Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

समरजितसिंह घाटगेंनी केलीम्हातारीच्या पठाराची पाहणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

चिकोत्रा प्रकल्प भरण्यासाठी अरळगुंडी पठारावरील जास्तीत जास्त पाणी नाले, बंधाऱ्यांच्या माध्यमातून चिकोत्रा धरणाकडे कसे वळवता येईल याबाबत वनविभागाचे व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची प्रत्यक्ष म्हातारीच्या पठारावर चर्चा झाली.

चिकोत्रा प्रकल्प भरण्यासाठीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी अरळगुंडी पठारावरील पाणी भविष्यात चिकोत्रा धरणाकडे वळविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने व समरजितसिंह घाटगे यांच्या प्रयत्नातून २७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे भविष्यात पाऊसमान कमी झाले तरी पाण्याचा स्रोत कायमस्वरूपी मिळावा म्हणून तसेच पाणी स्रोत उपलब्धतेचे योग्य ठिकाण प्रत्यक्ष पाहावेत म्हणूनच घाटगे यांनी म्हातारीच्या पठारावर प्रत्यक्ष पाण्याची पहाणी केली.

यावेळी वनविभागाच्या नियमानुसार तळे बांधल्यास वन्यप्राण्यांची सोय व पावसाळ्यात चिकोत्राकडे अतिरिक्त पाणी आपोआप वळेल, याबाबत रचनात्मक काम करण्याचे नियोजन केले आहे. यंदा चिकोत्रा धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने हे धरण ९५ टक्के भरले आहे. गतवर्षी धरणात पाण्याचा स्रोत वाढविण्यासाठी म्हातारीचे पठार विशेषतः अरळगुंडीच्या पठारावरील पाणी स्रोताची प्रत्यक्ष पाहणी घाटगे यांनी केली होती. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण भरत आले आहे. परंतु भविष्यात पाऊस कमी झाला तरी धरण पूर्णक्षमतेने भरावे. यावर उपाय सुचवून व त्याबाबत पाठपुरावा करून निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले होते.

यावेळी जलयुक्त शिवारचे अध्यक्ष उमेश देसाई, अमरसिंह घाटगे, वनअधिकारी अशोक पाटील, धरणग्रस्त समितीचे सदाशिव पाडेकर, गणपती शेटके, मुरलीधर बुवा, बाळ मुकुटकर तसेच पाटबंधारे अधिकारी बी. के. यादव, दिग्विजय कुंभार यांच्यासह वन, कृषी, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

००००

चिकोत्रा धरणावर सीसीटीव्ही

यावर्षीच्या धरण ९५ टक्के भरले आहे. त्यामुळे हे धरण पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी केवळ चार ते पाच लोकांची नेमणूक केली आहे. तरी या सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे सीसीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी विनंती धरणग्रस्त समितीच्यावतीने घाटगे यांच्याकडे केली. त्याला त्यांनी तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे घाटगे यांचे समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीआय अशोक पवारांसह तिघांची तडकाफडकी बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेठवडगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील आणि कॉन्स्टेबल नंदकुमार कराड यांची पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी (ता. ३१) तडकाफडकी बदली केली. पेठवडगावचा कार्यभार इचलकरंजी गावभाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप काळे यांच्याकडे सोपवला आहे. तर सहायक पोलिस निरीक्षक शरयू देशमुख यांना गावभाग पोलिस ठाण्याचा कार्यभार दिला. पेठवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेला लाखो रुपयांचा गुटखा आणि हप्तेखोरी तेथील पोलिसांना भोवली. अधीक्षक डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी तडकाफडकी निरीक्षक अशोक पवार यांच्या बदलीचे आदेश काढले. पोलिस मुख्यालयात त्यांची बदली करण्यात आली. याशिवाय सहायक निरीक्षक सचिन पाटील व कॉन्स्टेबल नंदकुमार कराड यांचीही रवानगी पोलिस मुख्यालयात झाली आहे. पेठवडगाव पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात पवार यांना बदलीला सामोरे जावे लागले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परवाना विभागाच्यावतीने पाच व्यवसाय सील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परवान्याचे नूतनीकरण न केलेल्या व थकबाकीदार पाच व्यावसायिकांचे व्यवसाय महापालिकेने शुक्रवारी सील केले. वाय. पी. पोवारनगर व टेंब रोड येथीलव्यावसायिकांवर ही कारवाई झाली. कारवाईच्या धडाक्यानंतर आता इतर थकबाकीदारांनी महापालिकेकडे एक लाख २५ हजारांची थकबाकी जमा केली आहे.

महापालिका क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी दरवर्षी व्यावसायिकांनी परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. परवाना विभागाच्यावतीने नूतनीकरणासाठी यापूर्वी संबंधित व्यावसायिकांशी पत्रव्यवहार करून थकबाकी जमा करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. पण तरीही थकबाकी न भरण्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर परवाना विभागाने कारवाई सुरू केली आहे. वाय. पी. पोवारनगर येथील मांगुरे इंडस्ट्रिज, सागर एंटरप्रायझेस, टेंबे रोड येथील करवीर इलेक्ट्रॉनिक व सौरभ इलेक्ट्रॉनिक आणि मंगळवार पेठेतील ओंकार ऑटोमोबाइल यांच्यावर कारवाई करण्यात आली. महापालिकेची कारवाई सुरू झाल्यानंतर इतर थकबाकीदारांनी एक लाख २५ हजारांची रक्कम जमा केली.

अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधीक्षक राम काटकर, निरीक्षक अनिल अदिवाल, सुभाष पोवार, अमर यादव, विजय वाघेला, बाळासाहेब जाधव व उदय यादव यांनी केली. थकबाकी वसुलीसाठी कारवाई कायम सुरू राहणार असून व्यवसायिकांनी परवाना नूतनीकरण, थकबाकी व नवीन परवान्यासाठी शिवाजी मार्केट येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेवटच्या दिवशी विवरण पत्र भरण्याची धांदल

$
0
0

विवरणपत्र भरण्याची

अखेरच्या दिवशी धांदल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याच्या आज शुक्रवारी अखेरच्या दिवशी विवरण पत्र भरण्याची धांदल उडाली होती. विवरणपत्र न भरणाऱ्या करदात्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे. त्यामुळे यंदा विवरणपत्र भरणाऱ्यांमध्ये नोकरदार व छोट्या व्यावसायिकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१७-२०१८ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत होती. पण, प्राप्तिकर खात्याने एक महिन्याची मुदतवाढ दिली. शुक्रवारी ही मुदत संपली. विवरणपत्र दाखल न केल्यास करदात्यांना दंडाला सामोरे जावे लागणार असल्याने यंदा नोकरदार व छोट्या व्यावसायिकांनी सीएंकडून विवरणपत्रे भरून घेतली. यावर्षी खासगी कंपन्या व छोट्या व्यापाऱ्यांना विवरणपत्रे भरण्यासाठी एसएमएस, ईमेलद्वारे आठवण करून दिली जात होती. शेवटच्या दिवशी करदाते सीएच्याकडे विवरणपत्र भरले आहे का? याची खातरजमा करून घेत होते. दोन कोटी रुपये असलेल्या छोट्या व्यावसायिकांना विवरणपत्र भरण्याची आज शेवटची मुदत होती. पण, दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचे व्यवहार आहेत, त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत विवरणपत्र भरुन देण्याची मुदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कमी मतदान केंद्रांचा अभ्यास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील दोन लोकसभा आणि दहा विधानसभा मतदारसंघांत गेल्यावेळी ३२७ केंद्रांवर सर्वांत कमी मतदान झाले होते. त्या केंद्रांवर मतदान का कमी झाले, पुढील निवडणुकीत मतदान वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, त्यासंबंधीचा अभ्यास निवडणूक प्रशासन आतापासून करीत आहे. प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मतदान वाढविण्यासाठी जागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्हा निवडणूक प्रशासन आतापासून करीत आहे. पात्र मतदारांची नोंदणी मोहीम राबवली जात आहे. बोगस, दुबार मतदारांचा शोध घेऊन ते रद्द केले जात आहे. सर्वच केंद्रांत चांगले मतदान होण्यासाठी केंद्रनिहाय नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील सर्वांत कमी म्हणजे एकूण झालेल्या मतदानापैकी दहा टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांची यादी तयार केली आहे. त्यात महिला आणि पक्रुषांचे किती मतदान झाले होते, त्याचाही सविस्तर तपशील संकलित केला आहे. प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर मतदान वाढविण्यासाठीचे कार्यक्रम प्रभावी, व्यापकपणे राबविण्यात येणार आहे, असे निवडणूक प्रशासनाने सांगितले.

०००

मतदारसंघनिहाय सर्वांत

कमी मतदान झालेली केंद्रे

कोल्हापूर दक्षिण : ३०, उत्तर : २९, चंदगड : ३५, राधानगरी : ४०, कागल : ३२, करवीर : ४०, शाहूवाडी : ३८, हातकणंगले : ३०, इचलकरंजी : २५, शिरोळ : २८

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस निरीक्षकांची चौकशी सुरू...

$
0
0

(मटा इम्पॅक्ट... आजच्या बातमीचा स्नॅप वापरावा)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणे आणि चोरट्याकडून जप्त केलेल्या रकमेत गोलमाल केल्याचे प्रकरण जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिसांच्या अंगलट आले आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'ने पोलिसांचा अजब कारभार उघडकीस आणल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली असून, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिसांची चौकशी सुरू केली.

पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांची नोंद वाढू नये, यासाठी अनेक फिर्यादी पोलिस डायरीपर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. तक्रार देण्यासाठी आलेल्या नागरिकांना बाहेरूनच कटवले जाते. याशिवाय दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्याचे आश्वासन देऊन संशयित आरोपींकडून पैसे उकळणे, फिर्यादींकडून पैसे उकळणे, खोटे गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवून पैसे उकळण्याचे प्रकार तर नेहमीच सुरू असतात. रंकाळा खण येथून शनिवारी (ता. २५) एका मोपेडच्या डिकीतील दीड लाख रुपये लंपास झाल्याची फिर्याद देण्यासाठी गेलेल्या फिर्यादीची जुना राजवाडा पोलिसांनी दखल घेतली नाही. फिर्यादीचीच उलट तपासणी घेऊन त्यांना माघारी पाठवले. याच गुन्ह्यातील चोरटा राजारामपुरी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर नाइलाजाने जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (ता. २९) गुन्हा दाखल केला.

चोरटा सापडल्यानंतर राजारामपुरी पोलिसांनी पुन्हा वेगळाच प्रताप केला. दीड लाखांची चोरी झालेली असताना त्यांनी फिर्यादीच्या जबाबात केवळ एक लाखाचा उल्लेख केला. ८५ हजार रुपये आणि १५ हजार रुपयांचा एक मोबाइल चोरट्याकडून जप्त केल्याचेही दाखविले. दीड लाखाची रक्कम गेल्याचे फिर्यादी सांगत होते. मात्र, मिळेल तेवढी रक्कम घेऊन गप्प राहा, असा अजब सल्ला पोलिसांनी फिर्यादीस दिला. हा सगळा प्रकार 'महाराष्ट्र टाइम्स'ने उघडकीस आणल्याने शुक्रवारी दिवसभर पोलिस दलात खळबळ उडाली. हे प्रकरण नेमके कोणावर शेकणार, याची दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेतली असून, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मानसिंग खोचे आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या चौकशीचे आदेश दिले. शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर चौकशी करून अधीक्षकांकडे अहवाल सादर करणार आहेत.

०००

अनेकांची होणार चौकशी

जुना राजवाडा आणि राजारामपुरी पोलिस ठाण्यातील ठाणे अंमलदार, चोरट्याला पकडणारे राजारामपुरीतील पोलिस, विलंबाने फिर्याद घेणारे जुना राजवाडाचे पोलिस, दोन्ही पोलिस ठाण्यांचे निरीक्षक या सर्वांची चौकशी होणार आहे. वरिष्ठांच्या आदेशानंतर कारवाई टाळण्यासाठी पळवाटा शोधण्याची धडपड संबंधित पोलिसांकडून सुरू आहे.

००००

फिर्याद नोंद करण्यास टाळाटाळ करणे आणि चोरीतील जप्त रक्कम, मुद्देमालाचा अपहार करणे हा गंभीर प्रकार आहे. पोलिसांवरील विश्वासाला तडा देणारे हे प्रकार आहेत. या प्रकरणातील सर्वच पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.

डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रोएशिया दौऱ्यात अनिकेत जाधव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय एकोणीस वर्षीय फुटबॉल संघ युरोप खंडातील क्रोएशिया दौऱ्यावर निघाला असून, या संघात कोल्हापूरच्या अनिकेत जाधव याची निवड झाली आहे. चार ते नऊ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत भारतीय संघाला चांगल्या खेळाचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे.

चार देश सहभागी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फ्रान्स, क्रोएशिया, स्लोव्हाकिया या देशांसह भारताचा समावेश आहे. अनिकेत जाधवने यापूर्वी १७ वर्षे वयोगटातील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. भारतात होणाऱ्या आयएसएल स्पर्धेत अनिकेत जमशेठपूर एफसीकडून प्रतिनिधित्व करणार आहे. कोल्हापूरचा निखिल कदम नॉर्थ ईस्टकडून, तर सुखदेव पाटील दिल्ली डायनोमोज संघाकडून खेळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रस्ताव द्या, पाणंद रस्त्यांसाठी निधी देऊ’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हातकणंगले तालुक्यातील पाणीपुरवठा योजना, आयुष्यमान भारत आरोग्य अभियान, पाणंद रस्ते या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करून प्रस्ताव तत्काळ द्यावेत. या सर्व योजनांसाठी सरकारचे धोरण सकारात्मक असून लागणारा सर्व निधी लवकरच उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पणन व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह सर्व विभागांची आढावा बैठक शुक्रवारी हातकणंगले येथील इंगवले फार्म हाउसवर झाली, यावेळी ते बोलत होते.

मंत्री खोत म्हणाले, 'हातकणंगले तालुक्यात यापूर्वी केलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना बहुतांश निरोपयोगी ठरत होत्या, यामुळे नवीन योजना करण्यासाठी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले आराखडे मंत्रालयाकडे पाठवून द्यावेत. त्यात कोणत्याही त्रुट्या राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सरकार एक कोटी रुपये खर्चाच्या आतील सर्व योजनांची कामे त्वरित चालू करणार असून, त्यानंतर मोठ्या खर्चाच्या योजना राबविण्यात येणार आहेत. पाणंद रस्त्यांच्या गैरसोयीने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याने पाणंद रस्त्यांचे प्रस्ताव लवकरात लवकर दिल्यास रस्ते करण्यासाठी सरकारच्या वतीने प्रतिकिलोमीटर ५० हजार रुपये तसेच उत्खनन व वाहतुकीसाठी येणारा खर्च दिला जाणार असून उत्खनन केलेल्या मुरुमांवरील सर्व रॉयल्टी माफ केली जाईल.'

जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी स्वागत केले. तहसीलदार सुधाकर भोसले यांचा सत्कार भूविकास बँकेचे माजी संचालक किरण इंगवले यांच्या हस्ते झाला. बैठकीस पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, प्रवीण यादव, अशोकराव माने, विजया पाटील, अण्णासाहेब शेंडुरे, उद्योगपती महावीर गाट, राजू मगदूम, भैय्या माने, तहसीलदार सुधाकर भोसले, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर, पाणीपुरवठाचे अभियंता बारटक्के,जीवन प्राधिकरणाचे मुल्ला, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

०००

फोटो ओळी -हातकणंगले येथे तालूक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या आढावा बैठकीत बोलताना मंत्री सदाभाऊ खोत,शेजारी अरुण इंगवले,प्रसाद खोबरे आदी मान्यवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नागरिकांनी पाठलाग करून चेन स्नॅचरला पकडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात तरुणीच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी पाठलाग करून पकडले. बेदम चोप देत चोरट्याला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले. योगेश शंकर माळी (वय ३२, रा. किणीकर कॉलनी, निपाणी, जि. बेळगाव) असे चोरट्याचे नाव आहे. हा प्रकार शुक्रवारी (ता. ३१) दुपारी एकच्या सुमारास घडला. त्याने चोरलेली चेन पोलिसांनी हस्तगत केली.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा येथे भारतीय पोस्टल सेवा कार्यालयात नोकरी करणारी राधा चंदनसिंह राजपूत (वय २६, रा. सणगर गल्ली, मंगळवार पेठ) ही तरुणी शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास गोव्याहून मध्यवर्ती बसस्थानकावर आली. तेथून ती मंगळवार पेठेतील घरी जाण्यासाठी रिक्षा स्टॉपकडे निघाली होती. यावेळी वाटेत एका तरुणाने तिच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसडा मारून तोडली. चोरटा पळून जात असतानाच तरुणीने आरडाओरडा सुरू केला. यावेळी जवळच असलेला रिक्षाचालक करण किशोर दणाणे याने चोरट्याला पाठलाग करून पकडले. इतर रिक्षाचालक आणि नागरिकांनीही चोरट्यास बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला वाहतूक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी या घटनेची माहिती देऊन शाहूपुरी पोलिसांना बोलवून घेतले. योगेश माळी असे चोरट्याचे नाव असून, तो खासगी ट्रॅव्हल्सवर क्लीनर म्हणून काम करतो. शुक्रवारी सकाळी तो कोल्हापुरात आला. त्याने अशा प्रकारे अन्य चोऱ्या केल्या आहेत काय? याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमाग आंदोलनाबाबत शुक्रवारी मेळावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गेल्या चार वर्षांपासून वस्त्रोद्योगात निर्माण झालेल्या मंदीतून यंत्रमागधारकांची सुटका व्हायची असेल तर त्यासाठी सर्वसमावेशक व्यापक लढा उभारण्याची गरज व्यक्त करून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी (ता.७) दुपारी चार वाजता लायन्स ब्लड बँक येथे सर्वसमावेशक मेळावा घेण्याचा निर्णय शुक्रवारी यंत्रमागधारक संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

वस्त्रोद्योगात निर्माण झालेल्या मंदीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी चर्चा करून निर्णय घेण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या सभागृहात यंत्रमागधारकांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीच्या सुरुवातीला यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी, काही स्थानिक प्रश्‍नांमुळे व्यवसाय अडचणीत आला असल्याचे स्पष्ट करत सन २०१३ मध्ये कामगार मजुरीबाबत जो निर्णय झाला तो चुकीचा झाला. मालेगाव, भिवंडीपेक्षा इचलकरंजीत मजुरी जादा दिली जाते. पण, इचलकरंजीतील यंत्रमागधारक कधीच कामगार विरोधी भूमिका घेत नसल्याचेही स्पष्ट केले. खर्चीवाल्या यंत्रमागधारकांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ट्रेडिंगचालकांच्या धोरणामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. तर सूत व्यापाऱ्यांनी पेमेंटधारा बंद केल्यानेही अडचणी निर्माण झाल्या असून त्यावर तोडगा काढणे आवश्यक असल्याचे सांगितले.

वीजतज्ञ प्रताप होगाडे यांनी, केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळेच वस्त्रोद्योगाची ही अवस्था झाल्याचा आरोप करून या व्यवसायाला स्थिरता मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने सहकार्याची भूमिका घ्यावी यासाठी राज्यासह केंद्रातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील सर्वच व्यवसायिकांनी एकत्र करुन लढा देण्याची गरज व्यक्त केली. पॉपलीन यंत्रमागधारक संघटनेचे सचिन हुक्किरे यांनी, यंत्रमागधारक आर्थिक कोंडीत सापडला असून नुकसानीमध्ये व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. तेव्हा स्थानिक प्रश्‍नावर लढा उभारावा अशी मागणी केली. इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी, मंदीतून मार्ग काढण्यासाठी केवळ इचलकरंजीत आंदोलन करून उपयोग नाही. तर राज्यातील मालेगाव, भिवंडी, वीटा आदी ठिकाणच्या यंत्रमागधारकांना एकत्र करणे आवश्यक असल्याचे सांगत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शुक्रवार 7 रोजी मेळावा घेण्याचे जाहीर केले. यावेळी सुरेश पाटील, विटा असो.चे किरण तारळेकर, दत्तात्रय कनोजे, विश्‍वनाथ मेटे, दिपक राशिनकर, चंद्रकांत पाटील, विकास चौगुले, आदींसह पदाधिकारी, कारखानदार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांचा राजीनामा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी शुक्रवारी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे राजीनामा सादर केला. तत्पूर्वी पाटील हे भूविकास बँकेचे थकबाकीदार असल्याने सिद्ध झाल्याने उपनिबंधकांनी त्यांना गुरुवारी अपात्र ठरवले होते. पाटील यांचे संचालक पदही रद्द झाले आहे.

पाटील हे भूविकास बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना अपात्र ठरवावे, अशी तक्रार संघाचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी जिल्हा उपनिबंधक काकडे यांच्याकडे केली होती. पाटील यांनी भूविकास बँकेच्या कागल शाखेतून १५ लाख ८३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. हे कर्ज थकल्याने २९ लाख ४०० रुपये थकबाकी झाली होती. पाटील यांच्याशिवाय एम. एम. पाटील, मानसिंग पाटील हेही भूविकास बँकेचे थकबाकीदार होते अशी तक्रार होती. मात्र त्यांनी निकाल लागण्यापूर्वीच संचालकपदाचा राजीनामा दिला. जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी युवराज पाटील यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी विभागीय सहनिबंधकाकडे अपील केले होते. विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे यांनीही जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय कायम ठेवत पाटील यांना अपात्र ठरवले. या निर्णयाविरोधात पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टाने पाटील यांना थकीत २९ लाख ४०० रुपये भरण्याचे आदेश दिले. पाटील यांनी थकबाकी भरल्यावर हायकोर्टाने अपात्रतेबाबत जिल्हा उपनिबंधकांना निर्णय घेण्याचे आदेश दिले. सहकार कायद्यानुसार जी व्यक्ती थकबाकीदार असते, त्यांचे संचालकपद रद्द करण्यात येत असल्याने उपनिबंधक काकडे यांनी पाटील यांना अपात्र ठरवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : रामचंद्र पाटील

$
0
0

रामचंद्र पाटील

शिराळा : मणदूर (ता. शिराळा) येथील रहिवासी शिराळा पंचायत समितीचे माजी सभापती रामचंद्र पाटील (वय ९३) यांचे शुक्रवारी निधन झाले. शिराळ्याच्या यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता.२) मणदूर येथे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेडसगावात ‘अंगाई्रमध्ये साकारणार वाचनालय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव येथील 'अंगाई' हे प्रा. चंद्रकुमार नलगे यांचे दुमजली घर पावसाने नुकतेच कोसळले. अंगाई चित्रपटाच्या कथा लेखनासह चित्रीकरणही झालेल्या या घरात आता गावासाठी वाचनालय सुरू करण्यात येणार आहे.

प्रा. नलगे यांनी या घरात तलावाच्या सत्यकथेवर 'अंगाई' चित्रपटाची कथा लिहिली. याच कथेवर पुढे चित्रपट काढला. त्याचे चित्रीकरण येथेच झाले. त्यामध्ये चंद्रकांत, सूर्यकांत, चित्तरंजन कोल्हटकर, उमा, लीला गांधी यांच्यासह अनेक कलाकार होते. याशिवाय या घरातच अगीन फूल, देवाची साक्ष, धग या कादंबऱ्यांसह अनेक कथा, कविता व ललित लेखनही नलगे यांनी केले. याच इमारतीत कानसा खोरा शिक्षण संस्था स्थापन झाली. विरळे आणि येळवण जुगाई येथे हायस्कूल व सरूड येथे शिवशाहू हायस्कूल स्थापन करण्याचा निर्णयही येथेच झाला. आता ही इमारत ढासळली आहे. येथे नव्याने इमारत बांधून गावासाठी वाचनालय सुरू करण्याचा निर्धार प्रा. नलगे यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाच्या आमिषाने फसवणूक

$
0
0

गडहिंग्लज : लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी सचिन शंकर घोरपडे (रा. आत्याळ, ता. गडहिंग्लज) याच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन घोरपडेने मार्च २०१८ पासून २४ ऑगस्टपर्यंत पीडितेला वारंवार भेटून तिच्याशी लग्न करू असे आश्वासन देत लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडितेने पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाडी मार्चवर मराठा समाज ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी चार सप्टेंबर रोजी मुंबईत 'मराठा स्वाभिमान गाडी मार्च' काढण्यावर ठाम असल्याचे सकल मराठा समाजाने शुक्रवारी जाहीर केले. आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी अमान्य करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करावे, अशी केलेली विनंती आंदोलकांनी धुडकावून लावली. शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती दिल्यानंतर समाजाच्या संयोजकांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

मराठा समाजाने सरकारला सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन बोलाविण्यासाठी ३१ ऑगस्टची डेडलाइन दिली होती. आंदोलकांच्या मागणीवरुन जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. विशेष अधिवेशन, आंदोलकांवर गुन्हे मागे घ्यावेत, आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाला मदत करावी या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहातील बैठकीत समाजाच्या प्रतिनिधींना दिली. राज्य मागासवर्ग आयोगाने १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात दिले आहे. अहवाल नसताना अधिवेशन घेतले तर निर्णय होणार नाहीत असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. अहवालानंतर हिवाळी अधिवेशनात शनिवार व रविवारी फक्त मराठा आरक्षणावर चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. आरक्षण टिकले पाहिजे, समाजाची फसवणूक होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याने मुख्यमंत्र्यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, 'राज्यात आरक्षणासाठी आंदोलन पेटले असताना कोल्हापुरात आंदोलन शांततेत होते. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. सध्या मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सव असल्याने आंदोलन काही काळ स्थगित ठेवावे. समाजाच्या आंदोलनामुळेच आरक्षणाचा प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. मराठ्यांनी युद्ध जिंकले आहे, पण तहात हरू नये. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची सूचना मान्य केली आहे.'

आमदार राजेश क्षीरसागर यांनी 'शांततेत मोर्चे काढूनही सरकारने आरक्षणाकडे दुर्लक्षच केले' अशी टीका करत समाज जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा राहिल असे सांगितले. खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील यांच्यासह समाजाचे जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवण्यास नकार

'मराठा समाजाला ठोस, टिकाऊ आरक्षण मिळणार असल्याने मुंबईतील आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे' असे खासदार शेट्टी यांनी बैठकीत सांगितले. यावर आंदोलक दिलीप देसाई यांनी 'मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवर आमदार, खासदारांचा विश्वास आहे का?' असा प्रतिसवाल केल्यावर सर्व लोकप्रतिनिधी निरुत्तर झाले. 'लोकप्रतिनिधींचा विश्वास असेल तर आम्ही आंदोलन मागे घेतो,' असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र खासदार शेट्टी यांनी, 'आम्हाला मुख्यमंत्र्यासमवेत चर्चेचे अधिकार नव्हते. आंदोलक, मुख्यमंत्री यांचे एकमेकाचे निरोप देण्याचे काम केले' असे सांगून सुटका करून घेतली. आमदार हळवणकर यांनी 'मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन घेण्याची तयारी दर्शवली आहे. सरकार व मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी मराठा समाज फसवणूक सहन करणार नाही. अधिवेशनातून काही साध्य झाले नाही तर आत्महत्या वाढतील' अशी भीती बोलून दाखवली. 'लोकप्रतिनिधींचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर आम्ही आंदोलन मागे कसे घेणार?' असा प्रश्न उपस्थित करत मुंबईतील आंदोलन होणार अशी घोषणा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक यांनी केली.

आंदोलनावरुन मत मतांतरे

मुंबईतील आंदोलन पूर्ण ताकदीने करावे आणि सण, उत्सव असल्याने आंदोलन काहीकाळ स्थगित करावे, अशा वेगवेगळ्या सूचना काही कार्यकर्त्यांनी केली. तर 'छत्रपती शिवरायांनी मोजक्या मावळ्यांनिशी आंदोलन करुन स्वराज्य निर्माण केले आहे. सचे मुंबईला किती वाहने जाणार? किती संख्या असेल यापेक्षा मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जाऊन सरकारला इशारा देण्याची गरज आहे, असा मुद्दा काही कार्यकर्त्यांनी मांडल्यावर मुंबईतील आंदोलनाची घोषणा करण्यात आली. चर्चेत नंदिनी बाभूळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, सचिन तोडकर, दिलीप देसाई यांच्यासह समाजाच्या प्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट केली.

०००

(मूळ कॉपी)

मराठा स्वाभिमान गाडी मार्च चार सप्टेंबरला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन बोलावावे ही मागणी राज्य सरकारने अमान्य केल्याने चार सप्टेंबरला मुंबईत 'मराठा स्वाभिमान गाडी मार्च' काढण्याची घोषणा सकल मराठा समाजाच्या संयोजकांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करावे, अशी विनंती आंदोलकांनी धुडकावून लावली. मुंबईतील मुख्यमंत्र्यासमवेत झालेल्या चर्चेची माहिती शासकीय विश्रामगृहात राजर्षी शाहू सभागृहात जिल्ह्यातील खासदार आमदारांनी दिल्यानंतर सकल मराठा समाज संयोजकांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारने मराठा समाजाला आंदोलन कसे देणार याची माहिती देण्यासाठी सप्टेंबर महिन्यात विशेष अधिवेशन बोलावावे अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे. त्यासाठी राज्य सरकारला ३१ ऑगस्ट डेडलाईन दिली होती. तसेच आंदोलकांच्या मागणीवरुन जिल्ह्यातील खासदार व आमदारांच्या शिष्टमंडळाने नुकतीस मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आंदोलकांच्या मागण्याबाबत चर्चा केली होती. विशेष अधिवेशनाबरोबर, आंदोलकांवर गुन्हे मागे घ्यावेत, आत्महत्याग्रस्त मराठा कुटुंबाला मदत करावी, या मागण्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींना दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाने १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल देण्याचे प्रतिज्ञापत्र कोर्टात दिले आहे. अहवाल नसताना अधिवेशन घेतले तरी निर्णय होणार नसल्याने सभागृहात फक्त वाझांटी चर्चा होईल असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. अहवाल आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात शनिवारी व रविवारी या दोन दिवशी फक्त मराठा समाजाला आरक्षण या विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मराठा समाजाचे आंदोलन कोर्टात टिकले पाहिजे, मराठा समाजाची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घेण्याची विनंती केली असल्याची माहिती शेट्टी यांनी यावेळी दिली.

आमदार सुरेश हाळवणकर म्हणाले, संपूर्ण राज्यात मराठा आरक्षण मागणीसाठी आंदोलन पेटले असताना कोल्हापूरातील आंदोलन शांततेत सुरु असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. सध्या मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सव असल्याने आंदोलन काही काळ स्थगित ठेवावे. सकल मराठा समाजाच्या आंदोलनामुळेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. मराठ्यांनी युद्ध जिंकले आहे पण तहात हरू नये. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घेण्याची सूचना मान्य केली आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी शांततेत मोर्चे काढूनही राज्य सरकारने आरक्षण देण्याबाबत दुर्लक्षच झाले आहे, अशी टीका करत सकल मराठा समाज जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा राहिल असे सांगितले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील, डॉ. सुजीत मिणचेकर, उल्हास पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००००

मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवण्यास लोकप्रतिनिधींचा नकार

मराठा समाजाला ठोस व टिकाऊ आरक्षण मिळणार असल्याने मुंबईतील आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे असे खासदार शेट्टी यांनी बैठकीत सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवर जिल्ह्यातील आमदार व खासदारांचा विश्वास आहे का? या दिलीप देसाई यांच्या प्रश्नावर खासदार व आमदार निरुत्तर झाले. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा विश्वास असेल तर आम्ही आंदोलन मागे घेतो, असे स्पष्ट केले. पण खासदार शेट्टी यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यासमवेत चर्चेचे अधिकार नव्हते. आंदोलक व मुख्यमंत्री यांचे एकमेकाचे निरोप देण्याचे काम केले असल्याचे सांगून लोकप्रतिनिधींनी सुटका करुन घेतली. तर आमदार हळवणकर यांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन घेण्याची तयारी दर्शवली आहे. राज्य सरकार व मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवला पाहिजे. सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी मराठा समाज आता फसवणूक सहन करणार नाही. अधिवेशनातून काही साध्य झाले नाही तर आत्महत्या वाढतील अशी भिती हळवणकर यांनी बोलून दाखवली. लोकप्रतिनिधींचाच मुख्यमंत्र्यांवर विश्वास नसेल तर आम्ही आंदोलन मागे कसे घेणार असा प्रश्न उपस्थित करत मुंबईतील आंदोलन होणार अशी घोषणा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक यांनी केली.

०००००

आंदोलनावरुन मत मतांतरे

मुंबईतील आंदोलन पूर्ण ताकदीने करावे, अशी सूचना करताना सण, उत्सव असल्याने आंदोलन काही काळ स्थगित करावे, अशी सूचना काही कार्यकर्त्यांनी केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या मावळ्यांनिशी आंदोलन करुन स्वराज्य निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे मुंबईत किती वाहने जाणार? किती संख्या असणार? या पेक्षा मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ जाऊन सरकारला इशारा देण्याची गरज आहे, असे पटवून दिल्यानंतर मुंबईतील आंदोलनाची घोषणा करण्यात आली. या चर्चेत नंदिनी बाभूळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य एस.आर. पाटील, सचिन तोडकर, दिलीप देसाई यांच्यासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अण्णासाहेब पाटील आर्थिकमहामंडळावर पवार यांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पवार हे गेले वीस वर्षापेक्षा अधिक काळ शिवसेनेत असून ते महापालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. सेनेचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी तीन वर्षे जबाबदारी सांभाळली होती.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची तर उपाध्यक्ष म्हणून पवार यांना संधी देण्यात आली आहे. या नियुक्तीने कोल्हापुरात शिवसेनेला राज्य पातळीवरील महामंडळ मिळाले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरूणांना बिनव्याजी कर्जासह आर्थिक मदत केली जाते. महामंडळाला राज्य सरकारने तीनशे कोटींची तरतूद केली आहे. 'राज्यभरातील बेरोजगार तरूणांसह उद्योजकांना अधिकाधिक मदत देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. गेले अनेक वर्षे सेनेचे निष्ठेने काम केले, हे पद म्हणजे त्याचे फळ आहे' असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे सुनील मोदी यांना एस. टी. महामंडळाचे सदस्यत्व लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्ञान, अनुभवातून आत्मविश्वास वाढवा

$
0
0

नांगरे-पाटील; डॉ. पाटील विद्यापीठाचा वर्धापनदिन उत्साहात

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

'ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर आत्मविश्वास वाढवा, निश्चित ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केला तरच यश मिळेल,' असा कानमंत्र कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिला. ते डॉ. डी. वाय. पाटील पाटील अभिमत विद्यापीठाच्या १३ व्या वर्धापनदिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते. यावेळी प्रा. नीलकंठ पालेकर यांना नांगरे-पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नांगरे-पाटील म्हणाले, 'डॉ. डी. वाय. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुलपती संजय पाटील विद्यार्थ्यांच्या विकासाचे ध्येय घेऊन पुढे घेऊन जात आहेत. या संस्थेचा देदीप्यमान इतिहास आहे. आतापर्यंत साडेतीन लाख विध्यार्थ्यांनी या संस्थेतून शिक्षण पूर्ण करून उज्वल करिअर बनविले आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध असून, विध्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करून करिअर करावे. आजचे युवक हे छोट्या छोट्या गोष्टींवर निराश होतात. परिस्थितीला सामोर न जाता व्यसनाच्या आहारी जातात. इंटरनेटचा बेसुमार आणि चुकीचा वापर करतात, हे चित्र बदलण्याची गरज आहे.'

डॉ संजय पाटील यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी एम. डी., एम. बी. बी. एस., नर्सिंग आदी विभागातील विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. मिलिंद सबनीस यांना 'शांतादेवी डी. पाटील उत्कृष्ट शिक्षक' तर सुनील पिंपळकर, रवींद्र आळवेकर यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, सयाजी हॉटेल मॅनेजमेंट डायरेक्टर रॉफ दनानी, रजिस्टर व्ही. व्ही. भोसले, डॉ अनिलकुमार गुप्तां, प्राचार्य अजयसिंह जाधव, प्राचार्य महादेव नरके उपस्थित होते. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. प्रकाश बेहरे यांनी तर आभार डॉ. शिम्पि शर्मा यांनी केले सूत्रसंचालन चैतन्या पाटील, अंकुर जैन यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी, सेनेत अस्वस्थता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभेचा कोल्हापूर मतदार संघ कॉँग्रेसला द्या. निवडून येणारा योग्य उमेदवार माझ्याकडे आहे. उमेदवार निवडून आणण्याची जबाबादारी माझी,' अशी ग्वाही कॉँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांनी नेत्यांना दिली, त्यानंतर राष्ट्रवादी, शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. आमदार पाटील यांच्या मनातील हा उमेदवार पक्षातील आहे की उसना आहे याचीही चर्चा रंगली आहे.

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने कॉँग्रेसने कोल्हापुरात लोकसभेचा नारळ फोडला. यात्रेच्या प्रारंभाला माजी मंत्री आमदार आमदार सतेज पाटील यांनी लोकसभेची कोल्हापुरातील जागा कॉँग्रेसला मिळावी अशी आग्रही मागणी केली. 'योग्य उमेदवार आमच्याकडे आहे. उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी माझी. कॉँग्रेसचा उमेदवार निवडून न आल्यास मुंबईला येणार नाही,' अशी ग्वाही आमदार पाटील यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केला. जागावाटपात कोल्हापूरवर कॉँग्रेसचा दावा करण्यासह विद्यमान खासदारांनाही अस्वस्थ करण्याची खेळी खेळली. याशिवाय इच्छुक उमेदवारांमध्येही बळ भरले.

कॉँग्रेसकडे सक्षम उमेदवार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले असले तरी, तो उमेदवार नेमका कोण? याबाबत गोपनीयता बाळगली. हीच गोपनीयता अनेकांची अस्वस्थता वाढवणारी ठरत आहे. गेल्या चार वर्षांतील त्यांचे काम आणि राष्ट्रवादीकडील उपलब्ध पर्याय पाहता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार खासदार महाडिक यांची गैरसोय करतील असे वाटत नाही. यातूनही अखेरच्या क्षणी जागावाटपात फेरफार झाल्यास मात्र खासदार धनंजय महाडिक यांची पक्षीय पातळीवर कोंडी होऊ शकते. अनपेक्षितपणे असा फेरफार झालाच तर त्यांच्यासमोर अन्य पक्ष किंवा अपक्षही निवडणूक लढवण्याचा पर्याय उपलब्ध असेल. कोणत्याही स्थितीत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे, त्यामुळे खासदार महाडिकांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण असणार या चर्चेला सरुवात झाली आहे.

संपूर्ण मतदार संघात प्रभाव पाडून विजयी मताधिक्य मि‌ळवेल अशा उमेदवाराचे नाव समोर नाही. अशावेळी आमदार सतेज पाटील स्वत:च लोकसभेच्या मैदानात उतरणार का याचीही उत्सुकता आहे. कॉँग्रेसमधून जिल्हाअध्यक्ष पी. एन. पाटील यांचा पर्याय समोर येऊ शकतो. याशिवाय माजी खासदार जयवंतराव आवळे यांनाही संधी मिळू शकते. कॉँग्रेसमध्ये सक्षम उमेदवार न मिळाल्यास राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतून उमेदवार आयात करण्याचाही पर्याय कॉँग्रेसकडे आहे. शिवसेनेचे प्रा. संजय मंडलिक यांना कॉँग्रेसमध्ये वळवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांना मानणारा गट आजही जिल्ह्यात आहे. याशिवाय प्रा. संजय मंडलिक यांनीही गटबांधणी केली आहे. राष्ट्रवादीतील एखादा उमेदवार कॉँग्रेसच्या गळाला लागल्यास विद्यमान खासदारांची मते फोडण्याची खेळी होऊ शकते.

जर- तरची लढाई अटीतटीची

याशिवाय श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचा पर्यायदेखील असू शकतो. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आग्रह केल्यास श्रीमंत शाहू छत्रपती कॉँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापुरातून निवडणूक लढवू शकतात. असे झाल्यास खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी निवडणूक सोपी ठरणार नाही. आमदार सतेज पाटील यांचे वक्तव्य जर-तर यावर अवलंबून असले तरी राजकारणात काहीही होऊ शकते. यामुळे आत्तापासूनच सर्व शक्यता गृहीत धरून पुढील नियोजन करावे लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीची व्याप्ती वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मेडीकलसाठी प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या प्रकरणाची व्याप्ती देशभर वाढण्याची शक्यता आहे. वाशीपाठोपाठ या टोळीने पुण्यातील २६ पालकांना दीड कोटीला गंडा घातला आहे. यामुळे तपासासाठी पुण्यातील विमानतळ पोलिस व सायबर विभागाचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या नावाने कंपनी स्थापन करुन ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

कर्नाटक, महाराष्ट्रासह विविध राज्यातील मेडीकल कॉलेजमध्ये कमी पैशात प्रवेश देतो, असे सांगून एका टोळीने अनेकांची फसवणूक केली आहे. या टोळीने पुण्यात इमर्ज ब्रेन स्टॉर्म इंडिया, वाशीत मेडीकना हेडवे सोल्युशन अशा विविध नावाने कंपन्या काढल्या. त्यासाठी कार्यालय भाड्याने घेतले, शिवाय तेथील फर्निचरही भाड्यानेच घेतले. एमबीबीएस किंवा इतर मेडीकल अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या पालकांशी संपर्क साधून त्यांनी प्रत्येक प्रवेशामागे किमान वीस लाख याप्रमाणे रक्कम घेतली आहे. पुणे कार्यालयात २६ पालकांनी या टोळीला पैसे दिले. पैसे मिळताच या टोळीने तेथूनही पोबारा केला. वाशी कार्यालयात सात ते आठ पालकांनी पैसे दिल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे.

पुणे विमानतळ पोलिसात फसवणूक झालेल्या एका पालकाने फिर्याद दिली आहे. त्याच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त केले आहे. या पथकात सायबर विभागाच्या पोलिसांचा समावेश करण्यात आला आहे. एक बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारावर मोबाईल, बँक खाते, गुमास्ता यांसह भाडेकरार करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर अनेक ठिकाणी अशी फसवणूक झाल्याची शक्यता आहे. वाशी पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी दिल्या असल्या तरी त्याची फिर्याद मात्र घेतलेली नाही. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याबरोबरच गुन्हे नोंदवण्याचे आदेश दिले जातील, असे सांगितले.

.. .. ..

या टोळीने अतिशय नियोजपूर्वक फसवणूक केली आहे. त्याची व्याप्ती देशभर असण्याची शक्यता आहे. फसवणुकीची रक्कम मोठी आहे. सायबर विभागाच्या मदतीने या प्रकरणाचा छडा नक्की लावण्यात येईल.

दिलीप शिंदे, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण गोलमेज परिषद रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षण मागणीसाठी मंत्रिगट उपसमितीने दिलेल्या आश्वासनानंतर सकल मराठा शौर्य पीठाच्यावतीने रविवारी (ता. २) होणारी गोलमेज परिषद रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान मंत्रिगट उपसमितीतील सदस्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी शिवाजी चौकातील सकल मराठा शौर्य पीठ आणि शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथील आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांचे आभार मानले.

सकल मराठा समाज शौय पीठाच्यावतीने शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरू होते. त्यांच्यावतीने रविवारी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. पण आज शनिवारी मंत्री गटाने सकल मराठा समाजाच्या २२ मागण्याबाबत आश्वासन दिल्याने शौर्य पीठाच्यावतीने गोलमेज परिषद रद्द करण्यात आली.

दरम्यान शनिवारी सायंकाळी सकल मराठा समाजाचे आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा पालकमंत्री पाटील राजर्षी शाहू जन्मस्थळावर केली. त्यानंतर पालकमंत्री पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे, आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवाजी चौकातील शौर्य पीठ आंदोलनस्थळी भेट देऊन आभार मानले. यावेळी प्रसाद जाधव, राजू जाधव, उदय लाड, निखिल इंगवले, परेश भोसले, विजय करजगार, राजेंद्र चव्हाण, बाबा महाडिक, दीपा पाटील, जयदीप शेळके आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शिवाजी तरुण मंडळाच्या शिवाजी मंदिर येथे भेट दिली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी पेठेच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चा शांततेत काढल्याबद्दल नेत्यांनी आभार मानले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, अजित राऊत, सुरेश जरग यांच्यासह पेठेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images