Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पालकमंत्र्याच्या उपस्थितीत विद्यापीठात आज बैठक

$
0
0

कोल्हापूर : राजर्षी शाहू शिष्यवृत्ती योजनेसह विद्यार्थी केंद्रीत उपक्रमांसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात सोमवारी (ता. २७) बैठक होणार आहे. बैठकीत पालकमंत्री पाटील हे विद्यापीठाच्या विविध योजना, शिष्यवृत्तीसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विद्यापीठाच्या नॅनो टेक्नॉलॉजी विभागाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता ही बैठक होईल. राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवेश फी सवलत आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरात अडकलेल्या वृध्दाला जीवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगेच्या पुरात अडकलेल्या स्मृतिभ्रंश झालेल्या वृद्धाला जीवनज्योत आपत्कालीन संघटनेच्या जवानांनी जीवदान दिले. सुधीर नारायण जोशी (वय ७५, रा. पहिली गल्ली, शाहूपुरी) अशी जीवदान मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

गांधीनगरजवळ पंचगंगेच्या नदीपात्रात एक व्यक्ती झाडावर अडकली होती. या व्यक्तीने आरडाओरड सुरू केल्यावर स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. त्यांनी महापालिकेच्या आपत्कालिन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर जीवनज्योत आपत्कालीन संघटनेच्या जवानांनी बोटीतून झाडाजवळ जाऊन अडकलेल्या व्यक्तीची सुखरुप सुटका केली. संबधित व्यक्तीला नाव विचारले असता त्यांना ते सांगता आले नाही. पण, त्यांनी शाहूपुरी पहिल्या गल्लीतील पत्ता सांगताना घरनंबर सांगितला. पोलिसांनी परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. नगरसेवक चव्हाण सीपीआरमध्ये आल्यावर संबधित व्यक्तीची ओळख पटताच त्यांनी जोशी यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

जोशी यांना थोडा स्मृतिभ्रंशाचा त्रास असून रविवारी सकाळी ते शाहूपुरीतील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गेले होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. जोशी हे उचगाव येथील बहिणीकडे रक्षाबंधन कार्यक्रमासाठी जाणार होते. सकाळी दहा वाजेपर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला होता. नंतर ते नदीपात्रातील झाडावर अडकल्याचे नातवाईकांना कळाले. जोशी नदीत कसे पडले? ते झाडात कसे अडकले? याचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांजा बाळगणाऱ्या दोघांना अटक

$
0
0

कोल्हापूर : राजारामपुरी माळी कॉलनी येथील महानगरपालिकेच्या मैदानात गांजा बाळगणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. अभिषेक किरण मुळेकर (वय २६, रा. माळी कॉलनी), प्रसाद अरुण हट्टीकर (वय २४, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) अशी संशयितांची नावे आहेत. गेल्या आठ दिवसात गांजाप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी तिसरी कारवाई केली आहे.

राजारामपुरी पोलिसांनी सांगितले की, माळी कॉलनी परिसरातील मैदानात काही तरुण रात्री गांजा ओढतात, अशी माहिती राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुंडाविरोधी पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी परिसरात सापळा रचला. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास माळी गांजा ओढणाऱ्या अभिषेक मुळेकर व प्रसाद हट्टीकर यांना ताब्यात घेऊन अटक केली. दोन्ही तरुणांकडे गांजा कोठून आणला याचा तपास सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत राजारामपुरी पोलिसांनी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या तरुणांवर केलेली ही तिसरी कारवाई आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाड चौकात एकाची आत्महत्या

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील लाड चौक येथील प्रसाद वसंत माने (वय ३५) यांनी घरातील वाशाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ते अविवाहित होते. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या आत्महत्येची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ दिवाळीपर्यंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजर्षी शाहू महाराजांवरील पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. त्यात शाहू महाराजांविषयीच्या आठवणी, महत्वाचे पत्रव्यवहार, आदेश, जाहीरनामे, छायाचित्रांचा सामावेश आहे. हा ग्रंथ १५०० ते १६०० पानांचा असेल. त्याच्या मुद्रणास प्रारंभ झाला असून दिवाळीपर्यंत ग्रंथाची छपाई पूर्ण होईल. त्यानंतर पुण्यात आयोजित कार्यक्रमात त्याचे प्रकाशन केले जाईल,' अशी माहिती ग्रंथाचे संपादक, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी रविवारी दिली. येथील शाहूपुरीतील भारती मुद्रणालयात माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते 'राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथा'च्या मुद्रणास प्रारंभ झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. मुद्रणालयात हा कार्यक्रम झाला.

डॉ. पवार म्हणाले, 'महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे इतिहास संशोधन व लेखन केले जाते. प्रबोधिनीतर्फे राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाची तिसरी विस्तारित आवृत्ती प्रकाशित होत आहे. या ग्रंथात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पी. सी. पाटील, डॉ. रावसाहेब कसबे, भाई वैद्य, डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. एन. डी. पाटील, खासदार शरद पवार आदी २५ मान्यवरांचे शाहूंच्या कार्यावरील लेख आहेत. यापूर्वीच्या ग्रंथात राहून गेलेले, शाहूंच्या कामगिरीचे सविस्तर तपशील ग्रंथात असतील. ग्रंथास पुण्याच्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीने अर्थसाहाय्य केले. त्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती, सचिव मालोजीराजे छत्रपती यांचे सहकार्य लाभले. त्यामुळे ग्रंथाची मूळ किंमत १५० रुपये असताना सवलतीच्या दरात ७५० रुपयांना ग्रंथ उपलब्ध करून दिला जाणार आहे. पहिल्या टप्यात १० हजार प्रतींची छपाई करण्यात येईल.'

माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, 'राजर्षी शाहू महाराजांवर अनेक पुस्तिका, ग्रंथ प्रकाशित झाले. त्यामध्ये नसतील इतके विस्तारित, सखोल संदर्भ राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथात आहेत. शाहू महाराजांचे विचार, कामगिरी जगभर पोहोचवण्यासाठी विविध भाषांत ग्रंथ तयार करण्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार प्रयत्नशील आहेत. नव्या पंचखंडात्मक स्मारक ग्रंथास सर्व ती मदत केली जाईल. ग्रंथाची छपाई पूर्ण झाल्यानंतर पुण्यात प्रकाशन सोहळा होईल. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे शाहू महाराजांची कामगिरी तरुणांसमोर नेण्याचे महत्वाचे काम केले जात आहे. त्यास आमचे पाठबळ राहील.'

डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, 'शाहूंच्या कार्यावरील पंचखंडात्मक स्मारक ग्रंथात शाहू महाराज यांच्याविषयीच्या पुरातत्व विभागाकडून मिळालेल्या मूळ महत्वाच्या कागदपत्रांचा सामावेश आहे. सर्वसामान्यांपर्यंत शाहूंचे कार्य पोहचवण्यासाठी हा ग्रंथ महत्वाचा ठरणार आहे. ग्रंथात शाहूंच्या कामगिरीविषयी अधिकाधिक माहितीचा भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासोबत मलाही ग्रंथाचे संपादन करण्याची संधी मिळाली.'

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, वसुधा पवार, डॉ. प्रकाश शिंदे, निहाल शिपूरकर, तनुजा शिपूरकर, पंडीत कंदले आदी उपस्थित होते.

००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाचे काम सुरू आहे. त्यात शाहूंच्या आठवणी, महत्वाचे पत्रव्यवहार, आदेश, जाहीरनामे, छायाचित्रांचा सामावेश आहे. हा १५०० ते १६०० पानांचा ग्रंथ असेल. त्याच्या मुद्रणास प्रारंभ झाला. दिवाळीपर्यंत या ग्रंथाच्या छपाईचे काम पूर्ण करून पुण्यात भव्य कार्यक्रम आयोजित करून प्रकाशन केले जाईल, असे प्रतिपादन ग्रंथाचे संपादक, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी रविवारी केले.

येथील भारती मुद्रणालयात माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्याहस्ते राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ मुद्रणास प्रारंभ करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रम ते बोलत होते. भारती मुद्रणालयात कार्यक्रम झाला.

डॉ. पवार म्हणाले, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे इतिहासाचे संशोधन व लेखन केले जाते. प्रबोधिनीतर्फे राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथाची तिसरी विस्तारित आवृत्ती प्रकाशित होत आहे. या ग्रंथात महर्षी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पी. सी. पाटील, डॉ. रावसाहेब कसबे, भाई वैद्य, डॉ. रघुनाथ माशेलकर, प्रा. एन. डी. पाटील, खासदार शरद पवार आदी २५ मान्यवरांचे शाहूंच्या कार्यावरील लेख आहेत. यापूर्वीच्या ग्रंथात राहून गेलेले शाहूंच्या कामगिरीचे सविस्तर तपशील ग्रंथात असतील. ग्रंथास पुण्याच्या ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीने अर्थसाहाय्य केले. त्यासाठी श्रीमंत शाहू छत्रपती, सचिव मालोजीराजे छत्रपती यांचे सहकार्य लाभले. यामुळे ग्रंथाची मूळ किंमत १५०० रूपये असतानाही सवलतीच्या दरात ७५० रूपयास उपलब्ध करून दिले जाणार आहे. पहिल्या टप्यात १० हजार प्रतींची छपाई करण्यात येईल.

माजी आमदार मालोजीराजे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्यावर अनेक पुस्तिका, ग्रंथ प्रकाशित झाले. त्यामध्ये नसतील इतके विस्तारित, सखोल संदर्भ राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथात आहेत. शाहू महाराजांचे विचार, कामगिरी जगभर पोहचवण्यासाठी विविध भाषेत ग्रंथ तयार करण्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार प्रयत्नशील आहेत. नव्या पंचखंडात्मक स्मारक ग्रंथास सर्व मदत केली जाईल. ग्रंथाची छपाई पूर्ण झाल्यानंतर पुण्यात भव्य असा प्रकाशन सोहळा घेतला जाईल. महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीतर्फे शाहू महाराज यांची कामगिरी तरूणांसमोर नेण्याचे महत्वाचे काम केले जात आहे. त्यास आमचे पाठबळ राहील.

डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, शाहूंच्या कार्यावरील पंचखंडात्मक स्मारक ग्रंथात शाहू महाराज यांच्याविषयीचे पुरातत्व विभागाकडून मिळालेल्या मूळ महत्वाच्या कागदपत्रांचा सामावेश आहे. सर्वसामान्यांपर्यंत शाहूंचे कार्य पोहचवण्यासाठी हा ग्रंथ महत्वाचा ठरणार आहे. ग्रंथात शाहूंच्या कामगिरीविषयी अधिकाधिक माहितीचा भर घालण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासोबत मलाही ग्रंथाचे संपादन करण्याची संधी मिळाली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार अॅड. श्रीपतराव शिंदे, वसुधा पवार, डॉ. प्रकाश शिंदे, निहाल शिपूरकर, तनुजा शिपूरकर, पंडीत कंदले आदी उपस्थित होते.

--------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज नगरप्रदक्षिणा

$
0
0

शिराळा : जोतिबा डोंगरावर सोमवारी (ता.२७) नगर प्रदक्षिणा निघणार आहे. श्रावण सोमवारी प्रदक्षिणा घातल्यानंतर चार धाम व काशी यात्रा केल्याचे पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा असल्यामुळे नगर प्रदक्षिणेला लाखो भाविक हजेरी लावतात. सकाळी नऊ वाजता जोतिबा मंदिरात अभिषेक आरती करून नगर प्रदक्षिणा गायमुखमार्गे मार्गस्थ होणार आहे. जोतिबा डोंगराभोवती २५ कि.मी. प्रवास करीत सायंकाळी सात वाजता नगरप्रदक्षिणा यमाई मंदिरात येणार आहे. येथे आरती करून सुंठवडा वाटपाने नगर प्रदक्षिणेची सांगता होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहार स्वयंपाकीमहिलांना अॅपरन देणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

'शालेय पोषण आहार योजनेतील स्वयंपाकी व मदतनीस यांना मानधनवाढीसाठी पाठपुराव्याबरोबरच स्वयंपाकी महिलांना अॅपरन आणि हेअर कव्हर पुरवू. अंगणवाडीतील मुलांना स्वच्छ आहार मिळावा यासाठी स्वंयपाक घर व परिसर स्वच्छतेवर भर द्या. सर्व शाळांमध्ये वजनकाटे बसविण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करणार आहे. शालेय पोषण आहार योजनेत भ्रष्टाचार आढळल्यास कडक कारवाई केली जाईल,' असे प्रतिपादन सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.

करवीर पंचायत समितीकडून आयोजित कसबा बीड (ता. करवीर) येथील महिला महाविद्यालयाच्या सभागृहात 'अन्नसुरक्षा व आरोग्यशास्त्र' कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यशाळेत परिसरातील अडीचेहून अधिक स्वयंपाकी व मदतनीस महिला उपस्थित होत्या.

जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष सातपुते म्हणाले, 'अंगणवाडीतील मुलांना सकस आहाराची कमतरता भासू नये यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी शाळेत अन्नदान करण्यात पुढाकार घ्यावा. आहार योजनेतील ठेकेदारानी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी.'

कार्यशाळेस पंचायत समिती सदस्या अर्चना खाडे, शालेय पोषण आहार करवीर पंचायत समितीच्या अधीक्षक वसुंधरा कदम-पाटील, मुख्याध्यापक पी. आर. सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. सावरवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कोळी यांनी स्वागत केले. विजय कांबळे यांनी आभार मानले.

००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदुराव बरगे अध्यक्ष

$
0
0

फोटो...

राधानगरी : बरगेवाडी (ता. राधानगरी) येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी हिंदुराव गणपती बरगे, तर उपाध्यक्षपदी शिवाजी गोविंद बरगे यांची निवड झाली. पोलिसपाटील उदय बरगे यांच्या प्रमुख उपस्थित निवडी पार पडल्या. यावेळी अध्यक्ष बरगे याचा सत्कार माजी अध्यक्ष शहाजी बरगे यांनी केला. यावेळी तंटामुक्त समिती सदस्य तानाजी बरगे, आंनदा बरगे, पंडित बरगे, देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष मारुती बरगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वडिलांवर हल्ला

$
0
0

आजरा : पैसे दिले नाहीत या कारणावरून मेढेवाडी (ता. आजरा) येथे मुलाने वडिलांना कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पांडुरंग राणे (वय ४७, रा. मेढेवाडी) यांनी मुलगा अमोल राणे याच्याविरोधात रविवारी आजरा पोलिसांत फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय मदत करा’

$
0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

'गोरगरीब रुग्ण औषधोपचाराअभावी दगावू नये यासाठी कोल्हापुरात वैद्यकीय सेंटर उभारले असून, कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य रुग्णांचा शोध घेऊन त्यांना मदत करून त्यांचे हित जोपासावे,' असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. हातकणंगले येथे शिक्षक भवनमध्ये तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी होत्या.

मंत्री पाटील म्हणाले, 'केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार सर्वसामान्यांसाठी मुद्रा लोनसह अन्य कर्जपुरवठा करण्यास राष्ट्रीयीकृत बँकांनी नकार दिल्यास संबंधित बँकांवर तत्काळ कारवाई केली जाईल. राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे.'

भाजपचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी स्वागत केले. संवाद मेळाव्याची सुरुवात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.

संवाद मेळाव्यात गावागावांत झालेली विकासकामे व तेथील समस्यांवर कार्यकर्त्यांशी सवांद साधण्यात आला. यावेळी नेज, अतिग्रे, आळते, नरंदे, पट्टणकोडोली, साजणी, मजले, लक्षीवाडी, कुंभोज, हातकणंगले येथील सरपंच, उपसरपंच यांनी गावांचा विकास आराखडा मांडून गावातील समस्यांचा आढावा घेतला. यामध्ये रस्ते, पाणी, कर्जमाफी, उज्ज्वला गॅस, ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून होणाऱ्या कामांचा आढावा, सरकारी विम्यांचे फायदे, शेतकरी विमा, अटल पेन्शन योजना शैक्षणिक कर्ज या कर्जाला सरकारची हमी मिळते याबाबतची माहिती, घरकुल योजनेंतर्गत प्रत्यक्ष निपटारा किती झाला, याबाबत चर्चा झाली.

यावेळी पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, जि.प. सदस्य प्रसाद खोबरे, अशोकराव माने, परशुराम चव्हाण, वडगावचे नगराध्यक्ष मोहन माळी, हुपरीच्या नगराध्यक्षा जयश्री गाट, जनता उद्योग समूहाचे अण्णासाहेब शेंडूरे, अविनाश बनगे, आदींसह तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरळमध्ये व्हाइट आर्मीचे रिलिफ कँप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोल्हापूर येथील व्हाइट आर्मीचे जवान दाखल झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून रिलीफ कँपमध्ये व्हाइट आर्मीचे जवान अव्याहतपणे मदत करत आहेत.

शनिवारी केरळवासियांचा 'ओणम' सण होता. या सणानिमित्त व्हाइट आर्मीच्या वतीने अल्लपुझा गावाच्या परिसरात रिलिफ कँप राबवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले चार ट्रक धान्य व साहित्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात आले. वैद्यकीय बोटीतून दिवसभर हजारो रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी सफाई मोहीम राबवली. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज व उज्ज्वल नागेशकरांच्या नेतृत्वाखाली शंभर लोकांचे वैद्यकीय व स्वंयसेवक मदत करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... अन् त्यांनी शिवरायांना वंदन केले

$
0
0

युवराज पाटील, कुडित्रे

छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सर्वजण नतमस्तक होतात. शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातील छत्रपती शिवरायांच्या अर्ध पुतळ्याजवळून दररोज शाळेला ये-जा करताना 'त्या' दोघीही त्यांना वंदन करतात. मात्र, आज काहीतरी राहिले आहे असे त्यांना वाटले. शिवरायांच्या पुतळ्याच्या गळ्यात हार नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता या दोन्ही शाळकरी मुलींनी शेजारच्या एका दुकानातून हार खरेदी केला आणि मनोभावे महाराजांना वंदन केले. निवृत्ती चौकातील ही घटना शिवरायांवर प्रेम करणाऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून येईल अशीच आहे. श्रृती तानाजी धोत्रे व तेजस्विनी तानाजी वाडकर अशी त्या दोन मुलींची नावे आहेत.

शृती ही करवीर तालुक्यातील पिरवाडीची. तेजस्विनी ही फुलेवाडीची राहणारी आहे. दोन्ही मुली महाराष्ट्र गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावीत शिकतात. श्रृती एसटीने तर तेजस्विनी केएमटीने शाळेला येते. या मार्गावरच शिवाजी पेठेतील शिवरायांचा अर्ध पुतळा आहे. दररोज या पुतळ्याला नमस्कार करूनच या दोघी शाळेला जातात. सोमवारी सकाळी खासगी क्लास करून शाळेला जात असताना नेहमीप्रमाणे नमस्कारासाठी श्रृतीची नजर शिवरायांच्या पुतळ्याकडे वळली. मात्र महाराजांच्या गळ्यात पुष्पहार नसल्याचे तिला दिसले. तिने आपली वर्गमैत्रीण तेजस्विनीला ही गोष्ट सांगितली. दोघींनी स्वत:कडील पैसे काढून पुष्पहार खरेदी करण्याचे ठरवले. चाळीस रुपये देऊन पुष्पहार खरेदी केला आणि अर्पण केला. दरम्यान, ही घटना अनेकांच्या मोबाइलमध्ये कैद झाली आणि बघता बघता सोशल मीडियावर पसरली. शाळकरी मुलींनी शिवरायांप्रति दाखवलेला आदरभाव सर्वांनाच भावला आणि त्यातून त्यांच्यावर अभिनंदचा वर्षाव झाला.

छत्रपती शिवराय आमचे आदर्श आहेत. ते चारित्र्यसंपन्नतेचा मानदंड आहे. याच भावनेतून महाराजांच्या गळ्यात हार नसल्याचे पाहून मन हेलावले. त्यामुळे मी आणि मैत्रिणीने हार आणला आणि त्यांना नमन केले.

- श्रृती धोत्रे, पिरवाडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यात सातशे किमीचे रस्ते तातडीने करणार

$
0
0

जिल्ह्यातील ११८ किलोमीटरचा समावेश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या सन २०१९-२० च्या आराखड्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मान्यता दिली. जिल्ह्यातील एकूण ११८ किलोमीटर लांबीच्या ७२ कामांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, विविध योजनांतून राज्यातील सातशे किलोमीटरचे रस्ते तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. हे रस्ते दर्जेदार करण्याबरोबरच ते वेळेत पूर्ण होण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील हे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीमध्ये आमदार अमल महाडिक व आमदार सुरेश मिणचेकर हे सदस्य आहेत. सोमवारी या समितीची बैठक झाली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांचा दर्जा, रस्त्यांची बळकटी करणे हा मुख्य उद्देश आहे. जिल्हा परिषदेकडील व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती करणे व त्याचा दर्जा सुधारणे हा मुख्य हेतू ठेवून त्याचे कामकाज सुरू झाले आणि ग्रामीण भागातील रस्ते अत्यंत चांगल्या दर्जाचे बांधण्यास प्रथमच सुरुवात झाली. जिल्हा मार्गाचा दर्जा सुधारणे व डांबरीकरण यातून केले जाते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाते. या योजनेतून २०१५ व १६ मध्ये ३८ किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून त्यातील तीन कामे पूर्ण झाली आहेत, तर एक काम अंतिम टप्प्यात आहे. दोन वर्षांपूर्वी मंजूर झालेली १६ पैकी दहा कामे पूर्ण झाली असून यावर्षी ११८ किमीचे रस्ते तातडीने करण्यात येणार आहेत. यातील ६० किमी लांबीच्या कामांची निविदा काढण्यात आली असून उर्वरित ५८ किमी रस्त्याचा प्रस्ताव तयार आहे. ग्रामसडक योजनेतून ४९१ किमी रस्ते तयार करण्याचे नियोजन आहे, यासाठी २२३ कोटी निधी अपेक्षित आहे. हा निधी जिल्हा नियोजन समिती व राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त संशोधन व विकास कार्यक्रमातून २०७ किलोमीटर रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. हे सर्व रस्ते तातडीने करण्यात येणार असून ते दर्जेदार व्हावेत यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

कोट

'दळणवळणाचा दर्जा चांगला असल्यास त्या ठिकाणी विकासाची मोठी संधी उपलब्ध होते ; हा उद्देश ठेवूनच या ग्रामीण भागाचे रस्ते चांगल्या पद्धतीने तयार करण्याचे काम राज्य सरकार चार वर्षांपासून करत आहे आणि लवकरच यातून ग्रामीण भागाचा विकास साधला जाईल.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संरक्षक भिंतीवर होणार ‘स्वच्छ कोल्हापूर’ चे दर्शन

$
0
0

अल्पसंख्याक विद्यार्थी वसतिगृहासाठी निधी देण्याची पालकमंत्र्याची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवाजी विद्यापीठातर्फे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या शंभर विद्यार्थी क्षमतेच्या वसतीगृहासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. या कामाला गती लाभावी यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत विशेष बैठक घेऊ', अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच विद्यापीठ परिसराभोवती उभारलेल्या संरक्षक भिंतीवर 'स्वच्छ व सुंदर कोल्हापूर'चे चित्रमय दर्शन घडवून कोल्हापूरच्या सुशोभिकरणात भर घालावी, अशी सूचना त्यांनी केली. प्रशासनाने त्याला होकार दर्शविला.

'स्वच्छ व सुंदर कोल्हापूर'चे चित्रमय दर्शन घडविण्यासाठी कलानिकेतन कॉलेजचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील निधी व इतर मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचेही पाटील यांनी सांगितले. पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीमध्ये विद्यापीठात सोमवारी बैठक झाली. या बैठकीत कुलगुरू देवानंद शिंदे यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात राज्य सरकारकडून घोषित निधी लवकर विद्यापीठाला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्ती केली.

विद्यापीठाने प्रायोगिक तत्वावर तीन जिल्ह्यातील दुर्गम, अतिदुर्गम भागातील एक हजाार विद्यार्थिनींच्या एसटी पासचा वार्षिक खर्च करण्याची योजना आखली आहे. या योजनेच्या पहिल्या वर्षासाठीचा आवश्यक निधी देऊ. तसेच विद्यापीठाने दुर्गम भागातील ५० कॉलेजमध्ये स्वच्छतागृहे उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या संदर्भातील अंतिम प्रस्ताव विद्यापीठाने तयार करुन सादर करावा, असेही पालकमंत्र्यांनी सुचविले. बैठकीला प्रकुलगुरू डी.टी. शिर्के, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त अभिजित चौधरी, कुलसचिव विलास नांदवडेकर, वित्त व लेखाअधिकारी व्ही.टी.पाटील, शैक्षणिक अधिकारी प्राचार्य डी. आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, उपकुलसचिव डॉ. जी. एस. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची संततधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची संततधार कायम राहिली. काही काळ जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने शहरातील सर्वच रस्त्यावर पाणीच पाणी दिसत होते. येथील पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २० फूट ५ इंच आहे. जिल्ह्यातील एकूण २६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. या बंधाऱ्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात आली आहे. सर्वच प्रमुख धरणे भरली असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी दिवसभर पाऊस पडत राहिला. सकाळी, दुपारी आणि सायंकाळीही जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील महाव्दार रोड, शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, गांधीनगर परिसरातील फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. दुचाकीस्वार, पादचाऱ्यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट परिधान केल्याचे दिसत होते. सततच्या पावसामुळे प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.

तळकोकण, धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पाऊस पडत राहिला. परिणामी पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि भोगावती नदीवरील हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, वारणा नदीवरील चिंचली, तांदुळवाडी, दुधगंगा नदीवरील सुळंबी, सुळकूड, सिद्धनेर्ली, बाचणी, दत्तवाड, कसबा वाळवे, तुरंबे तर कासारी नदीवरील यवलूज आणि वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे, चिखले बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

कोयना धरणातून ३८ हजार २९९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. पाणीपातळी वाढल्याने पंचगंगा नदीकाठावरील ऊस, भात पिके पाण्याखाली आहेत. त्यांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे आतंरमशागतीची कामे थांबली आहेत. गगनबावडा, राधानगरी, चंदगड, शाहूवाडी तालुक्यातील सर्वच पिके अती पावसाने धोक्यात आली आहेत.

सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात

सकाळी आठपर्यंतच्या २४ तासातील पाऊस तालुकानिहाय मिलीमीटरमध्ये असा : हातकणंगले : २.८८, शिरोळ : २.४३, पन्हाळा :१२.८६, शाहुवाडी :१४.१७, राधानगरी :१५.५०, गगनबावडा : २७.५०, करवीर : ४.२७, कागल : ७. २९, गडहिंग्लज : ४, भुदरगड : ११.८०, आजरा : १५.२५, चंदगड : १८.६७.

राधानगरी तुडूंब

राधानगरी धरण पूर्ण भरले आहे. त्यात ८.३६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर कोयना धरणात १०४.८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

अन्य धरणांतील पाणीसाठा आणि कंसात क्षमता : तुळशी ३.४४ (३.४७१), वारणा ३३.०६ (३४.३९९), दूधगंगा २४.०३ (२५.३९५), कासारी २.६८ (२.७४), कडवी २.५२ (२.५१६), कुंभी २.६८(२.७१५), पाटगाव ३.७२ (३.७१६), चिकोत्रा १.३६ (१.५२२), चित्री १.८९ (१.८८६), जंगमहट्टी १.२२(१.२२४), घटप्रभा १.५६ (१.५६०), जांबरे ०.८२ (०.३००),कोदे ०. २१ (०.२१४).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरभाट पावसाने ‘किटवडे’ची दैना…!

$
0
0

आरभाट पावसाने 'किटवडे'ची दैना…!

परिसर अतिवृष्टीजन्य घोषित करण्याची ग्रामस्थांची मागणी

रमेश चव्हाण, आजरा

आजरा तालुक्यातील किटवडे परिसर दररोजच्या अतिवृष्टीजन्य पावसाने अक्षरशः त्रस्त झाला आहे. सततच्या आरभाट पावसाने येथील पिके कुजू लागली आहेत. अनेक ठिकाणी पिकांवर तांबेरा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. हे चित्र दरवर्षी अधोरेखित होत आहे. पण या अतिवृष्टीजन्य स्थितीची सरकार-दरबारी कुठेही नोंद घेतली जात नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे नुकसान भरपाईपासून हा परिसर वंचित राहतो आहे. यावर उपाय म्हणून हा परिसर अतिवृष्टीजन्य घोषित करा, येथील पावसाची वास्तव नोंद करा, अशी मागणी होत आहे.

तालुक्याचा किटवडे, आंबाडे, लिंगवाडी, पारपोली, खेडगे, घाटकरवाडी आदी गावांचा परिसर म्हणजे मुसळधार पावसाचे माहेरघर आहे. दरवर्षी येथे बेदरकार पाऊस होतो. पावसाळ्यात एखादा अपवादात्मक दिवसही कोरडा जात नाही. अक्षरशः तडाखेबंद पाऊसधारांतच येथील ग्रामस्थांना गुजराण करावी लागते. इथे पिकांसह जनावरांचा गवत-चारा अक्षरश: कुजतो. माणसांचे हात, पाय, बोटेही पावसाने भिजून कुजतात. साथीच्या रोगाने माणसे आणि जनावरे आजारी पडतात. अशातच जंगली जनावरांचा वावरही मुलामाणसांना भयभीत करतो. यामुळे दरवर्षी लाखोंचे नुकसान सोसण्याची वेळ या परिसरावर येते. यामुळेच हा भाग अतिवृष्टीजन्य घोषित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही प्रयत्न चालवले आहेत. त्याला यश येण्याची गरज आहे.

वस्तूस्थितीजन्य पर्जन्यनोंद नाही

किटवडे परिसर अगदी कोकणालगत आंबोली व कावळेसादच्या दऱ्यांच्या आसपास वसल्याने येथील भौगोलिक रचनाच वेगळी आहे. कोकणाच्या समुद्रकिनाऱ्यावरून घोंघावत येणारा वारा कोणतीही आडवण नसल्याने थेट या परिसराकडे येतो. आणि पावसाळ्यामध्ये वाऱ्यासोबतचे ढग संततपणे कोसळवतो. अशा पावसाची मोजदाद ठेवल्यास, संपूर्ण राज्यातील मोठा पाऊस इथे आढळतो. ६५ मिमी पाऊस म्हणजे अतिवृष्टी. त्यामुळे सरकारी विभाग जागे होतात. किटवडे परिसरात वार्षिक सरासरी सहा ते आठ हजार मिमी पाऊस होतो. पण याची नोंद जलविज्ञान विभाग करते, जी शासन-दरबारी ग्राह्य मानली जात नाही आणि त्यामुळे नुकसान भरपाई मिळत नाही.

यंदाही विक्रमी उच्चांकी पाऊस…!

किटवडे पसिसरात १९८४ मध्ये झालेला ९ हजार मिमी पाऊस विक्रमी असल्याचे येथील जलविज्ञान केंद्र कर्मचारी रामचंद्र धोंडिबा सावंत सांगतात. पण यावर्षी ऑगस्टच्या मध्यापर्यंतच्या अडीच महिन्यांच्या कालावधीत येथे सुमारे साडेसहा हजार मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच इथे दररोज अतिवृष्टी होत आहे. अजून दोन महिने पाऊस होण्याचा अंदाज असल्याने यावेळी येथे विक्रमी पावसाचे संकेत आहेत.

आजऱ्यातील किटवडे-घाटकरवाडी अतिपावसाचा प्रदेश आहे. दररोज २५०-३०० मिमी म्हणजे महाबळेश्वरपेक्षाही मोठा पाऊस येथे होतो. पण, येथील पर्जन्यनोंद विचारात घेतली जात नसल्याने हा नुकसानग्रस्त परिसर भरपाईपासून वंचित राहतो. यासाठी आता या परिसराचा मध्य असलेल्या घाटकरवाडी येथे अत्याधुनिक पर्जन्यमापन केंद्र होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- प्रकाश आबिटकर, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संततधार पावसातही लिंगायत समाजाचे धरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लिंगायत संघर्ष समिती व जिल्हा लिंगायत समाजाच्यावतीने लिंगायत धर्माला अल्पसंख्याक धर्माचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सुरु असलेल्या धरणे आंदोलनाला संततधार पावसातही ग्रामीण व शहरातील कार्यकर्त्यांनी पाठिंबा देण्यासाठी गर्दी केली होती. आंदोलनाचा १३ दिवस होता. सोमवारी गडहिंग्लज तालुक्यातील कागल, मुत्नाळ,नूल, कडगाव, हातकणंगले तालुक्यातील माणगाव, शिरोली पुलाची, शिरोळ तालुक्यातील घोसरवाड, ऐनापूर गावातील ग्रामस्थांनी आंदोलनात सहभाग घेतला. प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस नगरसेवक तौफिक मुल्लाणी, शिवशंकर भस्मे, बी. एस. पाटील, तामगावचे सरपंच काकासाहेब पाटील, चेतन खोचगे, कडगावचे सरपंच संजय बटकडली यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दागिन्यांची पर्स लंपास

$
0
0

कोल्हापूर

सांगलीहून कोल्हापुरात आल्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकावर बसमधून उतरताना अज्ञात महिलेने प्रवासी वृद्धेची पर्स लंपास केली. या पर्समध्ये साडेसात तोळ्यांचे दागिने होते. हा प्रकार सोमवारी (ता. २७) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. याबाबत सुधा अजित हुंडेकरी (वय ६७, रा. नागाळा पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सुधा हुंडेकरी या कामानिमित्त सांगली येथे गेल्या होत्या. सोमवारी साडेचारच्या सुमारास त्या बसने कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकावर पोहोचल्या, बसमधून उतरताना पाठीमगील एका २० ते २५ वयोगटातील महिलेने हुंडेकरी यांच्या पिशवीतील पर्स लांबवली. या पर्समध्ये सात तोळ्यांचे सोन्याचे तोडे, अर्धा तोळ्यांचे मंगळसूत्र, मतदान ओळखपत्र होते. संशयित महिलेकडे अंदाजे एक वर्ष वयाची मुलगी होती, अशी माहिती फिर्यादी हुंडेकरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा संस्थांची मान्यता रद्द

$
0
0

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शाहू शिष्यवृत्ती योजनेवरुन शिक्षण संस्थांना सज्चड दम, प्रसंगी फौजदारी गुन्हाही दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ५० टक्के सवलतीत प्रवेश न देणाऱ्या कॉलेजिअस आणि शिक्षणसंस्थांची परवानगी रद्द केली जाईल, प्रसंगी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करू,' असा सज्जड दम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित बैठकीत दिला.

शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात सोमवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, आयुक्त अभिजित चौधरी, शिक्षण सहसंचालक अजय साळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदींच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागातील सभागृहात बैठक झाली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'वार्षिक आठ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे. योजनेंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश फीमध्ये ५० टक्केची सवलत आहे. त्यानुसार शैक्षणिक संस्था व कॉलेजिअसनी निम्मी प्रवेश फी भरुन प्रवेश देणे बंधनकारक आहे. शिक्षण शुल्क योजनेच्या अंमलबजावणीत टाळाटाळ करणाऱ्या संस्थांची गय केली जाणार नाही. विद्यापीठाने कोल्हापूर, सांगली, आणि सातारा जिल्ह्यातील शाहू शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा वस्तुस्थितीविषयक अहवाल येत्या आठ दिवसात तयार करावा. आर्टस, कॉमर्स, सायन्ससह इंजिनीअरिंग, तंत्रनिकेतन तसेच मेडिकल कॉलेजच्या विविध शाखा, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची माहिती सादर करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के फी भरली आहे, त्यातील ५० टक्के फी संबंधित विद्यार्थ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला जाईल.'

बैठकीच्या प्रारंभी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पवार व देवणे यांनी, 'विद्यार्थ्यांना आठ लाख रुपयांचा उत्पन्नाचा दाखला काढण्यात अडचणी उदभवत आहेत. दाखले काढण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने ते वेळेत उपलब्ध होत नाहीत. तहसीलदारांना विनाअट दाखले देण्याची सूचना करावी, तसेच तालुकानिहाय हेल्पलाइन सुरू करावी, त्यावर नियंत्रणासाठी स्वतंत्र अधिकारी नेमावा, 'असा मुद्दा मांडला. त्यावर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. बैठकीला कुलसचिव विलास नांदवडेकर, प्रकुलगुरु डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डी. आर. मोरे, वित्त व लेखाअधिकारी व्ही. टी. पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य अमित कुलकर्णी, शिवसेनेचे पदाधिकारी शिवाजी जाधव, दुर्गेश लिंगस, रवी चौगुले आदी उपस्थित होते.

.....................

जिल्हानिहाय स्वतंत्र पथके

विद्यार्थी केंद्रित विविध योजनांचे माहितीयुक्त फलक शिक्षण सहसंचालक कार्यालयाने कॉलेजच्या तर विद्यापीठाने कॅम्पसच्या दर्शनी भागात फलक स्वरुपात उभे करावेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. याप्रसंगी कुलगुरू शिंदे यांनी, शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी असे शैक्षणिक संस्थांना असे पत्राव्दारे कळवले आहे. प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र पथके, स्वतंत्र कक्ष स्थापन केल्याचे सांगितले. कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन केल्या आहेत. शिक्षण सहसंचालक साळी यांनी अनुदानित कॉलेजची माहिती संकलित केली जात असल्याचे सांगितले. प्रकुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, 'तीन जिल्ह्यातील ६१ कॉलेजपैकी २९ कॉलेजमधील माहिती उपलब्ध झाली आहे. त्या सर्व ठिकाणी फी सवलत दिली आहे.' त्यावर होमिओपॅथी, आयुर्वेदिक व विनाअनुदानित अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्थेतील स्थिती काय आहे अशी विचारणा झाली. पालकमंत्री पाटील यांनी राज्य सरकारने अशा अभ्यासक्रमांच्या दोन लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची ६०० कोटी रुपयांची फी भरल्याची माहिती दिली.

................

पंजाबराव देशमुख

वसतिगृहासाठी पुन्हा निविदा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंजाबराव देशमुख विद्यार्थी वसतिगृह सुरू केले आहे. वसतिगृहाची प्रवेश क्षमता ७२ इतकी आहे. मात्र १९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.वसतिगृह चालविण्यासाठी पाच संस्थांनी अर्ज केला होता. मात्र एकही संस्था त्यासाठी तयार नसल्याने पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनवर बंदीच्या मागणीविरोधात मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आम्ही सारे सनातन', 'सनातनला चिरडू पाहणाऱ्यांचा धिक्कार असो', अशा घोषणा देत सनातन संस्थेच्या समर्थनार्थ शहरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला मिरजकर तिकटी येथून सुरुवात झाली. तेथून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, बिंदू चौकमार्गे परत मिरजकर तिकटी चौकात येवून मोर्चाचा समारोप करण्यात आला.

यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक किरण दुसे म्हणाले, 'पुरोगामी संस्थांकडून डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सनातन संस्थेला बदनाम केले जात आहे. पुरोगामी चळवळींनी तपासाची दिशा भरकटवल्याने मारेकरी मोकाट आहेत. सनातनने काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये झालेला भ्रष्टाचार उघड केल्यानेच ते संस्थेवर बंदीची मागणी करत आहेत. गरळ ओकणाऱ्या पक्षांवर कारवाई न करता केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बंदीची मागणी केली जात आहे. सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा पुरोगामी नेत्यांच्या हत्यांशी कोणताच संबंध नाही. तपास यंत्रणांनीही सनातन संस्था वा अन्य कोणत्याही हिंदुत्ववादी संघटनेचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे अत्यंत चुकीचे आहे. असे असतानाही जर सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, तर सर्व हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरून विरोध करतील.'

डॉ. मानसिंग शिंदे म्हणाले, 'सनातन संस्थेच्या जयतु जयतु हिंदुराष्ट्रम या घोषणेमुळे आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याच्या भीतीपोटीच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे; मात्र आम्ही ठामपणे सनातनच्या पाठीशी राहणार आहोत. सनातन या शब्दाचा अर्थ नित्यनूतन असा आहे. मात्र सनातन या शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. तरीही आम्ही सनातनी म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे साधक आहोत.'

यावेळी संभाजी साळुंखे, महेश उरसाल,शिवानंद स्वामी, दिलीप दिवटे, किरण कुलकर्णी, शरद माळी, मधुकर नाझरे, अशोक रामचंद्रन, धर्माजी सायनेकर आदी उपस्थित होते.

महिला आणि मुलांचा सहभाग

सनातन समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात शहरासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने महिला भगवे झेंडे घेऊन उपस्थित होत्या. सहभागी महिलांनी भगवा वेश परिधान केला होता. तसेच घोषणा देण्यात महिलांनी आघाडी घेतली होती. मोर्च्याच्या सुरुवातीला मुले सनातन समर्थनाचे फलक घेऊन सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images