Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लिंगायत समाज आंदोलनाला आमदार आबिटकरांचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वतंत्र लिंगायत धर्म म्हणून मान्यता मिळावी, या मागणीसाठी येथील दसरा चौकात सुरू असलेल्या लिंगायत समाजाच्या बेमुदत धरणे आंदोलनाला गुरुवारी आमदार प्रकाश आबिटकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यावेळी दिवसभर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी भेट देऊन आंदोलनात सहभाग घेतला. लिंगायत संघर्ष समिती व जिल्हा लिंगायत समाजाकडून आंदोलन सुरू आहे.

आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर आमदार आबिटकर म्हणाले, 'स्वातंत्र्यपूर्व काळात लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्म म्हणून नोंद होती. स्वतंत्र लिंगायत धर्म म्हणून मान्यता मिळावी, हा लिंगायत समाजाचा हक्क आहे आणि तो तुम्हाला मिळालाच पाहिजे. हा हक्क मिळावा यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून विधानसभेत आवाज उठवू, तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू.'

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी २०१४ मध्ये निवडणुकीपूर्वी समाजाला जे वचन दिले होते त्याची चित्रफीत आंदोलनस्थळी मोठ्या स्क्रीनवर लावण्यात आली आहे. दरम्यान दिवसभर आज आंदोलनस्थळी तामगावचे माजी सरपंच बाबासाहेब पाटील, कळे लिंगायत समाज उपाध्यक्ष सुनील डबिरे, हातकणंगले तालुका मनसेचे पदाधिकारी उदय खडसे, बाबूराव तारळी, विलास आंबोळे, निखिल शिरूर, संजय चितारी, शिवानंद कार्वेकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कागल, कळे, हलसवडे, जयसिंगपूर, माणगाव, तामगाव, पुलाची शिरोली, वडगाव, आदी गावांतून समाजबांधवांनी सहभाग घेतला.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वारणा धरणातून विसर्ग वाढवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला असून तो ११ हजार ४१९ क्युसेक्सने सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिवसभर शहरात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ पाणीपातळी ३३.५ फूट होती. शाहूवाडीत ४१.८३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील ४६ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.

धरणक्षेत्रात जोरदार पर्जनवृष्टी सुरू असून, धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणात दुपारी बारापर्यंत ८१९४ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. बारानंतर ११ हजार ४१९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. काळम्मावाडी धरण ९६ टक्के भरले असून, सांडव्यावरून चार हजार क्युकेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. कोयनेचा विसर्ग ५६ हजार ३०० क्युसेक्सवरून ५२ हजार ३९५ क्युसेक्सपर्यंत कमी करण्यात आला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी स्थिर असून, दिवसभरात एक इंचाने पाणी उतरले. गुरुवारी सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी ३३ फूट ६ इंच होती. सायंकाळी सातपर्यंत पाणी पातळी ३३ फूट ५ इंच इतकी नोंदविण्यात आली. जिल्ह्यात काल दिवसभरात १७१.६८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ४१.८३ मि.मी. पावसाची नोंद झाली.

०००

तालुकानिहाय पाऊस

शाहूवाडी ४१.८३ मि.मी. हातकणंगले ३.७५, शिरोळ १.५७, पन्हाळा १०.८६, राधानगरी १९.८३, गगनबावडा २५.५०, करवीर ९.५५, कागल ८.०० गडहिंग्लज ३.४२, भुदरगड १८.८०, आजरा १४.७५, चंदगड १३.६३ मि.मी.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत १०२ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ४२ हजार ५१३ क्युसेकपर्यंत वाढली आहे. मात्र, पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे सहाही वक्र दरवाजे गुरुवारी सायंकाळी सहा अर्ध्या फुटाने कमी करून सहा फुटांवर खाली आणण्यात आले. त्यामुळे पायथा वीजगृहातून २१०० आणि वक्र दरवाजातून ५०,२९१ क्युसेक असा एकूण ५२,३९१ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरूच आहे. पाटण येथील मुळगाव पूल अद्याप पाण्याखालीच असल्याने मूळगावचा पाटणशी संपर्क अद्याप झालेला नाही. कोयना धरणात सध्या १०२.३३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

कोयना पाणलोट परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने जलाशयातील पाण्याची आवकही झपाट्याने वाढली. बुधवारी सायंकाळी सात वाजता धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांवर उचलून पाणी सोडण्यात आले. गुरुवारीही पावसाचा जोर कमी झाल्यामुळे दरवाजे अर्ध्या फुटाने खाली आणण्यात आले. गुरुवारी दिवसभरात कोयनानगर येथे २० मिलिमीटर, नवजा २२ व महाबळेश्वर येथे २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

धरणातून पाणी सोडले जात असल्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत झालेली वाढ अद्याप कायम आहे. मूळगाव पूल अद्याप पाण्याखालीच असल्याने तेथील ग्रामस्थांना पाटणला येण्यासाठी मूळगाव-त्रिपुडी-बेलवडे-नवारस्तामार्गे पुन्हा पाटण असे सुमारे २० किलोमीटरचा वळसा घालून यावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सणांसाठी एसटीच्या जादा गाड्या

$
0
0

सणांसाठी एसटीच्या

जादा गाड्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने कोल्हापूर विभागातील सर्व आगारांमध्ये जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. २५ ते २७ ऑगस्टदरम्यान जादा गाड्या धावणार आहेत. नारळी पौर्णिमेनिमित्त जोतिबा आणि नृसिंहवाडी येथे भाविकांची गर्दी असते. भाविकांच्या सुविधेसाठी जोतिबा डोंगर येथे जाण्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातून ३५ जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत, तर नृसिंहवाडीसाठी ३० जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रवासी मित्रांची नेमणूकही केली आहे. प्रवाशांनी एसटीचा वापर करून सुरक्षित प्रवासास प्राधान्य द्यावे, असे आवाहन एसटीच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंदाज समितीकडून एसटीपीची पाहणी

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम यांच्या समितीने गुरुवारी शहरातील महापालिकेच्या कसबा बावडा, दुधाळी येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसह विविध विकासकामांची पाहणी केली. शुक्रवारी (ता.२४) जिल्ह्यातील विविध विकासकामांची पाहणी समितीतर्फे करण्यात येणार आहे.

समिती दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आली आहे. शासकीय विश्रामगृहात महापौर शोभा ब्रोंद्रे यांनी समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम यांच्यासह सदस्यांचे स्वागत केले. सदस्य आमदार प्रकाश आबिटकर, आमदार उन्मेश पाटील, आमदार विजय रहागंडाले, आमदार राजेश काशीवार, आमदार कृष्णा गजबे, आमदार रमेश बुंदिले, आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह सहसचिव अशोक मोहिते, अव्वर सचिव विजय कोमटवार, कक्ष अधिकारी सचिन बाभळगावकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी समितीचे अध्यक्ष आमदार कदम आणि सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, स्थायी सभापती आशीष ढवळे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून विकासकामांची समितीचे अध्यक्ष, सदस्यांनी माहिती घेतली. त्रुटी असलेल्या कामांसंबंधी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दुपारनंतर महापालिकेच्या कसबा बावड्यातील ७६ एमएलडी, दुधाळीतील १७ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया केंद्र, सुर्वेनगरातील अमृत योजनेतील ड्रेनेजचे काम, पुईखडीतील थेट पाइपाइलाइन योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या जलशुद्धिकरण केंद्र, शांतिनिकेत परिसरातील विकास आराखड्यातील रस्ते, टेंबलाईवाडीतील अमृत योजनेतर्गंत हरित पट्टे विकसित करण्याच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर उद्योग भवनमधील औद्योगिक विकास, प्रदूषण नियंत्रण कार्यालयास समितीने भेट दिली. शुक्रवारी जिल्ह्यातील नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायती, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, परिवहन विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, ग्राहक संरक्षण, महसूल, वन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये, उद्योग, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, सहकार, पणन व वस्त्रोद्योग, पाणीपुरवठा व स्वच्छता, पर्यावरण, आदी विभागाकडील योजनांची माहिती समितीचे सदस्य घेणार आहेत. त्यातील काही कामांना अचानकपणे भेट देणार आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाळासाहेब खर्डेकर जयंतीनिमित्त उद्या कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बॅ. बाळासाहेब खर्डेकर - निंबाळकर आणि जागर फाऊंडेशनतर्फे बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सकाळी ११ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष शानूर मुजावर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरूटे, अंध शाळेला मदत करणारे संजय पोवार यांना बॅ. खर्डेकर समाजविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे', अशी माहिती जागर फाऊंडेशनचे प्रा. बी. जी. मांगले यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, माजी मंत्री प्रकाश आवाडे कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर माजी आमदार शिवाजीराव पाटील अध्यक्षस्थानी आहेत. पत्रकार परिषदेस संग्रामसिंह खर्डेकर, राहुलराजे खर्डेकर, पीटर चौधरी, प्रा. अशोक पाटील उपस्थित होते.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रश्श्यावर ताव मारायला आला का ?

$
0
0

'विधान मंडळ अंदाज समितीला मराठा समाज आंदोलकांचा घेराओ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा ठोक मोर्चातर्फे एक महिन्यापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत आमच्या जखमेवर मीठ चोळायला कशाला आला ‌? तांबड्या, पांढऱ्या रश्श्यावर ताव मारायला आला का', असा संतप्त सवाल मराठा समाजाच्या आंदोलक शिष्टमंडळाने गुरूवारी विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अनिल कदम यांच्यासह सदस्य आमदारांना केला. येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी साडेबाराच्या सुमारास गनिमी काव्याने जात आंदोलकांनी त्यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले.

येथील दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. समाजाच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याची भावना आंदोलकांची झाली आहे. त्यामुळे दोन आठवड्यापूर्वी विधीमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्याला आंदोलकांनी विरोध केला होता. विरोधाचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याची दखल घेत समितीचा दौरा रद्द झाला. दरम्यान, समितीचा पुन्हा दौरा ठरला. त्यानुसार सकाळी ११ वाजता येथील शासकीय विश्रामगृहात समितीचे अध्यक्ष अनिल कदम, समिती सदस्य आमदार प्रकाश आबिटकर, उन्मेष पाटील, विजय रहागंडाले, राजेश काशिवार, कृष्णा गजबे, रमेश बुंदीले, डॉ. संजय रायमुलकर यांच्यासह सहसचिव अशोक मोहिते, अव्वर सचिव विजय कोमटवार, कक्ष अधिकारी सचिन बाभळगावकर यांचे आगमन झाले. याची माहिती कळताच आंदोलक दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, स्वप्निल पार्टे, संजय पवार यांचे शिष्टमंडळ गनिमी काव्याने विश्रामगृहात दाखल झाले.

दौऱ्याला विरोध केला असतानाही पुन्हा समिती कोल्हापुरात आल्याने आंदोलक संतप्त झाले. ते समितीचे अध्यक्ष कदम व सदस्य आमदार बसलेल्या खोलीत घुसले. समितीला त्यांनी आक्रमकपणे जाब विचारला. आरक्षणासाठी मराठा समाजाचे एक महिन्यापासून आंदोलन सुरू आहे, तुम्ही सरकारमध्ये आहात, आरक्षणासाठी काय केले ? गेल्यावेळी आम्ही विरोध केला होता. विरोधाचे निवेदनही दिले होते, आता पुन्हा येऊन आमच्या जखमेवर मीठ चोळत आहात का,तांबड्या, पांढऱ्या रश्श्यावर ताव मारायला आला का ‌? अशा प्रश्नांची सरबत्ती आंदोलकांनी पदाधिकाऱ्यांवर केली. त्यावर काहीवेळ अध्यक्ष कदम निरूत्तर झाले. अचानकपणे पदाधिकाऱ्यांनी घुसून जाब विचारल्याने समितीमधील सदस्य, अधिकाऱ्यांची तांराबळ उडाली. आमदार आबिटकर यांनी आक्रमक आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी समिती अध्यक्ष कदम यांनी तुमच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवतो, आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची विनंती करतो, असे सांगितले. त्यानंतर पदाधिकारी शांत झाले.

-----------------------------

कोट

'मराठा समाज आरक्षणप्रश्नी सरकार उदासीन आहे. आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये सरकारमधील घटक असलेल्या विधानमंडळ अंदाज समितीने कोल्हापूर दौऱ्यावर येऊन मराठा समाजाच्या आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळले. यामुळे गनिमी काव्याने जाऊन त्यांना जाब विचारला.

दिलीप देसाई, समन्वयक, मराठा समाज आंदोलन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रामतीर्थ’ नदीपात्रात महिलेचा मृत्यू

$
0
0

रामतीर्थ नदीपात्रात

महिलेचा मृत्यू

आजरा : आजरा शहरानजीक रामतीर्थ परिसरामध्ये हिरण्यकेशी नदीपत्रात महिलेचा मृत्यू झाला. जयश्री शांताराम डेळेकर (वय ४५, रा. सोहाळे पैकी बाची, ता. आजरा) असे या महिलेचे नाव आहे. डेळेकर दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले होते, असे पोलिसांतून सांगण्यात आले. याबाबत आजरा पोलिसांत नोंद झाली आहे.

०००

मारहाणप्रकरणी गुन्हा

गडहिंग्लज : करंबळी (ता.गडहिंग्लज) येथे किरकोळ कारणावरून मंगल दुडाप्पा पाटील (वय ३७) यांना मारहाण केल्याप्रकरणी दोघींविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला. शुभांगी तानाजी कणसे व दीपा बाळू माळी (दोघेही रा.करंबळी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पाटील यांच्या घराबाहेर हा प्रकार घडला. पाटील दारात रांगोळी काढत असताना कणसे यांनी त्यांना दगड मारला. दगड का मारलास असे विचारले असता कणसे व माळी या दोघींनी पाटील याना शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्तेचे समीकरण बदलण्याची चिन्हे कमीच

$
0
0

काँग्रेस आघाडीकडे ३२ तर विरोधकांकडे २६ संख्याबळ

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जातीच्या दाखल्याचा फटका महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीबरोबरच भाजप ताराराणी आघाडीला देखील बसला आहे. यामुळे १९ नगरसेवकांचे पद जरी गेले असले तरी महापालिकेच्या सत्ता समीकरणावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता फारच कमी आहे. नव्या समीकरणात काँग्रेस आघाडीकडे ३२ तर विरोधकांचे संख्याबळ २६ असणार आहे.

तीन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली. आघाडीच्या ४४ सदस्यांमध्ये शिवसेनेच्या चार सदस्यांची भर पडल्याने हा आकडा ४८ पर्यंत पोहचला. याउलट विरोधकांकडे ३३ सदस्य होते. निलेश देसाई यांचे पद गेल्यानंतर याच आघाडीचे रत्नेश शिराळकर निवडून आले, त्यामुळे आकडेवारीत फारसा फरक पडला नाही. मात्र गुरूवारी झालेल्या राजकीय भूकंपानंतर महापालिकेत सत्ताबदलाच्या चर्चेला अचानक वेग आला.

न्यायालयाच्या निर्णयाने काँग्रेस आघाडीच्या अकरा नगरसेवकांना दणका बसला आहे. यामुळे आघाडीचे संख्याबळ ३३ पर्यंत घसरले आहे. आघाडीला मदत करणाऱ्या शिवसेनेचा एक सदस्य अपात्र ठरल्याने त्याचा फटका बसेल. यामुळे सत्ताधारी गटाचे बारा सदस्य कमी झाले तरी त्याचा सत्तेवर काहीच परिणाम होणार नाही. कारण दुसऱ्या बाजूला भाजप ताराराणी आघाडीचे सात नगरसेवक यापुढे सभागृहात नसतील. यामुळे विरोधी आघाडीचे संख्याबळ २६ होणार आहे. महापौरपदाची निवडणूक अजून लांब आहे, यामुळे सत्ताकारणात या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही.

चौकट

स्थायी समितीत होणार चुरस

भाजप ताराराणी आघाडीचे स्थायी समितीत संख्याबळ कमी होते, पण राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने भाजपचे आशिष ढवळे सभापती झाले. पण न्यायालयाच्या निर्णयाने दीपा मगदूम व अफजल पिरजादे यांचे नगरसेवकपद धोक्यात आले आहे. यामुळे आगामी सभापती निवडणुकीपर्यंत ही स्थिती कायम राहिल्यास सभापतीपद पुन्हा एकदा विरोधकांना मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरस्कार प्रदान

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर चित्पावन संघातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना गौरविण्यात आले. चित्पावन संघाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. हुबळीचे उद्योजक अच्युत लिमये, कराडचे उद्योजक रमेश गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती. ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम येथे कार्यक्रम झाला. कोल्हापूर येथील अनिरुद्धशास्त्री जोशी यांना गुरु पुरस्कार तर सांगली येथील मंदार पुजारी यांना वैदिक सन्मान पुरस्कार प्रदान केला. सुनीता केळकर (कोल्हापूर) यांना आदर्श माता पुरस्कार तर पद्माक्षी घैसास (पुणे) यांना महिला पत्रकार सन्मान पुरस्कार, कुडाळ येथील केशव फाटक यांना सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. मालती जोशी (सांगली) यांना सामाजिक कार्याचा महिला पुरस्कार देऊन सन्मानित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रांतिकुमार वरकचे यश

$
0
0

कोल्हापूर: येथील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी क्रांतिकुमार राजेश वरकने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) शहर गुणवत्ता यादीमध्ये १८ वे स्थान पटकावले. क्रांतिकुमारने २९२ पैकी २५८ गुण मिळवले आहे. इंग्लिश माध्यमात तो शहर विभागात प्रथम आला आहे. त्याला वडील राजेश, आई सुचित्रा व रविंद्र पोर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक राखी जवानांसाठी उपक्रम आज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

देश रक्षणासाठी सीमेवर अहोरात्र कार्यरत असलेल्या जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'घरातील एक राखी सीमेवरील जवानांसाठी' या उपक्रमाअंतर्गत आज (ता. २४) सकाळी १० वाजता विवेकानंद कॉलेज येथे राख्या प्रदान करण्यात येणार आहेत. 'राष्ट्र रक्षाबंधन' म्हणून आझाद हिंद राष्ट्रीय चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी राखी घेऊन यावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे केले आहे. विवेकानंद कॉलेजमधील शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे स्मृती भवन येथे आयोजित केलेल्या उपक्रमात महाविद्यालय, शाळा विविध संस्था यांच्याकडून जमा झालेल्या राख्या जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते पोस्टामार्फत सीमेवर पाठवल्या जाणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे असतील. डाक प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील व उद्योगपती मोहन मुल्हेरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत विचारच राज्य एकसंध ठेवतील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'महाराष्ट्रात काही लोकांकडून जातीय भिंती उभारून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला एकसंध ठेवण्याचे सामर्थ्य संत परंपरेतील विचारात असून, ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे,' असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

सातारा येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात गुंफण अकादमी व यशवंतराव चव्हाण विचार मंचतर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन व गुंफण गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. सबनीस अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाष जोशी, कराड अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. सुभाषराव एरम, मसूरच्या सरपंच सुनीता मसूरकर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य रमणलाल शहा लिखित 'आम्ही जिंकिला संसार' व डॉ. बसवेश्वर चेणगे लिखित 'प्रश्नवेध' या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य शहा यांचा ८५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, संगम उद्योग समूहाचे बाळासाहेब कुलकर्णी, राज्य शिक्षक संघाचे संपर्कप्रमुख सिद्धेश्वर पुस्तके, सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबिरे, वास्तुशास्त्र अभ्यासक नेहा शहा व गेवराई (जि. बीड) येथील प्रसिद्ध वक्ते रामानंद तपासे यांना गुंफण गुणगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

डॉ. सबनीस म्हणाले, 'अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखे बनून प्रत्येक विरोधकाचे मन जिंकले पाहिजे, तर काँग्रेस कार्यकर्त्याने हिमालयाच्या रक्षणासाठी धावून जाणाऱ्या सह्याद्रीसारखे म्हणजेच स्व. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे बनले पाहिजे. गुंफण अकादमीचे पुरस्कार ही मराठी संस्कृतीची सुंदर गुंफण आहे. अकादमीने पुरस्कारासाठी कोणत्याही एका जातीधर्मातील व्यक्तीला न निवडता संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब दिसेल अशा सर्व समाजातील व्यक्तींची निवड केली हे महत्त्वपूर्ण आहे.'

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या, 'प्राचार्य शहा यांचा अभ्यास, व्यासंग व त्यांनी संत साहित्यावर केलेले चिंतन उल्लेखनीय आहे. समाजासाठी त्यांचे साहित्य मार्गदर्शक व प्रेरक आहे.' यावेळी मिलिंद जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, सीए दिलीप गुरव, नेहा शहा यांनीही मनोगत व्यक्त केले. चंद्रकांत कांबिरे यांचा यावेळी न्यायालय अधीक्षकपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा सत्कार सातारा जिल्हा बँकेच्यावतीने संचालक प्रकाश बडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी प्रास्ताविक केले. नितीन शहा यांनी स्वागत केले. चंद्रकांत कांबिरे यांनी सूत्रसंचालन केले. सुजित शेख यांनी आभार मानले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंकफूडचा अतिरेक

$
0
0

कॉलेजच्या परिसरात होतेय विक्री; युजीसीच्या नियमांची अंमलबजावणी नाही

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : बदलती जीवनशैली, चटपटीत खाण्याच्या सवयी, सहज उपलब्ध होणारे पदार्थ यामुळे शहरातील तरुणाई फास्ट आणि जंक फुडचे अतिरेकी सेवन करत आहे. यामुळे तरुण वयात अनेक आजारांना बळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ आणि कॉलेज व परिसरात जंकफूड विक्रीस बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी गरजेची आहे.

गतिमान जीवनशैली अंगीकारताना पटकन उपलब्ध होणाऱ्या आणि चविष्ट असणाऱ्या खाद्यपदार्थांकडे तरुणाई आकर्षित होत आहे. शहरात मोठ्या जाहिरातीचे लागलेले फलक, टी. व्ही, इंटरनेट, मोबाइल या माध्यमातून तरुणाईला प्रभावित करणाऱ्या जाहिराती केल्या जातात. यामुळे अशा पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जाते. शहरात फास्ट फूड पुरवणारे रेस्टॉरंट, शॉप सहज उपलब्ध असल्याने त्याचा विळखा आणखी घट्ट होत आहे. तसेच ऑनलाइन डिलिव्हरीच्या सोयीदेखील तत्काळ उपलब्ध आहेत. कॉलेजला जाणारे तरुण सकाळी नाश्त्यात फास्टफूडला प्राधान्य देतात. मधल्या ब्रेकमध्ये तळलेले पदार्थ खाल्ले जातात. त्याबरोबर शीतपेयांची मागणी केली जाते. कॉलेज आवारात अशा पदार्थांची सहज विक्री होत असल्याने त्याला आळा घालणे अशक्य होते.

काय आहे फास्ट आणि जंक फूडमधील फरक

अनेकांना फास्ट आणि जंक फूडमधील फरक माहीत नसतो. जंक फूडचा एका अर्थाने कचरा अन्नपदार्थ असा उल्लेख केला जातो. जंक फूडमध्ये पोषक द्रव्ये नसतात किंवा त्याचे प्रमाण कमी असते. फास्ट फूडचा अर्थ लवकरात लवकर तयार होणारे आणि चटपटीत असणारे पदार्थ असा होतो. असे पदार्थ उभ्याने, चालता-बोलता अगदी गाडीत बसूनही खाता येतात. फास्ट फूड तळलेले असतात. तसेच गरम करण्याचा नावावर ते वारंवार त्याच तेलात तळले जातात. अशा पदार्थांत ट्रान्स फॅट आणि कॅलरिज अधिक असतात त्यामुळे ते अधिक धोकादायक असतात. त्यात साखर आणि मिठाचे प्रमाण देखील अधिक असते.

फास्ट आणि जंक फूडचे आरोग्यावर होणारे परिणाम

प्री डायबेटिस

अशा पदार्थांच्या अतिरेकी सेवनामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. कारण या फूडमध्ये शरीराला आवश्यक असणारे घटक अल्पप्रमाणात असतात. आहारातून शरीराला ग्लुकोजचा पुरवठा होत असतो मात्र जंक फूडमुळे इन्सुलिन निर्मितीच्या कार्यात बिघाड निर्माण होतो. या पदार्थांत फायबरचे प्रमाण असल्याने रक्तातील साखर वाढते. कमी वयात अनेकजण प्री डायबेटीसचे शिकार झालेले असतात.

पोटाचे विकार

सातत्याने जंक फुडच्या आहारी गेलेल्यांना पचनविकार त्रास देतात. तळलेल्या पदार्थांच्या माध्यमातून पित्तनिर्मिती अधिक होऊन पोटातील त्वचेला हानी होते. त्याचबरोबर या पदार्थांत फायबरचे प्रमाण अत्यल्प असल्याने बद्धकोष्ठताचा त्रास ठरलेला असतो.

कमालीचा थकवा व नैराश्य

शरीराचे संतुलन ठेवण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही पोषणद्रव्ये जंकफूडमध्ये नसल्याने शरीरासाठी उर्जा निर्मिती होत नसल्याने दीर्घकालीन थकवा, कमजोरी जाणवते. अत्सेच तरुणाईत हार्मोन्सचे प्रमाण बिघडून नैराश्य वाढते. तसेच चित्रविचित्र आभास निर्माण होतात.

हृदयविकाराचा धोका

मुळातच जंक फुडच्या सेवनामुळे वजनवाढ होते. मेदामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढून त्याचा हृदयावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. तसेच हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा तीव्र धक्का बसू शकतो.

किडनी व यकृताला मारक

चिप्स आणि फ्राईज यामध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते. यामुळे अतिप्रमाणात शरीरात फॅट्स तयार होतात. रक्तातील घटक गाळून विषारी व टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम किडनी करत असल्याने या प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम होतो. तसेच जंकफूड सोबत शीतपेयांचा मारा केल्याने यकृताची काम करण्याची क्षमता कमी होते.

कर्करोगाचा धोका

फायबरचा अभाव असल्याने जंकफूड हानिकारक असतातच पण त्यात असलेल्या साखर आणि मेद यामुळे प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.

हे आहेत फास्ट आणि जंक फूड

पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फाईज, चायनीज पदार्थ, रोल्स, सँडविच, रॅप्स,चिप्स, मंचूरियन, नुडल्स, चॉकलेट, केक, पेस्ट्री, चिकन, चिली, वडापाव, सामोसा, आईस्क्रीम सोबतीला शीतपेये अशा पदार्थांचा यात समावेश होतो

जंक फूड बंदीबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाचा पुढाकार

देशातील सर्व विद्यापीठे तसेच महाविद्यालये व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांच्या कॉलेज कॉलेज कॅम्पसमध्ये जंक फुडवर बंदी घालण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने २०१६ मध्ये घेतला होता. त्यानुसार आयोगाने विद्यापीठांना तसे पत्रही पाठवले होते पण त्याच्या अंमलबजावणीत दिरंगाई झाली असल्याने आयोगाने नव्याने निर्देश जारी केले आहेत. तसेच या निर्णयाची कसोशीने अंमलबजावणी करावी, असे नमूद करण्यात आले आहे. महाविद्यालयांनी याबाबत जनजागृती करावी, असे नमूद केले आहे. तसेच सीबीएसई मंडळानेही संलग्न शाळांना या निर्णयाबाबत कळवले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तरुणाईच्या आरोग्याबाबत सजगता वाढणार आहे.

विद्यापीठ, महाविद्यालये कँम्पसमध्ये जंकफुडच्या विक्रीवर बंदीबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेला निर्णय मुलांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि अभिनंदनीय आहे. यामुळे घरचे सकस पदार्थ खाण्याकडे मुले आपोआप वळतील. कायद्यानेच हा निर्णय घेतल्याने त्याची अंमलबजावणी बंधनकारक असणार आहे.

प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर, विवेकानंद कॉलेज.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जंक फुडच्या बंदीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच महाविद्यालयीन पातळीवर जंक फुडचे दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यास भविष्यातील त्यांचे आरोग्य सुरक्षित राहील. शासनाने या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे.

डॉ. पंकज एस. पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९ सप्टेंबरनंतर शेळया,धनगर आरक्षणासाठी ८ सप्टेंबरची डेडलाइन

$
0
0

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते. त्यांचे सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे झाले तरी आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. आता धनगर समाजाची सहनशीलता संपली आहे. ८ सप्टेंबरपूर्वी सरकारने आरक्षणाची अंमलबजावणी करावी, अन्यथा हातात कुऱ्हाड घेऊन शेळ्या, मेंढ्यांसह धनगर समाज रस्त्यावर उतरेल,' असा इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी शुक्रवारी दिला. समस्त धनगर समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्चासमोर ते बोलत होते.

शेंडगे म्हणाले, 'भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केली आहे. यामुळे सरकार उलथवून टाकण्याची समाजाची मानसिकता झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश केला. मात्र प्रवर्गातील लाभ समाजाला अजूनही मिळालेला नाही. चार वर्षांपूर्वी बारामतीत धनगर समाजाचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी फडणवीस यांनी आमची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या आश्वासनामुळे धनगर समाजाने भाजपला मतदान केले. भाजपची सत्ता आली. मात्र आरक्षणाचे आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही.'

दरम्यान, दुपारी बाराच्या सुमारास दसरा चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. कपाळावर भंडारा, डोक्यावर पिवळी टोपी, गळ्यात पिवळा स्कार्प अन् हातात पिवळा झेंडा घेऊन 'येळकोट... येळकोट जय मल्हार'चा जयघोष करीत कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या अग्रभागी मुली, त्यापाठोपाठ महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, विविध संघटनांचे प्रमुख नेते, अबालवृध्दांसह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सर्वच वक्त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच आंदोलकांनी ठिय्या मारला. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागणीचे निवेदन दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

मोर्चात उद्योगपती विलासराव वाघमोडे, बाबूराव हजारे, अशोकराव कोळेकर, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, नगरसेवक राजसिंह शेळके, कल्लाप्पा गावडे, आप्पासाहेब हजारे, संदीप कारंडे, बाबासाहेब सावगावे, कृष्णात शेळके, बाळासाहेब मोटे, तम्मा शिरोले, दीपक शेळके, बाबूराव बोडके, उन्मेश वाघमोडे, देवाप्पा चोपडे, धोंडिराम सिद आदी उपस्थित होते.

----------------

चौकट

मुलींच्या हस्ते निवेदन

तेजस्विनी वाळकुंजे (उचगाव), तनिष्का म्हैसाळे (अर्जुनवाड), माऊली गावडे (शिरोली पुलाची), विश्वनाथ पुजारी (नेर्ली), श्रद्धा पुजारी (कुंभोज), प्रज्ञा पुजारी (अब्दुललाट), श्रुती बरगाले (हेरवाड) या मुलींची जोरदार भाषणे झाली़ या मुलींच्याच हस्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन वर्षांत दोन हजार कोटींच्या ठेवी

$
0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर : राष्ट्रीय आणि व्यापारी बँकांशी स्पर्धा करताना सेवा आणि आधुनिकता यांची सांगड घालत जिल्ह्यातील सहकारी बँकाही श्रीमंत झाल्या आहेत. विश्वासार्ह व्यवहारामुळे या बँकांमध्ये गेल्या तीन वर्षांत दोन हजार कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत. तसेच तीन नवीन बँकांची वाटचाल शेड्युल्ड बँकांच्या दिशेने सुरू आहे. विशेष म्हणजे या बँकांचा एनपीए केवळ चार टक्के आहेत.

पंधरा वर्षांपूर्वी जिल्ह्यात पतसंस्थांचे पीक जोरात आले. पण, अनेक पतसंस्था बुडाल्या. त्यामुळे पतसंस्थांबरोबर सहकारी बँकांतील ठेवीही कमी झाल्या. याचवेळी दोन-तीन सहकारी बँकांही अवसायनात निघाल्या. शाहू, बलभीम, रवी यांसारख्या काही बँका इतर बँकांचे विलिनीकरण झाले. या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांची स्थिती नाजूक झाली. एकीकडे ठेवी कमी होण्याचे प्रमाण वाढत असतानाच कर्जवसुलीही थांबली. सामान्य लोकांना कर्ज मिळणे कठीण झाले. पतसंस्था आणि सहकारी बँका या दोन्हींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याने त्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला.

गेल्या तीन वर्षांत मात्र सहकारी बँका पुन्हा एकदा सक्षम होत असल्याचे चित्र आहे. बँकांची संख्या किंवा शाखा फार वाढल्या नसल्या तरी ठेवी मात्र मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. २०१५ साली असलेला सात हजारांवरील ठेवीचा आकडा यावर्षी साडेनऊ हजारांवर पोहचला आहे. केवळ या वर्षभरात ९५० कोटींच्या ठेवी वाढल्या. कल्लाप्पाणा आवाडे जनता सहकारी, वारणा, कोल्हापूर अर्बन, वीरशैव, आजरा सहकारी व महालक्ष्मी को-ऑप या सहा बँकांतील ठेवी प्रत्येकी पाचशे कोटींपेक्षा जादा आहेत. तीन बँका मल्टिस्टेट तर एक बँक मल्टिस्टेट व शेड्युल्ड आहे.

कोल्हापूर अर्बनपाठोपाठ वीरशैव व वारणा या बँका शेड्युल्ड होण्याच्या मार्गावर आहेत. राष्ट्रीय व व्यापारी बँका ज्या सुविधा देतात त्या सर्व सुविधा आता सहकारी बँकाही देत आहेत. एटीएम, नेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, आयएमपीएस सुविधाही मिळत असल्याने ग्राहकांची संख्याही वाढत आहे. राज्य व केंद्र सरकारचे अनुदानही या बँकांत जमा होत असल्याचे सभासद व ग्राहकांची चांगली सोय झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बँकांच्या तुलनेत सहकारी बँका कुठेच कमी पडत नसल्यानेच त्यांची श्रीमंती वाढत आहे.

चौकट

अशा वाढल्या ठेवी आणि दिलेली कर्जे

साल ठेवी कर्जवितरण

२०१५ ७४५१ ४५८२

२०१६ ७९०० ४६४५

२०१७ ८८०० ५३८०

२०१८ ९५५० ५९२५

......................

सहकारी बँकिंग

जिल्ह्यातील एकूण बँका ४७

बँकांच्या शाखा ४५०

एकूण ठेवी ९५५० कोटी

एकत्रित व्यवसाय १५,४७५ कोटी

बँकांनी केलेली गुंतवणूक ३७५० कोटी

कर्मचारी ३५५०, सभासद ६ लाख २५ हजार

...................

पाचशे कोटींपेक्षा अधिक ठेवी असलेल्या बँका ६

शंभर ते पाचशे कोटी ठेवी असलेल्या बँका १६

शंभर कोटीपर्यंत ठेवी असलेल्या बँका २५

............

राष्ट्रीय व व्यापारी बँकांचा एनपीए अकरा टक्के आहे. जिल्ह्यातील सहकारी बँकांचा मात्र केवळ चार टक्के आहे. यावरून या बँका किती सक्षम आहेत, हेच स्पष्ट होते. सेवा आणि आधुनिकतेची सांगड घालत सुरु असलेल्या विश्वासार्ह कारभाराच्या बळावरच या बँकांतील ठेवी वाढत आहेत.

शंकर मांगलेकर, सीइओ नागरी बँक असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राहीची कामगिरी देशाला अभिमानस्पद’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणाऱ्या कोल्हापूरच्या राही सरनोबतची गौरवशाली कामगिरी कोल्हापूरलाच नव्हे तर देशाला अभिमानास्पद आहे,' अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिचा गौरव केला.

राजारामपुरीतील राहीच्या घरी जाऊन पालकमंत्री पाटील यांनी तिचे वडील जीवन सरनोबत, आई प्रभा यांच्यासह सर्व कुटुंबीयांचे अभिनंदन करून राहीच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री पाटील म्हणाले, 'राहीची आशियाई स्पर्धेतील यशस्वी कामगिरी देशवासीयांना अभिमानास्पद आहे. महसूल खात्यात उपजिल्हाधिकारी म्हणून काम करणाऱ्या राहीची देदीप्यमान कामगिरी राज्य सरकारला विशेषत: महसूल विभागाला प्रेरणादायी ठरणारी आहे. कोल्हापूरला मोठी क्रीडा परंपरा लाभली असून गुणवंत खेळाडूंची मोठी मालिकाच तयार झाली आहे. विविध क्रीडा प्रकारांत खेळाडूंनी कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे. कोल्हापूरच्या दिव्यांग खेळाडूंनीही खेळामध्ये लौकिक निर्माण केला आहे. राहीबरोबरच तेजस्विनी सावंत, वीरधवल खाडे, अनुष्का पाटील, रेश्मा माने, शाहू माने, स्वरूप उन्हाळकर या खेळाडूंनी कोल्हापूरचा लौकिक वाढविला आहे.'

यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे जिल्हा समन्वयक विजय जाधव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुदतीबाबत कायद्यात तरतूद करू

$
0
0

पालकमंत्र्यांचा सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिलासा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित वेळेत सादर न केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने महापालिकेच्या १९ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. या नगरसेवकांचे पद कायम राखण्यासाठी मुदतीबाबतच्या कायद्यांमधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी दिले. याबाबत सोमवारी (ता.२७) मुंबई येथे नगरविकास विभागाच्या सचिवांसोबत प्रमुख नगरसेवकांची बैठक घेण्यात येईल, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र म्युनिसिपल कौन्सिल, नगरपंचायत व इंडस्ट्रियल टाउनशिप अॅक्ट १९६५ कलम ९ 'अ' नुसार निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत महापालिकेच्या नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. सुप्रीम कोर्टाने या कायद्यातील तरतुदीनुसार असे प्रमाणपत्र सादर न केलेल्या १९ नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी दिला. कोर्टाच्या निर्णयाचा महापालिकेतील सत्तारुढ व विरोधी आघाडीतील १९ नगरसेवकांना फटका बसला आहे. पद निर्णय रद्दचा निर्णय कोर्टाने दिला असला, तरी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारच्या अखत्यारित येत असल्याने त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास कोर्टाने निकार दिला. त्यामुळे पद रद्द करण्याचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात असल्याने शुक्रवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, 'सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यापूर्वी सरकारपातळीवर चर्चा करुन म्युनिसिपल अॅक्टच्या कलम ९ 'अ' मध्ये सुधारणा केल्यास नगरसेवकांचे पद कायम राहू शकते. त्यासाठी राज्य सरकारच्यावतीने कायद्यामध्ये सुधारणा करु. यासाठी सोमवारी नगरविकास विभागाच्या सचिवांबरोबर चर्चा केली जाईल.'

पालकमंत्री पाटील यांनी दिलेल्या आश्वासनामुळे पद रद्द झालेल्या नगरसेवकांसह दोन्ही आघाडीच्या प्रमुखांना काहीसा दिलासा मिळाला. सरकार पातळीवर कायद्यातील तरतुदीमध्ये बदल करण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे कायद्यातील दुरुस्तीसंदर्भात सरकारच्यावतीने तातडीने वटहुकूम काढला जाण्याची शक्यता आहे.

प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही नाही

सुप्रीम कोर्टाने जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांचे पद रद्द करण्याच निर्णय घेतला. पण याबाबतचा महापालिका प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल अथवा राज्य सरकारकडून आदेश प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाकडून कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा समाजाला एक महिन्यात आरक्षण मिळू शकते

$
0
0

माजी खासदार सुधीर सावंत यांचे स्पष्टीकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मागासवर्गीय आयोगाचा अहवाल १० दिवसात प्राप्त होऊ शकतो. हा अहवाल प्राप्त झाल्यावर मराठा समाजाला अवघ्या दहा दिवसात आरक्षण मिळू शकते', असा दावा आम आदमी पक्षाचे राज्य प्रतिनिधी माजी खासदार सुधीर सावंत यांनी केला.

सावंत म्हणाले,' मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारने मागासवर्ग आयोगाचा अहवाल न घेता आरक्षण जाहीर केल्याने ते कोर्टात टिकले नाही. मराठा समाजाचे मतदान मिळावे म्हणून नारायण राणे यांच्या अहवालानुसार आरक्षण जाहीर करुन मराठा समाजाची फसवणूक केली. त्यानंतर गेली चार वर्षे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विविध कारणे सांगून वेळकाढूपणा काढत असून मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा असा अहवाल अवघ्या दहा दिवसात मागासवर्गीय देऊ शकते, असे मागासवर्गीय अध्यक्षांनी भेटीच्यावेळी आपल्याकडे स्पष्ट केले होते.'

ते पुढे म्हणाले,' भाजप सरकारने आरक्षण प्रक्रिया देण्यासंदर्भात नोव्हेंबरची मुदत मागितली आहे. दहा दिवसांत मागासवर्गीय समितीने दिलेला अहवाल स्वीकारुन राज्य सरकारने एक दिवसाचे अधिवेशन बोलवावे. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करावी असा प्रस्ताव मंजूर करुन घ्यावा. हा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा. केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने घटना दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. कारण मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी सर्व जाती धर्मांनी केली असल्याने विधानसभा व लोकसभेत आरक्षण मागणीसंदर्भातील घटनादुरुस्तींना विरोध होऊ शकत नाही. ही सर्व प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण होऊ शकते. पण राज्य सरकारला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करायची असल्याने वेळकाढूपणा धोरण स्वीकारले जात आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतीश धुमाळ नवेजिल्हा पुरवठा अधिकारी

$
0
0

कोल्हापूर: येथील जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांच्यासह जिल्ह्यातील तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या प्रांताधिकारी, तहसीलदारांच्या बदल्या नुकत्याच झाल्या. आगवणे यांची बदली सोलापूर येथे झाली असून त्यांच्या ठिकाणी सोलापुरातील निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांची बदली झाली आहे. गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले यांची वाई (ता. सातारा) येथे प्रांताधिकारी म्हणून बदली झाली. त्यांच्या जागी पुणे येथील विजया पांगारकर यांची बदली झाली. बदली झालेल्या तहसीलदारांची नावे व कंसात बदलीचे ठिकाण असे : सुधाकर भोसले (हातकणंगले), शीतल मुळे (जिल्हाधिकारी कार्यालय), सचिन गिरी (करवीर), रामलिंग चव्हाण (गडहिंग्लज), बी. जे. गोरे (कागल), डी. आर. सावंत (गगनबावडा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images