Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

४९ पेटंटसह शिवाजी विद्यापीठ राज्यात आघाडीवर

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : तब्बल ४९ स्वामित्व हक्कांसह (पेटंट) शिवाजी विद्यापीठ राज्यात अव्वलस्थानावर आहे. राज्यातील ११ अकृषी विद्यापीठांकडे असलेल्या १५५ पेटंटपैकी ४९ पेटंट शिवाजी विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापकांच्या नावाने असल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती व संशोधन प्रोत्साहन योजनेंतर्गत मांडण्यात आलेल्या लेखाजोख्यातून ही संसोधन भरारी स्पष्ट झाली आहे. मुंबई आणि पुणे ही दोन्ही विद्यापीठे या क्रमवारीत प्रत्येकी ३२ पेटंटसह दुसऱ्या स्थानावर आहेत. पेटंटमध्ये विद्यापीठाने घेतलेल्या आघाडीमुळे संशोधनक्षेत्रात विद्यापीठाच्या योगदानावर शिक्कामोर्तब झाले आहे.

देशपातळीवर संशोधनात अधिकाधिक स्वामित्व हक्क भारतीय विद्यार्थी व प्राध्यापकांच्या नावावर कोरले जावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या मनुष्यबळ मंत्रालयाच्या पुढाकाराने गेल्या दहा वर्षापासून शिष्यवृत्ती व संशोधन प्रोत्साहन योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणीही शिवाजी विद्यापीठाने सक्रियपणे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून संशोधनाकडे अधिकाधिक विद्यार्थी वळावेत तसेच अध्यापनक्षेत्रात कार्यरत असताना पेटंट घेण्यामध्ये प्राध्यापकांनी योगदान द्यावे यासाठी विद्यापीठाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.

विद्यापीठातील प्राध्यापकांच्या नावे असलेल्या 'स्वामित्व हक्कां'च्या विषयांमध्ये मटेरियल सायन्स विभागातील संशोधित उत्पादनांचा प्रामुख्याने समावेश आहे. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवतंत्रज्ञान या विषयांमध्ये सर्वाधिक पेटंट विद्यापीठाने मिळवले आहेत. गॅस सेन्सर, सोलर सिस्टीम, सुपर कपॅसिटी, स्पेक्टो रिस्पॉन्स या विषयातील पेटंट उत्पादननिर्मितीसाठी तयार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती होत असते, तेव्हा पेटंटद्वारे संशोधित केलेले सूत्र वापरण्याचे हक्क संबंधित पेटंट करणाऱ्या संशोधकांकडे असतात. सध्या विद्यापीठाने संशोधित केलेले व पेटंट मिळवलेल्या ४९ विषयांवर आधारीत नवतंत्रज्ञानपर उत्पादनांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पण, भारतीयांना परवडतील अशा वस्तू बनवण्यात या पेटंटचे मोठे योगदान आहे.

आयपीआर सेलद्वारे विविध उपक्रम

पेटंटमधील सूत्राच्या आधारे तयार होणारे उत्पादन सर्वसामान्य माणसांच्या वापरात यावे तसेच किंमत, दर्जा आणि उपयुक्तता यांचा मेळ साधला जावा यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या बौद्धीक स्वामित्व हक्क (आयपीआर) या सेलद्वारे विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये पेटंटसाठी संशोधन प्रकल्प लेखनाबाबत कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. सध्या २०० पेक्षा अधिक प्राध्यापक संशोधन व पेटंटच्या अभ्यासासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये काम करत आहेत. दरवर्षी विद्यापीठातील १५ ते २० प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी पेटंटसाठी प्रस्ताव दाखल करतात. ज्या विषयातील संशोधनाचे स्वामित्व हक्क मिळवायचे आहेत त्याबाबतचा प्रस्ताव कसा तयार करायचा, त्यासाठी भाषा कशी वापरायची, लेखन कसे करायचे याबाबत सातत्याने मार्गदर्शन करण्यासाठी हा आयपीआर सेल कार्यरत आहे.

विद्यापीठ करणार

'पेटंट'साठीचा खर्च

संशोधक विद्यार्थ्यांनी जो विषय निवडला आहे, त्या विषयाची व्यापी, संशोधन पद्धतीचा अवलंब यावर पेटंटचा आर्थिक खर्च अवलंबून असतो. मात्र अधिकाधिक संशोधक विद्यार्थ्यांनी पेटंट घेण्याकडे स्वारस्य दाखवावे, म्हणून पेटंट प्रक्रियेसाठी येणारा सर्व खर्च शिवाजी विद्यापीठच करणार आहे. प्रोत्साहन व शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. पेटंटसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे १०० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले.

कोट

पंचवार्षिक बृहत आराखड्यामध्ये पेटंटमध्ये शिवाजी विद्यापीठाची क्रमवारी चढती रहावी यासाठी नियोजन केले आहे. मटेरियल सायन्समध्ये पेटंटची संख्या वाढावी, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्पादित होणाऱ्या उपकरणांच्या स्वामित्व हक्कात विद्यापीठाचे योगदान वाढेल. याद्वारे आयपीआर सेलद्वारे पॉलिसी फ्रेम तयार करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत पेटंटबाबत प्रोत्साहनाची व्याप्ती विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

- डॉ. डी. टी. शिर्के, प्र कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

विद्यापीठातील पेटंटचे विषय

गॅस सेन्सर

सोलर सिस्टिम

कॉपर झिंक टिन

कॉपर झिंक सल्फाइड

मँगेनीज ऑक्साइड

टंगस्टन ऑक्साइड

टंगस्टन सल्फाइड

स्प्रे स्पायरोलेसीस

नॅनो मटेरियल सिंथेसर

कार्बनडॉक्स

व्हरायटी ऑफ मेटल

मेटल डिटेक्टर

अॅक्टीव्हेटेड कार्बन टू अॅडसॉबंट

मायक्रोव्हीयल प्रॉडक्शन एल डोपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मांची भेट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

वाळवा तालुक्यातील कुरळप येथील मिनाई माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेला कोल्हापूर व सांगली येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून संस्थापक डॉ. अरविंद आबा पवार (वय ६१) याच्याविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या.

आश्रमशाळेत बुधवारी पवार याने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघड झाले. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

कुरळप पोलिसांनी बुधवारी पवार व वसतिगृहातील स्वयंपाकीण मनीषा कांबळे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. दोघांना गुरुवारी न्यायालयाने ३ अक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून पवार याच्याविरुद्ध जास्त पुरावे संकलित करण्याचे आदेश दिले. विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालयाच्या उपसंचालिका जयश्री सोनवडे-जाधव या आजही घटनास्थळी होत्या.

दरम्यान, सहाय्यक निरीक्षक विवेक पाटील म्हणाले, 'कोल्हापूर व सांगली येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. प्रयोगशाळेच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाची पुन्हा पाहणी करण्यात आली. जिल्हा पोलिसप्रमुखांनी तपासाबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.'

कुरळप पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक पल्लवी चव्हाण यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे हा प्रकार समोर आला. वसतिगृहातील मुलींनी पाठविलेल्या निनावी पत्राची दखल घेवून निरीक्षक विवेक पाटील व उपविभागीय अधिकारी किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कारवाई केली. अरविंद पवारने गेल्या अनेक वर्षांपासून येथील मुलींचे शोषण केले असावे अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावडातील टाकीचा मार्ग मोकळा

$
0
0

उर्वरित कामासाठी एक कोटी २० लाखांच्या निविदेला मंजुरी

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन कसबा बावडा येथे बांधण्यात येत असलेल्या २० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे काम मार्गी लागणार आहे. टाकीचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एक कोटी २० लाखाची निविदा मंजूर झाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या टाकीचे काम मार्गी लागणार असल्याने बावडा परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून कोल्हापूरसाठी ३३ कोटीचा निधी मंजूर झाला. यापैकी सुमारे तीन कोटी निधीतून कसबा बावडा येथे पाण्याची टाकी उभारण्यासाठी वर्ग करण्यात आला. सद्य:स्थितीत कसबा बावड्याला पिण्याच्या पाण्याची समस्या नसली, तरी भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करुन टाकीची उभारणी करण्यात येणार होती. निधी प्राप्त झाल्यानंतर २०१० मध्ये तत्कालीन नगरसेविका माणिक पाटील यांच्या प्रयत्नाने कामाला सुरुवात झाली. संपूर्ण कामाचे टेंडर ठेकेदार आर. डी. देसाई यांना देण्यात आले. ठेकेदारांने वॉटर पार्क ते पाण्याच्या टाकीपर्यंतची मुख्य जलवाहिनी व उपजलवाहिने काम केले.

जलवाहिनीचे काम झाल्यानंतर टाकीच्या उभारणीला सुरुवात झाली. कॉलम टाकण्यात आल्यानंतर कामाला विविध कारणाने विलंब होऊ लागला. अनेकवेळा ठेकेदाराला नोटीस बजावूनही कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी प्रशासनाने देसाई यांच्याकडील काम काढून नवीन ठेकेदाराची नेमणूक केली. पण दुसऱ्या ठेकेदारांने वाळूची कमतरता असल्याचे कारण पुढे करत कामाला सुरुवात केली नाही. परिणामी टाकी उभारण्याच्या कामाला राजकीय हस्तक्षेपामुळे विलंब होत असल्याने तत्कालिन नगरसेविका पाटील यांनी उपोषणाचा अवलंब केला. तत्पुर्वी महापालिका व राज्य प्रशासनापर्यंत पत्रव्यवहार केला. पण कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे गेल्या आठ वर्षापासून टाकीचे केवळ कॉलमच उभे आहेत. दोन्ही ठेकेदारांनी काम करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर प्रशासनाने गेल्या महिन्यात कंटेनरसाठी (पाणीसाठा डूम) निविदा प्रसिद्ध केली. एक कोटी २० लाख किमंतीच्या निविदेसाठी जे. एस. सिंग यांची एकमेव निविदा सादर झाली असून या निविदेला अंतिम मंजुरी दिली आहे. निविदेला मंजुरी मिळाल्याने लवकरच कसबा बावडा पाण्याच्या टाकीचा कामाला सुरुवात होणार असून भविष्यातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निकालात निघणार आहे.

दृष्टिक्षेपात टाकी

२० लाख लिटर

पाण्याची साठवण क्षमता

२०१०

कमाला सुरुवात

३ कोटी

एकूण प्रशासकीय खर्च

एक कोटी २० लाख

नव्या निविदेला मंजुरी

राष्ट्रीय पेयजेल योजनेतून निधी मंजूर झाला होता. पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कामाला दिरंगाई झाली. वाढीव लोकसंख्येच्या दृष्टीने पाण्याच्या टाकीचे काम होणे आवश्यक आहे.

माणिक पाटील, माजी नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिनाई आश्रमशाळेच्या मान्यता रद्दचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, इस्लामपूर

आश्रमशाळेतील लैंगिक अत्याचारप्रकरणी समाजकल्याण विभागाने संस्थेची मान्यता रद्द व्हावी व त्या शाळेतील १४ शिक्षकांचे निलंबन करावे असा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे. त्यामुळे या आश्रमशाळेचे आणि शिक्षकांचे भवितव्य अंधारमय झाले आहे. शासनाच्या संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत शाळेकडे दुर्लक्ष केले. वसतीगृहातील सुविधांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले नसल्याने ही घटना घडली अशी चर्चा परिसरात आहे. दरम्यान, कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेला आज पुणे येथील भटक्या विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्ग कल्याण संचालनालयाचे संचालक अहिरे यांनी भेट दिली. त्यांनी सांगली समाज कल्याणचे सहआयुक्त सचिन कवले यांना संस्था रद्दचा प्रस्ताव व कर्मचारी निलंबन करण्याबाबतचा फेरप्रस्ताव पाठवण्याचा सूचना दिल्या.

आजपर्यंत शाळेला भेटी देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शेरे बुकात नोंद करताना शालेय वातावरण चांगले आहे. तसेच वसतीगृहातील मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी केली जाते अशा नोंदी केल्या आहेत. त्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अरविंद पवार याच्या आमिषाला बळी न पडता तपासणी केली असती तर हा प्रकार घडलाच नसता. चौकशीसाठी आलेल्या संचालक अहिरे यांच्यासमोर शाळेतील शिक्षकांनी अरविंद पवार याच्या कृष्णकृत्यांचा पाढाच वाचला. त्याच्याकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक पिळवणुकीबाबत माहिती दिली. पवार स्टाफला देत असलेली गुलामगिरीची वागणूक आज समोर आली. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पवारची दहशत कथन करताना अधिकाऱ्यांसमोर अक्षराशः ओक्साबोक्शी रडले. स्वयंपाकीण मनीषा कांबळे हिला हाताशी धरून तो अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी वारंवार देत होता. याशिवाय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नेहमी शिवराळ भाषेत बोलायचा. हातपाय तोडण्याची धमकी देऊन दहशतीखाली ठेवायचा. तो शाळेत येताना बंदूक घेऊन येत असल्याने कर्मचाऱ्यांत कमालीची दहशत होती. या दहशतीच्या जोरावरच त्याचे कारनामे सुरू होते असे आज संचालक अहिरे यांच्यासमोर शिक्षकांनी सांगितले.

एका शिक्षिकेला रडताना चक्कर आल्याने सर्वांची धावपळ उडाली. स्टाफने सांगितलेल्या माहितीच्या आधारे वस्तूस्थितीजन्य अहवाल शासनाला पाठवावा अशा सूचना संचालक अहिरे यांनी समाजकल्याण आयुक्त सचिन कवले यांना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफडीआयविरोधात बंद

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

देशांतर्गत व्यापारात परदेशी गुंतवणुकीला दिलेल्या परवानगीच्या विरोधात शुक्रवारी व्यवहार बंद ठेवून व्यापारी रस्त्यावर उतरले. केंद्र सरकारने व्यापार धोरणात तातडीने सुधारणा करावी, अन्यथा डिसेंबर महिन्यात दिल्लीत रामलीला मैदानावर निदर्शने केली जातील, असा इशाराही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिला आहे. व्यापाऱ्यांसह केमिस्ट असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारच्या धोरणांचा निषेध केला.

'कहाँ गये, कहाँ गए...अच्छे दिन कहाँ गए?', 'कहा है सबका साथ, सबका विकास?' असे सवाल करीत केंद्र सरकारच्या व्यापार धोरणांच्या विरोधात शुक्रवारी देशभरातील व्यापाऱ्यांनी कामबंद ठेवले. कॉन्फेडरेशन आफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या पुढाकारने कोल्हापूर जिल्ह्यातील ७५ हून अधिक व्यापारी संघटनांनी बंदमध्ये सहभाग घेतल्याने दिवसभर प्रमुख बाजारपेठा बंद राहिल्या. दुकाने बंद राहिल्याने व्यापार पेठांमध्ये शुकशुकाट होता. सर्व व्यापारी संघटनांनी सकाळी अकराच्या सुमारास कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयापासून मोटारसायकल रॅलीला सुरुवात केली. राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, महापालिका, फोर्ड कॉर्नर, व्हीनस कॉर्नर, असेम्ब्ली रोडमार्गे रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले. यावेळी व्यापाऱ्यांसोबत खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

निवेदन दिल्यानंतर व्यापाऱ्यांशी बोलताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी म्हणाले, 'केंद्र सरकारच्या व्यापार धोरणांविरोधात देशभरातील आठ कोटी व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. कोट्यवधी कुटुंबांच्या उपजीविकेचा हा गंभीर प्रश्न आहे. सरकारने तातडीने व्यापारातील परदेशी गुंतवणूक मागे घ्यावी, अन्यथा १५ डिसेंबरला दिल्लीत रामलीला मैदानावर निदर्शने केली जातील. सरकारने व्यापाऱ्यांचा आक्रोश लक्षात घ्यावा.' कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. देशव्यापी बंद यशस्वी झाल्याचा दावा व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'परदेशी गुंतवणुकीचा परिणाम देशातील २५ ते ३० टक्के जनतेवर होणार आहे. याबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार आहे. संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन निर्णय मागे घेण्याची विनंती करू. गरज पडल्यास व्यापाऱ्यांसोबत दिल्लीत धडक मारली जाईल.'

यावेळी गोशिमाचे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, उद्योजक चंद्रकांत जाधव, धैर्यशील पाटील, प्रदीपभाई कापडिया, संजय पाटील, वैभव सावर्डेकर, आदी उपस्थित होते.

व्यापारपेठात शुकशुकाट

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे मार्केट यार्ड, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, धान्य बाजार, टिंबर मार्केट, चप्पल लाइन, महाद्वार रोड या नेहमी वर्दळ असलेल्या परिसरात शुक्रवारी शुकशुकाट होता. दिवसभर व्यापाऱ्यांनी दुकाने आणि व्यवहार बंद ठेवले. यामुळे हमाल, वाहतूकदार यांचेही काम ठप्प झाले. गांधीनगरातील व्यापाऱ्यांनीही बंदमध्ये सहभाग घेतल्याने गांधीनगरात सर्वत्र शांतता होती.

शंभर कोटींची उलाढाल ठप्प

कोल्हापूरसह गांधीनगरातील व्यापाऱ्यांची रोज किमान शंभर कोटींची उलाढाल होते. शुक्रवारच्या बंदमुळे दिवसभर खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिले. यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकली नाही. धान्य, कापड, मेडिकल, किरकोळ दुकाने बंद राहिली. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरही झाला. मालवाहतूक करणारी वाहनेही थांबल्याने आर्थिक उलाढाल होऊ शकली नाही.

केमिस्ट असोसिएशनचा कडकडीत बंद

औषधांच्या ऑनलाइन विक्रीविरोधात ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी बंद आंदोलन करण्यात आले. केमिस्ट असोसिएशनने व्हीनस कॉर्नरपासून मोर्चाला सुरुवात केली. फोर्ड कॉर्नर, सुभाष रोड, लक्ष्मीपुरीमार्गे अन्नऔषध प्रशासन कार्यालय ते पुन्हा व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. यावेळी काळ्या टोप्या आणि काळे शर्ट घालून केमिस्ट असोसिएशनच्या सदस्यांनी सरकारचा निषेध केला. यावेळी केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील, उपमहापौर महेश सावंत, राजकुमार छाबडा, शिवाजी ढेगे, प्रल्हाद खवरे, राहुल कारेकर, सचिन पुरोहित, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभा शांततेतच घ्या

$
0
0

कोल्हापूर : येथील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सभा शनिवारी (ता.२२) होत आहे. सभेत गोंधळ होणार होऊन शिक्षकी पेशाची बदनामी होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे पत्र प्राथमिक शिक्षण प्रशासनाने शुक्रवारी काढले. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळाचे प्रकार घडले. बँकेचे सभासद असलेले शिक्षक जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. यामुळे सभेत गोंधळ होऊ नये याकडे लक्ष द्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देणी भागवून ‘दौलत’ चालवा

$
0
0

चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना संचलित न्यूट्रीयन्स कंपनीने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे बिल, शेतकरी व कामगारांची तोडणी व ओढणी वाहतूकदार यांचे देणे थकीत आहे. उत्पादकांच्या हितासाठी अगोदर देणी द्यावीत व त्यानंतर कारखाना सुरू करावा, अशी मागणी दौलत सभासद संघटनेच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्याकडे केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मल्टिस्टेट’ प्रश्नी गोकुळची उद्याची सभा गाजणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) मल्टिस्टेट ठरावासंबधातील महत्वाची सर्वसाधारण सभा रविवारी (ता.३०) ताराबाई पार्क येथील 'गोकुळ' कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. सत्ताधारी व विरोधकांनी प्रत्येकी दोन हजारांवर ठराव आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे ही सभा वादळी होण्याचे चिन्हे असून पोलिस प्रशासनाने सभेसाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

सभेच्या विषयपत्रिकेवर १२ व्या क्रमांकाचा मल्टिस्टेट (बहुराज्यीय सहकारी संस्थाचा कायदा) ठराव असून या ठरावामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादक संस्थाचे अस्तित्व धोक्यात येणार आहे, असा आरोप गोकुळ बचाव कृती समितीने केला आहे. मल्टिस्टेटच्या ठरावामुळे कर्नाटकासह अन्य राज्यात, पर जिल्ह्यात दूध संकलन करण्यास गोकुळला परवानगी मिळणार असून त्याचा फायदा दूध उत्पादकांना होणार आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. गोकुळवर व्यापारी मालकी रहावी यासाठीसाठी मल्टिस्टेटचा घाट घातला आहे, असा आरोप आमदार मुश्रीफ व सतेज पाटील यांनी केला आहे.

सभेच्या पार्श्वभूमीवर आरोप, प्रत्यारोप, सभा, मेळावे दोन्ही गटांकडून घेतले जात आहेत. तसेच सहकार न्यायालयातही मल्टिस्टेटच्या विरोधातही विरोधकांनी दाद मागितली. पण न्यायालयाने विरोधकांचे दावे फेटाळून लावले. मल्टिस्टेटचा ठराव मंजूर करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्याची मागणी विरोधकांनी केली आहे तर ठरावासाठी आवाजी मतदान घेण्याचा अधिकार सभासद अध्यक्षांचा असल्याने गुप्त पद्धतीने मतदान घ्यावी, ही विरोधकांची मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.

दरम्यान, शुक्रवारी दोन्ही गटांकडून सभेच्या रणनितीसाठी बैठका घेण्यात आल्या. गोकुळच्या कार्यालयात माजी आमदार महाडिक, पी.एन. पाटील, खासदार धनंजय महाडिक यांनी संचालकांची तर शासकीय विश्रामगृहात आमदार मुश्रीफ, पाटील यांनी बचाव कृती समितीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


समिती स्थापली, कार्यकक्षा ठरेना

$
0
0

लोगो - जिल्हा परिषद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समितीची स्थापना झाली. पण समितीच्या चौकशीची कार्यकक्षा ठरलेली नाही. दुसरीकडे लोहार यांच्यासह संपूर्ण माध्यमिक विभागाची चौकशी होणार असल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. दरम्यान चौकशी समिती सदस्यांची शुक्रवारी बैठक होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी, शिक्षणाधिकारी लोहार यांच्यावर आरोप केले होते. शिक्षक मान्यतेवरुन त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. सदस्यांनी, शिक्षणाधिकाऱ्यांच्या कामकाजावर टीकास्त्र सोडताना सक्तीच्या रजेवर पाठवून चौकशीसाठी आक्रमक भूमिका घेतली. सर्वसाधारण सभा होऊन दोन आठवडे उलटल्यानंतर पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील यांचा समावेश आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांची समिती सचिव म्हणून नियुक्ती झाली. मंगळवारी समिती स्थापन केल्याची घोषणा झाली. त्याचवेळी लोहारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यासंदर्भातील लेखी आदेश काढण्यात येणार होता. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे दोन दिवस कार्यालयीन कामासाठी बाहेर असल्याने चौकशी समितीच्या सदस्यांना नियुक्तीची पत्रे मिळाली नाहीत. तसेच लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश निघाला नाही. शुक्रवारी यासंदर्भात कार्यवाही होण्याची शक्यता आहे. लोहारांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबत आदेश लागू करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शिवाय चौकशी समितीतील सदस्यांना पत्रे देताना समितीची कार्यकक्षा निश्चित होणार आहे. चौकशी समितीत समाविष्ठ सदस्यांची शुक्रवारी बैठक होणार असल्याचे वृत्त आहे.

कर्मचारीही धास्तावले

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीच्या कार्यकक्षेकडे लक्ष लागून राहिले आहे. लोहारांवर सभागृहात झालेल्या आरोपांच्या अनुषंगाने समिती चौकशी करणार की शिक्षकांकडून जाहीरपणे तक्रारी मागवून चौकशी होणार याची रुपरेषा ठरविली जाणार आहे. सदस्यांनी, लोहार यांच्या कामकाजासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्या तक्रारी मागवून चौकशी करावी अशी सदस्यांची मागणी आहे. दरम्यान माध्यमिक शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार असल्याने अनेकजण धास्तावले आहेत. काही कर्मचाऱ्यांनी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभा शांततेतच घ्या

$
0
0

कोल्हापूर : येथील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सभा शनिवारी (ता.२९) होत आहे. सभेत गोंधळ होणार होऊन शिक्षकी पेशाची बदनामी होणार नाही, यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे पत्र प्राथमिक शिक्षण प्रशासनाने शुक्रवारी काढले. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी शिक्षक बँकेच्या सभेत गोंधळाचे प्रकार घडले. बँकेचे सभासद असलेले शिक्षक जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. यामुळे सभेत गोंधळ होऊ नये याकडे लक्ष द्यावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात दुचाकींसह तीन मोटारींचा चुराडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मद्यधुंद चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटला आणि त्याच्या ट्रकला रस्ताही पुरला नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या काहींनी प्रसंगावधान ओळखून हेलकावे घेणार्‍या ट्रकपासून स्वतःचा बचाव केला. मात्र चिंचोळ्या रस्त्याकडेला रात्री विश्रांती घेणार्‍या दुचाकी, चारचाकींचा चुराडा झाला. अचानक मोठा आवाज झाल्याने गावभागातील नागरिक रस्त्यावर आले. त्यांनी बेफाम ट्रक रोखला आणि मद्यधुंद चालकाला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. सांगली कॉलेज कॉर्नर रस्त्यावर हा प्रकार घडला. याप्रकरणी दहिवडी येथील संजय नागू राऊत (वय ३५) या मद्यधुंद चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सलग सात दुचाकींचा चुराडा करुन पुढे सरकलेल्या ट्रकने पुन्हा दोन मोटारींसह एका जीपला फरफटत नेले.

याबाबत अधिक माहिती अशी, दहिवडी येथील चालक संजय राऊत याने ट्रकमधून (एमएच ११ एएल ००४५) या आणलेला माल सांगलीतील मार्केट यार्डात उतरवला. त्यानंतर त्याने मद्यप्राशन केले. ट्रक घेऊन तो भावभागात आला. कॉलेज कॉर्नरपासून एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या रस्त्यावर आल्यावर ट्रक भरकटला. चालक राऊत याचा ट्रकवरील ताबा सुटला. गावभागातील चिंचोळ्या रस्त्यावरुन जाताना काही अडथळे आल्याने पाठलाग करणार्‍यांनी तो ट्रक रोखला. अन्यथा आणखी वाहनांचा चुराडा होण्याची भीती होती. टिंबर एरियातून कॉलेज कॉर्नरवर येताना ट्रक बायपासकडे जाणार होता. तत्पूर्वी तो भरकटला. रस्ता सोडलेला ट्रक आपल्या दिशेने येत असल्याचे पाहुन रस्त्याकडेला उभे राहुन गप्पा मारणार्‍या दोघांनी दुचाकी ढकलत पळ काढला. नंतर ट्रक आमराईमार्गे शहरात घुसला. हायस्कूल रोड, गणपती पेठेतून गणपती मंदीरासमोरुन ट्रक टिळक चौकात आला. तेथे येईपर्यंत रस्ता मोठा आणि पूर्णतः रिकामा असल्याने कोणतीही गडबड झाली नाही. परंतु टिळक चौकातून ट्रक चिंचोळे रस्ते असलेल्या गावभागात घुसला आणि रस्त्याकडेच्या वाहनांचा चुराडा करत आणखी चिंचोळ्या रस्त्यात घुसू लागला.

सलग सात दुचाकींचा चुराडा करुन पुढे सरकलेल्या ट्रकने पुन्हा दोन मोटारींसह एका जीपला फरफटत नेले. अपघाताचा आवाज आल्याने नागरिक जागे झाले. त्यांनी ट्रकचा पाठलाग केला. मोठ्या धाडसाने नागरिकांनी ट्रक अडविला. चालक राऊत याला खाली उतरण्यास सांगितले. मात्र मद्यधुंद राऊतला आपण काय करतोय, हे समजतही नव्हते. तो खाली उतरण्यास तयार नव्हता. अखेर नागरिकांनी त्याला खाली ओढून चांगलाच चोप दिला. या प्रकाराची माहिती मिळताच शहर पोलिस दाखल झाले. त्यांनी राऊतला ताब्यात घेतले. ट्रक जप्त केला. ज्या वाहनांचे नुकसान झाले, त्याचा पंचनामा केला. सकाळपर्यंत पंचनामे सुरू होते. चालक राऊतची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याच्याविरुद्ध मद्यधुंद अवस्थेत भरधाव आणि निष्काळजीपणे ट्रक चालवून अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राजाराम’ची सभेनंतर वादंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा शुक्रवारी वादळी ठरली. दरम्यान, सभेचे कामकाज लोकशाही पद्धतीने झाल्याचा दावा सत्ताधारी गटाचे नेते महादेवराव महाडिक यांनी केला. सभेनंतर दोन्ही गटांत जोरदार घोषणायुद्ध झाले. नंतर विरोधकांनी घेतलेल्या समांतर सभेत सर्वसाधारण सभा गुंडाळल्याचा आरोप केला. कारखान्याचे अध्यक्ष हरीश चौगले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

सभेत अध्यक्ष चौगुले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सत्तारुढ गटाचे नेते माजी आमदार महाडिक हे बोलण्यासाठी उठले. त्यावेळी सत्तारुढ गटाच्या समर्थकांनी महाडिकांचा जयघोष केला. तर विरोधकांनी आमदार सतेज पाटील यांचा जयघोष सुरू केला. व्यासपीठासमोर बसलेले काही सभासद मध्येच उठून घोषणाबाजी करीत होते. या दरम्यान, महाडिक यांनी 'आपल्याला सभा चालवायची आहे, शांत रहा' असे आवाहन करीत त्यांनी शांत केले.

सभेत माजी आमदार महाडिक म्हणाले, 'साखर उद्योग अडचणीत असताना कारखान्याने सर्व सभासदांना एफआरपीचे पैसे दिले आहेत. कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या १२२ गावांतून उसाचे गाळप केले. सरासरी १२.२५ रिकव्हरी मिळाली. तोडणी, ओढणी, कर्मचाऱ्यांची सर्व देणी दिली आहेत. साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचे किमान भाव निश्चित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐतिहासिक आहे. यापूर्वी असा निर्णय झाला असता तर आता तोट्यात गेलेले कारखाने वाचले असते. ऊस उत्पादकांचा चांगले पैसे मिळाले असते. साखरेला लावलेल्या जीएसटीच्या रकमेतील काही हिस्सा उत्पादकांच्या हितासाठीच्या कामांना द्यावा, ठिंबक सिंचन बसवण्यासाठी सरकारने शंभर टक्के अनुदान द्यावे. सहकारातील कालबाह्य नियम बदलण्याची गरज आहे. गाळप सुरू करण्याचे परवाने ऑनलाइन करण्याची गरज आहे.'

यावेळी कार्यकारी संचालक ए. व्ही. निकम यांनी सभासदांनी लेखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचून दाखवली. यांदरम्यान, विरोधी गटातील सभासद विश्वास नेजदार,नितीन पालके सह इतर सभासद प्रश्न विचारण्यासाठी माइकची मागणी करीत होते. मात्र, त्यांच्यापर्यंत माइक पोहोचलाच नाही. विरोधक आणि इतर सभासदांना तोंडी प्रश्न विचारण्याची संधीच मिळाली नाही. नंतर सभा गुंडाळण्यात आली. सभेत अनेकवेळा गोंधळामुळे वातावरण तणावपूर्ण राहिले. सभेला सर्व संचालक आमदार अमल महाडिक आदींसह सभासद उपस्थित होते.

अमल महाडिक यांचा आग्रह

राजाराम साखर कारखान्याच्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सभेत माजी आमदार महाडिक बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर गोंधळ सुरू झाला. आरोप-प्रत्यारोपामुळे सभा तीन मिनीटांतच गुंडाळण्याची वेळ आली होती. मात्र, आमदार अमल महाडिक यांनी सभा चालवा असा आग्रह धरला. त्यानंतर सभा पूर्ववत झाली.

खोट्या सह्या करून बावडेकर आत

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी 'खोट्या सह्या करून बावडेकर सभेला आले आहेत. तरीही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे. येथे लोकशाही आहे,' असा टोला लगावला. यावेळी महाडिक समर्थकांचा जल्लोष केला.

सहवीज, विस्तारीकरणाला परवानगी

'एफआरपीमुळे कारखान्याला संचित तोटा झाला आहे. मात्र, कारखान्याचा कारभार पारदर्शक, काटकसरीने केला आहे. सभासदांच्या हितासाठी कारखान्याच्या सहवीज प्रकल्प आणि विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली' अशी माहिती महाडिक यांनी दिली.

सभेनंतर दोन्ही गट भिडले

सर्वसाधारण सभा झाल्यानंतर माजी आमदार महाडिक आणि आमदार पाटील यांच्या समर्थकांत जोरदार घोषणायुद्ध सुरू झाले. दोन्ही गट एकमेकांसमोर आले. एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रयत्न झाला. ढकलाढकली सुरू झाली. दोन्ही गट इर्ष्येने, द्वेषाने आपापल्या नेत्यांचा जयघोष करीत राहिले. त्यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले. यांदरम्यान, पोलिसांचा प्रचंड फौजफाटा दाखल झाला. त्यांनी दोन्ही गटांना पांगवले आणि वातावरण शांत केले.

हत्ती चालला की मुंगस...

माजी आमदार महाडिक यांनी भाषणाला सुरवात करताच आमदार पाटील यांचे कार्यकर्ते उठून उभे राहू लागले. यावेळी महाडिक यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊ लागताच महाडिक यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. 'हत्ती चालला की मुंगस ओरडत असतात. त्यांची दखल घ्यायची नसते' असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना खाली बसण्यास सांगितले.

०००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. दरम्यान, सभेचे कामकाज लोकशाही पध्दतीने झाल्याचा दावा सत्ताधारी गटाचे नेते महादेवराव महाडिक यांनी केला. सभेनंतर दोन्ही गटात जोरदार घोषणायुध्द झाले. त्यानंतर विरोधकांनी घेतलेल्या समांतर सभेत सभा गुंडाळल्याचा आरोप केला. हुकुमशाही कारखान्याचे अध्यक्ष हरीष चौगले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

अध्यक्ष चौगुले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर महाडिक बोलण्यासाठी उठले. समर्थक महाडिकांच्या जयघोष तर विरोधकांनी आमदार सतेज पाटील यांचा जयघोष सुरू केला. समोर बसलेले काही सभासद मध्येच उठून घोषणाबाजी करीत होते. त्यावेळी महाडिक स्वत: आपल्याला सभा चालवायची आहे, शांत रहा असे आवाहन करीत राहिले.

सभेला मार्गदर्शन करताना महाडिक म्हणाले, साखर उद्योग अडचणीत असताना कारखान्याने सर्व सभासदांना एफआरपीचे पैसे दिले आहेत. कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या १२२ गावांतून उसाचे गाळप केले. सरासरी १२. २५ रिकव्हरी मिळाली. तोडणी, ओढणी, कर्मचाऱ्यांची सर्व देणी दिली आहेत. साखर उद्योगाला स्थैर्य देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचे किमान भाव निश्चित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय ऐतिहासिक आहे. यापूर्वी असा निर्णय झाला असता तर आता तोट्यात गेलेले कारखाने वाचले असते. ऊस उत्पादकांचा चांगले पैसे मिळाले असते. साखरेला लावलेल्या जीएसटीच्या रकमेतील काही हिस्सा उत्पादकांच्या हितांसाठीच्या कामांना द्यावा, ठिंबक सिंचन बसवण्यासाठी सरकारने शंभर टक्के अनुदान द्यावे, सहकारातील कालबाह्य नियमात बदल करावे, गाळप सुरू करण्यासाठीचे परवाने ऑनलाइन द्यावे अशा मागण्या त्यांनी केले.

कार्यकारी संचालक ए. व्ही. निकम यांनी लेखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वाचून दाखवली. विरोधी गटातील सभासद विश्वास नेजदार,नितीन पालके सह इतर सभासद प्रश्न विचारण्यासाठी माईकची मागणी करीत होते. मात्र त्यांच्यापर्यंत माईक पोहचला नाही. विरोधक आणि इतर सभासदांना तोंडी प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर सभा गुंडाळली. सभेत मध्येमध्ये अनेकवेळच्या गोंधळामुळे वातावरण तणावपूर्ण राहिले. अशाप्रकारे सभाच वादळी ठरली. सभेस संचालक आमदार अमल महाडिक यांच्यासह सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.

------------

चौकट

अमल महाडिक यांचा आग्रह

राजाराम साखर कारखान्याच्या सभेकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. सभेत माजी आमदार महाडिक बोलण्यासाठी उभे राहिल्यानंतर गोंधळ सुरू झाला. आरोप, प्रत्यारोपामुळे सभा तीन मिनिटातच गुंडाळण्याची वेळ आली होती. मात्र आमदार अमल महाडिक यांनी सभा चालवण्याचा आग्रह धरला. सभा पूर्ववत झाली.

चौकट

खोट्या सह्या करून बावडेकर आत

खोट्या सह्या करून बावडेकर सभेला आले आहेत, तरीही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे, येथे लोकशाही आहे, असा टोला महाडिक यांनी लगावला. यावर महाडिक समर्थकांचा जल्लोष केला.

-------------

सहवीज, विस्तारीकरणाला परवानगी

एफआरपीमुळे कारखान्याला संचित तोटा झाला आहे. मात्र कारखान्याचा कारभार पारदर्शक, काटकसरीने केला आहे. सभासदांच्या हितासाठी कारखान्याच्या सहवीज प्रकल्प आणि विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती महाडिक यांनी सांगितले.

------------

सभेनंतर भिडले

सभा झाल्यानंतर माजी आमदार महाडिक आणि आमदार पाटील समर्थकांत जोरदार घोषणायुध्द सुरू झाले. दोन्ही गट एकमेकांसमोर आले. एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचा प्रयत्न झाला. ढकला ढकलीला सुरूवात झाली. दोन्ही गट इर्षेने, व्देषाने आप, आपल्या नेत्यांचा जयघोष करीत राहिला. यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले. पोलिसांचा प्रचंड फौजफाटा दाखल झाला. दोन्ही गटांना पांगवले. वातावरण शांत झाले.

--------------

चौकट

हत्ती चालला की मुंगसे

महाडिक भाषणाला सुरवात करताच आमदार पाटील यांचे कार्यकर्ते उठून उभा राहू लागले. त्याच वेळी महाडिक यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊ लागताच महाडिक यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. हत्ती चालला की मुंगसे ओरडत असतात त्याची दखल घ्यायची नसते असे सांगत खाली बसण्यास सांगितले.

-

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात सातत्याने होत असलेल्या अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या सततच्या आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत उमटले. सदस्यांनी जलअभियंता सुरेश कुलकर्णी यांना धारेवर धरत अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला. जलवाहिनीतील बिघाड, उपसा आणि वितरणातील असमानतेमुळे पाणी पुरवठ्याची समस्या अधिक जटील बनत आहे. त्यामुळे दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केल्याचा खुलासा प्रशासनाने केला. मात्र, यानंतर सदस्य अधिकच आक्रम बनले. पाणी पुरवठ्यात सुधारणेच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

शहरातील शिवाजी पेठ, रामानंद नगर, मंगळवार पेठ, सानेगुरुजी, फुलेवाडी, राजारामपुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. सुरळीत पाणी येण्यासाठी महासभा व स्थायी सभेत अनेकवेळा चर्चा होऊन त्यावर प्रशासनाने मार्ग काढलेला नाही. अनेक ठिकाणी गळती असताना केवळ चर्चा सुरू आहे. प्रशासन पाणीपुरवठ्याचा प्रश्न गांभीर्याने घेणार की नाही? असा संतप्त सवाल सभापती आशिष ढवळे यांनी केला. 'अमृत योजनेमधून ड्रेनेज पाइपलाइनचे काम सुरू आहे. ड्रेनेजचे काम झाल्यानंतर पुन्हा जलवाहिनीसाठी रस्ते खोदणार का? दोनवेळा खोदाईपेक्षा एकाचवेळी दोन्ही लाइनचे काम करा. वारंवारच्या खोदाईचा नागरिकांना त्रास होतो' असे सदस्या प्रतिक्षा पाटील यांनी सांगितले. सदस्य संजय मोहिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत 'नागरिक पाण्यासाठी दररोज आम्हाला विचारतात. प्रशासनाने पाणी मिळणार की नाही स्पष्ट करावे' असा संताप व्यक्त केला.

'यापूर्वी प्रभागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या नगरसेवकांना यापूर्वी अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा त्रास झाला नाही. आता मात्र दररोज महिला दारात येत आहेत. तुम्ही विभागाचा कारभार स्वीकारल्यापासून सर्वच नगरसेवकांची ही स्थिती आहे. पाण्याच्या खजिना कार्यालयातील अधिकारी फोन उचलत नाहीत. उद्धट उत्तरे देतात' अशी तक्रार सदस्य अजिंक्य चव्हाण यांनी केली.

दरम्यान, 'पाण्याची क्षमता व नवीन वाढलेली कनेक्शन यांचा ताळमेळ बसत नाही. परिणामी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. 'ए' व 'बी' वॉर्डला पाणी सोडण्यासाठी कर्मचारी नसल्याने गुरुवारी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. नियोजनासाठी चार कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती केली आहे. पूर्वी नऊ ठिकाणी गळती होती. त्यापैकी चार कामांच्या निविदा काढल्या आहेत. एका कामाची वर्कऑर्डर दिली आहे. सण असल्याने शटडाउन घेतलेले नाही' असा खुलासा जलअभियंता कुलकर्णी यांनी केला. त्यानंतर माजी नगरसेवक प्रकाश मोहिते यांना आदरांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.

गाडी अड्ड्यात पार्किंग

नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई दर्शनासाठी लाखो भाविक येतात. भाविकांना वाहने लावण्यासाठी जागा नाही. भाविकांची वाहने पार्किंग करण्यासाठी गाडी अड्ड्यात सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी सत्यजित कदम व संजय मोहिते यांनी केली. गाडी अड्ड्याला गेट करुन कंपाउंड केले आहे. मोकळ्या जागेत भराव टाकला आहे. सपाटीकरण केल्यानंतर गाडी अड्ड्यात पार्किंगसाठी जागा उपलब्ध होईल. त्यामुळे उत्सवकाळात भाविकांना पार्किंगची सुविधी मिळेल असे प्रशासनाने सांगितले.

भाडे रेडिरेकनरनुसारच

मटण मार्केटमधील गाळेधारकांना पूर्वी १०८ रुपये भाडे आकारले जात होते. यात वाढ होऊन २६०० ते २८०० रुपये भाडे झाले आहे. मटण मार्केटची इमारत हेरिटेज असल्याने तेथील गाळाभाडे कमी करावे, यासाठी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करावा अशी मागणी सदस्यांनी स्थायी सभेत केली. राज्य सरकारच्या निर्णयानुसार रेडिरेकनरपेक्षा कमी भाडे घेता येणार नाही. त्यामुळेच गाळेधारकांना डिमांड नोटीस पाठवल्या आहेत. दर तीन वर्षानी १५ टक्के भाडेवाढ होत असल्याने त्याच्यापेक्षा कमी भाडे आकारणी होऊ शकत नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले. परिणामी महापालिकेच्या गाळेधारकांना रेडिरेकनरनुसार भाडे द्यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे तेरा घरांची पडझड

$
0
0

पाच लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परतीच्या पावसाच्या तडाख्याने गेल्या दोन दिवसात ठिकठिकाणी मिळून तेरा घरांची पडझड झाली आहे. झाडे आणि भिंती कोसळून वाहनांची मोडतोड झाली. शिरोळ येथे झालेल्या पावसात दोन जनावरे मृत्युमूखी पडली. विविध भागातील घरांची पडझड, जनावरांच्या मृत्युमुळे नुकसानीचा आकडा पाच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

बुधवारी मध्यरात्री आणि सायंकाळी पावसाने शहर आणि जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शहर आणि उपनगरातील होर्डिंग्ज, स्वागत कमानी जमीनदोस्त झाल्या. विविध भागात झाडे कोसळून वाहनांची नासधूस झाली आहे. वाहनांची मोडतोड झाल्यामुळे दुरुस्तीची झळ सोसावी लागली. कसबा बावड्यातही जयभवानी गल्लीत घरावर झाड कोसळून किरकोळ नुकसान झाले. नागाळा पार्क परिसरात काही घरात पाणी शिरले होते.

शिरोली येथे बाळू पुजारी यांच्या घराची अंशत: पडझड होऊन २६००० हजार रुपयांचा फटका बसला. शिवाय शिवाजी रानगे यांच्या घराचे नुकसान झाले. पावसामुळे घराची पडझड होऊन त्यांना २४००० रुपयांची आर्थिक झळ सोसावी लागली. निलेवाडीत तीन घरे पडून साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. जुने पारगावमध्ये चार घरांना पडझड झाली. यामध्ये ७०,००० रुपयांचे नुकसान झाले. नवे पारगावातील काही घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. या नुकसानीत नागरिकांना ८०,००० रुपयांचा फटका बसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अट शिथिल करा

$
0
0

कोल्हापूर

मुस्लिमांप्रमाणे हिंदू समाजालाही बक्षीसपत्र करून देताना दस्तची अट शिथिल करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनात म्हटले आहे, मुस्लिम समाजात हिबा (बक्षीस) कायद्याप्रमाणे तोंडी बक्षीसपत्राला मान्यता आहे. नोंदणी केलेल्या दस्तची सक्ती नाही. याउलट हिंदू समाजाला स्टँप ड्युटी भरावी लागते. दस्त करावा लागतो. हे बंद करून शंभर आणि ५०० रूपयांच्या स्टँम्पवर बक्षीसपत्र करण्यासंबंधी सरकारने कायदा करावा. निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, दूर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाळेधारकांकडून साडेचार लाखांची थकबाकी वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या इस्टेट विभागाच्यावतीने थकबाकीदार दुकान गाळेधारकांकडून थकीत रक्कम वसूल करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गाळे सील करण्याबरोबर ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी सात गाळे सील करुन त्यांच्याकडील चार लाख ७६ हजार रुपयांचे थकीत भाडे वसूल केले.

महापालिकेने विविध व्यापारी संकुलामध्ये दुकानगाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहे. गेल्या काही वर्षापासून दुकानगाळ्यांचे भाडे थकीत गेले आहे. दुकानगाळ्यांच्या भाडेपट्टीमध्ये वाढ आली आहे. थकीत भाडे वसुलीसाठी इस्टेट विभागाने वसूलीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. नोटिशीनंतर भाडे जमा न करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने सील करण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी ए, बी, सी, डी व ई वॉर्डच्या विविध मार्केटमधील सात गाळे सील केले. या गाळेधारकांकडून थकीत भाड्यापोटी चार लाख ७६ हजार रुपये वसूल करण्यात आले. थकीत गाळेधारकांची संख्या जास्त असून कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इस्टेट विभाग कारवाई करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यामुळे अडले जॅकवेलचे काम

$
0
0

Appasaheb.mali@timesgoup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : सलग चार महिने कोसळणारा पाऊस आणि धरणातील पाणीसाठ्यामुळे कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनने पाणी आणण्याच्या योजनेत काळम्मावाडी धरणालगत उभारण्यात येणाऱ्या जॅकवेलचे काम बंद पडले आहे. जॅकवेलचे काम सुरू व्हावे यासाठी महापालिका आणि जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून प्रयत्न सुरू असले तरी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याशिवाय हे काम पूर्ण होऊ शकत नाही. धरणातील पाणीपातळी बारा मीटरने कमी झाल्यास जॅकवेल व इन्टकवेलचे काम सुरू होऊ शकते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी करण्यासाठी जादा विसर्ग करावा, असा महापालिकेचा प्रस्ताव आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली आहे. थेट पाइपलाइन योजनेत धरणाच्या बाजूला १८ मीटर व्यासाचे दोन जॅकवेल प्रस्तावित आहेत. त्यासाठी ४६ मीटर खोदाई होणार आहे. यापैकी ४३ मीटर खोदाईचे काम पूर्ण झाले होते. खोदाई केलेल्या जागेत धरणातील पाणी पसरू नये म्हणून कॉपर डॅमही बांधण्यात आला आहे. मात्र, सलग चार महिने धरणक्षेत्रात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कॉपर डॅम आणि जॅकवेलसाठी खोदाई केलेली जागा पाण्याखाली गेली आहे. परिणामी जॅकवलेचे काम बंद पडले आहे.

काळम्मावाडी धरण २५.३९२ टीएमसी क्षमतेचे आहे. सध्या धरणात ९६ टक्के म्हणजेच २४.४४ टीएमसी पाणी आहे. धरणाची पाणीपातळी ६४५.६० मीटर आहे. जॅकवेल व धरणक्षेत्रातील इन्टकवेलच्या कामासाठी पाणीपातळी ६३४ मीटर असणे अपेक्षित आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने राधानगरीऐवजी काळम्मावाडी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवावा असा महापालिकेचा प्रस्ताव आहे. कोल्हापूर शहराला राधानगरी आणि काळम्मावाडी या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होतो. मात्र, राधानगरी धरणातून पिण्याचे आणि सिंचना अशा दोन्ही प्रकारे पाण्याचा मोठा वापर होतो. 'जॅकवेल'च्या कामाला नजीकच्या काळात सुरुवात करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाण्याचा जादा विसर्ग आवश्यक आहे.

३८ किलोमीटरची पाइपलाइन पूर्ण

'काळम्मावाडी धरण ते कोल्हापूर अशी जवळपास ५३ किलोमीटर लांबीची पाइपलाइन प्रस्तावित आहे. यापैकी आतापर्यंत ३८ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे,' अशी माहिती या प्रकल्पाचे सल्लागार असलेल्या युनिटी कंपनीचे प्रतिनिधी राजेंद्र हासबे यांनी सांगितले. 'सोळांकूर येथे चार कि.मी. आणि धरणापासून सोळांकूरपर्यंतच्या मार्गावरील आठ किलोमीटर पाइपलाइनचे काम अजून अपूर्ण आहे. शिवाय धरणक्षेत्रात इन्टकवेल उभारणी प्रस्तावित आहे. इन्टकवेलचे तीन मीटरचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अजून सात मीटरचे काम शिल्लक आहे.

कामाला मुदतवाढीचा प्रस्ताव

जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे थेट पाइपलाइन योजनेचे काम आहे. कंपनीने योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी डिसेंबर २०१९पर्यंत मुदतवाढ मिळावी असा प्रस्ताव महापालिकेकडे सादर केला आहे. मुदतवाढीच्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. ऑगस्ट २०१४मध्ये योजनेच्या कामाचे उद्घाटन झाले. कंपनीने २७ महिन्यांत काम पूर्ण करून फेब्रुवारी २०१७ मध्ये योजना महापालिकेकडे हस्तांतरित करायची होती. मुदतीत काम न केल्यामुळे कंपनीवर दंडात्मक कारवाई सुरू आहे.

थेट पाइपलाइन योजनेत जॅकवेल उभारणीचे काम महत्त्वपूर्ण आहे. कामाला लवकर सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दूधगंगा डावा कालवा विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्यांसोबत काळम्मावाडी धरणातून पाण्याचा जादा विसर्ग करावा यासाठी प्राथमिक चर्चा झाली आहे. महापालिकेच्या स्तरावरुन पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. शिवाय धरण परिसरातील १.३५ हेक्टर जमीन पाइपलाइन योजनेसाठी वार्षिक एक रुपये इतक्या नाममात्र भाड्याने मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागानेही तशी शिफारस केली आहे.

- भास्कर कुंभार, उप जल अभियंता महापालिका

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची ४५ वाहनमालकांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार शहराच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या नादुरुस्त आणि बेवारस वाहनांचा सर्व्हे सुरू केला आहे. शुक्रवारी वाहतुकीला अडथळा ठरणारी ४५ वाहने आढळली. या वाहनमालकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. चार दिवसांत रस्त्यावरील वाहने न हटवल्यास ती जप्त करण्याचा इशारा महापालिकेने नोटिशीद्वारे दिला.

मार्च २०१८पासून महापालिकेने एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे पार्क केलेली आणि वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केली होती. सहा महिन्यांत अतिक्रमण विभागाने ६९ वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. कारवाईनंतर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी काहीशी कमी झाली. तरीही अद्याप बेवारस वाहनांची संख्या कमी झालेली नाही. परिणामी अतिक्रमण विभागाने पुन्हा कारवाईस सुरुवात केली आहे.

अतिक्रमण विभागाच्या पथकाने शुक्रवारी मुक्त सैनिक वसाहत, न्यू शाहूपुरी, रामानंदनगर, माळी कॉलनी, जुना पूल पेट्रोल पंपासमोर, खानविलकर पेट्रोल पंपासमोर, महावीर गार्डन, मंगळवार पेठ, बेलबाग रोड, पद्मावती गार्डन, उद्यमनगररोड, डोंबारवाडा, पांजरपोळ रोड, राजारामपूरी ११वी गल्ली, बुरुड गल्ली, न्यू कॉलेज, खरी कॉर्नर रोडवर पाहणी केली. पाहणीमध्ये ४५ वाहने वाहतुकीला अडथळा करणारी आणि बेवारस असल्याचे निदर्शनास आले. अशा वाहनांवर पाहणी दरम्यानच नोटिसा बजावण्यात आल्या. नोटीस बजावलेल्या वाहनधारकांनी सोमवारपर्यंत (१ ऑक्टोबर) वाहन काढून न घेतल्यास ती जप्त केली जातील.

दंडाची रक्कम वाढवण्याची गरज

अनेक दिवस पार्क केलेली वाहने जप्त करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सलग दोन दिवस पाहणी करतात. वाहनाचे फोटो काढून ते हटविण्याच्या सूचना करतात. सूचनेची अंमलबजावणी न केल्यास वाहन जप्त केले जाते. यासाठी महापालिकेला क्रेनसाठी दिवसाला २१५० रुपये भाडे द्यावे लागते. दिवसभराच्या कारवाईसाठी महापालिकेला दोन कर्मचाऱ्यांचे वेतन व क्रेन भाडे असे सुमारे ३,५०० रुपये खर्च येतो. त्यामुळे प्रशासनाने खर्चापेक्षा जास्त दंड लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला. पण, लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे दंडाची रक्कम कमी केली आहे. त्यामुळे रस्त्यावरील बेवारस वाहनांची संख्या कमी झालेली नाही. अशा वाहनांची संख्या कमी करण्यासाठी आणि बेवारस वाहनधारकांवर जरब बसण्यासाठी दंड वाढवावा अशी मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सभा परिसरात वादळापूर्वी शांतता

$
0
0

मल्टिस्टेट ठरावाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त

तिढा मल्टीस्टेटचा ... लोगो

.....................

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भला मोठा मंडप, खुर्च्यांची मांडणी, कर्मचारी, अधिकाऱ्यांची लगबग, संचालकांचे हास्यविनोद असे खेळीमेळीचे वातावरण जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या सभेपूर्वी गोकुळच्या आवारात दरवर्षी दिसायचे. पण यंदा मल्टिस्टेटचा ठरावाला विरोध होणार असल्याने सध्या ताराबाई पार्क येथील गोकुळच्या परिसरात तणावपूर्ण शांतता जाणवत आहे. सभास्थळांची पोलिसांकडून वारंवार होणारी पाहणी, सभेसाठी कुणाच्या नावे ठराव केला आहे, याची संचालकांकडून सुरु असलेली खातरजमा, नेतेमंडळींची फोनाफोनी असे चित्र पहायला मिळत आहे. रविवारी (ता. ३०) सभास्थळी जाणाऱ्या मार्गावर पोलिसांकडून नाकाबंदी केली आहे.

संपूर्ण राज्याचे 'गोकुळ'च्या सभेकडे लक्ष लागले आहे. सभेत बोगस ठरावधारक घुसवण्याचा आरोप गोकुळ बचाव कृती समितीने केला असून सभेचा ताबा २४ तास अगोदर पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी समितीने केली आहे. पण सहकार कायद्यानुसार सभा घेण्याचा अधिकारी गोकुळ संस्थेला असल्याने पोलिस फक्त कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत करणार आहेत.

ताराबाई पार्क येथील गोकुळच्या प्रांगणात भला मोठा मांडव घालण्यात आला आहे. गोकुळचे ३६५९ सभासद असून ३७०० खुर्च्या मांडण्यात येणार आहेत. तसेच संचालक मंडळांसाठी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा सुरु होणार आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडी तालुक्यातील दूध उत्पादक संस्था प्रतिनिधी सभेला उपस्थित राहणार असल्याने सकाळी नऊ वाजल्यापासून सभासदांना सोडण्यात येणार आहे. गोकुळच्यावतीने प्रत्येक संस्थेला बारकोड असलेला पास दिला आहे. बारकोड तपासून सभासदांना आत सोडण्यात येणार आहे. बारकोड तपासणारी चार मशिन प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात येणार आहे. पण सभासदांची गर्दी पाहता बारकोड यंत्रणा किती सक्षमपणे चालणार या विषयी शंका उपस्थित केली जात आहे. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह संचालक उपस्थित राहणार आहेत.

सर्वसाधारण सभेत होणारा संघर्ष लक्षात घेऊन सभास्थळी जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात येणार आहे. पितळी गणपती मंदिर ते एसपी ऑफीस चौक हा मार्ग सभेच्या कालावधीत बंद ठेवला जाणार आहे. सभासदांना वाहने लावण्यासाठी पोलिस मैदानात पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.

०००००

असा आहे बंदोबस्त ...

अतिरिक्त अधीक्षक १

उप अधीक्षक २

निरीक्षक ४

पोलिस १४०

होमगार्ड २५

वाहतूक पोलिस ३०

राज्य राखीव दलाची तुकडी १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवशक्ती’करणार वीरगळांचे संवर्धन

$
0
0

कोल्हापूर: शूरवीरांची स्मृतिचिन्हे समजल्या जाणाऱ्या वीरगळांचे संवर्धन करण्यासाठी शिवशक्ती प्रतिष्ठान पुढे सरसावली आहे. कसबा बीड येथील वीरगळ जतन करण्यात येणार आहे.

वीरगळ अभ्यासक अनिल दुधाणे, प्रतिष्ठानचे पमुख साताप्पा कडव यांनी संवर्धनाचे काम कसे व किती टप्प्यात करण्यात येणार आहे यासंबंधी मार्गदर्शन केले. करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सरपंच सत्यजित पाटील व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाला सुरुवात झाली. सुमारे ३५ वीरगळ संकलित केल्या आहेत. याप्रसंगी बबन गावडे, मच्छिंद्र चौगले, भीमराव पानारी, विजय काताळे, नीलेश खोले, नंदकुमार कदम, शिरीष जाधव, राजकिरण सावडकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images