Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दोन हजार ठराव आमच्याकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळ'च्या मल्टिस्टेट विरोधात आमच्याकडे १६०० ठराव आहेत. शनिवारपर्यंत २००० ठराव आमच्या हाती असतील' असा दावा आमदार सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधाऱ्यांकडे २७८० सभासदांचा ठराव असेल तर मग त्यांनी सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटसाठी आवाजी ऐवजी गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे' असे आव्हान त्यांनी दिले. सहकार कायद्यातील तरतूद आणि उत्पादकांची मागणी पाहता प्रशासनाने शनिवारी तशी यंत्रणा उभारावी, अशी सूचना केली. तर, गोकुळ स्वमालकीचा करण्याचा घाट घालणाऱ्या महाडिकांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी पी. एन. पाटील यांच्याकडे नेतृत्व दिले जाईल,' अशी घोषणा आमदार मुश्रीफ यांनी यावेळी केली.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'आमची गोकुळवर कधीच सत्ता नव्हती. पण दूध उत्पादकांच्या हक्कावर घाला येऊ नये यासाठी आम्ही लढा देत आहोत. गेली २५ वर्षे मल्टिस्टेटविना गोकुळ कर्नाटकासह अन्य राज्यांतून दूध संकलन करत आहे. मुंबई, पुणे, गोवा येथे दूध विक्री सुरू आहे. दुग्धजन्य पदार्थांची विक्री भारतभर केली जाते. दूध संकलन आणि विक्रीला कधीही अडचण आली नाही. मात्र गोकुळ आपल्या ताब्यात रहावा यासाठी मल्टिस्टेटचा घाट घातला आहे.'

माजी आमदार सतेज पाटील म्हणाले, 'मल्टिस्टेटसाठी २७८० सभासदांचा पाठिंबा असल्याचा दावा सधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र आमच्याकडे १६०० ठराव आहेत. शनिवारपर्यंत दोन हजार ठराव दाखल होतील. सत्ताधाऱ्यांनी संर्पक दौरे सुरू केले आहेत. त्यांना सभासदांचा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जाते. जर दोन तृतीयांश ठराव सोबत असतील तर त्यांनी गुप्त पद्धतीने मतदान घ्यावे. सभा न गुंडाळता अन्य विषयांवरही प्रश्न विचारायला संधी द्यावी. सत्ताधारी जर सभेला वकील उपस्थित ठेवणार असतील तर बचाव समितीच्या वकिलांनाही उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी.'

'गोकुळ कुणाच्या बापजाद्यांची मालमत्ता नाही' अशी टीका आमदार महादेवराव महाडिक यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आमदार पाटील यांनी, 'गोकुळ महाडिकांच्या बापजाद्यांची मालमत्ता नाही' टोला लगावला. ते म्हणाले, 'कोल्हापूरचे दूध मुंबईला अडवत असल्याने गुंडगिरीत आघाडीवर असलेल्या महाडिकांना टँकर भाड्याने देण्यासाठी आनंदराव पाटील-चुयेकर यांनी आमंत्रित केले. पण टँकर भाड्याने देण्याचे निमित्त करत महाडिकांनी गोकुळवर ताबा मिळवला. आता संघ स्व मालकीचा करण्यासाठी मल्टिस्टेटचा घाट घातला आहे.'

सभेला पैलवानाचा वापर

'मल्टिस्टेटचा ठराव मंजूर करण्यासाठी दूध उत्पादकांऐवजी सत्ताधाऱ्यांनी शाहूपुरी तालीम आणि कराडमधील लोकांशी संपर्क साधल्याची चर्चा सुरू आहे,' असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. 'सभेत बोगस सभासद घुसवले जाऊ नयेत यासाठी शनिवारी रात्री गोकुळ परिसर निर्मनुष्य केला जाणार आहे. सभास्थळी सकाळी आठ वाजल्यापासून सभासदांना सोडण्यात येणार आहे, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली.

दिल्ली बहूत दूर है

'मल्टिस्टेट' ठरावावर गुप्त मतदानाची मागणी आम्ही केली आहे. जर सत्ताधाऱ्यांनी आवाजी मतदान घेतले तर आम्ही कोर्टात जाऊ. त्यामुळे गोकुळ मल्टिस्टेट होणे अशक्य आहे. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की गोकुळ मल्टिस्टेट होणार आहे, तर त्यांनी दिल्ली बहूत दूर है हे लक्षात ठेवावे,' असा टोला मुश्रीफ यांनी मारला.

गोकुळचे नेतृत्व 'पी. एन.' यांच्याकडे देणार

'गोकुळ स्वमालकीचा करण्याचा घाट घालणाऱ्या महाडिकांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी पी. एन. पाटील यांच्याकडे नेतृत्व दिले जाईल,' अशी घोषणा आमदार मुश्रीफ यांनी केली. गोकुळचे ज्येष्ठ संचालक व अध्यक्ष अरुण नरके, अरुण डोंगळे यांच्यासह चंदगड, आजरा, गडहिंग्लजमधील संचालकांना एकत्र केले जाईल. पी. एन व मी एकत्र येणे ही काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होण्याचे संकेत आहेत' असेही मुश्रीफ म्हणाले.

मंत्री जानकरांचे अभिनंदन

जिल्हा सहकारी दूध संघात प्राथमिक दूध उत्पादकांना मतदानाचा अधिकार देण्याची घोषणा करणाऱ्या पशूसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी अभिनंदन केले. 'यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अशीच घोषणा केली होती. आता जानकर यांनी या घोषणेची सुरुवात गोकुळपासून करावी' असे माजी आमदार पाटील म्हणाले. तर जिल्हा मध्यवर्ती बँकेत प्राथमिक सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याची तयारी आहे असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

००००००००

(मूळ कॉपी)

मल्टिस्टेटसाठी गुप्त मतदान घ्या, बचाव समितीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटचा ठराव आवाजी मतदानाने न घेता गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात यावे, अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. दूध उत्पादकांचा आग्रह आणि सहकार कायद्यातील तरतूद लक्षात घेता शनिवारी (२९) दिवसभर गुप्त मतदानासाठी यंत्रणा प्रशासनाने उभारावी, अशी सूचना केली.

आमदार मुश्रीफ म्हणाले, गोकुळ हा जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी घडवला आहे. गेली २५ वर्षे मल्टिस्टेट न करता गोकुळ कर्नाटकासह अन्य राज्यातून दूध संकलन करत आहे. मुंबई, पुणे, गोवा येथे दूध विक्री करत आहे. दुग्धजन्य पदार्थांची विक्री संपूर्ण भारतभर केली जात आहे. गोकुलला दूध संकलन व विक्रीला कधीही अडचण आली नव्हती. पण गोकुळ आपल्या ताब्यात रहावा यासाठी मल्टिस्टेटचा घाट घातला जात आहे. आमची गोकुळवर कधीच सत्ता नव्हती. पण दूध उत्पादकांच्या हक्कावर घाला येऊ नये यासाठी आम्ही लढा देत आहोत.

सतेज पाटील म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडे मल्टिस्टेटसाठी २७८० सभासदांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. आमच्याकडे १६०० ठराव आहेत. शनिवारपर्यंत आमच्याकडे दोन हजार ठराव दाखल होतील. सत्ताधाऱ्यांचा कारभार चांगला आहे. संर्पक दौरे सुरु आहेत. सभासदांचा पाठिंबा मिळत आहे. दोन तृतीयांश ठराव असतील तर त्यांनी गुप्त मतदान पद्धत अवलंबावी. तसेच गोकुळची सभा न गुंडाळता अन्य विषयावर प्रश्न विचारण्यासाठी संधी द्यावी. सत्ताधाऱ्याकडून सभेस वकील उपस्थित राहणार असतील तर बचाव समितीच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी मिळावी.

०००००

सभेला सत्ताधाऱ्याकडून पैलवानाचा वापर

मल्टिस्टेटचा ठराव मंजूर करण्यासाठी दूध उत्पादकांऐवजी सत्ताधाऱ्यांनी शाहूपुरी तालीम व कराडमधील लोकांशी संपर्क साधल्याची चर्चा सुरु आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले. सभेत बोगस सभासद घुसवले जाऊ नयेत यासाठी शनिवारी रात्री गोकुळ परिसर निर्मनुष्य केला जाणार आहे, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. तसेच सकाळी आठ वाजल्यापासून सभासदांना सोडण्यात येणार आहे.

०००००

मल्टिस्टेट होणे अशक्य

मल्टिस्टेटच्या ठरावावर गुप्त मतदानाची मागणी आम्ही केली आहे. जर सत्ताधाऱ्यांनी आवाजी मतदान घेतले तर आम्हाला कोर्टात जावे लागेल. त्यामुळे गोकुळ मल्टिस्टेट होणे अशक्य आहे. सत्ताधाऱ्यांना वाटत असेल गोकुळ मल्टिस्टेट होणार आहे, तर त्यांनी "दिल्ली बहूत दूर है" हे लक्षात ठेवावे, असा टोला मुश्रीफ यांनी मारला.

०००००

गोकुळही त्यांच्या बापजाद्यांची नाही

गोकुळ कुणाच्या बापजाद्यांची मालमत्ता नाही अशी टीका आमदार महादेवराव महाडिक यांनी केली होती. या टीकेला प्रत्युंत्तर देताना आमदार पाटील यांनी गोकुळ महाडिकांच्या बापजाद्यांची मालमत्ता नाही टोला लगावला. कोल्हापूरचे दूध मुंबईला अडवत असल्याने गुंडगिरीत आघाडीवर असलेल्या महाडिकांना टँकर भाड्याने देण्यासाठी आनंदराव पाटील चुयेकर यांनी आमंत्रित केले. पण टँकर भाड्याने देण्याचे निमित्त करत महाडिकांनी गोकुळवर ताबा मिळवला. आता संघ स्वमालकीचा करण्यासाठी मल्टिस्टेटचा घाट घातला जात आहे.

०००००

पी.एन पाटील यांना गोकुळचे नेतृत्व देणार

गोकुळ स्वमालकीचा करण्याचा घाट घालणाऱ्या महाडिकांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी पी.एन. पाटील यांच्याकडे नेतृत्व दिले जाईल्, अशी घोषणा आमदार मुश्रीफ यांनी केली. गोकुळचे ज्येष्ठ संचालक व अध्यक्ष अरुण नरके, अरुण डोंगळे, चंदगड, आजरा, गडहिंग्लजमधील संचालकांना एकत्र केले जाईल. पी.एन व मी एकत्र येणे ही काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होण्याचे संकेत असल्याचेही मुश्रीफांनी स्पष्ट केले.

००००

के.पी. पाटील यांनी केले जानकरांचे अभिनंदन

जिल्हा दूध संघात प्राथमिक दूध उत्पादकांना मतदानाचा अधिकार देण्याची घोषणा करणाऱ्या पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचे माजी आमदार के.पी. पाटील यांनी अभिनंदन केले. जानकर यांनी या घोषणेची सुरुवात गोकुळपासून करावी. यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अशीच घोषणा केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेतही प्राथमिक सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याची तयारी असल्याचे मुश्रीफांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्यांचा कारखान्याचा अहवाल देणाऱ्यांना ५१ हजाराचे बक्षीस देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'श्रीकृष्णाच्या नावाने असणाऱ्या गोकुळच्या सभेत सत्याचा विजय होणार आहे. सभेदिवशी धर्मयुद्ध होणार आहे. आतापर्यंत मल्टिस्टेटच्या बाजूने लोकशाही पद्धतीने ३५५९ पैकी २७८० संस्थांनी लेखी स्वरुपात ठराव दिले आहेत. सभेत मल्टिस्टेटचा ठराव होणारच' असा विश्वास माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 'त्यांचा कारखान्याचा अहवाल देणाऱ्यांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस देऊ' असे आव्हानही त्यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता दिले.

माजी आमदार महाडिक म्हणाले, 'जगात अजून सत्य शिल्लक आहे. त्यामुळे गोकुळच्या सभेत मल्टिस्टेटचा ठराव होईल. राजाराम साखर कारखान्याच्या सभेत आम्ही लोकशाही शिल्लक असल्याचे दाखवून दिले आहे. ही वस्तूस्थिती पत्रकारांनी विरोधकांना जाऊन सांगावी. गेल्यावर्षी गगनबावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा वार्षिक अहवाल देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अजूनही हा अहवाल मला मिळालेला नाही. यावर्षीचा अहवाल आणून देणाऱ्यांना ५१ हजार रुपयांचे बक्षीस देणार आहे. डी. वाय. पाटील पाटील कारखान्याने चुकीच्या पध्दतीने एका रात्रीत ४३०० सभासद कमी केले आहेत. त्यांच्या कारखान्याचे कामकाज सद्दाम हुसेनपेक्षाही जास्त हुकूमशाही पद्धतीने चालते. कारखान्याच्या सभासदांच्या यादीत पुणे, मुंबईतील कॉलेजांतील विद्यार्थ्यांचा नावांचा सामावेश आहे. सोम्या, गोम्यांची नावे घुसडली आहेत. कदमवाडीतील त्यांचे हॉस्पिटल बंद आहे. तरीही सरकारचे अनुदान लाटले जात आहे.'

राजाराम महाराजांचा पुतळा उभारणार

'बावडा शिये रोडवरील मुख्य चौकात छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी,' अशी सूचना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी यावेळी उपस्थित ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना केली. नगरसेवक सुनील कदम, सत्यजित कदम यांनी याबाबत 'स्थायी समितीच्या सभेत ठराव करू,' असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायलंट झोनमधील वाहतुकीकडे दुर्लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनइधी, कोल्हापूर

रंकाळा पदपथ उद्यानाशेजारील क्रशर चौक ते शानिली पॅलेस मार्ग अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. पण या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन करत मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने एकप्रकारे सायलंट झोनमधील वाहतुकीला वाहतूक पोलिसांचे अभय मिळत आहे. परिणामी विरंगुळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. वर्दळीच्या रस्त्यावर घोड्याला झालेल्या अपघातानंतर येथील स्टॉलधारकांचा सर्व्हे करण्याच्या आयुक्तांनी इस्टेट विभागाला केलेल्या सूचना कागदावर राहिल्या आहेत.

रंकाळा टॉवर ते राजकपूर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असताना हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. ड्रेनेजलाइनच्या कामाला अनेक दिवस विलंब लागला. काम रेंगाळत गेल्यानंतर राधानगरीकडे जाणारी एसटी वाहतूक पदपथ उद्यानाशेजारील रस्त्यावरुन वळवण्यात आली. एसटीला प्रवेश दिल्यानंतर इतर अवजड वाहनांनी या मार्गावर घुसखोरी केली. त्यापूर्वी या मार्गावरुन अवजड वाहतूक होऊ नये, यासाठी इराणी खण येथे अडथळा निर्माण केला होता. पण एसटीला मार्ग करुन देताना हे अडथळे काढण्यात आले. परिणामी, सायलंट झोनमधून सर्वच प्रकारच्या वाहतुकीला सुरुवात झाली. रंकाळा टॉवर ते राजकपूर पुतळ्यापर्यंतच्या रस्त्याचे काम संपून तो मार्ग वाहतुकीस सुरू झाला. तरीही पदपथ उद्यानाशेजारील वाहतूक बंद करण्यास पोलिस, महापालिकेने दुर्लक्ष केले.

रंकाळा तलावावर स्थानिक नागरिकांसह पर्यटक दररोज हजेरी लावत असतात. पर्यटकांच्या दररोजच्या गर्दीमुळे तलावाला खाद्यपदार्थांच्या स्टॉलने वेढा दिला आहे. स्टॉलधारकांची गर्दी वाढत असताना लहान मुलांसाठी घोडेस्वारी, लहान मोटारी यांची गर्दी नित्याची असते. त्यामुळे सायंकाळी येथे वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहतूक कोंडीतून पादचारी मार्ग काढत असतात. एक महिन्यापूर्वी अशा वाहतूक कोंडीमुळे घोड्याला ट्रकने धडक दिली होती. अपघातामध्ये घोड्याचा मृत्यू झाला. अशाच प्रकारची जीवितहानी होऊ नये, यासाठी काहींनी महापालिका यंत्रणेकडे धाव घेऊन स्टॉलधारक, खेळणी याची पाहणी करत मार्ग वाहतुकीला बंद करण्याची मागणी केली.

महापालिकेने तातडीने रंकाळा परिसरात वाढलेल्या स्टॉलधारकांची मोजणी करण्याच्या सूचना केल्या. पण या सुचनांची एक महिन्यानंतरही अंमलबजावणी झालेली नाही. महापालिका प्रशासनाप्रमाणे वाहतूक पोलिस विभागाने रंकाळा ते राज कपूर पुतळ्यांपर्यंतच्या मार्गाची पाहणी करुन सायलंट झोन मार्गावरील वाहतूक बंद करण्याचे जाहीर केले. पण, यानंतरही दोन्ही यंत्रणा सुस्तच राहिल्या. परिणामी सायलंट झोन मार्गावरून वाहतूक सुरू असल्याने येथील जैवविविधताही धोक्यात येऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यागराज पेंढारकर यांचे निधन

$
0
0

कोल्हापुर:

गेल्या सहा दशकांपासून सिनेमांचे छायालेखन करणारे व कृष्णधवल ते रंगीत सिनेमांच्या प्रवासाचा चालताबोलता इतिहास असलेले ज्येष्ठ कॅमेरामन त्यागराज बाबूराव पेंढारकर (वय ९३) यांचे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता वृद्धापकाळाने कोल्हापुरातील निवासस्थानी निधन झाले. सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चित्रकर्मी भालजी पेंढारकर व व्ही. शांताराम यांचे ते पुतणे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा महेश, मुलगी तेजस्विनी, सून अनघा पेंढारकर असा परिवार आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे पेंढारकर गेल्या काही वर्षापासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. वयोमानामुळे त्यांच्या तब्येतीत चढउतार होत होता. दरम्यान, गेल्या आठवड्यात त्यांना कमी रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने खासगी रूग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर तब्येतीत सुधारणा होत होती. रूग्णालयातून त्यांना घरी आणण्यात आले. मात्र शुक्रवारी पहाटे त्यांना पुन्हा कमी रक्तदाबाचा त्रास सुरू झाला व त्यांची प्राणज्योत मालवली. ‘पडद्यामागचा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ ग्राफीक्स००००

$
0
0

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ ही जिल्ह्यातील दूध संस्थांची शिखर संस्था. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करून जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन करतात. त्यातून अनेक कुटुंबांना उभारी मिळाली. संघाच्या माध्यमातून जिल्ह्यात श्वेतक्रांती घडून आली.

०००००

गोकुळ स्थापना १६ मार्च १९६३

सभासद ३६५९

शेअर भांडवल ४२ कोटी ५९ लाख ९८,५०० रुपये

रिझर्व्ह फंड ३२ कोटी ८९ लाख ६,८०७ रुपये

इतर फंड १ अब्ज ९५ कोटी ५८ लाख ८७,२३५ रुपये

खेळते भांडवल ६ अब्ज ६९ कोटी ९३ लाख ८५,७४२ रुपये

नफा ६ कोटी ९० लाख ८३८ रुपये

डिव्हिडंड ११ टक्के

वार्षिक उलाढाल २१३९ कोटी २८ लाख २७ हजार रुपये

०००००

२७ सप्टेंबर २०१८ रोजीचे दूध संकलन (लिटरमध्ये)

शीत केंद्र म्हैस दूध गाय दूध एकूण दूध

गोकुळ २,५०,९४५ २,७०,८७८ ५,२१,८२३

बोरवडे ७४,७८६ १,०१,८७२ १,७६,६५८

लिंगनूर ८८,३९० ३८,८३९ १,२७,२२९

तावरेवाडी ५५,६९२ २६,०२६ ८१,७१८

गोगवे ४४,१२३ ४१,७८७ ८५,९१०

शिरोळ ३९,६४६ ७५,४२५ १,१५,०७१

एकूण दूध ५,५३,५८२ ५,५४,८२७ ११,०८,४०९

गतवर्षी दूध ४,४४,२६५ ६,१२,२९६ ५१,८४८

एकूण दूध लिटर्स १०,७८,५२२

वार्षिक सरासरी दूध लिटर्स ११,५९,००१

म्हैस दूध २०३१ लाख लिटर्स

गाय दूध २११९ लाख लिटर्स

०००००

२०१७-२०१८ मधील वार्षिक दूध संकलन ४१.८८ कोटी लिटर्स

परराज्य व परजिल्ह्यातील वार्षिक दूध संकलन १४७.५४ लाख लिटर्स

०००००००

वर्षभरातील दुग्धजन्य पदार्थ (मेट्रिक टन)

दुग्धजन्य पदार्थ उत्पादन

दूध भुकटी ६११२

देशी बटर ४८२६

कुकिंग बटर १९

टेबल बटर १४०

श्रीखंड १८०

पनीर ८५

दही १४७

तूप २,३७,००० (लिटर्स)

लस्सी ४९,००० (लिटर्स)

ताक ५,६७,००० (लिटर्स)

००००००

मुख्यालय, पुणे, नवी मुंबईतील पिशवीबंद दूध विक्री (आकडे लाख लिटर्स)

दुधाचा प्रकार मुख्यालय पुणे वाशी एकूण

फूल क्रीम दूध ५५३ ६८३ १४९२ २७२८

गाय दूध २६ ५६ ७९१ ८७३

टोण्ड दूध २३ ०० १६० १८३

गोकुळ लाइफ ०० ०० १०८ १०८

स्टँडर्ड दूध ०० ०२ ०० ०२

एकूण दूध ६०२ ७४१ २५५१ ३८९४

०००००

पशुवैद्यकीय कामाचा अहवाल

पशवैद्यकीय केंद्रे ३०

फिरते पशुवैद्यकीय दवाखाने ४५

समाविष्ट गावे १८७३

समाविष्ट संस्था ५४७२

००००००००००००००००००००

मूळ कॉपी......

गोकुळ स्थापना १६ मार्च १९६३

सभासद ३६५९

शेअर भांडवल ४२,५९,९८,५०० रुपये

रिझर्व्ह फंड ३२,८९,०६,८०७

इतर फंड १,९५,५८,८७,२३५

खेळते भांडवल ६,६९,९३,८५,७४२

नफा ६,९०,००,८३८

डिव्हिडंड ११ टक्के

वार्षिक उलाढाल २१३९ कोटी २८ लाख २७ हजार रुपये

०००००

२७ सप्टेंबर २०१८ दिवशीचे दूध संकलन (लिटरमध्ये)

शीत केंद्र म्हैस दूध गाय दूध एकूण दूध

गोकुळ २,५०,९४५ २,७०,८७८ ५,२१,८२३

बोरवडे ७४,७८६ १,०१,८७२ १,७६,६५८

लिंगनूर ८८,३९० ३८,८३९ १,२७,२२९

तावरेवाडी ५५,६९२ २६,०२६ ८१,७१८

गोगवे ४४,१२३ ४१,७८७ ८५,९१०

शिरोळ ३९,६४६ ७५,४२५ १,१५,०७१

एकूण दूध ५,५३,५८२ ५,५४,८२७ ११,०८,४०९

गतसाल दूध ४,४४,२६५ ६,१२,२९६ ५१,८४८

एकूण दूध लिटर्स १०,७८,५२२

वार्षिक सरासरी दूध लिटर्स ११,५९,००१

म्हैस दूध २०३१ लाख लिटर्स

गाय दूध २११९ लाख लिटर्स

०००००

२०१७-२०१८ मधील वार्षिक दूध संकलन ४१.८८ कोटी लिटर्स

परराज्य व परजिल्ह्यातील वार्षिक दूध संकलन १४७.५४ लाख लिटर्स

००००

वर्षभरातील दूग्धजन्य पदार्थ (मेट्रिक टन)

दूग्धजन्य पदार्थ उत्पादन

दूध भुकटी ६११२

देशी बटर ४८२६

कुकिंग बटर १९

टेबल बटर १४०

श्रीखंड १८०

पनीर ८५

दही १४७

लिटर्समध्ये

तूप २,३७,०००

लस्सी ४९,०००

ताक ५,६७,०००

००००००

मुख्यालय, पुणे, नवी मुंबईतील पिशवीबंद दूध विक्री (आकडे लाख लिटर्स)

दूधाचा प्रकार मुख्यालय पुणे वाशी एकूण

फूल क्रीम दूध ५५३ ६८३ १४९२ २७२८

गाय दूध २६ ५६ ७९१ ८७३

टोण्ड दूध २३ ०० १६० १८३

गोकुळ लाईफ ०० ०० १०८ १०८

स्टँडर्ड दूध ०० ०२ ०० ०२

एकूण दूध ६०२ ७४१ २५५१ ३८९४

०००००

पशुवैद्यकीय कामाचा अहवाल

पशवैद्यकीय केंद्रे ३०

फिरते पशुवैद्यकीय दवाखाने ४५

समाविष्ट गावे १८७३

समाविष्ट संस्था ५४७२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिस्टेटआडून लोकसभेची बांधणी

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर: जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) आजच्या सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटचा ठराव मांडला असून, आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी बचाव समितीच्या माध्यमातून विरोध सुरू केला आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यांतील सर्वपक्षीय नेते बचाव कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र आले आहेत. त्यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीची मोट बांधण्याचे संकेत मिळू लागले आहेत; पण सध्या शिवसेना, शेकाप सोबत असली तरी लोकसभा निवडणुकीत त्यांची भूमिका बदलण्याची शक्यता आहे.

'गोकुळ'चे नेतृत्व माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, खासदार धनंजय महाडिक करत आहेत, तर मल्टिस्टेटच्या ठरावाला आमदार पाटील, मुश्रीफ यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. विरोधाला व्यापक रूप देण्यासाठी गोकुळ बचाव कृती समितीची स्थापना केली आहे. समितीत पक्ष, भेद विसरून स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, जनसुराज्य शक्ती या पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.

मल्टिस्टेटविरोधात आमदार पाटील व मुश्रीफ गटाने पुन्हा महाडिक गटाविरोधात शड्डू ठोकला आहे. त्यातून त्यांनी लोकसभा निवडणुकीची चाचपणीही केल्याची चर्चा आहे. मल्टिस्टेटविरोधात पाटील, मुश्रीफ यांना आमदार चंद्रदीप नरके, खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संपतराव पवार-पाटील, मंडलिक गटाचा पाठिंबा मिळत आहे. मल्टिस्टेटच्या माध्यमातून महाडिक गटाविरोधात मोट बांधली जात आहे, पण भाजपसह विविध तालुक्यांतील अनेक गट महाडिक यांच्यासोबत आहेत. गोकुळचे संचालक त्यांच्यासोबत आहेत. काही नेतेमंडळी कुंपनावर असून, प्रत्यक्ष निवडणुकीवेळी ते आपली भूमिका बदलण्याची शक्यता आहे. नरके, घाटगे, आमदार नरसिंगराव पाटील गटाच्या भूमिका लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार व पक्ष लक्षात घेऊन ठरविल्या जाणार आहेत. तरीही मल्टिस्टेटला विरोध करताना महाडिक गट हेच लक्ष्य ठेवताना लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी आघाडी होऊ शकते याची चाचपणी सुरू आहे.

विधानसभा मतदारसंघ सत्ताधारी विरोधक

करवीर पी. एन.पाटील, अरुण नरके आमदार नरके, माजी आमदार पवार-पाटील

कागल रणजित पाटील, अंबरीश घाटगे आमदार मुश्रीफ, मंडलिक गट

गडहिंग्लज आमदार कुपेकर, रवींद्र आपटे, राजेश पाटील, दीपक पाटील -----

राधानगरी अरुण डोंगळे, देसाई गट के. पी. पाटील, दिनकरराव जाधव गट

पन्हाळा-शाहूवाडी आमदार पाटील, विश्वास जाधव, नरके गट, कोरे, करण गायकवाड गट

शिरोळ अनिल यादव खासदार शेट्टी, आमदार उल्हास पाटील

कोल्हापूर दक्षिण महाडिक गट आमदार पाटील गट

मल्टिस्टेटपासून अलिप्त

मल्टिस्टेटच्या वादापासून आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर अलिप्त आहेत. आबिटकर जरी शिवसेनेचे आमदार असले तरी त्यांचे पी. एन. पाटील आणि संजय मंडलिक यांच्याशी चांगले संबंध असल्याने ते अलिप्त आहेत. आमदार क्षीरसागर, हाळवणकर, डॉ. मिणचेकर या तीनही आमदारांचा गोकुळच्या राजकारणाशी संबंध आला नसल्याने ते अलिप्त आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक स्पर्धेसाठी रेश्माची निवड

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी कुस्तीपटू रेश्मा मानेची निवड झाली. ही स्पर्धा रुमानिया येथे होणार आहे. राजस्थान येथील चितोडगडमध्ये झालेल्या २३ वर्षाखालील वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिने ६५ किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तिने उत्तर प्रदेशच्या जस्मिनला पराभूत केले. तसेच केरळच्या वीणालाही तिने अस्मान दाखवले. हरयाणाच्या मोनियावर आकडी डावावर ६-२ अशा गुणांनी विजय मिळवला. तर दिल्लीच्या रौनकला १२-२ अशा गुणांनी नमवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हरकतींमधील त्रुटी दूर करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये नवीन रस्त्यांसाठी आरक्षण टाकताना जुन्या रस्त्यांचा विचार करण्यात आलेला नाही. आराखड्यामध्ये करवीर तालुक्यातील अनेक गावामधून अनावश्यक रस्ते गेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची घरे, शेती यांचे नुकसान होणार आहे. परिणामी दाखल केलेल्या हरकतींमधील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी त्रिसदस्यी समितीसमोर शनिवारी केली. यावेळी आर्किटेक्ट असोसिएशनच्यावतीने व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे आराखड्यातील त्रुटी निदर्शनास आणल्या.

जिल्ह्याचा प्रादेशिक आराखडा मंजूर झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून निवृत्त उपसंचालक वाय. एस. कुलकर्णी, प्रादेशिक योजनेचे उपसंचालक शिवराज पाटील व मिलिंद किणेकर या त्रिसदस्यीय समितीसमोर सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान आर्किटेक्ट असोसिएशनच्यावतीने व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे आराखड्यातील त्रुटी निदर्शनास आणल्या. यावर २६ प्रकारच्या सूचना करत उपाययोजनाही सूचवल्या आहेत. तीन दिवसांत करवीर तालुक्यातील जनसुनावणी पूर्ण झाली असून आराखड्यावर पुराव्यासह हरकती दाखल झाल्या आहेत. 'करवीर तालुक्यातील जनसुनावणी पूर्ण झाली असून आठ ते दहा ऑक्टोंबरपर्यंत गडहिंग्लज तालुक्यात जनसुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत अहवाल राज्य सरकारला पाठवणार असल्याचे महापालिकेचे सहायक नगररचनाकार धनंजय खोत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शौर्यदिनी वीरमाता, वीरपत्नींचा सत्कार

$
0
0

शौर्यदिन साजरा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भारत माता की जय, वंदे मातरम' आणि राष्ट्रगीताच्या जयघोषात शौर्य दिन सैनिक कल्याण कार्यालयच्या वतीने साजरा करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी, माजी सैनिक यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम कसबा बावडा रोड येथील सैनिक दरबार हॉल येथे पार पडला.

भारतीय सैन्यदलाने २९ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राइकद्वारे २५० अतिरेक्यांचा खात्मा केला होता. या दिवसाचे औचित्य साधून राज्य सरकारने २९ सप्टेंबर हा शौर्यदिन राज्यभरात साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक संघटना, युद्ध विधवा, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवृत्त मेजर जे. नलवडे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रमेश राजगिरे, माजी पोलिस अधिक्षक वसंत बागल, प्रवीण चौगुले, आनंदा वरेकर, महाराष्ट्र राज्य माजी सैनिक लीगचे उपाध्यक्ष एन.एन. पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मल्टिस्टेट व अन्य कारणावरील कामकाजावरुन सत्ताधारी गट व विरोधी गटामधील संभाव्य तणावाची शक्यता, तसेच विविध पक्ष, संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. रविवारी (३०)सकाळी सात वाजल्यापासून आदेशाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी, यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये रविवारी सकाळी सात वाजल्यापासून बुधवारी तीन ऑक्टोबर रोजी रात्री मध्यरात्री वाजेपर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम कामगारांचा २२ रोजी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी २२ ऑक्टोंबर रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी तालुकास्तरावर मेळावे आयोजित करुन कामगारांची जनजागृती करणार आहे,' अशी माहिती जिल्हा अध्यक्ष भरमा कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कांबळे म्हणाले, 'बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सुमारे नऊ हजार कोटी रुपये शिल्लक आहेत. शिल्लक रकमेतून महामंडळाकडे सुमारे ८०० कोटी रुपयांचे व्याज जमा होत आहे. मंडळाकडे शिल्लक रक्कम असताना त्याचा फायदा देण्याऐवजी कामगारांसाठी असणारी वैद्यकीय विमा योजना विद्यमान सरकारने बंद केली. सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात जनजागृती करुन मोर्चा काढण्यात येणार आहे.'

जिल्हा सचिव शिवाजी मगदूम म्हणाले, 'राज्यात बांधकाम कामगारांची नोंदणी वाढत असताना कामगारांना लाभ देण्याऐवजी किंवा नोंदणीकृत कामगारांना वेळेत सेवापुस्तक दिली जात नाहीत. परिणामी महामंडळाचे स्वतंत्र कार्यालय स्थापण करुन आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी संघटना सातत्याने करत आहे. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याने मंडळाकडून मिळणाऱ्या लाभापासून बांधकाम कामगार वंचित राहिले आहेत. बांधकाम कामगारांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या तयारीसाठी तालुकास्तरीय मेळाव्यांना तीन ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी करवीर तालुक्यातील बांधकाम कामगारांचा मेळावा होणार असल्याचे मगदूम यांनी सांगितले.'

पत्रकार बैठकीस प्रकाश कुंभार, भगवानराव घोरपडे, संदीप सुतार, विक्रम खतकर, आनंदा कराडे, रमेश निर्मळे, कुमार कागले, विजय कांबळे, दत्ता गायकवाड, विलास कांबळे, अजित मगदूम, विजय राजिगरे, प्रकाश पोवार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा महोत्सव स्थगित

$
0
0

निवेदन स्वीकारण्यास पालकमंत्र्यांचा नकार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राध्यापकांच्या प्रलंबित मागण्यासाठी सुरू असलेला संप मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने २ ऑक्टोंबर रोजी होणारा शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव स्थगित करण्यात आला. दरम्यान, प्राध्यापक संघटनांच्या काही प्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अंबाबाई मंदिर परिसरात निवेदन देण्याचा प्रयत्न केला असता निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्याचे महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघाने कळविले आहे.

पालकमंत्री पाटील सकाळी ११ वाजता अंबाबाई मंदिर येथे आले होते. त्यावेळी एमफुक्टोचे प्रा. सुभाष जाधव, प्रा. अरुण शिंदे, डॉ. सयाजीराव पाटील, प्रा. अण्णासाहेब चौगुले हे त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले नाही, हा संघटनेचा अवमान असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

दरम्यान २ ऑक्टोंबरपासून सुरू होणारा युवा महोत्सव संपामुळे स्थगित करण्यात आला. डॉ. डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमधील काही प्राध्यापक आंदोलनात सहभागी नव्हते. त्यांना आंदोलनात सहभागी करुन घेण्यासाठी 'सुटा'तर्फे संबंधित कॉलेजसमोर जाऊन निदर्शने केली. यानंतर प्राध्यापक आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी तासिका तत्वावरील प्राध्यापकांची बैठक रविवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता टाऊन हॉल येथे आयोजित केली आहे. त्यासाठी सीएचबी प्राध्यापकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जाधव यांनी केले आहे.

'सुटा'चे नेते प्रा. सुधाकर मानकर, डॉ. अरुण पाटील, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. आर. जी. कोरबू यांनी कोतोली, कळे येथील कॉलेजिअसना भेटी देऊन प्राध्यापकांना आंदोलनात सहभागी करून घेतले. याप्रसंगी डॉ. आबासाहेब चौगुले, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सयाजीराव पाटील, प्रा, सुनीता अमृतसागर, प्रा. विजय देठे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्रामुळे झाली नरकयातनेतून सुटका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'मॅडम, आम्हाला वाचवा... आम्हाला या नरकातून बाहेर काढा... केवळ तुम्हीच आम्हाला येथून बाहेर काढू शकता...!' अशी त्या पीडित निरागस मुलींची आर्त हाक मंगळवारी सकाळी एका निनावी पत्राद्वारे माझ्यापर्यंत पोहोचली आणि माझी झोपच उडाली... सांगली जिल्ह्यातील कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रशाळेचा संस्थापक अरविंद पवार याने त्याच्याच शाळेतील विद्यार्थिनींवर केलेल्या लैंगिक अत्याचाराची पाळेमुळे खणून काढणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण बोलत होत्या.

मंगळवारी (ता.२५) सकाळी साडेअकरा वाजता पत्र मिळाले. पत्रावर तीन ठिकाणी फक्त पल्लवी मॅडम यांनीच पत्र वाचावे, असा उल्लेख होता. त्यामुळे अत्यंत अगतिकतेने पत्र उघडले. वाचताना अंगाचा थरकाप उडाला. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर इतक्या क्रूरपणे शालेय मुलींवर अत्याचार होतोय, हे वाचून मन सुन्न झाले. तातडीने वरिष्ठ अधिकारी विवेक पाटील यांच्याशी चर्चा केली. उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर काळे यांना आम्ही भेटलो. अत्यंत गोपनीय पद्धतीने त्याच दिवशी मंगळवारी साध्या वेशात शाळेत जाऊन मुलींशी बोललो. मुलींनी सांगितलेले सत्य ऐकताना अंग शहारले. कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. मुली सांगत होत्या, 'पवारची गाडी आली की आम्ही लपायचो. आज कोणाला बोलावणार म्हणून अंग थरथरायचे. रोज नवे सावज हेरण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. त्याला ती स्वयंपाकीण मनीषा कांबळे साथ द्यायची. मॅडम, तिला सोडू नका, तिनेच आम्हाला उद्ध्वस्त केले आहे.'

घटनेबाबत माहिती घेत असताना या कानाची खबर त्या कानाला लागू दिली नाही. कधी सकाळ होतेय आणि त्या नराधमाला जेरबंद करतेय असे झाले होते. मंगळवारीच संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना चौकशीसाठी जाण्याबाबत कल्पना दिली होती. मात्र, चौकशी कोणाची व कशाबाबत करायची याबाबत कमालीची गुप्तता पाळली होती. बुधवारी सकाळीच पवार आणि मनीषा कांबळेला ताब्यात घेतले.

अत्यंत क्रूर कृत्य करणाऱ्या नराधम पवारने असहाय्यतेचा फायदा घेत मुलींवर केलेले अत्याचार माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. पीडित मुलींनी आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना याबाबत न सांगता पोलिसांवर जो विश्वास दाखविला, तो पोलिसांची समाजातील प्रतिमा उंचावणारा आहे. पल्लवी मॅडम यांनीच पत्र वाचावे, मॅडम, तुम्हीच आम्हाला यातून बाहेर काढा ही त्या मुलींची वाक्ये मला हत्तीचे बळ देणारी ठरली. सर्वच वरिष्ठ अधिकारी आणि सहकारी आम्ही सर्वांनी टीम म्हणून काम केले आणि समाजाला लागलेली कीड काही प्रमाणात का होईना, नष्ट केल्याचे समाधान मिळाले, असे चव्हाण सांगतात.

००००

कोट...

ज्यांच्यावर अन्याय होतो, त्यांनी तो सहन न करता मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करावा. कुरळपसारख्या घटनांना दुर्लक्षित करून चालणार नाहीत. समाजाला लागलेली ही कीड मुळापासून उपटून टाकायला हवी. यासाठी सूज्ञ, जाणकार आणि सामाजिक भान असणाऱ्या सामाजिक घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे. अरविंद पवार हे हिमनगाचे टोक आहे. अन्यायग्रस्तांचा आवाज दाबला जातो. तो योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. तरच सामान्य माणसाचा चांगुलपणावर विश्वास बसेल.

पल्लवी चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक

०००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायन समाज देवल क्लब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बहारदार शास्त्रीय गाययाने रंगणाऱ्या गायन समाज देवल क्लबच्या कलादालनमध्ये शनिवारी तबला वादनाचा ताल घुमला. वेगवेगळ्या भागातील कलाकारांनी ताल, झपताल सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली. तसेच तबल्यातील गत, तुकडे, चक्रधार या रचना सुंदररित्या सादर केल्या.

उपज कला केंद्रातर्फे उस्ताद म्हमूलाल सांगावकर स्मृती तबला महोत्सवचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन तबलावादक अरुण जोशी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, डॉ. नंदकुमार जोशी, अरुण डोंगरे, छाया सांगावकर, भोला सांगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन उद्घाटन झाले. दिवसभरात दोन सत्रात तबला वादनाचा कार्यक्रम रंगला. यामध्ये रेवती फाले, जितेंद्र मोरे. सचिन कचोटे, संदेश खेडेकर, प्रणव मोघे, प्रशांत देसाई यांनी तबलावादन केले. याशिवाय तबलावादक वामनराव मिरजकर, संदेश खेडेकर, राजप्रसाद धर्माधिकारी यांनी बहारदार वादन आविष्कार घडवित उपस्थितांच्या टाळया वसूल केल्या. प्रास्ताविक प्रदीप कुलकर्णी यांनी केले. रविवारी सायंकाळी महोत्सवचा समारोप होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यक्रमांचा धडाका लावा

$
0
0

इस्लामपुरातील भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत सूचना

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभेच्या मतदार संघातून भाजपचाच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी व्हायला हवा, त्यासाठी कार्यक्रमांचा धडाका लावा, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना इस्लामपूर येथे झालेल्या भाजपच्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कोअर कमिटीच्या बैठकीत करण्यात आल्या.

बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यापासून सर्वांनी पक्षाच्या आदेशानुसार काम करावे. राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार येण्यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहनही करण्यात आले.

येथील प्रकाश शैक्षणिक संकुलात सांगली, सातारा, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, प्रभारी अॅड. सचिन पटवर्धन, आमदार सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार विलासराव जगताप, डॉ. अतुल भोसले, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख हे दोघेही अनुपस्थित होते.

यावेळी नेत्यांनी सूचना दिल्या. पश्चिम महाराष्ट्रातील या चारही लोकसभा मतदार संघ आणि सर्व विधानसभा मतदार संघ जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची ताकद दिली जाईल. पक्षासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला आणि कार्यकर्त्याला भेदभाव न करता ताकद दिली जाईल. प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना घराघरात पोहचविण्यासाठी काम करावे. ज्या ठिकाणी बूथ पातळीवर काम कमी झाले आहे. त्या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळ देऊन पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बूथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांच्या विशेष बैठका घेऊन पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम होणे आवश्यक आहे. येणाऱ्या निवडणुकीत राज्यात आणि केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी हलगर्जीपणा न करता जोमाने कामाला लागावे. पक्षाचे विचार आणि पक्षाचे काम प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविले पाहिजे. सरकारच्या योजना लाभार्थी पर्यंत पोहचवा. सर्वांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करावे. यापुढे पक्ष वाढीसाठी आणि सर्वसामान्याच्या प्रश्नासाठी झोकून देऊन काम करा, असे आदेश कार्यकर्त्यांना देण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची ही बैठक असल्याने या बैठकीत ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. पक्षाची गोपनीय बैठक असल्याने बैठकीत अन्य कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, याबाबत गुप्तता पाळण्यात येत होती.

इस्लामपूरचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सातारचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार दिनकर पाटील, भगवान साळुंखे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई उपस्थित होते.

दोन तारखेपासून सुरुवात

लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे वातावरणनिर्मिती करण्यासाठी कार्यक्रमांचा धडका लावा, असे आवाहन करताना प्रचाराची रणणिती ठरवण्यात आली. कार्यक्रमांची सुरुवात दोन ऑक्टोबरपासून स्वच्छता मोहिमेने करावी, त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक कार्यक्रम घेण्याचे यावेळी ठरले. लोकांत मिसळा,योजना जनतेत पोहोचवा, तरच कमळ फुलेल, असेही यावेळी सांगण्यात आले.

यांच्यावर जबाबदारी

कोल्हापूर

प्रभारी: मकरंद देशपांडे

संयोजक: महेश जाधव

विस्तारक: शिवाजी बुवा

..........

हातकणंगले

प्रभारी: सचिन पटवर्धन

संयोजक: हिंदूराव शेळके

........

सांगली

प्रभारी: शेखर चरेगावकर

संयोजक: शेखर इनामदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘रेडीरेकनरचा फेरविचार करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने 'ड' वर्ग महापालिका व नगरपालिकेतील गाळेधारकांना रेडीरेकनरनुसार भाडे आकारण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करणारा निर्णय असला, तरी व्यवसायानुसार भाडे आकारणी करावी. अशी आकारणी करताना मटन, चिकन व मासे विक्रेत्यांना व्यवसायिकांना रेडीरेकनर दराचा विचार करावा, अशी मागणी नगरसेवक ईश्वर परमार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रजिस्टर पोस्टाद्वारे केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, नगररचना राज्यमंत्री रणजित पाटील, नगरविकास सचिवांनाही पत्रव्यवहार केला आहे.

पत्रामध्ये म्हटले आहे, '२०१५ च्या निर्णयानुसार महापालिका व नगरपालिकेच्या स्वमालकीच्या दुकानगाळ्यांच्या मासिक भाड्यांचे दरांमध्ये बदल करुन त्या-त्या भागातील चालू रेडिरेकनरनुसार भाडे आकारणी सुरू केली आहे. निर्णयामुळे महापालिकांच्या उत्पन्नात भर पडत असली, तरी दुकानगाळ्यांतून विविध स्वरुपाचे व्यवसाय केले जातात. जे व्यापारी नाशवंत मालाचा व्यापार करतात, अशा व्यापाऱ्यांना अधिक मालाची साठवण करता येत नाही. त्यामुळे त्यांचा व्यवसाय आणि उत्पन्नावर मर्यादा येतात. त्यामुळे अशा मटन, चिकन व मासे विक्री करणाऱ्या दुकानगाळेधारकांना रेडीरेकनरनुसार दर आकारणी संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे अशा व्यवसायिकांना भाडे आकारणी करताना फेरविचार व्हावी अशी मागणी नगरसेवक परमार यांनी केली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समिती स्थापली, कार्यकक्षा ठरेना

$
0
0

लोगो - जिल्हा परिषद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना झाली. पण समितीच्या चौकशीची कार्यकक्षा ठरलेली नाही. अजून समिती सदस्यांना नियुक्तीची पत्रे मिळाली नाहीत. शिक्षणाधिकारी लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला आहे, पण लेखी आदेशाअभावी कारवाई लटकल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी, शिक्षणाधिकारी लोहार यांच्यावर आरोप केले होते. शिक्षक मान्यतेवरुन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सदस्यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामकाजावर टीकास्त्र सोडताना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशीसाठी आक्रमक भूमिका घेतली. सर्वसाधारण सभा होऊन दोन आठवडे उलटल्यानंतर पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांची समिती सचिव म्हणून नियुक्ती झाली. मंगळवारी समिती स्थापन केल्याची घोषणा झाली. त्याचवेळी लोहारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासंदर्भातील लेखी आदेश काढण्यात येणार होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे सोमवारी, मंगळवारी दोन दिवस कार्यालयीन कामासाठी बाहेर असल्याने चौकशी समितीच्या सदस्यांना नियुक्तीची पत्रे मिळाली नाहीत. तसेच लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश निघाला नाही. शुक्रवारी यासंदर्भात कार्यवाही होण्याची शक्यता होती. मात्र वरिष्ठ अधिकारी, प्रमुख पदाधिकारी हे जिल्हा परिषदेत नसल्यामुळे लेखी आदेश निघू शकला नाही. चौकशी समितीतील सदस्यांना पत्रे देताना समितीची कार्यकक्षा निश्चित होणार आहे. मात्र सदस्यांनाही चौकशीसंदर्भातील पत्रे देण्यास विलंब होत आहे. यावरुन जिल्हा परिषदेत वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत.

कर्मचारीही धास्तावले

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या कार्यकक्षेकडे लक्ष लागून राहिले आहे. लोहारांवर सभागृहात झालेल्या आरोपांच्या अनुषंगाने समिती चौकशी करणार की शिक्षकांकडून जाहीरपणे तक्रारी मागवून चौकशी होणार याची रुपरेषा ठरविली जाणार आहे. सदस्यांनी, लोहार यांच्या कामकाजासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्या तक्रारी मागवून चौकशी करावी अशी सदस्यांची मागणी आहे. दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याने अनेकजण धास्तावले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’च्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मल्टिस्टेट'च्या ठरावावरून जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढलेली जिल्हा दूध संघाची (गोकुळ) सर्वसाधारण सभा आज, (रविवार) होणार आहे. सभेत संघ मल्टिस्टेट (बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा) करण्याचा महत्त्वाचा ठराव येणार आहे. हा ठराव महत्त्वाचा असल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी करणारे पत्र आमदार सतेज पाटील यांनी कार्यकारी संचालकांना दिले आहे. त्याचवेळी सभा घाईगडबडीत न गुंडाळता मल्टिस्टेट तसेच अन्य प्रश्नांवर शांततेत सविस्तर चर्चा करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. यामुळे या सभेकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

विरोधकांची रणनीती लक्षात घेऊन मल्टिस्टेट ठराव मंजूर करण्यासाठी सत्ताधारी नेते आणि संचालकांनी कंबर कसली आहे. दरम्यान, सभेच्या पार्श्वभूमीवर सभेच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

ताराबाई पार्क येथील 'गोकुळ'च्या प्रांगणात सकाळी ११ वाजता सभेला प्रारंभ हाईल. या ठिकाणी मोठा मंडप घालण्यात आला आहे. 'गोकुळ'चे ३६५९ सभासद आहे. ही संख्या लक्षात घेऊन ३७०० खुर्च्या मांडल्या आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक अनिल गुजर यांनी सभास्थळाची पाहणी केली. व्यासपीठाच्यासमोर सुरक्षेच्यादृष्टीने 'डी' झोन करण्याची तसेच सभा मंडपात बॅरिकेटस् लावण्याची सूचना त्यांनी केली. प्रवेशद्वाराजवळ व्हिडिओ कॅमेरे लावण्याची सूचनाही पोलिसांनी केली आहे. तसेच सभागृहाच्या बाहेर पोलिसांकडून व्हिडिओद्वारे चित्रीकरण करणार आहेत.

पितळी गणपती ते पोलिस मुख्यालयादरम्यानचा रस्ता रविवारी सकाळी सात वाजल्यापासून सभा संपेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सभेसाठी येणाऱ्या दूध उत्पादकांच्या वाहनांसाठी पोलिस मुख्यालयात पार्किंगची सुविधा करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सभासदत्वाची खात्री करुन सभामंडपात प्रवेश दिला जाणार आहे.

दरम्यान, शनिवारी आमदार सतेज पाटील यांनी 'गोकुळ'च्या कार्यकारी संचालकांना पत्र पाठवले. त्यात मी स्वत: तसेच आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, संपतराव पवार सभेला उपस्थित राहणार असून, व्यासपीठासमोर बैठकीची योग्य दक्षता घ्यावी. तसेच विषयांवर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र माईकची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या

'गोकुळ'च्या सभेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. दोन पोलिस उपअधीक्षक, चार निरीक्षक, १४० पोलिस, ३० वाहतूक पोलिस असा बंदोबस्त असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरुजींचा ‘गोंधळ’ कायम

$
0
0

नोकर भरतीवरून शिक्षक बँकेची सभा गाजली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोकरी भरती आकृतींबधाच्या मंजुरीवरुन प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ झाला. सत्तारुढ गटाने मागील सर्वसाधारण सभेतच आकृतीबंधाला मंजुरी मिळाली आहे, त्या विषयावर पुन्हा चर्चा नको, अशी भूमिका घेत सभा रेटण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी याप्रश्नी आक्रमक भूमिका घेत 'आकृतीबंधचा विषय नामंजूर केल्याशिवाय सभा चालू देणार नाही', असा इशारा दिला. सत्ताधारी व विरोधकांच्या मंजूर, नामंजूराच्या घोषणांत चेअरमन साहेब शेख यांनी 'विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर' म्हणत सभा संपवली.

दरम्यान सभेत बोलताना चेअरमन साहेब शेख यांनी 'बँकेला यंदा दोन कोटी ४९ लाख रुपयांचा नफा झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लाभांश वाटपास मान्यता दिली असून त्यानुसार पाच टक्के लाभांश करण्यात येत असल्याची घोषणा चेअरमन शेख यांनी केली. आयर्विन मल्टिपर्पज हॉल येथे शनिवारी दुपारी दोन वाजता बँकेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम ठेवण्याचा पहिल्याच विषयावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले.

दोन तासांच्या गोंधळानंतर दोन मिनिटात सर्व विषयांना मंजुरी देत सभा गुंडाळण्याचा प्रकार झाला. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदविला. या गोंधळात व्यासपीठावरील बँकेच्या सर्वसाधारण सभेचे पोस्टरही काहींनी फाडले. सभेनंतर, विरोधकांनी समांतर सभा घेत 'सत्ताधाऱ्यांनी सभासदांच्या भावना पायदळी तुडविल्या. सत्तारुढ संचालकांनी 'वंदे मातरम' चुकीच्या पद्धतीने म्हणत सभा गुंडाळली. नोकर भरती ही सत्तारुढ गटातील ठराविक बगलबच्च्यांच्या हिताची आहे,' अशी कडवट टीका केली. विरोधी गटाचे जोतिराम पाटील, रवीकुमार पाटील, शंकरराव मनवाडकर, कृष्णात कारंडे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

मागील सभेतील विषयपत्रिकेतील तेरा क्रमांकावरील 'नोकर भरती आकृतीबंध'हा विषय नामंजूर असताना इतिवृत्तात त्या संदर्भात नोंद का केली नाही? असा मुद्दा मांडत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. सीईओ कुलकर्णी यांनी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यावर 'तुम्ही बँकेचे चेअरमन आहात की व्यवस्थापक? सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे सत्तारुढ संचालकांनी द्यावीत. तुम्ही कोण?' असे खडेबाल सुनावले. 'सभा गुंडाळण्याचा प्रयत्न केला तर एकाही संचालकांनाला व्यासपीठावरुन खाली उतरू देणार नाही,' असा इशारा यावेळी दिला. चर्चेत कृष्णात पाटील, कृष्णात धनवडे, मारुती दिंडे आदींनी सहभाग घेतला. व्हाइस चेअरमन स्मिता डिग्रजे यांनी सभासदांचे स्वागत केले.

अहवालाच्या पहिल्याच पानावर चूक

बँकेची ८० वी वार्षिक सर्वसाधारण सभा होती. मात्र अहवाल पुस्तिकेच्या पहिल्याच पानावर २०१७ व १८ ची ७९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा असा उल्लेख केला होता. सभासदांनी या चुकीवरुन सत्तारुढ संचालक व बँक व्यवस्थापनाच्या कामाचा पंचनामा केला. संचालक मंडळ योग्य अहवाल तयार करू शकत नाही, यावरुन त्यांचे लक्ष नेमके कुठे होते असा मार्मिक टोलाही सभासदांनी लगाविला.

...तर चेअरमनपदाचा राजीनामा

चेअरमन शेख यांनी आरबीआयने पाच टक्के लाभांश वाटपास परवानगी दिली असल्याचे सभेत सांगितले. यावरुन विरोधी गटांनी त्या संदर्भात आरबीआयचे पत्र दाखवा, पत्राशिवाय खोटी माहिती देऊन सभासदांची दिशाभूल करू नका, असे म्हटल्यावर सत्तारुढ संचालक व विरोधकांत खडाजंगी उडाली. यावर चेअरमन शेख यांनी आरबीआयचे पत्र सभागृहात सादर करतो, माहिती खोटी निघाल्यास बँकेच्या चेअरमनपदाचा राजीनामा देतो, असे खुले आव्हान दिले. शेख यांनी सभागृहात आरबीआयचे पत्राचे जाहीर वाचन करून विरोधकांना उत्तर दिले.

'भरतीसाठी वीस लाख रुपये घेतले'

बँकेत १०६ कर्मचारी आहेत. बँकेच्या कामकाजासाठी कर्मचारी पुरेसे असताना १४९ कर्मचाऱ्यांच्या भरतीचा अट्टाहास कशासाठी. जादा कर्मचारी भरती करून बँक डबघाईला आणू नका. बँकेचे तुम्ही विश्वस्त आहात, मालक नाही, असेही सभासदांनी सुनावले. शिक्षक नेते रवीकुमार पाटील यांनी आरोप केला, ते म्हणाले, 'बँकेत कर्मचारी भरतीसाठी काही संचालकांनी २०-२० लाख रुपये घेतलेत. त्यासाठी नोकर भरतीचा खटाटोप आहे. संचालकांच्या बगलबच्चांसाठी ७५०० सभासदांच्या चुलीत पाणी ओतू नका', असा इशारा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिस्टेट फोकस, नेत्यांच्या प्रतिक्रिया

$
0
0

'गोकुळ'च्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटचा ठराव मांडण्यात येणार आहे. मल्टिस्टेटवरून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. मल्टिस्टेटवर नेत्यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया...

००००

मल्टिस्टेटचा निर्णय आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. मल्टिस्टेटनंतर नव्या निवडणुकीवेळी कर्नाटकातील संस्था मतदार नसतील. गोकुळचे नेतृत्व कधीच निवडणुकीची भीती बाळगत नाही. गोकुळमध्ये चांगला कारभार सुरू असताना राजकारणातून विरोध होत आहे. विरोधकांची धडपड केविलवाणी आहे. त्यामुळे दूध उत्पादकांना मल्टिस्टेटचा ठराव हिताचा वाटला तरच ते पाठिंबा देतील, अन्यथा ठराव नामंजूर होईल.

महादेवराव महाडिक, माजी आमदार

००००००

लोकशाही मार्गाने दूध उत्पादकांकडून मल्टिस्टेटला विरोध करत आहोत. मल्टिस्टेटमुळे मूळ सभासदांचे अस्तित्व नष्ट होणार आहे. गेल्या तीन वर्षांत कर्नाटकातील दूध संकलन केल्याने संघाला कोट्यवधीचा फटका बसल्याचे ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. कर्नाटकातील संस्था वाढवून त्यांचे मतदान मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दूध उत्पादक व संघांना अनेक प्रलोभने दाखवून ठराव मंजूर करण्याची खेळी रचली जात आहे.

सतेज पाटील, आमदार

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images