Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आंदोलन तीव्र करण्याचा लिंगायत समाजाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्य सरकारने आंदोलनाची दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंगायत समाजाच्यावतीने धरणे आंदोलन केले जाईल', असा इशारा उत्तर महाराष्ट्र संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर दंदणे यांनी दिला. दसरा चौकातील लिंगायत संघर्ष समिती आणि जिल्हा लिंगायत समाज संघटनेच्या धरणे आंदोलनाला सोमवारी भेट देऊन मार्गदर्शन केले. नाशिक जिल्हा समितीचे अध्यक्ष भरत धुमाळ व चंद्रशेखर दंदणे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक,अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यातील पाचशेहून अधिक समाजबांधवांनी दसरा चौकातील आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी भरत धुमाळ, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सुशिला आंधळकर, सरचिटणीस अरुण औटी यांनी भाषणात सरकारवर टीका केली.

अरुण औटी म्हणाले, 'शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत धर्माला अल्पसंख्याक धर्माचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे, अशी घोषणा केली आहे. पण मंत्री तावडे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी २०१४ मध्ये मुंबईतील आझाद मैदान येथे झालेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यावेळी सत्तेवर आल्यावर भाजप सरकार तातडीने मागण्या पूर्ण करेल असे आश्वासन दिले होते. तावडे यांनी दिलेल्या आश्वासनाला हारताळ फासला आहे.'

आज आंदोलनाला माजी आमदार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर धान्य व्यापारी प्रेरित बालकल्याण संस्था, कोल्हापूर धान्य व्यापारी मंडळ यांनी पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहापूरकर यांना पुरस्कार

$
0
0

डॉ. शहापूरकर यांना

समाजभूषण पुरस्कार

गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा घाळी स्मृती समाजभूषण पुरस्कार गडहिंग्लज साखर कारखान्याचे संचालक व प्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश शहापूरकर यांना जाहीर झाला. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. शुक्रवारी (दि.२४) डॉ. एस.एस.घाळी सभागृहात दुपारी तीन वाजता व्हाईस कल्चर समुपदेशक निनाद काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होईल. तर विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी काळे यांचे 'हरवत चाललेला संवाद व अस्वस्थ समाजमन' या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. शहापूरकर यांचे वैद्यकीय सहकार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाचा गौरव म्हणून त्यांची पुरस्काराची निवड केली आहे. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख २५ हजार असे त्याचे स्वरूप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदूर शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त

$
0
0

सीईओ मित्तल यांचे आदेश, गटशिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी होणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल तालुक्यातील वंदूर विद्यामंदिरमधील मुख्याध्यापक विष्णू दादू मोरे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी यासाठी १५० हून अधिक शिक्षकांनी सोमवारी जिल्हा परिषद गाठली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. याप्रसंगी सीईओ मित्तल यांनी वंदूर येथील संबंधीत शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करण्याचे आदेश दिले. तसेच कागलचे गटशिक्षण अधिकारी जी. बी. कमळकर यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याबाबत आदेशही सामान्य प्रशासन विभागाला दिले.

शाळेतील स्वच्छतागृहाच्या बांधकामावरुन शाळा व्यवस्थापन समितीमधील काही सदस्य मुख्याध्यापक मोरे यांना त्रास देत होते. मोरे यांनी याप्रश्नी गटशिक्षणाधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली होती. मात्र गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना सहकार्य केले नाही. या साऱ्या प्रकारामुळे मोरे हे गेले काही दिवस दबावाखाली होते. त्यांनी, शनिवारी दुपारी सिध्दनेर्ली येथील निवासस्थानी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करावी यासाठी विविध शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली १५० शिक्षक सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेत एकत्र आले.

शिक्षक संघटनेचे सुनील पाटील, राजाराम वरुटे, मोहन भोसले, रवीकुमार पाटील, प्रसाद पाटील, गौतम वर्धन, सुरेश कोळी, एस. के. पाटील. ए. जे. देसा, नंदकुमार वाईंगडे, बाळासाहेब निंबाळकर आदींचा समावेश होता. शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सीईओ मित्तल यांनी शाळा व्यवस्थापन समिती बरखास्त करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांना दिले. गटशिक्षण अधिकारी कमळकर यांना मंगळवारी चौकशीसाठी जिल्हा परिषदेत हजर राहण्याचा आदेशही काढला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातनवरील बंदीची मागणी अनाठायी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपास अपूर्ण आहे, अजून पुरावे समोर आलेले नाहीत. गुन्हा सिध्द झालेला नाही. कोर्टाने कुणाला दोषी ठरविले नाही. त्यापूर्वीच सनातन संस्थेवर बंदी घालण्याची होणारी मागणी अनाठायी असल्याचे पत्रक सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी प्रसिध्दीस दिले आहे. आगामी निवडणुकीत हिंदुत्ववादी पक्षांपासून हिंदूची मते तोडण्याचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकात पुढे म्हटले आहे, 'डॉ. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत सनातन संस्था हाच एकमेव तपासाचा केंद्रबिंदू मानून तपास केला गेला. कोणताही पुरावा नसताना सनातन संस्थेला दोषी ठरविले गेले. कसलेही पुरावे समोर आले नसताना साधकांची मानहानी का केली गेली, शिवाय दाभोलकरांच्या हत्येत वापरलेले पिस्तुल सापडलेल्या नागोरी खंडेलवाल यांच्या जामिनाला दाभोलकर परिवाराने विरोध का केला नाही, असा सवालही डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉर्निंग वॉकमधून तपास यंत्रणांचा निषेध

$
0
0

(फोटो आहे)

मॉर्निंग वॉकमधून

तपास यंत्रणांचा निषेध

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (ता. २०) शिवाजी पेठ परिसरात केलेल्या मॉर्निंग वॉक आंदोलनात तपास यंत्रणांचा निषेध करण्यात आला. कर्नाटकच्या पोलिसांना जे जमते, ते महाराष्ट्रातील पोलिसांना का जमत नाही असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. त्याचबरोबर तपासातील दिरंगाईबद्दल सरकारला जाबही विचारण्यात आला.

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला शहरात विविध ठिकाणी मॉर्निंग वॉक आंदोलन केले जाते. तपास यंत्रणांनी योग्य दिशेने तपास करून मारेकऱ्यांसह सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचा आग्रह या आंदोलनातून धरला जातो. सोमवारी शिवाजी पेठेतील फिरंगाई मंदिर पसिरात मर्निंग वॉक आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रकाश हिरेमठ यांनी 'गोळ्या घाला, लाठ्या मारा. विचार नाही मरणार' हे गीत सादर केले. निशांत शिंदे याने तपासातील दिरंगाईवर बोट ठेवणारी कविता सादर केली. यावेळी बोलताना उपस्थितांनी कॉ. पानसरे हत्येच्या तपासातील दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकार आणि तपास यंत्रणांचे काम संशयास्पद असल्याचा आरोपही करण्यात आला. आरोपींना वाचवण्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे काय, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. फिरंगाई तालीम, वेताळ तालीम, खंडोबा तालीम,सरदार तालीम ते महाराष्ट्र हायस्कूल या परिसरात मॉर्निंग वॉक आंदोलन करण्यात आले.

यावेळी अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, प्राचार्य टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, सतीशचंद्र कांबळे, हसन देसाई, उदय नारकर, फिरंगाई तालमीचे पी. जी. कांबळे, दत्तात्रय सुतार, भाऊ गणाचार्य, अजित चव्हाण, सागर साळोखे, सुनंदा चव्हाण, दिलदार मुजावर, उमेश सूर्यवंशी, सागर साळोखे, सुजाता म्हेत्रे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व श्रमिक संघाचा इचलकरंजीत मोर्चा

$
0
0

सर्व श्रमिक संघाचा इचलकरंजीत मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखाना स्थलांतर न करता आहे त्याच ठिकाणी अद्ययावत इमारत उभारण्यात यावी, याठिकाणी कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी नेमावा, सर्व प्रकारची औषधे मिळावीत यासह विविध मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघाच्यावतीने हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील कामगारांचा सोमवारी मोर्चा काढण्यात आला. येत्या १५ दिवसांत मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असलेल्या इचलकरंजी शहर व परिसरात औद्योगिक क्षेत्रातील जवळपास ४० हजार कामगार राज्य कामगार विमा योजनेचे लाभार्थी आहेत. परंतु येथील राज्य कामगार विमा योजना सेवा दवाखान्यात विस्कळीतपणा झाला असून कामगारांना आरोग्य सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. १६ जुलै २०१८ पासून आधीच आरोग्य सुविधा मिळत नसताना ऑनलाईन रेफरल लेटर देणे बंधनकारक केले आहे. बहुसंख्य कामगार हे अशिक्षित आहेत. त्यामुळे तातडीची आरोग्यसेवा मिळण्याची गरज असताना ऑनलाईन रेफरल लेटरअभावी उपचार न झाल्यास जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याठिकाणी कायमस्वरुपी वैद्यकिय अधिकारी नेमावा, सर्व प्रकारची औषधे मिळावीत, सध्या सुरु असलेल्या जागेतच नवीन इमारतीसाठी नगरपालिकेला प्रस्ताव द्यावा अथवा नगरपालिकेच्या इमारतीत अद्ययावत सेवा देण्यात यावी आणि कामगारांचा दवाखाना स्थलांतरीत करण्यात येवू नये अशी मागणी केली.

आंदोलनात सुनील बारवाडे, धोंडीबा कुंभार, अतुल कुंभार, अमोल कांबळे, शशिकांत घाटगे, दिलीप भोपळे, सचिन सुभेदार, विनायक गुंडकुले, राजू माने, विवेक पाटील, अमर मगदूम, सुनील शिंदे आदींसह कामगार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी पेठ एकवटली

$
0
0

मराठा आरक्षणप्रश्नी शिवाजी पेठेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शिवाजी पेठेतील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. आरक्षणप्रश्नी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.

निवृत्ती चौकातून मराठा समाजाच्या मोर्चास सुरुवात झाली. बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, पानलाईन, महानगरपालिका, चिमासाहेब चौकातून मोर्चा दसरा चौकात आला. दसरा चौकात सकल मराठा समाज व लिंगायत समाजाच्या ठिय्या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा दिल्या. मोर्चाच्या मार्गावर अवघी शिवाजी पेठ अवतरली होती. दसरा चौक, व्हिनस टॉकीज, स्टेशन रोड, असेंब्ली रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. आंदोलनात आमदार चंद्रदीप नरके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर बाजीराव चव्हाण, सागर चव्हाण, उदय साळोखे, माजी नगरसेवक विक्रम जरग, रविकिरण इंगवले, अजित राऊत, दत्ता टिपुगडे, इंद्रजित बोंद्रे, उत्तम कोराणे, अजित नरके, अॅड. अशोकराव साळोखे, राजू सावंत, लाला गायकवाड, सुरेश जरग, राजेंद्र चव्हाण, अजित इंगवले, सुहास साळोखे आदींसह नागरिक सहभागी झाले. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'पाटीलकी' पणास लावावी, असे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले. आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास पालकमंत्री पाटील यांच्या घरासमोर उपोषण काढण्यास मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. त्याचबरोबर मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण न झाल्यास आमदार चंद्रदीप नरके, महेश जाधव यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला.

देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले,' सरकारने मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खटले मागे घ्यावेत, यासाठी पालकमंत्र्यांच्या मदतीने मुख्यमंत्र्याना आवाहन करणार आहे. मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने पक्षभेद विसरुन आंदोलन सुरु केले असून यापुढे आंदोलनाचे केंद्र शिवाजी मंदिर राहील. सरकारने नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास माझ्या पदाचा राजीनामा देईन.'

माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले,' मराठा आरक्षण मागणीसाठी ५७ शांततेत मोर्चे काढूनही सरकारने दखल घेतलेली नाही. आरक्षणासाठी ३२ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना, फी भरताना अडचणी येत आहेत. मराठा समाजातील उद्रेक वाढला असून राज्य सरकारने तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा.'

माजी महापौर सई खराडे म्हणाल्या,' शिवाजी पेठेने मराठा आरक्षणाची मागणी करुन आंदोलनाची हाक दिली असून महिलांसह सर्वजण रस्त्यावर उतरलो आहोत. सरकारवर दबाव आणण्यासाठी आमदार नरके व महेश जाधव यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. पण त्यांनी केवळ घोषणा न करता कृती करुन सरकारवर दबाव आणावा.'

शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण म्हणाले,' मराठा आरक्षणप्रश्नी सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकी दाखवून शिवाजी पेठेची ताकद दाखवली आहे. या ताकदीपुढे सरकारला नमावे लागेल. मराठा आरक्षणासाठी यापुढे शिवाजी पेठ नेतृत्व करण्यास अग्रेसर राहील. '

माजी नगरसेवक रविकिरण इंगवले म्हणाले,' कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु असताना काहीजण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची बदनामी करत आहेत. पण शिवाजी पेठेचे आंदोलन कुणाच्या समर्थनात व विरोधात नसून मराठा आरक्षणासाठी आहे. वेळ पडली तर आरक्षणाच्या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या घरासमोर शिवाजी पेठ उपोषण करेल.' माजी नगरसेवक अजित राऊत म्हणाले,' मराठा क्रांती आंदोलनाचे नियोजन शिवाजी पेठेतून झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपली पाटीलकी पणाला लावावी.'

...........

आमदारकीचा राजीनामा देवू

आमदार चंद्रदीप नरके म्हणाले,' मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढूनही सरकार दखल घेत नसल्याने शिवाजी पेठ रस्त्यावर उतरली आहे. मराठा आरक्षण मागणीचा ठरावही विधानसभेत केला आहे. मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाने दिलेले दीड लाख पुरावे तपासून लवकर निर्णय घ्यावा. नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास संघर्ष अटळ आहे. त्यासाठी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे.'

..............

अन्यथा समाजाचा उद्रेक

महापौर शोभा बोंद्रे म्हणाल्या, ' राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये मराठा समाजासह मागासवर्गीयांना आरक्षण दिले होते. शंभर वर्षापूर्वी शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले असतानाही स्वातंत्र्यानंतर या समाजाला आरक्षण मिळत नसल्याने मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अन्यथा समाजाचा उद्रेक सरकारला सहन करावा लागेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत रेशनसाठी मोर्चा

$
0
0

दोन रुपये किलो दराने धान्य द्या

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

वार्षिक उत्पन्न ५९ हजार रुपयांची अट रद्द करुन सर्व रेशनकार्ड धारकांना २ रुपये किलो दराने धान्य देण्यात यावे या मागणीसाठी शहर शिवसेनेने पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाने पुरवठा निरिक्षण अधिकारी महादेव शिंदे यांना निवेदन दिले.

शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्किलीचे बनले आहे. त्यामुळे वार्षिक ५९ हजार रुपये उत्पन्नाची मर्यादा रद्द करावी या मागणीसाठी शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण, उपजिल्हाप्रमुख महादेव गौड यांच्या नेतृत्त्वाखाली पुरवठा कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी नगरसेविका सौ. उमा गौड, धनाजी मोरे, मलकारी लवटे, शिवाजी पाटील, संतोष गौड, मनोज भाट, लक्ष्मण पाटील, राजू आरगे, मारुती बन्ने, सुरज लाड, अविनाश वासुदेव, सचिन खोंद्रे, भरत शिवलिंगे, संजय पाटील, जितेंद्र मस्कर, बसय्या स्वामी आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात पावसाने उघडीप घेतली असून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजातून ४४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदी पाणी पातळी स्थिर असून दिवसभर फक्त एक इंचाने पाणी उतरले असून राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ३३ फूट पाच इंच इतकी होती. जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधीक ४४ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत असून कोदे (११२ मि.मी.), राधानगरी (८८), कासारी (७५), पाटगाव (६६), घटप्रभा (७२) या धरणांच्या क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. राधानगरी धरणाचे तीन व सहा क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडे असून ४४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. दूधगंगा धरणातून ८०००, तुळशी धरणातून ३२७७ तर वारणा धरणातून २४०५ क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. धरणक्षेत्रातील पाऊस आणि धरणाचा विसर्ग यामुळे पंचगंगेचे पाणी अद्याप पात्राबाहेर असून सोमवारी सकाळी आठ वाजता राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी ३३ फूट सहा इंच इतकी होती. सायंकाळी सात वाजता एक इंचाने पाणी उतरले.

दिवसभरातील पाऊस (मिमी)

गगनबावडा - ४४

हातकणंगले ४.७५

शिरोळ २.८५

पन्हाळा १२.८६

शाहूवाडी ४३.१६

राधानगरी २०.१७

करवीर ९.६३

कागल १३

गडहिंग्लज ४.८५

भुदरगड १६.२०

आजरा १३

चंदगड १६.६७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांवर दगडफेक

$
0
0

मटका अड्ड्यावर छाप्यावेळी

रांगोळीत पोलिसांवर दगडफेक

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

रांगोळी तालुका हातकणंगले येथे मटका अड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली. यामध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. दरम्यान, यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर दगडफेक करणाऱ्या सशयितांची धरफकड करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेनंतर रांगोळी येथे मोठा जमाव जमल्याने परिस्थिती तणावपूर्ण होती.

दरम्यान, मटका अड्यावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी ८ हजार ७८० रुपये आणि ७ मोबाईल, मटक्याच्या चिठ्या जप्त केल्या आहेत. याप्रकरणी शीतल इजारे आणि संतोष कुपटे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे अशी, प्रदीप कांबळे, महादेव कांबळे, तानाजी फराकटे, किरण अभ्रगे, दगडू कांबळे, भरत कांबळे, गुलाब शिंदे, मारुती आदमाणे, राजेंद्र शेळके, किरण माने, सुधाकर आवळे, सौरभ जाधव, कयुम मुजावर.

पोलिसांनी सांगितले की, नूतन जिल्हा पोलिसप्रमुख अभिनव देशमुख यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रांगोळी (ता. हातकणंगले) येथे माळभाग परिसरात मटका अड्डा सुरू असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांना समजली. त्यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार शिवाजीनगर आणि हुपरी पोलिस अशी दोन स्वतंत्र पथके या ठिकाणी छापा टाकण्यासाठी पोहोचली. यावेळी तेथे बंद खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकण्यात आला.

याचवेळी येथे जमाव एकत्र आला. जमाव आणि पोलिसांत वादावादी झाली. त्यानंतर जमावाने पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. यामध्ये निलेश भोसले हा कर्मचारी जखमी झाला. पोलिसांनी जमावावर लाठीमार केला. त्यानंतर जमाव पांगला. नंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या संशयितांनची धरफकड सुरू केली. दरम्यान, कारवाईवेळी काही महिलांनी विरोध केला. रात्री उशिरा पोलिसांनी १३ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर विविध कलमांन्वये शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत नाराजीनाट्य कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद संपण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. शहरांतर्गत पदाधिकाऱ्यांतील मतभेदांमुळे चार महिने राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली होती. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर आर. के. पोवार यांची निवड जाहीर होऊन काही दिवसांचा अवधी उलटला. पण त्यांच्या निवडीवरून पक्षात पुन्हा नाराजी निर्माण झाली आहे. शहराध्यक्षपदासाठी दावा केलेले माजी अध्यक्ष राजू लाटकर, माजी नगरसेवक अनिल कदम, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर हे गेल्या पाच-सहा दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून लांब राहिले आहेत.

शहराध्यक्षपदावरून प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम असल्याने पक्षाच्या ताकदीवर परिणाम होण्याची भीती कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी महापौर आर. के. पोवार यांच्याकडे पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे सांगण्यात येते. पोवार हे पक्षातील ज्येष्ठ व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष संघटनेसाठी होईल असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.

दुसरीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते प्रत्येक भाषणात संघटनेत तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत भाषण करतात. मग शहराध्यक्षपदाच्या निवडीत नव्या चेहऱ्यांना का संधी दिली नाही याकडे लक्ष वेधत आहेत. माजी महापौर पोवार यांनी यापूर्वी जवळपास सोळा वर्षे शहर अध्यक्षपद भूषविले आहे. बाजार समितीत प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेत ते संचालक आहेत. याकडेही पक्षातील काही कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत. शहराध्यक्षपदावरून पक्षात पुन्हा नाराजीनाट्य निर्माण झाल्याने लाटकर, कदम, शिंदे व कल्याणकर पक्षातर्फे स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. शनिवारी पक्षाचा शहरात युवक मेळावा झाला. त्यापासूनही ते लांबच राहिले. त्यांच्यापैकी काहींनी पक्ष कार्यालयाकडे न फिरकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आंदोलनाला शिक्षकांचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्या दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत असून सोमवारी निवृत्त शिक्षक, गॅरेज मालक व चालकांनी पाठिंबा दिला. मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मार्गदर्शन केले.

खेडेकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, सचिन तोडकर यांच्याशी चर्चा करून आंदोलनाबाबत माहिती घेतली. जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाने आंदोलनस्थळी भेट देऊन ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. यामध्ये अध्यक्ष जिनदत्त चौगुले, आनंदराव सोहनी, नवाब हसन, पी.एस. कांबळे, अनंत बांदेकर, कृ.जो. पाटील यांचा समावेश होता. जिल्हा टू व्हिलर मॅकेनिक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी, निपाणी, शाहूवाडी, कागल, राधानगरी तालुक्यातील गॅरेज मालक, चालक सहभागी झाले. आंदोलनाला पाठिंब्याचे पत्र असोसिएशनचे अध्यक्ष संतोष हराळे, इसाक मुजावर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या सर्वसाधारण सभेत मराठा आरक्षण मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला. संस्थेच्यावतीने धोंडीराम पाटील व सयाजी माने यांनी ठराव मंजुरीचे पत्र आंदोलकांच्या संयोजकांना दिले. कळंबा (ता.करवीर) येथील हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या सर्वसाधारण सभेत आरक्षणाचा ठराव मंजूर केला. तानाजी बराले व धोंडीराम मिरजे यांनी ठराव मंजुरीचे पत्र संयोजकांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाजपेयी यांना आदरांजली

$
0
0

वाजपेयी यांना आदरांजली

चंदगड : चंदगड येथील पंचायत समितीमध्ये आजच्या मासिक सभेत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. आज झालेल्या मासिक सभेत माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहून आजची सभा तहकुब करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी आर. बी. जोशी होते. तसेच चंदगड येथील ग्रामपंचायतीमध्येही माजी पंतप्रधान यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. पंचायत समितीच्या बैठकीमध्ये दहशतवादी हल्यात शहीद झालेले मेजर कौस्तुम राणे, चंदगड तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, माजी कर्णधार अजित वाडेकर आदींना आदरांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांची निवड

$
0
0

एकनाथ पाटील यांची निवड

राधानगरी : कंथेवाडी (ता. राधानगरी) येथील माजी उपसरपंच व भोगावतीचे माजी संचालक एकनाथ पाटील यांची शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य मध्यवर्ती कमिटीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र औरंगाबाद येथे झालेल्या १७व्या राज्य अधिवेशनात राज्य सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. या निवडीबद्धल एकनाथ पाटील यांचा सत्कार पक्षाचे जेष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेजर राणेंच्या अस्थी कलशाचे घेतले कोल्हापूरकरांनी दर्शन

$
0
0

मेजर कौस्तुभ राणे यांच्या

अस्थी कलशाचे दर्शन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काश्मिर येथे अतिरेक्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झालेल्या मेजर कौस्तुभ राणे यांच्या अस्थिकलशाचे दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनास्थळी सोमवारी सकाळी कोल्हापूरकरांनी दर्शन घेऊन त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर हा अस्थिकलश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथील सडुरे गावी नेण्यात आला.

शहीद मेजर राणे यांचे मूळ गाव सडुरे असून त्याचे काका विजय रावराणे व बहीण अश्विनी तावडे व त्यांचे कुटुंबिय कोल्हापूरमार्गे गावी निघाले होते. कोल्हापूरकरांना अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे यासाठी दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या व्यासपीठावर सोमवारी सकाळी आठ वाजता अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसह कोल्हापुरातील नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन मेजर राणे यांना आदरांजली वाहिली. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मेजर राणे यांच्या शौर्याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे, अशी भावना व्यक्त केली. याप्रसंगी स्वप्निल पार्टे, कादर मलबारी, राजदीप सुर्वे, विंग कमांडर दत्तात्रय पाटील, किशोर घाटगे, चंद्रकांत चव्हाण, अवधूत पाटील, प्रकाश पाटील, दीपक जमेनीस, शुभम शिरहट्टी, सुनील पाटील, दीपक सावंत, नंदकुमार रावराणे, जगदीश तावडे, शिवाजी नरके, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नरेंद्र यादव अध्यक्ष

$
0
0

कोल्हापूर : व्हीनस कॉर्नर मित्र मंडळाच्या गणेश उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नरेंद्र शामराव यादव व उपाध्यक्षपदी अक्षय विजय शेट्टी यांची निवड झाली. मंडळाचे अध्यक्ष शशिकांत बिडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उत्सव समितीच्या कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब झाले. उत्सव समितीच्या कार्यकारिणीवर कय्युम महंमदगौस मुजावर, सचिवपदी विशाल भोकरे तर सदस्य म्हणून खमर शेख, स्वप्नील वेसनेकर, सोमेश चौगुले, यशराज जुन्नरकर, वैभव दिवेकर, विनित बीडकर, आमीन मुजावर, तेजस शहा यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठ एकवटली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शिवाजी पेठेतील महिलांसह युवक, तालमी, मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मतभेद गाडून सोमवारी एकीची वज्रमूठ दाखवली. आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आरक्षण प्रश्नी सरकारने लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा उग्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी राज्य सरकारला देण्यात आला. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मराठा आरक्षणप्रश्नी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. आजच्या मोर्चातून ताकद दाखवताना यापुढे आंदोलन शिवाजी पेठेतून कायम सुरु राहील, अशी घोषणाही करण्यात आली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु आहे. शिवाजी पेठेच्यावतीनेही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी सकाळी निवृत्ती चौकात शिवाजी पेठेतील महिला, तालमी आणि मंडळांचे कार्यकर्ते जमू लागले. महिलांनी भगव्या साड्या परिधान केल्या होत्या, तर युवकांनी पांढऱ्या रंगाचे टी शर्ट घातले होते. भगव्या झेंड्यांनी चौक फुलून गेला होता. शिवाजी महाराजांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी मोठ्या संख्येने महिला होत्या. महापौर शोभा बोंद्रे, माजी महापौर सई खराडे, सुनीता राऊत, नगरसेविका तेजस्विनी इंगवले, जयश्री चव्हाण यांनी महिला आघाडीचे नेतृत्व केले. महिलांच्या मागे शिवाजी पेठेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाली होते.

'एक मराठा, लाख मराठा', 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे' अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दुमदुमून गेला. छत्रपती शिवराय, जिजाऊ यांच्या वेषातील बालमावळे मोर्चात सहभागी झाले होते. मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी मोर्चात थरार आणला तर दत्तपंथी भजनेही सादर करण्यात आली. मोर्चाच्या शिर्षक गीताने उत्साह निर्माण केला.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांच्या गांजापार्टीवर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेंडा पार्क येथील मोकळ्या जागेत कारमध्ये सुरू असलेल्या गांजा पार्टीवर छापा टाकून केलेल्या कारवाईत राजारामपुरी पोलिसांनी दोन डॉक्टरसह एका केबल व्यावसायिकास अटक केली. डॉ. स्वप्निल सुनील मंडलिक (वय ३०, रा. लक्षतीर्थ वसाहत), डॉ. भूषण चंद्रकांत मिठारी (३१, रा. उत्तरेश्वर पेठ) आणि युवराज उर्फ अभि मोहन महाडिक (३४, रा. डी, मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७० ग्रॅम चरस, ५० ग्रॅम गांजासह कार जप्त केली. रविवारी (ता. १९) रात्री ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडा पार्कातील मोकळ्या जागेत रात्री काही तरुणांची गांजा पार्टी रंगते, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार काही दिवसांपासून साध्या वेशातील पोलिसांचा परिसरात वॉच होता. रविवारी रात्री येथील एका कारमध्ये गांजा पार्टी सुरू असल्याची माहिती निरीक्षक औदुंबर पाटील यांना मिळाली होती. यानुसार रात्री बाराच्या सुमारास उपनिरीक्षक आण्णाप्पा कांबळे यांच्या पथकाने शेंडा पार्कातील मेडिकल कॉलेजच्या रिकाम्या जागेत शोध सुरू केला. कारवाईत गांजा आणि चरस ओढणारे तिघे पोलिसांच्या हाती लागले. यातील स्वप्निल मंडलिक आणि भूषण मिठारी हे दोघे डॉक्टर असल्याची माहिती चौकशीत समोर आली, तर युवराज महाडिक केबल व्यावसायिक आहे. हे तिघेही नशेत होते. त्यांच्याकडे ५० ग्रॅमच्या गांजाच्या दोन पुड्या मिळाल्या. गॉगलच्या केसमध्ये चरस लपवले होते. पोलिसांनी गांजा, चरस व कार असा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. छापा टाकल्याचे लक्षात येताच तिघांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघेही नशेत तर्रर्र होते. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी तिघांना सोमवारी कोर्टात हजर केले. कोर्टाने तिघांना जामीन मंजूर केला. या कारवाईमुळे शहरात गांजासह चरसचीही विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी नशेसाठी चरस आणि गांजा नेमका कुणाकडून मिळवला, याचा शोध सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे, सिद्धेश केदार, रणजित कांबळे, राहुल मोहिते, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.

चरस पकडण्याची पहिलीच कारवाई

गांजा विक्री राजरोस सुरू असल्याची वस्तुस्थिती महाराष्ट्र टाइम्सने चार महिन्यांपूर्वीच समोर आणली होती. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोकुळ शिरगाव येथे कारवाई करून ५० हजारांचा गांजा पकडला होता. राजारामपुरी पोलिसांनी टाकाळा परिसरात गांजा पार्टी करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांनाही अटक केली होती. यात दोन तरुणींचाही समावेश होता. शहरात पहिल्यांदाच चरस सापडल्याने पोलिसही चक्रावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक आत्महत्येप्रकरणी वंदूर बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यातील वंदूरच्या शाळेतील मुख्याध्यापक विष्णु मोरे यांनी शनिवारी आत्महत्या केली. गुणी शिक्षकावर अत्याचार झाल्याच्या निषेधार्थ सोमवारी वंदूर गाव बंदची हाक दिली. सकाळपासूनच सर्व व्यवहार बंद होते. शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, ग्रामस्थ पालकांनी शाळेपासून हनुमान मंदिरापर्यंत निषेध फेरी काढली. 'मोरेसर अमर रहे', आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे, अशा विद्यार्थ्यांच्या घोषणांनी गाव हेलावले.

वंदूर शाळेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या आत्महत्त्येमागील कारण सर्वांना समजले आहे. ज्यांनी त्यांना आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केले त्यांना कायद्याचा बडगा दाखवल्यास ती खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात शोकसभेत ग्रामस्थांनी भावना व्यक्त केल्या.

मोरे यांचे मूळ गाव कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली आहे. ते वंदूर प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. त्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह बांधण्यासाठी शासनाचा निधी आला होता. त्याचे काम सुरू होते. या कामासाठी लागणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे वापरले आहे, उंची कमी ठेवली आहे यांसह अन्य तक्रारींसाठी गावातीलच काहींनी वरिष्ठ पातळीवर अर्ज करून चौकशीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने चौकशी सुरू होती. मुख्याध्यापक मोरे यांनी यामध्ये भ्रष्टाचार केला असावा असाही आरोप काहींनी केला होता. संशयित आरोपींनी यासाठी एक लाख रुपयांची मागणी करीत त्यांना वेठीस धरले होते. सातत्याने त्यांच्यावर झालेल्या मानसिक दबावाने मोरे यांनी आत्महत्त्या केली.

मंदिराच्या आवारातील शोकसभेत संजय गांधी योजनेचे अध्यक्ष धनराज घाटगे, सरपंच बाळासाहेब कांबळे, उपसरपंच बाळासाहेब पाटील, माजी पं. स. सदस्य अनिल गुरव, एकनाथ बागणे, पुंडलिक खोडवे, परशुराम कांबळे, शिवसिंह घाटगे, तानाजी मगदूम सर, सुरेश पाटील आदींची भाषणे झाली. गावात तणावपूर्ण शांतता होती. शोकसभा सुरू असताना उपस्थित दोन विद्यार्थ्यांमध्ये चक्कर आली आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक, गावकर्‍यांचे डोळे पाणावले. दरम्यान, दरम्यान तालुक्यातील सर्व शिक्षकांनी येवून येथील पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना तसेच कागल पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आरोपींना कडक शासन करावे अशी मागणी केली.

शाळेतील स्वच्छतागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले आहे, भ्रष्टाचार केला आहे. हे प्रकरण मिटवायचे असेल तर आम्हाला एक लाख रुपये द्या. नाहीतर तुमची बातमी देऊन बदनामी करतो. तुमच्याविरोधात अनुसुचित जाती, जमाती प्रतिबंधात्म कायद्यांतर्गत केस टाकतो अशी धमकी देऊन शिक्षक विष्णू मोरे यांना त्रास दिला गेला. गावातील संशयित अमर मनोहर आवळे, दयानंद आकोबा कांबळे, अनिल मनोहर कांबळे, उत्तम देवाप्पा कांबळे, अमर युवराज कांबळे या सर्वांनी मोरे यांना सातत्याने त्रास दिला. त्यांच्या त्रासाला कंटाळून १८ ऑगस्ट रोजी मोरे यांनी गळफास घेवून आत्महत्त्या केली. या प्रकरणाचा तत्काळ छडा लावून आरोपींना कायद्याचा बडगा दाखवू.

- सूरज गुरव, - उपविभागीय पोलिस अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण विभागाला टाळे ठोकले

$
0
0

शाहूवाडीत शिक्षण विभागाला सभापतींनी ठोकले टाळे

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

शाहूवाडी तालुक्यातील शिक्षकांची रिक्तपदे त्वरीत भरावीत या मागणीसाठी सभापती अश्विनी पाटील, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान पदाधिकाऱ्यांनी शाहूवाडी पंचायत समितीकडील शिक्षण विभागाला सोमवारी सकाळी टाळे ठोकून प्रवेशद्वारात ठिया आंदोलन केले. पूर्वसूचना देवूनही प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल यावेळी आंदोलक पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

शाहुवाडी तालुक्यात ८८२ शिक्षकपदे असून अद्याप ही १३० शिक्षकपदे रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शाळा शिक्षकांअभावी ओस पडल्या आहेत. आठ शाळांना शिक्षकच मिळालेला नाही. एकीकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा सरकार दारबारातून डांगोरा पिटला जात आहे. मात्र शाहूवाडी तालुका अपवाद ठरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तीव्र भावना पदाधिकऱ्यांनी व्यक्त केली. तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळांनाही आज स्थानिक नागरिकांनी टाळे ठोकून मुलांना अघोषित सुट्टी दिली.

डोईजड प्रशासनाची मुजोरी

दरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य सोमवारी टाळेठोक आंदोलन करणार असल्याची तालुका व जिल्हा प्रशासनाला माहिती असूनही प्रत्यक्षात आंदोलनावेळी पंचायत समितीकडील शिक्षण विभागात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता. जिल्हा प्रशासनानेही आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने या पदाधिकऱ्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. जि. प. सदस्य हंबीराव पाटील, सभापती अश्विनी पाटील, उपसभापती पांडूरंग पाटील, माजी सभापती डॉ. स्नेहा जाधव, माजी उपसभापती दिलीप पाटील, सदस्य विजय खोत, सुनीता पारळे, अमरसिंह खोत यांच्यासह अमर पाटील, जालिदंर पाटील, सुरेश पारळे, बाबू सोनावळे, दिंगबर कुंभार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images