Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहाशेजणांच्या डोळ्यांत ‘प्रकाश पेरणी’

$
0
0

वर्षभरातील कोल्हापुरातील स्थिती, नेत्रसंकलन कमी, मागणी अधिक

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

अवयव दान हे जगातील सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक समजले जाते. भारतीय संस्कृतीत दानाला अत्यंत महत्व दिले जाते. कोल्हापुरात अवयवदानाबाबत जागरुकता वाढत आहे. मृत्यूनंतर डोळ्यांच्या माध्यमातून आपण जिवंत राहू, या भावनेने नेत्रदान करण्यात पुढाकार घेतला जात आहे. गेल्या वर्षभरात कोल्हापुरातील सहाशेहून अधिक रुग्णांच्या डोळ्यांत बुब्बुळ प्रत्यारोपणांसह इतर आजाराच्या यशस्वी शस्त्रक्रिया करत 'प्रकाशाची पेरणी' करण्यात आली आहे.

इतर अवयवदानापेक्षा नेत्रदानाबाबत गेल्या काही वर्षांत अधिक जनजागृती झाल्याने नेत्रदान करण्यावर अधिक भर दिला जातो. अपघात तसेच इतर घटनांमळे बुब्बुळाला इजा झाल्याने अनेकांना दृष्टिहीन आयुष्य काढावे लागते. अलीकडे नेत्रसंकलनाच्या माध्यमातून बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया अत्याधुनिक साधनांच्या वापराने यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले आहे. नेत्रदानाच्या माध्यमातून आपण इतरांना दृष्टी देऊ शकतो ही भावना रुजत असल्याने त्याबाबत उत्स्फूर्त पुढाकार घेतला जात आहे.

...........

नेत्रदान करताना ...

कोणत्याही वयोगटातील व्यक्ती मरणोत्तर नेत्रदान करू शकते. तसेच नेत्रदानाचा फॉर्मही भरता येतो. नेत्रदानाचा फॉर्म भरला नसेल तरीही नेत्रदान करता येते. नेत्रदान मृत्यूच्या चार ते सहा तासाच्या आत करावे लागते. नेत्रपेढीला कळवल्यानंतर नेत्रतज्ज्ञ येऊन पारदर्शक पटल किंवा डोळा काढून घेतात. या प्रक्रियेसाठी किमान २० ते ३० मिनिटांचा कालावधी लागतो. नेत्रदान करत असताना मृतदेहाला विद्रुपता येणार नाही याची काळजी घेतली जाते. कर्करोगाचे, एचआयव्ही-एड्सचे रुग्ण,कावीळ तसेच डोळ्यांना जंतूसंसर्ग झालेल्यांना नेत्रदान करता येत नाही.

नेत्रदानासाठी काय कराल ...

मृत्यूनंतर अवयवरुपी जिवंत राहण्यासाठी नेत्रदान हा मार्ग असतो. नेत्रदानाची इच्छा असल्यास नेत्रदानाचा फॉर्म भरावा. अगदी फॉर्म भरणे शक्य झाले नाही तरी आपल्या जवळच्या नातेवाइकांना आपली इच्छा सांगून ठेवावी म्हणजे मृत्यूनंतर ती पूर्ण केली जाईल. इच्छित व्यक्तीच्या मृत्यूनंतर तत्काळ नेत्रपेढीला संपर्क करावा. तसेच नेत्रपेढीस कळवताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच मृत्यूची अचूक वेळ कळवावी. मृत व्यक्तीच्या डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी. त्याचबरोबर घरातील पंखे, एसी बंद करावा. तसेच मृत व्यक्तीच्या मानेखाली उशी ठेवावी. नेत्रदानावेळी डॉक्टरांनी दिलेली मृत्यूप्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत व नातेवाईकांचे संमतीपत्र भरून देणे आवश्यक असते.

युवापिढीने पुढाकार घ्यावा

सोशल मिडीयाच्या प्रभावी वापरामुळे तरुणाई एकमेकांच्या संपर्कात आली आहे. या माध्यमांचा वापर विविध सकारात्मक गोष्टींसाठी करणे शक्य आहे. नेत्रदान चळवळ वाढण्यासाठी तरुण पिढीने सोशल माध्यमांच्या वापरातून जनजागृती करून नेत्रदान चळवळीला बळ देण्याची अपेक्षा नेत्रपेढी संस्थाकडून व्यक्त करण्यात येत आहे. अलीकडे वाढदिवसानिमित्त नेत्रदानाचे फॉर्म तरुणांकडून भरले जात आहेत.

..........

या ठिकाणी करता येईल नेत्रदान

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय(सीपीआर) संपर्क: नेत्रदान समुपदेशक ९५०३२९४०८६

प्रगती नेत्र रुग्णालय: संपर्क:०२३१-२५२९३४८

नंदादीप नेत्रालय: संपर्क: ७५८८०८४९९९

.................

कोट::

'नेत्रदान चळवळ वाढीस लागण्याची गरज आहे. नेत्रसंकलन संख्येपेक्षा मागणी अधिक असल्याने नेत्रदानाची मोहीम समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचायला हवी. विविध सामाजिक संस्थाबरोबर तरुणाईचा सहभाग वाढल्यास या चळवळीला अधिक बळ येईल.

डॉ. अतुल राउत, विभागप्रमुख, नेत्रशल्यचिकित्सा शास्त्र विभाग, सीपीआर

दृष्टीक्षेप ...

जगभरात ४० दशलक्ष व्यक्ती नेत्रहीन

भारतातील नेत्रहीन संख्या १५ दशलक्ष

बुब्बुळसंबंधी आजार असलेल्या व्यक्ती १.१ दशलक्ष

..........................

डॉक्टर कोट फोटो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंभी बँक देणारदहा टक्के लाभांश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'सहकारी बँकांना नोटाबंदी निर्णयामुळे व रिझर्व्ह बँकेच्या शर्तींमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी आमच्या प्रामाणिक शेतकरी कर्जदारांच्या नियमित कर्जफेडीने बँकेचा नेट एनपीए कमी करण्यास मदत झाली. कुंभी-कासारी सहकारी बँकेला ७० लाख निव्वळ नफा मिळाला आहे. रिझर्व्ह बँकेकडून परवानगी मिळताच यावर्षी १० टक्के लाभांश दिला जाईल,' अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अजित नरके यांनी दिली.

कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी बँकेच्या ४३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार चंद्रदीप नरके प्रमुख उपस्थित होते. लेखापाल प्रवीण पाटील यांनी विषयवाचन, तर अहवालवाचन कार्यकारी संचालक डी. एस. राऊत यांनी केले.

अजित नरके म्हणाले, 'अहवाल वर्षात ४३ कोटी ५० लाख कर्ज वितरण झाले असून, बँकेकडे ७७ कोटी २५ लाखांच्या ठेवी जमा आहेत. तसेच प्रामाणिक कर्जदारांना डिबेटद्वारे एक ते दीड टक्का सवलत देण्याचे धोरण बँकेने अमलात आणले आहे.'

यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विशेष अधिवेशन बोलाविण्याची तसेच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सांगून प्रसंगी निकषात बदल करा, पण ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी केली.

प्रकाश सरनोबत (आडूर), भीमराव नाळे (सांगरुळ), आर. डी. पाटील (पाडळी बुद्रुक) प्रा. एस. पी. चौगले (वाकरे), विष्णू पाटील (कोपार्डे) यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी कुंभी करखान्याचे उपाध्यक्ष अरुण पाटील, बँकेचे सर्व संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी आभार मानले.

०००

फोटो : कुंभी-कासारी सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना बँकेचे अध्यक्ष अजित नरके. सोबत उपाध्यक्ष अरुण पाटील, कार्यकारी संचालक डी. एस. राऊत व सर्व संचालक.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हास्तरीय स्वीमिंग स्पर्धेत सरस्वती हायस्कूलचे यश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपालिका जलतरण तलाव येथे जिल्हास्तरीय शासकीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये येथील सरस्वती हायस्कूल विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. १७ वर्षांखालील गटात अभिनंदन भरत चौगुले याने ५० मीटर फ्री स्टाइलमध्ये प्रथम, ५० मीटर बटरफ्लायमध्ये प्रथम, १०० मीटर बटरफ्लायमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात अद्वैत स्वप्नील मानेने प्रथम तसेच जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत १२ वर्षांखालील गटात सनी गजानन मांगुरे याने द्वितीय क्रमांक मिळविला. त्याची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय योगासन स्पर्धा शिर्डी येथे झाल्या. स्पर्धेत ८ ते ११ वर्षे वयोगटात यश रमेश पाणीभाते (तृतीय), सिद्धी संतोष दुरुगडे (चतुर्थ), १४ ते १७ वयोगटात सानिका शैलेंद्र जाधव (चौथा) यांनी यश मिळवले. सर्व खेळाडूंची पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना मुख्याध्यापक पी. डी. शिंदे, एस. डी. परीट, एस. जे. साळुंखे, एस. सी. हिरेमठ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह माने, सेक्रेटरी शिवाजीराव जगताप, जॉ. सेक्रेटरी पृथ्वीराज माने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चव्हाण, गुरव यांची आगेकूच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत बुधवारी पहिल्या दिवशी ८५ किलो वजन गटात चव्हाण व गुरव यांनी विजय संपादन करीत आगेकूच केली, तर ७४ किलो वजन गटात शुभम व आदित्य पाटील यांनी विजय संपादन केला. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.

८५ किलो वजन गटात पहिली लढत मयूर सोनाळे (मळगे बुद्रुक) आणि अनिल चव्हाण (नंदगाव) यांच्यात झाली. यामध्ये चव्हाणने पहिल्या तीन मिनिटांच्या आताच आक्रमक खेळ करीत १०-० गुणांनी सोनाळेवर विजय संपादन केला. दुसरी लढत सुभाष पाटील (साके) आणि विनायक गुरव (मळगे खुर्द) यांच्यात झाली. त्यात गुरवने ९-० गुणांनी पाटील याला पराभूत केले, तर ७४ किलो वजन गटात बानगेच्या अमोल बोंगार्डेने शाहू साखरच्या शुभम पाटीलला (म्हाकवे) पुढे चाल दिली, तर मळगे बुद्रुकच्या रोहित पाटीलने कापते डावावर पुलाच्या शिरोलीच्या आदित्य पाटीलला चितपट केले. पंच म्हणून रंगराव हरणे काम पाहीले.

स्पर्धेत २२ पासून ८५ किलो वजन गटापर्यंत ५०९ खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत. स्पर्धा चार दिवस चालणार आहे. क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन समरजितसिंह घाटगे यांनी, तर क्रीडा ज्योतीचे स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांचे भाषण झाले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील आणि कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

००००

फोटो...

कागलच्या श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत मॅटवरील कुस्ती स्पर्धेस बुधवारी प्रारं झाला. पहिल्या दिवशी मयूर सोनाळे आणि अनिल चव्हाण यांच्यात कुस्ती लावताना समरजितसिंह घाटगे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरी बातमीसाठी कोट...

$
0
0

शहरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेतून सरकारच्या मागासवर्गीयांच्या योजनांतून कर्जे दिली जात नाहीत. सधन उद्योजकांना सबसिडीची कर्जे देऊन त्यांचे लाड पुरवले जातात. चांदी व्यवसायासह मागासवर्गीयांची कर्जे या बँकेतून फक्त काही कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांना दिली आहेत याची चौकशी होणे गरजेचे आहे.

विद्याधर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते

०००

शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांत ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. बँकेत जाताना दोन-तीन मजले चढून जावे लागत असल्याने ज्येष्ठांनी तक्रारी केल्यास अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात.

आप्पासाहेब देसाई

अध्यक्ष,जेष्ठ नागरिक संघटना

००००

हुपरीमधील राष्ट्रीयीकृत बँकेत सर्वसामान्य व्यावसायिकांना कायद्याचे ज्ञान सांगून कर्जे सर्रासपणे नाकारली जातात. भांडी व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणे कर्ज भरण्याची हमी देऊनही मुद्रा योजनेचे कर्ज नाकारण्यात आले. या सर्व बँका धनिकांसाठी उभारल्या आहेत अशी शंका वाटते.

सिद्धेश्वर साळुंखे, भांडी व्यावसायिक

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात ओला दुष्काळाची मागणी

$
0
0

शेतपिकांच्या पंचनाम्याचे आदेश

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा जिल्हा परिषदेचा ठराव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन महिन्याहून अधिक काळ सतत पडणाऱ्या पावसामुळे सर्वच भागातील शेतपिके धोक्यात आली आहेत. ऊस,भातासह अन्य पिकांच्या वाढीवर परिणाम संभवत आहे. जिल्हा प्रशासनाने, शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा असेही बजावले आहे. तर जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असा ठराव केला आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची बैठक झाली. बैठकीत, पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी निश्चित करावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली.

जिल्ह्याच्या विविध भागात यंदा पावसाने ठाण मांडले आहे. धरणक्षेत्रात सतत पाऊस पडत आहे. पावसामुळे पीके कुजत आहेत. नदीकाठावरील शेतपिके अद्याप पाण्याखाली आहेत. पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील मुख्य पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भिती शेतकरी व्यक्त करु लागला आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांनी जिल्हा प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले आहे. जिल्हा प्रशासनाने पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. मात्र पावसाचा जोर कायम असल्यामुळे प्रत्यक्ष सर्व्हे करण्यात अडचणी येत आहेत. कृषी सहायक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल देण्याच्या सूचना महसूल विभागाला आहेत. ग्रामीण भागात चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश तालुका पातळीवरील तहसिलदारांना दिले आहेत. ते गावस्तरावरील तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पथकातर्फे पंचनामे केले जातील. पाऊस थांबल्यानंतर तत्काळ पंचनामे होतील. अहवाल आल्यानंतर सरकारकडे सादर करू.

- अविनाश सुभेदार, जिल्हाधिकारी

१९८९ मधील महापुरापेक्षा यंदाची स्थिती बिकट आहे. अतिपावसामुळे नदीकाठावरील पिके कुजली आहेत. अन्य भागातील नाचणी, भुईमूग, भात पिकांची वाढ खुंटली आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस, तांबेरा कीडमुळे पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी सध्या तिहेरी संकटात आहे. सरकारने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन जास्तीत आर्थिक मदत व अन्य सुविधा द्याव्यात.

- सर्जेराव पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढा सुरूच ठेवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी लिंगायत समाज संघर्ष समितीने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, संघर्ष समितीने पुकारलेल्या धरणे आंदोलनाला गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. सरकारने, लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. स्वतंत्र धर्म म्हणून लिंगायत समाजाला केंद्राने मान्यता द्यावी. यासाठी आवश्यक पाठपुरावा राज्य सरकारने करावा. मागण्या मान्य होईपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त केला.

दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह अन्य नेतेमंडळी शुक्रवारी (ता.३१) आंदोलनस्थळी भेट देणार आहेत, तर समाजाच्या शिष्टमंडळाने मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीत संघर्ष समितीचे सुनील रुकारी, काकासाहेब कोयटे, सरला पाटील, गुरुनाथ बडुरे, मिलिंद साखरपे, शिवरुद्र आडके, श्रीकांत तोडकर, भगवान कोठावळे, आदींनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी समाजाच्या मागण्यांबाबत योग्य निर्णय घेऊ, असे शिष्टमंडळाला सांगितले.

लिंगायत समाज संघर्ष समितीच्या आंदोलनाचा गुरुवार हा पंधरावा दिवस होता. दसरा चौक परिसरातील आंदोलनस्थळी सकाळपासूनच विविध भागांतील नागरिकांनी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवप्रसाद तेली, माजी सरपंच प्रकाश खोबरे, माजी पोलिस पाटील शिवगोंडा पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला. सरकारने समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात. गेले पंधरा दिवस समाज लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहे. राज्यकर्त्यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी प्रा. जालिंदर पाटील, भगवान काटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. तारदाळ, पेठवडगाव, शिरोली, कळे, हसूरचंपू येथील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. प्रा. बी. आर. गाडवे, अनिल भुसके, दीपक मिठारी, अशोक गायकवाड, अशोक बाबू खोत, बाबासाहेब महाजन, आदी आंदोलनात सहभागी झाले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उशिरा आल्याने महापौरांची आरती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिके सर्वसाधारण सभा वेळेत सुरू न केल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना आरती ओवाळून सभा सुरू करायला लावली. या वेळी महिला सदस्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सायंकाळी चार वाजता बोलावण्यात आली होती. परंतु, साडेपाच वाजले तरी सभा सुरू झाली नाही. त्यामुळे, काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारे, परवीन इनामदार संतापल्या. 'नगरसचिव, सभा सुरू करा,' 'एलईडीच्या वाटाघाडी संपल्या की नाही?,' अशा घोषणा दिल्या. शेवटी महिला सदस्यांनी महापौर कक्षाबाहेर जाऊन घोषणाबाजी सुरू केली. 'संकष्टी आहे, सभा लवकर सुरू करा' म्हणून आरती सुरू केली. संतापलेल्या महिला आरती घेऊन सभागृहात आल्या व महापौर कक्षासमोर ठिय्या मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२४ जणांना नोकरीच्या संधी

$
0
0

कोल्हापूर : येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे गुरुवारी आयोजित रोजगार मेळाव्यात २४ जणांची निवड झाली. राजश्री छत्रपती शाहू कॉलेजमध्ये मेळावा झाला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजनेतून १५२ जणांना कर्जासाठी निवड करण्यात आली. मेळाव्यास कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील आठवी ते पदवीधर, चिकित्सक, परिचारिका, कक्ष सेवक, एम. बी. ए., आय. टी. आय., डिप्लोमा, इंजिनीअर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले ६४८ जण मेळाव्याला आले. २० कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक पात्रतेनुसार मुलाखत घेतली. त्यातून ६०९ जागेसाठी प्राथमिक फेरीसाठी २६९ जणांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत २४ जणांची निवड झाली. त्यांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकताचे सहायक संचालक ज. बा. करीम यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांच्या जाचक अटींमुळे व्यावसायिक मेटाकुटीला

$
0
0

\Bलोगो : चांदी उद्योगाला अवकळा\B

प्रवीण कांबळे, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील राष्ट्रीयीकृत बँकेच्या आडमुठ्या धोरणांनी चांदी उद्योगासह अन्य व्यावसायिकांना कर्जे देण्यासाठी लावलेल्या जाचक अटींनी व्यावसायिक अक्षरशः मेटाकुटीला आले असून, काही मंडळीनी फक्त 'एकाच' बँकेवर हल्लाबोल करून आंदोलनाचा इशारा देत लाखो रुपयांची कर्जे उचलली आहेत. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी बँक अधिकारी रात्रीचा दिवस करत असताना कर्जे मंजूर केलेले अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हुपरीत चांदीचे दागिने तयार करून त्यावर कलाकुसर करत ते मजुरीवर बनवून देण्याचा व्यवसाय केला जातो. चांदीच्या विटा आणल्यानंतर टंच, आटणी, ओढणी, सूत मशिन, प्रेस, डिसाइन, भरणी, जोडकाम, साधे पॉलिश, व्हॉयब्रेडर पॉलिश, मिनाकाम, तासकाम, पॅकिंग, परपेठेवर तयार दागिने व्यापाऱ्यांना पोहोचविणे असे चांदी व्यवसायाचे उपघटक आहेत. या व्यवसायात हजारो सर्वसामान्य व्यावसायिक काम करून उदरनिर्वाह करतात. या व्यवसायाला आर्थिक मदत झाली तर चांगला व्यवसाय करता येतो. यासाठी अनेक चांदी व्यावसायिकांनी शहरातील राष्ट्रीयीकृत बँकेचे उंबरठे झिजवले; परंतु अनेक जाचटक अटींमुळे त्यांना कर्जे नाकारण्यात येत आहेत.

राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्जे नाकारण्याबाबत विचारणा केली असता काही चांदी उद्योजकांनी थकीत कर्जे भरलीच नाहीत. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठांनी चांदी व्यवसाय सोडून इतरांना कर्जे देण्यास अडचणी नसल्याचे सांगितले. यामुळे सर्वसामान्य चांदी व्यावसायिक कोलमडला आहे. बँकेचे अधिकारी कर्जासाठी घर तारणसारखे पर्याय सुचवतात; परंतु हुपरी शहरातील निम्याहून अधिक भागाचा अद्याप सिटी सर्व्हे झाला नसल्याने बँका कर्ज देण्यास तयार होत नाहीत. चांदी उद्योगासह किराणा व्यवसाय, पानपट्टी, सलून, सायकल दुकान, आदी अनेक व्यवसायांना मुद्रा योजनेची कर्जे देण्यास एका बँकेतून दिलेल्या भरघोस कर्जाचे दाखले देऊन चांदी व्यावसायिकांना कर्जे नाकारण्यात येत असल्याने व्यावसायिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याबरोबर या बँकेत गेल्यावर्षी आठ ते दहाजणांनी चांदी व्यवसायास कर्ज दिले नाही म्हणून बेमुदत उपोषण करून एका दिवसात लाखो रुपयांची कर्जे मंजूर करून घेतली. मात्र, ती थकीत राहिल्याने बँकेने कर्जास नकार दिल्याने त्याचा इतरांना फटका बसत आहे.

दरम्यान, गेल्या तीन-चार वर्षांत एका राष्ट्रीयीकृत बँकेत पंतप्रधान रोजगार योजनेसह मुद्रा योजना, विविध सरकारी योजनांची दिलेली कोट्यवधी रुपयांची कर्जे संशयास्पद असल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे. (उत्तरार्ध)

००००

एकाच बँकेत १८ कोटी थकीत?

हुपरी शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचाऱ्याने अनागोंदी कारभार करून गेल्या तीन वर्षांत लाखो रुपयांच्या कर्जांची खैरात केली. त्यामुळे या कर्मचाऱ्याला भीती घालून अनेकांनी लाखो रुपयांची कर्जे मंजूर घेतली; परंतु या कर्जाचा एक पैसाही भरला नसल्याने बँकेत ७६३ जणांचे १८ कोटी रुपये थकीत असल्याचे बोलले जात आहे.

००००

कोट...

हुपरीतील राष्ट्रीयीकृत बँका म्हणजे 'असून अडचण, नसून खोळंबा' अशी गत असल्याने सर्वसामान्य किराणा व्यावसायिक या बँकांकडे फिरकतसुद्धा नाहीत. चांदी व्यवसायाला कर्जाला नकार देणाऱ्या या बँकांमध्ये किरकोळ किराणा व्यापाऱ्यांसह अन्य व्यावसायिकांना जाचक अटी लावून कर्जे नाकारण्याचे प्रकार घडतात.

सुरेश इंग्रोळे, अध्यक्ष, किराणा-भुसारी व्यापारी असो., हुपरी

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुंबई गाडी मार्च’ची आज रणनीती ठरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतरच विधानसभेचे अधिवेशन घेतले जाईल, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम भूमिका घेतल्यानंतर सकल मराठा समाजाच्यावतीने मुंबईत होणाऱ्या गाडी मार्चची रणनीती आमदार आणि खासदारांच्या बैठकीत ठरणार आहे. शुक्रवारी (ता. ३१) दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधींसमवेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. दरम्यान, शहरात पेठापेठांत गाडी मार्चसाठी बैठकांचा धडाका सुरू असून ग्रामीण भागातून मराठा समाजातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात अधिवेशन घ्यावे, अशी मागणी मराठा समाजाने जिल्ह्यातील खासदार व आमदारांकडे केली आहे. या मागणीनुसार जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी बुधवारी (ता. २९) मुंबईत खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्याची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतरच विधीमंडळाचे विशेष अधिवेशन घेतले जाईल, असे स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या बैठकीतील माहिती लोकप्रतिनिधी शुक्रवारी मराठा समाजाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देणार आहेत. त्यानंतर मुंबईतील गाडी मार्चची रणनीती ठरणार आहे. गाडी मार्चला खासदार, आमदारांनी पाठिंबा दिला असून यासंदर्भात बैठकीत निर्णय होईल.

सकल मराठा समाजाने चार सप्टेंबरला कोल्हापुरातून गाडी मार्चची घोषणा यापूर्वी केली आहे. या मार्चच्या अग्रभागी श्रीमंत शाहू छत्रपती यांचे वाहन असणार आहे. कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गाडी मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी सकल मराठा समाजाशी संपर्क साधला आहे. त्यामध्ये सांगली, कराड, सातारा, पुणे, रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलिसांनी गाडीमार्च रोखला तर कोणती भूमिका घ्यायची याबाबतही शुक्रवारी बैठकीत चर्चा होईल. मुंबईत वाहनांसह बेमुदत आंदोलन सुरू ठेवण्याची तयारी केली असून जिल्ह्यातील मुंबईत वास्तव्य करणारे कोल्हापूरचे रहिवासी व मराठा समाजातील संस्थांनी मोर्चाला मदतीला हात पुढे केला आहे, अशी माहिती मोर्चाच्या संयोजकांनी दिली.

जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा पाठिंबा

दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात सोमवारी शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष सर्जेराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जालंदर पाटील मंडलिक युवा प्रतिष्ठानचे विरेंद्र मंडलिक, रणजित जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

सणगर तालीम परिसराचा पाठिंबा

मंगळवार पेठेतील सणगर गल्ली तालीम, बोडके तालीम, जंगी हुसेन तालीम परिसरातील कार्यकर्त्यांनी नियोजनासाठी सोमवारी बैठक घेतली. मुंबईतील गाडी मार्चसाठी १० वाहने पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला स्वप्निल पार्टे, बाबासाहेब पोवार, अशोक पोवार, माजी नगरसेवक बाबा पार्टे, अशोक मुळीक, दत्ता माने, अशोक जाधव, अनिल पोवार, गजानन यादव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निपाणी पालिकेसाठी ७१ टक्के मतदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निपाणी

निपाणी नगरपालिकेसाठी ३१ प्रभागांमध्ये १३० उमेदवारांसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. सकाळी सात वाजता मतदानास प्रारंभ झाला. एकूण ५० हजार ४०० पैकी ३६ हजार १८१ मतदान (७१ टक्के) झाले. भाजप आणि काँग्रेसमध्येच थेट लढत होत असल्याने मतदान केंद्राभोवती कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मतमोजणी सोमवारी (३ सप्टेंबर) चिकोडी येथे होणार आहे.

निपाणी नगरपालिका निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि अपक्षांची संख्या मोठी असल्याने सकाळच्या टप्प्यात चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. सकाळी अकरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार न घडता २५ टक्के मतदान झाले होते. सर्वच प्रभागांत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागली होती, शिवाय वाहनांचाही वापर करण्यात आला. शहरातील ५२ मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील सर्वच प्रभागांची पुनर्रचना झाल्याने अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असल्याने ती शोधण्यासाठी कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. काही मतदान केंद्रांशेजारी मतदान स्लीप देण्यासाठी यंदा प्रथमच मशिनचा वापर करण्यात आला होता, त्यामुळे मतदारांना मतदानाची तत्काळ स्लीप मिळत होती.

सर्वच केंद्रांवर संबंधित प्रभागातील उमेदवार थांबून मतदारांना मतदानाचे आवाहन करत होते. विविध पक्षांचे नेते मतदार केंद्रावर जाऊन मतदानाबाबत चौकशी करत होते. मतदानादिवशी दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. एकंदरीत ही निवडणूक चुरशीची होणार असल्याने प्रत्येक जण आपल्या प्रभागातील मतदारांना आणून मतदान केंद्रात व्यस्त असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेठवडगाव पीआयसह तिघा पोलिसांची बदली

$
0
0

हातकणंगले : पेठवडगाव (ता. हातकणंगले) पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार, तर काही महिन्यांपूर्वी रुजू झालेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील व पोलिस हवालदार नंदू कराड यांची शुक्रवारी अचानक बदली करण्यात आली.

बदलीमागे गुटखा कंटनेर तस्करीत संरक्षण देऊन 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात होत असून, याप्रकरणी तक्रार दाखल झाली नसल्याने या अधिकाऱ्यांच्या बदलीवर निभावले असल्याचे पोलिस वर्तुळात चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब रस्ताप्रकरणीमनसेची गांधीगिरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्ते दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी येथील उद्योग भवनातील औद्योगिक विकास महामंडळ कार्यालयात गांधीगिरी आंदोलन केले. निवेदन देऊनही रस्ते दुरूस्ती न केल्याच्या निषेधार्थ कार्यकारी अभियंता दिलीप काकडे यांना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला.

औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात रोज मोठ्या संख्येने कामगार दुचाकी व इतर वाहनांतून ये, जा करतात. येथील कारखांन्यातून उत्पादीत मालाची वाहतूक अवजड वाहनांतून त्याच रस्त्यावरून होते. मात्र, प्रमुख रस्त्यांच्या अवस्था दयनीय झाली आहे. मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. ते मुजवावेत आणि रस्ते चांगले करावेत, अशा मागणीचे निवेदन १५ दिवसांपूर्वी कागल मनसेतर्फे औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र, त्याची दखल घेतली नाही. यामुळे कागल मनसे तालुका अध्यक्ष संजय पाटील, विनय पाटील, चंद्रकांत पाटील, संतोष मोरे, दिपक घाडगे, अनिल पाटील, अमर शिंदे, सुरेश पाटील यांनी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना पुष्पहार घालत गांधीगिरी आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा कारभार देशाला घातक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजप सरकारचा चार वर्षांतील कारभार सांगण्यासारखा नसल्याने जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून देशातील वातावरण कलुषित केले जात असून, यातूनच धर्माच्या नावावर हत्या सुरू आहेत. अशा घटना देशाच्या एकतेला घातक असून, त्याला सर्वांनी विरोध करावा,' असे आवाहन काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. केशवराव भोसले नाट्यगृहात शुक्रवारी झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

खरगे म्हणाले, 'पुरोगामी विचारवंतांच्या हत्येला जबाबदार असलेल्या सनातन संस्थेच्या साधकांना ताब्यात घेण्याऐवजी ज्यांनी पुरोगामी विचारांचा प्रसार आणि प्रचार केला अशा लोकांना ताब्यात घेऊन विचारांची गळचेपी केली जात आहे. काँग्रेसचा संघर्ष निवडणूक किंवा सत्तेसाठी नसून देशाला बरबाद करणाऱ्या विचारधारेविरुद्ध आहे. संघर्षामध्ये तन-मन-धनाने कार्यकर्ता सहभागी झाल्यास झेंडा लावण्यासही भाजप देशात शिल्लक राहणार नाही. महिलांवरील अत्याचार, अल्पसंख्याकांच्या कत्तली आणि वाढलेली झुंडशाही हे हिटलरशाहीचे द्योतक असून त्याला भाजप प्रोत्साहन देत आहे.'

प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण म्हणाले, 'बेरोजगारांची वाढती संख्या, शेतकरी आत्महत्या आणि कायदा-सुव्यवस्था यामुळे पंतप्रधान न मुख्यमंत्र्यांनी 'कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र' अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सरकारची संवेदनशीलता संपली असून सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून पुन्हा सत्ता अशी भाजपची वाटचाल सुरू आहे. राज्यातील रस्त्यातील खड्ड्यांमुळे लोकांचा जीव जात असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील ३१ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त होतील अशी तारीख पे तारीख देत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस ७२ हजार नोकरभरतीचे आश्वासन देत असताना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी 'कोठे आहेत नोकऱ्या?' अशी विचारणा करत असल्याने युवकांनी नोकरीची आशाच सोडून दिली आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने संयमाने मोर्चे काढले, पण मागासवर्गीय आयोगाचे कारण पुढे करून भाजप आरक्षणाला विलंब लावत आहे. यातून मराठा विरुद्ध इतर जाती असा जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. कोरेगाव-भीमा दंगलीला जबाबदार असणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना ताब्यात घेण्याऐवजी पुरोगांमी विचारवंताना ताब्यात घेऊन भीती निर्माण केली जात आहे.'

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी, रोजगारांसाठी फिरणारा युवक, कंगाल झालेला व्यापारी आणि अल्पसंख्याकांच्या झुंडशाहीने सुरू असलेल्या हत्या या सर्व सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी जनसंघर्ष यात्रा आहे. राफेल विमान खरेदीत सरकारी कंपन्यांना सहभागी करून न घेता खासगी कंपन्यांना सहभागी करून भाजपने ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदींनी गुजरात पेट्रोलियम कंपनीमध्ये २० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. घोटाळ्यांची अशी अनेक प्रकरणे बाहेर येत असताना राज्यात आठ लाख कोटींची गुंतवणूक आणि ३० लाख युवकांना रोजगार मिळाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात कोल्हापुरात किती गुंतवणूक झाली आणि किती जणांना रोजगार मिळाला ते सांगा? आघाडी सरकारने डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येपूर्वीच एप्रिल २०११ मध्ये केंद्र सरकारकडे सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी केली होती, त्याची अद्याप पूर्तता केलेली नसून मारेकऱ्यांनाही ताब्यात घेतलेले नाही.'

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नसीम खान, हर्षवर्धन पाटील, प्रदेश युवक अध्यक्ष विश्वजित कदम यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. मेळाव्यास महापौर शोभा बोंद्रे, माजी मंत्री मधुकर चव्हाण, डी. पी. सावंत, कल्लाप्पाण्णा आवाडे, हुस्नबानू खलिफे, वीरेंद्र जगताप, रामहरी रूपनवर, सचिन सावंत, चारूलता टोकस, राजन भोसले, बसवराज पाटील, शरद रणपिसे, आनंदराव पाटील, आशिष दुवा, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज साठे, प्रकाश सोनवणे, रामकृष्ण यशवंत हप्पी, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे, सत्यजित तांबे, दिनकरराव जाधव, गणपतराव पाटील, प्रल्हाद चव्हाण तौफिक मुल्लाणी, राजू वाघमारे, प्रकाश सातपुते, प्रतिमा पाटील, संध्या घोटणे, सुप्रिया साळोखे, सुरेखा शहा, गुलाबराव घोरपडे, अमीर शेख गटनेते शारंगधर देशमुख, अशोक जाधव, दिलीप पोवार, अमर पाटील, विद्याधर गुरुबे, पार्थ मुंडे, दीपक थोरात, आदी उपस्थित होते. सचिन चव्हाण यांनी आभार मानले.

००००००

करवीर निवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने जनसंघर्ष यात्रेला सुरुवात झाल्याने परिवर्तन अटळ आहे. कोल्हापूरच्या भूमीत 'आरेला कारे' म्हणण्याची धमक असल्याने यात्रेला येथून सुरुवात झाली आहे. संघर्षाची ठिणगी राज्यभर वणव्यासारखी परसरेल. यात्रेच्या माध्यमातून वीजदरवाढीला विरोध करण्याबरोबरच जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलन उभाण्यात येईल.

सतेज पाटील, आमदार

०००

कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसचा दावा

मेळाव्यात काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर टीका केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी टीका केल्यानंतर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. यापूर्वी येथील लोकसभेची जागा काँग्रेसची होती. मात्र, नंतर ती अन्य पक्षाला दिली. पुन्हा ही जागा घेण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करत कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने दावा करत राजकीय चर्चेला तोंड फोडले.

०००

चित्रफितीतून आश्वासनांची चिरफाड

लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने अनेक आश्वासने दिली. अच्छे दिन, हमीभाव, नोकरभरती या फसलेल्या घोषणांबरोबरच राफेल खरेदी, नोटाबंदी निर्णयाची चिरफाड करणारी चित्रफीत काँग्रेसच्या वतीने केली आहे. सभागृहात या चित्रफितीद्वारे सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीच्या सावकारास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्जवसुलीसाठी खासगी सावकाराने तगादा लावल्याने तेल व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी खासगी सावकार भाऊसाहेब माळी (वय ४५, रा. सांगली) यास शुक्रवारी अटक केली. माळी हा चार दिवसांपूर्वी कोर्टात शरण आला होता. राजारामपुरी पोलिसांनी कोर्टात हजर केले असता, त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

टाकाळा येथील खाद्यतेल व्यापारी उमेश बजाज यांनी २०१७ मध्ये व्यावसायिक कारणासाठी सांगली येथील खासगी सावकार भाऊसाहेब माळी याच्याकडून दरमहा पाच टक्के व्याजाने ३३ लाख रुपये घेतले होते. आर्थिक अडचणीमुळे कर्ज फेडता आले नाही. कर्जवसुलीसाठी सतत तगादा सुरू असल्याने बजाज यांनी ३ ऑगस्टला राहत्या घराच्या टेरेसवर गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल होती. खासगी सावकार माळी हा पोलिसांच्या भीतीने कोर्टात शरण आला होता. त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली होती. राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी कोर्टात अर्ज करून माळी याचा ताबा घेतला. त्याची चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेलमध्ये मोडतोड करून मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर्ववैमनस्यातून हॉटेलमधील कर्मचाऱ्यास चौघांनी बेदम मारहाण केली. संभाजीनगर येथील धनराज इंदिरासागर हॉटेलमध्ये गुरुवारी (ता. ३०) रात्री हा प्रकार घडला. याबाबत जुना राजवाडा पोलिस ठाण्यात शरद मधुकर केंदळेकर (वय २२, रा. कांडगाव, ता. भुदरगड) या कामगाराने फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय रामचंद्र साळोखे (रा. आरके नगर, कोल्हापूर), अमोल भारत भाट (रा. कंदलगाव, ता. करवीर), रोहन बुरड, व संदीप कुरणे (रा. दोघे गोकुळ शिरगाव, ता. करवीर) या चौघांवर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले की, संभाजीनगर परिसरातील धनराज इंदिरासागर हॉटेलमधील कर्मचारी शरद केंदळेकर याचा काही तरुणांशी वाद झाला होता. गुरुवारी रात्री चार तरुण हॉटेलमध्ये आले. त्यांनी केंदळेकर याच्याकडे मद्याची मागणी केली. मद्य देण्यास विलंब होत असल्याचे निमित्त करून त्यांनी केंदळेकर याला काठी आणि लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. वाद सोडवण्यासाठी आलेला कामगार अंकुश घोटणे यालाही मारहाण झाली. यावेळी चौघांनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून सुमारे एक लाखाचे नुकसान केले. यानंतर मारहाण करणारे चौघे निघून गेले. केंदळेकर याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अक्षय साळोखे, अमोल भाट, रोहन बुरड व संदीप कुरणे या चौघांवर गुन्हा दाखल केला. या चौघांचाही शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक मानसिंह खोचे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई

$
0
0

शाहूवाडी : शिंपे (ता. शाहूवाडी) येथे अवैधरीत्या देशी मद्यविक्री करणाऱ्या महादेव दत्तू पाटील (वय ४०) याच्यावर कारवाई केल्याची माहिती शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी दिली. त्याच्याकडे आढळलेला १२४८ रुपये किमतीचा देशी मद्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. यापूर्वी बांबवडे-सरूड दरम्यान वाडीचरण (ता. शाहूवाडी) येथील स्वतःच्या घराशेजारी अवैध देशी मद्यविक्री करणाऱ्या मानसिंग अशोक चौगुले याच्यावर पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत आढळलेला ४६०२ रुपयांचा देशी मद्यसाठाही जप्त केला असल्याची माहितीही रानमाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवेशाच्या नावाखाली कोट्यवधीला गंडा

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : कर्नाटकातील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो, असे सांगून बनावट कंपनी स्थापलेल्या टोळीने अनेकांना कोट्यवधीला गंडा घातला आहे. यात कोल्हापुरातील एका सिनेव्यावसायिकाला तेहतीस लाखाचा दणका बसला आहे. रक्कम मिळताच वाशी येथील कार्यालय बंद करून ही टोळी गायब झाली. पोलिसही फिर्याद घेत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत.

मेडिकलसाठी जून आणि जुलैमध्ये पालकांनी कर्नाटक व महाराष्ट्रातील कॉलेजसाठी ऑनलाइन अर्ज भरले. त्यानंतर मेडीकना हेडवे सोल्युशन प्रा. लि. या कंपनीच्या लोकांनी अशा लोकांशी संपर्क साधला. व्यवस्थापन कोट्यातून हवा तेथे प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले. कोल्हापुरातील एक चित्रपटगृह मालकही त्यांच्या जाळ्यात सापडला. बंगळुरूच्या वैदेही इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमबीबीएसला प्रवेश देऊ, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार ते वाशीतील कार्यालयात गेले. तेथे प्रवेशाची रक्कम निश्चित झाली. कॉलेज बंगळुरूला असल्याने रक्कम तेथेच स्वीकारण्यात येईल, असे सांगण्यात आले.

ठरल्यानुसार हे पालक कॉलेजमध्ये गेले. पण, येथे सरकारी अधिकाऱ्यांचा पहारा असतो, त्यामुळे रक्कम खासगी ठिकाणीच द्या, असे टोळीने सांगितले. त्यानुसार प्रवेश अर्ज घेऊन टोळीतील चौघे हॉटेलमध्ये आले. अर्जही भरून घेऊन कागदपत्रांच्या मूळ प्रती घेतल्या. देणगी आणि फीची रक्कम कशी आणि किती टप्यात द्यायची, याबाबतचा करारही केला. त्यानुसार रोख वीस लाख, चार लाखाचा चेक आणि फी म्हणून सहा लाख ८३ हजाराचा डीडीही घेतला. दोन दिवसांत तुमचे नाव प्रवेश यादीत दिसेल, असे सांगून रक्कम घेऊन टोळीने पोबारा केला.

आठ दिवसानंतरही संबंधित कॉलेजच्या यादीत नाव न आल्याने पालकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी पुढील यादीत नक्की प्रवेश मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र चार दिवसानंतर संबंधितांचे मोबाइल बंद झाले. अनेकदा प्रयत्न करुनही मोबाइल न लागल्याने पालकांनी वाशीतील कार्यालय गाठले. पण कार्यालय बंद होते. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता फसवणूक झालेले बरेच पालक येथे हेलपाटे मारत असल्याचे सांगण्यात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ते वाशी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेले. तेथे केवळ अर्ज घेऊन चौकशीचे आश्वासन मिळाले. आठ दिवसानंतरही चौकशी झाली नाही. या पोलिस ठाण्याकडे यापूर्वीही अनेकांनी तक्रार दिली. पण फिर्याद नोंद झाली नाही. यामुळे पालक हवालदिल झाले आहेत.

..

मार्कलिस्ट पोष्टाने परत

करार करताना त्या टोळीने शाळा सोडल्याचा दाखला, दहावी व बारावी मार्कलिस्टसह बरीच कागदपत्रे घेतली होती. ही सर्व कागदपत्रे पालकांना पोष्टाने पाठवली आहेत. ती शुक्रवारीच मिळाली. या पाकिटावरही बंगळुरूचा पत्ता आहे.

...

असे ओढले जाळ्यात

या टोळीत लेखा, नरेंद्र सिंग, राहुल सिंग, रणजित सिंग असे चौघे आहेत. समोरच्यावर छाप पडेल असे बोलणे, प्रवेशप्रक्रियेतील बारीकसारीक माहिती यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्या जाळ्यात फसते. विशेष म्हणजे प्रवेश न मिळाल्यास पैसे परत मिळतील, असे सांगून त्यांनी एका बँकेचा चेकही दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मधुकर बाचूळकर यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या कारभाराला कंटाळून प्रसिद्ध वनस्पतीतज्ज्ञ प्रा. मधुकर बाचूळकर यांनी महापालिकेच्या तीन समित्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते वृक्ष प्राधिकरण, जैवविविधता मंडळासह पर्यावरण संवर्धन मंडळावर कार्यरत होते. महापालिकेच्या स्वच्छता अभियानाचे ब्रॅड अॅम्बेसिडर पदही त्यांनी सोडून दिले आहे.

शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या अनेक समित्या आहेत. त्यामध्ये लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकाऱ्यांसह काही पर्यावरण तज्ज्ञांचाही समावेश आहे. या समितीवर प्रा. बाचुळकर हे गेले अनेक वर्षे काम करत होते. मात्र त्यांना महापालिकेकडून या काळात अनेक कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. 'तुम्ही फक्त सूचना करायच्या. त्याची अमंलबजावणी करायची की नाही हे आम्ही ठरवणार' असे उत्तर सतत अधिकाऱ्यांकडून मिळत होते. अमृत योजनेतून झालेली वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या सूचनांची न होणारी अमंलबजावणी, वृक्ष प्राधिकरण समितीची न होणारी बैठक, काही बैठकीत होणारी पोकळ चर्चा आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींचा नकारात्मक दृष्टिकोन याला कंटाळून अखेर प्रा. बाचुळकर यांनी समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

आपल्या पर्यावरण क्षेत्रातील ज्ञानाचा महापालिका काहीच उपयोग करून घेत नाही, शिवाय तेथील अधिकारी व लोकप्रतिनिधींची ध्येयधोरणे, कार्यपध्दती न पटणारी आहेत. यामुळे या कारभाराला कंटाळून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

- प्रा. मधुकर बाचुळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images