Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आरोग्य शिबिराला प्रतिसाद

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर लोणारी समाज सेवा संस्था, भागीरथी महिला सेवा संस्था स्थापित सावित्रीबाई फले भगिनी बचत गटामार्फत उचगाव येथे आरोग्य शिबिर झाले. भागीरथी महिला संस्थेच्या संचालिका अवनी शेठ, नगरसेविका उमा इंगळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. लोणारी संस्थेचे अध्यक्ष राजू सोडमिसे अध्यक्षस्थानी होते. शिबिरात डॉ. पल्लवी मेहता, डॉ. मदन किटवाडकर, डॉ. श्रीधर पाटील, यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी किशोर चोरगे, यशवंत नरळे, किशोर गौड, गायत्री नरळे, पूजा धंगेकर, आदी उपस्थित होते.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंनिसतर्फे रक्तदान शिबिर

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर शाखा व मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईदनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कैलास वानोळे, कृष्णात कोरे, दिलदार मुजावर, नियाज अत्तार, निशांत शिंदे, मुक्ता शिंदे, प्रमोद म्हेत्रे, संघसेन जगतकर, दिलीप कांबळे, रमेश वडणगेकर, अमर शिंगाटे, प्रा. अफताब जमादार यांनी रक्तदान केले. याप्रसंगी लेखक राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. सुभाष कोळी, सीमा पाटील, सुजाता म्हेत्रे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. संयोजन डॉ. के. एल. माळवदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत आंदोलना चौदा गावांचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वतंत्र धर्म मान्यतेसाठी लिंगायत संघर्ष समितीने पुकारलेल्या धरणे आंदोलनाला बुधवारी चौदा गावांतील नागरिकांनी पाठिंबा दिला. तसेच शिवसेना, बळीराजा पार्टी, मुस्लिम समाजासह विविध संघटनांनी आंदोलनाला समर्थन दिले. दरम्यान आंदोलनाची व्याप्ती वाढावी आणि त्यामध्ये तरुणांच्या सहभागासाठी लिंगायत संघर्ष समिती, युवक आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. युवक आघाडीच्या माध्यमातून कॉलेज तरुण, तरुणींचा आंदोलनात सहभाग वाढविण्यात येणार आहे.

लिंगायत संघर्ष समितीमार्फत विविध मागण्यांसाठी १६ ऑगस्टपासून दसरा चौक परिसरात धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी बुधवारी चौदा गावांतील नागरिक सहभागी झाले. वडणगे, आजरा, कडलगे, कबनूर, माणगाव, राजापूर, हसूर, मलकापूर, बाबंवडे, पिशवी येथील नागरिकांनी आंदोलनस्थळी येऊन पाठिंबा दिला. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, शिराळा तालुक्यातील सागाव येथील नागरिकही धरणे आंदोलनात सहभागी झाले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रवी चौगले, दुर्गेश लिंग्रस, महिला आघाडीच्या शुभांगी पोवार यांनी बुधवारी दुपारी आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच लिंगायत समाजाच्या मागण्यांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांनी सांगितले. वीरशैव लिंगायत समाज कबनूर, शाहूवाडी तालुका लिंगायत समाज, सुतार लोहार समाज उन्नती संस्था, बळीराजा पार्टीनेही आंदोलनाला पाठिंबा दिला. मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी आंदोलनाला समर्थन व्यक्त केले. मलकापूर नगरपरिषदेचे बांधकाम सभापती सोनिया पंकज शेंडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या विजया पाटील कबनूर, राजाभाऊ शिरगुप्पे, कडलगेचे सरपंच सतीश शिरुर, लहूजी शक्ती सेनेचे अशोक भंडारे, अमर तडाखे आंदोलनात सहभाग नोंदविला.

०००

युवक आघाडीची स्थापना

आंदोलनाची व्याप्ती वाढवताना त्यामध्ये तरुणांचा सहभाग यावर भर दिला जाणार आहे. यासाठी लिंगायत संघर्ष समिती, जिल्हा युवक आघाडीची स्थापना केली आहे. युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सुधीर चंद्रशेखर पांगे, जिल्हा समन्वयक सिद्धांत सूर्यकांत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष केतन कृष्णात तवटे, जिल्हा कार्याध्यक्ष निखिल चंद्रकांत शिरूर, प्रवक्तेपदी यश विजय आंबोळे यांची निवड झाली. सदस्य म्हणून पुष्कर किशोर गाडवे, नीलेश अण्णासाहेब तायशेट्टी, दीपक अनंतराव मिठारी, प्रमोद विठ्ठल व्हनगुते, मनोज बसवराज गुंजाटी यांचा समावेश आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजपेयींचा अस्थिकलश उद्या कोल्हापुरात

$
0
0

कोल्हापूर : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा अस्थिकलश शुक्रवारी (ता. २४) दर्शनासाठी कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील त्यादिवशी अस्थिकलश घेऊन सकाळी सात वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूर रेल्वेस्थानकावर येणार आहेत. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत अस्थिकलश बिंदू चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. शनिवारी (ता. २५) सकाळी नऊ वाजता अस्थिकलश शहरातील प्रमुख मार्गांवरून पंचगंगा नदीघाट येथे नेण्यात येणार आहे. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश आणि पंचगंगा नदी घाट असा अस्थी विसर्जन मार्ग आहे. पालकमंत्री, जिल्ह्यातील भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत पंचगंगा नदीघाट येथे अस्थिकलशाचे विसर्जन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी क्रांती’त कोल्हापूरला ठेंगा

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : सरकारच्या कृषी विभागातर्फे अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नव्याने राबविली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांचा सामावेश आहे. मात्र, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना ठेंगा दाखविण्यात आला आहे. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे योजनेत या दोन जिल्ह्यांचा सामावेश झालेला नाही, असा सरकारी यंत्रणेचा दावा आहे. मात्र, योजनेत सामावेश न केल्याने सरकारने अन्याय केल्याची भावना संबंधित शेतकऱ्यांत झाली आहे.

अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने बिरसा मुंडा यांच्या नावाने कृषी क्रांती योजना नव्याने आणली. आदिवासींसह राज्यातील २९ जिल्ह्यांत जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील कृषी विभागातर्फे योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. ९ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह विविध ठिकाणी ठळकपणे जाहिराती करण्यात आल्या आहेत. जाहिरात वाचून अनुसूचित जमातीतील शेतकरी तालुका पातळीवर पंचायत समिती, जिल्ह्यातून जिल्हा परिषदेकडे चौकशीकडे येत आहेत. मात्र, कृषी अधिकारी योजनेत कोल्हापूर जिल्हा नसल्याचे सांगत आहेत. याबाबत विचारणा केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

००००

कृषिमंत्र्यांचे जिल्हेच

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सांगली आणि कृषिमंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत नाहीत. कृषी विकासात दोन्ही जिल्हे नेहमी आघाडी असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहेत. तरीही योजनेत दोन्ही जिल्ह्यांचा सामावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राजकीय ताकद वापरून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांचा सामावेश योजनेत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

००००

महत्त्वाचे निकष

लाभार्थी शेतकरी अनुसूचित जमाती वर्गातील असावा, आधार कार्ड आवश्यक, जमिनीचा सात-बारा, आठ 'अ' उतारा, जमिनीचे क्षेत्र कमीत कमी ०.२० हेक्टर ते ६ हेक्टर, वार्षिक उत्पन्न मर्यादा दीड लाख रुपये.

००००

अनुदान असे

नवीन विहीर खोदाई : २ लाख ५० हजार, जुनी विहीर दुरुस्ती : ५० हजार, इन वेल बोअरिंग : २० हजार, पंप संच : २० हजार, वीजजोडणी १० हजार, शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण : १ लाख, ठिंबक : ५० हजार किंवा तुषार सिंचन : २५ हजार, पीव्हीसी पाइप : ३० हजार, परसबाग : ५००, नवीन विहीर, वीज जोडणी, पंपसंच, पीव्हीसी पाइप, ठिंबक सिंचन यासाठी एकूण ३ लाख ३५ हजार ते ३ लाख ६० हजार रुपये.

०००

अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांचा सामावेश बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात या प्रवर्गातील शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे या योजनेत कोल्हापूर जिल्ह्याचा सामावेश सरकारने केला नसावा. अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी इतर सरकारी योजना आहेत. त्याचा लाभ संबंधित शेतकऱ्यांना दिला जात आहे.

चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा कृषी विकास अधिकारी

००००

मटा भूमिका

लोकप्रतिनिधींकडून

प्रयत्नांची गरज

सहकार, कृषी क्षेत्रातील विकासात कोल्हापूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील अनेक नावीन्यपूर्ण कृषी उपक्रम राज्यात आदर्श ठरले आहेत. तरीही मागास घटकातील शेतकऱ्यांना अजूनही सरकारी अनुदानाची गरज आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी सरकारच्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत सामावेश होणे आवश्यक आहे. त्यासाठी सध्याच्या राज्यातील राजकारणातील प्रभावशाली कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वच खासदार, आमदारांनी प्रयत्न करावेत.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवृत्त...

$
0
0

रुक्मिणी पाटील

कोल्हापूर : विक्रमनगर येथील रुक्मिणी विलास पाटील (वय ९७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, जावई, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता.२३) सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरळ पूरग्रस्तांसाठी फाय फाऊंडेशनची एक कोटीची मदत

$
0
0

फोटो : दुकॉलमी

केरळ पूरग्रस्तांसाठी फाय

फाऊंडेशनची एक कोटीची मदत

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

केरळमधील पूरग्रस्तांसाठी इचलकरंजी येथील फाय फाऊंडेशनने एक कोटी रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीला दिला आहे. फाऊंडेशनचे चेअरमन पंडितकाका कुलकर्णी यांनी हा निधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे हा निधी 'फाय'च्या विश्वस्तांनी नवी दिल्ली येथे सुपूर्द केला. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान,भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्यामजी जाजू उपस्थित होते.

फाय फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. एस. पी. मर्दा, मयूर लक्ष्मेश्वर,उद्योजक नितीन धूत,रवींद्र मर्दा यांनी निधीचा धनादेश अमित शहा यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी अमित शहा यांनी इचलकरंजीसारख्या छोट्या शहराने आपत्तीच्या काळात राष्ट्रीयस्तरावर केलेली ही मदत देशाला प्रेरणादायी आहे. देशातील उद्योजकांना तसेच दानशूर व्यक्तींना या मदतीचा अभिमान वाटेल, असे मत व्यक्त केले.

फाय फाऊंडेशनने अनेक आपत्तींप्रसंगी मदतीचा हात पुढे केला आहे. यापूर्वी नेपाळमध्ये झालेल्या भूकंपावेळी फाय फाऊंडेशनने १ कोटी रुपयांची मदत केली होती. महाराष्ट्रात दुष्काळ पडला, त्यावेळी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मुख्यमंत्री दुष्काळ सहाय्य निधीसाठी फाय फाऊंडेशनने १ कोटी रुपये दिले होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्च साखर उतारापुरस्कार ‘कुंभी’ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरिज (नवी दिल्ली) या शिखर संस्थेकडून २०१७-१८च्या हंगामासाठी सर्वाधिक उच्च साखर उतारा पुरस्कार कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला. चिफ डायरेक्टर (शुगर) भारत सरकार यांतच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या पुरस्कारासाठी कुंभी-कासारी साखर कारखान्याची निवड करण्यात आल्याची माहिती कुंभी कारखान्याचे चेअरमन आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.

आमदार नरके म्हणाले, 'हंगाम १९९१-९२ मध्ये अखिल भारतीय पातळीवर ऊस विकास कार्याबद्दलचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि उच्च उतारा विभागातील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नॅशनल फेडरेशन को-ऑप. शुगर फॅक्टरीजकडून यापूर्वी कुंभी-कासारी कारखान्यास मिळाले आहेत. आतापर्यंत कारखान्याने उच्च साखर उतारा, ऊस विकास, आणि तांत्रिक कार्यक्षमता राखण्याला नेहमी प्राधान्य दिले आहे. या पुरस्काराच्या यशात कारखान्याचे सभासद शेतकरी, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, ऊसतोडणी वहातूक संघटना यांचा मोलाचा वाटा आहे.'

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. बाजीराव शेलार, संचालक भगवान पाटील, किशोर पाटील, दादासाहेब लाड, उत्तम वरुटे, निवास वातकर, अनिल पाटील , विलास पाटील, आनंदराव पाटील, प्रकाश पाटील, दिलीप गोसावी, चिफ केमिस्ट प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रास्ता रोको

$
0
0

माजी आमदार के. पी. पाटील यांचा इशारा

म.टा.वृत्तसेवा, गारगोटी

भुदरगड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली असून सरकारने आठ दिवसांत ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडू, असा इशारा भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी आमदार के. पी. पाटील यांनी तहसीलदारांना दिला. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील यांनी नायब तहसीलदार शीतल देसाई यांच्याकडे निवेदन दिले.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार म्हणाले, 'भुदरगड तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला असून ऊसपिकासह भात, नाचणी, भुईमूग पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा आंदोलन छेडू.'

शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद मोरे यांनी मनोगते व्यक्त केले. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक मधुकर देसाई, धनाजीराव देसाई, के. ना. पाटील, हुतात्मा स्वामी सूतगिरणीचे चेअरमन पंडितराव केणे, सुनील कांबळे, जिल्हा शेतकरी संघाचे संचालक बाळासाहेब भोपळे, प्रा. दौलतराव जाधव, शिवाजीराव देसाई, उपसरपंच सचिन देसाई, शेखर देसाई, जयवंत गोरे, अजित देसाई, आण्णा पाटील, भालचंद्र कलकुटकी, रवींद्र वायदंडे, आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

गारगोटी : भुदरगड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करताना माजी आमदार के. पी. पाटील, सोबत विश्वनाथ कुंभार, मधूकर देसाई, पंडितराव केणे, धनाजीराव देसाई आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गडहिंग्लजमध्ये अंनिसचे मॉर्निंग वॉक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,गडहिंग्लज

डॉ. नरेंद्र दाभोळकर, अॅड. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना शोधून कडक कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जवाब दो आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येथील अंनिस शाखा व पुरोगामी संघटनांतर्फे निर्भय मार्निग वॉक काढून सरकारचा निषेध करण्यात आले.

येथील एम. आर. हायस्कूलपासून मार्निंग वॉकला सुरुवात झाली. कडगाव रोड, वीरशैव चौक, बाजारपेठमार्गे, नेहरू चौक, लक्ष्मी रोडमार्गे मुख्य मार्गावरून दसरा चौकात आले. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या खुन्यांना फाशी द्या, आदी घोषणा देत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. प्रा. किसनराव कुराडे, प्रा. प्रकाश भोईटे, प्रा. पी. डी. पाटील, प्रा. आशपक मकानदार, मंजुषा कदम, अरुणा शिंदे, बाळासाहेब मुल्ला यांची मनोगत व्यक्त केले.

यावेळी जे. वाय. बारदेस्कर, प्रा. डी. जी. चिघळीकर, प्रा. शिवाजी होडगे, सदानंद वाली, जी. एस. शिंदे, अशोक मोहिते, उज्ज्वला दळवी, सुवर्णलता गोविलकर, सुमन सावंत, स्नेहा भुकेले, छाया इंगळे, स्वाती चौगुले, प्रा.सुभाष कोरी, प्रा.आप्पासाहेब कमलाकर, प्रा.आर.आर.पाटील, शिवाजी पाटील, अॅड.सुधाकर पोवार, रमजान अत्तार, गणतराव पाटील, गणपतराव पाथरवट, प्रा.तानाजी चौगुले, नागेश चौगुले, बाळेश नाईक, प्रभाकर देसाई, बाळासाहेब मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरसिंह पाटील यांची निवड

$
0
0

शाहूवाडी : अमरसिंह हंबीरराव पाटील-भेडसगावकर यांची नुकतीच युवासेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिवसेना युवानेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या

आदेशानुसार व जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघाच्या कातड्यासह दोघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

वाघाचे कातडे विकण्यासाठी आलेल्या कराड तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली. मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास सापळा रचून पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने पेठ नाका (ता. वाळवा) येथे ही कारवाई केली. वैभव सुरेश झंजे (वय १९, रा. रिसवड, ता. कराड), अक्षय मोहन गिरी (वय २१, रा. चिखली, ता. कराड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून ८० हजार रुपये किमतीचे वाघाचे कातडे, मोटारसायकल तसेच दोन मोबाइल असा १ लाख १३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिस हवालदार प्रकाश संभाजी पवार यांनी याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अक्षय गिरी व वैभव झंजे यांनी वाघाचे कातडे विकण्याच्या उद्देशाने आणले असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाला लागली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. पेठ नाका येथील राजारामबापू बँकेसमोर पोलिसांनी वैभव आणि अक्षयला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी ८० हजार रुपयांचे तीन फूट लांब आणि सव्वादोन फूट रुंद आकाराचे वाघाचे कातडे व मोटारसायकल (एमएच ५० बी ५१७१), आठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल व रोख पाच हजार रुपये असा एकूण १ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

.. .. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या १९ नगरसेवकांचं पद रद्द

$
0
0

कोल्हापूर:

जात प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या कोल्हापूरमधील नगरसेवकांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने १९ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या नगरसेवकांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे.

कोल्हापूर पालिका निवडणुकीत आरक्षित जागेवरून उमेदवारी अर्ज भरताना या नगरसेवकांनी जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे त्यांना निवडून आल्यानंतर सहा महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. मात्र या नगरसेवकांनी विहित मुदतीत प्रमाणपत्र सादर केले नव्हते. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर नियमानुसार ६ महिन्यात जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक असल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आणि या नगरसेवकांना दणका देत त्यांचं पद रद्द केलं. त्यात काँग्रेसच्या ६, भाजपच्या ५, राष्ट्रवादीच्या ४, ताराराणी आघाडीच्या ३ आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे या सर्वपक्षीय नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, ज्या नगरसेवकांचे पद रद्द झाले आहे, त्या प्रभागात नव्याने निवडणुका घेण्यात येणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. पद रद्द झालेल्या नगरसेवकांमध्ये अश्विनी रामाणे, स्वाती येवलुजे आणि हसीना फरास या तीन माजी महापौरांचा समावेश आहे.

यांचे नगरसेवकपद रद्द झाले

१. संदिप नेजदार
२. दीपा मगदूम
३. स्वाती येवलूजे
४. हसीना फरास
५. अश्विनी रामाणे
६. किरण शिराळे
७. सचिन पाटील
८. विजय खाडे पाटील
९. नियाझ खान
१०. मनीषा कुंभार
११. अश्विनी बारामते
१२. संतोष गायकवाड
१३. शमा मुल्ला
१४. सविता घोरपडे
१५. वृषाली कदम
१६. रीना कांबळे
१७. गीता गुरव
१८. कमलाकर भोपळे
१९. अफझल पिरजादे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाठी विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानकडून २५ लाख

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी गुरुवारी जाहीर केले.

'केरळला महापुराचा फटका बसल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली असून, सुमारे ४६ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. एकूण १७०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. केरळ राज्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी या राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत वैधानिक गोष्टींची पूर्तता करून हा निधी केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सूपुर्दख्केला जाईल,' असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत ५५० सीसीटीव्ही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सेफ सिटीअंतर्गत अत्याधुनिक व उच्च दर्जाचे सीसीटीव्ही बसविण्याचा प्रारंभ गुरुवारी महात्मा गांधी पुतळा येथे आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा अलका स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला. उच्च दर्जाचे आधुनिक कॅमेरे असल्याने परिसरातील वाहतुकीची कोंडी, नियमांचे उल्लंघन आणि गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष राहणार असल्याने शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

जिल्हा नियोजन व विकास निधीतून मंजूर साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून सेफ सिटीअंतर्गत इचलकरंजी शहरातील मुख्य मार्गासह प्रमुख ठिकाणी ५५० सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात येणार असून त्याचे कंट्रोल अप्पर पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात असणार आहे. त्यानुसार गांधी पुतळा येथे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला. अत्याधुनिक पद्धतीचे उच्च दर्जाचे कॅमेरे असून, त्याची मर्यादा (रेंज) दीडशे मीटर आहे. त्यामुळे दूर अंतरावरूनही सर्व हालचाली अचूकपणे टिपल्या जातील. या संपूर्ण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा अनंत चतुर्दशीदिवशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली.

शहरात पहिल्या टप्प्यात कोल्हापूर नाका ते नदीवेस नाका या मुख्य मार्गावर ११० सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात शहरातील अंतर्गत रस्त्यांवर कॅमेरे बसविण्यात येतील. शहरात एकूण ५५० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. पहिला टप्प्यासाठी एक कोटी ३३ लाख रुपये मंजूर झाले असून, हा प्रोजेक्ट जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयाच्या देखरेखीखाली होणार आहे. पहिल्या टप्प्यात समाजकल्याणकडून ५० लाख, जिल्हा नियोजन व विकास निधीतून ५० लाख, इचलकरंजी पालिकेकडून ३३ लाखांचा निधी दिला जाणार आहे. त्यामध्ये कोल्हापूर नाका, शाहू पुतळा, शिवाजी पुतळा, जनता चौक, गांधी पुतळा, राजवाडा चौक, महादेव मंदिर, नदीवेस नाका, डेक्कन चौक, नवीन नगरपालिका चौक येथे कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, उपनगराध्यक्षा सरिता आवळे, राज्य यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार, अजितमामा जाधव, मदन झोरे, जुलेखा पटेकरी, दिलीप मुथा, भाऊसाहेब आवळे, पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, सपोनि संजय हारुगडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण पवार आदी उपस्थित होते.

०००००

फोटो -

चोरट्याकडून सहा

सायकली जप्त

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

संशयावरून ताब्यात घेतलेल्या चोरट्याला गजाआड करत शहापूर पोलिसांनी ४४ हजार रुपये किमतीच्या सहा महागड्या सायकली जप्त केल्या आहेत. योगेश उत्तम तुपरवाडकर (वय २२, रा. दत्तनगर गल्ली नं. २ शहापूर) असे चोरट्याचे नाव आहे.

शहापूर पोलिस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना धनगरमाळ परिसरात योगेश तुपरवाडकर महागडी रेसर सायकल घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांची गाडी पाहताच त्याने सायकल रस्त्याकडेला टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करता संबंधित सायकल पंचगंगा कारखाना परिसरातून चोरल्याची कबुली त्याने दिली. अधिक चौकशीत शहरातील राधाकृष्ण चित्रमंदिर, कापड मार्केट, डेक्कन सूत गिरणी परिसरातून सायकली चोरल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडून रेसर, अ‍ॅटलस, रेंजर अशा कंपनीच्या महागड्या सहा सायकली जप्त केल्या आहेत. ही कारवाई शहापूर पोलिस ठाण्याचे सपोनि संजय हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा समाज आंदोलनस्थळी विधिमंडळ समितीची भेट

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनस्थळी विधिमंडळ अंदाज समितीतील सदस्यांनी गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भेट दिली. आमदार अनिल कदम, डॉ. संजय रायमूलकर, रमेश बुंदीले, प्रकाश आबिटकर या सदस्यांचा समावेश होता. स्थानिक आमदार राजेश क्षीरसागरही यावेळी उपस्थित होते.

सकल मराठा समाजाच्या वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर यांच्याशी अंदाज समितीतील सदस्यांनी चर्चा केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण कसे देणार, त्याची प्रक्रिया कशी असणार याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला सांगितली पाहिजे. त्यासाठी राज्य सरकारने एक दिवसाचे अधिवेशन बोलावावे, अशी मागणीही यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीच्या चर्चेला आला वेग

$
0
0

तगड्या उमेदवारांचा शोध पक्षांकडून सुरु

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुप्रीम कोर्टाने वेळेत जातप्रमाण पडताळणी पत्र वेळेत न दिल्याने महानगरपालिकेच्या १९ नगरसेवकांचे पद रद्द केले. त्यामुळे १९ प्रभागात पुन्हा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. निवडणूक दिवाळीच्यापूर्वी होणार असे छातीठोकपणे सांगत इच्छुक उमेदवारांनी कानोसा घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक रद्द झालेल्या नगरसेवकांच्याऐवजी अन्य उमेदवार रिंगणात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे उमेदवार पळवापळवी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तगड्या उमेदवारांचा शोध सर्वच पक्षांनी सुरु केला असून महानगरपालिकेतील कारभारी प्रभागातील बदलत्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत.

माजी महापौर हसीना फरास, अश्विनी रामाणे, माजी स्थायी समिती सभापती डॉ. संदीप नेजदार, माजी सभागृह विरोधी पक्षनेता किरण शिराळे यांच्या प्रभागात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१५ मध्ये झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीतील उमेदवार पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२०१५ मध्ये अशा झाल्या लढती

प्रभाग क्रमांक १, शुगर मिल

सुभाष बुचडे, विद्यमान नगरसेवक, काँग्रेस

जयश्री घाटगे

रमेश पोवार

सदानंद राजवर्धन

............

प्रभाग क्रमांक ३ हनुमान तलाव

डॉ. संदीप नेजदार विद्यमान नगरसेवक, काँग्रेस

पुष्पलता संकपाळ, ताराराणी आघाडी

राहुल माळी, शिवसेना

..........

प्रभाग ६, पोलिस लाईन

स्वाती यवलुजे, विद्यमान नगरसेविका, काँग्रेस

प्राजक्ता लाड

संगीता बिरंजे

शकुतंला माने

............

प्रभाग क्रमांक २१, टेंबलाईवाडी

कमलाकर भोपळे, विद्यमान नगरसेवक, ताराराणी आघाडी

अमित कांबळे

अमोल मुधाळे

अनिल शिंदे

अर्जुन घाटगे

दिगंबर खाडे

............

प्रभाग क्रमांक २८, सिद्धार्थनगर

अफजल पिरजादे, विद्यमान नगरसेवक, राष्ट्रवादी

तेजस्विनी घोरपडे, शिवसेना

जय पटकारे, काँग्रेस

लईक पिरजादे, ताराराणी आघाडी

.............

प्रभाग क्रमांक ३०, खोलखंडोबा

किरण शिराळे, विद्यमान नगरसेवक, ताराराणी आघाडी

अनिल पाटील, शिवसेना

श्रीकांत बनछोडे, काँग्रेस

राहुल काकडे, राष्ट्रवादी

......................

प्रभाग क्रमांक ३३ महालक्ष्मी मंदिर

हसीना फरास, विद्यमान नगरसेविका, राष्ट्रवादी

श्रुती पाटील, भाजप

अर्चना भुर्के, शिवसेना

............

प्रभाग क्रमांक ३४, शिवाजी उद्यमनगर

सचिन पाटील, विद्यमान नगरसेवक, राष्ट्रवादी

दीपक स्वामी,

अभय कामत, शिवसेना

विशाल शिराळकर

............

प्रभाग क्रमांक ३५ यादवनगर

शमा मुल्ला, नगरसेविका, राष्ट्रवादी

सुमय्या मुजावर, ताराराणी आघाडी

मंगल हजारे, काँग्रेस

सुनिता शिंदे, शिवसेना

............

प्रभाग क्रमांक ४३ शास्त्रीनगर, जवाहरनगर

नियाज खान, विद्यमान नगरसेवक, शिवसेना

नंदकुमार वळंजू, ताराराणी आघाडी

शादाब अत्तार, राष्ट्रवादी

दत्तात्रय कांबळे, काँग्रेस

....................

प्रभाग क्रमांक ५८, संभाजीनगर

संतोष गायकवाड, विद्यमान नगरसेविका, भाजप

हरिदास सोनवणे, काँग्रेस

रविंद्र आवळे, राष्ट्रवादी.

.............

प्रभाग ५९, नेहरु नगर

अश्विनी बारामाते, विद्यमान नगरसेविका, भाजप

जयश्री सोनावणे, काँग्रेस

सरोजनी पोळ

पौरावी उगवे

..............

प्रभाग क्रमांक ६१, सुभाष नगर

सविता घोरपडे, विद्यमान नगरसेविका, ताराराणी आघाडी

अर्चना भुर्के, शिवसेना

कौसर बागवान,

वंदना खतकर

.....................

प्रभाग क्रमांक ६९

विजय खाडे पाटील, विद्यमान नगसेवक, भाजप

प्रमोद पोवार

सुरेश चौगुले

उमर शेख

.................

प्रभाग क्रमांक ७०, राजलक्ष्मी नगर

दीपा मगदूम, विद्यमान नगरसेविका, काँग्रेस

शोमा बामणे, भाजप

अंजली आंबेकर, राष्ट्रवादी

आरती साळोखे, शिवसेना

..................

प्रभाग क्रमांक ७३, फुलेवाडी रिंगरोड

रिना कांबळे, विद्यमान नगरसेविका, काँग्रेस

अयोध्या दाभाडे,

मिनाक्षी मेस्त्री

रुपाली मस्के

सुनिता मोरे

................

प्रभाग ७४, सानेगुरुजी वसाहत

मनीषा कुंभार, विद्यमान नगरसेविका, भाजप

माधुरी लोखंडे

तेजश्री पाटील

नेहा भुर्के

.................

प्रभाग क्रमांक ७७ शासकीय कारागृह

अश्विनी रामाणे, विद्यमान नगरसेविका, काँग्रेस

सुवर्णा साळोखे,

अश्विनी लोळगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाठी विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानकडून २५ लाख

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याचे पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी गुरुवारी जाहीर केले.

'केरळला महापुराचा फटका बसल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली असून, सुमारे ४६ हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच १० लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. एकूण १७०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. केरळ राज्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी या राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे २५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत वैधानिक गोष्टींची पूर्तता करून हा निधी केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सूपुर्दख्केला जाईल,' असे डॉ. भोसले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनीचा साठा शंभर टीएमसीवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

उजनी धरणातील पाणीसाठ्याने बुधवारी सायंकाळी शंभर टीएमसीचा टप्पा ओलांडला. पुणे जिल्ह्यातून ६० हजार १६५ क्युसेकचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळी आठ वाजता ७५ टक्के इतका झाला आहे.

मागील महिनाभरापासून पुणे जिल्ह्यातून पाणी उजनी धरणात येत आहे. त्यात सातत्याने वाढच होत असल्याने उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता उजनी धरणातील एकूण पाणीसाठा १००. ७६ टीएमसी इतका झाला होता.

धरणातील पाणीसाठा सायंकाळी आठ वाजता ७५ टक्क्यांवर पोहोचला होता. पुणे जिल्ह्यातून असाच प्रवाह राहिला, तर धरणाचे दरवाजे उचलून नदीत पाणी सोडावे लागणार आहे. या वर्षी उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी वजा २७ टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. ती आता अधिक ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. म्हणजे धरणात १०० टक्के पाणी आले आहे.

कॅनॉलला पाणी सोडण्याची गरज

उजनी धरणाचे पाणी कॅनॉलला सोडण्याची मागणी वाढली आहे. दोन वर्षांखाली जिल्ह्यात पाऊस कमी पडला होता. त्यावेळी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाणी कालव्याद्वारे जिल्हाभरात सोडून लहान-मोठे बंधारे, ओढे, ओढ्यावरील बंधारे व काही तलावही भरून घेतले होते. अशाच पद्धतीने याही वर्षी कालव्यातून पाणी सोडणे शक्य असेल त्या ठिकाणचे तलाव, बंधारे व ओढ्यावरील बंधारे भरून घेण्याची मागणी होत आहे. सीना नदीच्या पुढे कारंबा सावळेश्वर जलसेतू परिसरात पाण्याची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरळसाठी दातृत्वाचा वर्षाव

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आदमापूर (ता. भुदरगड) येथील सदगुरू श्री बाळूमामा देवालय ट्रस्ट तसेच धारेवाडी (ता. कराड) शिवम प्रतिष्ठानच्या वतीने पुढाकार घेऊन केरळमधील पूरग्रस्तांना दोन ट्रक धान्य, औषध पाठविण्यात आली. तब्बल १८ टन धान्य, भांडी, कपडे पाठवून संकटातील पूरग्रस्तांवर दातृत्वाचा वर्षाव करीत माणुसकीचे दर्शन घडविले.

केरळमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे, प्रापंचिक साहित्य वाहून गेल्याने तेथील अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांना मदत करण्यासाठी माजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी शिवम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यानंतर सोमनाथ यरनाळकर, आदित्य खतकर, सुहास सोरफ, उदय भाट यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले. श्री बाळूमामा देवालयाच्या ट्रस्टींना भेटून केरळवासीयांना मदत करण्याची विनंती केली. त्याला त्यांनी त्वरित प्रतिसाद दिला.

मुरगूडमधील गणेश नागरी पतसंस्था, व्यापारी नागरी पतसंस्था, लक्ष्मी नारायण पतसंस्था, विश्वनाथराव पाटील बँक यांनाही विनंती केली. स्वत:हून अनेकांनी धान्य आणून दिले. या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी धान्य संकलित केले. शिवराज विद्यालय, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, मूरगूड विद्यालय गर्ल्स हायस्कूलमधील प्रत्येक विद्यार्थ्याने एक किलो धान्य दिले. शिवम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मुरगूड परिसरातील भडगाव, यमगे, शिंदेवाडी, मळगे खुर्द, बोळावी, अवचितवाडी, दौलतवाडी, तिटवे, कासारवाडा, नंदगाव येथील प्रत्येक घरात जाऊन धान्य जमा केले. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी ब्लँकेट्स व रोख पैसे दिले. अशाप्रकारे केवळ दोन दिवसांत दोन ट्रक धान्य संकलित झाले. शिवम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एक ट्रक धान्य गोळा केले. बाळूमामा ट्रस्टने एक ट्रक धान्य दिले. संकलित दोन ट्रक धान्य केरळच्या पूरग्रस्तांसाठी नुकतेच रवाना केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>