Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

४११ ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील ४११ गावांत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्या. मात्र, या सर्वच गावांतील पाणीपुरवठा समित्या व ग्रामपंचायतींनी योजनेचे लेखापरीक्षण व जमाखर्च अहवाल सादर केला नाही. त्यामुळे त्यांना नोटिसा काढण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मुदतीत जमा-खर्चाचा अहवाल सादर न केल्यामुळे संबंधित योजनेचा ५६ कोटी रुपयांहून अधिक निधी सरकारकडे प्रलंबित आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील नवीन २९ योजनांना तांत्रिक मंजुरी दिली. या योजनांना प्रशासकीय मंजुरी देण्याची सूचना महाडिक यांनी केली. यामध्ये पन्हाळा तालुक्यातील १३, हातकणंगले तालुक्यातील आठ, शाहूवाडी तालुक्यातील सात व शिरोळमधील एका योजनेचा समावेश आहे.

बैठकीत जिल्ह्यातील विविध भागांतील अपूर्ण पाणीपुरवठा योजनेबाबत चर्चा झाली. अपूर्ण योजनांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले. ज्या ४११ गावांतील पाणीपुरवठा योजनांचे जमाखर्च झालेला नाही. त्या योजनांचा जमाखर्च जिल्हा परिषद स्तरावर करण्याची सूचना करण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अभियंता अमन मित्तल, कार्यकारी अभियंता एम. एस. बसर्गेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज आतषबाजी

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे भवानी मातेच्या जागरनिमित्त बुधवारी (ता.१७) रात्री आठ वाजता आतषबाजी करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार वळंजू यांनी दिली आहे. तसेच मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्त सोंगी भजन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. सोंगी भजन स्पर्धेचा निकाल व बक्षीस समारंभ शुक्रवारी (ता.१९) सायंकाळी होणार असल्याची माहिती मंडळाचे उपाध्यक्ष सुहास भेंडे व नवरात्रोत्सव कमिटीचे अध्यक्ष पोपट मुसळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवमतदारांनी नाव नोंदणी करावी

$
0
0

उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांचे आवाहन, महाराष्ट्र टाइम्स, निवडणूक प्रशासनातर्फे आयोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नविन मतदार नोंदणी मोहिम राबवली जात आहे. मोहिमेत १ जानेवारी २०१९ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या प्रत्येक युवक, युवतींनी मतदार यादीतील नावासाठी विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावेत किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करावी', असे आवाहन निवडणूक विभागच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले यांनी मंगळवारी केले.

जिल्हा निवडणूक प्रशासन व महाराष्ट्र टाइम्सतर्फे येथील केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'नव मतदार नोंदणी आणि जागृती' कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रांताधिकारी सचिन इथापे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भोसले म्हणाल्या, 'जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ३९ लाख आहे. यापैकी २९ लाख मतदार आहेत. त्यात १५ लाख पुरूष तर १४ लाख स्त्री मतदार आहेत. १८ ते १९ वयोगटातील केवळ १० हजार मतदार आहेत. त्यावरून युवा मतदारांनी नाव नोंदणीकडे पाठ फिरवल्याचे दिसते. म्हणून निवडणूक प्रशासन प्रत्येक कॉलेज, महाविद्यालयात जाऊन १८ वर्षे पूर्ण झालेले आणि १ जानेवारी २०१९ पर्यंत १८ वर्षे पूर्ण झालेल्यांचे अर्ज भरून घेत आहे. ऑनलाइनही अर्ज भरता येतो. त्यामुळे पात्र प्रत्येक विद्यार्थी, विद्यार्थीनीने अर्ज करावेत. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी एकही पात्र मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालय प्रशासनानेही विशेष प्रयत्न करावेत.'

प्रांताधिकारी इथापे म्हणाले, 'महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश अर्जासोबतच मतदार यादीत नाव नोंदणीचा अर्जही भरून घेण्यात आला. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. ऑक्टोबरअखेरच्या या मोहिमेतून नाव नोंदवण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयापर्यंत निवडणूक प्रशासन पोहचत आहे. १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकास घटनात्मकदृष्ट्या मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. त्यासाठी महाविद्यालयातच अर्ज भरून घेतले जात आहे. ऑनलाइनही अर्ज भरता येते. गुगलवर जाऊन केवळ व्होटर असे इंग्रजीत टाईप केल्यानंतरही ऑनलाईन अर्ज भरण्याच्या वेबसाइटवर जाता येते. पात्र सर्व विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबरअखेर नाव नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. अर्ज भरलेल्यांना ४ जानेवारीला मतदान ओळखपत्र दिले जाईल.' यावेळी नोडल अधिकारी महेश नाझरे, प्रशिक्षक पुरूषोत्तम ठाकूर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

-------

चौकट

'मटा'चे विशेष आभार

अधिकाधिक नव मतदारांनी मतदार यादीत नावासाठी अर्ज करावेत, यासाठी महाराष्ट्र टाइम्स बातम्यांच्या माध्यमातून चांगली मदत करीत आहे. त्याबद्दल कार्यक्रमात 'मटा'चे विशेष आभार प्रांताधिकारी इथापे यांनी मानले.

--------------

दोनशे जणांची नोंदणी

यावेळी केआयटीमधील २०० विद्यार्थी, विद्यार्थींनी अर्ज भरले. ते केआयटीचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिनी यांच्या हस्ते उपजिल्हाधिकारी भोसले यांच्याकडे देण्यात आले. 'आणखी ८०० अर्जांचे वाटप केले आहेत. लवकरच तेही भरून दिले जाईल, पात्र एकही विद्यार्थी नाव नोंदणीपासून वंचित राहणार नाही', असे प्रतिपादन प्रा. प्रमोद पाटील यांनी यावेळी केले.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज हुमणी नियंत्रण कार्यशाळा

$
0
0

चंदगड : राज्य सरकारच्या कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत बुधवारी (ता. १७) सकाळी साडेदहा वाजता हुमणी नियंत्रण या विषयाचे शेतकरी प्रशिक्षण चंदगड मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत आयोजित केले आहे. प्रशिक्षणाला कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयाचे डॉ. पांडुरंग मोहिते मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएसआरमधून चौकांचे सुशोभिकरण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या सौंदर्यात चौक, उद्याने, आयलँड नेहमीच भर घालतात. शहरातील अशा अनेक चौक व उद्यानांची दुरवस्था झाली असल्याने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर : सामाजिक उत्तरदायित्व निधी) फंडातून चौकांचे सुशोभिकरण करण्याचा प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी मिळाली. पाच ते वीस लाखांपर्यंतची कामे सीएसआर फंडातून होणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

औद्योगिक कंपन्यांकडून दरवर्षी सीएसआर फंडातून विविध समाजोपयोगी कामे केली जातात. या फंडातून शहरातील चौक, उद्याने, आयलँड, फुटपाथ, पार्किंग झोन, शाळा व दवाखान्यांचे सुशोभिकरण करण्यास अनेक कंपन्या इच्छुक आहेत. शहरातील असे महत्त्वाचे चौक व आयलंडचे सुशोभिकरण करताना महापालिकेसमोर निधीचा प्रश्न निर्माण होत आहेत. अशा प्रकारची कामे भांडवली खर्चातून करावी लागतात. पण भांडवली उत्पन्न कमी आणि सरकारी निधीवर मर्यादा येत असल्याने शहरातील अनेक चौक, आयलंड व उद्यानांना बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

परिणामी शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या जागांचा विकास केला जाणार आहे. सद्य:स्थितीत औद्योगिक कंपन्यांनी सीएसआर फंड देण्यास समर्था दर्शवली. त्यानुसार एसआर फंड खर्च करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावानुसार कंपनी अथवा वैयक्तिक स्वरुपात दोन ते पाच, पाच ते दहा व दहा ते वीस लाखापर्यंतची कामे विकसकाला करता येणार आहेत. सुमारे ५० स्व्केअर फुटांपर्यंतच्या कामाचा यामध्ये समावेश आहे. यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता थेट आयुक्तस्तरावर कामाला मंजुरी दिली जाणार आहे. कामाची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी विकासकावर राहणार असून, त्यासाठी त्यांना कामाच्या ठिकाणी संबंधित कंपनी अथवा वैयक्तिक नावाचा फलक लावण्याची मुभा दिली आहे. मात्र अशी कामे कोणत्याही त्रयस्थ संस्थेला देण्यात येणार नाहीत. याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर आल्यानंतर सदस्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. परिणामी सीएसआर फंडातून गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत पडलेले शहरातील अनेक चौक, उद्याने आणि आयलंडला झळाळी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

०००

तत्कालीन आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या संकल्पनेतून शहराचे प्रवेशद्वार व काही आयलंडचे सुशोभिकरण केले होते. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडली होती. त्याच पद्धतीने 'लोकसहभागातून विकास' अशी संकल्पना तत्कालीन स्थायी सभापती राजू लाटकर यांनी मांडली, पण या प्रस्तावाला मूर्त स्वरूप आले नाही. शहर सुशोभिकरणाचा असाच प्रस्ताव सद्य:स्थितीत प्रशासनाने तयार केला आणि त्याला मंजुरीही मिळाली.

००००

सीएसआर फंडातून काम करण्यास अनेकजण इच्छुक आहेत. यापूर्वी या पद्धताची ठराव झाला होता, पण स्पष्ट नियमावली नव्हती. तसेच निधी खर्च करण्याची मर्यादी होती. सद्य:स्थितीत नियमावली तयार केली असून, त्याद्वारे फंड खर्च करण्यात येणार आहे. देखभाल व दुरस्तीची जबाबदारी संबंधितांवर दिली आहे.

डॉ. अभिजित चौधरी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाने उडाली तारांबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने नोकरदार, विद्यार्थी, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. पावसामुळे भात पिकाच्या मळणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेले आठवडाभर हवेत उष्मा वाढला होता. मंगळवारी सकाळपासून हवामान ढगाळ होते. हवेत आर्द्रता वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. दुपारी तीन वाजता आभाळ अंधारुन आल्यावर वारा सुटला. तसेच ढगांचा गडगडाट सुरु झाला. पण पावसाने तुरळक हजेरी लावली. पाच वाजता पावसाला पुन्हा सुरुवात झाली. कार्यालय व शाळा सुटण्याच्या वेळी पाऊस सुरु झाल्याने कर्मचारी व विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ उडाली. अनेकांनी भिजत जाणे पसंत केले. थंडगार वारा आणि पावसाची रिपरिपीपासून बचाव करत रिक्षा, बसचा आधार नागरिकांना घ्यावा लागला.

नवरात्र उत्सवामुळे विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर दुकाने थाटली होती. पण पावसामुळे त्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. महाद्वार रोड, पापाची तिकटी, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोडवरील फेरीवाल्यांची तारांबळ उडाली. अंबाबाई मंदिर परिसरात पावसापासून बचाव करण्यासाठी दुकानांचे अडोसे शोधले.

ग्रामीण भागात भात कापणी व मळणी सुरु असून त्याला पावसाचा फटका बसला. कापलेले भात झाकून टाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच तांराबळ उडाली. पुढील काही दिवस असाच पाऊस राहिला तर ऊस हंगामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसामुळे उसतोडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनोग्राफी केंद्रांची अचानक तपासणी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींचा जन्मदर ९३३ आहे. हे प्रमाण वाढण्यासाठी आरोग्य विभागाने एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही, यावर विशेष लक्ष द्यावे. सोनोग्राफी केंद्रावर अचानक छापे टाकून तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले. जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी दक्षता पथक समिती बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'नोंदणीकृत २३८ सोनोग्राफी केंद्र आहेत. त्यापैकी १५० केंद्र कार्यरत आहेत. उर्वरीत ८८ केंद्र विविध कारणांनी बंद आहेत. बंद केंद्रातील सोनोग्राफी यंत्राची विल्हेवाट सरकारच्या आदेशानुसार लावण्यासाठी आरोग्य प्रशासनाने पाठपुरावा करावा. सुरू असलेल्या केंद्राची वारंवार तपासणी करावी. तपासणीत त्रुटी, दोष आढळलेल्या केंद्रावर कडक कारवाई करावी. नोंदणीकृत १५३ गर्भपात केंद्र आहेत. त्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे ७२, ग्रामीण रूग्णालयांत २० तर ६१ खासगी केंद्र आहेत. सर्वच केंद्रावर प्रशासनाने बारीक नजर ठेवावी.'

पीसीपीएनडीटी कायदा सल्लागार गौरी पाटील यांनी स्वागत केले. बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूक देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास देशमुख, सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-------------------

चौकट

येथे संपर्क करा

स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याची माहिती मिळाल्यास १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. जवळच्या सरकारी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांनी बैठकीत सांगितले. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

--------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इलेक्ट्रॉनिक बाजारपेठ सज्ज

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

साडेतीन मुहुर्त असलेल्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील इलेक्ट्रॉनिक शोरुम विक्रीसाठी सज्ज झाली आहेत. एलईडी, फ्रीज, ओव्हन, वॉशिंग मशिनबरोबर यंदा ओव्हनला मागणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ग्राहकांना खेचण्यासाठी व्यापाऱ्यांनी भरघोस ऑफर्स दिल्या आहेत. विद्युत रोषणाईने शोरुम उजळल्या असून ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वस्तूंच्या डिसप्लेसाठी मंडपही उभारण्यात आले आहेत.

दसरा व दिवाळी या सणाच्या काळात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दसऱ्यादिवशी नवीन वस्तू खरेदी करायची असा अनेक कुटुंबात प्रघात आहे. रोज आवश्यक असणारी अत्याधुनिक वस्तू आपल्या घरी असावी अशी सर्वसामान्य ग्राहकांची इच्छा असते. ग्राहकाला केंद्रस्थानी ठरवून व्यापाऱ्यांनी योजना आखल्या आहेत. एलईडी टीव्हीसोबत होम थिएटरची ऑफर दिली जात आहे. ९९९ ते १४९९ रुपये डाऊन पेमेंट भरुन हप्ताने टीव्ही ग्राहकांना उपलब्ध करुन दिला आहे. तसेच एलईडीवर होम थिएटरची फ्री ची ऑफर दिली आहे.

आकर्षक सिंगल व डबल डोअर रेफ्रीजेटर खरेदीसाठी ग्राहकांना ऑफर दिली आहे. कोणताही जुना फ्रीज एक्सचेंज करा व दोन हजार रुपयांची सूट मिळवा अशी ऑफर दिली आहे. यापूर्वी जुना फ्रीज दिल्यानंतर एक हजार रुपयांची सूट मिळत होती. आता ही सूट एक हजार रुपयांनी वाढवली आहे. वॉशिंग मशिन आणि मायक्रोओव्हन खरेदीवरही एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. १५०० ते २००० हजार रुपयांची सूट दिली आहे. विविध फायनान्स कंपन्याकडूनही टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, ओव्हन खरेदीसाठी फायनान्सची सोय केली जात आहे. काही कंपन्यांच्या फ्रीजवर ओव्हन फ्रीची ऑफरही दिली जात आहे. मोबाईल कंपन्याची शोरुममध्ये सर्वात जास्त तरुणाईची गर्दी आहे. मोबाइलचे नवीन व्हर्जन घेण्याकडे कल वाढला आहे. लॅपटॉप खरेदीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. दहावीपासून पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून विविध कंपन्यांच्या लॅपटॉपची माहिती घेतली जात आहे. दसऱ्याला लॅपटॉपची चांगली विक्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रत्यक्ष शोरुममध्ये ग्राहकांनी बार्गेनिंग केल्यावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीत व्यापाऱ्यांकडून घशघशीत सूट दिली जाते. डाऊन पेमेंटला सूट दिली जात नाही पण पूर्ण रक्कम दिल्यावर एमआरपीच्या किंमतीत वस्तू दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दसरा महोत्सव तयारीला वेग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ऐतिहासिक दसरा चौकात दसरा महोत्सवाची तयारी सुरु झाली असून भव्य मंडप, शमियांना, लकडकोट उभारणे काम सुरु झाले आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सीमोल्लंघन राजघराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

दसरा समितीचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे, कार्याध्यक्ष युवराज मालोजीराजे या मार्गदर्शनाखाली दसरा महोत्सवाची तयारी सुरु आहे. दसरा चौकात भव्य मंडप उभारण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो त्या ठिकाणी लकडकोट उभारण्याचे काम सुरु झाले आहे. मंगळवारी व बुधवारी मंडपाचे काम पूर्ण केले जाणार असून करवीर संस्थानाचे निशान असलेला जरीपटका उभारण्यात येणार आहे. तसेच दोन ठिकाणी अशोक वृक्षाच्या पानाच्या कमानी उभारण्यात येणार आहे. त्यावर लाल पांढऱ्या रंगाचे निशान लावण्यात येणार आहेत. ७०० मान्यवरांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. तसेच अंबाबाई,तुळजाभवानी आणि गुरु महाराज वाड्यातील पालख्या ठेवण्यासाठी स्वतंत्र मंडप उभारण्यात येणार आहे.

दरम्यान पोलिस अधिकाऱ्यांकडून दसरा चौकाची पाहणी करण्यात आली आहे. सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाणे आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेला सूचना देण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहिम व दसरा चौक पटांगणाचे सपाटीकरण अंतिम टप्प्यात करण्यात येणार आहे. भवानी मंडपात दसऱ्याच्या छबिन्याची तयारी सुरु आहे. भवानी मंडपातील पालखीसमवेत तोफ व शस्त्रात्रधारी मानकरी सहभागी होत असतात. शस्त्रात्रांची स्वच्छताही करण्यात आली आहे. खंडेनवमी दिवशी शस्त्रास्त्र पूजनही केले जाणार आहे. दसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी श्रीमंत शाहू छत्रपती, श्रीमंत युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज कंत्राटी कामगार संघातर्फे निदर्शने

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे कर्मचाऱ्यांचे नियिमत पगार, बोनस या मागण्यांसाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने केली. दिवाळी बोनसमध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही संघटनेने केला. कंत्राटी कामगारांना महावितरणच्या नियमाप्रमाणे पगार मिळत नाही. दिवाळी बोनसमध्ये कंत्राटदार भ्रष्टाचार करत आहेत. कंपनीकडून कर्मचाऱ्यांना बोनस मिळूनही कंत्राटदाराकडून दिला जात नाही. ईएसआय हॉस्पिटल सुविधा अनेक कामगारांना मिळत नाही अशा विविध प्रश्नांचे निवेदन कामगार अधिकाऱ्यांना दिले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष मिलिंद कुडतरकर, अनिल लांडगे, वासीम मोमीन, मधुकर माळी, अमित सूर्यवंशी, योगेश आमटे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नुकसानभरपाई करावा लागला वर्षभर संघर्ष

$
0
0

Sachin.patil1@timesggroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : घरात अठराविश्व दारिद्र्य, वडिलांचे हरपलेले छत्र अशा परिस्थितीत राजेंद्रनगर झोपडपट्टी परिसरातील प्रशांत आंबी या तरुणाच्या आईला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार नाकारण्यात आले. नाकारण्यात आलेल्या आजारावर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याच योजनेतूनच उपचार करण्यात आले. त्यामुळे फसवणूक झालेल्या संबंधित हॉस्पिटलकडून नुकसानभरपाईसाठी त्याला वर्षभर संघर्ष करावा लागला.

बी.कॉम.च्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रशांतची आई यल्लव्वा यांना मूतखड्यावरील उपचारासाठी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. विविध तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. आंबी यांची परिस्थिती गरिबीची असल्याने महात्मा फुले जनआरोग्य योजनेनुसार उपचार करण्याची विनंती केली. मात्र, योजनेत आजार बसत नसल्याचे कारण सांगण्यात आले. रुग्णाची अवस्था गंभीर असल्याने कुटुंबीयांनी कर्ज काढून शस्त्रक्रिया व उपचाराची बिले रोखीने भरली. यावेळी मागणी करूनही उपचाराबाबतची कोणतीही बिले त्यांना देण्यात आली नाहीत. हॉस्पिटल प्रशासनाकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. डिस्चार्जनंतर रुग्णाला १५ दिवसांत पुन्हा त्रास झाल्याने त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा रुग्णाच्या किडनीला संसर्ग झाला असून, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सीटी स्कॅन व डायलिसीस करण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आजाराचे अर्धे उपचार महात्मा फुले योजनेतून न केल्याने पुढील उपचार महात्मा फुले योजनेतून करता येणार नसल्याचे सांगितले. मात्र, त्याच आजारावरील पुढील शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेतून केली. आधीच्या हॉस्पिटलमध्ये ज्या आजाराबाबत नाकारलेली शस्त्रक्रिया दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याच योजनेतून मोफत केल्याने हॉस्पिटलने योजनेला नकार देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे हॉस्पिटलकडून आर्थिक नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करावा लागला.

०००

वर्षभर पाठपुरावा

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार नाकारून शस्त्रक्रियेचे पैसे घेतल्याने प्रशांत आंबीने नुकसानभरपाईसाठी वर्षभर हॉस्पिटल, संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा केला. यावेळी त्यांच्यावर राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. तसेच पैसे देऊन गप्प राहण्याचे आमिष दाखविले. याप्रश्नी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, महात्मा फुले जनआरोग्य योजना समन्वयक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करावा लागला. यामध्ये प्रशांतचे शैक्षणिक नुकसान झाले. तसेच याबाबत जनजागृती होण्यासाठी त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कँपेन सुरू केले. अखेरीस वर्षभर प्रयत्न केल्यानंतर 'त्या' हॉस्पिटलने नुकसानभरपाईची रक्कम आंबी कुटुंबीयांकडे सुपूर्द केली.

००००

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचार नाकारलेल्या रुग्णांनी तक्रारीसाठी पुढे येणे गरजेचे आहे. या योजनेबाबत लोकांमध्ये पुरेशी जनजागृती नसल्याने रुग्णांचा गैरफायदा घेतला जातो. तक्रारीसाठी आलेल्या रुग्णांची शासकीय पातळीवर दखल घेतली जावी.

प्रशांत आंबी

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिगत वीज वाहिनीवरून खडाजंगी

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात टाकण्यात येत असलेल्या भूमिगत विद्युत वाहिनीला महापालिकेने परवानगी दिली आहे. मंजुरी देण्यापूर्वी कामाला सुरुवात कशी झाली? खोदाईनंतर रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार? आदी प्रश्नांवरून महापालिकेच्या महासभेत मंगळवारी चांगलीच खडाजंगी उडाली. यापूर्वीच्या कामात चुका झालेल्या असताना त्याची जबाबदारी कोण घेणार? असा मुद्दा उपस्थित करत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना सदस्यांनी धारेवर धरले. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत सुमारे ३५ कि.मी. अंतराची आणि २२ कोटी रुपये खर्चाची भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यात येणार आहे. योजना राबविण्यासाठी महापालिका आणि महावितरणमध्ये करार होणार आहे. पण असा कोणताही करार न करताच तीन प्रभागांत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. परवानगीशिवाय करण्यात येत असलेल्या कामावरून सदस्यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली.

गटनेते शारंगधर देशमुख म्हणाले, 'ठेकेदाराने यापूर्वीच्या कामात चुका केला आहेत. त्याची जबाबदारी अधिकारी घेणार आहेत का? ठेकेदार सहा-सहा महिने काम प्रलंबित ठेवत असताना त्यांच्यावर कारवाई न करता छोट्या ठेकेदारावर प्रशासन कारवाई करते.' राहुल चव्हाण यांनी पाणीपुरवठ्याच्या लाइनमध्येच विद्युत वाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे धोका होण्याची शक्यता वर्तवली. भूपाल शेटे म्हणाले, 'विद्युत वाहिनी टाकल्यानंतर रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. रस्त्यांची दुरवस्था झाल्यास आंदोलनाला सामोरे जावे लागेल. त्याचा त्रास सदस्यांना होईल. खोदाईनंतरही ठेकदारावर कारवाई का केली नाही, ठेकेदार महापालिकेचा जावई आहे का?' 'तर महासभेच्या मंजुरीपूर्वीच कामाला सुरुवात केल्याने ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गटनेते विजय सूर्यवंशी यांनी केली.' प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'विकासकामे करताना कायदेशीर बाबी पाहणे आवश्यक आहे. जयंती नाल्यावर ११ केव्हीच्या विद्युत वाहिन्या उघड्या असल्याने एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना त्वरित पत्रव्यवहार करा.'

आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, 'परवानगीशिवाय काम केल्याबद्दल ठेकेदारांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जाईल. रस्ते खोदाईनंतर प्रत्येक ५०० मीटरप्रमाणे रस्ते ठेकेदाराकडून करून घेतले जाणार आहेत, त्याची जबाबदारी अभियंत्यावर सोपवली आहे. त्यानुसार काम न झाल्यास अभियंत्यावर कारवाई करण्यात येईल.' नेत्रदीप सरनोबत म्हणाले, 'तीन प्रभागांतील काम विभागीय कार्यालयामार्फत बंद केले असून ठेकेदाराला नोटीसही दिली आहे.'

नियाज खान म्हणाले, 'शहरातील ५४ पैकी २० एलईडी दिवे बंद असून विद्युत साहित्याअभावी दुरुस्तीची कामे होत नाहीत. नगरसेवकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही.' 'अभिजित चव्हाण यांनी, पाणी, लाइट, आरोग्य महत्त्वाच्या सुविधांचा बोजवारा उडाल्याचे सांगितले. 'दोन महिन्यांपासून नगरसेवक वर्क ऑर्डरच्या प्रतीक्षेत असल्याचे सत्यजित कदम यांनी सांगितले.' प्रशासनाने एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ईईएसएलसोबत करार केला आहे. सात वर्षांपर्यंत एलईडी दिव्यांची जबाबदारी कंपनीवर असून योजना हस्तांतर करताना शंभर टक्के बल्बची खात्री करूनच ताब्यात घेणार असल्याचे स्पष्ट केले.

सभेत उपमहापौर महेश सावंत, सदस्या जयश्री चव्हाण, अश्विनी बारामते, रूपाराणी निकम, अजित ठाणेकर, तौफिक मुल्लाणी, दिलीप पोवार, विलास वास्कर, प्रतापसिंह जाधव, मुरलीधर जाधव, किरण शिराळे, शेखर कुसाळे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

०००

सभेत झालेले मंजूर ठराव...

राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कार द्यावा

एलईडी पथदिव्यांसाठी करार

शालिनी स्टुडिओ जागेवर बांधकामबंदी

पर्यावरण अहवाल मंजूर

ठेकेदार नोंदणी शुल्कात वाढ

००००००

भोपळे अनुपस्थित, प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक

पाणीपुरवठा नियोजनासाठी बोलावण्यात आलेल्या महासभेत कमलाकर भोपळे यांनी स्टंटबाजी केल्याचा आरोप झाला होता. पार्टी मिटिंगमध्येही त्यांना समज दिली होती. परिणामी आजच्या सभेत भोपळे उपस्थितच राहिले नाहीत, तर सदस्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे सभेला सुरक्षारक्षक नेमण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे सभागृहाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षक तैनात होते, तर सभेत बोलण्यास संधीच मिळत नसल्याने महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुरेखा शहा यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्या सभेस हजर राहिल्या नाहीत.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोनससाठी कामगारांचा धडक मोर्चा

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना तत्काळ सुरू करावी, दिवाळी बोनस किमान पंधरा हजार रुपये मिळाला पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी धडक मोर्चा काढला. शेकडो बांधकाम कामगारांनी शाहूपुरी येथील सहायक आयुक्त कामगार कार्यालयाच परिसर जोरदार घोषणेबाजी करत दणाणून सोडला. बी.जी.मांगले, सामाजिक कार्यकर्ते पीटर चौधरी, चंद्रकांत कांडेकरी, नंदकुमार गोंधळी, रवींद्र मोरे, तानाजी तावडे आदींच्या नेतृत्वाखाली शाहू मिल ते कामगार कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.

'बांधकाम कामगार कल्याण'चे माजी सदस्य व जागर फाऊंडेशनचे बी.जी.मांगले म्हणाले,'बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या स्थापनेपासून आजपर्यंत कामगार न्याय हक्कासाठी सातत्याने झगडतो आहे. कामगारांच्या कल्याणासाठी ७५०० कोटी रुपये शिल्लक आहेत. मात्र विविध योजनांचा कामगारांना लाभ मिळत नाही. गेल्या चार वर्षपासून मेडिक्लेम योजना बंद आहे. यामुळे गरीब कामगारांवर अन्याय होत आहे.'

चंद्रकांत कांडेकरी म्हणाले,'बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही. शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अनेक महिने प्रलंबित आहेत.' 'कामगारांना लाभ मिळावेत. प्रत्यक्ष साइटवर काम करणारा कामगार हा नोंदणीकृतच असला पाहिजे, कामगार मंडळाने सुरक्षेची साधने पुरवावीत, पेन्शन योजना लवकर सुरू करावी,'आदी मागण्यांचे फलक लक्षवेधी ठरले.

शिष्टमंडळातर्फे कामगार अधिकारी अश्विनी वाघ यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यांनी कामगारांच्या मागण्या सरकारकडे सादर करु, तसेच कामगार कार्यालयाच्या अधिकारातील योजनांची अंमलबजावणी करु असे सांगितले. मोर्चामध्ये तानाजी मोरे, सम्राट गोंधळी, संदीप पाटील, बाजीराव टकले, एच.एन.वाघमारे, अजित लोखंडे, अनिल शिवाजी पाटील, अमित अवघडे यांच्यासह कामगार सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळ बाजारात मोठी उलाढाल

$
0
0

कोल्हापूर:

नवरात्रोत्सवानिमित्त बाजारात फळांची मोठी उलाढाल झाली आहे. सफरचंदाला सर्वाधीक मागणी असून चिकू, मोसंबी, सिताफळ, डाळींब या फळांना मोठी मागणी आहे.

गणेशोत्सवाच्या कालावधीत बाजारात सफरचंदांचे आगमन झाले होते. नवरात्र उत्सव काळात भाविक नऊ दिवस फक्त फलाहार करतात. त्यामुळे फळांना मोठी मागणी आहे. शाहू मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत फळांची चांगली आवक झाली. सिमला सफरचंदाची ९० बॉक्स तर डेलिसन जातीच्या सफरचंदाची १३० बॉक्स आवक झाली आहे. मोसंबी, संत्री, पेरु, डाळिंब, सिताफळाची आवक मोठा प्रमाणात झाली आहे. सफरचंदाचा दर प्रतिकिलो ६० ते २०० रुपये इतका आहे. सिमला सफरचंद जास्त गोड असल्याने मोठी मागणी आहे. डाळिंबाचा प्रतिकिलो दर ४० ते ७० रुपये इतका आहे. सिताफळे प्रतिकिलो ४० ते १०० रुपये तर चिकूचा दर प्रतिकिलो ४० ते ८० रुपये इतका आहे. मोसंबी प्रतिकिलो ३० पासून ५० रुपयांपर्यंत आहेत. केळींनाही मोठी मागणी असून केळीचा दर प्रतिडझन २० ते ७० रुपये इतका आहे.

फळांचे दर (प्रतिकिलो, रुपयांत)


सफरंचद ६० ते २००

डाळिंब ४० ते ८०

सिताफळ ४० ते ८०

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी २० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा शाही दसरा

$
0
0

कोल्हापूरचा शाही दसरा

प्रा. डॉ. अरुण शिंदे

म्हैसूर, ग्वाल्हेर व कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा देशभर प्रसिद्ध आहे. संस्थान काळातील दरबारी वैभव, भव्यता, ऐश्वर्य, शिस्तबद्धता यांमुळे हा सोहळा लोकांच्या उत्साहाचा, कौतुकाचा, चर्चेचा आणि अभिमानाचा विषय होता. राजेशाही संपून लोकशाही आल्यानंतर दसरा उत्सवामध्ये बदल होत गेला. तरीही या सोहळ्याविषयीचे आकर्षण व अभिमान कायम आहे.

दसरा चौकाचे मूळ नाव 'चौफाळ्याचा माळ'. या माळावर चाफ्याची भरपूर झाडे होती. म्हणून त्याला चाफाळ्याचा माळ किंवा चौफाळ्याचा माळ म्हटले जायचे. कोल्हापूर शहर आणि रेसिडेन्सीच्या मध्यावर हा चौफाळ्याचा विस्तीर्ण माळ पसरलेला होता. या माळावर कुस्त्यांची जंगी मैदाने व्हायची. पुढे चौफाळ्याच्या माळाचे दसरा चौक असे नामकरण होऊन त्यास शाही रूपरंग प्राप्त झाले. कोल्हापूरच्या शाही दसऱ्यास जवळपास अडीचशे वर्षांची परंपरा आहे. शाहू महाराजांच्या काळात दसरा उत्सव नावारूपास आला. राजाराम महाराजांच्या काळात दसरा उत्सवाचे ऐश्वर्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. हा उत्सव पाहण्यासाठी हजारो स्त्री-पुरुष नटून थटून येत असत. त्यांच्या गर्दीने कोल्हापूर शहर गजबजून जाई. सायंकाळी पाच वाजता पहिल्या तोफेची सलामी होई व जुन्या राजवाड्यातून दसऱ्याच्या मिरवणुकीस सुरुवात होई.

या मिरवणुकीत आघाडीला तोफखाना, त्या मागून जरीपटक्याचा घोडा, लष्कर, पोलीस दल, लाल डगला रिसाला (घोडदळ), खासगीकडील सरंजाम, मुलकी व जंगलकडील शिपाई, शिकारखान्याकडील वाघ, चित्ते, नगारा लादलेले उंट व शोभिवंत अंबारी घेऊन झुलत चाललेले हत्ती असत. सुरुवातीला काही वर्षे राजाराम महाराज अंबारीत बसत; पण नंतर ते घोड्यावर स्वार होऊ लागले. त्यांच्याबरोबर जहागीरदार, सरदार, इनामदार, वरिष्ठ अधिकारी व सामान्य नागरिक यांचे घोडे असत. ते सर्व एक नंबरच्या दरबारी पोशाखात असत. या मिरवणुकीतील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे लाल डगला रिसाला. राजाराम महाराजांना उमदे घोडे पाळण्याचा मोठा शोक होता. त्यामुळे लाल डगला रिसाल्यात अत्यंत देखणे घोडे असत. एक रांग पांढर्या शुभ्र घोड्यांची. दुसरी रांग अबलख घोड्यांची. तिसरी रांग काळ्या व तपकिरी रंगांच्या घोड्यांची. या घोड्यांवरचे स्वार लाल डगल्याचे व जरी किनारीच्या लाल फेट्यांचे असत. त्यांच्या कमरेला तरवारी असत व हातात निशाणासह उभे भाले असत. पालखीच्या पुढे मखमली झूल व सोन्या-चांदीचे दागिने असलेले कोतवाली घोडे दिमाखाने नाचत चालत असत. पुढे लष्करी बँड असे. मागे नोबत झडे.

अशी ही शाही मिरवणूक दसरा चौकात यायची. तेथे छत्रपतींना तोफांची सलामी दिली जायची. नंतर छत्रपती लकडकोटावर ठेवलेल्या आपट्याच्या पानांची पूजा करायचे. त्या नंतर जमलेले सर्व लोक प्रथम छत्रपतींना सोने (आपट्याची पाने) द्यायचे व नंतर एकमेकांना आपट्याची पाने देऊन दसरा साजरा करायचे. जुन्या राजवाड्यात श्री तुळजाभवानीच्या उजव्या बाजूस कोल्हापूरच्या छत्रपतींचे परंपरागत तख्त होते. या स्थानी दसर्याचा विशेष दरबार भरे. दसऱ्याची शिलंगणाची मिरवणूक संपवून राजवाड्यात आल्यावर प्रथम महाराज धायज्यासह (संरक्षक घोडेस्वार पथक) करवीर निवासिनीचे दर्शन घेत. नंतर तुळजाभवानीचे दर्शन घेत. देवीपुढे कोहळा फोडण्याचा व इतर धार्मिक विधी होत. नंतर महाराज म्हालदार चोपदारांच्या खड्या आवाजातल्या ललकाऱ्यांच्या निनादात तख्ताला प्रणाम करून मांडी न घालता तख्तावर बसत. दसऱ्याचा दरबार हा मुख्यतः महाराजांना सोने देण्याचा दरबार असल्याने आपापल्या मानाप्रमाणे दरबारी महाराजांना सोने (आपट्याची पाने) देत. पर्णशालेचे हवालदार सोने देणाऱ्यास विडे देत. विडे घेतल्यावर पुन्हा महाराजांना मुजरा करून आपल्या जागी जात असत. आज दसऱ्याचे हे ऐतिहासिक स्वरूप बदलले आहे. सध्या 'छत्रपती देवस्थान ट्रस्ट'मार्फत शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन केले जाते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आपल्या राजपरिवारासमवेत ऐतिहासिक 'मेबॅक' गाडीतून शाही मिरवणुकीने दसरा मैदानावर येतात. तोफा व बंदुकांच्या फैरीं झाडून छत्रपतींना सलामी दिली जाते. त्या वेळी सर्वजण उभे राहून मानवंदना देतात. या सोहळ्यात दसरा मैदानाच्या मध्यभागी शमीचे झाड रोवण्यात येते. शाहू महाराजांनी शमींच्या पानांचे पूजन करताच बंदुकीच्या फैरी उडविण्यात येतात. त्या नंतर जमलेले लोक सोने (आपट्याची पाने) लुटतात व एकमेकांना देतात. छत्रपती रात्री उशिरापर्यंत करवीरवासीयांचे सोने स्वीकारत असतात. कोल्हापूर दरबारचे वैभव म्हणून दसरा उत्सवाकडे पाहता येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दसरा चौकात शाही दसरा

$
0
0

कोल्हापूर

दसरा महोत्सव समितीतर्फे विजयादशमीनिमित्त गुरुवारी (ता.१८) परंपरेप्रमाणे 'शमीपूजन' समारंभ दसरा चौक येथे सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन होणार आहे. कोल्हापूरच्या दसरा सोहळ्याची खासियत असलेला हा समारंभ पाहण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी होते. दसरा महोत्सव समितीतर्फे दसरा चौक येथे या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधीस्थळावर मेघडंबरी

$
0
0

तीन दिवसांत कामाला सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळावर सुमारे सव्वा तीन टन वजनाची व १५ फूट उंचीची मेघडंबरी क्रेनच्या मदतीने बुधवरी बसवण्यात आली. मेघडंबरी बसवल्यानंतर आता संरक्षक भिंतीच्या बांधकामाला तीन ते चार दिवसांत सुरुवात होणार आहे. मेघडंबरीचे उर्वरीत काम १५ दिवसांत पूर्णत्वाकडे जाणार आहे.

लोकराजा शाहू महाराजांचे समाधीस्थळ विकसित करण्यासाठी सुमारे चार कोटींचा आराखडा तयार केला. समाधीस्थळ, मेघडंबरी, संरक्षक भिंत, पाथ वे, लॉन, लँड स्केपिंग, विद्युत रोषणाई बरोबर छत्रपती शिवाजी, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराराणी यांच्या मंदिरांचा विकासामध्ये समावेश केला होता. आराखड्यानुसार जुलै २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. समाधीस्थळाचे काम पूर्ण झाले, पण मेघडंबरीच्या कामाला विलंब होत गेला.

शिल्पकार किशोर पवार यांनी इटली येथील राजाराम महाराजांच्या समाधीवरील मेघडंबरीप्रमाणे येथे मेघडंबरी तयार करण्यास सुरूवात केली. महापालिकेने मेघडंबरीसाठी १५ लाखांची तरतूद केली, पण मेघडंबरीचे काम अवघड व वेळखाऊ असल्याने कामाला विलंब होत गेला. परिणामी समाधीस्थळाचे काम त्वरीत होण्यासाठी शाहूप्रेमींनी आंदोलनही केले. आठ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर कलाकुसरीचे काम पूर्ण केले. सुमारे सव्वा तीन टन वजन आणि १५ फूट दोन इंच असलेली मेघडंबरी ४० टन वजनाच्या क्रेनच्या मदतीने समाधीस्थळावर बसवण्यात आली. मेघडंबरी बसवण्यापूर्वी संरक्षक भिंत बांधण्यासाठी एक कोटी नऊ लाखांची वर्क ऑर्डर काढण्यात आली होती. त्यानुसार बुधवारपासून लेआउट करण्यास सुरुवात झाली. प्रत्यक्ष बांधकामाला तीन ते चार दिवसांत सुरुवात होणार आहे. सहा महिन्याच्या मुदतीत संरक्षक भिंतीचे काम पूर्ण होणार असून एकूण प्रकल्प खर्चामध्ये दोन ते अडीच कोटींची वाढ होण्याची शक्यता असून समाधीस्थळाचे संपूर्ण काम महापालिका निधीतून सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

'समाधीस्थळावर तातडीने विविध सुविधा देण्यासह सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना करत उर्वरीत कामे पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करु,' असे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.' याप्रसंगी महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, उपमहापौर महेश सावंत, गटनेते शारंगधर देशमुख, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, माजी महापौर हसिना फरास, नगरसेवक अर्जुन माने, प्रवीण केसरकर, संजय मोहिते, अफजल पिरजादे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अदिल फरास, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, ठेकेदार व्ही. के. पाटील, अजय पाटील, आर्किटेक्ट अभिजीत जाधव-कसबेकर, शिल्पकार किशोर पुरेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत आदी उपस्थित होते.

..........................

चौकट

सभागृहाला १२५ वर्षापूर्वीचा लूक

समाधीस्थळाच्या आवारात असलेल्या सभागृहाला बाहेरुन १२५ वर्षापूर्वीच्या इमारतीचा लूक देण्यात येणार असून आतील भाग मात्र अत्याधुनिक असणार आहे. १७५ लोक बसू शकतील एवढ्या क्षमतेच्या सभागृहात शाहू महाराजांच्या जीवनावरील मराठी व इंग्रजी भाषेतील माहितीपट दाखवण्यात येणार आहे.

.................

इटलीनंतर कोल्हापूर मेघडंबरी

इटली येथील फ्लोरेंस येथे राजाराम महाराजांच्या समाधीस्थळावर मेघडंबरी उभा केली आहे. या मेघडंबरीची प्रतिकृती शाहू समाधीस्थळावर साकारली आहे. सव्वा तीन टन ब्राँझ धातुची मेघडंबरी बनवण्यासाठी प्रथम १४ लाखाची तरतुद केली होती. पण त्यापेक्षाही जास्त खर्च करण्यात आला आहे. मेघडंबरी प्रत्यक्ष जाग्यावर बसवण्यात आली असली, तरी अंतिम फिनिशिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

चौकट

'मटा' चा सातत्याने पाठपुरावा

नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाची उभारणी करावी यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' च्या वतीने गेले चार वर्षे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मेघडंबरीच्या कामाला सतत विलंब लागत होता. हे काम तातडीने व्हावे यासाठी देखील विविध वृत्तांच्या माध्यमातून महापालिकेकडे पाठपुरावा केला.

.........................

मूळ बातमी

शाहू समाधीस्थळावर मेघडंबरी

संरक्षक भिंतीच्या लेआउटला सुरुवात, तीन दिवसांत कामाला सुरुवात

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नर्सरी बाग येथे राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळावर सुमारे सव्वा तीन टन वजनाची व १५ फूट उंचीची मेघडंबरी क्रेनच्या मदतीने बुधवरी बसवण्यात आली. मेघडंबरी बसवल्यानंतर आता संरक्षक भिंतीच्या बांधकामाला तीन ते चार दिवसांत सुरुवात होणार आहे. मेघडंबरीचे उर्वरीत काम १५ दिवसांत पूर्णत्वाकडे जाणार आहे.

लोकराजा शाहू महाराजांच्या समाधीस्थळ विकसीत करण्यासाठी सुमारे चार कोटीचा आराखडा तयार केला. समाधीस्थळ, मेघडंबरी, संरक्षक भिंत, पाथवे, लॉन, लँड स्केपिंग, विद्युत रोषणाई बरोबर छत्रपती शिवाजी, करवीरच्या संस्थापीका ताराराणी यांच्या मंदिराचा विकासामध्ये समावेश केला होता. आराखड्यानुसार जुलै २०१४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. समाधीस्थळाचे काम पूर्ण झाले, पण मेघडंबरीच्या कामाला विलंब होत गेला.

शिल्पकार किशोर पवार यांनी इटली येथील राजाराम महाराजांच्या समाधीवरील मेघडंबरीप्रमाणे येथे मेघडंबरी तयार करण्यास सुरुवात केली. महापालिकेने मेघडंबरीसाठी १५ लाखांची तरतूद केली. पण मेघडंबरीचे काम अवघड व वेळखाऊ असल्याने कामाला विलंब होत गेला. परिणामी समाधीस्थळाचे काम त्वरीत होण्यासाठी शाहूप्रेमींनी आंदोलनही केले. दरम्यान जुलै २०१८ रोजी महापौर शोभा बोंद्रे व आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी समाधीस्थळासह मेघडंबरीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी पाहणी करुन मेघडंबरीचे काम त्वरीत पूर्ण करण्याची सूचना केली. शिल्पकार पुरेकर यांनी जुलैपूर्वीच रात्रंदिवस काम करण्यास सुरुवात केली, पण कलाकुसरीचे काम अवघड आणि वेळ खाऊ असल्याने आणखी विलंब झाला. आठ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी कलाकुसरीचे काम पूर्ण केले. सुमारे सव्वा तीन टन वजन आणि १५ फूट दोन इंच असलेली मेघडंबरी ४० टन वजनाच्या क्रेनच्या मदतीने समाधीस्थळावर बसवण्यात आली. मेघडंबरी बसवण्यापूर्वी संरक्षक भिंती बांधण्यासाठी एक कोटी नऊ लाखाची वर्क ऑर्डर काढण्यात आली होती. त्यानुसार बुधवारपासून लेआउट करण्यास सुरुवात झाली. लेआउट झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला तीन ते चार दिवसांत सुरुवात होणार आहे. सहा महिन्याच्या मुदतीत संरक्षक भिंतीचे काम पूर्ण होणार असून एकूण प्रकल्प खर्चामध्ये दोन ते अडीच कोटीची वाढ होण्याची शक्यता असून समाधीस्थळाचे संपूर्ण काम महापालिका फंडातून सुरू असल्याचे महापालिकेच्या सुत्रांनी सांगितले.

'समाधीस्थळावर तातडीने लाइट सुविधा देवून पाथवे तयार करण्याबरोबर सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना करत उर्वरीत कामे पूर्ण झाल्यानंतर लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करु असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.' यावेळी महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, उपमहापौर महेश सावंत, गटनेते शारंगधर देशमुख, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, माजी महापौर हसिना फरास, नगरसेवक अर्जुन माने, प्रवीण केसरकर, संजय मोहिते, अफजल पिरजादे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अदिल फरास, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, ठेकेदार व्ही. के. पाटील, अजय पाटील, आर्किटेक्ट अभिजीत जाधव-कसबेकर, शिल्पकार किशोर पुरेकर, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत आदी उपस्थित होते.

..........................

चौकट

समाधीस्थळाच्या चवथऱ्यावर १५ फूट उंचीची मेघडंबरी बसवण्यात आली. मेघडंबरीखाली स्तंभ उभारण्यात येणार असून स्तंभावर शाहू महाराजांच्या विविध वयाच्या चार प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत. तसेच मेघडंबरीखाली रयतेच्या जनहितासाठी काढलेले विविध आदेशाच्या प्रतिकृती दगडी पेटीत ठेवण्यात येणार आहेत.

..................

सभागृहाला १२५ वर्षापूर्वीचा लूक

समाधीस्थळाच्या आवारात असलेल्या सभागृहाला १२५ वर्षापूर्वीच्या इमारतीचा लूक बाहेरुन देण्यात येणार असून आतील भाग मात्र अत्याधुनिक असणार आहे. १७५ लोक बसू शकतील या क्षमतेचा सभागृहात शाहू महाराजांच्या जीवनावरील मराठी व इंग्रजी भाषेच्या डॉक्यूमेंट्री दाखवण्यात येणार आहेत. संरक्षक भिंत व सभागृह केर्ली येथील कारागीर साकारणार आहेत.

...................

इटलीनंतर कोल्हापूर मेघडंबरी

इटली येथील फ्लोरेंस येथे राजाराम महाराजांच्या समाधीस्थळावर मेघडंबरी उभा केली आहे. या मेघडंबरीची प्रतिकृती शाहू समाधीस्थळावर साकारली आहे. सव्वा तीन टन ब्राँझ धातुची मेघडंबरी बनवण्यासाठी प्रथम १४ लाखाची तरतुद केली होती. पण त्यापेक्षाही जास्त खर्च करण्यात आला आहे. मेघडंबरी प्रत्यक्ष जाग्यावर बसवण्यात आली असली, तरी अंतिम फिनिशिंगसाठी १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे.

....................

चौकट

दृष्टीक्षेप शाहू समाधीस्थळ

चार कोटी ६५ लाख

एकूण आराखडा

२५ लाख

मेघडंबरी

एक कोटी नऊ लाख

संरक्षक भिंत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जयंती’वरील वीज वाहिनीची पाहणी

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाल्यावर उघड्यावर असलेल्या ११ केव्ही विद्युत वाहिनीची पाहणी बुधवारी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता शेटके यांनी केली. याबाबतचा अहवाल शुक्रवारी (ता. १९) आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना सादर करण्यात येणार आहे.

जयंती नाला येथील उपसा केंद्रासाठी स्वतंत्र वीजपुरवठा करण्यासाठी ११ केव्ही उच्चदाब असलेली विद्युत वाहिनी टाकण्यासाठी निविदा काढली. हे काम महापालिकेने महावितरणला ३१ लाखांच्या मोबदल्यात दिले. तीन महिने मुदतीच्या या कामासाठी महापालिकेने संपूर्ण रक्कम आगाऊ दिली. पण कंपनीने भारतीय विद्युत कायदा व नियमानुसार काम केले नसल्याने वाहिनी उघड्यावर आली आहे. उच्चदाबाची वाहिनी एक मीटर खाली व सिमेंट पाइपमधून ओढणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात वाहिनी स्ट्रॉम वॉटर योजनेच्या डक्टमधून ओढल्याचे निदर्शनास येते. याबाबत महासभेत प्रा. जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले होते.

सभेतच आयुक्त डॉ. चौधरी यांनी तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बुधवारी कनिष्ठ अभियंता शेटके व उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी पाहणी केली. पाहणीमध्ये विद्युत वाहिनी खोदाई करून टाकली नसल्याचे निदर्शनास आले. याबाबतचा अहवाल शेटके शुक्रवारी आयुक्तांना सादर करणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपशहर अभियंता घाटगे यांनी सांगितले.

दरम्यान जयंती नाल्यावरील कठडा कोसळल्यानंतर ट्रेमध्ये बसवलेली विद्युत वाहिनी वर आली आहे. पुन्हा ट्रेद्वारे वाहिनी बसविण्यासाठी पुरातत्त्व खात्याची परवानगी लागणार आहे. याबाबत आयुक्तांचे पत्र मिळाल्यानंतर तीन-चार दिवसांत विद्युत वाहिनीचे काम करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

००००

जयंती नाल्यावरुन क्रेन कोसळल्यानंतर वाहिनी वर आली. ट्रेच्या सहायाने वाहिनी बसविण्यासाठी पुरातत्त्व खात्याची परवानगी लागणार आहे. आयुक्तांचे याबाबतचे पत्र दोन दिवसांत मिळणार असून, त्यानंतर कामाला सुरुवात होईल.

एस. एम. माने, शहर कार्यकारी अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुन्हा दाखल करण्याची मागणी

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी वाहनाचा वापर केल्यास, संबंधित अधिकाऱ्यांना वाहतूक भत्ता देवू नये, असे राज्य सरकारचे परिपत्रक आहे. पण आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील हे महापालिकेचे वाहन वापरुन वाहतूक भत्ताही घेत आहेत. याद्वारे डॉ. पाटील महापालिकेची फसवणूक करत असून, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी नगरसेवक पांडुरंग आडसुळे यांनी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे बुधवारी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आकर्षक रांगोळ्या, फुलांचा वर्षाव, 'अंबामाता की जय'चा घोष आणि भाविकांचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा भावभक्तीच्या वातावरणात करवीरनिवासिनी अंबाबाईचा नगरप्रदक्षिण सोहळा बुधवारी पार पडला. रात्री साडेनऊच्या सुमारास तोफेची सलामी झाली आणि देवीची उत्सवमूर्ती फुलांनी सजविलेल्या वाहनातून भेटीला निघताच भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला. मध्यरात्रीपर्यंत सुरू राहिलेल्या नगरप्रदक्षिणेचा विलोभनीय सोहळा डोळ्यांत साठविण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

अष्टमीनिमित्त अंबाबाईच्या उत्सवमूर्तीची नगरप्रदक्षिणा भाविकांसाठी आकर्षणाचा सोहळा ठरल्याचे यंदाही पाहायला मिळाले. रात्री दहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. बरसणाऱ्या सरी अंगावर झेलत भाविकांनी देवीचा सोहण अनुभवला. देवीच्या स्वागतासाठी प्रदक्षिणा मार्ग सजला होता. सजविलेल्या चांदीच्या वाहनात सालंकृत पूजेची अंबाबाईची उत्सवमूर्ती विराजमान होती. पॉप्युलर स्टील वर्क्सचे राजू जाधव व कुटुंबीयांच्या हस्ते व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्ष वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजी जाधव, संगीता खाडे, देवस्थान समितीचे व्यवस्थापक विजय पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहन पूजन झाले. नगरप्रदक्षिणा मार्ग विद्युत रोषणाईच्या झगमगाटात न्हाऊन निघाला होता.

यानंतर अंबामातेचा जयघोष, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि भाविकांचा अमाप उत्साहांनी संपूर्ण वातावरणाला भावभक्तीचा साज चढला. अंबाबाईची उत्सवमूर्ती महाद्वार चौक, गुजरीमार्गे भवानी मंडप येथे दाखल झाली. भवानी मंडप येथे अंबाबाईची उत्सवमूर्ती व तुळजाभवानी यांच्या भेटीचा सोहळा झाला. याप्रसंगी छत्रपती घराण्यातर्फे देवीची ओटी भरण्यात आली. तसेच मानाचे विडे प्रदान केले. त्यानंतर गुरुमहाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे पुन्हा महाद्वार अशी नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. रात्री बारानंतर मंदिरातील महाकाली मंदिरासमोर देवीचा जागर झाला. जागरामुळे गुरुवारी सकाळी नऊनंतर मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. दरम्यान, नगरप्रदक्षिणा मार्गावर विविध संस्था व संघटनेतर्फे भाविकांना प्रसाद वाटप केले.

००००

पन्नास हजार भाविकांनी घेतले दर्शन

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत देवीच्या दर्शनासाठी रोज लाखाहून अधिक भाविकांची गर्दी लोटते. गेले सात दिवस मंदिर परिसरात भाविकांचा ओघ होता. बुधवारी अष्टमीनिमित्त दिवसभरात ५० हजार भाविकांनी दर्शन घेतले. इतर दिवसांच्या तुलनेत बुधवारी गर्दीचा ओघ कमी जाणवत होता. दिवसभर व्हीआयपी दर्शन मार्ग बंद ठेवला होता. यामुळे लोकप्रतिनिधींपासून अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांनी नियमित रांगेतूनच दर्शन घेतले. खासदार धनंजय महाडिक यांनीही मुखदर्शन रांगेतून देवीचे दर्शन घेतले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images