Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोस्ट देणार घरबसल्या बँकीग सुविधा

$
0
0

लोगो

..........

जिल्ह्यात पाच ठिकाणी आयपीपीबीची स्थापना, एक तारखेला उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सर्व प्रकारच्या बँकीग सुविधा लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी पोस्ट खात्याने 'इंडिया पोस्ट पेमेंटस बँक'ची (आयपीपीबी) स्थापना केली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात पाच ठिकाणी पोस्ट बँकेची सुविधा उपलब्ध असणार आहे. 'आयपीपीबी'व्दारे लोकांना घरबसल्या बँकीग सुविधा मिळणार आहेत.

लोकांच्या सोयीसाठी पोस्टमन घरी जाऊन बँक खाती उघडण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. बँक खाते चालू करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक व मोबाइल नंबर आवश्यक आहे. पोस्ट खात्याने त्वरित व पेपरलेस प्रक्रियेचा अवलंब केला आहे. ग्राहकांना, ठेवीवर चार टक्के व्याजदर मिळणार आहे. पोस्ट बँकेव्दारे लोकांना विम्याचे हप्ते, मोबाइल बिल, वीज, पाणी बिल भरण्याची सुविधा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या पुढाकारातून 'आयपीपीबी'ची स्थापना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी १ सप्टेंबर रोजी पोस्ट पेमेंटस बँक अंतर्गत ६५० शाखा व ३२५० सेवा केंद्राचे लोकार्पण होणार आहे.

कोल्हापूर डाक विभागातील पहिल्या टप्प्यामध्ये पाच ठिकाणी ही सुविधा असणार आहे. कसबा बावडा रोडवरील कोल्हापूर प्रधान डाक घर येथे मुख्य शाखा असणार आहे. मार्केट यार्ड उप डाकघर, शुक्रवार पेठ उप डाकघर, उचगाव शाखा डाकघर, हेर्ले शाखा डाकघर येथे सेवा केंद्र असणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदर अमल महाडिक, आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आयपीपीबी बचत खाते, चालू खाते,पैशाचे हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण अशा विविध सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. या सुविधा पोस्ट ऑफीस, मायक्रो एटीएम पोस्टमनजवळील मोबाइलव्दारे, बँकीग अॅप, एसएमएसव्दारे मिळणार आहेत. पोस्ट खात्याने यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. कोल्हापुरात ९६ पोस्ट ऑफीसेस तर ४६७ शाखा डाकघर आहेत. सामान्य नागरिकांसाठी सर्वात जवळची स्वस्त आणि विश्वसनीय बँक तयार करणे हा प्रमुख उद्देश असल्याचे विभागाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृद्धेचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवार पेठेतील वृद्धेने आजारास कंटाळून स्वत:च्या पोटात चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोटातील चाकूसहीत गंभीर जखमी अवस्थेतील वृद्धेला नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. जुबेदा इब्राहीम पठाण (वय ६२) असे जखमी वृद्धेचे नाव आहे. हा प्रकार बुधवारी (ता. २९) दुपारी घडला.

याबाबत अधिक माहिती अशी, जुबेदा पठाण या सोमवार पेठेतील घरात मुलगा इरफान, सून आसमा आणि दोन नातू यांच्यासह राहतात. मुलगा खासगी नोकरी करतो, त्यांची सून आसमा यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्या माहेरी गेल्या आहेत. सोमवार पेठेतच माहेर असल्याने त्या वरचेवर सासरी येऊन घरातील काम आणि सासू जुबेदा यांच्या औषधोपचाराची काळजी घेतात. बुधवारी सकाळी इरफान कामावर गेले होते. दुपारी जेवण्यासाठी घरी आल्यानंतर त्यांनी आईस हाक मारली, मात्र आईचा आवाज आला नाही. हाक मारुनही आई उठत नसल्याने मुलाने आईच्या अंगावरील पांघरून बाजूला केले असता, आई गंभीर जखमी असल्याचे लक्षात आले. पोटात चाकूची मूठही दिसत होती. इरफानने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलवून घेतले. जुबेदा यांना बेशुद्धावस्थेत तातडीने रिक्षातून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआरमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून जुबेदा यांच्या पोटातील चाकू बाहेर काढला. आजारपणामुळे जुबेदा यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यांनी स्वत:च चाकूने भोसकून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा जबाब मुलगा इरफान यांनी सीपीआर पोलिस चौकीत दिला आहे. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४४ हजार शेतकऱ्यांना लाभ शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाच लाखांपर्यंत थकीत असणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांनाही पुन्हा कर्ज पुरवठा करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्याचा लाभ जिल्ह्यातील ४४ हजार ४६० शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या जुन्या कर्जमाफीतून जिल्हा बँकेने ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांना ११२ कोटीचे कर्ज दिले होते. नाबार्डने ते अपात्र ठरविले. जिल्हा बँकेने याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर हायकोर्टाने नाबार्डचा तो निर्णय रद्द केला. त्यानंतर नाबार्डने या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यावर २ मे २०१८ रोजी सुनावणीत झाली. अपात्र कर्जमाफीप्रकरणातील शेतकऱ्यांना १ लाखांपर्यंत कर्ज देण्याचा आदेश कोर्टाने दिला. मंगळवारी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली. कोर्टाने कर्जमाफीत अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना ५ लाखांपर्यंत कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत.

----------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय पाटील यांच्यासह २३ जणांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

येथील एस. के. पाटील को-ऑप. बँकेतील सन २००१ ते ३१ मार्च २००७ या कालावधीतील १७ कोटी ३१ लाख ८ हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी बँकेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह २३ जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने संचालक व नगराध्यक्ष जयराम पाटील, भाजपचे रामचंद्र डांगे, तज्ज्ञ संचालक प्रतापसिंग देसाई, गोपाळ शिपूरकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज मांजरेकर यांचा समावेश आहे. याबाबतची फिर्याद सनदी लेखापाल उमेश वामन गोगटे (वय ४१, रा. अनुदत्त हाउसिंग सोसायटी, रामबाग कॉलनी, कोथरूड, पुणे) यांनी दिली आहे.

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : कुरुंदवाड येथे एस. के. पाटील बँकेचे मुख्य कार्यालय आहे. बँकेच्या कुरुंदवाड व कोल्हापूर येथे दोन शाखा कार्यान्वित होत्या. ही बँक सध्या अवसायनात आहे. अध्यक्ष संजय पाटील, संचालक व विद्यमान नगराध्यक्ष जयराम पाटील, भाजपचे रामचंद्र डांगे, तज्ज्ञ संचालक प्रतापसिंग देसाई, गोपाळ शिपूरकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज मांजरेकर, संचालक मारुती तिटवे, रघुनाथ पाटील, रामचंद्र मोहिते, रामदास जगताप, बाबूराव पाटील, रघुनाथ नाना पाटील, श्रीमती विजया यशवंत पाटील, सर्जेराव पाटील, बाबासाहेब कांबळे, बंडोपंत नाईकवडी, शकुंतला एस. पाटील, लता डी.पाटील, शामराव पाटील, चंद्रकांत पाटील, पांडुरंग पाटील, अण्णासाहेब पाटील, सुरेश पाटील या सर्वांनी नियमबाह्यरीत्या अपात्र संस्था व व्यक्तींना कर्ज देऊन स्वत:चा व इतरांच्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केला. बँकेचा तोटा कमी दाखवून तसेच राष्ट्रीयीकृत व इतर बँकेच्या तारणावर प्रथम बोजा असताना त्यावर दुय्यम बोजा चढवून फसवणूक केल्याचे एकूण १७ कोटी ३१ लाख ८ हजारांचा अपहार केल्याचे सनदी लेखापाल गोगटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कुरुंदवाड पोलिसांनी बँकेच्या अध्यक्षांसह सर्व संचालकांवर भारतीय दंड विधान कलम ४०९, ४२०, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. तपास सहायक पोलिस निरीक्षक कुमार कदम करीत आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमळ चिन्हावरून सत्तारुढ-विरोधकांत खडाजंगी

$
0
0

लोगो : इचलकरंजी नगरपालिका सभा

फोटो (छाया - ओमप्रकाश)

म. टा. वृत्तसेवा,इचलकरंजी

शहरातील भागाभागांत खासगी इमारतींवर भाजपचे कमळ चिन्ह रंगवून पक्षाची जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई संदर्भातील विषयावर सत्तारुढ आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. शहर डिजिटलमुक्त करण्याचा ठराव झाला असतानाही अशाप्रकारची जाहिरातबाजी रोखण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी केली. मात्र, नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी खासगी इमारतींवर रंगरंगोटी अथवा डिझाइन काढण्यास परवानगीची गरज नसल्याचे सांगितल्याने काही काळ गोंधळ उडाला. या गोंधळातच सत्तारुढ सदस्यांनी हा विषय गुंडाळला. त्यामुळे भविष्यात शहरात पुन्हा डिजिटल वॉर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विविध २८ आणि ऐनवेळच्या दोन विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगरपालिकेच्या सभागृहात बुधवारी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. प्रारंभी राजर्षी शाहू विकास आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शहरातील स्ट्रीट लाइट बंद असल्याबाबत लक्षवेधी मांडली. या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही कार्यवाही का केली जात नाही असा सवाल केला. तर काँग्रेसचे नगरसेवक राजू बोंद्रे यांनी ज्या मक्तेदाराला वार्षिक कामाचे टेंडर दिले आहे. त्याच्याकडून तीन महिन्यांचे बिल वजा करावे अशी मागणी करत मक्तेदाराला पाठीशी का घातले जात आहे अशी विचारणा केली. अखेरीस नगराध्यक्षा स्वामी यांनी एक सप्टेंबरपासून स्ट्रीट लाइट दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिले. सांगली रोडवरील हॉटेल राज कॅसलच्या पिछाडीस असलेल्या भूखंडाच्या सातबारा उताऱ्यावरील प्रकाश आवाडे क्रीडा अकादमीचे नाव कमी करून नगरपालिकेचे नाव लावण्याचा विषय एकमताने नामंजूर करण्यात आला.

कचरा गोळा करणाऱ्याा बीव्हीजी कंपनीला सहा महिने मुदतवाढ देण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली. नगरसेविका शुभांगी माळी यांनी चांगले कामाचा दाखला दिला म्हणून या कंपनीला स्वच्छतेचे काम देण्यात आले. पण इचलकरंजी स्वच्छ व सुंदर झाली का? असा सवाल उपस्थित करुन आपल्या प्रभागात दैनंदिन घंटागाडी येत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत असल्याची तक्रार केली. त्यावर बुलडोझर, जेसीबी, पोकलँड या कामासाठी मुदतवाढ दिली नसल्याने कचरा डेपोवर कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने शहरात कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्याचे नगरसेवक सागर चाळके यांनी सांगितले. त्यावर विठ्ठल चोपडे यांनी आक्षेप घेत बीव्हीजीला मुदतवाढ देण्यास विरोध दर्शविला. कचरा गोळा करण्याच्या कामासाठी पालिकेकडे पुरेशी वाहने चार महिन्यांत प्राप्त होणार असल्याने प्रशासनानेच बीव्हीजीला मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव दिल्याचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले. त्यावर सर्वानुमते सहा महिन्यांच्या मुदतवाढीला मंजुरी दर्शविण्यात आली.

नगररचना विभागाकडील भूसंपादन हेडवरील एक कोटी रुपये महिला व बालकल्याण समितीकडे वर्ग करण्याचा विषयाला विरोधी सदस्यांनी विरोध दर्शविला. अखेर हा विषय मतदानाला टाकून तो २५ विरुद्ध १९ मतांनी मंजूर केला. यावेळी झालेल्या चर्चेत अशोक जांभळे, अजित जाधव, राहुल खंजिरे, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, तानाजी पोवार, सुनिल पाटील, तेजश्री भोसले, दीपाली बेडक्याळे, आदींनी भाग घेतला.

०००

अतिक्रमण व हॉकर्स झोनवर जोरदार चर्चा

शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या विषयावर विरोधी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेविका ध्रुवती दळवाई यांनी जुन्या हॉकर्स झोनची अंमलबजावणी होत नसताना नवे हॉकर्स झोन कशासाठी असा सवाल केला. आधीच्या झोनची व्यवस्था नसताना आणि अतिक्रमण निर्मुलन यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रथम जुन्या झोनची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली, तर राहुल खंजिरे यांनी ज्या झोन संदर्भात हरकती व सूचना आल्या त्यावर प्रशासनाने काय कार्यवाही केली त्याची सभागृहाला माहिती देण्याची मागणी करत प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप केला. तर सत्तारुढ गटाने हा विषय महत्त्वाचा असल्याचे सांगत मंजुरी देण्यावर अधिक भर दिला. मात्र चर्चेअंती शहरातील ११ हॉकर्स झोन कायम ठेवण्यासह नवीन ९ हॉकर्स झोन निश्चित करण्याचा विषय पुढील सभेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

ध्वनिक्षेपक यंत्रणा कुचकामी

नगरपालिकेच्या सभागृहातील ध्वनिक्षेपक यंत्रणेत दोष असल्याने कोण काय बोलते हे नीटपणे ऐकू येत नसल्याबद्दल चोपडे यांनी प्रश्न उपस्थित केला. सदोष यंत्रणेमुळे सभागृहात सदस्यांना मत मांडताना अडचणीत येत असल्याने ही यंत्रणा अत्याधुनिक स्वरूपाची करावी अशी मागणी केली. अखेर आवश्यक त्या स्वरूपाचा खर्च करून यंत्रणा सक्षम करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.

जलपर्णी हटविण्याची मागणी

शहापूर येथील खणीत जलपर्णीने विळखा घातला आहे. गेल्या महिन्याभरापासून जलपर्णी हटवण्यासंदर्भात पाठपुरवठा करत असल्याचे नगरसेवक किसन शिंदे यांनी सांगितले. यावर्षी या खणीमध्ये श्रींचे विसर्जन करायचे की नाही असा सवाल उपस्थित करत अनंत चतुर्दशीपूर्वी जलपर्णी हटविण्याची गरज व्यक्त केली. त्यावर मुख्याधिकारी पाटील यांनी जलपर्णी हटवण्यासाठी कोणत्याही बजेटची तरतूद नसल्याचा मुद्दा उपस्थित करून आरोग्य विभागाचा काही निधी याकडे वर्ग करून जलपर्णी हटवण्यात येईल अशी ग्वाही दिली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लिंगायत’आंदोलनाला सोळा गावांचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी लिंगायत समाज संघर्ष समितीतर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला बुधवारी सोळा गावांतील विविध समाज, संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला. आजऱ्याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अण्णा-भाऊ उद्योग समूहाचे अशोक चराटी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा महासंघ आजरा तालुका, वारणा सहकारी पाणी पुरवठा अंबप, वीरशैव उत्कर्ष मंडळ इचलकरंजीच्या प्रतिनिधींनी आंदोलनात सहभाग घेतला.

याप्रसंगी बोलताना विविध वक्त्यांनी सरकारने समाजाच्या प्रश्नांची दखल घ्यावी, वेळकाढूपणा केल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढेल असा इशारा दिला.

लिंगायत समाज संघर्ष समितीने १६ ऑगस्टपासून दसरा चौक परिसरात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला जिल्ह्याच्या विविध भागातून वाढता पाठिंबा मिळत आहे. बुधवारी इचलकरंजी, उजळाईवाडी, कडगले, वडगाव, तामगाव, शिरोली पुलाची, अंबप, हातकणंगले, शिरढोण, मौजे सांगाव, राशिवडे बुद्रुक, माणगाव येथील नागरिक आंदोलनात सहभागी झाले. आजऱ्याच्या नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अण्णा-भाऊ उद्योग समूहाचे अशोक चराटी, आजरा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आनंदराव कुलकर्णी, आजरा बँकेचे चेअरमन विलास नाईक, लिंगायत समाजाचे डॉ. जयकुमार डांग, आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन समाजाच्या मागण्यांना पाठिंबा दिला. लिंगायत समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे. लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म मान्यता मिळावी, अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या मागण्या रास्त आहेत. सरकारने या मागण्यांची दखल घ्यावी.

इचलकरंजी, हातकणंगलेतील प्रतिनिधींचा सहभाग

इचलकरंजी येथील वीरशैव उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गजानन सुलतानपुरे, प्रकाश दत्तवाडे, सुशांत मुरदंडे, बाबासाहेब पिरगोंडा पाटील, नगरसेवक संजय तेलनाडे, राशिवडेचे दिग्विजय आजमाने आंदोलनात सहभागी झाले. हातकणंगले येथील अशोक अण्णासाहेब पाटील, अंबप येथील डॉ. बी. के. पाटील, डॉ. विश्वनाथ तोडकर,भारत सातगोंडा पाटील यांचाही समावेश राहिला. मार्केट कमिटीचे कृष्णात पाटील, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह युवराज पाटील, पांडुरंग पाटील, शामराव पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उशिरा आल्याने महापौरांची आरती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगरपालिके सर्वसाधारण सभा वेळेत सुरू न केल्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी महापौर शोभा बनशेट्टी यांना आरती ओवाळून सभा सुरू करायला लावली. या वेळी महिला सदस्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी सायंकाळी चार वाजता बोलावण्यात आली होती. परंतु, साडेपाच वाजले तरी सभा सुरू झाली नाही. त्यामुळे, काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल, श्रीदेवी फुलारे, परवीन इनामदार संतापल्या. 'नगरसचिव, सभा सुरू करा,' 'एलईडीच्या वाटाघाडी संपल्या की नाही?,' अशा घोषणा दिल्या. शेवटी महिला सदस्यांनी महापौर कक्षाबाहेर जाऊन घोषणाबाजी सुरू केली. 'संकष्टी आहे, सभा लवकर सुरू करा' म्हणून आरती सुरू केली. संतापलेल्या महिला आरती घेऊन सभागृहात आल्या व महापौर कक्षासमोर ठिय्या मारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्ज वसुलीच्या तगाद्यानेतरुणाची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी भिशीतून घेतलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्यामुळे कर्जदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. बहिरेश्वर (ता. करवीर) या गावात गुरुवारी पहाटे ही घटना घडली. तानाजी सदाशिव सातपुते (वय ३५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी भिशीचालक सचिन बाळकृष्ण मोरे (३५, रा. बहिरेश्वर) याला करवीर पोलिसांनी अटक केली.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिरेश्वर येथील तानाजी सातपुते याने खासगी भिशीचालक सचिन मोरे याच्याकडून कर्ज घेतले होते. आर्थिक अडचणींमुळे त्याला कर्जाची परतफेड करता आली नाही. मोरे याने तानाजीकडे कर्जफेडीसाठी तगादा लावला. पैसे न मिळाल्यास पोलिसांत तक्रार देण्याची भीतीही दाखवली. या तगाद्याला कंटाळून गुरुवारी पहाटे तानाजीने राहत्या घरात लाकडी वाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी नातेवाईकांच्या लक्षात आला. त्याने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सचिन मोरे याच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचा उल्लेख केला आहे. करवीर पोलिसांनी मोरे याच्यावर कलम ३०६, ५०४, ५०६ यासह अनुसचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांजा विक्री कनेक्शनचा शोध सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अमली पदार्थांपैकी सहज उपललब्ध होणाऱ्या गांजाची रोजची उलाढाल लाखोंच्या घरात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी (ता. २९) राजाराम तलाव येथे पकडलेल्या ३१ किलो गांजामुळे शहरातील गांजा विक्रीची वस्तुस्थिती समोर आली. गांजाची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी विक्रेत्यांचे रॅकेट मुळापासून उखडून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विक्रेत्यांच्या कर्नाटक कनेक्शनचा शोध सुरू असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सप्ष्ट केले.

शहरात गांजाची राजरोस विक्री सुरू असल्याची वस्तिस्थिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने चार महिन्यांपूर्वीच मांडली होती. यानंतर राजारामपुरी पोलिसांनी दोन ठिकाणी गांजा पकडला, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा पकडला होता. पंधरा दिवसांपूर्वीच शेंडा पार्क येथील कारवाईत दोन डॉक्टरांकडून पोलिसांना चरसही मिळाले होते. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी गांजा विक्रीच्या मुळाशी जाण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. यानुसार पोलिसांनी शहरातील गांजा विक्रेत्यांवर लक्ष केंद्रीत केले होते. कर्नाटकसह सांगली जिल्ह्यातील दोघांकडून तब्बल ३१ किलो गांजा खरेदी करताना पोलिसांनी यादवनगर येथील एक संशयितास अटक केली. या कारवाईमुळे रोज लाखो रुपयांचा गांजा कोल्हापुरात येत असल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील आठ ते दहा होलसेल विक्रेते रोज आसपासच्या जिल्ह्यांमधून गांजा मागवतात. ते प्रत्येकी पंधरा ते वीस जणांना गांजाची विक्री करतात. हा गांजा पुन्हा पुढील विक्रेत्यांकडे पोहोचतो. हे रॅकेट शहरात खोलवर पसरले आहे. किरकोळ विक्रेत्यांना पकडण्यापेक्षा मोठे विक्रेते आणि वितरकांना पोलिसांनी लक्ष्य केले आहे. यात काही संशयित कर्नाटकातील आहेत, तर काही संशयित सांगली जिल्ह्यातील आहेत. 'विक्रेते आणि वितरकांमार्फत गांजाचे उत्पादन करणाऱ्यांपर्यंतही पोहोचण्याचा निर्धार पोलिसांनी केला आहे,' अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकार महिलेविरोधात डॉक्टरची तक्रार

$
0
0

खासगी सावकार महिले

विरोधात डॉक्टरची तक्रार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलीच्या लग्नासाठी एका खासगी सावकार महिलेकडून हातउसने घेतलेल्या २२ लाख रुपयांपोटी ५६ लाखांची परतफेड करूनही महिलेकडून आणखी पैशांसाठी तगादा सुरू असल्याचा तक्रार अर्ज एका डॉक्टरांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. ३०) दिला. तक्रारदार डॉक्टर भूलतज्ज्ञ आहेत. २०१६ मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न होते. यासाठी ऐनवेळी पैशांची गरज पडल्याने त्यांनी नातेवाईकांमार्फत एका खासगी सावकार महिलेकडून व्याजाने २२ लाख रुपये घेतले. मुद्दल आणि व्याज असे ५६ लाख रुपये परत केल्याचा दावा त्यांनी केला आहे. यानंतरही खासगी सावकार महिलेकडून आणखी रकमेची मागणी केली जात आहे. पैशांसाठी वारंवार फोन करून धमकावले जाते. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज डॉक्टरांनी गुरुवारी संध्याकाळी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिला. याबाबत निरीक्षक मानसिंह खोचे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, 'एक तक्रार अर्ज पोलिस ठाण्यात आला आहे. हा प्रकार खंडणीचा आहे, की खासगी सावकारीचा याबाबत चौकशी सुरू आहे. चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकार वर्षभर झोपले होते का?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले. मात्र, ठोक मोर्चा काढल्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार असे सांगणारे राज्य सरकार गेले वर्षभर झोपले होते का? असा सवाल करत आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यात राज्य सरकारची भूमिका प्रामाणिक दिसत नसल्याने मुंबईतील 'गाडी मार्च' आंदोलनातून सरकारचे नाक कापण्यासाठी सज्ज रहावे,' असे आवाहन आमदार क्षीरसागर यांनी केले. संयुक्त जुना बुधवार पेठेच्यावतीने कोल्हापुरातून मुंबईला काढण्यात येणाऱ्या 'गाडी मार्च'च्या आयोजनासाठी सोमवारी बैठक झाली. यावेळी, समाजाने आदेश दिल्यास आमदार पदाचा राजीनामा देऊ असे क्षीरसागर यांनी सांगितले.

'राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनात फूट पाडली जात आहे,' असा आरोप आमदार क्षीरसागर यांनी केला. क्षीरसागर म्हणाले, 'समाजाने शांततेत मोर्चे काढल्यावर त्याचे खूप कौतुक झाले. पण आरक्षणाचा निर्णय झाला नाही. ठोक आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारला जाग आली. नोव्हेंबर महिन्यापर्यंत आरक्षण देण्याबाबत आश्वासन दिले असले तरी सरकारच्या हेतूविषयी शंका वाटते. त्यामुळे समाज जो निर्णय देईल, त्यासाठी राजकारण सोडण्याची तयारी आहे. कोल्हापुरातील आमदारांनी समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असताना अन्य जिल्ह्यांतील आमदार झोपलेत का?' कोल्हापूर जिल्ह्यातील समाजाच्या आंदोलनात प्रामाणिकपणा असल्याने आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. फूट पाडण्याचा प्रयत्न होऊनही आंदोलकांनी एकी दाखवली आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांना आंदोलकांची भावना समजावून सांगितल्यावर त्यांनी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर अधिवेशन घेतले जाईल, असे स्पष्ट केले आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आली असून आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सरकारच्या हेतूविषयी शंका वाटते. मुंबईतील वाहन मोर्चाने वाहतूक कोंडी करून सरकारला धडा शिकवू.'

यावेळी माजी महापौर महादेवराव आडगुळे, बाळ घाटगे, दिलीप देसाई, सुशिल भांदिगिरे यांनी भाषणातून गाडीमार्चला पाठिंबा दिला. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, धनंजय सावंत, अनिल पाटील, हेमंत साळोखे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळ विक्रेत्यांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा

$
0
0

फळ विक्रेत्यांचा पाठिंबा

कोल्हापूर : शिवाजी चौकात सुरु असलेल्या सकल मराठा समाजाच्या शौर्य पीठास शहर फळ विक्रेत्यांनी पाठिंबा दिला. फळ विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हातगाड्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. उत्तम जाधव, मारुती शिंदे, युनुस वडगावकर, मनोहर बिंदगे, मुश्ताक चाबूकस्वार आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केनवडेत भरदिवसा पाच लाखांचा दरोडा

$
0
0

फोटो...

म. टा. वृत्तसेवा, कागल

केनवडे (ता. कागल) येथील बापू राऊ लोखंडे यांच्या बंद असलेल्या घरात भरदिवसा दरोडा घालून १५ तोळे सोन्याचे व १० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने तसेच रोख आठ हजार रुपये असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेने केनवडेसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची नोंद कागल पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : बापू लोखंडे गुरुवारी पत्नीसह खेबवडे (ता. करवीर) येथे पाहुण्यांकडे गेले होते. त्यामुळे घरी कोणीच नव्हते. ही संधी साधून चोरट्यांनी पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. दरम्यान, चोरट्यांनी बेडरूममध्ये असलेली तिजोरी फोडून तिजोरीतील कपडे बाहेर फेकून तब्बल १५ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील इतर खोलीतील संगणक, लॅपटॉप या मौल्यवान वस्तूंना हातही लावला नाही. भरदिवसा गावाच्या मध्यवस्तीत असणाऱ्या घरात चोरट्यांनी दरोडा घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची नोंद कागल पोलिसांत झाली असून, पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल संतोष डगळे आणि प्रवीण कांबळे करीत आहेत.

००००

भुरट्या चोरट्यांची शक्यता

लोखंडे यांच्या घरात जेव्हा चोरट्यांनी दरोडा घातला, तेव्हा वेळ दुपारची होती. विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील इतर कोणत्याही खोलीत प्रवेश केला नाही. ज्या खोलीतील तिजोरीत मौल्यवान वस्तू होत्या, त्या खोलीत जाऊन तिजोरीवर लपवून ठेवलेली चावी शोधून दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. यावरून या चोरट्यांचा वावर घरात असावा आणि हे स्थानिक भुरटे चोरटे असावेत अशी चर्चा उपस्थित नागरिकांत सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रभागेतील पुंडलिक मंदिर पाण्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर धरणातून भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गाने नदी दुथडी भरून वाहत असून, यात पुंडलिक मंदिर पाण्यात गेले आहे. प्रशासनाकडून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाद्वार घाट पायरीवर आलेले पाणी कमी झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुंडलिक मंदिराजवळ स्नानासाठी गेलेला तरुण पाण्यात वाहून गेल्याने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उजनी धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातून प्रथम ५ हजार क्युसेकचा व त्यानंतर १० हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला होता. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पुन्हा भीमा नदीच्या विसर्गात वाढ करून विसर्ग १५ हजार क्युसेक करण्यात आल्याने भीमा नदीला पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. मंगळवारी पहाटे हा विसर्ग पंढरपूर येथे दाखल झाल्याने पुंडलिक मंदिर पाण्यात गेले आहे. तर, महाद्वार घाटाच्या पायरीला पाणी आले होते. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, विसर्ग कमी करण्यात आल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी येथे स्नान करण्यासाठी आलेल्या राहुल काथार (जळगाव) या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने पुंडलिक मंदिर येथे स्नान करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांना पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे. महिला भाविकांना खोल पाण्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येथील लोखंडी कठडयांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे भाविकांच्या जीवास धोका असल्याने येथे शहर पोलिस स्टेशनच्यावतीने दोन पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन वृत्त : लक्ष्मण खामकर

$
0
0

फोटो..

लक्ष्मण खामकर

राधानगरी : धामोड (ता. राधानगरी) येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील शेतकरी लक्ष्मण नाना खामकर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सह्याद्री शिक्षण संस्थेचे चेअरमन हिंदुराव नाना खामकर यांचे ते बंधू तसेच राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती जयसिंग खामकर यांचे चुलते होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तणावपूर्ण वातावरणात रक्षाविसर्जन

$
0
0

म. टा.वृत्तसेवा, कराड

कराड तालुक्यातील येणपे येथे बलात्कार करून खून झालेल्या सविता गणेश पाटील या महिलेच्या रक्षाविसर्जनासाठी जमलेल्या ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभा आयोजित करून दोषींना कायदेशीर मार्गाने कठोर शिक्षा व्हावी, असा ठराव केला. दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने आरोपींच्या घरावर दगडफेक करत तोडफोड केली. या वेळी दोघांना लोखंडी गजाने मारहाण झाली आहे. तसेच, काही वाहनांची तोडफोड करण्यात आली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तणाव निवळला.

सविता पाटील या जनावरे चारण्यासाठी वाघजाईच्या समोरील खडी नावाच्या शिवारात गेल्या असता, त्यांचा बलात्कार करून खून करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलिस यंत्रणेने तपास करत १२ तासांत करण शंकर कोळी यासह एका अल्पवयीन मुलास अटक केली. गुरुवारी सविता यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असल्याने गावातील महिला, तरुण, तरुणी, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात जमल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. महिला व ग्रामस्थातून विशेष ग्रामसभा बोलावून संबंधित आरोपीना कठोर शिक्षा देण्याबरोबर येणपे गावातील गावरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत एकमुखी ठराव घेण्यात आला. या वेळी जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, उपअधिक्षक नवनाथ ढवळे, अशोक क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील, प्रांताधिकारी हिम्मत खराडे, पै. तानाजी चवरे, सुभाष शेवाळे, येणपेचे सरपंच दादासाहेब जगताप यांनी जमावाला शांत करत शांततेचे आवाहन केले. त्याचबरोबर जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख यांनी संबंधित आरोपीला कठोर शिक्षा होण्याचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण रक्षाविसर्जन कार्यक्रम पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरट्यांची आंतरराज्य टोळी अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफोड्या व दुचाकी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी (ता. ३०) सकाळी गुजरी परिसरात जेरबंद केले. या टोळीकडून पोलिसांनी चोरीतील २७ तोळे सोन्याचे दागिने आणि चार दुचाकी असा ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. इचलकरंजी परिसरात केलेले ९ गुन्हे उघडकीस आले आहे. या टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

टोळीचा म्होरक्या रियाज इमाम कुचनूर (वय ३८, रा. शहापूर, इचलकरंजी), याच्यासह महेश उर्फ सलीम अल्लाउद्दीन नायकवडी (२३, कलानगर कॉर्नर, इचलकरंजी), सुलतान उर्फ इल्या ताजुद्दीन झांजे (२७, रा. गोठणपूर गल्ली, कुरुंदवाड), शिवम उर्फ पिल्या शिवाजी किर्दक (२०, किर्लोस्करवाडी, ता. पलूस, जि. सांगली), युनुस दस्तगिर मुल्ला (३२, रा. कबनूर, ता. हातकणंगले) आणि इकबाल सुबान पठाण (२८, रा. बेळगाव) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. या टोळीतील अमोल (पूर्ण नाव समजले नाही) हा अद्याप फरारी आहे.

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक कार्यरत आहे. पथकाचे प्रमुख, सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांना इचलकरंजीतील एका संशयिताची माहिती मिळाली होती. संशयित रियाज कुचनूर हा गुरुवारी सकाळी गुजरीत चोरीतील सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा लावला. संशयिताची ओळख पटताच त्याला ताब्यात घेतले. गुजरीत त्याच्या अंगझडतीत पोलिसांना सोन्याच्या पाटल्या मिळाल्या. चौकशीदरम्यान त्याने २०१७मध्ये इचलकरंजीतील परिख कॉलनीत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी कुचनूर याचे साथीदार सलीम नायकवडी, सुलतान झांजे, शिवम किर्दक, युनुस मुल्ला आणि इकबाल पठाण यांनाही अटक केली असून, या टोळीतील सहावा संशयित अमोल पसार आहे.

कुचनूर टोळीने गेल्या दोन वर्षात शिवाजीनगर, गावभाग, इचलकरंजीत पाच घरफोड्या केल्या आहेत, तर शाहूपुरी आणि इचलकरंजी परिसरातून चार दुचाकींची चोरी केली. बंद घरांचा कडी-कोयंडा उचकटून ते आतील किंमती ऐवज आणि रोख रक्कम लंपास करीत होते. गेल्या दोन वर्षात त्यांनी अनेक चोऱ्या केल्या, मात्र पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत. टोळीवर अन्य जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. कर्नाटकाच्या सीमाभागासह सांगली, सोलापूर, सातारा पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक निरीक्षक संतोष पवार, उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, सचिन पंडित यांच्यासह विजय कारंडे, श्रीकांत पाटील, विजय गुरखे, राजेंद्र हांडे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टोळीचे आंतरराज्यीय कनेक्शन

टोळीतील इकबाल पठाण हा संशयित बेळगावचा आहे, तर सुलतान झांजे हा सांगली जिल्ह्यातील आहे. चोरीतील मुद्देमाल विकण्यासाठी ते कर्नाटकमध्ये जात होते. कोल्हापुरातून चोरलेल्या दुचाकी त्यांनी परजिल्ह्यात विकल्या, तर इचलकरंजीतून चोरलेल्या दुचाकींची विक्री सीमाभागात केली. त्यांचे आणखी काही टोळ्यांशी कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. या टोळीकडून चेन स्नॅचिंगचेही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अधीक्षक डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बहिरेश्वरमध्ये तरुणाची आत्महत्या

$
0
0

सिंगल फोटो..

म. टा. वृत्तसेवा , कुडित्रे

बहिरेश्वर (ता. करवीर) येथील तानाजी सदाशिव सातपुते (वय ३७) यांनी राहत्या घरी गाळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. सातपुते चर्मकार व्यवसायाबरोबरच गावातील एका दूध संस्थेत लिपिक म्हणून काम पाहत होते. यापूर्वी त्यांनी भिशी सुरू केली होती, पण नंतर भिशी काही कारणांनी बंद पडली. त्यामुळे त्यावेळी भिशीत पैसे भरलेल्या लोकांकडून पैसे परत करण्याचा तगादा सुरू झाला. पैसे परत करू शकत नसल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे सातपुते यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्टीत म्हटले आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, मुलगी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरटा सापडल्यानंतर गुन्ह्याची नोंद

$
0
0

चोरटा सापडल्यानंतर गुन्ह्याची नोंद

पोलिसांचा अजब कारभार, चोरीच्या रकमेतही गोलमाल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फिर्याद नोंद करून घेण्यास पोलिस टाळाटाळ करतात याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. रंकाळा खणीजवळ मोपेडच्या डिकीतून अज्ञात चोरट्याने रक्कम लंपास केल्याची फिर्याद देण्यासाठी गेलेल्या तक्रारदाराला जुना राजवाडा पोलिसांनी बाहेरूनच पिटाळले. मात्र तो चोरटा राजारामपुरी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर या चोरीचा उलगडा झाला. त्यानंतर नाइलाजाने जुना राजवाडा पोलिसांनी फिर्याद नोंद केली. विशेष म्हणजे चोरीला गेलेल्या रकमेतही गोलमाल झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

देवकर पाणंद येथील इंद्रजित दत्तात्रय पसारे (वय ६२) हे विमा एजंट आहेत. त्यांनी दीड लाखांची रक्कम मोपेडच्या डिकीत ठेवली होती. शनिवारी (ता. २५) ते रंकाळा खण येथे पोहण्यासाठी गेले होते. संध्याकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने पसारे यांच्या डिकीचे लॉक तोडून रक्कम लंपास केली. मोपेडजवळ येताच पसारे यांना डिकी उचकटल्याचे दिसले. त्यांनी पैशांचा शोध घेतला. मात्र पैसे मिळाले नाहीत. चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. फिर्याद देण्यासाठी ते ठाणे अंमलदाराकडे गेले. मात्र, पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेण्याऐवजी त्यांचीच उलटतपासणी केली. 'आधी तुम्ही घरात पैसे शोधा, कुठे गहाळ झालेत का बघा' असे फुकटचे सल्ले देऊन त्यांना बाहेर कटवले. पसारेंकडून तक्रार देण्याचा फारच आग्रह झाल्याने अखेर एक कच्चा अर्ज घेतला. त्यानंतर पैसे असल्याचा पुरावा म्हणून बँकेचे स्टेटमेंट घेऊन या असे त्यांना सांगण्यात आले.

दरम्यान, राजारामपुरी पोलिसांनी इचलकरंजी येथील धीरज मिरासाहेब शिंगाडे (२०, रा. जुना चंदूर रोड, इचलकरंजी) या संशयिताला सोमवारी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने रंकाळा खणीजवळ मोपेडच्या डिकीतील रक्कम लंपास केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने त्याच्याकडून रोख ८५ हजार रुपये आणि १५ हजार रुपये किंमतीचा मोबाइल हस्तगत केला. चोरटा पकडला गेल्याने जुना राजवाडा पोलिसांची तारांबळ उडाली. फिर्याद नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलिस तोंडघशी पडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच मंगळवारी (ता. २९) दुपारी फिर्याद नोंदवण्यात आली.

यापूर्वही असेच प्रकार

यापूर्वीही अनेकदा चोरटा सापडल्यानंतर फिर्याद नोंदवण्याचे प्रकार जुना राजवाडा पोलिसांकडून झाले आहेत. गुन्ह्यांची संख्या वाढू नये यासाठी काही पोलिस कर्मचारी फिर्यादींना पोलिस ठाण्याच्या बाहेरूनच माघारी पाठवतात. या गंभीर प्रकाराची पोलिस अधीक्षकांनी तातडीने दखल घेऊन संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

चोरीच्या रकमेत गोलमाल

चोरीस गेलेली रक्कम सुमारे दीड लाख एवढी होती. चोरटा हाती लागल्यानंतर पोलिसांच्या रेकॉर्डवर केवळ एक लाखाची रक्कम आली. उर्वरित रकमेबाबत फिर्यादीने विचारणा केली असता, पोलिसांनी आहे तेवढी रक्कम घेऊन गप्प राहण्याचा सल्ला दिला. रक्कम मिळते ते नशीब म्हणा. नाहीतर तेवढेही पैसे मिळाले नसते, असे सांगून त्यांनी फिर्यादीची बोळवण केली. उर्वरित पैसे चोरट्याकडे आहेत की पोलिसांकडे याचा शोध वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच घ्यावा लागणार आहे.

फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ झाली नसावी. आमचे कर्मचारी सर्व तक्रारी घेतात. मी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतलेली नाही. याबाबत कर्मचाऱ्यांशी बोलून अधिक माहिती घेतो. कदाचित खात्री करण्यासाठी पोलिसांनी वेळ घेतला असेल.

- मानसिंह खोचे, निरीक्षक, जुना राजवाडा

गोपनीय माहितीनुसार आम्ही संशयिताला पकडले. अधिक चौकशीत त्याने रंकाळा खणीजवळ मोपेडच्या डीकीतून पैसे चोरल्याची कबुली दिली. चोरट्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही एक लाख रुपयांची नोंद केली. चोरीतील रक्कम वसुलही केली. फिर्यादीने अधिकच्या रकमेचे पुरावे दिल्यास चोरट्याकडे पुन्हा चौकशी करू.

- औदुंबर पाटील, निरीक्षक, राजारामपुरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरी कोट जोड...

$
0
0

हुपरी शहरातील राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वशिल्याने व त्यांना कमिशन दिले तरच चांदी उद्योजकांना कर्जे मंजूर होतात. एका बँकेतील कोट्यवधी रुपयांची थकीत कर्जे अशाच प्रकारे दिल्याने सर्वसामान्य व प्रामाणिक चांदी व्यावसायिकांना कर्जे मिळण्यास अडचणी येत आहेत. यात सुधारणा होणे आवश्यक आहे.

मानसिंगराव देसाई, अध्यक्ष, चांदी औद्योगिक सहकारी संघ

०००

एका राष्ट्रीयीकृत बँकेने पात्र नसलेल्या लोकांना कोट्यवधींची कर्जे दिली. सरकार कौशल्य विकासाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देत आहे. हुपरी कौशल्यांची जननी असून, येथे नवीन कौशल्य देण्याची गरज नाही. चांदी उद्योजकांना सर्व कायदेशीर पूर्तता करून कर्जे दिल्यास व्यवसायवाढीला चालना मिळेल.

उदय वाशीकर, सचिव, चांदी माल धडी उत्पादक संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images