक भवनात कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमात मेधा पाटकर यांच्यासह देशातील मान्यवर मनोगत व्यक्त करतील' अशी माहिती महापौर व संविधान सन्मान यात्रा स्वागत समितीच्या स्वागताध्यक्षा शोभा बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापौर बोंद्रे म्हणाल्या, 'शाहू महाराजांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय यासारखी मूल्ये करवीरनगरीच्या भूमीत रुजवली. देशाची राज्यघटना डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आकाराला आली तेव्हा ही मूल्ये राज्यघटनेचा मुलाधार म्हणून स्वीकारण्यात आली. पण अलिकडच्या काही घटनांवरून हे मुलाधार धोक्यात आले आहेत. यासाठीच गांधी जयंतीपासून दांडी ते दिल्ली अशी संविधान सन्मान यात्रा सुरू केली आहे. राज्यात यात्रेची वाटचाल समता, सहिष्णुता व धर्मनिरपेक्षतेचा जागर करत सुरू आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, जाती-धर्माचे राजकारण, महिलांवरील अत्याचर, देशभरातील विचारवंतांच्या हत्या व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घातल्या जात असलेल्या मर्यादा अशा विषयांवरही यात्रेच्या उपक्रमांमध्ये चर्चा होणार आहे. कोल्हापूर येथे २२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता यात्रेचे आगमन होणार आहे. त्यानंतर विविध मान्यवर शाहू स्मारक भवनात कार्यक्रमात विचार मांडणार आहेत.'

प्राचार्य टी. एस. पाटील म्हणाले, 'राज्यघटना समजावून सांगण्यासाठी संविधान यात्रेचे आयोजन केले आहे. यात्रेनंतर शाळा, कॉलेजमधील विद्यार्थ्यांना राज्यघटनेचे महत्व सांगणारे उपक्रम वर्षभर राबवण्यात येणार आहेत.'

पत्रकार बैठकीस शिवाजीराव परुळेकर, चंद्रकांत यादव, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, दिलीप पवार, संभाजीराव जगदाळे, उदय कुलकर्णी, सीमा पाटील, रमेश आपटे, अशोक चौगले, रवी जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांविरोधात महापालिकेची कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्याने शहरामध्ये वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. सीपीआर, बिंदू चौक व भाऊसिंगजी रोडवर कारवाई करताना फेरीवाल्यांचे साहित्य ताब्यात घेतले. तर दुकानांसमोरील फलक काढून टाकण्यात आले.

करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी भाविकांची नवरात्रोत्सवामुळे शहरात गर्दी वाढली आहे. भाविकांच्या गर्दीमुळे वाहनांच्या संख्येत वाढ झालेली असाना अनेक फेरीवाले व दुकान व्यवसायिक वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने व्यवसाय करत आहेत. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांनी पोलिस प्रशासन व महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात अतिक्रमण काढण्याबाबत झालेल्या बैठकीस शहर पोलिस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, गृह पोलिस अधीक्षक सतीश माने यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व महापालिका अधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सीपीआर हॉस्पिटल, भाऊसिंगजी रोड व बिंदू चौक येथील व्यवसायिक व फेरीवाल्यांवर कारवाई केली. शिवाजी चौक, महापालिका, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजक तिकटी आदी ठिकाणी अतिक्रमणे करून व्यवसाय केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिका व पोलिस प्रशासनाने दिला आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर पोलिस वाहतूक निरीक्षक अनिल गुजर, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब पवार, उपशहर अभियंता एस. के. माने, राजेंद्र वेल्हाळ, महानंदा सूर्यवंशी, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार यांच्यासह ४० कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रीय पेयजल योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या वर्क ऑर्डर होवूनही कामे न सुरू केलेल्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा' असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. खोत यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामधाम येथे आढावा बैठक झाली.

बैठकीत पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सध्यस्थितीविषयी चर्चा झाली. या तालुक्यातील विविध गावातील पाणी पुरवठा योजनांची माहिती घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले. विभागीय तांत्रिक कमिटीने मंजुरी दिलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना तत्काळ सुरुवात करावी अशी सूचना खोत यांनी केली.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, गटनेते अरुण इंगवले यांनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने यांनी मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मांडला. याप्रसंगी एमजीपीचे कार्यकारी अभियंता एम. जी. भोई, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एम. एस. बसर्गेकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षांनी घेतली भेट

हुपरी येथे पाणी पुरवठा योजना अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकी उभारणी प्रस्तावित आहे. तीन टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. एका टाकीचे काम जागेच्या प्रश्नामुळे होऊ शकले नाही. जागेप्रश्नी काहीजणांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टाकीसाठी जागेचा ताबा मिळावा यासाठी हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगी, मुख्याधिकारी तानाजी नरळे, पक्षप्रतोद भरत लठ्ठे, अमित गाठ आदींच्या शिष्टमंडळांनी कृषी राज्यमंत्री खोत यांची भेट घेतली. खोत यांनी यासंदर्भात लवकरच संयुक्त बैठक घेऊन प्रश्नाची सोडवणूक करू अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केआयटी’ कॉलेजमध्ये आज मतदार नोंदणी

$
0
0

महाराष्ट्र टाइम्स, निवडणूक प्रशासनातर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा निवडणूक प्रशासन व महाराष्ट्र टाइम्सतर्फे येथील केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये नव मतदार नोंदणी आणि जागृतीचा कार्यक्रम आज, मंगळवारी आयोजित केला आहे. दुपारी साडेतीन वाजता कार्यक्रमास प्रारंभ होईल. निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, प्रांताधिकारी सचिन इथापे हे यावेळी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. यावेळी मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगातर्फे मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. १ सप्टेंबरपासून कार्यक्रम व्यापकपणे राबवला जात आहे. त्यात नविन मतदार नोंदणीसाठी अर्ज भरून घेणे, नाव वगळणे, नाव, पत्यात दुरूस्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. १८ वर्षे झालेल्या प्रत्येकाचे नाव मतदार यादीत असावे, यासाठी प्रशासन जागृती करीत आहे. जिल्ह्यात १८ ते १९ वर्षे वयोगटातील सव्वा लाख युवक, युवती आहेत. यापैकी केवळ दहा हजारजणांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. अजूनही मोठ्या संख्येने यादीबाहेर नवमतदार आहे. यामुळे निवडणूक प्रशासनाने विद्यापीठास विनंती करून प्रत्येक महाविद्यालयात नवमतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले. त्यानुसार केआयटीने कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी केआयटीचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी, प्रा. विजय रोकडे, नोडल अधिकारी महेश नाझरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपजिल्हाधिकारी भोसले, प्रांताधिकारी इथापे मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात मतदार यादीतील नावासाठी अर्ज भरून घेण्यात येणार आहे.

------

ही कागदपत्रे आवश्यक

जन्म पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, अथवा बोनाफाईड प्रमाणपत्र, ग्रामसेवक किंवा तलाठीचा रहिवासी दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, १ पासपोर्ट आकाराचा फोटो, घरातील नात्यातील एकाचे मतदान ओळखपत्र झेरॉक्स.

-----------

... तर नाव नोंदवता येणार

परजिल्हा, गावातून शिक्षणासाठी कोल्हापुरात आलेले विद्यार्थी सुट्टी पडल्यानंतर गावी जातात. तोपर्यंत मतदार यादी नाव नोंदणी मोहिम संपलेली असते. म्हणून अशा विद्यार्थ्यांचेही अर्ज भरून घेतले जात आहेत. अर्ज संबंधित विद्यार्थ्याच्या गावातील मतदान केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. याशिवाय परिसरातील वसाहत, गावातील १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनाही नाव नोंदणी करता येणार आहे.

----------------

शेवटची संधी

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावयाचे असल्यास या महिनाअखेर नाव नोंदणीसाठी अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रशासन महाविद्यालयात येत आहे. इच्छुकांना महाविद्यालयातच नाव नोंदवण्याची शेवटची संधी आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी भोसले यांनी केले आहे.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक भोपळे यांची कानउघडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी बोलवण्यात महापालिकेच्या विशेष सभेत नगरसेवक कमलाकर भोपळे यांनी केलेल्या स्टंटबाजीवर भाजप-ताराराणी आघाडीच्या बैठकीत चांगलीच कानउघडणी केली. सर्व सदस्यांनी भोपळे यांना धारेवर धरत सभागृहात पुन्हा असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. मंगळवारी होणाऱ्या सभेत एलइडी प्रोजेक्टबाबत आक्रमक भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी होणाऱ्या महापालिकेच्या महासभेच्या पार्श्वभूमीवर व्यूहरचना आखण्यासाठी सायंकाळी भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांची बैठक झाली. महासभेत येणाऱ्या विषयावर चर्चा होण्यापूर्वी सर्व सदस्यांनी भोपळे यांना धारेवर धरले. दांडके, गटातील पाणी व घागर आणत भोपळे यांना सभागृहात स्टंटबाजीची सवय लागली असून याला आवर घालण्याची मागणी नगरसेवक किरण नकाते यांनी केली. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा देत सभागृहात असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे ठणकावून सांगितले. सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे भोपळे यांना नमते घ्यावे लागले.

शहरातील वीजवाहिनीचे झाळे कमी करण्यासाठी एलइडी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर झाला आहे. मात्र गेल्या तीन सभेत एलइडीचा प्रकल्प पुढील मीटिंगसाठी म्हणून प्रलंबित ठेवला जात आहे. शहरात हा प्रकल्प राबवण्यासाठी महासभेत आक्रमक भूमिका मांडण्याचा निर्णय मीटिंगमध्ये घेण्यात आला. बैठकीस गटनेते विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, किरण शिराळे, किरण नकाते, इश्वर परमार, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, जयश्री जाधव, मेहजुबीन सुभेदार यांच्यासह पार्टीचे सदस्य उपस्थित होते.

सभागृहात सूचना करणार

पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी बोलवलेल्या विशेष सभेत नगरसेवक नियाज खान व कमलाकर भोपळे यांनी सभागृहाचा अवमान होईल असे कृत्य केले होते. त्यामुळे नाराज झालेल्या आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी संबंधीत नगरसेवकांवर कारवाई करण्याबरोबरच सभागृहाचे कामकाज नियमानुसार होण्यासाठी विनंतीपत्र महापौर बोंद्रे यांना बुधवारी दिले होते. मात्र, चार दिवसानंतरही या पत्रावर महापौर बोंद्रे यांनी कोणतीही कारवाई केलेली नसल्याने त्यांचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात राहिला आहे. आजच्या सभेत महापौर बोंद्रे सर्व सदस्यांना सभागृहातील नियमावलीबाबत सूचना करणार आहेत.

कोट

काँग्रेस सदस्यांकडून सभागृहाचा अवमान होईल अशी कृती घडलेली नाही. तरीही आजच्या सभेपूर्वी पक्षाची पार्टी मीटिंग घेण्यात येणार आहे. मीटिंगमध्ये सदस्यांकडून सभागृहाचा अवमान होईल अशी कोणतीही कृती करू नये, अशा सूचना करण्यात येणार आहेत.

- शारंगधर देशमुख, गटनेते,काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समन्वयक करतात तरी काय ?

$
0
0

तक्रार करूनही काहीच उपयोग नसल्याचा आरोप

रूग्णालयांचा गोरखधंदा ... ३

महात्मा फुले जनआरोग्य

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आजार बसत नसल्याचे कारण दाखवून उपचाराला नकार दिलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशा रूग्णांना न्याय देण्यासाठी नेमलेले समन्वयक डॉ. सागर पाटील करतात काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रूग्णापेक्षा हॉस्पिटलवरच विशेष 'प्रेम' दाखवले जाते, याचा 'अर्थ' काय अशी विचारणा केली जात आहे. यामुळे साखळी करून सरकारी निधीवर डल्ला मारणाऱ्या सर्वांवर कारवाई होण्याची गरज आहे.

रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर प्रारंभी योजनेत बसवू असे सांगितले जाते. मात्र उपचाराला सुरुवात करून काही दिवसातच योजनेची फाईल 'रिजेक्ट' झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पूर्ण पैसे भरून उपचार करावे लागतील असे सांगण्यात येते. पुढे उपचार घ्यावयाचे नसतील तर डिस्चार्ज घेण्याचा पर्याय दिला जातो. मात्र त्यापूर्वी उपचाराचा खर्च वाढलेला असतो. त्यामुळे रुग्णाला अन्यत्र हलवण्यापेक्षा पुढील उपचार चालू ठेवण्याचा निर्णय नातेवाईक घेतात. कागदे रंगवून योजनेतून आणि रुग्णाकडून पैसे वसूल केल्याचीही चर्चा आहे.

या योजनेचे समन्वयक म्हणून डॉ. सागर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हॉस्पिटलच्या तक्रारी असल्यास त्यांच्याशी समन्वय साधून न्याय मागणे अपेक्षित आहे. पण अशा लोकांना न्याय मिळाला असता तर तक्रारी वाढल्या नसत्या. तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही, अशी भावना नातेवाईकांच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे पाटील यांच्याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

महात्मा फुले जनआरोग्य योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी आरोग्य मित्रांची भूमिका महत्वाची ठरते. आरोग्यमित्रांना या योजनेचा पुरेपूर अभ्यास नसल्याने सामान्य लोकांना माहिती मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत. आरोग्य मित्र हा योजनेतील महत्वाचा दुवा असून तोच एजंटची भूमिका करत असल्याने रुग्णांची दिशाभूल होत आहे. योजनेच्या कार्यवाहीबाबत आरोग्य मित्रांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे.

.............

तक्रारीआधी सेटलमेंट

योजनेबाबतची तक्रार घेऊन आलेल्या व्यक्तीला आजाराबाबतची शास्त्रीय माहिती सांगून गोंधळात टाकले जाते. सर्वसामान्यांना आजाराबाबत शास्त्रीय माहिती काहीच नसल्याने तक्रारीचा जोर कमी होतो. त्याही पुढे जावून रुग्णाने तक्रारीबाबत पाठपुरावा केल्यास सेटलमेंटचे आमिष दाखवले जाते. रुग्णालये पैसे घेत असल्याच्या तक्रारी होऊनही प्राथमिक स्तरावर तडजोडी झाल्याने प्रशासनापर्यंत येणाऱ्या तक्रारीचा ओघ कमी होतो. तसेच काहीवेळा रुग्णांकडून कोऱ्या लेटरपॅडवर सह्या घेण्यात आल्याने तक्रारीसाठी पुढे येणाऱ्याना पायबंद बसतो.

...............

कोट

'महात्मा फुले योजनेतून सर्व खर्च करून देतो असे सांगितले. विविध चाचण्या बाहेर कराव्या लागल्या तसेच चाचण्यांसाठी पैसे भरून घेतले. या योजनेंतर्गत दिले जाणारे जेवण सुमार दर्जाचे होते. काही प्रश्न विचारल्यास प्रशासनाची भाषा देखील उर्मट असते. आरोग्य मित्राकडे तक्रार केल्यास लेखी तक्रार द्या असे सांगण्यात आले. पेशंटच्या जिवाला धोका होईल या भीतीने तक्रार करण्याचे धाडस झाले नाही.

चंद्रकांत पाटील, पिडीत रुग्णाचे कुटुंबिय

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर कंत्राटदारांना ब्लॅक लिस्ट करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राष्ट्रीय पेयजल योजना व मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या वर्क ऑर्डर होवूनही कामे न सुरू केलेल्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा' असे आदेश कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. खोत यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामधाम येथे आढावा बैठक झाली.

बैठकीत पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ या तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांच्या सध्यस्थितीविषयी चर्चा झाली. या तालुक्यातील विविध गावातील पाणी पुरवठा योजनांची माहिती घेतली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे प्रभारी मुख्य अभियंता सुभाष भुजबळ यांनी पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन केले. विभागीय तांत्रिक कमिटीने मंजुरी दिलेल्या पाणी पुरवठा योजनांच्या कामांना तत्काळ सुरुवात करावी अशी सूचना खोत यांनी केली.

जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, गटनेते अरुण इंगवले यांनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासने यांनी मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मांडला. याप्रसंगी एमजीपीचे कार्यकारी अभियंता एम. जी. भोई, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता एम. एस. बसर्गेकर, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, शिवाजी मोरे आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षांनी घेतली भेट

हुपरी येथे पाणी पुरवठा योजना अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकी उभारणी प्रस्तावित आहे. तीन टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. एका टाकीचे काम जागेच्या प्रश्नामुळे होऊ शकले नाही. जागेप्रश्नी काहीजणांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या टाकीसाठी जागेचा ताबा मिळावा यासाठी हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाठ, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगी, मुख्याधिकारी तानाजी नरळे, पक्षप्रतोद भरत लठ्ठे, अमित गाठ आदींच्या शिष्टमंडळांनी कृषी राज्यमंत्री खोत यांची भेट घेतली. खोत यांनी यासंदर्भात लवकरच संयुक्त बैठक घेऊन प्रश्नाची सोडवणूक करू अशी ग्वाही दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभूराजेंची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

धर्मवीर छत्रपती शंभूराजे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीची बदनामी करणार्‍या लेखक, प्रकाशक आणि संबंधित घटकांविरोधात तत्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी हातकणंगले तालुका सकल मराठा समाज समन्वय समितीने केली आहे. याबाबत तहसीलदार सुधाकर भोसले व पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांना निवेदन देण्यात आले. संबंधितांवर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या निवेदनात असे म्हटले आहे, महाराष्ट्र सरकारच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत पूरक वाचन म्हणून विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या 'समर्थ रामदास स्वामी' या पुस्तकातून छत्रपती शंभूराजे आणि 'संतांचे जीवन प्रसंग' या पुस्तकातून संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीच्या बाबतीत अवमानकारक मजकूर छापून बदनामी करण्यात आली आहे. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. समर्थ रामदास स्वामी पुस्तकाच्या लेखिका डॉ. शुभा साठे, संतांचे जीवन प्रसंग या पुस्तकाचे लेखक गोपीनाथ तळवळकर यांच्यासह प्रकाशक तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत या पुस्तकांना मंजूरी देणार्‍या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या सदस्यांसह अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करुन या पुस्तकांवर तत्काळ बंदी घालावी. त्याबरोबर या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर माफी मागून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.

यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील, उपाध्यक्ष दीपक कुन्नुरे, सचिव भाऊसाहेब फास्के, शरद साखर कारखान्याचे संचालक दशरथ पिष्टे आदींनी तीव्र भावना यावेळी व्यक्त केल्या.

शिष्टमंडळात अ‍ॅड. संग्रामसिंह नाईक, दयासागर मोरे, सुभाष पाटील, पंडीत निंबाळकर, दिनानाथ मोरे, कृष्णात जाधव, सुभाष चव्हाण, प्रल्हाद तालुगडे, अजित पाटील, रोहित तोरस्कर, विजय जाधव, अभिजित वरुटे, किशोर लुगडे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरात स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

स्वाइन फ्लूची लागण झाल्याने येथील महिलेचा सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अश्‍विनी गुरुनाथ संकपाळ (वय ४४, रा. विद्यासागर अपार्टमेंट, १५ वी गल्ली, जयसिंगपूर) असे त्यांचे नाव आहे. गेल्याच आठवड्यात धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील एका तरुणाचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. तर उदगाव येथील एका व्यक्तीला स्वाइन फ्लूची लागण झाली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

सात दिवसांपूर्वी अश्‍विनी संकपाळ यांना सर्दीचा त्रास जाणवू लागला. यानंतर तापही आल्याने शिरोळ येथील रुग्णालयात त्यांनी उपचार घेतले. नंतर त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे त्या जयसिंगपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्या. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सांगली येथील रुग्णालयात जाण्यास सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. तपासणी अहवालानंतर त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यामध्ये न्यूमोनियाची लक्षणेही आढळली होती. रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

गेल्याच आठवड्यात स्वाइन फ्लूने धरणगुत्ती येथील तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर आता जयसिंगपूरच्या महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथील शशिकांत बाजीराव चौगुले (वय ४५) यांनाही स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयांत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्दी, ताप, खोकल्याने त्रस्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी अहवालामध्ये त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

सर्दी, ताप, घशात खवखवणे, घास गिळताना त्रास होणे ही स्वाइन फ्लूची प्राथमिक लक्षणे आहेत. यानंतर रुग्णाला न्युमोनिया होतो. प्राथमिक लक्षणे आढळताच रुग्णांनी तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घ्यावेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

-एन. एस. चौगुले, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघ अध्यक्षपद निवड प्रक्रिया सुरु

$
0
0

कोल्हापूर : भूविकास बँकेच्या थकबाकीपोटी युवराज पाटील यांचे संचालक आणि अध्यक्षपद रद्द झाल्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी सहकार खात्याने निवड प्रक्रिया सुरु केली आहे. जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी प्राधिकृत अधिकारी म्हणून प्रदीप बरगे यांची निवड केली आहे. पुढील आठ दिवसांत अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. गेले महिनाभर संघाचे अध्यक्षपद रिक्त असून, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील भुयेकर प्रभारी अध्यक्षपद सांभाळत आहेत. अध्यक्षपदासाठी भुयेकर पाटील यांच्यासह अमरसिंह माने, जी. डी. पाटील, राजू पाटील यांची नावे आघाडीवर आहेत. शिवाजीराव कदम, शोभना शिंदे नेसरीकर, विजयादेवी राणे, मानसिंगराव जाधव या विरोधी गटातील संचालकांनी अध्यक्षपदासाठी चाचपणी सुरु आहे.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची गांधीगिरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शासन आणि महावितरण कंनपीने ग्राहकांवर लादलेली अन्यायी वीज दरवाढ तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने कॉ. मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली. शासनाच्या अन्यायकारक धोरणामुळे उद्योगांची वाताहात होत चालल्याच्या प्रकाराचा शंखध्वनी करुन निषेध नोंदविण्यात आला. मंदीच्या गर्तेत अडकलेल्या यंत्रमाग व्यवसायासह महागाईने त्रस्त जनतेला वीज दरवाढीची दसरा-दिवाळीची भेट दिल्याबद्दल साखर वाटप करुन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

पेट्रोल आणि डिझेल पाठोपाठ वीज दरवाढ सर्वसामान्यांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. अन्यायी वीज दरवाढ करुन शासनाने सर्वसामान्य लोकांची पिळवणूक सुरु केली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्षाच्यावतीने कॉ. मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, नगरसेवक शशांक बावचकर, इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी, यंत्रमागधारक तुकाराम पाटील यांनी, अन्य राज्यांच्या तुलनेत महावितरणचा उत्पादन व वितरण खर्च प्रचंड आहे. हा अतिरिक्त बोजा वीज कंपन्यांची अकार्यक्षमता, अवाढव्य भांडवली व प्रशासकीय खर्च, वीज चोर्या, वितरण गळती, प्रचंड भ्रष्टाचार यामुळे झाला आहे. त्याचा फटका राज्यातील उद्योजक, व्यापारी, शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना मुकाटपणे सोसावा लागत आहे. मागील दहा वर्षाच्या तुलनेत गत चार वर्षापासून सरकारने सामान्य ग्राहक, उद्योजक व शेतीसाठी लागणाऱ्या वीज दरात सातत्याने वाढ केली आहे. ही दरवाढ सर्वसामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकर्यांसाठी अन्यायकारक असून सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नियोजन उद्ध्वस्त करणारी असल्याचे सांगितले. ही अन्यायी वीज दरवाढ तातडीने रद्द न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत दसऱ्याची जय्यत तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व मराठा विकास संघटनेच्यावतीने गेल्या अकरा वर्षापासून शहरात सुरू झालेली शाही दसरा महोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. शाही मिरवणूक, पुरस्कार वितरण, गौरव समारंभ, सिमोल्लंघन सोहळा आदी कार्यक्रम गुरुवारी (ता. १८ ऑक्टोबर) सायंकाळी श्रीमंत ना. बा. घोरपडे चौकात (दसरा चौक) होतील अशी माहिती सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी दिली.

सुरेशदादा पाटील म्हणाले, 'प्रथेनुसार गावभागातील अंबाबाई मंदिरापासून शाही मिरवणूकीस प्रारंभ होईल. यात उंट, घोडे, भालदार, चोपदार, अष्टप्रधान मंडळ, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, गोंधळी, ढोल-ताशा व तुतारी वाद्यांचा गजरासह लवाजामा असेल. मिरवणूक प्रथेप्रमाणे झेंडा चौक मार्गे राजवाड्यात जाऊन ग्रामदैवत व श्रीमंत घोरपडे सरकार यांचा आशिर्वाद घेईल. नवचंडीकेचे पूजन होऊन कोहळा फोडण्याचा विधी होऊन मिरवणूक दसरा चौकात आल्यानंतर स्वागत समारंभ होईल. यावेळी गणराया आणि दुर्गामाता पुरस्कारांचे वितरण होईल. त्याचबरोबर विविध क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या इचलकरंजी शहर व परिसरातील दहा खेळाडू, मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणास बसलेल्या १० रणरागिणी तसेच मराठा उद्योजकांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित केला आहे.' कार्यक्रमास उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येण्यात असून भाग्यवान १२ महिलांना पैठणी साडी देण्यात येणार आहे. त्यानंतर सार्वजनिक दसरा महोत्सवाचे मानकरी सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते सिमोल्लंघनाचा कार्यक्रम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनआवाडेंकडून राजकारण’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय पूर्ण क्षमतेने व उत्तम पध्दतीने सुरू असताना केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अशक्य व हास्यास्पद मागणी केली जात आहे. अशा पद्धतीची अव्यवहार्य मागणी करून सर्वसामान्य जनतेचे थट्टा केली जात आहे. साथ देण्याऐवजी जवाहर कारखान्याचे चेअरमन प्रकाश आवाडे हे राजकारण करून खीळ घालण्याचा प्रयत्न नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे चुकीचे व निषेधार्ह आहे. रुग्णालयाची मालकी आता शासनाकडे असल्यामुळे त्या संदर्भातील ठराव देता येणार नाही' अशी माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगराध्यक्षा स्वामी म्हणाल्या, 'फेब्रुवारी २०१८ मध्ये इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय शासनाकडे हस्तांतरीत होऊन आरोग्य विभागाने ताबा घेतला आहे. त्यानंतर आवश्यक पदे बदलीने भरण्यात आली असून प्रक्रिया अजुनही सुरू आहे. सध्या या रुग्णालयात विविध १५ विभाग व १०० बेड सुरू झाले आहेत. रुगणालयात लाखो रुपयांची औषध खरेदी आलेली आहे. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून रुग्णालयात आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यातर्फे एमएलएचपी ट्रेनिंग सेंटर सुरू झाले असून त्याअंतर्गत तीस शिकाऊ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. ब्लड स्टोरेज युनिट, कंत्राटी सेवा लवकरच सुरू होणार आहेत. रुग्णालयाच्या मालमत्ता पत्रकावर शासनाचे नाव नोंद झाले आहे. त्याची देखभाल, दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून येत्या दोन महिन्यांत प्राप्त होणार आहे. त्यामुळे रुग्णालयाची मालकी ही शासनाची असल्याने जवाहर कारखान्याने मागणी केल्याप्रमाणे ठराव देता येणार नाही.'

नगराध्यक्षा स्वामी म्हणाल्या, 'कष्टकरी जनतेसाठी रुग्णालय पूर्ण क्षमतेने चांगल्या पध्दतीने सुरू असताना केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हास्यास्पद मागण्या केल्या जात आहेत. अशा पध्दतीची अव्यवहार्य मागणी करून जवाहर कारखान्याने शासन व लोकप्रतिनिधी यांना कमी लेखून सर्वसामान्य जनतेची थट्टा केली आहे. लवकरच २०० बेड सुरू करण्यासाठी आमदार हाळवणकर प्रयत्नशील असून त्यांना साथ देण्याऐवजी राजकारण करून खीळ घालण्याचा सुरु असलेले प्रयत्न थांबवावेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठ्ठल आणि रुक्मिणीच्या गाभाऱ्याला आकर्षक गुलाब फुलांची सजावट

$
0
0

पंढरपूर : विठ्ठल मंदिरात सुरु असलेल्या शारदीय नवरात्री महोत्सवासाठी आज मंदिर समितीच्यावतीने विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या गाभार्याला आकर्षक लाल गुलाबची सजावट करण्यात आली असून दोन्ही गाभारे लाल रंगाने न्हाऊन निघाले आहेत . या नवरात्रीच्या काळात मंदिर समितीने कधी तुळशीच्या तर कधी शेवंतीच्या फुलांनी यापूर्वी गाभाऱ्याची सजावट केली होती . लाल गुलाब हव्या त्या संख्येत मिळत नसल्याने अखेर मंदिर समितीने अनेक ठिकाणाहून हे गुलाब मागवून आज देवाच्या गाभाऱ्यात हि लाल गुलाबाची सजावट केली आहे . लाल गुलाबात विठ्ठल रुक्मिणीचे अनोखे रूप खुलून दिसत असून देवाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली आहे . पंढरपुरातील स्थानिक कलाकार माऊली म्हेत्रे यांनी सहा तास राबून हि आकर्षक सजावट पूर्ण केली आहे .


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर विमानसेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करू

$
0
0

कोल्हापूर:

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा उडान योजने अंतर्गत केंद्र सरकारने सुरू केली, परंतु ही सेवा सुरळीत चालत नसल्यामुळे प्रवाशांची व स्थानिक कोल्हापूरकरांची तीव्र नाराजी असल्याची बाब खासदार संभाजीराजे यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे प्रभू यांची भेट घेऊन ही माहिती दिल्यानंतर ही विमानसेवा सुरळीत चालू ठेवण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एअर डेक्कन या कंपनीने कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आतापर्यंत नियमित चालू ठेवली नाही, जमत नसेल तर पर्यायी कंपनीचा विचार मंत्रालयाने करावा, अशी मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली. त्याचबरोबर कोल्हापूर विमानतळाचा विकास आणि विमानसेवेसंदर्भात कोल्हापूर येथे एक आढावा बैठक केंद्रीय मंत्री प्रभू यांनी घ्यावी, अशी विनंती केल्यानंतर लवकरच कोल्हापूर येथे येऊन ही बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले.

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणाच्या गेल्या आठवड्यात झालेल्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची कुठलीही कल्पना केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला नसल्याची माहिती यावेळी त्यांनी मंत्र्यांना दिली. भूमिपूजन कार्यक्रमात जी गडबड प्रशासनाने केली, यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रभू यांनी यापुढे देशात विमानतळ प्राधिकरणाचा कुठलाही कार्यक्रम असल्यास त्याची पूर्व कल्पना स्थानिक विमानतळ प्रशासनाने केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाला देणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले. यापुढे जिथे कुठेही अशाप्रकारचे कार्यक्रम असतील तर संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना देणे आणि निमंत्रित करणे बंधनकारक करण्याचे आदेशही प्रभू यांनी दिले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकोडे वाचनालयाच्या वतीने कुंकुमार्चन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

हिरव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला... प्रत्येकीसमोर ठेवलेले श्रीयंत्र... देवाचा प्रसाद म्हणून साखर फुटाणे... अंबाबाई मंदिरातील गुरुजींचा देवीच्या मंत्राचा जयघोष... विशिष्ट लयीत सुरू असलेले देवीच्या उपासनेचे स्त्रोत्र... प्रत्येक स्त्रोताच्या उच्चाराबरोबरच श्री यंत्रावर महिलांकडून सुरु असलेले कुंकुमार्चन... हे चित्र होते जरगनगरातील. नवरात्रौत्सवाची पर्वणी साधत जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने महिलांसाठी विशेष कुंकमार्चनाचे. कुंकुमार्चनचा हा दुसरा सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात आज पार पडला.

अंबाबाई मंदिरातील देवस्थानाचे पूजारी सुदाम सांगले आणि ओंकार भोरे यांनी कुकुंमार्चन विधी सांगितला. यावेळी या वेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी आयोजनामागील उद्देश सांगून सर्वांनी व्यक्तिगत इच्छेबरोबर राज्यातील दुष्काळ परिस्थितीसह बळीराजाला समृद्ध करण्याची प्रार्थना ही केली. आजच्या या सोहळ्यासाठी आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रिमा राहुल चिकोडे, योगेश चिकोडे, सचिन साळोखे, कृष्णा अतवाडकर, दिपक नगरी, भार्गव परांजपे, अर्चना रुईकर, संगिता ओतारी, पायल गुरव, नेहा कुलकर्णी, शोभा साळोखे, ऋचा लाटकर, हर्षवर्धन चिकोडे, वेदांत चिकोडे आदीसह महिलांनी उर्स्फुत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जनआरोग्य’च्या अॅडमिट रुग्णांवर उपचार होणारच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थी रुग्णांकडून जादा रक्कम उकळणाऱ्या जिल्ह्यातील पंधरा हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्या हॉस्पिटलमध्ये या योजनेतून काही रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केंपी पाटील यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील ज्या ११ हॉस्पिटलना वगळण्यात आले आहे, त्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून सध्या काही रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांवर मोफत उपचार होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दाखल असलेल्या रुग्णांवर व्यवस्थित उपचार केले जाणार आहेत. तसेच त्यांच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अॅस्टर आधार हॉस्पिटलचे जरी निलंबन झाले असले तरी या योजनेतून नियमित डायलेसिस करणाऱ्या रुग्णांना उपचार करण्यास परवानगी दिली आहे. उपचार घेत असणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी जिल्हा आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

जिल्ह्यातील पंधरा हॉस्पिटलवर बडगा उगारल्याबद्दल रुग्ण व नातेवाइकांकडून स्वागत होत आहे. हॉस्पिटलकडून जादा पैसे उकळल्याच्या तक्रारी करणारे रुग्ण पुढे येत आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या पथकाने या विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दहा पथकांनी १२ व १३ ऑक्टोबरला जिल्ह्यातील ३४ हॉस्पिटलवर छापे टाकून तपासणी केली असता गंभीर त्रुटी आढळून आल्या. योजना नि:शुल्क असतानाही तपासणी व सुविधेच्या नावाखाली जादा रक्कम उकळल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच रुग्णांकडून औषधाचे दर वाढवून जादा रक्कम वसूल केली होती. तसेच पात्र रुग्णांना नाकारण्याचे धाडसही दाखवले होते. हॉस्पिटलच्या मनमानी कारभाराचा फटका रुग्णांना बसल्याने त्यांनी या योजनेतील मुंबईच्या कार्यालयांना ई-मेल व अन्य मार्गाने तक्रारी केल्या होत्या. तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images