Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अत्याचारप्रकरणी संशयित ताब्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

पणुंद्रे पैकी सुतारवाडी (ता. शाहूवाडी) येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित शिवाजी कृष्णा सुतारविरोधात शनिवारी शाहूवाडी पोलिसांत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. सुतारला रविवारी दुपारी ताब्यात घेऊन पोलिसांनी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. आरोपीला सोमवारी (ता. १५) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक रानमाळे यांनी दिली.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी महिला व संशयित आरोपी शिवाजी सुतार हे पणुंद्रे पैकी सुतारवाडी (ता. शाहूवाडी) येथील रहिवाशी असून फिर्यादी महिला व मुले गुरुवारी रात्री जेवल्यानंतर घरात झोपले होते. यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास आरोपी सुतारने शिडीच्या साहाय्याने माळ्यावर चढून फिर्यादी महिला व मुले झोपलेल्या खोलीत प्रवेश केला. यावेळी सुतारने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने शनिवारी (ता.१३) रात्री उशिरा दिल्याने सुतारवर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी दुपारी सुतारला पोलिसांनी ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीच्या धडकेतील जखमीचा मृत्यू

$
0
0

सिंगल फोटो...

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर शेताकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने अजयकुमार नारायण पाटील (वय ३८, रा. कुर्तनवाडी) गंभीर शनिवारी दुपारी जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. भाऊ सुनील नारायण पाटील यांनी याबाबतची माहिती चंदगड पोलिसांत दिली. दरम्यान धडक दिलेल्या यामाहा गाडीवरील ऋतिक नामदेव कांबळे (मौजे कार्वे, ता. चंदगड) व ओंकार विजय कदम (मजरे कार्वे) हे दोघेही जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निलंबत हॉस्पिटलआज जाहीर होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून जिल्ह्यातील दहा हॉस्पिटलना वगळण्यात आले असून, सोमवारी (ता.१५) या हॉस्पिटलची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच निलंबित हॉस्पिटलच्या जागी नवीन हॉस्पिटलना संधी दिली जाणार आहे. ही प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.

महात्मा फुले जनआरोग्य योजना नि:शुल्क असतानाही रुग्णांकडून पैसे उकळण्याच्या तक्रारी योजनेच्या मुंबई कार्यालयाकडे ई-मेल आणि अन्य मार्गाने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांनी केल्या होत्या. या योजनेचे सीईओ डॉ. सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली २० डॉक्टरांच्या पथकाने १२ व १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ३४ हॉस्पिटलची तपासणी केली. डॉ. शिंदे यांनी स्वत: अॅस्टर आधार हॉस्पिटलची पाहणी केली असता तेथे अनेक रुग्णांकडून पैसे उकळल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी महात्मा फुले योजनेतून या हॉस्पिटलचे तत्काळ निलंबन केले. तसेच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील दहा हॉस्पिटलमध्ये अनियमितता व गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना वगळण्यात आले.

दहाही हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून जादा रक्कम उकळल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच काही हॉस्पिटलमध्ये पात्र रुग्णांना नाकारण्याचे प्रकारही उघडकीस आले आहेत. या प्रकाराची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. काही हॉस्पिटलनी उपचार व सुविधा देण्याचा दर्जा राखला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना विभागाने दहाही हॉस्पिटलमधील कागदपत्रे जप्त केली असून, त्यांची कसून तपासणी केली जात आहे. दहा हॉस्पिटलना या योजनेतून निलंबित केल्यानंतर रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी नवीन हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत केला जाणार आहे.

गेल्या पाच वर्षांत या योजनेतून जिल्ह्यातील एक लाख २१ हजार १०८ रुग्णांवर उपचार झाले आहेत. आजअखेर उपचारापोटी ३०५ कोटी ९५ लाख ३० हजार रुपये हॉस्पिटलना दिले आहेत. सर्वसामान्यांना दर्जेदार उपचार मिळावेत हा हेतू असतानाही हॉस्पिटलच्या गळेकापू स्पर्धेमुळे योजना बदनाम होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्यात येणार आहेत. तसेच या योजनेवर सरकारमार्फत समन्वयकांनी करडी नजर ठेवून गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने कुंकुमार्चन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नवरात्रौत्सवानिमित्त जगरनगर येथील कै. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा झाला. या उपक्रमात सुमारे २५० हून अधिक महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. अंबाबाई मंदिरातील देवस्थानाचे पूजारी सुदाम सांगले यांनी कुकुंमार्चन विधी सांगितला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. ते म्हणाले, राज्यात दुष्काळाची परिस्थिती असून शेतकरी व सर्व दुष्काळ ग्रस्तांसाठी ही प्रार्थना या माध्यमातून करावी. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना करावी.'

यावेळी चिकोडे यांनी आयोजनामागील उद्देश विषद केला. यावेळी योगेश चिकोडे, सचिन साळोखे, कुष्णा मातवाडकर, मधुरिमा चिकोडे, संगीता साळोखे, अंजली परांपजे, अपर्णा रुईकर, शोभा साळुंखे, सुमती किकले, लता यादव, संगीता ओतारी, पायल दामोदर गुरव यांच्यासह विविध महिलांनी आयोजनात सहभाग नोंदवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बौद्ध धर्मात ४९ हिंदूचा प्रवेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजेंद्रनगर येथे आयोजित केलेल्या धम्मदीक्षा समारंभात रविवारी ४९ हिंदूंनी बौद्ध धर्मात प्रवेश केला. भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध संघर्ष समिती आणि स्वराज्य तरुण मंडळाने या समारंभाचे आयोजन केले होते. बौद्ध संघर्ष समितीचे राज्य संघटक पल्लवी हर्षे यांची प्रमुख उपस्थिती होती.

समितीचे अध्यक्ष डॉ. पवन गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून बौद्ध धर्म प्रवेशाची प्रकिया समजावून सांगितली. शुभ्र वेष परिधान केलेल्या पुरुष व महिलांना भद्देयनाथ यांनी दीक्षा दिली. यावेळी पल्लवी हर्षे यांनी, विषमतेविरुद्ध लढण्यासाठी बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, 'बौद्ध धर्म स्वीकारल्यावर जबाबदारी संपणार नसून विषमतेविरुद्ध तीव्र लढा द्यावा लागणार आहे. बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना आयुष्यभर लोकशाही मूल्ये, सामाजिक समता राबवण्याची जबाबदारी राहणार आहे.'

समारंभाला एस. पी. दीक्षित, प्रा. उषा काळे, सुखदेव बुध्याळकर, स्वराज्य तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आठवले, सोमनाथ घोडेराव प्रमुख उपस्थित होते. प्रा. डी. डी. वाघमारे, दीपाली चव्हाण, प्रा. कुलवीर कांबळे, प्रा. बालाजी कांबळे, बाळासाहेब शिवशरण, प्रा. विकास विधाते यांनी समारंभाचे नियोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी खरी कॉर्नर येथे रास्ता रोको

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात मुबलक पाणीसाठा असताना केवळ नियोजनातील त्रुटींमळे शहरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याच्या निषेधार्थ माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली रविवारी खरी कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन केले. मात्र, महापौर शोभा बोंद्रे, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

महापौर बोंद्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'गेल्या दोन वर्षांपासून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र, योजना रखडल्याने विशेषत: महिलांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा फटका बसत आहे. जिल्हा पाण्याने समृद्ध असताना केवळ भ्रष्ट अधिकारी आणि नियोजनातील त्रुटींमुळे पाण्याची वारंवार समस्या निर्माण होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही.'

प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे संपूर्ण शहरातील पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी इंगवले यांच्या नेतृत्वाखाली खरी कॉर्नर येथे रास्ता रोको केले. यावेळी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली. रास्ता रोका आंदोलनाची पूर्वकल्पना दिल्याने आंदोलनस्थळी महापौर बोंद्रेंसह जलअभियंता कुलकर्णी तातडीने दाखल झाले. मागणीचे निवदेन दिल्यानंतर महापौर बोंद्रे यांनी नियोजनातील त्रुटी दूर झाल्या असून, लवकरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलनात नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांच्यासह चंद्रकांत जगदाळे, बाळासाहेब शिंदे, प्रकाश इंगवले, उदय चव्हाण, राजाभाऊ घोरपडे, सारिखा साळोखे, अर्पिता शिंदे, आरती माने, स्वप्नाली शेंडे, दीपादेवी शेंडे, पल्लवी शेंडे, सुप्रिया शेंडे, आदी सहभागी झाले होते.

०००

आंदोलनाला आमदार क्षीरसागर यांची भेट

पाणीपुरवठ्याचा नियोजनासाठी बोलावलेल्या विशेष सभेत शिवसेनेचे गटनेते नियाज खान यांनी जलअभियंता कुलकर्णी यांच्यावर पाणी फेकले होते. या घटनेचे सभागृहात चांगलेच पडसाद उमटले. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सभागृहाचा अवमान करणाऱ्या सदस्यांवर कारवाई करावी, असे विनंती पत्रही महापौर बोंद्रे यांना दिले. या घटनेला तीन दिवस झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी शिवसेनेत दाखल झालेले माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी आंदोलन केले. आंदोलनस्तळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी भेट देत आंदोलकांना बळ दिले. आंदोलनस्थळी आमदारांनी दिलेल्या भेटीची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राक्षसी प्रवृत्तीच्या नाशासाठी संघटन आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दहशतवाद, जातीयवाद, भाषावाद, प्रातंवाद, अस्पृश्यता आणि प्रदूषण समाजातील या राक्षसी प्रवृत्ती आणखी फोपावत आहेत. अशा राक्षसी प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी संघटन आवश्यक आहे. संघटीत शक्तीद्वारे राक्षसी प्रवृत्तीचा संहार शक्य आहे' असे मत राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे पश्चिम विभागाचे संघचालक डॉ. जयंतीभाई भडेसिया यांनी व्यक्त केले. न्यू कॉलेज येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने राजर्षी शाहू दसरा उत्सव कार्यक्रमात बोलत होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शस्त्रपूजन, ध्वजारोहण करण्यात आले. स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिक सादर केल्यानंतर सांघिक गीत व अमृतवचन झाले.

यावेळी डॉ. भडेसिया म्हणाले, 'अधर्माचा नाश करुन धर्माची पुनर्स्थापना करताना समाजावरील अत्याचार दूर करण्यासाठी अनेक वीर निर्माण झाले. ज्या-ज्यावेळी धर्मविघातक शक्ती निर्माण झाल्या, त्यावेळी दैवी शक्ती निर्माण होऊन त्यांनी धर्माचे रक्षण केले. मात्र, अद्याप या विघातक शक्तींचा पूर्णपणे नाश झालेला नाही. आजही समाजात जातीयवादी राक्षस दिसून येतो. जातीयवादाबरोबर भ्रष्टाचार वाढत असल्याने अलिकडच्या काळात भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याचा वेग वाढत असल्याने देशाच्या सांस्कृतवरच एकप्रकारे आक्रमण होत आहे. यातून मशिनरी धर्मांतराच्या नावाखाली राष्ट्रीयिकरण करत आहेत. समाज जातीयवाद, भाषावाद आणि प्रातंवादात अडकून पडल्याने दहशतवाद फोवात आहे. दहशतवाद आपल्या देशापुरता मर्यादीत नसून जगाची समस्या बनली आहे. समाजातील ही समस्येचे मुळापासून उच्चाटन करण्यासाठी संघटन आवश्यक आहे.'

'समाजातील वंचित आणि मागास घटकांना शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतूद केली. ब्राह्मणेत्तरांना वैदिक पठण करण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी वैदिक स्कूल काढले. बालविवाह विरोधी व विधवा पुर्नविवाह कायदा केला. अशा राजर्षी शाहू महाराजांच्या कर्मभूमीत त्यांच्याच नावाने दसरा उत्सव कार्यक्रम होत आहे, त्याबद्दल मनस्वी आनंद होत असून त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे अनुकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या या विचारांमुळे संघामध्ये जातीभेद दिसून येत नाही' असे डॉ. भडेसिया यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख हिंदकेसरी दिनानाथसिंह प्रकृती अस्वस्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. त्यांनी पाठवलेला संदेश डॉ. सूर्यकिरण वाघ यांनी वाचून दाखवला. यावेळी दरवर्षीप्रमाणे गुरुवारी (ता. १८) विजयादशमीदिवशी सकाळी सव्वासात वाजता शिवाजी पेठ येथील खराडे हायस्कूल येथून संचलन कार्यक्रम होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी भगतराम छाबडा, प्रतापसिंह दड्डीकर, मुकुंद भावे, केदार कुलकर्णी, केदार जोशी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विवेक मंद्रुपकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी कुलसचिवांची खातेनिहाय चौकशी

$
0
0

विद्यापीठ इमारतीचा लोगो वापरावा....

..............

विद्यापीठाकडून निवृत्त न्यायाधीशाची नियुक्ती, नोकरभरती प्रकरणी चौथ्यांदा तपास

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasahe_MT

कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात २०१० ते २०१५ या कालावधीतील झालेली बेकायदेशीर नोकरभरती तसेच शैक्षणिक पात्रता डावलून केलेल्या पदोन्नतीच्या प्रकरणाची चौथ्यांदा चौकशी होणार आहे. नोकरभरती व पदोन्नतीवरुन तत्कालिन कुलसचिव डी.व्ही.मुळे यांच्या विरोधात विविध संघटना व व्यक्तिगत स्वरुपात राज्यपालांपर्यंत तक्रारी झाल्या होत्या. या साऱ्या प्रकरणाची यापूर्वी तीन वेळा चौकशी झाली आहे. प्रशासनाने आता मुळे यांच्या कामकाजाची खातेनिहाय चौकशी करण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाने खातेनिहाय चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठातील न्यायाधिकरण इमारतीत सोमवारपासून (ता.१५) चौकशी सुरू होईल. या चौकशीअंती कारवाईचे स्वरुप निश्चित होणार आहे. यामुळे प्रशासनाने, खातेनिहाय चौकशी संदर्भात गोपनीयता बाळगली आहे. तक्रारदारांनाही चौकशीसंदर्भात अद्याप कळविलेले नाही. चौकशीप्रसंगी गरज भासली तर तक्रारदारांना बोलाविण्याची शक्यता आहे. मुळे यांच्या कुलसचिवपदाच्या कालावधीतील नोकरभरती आणि पदोन्नतीची प्रकरणे वादग्रस्त ठरली होती. चार सहायक प्राध्यापकांना निकष डावलून सहयोगी व प्राध्यापक अशा पदावर नियुक्ती दिली होती. तसेच त्यांनी एका प्राध्यापकाच्या नियुक्तीप्रसंगी जादा गुण दिल्याची तक्रार आहे.

कुलसचिव हा प्रशासकीय प्रमुख असतो. विद्यापीठातील नोकरभरतीपासून पदोन्नतीपर्यंत सगळया घटकांना प्रशासकीय प्रमुख म्हणून तो जबाबदार असतो. मुळे यांच्या कालावधीतच अकरा कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीतही नियमांना हरताळ फासल्याच्या तक्रारी आहेत. विद्यापीठ विकास मंच, विद्यापीठ सेवक संघ, कास्ट्राईब, सुप्टा आणि आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघामार्फत मुळेंच्या विरोधात कुलपती तथा राज्यपाल कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. तक्रारदारांनी ५२ प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. या साऱ्याची गांभीर्याने दखल घेत कुलपती कार्यालयाने विद्यापीठ प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यासाठी विद्यापीठाने निवृत्त न्यायाधीय जे.एन.शानबाग यांची कमिटी नेमली होती.

...............

व्यवस्थापन परिषदही अंधारात

शानबाग कमिटीने २०१६ मध्ये चौकशी करुन विद्यापीठाला अहवाल दिला. दरम्यानच्या कालावधीत विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर राज्य सरकारने या साऱ्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी सोलापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक सतीश देशपांडे यांची चौकशी समिती नेमली होती. या दोन्ही अहवालाच्या आधारे विद्यापीठ प्रशासनाने पुन्हा निवृत्त न्यायाधीश शानबाग यांच्यामार्फत पुन्हा स्वतंत्र चौकशी केली. या तीनही चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी त्या चौकशी अहवालासंदर्भात वेळोवेळी विचारणा केली. मात्र प्रत्येकवेळी त्यांना चौकशीची कार्यवाही सुरू असल्याचे सरकारी छाप उत्तरे दिली गेली. चौकशी अहवाल जाहीर न करण्यामागील गौडबंगाल काय ? अशी विचारणाही व्यवस्थापन सदस्य करत आहेत.

.................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रश्नांचा जागर... प्राधिकरण

$
0
0

प्रश्नांचा जागर...

००००

प्राधिकरण टांगणीला

नियमावली आणि कार्यकक्षेवरून ग्रामीण भागात गोंधळाची स्थिती

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : प्रचंड गाजावाजा करत स्थापन केलेल्या 'कोल्हापूर क्षेत्र नागरी विकास प्राधिकरण'ची स्थिती अधांतरी लटकल्यासारखी आहे. कोल्हापूरसह आसपासच्या ४२ गावांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून एक पैशाचा निधी दिला नाही. शहर आणि गावांसाठी संयुक्त प्रकल्प राबविला नाही. या कालावधीत 'प्राधिकरण'च्या माध्यमातून विकासाची नवीन वाट निर्माण होण्याऐवजी नागरिकांत संभ्रमावस्था वाढली. प्राधिकरणची नियमावली आणि कार्यकक्षेवरून ग्रामीण पातळीवर गोंधळाचे वातावरण कायम आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचा विरोध, त्यांच्यातील अविश्वासाची भावना दूर करण्यासाठी राज्य सरकारला आश्वासक पावले टाकावी लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे गावपातळीवरील राजकारण, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानावर डोळा आणि विरोधाला विरोध ही भूमिका बाजूला सारून प्राधिकरणसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून समर्थक आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकल्याने 'प्राधिकरण'ची घोषणा झाली. 'प्राधिकरण'च्या घोषणेदरम्यान शहराच्या धर्तीवर सुविधा, ग्रामीण भागांचा नियोजनबद्ध विकास, ग्रामपंचायतीचे अधिकार कायम राहतील अशी ग्वाही दिली होती.

दरम्यान, 'प्राधिकरण'ची घोषणा होऊन सव्वा वर्षाचा कालावधी उलटला. राज्य सरकारने, या काळात प्राधिकरण क्षेत्रात एकही मोठा प्रकल्प मंजूर केला नाही. समाविष्ट ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधीची घोषणा केली नाही. ग्रामीण भागातील बांधकाम परवान्याचा विषय सध्या गाजत आहे. प्राधिकरणमुळे ग्रामपंचायतीचे अधिकार संपणार, करविषयक अधिकार संपुष्टात येतील. शेतजमिनीवर आरक्षण पडणार असा गैरसमज गावकऱ्यांत निर्माण झाला आहे. गावोगावी जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधून गैरसमज दूर करावे लागणार आहेत. राज्य सरकारला संबंधित गावांच्या विकासासाठी 'अॅक्शन प्लॅन' आखावा लागणार आहे.

००००

लोकांच्या शंका, पालकमंत्र्याची ग्वाही

प्राधिकरणबद्दल ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. सरकारी यंत्रणेला त्या समस्या आणि अपेक्षा जाणून घ्याव्या लागतील. 'प्राधिकरण'कार्यालयातील अपुरा अधिकारी व कर्मचारीवर्ग पाहता हे काम त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. यासाठी राज्यकर्त्यांना हे आव्हान पेलावे लागणार आहे. 'प्राधिकरण'ला वाढता विरोध पाहून पालकमंत्री पाटील यांनी संबंधित गावांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आश्वासक चर्चा घडविली. त्या बैठकीत त्यांनी 'ग्रामपंचायतीचे अधिकार कायम राहतील. गावठाण व गावठाणबाहेरील २०० मीट क्षेत्रातील बांधकामांना मान्यता, महसूल आकारणी ग्रामपंचायतीकडील राहतील असे स्पष्ट केले आहे. शिवाय प्रकल्पासाठी शेतजमिनी ताब्यात घेणार नाही,' असे स्पष्ट केले.

००००

महापालिकेच्या ५५०० कोटींच्या प्रस्तावाला ठेंगा

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी महापालिका प्रयत्नशील होती. मात्र, हद्दवाढीवरून समर्थक आणि विरोधक असे दोन गट निर्माण झाले. हद्दवाढीऐवजी 'प्राधिकरण'ची घोषणा झाली. महापालिकेने राज्य सरकारकडे 'प्राधिकरण'ची स्थापना करताना महापालिकेला विकासकामांसाठी ५५०० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर केला होता. शहरातील उड्डाणपूल, रिंग रोड, वाहनतळ, घनकचरा व्यवस्थापन, हॉस्पिटल्स सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण अशा विविध प्रस्तावित कामांसाठी आवश्यक निधी मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्री व नगरविकास खात्याकडे केली होती. दरम्यान, 'प्राधिकरण'ची घोषणा करताना महापालिकेच्या पदरात काहीच पडले नाही.

००००

प्राधिकरणमुळे ग्रामीण भागाच्या विकासाला सुरुवात होणार आहे. पालकमंत्र्यांनी बैठका घेऊन अनेक शंकांचे निरसन केले आहे. ग्रामपंचायतीच्या अधिकारापासून बांधकाम परवान्यापर्यंत ग्रामपंचायतीच्या हक्कावर गदा येणार नाही. यामुळे 'प्राधिकरण'ला केवळ विरोधासाठी विरोध ही कुणाची भूमिका असू नये.

नारायण पोवार, गोकुळ शिरगाव

००००

प्राधिकरणमार्फत संबंधित गावांत कोणती विकासकामे होणार याबाबत असंदिग्धता आहे. पालकमंत्र्यांनी ४२ गावांच्या सरपंचांसोबत चर्चा करायला हवी. प्राधिकरण समितीने लोकांच्या भावना जाणून घेऊन पुढील कार्यवाही करावी.

संग्राम पाटील, सरपंच पाचगाव

००००

प्राधिकरणअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहे त्याचा विचार करून कार्यवाही केली जाईल. त्यासाठीच्या निधीसाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रयत्न सुरू आहेत. विकास परवानगी देताना शुल्काची आकारणी, सरकारी जमिनी विकसित करून निधी आणि सरकारकडून निधी मिळवून विकासकामांना प्राधान्यक्रम राहील.

शिवराज पाटील, सीईओ, प्राधिकरण

०००००

प्राधिकरणवर दृष्टिक्षेप...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३० ऑगस्ट २०१६ रोजीच्या बैठकीत प्राधिकरणाचा प्रस्ताव

१६ ऑगस्ट २०१७ रोजी प्राधिकरण स्थापण्याची घोषणा

प्राधिकरणमध्ये कोल्हापूर शहरालगतच्या ४२ गावांचा समावेश

कोल्हापूर शहराचे सध्याचे क्षेत्रफळ ६६.२ चौरस किलोमीटर

४२ गावांच्या प्राधिकरणातील समावेशनंतरचे क्षेत्रफळ ३४५ चौरस किलोमीटर

कोल्हापूर शहराची लोकसंख्या ५,४९,२३६ (२०११ नुसार)

प्राधिकरण क्षेत्राची लोकसंख्या ९,२०,०००

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी कार्यालयांत स्वच्छता पंधरवडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात १३ ते २८ ऑक्टोबरअखेर कार्यालयीन स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन केले आहे. या दरम्यान सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालयांत कायमपणे स्वच्छता राहण्यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात. अंतर्गत आणि बाह्यस्वच्छता करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी गुरुवारी दिले.

कार्यालयीन स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

सुभेदार म्हणाले, 'स्वच्छतेच्या कामात हयगय झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. पंधरवड्याची सुरुवात येत्या शनिवारी सुट्टीच्या दिवशी होणार आहे. मात्र, सुट्टी न घेता नेहमीप्रमाणे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून स्वच्छता करायची आहे. वर्गीकरण करून अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट लावावी.'

स्वच्छता पंधरवड्याच्या यशस्वितेसाठी, नियंत्रणासाठी जिल्हा, तालुकास्तरावर प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. समितीने तालुका, गावपातळीवरीलही सरकारी, निमसरकारी कार्यालयातील स्वच्छतेची मोहीम गतिमान करावी. परिसरात पार्किंग लॉटस, येण्या-जाण्याचा रस्ता, पायऱ्या स्वच्छ ठेवाव्यात. शौचालय स्वच्छ असावीत. तेथे पुरेसे पाणी उपलब्ध करावे. वापरात नसलेल्या वाहनांची नियमानुसार विल्हेवाट लावावी.'

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पंधरवड्याच्या अंमलबजावणीची सविस्तर माहिती दिली. जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, उपमुख्य कार्यकारी आधिकारी प्रियदर्शनी मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, तहसीलदार सविता लष्करे, नायब तहसीलदार प्रकाश दगडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

००००

...तर २०० रुपये दंड करा

कार्यालयातील कुठल्याही कोपऱ्यात कोणी थुंकणार नाही, याची दक्षता घ्या. थुंकताना आढळणाऱ्यास २०० रुपये दंड करावा, असा आदेश जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिला. याउलट स्वच्छतेत उत्कृष्ट काम केलेल्यांना जिल्हास्तरावर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपट्टी वसुली मोहिमेला थंडा प्रतिसाद

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

थकीत पाणी बिल वसूल करण्यासाठी शहर पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम राबवली. पंधरा दिवसांच्या वसुलीमध्ये २५ कोटींपैकी केवळ ७६ लाखांची थकबाकी जमा झाली. वसुलीला बड्या थकबाकीदारांकडून मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अल्प रक्कम असलेल्या थकबाकीदारांचा पाणीपुरवठा तोडण्यात प्रशासनाने धन्यता मानली असल्याचे कारवाईवरुन दिसून येते.

शहरात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना अनेक बड्या व्यक्तींकडे पाणी बिलाची मोठी थकबाकी असल्याचे समोर आले होते. प्रशासनाने पाणी बिल वेळेत भरण्यासाठी थकबाकीदारांची नावे प्रसिद्ध केली. या थकबाकीदारांत प्रामुख्याने राजकीय व्यक्ती, बांधकाम व्यवसायिक यांच्यासह सरकारी कार्यालयांचा समावेश आहे. थकबाकीदारांना रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली. तसेच वसुली मोहीम राबवण्याबरोबरच मिळकतीवर बोजा नोंद करण्याचा इशाराही दिला होता. सुमारे २५ कोटींची थकीत रक्कम असल्याने पाणीपुरवठा विभागाने वसुली मोहीम सुरु केली.

प्रशासनाने वसुलीसाठी पथकप्रमुख, मीटर रिडर, भाग फिटर, सहायक अशा प्रत्येकी चौघांचा समावेश असलेली पाच पथके स्थापन केली.

पथकाने पाच सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत राबवलेल्या वसुली मोहिमेत केवळ ७६ लाख २६ हजार १५५ रुपये जमा झाले आहेत. एक हजार थकबाकीदारांपैकी वसुली पथकाने ५१५ थकबाकीदारांना भेटी दिल्या असून १३९ थकबाकीदारांचा पाणीपुरवठा खंडीत केला आहे. विभागाची थकीत रक्कम आणि वसूल झालेली रक्कम पाहता अद्यापही यातून बडे थकबाकीदार बाहेरच आहेत. महापालिकेने ५० हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या थकबाकीदारांनी वेळेत रक्कम न भरल्यास पाणीपुरवठा खंडीत करण्याबरोबर मिळकतीवर बोजा नोंद करण्याचा इशारा दिला आहे. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली मोहीम राबवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॅकच्या अध्यक्षपदी धोत्रे

$
0
0

अध्यक्षपदी हरिश्चंद्र धोत्रे

कागल : मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ कागल हातकणंगलेच्या (मॅक) अध्यक्षपदी हरिश्चंद्र धोत्रे यांची फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गोरख माळी तर सेक्रेटरीपदी संजय पेंडसे आणि ट्रेझरीपदी श्रीनिवास कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी संचालक मनोहर शर्मा, अशोक दुधाणे, मोहन कुशिरे, संजय जोशी, यशवंत पाटील, रघुनाथ थोरात, प्रताप परुळकर, सत्यजित पाटील, सचिन कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबाची कमळ पुष्प रुपातील पूजा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

जोतिबा नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला भाविकांची अलोट गर्दी झाली. मंगळवारी (ता. १६) जोतिबाचा जागर होणार आहे. आज नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला जोतिबाची पाच कमळ पुष्पामध्ये महापूजा बांधली.

दरम्यान, नवरात्रोत्सवाचा सप्तमीला जोतिबा देवाचा जागर असतो. बुधवारी जगारानिमित्त जोतिबा देवाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्यांमध्ये महापुजा बांधली जाते. पुजेपुढे उन्मेष हा अश्व ( घोडा ) अर्पण केला जातो. मंदिराच्या दरवाज्यावर सीताफळ, कवडांळ, बेल, फुलांचे तोरण बांधले जाते. जागरादिवशी भाविक मोठ्या प्रमाणात ऊस 'कडाकणी' अर्पण करतात. फलाहाराची पाच ताटाचा नैवेद्य वाजत-गाजत यमाई मंदिराकडे जातो. उंट, घोडे, वाजंत्री, देव सेवकाच्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघेल. मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार आहे. मंदिरात भजनाचा कार्यकम होतो.

दरम्यान, पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली. मंदिरासभोवती प्रचंड दर्शन रांगा लागल्या होत्या. जोतिबा डोंगरावर स्थापित नवदुर्गाचे दर्शन स्थानिक नवरात्र उपासकांनी पायी चालत घेतले. रात्री उशिरापर्यंत भाविक दर्शनासाठी जोतिबाचा डोंगर चढत होते.

फोटो ओळ : नवरात्रोत्सवाच्या सहाव्या माळेला जोतिबा देवाची बांधण्यात आलेली पाच कमळ पुष्पांतील सालंकृत महापूजा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वासहा लाख टन गाळपाचे कुंभी कारखान्याचे उद्दिष्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'कुंभी कासारी कारखान्याने २०१७-१८च्या हंगामात ६ लाख ३२ हजार २४२ मेट्रीक टन उसाचे गाळप करून ८ लाख २९ हजार ५२० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. यावर्षी कार्यक्षेत्रात झालेल्या अतिरिक्त पाऊस व पुरामुळे एकरी उत्पादनात घट होणार आहे. कारखान्याचे चालू गाळप उदिष्ट गाठण्यासाठी सभासद व बिगर सभासदांनी आपला पिकवलेला सर्व ऊस कारखान्याला पाठवून सहकार्य करावे' असे आवाहन कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी केले. यावर्षी कुंभी कारखान्याचे सव्वासहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

कुडित्रे येथील कुंभी कासारी कारखान्याच्या ५६ व्या बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी संचालक उत्तमराव वरुटे व त्यांच्या पत्नी अनिता यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.

चेअरमन, आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, 'साखर उद्योगाबाबत केंद्र शासनाने अनेक दीर्घकालीन निर्णय घेतले आहेत. साखर निर्यात धोरणांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. येत्या काळातही अतिरिक्त साखरेचा प्रश्न भेडसावणार असून निर्यात साखरेला सध्या दोन हजार दर एक्स फँक्टरी मिळत असून जर साखर निर्यात अनुदान मालतारण कर्जासाठी बँकाकडे जमा केल्यास निर्यातीला गती मिळेल. गेल्या दोन वर्षात एफआरपी दर आणि साखरेचा दर यात मोठी तफावत असल्याने साखर कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये गेले. सध्याची कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता ताबडतोब शासकीय मदतीची गरज आहे. एफआरपी १४ दिवसांत देण्याचे बंधनकारक असल्याने कारखान्यांना आर्थिक मदत व्हायची असेल तर साखरेला ३६ रुपये हमीभाव मिळाला पाहिजे.'

यावेळी व्हाइस चेअरमन ॲड. बाजीराव शेलार, सर्व संचालक, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, सचिव एम. ए. पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : कुंभी कासारी कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन करताना संचालक उत्तमराव व अनिता वरुटे. सोबत चेअरमन आमदार चंद्रदीप नरके, व्हा. चेअरमन ॲड. बाजीराव शेलार यांसह सर्व संचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारप्रकरणी जि.प.कॅव्हेट दाखल करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या कार्यमुक्त करण्याच्या कारवाईविरोधात तत्कालिन शिक्षणाधिकारी किरण लोहार हे हायकोर्टात दाद मागणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदमार्फत लोहार चौकशी प्रकरणी हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शिक्षण समिती सभापती व चौकशी समिती अध्यक्ष अंबरिश घाटगे, सदस्य अरुण इंगवले यांनी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेऊन कॅव्हेट दाखल करण्यासंदर्भात चर्चा केली. पाच सदस्यीय चौकशीमार्फत शिक्षणधिकारी लोहार यांच्या कामकाजाची चौकशी सुरू आहे. समितीने लोहारांविरोधात संबंधितांना तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे लोहार यांनी 'कार्यमुक्त करण्याच्या कारवाई विरोधात हायकोर्टात दाद मागणार आहे. सरकारी व जिल्हा परिषदेवरील यंत्रणेवर माझा विश्वास आहे. पण काही सदस्यांच्या दबावापोटी बेकायदेशीररित्या चौकशी सुरू आहे. या कारवाईविरोधात कायदेशीर लढाई करू' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोन्याचा तुकडा तपासून तारण कर्ज

$
0
0

दरम्यान, सोन्याचा मुलामा देऊन सोने तारण कर्जप्रकरणातून फसवणूक करण्याच्या घटनेनंतर या कर्जप्रकरणात सोन्याचा तुकडा तपासून कर्ज देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. तसेच सोने तारण कर्ज थांबवले नसल्याचा खुलासाही जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदाभाऊ करणार वारणेत शक्तीप्रदर्शन

$
0
0

'रयत क्रांती' च्या ऊस परिषदेला मुख्यमंत्री येणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रयत क्रांती संघटनेचा पहिला वर्धापन दिन आणि ऊस परिषदेच्या निमित्ताने कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे येत्या २४ ऑक्टोबर रोजी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी करत आहेत. या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वत: मुख्यमंत्रीच येणार असल्याने यावर्षी उस दरासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याचे मंत्री खोत यांनी 'मटा' ला सांगितले.

'रयत क्रांती' ची स्थापना केल्यानंतर मंत्री खोत हे वर्षभर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी करत आहेत. खासदार राजू शेट्टी यांना लक्ष्य करत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यांनी हातकणंगले, शाहूवाडी व पन्हाळा या तीन तालुक्यात विशेष लक्ष दिले आहे. स्वाभिमानी संघटनेची २७ ला जयसिंगपूरात ऊस परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'रयत' ची कोडोलीत २४ ला परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे मंत्री उपस्थित राहणार आहेत. जोरदार शक्तीप्रदर्शन करत शेट्टींना आव्हान देण्याचा खोत यांचा प्रयत्न आहे. संपूर्ण जिल्ह्यातून या परिषदेला कार्यकर्ते उपस्थित रहावेत यासाठी नियोजन सुरू आहे. उसाच्या दराविषयी देखील यामध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे या परिषदेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

...

चौकट

'उसाच्या एफआरपीबाबत काहीजण जाणीवपूर्वक गोंधळ वाढवत आहेत, पण यावेळी २६१२ हा दर मिळेल, त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही,' असे मंत्री खोत यांनी सांगितले. 'मटा' कार्यालयास दिलेल्या भेटीवेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 'ऊस परिषद यशस्वी करण्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मुख्यमंत्री येणार असल्याने ते उसाबरोबरच इतर अनेक महत्वाचे निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे मतांवर डोळा ठेवत आंदोलन करणाऱ्यांचे दुकान यावेळी बंद होणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरोलीत वृध्दाची आत्महत्या

$
0
0

जयसिंगपूर : हरोली (ता. शिरोळ) येथे वृद्धाने झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आप्पासाहेब आण्णा पाटील (वय ७२) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. शिरोळ पोलिसात याबाबत नोंद झाली आहे.

आप्पासाहरेब पाटील हे कुटुंबीयांसमवेत मळ्यात राहतात. शिवराई मळ्यात आंब्याच्या झाडास दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. यानंतर भिमगोंडा पासगोंडा पाटील यांनी घटनेची वर्दी शिरोळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शेतजमिनीच्या वाटणीच्या वादातून ही आत्महत्येची घटना घडल्याची चर्चा होती. पाटील यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगावच्या बाजारात सहा कोटींची उलाढाल

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे विजयादशमीपूर्वीच्या सोमवारी भरलेल्या ऐतिहासिक महालक्ष्मी जनावरांच्या बाजारात आज विविध प्रकारच्या जनावरांची आवक मोठ्या प्रमाणात होऊन या बाजारात सुमारे सहा कोटींची उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आजच्या जनावरे खरेदीनंतर उत्साही खरेदीदारांनी फटाके फोडून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. मिणचे येथील व्यापारी अनिल जाधव व सुनील जाधव यांनी २४ म्हैशींची विक्री झाल्याबद्दल त्यांचा खरेदीदारांना फेटा बांधून सत्कार केला.

बावची (ता. वाळवा) येथील नायकू महादेव भोसले यांचा चारदाती खिल्लार बैल ७ लाखास होता. रावसाहेब खोत (नरंदे) यांचा मुरा जातीचा रेडा (वळु) दीड लाखांस होता. हा वळू स्टूलवर दोन्ही पाय ठेवून ऐटीत उभा राहत होता. मात्र उशिरापर्यंत विक्री झाली नाही. महालक्ष्मी मंदीर परिसरात पाण्याच्या टाकी ते देवगिरी पेट्रोलपंपापर्यंत जनावरांचा बाजार भरला होता.

जुन्या पाण्याच्या टाकीजवळ म्हैशीचा बाजार भरलेला होता. म्हैशीच्या बाजारात मुरा, म्हैसाणा, पंढरपुरी, दुग्गल, गावठी, जाफराबादी आदी जातींच्या म्हैशी विक्रीसाठी आल्या होत्या. त्यांची आवक सातशे ते आठशे इतकी होती. म्हैशीच्या किंमती ४० हजार ते १ लाख ५० हजारांपर्यंत होत्या. यामध्ये मिणचे येथील अनिल जाधव यांनी तब्बल २५ म्हशी विक्रीसाठी आणल्या होत्या. यामध्ये १७ लिटर दुध देणारी मुरा म्हैस प्रमोद पाटील (कसबा बावडा) यांनी १ लाख ३५ हजार किंमतीस घेतली. तर सुनील जाधव यांची म्हैसाना म्हैस अनिल मिटले (जोतीबा) यांनी १ लाख २५ हजाराला खरेदी केली. मेंढा जातीची म्हैस अब्बास काशिद (घुणकी) यांनी रंगराव शंकर दाभाडे (अंबप) यांना ९० हजार रुपयांना विक्री झाली. गाईंच्या जातीमध्ये एचएफ, होस्टन, जर्सी, रेडडेनिथ, गीर विक्रीस आल्या होत्या. त्यांच्या किंमती ४० हजारांपासून १ लाख ४० हजारांपर्यंत होत्या. गायींची आवक जवळपास १००० पर्यंत होत्या. रामचंद्र नवनाथ जाधव (मालेवाडी ता. वाळवा), शिवाजी श्रीपती पाटील (भुयेवाडी), भगवान शिंदे (जठारवाडी) यांच्याकडे गायींची मोठी उलाढाल झाली.

बैल बाजारात १५०० जोडींची आवक होती. यामध्ये खिलार, माणदेशी, म्हैसूरी, जवारींचा समावेश होता. ४० हजारांपासून ते ४ लाख हजारापर्यंत बैलांच्या किंमती होत्या. नायकू भोसले यांच्यासह ज्ञानदेव गणपती जिवले (कोडोली) यांच्या आकर्षक बैलजोड्या होत्या. गणेशोत्सव, नवरात्री उत्सवामुळे मिळालेल्या सक्तीच्या मांसाहाराच्या विश्रांतीनंतर शेळी, मेंढी, बकरी आदीची हजारांहून अधिक आवक झाली. मार्केट यार्ड येथे पहाटे बकऱ्यांचा बाजार बाजार समितीत भरला होता.

वडगाव बाजार समितीने जनावरांसाठी पाणी, चाऱ्याची व्यवस्था केली होती. सभापती संजय मगदुम, नितिन चव्हाण, सुभाष भापकर आदींनी बाजारांवर देखरेख ठेवली. पोलिसांनी वाहतुकींची कोंडी होऊ नये यासाठी कोल्हापूरला जाणारी वाहतूक नागोबावाडी व मंगरायचीवाडीमार्गे वळवली होती. यावेळी पेठवडगावचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाच्या पक्षाची ८ ऑक्टोबरला घोषणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'मराठा आरक्षणासह समाजाची वोट बँक एकजुट करण्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्त साधत म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील रायरेश्वराच्या मंदिरात केली जाणार आहे. यावेळी पक्षाचे चिन्ह, ध्वज व ध्येय याचीही घोषणा केली जाणार आहे' अशी माहिती पक्षाचे संस्थापक सुरेश पाटील यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप यांना वगळून समविचारी पक्षांना सोबत घेणार असल्याचेही ते म्हणाले.

संस्थापक सुरेश पाटील म्हणाले, 'प्रदीर्घ काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा उभारण्यात आलेला आहे. त्यासाठी गेल्या दोन वर्षात राज्यभरात तब्बल ५७ मूक मोर्चे काढण्यात आले. परंतु राज्य शासनाकडून अद्याप काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. शिवाय विविध राजकीय पक्षात सहभागी लोकप्रतिनिधीही शांतच बसल्याने मराठा समाज आजही आरक्षणापासून वंचित राहिला आहे. हा हक्क मिळावा आणि सकल मराठा समाज एकजुट व्हावा यासाठीच या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

सुरेश पाटील म्हणाले, 'यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेची मते आजमावली. संपूर्ण महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडा आदी भागात सर्व्हे करण्यासह बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी उदंड प्रतिसाद लाभला. या सर्वांच्या पाठबळावरच हा पक्ष उभा राहणार आहे. आजवर अनेक पक्षांनी आरक्षणाबद्दल आत्मियता दाखविली, पण एकानेही त्याची पुर्तता न केल्याने मराठा समाज हक्कापासून दूर राहिला. म्हणूनच सकल मराठा समाजाला एकवटून ताकद दाखवून देण्यासाठीच मराठा समाज पक्षाची स्थापना केली आहे.'

'पक्षाला शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्यासह नऊ शेतकरी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. आरक्षणाच्या मागणीसह प्रलंबित प्रश्नांसाठी काही राजकीय पक्षांचाही लढा सुरू आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनीही आम्हांस साथ देण्याची तयारी दर्शविली आहे. प्रस्थापित विरुध्द विस्थापित अशीच ही लढाई आहे. जे समविचारी पक्ष आमच्यासोबत येतील त्यांना आम्ही सामावून घेऊ. त्यातूनच तिसरी आघाडी निर्माण होईल' असे पाटील यांनी सांगितले.

नवीन पक्ष स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर सासवड येथे झालेल्या बैठकीस रघुनाथदादा पाटील, गणेश जगताप, कालिदास अपेट, बाबासाहेब पाटील, परेश भोसले, संतोष बागम उपस्थित होते असेही पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>