Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ठिबक सिंचनाने जमिनीचा पोत वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे क्षारपड जमिनींचे प्रमाण वाढले आहे. हा धोका टाळण्यासाठी ठिबक सिंचन हाच उपाय आहे. त्यातून जमिनीचा पोत वाढणार असून उत्पादन वाढ होऊन शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे,' असे प्रतिपादन नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक नंदु नाईक यांनी केले. 'नाबार्ड'च्यावतीने 'पाण्याचा कार्यक्षम वापर' या राज्यव्यापी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेच्या संचालिका, माजी खासदार निवेदिता माने होत्या.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणात नाबार्डच्यावतीने पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानाची सुरुवात खासदार माने यांच्या हस्ते झाली. संचालिका माने म्हणाल्या, 'भौगोलिकदृष्ट्या आणि पाण्याच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा समृद्ध असला तरी पाण्याच्या अतिवापरामुळे वाढतच चाललेली नापिकी ही बाब निश्चितच चिंताजनक आहे. पाण्याच्या नियोजनपूर्वक व काटेकोर वापरातूनच खऱ्या अर्थाने समृद्धी येईल.'

जैन इरिगेशनचे व्यवस्थापक उद्धव पाटील म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यात भरपूर पाणी भरपूर असताना ठिबकची गरज काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. पाटाच्या पाण्यामुळे जमीन क्षारपड होण्याचा मोठा धोका असतो. पण ठिबक सिंचनमुळे खर्च कमी होईल आणि पाण्याबरोबरच खताचेही व्यवस्थापन करता येईल.'

तर 'करवीर तालुक्यातील कारभारवाडी येथे गावाने ठिबक सिंचन राबवली असून या योजनेला जिल्हा बँकेने कर्जपुरवठा केला आहे', याकडे संचालक भैय्या माने यांनी माहिती दिली. देवयानी साळुंखे, असिफ फरास यांनी नाबार्डला ठिबक योजनेसाठी निधी द्यावा, अशी सूचना केली. संचालक सर्जेराव पाटील राजू आवळे, विलास गाताडे, अनिल पाटील, आर. के. पोवार उपस्थित होते. स्नेहल करंडे यांनी सूत्रसंचालन केले. बोर्ड व प्रशासन व्यवस्थापक गोरख शिंदे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजीत इंटकचा मोर्चा

$
0
0

कामगार विमा योजना दवाखान्यात

सुविधांसाठी इंटकची निदर्शने

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील कामगार राज्य विमा योजना दवाखान्याचे नुतनीकरण करण्यासह आवश्यक तो स्टाफ मंजूर करुन याठिकाणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात यांसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्यावतीने दवाखान्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. सुविधा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र इंटकचे सेक्रेटरी शामराव कुलकर्णी यांनी दिला.

औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना आणि कुटुंबियांना आरोग्य सेवेसाठी कामगार राज्य विमा योजना व त्याच्या दवाखान्यांशिवाय कोणताही पर्याय नाही. येथील विविध समस्यांच्या सोडवणुकीसह सुविधा उपलब्ध व्हाव्यात या मागणीसाठी शामराव कुलकर्णी यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी निदर्शने करण्यात आली. राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले, उपाध्यक्ष प्रदीप साहू यांनी मागण्यांचे निवेदन मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. जयश्री जावडेकर यांना दिले.

यावेळी बोलताना शामराव कुलकर्णी यांनी, आज चौदा हजार कामगार कुटुंबे सदस्य आहेत. त्याचा विचार होऊन इमारतीमध्ये सुधारणा गरजेची आहे. दवाखान्यात आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांवर उपचार होऊ शकत नाहीत. संलग्न दवाखाने वा मोठ्या वैद्यकिय संस्था ऑनलाइनशिवाय कामगारांना प्रवेश देत नाहीत. ही प्रक्रिया फार किचकट आहे. दवाखान्यात पुरेसा स्टाफ हवा. कामगारांना आवश्यक सुविधा पुरवण्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुलकर्णी यांनी दिला. अशोक रायमाने, मुकुंद कांबळे, सुभाष शिंगे, घोरपडे आदींसह कामगार, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तायक्वांदोत यश

$
0
0

योगासन, तायक्वोंदो स्पर्धेत यश

इचलकरंजी : तालुकास्तरीय योगासन व तायकांन्दो या स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले. योगासन स्पर्धेत तन्वी उदय कुंभार आणि सेजल सुनिल सुतार या विद्यार्थिनींनी वैयक्तिक व रिदीमिक या प्रकारात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्यांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली. १७ वर्षाखालील तायाक्वोंदो स्पर्धेमध्ये पायल लहू वाघमारे हिने प्रथम क्रमांक पटकविला. तिचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका एस. एस. गोंदकर, उपमुख्याध्यापक बी. आर. कांबळे, उपप्राचार्य आर. एस. पाटील, पर्यवेक्षक वाय. बी. बंडगर यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडाविभाग प्रमुख शेखर शहा, ए. आर. कोष्टी यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे प्रेसिडेंट मदनलाल बोहरा, चेअरमन हरिष बोहरा व मानद सचिव बाबासाहेब वडिंगे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शिराळा

'जोतिबाच्या नावान चांगभलं'च्या जयघोषात आज, श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी जोतिबा डोंगरावर नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. सकाळी ९ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत ही नगरप्रदक्षिणा जोतिबा डोंगराभोवती सुरू होती. अष्ट तीर्थ व बारा ज्योतिलिंगाचे दर्शन करीत भाविकांच्या गर्दीने प्रदक्षिणा मार्ग भक्तिमय झाला होता.

'जोतिबाच्या नवानं चांगभलं, यमाईच्या नावानं चांगभलं'चा गजर जोतीबा डोंगराच्या कपारीत घुमत होता. हजारो भाविकांच्या साक्षीने आजची नगरप्रदक्षिणा पूर्ण झाली. नगरप्रदक्षिणेला महाराष्ट्र, कर्नाटकातून हजारो भाविकांनी हजेरी लावली. सलग १० तास पायात चपला न घालता, जमिनीवर खाली न बसता, डोंगरदऱ्यातून, चिखल, माती तुडवत दाट धुके आणि पावसाची रिमझिम सरीतून वाट काढत भाविक सहभागी झाले होते. या मार्गावर सेवाभावी संस्थांच्यावतीने फराळाचे वाटप करण्यात आले.

सोमवारी सकाळी ९ वाजता जोतिबा मंदिरात अभिषेक आरती करून दिंडी गायमुख मार्गे मार्गस्थ झाली. मंदिरात जोतिबाची अलंकारिक खडी सरदारी रुपात पूजा बांधण्यात आली होती. डोंगराभोवती २५ किलोमीटरचा प्रवास करीत सांयकाळी ७ वाजता ही दिंडी यमाई मंदिरात आली. येथे आरती करुन सुंठवडा वाटपाने नगरप्रदक्षिणेची सांगता करण्यात आली. या वर्षी भाविकांची उच्चांकी गर्दी झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खैराची तस्करी करणारी टोळी अटकेत

$
0
0

खैराची तस्करी करणारी टोळी अटकेत

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

खैराच्या झाडांची बेकायदेशीरपणे तोड करून चोरी करणाऱ्या टोळीला भुदरगड वनविभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. याप्रकरणी वनविभागाने नऊ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून खैराच्या झाडांनी भरलेली बोलेरो पिकअप गाडी, कटर, चार मोबाइल, दारुची बाटली असा सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भुदरगड तालुक्यात खैराच्या झाडांची चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती वनविभागाला लागली होती. त्यानुसार वनक्षेत्रपाल अशोक पाटील, संदेश पाटील, एन. टी. मगदूम, एम. डी. अंगज, एस. ए. लोहार, एस. एच. सांगले, एस. व्ही. राऊत, एम. बी. काशीद, बी. बी. माणगांवकर, के. एम. मलगोंडा, डी. के. डाकरे, एस. जी. देसाई, एम. व्ही. कापसे आदींच्या पथकाने पाळत ठेऊन सापळा लावला. सोमवारी साडेचारच्या सुमारास शेणगाव-फये रोडवर बोलेरो पिकअप (एमएच ०७ एजे ०३०१) भरधाव वेगाने जात असल्याचे आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून गाडी पकडली. यात खैराची झाडे आढळून आली. बोलेरोसह पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना नागरीकांनी अडवून बेदम चोप दिला.

वनविभागाने कृष्णात चंद्रकांत वैद्य (३६), संजय दशरथ देसाई (४०), दादासो पांडुरंग वैद्य (३८), तानाजी रामचंद्र माने (४२), जयवंत तुकाराम वैद्य (२६), मोतेश बाबुराव बारदेसकर (३३ , सर्व रा. हेदवडे), शिवराम काशीराम हरयाण (४०, रा. गावधरवाडी, तिथवली), अनिल शंकर पवार (४८, रा. उंबर्डे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग), शहाजी तानाजी देसाई (३६, रा. गिरगाव) या नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरांचा जीडीपीही जाहीर होणार

$
0
0

Gurubal.mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : देश आणि राज्याची आर्थिक स्थिती स्पष्ट करणाऱ्या 'जीडीपी'च्या आकडेवारीची व्यापकता आता शहरापर्यंत वाढवण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून देशातील सर्व शहरांचाही जीडीपीही यापुढे जाहीर करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून पुढील महिन्यात शंभर स्मार्ट सिटींचे सर्वेक्षण करण्यात येईल. या नव्या निर्णयाने शहरांच्या प्रगतीची आकडेवारीच उपलब्ध होणार आहे.

देशाच्या आर्थिक स्थितीची माहिती जीडीपीवरुन समजते. जागतिक पातळीवर देश आर्थिकदृष्ट्या नेमका कोणत्या स्थानावर आहे, देशातील उद्योग, कृषी आणि सेवा यांची स्थिती काय आहे? याचा अभ्यास करून जीडीपी जाहीर केला जातो. या आकडेवारीतून सरकारची कार्यक्षमता तसेच विकासाचा वेगही लक्षात येतो. देशाच्या जीडीपीप्रमाणेच राज्याचा जीडीपीही स्वतंत्रपणे प्रसिद्ध् केला जातो. सर्व राज्यांच्या आकडेवारीवरून त्यांच्या प्रगतीचा तुलनात्मक आढावा मांडता येणे शक्य होते. निधी उभारतानाही त्याचा फायदा होतो. एखादे राज्य अथवा देश प्रगतीपथावर असेल तर गुंतवणूकदार त्याचा प्राधान्याने विचार करतात. म्हणून जीडीपीला अत्यंत महत्व आहे. विकासाच्या टप्प्यावर मागे असलेल्या क्षेत्रासाठी यामुळे तरतूद करणे शक्य होते किंवा विकासाचा वेग वाढवण्यातील अडथळे यामुळे समजू शकतात. त्यानुसार भविष्यातील धोरणे आखणे सोपे जाते.

देशातील अनेक शहरे झपाट्याने प्रगती करत आहेत. त्यामुळे शहरातील उद्योग व व्यवसायातील गुंतवणूक वाढत आहे. काही शहरांची प्रगती मात्र अत्यंत धिम्या गतीने होत असल्याचे दिसते. मात्र शहराच्या विकासातील नेमके अडथळे काय आहेत आणि कोणत्या क्षेत्रात शहर मागे पडते आहे, याबाबतची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याने गुंतवणूकदारांची अडचण होते. यामुळे या विकासाची नोंद घेण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सर्व महानगरांचा जीडीपी प्रसिद्ध् करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरूवात म्हणून शंभर स्मार्ट सिटी पहिल्या टप्प्यात निवडण्यात आल्या आहेत. येत्या महिनाभरात या मोहिमेची सुरूवात करण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका असलेल्या सर्व शहरांचा जीडीपी प्रसिद्ध करण्यात येईल.

काही महापालिकांनी निधी उभारण्याचा निर्णय घेतला. पण संस्थेच्या भक्कम आर्थिक स्थितीबाबत विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध नसल्याने अडचणी आल्या. नव्या निर्णयाने ही अडचण दूर होणार आहे. प्रत्येक महापालिकेचे कर वेगवेगळे असतात. दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि आकारले जाणारे कर यांतही तफावत असते. यात समतोलपणा आणण्यासाठी जीडीपीतील आकडेवारीचा फायदा होईल. देशभरातील शहरात उपलब्ध असणाऱ्या सुविधांचीही तुलना करणे शक्य होणार आहे.

...

देशातील अनेक महापालिकांना शहराच्या विकासासाठी निधी उभारायचा असतो. मात्र संस्थेची अधिकृत व मान्यताप्राप्त आर्थिक स्थिती माहीत नसल्याने अडचणी येतात. यामुळे शहरांचा जीडीपी जाहीर करण्यात येणार आहे. येत्या वर्षभरात देशातील बहुतांशी शहरांचा जीडीपी प्रसिद्ध् करण्यात येईल.

कुणालकुमार, प्रमुख, स्मार्ट सिटी योजना, केंद्र सरकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाण करणारे दोघे ताब्यात

$
0
0

(एक फोटो आहे)

...........

हल्लेखोरांपैकी दोघे ताब्यात

दारू दिली नसल्याच्या रागातून निवृत्त पोलिस अधिकाऱ्यास मारहाण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हॉटेलमध्ये दारू दिली नसल्याच्या रागातून सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकास मारहाण करणाऱ्या चौघांपैकी दोघांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. हर्षल उर्फ सोमनाथ अविनाश लाहुंडे (वय २४, रा. ई वॉर्ड, राजारामपुरी), अभिजीत कांबळे (२५), राहुल देवपुजे (२९) यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाने हल्ला केला होता. यातील लाहुंडे आणि एक अल्पवयीन पोलिसांच्या हाती लागला आहे. याबाबत बाळासाहेब कोंडिबा सांगले (६५, रा. अयोध्या अपार्टमेंट, ताराबाई पार्क) यांनी फिर्याद दिली आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब सांगले यांच्या मुलाचे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सन स्टार या नावाचे हॉटेल आहे. शनिवारी (ता. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास हर्षल उर्फ सोमनाथ हा तरुण त्याच्या तीन मित्रांसह हॉटेलमध्ये गेला. त्याने निलेश सांगले यांच्याकडे दारूची मागणी केली. हॉटेल आणि बार बंद झाल्याने दारू मिळणार नसल्याचे त्यांनी सांगितले. दारू देण्यास नकार दिल्याने हर्षलसह त्याच्या मित्राने हॉटेलमध्ये गोंधळ घातला. हे दोघे खुर्ची घेऊन निलेश यांच्या अंगावर धावून गेले. तुला बघून घेतो, अशी धमकीही त्यांनी दिली. हॉटेलमधील कर्मचाऱ्याने या प्रकाराची माहिती मोबाइलवरून निलेश यांचे वडील बाळासाहेब सांगले यांना दिली. सांगले दुचाकीवरून हॉटेलकडे येत होते. यावेळी दाभोळकर चौकातील रुईकर धर्मशाळेसमोर चौघांनी सांगले यांची दुचाकी अडवली. तुला मस्ती आली आहे काय, असे म्हणत चौघांनी त्यांना बेदम मारहाण केली. यातील एकाने सांगले यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने सांगले जमिनीवर कोसळले. लोकांची गर्दी जमताच हल्लेखोर पळून गेले.

या घटनेची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून संशयित हल्लेखोरांची ओळख पटवली. रविवारी रात्री उशीरा हर्षल उर्फ सोमनाथ लाहुंडे याच्यासह एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील लाहुंडे याला अटक करून कोर्टात हजर केले असता, कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. हल्लेखोरांमधील अभिजित कांबळे आणि राहुल देवपुजे हे दोघे पसार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

चौकट

निवृत्त पोलिस असोसिएशनकडून निषेध

निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनने सांगले यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. या घटनेतील हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवृत्त पोलिसांच्या असोसिएशनने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातबारा यंत्र धूळखात पडून

$
0
0

फोटो आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्र बनलेय शोभेची वस्तू

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात २३ रूपये टाकल्यानंतर त्वरित सातबारा मिळणारे यंत्र चार महिन्यांपासून धूळखात पडून आहे. 'आपले सरकार' असे लिहिलेल्या एटीएमसारखे हे किऑस यंत्र शोभेची वस्तू बनली आहे. सर्व सातबारा, आठ अ डिजिटल सहीनिशी अपलोड न झाल्याने आणि सर्व्हर डाऊन असल्याने यंत्र कार्यान्वित नाही. निवासी उपजिल्हाधिकारी कक्षासमोर एका कोपऱ्यात दर्शनी भागात ठेवलेले हे यंत्र कधी सुरू होणार, अशी विचारणा गरजू वारंवार प्रशासनाकडे करीत आहेत.

सातबारा, आठ अ देताना तलाठी शेतकऱ्यांकडून मनमानी पैशाची वसुली करतात अशा तक्रारी अनेक वर्षांपासूनच्या आहेत. कितीही कडक शिस्तीचे, पारदर्शक कारभार करणारे जिल्हाधिकारी असले तरी गावपातळीवरील तलाठ्यांकडून सातबारा देताना विविध कारणे सांगत चिरीमिरी वसूल केली जाते, हा सामान्य शेतकऱ्यांचा अनुभव आहे. हे थांबण्यासाठी आणि तातडीने देश, विदेशातील कोठूनही ऑनलाइन सातबारा, आठ अ मिळण्यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. त्यातून २०१४ मध्ये ऑनलाइन सातबारा, आठ अ अपलोड करण्याच्या कामाला सुरूवात झाली.

दरम्यान, डिजीटल सहीनिशी सर्व सातबारा, आठ अ महसूल यंत्रणेच्या सर्व्हरवर अपलोड करण्याचे काम सध्या थांबले आहे. परिणामी २३ रूपये टाकल्यानंतर त्वरित सातबारा, आठ अ मिळणारे जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रही वापराविना पडून आहे. यंत्र बंद आहे, त्याची माहिती सामान्यांना नसते. यंत्र सुरू नसल्याचा फलकही जवळपास कुठे लावलेला नाही. यामुळे त्वरित सातबारा, आठ अ ची गरज असलेले काहीजण यंत्राजवळ जातात, बटणे दाबतात. त्यानंतर त्यांना यंत्र बंद असल्याचे कळते. ते विचारणा करण्यासाठी कार्यालयातील लिपिकाकडे जातात. लिपिक यंत्र सुरू नाही, असे सांगतो. त्यामुळे प्रश्न विचारणारे संतप्त होऊन कशाला यंत्र ठेवला असा प्रतिप्रश्न करतात. रोज, हाच प्रश्न, तेच उत्तर देऊन संबंधित टेबलचे लिपिक हैराण झाले आहे.

-------------

१ लाख ९९ हजारांचा निधी

एटीएमसारख्या सातबारा यंत्रासाठी जिल्हा नियोजनमधील १ लाख ९९ हजारच निधी खर्च केला आहे. १ मेपासून यंत्रावर सातबारा, आठ अ देण्याची तयारी केली. मात्र प्रत्यक्षात चार महिने झाले तरी यंत्रातून एकही सातबारा, आठ अ मिळालेला नाही. कोल्हापूरनंतर सर्व राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असे यंत्र बसवण्याचे नियोजन महसूल विभागाने केले होते. मात्र डिजिटल सहीसह सातबारा, आठ अ अपलोड करण्याचे राज्याचे सर्व्हरच डाऊन आहे. परिणामी किऑस यंत्रातून सातबारा, आठ अ देण्याची योजना प्रारंभ होण्यापूर्वीच बंद झाल्याचे चित्र आहे.

---------------

केवळ १५ टक्केच

ऑनलाइन सातबारा अपलोड करण्यात कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्यापासून आघाडीवर आहे. पण सर्व्हरची अडचण असल्याने डिजिटल सहीचे सर्व सातबारा, आठ अ अपलोड झालेले नाहीत. जिल्ह्याचे हे काम केवळ १५ टक्के झाले आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत पैसे टाकल्यानंतर यंत्रावरून ऑनलाइन सातबारा, आठ अ मिळणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

----------

मटा भूमिका

विविध सरकारी योजनांचा लाभ घेणे, बँकांकडून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा, आठ अ लागतो. वेळेत आणि पारदर्शकपणे सातबारा, आठ अ सर्व शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी महसूल प्रशासनाने डिजिटल सहीनिशीचा सातबारा अपलोडचे काम त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्व्हर डाऊनची अडचण दूर करून सर्व्हरमधील स्पेस वाढविण्यासाठी सरकारी पातळीवर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. एटीएमप्रमाणे यंत्रात पैसे टाकल्यानंतर सातबारा, आठ अ मिळण्याची सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरात लवकर द्यावी.

--------------

कोट

'सातबारा, आठ अ दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यस्तरावरच सर्व्हर डाऊनची समस्या आहे. यामुळे पैसे टाकल्यानंतर सातबारा, आठ अ मिळणारे यंत्र बंद आहे. येत्या दोन दिवसांत ऑनलाइन सातबारा अपलोडच्या कामाला पुन्हा सुरूवात होईल. त्यानंतर यंत्र कार्यान्वित केले जाईल.

संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोदाळी-चंदगड बस अपघातात ७७ जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगड-हेरे मार्गावर कोदाळीहून चंदगडला येत असलेल्या बसचा सुळ्ये येथील वळणावर समोरुन येणाऱ्या डंपरला वाचविताना बसचालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. यामध्ये बसमधील ७७ प्रवाशी जखमी झाले. सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता हा अपघात झाला. चालक सिकंदर गेडाम यांनी याबाबतची माहिती चंदगड पोलिसात दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चंदगड आगाराची मुक्कामी असलेली कोदाळी बस सकाळी बेळगावला गेली. बेळगावहून पुन्हा कोदाळीला येऊन ती चंदगडला जात होती. बस सुळ्ये गावाजवळच्या वळणावर आली असताना समोरुन अचानकपणे जोरात डंपर आल्याने चालकाने बस बाजूला घेतली. त्याचा बसवरील ताबा सुटल्याने रस्त्याशेजारी असलेल्या झाडावर बस आदळली. चालकाने बस रस्त्याच्या कडेला जात असल्याचे पाहून अचानक जोराचा ब्रेक लावला. त्यामुळे बेसावध प्रवाशी बसमध्येच आदळले. सुमारे ७७ प्रवासी जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी जखमींना मिळेल त्या वाहनाने चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघात झालेल्या बसमधील बहुतांश प्रवाशांच्या डोक्याला व नाकाला गंभीर दुखापत झाली होती. पाच गंभीर जखमींना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णांलयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

.............

अपघातातील जखमी

सिकंदर गेडाम (वाहक, चंदगड), लता कडूकर (कोनेवाडी), आनंदी गावडे, दत्ताराम गावडे (रायंदेवाडी), कैलास पाटील (खामदळे), अश्वगंधा दळवी, ज्योती दळवी, सचिन दळवी, परशराम रामगच्चे, जयश्री दळवी, सुजाता गोरे (सर्व रा. गुळंब), अनंत कांबळे, वामन गवस, राधिका गावडे, रुक्मीणी गावडे, कृष्णा गावडे, राज गावडे, शुभम दळवी, रामचंद्र देसाई (कोदाळी), लक्ष्मण कदम (कलिवडे), रेखा चौगुले (तिलारीनगर), सुमित्रा गुरव, रामकृष्ण गवस, लक्ष्मण गवस, उत्तम गवस, रुक्मीणी गवस, नागोजी लांबोर (सर्व रा. कळसगादे), संध्या लाड (शिरगाव), सावित्री शिंदे (भोगोली), लक्ष्मी नाईक (चौकुळ), रुक्मीणी शंकर नाईक (डुक्करवाडी) यांच्यासह ७७ प्रवासी जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत फेरीवाला झोन लालफितीत

$
0
0

राजेंद्र पाटील, इचलकरंजी

वाढत्या अतिक्रमणाला लोकप्रतिनिधींबरोबर प्रशासनाचेही तितकेच पाठबळ आहे. कित्येक वर्षापासून लालफितीत अडकलेला फेरीवाला झोन अस्तित्वात नसल्यामुळेच हा प्रश्न बिकट बनत चालला आहे. अतिक्रमणे हटविण्याऐवजी शहरात दररोज त्यात भर पडत चालली आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडे सक्षम अधिकारी नसल्यामुळे फेरीवाल्यांसह अतिक्रमणधारकांना कसलीही भीती उरलेली नाही. तत्कालीन मुख्याधिकारी शिवमूर्ती नाईक व अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांची अतिक्रमणांविरोधात केलेली धडाकेबाज कारवाई आजही इचलकरंजीकरांच्या आठवणीत आहेत. अशा अधिकाऱ्यांची सध्या गरज निर्माण झाली आहे.

इचलकरंजीची अलिकडे झपाट्याने वाढ होत चालली आहे. उपनगरांसह शहराचा विस्तार होत असताना मुख्य मार्गाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नगररचना विभागाच्या डेव्हलपमेंट प्लॅननुसार मुख्य मार्ग रुंदीकरणाचा प्रश्न केवळ चर्चिला जातो. पण निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करुन हा प्रस्ताव बारगळला आहे. त्यामुळे राजवाडा चौक ते नदीवेस नाका, मोठे तळे ते नारायण चित्रमंदिर, नाट्यगृह ते टिळक रोड, विक्रमनगर ते सांगली रोड असे अनेक मुख्य मार्ग रुंदीकरणाविना अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. ही जागा संपादीत करुन मिळकतधारकांना त्याची भरपाई दिल्यास हे रस्ते वाहतूकीसाठी रुंद होऊ शकतात. परिणामी काहीअंशी वाहतूकीचा प्रश्न सुरळीत होऊ शकतो.

नगरपालिकेने वाढत्या अतिक्रमणाला आळा घालण्यासाठी स्वतंत्रपणे अतिक्रमण निर्मूलन पथकाची नेमणूक केली आहे. या विभागाकडे काम करणाऱ्या प्रमुखाची कारकिर्द आजपर्यंत वादग्रस्त ठरली आहे. अतिक्रमणे हटविण्याऐवजी वाढविण्यातच यांचा अधिक वाटा राहिला आहे. लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि अतिक्रमणधारकांकडून मिळणारी चिरीमिरी यामुळे या पथकाची जबाबदारी घेण्यास अनेकजण इच्छुक असतात. त्यामुळे अतिक्रमण हटण्याऐवजी वाढतच चालले आहे. अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी शहरातील मुख्य मार्गावरील अतिक्रमण काढण्याची मोहिम हाती घेतली. त्यानुसार विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या पानटपऱ्या, दुकानांच्या छपऱ्या, हातगाड्या जप्त केल्या होत्या. पण चार दिवसानंतरही ही मोहीम थंडावली. लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप व किरकोळ विक्रेत्यांचे प्रतिनिधी यांच्या दबावानंतर जप्त करण्यात आलेले साहित्य पुन्हा परत देण्यात आले. तसा ठराव नगरपालिका सभागृहात करण्यात आला आहे. पण लोकप्रतिनिधींनी या विक्रेत्यांना झुकते माप दिल्याने हा ठराव कागदोपत्रीच उरला आहे. शहर स्वच्छ, सुंदर व अतिक्रमणमुक्त होण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिक व विक्रेत्यांचाही सहभाग गरजेचा आहे.

तात्पुरती कारवाई होत असल्याने अतिक्रमणधारक निर्ढावले आहेत. आज काढलेले अतिक्रमण दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याठिकाणी बस्तान मारुन बसल्याचे दिसून येते. त्यामुळे कारवाईचा फार्स न करता कायमस्वरुपी मोहिम राबवण्याची नितांत गरज आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या अतिक्रमणावर नगरपालिकेचे नियंत्रण उरला नसल्याचा आरोप सातत्याने होत आहे. त्याला फेरीवाला संघटनेनेही दुजोरा दिला आहे.

अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी शहरात सर्वे करुन विविध ठिकाणी ३६ फेरीवाला झोन निश्चित करण्यात आले आहेत. नगरपालिकेने त्यातील १२ झोन मंजूर आहेत. उर्वरीत २४ झोन मंजूरीचा प्रश्न प्रलंबित असल्याने अतिक्रमणाची समस्या भेडसावत आहे. नगरपालिकेने झोन निश्नित करुन दिल्यास अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरुपी दूर होण्यास मदत होणार आहे.

- दीपक पाटील

अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरीवाला संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्यायाधीश उदय ललित यांचे रविवारी व्याख्यान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कायदेतज्ज्ञ अॅड. अरविंद शहा यांच्या स्मृतिनिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश उदय ललित याचे व्याख्यान आयोजित केले आहे. शाहू स्मारक भवन येथे रविवारी (ता. २) सकाळी अकरा वाजता व्याख्यान होईल, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अॅड. अरविंद शहा यांनी विधी क्षेत्रात सुमारे ५५ वर्षांहून अधिक काळ काम केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काम करताना त्यांनी गाजलेल्या खटल्यांमध्ये पीडितांना न्याय मिळवून दिला. शहरातील विविध संस्थांसह शिवाजी विद्यापीठ, राष्ट्रीयीकृत बँकांचे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या स्मृतिनिमित्त जिल्हा बार असोसिएशन व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने सुप्रिम कोर्टातील न्यायाधीश उदय ललित यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. न्यायाधीश ललित यांचा हिंदू वारसा हक्क कायद्याचा विशेष अभ्यास आहे. 'हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार महिलांचा वडिलोपार्जित मालमत्तेतील अधिकार' या विषयावर ते बोलणार आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म. आ. लव्हेकर आणि मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती जे. ए. पटेल प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय लॉ कॉलेजचे विद्यार्थी, पक्षकार आणि वकील या व्याख्यानास उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेसाठी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विवेक चिटणीस, अॅड. संतोष शहा, शहाजी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायण, न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य उदय सावंत, प्रा. सविता रासम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनियम दुरुस्तीवरुन शेतकरी संघात वादंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सामान्य नागरिक व शेतकरी सभासद या धोरणानुसार शेतकरी संघाची उभारणी झाली. एकेकाळी देशभर नावाजलेल्या संघाच्या कामकाज पद्धतीत काही कारभारी संचालकांनी मनमानी करत ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. संघाच्या निवडणुकीस उभे राहण्यासाठी व्यक्ती व संस्था सभासदांना २५००० रुपयांचे शेअर्स बंधनकारक करण्याचा प्रस्ताव हा सामान्य सभासदांवर अन्याय करणार असल्याच्या भावना आजी-माजी संचालकांनी मांडल्या. कारभारी संचालकांनी हा ठराव मंजूर केला तर त्याविरोधात कायदेशीर लढाई करू असा इशारा संबंधितांनी दिला.

संघाच्या काही संचालकांच्या मनमानी कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कार्यकारिणीची मान्यता न घेता नोकरभरती, संघाच्या मालकीच्या शाखा बंद करुन त्या खासगी व्यावसायिकांना भाड्याने देणे याकडेही आजी-माजी संचालक लक्ष वेधत आहेत. गारगोटीतील मौनी विद्यापीठाच्या व्यापारी संकुलातील संघाच्या मालकीचे चार गाळे खासगी व्यवसायिकाला भाड्याने दिले आहेत. याठिकाणची संघाची शाखा बंद केली. असाच प्रकार भोगावतीत झाला आहे. या ठिकाणी संघाची शाखा असताना लगतचे गोडावून मात्र खासगी व्यवसायासाठी भाड्याने दिला आहे. हा सारा कारभार संघाच्या उन्नतीसाठी की खासगी व्यावसायिकांच्या भल्यासाठी असा प्रश्न आता सभासद उपस्थित करत आहेत. भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयातील पहिला मजला गेली अनेक वर्षे वादात अडकला आहे. काही पंपावर उदारीवर इंधन विक्री सुरु असल्याकडेही लक्ष वेधत आहेत.

शेतकरी सहकारी संघाची मंगळवारी (ता. २८) सर्वसाधारण सभा आहे. कारभारी संचालकांनी सभेत निवडणुकीसंदर्भात पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. त्याला संघाचे संचालक शिवाजीराव कदम, शोभना शिंदे, मानसिंगराव जाधव आणि विजयादेवी राणे यांनी विरोध केला आहे. संचालिका शोभना शिंदे यांनी 'निवडणुकीबाबत पोटनियम दुरुस्ती नियमावली चुकीच्या पध्दतीने मांडली आहे. सभासदांची २५००० हजार रुपयांचे शेअर्सची कुवत नाही. मूठभर लोकांसाठी पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव खपवून घेणार नाही.' असे सांगितले. तर संघाचे माजी कार्यकारी संचालक सुरेश देसाई म्हणाले, 'सामान्य सभासद न शेतकरी निवडणुकीपासून लांब राहावा, आणि ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण व्हावी या पध्दतीने नियमावली तयार केली आहे. पोटनियम दुरुस्तीला विरोध राहील.'असे स्पष्ट केले.

शेतकरी संघाची स्थापना उदात्त हेतूने झाली. सामान्य नागरिक आणि शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. संघाचा लौकिक कायम राहावा, तो टिकावा या पध्दतीने कामकाज झाले पाहिजे. पोटनियम दुरुस्तीमुळे सामान्य सभासदांच्या हक्कावर गदा येणार असल्याने पोटनियम दुरुस्तीला मंजुरी मिळू नये अशी आमची भूमिका आहे.

- वसंतराव मोहिते, माजी अध्यक्ष शेतकरी संघ

...............

(मूळ कॉपी)

सामान्य सभासदावर अन्याय, मूठभरांची मक्तेदारी!

पोटनियम दुरुस्तीवरुन आजी, माजी संचालकांच्या भावना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सामान्य नागरिक व शेतकरी सभासद या धोरणानुसार शेतकरी संघाची उभारणी झाली. एकेकाळी देशभर नावाजलेल्या संघाच्या कामकाज पध्दतीत काही कारभारी संचालकांनी मनमानी करत ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. संघाच्या निवडणुकीस उभे राहण्यासाठी व्यक्ती व संस्था सभासदांना २५००० रुपयांचे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव हा सामान्य सभासदांवर अन्याय करणार असल्याच्या भावना आजी, माजी संचालकांनी मांडल्या. कारभारी संचालकांनी हा ठराव मंजूर केला तरी त्याविरोधात कायदेशीर लढाई करु असा इशारा संबंधितांनी दिला.

संघाच्या काही संचालकांच्या मनमानी कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कार्यकारिणीची मान्यता न घेता नोकर भरती, संघाच्या मालकीच्या शाखा बंद करुन त्या खासगी व्यावसायिकांना भाड्याने देणे याकडेही आजी, माजी संचालक लक्ष वेधत आहेत. गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या व्यापारी संकुलातील संघाच्या मालकीचे चार गाळे खासगी व्यवसायिकाला भाड्याने दिल्या आहेत. याठिकाणची संघाची शाखा बंद केली. असाच प्रकार भोगावतीत झाला आहे. या ठिकाणी संघाची शाखा असताना लगतचे गोडावून मात्र खासगी व्यवसायासाठी भाड्याने दिला आहे. हा सारा कारभार संघाच्या उन्नतीसाठी की खासगी व्यावसायिकांच्या भल्यासाठी असा प्रश्न आता सभासद उपस्थित करत आहेत. भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयातील पहिला मजला गेली अनेक वर्षे वादात अडकला आहे. काही पंपावर उदारीवर इंधन विक्री सुरु असल्याकडेही लक्ष वेधत आहेत.

शेतकरी सहकारी संघाची मंगळवारी (ता. २८) सर्वसाधारण सभा आहे. कारभारी संचालकांनी सभेत निवडणुकीसंदर्भात पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. त्याला संघाचे संचालक शिवाजीराव कदम, शोभना शिंदे, मानसिंगराव जाधव आणि विजयादेवी राणे यांनी विरोध केला आहे. संचालिका शोभना शिंदे यांनी 'निवडणुकीबाबत पोटनियम दुरुस्ती नियमावली चुकीच्या पध्दतीने मांडली आहे. सभासदांची २५००० हजार रुपयांचे शेअर्सची कुवत नाही. मूठभर लोकांसाठी पोटनियम दुरुस्तीचा प्रस्ताव खपवून घेणार नाही.' असे सांगितले. संघाचे माजी कार्यकारी संचालक सुरेश देसाई म्हणाले, 'सामान्य सभासद न शेतकरी निवडणुकीपासून लांब राहावा, आणि ठराविक लोकांची मक्तेदारी निर्माण व्हावी या पध्दतीने नियमावली तयार केली आहे. पोटनियम दुरुस्तीला विरोध राहील.'असे स्पष्ट केले.

..........

शेतकरी संघाची स्थापना उदात्त हेतूने झाली. सामान्य नागरिक आणि शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. संघाचा लौकिक कायम राहावा, तो टिकावा या पध्दतीने कामकाज झाले पाहिजे. पोटनियम दुरुस्तीमुळे सामान्य सभासदांच्या हक्कावर गदा येणार असल्याने पोटनियम दुरुस्तीला मंजुरी मिळू नये अशी आमची भूमिका आहे.

वसंतराव मोहिते, माजी अध्यक्ष शेतकरी संघ

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाच्या जागेसाठी पालकमंत्र्यांना साकडे

$
0
0

(फोटो आहे)

बार असोसिएशनने घेतली पालकमंत्र्यांची भेट

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापुरातील खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील जमिनीचा सुधारित प्रस्ताव अद्याप जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे पाठवलेला नाही. याबाबत जिल्हा बार असोसिएशनने सोमवारी (ता. २७) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी साकडे घातले. दरम्यान, जिल्हा बार असोसिएशनच्या ई-लायब्ररीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वीच कोल्हापुरातील खंडपीठासाठी ११०० कोटी रुपयांची घोषणा केली. यानंतर खंडपीठाचे कामकाज कोल्हापुरात सुरू व्हावे, यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. खंडपीठ कृती समितीने वारंवार याचा पाठपुरावा केला. मुंबईत जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पत्रव्यवहार केला, तरीही ठोस कार्यवाही झाली नाही. राज्य सरकारने किमान जागेची तरतूद करावी, असा आग्रह जिल्हा बार असोसिएशनने धरला होता. मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी जागेचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला केली होती. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी शेंडा पार्क येथील जागेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता. या प्रस्तावात १५ त्रुटी असल्याने नव्याने सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाने दिले होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुधारित प्रस्ताव पाठवला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी बार असोसिएशनला दिले होते. प्रत्यक्षात ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला तरीही, सुधारित प्रस्ताव तयार झालेला नाही.

याबाबत जिल्हा बार असोसिएशनने सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी चर्चा करताना अॅड. चिटणीस म्हणाले, 'शेंडा पार्क येथील जागा खंडपीठासाठी आरक्षित करावी, असे पत्र आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पहिल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे पत्र आम्हाला मिळाले. यानंतर पंधरा दिवसात सुधारित प्रस्ताव पाठवण्याचे आश्नासन मिळाले होते. मात्र, मुदत उलटूनही हे काम झालेले नाही. महसूलमंत्री या नात्याने तुम्ही जागेचा मुद्दा निकाली काढू शकता. त्रुटींची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना द्याव्यात. जागा आरक्षित करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण व्हावी.' यावर पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कोल्हापुरात खंडपीठ सुरू व्हावे यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे. जागेचाही प्रश्न लवकरच सुटेल.' यावेळी अॅड. ओंकार देशपांडे, अभिषेक देवरे, महिला प्रतिनिधी मनीषा पाटील, स्वाती तानवडे, दीपाली पोवार, अविनाश पाटील, आदी उपस्थित होते,

............

चौकट

ई-लायब्ररीसाठी मागवला खर्चाचा तपशील

कसबा बावडा येथील न्यायसंकुलाच्या इमारतीत जिल्हा बार असोसिएशनच्या ई-लायब्ररीसाठी २५ लाख रुपये देण्याची घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली आहे. ई-लायब्ररीसाठी लागणारे फर्निचर, पुस्तके यांचा खर्चाचा तपशील द्यावा, अशी सूचना पालकमंत्र्यांनी बार असोसिएशनकडे केली. सक्षम ठेकेदाराकडून तातडीने काम पूर्ण केले जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच मागणाऱ्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल, एकास अटक

$
0
0

(दोन फोटो आहेत)

लाच मागणाऱ्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

नळपाणी पुरवठा बिलांच्या मंजुरीसाठी मागितली साडेतीन लाखांची लाच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या बिलाचे मूल्यांकन आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी साडेतीन लाखांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने शिरोळ पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता आणि पुणे येथील उपअभियंत्यास एसीबीने अटक केली. उपअभियंता अशोक महादेव कांबळे (वय ४५) आणि शाखा अभियंता तुकाराम शंकर मंगल (वय ४२, रा. संभाजीनगर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. कांबळे याची पुण्याला बदली झाली होती. एसीबीने सोमवारी (ता. २७) ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गिरिश गोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम ठेकेदाराने टाकवडे येथील राष्ट्रीय पेयजल नळपाणी पुरवठा योजनेचा ३ कोटी ८० लाख रुपये कामाचा ठेका २०१४ मध्ये घेतला होता. कामानुसार ठेकादाराला ३ कोटी ५५ लाख रुपये बिल मिळाले. २२ मार्च २०१८ मध्ये पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले. त्यानंतर उर्वरित २५ लाख रुपयांचे बिल मिळवण्यासाठी ठेकेदारांनी शिरोळ येथील पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता तुकाराम मंगल यांच्याकडे अर्ज केला. कामाचे मूल्यांकन व ना हरकत प्रमाणपत्र घेऊन टाकवडे ग्रामपंचायतकडे देणे आवश्यक होते. त्यासाठी ठेकेदाराने वारंवार मंगल यांची भेट घेऊन मूल्यांकन व ना हरकत प्रमाणपत्राची मागणी केली.

मूल्यांकन आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मंगल याने ठेकेदाराकडे स्वत:साठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्याचबरोबर उपअभियंता कांबळे यांना दीड लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. बिल मंजूर होण्यापूर्वी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्याने मंगल आणि कांबळे या दोघांनी ठेकेदाराकडून १ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश घेतला. यानंतरच त्यांनी मूल्यांकन व ना हरकत पत्रावर मागील तारिख टाकून सही केली. याबाबत ठेकेदारांनी २५ मे २०१८ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ ऑगस्टला शिरोळ पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागातून शाखा अभियंता तुकाराम मंगल यास सोमवारी अटक केली. उपअभियंता अशोक कांबळे याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग पुणे येथे महिन्यापूर्वी बदली झाली आहे. एसीबीच्या पथकाने पुण्यात जाऊन कांबळे यास अटक केली. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने गुन्हा दाखल करून अटक करण्याची कारवाई झाल्याने शिरोळ पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली.

..........

कोट

' पाणी पुरवठा योजनेचे बिल काढण्यासाठी मूल्यांकन आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोन्ही संशयितांनी लाच मागितली होती. दोन्ही संशयितांना रंगेहात पकडण्याचा आमचा प्रयत्न होता, मात्र ऐनवेळी त्यांनी रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने अटकेची कारवाई केली आहे.

गिरिष गोडे - उपअधीक्षक, एसीबी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईतील मोर्चात मंगळवार पेठेची ताकद दिसणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी मुंबईत काढण्यात येणाऱ्या वाहन मोर्चास मंगळवार पेठेतील प्रत्येक गल्लीतून एक वाहन पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवार पेठ डाकवे गल्लीतील काशिद हॉल येथे मराठा समाजातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब लबेकर पाटील होते.

बैठकीत मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी आरक्षण अंमलबजावणीस विलंब करण्याऱ्या राज्य सरकारवर कार्यकर्त्यांनी टीका केली. शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजीराव जगदाळे यांनी आरक्षण मागणीसाठी युवकांनी आत्महत्या करुन जीवन संपवू नका असे आवाहन केले. ते म्हणाले, 'आरक्षण देण्याबाबत सरकारची मानसिकता दिसून येत नाही हे गेल्या चार वर्षांत दिसले आहे. मुंबईचा मोर्चा शांततेत काढावा. कोणतेही गालबोट लावू नये.'

'मराठा आरक्षण आंदोलनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील फूट पाडत आहेत,' असा आरोप अशोक पोवार यांनी केला. पोवार म्हणाले, 'सरकारने किती फूट पाडण्याच्या प्रयत्न केला तरी मराठा समाज एकी करुन राज्य सरकारवर दबाव आणून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यास भाग पाडेल.' जयकुमार शिंदे यांनी मुंबईतील आंदोलनातून सरकारला सळो की पळो करुन सोडले जाईल, असा इशारा दिला. आरक्षण मागणीसाठी आत्महत्या केलेल्या ३३ जणांच्या कुटुंबाना मराठा उद्योजकांनी दत्तक घ्यावे, असे आवाहन मनोज शिंदे यांनी केले. मोर्चासाठी तीन ते चार जणांची समिती नियुक्त करुन नियोजन करावे, अशी सूचना उद्योगपती चंद्रकांत जाधव यांनी केले. माणिक मंडलिक, राजू भोसले, किशोर डवंग, दीपक गौड, महादेवराव जाधव, किसन कल्याणकर यांची भाषणे झाली. यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, अशोक पाटील, गजानन यादव, किसनराव काशीद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास करवीर तालुक्यातील उचगाव (ता. करवीर) येथील यादव ग्रुप, म्हाळुंगे ग्रामपंचातीचे सदस्य व कार्यकर्ते, कृषी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी, कागल तालुक्यातील लिंगनूर यांनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजी चौकातील सकल मराठा शौर्य पीठाच्या धरणे आंदोलनाला शहर व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी भेट दिली. माळ्याची शिरोली (ता. कागल) येथील ९२ वर्षीय दत्तू विठू पाटील यांनी थरारक मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करुन आंदोलनात सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गटशिक्षण अधिकारी कमळकरांची बदली?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

वंदूर (ता. कागल) येथे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणी तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी गणपती कमळकर यांची जिल्हा परिषद मुख्यालयात बदली करण्याचा प्रस्ताव असल्याचे समजते. याबाबतचे येत्या दोन दिवसांत असा आदेश काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वंदूरचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांनी सिद्धनेर्ली येथे राहत्या घरी १८ ऑगस्ट रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार वंदूरमधील अमर आवळे, अनिल कांबळे, अमर कांबळे, उत्तम कांबळे आणि दयानंद कांबळे यांनी शाळेच्या स्वच्छतागृहाचे दर्जेदार काम झाले नाही, असा ठपका ठेवत मोरे यांच्याकडे खंडणी मागितली होती. शिवाय जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रार केली. वरिष्ठांचे अहवाल व्यवस्थित असताना तीन महिने छळ झाल्याने मोरे यांनी आत्महत्या केल्याचा ठपका ठेवला आहे. याबाबत वंदूर आणि सिध्दनेर्ली ग्रामस्थांनी निषेध व्यक्त करुन संशयितांना जबर शासन करण्याची मागणी केली आहे. मात्र संशयित मोकाट आहेत.

दरम्यान, गटशिक्षण अधिकारी कमळकर यांच्याविरोधात बंडाचा झेंडा घेतला आहे. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने त्यांच्या बदलीची मागणी केली आहे. दरम्यान, कागलचे गटशिक्षण अधिकारी कमळकर यांचा पदभार दुसर्‍याला देऊन त्यांची जिल्हा परिषद मुख्यालयात बदली करण्याचा प्रस्ताव आहे. अद्याप यासंदर्भात प्रक्रिया झालेली नाही. याबाबत दोन दिवसांत प्रक्रिया होईल असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवृत्त...काशीबाई घोडके

$
0
0

काशीबाई घोडके

कोल्हापूर : राजारामपुरी १२ वी गल्लीतील काशीबाई कृष्णा घोडके (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातंवडे असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कपडे खरेदीचे पैसे मागितल्याने मारहाण

$
0
0

(फोटो आहेत)

दोघे अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिरजकर तिकटी येथील जॉनी पॅशन वर्ल्ड या कापड दुकानात दुकानदारास धक्काबुक्की करून ४८०० रुपयांची कपडे घेऊन जाणाऱ्या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. स्वप्निल जगन्नाथ साळोखे (वय २६) आणि अभिजित माणिकराव कुदळे (२५, रा. दोघेही पाण्याचा खजिना, नंगीवली चौक) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. जबरदस्तीने कपडे घेऊन जाण्याचा प्रकार रविवारी (ता. २६) दुपारी घडला होता. याबाबत दुकानातील कामगार संकेत शिवाजी कोळी (२१, रा. धोत्री गल्ली, गंगावेश) याने फिर्याद दिली आहे.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजकर तिकटी येथे राजेंद्र गवळी-भोसले यांचे जॉनी पॅशन वर्ल्ड हे कापड दुकान आहे. या दुकानात संकेत कोळी हा काम करतो. या दुकानात रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास दोन तरुण आले. त्यांनी एक जीन्स पॅन्ट आणि तीन शर्ट अशी ४८०० रुपयांची खरेदी केली. कोळी याने पैशांची मागणी केल्यानंतर या दोघांनीही शिवीगाळ व धक्काबुक्की करीत पैसे देण्यास नकार दिला. 'आम्ही कोण आहे, तुला माहिती आहे काय? यापुढे पैसे मागितलेस तर तुला ठार मारतो,' अशी धमकी देऊन जबरदस्तीने कपडे घेऊन निघून गेले. कोळी याने दुकानमालकांना घटनेची माहिती दिली. यानंतर सोमवारी दुपारी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. नंगीवली तालीम येथून दोघांना ताब्यात घेतले. दोघांनीही जबरी चोरीची कबुली दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील कपडे जप्त केले.

अटकेतील दोघांनी आणखी काही दुकानदारांना धमकावून त्यांच्याकडून पैसे आणि वस्तू उकळल्याचा पोलिसांना संशय आहे. यानुसार त्यांची चौकशी सुरू असल्याचे निरीक्षक मानसिंग खोचे यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सरोजिनी चव्हाण, पोलिस नाईक एकनाथ चौगले, सचिन देसाई, गजानन परीट आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी विहीर पाणी करास विरोध

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भूजल अधिनियम २०१८ च्या सुधारित मसुद्यातील तरतुदीत असलेल्या खासगी विहीर, विंधन विहिरीवरील पाण्यावर कर आकारण्यास येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहातील कार्यशाळेत शेतकऱ्यांनी मंगळवारी जोरदार विरोध केला. यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अधिनियमावरील हरकती, सूचना लेखी स्वरूपात ३१ ऑगस्टअखेर द्याव्यात, असे आवाहन केले.

वरिष्ठ भूवैज्ञानिक हृषिराज गोसकी यांनी अधिनियमातील तरतुदींची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, 'विहिरीमधून शेती किंवा औद्योगिक वापरासाठी केलेल्या पाण्यावर महसूल विभागामार्फत कर बसविण्यात येईल. शंभर चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम असल्यास पाऊस पाणी साठवण संरचना सक्तीची आहे. याशिवाय बांधकामास मान्यता दिली जाणार नाही. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील विहीर, विंधन विहिरीची नोंदणी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे १८० दिवसांत करणे बंधनकारक आहे. अर्ज केल्यानंतर ९० दिवसांत उपजिल्हाधिकाऱ्यांकडून विहीर नोंदणी प्रमाणपत्र मिळणार आहे. २०० फूट खोलीची विहीर खोदण्यास परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त खोलीची विहीर केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच खोदण्यास परवानगी देण्यात येणार आहे.'

शेतकरी संघटनेचे अॅड. माणिक शिंदे यांनी अधिनियम शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, 'शेतीमालास हमीभाव नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे तो आत्महत्या करीत आहे. अशावेळी शेतीसाठीच्या पाण्यावर कर वसुली करणे अन्यायकारक आहे. अशा भूजल अधिनियमाचा निषेध करतो.'

शेतकरी अण्णासाहेब पाटील म्हणाले, 'पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी आमदार, खासदार फंडातून निधी मिळावा. शेतीसाठी वापरलेल्या पाण्यावर कर लावू नये.' क्रेडाईचे संचालक आदित्य बेडेकर म्हणाले, 'शहरात १०० चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असल्यास पाऊस पाणी साठवण संरचना करण्याची सक्ती जाचक आहे.' जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील म्हणाले, 'जेथे अधिक पाणी उपलब्ध आहे, तेथे बचतीचे आणि जिथे टंचाई आहे, तिथे वापरण्यावर निर्बंध आणण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जलसाक्षरता अभियान राबवावे.'

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, 'भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी भूजल अधिनियमातील तरतुदीची अंमलबजावणी करावीच लागेल. अधिनियमातील कोणत्या तरतुदींवर आक्षेप आहेत, ते नेमकेपणाने हरकतींवर नोंदवावे.'

यावेळी भूजल सर्वेक्षण ग्रामविकास यंत्रणेचे उपसंचालक रमेश देशपांडे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासह महसूल, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

००००

चौकट

हरकती नोंदविण्यासाठी

हरकती आणि सूचना असल्यास त्या अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सातवा मजला, गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत संकुल, क्रॉफर्ड र्मार्केटजवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई - ४००००१ यांच्याकडे लेखी किंवा psec.wssd@maharashtra.gov.in या ई-मेलवर ३१ ऑगस्टपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी सुभेदार यांनी केले.

००००

सीईओंशी चकमक

अॅड. शिंदे यांनी भूजल अधिनियमाचा निषेध केला. हा संदर्भ घेत सीईओ मित्तल यांनी भाषणबाजी नको, नेमक्या कोणत्या मुद्यास विरोध आहे, ते लेखी द्या, अधिनियमाची अंमलबजावणी करावीच लागेल, असे सांगितले. त्यावेळी अॅड. शिंदे यांनी माझ्यावर आरोप करू नका, असे सांगितले. तेव्हा अॅड. शिंदे आणि मित्तल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार यांनी हस्तक्षेप केले.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

गणेशोत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिल्याच्या कारणातून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भांडी व्यापाऱ्याला बेदम मारहाण करीत दुकान पेटविण्याची धमकी देणाऱ्या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवजित चव्हाण व विशाल सोनीकर अशी त्यांची नावे आहेत.

या प्रकरणी दुकानदार चंपालाल बाबूलाल शहा (वय ४८, रा. पवार माळ) यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नवजित चव्हाण व विशाल सोनीकर यांच्यासह बारा जणांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. येथील शिवाजी पुतळा परिसरात चंपालाल शहा यांचे भांड्याचे दुकान आहे. सोमवारी रात्री याच परिसरातील संस्कार फ्रेंडस सर्कल गणेशोत्सवाचे दहा ते बारा कार्यकर्ते त्यांच्या दुकानात आले. त्यांनी त्यांच्याकडे गणेशोत्सवासाठी एक हजार रुपये वर्गणीची मागणी केली. त्यावर शहा यांनी आता पैसे नाहीत, सकाळी देतो, असे सांगितले असता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहा यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. वर्गणी दिली नाही तर दुकान पेटवतो, अशी धमकी देत निघून गेले. याप्रकरणी शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चव्हाण आणि सोनीकर यांच्यासह दहा ते बाराजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images