Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सिनेमातला राजादादा

$
0
0

ज्येष्ठ कॅमेरामन यांचे त्यागराज पेंढारकर यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्याविषयी जागवलेल्या आठवणी...

.. .. .. ..

यशवंत भालकर

.. .. .. ..

मराठी आणि हिंदी चित्रसृष्टी समृद्ध करण्यासाठी गेल्या ७०-८० वर्षांत अनेक घराण्यांचे योगदान फार मोठे आहे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीची घडी बसवून देण्यापासून मास्टर विनायक या गुणी कलाकार दिग्दर्शकास निर्माता म्हणून उभे करणाऱ्या नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर यांचे छायालेखक त्यागराज पेंढारकर उर्फ राजादादा हे चिरंजीव. एका नटश्रेष्ठाच्या पोटी जन्म घेतलेल्या त्यागराज यांनी छान उंची असताना अभिनयाचा मार्ग न धरता सुरुवातीला दिग्दर्शन विभाग व नंतर थेट मुंबई गाठून चित्रपती व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत जावून छाया लेखनाचे धडे गिरवणे सुरु केले.

आभाळाएवढा बाप पाठीशी. भालजी पेंढारकरांसारखे काकागुरु आणि व्ही शांतारामांची चाणक्ष नजर. सिनेमात फक्त संधी मिळणं महत्त्वाचे असते. जो त्या संधीचे सोनं करतो, जीवाचं रान करतो, ही संधी पुन्हा नाही हे ज्याला कळते तोच खरा कलाकार तंत्रज्ञ.

आज साठ वर्षांपूर्वीच म्हणजेच १९५८ साली व्ही. शांताराम यांची जगभर गाजलेला 'दो आँखे बारा हाथ' हा त्यागराजदादांचा पहिला चित्रपट. त्यांच्या आयुष्याचे सोनं करुन गेला. आजही जेलरची दाढी करत असताना कैद्याचे थरथरणारे हात, तो आरशातला क्लोज... मोठे जेलर बाबूराव पेंढारकरांचे, पायाचे, बुटाचे थरकाप उडवणारे शॉट या साऱ्यांत कॅमेरामन त्यागराज यांचे कसब दिसून आले.

१९६० च्या 'नवरंग'ने त्यागराज यांना छायालेखक म्हणून खूप प्रसिद्धी आणि यश मिळविले. पुढे अनेक चित्रपट केले. राजकपूर यांचा 'दिवाना,' जेमिनीचा 'समाज को बदल डालो' १९७३ चा शाहीर दादा कोंडके यांचा 'आंधळा मारतो डोळा' १९७४ चा रंगीत 'राजा शिवछत्रपती,' त्यानंतर अनेक गुजराती चित्रपट राजादादाच्या हातून यशस्वी झाले. चंद्रकांत मांडरे यांचा तो राजा तर सूर्यकांत बेबी शकुंतला, माधवी देसाई, प्रभाकर पेंढारकर यांचा राजादादा.

छायालेखक त्यागराज पेंढारकर हा खरंच राजा माणूस होता. अत्यंत शिस्तप्रिय, शांत स्वभावाचे. १९८५ सालचा दिलीपराज चित्र, पुणे यांच्या दिग्दर्शक भास्कर जाधव यांच्या 'देवाशपथ खरं सांगेन,' या चित्रपटावेळी मी भास्कररावांचा प्रमुख सहायक दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यागराजदादांशी छान गट्टी जमली. पुढे आदरयुक्त मैत्री. त्यागराजदादांचे कोल्हापुरातील वास्तव्य आम्हा चित्रपटसृष्टीतील लोकांच्यादृष्टीने वैभव होते.

माझ्या 'मला भेटलेली मोठी माणसं,' या पुस्तक प्रकाशनाला ते तब्येत बरी नसताना आले. प्रकाशन सोहळ्यानंतर बरोबर दोन दिवसांनी त्यागराजदादांचा फोन आला. 'यशवंतराव' वेळ असेल तर फ्रेंड कॉलनीत घरी चहाला या. दादांनी सगळे पुस्तक एकटाक वाचले होते. माझे भरभरुन कौतुक केले. काकीकडून एक भेटवस्तू मागवली. त्यांनी शालिनी सिनेटोन परिसरात काढलेला सूर्योदयाचा फोटो माझ्या हातात ठेवला. माऊंटवरच होता. 'ओळखा फोटो..' एका तारेच्या कुंपणाचा संदर्भ घेत मी पटकन् बोललो. 'शालिनी स्टुडिओ परिसर,' 'शाब्बास हा तुम्हाला बक्षीस.' मी भारावलो. 'दो आँखे बारा हात,' 'नवरंग' सारख्या यशस्वी चित्रपटाच्या छायालेखकानी दिलेला तो फोटो मी कपाळाला लावला. फोटो घरी घेऊन सरळ शिवाजी चौकात गेलो. भोरीच्या दुकानात फ्रेम करण्यास टाकला. सायंकाळी घेऊन आलो. आज तो फोटो माझ्या बेडरुममध्ये आहे. त्यावर मी त्यांची ह्ट्टाने स्वाक्षरी घेतली होती.

श्रीकांत डिग्रजकरांचा सकाळी सकाळी फोन आला. मी म्हणालो 'सुप्रभात' डिग्रजकर म्हणाले, 'राजादादा गेला' पेंढारकर परिवारातील चित्रपटाशी नाळ असणारा शेवटचा तारा खळकन निखळून पडल्याचा भास मला झाला. त्यागराज पेंढारकर सिनेमातला राजादादा आम्हाला पोरकं करुन गेला. पण असंख्य कलाकृती मागे ठेवून. त्यांच्या डोळ्यांनी टिपलेली चित्रं आता आपल्या डोळ्यात आसवं आणून पहायची.

(लेखक ज्येष्ठ दिग्दर्शक आहेत.)

.. .. .. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गोकुळ दूध संघाच्या सर्वसाधारण सभेत तुफान राडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकूळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याच्या ठरावावरुन दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये तुफान राडा झाला.

आमदार सतेज पाटील आणि महादेव महाडिकांचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. चप्पलफेक, धक्काबुक्कीने दोन्ही बाजूचे नेते व कार्यकर्ते भिडल्याने सभेत धुमश्चक्री उडाली. व्यासपीठापर्यंत चप्पल फेकण्यात आल्या. या राड्यानंतर काही मिनिटांतच सभा गुंडाळावी लागली.

सभेदरम्यान एक रुग्णवाहिकाही फोडण्यात आली. तसेच दुधाच्या व चिवड्याच्या पिशव्या फेकण्यात आल्या. पत्रे उचकटून सभेमध्ये घुसण्याचा प्रकार झाला. गोकुळच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभा प्रचंड तणाव व गोंधळात झाली.


दरम्यान, सभेपूर्वी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदिप नरके, के. पी. पाटील, प्रा. संजय मंडलिक, ए. वाय. पाटील या विरोधकांनी समांतर सभा घेऊन बोगस सभासद घुसवून जागा अडवल्याचा आरोप केला.

आमच्या सभासदांना निम्मी जागा द्या अशी मागणी करत प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. विरोधकांनी मल्टिस्टेटच्या ठरावाला विरोध करत कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभा संपताच विरोध असणाऱ्या संस्थांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.

सभेत झालेल्या गोंधळात परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर: बाइकवरून फिरणारे कोंबडे पाहिलेत का?

$
0
0

सूर्यकांत आसबे, सोलापूर:

आतापर्यंत आपण 'अण्णा अण्णा' बोलणारा कोंबडा पाहिला. त्याचं कौतुकही झालं. पण सोलापुरात दोन कोंबड्यांना मात्र वेगळीच सवय जडलीय. या दोघांनाही चक्क दुचाकीवरून फिरण्याची सवय लागली आहे. त्यामुळे बाइकवरून ऐटीत फिरणारे सर्जा आणि राजा हे दोन्ही कोंबडे सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहेत. पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरलेल्या या सर्जा-राजाला पाहण्यासाठी सावळेश्वर गावात एकच झुंबड उडाली आहे.

मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर गावातल्या औदुंबर लवटे यांचे हे कोंबडे सध्या सोलापूर जिल्ह्यात कुतूहुलाचा विषय बनले आहेत. कारण लवटेंच्या या कोंबड्यांना दुचाकीचा जिव्हाळा लागला आहे. सुरुवातीला गाडीवर बसवल्यानंतर घाबरणाऱ्या या कोंबड्यांना आता मात्र गाडीवर बसायची एवढी आवड लागली आहे, की औदुंबर लवटे गाडीला चावी लावायच्या अगोदर कोंबडेच गाडीवर चढून बसतात.

औदुंबर लवटे चिंचोली एमआयडीसीत प्रीसीजन कंपनीत काम करतात. कोंबड्याप्रमाणे ससे पाळण्याचाही लवटेंना छंद होता. पण कामाच्या व्यापामुळे नंतर त्यांनी फक्त कोंबड्याच पाळायला सुरुवात केली. या लाडक्या कोंबड्यांना बसण्यासाठी गाडीच्या हँडलला खास स्टँड बनवले असून या स्टँडवर कोंबडे अगदी आरामात आणि रुबाबात बसतात. मग लवटे मोहोळ बाजारला जाऊ द्यात की इतरत्र फिरायला, हे कोंबडे कायम त्यांच्या सोबत असतात. त्यामुळेच आमच्या कोंबड्यांनाही ट्रेनिंग द्या, अशी मागणी लोकांकडून औदुंबर लवटेंकडे केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण फसलेः सुशीलकुमार

$
0
0

पंढरपूरः सुनील दिवाण

काँग्रेसच्या काळात भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेले एकही शेजारी राष्ट्र आज भारताच्या सोबत नसून मोदी सरकारचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे फसले आहे, असा गंभीर आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सोलापुरात केला. सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज काँग्रेसचा मेळावा पंढरपूरमध्ये घेण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.

सर्जिकल स्ट्राइकची पब्लिसिटी करणाऱ्यांनी काँग्रेसच्या काळात किती सर्जिकल स्ट्राइक झाले याची माहिती IB चे रेकॉर्ड तपासून काढून पाहावी. आमच्या काळात अतिरेक्यांच्या अनेक चौक्या नष्ट केल्या मात्र याची आम्ही कधीही जाहिरातबाजी केली नाही. सर्जिकल स्ट्राइक ही सैन्याची गोपनीय मोहीम असते मात्र या सरकारने याचीही जाहिरातबाजी केली, असे शिंदे म्हणाले. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस पक्षाशी आघाडी करू इच्छित असून त्यांनी एमआयएमशी हातमिळवणी केली आहे. मात्र राष्ट्रवादीला आंबेडकर उघड विरोध करीत असल्याबाबत छेडले असता यावर सध्या बैठका सुरु असून त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, पुढील बैठकीत अॅड. प्रकाश आंबेडकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करू, असंही शिंदे यावेळी म्हणाले.

मी निवडणूक लढवायला कधीच भीत नसून एकदा पराभूत झालो असलो तरी वर्षानुवर्षे हीच जनता मला विजयी करत आली आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात विविध जातींचा मोठा मेळावा घेतला असला तरी आपल्याला काही फरक पडत नाही, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात

$
0
0

पंढरपूर :

मंगळवेढा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधणीसाठी स्थानिक नेते पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले खरे. मात्र, या शिष्टमंडळात बँक दरोड्यातील आरोपीचा समावेश असल्यामुळे खळबळ उडाली.

मंगळवेढा तालुक्यातील पक्ष बांधणी व इतर पक्षांतर्गत बाबींसाठी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. या शिष्टमंडळात नगराध्यक्ष अरुणा माळी , राहुल शहा , पी बी पाटील , भारत पाटील , काशिनाथ पाटील आदींचा समावेश होता. त्याच बरोबर रामेश्वर मासाळ हा देखील या शिष्टमंडळात असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. रामेश्वर मासाळवर 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या ७८ लाख रुपयाच्या दरोड्याचा आरोप आहे. सांगोला येथील 'बँक ऑफ महाराष्ट्र'ची पैसे घेऊन जाणारी व्हॅन १ नोव्हेंबर २०१७ रोजी लुटण्यात आली होती. या तपासात राष्ट्रवादीचे तत्कालीन पदाधिकारी रामेश्वर मासाळचे नाव समोर आले होते . पोलिसांनी या आरोपींकडून लूटीला गेलेली रक्कम देखील वसूल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. सध्या हा खटला न्यायालयात असून रामेश्वर मासाळ जामिनावर सुटला आहे. ही सर्व पार्श्वभूमी माहीत असतानादेखील मंगळवेढा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आरोपीला थेट शरद पवार यांच्या भेटीला नेलेच कसे असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. आरोपींला पक्ष पाठीशी घालणाऱ्या पक्षासोबत कसे जायचे असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

रामेश्वर मासाळ काही वर्षे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होता. दरोड्याच्या घटनेनंतर सार्वजनिक कार्यक्रमातून मासाळ अनुपस्थित होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ अध्यक्षपदाची चर्चा सुरु

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मल्टिस्टेट ठराव मंजूर करण्याचे दिव्य पार पाडल्यानंतर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये (गोकुळ) अध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामध्ये रणजित पाटील, रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, अंबरिश घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

गोकुळमध्ये महाडिक गटाची सत्ता आल्यानंतर विश्वास पाटील यांना संधी दिली गेली. अध्यक्ष पाटील यांचे पी. एन. पाटील आणि महाडिक या दोघांबरोबर संबध चांगले आहेत. गेल्या तीन वर्षांत झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत अध्यक्ष पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेससोबत राहिल्याने पी. एन. पाटील यांचा त्यांना भक्कम पाठिंबा असल्याने त्यांचे स्थान अजूनही बळकट मानले जाते. पण, आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाची भाकरी फिरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मल्टिस्टेटवरुन सतेज पाटील यांना मुश्रीफ यांनी साथ दिल्याने माजी आमदार महाडिक वचपा काढण्याची संधी शोधत आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ निवडून येणार नाहीत, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. महाडिक यांच्या टार्गेटवर सध्या मुश्रीफ असल्याने कागल तालुक्यातील संचालकांना अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे माजी अध्यक्ष रणजित पाटील व अंबरिश घाटगे यांची नावे आघाडीवर आहेत. दोघांपैकी एकाला अध्यक्षपदाची संधी दिली तरी कागलच्या राजकारणाची समिकरणे बदलण्याची शक्यता आहे. रणजित पाटील हे महाडिक यांचे जवळचे मानले जातात. पण अंबरिश घाटगे यांना अध्यक्षपदाची संधी देऊन समरजित घाटगे यांना विधानसभा उमेदवारीसाठी आग्रह करून दोन्ही घाटगे गट एकत्र आणण्यासाठी महाडिक प्रयत्न करतील. घाटगे गट एकत्र झाले तर मुश्रीफांना विधानसभेची निवडणूक सोपी जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

तर दुसरीकडे विश्वास पाटील हेच अध्यक्ष रहावे यासाठी पी. एन. पाटील याचा आग्रह राहणार आहे. आगामी विधानसभा अध्यक्षपद निवडीसाठी त्यांना फायदा होणार आहे. महाडिक यांनी अध्यक्ष बदलासाठी जास्तच आग्रह धरला तर पी. एन. पाटील हे करवीर आणि राधानगरी विधानसभा मतदारसंघातील राजकारण लक्षात घेऊन कदाचित अरुण डोंगळे यांचे नाव पुढे करतील. रवींद्र आपटे यांचे नावही ऐनवेळी पुढे येऊ शकते. नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेतला तर बाळासाहेब खाडे, रामराजे कुपेकर यांनाही लॉटरी लागू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुष्याची सायंकाळ झाली स्मार्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑनलाइन शॉपिंग ते बुकमाय शो द्वारे सिनेमाचे तिकीट घरबसल्या बुक करण्यापर्यंत तर फेसबुकवर फोटो अपलोड करण्यापासून व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅक्टिव्ह राहण्यापर्यंत ज्येष्ठ मंडळी सध्या स्मार्ट झाली आहेत. नव्या जमान्याची नस ओळखून टेक्नोसॅव्ही बनत ज्येष्ठांनी आपल्या आयुष्याची सायंकाळ स्मार्ट केली आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाच्या जगात आजच्या आजी-आजोबांनी आपलं विश्व शोधलं आहे.

कोल्हापुरात सध्या ज्येष्ठ मंडळींचे असे अनेक गुप आहेत, की ज्यांच्या कनेक्ट असण्याचे माध्यम सोशल मीडिया आहे. सकाळी व संध्याकाळी फिरायला येण्याच्या निमित्ताने रंगणाऱ्या गप्पांमध्ये स्मार्टफोनमधील नव्या अॅपवर सुरू असलेली चर्चा सध्या ज्येष्ठांमध्ये असते. आरोग्य, विमा, गुंतवणूक, सहली अशा विषयांवरील ज्येष्ठांसाठी आवश्यक असलेल्या पोस्ट व्हॉट्सअॅपवर शेअर करणे हा नवा विरंगुळा ज्येष्ठांच्या वर्तुळात आवडीचा विषय आहे.

शिवाजी पेठ येथील जंटलमन ग्रुपमधील ज्येष्ठ मंडळी ट्रेकिंगच्या आवडीतून एकत्र आले आहेत. स्मार्टफोनवर याच नावाने एक ग्रुप बनवून त्यांचा दिलखुलास संवाद सुरू असतो. पासष्टीची ही मित्रमंडळी दर रविवारी एकत्र येतात आणि जोतिबा डोंगरावर जातात. ट्रेकिंगसाठी असलेले स्पॉट इंटरनेटवरून शोधून काढतात व एकमेकांना पाठवतात. परशुराम नांदवडेकर यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुप मेंबर्सची संख्या आता शंभरहून अधिक झाली आहे.

वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या ज्येष्ठांनी तर यू ट्यूबचा वापर पन्नासच्या दशकातील सिनेमांतील गाणी ऐकण्यासाठी केला आहे. आप्पासाहेब वणिरे, राजाभाऊ पाटील, नारायण शिंदे यांच्या हातातील स्मार्टफोन या त्रिकुटाला दर रविवारी त्यांच्या तरुणपणातील सिनेगीताच्या राज्यात घेऊन जातो. त्यासाठी खास नातवंडाकडून या आजोबा मंडळींनी यूट्यूबचा वापर शिकून घेतलाय.

टाकाळा येथे वत्सला शिरपे या पंचाहतरीच्या आजींना एकच मुलगी. ती विवाहानंतर बंगळुरूला असते. वत्सलाआजी रोज रात्री व्हॉटसअॅप व्हीडिओ कॉलवर मुलगी व नाती सोबत गप्पा मारतात. कॉलनीतील ग्रुपचे फोटो शेअर करतात. नवा पदार्थ केला की त्याचे फोटो पाठवतात. इतकेच नव्हे तर त्यांनी नातीच्या आवडीचे पदार्थ यूट्यूब बघून शिकून घेतले आहेत.

कोट

सुरुवातीला स्मार्टफोन वापरणे जड गेलं. पण आता सवय झाल्यावर खूप चांगलं वाटतंय. महत्वाचे म्हणजे खूप उपयुक्त माहिती मिळते व ती शेअर करता येते. वेळ घालवताना खूप आनंद मिळतो.

- परशुराम नांदवडेकर

सोशल मीडिया हे काही फक्त तरुणाचंच माध्यम नाही तर आमच्यासारख्या ज्येष्ठांनाही एकत्र आणणारं माध्यम आहे. एकमेकांसोबत सार्टफोनमधून संवाद साधण्यातील साठीनंतरच्या वयातील आनंद वेगळाच आहे.

- नलिनी वाळुंजे

चौकट

- फेसबुक, व्हॉटस्अॅप ग्रुपमधून गप्पांमध्ये विरंगुळा

- नोकरी, व्यवसायानिमित लांब असलेल्या मुलं, नातवंडांशी गप्पा

- आजार, औषधे, घरगुती उपचार यांविषयी चर्चा

- समान आवडीचे विषय पोस्ट करणे

- यूट्यूबवर जुनी गाणी ऐकणे

- फेसबुकवर शाळा, कॉलेजांतील मित्रमैत्रिणी शोधून चॅटिंग करणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध उत्पादकांसाठी ‘रासप’चे भजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळच्या सभेत मल्टिस्टेटवरुन सत्ताधारी विरोधक आमने-सामने आले असताना राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याखाली दूध उत्पादकांच्या हितासाठी सुबुद्धी भजन गायिले. सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही गटांचे वर्चस्व सुरू असताना रासपने भजनाच्या माध्यमातून दूध उत्पादकांमध्ये जागृती निर्माण करुन त्यांच्या हितासाठी रासप कार्यरत राहील असा संदेश दिला.

रासपच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्य आणि जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था राजकीय नेत्यांचे अड्डे बनून व्यक्तिगत स्वार्थामुळे रसातळाला गेल्या. अनेक संस्था नामशेष झाल्या. या संस्थांच्या जीवावर मुठभर राजकीय नेत्यांनी मालमत्ता गिळंकृत करुन मालामाल झाले. अशीच स्थिती गोकुळची होऊ शकते. भविष्यातील हा धोका टाळण्यासाठी उत्पादकांनी गोकुळ टिकवण्यासाठी एकत्र यावे.'

सुबुद्धी भजनावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संदेश कचरे, सलीम पटवेगार, जयसिंग सुतार, चंद्रकांत खोंद्रे, सुशिल ऐडगे, दशरथ भोसले, उमाजी सनदे, शुभांगी चितारी, गीता बंदसोडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मल्टिस्टेटविरोधात कोर्टात जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या ठराव सभेने नामंजूर केला आहे. तरीही प्रोसिडिंगमध्ये ठराव मंजूर असे नमूद केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर व दुग्धविकास अधिकाऱ्यांवर राहील. प्रोसिडिंगमध्ये तसा उल्लेख झाल्यास ठरावाविरोधात कायदेशीर लढाई करणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले, 'जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट करण्याचा विषय हा पत्रिकेवर आल्यापासून त्याविरोधात आमची कायदेशीर लढाई सुरू आहे. दूध संस्थांना संघ मल्टिस्टेट नको आहे. त्यामुळे या विरोधात दूध संस्थांचे प्रतिनिधी असलेले ठरावधारक पहिल्यापासून आमच्या, गोकुळ बचाव कृती समितीच्या संपर्कात होते. या सर्व ठरावधारकांना घेऊनच आम्ही आजच्या सभेवेळी सभागृहात प्रवेश केला. सभेतील विषयांचे वाचन सुरू असताना ठरावधारक सभासदांनी मल्टिस्टेटचा ठराव नामंजूर केला. त्यानंतर झालेल्या सभेत आम्ही ठरावधारकांना तशी नोंद करण्यास सांगितले होते. त्यानुसार १८०० ठरावधारकांनी मल्टिस्टेटला विरोध असल्याची नोंद केली आहे. तरीही प्रोसीडिंगमध्ये ठराव मंजूर असा जर उल्लेख केल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल. या प्रकाराची सर्व जबाबदारी संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर आणि संबंधित दुग्धविकास अधिकाऱ्यांवर राहील. प्रोसिडिंगमध्ये तसा उल्लेख झाल्यास आम्ही ठरावाविरोधात कायदेशीर लढाई लढणार आहोत. बहुसंख्य ठरावधारक आमच्यासोबत आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘संस्कारासह तंत्रज्ञानाचे शिक्षण आवश्यक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शालेय जीवनातच मुलांच्या मनांवर संस्कारशील मूल्ये रुजविण्यासाठी पाद्यपूजन कार्यक्रम अनुकरणीय आहे. मुलांना संस्कारासोबत बदलत्या तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळाल्यास त्यांची उत्कृष्ट जडणघडण होईल. पाद्यपूजनाचा कार्यक्रम फक्त एक दिवस न करता प्रत्येक विद्यार्थ्याने रोज आई-वडिलांच्या पाया पडावे,' असे प्रतिपादन भारतीय जैन महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष व बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल यांनी केले.

ओसवाल यांच्या पुढाकारातून व कणेरी मठाच्या सहकार्याने कुमार विद्यामंदिर व कन्या विद्यामंदिर इंगळी येथे पाद्यपूजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमास ३०० पालकांचा सहभाग होता. याप्रसंगी विद्यामंदिराला संगणक प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन झाले. घाटगे म्हणाले, 'इंगळी गावच्या विकासासाठी सर्व सदस्य राजकारण बाजूला ठेवून एकत्रित काम करतात ही कौतुकाची बाब आहे. जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजिटल करण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात इंगळीतून होत आहे. लोकवर्गणीतून शाळा परिसराचा विकास ही संकल्पना स्तुत्य आहे. इंगळी शाळेच्या विकासासाठी जी मदत लागेल ती करू.' जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी, इंगळे गाव माझ्या मतदारसंघात नसले तरी या गावासाठी लागेल ती मदत करू, असे सांगितले. रावसाहेब पाटील यांनी चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीतर्फे शाळेला पाच लाख रुपये किमतीचे साहित्य देणार असल्याचे सांगितले.

प्रियांका रेंदाळे व सारिका जाधव यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. जि. प. सदस्या स्मिता शेंडुरे, पं. स. सदस्या वैजयंती आंबी, सरपंच शालन पाटील, उपसरपंच भारती पाटील. शांतिनाथ चौगुले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. बाबासाहेब शिंगे यांचा सत्कार झाला. संदीप गुदले यांनी आभार मानले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक संघाच्या सभेत धक्काबुक्की

$
0
0

'विद्याभवन' इमारत बांधकाम-आर्थिक व्यवहारावरुन सभा गाजली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. विद्याभवन इमारतीचे बांधकाम आणि चार वर्षातील आर्थिक व्यवहाराच्या चौकशीवरुन सभेत गदारोळ उडाला.'विद्याभवन'च्या नवीन इमारतीच्या बांधकामाची चौकशी धर्मादाय सहआयुक्त यांच्यामार्फत करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

मागील काळातील सर्व आर्थक व्यवहारांचे ऑडिट झाले आहे. अहवाल धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाला सादर केला आहे. मात्र सत्ताधारी मंडळी हेतूपुरस्सर चौकशीचा फार्स करत असल्याचा आरोप विरोधी गटांनी केला. विरोधकांनी सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभारावर मनमानीपणे निर्णय घेतल्याचे टीकास्त्र सोडत समांतर सभा घेतली. या सभेत मुख्याध्यापक संघातील सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व करणारे शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचा गट व विरोधी गटाचे नेते डी.बी.पाटील गटातील मतभेद उफाळून आले.

काही सभासदांनी व्यासपीठावर धाव घेत तावातावाने बोलण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी सत्ताधारी व विरोधकांत धक्काबुक्की झाली. सभागृहात सातत्याने गोंधळाचे चित्र निर्माण झाल्याने ज्येष्ठ सभासदांनी मुख्याध्यापक संघ ही जिल्ह्यातील शाळांची शिखर संस्था आहे. संघावर मुख्याध्यापक प्रतिनिधित्व करत आहेत. आपल्या कृत्यामुळे शरम वाटेल असे वर्तन कुणी करु नये, असे आवाहन केले. मात्र आर्थिक व्यवहाराची चौकशी आणि 'विद्याभवन'च्या बांधकाम खर्चावरुन दोन्ही बाजू आमनेसामने आल्या. मुख्याध्यापक संघाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिटचा निर्णय झाला.

.........

सविस्तर वृत्त ३ वर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींना हटवा, देश वाचवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशात अघोषित आणीबाणी लादली आहे. घटनेतील अधिकारांवर गदा आणली जात आहे. म्हणून २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटवा, देश वाचवा अशी मोहीम राबविण्याचा निर्धार रविवारी महिला मेळाव्यात करण्यात आला. देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या 'अमन की बात' जथ्यातील १७ महिलांच्या उपस्थितीतील मेळाव्यात निर्धार झाला.

येथील शाहू स्मारक भवनात भारतीय महिला फेडरेशन, राज्य अंगणवाडी कर्मचारी युनियन, मुस्कान संस्था, वेश्या अन्याय मुक्ती परिषद, राज्य किसान महिला सभेतर्फे मेळाव्याचे आयोजन केले होते. चार वर्षांपासून देशात अशांतता, महिलांवर अन्याय वाढले आहेत, जातीय तेढ निर्माण केले जात आहे. यापार्श्वभूमीवर १७ महिलांचा जथ्था दोन आठवड्यापासून देशभ्रमंती करीत आहे. बेळगावातून जथ्था कोल्हापुरात आल्यानंतर मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अंगणवाडी सेविकांच्या नेत्या सुमन पाटील होत्या.

ज्येष्ठ सामाजिक नेत्या शबनम हश्मी म्हणाल्या, 'धर्म, जातींमधील चुकीच्या प्रथांविरोधात प्रबोधन केल्याने डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्यांना सरकार संरक्षण देत आहे. गुजरातमध्ये मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्या जिवाला धोका निर्माण केल्याचा आरोप करून २२ जणांचा इन्काउंटर करण्यात आला. त्यांचे देशातील सरकार शहरी नक्षलवादाच्या नावाखाली विचारवंत, समाजसेवकांना नजरकैदेत ठेवले. बुद्धीजीवींचा आवाज दाबला. यामुळे मोदी हटवा, संविधान, देश वाचवा अशी मोहीम राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.'

स्मिता पानसरे म्हणाल्या, 'सध्याचे मनुवादी सरकार स्त्रियांचे हक्क, स्वातंत्र्यावर बंधने आणत आहे. पुन्हा एकदा १६ व्या शतकात महिलांना नेण्याचा त्यांचा डाव आहे. सत्तेचा गैरवापर करून झुंडशाहीला प्रोत्साहन दिले जात आहे. जगण्यातील प्रश्न मागे पडावेत, यासाठी जाती, जातींमध्ये तेढ निर्माण केले. देशातील वातावरण असुरक्षित आहे. यामुळे विविध राज्यांतील महिला देशभ्रमंती करून ८ ऑक्टोबरला मुंबईत, तर १३ ऑक्टोबरला दिल्लीत धडक मारणार आहेत.'

राजस्थान महिला चळवळीतील नेत्या राजकुमारी डोंग्रा म्हणाल्या, 'सत्ताधाऱ्यांनी देशातील वातावरण भयानक केले आहे. संस्कृतीच्या नावाखाली स्वातंत्र्यावर बंधने आणली आहेत. तथाकथित गोरक्षकांचा हैदोस सुरू आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. दिवसाढवळ्या विनयभंग, सामूहिक बलात्काराच्या घटना होत आहेत. त्याविरोधात आवाज उठवण्यासाठी देशातील विविध राज्यातील महिला एकत्र येऊन देशभर जथ्थाने जात जागृती करीत आहेत.'

गुजरातच्या नूरजहाँ दिवाण, अध्यक्षा पाटील, स्वाती क्षीरसागर, संगीता यांची भाषणे झाली. यावेळी उमा पानसरे, उषा लवटे यांच्यासह विविध संघटना, संस्थांच्या महिला उपस्थित होत्या. ज्योती भालकर यांनी सूत्रसंचालन तर शुंभागी पाटील यांनी आभार मानले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत कोल्हापूर, पुणे अजिंक्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

१७ वर्षांखालील १३ व्या राज्यस्तरीय रोलबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मुलांमध्ये कोल्हापूर विभागाने, तर मुलींमध्ये पुणे विभागाने अजिंक्यपद पटकाविले. महाराष्ट्र राज्य रोलबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कोल्हापूर जिल्हा रोलबॉल असोसिएशन व बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा झाली.

स्पर्धेत आठ विभागांतील १६ संघ सहभागी झाले होते. साखळी सामन्यानंतर रविवारी बाद फेरीस सुरुवात झाली. मुलींच्या पहिल्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर संघाने नाशिकवर, तर पुण्याने नागपूरवर विजय मिळवून अंतिम फेरी गाठली. अत्यंत अटीतटीच्या सामन्यात पुणे संघाने ३ विरुद्ध १ गुणाने विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले.

मुलांच्या सामन्यात कोल्हापूरने नागपूरवर, तर अमरावती संघाने पुण्यावर विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. कोल्हापूर विरुद्ध अमरावती अंतिम सामना पहिला डाव अत्यंत चुरशीचा झाला. उत्तरार्धात सुरुवातीला चुरस कायम होती. मात्र, नंतर कोल्हापूरच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ करीत ७ विरुद्ध २ अशा गोलनी दणदणीत विजय मिळविला.

बक्षीस वितरण समारंभ रोलबॉल खेळाचे जनक राजू दाभाडे, नगरसेवक राहुल खंजिरे, प्रा. शेखर शहा, गडहिंग्लजच्या नगरसेविका सुनीता पाटील, महेश कोळीकाल, मुख्याध्यापिका एम. एस. रावळ यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे संयोजन संघटनेचे जिल्हा सचिव अमित पाटील, संयोजन समिती सदस्य संजय हारगे, राहुल जोशी, राजेश चौगुले, आदींनी केले. प्रशालेचे क्रीडा विभागप्रमुख राजेश चौगुले यांनी प्रास्ताविक केले. एस. व्ही. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रवी चौगुले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिस्टेटच्या परवानगीसाठी हालचाली सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटचा ठराव मंजूर झाल्यानंतर राज्य सरकारकडे परवानगीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मल्टिस्टेटला परवानगी मिळू नये यासाठी विरोधी गटाकडून कोर्टात जाण्याची तयारी सुरू झाल्याने ब्रेक लावण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

सर्वसाधारण सभा झाल्यानंतर एक महिन्यात सभेचे प्रोसिडिंग लिहून पूर्ण करण्याची अट असते. पण, एक महिन्याची वाट न पाहता प्रोसिडिंग पुढील आठवड्यात पूर्ण केले जाण्याचे संकेत मिळत आहेत. प्रोसिडिंग पूर्ण झाल्यावर गोकुळला मल्टिस्टेट संघ म्हणून मान्यता मिळावी यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी गोकुळ प्रशासनाकडून तज्ज्ञ कायदे तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून मल्टिस्टेटला राज्य सरकारकडून लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मल्टिस्टेट संघ झाल्यावर गोकुळ कर्नाटकातून तीन तालुक्यांतून दूध संकलन करणार आहे. मल्टिस्टेटसाठी कर्नाटक राज्य सरकारकडून परवानगी मिळवण्यासाठी संचालक मंडळाला प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या कर्नाटकात जनता दल व काँग्रेसचे सरकार आहे. माजी आमदार पी. एन. पाटील कर्नाटकातील काँग्रेसच्या नेत्याशी संपर्क साधून मल्टिस्टेट प्रस्तावाला परवानगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील अशी चर्चा आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर केंद्र सरकारची मल्टिस्टेटला पाठिंबा मिळण्यास अडचण येणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणूकीपूर्वी परवानगी मिळावी यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे मल्टिस्टेटला परवानगी मिळू नये यासाठी न्यायालयीन प्रयत्न केले जाणार असल्याने मल्टिस्टेटला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उद्योग, व्यवसायात ग्राहक केंद्रस्थानी हवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'उद्योग, व्यवसायात दिवसेंदिवस आव्हाने वाढत आहेत. ती यशस्वीपणे पेलण्यासाठी ग्राहक केंद्रस्थानी ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात,' असे मत पुण्यातील श्रीनिवास इंजिनीअरिंगचे चेअरमन व प्रसिद्ध उद्योजक गिरीधारी काळे यांनी व्यक्त केले.

येथील कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनतर्फे रविवारी झालेल्या 'उद्योग श्री' पुरस्कार वितरण कार्यक्रमात 'उद्योगांसमोरील आव्हाने' या विषयावर ते बोलत होते. असोसिएशनच्या उद्योगपती माधवराव बुधले सभागृहात कार्यक्रम झाला.

काळे म्हणाले, 'ग्राहकाला महत्त्व देऊन व्यवसाय, उद्योग केल्यास प्रगती होते. हे करताना काळानुरूप नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी वेळीच उपाय शोधले पाहिजेत.'

यावेळी उद्योजक महंमद हुदली, डी. एस. पाटील, बाबूराव आरवाडे यांना मरणोत्तर 'उद्योग श्री' पुरस्काराने गौरविण्यात आले. साजिद हुदली, भरत पाटील, प्रफुल्ल व मंदार आरवाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी साजिद हुदली, प्रफुल्ल आरवाडे, राजेंद्र मिठारी यांची भाषणे झाली.

'स्मॅक'चे अध्यक्ष राजू पाटील, 'गोशिमा'चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, उद्यम सोसायटीच्या अध्यक्षा संगीता नलवडे, कागल असोसिएशनचे उपाध्यक्ष गोरख माळी, चेंबर ऑफ कॉमर्सचे शिवाजीराव पवार, 'आयआयएफ'चे उपाध्यक्ष सुरेश चौगुले यांच्यासह ज्येष्ठ उद्योजक सभासद दिलीप चव्हाण, विजय पर्वते, शरद पाटील, अशोकराव जाधव आदींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कमलाकांत कुलकर्णी, हर्षद दलाल यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. इंजिनीअरिंग असोसिएशनचे मानद अध्यक्ष नितीन वाडीकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अतुल आरवाडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सचिव रणजित शाह यांनी आभार मानले.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिनोळीतील तरुणाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

शिनोळी (ता. चंदगड) येथील विलास उर्फ लक्ष्मण यलाप्पा बिर्जे (वय ४२) यांचा स्वाइन फ्लूमुळे बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला.

गुडेवाडी येथील नीता राजेंद्र सुतार हिचा पाच दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच स्वाइन फ्लूचा दुसरा बळी गेल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिनोळीत आरोग्य विभागाच्यावतीने खबरदारी म्हणून पथक तैनात केले असून स्वच्छता व जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. यासंदर्भात माहिती अशी, विलास बिर्जे हे चालक असल्यामुळे ते सतत फिरतीवर असतात. नुकताच ते प्रवास करुन ते घरी आले. त्यावेळी त्यांना अचानकपणे ताप आला. गावात प्राथमिक उपचार करून त्यांनी थेट बेळगाव गाठले. तेथेही एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी १९ सप्टेंबर २०१८ रोजी बेळगाव येथील केएलई रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले असता त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदान झाले. शुक्रवारी केएलई रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

आरोग्य यंत्रणा सतर्क

स्वाइन फ्लूमुळे बिर्जे यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तुड्ये आरोग्य केंद्राचे १५ कर्मचाऱ्यांचे पथक शिनोळीमध्ये दाखल झाले. त्यावेळी बिर्जे यांच्या कुटुंबातील व सहवासातील व्यक्तींची तपासणी करून प्रतिबंधक उपचार सुरू केले आहेत. याबाबतची लक्षणे आढळल्यास नागरीकांनी घाबरुन न जाता आरोग्य विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक संघाच्या सभेत धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्याध्यापक संघाच्या अधिवेशनासाठी जमवलेल्या देणगीचा हिशेब आणि विद्याभवनच्या नवीन इमारत बांधकामासाठी इस्टिमेटपेक्षा जादा दोन कोटी रुपये खर्चावरून कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघांच्या सभेत प्रचंड गोंधळ झाला. सभेत कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या 'विद्याभवन'च्या नवीन इमारतीच्या बांधकामाची चौकशी करण्याचा निर्णय झाला. सभेत मंजूर-नामंजूरच्या घोषणा आणि व्यासपीठावर जाऊन माईकचा ताबा घेताना एकमेकांना धक्काबुक्कीचे प्रकार घडले.

ज्या शाळा मुख्याध्यापक संघाच्या प्रश्नपत्रिका घेणार नाहीत, त्या शाळांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठरावही मंजूर झाला. २०१७-१८ मध्ये बजेटपेक्षा जादा बांधकाम खर्चाला मान्यतेचा विषय नामंजूर केल्याचे चेअरमन सुरेश संकपाळ यांनी सांगितले. धर्मादाय कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे चौकशी समिती नेमून आर्थिक व्यवहार व जादा खर्चाच्या बांधकामाची चौकशी करण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतला. तर विरोधकांनी समांतर सभा घेत सत्तारुढ गटाचे विविध निर्णय घटनाबाह्य असून त्याविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा दिला.

आर्थिक व्यवहाराच्या चौकशीवरुन सत्तारुढ व विरोधी गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने सभागृहात पहिल्यापासून शेवटपर्यंत गदारोळ राहिला. डिसेंबर २०१७मध्ये मुख्याध्यापक संघाची निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत शिक्षक नेते डी. बी. पाटील गटाचा पराभव झाला होता. शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सत्तेत आलेल्या कार्यकारिणीची ही पहिलीच सभा होती. सभेत, मुख्याध्यापक संघाच्या कोल्हापुरातील अधिवेशनासाठी गोळा केलेल्या देणगीवरुन व इमारत बांधकामप्रश्नी दोन्ही गट हमरीतुमरीवर गले. विरोधकांनी अहवालात अधिवेशनाच्या देणगीचा जमा खर्चाचा तपशील आवश्यक होता असे सांगत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सचिव दत्ता पाटील यांनी 'जमा खर्चाचा अहवाल अपुरा आहे. अनेकांनी देणगी देऊनही रक्कम जमा केली नाही'असे सांगताच गोंधळ वाढला.

विरोधी गटाच्या आर. वाय. पाटील यांनी व्यासपीठासमोर येऊन 'जमा-खर्चात तफावत राहू नये, देणगीसाठी बँकेत स्वतंत्र खाते उघडले होते' असा प्रतिटोला लगाविला. शिवाय ए. आर. पाटील, विलास पोवार, के. के. पाटील, डी. एस. घुगरे, एस. पी. चौगुले, टी. एल. राजाराम यांनीही सत्तारुढ गटावर जमाखर्चावरुन आक्षेप घेतले. सत्तारुढ गटाकडून सुदर्शन पाटील, एम. आर. पाटील, दीपक पाटील, नाजिद पटेल, गणेश भाटे यांनी चर्चेत भाग घेतला. मुख्याध्यापक शिवाजी कोरवी यांनी तळमजल्यातील पाणी उपशाकडे लक्ष वेधले. लोकल ऑडिटर मिलिंद पांगिरेकर यांनी स्वागत केले.

ठेकेदाराला आधीच बिले

चेअरमन संकपाळ यांनी विद्याभवनच्या नवीन इमारत बांधकामावरुन मागील सत्ताधाऱ्यांना उद्देशून, इमारतीचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेता महादेव कन्स्ट्रक्शन कंपनीला कोट्यवधी रुपयांची बिले दिली. बयाणा रक्कमही सुरक्षित ठेवली नाही असा आरोप केला. तेव्हा विरोधी गटाचे आर. वाय. पाटील यांनी इमारतीसाठी जादा खर्च केला नाही 'बयाणा...'साठी बँकेत पंधरा लाख रुपयांची तरतूद केली होती हे निदर्शनास आणून दिले.

मागील कार्यकारिणीने धर्मादाय कार्यालय व सर्वसाधारण सभेची कसलीही परवानगी न घेता बांधकामच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. इमारत बांधकामासाठी दोन कोटी ४७ लाख रुपयांचे इस्टीमेट असताना चार कोटीहून अधिक रुपये खर्च केले आहेत. सभेने, २०१३-२०१६ व २०१६-२०१७ मधील आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याचे ठरविले आहे. एप्रिल २०१६ मध्ये मागी कार्यकारिणीची मुदत संपल्यावरही त्यांनी कारभार केला.

- सुरेश संकपाळ, चेअरमन मुख्याध्यापक संघ

सत्तारुढ गटाने बांधकाम खर्चावरुन मागील कार्यकारिणीवर केलेले आरोप खोटे आहेत. कार्यकारिणीच्या मंजुरीने बांधकाम खर्च केला आहे. धर्मादाय कार्यालयाला अहवाल दिला आहे. सर्व कामांचे ऑडिट झाले असताना सत्तारुढ गट हेतूपरस्पर चौकशीचे निर्णय घेत आहे. आर्थिक व्यवहाराची चौकशी व शाळांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घटनाबाह्य असून, त्या विरोधात कोर्टात जाऊ.

- विलास पोवार, विरोधी गट, माजी चेअरमन मुख्याध्यापक संघ

सभेत काय झाले...

- मुख्याध्यापक संघातील सभागृहाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्याचा ठराव मंजूर

- संघ तोट्यात असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा

- पुढील वर्षी संघ फायद्यात आणण्याचा अध्यक्षांचा संकल्प

- आर्थिक उर्जितावस्थेसाठी अनेक उपक्रम

- संचालक मंडळ कसलेही मानधन व भत्ता घेत नसल्याचे अध्यक्षांचा दावा

- मुख्याध्यापक संघाच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे ठरले

- वार्षिक सभेचा अहवाल मुदतीत मिळाला नसल्याचा विरोधकांचा आरोप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ बचाव समितीचा प्रवेशद्वारात ठिय्या

$
0
0

विरोधकांचा प्रवेशद्वारात ठिय्या

प्रचंड घोषणाबाजी; सभामंडपात जागा देण्यावरून वादंग

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा दूध संघाच्या सभेत मल्टिस्टेट ठरावाला विरोध करण्यासाठी गोकुळ बचाव कृती समितीचे सर्व नेते व ठरावधारक ड्रीम वर्ल्ड येथून सकाळी नऊ वाजता दाखल झाले. पण सभास्थानी येण्यापूर्वीच सभागृह तुडूंब भरल्याने अर्धी बाजू रिकामी करण्याची मागणी समितीच्या नेत्यांनी पोलिस प्रशासनाकडे केली. पण जागा देण्याचा अधिकार सभाध्यक्षांना असल्याने त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारात रोखून धरले. परिणामी समितीच्या नेत्यांनी प्रवेशद्वारातच प्रचंड घोषणाबाजी करत ठिय्या मारला. प्रवेशद्वारात सुमारे तासभर प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

गोकुळ मल्टिस्टेट करण्याच्या ठरावाला विरोध करण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके गटाचे ठरावधारक ड्रीम वर्ल्ड पार्क येथे जमले होते. प्रमुख नेत्यांसह सर्व ठरावधारक सभास्थळी दाखल होण्यापूर्वी सभागृह भरले होते. अनेक ठरावधारक रांगेत उभे होते. बसण्यास जागा व आत प्रवेश करण्यास जागा मिळत नसल्याने बसण्यास जागा देण्याबरोबर ठरावधारकांना आत प्रवेश करण्यासाठी अर्धी जागा मोकळी करण्याची मागणी नेत्यांनी पोलिसांच्याकडे केली. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी जागा देण्याचा अधिकार सभाध्यक्षांना असल्याचे सांगत सर्वांनाच प्रवेशद्वारात अडवले. परिणामी मुश्रीफ, पाटील, नरके, प्रा. संजय मंडलिक, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, संपतबापू पवार-पाटील, राजेंद्र गड्डाण्णावर असे प्रमुख नेते प्रवेशद्वारात उभे होते. सभेची वेळ जवळ येऊ लागली तसी, सर्वांचीच चांगलीच घालमेल झाली. त्यांचे सर्मथक घोषणानी वातावरण तापवत असतानाच प्रवेशद्वार तोडून आत जाण्याची मागणी करू लागले. आत जाण्यास जागाच मिळत नसल्याने प्रमुख नेत्यांनी सत्तारुढ गटांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. परिणामी प्रवेश मिळत नसल्याने सर्वच प्रमुख नेत्यांनी रस्त्यावरच ठिय्या मारत निषेध व्यक्त केला.

प्रा. मंडलिक म्हणाले, 'सभासदांना आत न घेता हुकूमशाही पद्धतीने सभा घेतली, ही हुकूमशाही गाडून टाकू.'

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव गड्ड्याण्णावर म्हणाले, ' बेळगाव, विजापूरमधून सव्वा लाख लिटर दूध येत असताना आणखी कोठून दूध घेणार? केवळ महाडिक कंपनीचा फायदा आणि लिमिटेड संघ करण्यासाठी मल्टिस्टेटचा ठराव करत असल्याचा आरोप करत पी. एन. पाटील यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती,' असा टोलाही त्यांनी लगावला. पोलिसांनी सभास्थळ ताब्यात घेण्याची घोषणा केली होती. तर रात्रीत सभागृह कसे भरले याचा खुलासा नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी करावा.' अशी मागणीही केली. परराज्यातून दूध संकलनाचा अट्टहास करुन संघ व्यापाऱ्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर यांनी

केला.

दरम्यान भाषण सुरू असतानाच मुख्य प्रवेशद्वार अर्धे उघडण्यात आले. त्यामुळे प्रमुख नेत्यांसह सर्वजण सभागृहात जाऊन मल्टिस्टेटविरोधी घोषणा दिल्या. लगेचच सभा संपल्याने सर्वच प्रमुख नेत्यांना त्यांच्या समर्थकांनी खांद्यावरुन सभागृहाबाहेर आणले.

तर भविष्यात संचालकांनाही लाथा बसतील

संघाला उर्जितावस्था आणण्यात स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर व विद्यमान संचालक अरुण नरके यांचे मोलाचे योगदान आहे. दोघांच्या प्रयत्नामुळे संघ उत्पादकांच्या मालकीचा राहिला आहे. आपण व रणजितसिंह पाटील यांनी चोरीचे टँकर पकडले आहेत. पण मल्टिस्टेट झाल्यानंतर उत्पादकांचा हक्क संपुष्टात येणार असून भविष्यात व्यापारी प्रवृत्ती संचालकांनाही लाथा घालतील. याची जाणीव ठेवून सभेतून ज्येष्ठ बंधू रणजीतसिंह पाटील यांना उठून येण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

दूध पिशव्यांची फेकाफेकी

सभेला सुरुवात होण्यापूर्वी सभागृह तुडूंब भरले होते. त्यामुळे अनेक ठरावधारक प्रवेशद्वारातच अडकले होते. बचाव कृती समितीच्या नेत्यांना आत सोडल्यानंतर रांगेतील ठरावधारकही आत घुसले. सभेसाठी आलेल्या ठरावधारकांना त्याचवेळी दूध वाटप केले जात होते. पण संख्या वाढल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी स्वत:च पिशव्या घेत इतरांच्याकडे फेकण्यास सुरुवात केली. परिणामी गोकुळ दुधाच्या पिशव्या अनेकठिकाणी पडल्याचे दिसत होते.

...............

ठरावधारक शेवटपर्यंत रांगेत

ठरावधारकांना बारकोड तपासून सोडण्यात येणार होते. त्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला ठरावधारकांची रांग केली होती. तर त्याचवेळी कृती समितीचे ठिय्या आंदोलन सुरु होते. पोलिस प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वार उघडल्यानंतर सर्व कार्यकर्ते आत गेले, पण रांगेतील ठरावधारकांना आत जाता आले नाही. तोपर्यंत राष्ट्रगीत सुरु झाल्याने रांगेतील ठरावधारक ठराव हातात घेवून केविलवाणी नजरेने पाहत होते. समांतर सभा झाली, तरी अनेक ठरावधारक रांगेत उभा असल्याचे चित्र पहायला मिळत होते.

..............

पत्रे उचकटले, पडदे फाडले

कृती समितीच्या ठिय्यानंतर प्रमुख नेते मंडळींना मुख्य प्रवेशद्वारातून सोडण्यात आले. त्यांच्याबरोबर कार्यकर्तेही घुसले. त्याचवेळी सभेला जाण्यासाठी रांगेत उभा राहिलेल्या ठरावधारकांना आत जाण्यास जागाच मिळाली नाही. परिणामी संतप्त ठरावधारकांनी प्रवेशद्वाराच्या उजवीकडील बाजूचे पत्रे उचकूट टाकले, तर काहीनी पांढरे पडदे फाडून आत प्रवेश केला. पण आत जाताच राष्ट्रगीत सुरु झाल्याने त्यांना पुन्हा मागे परतावे लागले. त्यामुळे प्रवेशद्वारावर चांगलीच चेंगराचेंगरी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समांतर सभेत मल्स्टिटेट नामंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सभेनंतर विरोधी गटांनी ताराबाई पार्कातच पितळी गणपती चौकात घेतलेल्या समांतर सभेत 'मल्टिस्टेट'चा ठराव नामंजूर केला. दोन हजार ठरावधारक आपल्या पाठीशी असल्याचा दावा गोकुळ बचाव कृती समितीने केला. गोकुळ हाच जिल्हा दूध संघ राहावा यासाठी कोर्टात दाद मागण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला. समांतर सभेच्या अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे चेअरमन के. पी. पाटील होते.

समांतर सभेत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'पहाटे चार वाजता बोगस सभासद आत घुसविले गेले. तरीही सभागृहातील सर्वांनी मल्टिस्टेटला विरोध केला. जिल्हा दूध संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, तत्कालीन नेते शरद पावर यांनी जागा उपलब्ध करुन दिली. ४५ वर्षात उत्पादकांनी गोकुळ संघाची वाढ केली. मात्र केवळ 'लोणी' खाण्यासाठी लोकभावनांचा आदर न करता मल्टिस्टेटचा ठराव केला जात आहे. त्याचा परिणाम भविष्यातील निवडणुकीत भोगावे लागतील. मल्टिस्टेटच्या बाजूने ठराव देण्यासाठी सत्तारुढ गटाने सभासदांना पाच किलो तूप व श्रीखंड दिले. पण ही आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची लढाई आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ८०० ठराव आम्ही सत्तारुढ गटाला दिले. निवडणुकीत काठावरील बहुमत मिळाल्यानेच मल्टिस्टेटचा घाट घातला आहे. पण उत्पादकांनी गोकुळची सत्ता दिल्यास लिटरला दहा रुपये जास्त दर देऊ. माजी आमदार महाडिक यांना नाव न घेता 'हिंम्मत असेल, तर दुसरा मल्टिस्टेट संघ काढावा' असे आव्हान मुश्रीफ यांनी दिले.

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, 'सुमारे दोन हजार ठरावधारक बाहेर असताना सभेला सुरुवात केली. पहाटेपासून बोगस सभासद सभागृहात सोडले. आम्ही संचालकांच्या हूकुमशाहीला सभागृहात घुसून प्रत्युत्तर दिले आहे. उत्पादकांच्या स्वाभिमानाची लढाई कायमपणे सुरू राहील. सत्तारुढ संचालकांनी मल्टिस्टेट ठरावाचे वाचन केले. पण ठराव मंजूरपेक्षा नामंजूर करणारेच ठरावधारक अधिक होते. त्यामुळे मल्टिस्टेटचा ठराव नामंजूर झाला आहे.'

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'सभेसाठी पहाटेपासून आणलेल्या ठरावधारकांनाही मल्टिस्टेटचा ठराव मान्य नव्हता. उत्पादकांच्या हितासाठी गोकुळविरोधातील लढाई सुरूच राहिल. नोगरभरतीला स्थगिती आणि मल्टिस्टेटला विरोध करण्यासाठी कोर्टात दाद मागणार आहे.'

माजी आमदार संपतबापू पवार-पाटील म्हणाले, 'राज्य सरकारच्या मदतीने सहकाराला काळिमा फासणारी घटना गोकुळच्या सभेत घडली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेची उचित दखल घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा जनता तुमच्यावर वरंवटा फिरवल्याशिवाय राहणार नाही. कष्टकरी आणि श्रमिकांचा संघ टिकला नाही, तर सहकार मोडीत निघेल. मल्टिस्टेटनंतर दुधाला जास्त दर देणार का? हा प्रश्न आहे. यातील काहीही जाहीर न करता सरकारच्या मदतीने उत्पादकांच्या चुलीत पाणी ओतले आहे. पण त्यामुळे चूल विझणार नसून त्याची धग कायम राहील.'

प्रा. संजयसिंह मंडलिक म्हणाले, 'स्वागत आणि राष्ट्रगीत एकाचवेळी घेऊन ठराव मंजूर केला आहे. भाडोत्री माणसांच्या मदतीने संघ मल्टिस्टेट करण्याचा डाव खऱ्या पदाधिकाऱ्यांनी हाणून पाडला. उत्पादकांनी आपला हक्क दाखवून दिला आहे.'

जिल्ह्याचा चिवडा होऊ देणार नाही

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, 'सभेत अध्यक्षांनी एक ते १२ ठराव मंजूर का अशी विचारणा केल्यानंतर सर्व ठराव नामंजूर करण्यात आले. तरीही मल्टिस्टेटचा ठराव झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पैसे घेऊन नोकरभरती झालेले नोकरही त्यांच्या डोक्यात दुधाचा कॅन मारतील. ठरावधारकांना देण्यासाठी चिक्कोडीवरुन चिवडा आणला. संघ मल्टिस्टेट झाल्यानंतर असाच चिवडा होणार आहे. पण जिल्ह्याचा आम्ही चिवडा होऊ देणार नाही,' असे सुनावत तशी शपथच सर्वांना दिली.

आजचा उद्रेक हा ट्रेलर

'दोन हजार ठरावधारकांना सभास्थळी जाण्यास मज्जाव केला. गोकुळच्या नेत्यांनी आपली दादागिरी व हुकूमशाही दाखवली. पण आम्ही या नेत्यांना नेतेच मानत नसल्याने सभागृहात प्रवेश करून दाखवला. आम्ही दंडुकशाहीला घाबरत नाही. उत्पादकांनी दाखवलेला उद्रेक हा चित्रपटाचा ट्रेलर आहे. अद्याप चित्रपट शिल्लक आहे' असा इशारा आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली. 'बंटी तुम्ही या ठरावधारकांची नोंद घेऊन कोर्टात जा. पण आपण सभेत जाऊन मल्टिस्टेटला विरोध केला आहे. सभागृहाने त्याला मान्यता दिली' असे नरके म्हणाले. आमदार नरके यांची आक्रमक भूमिका समांतर सभेत चांगलीच चर्चेची ठरली.

दिल्ली अभी दूर नही है

प्रा. मंडलिक यांचे भाषण सुरू असताना अनेक कार्यकर्ते लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी करत होते. मुश्रीफ यांनीही 'गोकुळच्या गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे ८०० ठराव सत्तारुढ गटाला दिले. त्यामुळे त्यांना निसटता विजय मिळवला. निसटत्या विजयाच्या भीतीने मल्टिस्टेटचा घाट घातला आहे. लोकभावना जाणून घेणे महत्वाचे होते. आगामी निवडणुकीत सभासद त्यांना जागा दाखवतील' असा टोला लगावत 'दिल्ली अभी दूर नही है' असा सूचक इशाराही दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’मध्ये राडा; सभेत बूट, चपलांचा वर्षाव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटाच्या समर्थकांनी बूट, चपलांचा वर्षाव करत राडा केला. नेत्यांच्या उपस्थितीत समर्थक व विरोधक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन गर्दीला नियंत्रणात आणले. या गोंधळातच अवघ्या दोन मिनिटांत मल्टिस्टेटचा (बहुराज्यीय सहकारी संस्थांचा कायदा) ठराव मंजूर करण्यात आला. तर विरोधकांनी हा ठराव नामंजूर केल्याचा दावा केला. 'मंजूर', 'नामंजूर'च्या घोषणांमुळे एकच गोंधळ उडाला. 'गोकुळ'च्या इतिहासात प्रथमच सभेत चप्पलफेक झाल्याने परंपरेला गालबोट लागल्याची खंत सभासदांनी व्यक्त केली.

रविवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून दूध उत्पादक ताराबाई पार्क येथील गोकुळच्या कार्यालय परिसरात येत होते. नऊ वाजेपर्यंत सभामंडप सभासदांच्या उपस्थितीमुळे तुडूंब भरला होता. त्यामध्ये बहुतांशी सभासद सत्ताधारी गटाचे होते. सभेपूर्वी एक तास अगोदर दहा वाजण्याच्या सुमारास माजी आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, भरमू सुबराव पाटील, आमदार सत्यजित पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील सभामंडपात आले. मागील सभेत अहवाल वाचन करणारे महाडिक आणि अन्य नेते सभासदांत व्यासपीठाच्या समोर येऊन बसले. नेत्यांच्या आगमनानंतर त्यांच्या समर्थकांनी टाळ्या व शिट्ट्या वाजवून स्वागत केले. १० वाजून ४० मिनिटांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक मंडळ व्यासपीठावर स्थानापन्न झाले.

अकरा वाजता सभा सुरू होण्यापूर्वी १० वाजून ५५ मिनिटांनी मंडपाच्या मागील बाजूने आमदार चंद्रदीप नरके, हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह विरोधी नेते, त्यांच्या समर्थकांचे आगमन झाले. यावेळी सत्ताधारी समर्थकांनी महाडिक व पी. एन. पाटील यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या तर विरोधी समर्थकांनी नरके, पाटील, मुश्रीफांच्या घोषणा दिल्या. मंडपात तुडुंब भरलेल्या गर्दीतून वाट काढत आमदार नरके, त्यांचे बंधू अजित नरके व्यासपीठाजवळ पुढे जाण्यासाठी घुसले. त्यांना रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे समर्थक प्रयत्न करत होते. पण बहुतांशी उत्पादकांनी त्यांना वाट करुन देण्यास सुरुवात केली. नरके यांच्या मागोमाग आमदार मुश्रीफ, आमदार पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, प्रा. संजय मंडलिक, नाविद मुश्रीफ, ऋतुराज पाटील येऊ लागल्यावर त्यांना रोखा असा इशारा सत्ताधारी नेत्यांकडून केला. गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित पाटील यांनी माईकचा ताबा घेत 'त्यांना रोखा, पुढे सोडू नका, आमची माणसं सकाळपासून येऊन बसले आहेत', असा पुकारा सुरू केल्यावर सत्ताधारी गटाच्या समर्थकांनी विरोधी नेत्यांना रोखण्यासाठी चाल करून गेले.

विरोधी नेते पुढे येत असताना सत्ताधारी गटाचे समर्थक त्यांना रोखू लागले. त्यातून ढकलाढकली सुरू झाली. दोन्ही गटाचे समर्थक हातघाईवर आले. त्यानंतर चप्पल, बुटांचा वर्षाव सुरू झाला. काहींनी तर थेट अल्पोपहाराच्या पिशव्या फेकल्या. महाडिक व पी. एन पाटील ज्या ठिकाणी बसले होते तेथून दहा फुटावर विरोधी नेते आल्याने एकच गोंधळ सुरू झाला. एकीकडे राडा सुरू असताना गोकुळच्या कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी अहवाल वाचन सुरू केले. पण सभासदांच्यात बसलेल्या महाडिक यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांना ठरावाचे वाचन करण्याची खूण केली. अध्यक्ष पाटील यांनी घाणेकर यांच्या ताब्यातून माईक काढून घेत ठरावाचे वाचन सुरू केले. ठरावांचे क्रमांक जसे पुकारले जात होते तसतसे सभामंडपात मंजूर, नामंजूरच्या जोरदार घोषणा सुरू झाल्या. या घोषणायुद्धात चपलांची अखंड फेकाफेकी सुरू होती. अहवालातील बारा क्रमांकाचा मल्टिस्टेटचा ठराव वाचून झाल्यावर सभेत 'मंजूर' असा सत्ताधारी तर 'नामंजूर' असा विरोधकांचा आवाज टिपेला पोहोचला.

महाडिक, पी.एन. पाटील यांनी हात उंचावून 'मंजूर', 'मंजूर'च्या घोषणा दिल्या. तर दुसरीकडे मुश्रीफ, पाटील, नरके 'नामंजूर'च्या घोषणा देत होते. दोन्ही गट अमोरासमोर आल्यावर शाहूवाडी पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील दंगा धाव घेत दोन्ही गटांना समर्थकांना बाजूला केले. त्यांनी सौम्य लाठीमार केला. याचवेळी राष्ट्रगीत सुरू झाल्याने काही काळ शांतता पसरली. राष्ट्रगीत संपल्यानंतर पुन्हा घोषणायुद्ध सुरू झाले. गोंधळातच विरोधी नेते बाहेर गेल्यावर व्यासपीठावर पी. एन. पाटील व महादेवराव महाडिकही तेथून गेले. त्यांनी ठराव मंजूर केल्याबद्दल सभासदांचे आभार मानले.

एलईडी स्क्रीन फोडली

सभेचे कामकाज सभासदांना पाहता यावे यासाठी एलईडी स्क्रीनची सोय सभामंडपात केली होती. पण सभेत झालेल्या राड्यात एलईडी स्क्रीन फोडून टाकली. खुर्च्यांची फेकाफेकी करून पडदेही फाडून टाकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images