Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चोरट्याला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

रेल्वे प्रवाशांचे मोबाइल पळवणाऱ्या एका संशयित चोरट्याला लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकाने अटक केले असून, त्याच्याकडून १ लाख ९,५०० रुपयांचे ११ हँडसेट जप्त केले आहेत.

राजू मच्छिंद्र जाधव (वय २५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर) असे पकडण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून, त्याला गुरुवारी मोबाइल हँडसेटसह ताब्यात घेतले. गेल्या काही दिवसांपासून राजू जाधव हा रेल्वे डब्यांमधून इतर प्रवाशांबरोबर प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे मोबाइल लांबवायचा. याची कुणकुण लोहमार्ग पोलिसांना लागली होती. त्यांचे एक पथक त्याच्या मागावर होते. गुरुवारी रेल्वे स्थानकावरच सापळा रचून त्याला पकडले. त्याच्या घराचीही झडती घेतली गेली. मात्र, त्याने घरामध्ये चोरीचे काही लपवून ठेवल्याचे उघडकीस आलेले नाही. इतर गुन्हे उघडकीस यावेत आणि पोलिस कोठडी मिळावी यासाठी त्याला शुक्रवारी सोलापूर येथील दौंडच्या फिरत्या न्यायालाल हजर केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महाडिक, मुश्रीफांच्या अपयशामुळे सुळकूडचा कर्नाटक प्रवेशाचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विकासकामे होत नसल्याने कागल तालुक्यातील सुळकूड गावाने कर्नाटकात जाण्याचा ठराव केला ही अतिशय गंभीर बाब आहे. तेथील आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांना त्या गावचा विकास करण्यात अपयश आले. म्हणूनच कर्नाटकात जाण्याचा ठराव गावाने केला,' असा आरोप शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

संजय पवार म्हणाले, 'सुळकूड गाव कागल विधानसभा आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आहे. कर्नाटक सीमेवर असलेले गाव मूलभूत विकासापासून वंचित आहे. या गावची विकास करण्याची जबाबदारी खासदार महाडिक आणि आमदार मुश्रीफ यांचीच आहे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

शिवसेनेचे नेते विजय देवणे म्हणाले, 'सुळकूड गावात दफनभूमी नाही. दूधगंगा नदीवर मंजूर पुलाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले. गावास जोडणारे रस्ते खराब आहेत. ग्रामस्थांना कर्नाटक हद्दीतील रस्त्यावरून कागल व इतर गावांना यावे लागले. अंतर्गत रस्ते, गटर नाहीत. प्राथमिक शाळेच्या इमारतीची पडझड झाली आहे. सरकारच्या विविध विकासयोजनांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. म्हणून सुळकूड गावाने कर्नाटकात जाण्यासंबंधीचा ठराव केला. त्यानंतर मी गावाला भेट दिली. तेथे विकासकामे होण्यासंबंधी पाठपुरावा करीत आहे. सर्वांगिण विकासासाठी गाव दत्तक घ्यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्याची दखल घेऊन कागलच्या प्रांताधिकाऱ्यांनी १८ सप्टेंबरला बैठक बोलावली आहे. यापुढील काळात सरकारने गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना ग्रामस्थांना घेऊन तीव्र आंदोलन करेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोहारांकडे फायली पाठवू नका

$
0
0

जि.प. ... लोगो

..............................

प्रशासन अधिकाऱ्यांची सूचना, सदस्य निंबाळकरांच्या तक्रारीची दखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कामकाजाची चौकशी करण्याचा निर्णय झाला. या ठरावाला न जुमानता ते शुक्रवारी उपसंचालक कार्यालयात बसून 'माध्यमिक' चे कामकाज करीत असल्याची तक्रार सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी प्रशासनाकडे केली. त्यानंतर तातडीने सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी तेथील कक्ष अधिकाऱ्यांना बोलवून लोहार यांच्याकडे फायली पाठवू नका, तशा सूचना विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना द्या, अशी सूचना दिली.

वैयक्तिक मान्यतेसाठी लोहार पैशाची मागणी करतात. ते जि. प. च्या बैठकीला उपस्थित राहत नाहीत, असे आरोप निंबाळकर यांनी ११ सप्टेंबरला झालेल्या सभेत केले होते. त्याच विषयावरून 'माध्यमिक'मधील शिपाई ते अधिकाऱ्यांपर्यंतची चौकशी होईपर्यंत लोहार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिले. हा आदेश डावलून लोहार यांनी सभेच्या दुसऱ्या दिवशी कार्यालयात येऊन कामकाज केले. त्यास सदस्य निंबाळकर यांनी जोरदार विरोध करताच त्यांना काढता पाय घ्यावा लागला. उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार असल्याने ते त्या कार्यालयात बसून 'माध्यमिक' चे कामकाज करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिवसभरात त्यांनी काही फायली मागून घेतल्या. सह्याही केल्याची माहिती निंबाळकर यांना मिळाली. त्याची त्यांनी प्रशासनाकडे तातडीने तक्रार केली.

--------------------

कोट

'मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवारपर्यंत रजेवर आहेत. त्यामुळे लोहार आणि 'माध्यमिक' विभागाची चौकशी करण्यासंबंधीचा लेखी आदेश काढता आलेला नाही. तोपर्यंत त्यांच्याकडे येथील कोणतीही फाईल पाठवू नये, अशी सूचना दिली आहे. रजेसंबंधीचा अर्ज लोहार यांनी अद्याप दिलेला नाही. अर्ज न दिल्यास येथील शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार काढून घेण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे.

रविकांत आडसूळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन

-----------------

कोट

'लोहार यांच्या नियमबाह्य, चुकीच्या कामकाजाविरोधात माझ्याकडे तक्रारींचा ओघ लागला आहे. यातील अनेक तक्रारी गंभीर आहेत. म्हणूनच सभेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय झाला. तरीही ते उपसंचालक कार्यालयात बसून 'माध्यमिक'चे कामकाज करीत आहेत. त्यासंबंधीची तक्रार प्रशासनाकडे केली आहे. लोहारांची अशीच भूमिका राहिल्यास जि.प. च्या दारात आंदोलन करणार आहे.

राजवर्धन निंबाळकर, सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार्टी देणार १००बेरोजगारांना धडे

$
0
0

२३ सप्टेंबरला प्रवेश परीक्षा, ७० जणांचे अर्ज

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे येथील बार्टीतर्फे नियुक्त केलेल्या करूणा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून (राजारामपुरी १४ वी गल्ली) १०० बेरोजगारांना स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुकांना २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. आतापर्यंत ७० जणांनी अर्ज केले आहेत. २३ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) बँक, रेल्वे, एल. आय. सी विभागातील लिपीकवर्गीय आणि तत्सम पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षेच्या विविध विषयांवर तज्ज्ञांतर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी चार महिन्यांचा असेल. त्यासाठी अनुसूचित जातीमधील उमेदवार असावा, वय १८ ते ३५ पर्यंत असावे, बारावी उत्तीर्ण असणारे अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत.

प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. ३० टक्के महिला, ३ टक्के दिव्यांगासाठी जागा राखीव आहेत. या निकषांतून प्रवेश मिळालेले विद्यार्थी, विद्यार्थींनी दोन सत्रात तज्ज्ञ प्रशिक्षण देतील. निवास आणि भोजनाची सुविधा वगळता प्रशिक्षण मोफत मिळणार आहे. प्रशिक्षण कालावधींत प्रत्येक महिन्यांत तीन हजार मानधन मिळणार आहे. प्रशिक्षणासोबत विविध परीक्षांसाठी अर्ज भरण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. याचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या गरीब, सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत मंडळांवर बडगा

$
0
0

पालिकेने आठ मंडप उतरवले; १५ मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

कोल्हापूर टाइम्स टीम

मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार परवानगी न घेतलेल्या आणि वाहतुकीस अढथळा ठरणाऱ्या मंडळावर गुरुवारी महापालिकेने प्रथमच कारवाईचा बडगा उगारला. पवारनगी न घेतलेल्या आठ मंडळांचे मंडप उतरून घेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १५ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. महापालिकेच्या कारवाईमुळे दरवर्षी विनापरवाना मंडप उभारणी करणाऱ्या मंडळांवर चागंलाच वचक बसला आहे.

हायकोर्टाने दहा ऑगस्ट रोजी गणेशोत्सवामध्ये विनापरवाना मंडप उभारणी आणि वाहतुकीला अढथळा ठरणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दहा दिवसांपूर्वीच मंडप उभारणीस सुरुवात केली होती. यातील काही मंडळांनी मंडप उभारणीसाठी महापालिकेच्या चार विभागीय कार्यालयाकडून परवानगी घेऊन शुल्क जमा केले होते. मात्र, काही मंडळांनी परवानगी न घेता तर काही मंडळांनी वाहतुकीस अढथळा ठरेल असे मंडप उभा केले होते.

मंडप उभारणी करताना रस्त्याच्या ७५ टक्के भाग मोकळा ठेवणे, १२ फुटाचा रस्ता असल्यास त्यावर मंडप उभा करू नये, सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची खोदाई करण्यास मनाई, फायर ब्रिगेडची गाडी व रुग्णवाहिका जाण्यासाठी पुरेसा मार्ग मोकळा ठेवावा, अशी नियमावली तयार केली. महापालिका क्षेत्रात अशा प्रकारच्या नियमाचे उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार फौजदारी व दोन हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. तसेच मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्यास आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले होते. मंडप उभारणीमध्ये अनेक ठिकाणी नियमानाच हरताळ फासला असल्याची वस्तुस्थिती दिसत होती. पण याकडे महापालिका यंत्रणेचे पुर्णत: दुर्लक्ष झाले होते. कोल्हापूर शहराबरोबर राज्यातील अनेक शहरात अशी वस्तुस्थिती असताना संबंधित महापालिकांचे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले होते. दोन दिवसांपुर्वी झालेल्या हायकोर्टातील सुनावणीमध्ये अनेक शहरांचे दाखले देत, कारवाई करण्याचे आदेश देऊन प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या होत्या.

न्यायमूर्ती अभय ओक, एस. एसस. सोनक यांच्या खंडपीठाने राज्य सरकार आणि महापालिकेच्या सुनावल्यानंतर गुरुवारी सुट्टीदिवशी महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली. मोहिमेमध्ये सदर बाजार, बुधवार पेठ, जवाहर नगर आदी विभागात कारवाई करत आठ मंडळांचे मंडप उतरले. तर १५ मंडळांवर गुन्हे दाखल केले. महापालिकेने उशिरा का असेना वाहतुकीस अढथळा ठरणाऱ्या आणि विनापरवाना मंडप उभारणी केलेल्या मंडळावर कारवाई केल्याने वाहनधारकांतून कारवाईचे स्वागत होत आहे.

चौकट

७३७

परवानगी घेतलेली मंडळे

अंदाजे १,३००

शहरातील मंडळे

१,४०० रु.

दहा बाय दहा मंडपासाठी शुल्क

परवानगीसाठी मंडळांची धावाधाव

विनापरवाना मंडप उभारणी आणि वाहतुकीसाठी अडथळा करत असलेल्या सार्वजनिक मंडळावर कारवाई करण्याचे आदेश हाय कोर्टाने राज्य सरकारला दिले होते. कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रथमच कोल्हापूर महापालिकेने कारवाईचा बडगा गुरुवारी उगारला. महापालिकेच्या कारवाईनंतर शुक्रवारी सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक तेलनाडे, मटकाकिंग अग्रवालसह ४३ जण हद्दपार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गणेशोत्सव काळात शहर आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गावभाग पोलिस ठाण्याने हद्दीतील रेकॉर्डवरील ४३ जणांना हद्दपार केले आहे. त्यामध्ये नगरसेवक संजय तेलनाडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, मटकाकिंग राकेश अग्रवाल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोहन मालवणकर यांच्यासह सर्वांना २३ सप्टेंबरपर्यंत हद्दपार करण्यात आल्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या. दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या कारवाईची माहिती देण्यात आलेली नाही.

१३ सप्टेंबरपासून सुरु झालेल्या गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी तहसिलदारांच्या आदेशाने गावभाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ४३ जणांना हद्दपार केले. त्यामध्ये संजय शंकरराव तेलनाडे (वय ३७, रा. गावभाग), राहुल रवींद्र उडपी-माने (२५, रा. चांदणी चौक), राकेश विलास माणकापुरे (२५), सलीम महंमद दंडीन (३३), सिद्धार्थ अनिल पाटील (२३, दोघे रा. गावभाग), निलेश परशराम घोरपडे (२५, रा. काडापुरे तळे), राजेंद्र गजानन आरगे (वय २५), मलकारी आप्पासो लवटे (४३), गणेश बजरंग नेमिष्टे, अनुप भाऊसो सिदनाळे (चौघे रा. शेळके गल्ली), सनी अशोक लोंढे, रमेश बाबू कुडाळकर (२५, दोघे रा. लालनगर), उमेश दिलीप लाखे (२४), देवदास बन्नु नेतले (३५, दोघे रा. लाखेनगर), सूरज वसंत बन्ने (२०,रा. परीट गल्ली), अमर निवृत्ती मगदुम (३५), राकेश मदनलाल अग्रवाल (४५, दोघे रा. वेताळ पेठ), अनिल बाबूराव पाटील (३५, रा. आसरानगर), नरेश रुपसिंग गागडे (३४, रा. शांतीनगर), प्रविण संभाजी पवार (रा. नेरूनगर झोपडपट्टी), उल्हास रायगोंडा पाटील (३४, रा. पाटील मळा), प्रविण धुळाप्पा नेजे (३०, रा. आमराई रोड), सुशिल श्रीकांत कोरवी (२०, रा. अडतपेठ), युवराज शिवाजी पाटील (अवधुत आखाडा), दयासागर विठ्ठल हेगडे (२१, रा. सहकारनगर), संदीप कृष्णात गायकवाड (३१, रा. मोळे तळे), संजय आनंदराव जगताप (३९, रा. मगदूम गल्ली), सुहास वसंत माळी (३७, रा. पटेकरी गल्ली), दीपक सतीश कोरे (३३), राहुल बसलिंग दरिबे (२३, दोघे, रा. टाकवडे वेस), सनी उत्तम कांबळे (रा. इंदिरानगर), प्रकाश बसाप्पा कांबळे (४०, रा. कृष्णानगर), किरण बाबूराव काळे (२६), अमोल कृष्णा कोरवी (२९, दोघे रा. जवाहरनगर), विजय यशवंत येटाळे (३६, रा. झेंडा चौक), विवेकानंद धोंडीराम आरेकर (२२, रा. चावरे गल्ली), संजय दत्तात्रय पाटील (४०, रा. सूर्यवंशी चाळ), अंकुश आप्पासो सरदेसाई (२३), सूरज श्रीकांत किनिंगे (२४, दोघे रा. आंबी गल्ली), शैलेश रंगराव पोवार (२६, रा. खंजिरे मळा), प्रमोद बाळू बचाटे (२५, रा. कागवाडे मळा), मोहन पांडुरंग मालवणकर (रा. मंगळवार पेठ) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोडावत पॉलिटेक्नीकचे एनबीएकडून मूल्यांकन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलिटेक्नीकचे नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रीडेशन (एनबीए) या समितीकडून मूल्यांकन करण्यात आले. घोडावत पॉलिटेक्नीकने गेल्यावर्षी एनबीएसाठी अर्ज सादर केला होता. अवघ्या सहा वर्षात अॅक्रीडेशनसाठी अर्ज सादर करणारी संजय घोडावत पॉलिटेक्नीक अग्रगण्य संस्था आहे. समितीने संस्थेच्या सुविधा व कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी केली.

एनबीएतर्फे देशातील अभियांत्रिकी, फार्मसी, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट या संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासाठी महाविद्यालय स्तरावर शाखानिहाय मूल्यांकन, मानांकन दिले जाते. त्यानुसार संस्था उत्कृष्ट शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी सतत प्रयत्न करतात. समितीने प्रामुख्याने टिचिंग लर्निंग प्रोसेस, रिसर्च अँड कन्सल्टन्सी, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट्स फीडबॅक, आऊटकम बेस्ड एज्युकेशन, सीओ-पीओ मॅपिंग, प्लेसमेंट, कॉमन फॅसिलिटी अशा विविध गोष्टींचे निकष लावून मूल्यमापन केले. एनबीए समितीचे चेअरमन म्हणून एनआयटीटीआर भोपाळचे डॉ. आर. के. दीक्षित होते. तन्वीर अहंमद, सुरेश रामास्वामीरेड्डी, अमित्व चटर्जी, एन. एस. राघव, के. सुधाकर रेड्डी आदी सदस्यांची टीम होती. संस्थेचे एनबीए समन्वयक प्रा. नरेश कांबळे, सर्व विभाग समन्वयकांनी संयोजन केले. घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व संस्थेचे प्राचार्य विराट गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्यांकन झाले. यशस्वी मूल्यांकनाबाबत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. व्ही. ए. रायकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

फोटो

अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत पॉलिटेक्नीकच्या मूल्यांकनासाठी आलेले एनबीए समितीचे चेअरमन डॉ. आर. के. दीक्षित, तन्वीर अहंमद, सुरेश रामास्वामी रेड्डी, अमित्व चटर्जी, एन. एस. राघव, के. सुधाकर रेड्डी, विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी, प्रा. नरेश कांबळे आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेक्युलर कला प्रदर्शन उद्यापासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेक्युलर मुव्हमेंटच्यावतीने उद्या, (रविवार) पासून कला प्रदर्शन आयोजित केले आहे. महाराष्ट्रातील नामवंत चित्रकारांच्या कलाकृत्तींचा समावेश या प्रदर्शनात आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात आयोजित प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांच्याहस्ते रविवारी दुपारी २ वाजता होणार आहे. ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या क्लार्क हाउस इनिशिएटिव्हचे क्युरेटर आणि फाउंडर सुमेश्वर शर्मा, पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ एज्युकेशनचे संचालक प्रा. मर्झबान जाल, नागपूरचे ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, उद्योजक एम. बी. शेख उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शन २२ सप्टेंबरअखेर सुरू राहणार आहे.

प्रा. कांबळे यांनी प्रदर्शनामागची भूमिका सांगितली. ते म्हणाले, 'सद्यस्थितीत स्त्रियांवर होणारे अत्याचार, शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण, सुसह्य केलेली भांडवलशाही, जमातीय हुकूमशाहीची चाहूल आदी प्रश्न निर्माण झाले आहेत. या सगळ्या समस्यांची कमीअधिक प्रमाणात मूळ समस्या ही धर्माधिष्ठीत जातीव्यवस्था आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी भारतीय संविधानाला अभिप्रेत समाज निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी सेक्युलर जाणीवा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सेक्युलर कला प्रदर्शनाच्या माध्यमातून या जाणीवा रुजाव्यात या उद्देशाने प्रदर्शन आयोजित केले आहे.'

ते म्हणाले, 'सेक्युलर मुव्हमेंटने पाचगणीत अस्वस्थ भारतीय वर्तमान : चित्रकारांचे-शिल्पकारांचे आकलन आणि भाष्य,' या विषयावर गेल्या मे मध्ये पाचगणीत कार्यशाळा घेतली. महाराष्ट्रातील आघाडीचे कलावंत यात सहभागी झाले. तेथे निर्माण केलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत भरवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात कोल्हापुरात होत आहे.'

पत्रकार परिषदेला सेक्युलर मुव्हमेंटचे सरचिटणीस प्रा. भरत नाईक, खजिनदार सुरेश भंडारे उपस्थित होते.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कात्यायनी मंदिर चोरीतील फरारी सूरज काळे जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कळंबे तर्फे ठाणे (जि. कोल्हापूर) येथील कात्यायनी देवी मंदिरातील चोरी प्रकरणातील फरारी संशयित सूरज तानाजी काळे (रा. दौंड ता. पुणे) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हातकणंगले येथील बसस्थानकातून अटक केली.

मंगळवारी (११ सप्टेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास कात्यायनी देवी मंदिराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी देवीचे चांदीचे दोन मुखवटे, पंचारती आदी सुमारे दोन किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले होते. मंदिरातील चोरीने एकच खळबळ उडाली होती. तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपी सूरज काळे हा कागल तालुक्यातील वंदूर गावातील कुलकर्णी पोल्ट्रीफार्मजवळ असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी पथकासह छापा टाकला. मात्र चाहूल लागताच काळे दागिन्याची पिशवी टाकून पळून गेला. कापडी पिशवीत कात्यायनी मंदिरातील चोरलेले ६० हजार रुपये किंमतीचे दागिने सापडले होते. त्यानंतर काळेच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. काळे हा हातकणंगले येथील बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचत त्यास अटक केली. त्याने चोरीची कबुलीही दिली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला करवीर पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीनगर हद्दीतील ४२ हद्दपार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडून हद्दीतील रेकॉर्डवरील ४२ जणांना हद्दपार केले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्यावतीने रेकॉर्डवरील द्वारकाधिश जयनारायण खंडेलवाल (वय २६ रा. पुरोहित बिल्डिंग), आनंद शेखर जर्मनी (वय २५ रा. कबनूर), किरण बबन लोहार (वय २५ रा. जवाहरनगर), सचिन लक्ष्मण झळके (वय २४ रा. शाहूनगर चंदूर), सुनील गुरुपाल कुंभार (वय २२ रा. भारतमाता हौसिंग सोसायटी) यांच्यासह ४२ जणांना हद्दपारीच्या नोटिसा बजावल्या आहेत. शहर आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टायटन’तर्फे २५ हजार मुलींना शिक्षण’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींची संख्या मोठी आहे. टायटन परिवाराच्या माध्यमातून २५ हजार अल्पवयीन मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणार आहे,' अशी माहिती टायटनचे व्यावसायिक सहकारी राणा उपपालपट्टी यांनी दिली. दसरा चौक येथील टायटन शोरूम येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. स्केटिंग खेळाच्या माध्यमातून देशातील प्रमुख शहरांतून जनजागृती मोहीम काढण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ते कोल्हापुरात आले होते.

उपपालपट्टी म्हणाले, 'देशाचा बहुतांशी भाग ग्रामीण असून तेथील ४० टक्के महिला शिक्षणापासून वंचित आहेत. घरातील एक स्त्री शिकली तर ती अनेक पिढ्यांना शिक्षित करू शकते. स्वातंत्र्यानंतर स्त्री शिक्षणात आपण कमी पडलो. महिलांमध्ये आरोग्याचे अनेक प्रश्न आहेत. यामध्ये कर्करोगाचे प्रमाण चिंताजनक आहे. यासाठी शिक्षण आणि आरोग्याबाबत देशातील महिलांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक आहे. देशातील मुलींचे आयुष्य शिक्षणाशिवाय अपूर्ण आहे. टायटन समूहाच्या माध्यमातून गेल्या १९ वर्षांपासून महिला आणि मुलींच्या शिक्षणासाठी भरीव काम केले जात आहे. समाजातील वंचित घटकासाठी काम करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.'

याप्रसंगी इनरव्हील क्लबच्या तनुजा कामत, ममता झंवर, क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या वीणा डोली, पल्लवी मूग, दिपाली तैवाडे, दीपा देशपांडे, पल्लवी नवाळे, आसावरी देशिंगकर, वैशाली चौगुले, प्रसाद कामत, राजेंद्र डकरे, भूषण रुकडे, टायटन कंपनीचे श्री हरिंद्रनाथ, अनुपम सहा, रवी मिश्रा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा सहकारी दूध संघाला पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शिराळा

वारणानगरच्या वारणा सहकारी दुध संघाला नँशनल को-ऑपरेटीव्ह डेअरी फेडरेशनऑफ इंडिया यांच्यामार्फत ई मार्केटद्वारे २०१७-२०१८ या वर्षात दुग्धपदार्थ विक्रीसाठीचा देशपातळीवरील तीस-या क्रमांकाचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

गुजराथ येथील आणंद येथे झालेल्या कार्यक्रमात केंदीय कृषीमंत्री राधा मोहनसिंग व कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या हस्ते वारणा दुध संघाचे मार्केटिंग ऑफिसर अनिल हेर्ले यांनी पुरस्कार स्वीकारला. दुग्ध पदार्थाच्या गुणवत्तेबाबत संघाने कधीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे आमचे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे आम्ही पुरस्कारास पत्र ठरलो आहे असे प्रभारी कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले. उपाध्यक्ष भाऊसाहेब गुळवणी यांनीही संघातील कर्मचारी, अधिकारी आणि समूहाचे नेते विनय कोरे यांच्या कुशल मार्गदर्शनामुळे वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झाले आहेत असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारमंत्र्यांची ‘रेल्वेत चर्चा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी 'माझं सोलापूर बदलतंय' हे ब्रीदवाक्य घेऊन 'हुतात्मा एक्स्प्रेस'ने प्रवास करीत प्रवाशांशी संवाद साधला. सोलापूरचे विविध प्रश्न जाणून घेण्यासाठी, विकासावर चर्चा करण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनने या उपक्रमाचे आयोजन केले होते. प्रवाशांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत, सुभाष देशमुख यांना सूचना करीत उपक्रमाचे कौतुक केले.

सोलापूरच्या प्रश्नांवर लोकप्रतिनिधी आमच्याबरोबर प्रवास करीत संवाद साधल्याने सोलापूरकर प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. या वेळी सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे सोलापूरत्या प्रश्नांवर आपण सोलापूरच्या विकासासाठी काय करू शकता? असा अर्ज भरून घेण्यात आला. याद्वारे आलेल्या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे. या प्रवासात झालेल्या चर्चेमध्ये युवक, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक समस्या, विकासकामे याविषयी चर्चा झाली. सोलापूरकर या नात्याने आम्ही आपल्या सोबत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली. या वेळी सोलापूर सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले, प्रा. हिंदुराव गोरे, अनिकेत चनशेट्टी , श्रीकांत माळगे, आशिष गोसावी, सचिन आसबे, प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर-सांगली रस्ता दुरस्तीसाठी निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-सांगली आणि आंबोली ते बेळगावपर्यंतच्या रस्ता दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी २६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते)अवर सचिव सु. वि. करमरकर यांनी काढला आहे.

पावसामुळे कोल्हापूर-सांगली तसेच आंबोली ते बेळगावपर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनधारकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बांधकाममंत्री पाटील यांनी या रस्त्याचे मजबुतीकरणासह नूतनीकरणासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बांधकाम विभागाच्या अखत्यारितील डांबरी रस्त्यांचे नूतनीकरण अथवा मजबुतीकरणासह नूतनीकरणाचा प्रस्ताव सादर झाला होता. २०१८-१९ योजनेत देशभाल दुरूस्ती अंतर्गत यासाठी निधी मंजूर केला. कोल्हापूर-सांगलीसाठी २० कोटी आणि अंबोली ते बेळगावपर्यंत सहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामध्ये काढलेल्या दिलेल्या आदेशात शिरोली ते सांगली रस्ता, शिरोली ते अंकली ते सांगली (जयसिंगपूर बायपास) आणि वेगुर्ला अंबोली जिल्हा हद्दीपासून शिरगाव नागनवाडी ते बेळगाव राज्य हद्दीपर्यंत समावेश असल्याचे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलिदा कुणाच्या खिशात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियमबाह्य प्रक्रिया राबवली. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला आहे. जनतेच्या कराचे ४१ हजार, २०५ कोटी अतिरिक्त पैशांचा मलिदा कुणाच्या खिशात गेला?' असा सवाल करत भाजपचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणा, असे आवाहन शनिवारी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.

काँग्रेस कमिटी कार्यालयातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, 'काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने २०१२ मध्ये १२६ राफेल खरेदीचा प्रस्ताव आणला. पहिल्या टप्यात ३६ राफेल खरेदीसाठी ५२६ कोटींची निविदा प्रसिद्ध केली. मात्र दर निश्चित न झाल्याने खरेदीची फेरनिविदा काढली. दरम्यान, लोकसभेची आचारसंहिता सुरू झाली. खरेदीचा आदेश देता आला नाही. सन २०१४ मध्ये सरकार भाजपचे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सला जाऊन आल्यानंतर पूर्वीची राफेल खरेदी प्रक्रिया रद्द केली. नव्या प्रक्रियेत ३६ राफेल खरेदीसाठी ६० हजार, १४५ कोटींची निविदा २०१५ मध्ये काढली. देखभाल, दुरूस्तीसाठी १८ हजार कोटींचे काम रिलायन्स कंपनीला दिले. ही कंपनी निविदा प्रसिद्ध होण्याआधी केवळ १२ दिवस आधी नोंदणी झाली आहे. कंपनीचे बारसे होण्याआधीची पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मित्राचे भले करण्यासाठी रिलायन्सला हे काम दिले. या कंपनीकडे तंत्रज्ञ नाहीत. बाहेरच्या देशांतील तंत्रज्ञातर्फे राफेल देखभाल, दुरुस्ती करताना देशाच्या सुरक्षेला बाधा येऊ शकते, हे गंभीर असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यावर लोकसभेत काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले. मात्र, पंतप्रधान मोदींनी काहीही उत्तर दिले नाही. भाजपचे कोणीही बोलायला तयार नाहीत. एकूण या प्रकरणात तब्बल ४१ हजार, २०५ कोटी रुपये आपल्या मर्जीतील लोकांच्या कंपनीस अतिरक्त देण्यात आले आहेत. 'न खाऊंगा, खाने दुंगा', असे म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी राफेलचा व्यवहार संशयास्पदपणे केला. ते देशाचे रखवालदार नव्हे भागीदार बनले आहेत. हा गैरव्यवहार, घोटाळा सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यापकपणे प्रयत्न करावेत.

जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, 'राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाई वाढल्याने सामान्यांना झळ बसत आहे, तरीही सरकार सुस्त आहे.' यावेळी आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, संध्या घोटणे, बाजीराव सातपुते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, मेळाव्याआधी पत्रकार परिषदेत राफेल खरेदी व्यवहारातील गैरकारभाराची माहिती माजी मंत्री पाटील यांनी दिली.

पेट्रोलवर ३९ रूपये कर

'देशात सर्वाधिक महाराष्ट्रातील पेट्रोलवर देशात सर्वाधिक ३९ रूपये कर लावला आहे. डिझेल, गॅसचे दरही भडकले आहेत. परिणामी महागाई प्रचंड वाढली आहे. जीएसटीच्या माध्यमातून सर्वच वस्तूंना मोठा कर लावला आहे. अशा माध्यमातून गोळा झालेल्या पैशांतून गैरव्यवहार केला जात आहे. तेच पैसे वापरून भाजप निवडणुका जिंकत आहे,' असा आरोपही माजी मंत्री पाटील यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाजत गाजत गौराई आली...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायनंत गौरीचे शनिवारी घराघरांत आगमन झाले. गौरीला आणण्यासाठी गेलेल्या महिला आणि तरुणींनी फुगडीचा फेर धरत गाणी गायली. भाजी, भाकरी, वडीचा नैवेद्य दाखवल्यानंतर सायंकाळी गौरीला सजवण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती.

गणेशाच्या आगमानंतर शनिवारी सकाळपासून गौराईच्या आगमनाची घरोघरी तयारी सुरू होती. पंचगंगा नदी घाट, रंकाळा, कसबा बावडा येथील राजाराम बंधारा, कोटीतीर्थ येथे भरजरी साड्या परिधान करून महिला, युवती, लहान मुलींनी सकाळी अकरा वाजल्यापासून गर्दी केली होती. अनेक ठिकाणी महिलांनी फेर धरत गौरी गीते म्हटली. झिम्मा, फुगडीचा फेर धरत आनंद लुटला. पाणवठ्यावर गौरीचे डहाळे कलशात घेऊन ढोल-ताशा, बँन्डच्या तालावर वाजत गाजत गौरी घरोघरी नेण्यात आल्या. शहरातील प्रमुखा बागामध्येही गौरी नेण्याचे विधी पार पडले. कडक उन्हाचा तडाखा असून महिला वर्गाचा उत्साह तसूभरही कमी झालेला नव्हता.

सुख समृद्धी घेऊन सोनपावलांनी आलेल्या गौराई गौरींचे पंचारती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर गणरायाच्याजवळ गौरीची प्रतिष्ठापना करण्यात आली. देवीची आरती म्हणून व भाजी भाकरी वडीचा नैवेद्य दाखवण्यात आल्या. सायंकाळच्या सत्रात गौरीचे मुखवटे लावून भरजरी वस्त्रांनी गौरीला सजविण्यात आले. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत गौरी गीतांवर महिला वर्गांनी फेर धरत रात्र जागवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदभरतीची जबाबदारी कुलगुरुंची

$
0
0

नियम डावलल्यास कुलसचिवांवरही होणार कारवाई ;सरकारचे विद्यापीठांना आदेश

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

विद्यापीठांतील विविध पदांची भरती करताना नियमावलींना हरताळ फासल्यास त्याची जबाबदारी कुलगुरु आणि कुलसचिवांवर असेल. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयाची अट यांचा भंग केल्यास कारवाई करण्यात येईल, असा सूचनावजा इशारा देणारा आदेश सरकारने विद्यापीठ आणि विभागीय शिक्षण सहसंचालकांना बजावला आहे. बेकायदा भरती प्रक्रियेतील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक लाभविषयक समस्या निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठाची राहणार आहे, असा धोरणात्मक निर्णयही घेतला आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठांना आणि शिक्षण सहसंचालक कार्यालयांना येथून पुढे नियमानुसार पदभरतीसंदर्भात नोटीस बजावली आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये सरकारमान्य आणि विद्यापीठ स्वनिधी अशा दोन प्रकारे भरती प्रक्रिया होते. यामध्ये प्राध्यापक, वर्ग एक व दोनमधील अधिकारी आणि तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्राध्यापक, वर्ग एकमधील पद भरती या थेट कुलगुरूंच्या नियंत्रणाखाली होते. तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कुलसचिवांच्या अखत्यारित असतात.

वर्ग दोनमधील काही निवडी या कुलगुरू तर काही पदे कुलसचिव कार्यालयाशी संबंधित आहेत. सरकारमान्य नियमित पदांवर भरती संबंधी सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत. मात्र पदभरतीचे धोरण, नियम, विद्यापीठ नियमातील तरतुदींना काही ठिकाणी फाटा दिला जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. विद्यापीठात भरती प्रक्रिया राबविताना मुदतीत जाहिराती दिल्या जात नाहीत. शैक्षणिक पात्रता, अनुभव या अटींचे पालन होत नाही. अशा प्रकारे नियुक्त झालेले कर्मचारी बराच काळ पदावर कार्यरत राहतात. त्या कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याबाबत प्रकरणे सरकारकडे सादर केली जातात.

अशा प्रकारच्या अनियमिततेतून सवलती देण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करून वेतनविषयक व सेवानिवृत्तीचे लाभ यावरुन समस्या निर्माण होतात. प्रकरण कोर्टापर्यंत पोहचते. अशा अपात्र कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करून त्यांना वेतन व इतर सेवेचे लाभ देण्याची वेळ सरकारवर येते. या साऱ्या बाबींचा विचार करून सरकारने सरकारमान्य पद भरतीसंदर्भात कुलगुरू, कुलसचिवांना लेखी आदेश दिले आहेत. यापुढे पदभरतीदरम्यान कसल्याही प्रकारची अनियमिता राहणार नाही हे तपासण्याचे आदेश दिले आहेत. कालांतराने अनियमिता, चुका आढळल्यास त्याची जबाबदारी व वेतनविषयक जबाबदारी विद्यापीठाची राहील आणि याप्रकरणी कुलगुरू आणि कुलसचिवांवर निश्चित केले जाईल, असे कळविले आहे.

विद्यापीठात सरकारमान्य पद भरतीची प्रक्रिया नियमानुसार झाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सरकारने आता पद भरतीत अनियमितता आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित केली आहे. या बाबी विचारात घेऊन विद्यापीठ प्रशासनाला भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

अजय साळी, शिक्षण सहसंचालक कोल्हापूर विभाग

विद्यापीठातील ३५० हून अधिक प्रकरणे कोर्टात

भरती प्रक्रियेतील अनियमिता, काल्पनिक वेतनवाढीचा घोळ यावरुन शिवाजी विद्यापीठातील सुमारे ३५० प्रकरणे कोर्टात आहेत. काही प्रकरणात कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तर भरती प्रक्रियेतील अनियमिततेवरुन सरकारनेच चौकशीसाठी एक कमिटी नेमली होती. विद्यापीठ कॅम्पसमधील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांच्या काल्पनिक वेतनवाढीचा विषय सध्या हायकोर्टात आहे. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी मिळून २८ जणांच्या भरती प्रक्रियेची आता तिसऱ्या कमिटीकडून चौकशी सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलावंत टीकाकार कधी होणार?

$
0
0

आपण समाजाचाच भाग आहोत, ही जाणीव कलाकाराला स्वत:लाच व्हायला हवी. त्यासाठी त्याने स्वत:ला समाजाशी जोडून घ्यायला हवे; अन्यथा तो व्यवस्थेचा टीकाकार कधी होणार? असा सवाल ज्येष्ठ समीक्षक आणि विचारवंत प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी व्यक्त केला. सेक्युलर मूव्हमेंटने पाचगणीमध्ये महाराष्ट्रातील निवडक चित्रकारांची कार्यशाळा घेतली होती. त्यातील कलाकृतींच्या प्रदर्शनाचा प्रारंभ कोल्हापुरात आज (रविवार) पासून होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रमुख संयोजक असलेले प्रा. कांबळे यांच्याशी साधलेला संवाद….

००००००

अस्वस्थतेचा हुंकार साहित्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला. तसा तो चित्र-शिल्पकलेच्या माध्यमातून व्यक्त होतोय का?

सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, भाषेचे व्याकरण, शब्द याची जी सार्वत्रिक साक्षरता निर्माण झाली, तशी चित्राची भाषा, रंगरेषा, त्याचे व्याकरण याची सार्वत्रिक साक्षरता झाली नाही. दुसरा मुद्दा असा की, प्रत्येक माध्यमाची जशी ताकद असते, तशी त्याची एक मर्यादाही असते. या सगळ्या प्रकाराला शिक्षणपद्धतीही जबाबदार आहे किंवा त्या त्या क्षेत्रातील जाणकारही जबाबदार आहेत. एक मात्र खरे आहे की, हजार पानांच्या पुस्तकाने जो परिणाम होणार नाही, त्याहून अधिक परिणाम एखाद्या चित्राच्या माध्यमातून होऊ शकतो.

आता मुद्दा असा की, पहिली गोष्ट म्हणजे भाषा आणि साहित्य, चित्र आणि कला यांची मांडणी आणि फरकामध्ये तुलना होऊ शकत नाही. हीही गोष्ट खरी आहे की, जेव्हा एखादी व्यवस्था जाचक बनते तेव्हा तिच्याविरुद्धचा एक निषेध, तिच्याविरुद्धचे आपले मत मांडण्याचे कर्तव्य प्रत्येक माध्यमाने केले पाहिजे, साहित्याच्या माध्यमातून ते केले असले तरी त्याची जेवढी प्रसिद्धी झाली किंवा आधी म्हटल्याप्रमाणे त्याची सार्वत्रिक साक्षरता असल्यामुळे लोकांपर्यंत ते जेवढ्या प्रमाणात पोहोचले तेवढ्या प्रमाणात ते कलेच्या म्हणजे चित्रांच्या माध्यमातून असो, शिल्पकला असो, ते पोहोचलेले नाही. यासाठी हेतूपुरस्सर प्रयत्न करावे लागतील.

सेक्युलर मूव्हमेंटने तशी सुरुवात केलेली आहे. आणखी एक गोष्ट की, भारतासारख्या देशात आजही अनेक कला जातीशी निगडित आहेत, ही एक मोठी शोकांतिकाच आहे. मला एवढेच म्हणायचे आहे की, साहित्याबद्दलच्या साक्षरतेइतकी साक्षरता चित्र आणि शिल्पकलेच्या बाबतीत झाली तर आविष्करणही तितक्याच ताकदीने होईल. मला वाटते की, अस्वस्थतेची जाणीव जेवढी साहित्यिकांना आहे, तेवढीच चित्र आणि शिल्प, कलावंतांना आहे; पण मुद्दा आहे तो त्याच्या आविष्कार करण्याच्या मर्यादेचा आणि ताकदीचा.

वर्तमानाबद्दल चित्रकार, शिल्पकार आणि कलावंत सजग तरी आहेत का? तुम्ही शिक्षणव्यवस्थेतील दोषाचा मुद्दा मांडला, शिक्षणव्यवस्थाच त्यांच्या आविष्करणातील अडथळा ठरते का?

शिक्षणव्यवस्थेत चित्रकला या विषयाचे दुय्यम-तिय्यम स्थान आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे चित्रकला हा विषय सक्तीचा केला तर पहिला मुद्दा बऱ्यापैकी निकालात निघतो. म्हणजे चित्रकलेचीही एक सार्वत्रिक भाषा तयार होईल ना?

सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा व्यवस्थेविरोधात चित्रकलेच्या माध्यमातून आपले मत नोंदविणाऱ्या कलावंतांचा विचार केला तर मला आठवण येते ती एम. एफ. हुसेन यांसारख्या अपवादात्मक कलावंताची. ते सोडले तर फारसे काही प्रयोग झालेत, असे वाटत नाही; पण एक गोष्ट खरी की, व्यवस्थेविरोधात जेव्हा तुम्ही तुमचे माध्यम वापरता तेव्हा त्याची किंमतही मोजण्याची तयारी ठेवावी लागते आणि या संदर्भात चित्रकार हा मुळातच आपण समाजापासून वेगळे आहोत, अशा एका भ्रामक कोषात अडकलाय की काय, अशी शंका येते. म्हणजे 'मला काय त्याचे?... समाजात जे घडते त्याचा माझा संबंध नाही…' अशा एका भ्रामक समजुतीत तो अडकलाय की काय, अशी शंका येते. म्हणण्यापेक्षा ते एक वास्तवही आहे.

हा मुद्दा नेमकेपणानं कसा सांगाल?

म्हणजे असे की, जो जो कोणी संवेदनशील आणि विवेकी कलावंत आहे, तो तो आपले मत, आपला विचार मांडण्यासाठी आपले माध्यम वापरतोच. पुन्हा मुद्दा तिथेच आहे की, ज्या व्यवस्थेविरोधात आपले माध्यम वापरायचे त्या व्यवस्थेचे आकलन…... आणि त्याचाच अभाव आहे. म्हणजे नेमकेपणानेच बोलायचे म्हटले तर एखादा उत्कृष्ट चित्र काढणारा चित्रकार त्याला तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, विचारप्रणाली, चळवळी याविषयी किती भान असते, असा एक प्रश्नच आहे ना!

म्हणजे आकलनाच्या पातळीवरच्याच मर्यादा आहेत का?

हो, आहेत! मर्यादा म्हणण्यापेक्षा जाणून घ्यायला बसला तर कुणापेक्षाही कलावंत कमी नाही. परंतु, आधी म्हटल्याप्रमाणे त्याला असे सतत वाटत राहते की, मी समाजापेक्षा कुणीतरी वेगळा आहे. आपण कलावंत आहोत, आपले आणि समाजाचे काही नाते नाही. त्याला कारण म्हणजे जगभरात जे चुकीचे समज पसरवले गेले, म्हणजे कलेसाठी कला, कलेचा हेतू लोकांना आनंद देणे, कलेचा विषय सामाजिक बांधिलकीचा असू शकत नाही, कुठल्यातरी विचाराला तुमची कला बांधली तर ती प्रचारकी थाटाची होईल आणि तशी ती झाली की, सौंदर्यमूल्याला दुरावते, असे जे समज त्या त्या क्षेत्रातील कलावंतांवर, कलाअभ्यासकांवर प्रस्थापित लोकांनी बिंबवले, त्याचाही कदाचित तो परिणाम असेल.

असे असेल तर त्यांच्या विचाराच्या कक्षा विकसित करण्यासाठी काय करावे लागेल?

महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पर्याय म्हणून किमान दहा-बारा साहित्य संमेलने सुरू असल्याची नोंद आहे. मग ते फुले-आंबेडकरी संमेलन असो, विद्रोही असो, बौद्ध, ग्रामीण, आदिवासी संमेलन असेल. …गावपातळीवरही वर्षांनुवर्षे साहित्य संमेलने भरताहेत. तशी चित्रकारांचीसुद्धा संमेलने भरवणे हा पहिला उपाय. दुसरे, याआधी महाराष्ट्रात चित्रकारांची संमेलने व्हायची. १९५१ साली शंकरराव किर्लोस्करांच्या उपस्थितीत संमेलन झाले होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून चित्रकारांची संमेलने होत होती. आम्ही पाचगणीत चित्रकारांची निवासी कार्यशाळा घेण्याचा प्रयत्न केला, तशा कार्यशाळा घेतल्या तरी चित्रकार, कलावंतांमध्ये भोवतालाचे एक सजग भान निर्माण व्हायला मदत होईल, असे वाटते. कलावंत हा समाजाचा भाग आहे. तो सजग असला पाहिजे, व्यवस्थेविरोधाचा टीकाकार असला पाहिजे, ही जाणीव त्याची त्यालाच व्हायला हवी. त्यासाठी त्याने स्वत:ला समाजाशी जोडून घ्यायला हवे; अन्यथा तो व्यवस्थेचा टीकाकार कधी होणार?

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारभाव तेल महागले

$
0
0

खाद्य तेलाचे भाव वाढले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशोत्सवात धान्य, कडधान्याचे दर स्थिर असले तरी खाद्यतेलामध्ये सूर्यफूलाच्या दरात प्रतिलिटर दोन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. तर शेंगतेल प्रतिकिलो एक रुपयाने वाढले आहे.

गौरी गणपती आगमनामुळे गेल्या आठवड्यात किराणा बाजारात मोठी उलाढाल झाली. ग्राहकांनी मोठी खरेदी केली असल्याने ग्राहकांची संख्या कमी झाल्याने सध्या बाजारपेठ शांत आहे. पोहे, साखरेचे दर स्थिर असले तरी शेंगदाणा दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली आहे. कडधान्यामध्ये तूरडाळ, मूगडाळ, उदीड डाळ, मसूर डाळीचे दर स्थिर आहेत. बेळगावी मसूर प्रतिकिलो १० रुपयांनी स्वस्त झाली आहे. गेल्या आठवड्यात बेळगावी मसूरचा दर प्रतिकिलो १३० रुपये होता. आता हा दर १२० रुपयांवर स्थिरावला आहे.

खाद्य तेलाच्या दरात वाढ झाली असून शेंगतेलाच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाने वाढ झाली आहे. सूर्यफुलाच्या दरात प्रतिलिटर दोन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. मसाल्यामध्ये जिरे दरात प्रतिकिलो वीस रुपयांनी वाढ झाली आहे.

किराणा प्रतिकलो दर (रुपयामध्ये)

पोहे ५० रु.

साखर ३६ ते ३८ रु.

शेंगदाणे ९० ते १०० रु.

मैदा ३२ रु.

आटा ३० ते ३२ रु.

रवा ३२ रु.

गूळ ५० रु.

शाबू ६४ रु.

डाळीचे दर (किलोमध्ये)

तूरडाळ ६४ ते ७२ रु.

मूगडाळ ८० रु.

उडीद डाळ ६० ते ७२ रु.

हरभरा डाळ ६० ते ६४ रु.

मसूर डाळ ६४ रु.

मसूर ७० ते १२० रु.

चवळी ८० ते १०० रु.

हिरवा वाटाणा ६० ते ८० रु.

काळा वाटाणा ६४ ते ६८ रु.

पांढरा वाटाणा ५६ ते ६० रु.

मटकी ८० ते १०० रु.

छोले ८० ते १०० रु.

पावटा १०० रु.

०००

बार्शी शाळू ३२ ते ३८ रु.

गहू २५ ते ३४ रु.

ज्वारी नं.१ २४ ते ३० रु.

ज्वारी नं.२ १८ ते २५ रु.

बाजरी २४ ते २८ रु.

नाचणी ३६ ते ४० रु.

००००

तेलाचे दर (किलो)

शेंगतेल १२५ रु.

सरकी तेल ९० रु.

खोबरेल २४० रु.

सूर्यफूल ९० ते १०० रु.

०००

मसाले दर (किलोमध्ये)

तीळ १४० ते १५० रु.

जिरे २६० ते २८०रु.

खसखस ७०० ते ८०० रु.

खोबरे २०० रु.

वेलदोडे १७०० ते २००० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंडळांवरील कारवाई थांबवा

$
0
0

कोल्हापूर: विनापरवाना व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर महापालिका कारवाई करत आहे. कारवाई करताना हायकोर्टाचे पत्र दाखवले जात आहे. महापालिकेचा सर्व कारभार कोर्टाच्या निर्देशानुसार होतो का? असा प्रश्न उपस्थित करत मंडळावरील कारवाई थांबवा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात म्हटले आहे, 'लहान गल्ली व उपनगरांमध्ये गणेशोत्सवासाठी मंडप उभारले आहेत. वाहतुकीस अडथळा होत नसताना, महापालिका हायकोर्टाचे पत्र दाखवून कारवाई करत आहेत. शहरात अनेकठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण झाले असून अनाधिकृत बांधकामाना अभय दिले जात आहे. मात्र केवळ दहा दिवसांच्या गणेशोत्सवात प्रशासन आडकाठी निर्माण करत आहे. मंडळांनी जर परवानगी घेतली नसल्यास प्रशासनाने त्यांना परवानगी द्यावी, पण मंडप काढू नये असेही पत्रकात स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images