Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भुदरगड गणरायाचे उत्साहात स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

भुदरगड तालुक्यात गणरायाचे उत्साही वातावरणात पारंपरिक वाद्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खानापूर (ता. भुदरगड) येथे घरी गणपती दर्शन घेऊन आरती केली.

आज सकाळपासूनच आबालवृद्ध, महिला गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. कुंभार गल्ल्यांसह विविध स्टॉलवरून गणेशमूर्ती आणल्या जात होत्या. सार्वजनिक गणेश मंडळांनी दुपारनंतर गणेशमूर्ती आणल्या. लेझीम, झांज पथक, ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या. दुपारी तीनच्या सुमारास पालकमंत्री पाटील यांचे खानापूर येथे आगमन झाले. त्यांनी आपल्या घरातील गणपतीचे दर्शन घेऊन आरती केली. तळेमाऊली मंदिरात दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत, तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयसिंगपुरात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

येथील ज्ञानानंद फ्रेंड्स सर्कलच्या गणेश मंडळाची मिरवणूक सुरू असताना कार्यकर्त्यांना दगड व काठीने मारहाण झाली. त्यानंतर पोलिसात फिर्याद दिली म्हणून पुन्हा मारहाण करण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा ईदगाह मैदान व दसरा चौक परिसरात ही घटना घडली. या मारहाणीत पाचजण जखमी झाले आहेत.

सुशांत सुरेश हजारे (वय ३०, रा. झेले हायस्कूलसमोर, जयसिंगपूर), सचिन अनिल लाटकर (वय २५), शुभम संतराम बामणे (वय २२), महेश महादेव हजारे (वय ३०, सर्व रा.इंदिरानगर सोसायटी, जयसिंगपूर), वैभव तात्यासो भतगे (वय २६, रा.नांदणी नाका, जयसिंगपूर) अशी जखमींची नावे आहेत. या मारहाणप्रकरणी पोलिसांनी संभाजीनगर तरूण मंडळातील मयुरेश गायकवाड, रोहन कांबळे, गिरीश गाडीवडर, किरण उर्फ गोट्या चव्हाण (सर्व रा. संभाजीनगर, जयसिंगपूर) यांच्यासह अनोळखी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ज्ञानानंद फ्रेंड्स सर्कल मंडळाची गणेश मिरवणूक ईदगाह मैदानाजवळ आली होती. यावेळी मयुरेश गायकवाड, रोहन कांबळे, गिरीश गाडीवडर, किरण उर्फ गोट्या चव्हाण यांच्यासह अनोळखी चार ते पाचजण मोटारसायकलवरून आले. त्यांनी सुशांत हजारे व त्याचा मित्र सचिन लाटकर यांना मारहाण करून ते पसार झाले. यामुळे सुशांत हजारे यांनी जयसिंगपूर पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. यानंतर पुन्हा रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथे येऊन वैभव भतगे, शुभम बामणे, महेश हजारे यांना काठीने तसेच दगडाने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत. सुशांत हजारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक, सतेज संघर्ष टोकाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघ मल्टिस्टेट करण्याच्या मुद्द्यावरुन पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला चालला असल्याचे दिसून येत आहे. 'गोकुळ'च्या ताराबाई पार्कातील कार्यालयात बुधवारी आमदार पाटील समर्थक विश्वास नेजदार यांना झालेल्या मारहाणीमुळे समर्थक संतप्त झाले आहेत. गुरुवारी 'अजिंक्यतारा' येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नेजदार यांचे पुतणे, नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांनी महादेवराव महाडिक यांनी कसबा बावड्यात येऊन दाखवावे, असे खुले आव्हान दिले. त्याचवेळी अध्यक्ष विश्वास पाटील यांनीही 'गोकुळ'च्या ताराबाई पार्क कार्यालयात येऊन बघावे, असा इशारा दिला.

नेजदार म्हणाले, 'माझे काका विश्वास नेजदार गोकुळचे ज्येष्ठ सभासद आहेत. बुधवारी गोकुळच्या संचालक समर्थक गुंडांनी जी मारहाण केली त्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार नाही. या प्रकाराला नजीकच्या काळात 'जशास तसे' उत्तर देण्याची तयारी केली आहे. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी अध्यक्षासह संचालकांची होती. मात्र उत्तर देण्याऐवजी समर्थक गुंडांकडून त्यांना मारहाण करण्यात आली. या मारहाणीला आम्ही बावडेकर जशास तसे उत्तर देऊ.'

विश्वास नेजदार म्हणाले, 'प्रश्न विचारण्याच्या प्रामाणिक हेतून संपर्क सभेत गेलो होतो. गोंधळ घालायचाच असता तर मीही समर्थक घेऊन गेलो असतो. माझ्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी अध्यक्ष, संचालकांच्या बगलबच्च्यांनी गोंधळ घातला. मल्टिस्टेटच्या ठरावाला विरोध केल्यानेच मला मारहाण झाली.'

-------------

बावडेकर जशास तसे उत्तर देतील...

यावेळी श्रीराम सोसायटीचे संचालक आणि आमदार पाटील यांच्या समर्थक नगरसेवकांचीही बैठक 'अजिंक्यतारा' येथे झाली. नेजदार यांच्यासारख्या ज्येष्ठ सभासदास भाडोत्री गुंडांकडून मारहाण झाली. हा कसबा बावडा व लाइन बाजारावासीयांचा अपमान आहे. त्यामुळे विश्वास पाटील व त्यांच्या बगलबच्चांना जशास, तसे उत्तर देऊ, असा इशारा नगरसेवक सुभाष बुचडे, माजी महापौर स्वाती यवलुजे, नगरसेवक मोहन सालपे, श्रावण फडतरे, माधुरी लाड, अशोक जाधव, श्रीराम सोसायटीच्या सभापती प्रविण लाड आदींनी याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकांत दिला आहे.

-------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरकती डावलून वीज दरवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वीज दरवाढीच्या विरोधात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून २५ हजारांहून हरकती नोंदविल्या होत्या. मात्र, राज्य वीज नियामक आयोगाने हजारो हरकती डावलत ग्राहकांना पंधरा टक्के वीज दरवाढीचा झटका दिला. इंधन महागाईने नागरिक होरपळत असताना पुन्हा दरवाढीचा शॉक दिल्याने सामान्यांचे जगणे असह्य बनल्याची ओरड होत आहे. दुसरीकडे राज्यातील ४० लाख कृषी पंपधारकांना जादा झळ सोसावी लागणार आहे. कोल्हापूर परिसरातील औद्योगिक वसाहतींनाही दरवाढीचा फटका बसेल. त्यामुळे या विरोधात पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.

महाराष्ट्रात औद्योगिक वीजेचे दर अन्य राज्यातील वीज दरवाढीपेक्षा पूर्वीपासून जास्त आहे. जादा दराची वीज, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे कारखानदार, उद्योजक अन्य राज्याच्या वाटेवर आहेत. आता पुन्हा वीज दरवाढीची आकारणीमुळे कारखानदार, उद्योजक अन्यत्र स्थलांतर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतीसह गोकुळ शिरगाव एमआयडीसी, शिरोली एमआयडीसी, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कारखानदार, उद्योगांना वीज दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केल्यानंतर कोल्हापूर, सांगलीतून मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविल्या होत्या. कारखानदार, उद्योजकांनी त्याला आक्षेप घेतला होता. सुनावणीसमोर महावितरणाचा वीज दरवाढीचा प्रस्ताव कसा चुकीचा आहे हे पटवून दिले होते. थकबाकी, वीज गळतीकडे लक्ष वेधले होते. वीज नियामक आयोगाने त्या हरकती डावलून वीज दरवाढ जाहीर केली.

राज्यातील सर्वच वीज ग्राहकांची ही फसवणूक आहे. उपलब्ध माहितीनुसार ग्राहकांवर पंधरा टक्के दरवाढ लादली आहे. नियामक आयोगाने महावितरणची २०,५६१ कोटी रुपयांची तूट मान्य केली. यापैकी ८,२५७ कोटी रुपये तूट म्हणजे सहा टक्के रक्कम रोखीने वसूल केली जाणार. यापैकी सहा टक्के दरवाढ एक सप्टेंबरपासून तर उर्वरित १२,३८२ कोटी रुपयांची तूट अर्थात नऊ टक्के रक्कम वीस एप्रिलनंतर वसूल केली जाईल. नियामक आयोगाने लागू केलेल्या दरवाढीचा अभ्यास सुरू असून दोन दिवसात त्यासंदर्भात स्पष्ट भूमिका मांडू.'

- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना

एक जून २०१५ रोजी विधानभवनात ऊर्जामंत्र्यांनी कोणतीही वीज दरवाढ लादणार नाही शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात वीज देण्याची घोषणा केली होती. मात्र सरकारचे बोलणे एक आणि कृती त्याच्या उलटी अशी वर्तणूक आहे. वीज दरवाढीचा निर्णय हा सामान्य शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे. राज्यातील ४० लाख कृषीपंपधारकांना त्याचा झटका बसणार आहे, या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल.

- विक्रांत पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशन

महाराष्ट्रातील वीज दर इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे. कर्नाटक, गोवा, गुजरात या शेजारील राज्यात वीज दर कमी आहे. कोल्हापुरात फाऊंड्री उद्योग जास्त आहे. फाऊंडी उद्योगासाठी वीज हे रॉ मटेरियल आहे. वीज दरवाढ झाली तर उत्पादन खर्च वाढतो. कोल्हापूर परिसरात सुमारे २५००....एक राष्ट्र एक कर ही प्रणाली लागू केली आहे. तर एक राष्ट्र एक वीज दर का लागू केली नाही. फाऊंडी उद्योग, मशिन शॉप या साऱ्याच घटकांना फटका बसणार आहे.

- हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन संस्कृतींच्या मिलाफाचा न्यारा थाट

$
0
0

धागा ... संस्कृतीचा, परंपरेचा .......... लोगो

..................

कर्नाटकाच्या विविध भागातील बांधव झाले कोल्हापूरशी समरस

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुणी व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने तर कुणी रोजगाराच्या शोधात कोल्हापूर गाठले. काही संस्थानकाळात तर काहीजण ७० ते ८० वर्षापूर्वी कोल्हापुरात स्थायिक झाले आहेत. आता या कुटुंबीयांची चौथी, पाचवी पिढी कोल्हापुरात आहे. कर्नाटकाच्या विविध भागातील ही मंडळी कोल्हापूरशी समरस झाली आहेत. विविध जातीधर्मातील या मंडळींनी गावाकडील पाऊलखुणा जपताना येथील संस्कृती, रितीरिवाज पूर्णपणे अंगिकारली आहे. सण समारंभापासून गणेशोत्सवापर्यंत या मंडळीनी दोन्ही प्रातांतील संस्कृतीचा मिलाफ घडवत उत्सवाचा न्यारा थाट निर्माण केला आहे.

सीमाभागातील बेळगाव, चिकोडी, निपाणीसह अथणी, विजापूर, धारवाड, हुबळी अशा विविध भागातून कोल्हापुरात येऊन स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या हजारोंच्या पटीत आहेत. काही कुटुंबे व्यापारात आहेत तर काही नोकरी, व्यवसाय करत आहेत. कोल्हापुरातील धान्य व्यापारात तर नष्टे, कटके, लकडे, दिवटे, गाडवे, हळदे, वाली, कदम, कामत, रासम, पाटील, अथणे, माने अशी कितीतरी कुटुंबे आहेत. यांच्यासह विविध जातीधर्मातील लोक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने कोल्हापूरकर बनले. मूळचे कर्नाटकचे असलेल्या आणि गेल्या पाच पिढया कोल्हापूरच्या मातीशी समरस झालेल्या कुटुंबीयांचा आज विस्तार झाला आहे. सण, समारंभ उत्सवात सगळे भाऊबंद जमतात. बाप्पांच्या स्वागतासाठी काही ठिकाणी कुटुंबीयांच्या तीन पिढ्या एकत्र येतात.

'बाप्पाच्या आगमनाच्या वार्तेपासून शनिवार पेठेतील काकांच्या घरी एकच धामधूम असते. प्रत्येकजण बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेला असतो. गणेशमूर्ती भोवती सजावट, रोषणाईसाठी तर बच्चे कंपनीही सरसावलेली असते. घरगुती गणेश उत्सव कालावधीत रोज सकाळ आणि संध्याकाळी कुटुंबातील सगळे सदस्य जमतात. नष्टे कुटुंबीय हे कोल्हापूरशी समरस झाले आहेत. कोल्हापूरची संस्कृती, रितीरिवाज, सण समारंभ सारं काही इथल्या संस्कृतीशी मिळतेजुळते असल्याचे संदीप नष्टे यांनी सांगितले. संदीप हा नष्टे कुटुंबांतील कोल्हापुरातील चौथ्या पिढीचा प्रतिनिधी.

व्यापार, रोजगाराच्या शोधार्थ अनेकांनी कोल्हापूरची वाट धरली. या उद्यमशील नगरीत अनेकांनी अर्थार्जनासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरू केले. पूर्वापार व्यापार व्यवसाय सांभाळत असतानाच काहीजणांनी आता वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत. मात्र सण, समारंभ, उत्सव आणि त्या माध्यमातून संस्कृतीशी विणलेली घट्ट नाळ कायम आहे. घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेशोत्सवात त्यांचा सहभाग आहे. ही मंडळी रहायला वेगवेगळ्या ठिकाणी असली तरी सण, समारंभाला एकत्र येतात. गणेश चतुर्थीची तयारी आठ दिवस अगोदर सुरू होते. या उत्सवासाठी सगळी भावंडे, त्यांची मुले एकवटतात. सकाळ, संध्याकाळ पूजा अर्चा, आरती होते. या निमित्ताने तीन पिढ्या एकत्र येतात.

.................

गौराई गीतांची परंपरा

गल्लीत घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होते. पाच दिवसाचा उत्सव संपला की घरगुती गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक एकत्र काढली जाते. आजही वाजतगाजत विसर्जन मिरवणूक निघते. पूर्वी गणेश उत्सवाच्या कालावधीत झिम्मा फुगडी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या स्वरुपात व्हायचे. मुली, गृहिणी लोकगीते, झिम्मा फुगडीवर फेर धरायच्या. गल्लोगल्ली गौराईची गाणी रंगायची. नव्या पिढीतील युवतीही गौराईची गीते म्हणत परंपरा जपत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ घशात घालण्यासाठीच मल्टिस्टेट

$
0
0

आमदार सतेज पाटील गटाचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळ संघ मल्टिस्टेट झाल्यास तेथील नोकर, कामगार, सभासद, उत्पादकांच्या हिताला धक्का लागणार आहे. छत्रपती राजाराम कारखान्याप्रमाणे परराज्यातील सभासद करून गोकुळ घशात घालण्यासाठीच सत्ताधारी मल्टिस्टेटचा घाट घातला आहे. त्यास विरोधासाठी आमदार हसन मुश्रीफ येणार आहेत. जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधींनीही विरोधासाठी उपस्थित राहावे', असे आवाहन आमदार सतेज पाटील गटाचे बाबासाहेब चौगले, बाबासाहेब देवकर, किरणसिंह पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, 'करवीर दूध संघातून गोकुळ निर्माण झाला. या संघाची मूळ ओळखच बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारचे कोणतेही निर्बंध असू नयेत, नियम अटी पाळणे बंधनकारक असू नये, कायमस्वरूपी संघ आपल्याच ताब्यात रहावा, यासाठीच मल्टिस्टेट घाट घातला आहे. त्यास जिल्ह्यातील सभासदांचा मोठ्या प्रमाणात विरोध आहे. तरीही २१ रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हुकूमशाही पध्दतीने ठराव मांडला जाणार आहे. हा ठराव हाणून न पाडल्यास संघ कोल्हापूर जिल्ह्यात आणि फायदा परराज्याला होईल. याउलट विरोधकांचा आवाज दाबून कोणत्याही परिस्थितीत ठराव मंजूर करून घेण्यात येईल.

गणेशोत्सव काळात सभा घेऊ नये, तारीख बदलावी अशी मागणी सहकार विभागाकडे केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. जिल्ह्यातून येणाऱ्या सर्व सभासदांना बसण्यासाठीची बैठक व्यवस्था अपुरी पडणार असल्याने ताराबाई पार्कातील कार्यालय परिसरातील जागा बदलावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुखांकडे निवेदनाव्दारे केली आहे. त्याचीही दखल घेतलेली दिसत नाही. विरोधी सभासदांना सभेच्या ठिकाणी पोहचता येऊ नये, त्यांना खुर्च्या मिळू नये, असे नियोजन केले जात आहे. त्या दिवशी सकाळी सातपासून खुर्च्या अडविण्यासाठी संचालक समर्थक मोठ्या संख्येने सभेच्या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली आहे.'

-------

चौकट

पारदर्शक कामकाज आहे तर ...

गोकुळचे कामकाज पारदर्शक असल्याचे सांगितले जाते, हे खरे असेल तर खुल्या मैदानात सर्वसाधारण सभा घेऊन सभासदांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे संचालकांनी देणे गरजेचे आहे. हे न करता छोट्या जागेत सभा घेऊन गेल्यावर्षीप्रमाणे सभा गुंडाळण्याचेच नियोजन असल्याची टीका भुयेकर यांनी केली. करवीर तालुका संपर्क सभेत संचालकांनी आपल्या समर्थक गुंडांना आणून जाणीवपूर्वक गोंधळ घातल्याचा आरोप शशिकांत खोत यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत जल्लोषी मिरवणुका

$
0
0

मँचेस्टरनगरी गणरायाचे जल्लोषी स्वागत

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, ढोल-ताशांचा, झांजपथकाचा निनाद आणि बालचमूंचा ओसंडून वाहणारा उत्साह अशा आनंदमयी वातावरणात गुरुवारी इचलकरंजीत विघ्नहर्त्या गणरायाची भक्तांनी प्रतिष्ठापना केली. दैनंदिन अडचणी दूर सारून आगामी दहा दिवस आनंदात घालवण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले. शहर परिसरात गणरायाचे वाजत-गाजत, धुमधडाक्यात स्वागत झाले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांबरोबरच घरोघरी उदंड उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

गुरुवारी सकाळपासूनच गणेशाच्या प्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू होती. विद्युत रोषणाई, रंगीबेरंगी माळांसह सजवलेल्या टेबलवर विघ्नहर्त्या गणरायाची भक्तिभावे विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. शहरातील मानाच्या गणपतींचे आणि विविध गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीचे वाजत गाजत आगमन झाले. काही मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना रात्री उशिरापर्यंत सुरू होती. आज गणेशचतुर्थीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हे बाप्पा दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशभक्तांच्या घरी पाहुणचार घेतील.

मंडळांच्या कार्यकर्त्यांची देखावे तयार पूर्ण करण्याची लगबग सुरू झाली आहे. लवकरच देखावे तयार करुन ते नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्याच्या प्रयत्नात मंडळाचे कार्यकर्ते गुंतले आहेत. यंदाही पौराणिक, सामाजिक विषयावरील देखावे पाहण्याठी मिळणार आहेत. सकाळी शहरांतील कॉ. के. एल. मलाबादे चौक ते गांधी पुतळा या मार्गावरील बाजारपेठ गर्दीने ओसंडून वाहत होती. बुधवारपासून दहा दिवस सुरू झालेल्या गणेशोत्सवाच्या कालखंडात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिस प्रशासनाने उच्च ध्वनीयंत्रणेवर निर्बंध घातल्याने पारंपरिक वाद्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत होते. मिरवणुकीसाठी बेंजो, ढोल-ताशे यांसारख्या पारंपरिक वाद्यांसह बँड पथकांनाही मागणी वाढल्याचे दिसत होते. त्यामुळे मिरवणुकीत ढोल, ताशांचा गजर पहावयास मिळत होता.

फोटो

विघ्नहर्त्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी घरी नेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता (छाया : अनंतसिंग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात इचलकरंजीत सहा जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील कॉ. मलाबादे चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका युवतीसह सहा बालकांचा चावा घेत त्यांना जखमी केले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गणेशोत्सवाच्या काळातच ही घटना घडली. गणेशोत्सवाची लगबग सुरु असताना घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. सर्व जखमींना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

अमृता शिवाजी हत्तीकर (वय ६, रा. जयभिमनगर), अनुष्का महेश माने (वय ३), ऋषीकेश सुरेश माने (वय ७ दोघे रा. नारायणनगर), ओम युवराज दिवटे (वय ११ मुक्तसैनिक वसाहत), श्रेयश जगन्नाथ धोंगडे (वय ६), सनी संपत पाटील (वय १० दोघे रा. विक्रमनगर) व काजल आप्पासो आवळे (वय २३ आवळे गल्ली) अशी जखमींची नावे आहेत. घरगुती गणपती आणण्यासाठी काही नागरिक आपल्या मुलांसह मलाबादे चौक परिसरात आले होते. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने अचानकपणे हल्ला करत चावा घेण्यास सुरुवात केली. दिसेल त्याचा चावा घेत कुत्र्याने मलाबादे चौक, अडत पेठ परिसरात काही वेळात धुमाकूळ घातला. तब्बल सहाजणांना हे कुत्रे चावल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गर्भवती पत्नीचा खून; पतीला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

गर्भवती असलेल्या आपल्या मुलीचा पतीनेच गळा आवळून खून केल्याची फिर्याद मृत महिलेच्या वडिलांनी शहर पोलिसांत दिली आहे. फिर्यादीनुसार पोलिसांनी मृत महिला मोनिका हिचा पती रघू नायक याला कर्नाटकातून ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

येथील रुद्रकुमार विरेगौडा अय्यंगार यांची बसस्थानकासमोरील कर्मवीर पुतळ्याशेजारील चैतन्य कॉम्प्लेक्समध्ये बेंगलोर अय्यंगार बेकरी आहे. रघू हा बेकरीत काम करीत होता. तसेच, तो बेकरीच्या वरतीच असलेल्या एका खोलीत पत्नी मोनिकासह राहात होता. ७ सप्टेंबर रोजी सकाळी रघू याने बेकरी मालकांना फोन करून पत्नी गर्भवती असल्याने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर बेकरी मालक रुद्रकुमार यांनी स्वत: जाऊन बेकरी उघडली. त्यावेळी रघू राहात असलेल्या खोलीला कुलूप दिसून आले. दुसऱ्या दिवशी रुद्रकुमार यांनी रघूला फोन लावला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास ते गॅसची शेगडी आणण्यासाठी रघू राहात असलेल्या खोलीकडे गेले. मात्र, खोली बंद असल्याने त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून खोली उघडली असता, त्यांना खोलीतून घाण वास येऊ लागला. त्यांनी खोलीत जाऊन पाहिले असता, मोनिका ही मयत अवस्थेत जमिनीवर पडली होती. त्यानंतर रुद्रकुमार यांनी पोलिसांत तक्रार दिली.

दरम्यान, मोनिकाचा मृतदेह सापडल्यापासून तिचा पती रघू गायब होता. रघू कर्नाटकमध्ये पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रघूला पकडण्यासाठी कर्नाटकमध्ये गेलेले पथक रघूला घेऊन बुधवारी पहाटे कराडमध्ये पोहचले. रघूला पत्नी मोनिकाचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून त्याने मोनिकाचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते ’मंडप काढण्याचे हायकोर्टाचे आदेश

$
0
0

पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस अधीक्षकांना अतिरिक्त आयुक्तांचे पत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाचे निर्देश डावलून जर सार्वजनिक गणेश मंडळाची उभारणी झाली, असेल तर गुन्हे दाखल करा. पण गुन्हे दाखल करण्यापूर्वी प्रथम मंडप काढून टाका, असे आदेश मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी कोल्हापूर महापालिकेला दिले. तसेच बुधवारी (ता. १९) होणाऱ्या सुनावणीवेळी प्रतिज्ञापत्र सादर करा अशा सूचनाही दिल्या. यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिकेने मंडप काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणीचे नियम तयार केले आहेत. मात्र मंडप उभारणीस सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे समोर आले होते. कोल्हापूरसह अनेक शहरांमध्ये अशी अवस्था असल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये हायकोर्टाने महापालिकांना सुनावत शुक्रवारी (ता.१४) होणाऱ्या सुनावणीमध्ये प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.

शुक्रवारच्या सुनावणीवेळी महापालिकेने मंडपावर केलेली कारवाई कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र कोर्टाने यावर असमाधान व्यक्त करत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, पण त्यापूर्वी मंडप उतरवून घेण्याचे आदेश दिले. गुरुवारी महापालिकेने चार विभागीय कार्यालयाच्यावतीने कारवाई करत आठ मंडळांचे मंडप उतरवले. तर १५ मंडळावर गुन्हे दाखल केले आहेत. पण शुक्रवारी मंडळांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पण कोर्टाचे आदेश मिळाल्यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी अडथळा ठरणारे मंडप काढण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्याची मागणी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे शनिवारी पोलिस बंदोबस्तात विनापरवाना आणि वाहतुकीला अडथळे ठरणाऱ्या मंडळांवर महापालिका कारवाई होण्याची शक्यता आहे.

चौकट

महापालिका अधिकाऱ्यांची धावपळ

हायकोर्टाने विनापरवाना विशेषत: वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या सार्वजनिक मंडळांवर कारवाई करणाचे आदेश दिले आहेत. कारवाईत कुचराई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना दोषी ठरवणार असल्याचेही सूचित केले आहे. परिणामी अशा मंडळांवर कारवाई करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडू लागली आहे. तर गुरुवारी महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अनेक मंडळे स्वत:हून मंडप काढून घेत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार कोटींची जादा दराची निविदा मंजूर

$
0
0

नगरोत्थानमधील चार रस्त्यांची लवकर कामे सुरू होणार

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियान योजनेंतर्गत येणाऱ्या चार रस्त्यांसाठी सुमारे चार कोटींच्या निविदेला जादा दराने स्थायी समितीने मंजुरी दिली. यशोमाला कन्स्ट्रक्शनला रस्त्याचे काम देण्यात येणार आहे. परिणामी यल्लमा मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती कामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.

नगरोत्थान योजनेतील यल्लामा मंदिर ते कंदलगाव जकात नाका, जमदग्नी ऋषी देवालय ते नेहरुनगर, नेहरुनगर ते आयसोलेशन हॉस्पिटल आणि शास्त्रीनगर ते रेड्यांच्या टकरीपर्यंतच्या रस्त्याचे काम व्हीयुबी कंपनीला दिले होते. पण गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांच्या कामाला सुरुवात झालेली नव्हती. या विरोधात महासभेत कंपनीकडून काम काढून घेण्याबरोबरच कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. तरीही कंपनीने कामाला सुरुवात केली नसल्याने वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागत होते.

शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत व्हीयुबी कंपनीचे काम काढून घेण्याचा निर्णय झाला. जुन्या कंपनीकडून काम काढून घेत यशोमाला कन्स्ट्रक्शनला १२.८७ जादा दराने काम देण्याचा कार्यालयीन प्रस्ताव बैठकीत सादर केला. या प्रस्तावाला समिती सदस्यांनी मान्यता दिली. स्थायी समितीच्या मान्यतेनंतर महासभेला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. महासभेची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

सदस्य राहुन माने म्हणाले, ' पावसामुळे शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. विशेषत: सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनंत चतुर्थीपूर्वी रस्त्यांचे पॅचवर्क पूर्ण करणे आवश्यक आहे. पण प्लँट सुरु नसल्याने पॅचवर्कचे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न उपस्थित करत मिरवणुकीपूर्वी पॅचवर्कचे काम पूर्ण करण्याची सूचना केली. कचऱ्यामधून पाणी येत असल्याने प्लँट सुरू केलेला नाही. प्लँटसाठी लागणारी सर्व सुविधा असून सोमवारपासून पॅचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे प्रशासने स्पष्ट केले.

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी काय नियोजन केला, असा मुद्दा सदस्या गीता गुरव यांनी उपस्थित केला. 'भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी डॉग स्कॉड कर्मचारी पाठवण्यात येतात. त्याचबरोबर डॉक्टरांचे नवीन पॅनेल तयार केले आहे. प्रत्येक डॉगमागे ऑपरेशनसाठी २५० रुपये शुल्क देण्यात येत असून दररोज दहा कुत्र्यांवर ऑपरेशन केले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले.' तसेच गणेशोत्सव काळात १२ ठिकाणी स्वच्छतेसाठी पथके तैनात केली आहेत. मुख्य मार्गावर जादा कर्मचारी लागल्यास त्याची पूर्तता करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

चौकट

कचरा संकलित

करण्यासाठी नवीन वाहने

कचरा संकलित करण्यासाठी सुमारे ७५० किलो क्षमता असलेली नवीन वाहने घेण्यात येणार आहेत. वाहन खरेदीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. जादा क्षमतेची वाहने मोठे रोड व कॉलनीतील मोठ्या रोडवरील कचरा संकलित करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. परिणामी कचरा संकलित करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या कमी होऊन डिझेलमध्ये बचत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रयतची उत्पादने जिल्ह्याबाहेर पोहचविणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'रयत सेवा संघाचा नियोजनबद्ध व काटकसरीने कारभार सुरू आहे. रयतच्या बैलजोडी छाप हातमिश्र खताच्या गुणवत्तेमुळे करवीरसह शिरोळ, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातूनही मोठी मागणी आहे. अन्य सेवासंघापेक्षा रयतच्या खताला सर्वाधिक पसंती मिळत आहे. येणाऱ्या काळात खताबरोबर अन्य व्यवसाय क्षेत्रातही वाटचाल करणार आहे. रयतची उत्पादने जिल्ह्याबाहेर पोहचविणार आहे' असे प्रतिपादन रयत संघाचे मार्गदर्शक व गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले. रयत सेवा संघाच्या पाडळी खुर्द येथील सभागृहात झालेल्या ५६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत संघाचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील होते.

प्रारंभी श्रीपतराव बोंद्रे व एस. आर. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम अहवाल व विषय वाचन व्यवस्थापक तानाजी निगडे यांनी केले. शाहू महाराजांना भारतरत्न, मराठा आरक्षण व ओला दुष्काळ जाहीर करण्याचे ठराव मंजूर करण्यात आले.

विश्वास पाटील म्हणाले, 'रयत संघावर सभासदांना असलेला विश्वास हा संघाच्या प्रगतीतील महत्त्वाची बाब आहे. ज्या संस्था व सभासद शेतकरी एकटन खत खरेदी करतात, त्यांना १०० रुपये रिबेट देण्यात आले.'

अध्यक्ष नेमगोंडा पाटील यांनी रयत संघाला या वर्षी १२ लाखाचा नफा झाला असून १ कोटी ३२ लाख ५० हजावर पोहचली असल्याचे सांगितले. यावेळी सज्जन पाटील (महे), एस. एस. पाटील, आर. डी. पाटील (पाडळी खुर्द) यांनी चर्चेत भाग घेऊन काही त्रूटींवर बोट ठेवून सकारात्मक सूचना केल्या. कुंभी कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील, मार्केट कमिटीचे दशरथ माने, रयतचे संचालक आनंदराव यादव, शिवाजी भोसले, कुंडलिक पाटील, सचिन पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. उपाध्यक्षा माधुरी जाधव यांनी आभार मानले.

पण शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

चर्चेदरम्यान एस. एस. पाटील यांनी सभासद प्रशिक्षणाची सूचना केली. त्याला उद्देशून बोलताना विश्वास पाटील म्हणाले, 'संघाच्यावतीने शेतीविषयक मार्गदर्शन मेळावे, शिबिर ठेवली पण शेतकरीच कमी प्रमाणात येतात. भत्ता व इतर सोयी उपलब्ध करून दिली तरी त्याला प्रतिसाद मिळत नाही. पण तरीही शेतीविषयक नवनवीन माहिती पोहचविण्याचा प्रयत्न हा चालूच राहील.'

फोटो : रयत सेवा संघाच्यावतीने सर्वाधिक खते खरेदी केलेल्या घानवडेच्या रासाई विकास संस्थेला विशेष अनुदान वाटप करताना विश्वास पाटील. सोबत संघाचे अध्यक्ष नेमगोंडा पाटील व सर्व संचालक.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदारयाद्या अद्ययावतचे आदेश

$
0
0

लोकसभा निवडणुकीसाठी

मतदारयाद्या अद्ययावतचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

लोकसभा निवडणूक आगामी सहा महिन्यांत कधीही जाहीर होईल असे गृहीत धरून प्रशासन पावले उचलत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी अद्ययावत मतदारयाद्या तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यादृष्टीने तयारी म्हणून भुदरगड प्रशासनाने तालुक्यातील सर्व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक गारगोटीतील शाहू वाचनालयात घेतली.

निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण कार्यक्रम घोषित केले आहे. त्यानुसार १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रारुप मतदारयाद्यांची प्रसिद्धी करणेत आली आहे. १ सप्टेंबर २०१८ ते ३१ ऑक्टोबर २०१८ अखेर दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. ३० नोव्हेंबर २०१८ पूर्वी दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. ३ जानेवारी २०१९ रोजी पुरवणी मतदारयादीची छपाई करण्यात येणार आहे. तर ४ जानेवारी २०१९ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणेत येणार आहे. असा हा मतदारयाद्यांचा कार्यक्रम आहे. गारगोटीतील शाहू वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत भुदरगड तालुक्याचे तहसीलदार अमरदीप वाकडे, निवडणूक नायब तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी मार्गदर्शन केले. राजीव कुंभार तसेच तालुक्यातील सर्व सतरा पर्यवेक्षक व एकूण १७२ केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ

भुदरगड तालुक्यातील सर्व पर्यवेक्षक व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना निवडणूक नायब तहसिलदार हणमंत म्हेत्रे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दत्त शिरोळ’चा दिवाळीपूर्वी १०० रुपये हप्ता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'दत्त साखर कारखान्याने गेल्या हंगामात गाळप झालेल्या ऊसास आतापर्यत प्रतिटन २ हजार ९२५ रुपये दर दिला आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिवाळीपुर्वी उर्वरीत १०० रुपयांचा हप्ता देण्यात येईल' अशी घोषणा अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत केली. कारखान्याची गाळपक्षमता दोन हजार मेट्रीक टनाने वाढवून ती नऊ हजार मेट्रीक टन करण्यासाठी सभेत मंजुरी देण्यात आली. शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याची ४९वी वार्षिक साधारण सभा आणि दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्टची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी चेअरमन गणपतराव पाटील बोलत होते. सभेत सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजूरी दिली.

अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, 'गेल्या हंगामात गाळपास आलेल्या उसास प्रतिटन ३०२५ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानुसार गळीत हंगामाच्या प्रारंभी प्रतिटन २९२५ रुपये पहिला हप्ता देण्यात आला. यानंतर कारखान्यासमोर आर्थिक अडचणी आल्याने गाळपास आलेल्या उसास प्रथम प्रतिटन २५०० रुपये व हंगाम संपल्यानंतर प्रतिटन ४२५ असे २९२५ रुपये देण्यात आले. उर्वरीत प्रतिटन १०० रुपये ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिवाळीपूर्वी देण्यात येतील. गेल्या गळीत हंगामात कारखान्याने १४५ दिवसांत ११ लाख ८७ हजार २१ मे. टन उसाचे गाळप करून १२.५५ साखर उतार्‍याने १४ लाख ९० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. उत्पादीत साखर कारखान्यांमध्ये पडून राहिली. गळीत हंगामाच्या प्रारंभी ३६०० रुपये प्रतिक्विंटल असणारे साखरेचे दर डिसेंबरमध्ये २५०० रुपयांपर्यत घसरले. यामुळे कारखान्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.'

कारखाना सध्या प्रतिदिनी ८७०० मे. टनाहून अधिक उसाचे गाळप करतो. मात्र, राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाकडून घेतलेल्या मंजुरीप्रमाणेच गाळप करण्याची अट आहे. यामुळे सध्याचे गाळप व सहवीज प्रकल्पाच्या दृष्टीने गाळप क्षमता ९ हजार मे.टन करण्यात येणार आहे. कारखान्याचे चालू वर्ष हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून गेल्या ४९ वर्षात ६० हजार लिटर क्षमतेची स्पिरीट उत्पादन डिस्टिलरी, ३० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्लँट, ३६ मे.वॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प, प्रतिवर्षी ५० हजार टनाहून अधिक कंपोष्ट उत्पादन प्रकल्प यासह अन्य संस्था उभारल्या आहेत. ८ नोव्हेंबर २०१७पासून सहवीज प्रकल्प कारखान्याकडे चालविण्यास घेऊन पाच महिन्यात महावितरणला वीज दिली. यामुळे १२ कोटी ७४ लाख नफा झाला आहे. सेंद्रीय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढत आहे. शिरोळ तालुक्याबरोबरच कर्नाटक राज्याच्या सीमा भागात ४ हजार ८१ एकर क्षारपड जमिन सुधारण्याचे काम गतीने सुरू आहे.'

विषयपत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले. उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक अनिल यादव, रणजित कदम, विनया घोरपडे, सरलाताई पाटील, पृथ्वीराज यादव, सचिव बी. बी. शिंदे, फायनान्स मॅनेजर बी. जी. पाटील यांच्यासह सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो

शिरोळ येथे दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष गणपतराव पाटील. समोर उपस्थित शेतकरी सभासद.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मल्टिस्टेट हे खासगीकरणाचे पाऊल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'गोकुळ दूध संघाचे नाव कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ असे आहे.त्यामुळे तो मल्टिस्टेट करताच येत नाही.व्यक्तिगत सभासदांसाठी मल्टिस्टेटचा घातलेला घाट हाणून पाडू.कारण मल्टिस्टेट हे खासगीकरणाचे पहिले पाऊल आहे' असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. सर्वसाधारण सभेत 'गोकुळ' मल्टिस्टेट करण्याच्या प्रस्तावाला विरोधासाठी कागल तालुक्यातील आमदार मुश्रीफ,प्रा.मंडलिक आणि प्रविण पाटील गट यांच्या सभासदांची संयुक्त बैठक झाली. यावेळी आमदार मुश्रीफ बोलत होते.

दरम्यान, 'सरकारने या संघाला कोट्यावधींची प्रॉपर्टी दिली.त्यामुळे संघाला सरकारचे नियम पाळावेच लागतील.मल्टिस्टेटमुळे कोल्हापूरचा स्वाभिमान आणि अस्मिता विकली जाईल.ते पाहता संघाने मल्टिस्टेटचा विषय सोडून द्यावा, अन्यथा त्याचा परिणाम लोकसभा,विधानसभा आणि राजकीय जीवनावर होईल' असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'मल्टिस्टेट म्हणजे बिनकासऱ्याचे जनावर आहे. दौलत कारखाना लिलावात काढून तो चालवायला दिला त्याचा कंट्रोल दिल्लीतून होत आहे. अजूनही संचालक मोकाटच आहेत, हे त्याचे उदाहरण आहे.त्यामुळे संघ मल्टिस्टेट झालाच तर व्यक्तिगत सभासदांचा ठराव मांडून फार मोठी अडचण होईल.त्यामुळे आंधळेपणाने सत्ताधाऱ्यांच्या मागे जाऊन स्वतःचे महत्व कमी करुन घेणार का? हा प्रश्न आहे. आयुष्यभर गोकुळची सत्ता भोगा, पण मल्टिस्टेच्या मार्गाने दूध संघ विकण्याच्या प्रवृत्तीला कडाडून विरोधच राहील.खासगीकरण करून आयुष्यभर मलई खाण्याचे मनसुभे उधळून लावू. गोकुळचे वैभव दोन नेते विकायला निघाले आहेत. म्हणून आजच सावध होवूया.पुढे काय होणार याची चिंता करु नका.'

प्रविण पाटील म्हणाले,'गोकुळचे संस्थापक चुयेकरांनादेखील गोकुळ मल्टिस्टेट करावे वाटले नाही. मग आताच गरज का? सभासदांना थांबवण्याचा प्रयत्न होईल. पण गेट मोडून आत जावू. पडेल त्या किंमतीला विरोध एकदिलानेच राहील. गाडीत बसून कासरं धरलेल्या कारभाऱ्यांचा घडा आता भरला आहे.'

प्रताप माने यांनी हा जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहिला असून दुध उत्पादकांच्या घामातून व श्रमातून उभारलेले सहकाराचे मंदीर उध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे असा आरोप केला. प्रविण भोसले आणि उपसभापती विजय भोसले,दत्ता पाटील यांची भाषणे झाली.यावेळी रघुनाथ पाटील,प्रविण काळबर,रमेश तोडकर,विश्वास कुर्हाडे,राजेंद्र माने उपस्थित होते. विकास पाटीलर यांनी आभार मानले.

परतफेड अपकाराने

आमदार मुश्रीफ यांनी,'गोकुळच्या मागील निवडणुकीत पैरा फेडण्याच्या नादात आम्ही राष्ट्रवादीची ७०० ते ८०० मते सत्ताधाऱ्यांना दिली. परंतु माझ्या नावाने निघालेल्या डेअरीलाही सत्ताधाऱ्यांनी सभासद होऊ दिले नाही. अशा पद्धतीने उपकाराची परतफेड अपकारानेच केली' असा आरोप केला.

सभासदांना वाटत असेल तर…

'नुकत्याच झालेल्या नोकरभरतीत १५ ते २० लाख रुपये घेवून नोकऱ्या देण्यात आल्या.हा जनतेचा अपमान आहे.ही भरती नियमाप्रमाणेच होणार आणि निकाल आमच्याच बाजूने होणार. मग घेतलेले पैसे परत कसे देणार? असा सवाल आहे' असे सांगून आमदार मुश्रीफ म्हणाले,'सर्वसाधारण सभेत केवळ सभासदांनाच प्रवेश द्यावा. त्यांना मल्टिस्टेटसह सगळ्या बाबी मान्य असतील होवून जाऊ द्या. यासाठी संचालक मंडळाला गुप्त बैठका घ्याव्या लागल्या. हेच त्यांचे दुर्दैव आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बांबवडेत संचलन

$
0
0

बांबवडेत पोलिसांचे संचलन

शाहूवाडी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी बांबवडे (ता. शाहूवाडी) शहरात संचलन केले. शाहूवाडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील, निरीक्षक मनोहर रानमाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करत पिशवी रोड, बाजार चौक, सोनार गल्ली, जुने बांबवडे परिसरातून कोल्हापूर-रत्नागिरी मुख्य मार्गावर संचलन केले. उच्च ध्वनियंत्रणेला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांच्या साथीने गुरुवारी गणेश आगमन मिरवणूक काढणाऱ्या मंडळातील कार्यकर्त्यांचे बांबवडे पोलिस दूरक्षेत्राच्या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन डीवायएसपी आर. आर. पाटील यांनी कौतुक केले. दरम्यान बांबवडे १२, पिशवी १३, साळशी ०९ अशा ३४ गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणाची हानी टाळण्याची ग्वाही देत पोलिस प्रशासनास तसे निवेदनही सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षपदी प्रा. बी.एस. पाटील

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रा. बी. एस. पाटील, उपाध्यक्षपदी प्रा. दीपक खोत यांची निवड करण्यात आली. असोसिएशनच्या कार्याध्यक्षपदी प्रा. एस. एम. पाटील, सचिवपदी प्रा. सुरेश कातवरे, कोषाध्यक्षपदी प्रा. शहाजी पाटील, संघटक प्रा. मोहन गावडे यांची निवड झाली. असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक प्रा. पी. बी. पाटील याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवडीवर शिक्कामोर्तब केले. कार्यकारिणीत प्रा. तानाजी चव्हाण, प्रा. बसवंत पाटील, प्रा. राजेश पवार, प्रा. प्रकाश मोरे, प्रा. ऋषीराज जाधव, प्रा. महेश बसुगडे, प्रा. विद्यानंद उपाध्ये, प्रा. सुनील पेठे, प्रा. उमेश पुजारी, प्रा. एम. बी. सावंत अशी कार्यकारिणी निवडण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनीप्रदूषण उल्लंघनप्रकरणी दोन मंडळांवर गुन्हा

$
0
0

ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन

करणाऱ्या दोन मंडळांवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गणरायाच्या स्वागत मिरवणुकीत ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन मंडळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावभाग पोलिस ठाण्याने वीरशैव गणेशोत्सव मंडळ तर शिवाजीनगर पोलिस ठाण्याने नटराज युवक मंडळावर कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन्ही मंडळांतील पदाधिकाऱ्यांसह साउंड सिस्टिम व्यावसायिक, वाहनचालक अशा सुमारे १० जणांवर गुन्हा दाखल केला. स्पिकर बॉक्स, मिक्सर तसेच ट्रॅक्टर, टेम्पोसह सुमारे ८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख दिले आहेत. मात्र, शहरातील दोन मंडळांनी श्री मूर्ती प्रतिष्ठापना मिरवणुकीत ध्वनीप्रदूषणाचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. त्यानुसार गावभाग आणि शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. गावभागातील विरशैव गणेशोत्सव मंडळाची झेंडा चौक ते महादेव मंदिर जाणाऱ्या मार्गावर मिरवणुक सुरू होती. या मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टिम लावल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्पिकर बॉक्स, मिक्सर, जनरेटर त्याचबरोबर ट्रॅक्टर व ट्रॉली (एमएच ०९ एएन ३०१५) असा सुमारे ६ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष प्रणव सुरेश पाटील, उपाध्यक्ष रोहित चंद्रकांत मगदूम, अमर भाऊसाहेब पाटील, रमेश बाळासाहेब पाटील, किरण सुभाष पाटील, संदेश विलास कापसे, साऊंड सिस्टिम चालक शशिकांत उर्फ पप्पू सुरेश वाघमोरे (सर्व रा. इचलकरंजी), वाहनचालक कुमार कऱ्याप्पा मुश्यापोळ (रा. अब्दुललाट, ता. शिरोळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी मानस हॉटेल परिसरातील नटराज युवक गणेशोत्सव मंडळाने मिरवणूकीत ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ स्पिकर बॉक्स, छोटा हत्ती टेम्पो (एमएच ०२ वायए १७६०) असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर मंडळाचा अध्यक्ष योगेश गजेंद्र थोरात व वाहनचालक सतीश सिद्राम गणप्पा (वय२३, रा. धारवट झोपडपट्टी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव २७ पासून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

गेल्या दहा वर्षांपासून सोलापुरात साजरा होणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यंदा २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवानिमित्त माहितीपट, पथनाट्य, प्रश्नमंजुषा तसेच नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून, २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात,' असे आवाहन करण्यात आले आहे. या वेळी किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीचे मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख प्रभाकर रावळ, डॉ. श्रीनिवास वडगबाळकर, डॉ. नरेंद्र काटीकर, सुभेदार पेठकर, डॉ. रवींद्र चिंचोलकर, ऋषिकेश कुलर्णी आदी उपस्थित होते.

'गेल्या दहा वर्षांपासून सोलापुरात किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सव आणि सोलापूर विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात पर्यावरणाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण चित्रपट दाखविले जातात. तसेच, पर्यावरण, वनजीवन, ऊर्जा, हवा आणि पाणी या संदर्भातील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षीचा महोत्सव 'प्रदूषण टाळा, नदी वाचवा' या विषयावर आधारलेला आहे. महोत्सवांतर्गत माहितीपट व लघुपट स्पर्धा होणार आहे. महाविद्यालय व विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा खुली असून, २२ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका पाठवता येतील. स्पर्धेसाठी दहा मिनिटांची लघुपट अथवा माहितीपट तयार करणे अपेक्षित आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्याशी (९८६००९१८५५) यांच्याशी संपर्क साधावा,' असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा महोत्सवासाठी १२ लाखांचा निधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचे यजमानपद स्वीकारणाऱ्या महाविद्यालयास १२ लाख रुपये निधी देण्यात येणार आहे. याबाबतच्या महत्त्वपूर्ण ठरावास विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

विद्यापीठाच्या यंदाच्या 'उन्मेष सृजनरंगाचा' या १५ व्या युवा महोत्सवासाठी महाविद्यालयांकडून विद्यापीठाने प्रस्ताव मागविले होते. परंतु, दिलेल्या अंतिम मुदतीत एकाही महाविद्यालयाने आपला प्रस्ताव दाखल केलेला नव्हता. यजमान महाविद्यालयास मिळणारा सहा लाख रुपयांचा निधी अत्यल्प असल्याने एकही महाविद्यालय उत्स्फूर्तपणे यजमानपद घ्यायला तयार नव्हते. या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी विकास विभाग व युवा महोत्सव समितीची एक बैठक नुकतीच पार पडली होती. या वेळी युवा महोत्सवासाठी दिल्या जाणाऱ्या निधीत वाढ करण्यासंदर्भात चर्चा झाली व तसा प्रस्ताव तयार करून व्यवस्थापन परिषदेकडे पाठविण्यात आला होता. त्यानंतर, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत युवा महोत्सवाच्या निधीत वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. आता यजमानपद घेणाऱ्या महाविद्यालयास १२ लाख रुपयांचा निधी दरवर्षी दिला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images