Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मेघडंबरीच्या कामाची पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सिद्धार्थनगर जवळील नर्सरी बागेत उभारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळावरील मेघडंबरीच्या काम महिन्यात पूर्ण करा,' अशी सूचना शनिवारी महापौर शोभा बोंद्रे यांनी केली. 'मेघडंबरीचे काम पूर्णत्वास गेले असून शाहू समाधी स्थळाचे लोकार्पण एक महिन्यामध्ये होण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रयत्न करावेत,' अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.

महानगरपालिकेच्यावतीने नर्सरी बागेत राजर्षी शाहूंच्या समाधीचे काम सुरू आहे. गेली आठ-नऊ महिने हे काम रखडले होते. २६ जून रोजी झालेल्या शाहूजयंतीच्या निमित्ताने त्याची चर्चा झाल्यानंतर महापौर बोंद्रे यांना समाधी स्थळाच्या कामाबाबत प्रयत्न करण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या होत्या. शनिवारी आमदार पाटील, महापौर बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी बापट कॅम्प येथे जाऊन मेघडंबरीच्या कामाची पाहणी केली. यावेळी शिल्पकार पुरेकर यांनी मेघडंबरीच्या कामाची माहिती दिली. सुमारे दीड टन वजनाच्या ब्रॉँझमधील मेघडंबरीचे काम पूर्ण झाले असून लवकरच प्रत्यक्ष जागेवर जोडणी केली जाईल, असे सांगण्यात आले. 'समाधीस्थळाशेजारील बगीच्याचे काम, तसेच त्याठिकाणी करावी लागणारी साफसफाई, संरक्षक भिंत ही कामे लवकर पूर्ण करा. मेघडंबरीचे काम पूर्णत्वास गेले असल्याने शाहू समाधीस्थळाचे लोकार्पण येत्या एक महिन्यात होण्याच्या दृष्टीने महापालिकेने प्रयत्न करावेत,' अशी सूचना आमदार पाटील यांनी केली.

यावेळी महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती सुरेखा शहा, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक सुभाष बुचडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


४८ तासांत रस्त्यांचे पॅचवर्क करा

$
0
0

फोटो जोडला आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांत पावसामुळे दैना उडालेल्या शहरातील रस्त्यांचे भरपावसात पॅचवर्क करण्यात येणार आहे. शहरातील खराब रस्त्यांबाबत महापौर शोभा बोंद्रे यांनी अधिकारी, पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत ४८ तासांत खराब रस्त्यांचे पॅचवर्क करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच वॉरंटी कालावधीमध्ये असलेल्या रस्त्यांचे ठेकेदारांकडून पूर्ववत करून घेण्याची सूचनाही महापौर बोंद्रे यांनी केली.

जुलैपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची पुरती दैना उडाली आहे. रस्त्यावरील भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे दररोज किरकोळ स्वरूपाचे अपघात घडत आहे. रस्त्यावरून मोटारसायकल चालवणे मुश्कील बनले आहे. रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांच्या तीव्र भावना व्यक्त होत आहेत. याची दखल घेत शनिवारी महापौर बोंद्रे यांनी अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत खड्डे पडलेल्या रस्त्यांवर मुरुम टाकून रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचना दिल्या.

उपमहापौर महेश सावंत यांनी चारही विभागीय कार्यालयांनी त्यांच्या प्रभागातील मुख्य रस्ते, शाळांचा रस्ता यांचा सर्व्हे करावा. मेच्या शेवटी केलेले रस्ते खराब झाले आहेत. त्या रस्त्यांची दुरुस्ती संबंधित ठेकेदारांकडून करावी अशी सूचना मांडली. 'आयआरबीचे अनेक रस्ते खराब झाले असून त्याचे कारण काय? प्रामुख्याने आयआरबीचे रस्ते व प्रभागातील मुख्य रस्ते प्राधान्याने करा अशी सूचना गटनेते शारगंधर देशमुख यांनी केली.

भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी म्हणाले, 'पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने रस्ते खराब होत आहेत. पाण्याची निर्गत करण्यासाठी रस्त्यांच्या बाजूला गटर रुंद करून पाण्याची निर्गत करा.' 'आयआरबीने तयार केलेले काँक्रिटचे रस्ते व साइडचा डांबरी रस्ता यामध्ये मोठ्या भेगा पडत आहेत. त्यामुळे वाहनधारक घसरून पडत आहेत. ठेकेदारांनी केलेले रस्ते जे वॉरंटी कालावधीमध्ये आहेत, अशा रस्त्यांची दुरुस्ती ठेकेदारांकडून करावी आशी सूचना प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके यांनी मांडली.

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत म्हणाले, 'एक ते तीन वर्षे वॉरंटीमध्ये असणाऱ्या रस्त्यांचे पॅचवर्क करण्याच्या कामास लवकरच सुरुवात केली जाईल. पावसाळ्यात चारही विभागीय कार्यालयांच्या वतीने मुरुम टाकून पॅचवर्क सुरू आहे. पावसामुळे पॅचवर्क पुन्हा निघालेले असून मुख्य रस्त्यांचे पॅचवर्क करण्याचे नियोजन आहे.'

बैठकीस स्थायी समिती सभापती आशीष ढवळे, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अशोक जाधव, उपशहर अभियंता एस. के. माने, हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता रावसाहेब चव्हाण, अनिरुद्ध कोरडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ ठिकाणी डेंगीच्या आळ्या

$
0
0

कोल्हापूर: महापालिकेच्यावतीने शहरात राबवण्यात येथे असलेल्या डेंगी प्रतिबंधात्मक विशेष मोहिमेत २४ घरांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंगीच्या आळ्या आढळल्या. शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभाग, नागरी कुटुंब कल्याण केंद्र यांनी संयुक्त पाहणी केली. राजलक्ष्मीनगर, अकबर मोहल्ला, लक्षतीर्थ वसाहत, बाजारगेट आदी ठिकाणी राबवलेल्या मोहिमेमध्ये २८७ घरांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये २४ कुटुंबाकडील साचलेल्या पाण्यामध्ये डेंगीचे डास व आळी आढळून आल्या. तसेच बांधकामाच्या ठिकाणी पाणी साचलेले निर्दशनास आलेस सबंधिताचे बांधकाम परवाना रद्द करण्याच्या सूचना दिल्या. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग, नागरी कुटूंब कल्याण व सर्व विभागीय आरोग्य निरीक्षक यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेहुण्यांना निवडून आणा, तुम्ही विधानपरिषदेवर

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बूथ कमिट्या सक्षम बनल्या तर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला शंभर टक्के यश मिळेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आगामी सहा महिने पक्षासाठी द्यावेत. जनता भाजप सरकारला कंटाळली असल्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसची सत्ता हमखास येईल. सत्ता आल्यावर ज्याला महामंडळ हवे, तो महामंडळावर असेल. शिवाय जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील तुम्ही, मेहुणे के. पी. पाटील यांना निवडून आणा, तुम्हाला विधानपरिषदेवर आमदार करतो,' असे खुले आवाहन राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. मुश्रीफांच्या त्या वक्तव्यावर ए.वाय. पाटील यांनी हसत हसत 'मेहुण्यांनाच विधानपरिषदेवर पाठवा' अशी टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला.

जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा बूथ कमिटी संकल्प मेळावा आयोजित केला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा झाला. साइक्स एक्स्टेंशन येथील महालक्ष्मी सभागृहात आयोजित मेळाव्याला कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मेळाव्यात मराठा, लिंगायत, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. येत्या लोकसभेला जिल्ह्यातील दोन्ही जागा आणि विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येतील त्या जागा निवडून आणण्याची ताकत असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या धोरणांचा समाचार घेताना मुश्रीफ म्हणाले, 'राफेल विमान खरेदीत आजवर सर्वांत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याप्रश्नी नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडावी लागेल. जीएसटी, नोटबंदीमुळे कारखानदारी, व्यापार उद्योगावर विपरित परिणाम झाला. बेरोजगारी वाढली आहे. समाजातील एकही घटक सरकारच्या कामगिरीवर समाधानी नाही. सरकारचे काम ठप्प असून, मंत्र्यांना पोलिस बंदोबस्तात दौरे करावे लागत आहेत. सरकारने, मराठा, धनगर, लिंगायत व मुस्लिम आरक्षणप्रश्नी फसवणूक केल्यामुळे समाजात असंतोष आहे. नोव्हेंबर महिन्यात मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणप्रश्नी अनुकूल अहवाल दिला नाही तर सरकार दुसरा काय पर्याय देणार आहे. जानेवारीनंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारकडून आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक होण्याची भीती आहे.'

राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील म्हणाले, 'भाजप सरकार, समाजातील सर्वच घटकांच्या मुळावर उठल्याचे चित्र आहे. तरुण रोजगारांपासून तर लाखो विद्यार्थी शिष्यवृत्त्यापासून वंचित आहेत. या सरकारविरोधात असंतोष असून राज्यात ५३ मोर्चातून दीड लाख तरुण रस्त्यावर उतरले. बूथ कमिट्या या निवडणुकीचा महत्त्वाचा पाया आहे. बूथ कमिट्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्यभर नियोजन सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतला जाईल.'

माजी खासदार निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, शहराध्यक्ष आर. के. पोवार, युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष नाविद मुश्रीफ, आदिल फरास, आदींनी बूथ कमिट्यांची प्रभावी बांधणी केली जाईल. 'एक बूथ...दहा तरुण' ही संकल्पना सक्षमपणे राबवली आणि आपआपसातील मतभेद मिटवून सर्वांनी एकत्रित लढल्यास राष्ट्रवादीची ताकद पुन्हा जिल्ह्यात निर्माण होईल. आपआपसातील मतभेदामुळे राष्ट्रवादीतील घडी विस्कटली होती, असे स्पष्ट सांगितले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोशल मिडीयावरुन बदनामी करण्याचा प्रयत्न झाल्यास तो खपवून घेणार नाही असे फरास यांनी सांगितले. युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी प्रास्ताविक केले.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैदा, आट्याच्या दरात वाढ

$
0
0

बाजारभाव...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्रावण महिन्यात उपवासाच्या पार्श्वभूमीवर मैदा, आटा, तूरडाळीच्या दरात वाढ झाली आहे. शाबू, शेंगदाणा या उपवासाच्या पदार्थांचे दर स्थिर असून, तीळ व जिरे दरात प्रतिकिलो १० रुपयांनी वाढ झाली आहे.

श्रावण महिन्यात घरोघरी सोमवार, शुक्रवार या दिवशी गोडधोड पदार्थांची मेजवाणी असल्याने पुरणपोळी, चपाती, पुरी या पदार्थांचा स्वयंपाकात समावेश असल्याने मैदा, आट्याला मागणी वाढली आहे. मैदा व आट्याच्या दरात प्रतिकिलो दोन रुपयांनी वाढ झाली असून, ग्राहकांच्या खिशाला चाट बसत आहे. पोह्याच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली असून, पोह्याचा दर प्रतिकिलो ५० रुपयांवरून ४८ रुपये दर झाला आहे. तूरडाळीच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली ब्रँडेड कंपन्यांची डाळ ७० रुपयांवरून ७२ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. शाबूचा दर प्रतिकिलो ६० ते ६४ रुपयांवर स्थिर आहे. उडीद डाळीत प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली आहे. काळा वाटाण्याच्या दरातही दोन रुपयांची घसरण झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदळाचे चे दर स्थिर असल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. शेंगदाणे, सरकी तेलाच्या दर स्थिर असले तरी पॅकिंग सूर्यफूल दरात एक ते दोन रुपयांनी वाढ झाली आहे.

किराणा दर (प्रतिकिलो रु.)

पोहे ४४ ते ४८

साखर ३६ ते ३८

शेंगदाणे ८४

मैदा ३० रु. ३२

आटा ३२ ते ३६

गूळ ५०

शाबू ६० ते ६४

००००

डाळीचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ ६४ ते ७२

मूगडाळ ८० ते ८४

उडीद डाळ ६४ ते ७०

हरभरा डाळ ६४ ते ६०

मसूर डाळ ६० ते ६४

मसूर ६० ते १३०

चवळी ८० ते १००

हिरवा वाटाणा ८०

काळा वाटाणा ६० ते ६४

पांढरा वाटाणा ६०

मटकी ८० ते १००

पावटा १००

०००

बार्शी शाळू ३४ ते ४०

गहू २८ ते ३६

ज्वारी नं.१ २४ ते ४०

बाजरी २८

नाचणी ३६

००००

खाद्यतेल

शेंगतेल १२० ते १२५

सरकी तेल ८८ ते ९०

खोबरेल २४० ते २६०

सूर्यफूल ९५ ते १००

०००

मसाले (प्रतिकिलो रु.)

तीळ १४० ते १५०

जिरे २४० ते २७०

खसखस ६०० ते ८००

खोबरे १८० ते २२०

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्काऱ्यास अटक

$
0
0

गारगोटी : मिणचे बुद्रुक (ता. भुदरगड) येथे शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भुदरगड पोलिसांनी संतोष तानाजी कांबळे (वय २३) या नराधमास भुदरगड पोलीसांनी अटक केली आहे. संतोष कांबळेने नात्यातीलच शाळकरी मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून वेळोवेळी बलात्कार केला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनाही त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी पीडित मुलीने पोलिसात फिर्याद दिली होती. मात्र, कांबळे फरार झाला होता. पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. त्यास प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कोष्टी यांच्यासमोर उभे केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३६ गुंठ्यांवरील आरक्षण उठविले

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : दुसऱ्या शहर विकास आराखड्यामध्ये स्थानिकांच्या गरजा लक्षात ठेऊन महापालिकेने बगीचा व विस्थापितांच्या दुकानगाळ्यांसाठी जमीन आरक्षित केली. पण महापालिकेने दहा वर्षांत आरक्षित जमीन संपादित केली नाही, तसेच जमिनीचा विकास केला नसल्याने राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने ३६ गुंठ्यांवरील आरक्षण उठवण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा आदेश गेल्या आठवड्यात नगरविकास खात्याने काढला आहे. नगरविकास विभागाने काढलेला हा आदेश एकप्रकारे सत्ताधारी आणि विरोध गटातील कारभाऱ्यांच्या पथ्यावर पडला आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३१(१) नुसार शहराची दुसरी सुधारीत विकास योजनेला १९९९ ला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार योजनेला २००१ पासून सुरुवात झाली. विकास आराखड्यामध्ये बुदिहाळकरनगर व प्रथमेशनगर येथील रि.स. नं. ८१६/३ मधील २,१३० चौरस मीटर जागा बगीच्यासाठी तर प्रतीभानगर येथील रि.स.नं १,२५९ मधील १,२५९ चौरस मीटर अशी ३६ गुंठे जमीन आरक्षित केली होती.

विकास आराखड्यामध्ये आरक्षित केलेली जमीन दहा वर्षांत संपादित करणे आवश्यक आहे. यासाठी जमीन मालकाला टीडीआर अथवा इतर फायदे देण्याची तरतूद आहे. मात्र महापालिकेने आरक्षित केलेली जमीन संपादीत केली नाही. दहा वर्षानंतरही महापालिकेने जमीन संपादित केली नसल्याने जमीन मालकांनी जून २०१२ रोजी कलम १२७ (१) नसुार जमीन संपादित करण्याची नोटिशीद्वीरे सूचना केली होती. नोटीस दिल्यानंतरही महापालिकेने वर्षभराच्या काळात जमीन संपादित केली नाही, अथवा संपादित करण्यासाठी भूसंपादनाची अधिसूचना प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे जमीन मालकाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीवेळी नगररचना विभागाचा अहवालनुसार नोटिशीनंतर जागा संपादित करण्याची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे ही जमीन मूळ मालकांना देण्यात येणार आहे. तसेच आरक्षणमुक्त झालेल्या जमिनीशेजारील जागेवरील असलेल्या आरक्षणाप्रमाणे विकसित करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे नगरविकास खात्याच्या आदेशात म्हटले आहे. महापालिकेने जमीन आरक्षित केल्यापासून जमीन संपादित करण्यास दिरंगाई करण्याबरोबरच त्यावर ज्यासाठी आरक्षण टाकले आहे त्याचा विकास करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे आरक्षित झालेली जमीन पुन्हा मूळ मालकांच्या ताब्यात गेली आहे.

फेरीवाला धोरणानंतर जटील समस्या

नवीन फेरीवाला धोरण लवकरच अंमलात येणार आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवर फेरीवाल्यांसोबत चर्चा सुरू असून त्यासाठी समितीही स्थापन केली आहे. नव्या धोरणाला सुरुवात होण्यापूर्वीच यापुर्वी विस्थापितांना दिलेल्या जागेचा विकास महापालिकेने केलेला नसल्याने विस्थापितांचा प्रश्न अधिक जटील होण्याची शक्यता आहे.

नगरविकासचा आदेश कारभाऱ्यांच्या पथ्यावर

महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीरनाम्यामध्ये महापालिकेच्या कोणत्याही जागेवरील आरक्षण न उठवण्याचे अभिवचन दिले होते. जाहीर सभेमध्येही त्याचा उल्लेख केला जात होता. महापालिकेने आरक्षणे उठवली नसल्याचा छातीठोक दावा नेते करत असले तरी, एकप्रकारे कागदोपत्री खेळ करून आरक्षणे उठवण्याचा हा डाव साधला आहे. सध्या महापालिकेत काँग्रेस- राष्ट्रवादीची सत्ता असल्याने आम्ही आरक्षण उठवले नाही, असा दावा नेते करू शकतात. नगरविकास खात्याने काढलेला आदेश एकप्रकारे कारभारी नगरसेवकांच्या पथ्यावरच पडल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गीत-नृत्यांनी फुलला कलासंगम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थिरकायला लावणारा संगीताचा ठेका, डोलायला लावणारी बहारदार गीते, शास्त्रीय संगीताच्या सुरावटींवर फुललेल्या नृत्याविष्कारांपासून कोळी अन् गोंधळी या लोकगीतांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी 'कलासंगम' बहरला.'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापनदिनानिमित आयोजित 'कलासंगम'च्या मंचावर तरुणाईचे कलागुण अक्षरश: बहरले. कोल्हापूरसह आसपासच्या भागातील तरुणाईने सूर, लय आणि तालचा अनोखा मिलाफ घडवत शनिवारच्या सायंकाळी दसरा चौक येथील शाहू स्मारक भवनच्या रंगमंचावर धमाल केली.

तब्बल चार तासांहून अधिक काळ रंगलेल्या या सोहळ्यात हेल्पर्स ऑफ दि हॅन्डीकॅप्ड संस्थेमधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी व्हील चेअर डान्स सादर करताच 'कलासंगम'मधील जल्लोष टिपेला पोहोचला. हेल्पर्सच्या विद्यार्थ्यांनी या सादरीकरणातून 'हौसले है बुलंद, विश्वास है मन में'ची जिगर दाखविताच सभागृहात उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत त्यांच्या जिद्दीला जणू सलाम केला. कोल्हापूर आणि आसपासच्या कलाकारांना सादरीकरणाचे हक्काचे व्यासपीठ ठरलेल्या 'कलासंगम' मंच सेलिब्रिटीसाठीही आकर्षण ठरला. झी युवा वाहिनीवरील 'आम्ही दोघी' मालिकेतील लोकप्रिय जोडी विवेक सांगळे आणि खुशबू तावडे हे 'कलासंगम'मध्ये सहभागी होत अन्य कलाकारांसोबत धमाल केली. कधी प्रेक्षकांशी संवाद, तर कधी गाण्यावर फेर धरत मनोरंजन केले.

खचाखच भरलेल्या शाहू स्मारक भवनच्या सभागृहात सायंकाळी पाच वाजता स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 'गणेश वंदना'चे सूर आळवला आणि प्रेक्षकांनी 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'चा गजर करत सभागृह दणाणून सोडले. गायक कलाकार शुभम सुतारने किशोरकुमारांच्या गाण्यावर आधारित मॅश अॅप सादर करत प्रेक्षकांना जुन्या काळातील सदाबहार गाण्यांची मेजवानी दिली. सार्थक क्रिएशन्सच्या सोनाली रजपूत, स्वाती कदम, राजनंदिनी पतकी आणि स्नेहाराणी लाटकर महिला कलाकारांनी 'मधुबाला ते माधुरी' यांच्यावर चित्रीत मुजरा गीतांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनाच्या तारा छेडल्या.

बादल जाधव या कलाकाराचा 'देवाक काळजी' या गीतावरील परफॉर्मन्स प्रेक्षक मनाला स्पर्शून गेला. प्रेमजित सुतार, अभिजित सुतार आणि स्वप्निल सुतार यांच्यातील वादन जुगलबंदी चांगलीच रंगली. दुर्धर आजारांशी खंबीरपणे सामना करणाऱ्या लहानग्या राजवीर पाटीलचा कलाविष्कार दाद घेऊन गेला. गायक निशांत गोंधळीने सादर केलेल्या 'सैराट'मधील 'झिंग झिंग झिंगाट'गाण्यावर तरुणाईने ठेका धरला. कार्यक्रमात सार्थक क्रिएशन, कोल्हापूर डान्स अॅकॅडमी, भालकर कला अकादमी यांचा सहभाग राहिला. कार्यक्रमादरम्यान नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे, संग्राम भालकर यांनी सहभागी कलाकारांना मार्गदर्शन केले. अक्षय डोंगरेच्या खुमासदार निवेदनाने टाळ्या वसूल केल्या. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया यांच्या हस्ते सहभागी कलाकारांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.

शास्त्रीयपासून कोळी व गोंधळी नृत्याची धमाल

'हिप होपर्स क्रू'च्या कलाकारांनी कार्यक्रमातून देशभक्तीचे दर्शन घडविले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित गीत नृत्यांनी वातावरण भारावून गेले, तर बिऑन इन डान्स अँड फिटनेस स्टुडिओच्या कलाकारांनी कोळी नृत्य सादर करत उपस्थितांना डोलायला लावले. प्रकाश नृत्य कलामंदिराचा शास्त्रीय नृत्याविष्कार,सार्थक क्रिएशन्सचा गोंधळ नृत्यांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. कोळी नृत्य आणि गोंधळी नृत्याने कार्यक्रमात धमाल केली.

.........

ओल्ड इज गोल्ड

तरुणाईच्या जोश जल्लोषांनी रंगलेल्या या सोहळ्यात ३५ ते ६६ वयोगटातील कलासक्त मनाच्या दहाजणांनी 'ओल्ड इज गोल्ड' संकल्पनेवर आधारित गीत, नृत्य सादर केले. भालकर्स अकादमीच्या कलाकारांचा हा वेगळा नृत्याविष्कार दाद घेऊन गेला. यामध्ये सिने दिग्दर्शक यशवंत भालकर, प्रा. नंदकुमार रानभरे, जिनपाल मगदूम, पांडुरंग पाटील, संभाजी पाटील, परशुराम नांदवडेकर, निलेश कोंडेकर, योगेस सपाटे, संतोष वायचळ, संजय कुंभार यांचा समावेश होता.

.................

'श्रावणक्वीन'मधील सौंदर्यवतींनी जिंकली मने

यंदाच्या 'मटा श्रावणक्वीन' स्पर्धेतील सहभागी सौंदर्यवतींचा 'कलासंगम'च्या मंचावर कॅटवॉक रंगला. स्पर्धेतील सहभागी युवती आणि सार्थक क्रिएशन्स मॅन हंटतर्फे वेस्टर्न फॅशन शोने कार्यक्रमाची शोभा वाढली. सौंदर्यवतींनी'श्रावणक्वीन' स्पर्धेतील अनुभव उपस्थितांशी शेअर केला. 'आम्ही दोघी'तील कलाकार विवेक आणि खुशबू हे दोघे 'सजना है मुझे सजना के लिए' गाण्यावर स्पर्धक युवतींसोबत रॅम्पवर सामील झाले आणि साऱ्यांच्या उत्साहाला उधाण आले.

..................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाचक प्रतिक्रिया..

$
0
0

समाजात प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्ती आहेत. पण त्यांची दखल घेणारे कमी आहेत. कोणी उत्तम प्रकारची नैसर्गिक शेती करतो, कोणी झाडे लावतो, कोणी पाण्याची योजना राबवतो. समाजात सामान्य लोक कोणाचीही मदत न घेता बरीच कामे करत असतात. अशा माणसांची दखल घेणारे वृत्तपत्र म्हणजे 'महाराष्ट्र टाइम्स'. मी हे स्वानुभवाने सांगतो. कारण मी सुरू केलेल्या 'कविमित्र'ची बातमी कोणताही प्रयत्न न करता १३ जून रोजी प्रसिद्ध झाली. आमचा एक कविमित्र बाळकृष्ण पाटील या अगदी साध्या माणसाने लिहिलेला 'शाळा सुटली पण...'हा लेख पाच जुलैच्या अंकात प्रसिद्ध झाला. अशा या प्रामाणिक वृत्तपत्राच्या वर्धापनदिनास हार्दिक शुभेच्छा.

- सुरेश पाटील, कापड बझार हुपरी

०००

(मूळ कॉपी)

समाजात प्रामाणिकपणाने काम करणारी बरीच माणसे असतात. पण त्यांची दखल घेणारी प्रसिध्दे क्षेत्रे कमी आहेत. कोणी उत्तम प्रकारची नैसर्गिक शेती करतो, कोणी झाडे लावतो. कोणी पाण्याची योजना राबवित असतो. समाजात सामान्य लोक कोणाचीही मदत न घेता बरीच कामे करत असतात. अशा माणसांची दखल घेणारं जर कोणतं वर्तमानपत्र असेल तर ते म्हणजे, 'महाराष्ट्र टाइम्स'होय. हे मी, स्वानुभवाने सांगतो आहे. कारण मी सुरू केलेल्या 'कविमित्र'ची बातमी कोणताही प्रयत्न न करता १३ जून रोजी प्रसिध्द झाली. आमचा एक कविमित्र बाळकृष्ण पाटील या अगदी साध्या माणसाने लिहिलेला 'शाळा सुटली पण...'हा लेख पाच जुलैच्या अंकात प्रसिध्द झाला. अशा या प्रामाणिक वर्तमानपत्राच्या वर्धापनदिनास हार्दिक शुभेच्छा.

सुरेश जयेंद्र पाटील, कापड बझार हुपरी

व कविमित्र संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत नाराजीनाट्य कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद संपण्याची चिन्हे नाहीत. शहरांतर्गत पदाधिकाऱ्यांतील मतभेदामुळे चार महिने राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाची निवड लांबणीवर पडली होती. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी आर. के. पोवार यांची निवड जाहीर होऊन काही दिवसांचा अवधी उलटला. पण त्यांच्या निवडीवरून पक्षात पुन्हा नाराजी निर्माण झाली आहे. शहराध्यक्षपदासाठी दावा केलेल्या माजी अध्यक्ष राजू लाटकर, माजी नगरसेवक अनिल कदम, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर गेल्या पाच-सहा दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून लांब राहिले आहेत.

शहराध्यक्षपदावरून प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये नाराजी कायम असल्याने पक्षाच्या 'पॉवर'वर परिणाम होण्याची भीती कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी महापौर आर. के. पोवार यांच्याकडे पक्षाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे सांगण्यात येते. पोवार हे पक्षातील सीनिअर व अनुभवी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचा अनुभवाचा फायदा पक्ष संघटनेसाठी होईल असे कार्यकर्त्यांना सांगण्यात आले.

दुसरीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते प्रत्येक भाषणात संघटनेत तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत भाषण करतात. मग शहराध्यक्षपदाच्या निवडीत नव्या चेहऱ्यांना का संधी दिली नाही याकडे लक्ष वेधत आहेत. माजी महापौर पोवार यांनी यापूर्वी जवळपास सोळा वर्षे शहर अध्यक्षपद भूषविले आहे. बाजार समितीत प्रशासक म्हणून त्यांची नियुक्ती केली होती. जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत. याकडेही पक्षातील काही कार्यकर्ते लक्ष वेधत आहेत. शहराध्यक्षपदावरून पक्षात पुन्हा नाराजीनाट्य निर्माण झाले आहे. लाटकर, कदम, शिंदे व कल्याणकर पक्षातर्फे स्वातंत्र्यदिनी आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. शनिवारी पक्षाचा शहरात युवक मेळावा झाला. त्यापासून ते लांबच राहिले. त्यांच्यापैकी काहींनी पक्ष कार्यालयाकडे न फिरकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे दिमाखात गुणवंतांचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने २०१७ रोजी घेतलेल्या 'मटा उत्सवमूर्ती सन्मान' स्पर्धेचे दिमाखदार सोहळ्यात वितरण झाले. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात येणारे मंडळाचे कार्यकर्ते, सभागृहात टाळ्यांचा गजर आणि उत्साहपूर्ण वातावरणात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते विजेत्या मंडळांचा गौरव केला. रविवारी शाहू स्मारक भवनात झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ अमन मित्तल व अपना बँकेचे कोल्हापूर विभागाचे सहायक प्रमुख व्यवस्थापक रोलँड रिबेरो प्रमुख उपस्थित होते. 'मटा'ने २०१७ च्या गणेशोत्सवात लोकप्रिय मंडळ, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, उत्कृष्ट सजावट व मूर्ती आदी गटांत स्पर्धा आयोजित केली होती.

रविवारी या स्पर्धेच्या विजेत्या मंडळांना बक्षिस वितरण करण्यात आले. यामध्ये सर्वात लोकप्रिय मंडळामध्ये दिलबहार तालीम मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाचे बक्षिस जाहीर होताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. जल्लोषी वातावरणामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्या हस्ते बक्षिस देवून कार्यकर्त्यांचा गौरव केला. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीमध्ये जुना बुधवार पेठ येथील डांगे गल्ली तरुण मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला.

उत्कृष्ट सजावट विभागात शाहूपुरी दुसरी गल्ली येथील राधाकृष्ण तरुण मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे सोल्जर्स तरुण मंडळ, तोरस्कर चौक व युवक मित्र मंडळ राजारामपुरी ११ वी गल्ली यांनी मिळवला. उत्कृष्ट मूर्ती विभागात शनिवार पेठ येथील अष्टविनायक ग्रुपची मूर्ती सर्वोत्कृष्ट ठरली. द्वितीय क्रमांक जुना बुधवार पेठ येथील दि ग्रेट मराठा तर तृतीय क्रमांक गुजरी येथील श्री एकदंती गणेश मित्र मंडळ व केसापूर पेठ येथील हाय कमांडो फ्रेंड्स सर्कलला विभागून देण्यात आला.

दरम्यान, महाराष्ट्र टाइम्सच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या विविध स्पर्धांसाठी बहुमोल सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील व सीईओ अमन मित्तल यांच्या हस्ते झाला. यामध्ये चित्रकला व निंबध स्पर्धेसाठी प्रशांत जाधव, संजय सौंदलगे यांचा सत्कार केला. चित्रकार विजय टिपुगडे, मटा उत्सवमूर्ती स्पर्धेचे परीक्षक मंगशे शिंदे, मनोज दरेकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला.

पक्षी वाचवा मोहीम

पक्षी वाचवा मोहिमेंतर्गत दोन गटात झालेल्या निबंध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिस वितरण झाले. पहिली ते सातवी गटात अक्षरा सौंदलगे प्रथम क्रमांक मिळवला. प्राची कल्याणकर व अंबिका गेंजगे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. आठवी ते महाविद्यालयीन गटात दिव्या मंगावेने प्रथम क्रमांक मिळवला. रेवती ढवळशंखने द्वितीय तर स्नेहल गेंजगने तृतीय क्रमांक पटकावला. खुल्या गटात प्रथम क्रमांक पद्मजा गेंजगने पटकावला. द्वितीय के. डी. हराळे व तृतीय क्रमांक मैत्राली खटावकरने मिळवला. विजेत्या स्पर्धकांना विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरव केला.

चित्रकला स्पर्धेत हर्षिता सुतार प्रथम

चित्रकला स्पर्धेच्या पहिली ते चौथी गटात हर्षिता सुतारने प्रथम क्रमांक पटकावला. अनुश्री साळी व वैदही गुळवणीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. पाचवी ते सातवी गटात जय भडगावे प्रथम, प्रथमेश भोसले द्वितीय तर अथर्व चौगुलने तृतीय क्रमांक मिळवला. तर आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक चैतन्य गुळवणीने मिळवला. द्वितीय सात्विक जाधव व श्रेया कदमने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत धर्म आंदोलनालाआमदार, खासदारांचा पाठिबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लिंगायत धर्माला अल्पसंख्याक धर्माचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी दसरा चौकात सुरू असलेल्या लिंगायत धर्मीयांच्या धरणे आंदोलनाला रविवारी खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांनी पाठिंबा दिला. तसेच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे.

आंदोलनस्थळी खासदार महाडिक व आमदार पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. खासदार महाडिक म्हणाले, 'सत्तेत येण्यापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे वचन दिले होते. सत्ताधारी पक्षाला त्यांच्या वचनाची आठवण करून देण्यासाठी लोकसभेत मागण्यांचा विषय मांडू.'

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'लिंगायत समाज बसवेश्वरांचे विचार मानणारा संयमी व शांत समाज आहे, पण सर्वच समाजांना आश्वासनांचे गाजर दाखविणाऱ्या या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन तीव्र करावे. प्रसंगी तलवार हातात घ्यावी लागेल. आघाडी सरकारच्या काळात लिंगायत समाजातील १४ पोटजातींना आरक्षण दिले होते. लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा व अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी मंत्रिमंडळाचा ठराव केला होता. पण राज्य सरकारने तो केंद्राकडे पाठवला नाही. सत्तेवर आल्यावर १०० दिवसांत लिंगायत समाजाच्या मागण्या मान्य करण्याचे वचन देणाऱ्या विनोद तावडे यांनी वचनाला हरताळ फासला आहे.'

आंदोलनाला प्राचार्य टी. एस. पाटील, प्राचार्य जी. पी. माळी, महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे अध्यक्ष राजू वळीवडे, धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष कृष्णात शेळके, कलगोंडा पाटील (अब्दुल्लाट), गणेश जंगम (कोथळी), नीलकंठ मुगळखोड (माणगाव), कागल पंचायत समिती सभापती राजश्री माने, उपसभापती विजय भोसले, व्यंकाप्पा भोसले, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, सावकार मदनाईक, जिल्हा परिषद सदस्य राम शिंदे, नगरसेवक शैलेश चौगुले, संभापूरचे उपसरपंच ऋतुराज देसाई, लोकतांत्रिक जनता दलाचे जिल्हाध्यक्ष गौरव पणोरेकर, अण्णाप्पा पंधारे (अकिवाट), अमोल पाटील (टाकवडे) यांच्यासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी भेट दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मसाले वधारले, उलाढाल थंडावली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केरळमध्ये उद्भवलेल्या महाप्रलयाचा थेट परिणाम कोल्हापुरातील व्यापार, व्यवसायावर झाला आहे. कोल्हापुरातून केरळला पुरवठा करण्यात येणाऱ्या साखर, कांदा, बटाटा, रवा, आटा, मैदा या वस्तूंची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे, तर केरळमधील मसाल्याच्या पदार्थांची आवक थांबली आहे. परिणामी मिरी, सुंठ, वेलदोडा, जायपत्रीच्या दरात वाढ झाली आहे. भविष्यकाळात खोबऱ्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आवक-जावक ठप्प राहिल्याने रोजची शेकडो कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतून केरळला रोज २५ ट्रक मालाचा पुरवठा होतो. गेले काही दिवस केरळमधील महापुराच्या स्थितीमुळे मालवाहतूक पूर्ण बंद झाली आहे. यामुळे शेकडो कोटी रुपयांची उलाढाल थंडावल्याचे लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले. केरळमध्ये या भागातील ७० हून अधिक ट्रक अडकले होते. केरळ ट्रान्स्पोर्ट असोसिएशनशी संपर्क साधून सर्व ट्रक सुखरूपपणे बाहेर काढले आहेत. नारळाची आवक कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात होते. यामुळे सणासुदीच्या कालावधीत नारळाच्या उपलब्धतेवर काही परिणाम होणार नाही असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

केरळमध्ये वेलदोडा, सुंठ, जायफळ, जायपत्री, मिरी, खोबऱ्याचे उत्पादन मोठे आहे. केरळशी होणारा नित्याचा व्यवहार ठप्प झाल्याने गेल्या आठ दिवसांत मिरी, सुंठ, वेलदोडा आणि जायपत्रीच्या दरात वाढ झाल्याचे मसाला पदार्थाचे व्यापारी किरण शहा यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात मिरीचा दर प्रतिकिलो ३५० रुपये होता. आता तो ४५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सुंठ १८० रुपयांवरून २२० पर्यंत तर वेलदोड्याचा दर १३५० रुपयांवरून १६५० रुपयांवर प्रतिकिलो पोहोचला आहे. जायपत्रीचा किलोचा दर यापूर्वी १०५० होता, त्यामध्ये तीनशे रुपयांनी वाढ झाली आहे.

मसाल्याच्या पदार्थांची आवक बंद, महापुरामुळे उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे भविष्यकाळात मसाल्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे किराणा व भुसारी व्यापारी असोसिएशनचे बबन महाजन यांनी सांगितले. केरळशी होणारा व्यापार, व्यवसाय सद्य:स्थितीत थांबला आहे. परिणामी केरळला पुरवठा करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंचा व्यवहार आता मुंबई, राजस्थान, अहमदाबाद या शहरांसोबत सुरू आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूरच्या बाजारपेठेत कुठल्याही वस्तूंची टंचाई जाणवत नाही. सध्या स्थानिक बाजारपेठेत खोबऱ्याची विक्री कमी असली तर दसरा, दिवाळीला मागणी वाढते. यामुळे सणासुदीच्या कालाधीत दरवाढीची चिन्हे आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखक नवनाथ गोरेंसोबत उद्या संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीचा युवा पुरस्कारप्राप्त लेखक नवनाथ गोरे यांच्यासोबत मंगळवारी (ता. २१ ऑगस्ट) 'मटा युवा संवाद' कार्यक्रम रंगणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून लेखकांशी संवाद या साहित्यिक उपक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात दुपारी बारा वाजता कार्यक्रम होणार आहे.

गोरे यांनी 'फेसाटी' कांदबरीत दुष्काळी भागातील चित्रण अंत्यत वास्तवदर्शी केले आहे. निसर्गाची अवकृपा, शेतकऱ्यांची दैन्यावस्था आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत वाटचाल करणाऱ्या तरुणाची कथा या कांदबरीत मांडली आहे. मराठी वाङमयातील या वेगळ्या साहित्यकृतीबद्दल गोरे यांना राष्ट्रीय पातळीवरील साहित्य अकादमी युवा पुरस्कार पुरस्कार जाहीर झाला. मंगळवारी आयोजित 'मटा युवा संवाद'मध्ये लेखक गोरे यांची जडणघडण उलगडणार आहे. गोरे हे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील निगडी बुद्रूक येथील आहेत.

जत तालुका हा दुष्काळी भाग, निसर्गाची अवकृपा कायमची. अशा खडतर परिस्थितीत न डगमगता गोरे यांनी कॉलेज शिक्षण पूर्ण केले, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिवाजी विद्यापीठात प्रवेश घेतला. हा सारा जीवन प्रवास आणि जगण्यासाठी रोजचा संघर्ष या कांदबरीत मांडला आहे. 'फेसाटी' कांदबरी एका अर्थाने गोरे यांच्या जीवन संघर्षाची कथा आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सहाव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 'मटा युवा संवाद'चे आयोजन केले आहे. या माध्यमातून लेखकांशी थेट संवाद साधता येणार आहे. साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेच्या पााणीपातळीत वाढ

$
0
0

गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ६८.५० मिमीची नोंद झाली असून पंचगंगा नदी पाणी पातळीत दीड फुटाने वाढ झाली आहे. दरम्यान, पावसामुळे जिल्ह्यातील ५२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून धरणातून ३०२८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वारणा नदीत जयश्री संभाजी पाटील (वय ३२, रा. भादोले, ता. हातकणंगले) ही महिला वाहून केली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शोध मोहीम सुरु आहे.

पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून राजाराम बंधाऱ्याजवळ दिवसभरात नऊ इंचाने वाढ झाली आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ३१ फूट ९ इंच पाण्याची पातळी होती. रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत पाणी पातळी ३३ फूटापर्यंत पोचली. दिवसभरात नऊ इंचाने वाढ होऊन सायंकाळी सात वाजेपर्यंत पाणी पातळी ३३ फूट ९ इंचापर्यंत होती.

००००

जिल्ह्यातील तालुकावार पाऊस असा

गगनबावडा ६८.५० मि.मी. हातकणंगले ५.२७, शिरोळ २.१४, पन्हाळा १८.२७, शाहूवाडी ६१.६६, राधानगरी ३१.१७, करवीर ११.५४, कागल ०.४३, गडहिंग्लज ४.७१, भुदरगड २०.४०, आजरा १५.००, चंदगड २०.००.

००००

कोयना धरणातून ४४ हजार २५ क्युसेक विसर्ग

कोयना धरणातून ४४ हजार ०२५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून वारणा धरणातून १० हजार ६२७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शनिवारी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडे होते. मध्यरात्रीनंतर चारही दरवाजे बंद झाले. पण रविवारी दुपारी एक वाजता एक दरवाजा उघडला. काळम्मावाडीतून आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सकल मराठा समाज पश्चिम विभागाची बुधवारी बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाज पश्चिम महाराष्ट्रातील समन्वयकांची बुधवारी (ता. २२) मार्केट यार्ड मुस्कॉन लॉन येथे बैठक होणार आहे, अशी माहिती संयोजकांनी दिली

मराठा आंदोलनासंबधी सर्व प्रतिनिधींना बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. बुधवारी सकाळी साडेदहा ते दोन वाजेपर्यंत जिल्ह्यांतील सर्व तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक होणार आहे. बुधवारी दुपारी तीन ते सहा यावेळेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, पंढरपूर, मिरज, कराड येथील समन्वयकांची बैठक होणार आहे. मुंबई व पुण्यातील सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत सरकारकडे मराठा समाजाच्या मागण्या, राज्यस्तरीय आचारसंहितेवर चर्चा होऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले खटले, आत्महत्या या संबधी अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेला वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे, दिलीप देसाई, स्वप्नील पार्टे, उमेश पोवार आदी उपस्थित होते. दरम्यान शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्ते ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.

शिवाजी पेठेतील मोर्चाला पाठिंबा

मराठा आरक्षणप्रश्नी शिवाजी पेठेतील मोर्चाला सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला आहे. शहरातील सर्व पेठांनी मार्चे काढून सरकारवर दबाव आणावा, असे आवाहनही करण्यात आले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकातून मोर्चास सुरुवात होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे शिवाजी पेठ मोर्चा संयोजकांनी केले आहे.

दरम्यान, काश्मिरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हौतात्म प्राप्त झालेल्या मेजर कौस्तुभ राणे यांचा अस्थींचे सोमवारी पंचगंगेत विसर्जन करण्यात येणार आहे. मुंबईहून अस्थिकलश येणार असून दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या व्यासपीठावर दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर नदीत विसर्जन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगरेषांची भरली चित्रशाळा

$
0
0

महाराष्ट्र टाइम्सच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर टाइम्स टीम

शाळकरी मुलांच्या कल्पनाविष्कारातून कागदावर अवतरणाऱ्या वेगवेगळ्या कलाकृती, कधी रेषांचा खेळ तर कधी रंगाशी नातं जोडत हुबेहूब साकारणारी व्यक्तीचित्रे, आवडता पक्षी प्राण्यांपासून ते प्लास्टिकमुक्तीच्या जागरापर्यंतचा संदेश देणाऱ्या चित्रांची दुनिया रविवारी बालचमूच्या कॅनव्हासवर अवतरली. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शाळकरी मुलांच्या चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने रंग रेषांची चित्रशाळा अनुभवता आली. पहिली ते दहावी पर्यंतची हजारो मुले अक्षरश चित्रांच्या दुनियेत हरवली. आणि रविवारच्या सुट्टीचा दिवस जणू आनंदाची पर्वणी ठरला. भुरभुरता पाऊस आणि 'कलासंगम'च्या मंचावर रंग रेषांचा बहर असे चित्र विलोभनीय पहावयास मिळाले.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेत कोल्हापूरसह आसपासच्या गावातील हजारो मुलांनी सहभाग घेतला. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परिसर विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलला. दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य पी. एस. हेरवाडे, डाइस अकॅडमीच्या दिशा पाटील, महाराष्ट्र राज्य कला अध्यापक संघ, जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव, शिवाजी म्हस्के आदींच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून अनोख्या पद्धतीने चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन झाले.

स्पर्धेच्या तीनही गटातील विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती. स्पर्धेला प्रारंभ होताच मुलांनी मनातील उमलते तरंग कागदावर रेखाटण्यास सुरुवात केली आणि काही मिनिटांतच चित्रशाळा आकाराला येऊ लागली. प्रत्येक गटातील विद्यार्थी आपल्या आवडत्या विषयाचे रेखाटण आणि उत्कृष्ट रंगसंगती करत जणू चित्रांच्या दुनियेत हरविले. तास, दीड तासाच्या प्रयत्नानंतर मनासारखा चित्र आकाराला आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या छटा आणखीनच फुलल्या. स्पर्धा संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र प्रदान केल्यानंतर त्यांचा आनंद द्विगुणित झाला. कोल्हापूर जिल्हा कला अध्यापक संघ, कोल्हापूर आर्ट फाऊंडेशन व दि न्यू एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. पेटाळा येथील राम गणेश गडकरी सभागृह, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्सस हायस्कूल आणि विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल येथे चित्र दुनिया अवतरली. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक डाइस अकॅडमी होते तर श्री मुरारी मुद्रणालयचेही सहकार्य लाभले.

चिमुकल्यांना आकर्षण पक्षी, प्राणी अन् विदूषकाचे

पक्षी, प्राणी आणि सर्कशीतील विदूषक हे लहान मुलांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी हेच विषय सुचविले होते. आवडत्या विषयावर चित्र काढण्याची संधी लाभताच लहानग्यांचा हुरुप आणखी वाढला. रंगीबेरंगी मुखवटे परिधान केलेला, खदखदून हसविणारा विदूषक अशी विविध रुपे कागदावर उतरु लागली. कुणी नानाविध पक्ष्यांच्या दुनियेत हरविले. तर कोण प्राण्यांची चित्रे काढू लागला. मोर, पोपट, चिमणी, कोकिळा या पक्ष्यांच्या चित्रात रंग भरत हुबेहूब चित्र साकारण्यासाठी त्यांची चाललेली धडपड वाखाणण्याजोगी होती. प्राण्यांची ओळख करुन देताना अनेकांनी घोडा, बैलजोडी, हत्ती, उंट, पाळीव कुत्रा यांना पसंती दिली. राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या या लहान गटातील चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला.

वाहतूक सुरक्षा आणि निसर्ग संवर्धनही

इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा 'वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेटचा वापर, मिरवणूक, वृक्षारोपन व संवर्धन' या विषयावर रंगली. मुलांनी या स्पर्धेच्या माध्यमातून आवडता सण चित्रबद्ध केला. काही मुलांनी तर सार्वजनिक गणेशोत्सववर चित्र रेखाटन केले. आकर्षक गणेश मूर्ती, त्याभोवती केलेली सुंदर अशी आरास, वाजत गाजत काढलेली मिरवणूक असे अनेक प्रसंग विद्यार्थ्यांनी चित्रातून जिवंत केले. खरं तर, मिरवणुकीचा माहौल चित्रात उतरविणे अवघड, मात्र विद्यार्थ्यांनी अतिशय खुबीने मिरवणूक कागदावर आणली. वृक्षारोपण आणि संवर्धन या विषयावर शाळकरी मुलांच्या सजगवृत्तीचे दर्शन घडले. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी निसर्ग संवर्धन, वृक्ष लागवड ही निकड त्यांनी चित्रांतून मांडली.

आयडॉलला चित्रबद्ध करताना....

आठवी ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आवडते व्यक्तिमत्व, आवडता सण आणि प्लास्टिकमुक्ती हे विषय होते. आवडते व्यक्तिमत्व रेखाटताना विद्यार्थ्यांमधील कलागुण बहरले. सहभागी स्पर्धकांनी अतिशय तन्मयतेने आपआपल्या 'आयडॉल'ला चित्र रुप देताना कुठलीच कसर राहू नये याची खबरदारी घेत होता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरु, भगतसिंग, राजर्षी शाहू महाराज, रणरागिनी ताराराणी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची व्यक्तीचित्रे रेखाटली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तीचित्र रेखाटत स्मृती जागविल्या. 'प्लास्टिकमुक्तीचा जागर, प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा'अशी सामाजिक विषयावरील चित्रे रेखाटत विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले.

'त्या' मुलांची चित्रे ठरली विशेष लक्षवेधी

समर्थ विद्या मंदिरमधील २६ दिव्यांग विद्यार्थी आणि विनयकुमार मदनमोहन लोहिया कर्णबधिर विद्यालयामधील ३५ विद्यार्थी स्पर्धेतील विशेष आकर्षण ठरले. या विद्यार्थ्यांनी तीनही गटातील विषयानुरुप चित्रे रेखाटली. गणेश उत्सव, दहीहंडीचे चित्रण, पक्षी, प्राण्यांची चित्रांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. वाहतूक सुरक्षा आणि हेल्मेपटचा वापर या विषयावरील चित्रामध्ये विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी दिसली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटका, जुगार अड्ड्यावर छापे

$
0
0

मटका, जुगार

अड्ड्यांवर छापे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवार पेठेतील अकबर मोहल्ला तरुण मंडळांच्या पाठीमागे मोकळ्या जागेत तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी सातजणांना अटक केली. सोमवारी (ता. २०) दुपारी अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली. जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा साडेचार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

इजाज रशीद पठाण (वय २६), मेहबूब इमाम मुजावर (४५), इम्रान इकबाल शेख (२६), गुलाब इलाई सय्यद (४२), जुबेर इकबाल महात (२४),जावेद दस्तगीर शेख (३८, रा. सर्व सोमवार पेठ), सलीम मुबारक बारगीर (३६, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली. तसेच लक्ष्मीपुरी परिसरात मटका अड्डयावर छापा टाकून मुनीर नबीसाब पटवेगार (४४, रा. सोमवार पेठ) याला अटक केली. त्याच्या ताब्यातून मटक्याच्या चिठ्ठया व रोख रक्कम असा साडेआठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील संशयितांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूत्रधारांना पकडा, अन्यथा मुंबईत ठाण

$
0
0

फोटो आहे...

.....

'अंनिस' च्या परिसंवादात इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागील खऱ्या सूत्रधारांना पकडा, अन्यथा राज्यभरातील पुरोगामी चळवळीतील एक लाख कार्यकर्ते मुंबईत मोर्चा काढून ठाण मांडतील,' असा इशारा महाराष्ट्र विवेक वाहिनीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्राचार्य टी.एस. पाटील यांनी दिला.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी त्यांच्या विचार कार्यांचा जागर करण्यात आला. समितीतर्फे शाहू स्मारक भवन येथे 'दाभोलकरांचा खून आणि त्यानंतर...'या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या कार्याचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले, 'जातीव्यवस्थेबरोबरच धर्मचिकित्सा करण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. प्रस्थापित समाजाला हा प्रकार सहन झाला नाही. जातीयवादी व धर्मांध शक्तींनी पुन्हा डोके वर काढल्याने देशासमोर नवे संकट निर्माण झाले आहे. प्रस्थापित समाजाचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पुरोगामी विचारवंतांची हत्या केली. दाभोलकरांचा खून होऊन पाच वर्षाचा कालावधी उलटला, अद्याप त्या खुनामागील मास्टरमाईंड सापडला नाही. सरकारने खुनामागील सूत्रधारांना पकडावे, अन्यथा राज्यातील सामाजिक, पुरोगामी चळवळीतील एक लाख कार्यकर्ते मुंबईत ठाण मांडतील.'

लेखिका नीलम माणगावे म्हणाल्या, 'डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंनिसची चळवळ संपेल अशी भिती अनेकजण व्यक्त करत होते. मात्र विवेकवादावर आधारित ही चळवळ नव्या जोमाने सुरु झाली. तरुण कार्यकर्ते चळवळीत सक्रिय झाले. हा एका अर्थी दाभोलकरांच्या विचार कार्याचा विजय आहे. त्यांनी समता, स्वातंत्र्य, न्याय आणि विवेक या सूत्रांवर केलेल्या सामाजिक कार्याचे मोल मोठे आहे. समाजात विवेकवाद व परिवतर्नवादी बदल घडत असल्याचे हे लक्षण आहे.'

अंनिसचे सांगली जिल्हाध्यक्ष अॅड. के. डी. शिंदे म्हणाले, 'बहुजन समाजातील अंधश्रध्दा, अज्ञान हा एका समाज घटकाचा व्यवहार आहे. दाभोलकरांनी बहुजनातील अंधश्रध्दा, अज्ञान दूर करुन त्यांना विज्ञानवादी बनविण्यासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांचे परिवर्तनवादी कार्य न रुचल्याने व विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याचे सामर्थ्य नसलेल्यांनी दाभोलकरांची हत्या केली. दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या रेकी करुन झाली आहे. त्यांच्या खुन्यातील संशियत आरोपींना अटक झाली पण सरकारने या हत्येमागे ज्यांचा मेंदू आहे त्या मास्टरमाईंडचा शोध घ्यावा. तपास यंत्रणेने नवीन आयुधांचा वापर करुन या प्रकरणांचा छडा लावावा.' अनिल चव्हाण यांनी,विचारवंतांच्या हत्या होवूनही प्रशासन खऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहचू शकत नाही. सरकारने याप्रश्नी राज्यातील जनतेला उत्तर दिले पाहिजे,असे नमूद केले. सीमा पाटील यांनी प्रास्ताविक केले. रमेश वडणगेकर यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्येतही अंदुरेचा सहभाग?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेला आरोपी सचिन अंदुरे याचा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येतही सहभाग असल्याचा संशय एसआयटी अधिकाऱ्यांना आहे. याबाबत अंदुरेची चौकशी करण्यासाठी पथक पुण्यात ठाण मांडून आहे. शिवाय बेळगावातूनही माहिती घेतली जात आहे. दाभोलकर हत्येतील प्रमुख संशयित डॉ. वीरेंद्र तावडे याचा अंदुरे, राऊत, गोंधळेकर आणि समीर गायकवाड यांच्याशी संपर्क होता. या सर्वांच्या परस्पर संबंधाची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

मुंबईत सापडलेल्या शस्त्रसाठ्याचा तपास करताना दहशतवाद विरोधी पथकाने वैभव राऊत याच्या संपर्कातील सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर, सचिन अंदुरे याच्यासह चौघांना अटक केली. यातील अंदुरे यानेच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. शिवाय दाभोलकर हत्येतील मुख्य आरोपी वीरेंद्र तावडे एकमेकांच्या संपर्कात होता. तावडेचा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येत सहभागी असलेला संशयित गायकवाड याच्याशी संबंध होता. मुंबईत घरात स्फोटके ठेवणारा राऊत आणि कळसकर हे एकमेकांच्या संपर्कात होते. कळसकरचे कोल्हापुरातील वास्तव्य आणि इतर संशयितांशी असलेला संपर्क लक्षात घेऊन एसआयटीने सचिन अंदुरेवर लक्ष केंद्रीत केले आहे.

अंदुरेने शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र आणि कर्नाटकात घेतल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापूर्वी जत (जि. सांगली) येथे काही हिंदुत्ववादी संघटनांनी काही तरुणांना शस्त्र प्रशिक्षण दिल्याची माहिती तपासात समोर आली होती. लंकेश यांच्या हत्येतील संशयितांनी बेळगावजवळ शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे उघड झाले आहे. अंदुरेचा जत आणि बेळगावशी संबंध आहे काय? याची माहितीही घेतली जात आहे.

तपासात कमालीची गोपनियता

मुंबईत शस्त्रसाठा सापडल्यानंतर ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे धक्कादायक माहिती मिळाल्याने एटीएस, सीबीआय आणि एसआयटीचा तपास गतिमान झाला. संशयितांचे मोबाइल कॉल डिटेल्स, त्यांच्या फेसबुकवरील पोस्ट, ई-मेल्स, हिंदुत्ववादी संघटनांशी असलेला संबंध, शिबिरांमधील सहभाग, आर्थिक उत्पन्नाची साधने, नातेवाईकांसह डॉ. वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांच्याशी आलेला संपर्क या विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. सर्वच तपास यंत्रणांची अनेक पथके कार्यरत आहेत. याबाबत कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे. अधिकृत माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images