Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘महाराष्ट्र’च्या माजी विद्यार्थ्यांकडून गणवेश वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या २००१-२००२ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांकडून गरजू आणि होतकरू ८५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी ६ मे २०१८ रोजी घेतलेल्या स्नेहमेळाव्यात शाळा किंवा गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार माजी विद्यार्थ्यांनी निधीही जमा केला. जमा झालेल्या निधीतून चेअरमन डी. बी. पाटील, संस्थेचे अध्यक्ष एस. आर. चरापले व महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ए. एस. रामाणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. ग्रंथालयासाठी सात हजारांची देणगी ग्रंथपाल सौरभ पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. तसेच न्यू प्राथमिक विद्यालयासाठी मुख्याध्यापिका एस. आर. पाटील यांच्याकडे दोन स्पीकर देण्यात आले.

प्राचार्य रामाणे म्हणाले, '२००२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल जपलेली आपुलकी आणि राबवलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. भावी पिढीनेही अशा उपक्रमाचे अनुकरण करीत वारसा जपणे आवश्यक आहे.' गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका एस. बी. शिंदे, सूर्यकांत माळी यांनी मनोगत व्यक्त केले.

उपक्रमासाठी उपप्राचार्य यू. आर. आतकिरे, उपमुख्याधापक ए. एन. जाधव, व्ही. जी. चोपडे, एस. वाय. कोळी व व्ही. एस. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी रोहित भोईटे, चेतन रोहिले, महेश साळोखे, आदित्य काशीद, बसवराज कबुरे, स्वरूप शिंदे, विद्याधर दुर्गुळे, निखील पाटील, पूजा दिंडे, शिल्पा जौंदाळ, स्मिता साळोखे उपस्थित होते. एस. एस. मोरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अतिक्रमण काढण्यावरून मारामारी

$
0
0

टपरीचे अतिक्रमण

काढण्यावरुन मारामारी

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पान टपरीचे अतिक्रमण काढण्यास विरोध झाल्याने वादाला तोंड फुटले. यावेळी दोन गटात वादावादी होऊन मारामारी झाली. मुख्य रस्त्यावरील जुन्या नगरपालिकेसमोर घडलेल्या या प्रकारामुळे कांही काळ तणाव निर्माण झाला होता. या मारामारीचे चित्रीकरण करणाऱ्या दोन फोटोग्राफरच्या कॅमेर्‍याची मोडतोड करण्यात आली. दरम्यान, गावात अतिक्रमणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना अतिक्रमण विभाग मलईदार प्रकरणांत लक्ष घालत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या मारामारीबाबत गावभाग पोलिस ठाण्यास परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

शहरात मुख्य मार्गावर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे नगरपालिकेने मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुन्या नगरपालिकेसमोरील पान टपरीचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी टपरीधारकांनी पथकाबरोबर हुज्जत घालण्यास सुरुवात गेली. दुकानाशेजारी गटारीवरील फरशांचे अतिक्रमण काढण्याची मागणी केली. त्यानुसार पथकाने गटारीवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्याच वेळी जुना वाद उफाळून आला, या टपरीच्या जागेवरुन बागवान व मुलचंदाणी यांच्यामध्ये वाद आहे. दोघांमध्ये याचवेळी वादावादीस सुरुवात झाली. शाब्दीक वादावरुन झालेली सुरुवात मारामारीपर्यंत गेली. यावेळी मनशाराम रहंदामल मुलचंदाणी यांना बागवान समर्थकांनी तर झाकीर बाबू बागवान यांना मुलचंदाणी समर्थक तसेच नागरिकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा गोंधळ उडाला. या मारामारीत छायाचित्रणासाठी गेलेल्या दोन फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची तोडफोड झाली. या प्रकारानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणी झाकीर बागवान (वय ४८) व मनशाराम मुलचंदाणी (वय ७२) यांनी गावभाग पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटाकडील सातजणांवर अदखल पात्र गुन्हे नोंद केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्ल्यू ग्रीन अल्गीचा प्रादूर्भाव रोखा

$
0
0

रंकाळ्यातील प्रदूषणप्रश्नी आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराचे वैभव असलेल्या रंकाळा तलावात ब्ल्यू ग्रीन अल्गीचा प्रादूर्भाव वाढून पाण्याला हिरवा रंग आला आहे. त्यामुळे ब्ल्यू ग्रीन अल्गीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करा. तसेच अल्गीचा प्रादूर्भाव कसा रोखता येईल, त्याचा अहवाल आठवड्यात सादर करा, असे आदेश महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पर्यावरण अधिकारी सुनील व्याघ्रांबरे यांना मंगळवारी दिले. अहवाल तयार करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभाग व तज्ज्ञ व्यक्तींची मदत घेण्याची सूचना डॉ. चौधरी यांनी केली.

शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या रंकाळा तलावाला पुन्हा प्रदूषणाचा विळखा घट्ट होवू लागला आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात सांडपाणी रंकाळ्यात मिसळल्याने ब्ल्यू ग्रीन अल्गी या एकपेशीय वनस्पतीची वाढ होऊन पाणी हिरवेगार दिसू लागले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रंकाळ्याच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.

रंकाळ्याचे प्रदूषण प्रामुख्याने सांडपाण्यामुळे होत असल्याने सांडपाणी रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या, पण या सर्व उपाययोजना तकलादू ठरल्या आहेत. हे रंकाळ्याच्या पाण्याला आलेल्या हिरव्या रंगावरुन स्पष्ट होते. पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात सांडपाणी रंकाळ्यात मिसळत असल्याने दरवर्षी पाण्याला हिरवा रंग प्राप्त होत असताना महापालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे. यावर्षी संततधार पावसामुळे प्रचंड सांडपाणी थेट रंकाळ्यात आले आहे. सांडपाणी रोखण्यासाठी नाल्यांवर फळ्या टाकून सांडपाणी अडवण्यात येणार होते, पण अशाप्रकारे सांडपाणी अडवल्यास पाठीमागे पाण्याला फुगवटा निर्माण होऊन ते घरात घुसण्याची शक्यता असल्याने हा पर्याय रद्द करण्यात आला. त्यामुळे हे सांडपाणी थेट रंकाळ्यात आल्याने पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला आहे.

मंगळवारी या घटनेची आयुक्त डॉ. चौधरी यांनी तातडीने दखल घेतली. 'सांडपाण्यामुळे ब्ल्यू ग्रीन अल्गीचे प्रमाण वाढल्याने पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला असल्याने रंकाळ्यातील पाण्याचे तातडीने नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी पाठवा. प्रदूषण रोखण्यासाठी अहवाल सादर करण्याबरोबर ब्ल्यू ग्रीन अल्गीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाय सूचवा, यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाची मदत घ्या, असे आदेश आयुक्तांनी दिले. तत्पूर्वी सांडपाणी रोखण्यासाठी अन्य उपाययोजना करता येते का ? याचीही पाहणी करण्याची सूचना डॉ. चौधरी यांनी केली. पाण्याला हिरवा रंग आल्यानंतर तातडीने उपाययोजनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र पावसाचा जोर असल्याने ब्ल्यू ग्रीन अल्गीचा प्रादुर्भाव कायम राहणार आहे, पण ऑक्टोबरनंतर याची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

........

चौकट

खर्च करण्यावर मर्यादा

रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी अनेकवेळा निधीची घोषणा झाली. घोषणेनुसार काहीप्रमाणात निधी खर्चही करण्यात आला. पण हरित लवादाने रंकाळ्यासाठी आलेल्या निधीचे पर्यावरण निकषावर ऑडिट करण्याचे सूचना केल्या आहेत. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी आलेला निधी खर्च करण्यावर मर्यादा येत आहे.

चौकट

बोटिंगचा उपाययोजना मागे पडली

रंकाळ्यात थेट सांडपाणी मिसळल्यानंतर पाणी प्रदूषित होते. सांडपाण्यात नत्राचे प्रमाण जास्त असल्याने प्रदूषणात वाढ होत असल्याचे तज्ज्ञाचे मत होते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन प्रमाण वाढवणे व हवा खेळती ठेवण्यासाठी बोटिंगचा पर्याय पुढे आला होता. पण बोटिंग करण्याचा प्रस्ताव बारगळल्याने ही उपाययोजना कागदावर राहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या प्रकरणातील दुवे लवकरच हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), राज्य दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) कर्नाटक विशेष तपास पथक (एसआयटी) आणि कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या पैलूंवर तपास सुरु आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या खूनप्रकरणी या चारही तपास यंत्रणा समन्वयसाने काम करीत आहेत. पैकी पानसरे हत्येचा उलगडा करण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र एसआयटीला काही धागेदोरे मिळाले आहेत. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तपास यंत्रणा कार्यरत आहे. या प्रकरणी येत्या काळात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागू शकतील,' अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख म्हणाले, 'पानसरे हत्या प्रकरणात अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे तपास अधिकारी आहेत. पानसरे हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंत्रणांकडून तपास सुरु आहे. एसआयटीच्या हाती काही दिवसांत महत्त्वाचे दुवे हाती लागण्याची शक्यता आहे. तपासाबाबत चारही यंत्रणात समन्वय आहे. संशयितांकडून चौघांच्या हत्येप्रकरणी तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी मिळू शकतील. यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ही माहिती या प्रकरणाच्या तपासात उपयोगी पडेल. नालासोपारा येथे एका घरात सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एटीएस पथकाने संशयित शरद कळसकरची चौकशी सुरु केली आहे. त्याचे कोल्हापुरातील वास्तव्य, त्याचा पानसरे हत्या प्रकरणात काही संबंध आहे का? याबाबतही तपास सुरु आहे.'

देशमुख म्हणाले, 'सार्वजनिक उत्सवात आवाज मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या सार्वजनिक तरुण मंडळांवर कडक गुन्हे दाखल केले जातील. यावर्षीचा गणेशोत्सव उच्च ध्वनिक्षेपकमुक्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उच्च ध्वनिक्षेपक भिंती उभारणाऱ्या मंडळांना सूचना दिल्या आहेत. काही मंडळांना दहा दिवसांत नोटिसा पाठविल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात प्रबोधनावर भर देण्यात येईल. त्यानंतरही आगळीक केल्यास संबंधितांवर पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कडक कारवाई केली जाईल. गांजा आणि चरस प्रकरणाशी मुळाशी जाणार असून, असे पदार्थ पुरवणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोलिस पोहोचतील.'

०० ०० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरे आत्महत्याप्रकरणीचौकशी अधिकारी नियुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल तालुक्यातील वंदूर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विष्णू दादू मोरे यांच्या आत्महत्येप्रकरणी शिक्षक संघटनांनी दोषीवर कारवाईची मागणी केली आहे. शाळा व्यवस्थापन समितीतील काही सदस्यांनी मुख्याध्यापकांना त्रास दिल्याची तक्रार आहे. तसेच शिक्षक संघटनांनी कागल येथील गटशिक्षणाधिकारी जी. बी. कमळकर यांच्या कार्यपद्धतीविषयी आक्षेप नोंदविले आहेत. या साऱ्या प्रकाराची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकाराची चौकशी होऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्याचे मित्तल यांनी सांगितले. दरम्यान गटशिक्षणाधिकारी कमळकर यांनी सोमवारी सायंकाळी सीईओ मित्तल यांची भेट घेऊन म्हणणे मांडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाचा प्रेरणास्रोत हरपला

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विरोधी पक्षात असतानाही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आदराचे स्थान मिळवले. सद्य:स्थितीत राजकारणाचा पाया ढासळत असताना वाजपेयींनी राजकीय प्रगल्भता दाखवली. उत्कृष्ट संसदपटू आणि कवी मनाच्या व्यक्तिमत्त्वाने देशाला नेहमीच प्रेरणा दिली. सर्वसामान्यांचा आधारवड असलेल्या व्यक्तीच्या निधनाने प्रेरणास्त्रोत हरपला,' अशा भावना व्यक्त करत माजी पंतप्रधान वाजपेयी यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान वाजयेपी यांना आदरांजली वाहण्यासाठी मंगळवारी राजर्षी शाहू सभागृहात सर्वपक्षीय शोकसभा झाली. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या. यावेळी अनेक वक्त्यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला.

महापौर बोंद्रे म्हणाल्या, 'वाजपेयींनी आपल्या राजकीय जीवनात सर्व पक्षांबरोबर सलोख्याचे संबंध निर्माण केले. शांत आणि संयमासोबत त्यांच्या कणखर वृत्तीचे अनेकदा देशाला दर्शन घडले. खुमासदार शैलीत भाषण करताना अनेकवेळा त्यांनी विरोधकांची मने जिंकली. कवितेच्या माध्यमातून हळवे मन अनकेदा अनुभवाला आले. म्हणूनच त्यांच्या आठवणी चिरंतणपणे राहतील.' उपमहापौर महेश सावंत म्हणाले, 'तीनवेळा पंतप्रधानपद भूषविताना वाजपेयींनी अनेक पक्षांची मोट बांधली. सत्ता स्थापन करताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अशा नेत्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्ते उपस्थित आहेत, ही उपस्थिती त्यांना खरी श्रद्धांजली अर्पण करणारी आहे.'

ज्येष्ठ भाजप नेते सुभाष वोरा म्हणाले, 'वाजपेयी भाजपबरोबरच सर्वसामान्यांचे नेते होते. सर्वांशी असलेल्या सौहार्द संबंधामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षानेही कधी टिकाटिपण्णी केली नाही. सामान्य कुटुंबातील नेतृत्वाने स्वत:च्या कर्तृत्वातून जनतेच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले. अशा नेता पुन्हा होणार नाही.'

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, 'संसदेत एकेकाळी दोन खासदार असलेल्या भाजपने वाजपेयींच्या कुशल नेतृत्वामुळे सत्ता स्थापन केली. तीनवेळा पंतप्रधान होऊन त्यांनी आपल्या कार्याची झलक दाखवली. कोल्हापूरशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळेच त्यांच्या अस्थिकलश पालकमंत्री चंद्रकांत पाटील घेऊन येणार आहेत. शुक्रवारी (ता. २४) बिंदू चौकात सकाळी दहा वाजता अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.'

जिल्हाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, 'वाजपेयींनी भाजप कार्यकर्त्यांना जगण्याची दिशा दिली. कोल्हापूरशी त्यांचा विशेष ऋणानुबंध होता. त्यामुळे अशा नेत्याच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी शहरातील एखादा रस्ता किंवा चौकाला त्यांचे नाव द्यावे. तसेच महापालिकेच्या वतीने स्मारक उभारावे.'

शोकसभेत महिला व बालकल्याण सभापती सुरेखा शहा, शिक्षण सभापती अशोक जाधव, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, माजी महापौर आर. के. पोवार, महिला काँग्रेसच्या सरलाताई पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, राष्ट्रवादीचे राजू लाटकर, लाला गायकवाड, माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे, वसंतराव मुळीक, अशोक भंडारे, प्रा. विश्वास देशमुख, दिलीप पवार, नगरसेवक अजित ठाणेकर, धनंजय सावंत, किशोर घाटगे, बबन रानगे, भगवान काटे, बाबुराव कदम, प्रसाद पाटील यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

शोकसभेस शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम, माजी नगरसेवक बाब पार्टे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाकवे, चंदूर ग्रामस्थांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कागल तालुक्यातील म्हाकवे, हातकणंगले तालुक्यातील चंदूर व भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी ग्रामस्थांनी मंगळवारी दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा दिला. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संचालक सुशांत शेलार यांच्यासह मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट दिली. विविध सहकारी संस्थाचे पदाधिकारी, मंडळांचे कार्यकर्ते, महाविद्यालयीन युवकांचा ठिय्या आंदोलनातील सहभाग लक्षणीय होता.

भुदरगड तालुक्यातील दिंडेवाडी येथील ग्रामसभेत मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ठराव करण्यात आला. दत्तात्रय भोईटे यांनी ठराव मांडला तर अशोक मोरबाळे यांनी अनुमोदन दिल्यानंतर ठराव मंजूर करण्यात आला. मंगळवारी सरपंच श्रीधर भोईटे यांनी ठरावाची प्रत आंदोलनाच्या संयोजकांना दिली.

हातकणंगले तालुक्यातील चंदूर ग्रामस्थांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला. राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षणप्रश्नी चालढकलपणा सुरु असल्याने सकल मराठा समाजाची मागणी न्याय असल्याने ठिय्या आंदोलनाला चंदूर ग्रामपंचायतीचा पाठींबा असल्याचे पत्र देण्यात आले. तसेच गावातील वीरशैव लिंगायत समाज मंडळ, अरुण विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, शंकरराव पाटील चंदूरकर नागरी सहकारी पतसंस्था, जय किसान विविध कार्यकारी सेवा संस्थांनी सर्वसाधारण सभेत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीचा ठराव मंजूर केला आहे. ठरावाची प्रत संयोजकांना देण्यात आली.

कागल तालुक्यातील म्हाकवे ग्रामपंचायतीने स्वातंत्रदिनी झालेल्या ग्रामसभेत मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीचा ठराव मंजूर केला. सलीम मुल्लाणी हे ठरावाचे सूचक असून विठ्ठल शिंदे यांनी अनुमोदन दिले आहे. ठरावाची प्रत सरपंचासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित दाखवून आंदोलनाला पाठिंबा दिला.

००००

शौर्य पीठ आंदोलनाला खासदारांचा पाठिंबा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवाजी चौकात शौर्य पीठाच्यावतीने ठिय्या आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला खासदार धनंजय महाडिक यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, महानगरपालिका विरोधी पक्षनेता विलास वास्कर, भाजप नगरसेवक अजित ठाणेकर, विजय खाडे, दीपा पाटील, हिंदूराव शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला. आंदोलनात प्रसाद जाधव, राजू जाधव, राजू सावंत, निखिल इंगवले यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गाय दूध खरेदीत रुपयाने कपात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसएनएफचे (सॉलिडस् नॉट फॅट) प्रमाण कमी असलेल्या गायीच्या दूध खरेदी दरात एक रुपये कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने दूध दरवाढीचा फुगा अवघ्या महिन्याभरात फुटला. एक रुपये कमी दर मिळणार असल्याने दूध उत्पादकांना याचा फटका बसणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर सरकारने गायीचा दूध दर प्रतिलिटर २५ रुपये निश्चित केला. एक ऑगस्टपासून खरेदी दर व विक्रीची अंमलबजावणी सुरू केली आहे. ३.५ फॅट व ८.५ एसएनएफला असलेल्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटर खरेदी दर आहे. सरकारने एसएनएफच्या खरेदी दरात प्रतिपॉइंट कमी फॅटसाठी ३० पैशांची कपात मान्य केली होती. पण प्रतिपॉइंट कमी एसएनएफकरिता दर कपातीबाबत सरकारने कोणताही उल्लेख सरकारी आदेशात केला नव्हता. राज्यातील सहकारी व खासगी संस्थांनी एसएनएफमधील कपात अवघी तीस पैसे असल्याचे निदर्शनास आणले. उच्चप्रतीचे दूध स्वीकारताना तसेच भेसळीला आळा बसावा यासाठी फॅटबरोबरोबर एसएनएफसाठी प्रतिपॉइंट काही रक्कम कपात करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी केली. फॅट चांगले असले तरी एसएनएफमध्ये अन्य आवश्यक असलेले घटक कमी असतात. त्यामुळे दुधाचा दर्जा घसरतो, असे दूध संघांचे म्हणणे आहे. सरकारने सहकारी व खासगी दूध संस्थांनी मागणी करत दुधाच्या प्रतिपॉइंट एसएनएफकरिता एक रुपये कपातीचा निर्णय घेतला. त्यामुळे ८.३ व ८.४ एसएनएफ असलेल्या खरेदी दरात एक रुपयाने कपात होणार आहे. यापूर्वी फॅटनुसार दर मिळत होता, पण आता एसएनएफची अट घातली असल्याने खरेदी दर कमी होणार आहे.

गायीच्या दुधात एसएनएफचे प्रमाण कमी असल्यास दूध उत्पादकांना एक रुपयाचा फटका बसणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात गायीच्या दुधाचे फॅट ३.५ च्यावर असते. गोकुळकडे गायीच्या दुधाचे फॅट ४.२ व ८.५ फॅट असल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना २५ रुपये दर कायम राहणार असल्याचे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.

२१ ऑगस्टच्या आदेशानुसार गाय दूध दर

फॅट/एसएनएफ ८.३ ८.४ ८.५

३.२ २२.१० रु. २३.१० रु. २४.१० रु.

३.३ २२.४० रु. २३.४० रु. २४.४० रु.

३.४ २२.७० रु. २३.७० रु. २४.७० रु.

३.५ २३.०० रु. २४.०० रु. २५.०० रु.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलतरण स्पर्धेत वाघ, देशपांडे यांचे यश

$
0
0

कोल्हापूर: जिल्हास्तरीय श्री शाहू जलतरण स्पर्धेत खुल्या गटात प्रज्जवल वाघ, आभा देशपांडे यांनी यश मिळवले. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन व रोटरी क्लबच्यावतीने स्पर्धेचे आयोजन भवानी जलतरण तलाव येथे करण्यात आले होते.

स्पर्धा फ्रीस्टाईल, बॅकस्ट्रोक, ब्रेस्ट्रोक, बटरफ्लाय व आय. एम. व मिक्स फ्री स्टाईल रिले या प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धा सात, नऊ, अकरा, तेरा, पंधरा, सतरा वयोगटात घेण्यात आली. कोल्हापूर, भोगावती, राधानगरी, इचलकरंजी येथील २०५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेतील यशस्वी खेळाडू १७ वर्षाखालील, अवधूत परूळेकर व इफिया इकलवाले, १५ वर्षाखालील, तेजस माने व अस्मी देसाई, १३ वर्षाखालील, यशराज चौगुले व अपूर्वा म्हेतरे, ११ वर्षाखालील: शिववर्धन पाटील व संस्कृती आयरे, ९ वर्षाखालील श्रीधर कामते व सुरभी देसाई. ७ वर्षाखालील: ध्रुवराज पाटील व स्वरा पाटील.

बक्षिस वितरण रोटरी क्‍लब ऑफ सनराईजचे सचिव ऋषिकेश खोत व कॅप्टन बी. एन. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी केएसएचे उपाध्यक्ष सरदार मोमीन, सरचिटणीस माणिक मंडलिक, संभाजी पाटील-मांगोरे, नील पंडित-बावडेकर, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, मानसिंग पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गटशिक्षणाधिकाऱ्यांवर दोषी आढळल्यास कारवाई करू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

वंदूर शाळेचे मुख्याध्यापक विष्णू दादू मोरे यांनी सेवेत असताना आत्महत्या केली. शाळेच्या शौचालयाचे बांधकाम निकृष्ट झाल्याच्या दर्जाबाबत त्यांना मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून आत्महत्येसारखी घटना घडली ही बाब अत्यंत दुर्दैवी, निंदनीय आहे. या घटनेची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाई करू, अशी माहिती कागल पंचायत समितीच्या सभापती राजश्री माने यांनी पत्रकार बैठकीत दिली.

कागल पंचायत समिती कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीस उपसभापती विजय भोसले, सदस्य जयदीप पोवर, संग्राम सावंत, राजेंद्र माने उपस्थित होते. छत्रपती शाहूंचा कागल तालुका आहे. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारच्या स्तरावर खबरदारी घ्यायला हवी, असे मत उपसभापती विजय भोसले यांनी व्यक्त केले.

या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी गणपती कळमकर दोषी आहेत का? या प्रश्नावर पत्रकारांनी छेडले असता माने म्हणाल्या, 'चौकशीअंती कम‌‌ळकर दोषी आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे येत्या १ सप्टेंबरला पंचायत समिती सभा आहे. विभागीयस्तरावर चौकशी होऊन गटशिक्षणाधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर निलंबन करण्याचा ठराव करणार आहे. मोरे कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळेपर्यंत पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी राहतील.'

०००००००

मोरे आत्महत्याप्रकरणी

सिद्धनेर्लीत कडकडीत बंद

म. टा. वृत्तसेवा, कागल

वंदूर शाळेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या आत्महत्येने कुटुंबाची प्रचंड हानी झाली आहे. भरून न येणारे नुकसान आहे. त्यांची मुलं आज शिक्षण घेत आहेत. कुटुंबीयांबरोबरच सिद्धनेर्ली गावची अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी सिद्धनेर्ली ग्रामस्थांनी गावच्या बसस्थानकापासून मोरे यांच्या घरापर्यंत प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढली. यावेळी सिद्धनेर्ली गाव कडकडीत बंद ठेवण्यात आले.

यावेळी झालेल्या निषेध सभेत शाहीर सदाशिव निकम, कॉ. शिवाजी मगदूम, दत्ता पाटील, विलास पोवार, अनिल गुरव, रवि घराळ, धनाजी मगदूम यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी झालेल्या वंदूर शाळेच्या स्वच्छतागृहाचे बांधकाम निकृष्ट झाले आहे. दयानंद कांबळे, अनिल कांबळे, उत्तम कांबळे, अमर कांबळे व्यवस्थान समितीचे सदस्य अमर आवळे या पाचजणांनी मोरे यांना सातत्याने त्रास देत धमकावले. मोरे यांचा या कामाशी संबंध नसताना प्रकरण मिटविण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. न दिल्यास बातमी देऊन बदनामी करू, जातीवाचक गुन्हा दाखल करू अशी तक्रार केली होती. मात्र या तक्रारीत काही तथ्य नसल्याचे सिद्ध झाले होते तरीही मोरे यांना पाचजण त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्त्येस जबाबदार असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करावी, पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करावी व मोरे कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली.

दरम्यान ग्रामस्थांनी शोक सभेनंतर आपला मोर्चा कागल तहसीलदार कार्यालय, पंचायत समितीकडे वळविला. याठिकाणी जाऊन तहसीलदार व गटविकासाधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी कृष्णात मेटिल, राहुल महाडिक, उपसरपंच कबीर कांबळे, केशव चौगले, आदींसह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुद्रभूमीसाठी दहा लाखांचा निधी देऊ

$
0
0

आमदार सतेज पाटील यांची ग्वाही

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

वीरशैव लिंगायत समाज रुद्रभूमी विकासासाठी आमदार निधीतून दहा लाखांचा निधी देण्याबरोबरच जिल्हा नियोजन विकासामधून ५० ते ६० लाखाची निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. वीरशैव लिंगायत समाजातर्फे आयोजित ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

आमदार पाटील, म्हणाले, 'वीरशैव लिंगायत समाजाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी ध्येय, जिद्द, चिकाटी मनात ठेवूनच जीवनामध्ये यशस्वी व्हावे. पालकांनी मुलांच्याकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता मुलांच्या आवडीनुसार त्यांचे क्षेत्र निवडू द्यावे. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या अनुभवाची शिदोरी तरुणांपुढे ठेवावी. जीवनातील चांगले व कटू अनुभव सांगितले तरच युवा पिढी जीवनामध्ये यशस्वी होईल.' महापौर बोंद्रे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

यावेळी वीरशैव बँकेचे अध्यक्ष डॉ. दिलीप चौगुले, उपाध्यक्ष अनिल सोलापुरे, नगरसेविका उमा बनछोडे, सरलाताई पाटील, शैला गाताडे, संचालक नानासाहेब नष्टे, माजी प्राचार्य य. ना. कदम, प्रा. बाळासाहेब वाघुले, सुभाष चौगुले, आशाक माळी, शंकरराव कदम आदी उपस्थित होते. सुनील गाताडे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे यांनी केले. राजू वाली यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अंनिस वार्तापत्र’च्या व्यवस्थापकाला धमकी

$
0
0

सांगली ः अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या सांगली विभागाचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांना सोशल मीडियातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विशाल गोरडे नामक व्यक्तीच्या फेसबुकवरुन 'तुझं खानदानच संपवून जाईल,' अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबतची तक्रार थोरात यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनी पुरोगामी संघटनांनी काल, २० ऑगस्टला राज्यभर 'जबाब दो' आंदोलन केले. सांगलीतील आंदोलनाचे नेतृत्व थोरात यांनी केले होते. मंगळवारी गोरडे नावाच्या फेसबुक अकाउंटवरुन डॉ. दाभोलकर यांची बदनामी करणारी पोस्ट व्हायरल झाली. त्यानंतर त्याच अकाउंटवरुन थोरात यांना 'पाचशे वकील उभे करीन, पण एकटा जाणार नाही. तुझं खानदान संपवूनच जाईन... कर काय करायचे ते कर,' अशी धमकी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी योजनेसाठी आता हमीपत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मीटरचा अभाव, पाणीपट्टी वसुलीची मोठी थकबाकी यामुळे गावपातळीवरील पाणीपुरवठा योजना तोट्यात येतात. कालांतराने बंद पडतात. यावर मात्रा म्हणून आता ज्या गावांमध्ये नव्याने पाणीपुरवठा योजना राबवायची आहे, तेथील नागरिकांनी मीटर जोडणी आणि पाणीपट्टी भरण्याबाबत हमीपत्र द्यावयाचे आहे. ज्या गावाकडून मीटर वापर आणि शंभर टक्के पाणी वसुलीसंदर्भात हमीपत्र मिळणार नाही, तेथेपाणीपुरवठा योजना मंजूर होणार नाही.

जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला. राज्य सरकारने या संदर्भात स्पष्ट सूचना केल्या आहेत. त्यानुसार संबंधित निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे ठरले. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. या आर्थिक वर्षात सुमारे २४८ गावांतून पाणीपुरवठा योजनेचे प्रस्ताव आहेत. या गावांना आता हमीपत्र द्यावे लागणार आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाकडून पाणीपट्टीची रक्कम थकीत ठेवणार नाही याबाबत लेखी हमी द्यावे लागणार आहे.

राज्य सरकारने ९ मार्च २०१८ रोजी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात काढलेल्या अध्यादेशाबाबत समितीमध्ये चर्चा झाली. ज्या पाणीपुरवठा योजना तीन वर्षांपेक्षा अधिक काळ रखडल्या आहेत किंवा त्या सुरू झाल्या नाहीत त्या योजना निधीसह जिल्हा परिषदेकडे वर्ग करून घ्याव्यात असे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात सुमारे ८८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना झाल्या आहेत. दहा ते बारा ठेकेदारांनी स्वत:कडील रक्कम वापरून योजना पूर्ण केली आहे. अद्याप त्या ठेकेदारांना बिले मिळाली नाहीत. जिल्हा परिषदेने योजना ताब्यात घेऊन ठेकेदारांचे बिले द्यावीत अशी मागणी ठेकेदारांनी केली. यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे सांगण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, महिला व बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे यांच्यासह अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

००००

कूपनलिकेवरही नियंत्रण

ग्रामीण भागात सरकारी योजना आणि खासगी पातळीवर कूपनलिका खोदल्या जातात. खासगीर कूपनलिकेवर कुणाचेच नियंत्रण नसते. नजीकच्या काळात त्यावर सरकारी नियंत्रण असणार आहे. संबंधितांना त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. पाणी उपलब्ध होत नाही म्हणून खोलवर कूपनलिका खोदल्या जातात. त्याचा भूजलस्तरावर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाहू शिष्यवृत्ती’ लागू करा

$
0
0

फोटो अर्जुन टाकळकर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवेश फी सवलत आहे. या योजनेपासून शिवाजी विद्यापीठाच्या एकाही महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाही याची काळजी महाविद्यालय प्रशासनाने घ्यावी, अशी स्पष्ट सूचना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली. या सवलतीअंतर्गत दिले जाणारे प्रवेश रोखल्याचे आढळून आल्यास त्या महाविद्यालयाचे अनुदान रोखण्यासाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला.

वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आत असलेल्या कुटुंबातील मराठा विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना राज्य सरकारच्या वतीने लागू केली आहे. मात्र, विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील काही महाविद्यालयांत या योजनेची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याबाबत मागणीचे निवेदन उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांना देण्यासाठी दोनवेळा निदर्शनासह आंदोलन करण्यात आले. याअंतर्गत गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या वतीने कुलगुरू डॉ. शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानुसार महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक घेण्याचे आश्वासन डॉ. शिंदे यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिले होते. मंगळवारी झालेल्या बैठकीत शाहू शिष्यवृत्ती योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात कुलगुरू शिंदे यांनी सूचना दिल्या. बैठकीस कोल्हापूर ,सांगली व सातारा जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, पदाधिकारी व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, 'सरकारने या योजनेबाबत दिलेला आदेश काही संस्था व महाविद्यालय प्रशासनाने धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे. याबाबत सातत्याने डॉ. साळी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ते अनुपस्थित राहतात.' यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. साळी यांना धारेवर धरले.

विद्यापीठांतर्गत येणाऱ्या १३३ महाविद्यालयांत शाहू शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित न केल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसल्याची तक्रार माझ्याकडे अद्याप आलेली नाही असे डॉ. साळी यांनी सांगताच शिवसेनेच्या संजय पवार व विजय देवणे यांनी डॉ. साळी यांना फैलावर घेतले. १३३ संस्थांपैकी बैठकीला केवळ ९० संस्थाचालक उपस्थित होते. या योजनेचे परिपत्रक प्रत्येक कॉलेजपर्यंत पोहोचविणे व या योजनेची माहिती विद्यार्थ्यांना देण्याची जबाबदारी उच्चशिक्षण सहसंचालकांची आहे. काही कॉलेज प्रशासनाकडून प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के फी भरून घेतली जाते व नंतर ५० टक्के फी परत दिली जाईल असे सांगण्यात येते. मात्र, याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल किसन कुराडे यांनी व्यक्त केला. जर सरकारने याबाबत दिरंगाई केल्यास आवाज उठवू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

०००

येत्या १५ दिवसांत सर्व महाविद्यालयांतून माहिती मागवून त्याचा अहवाल तयार केला जाईल. विद्यार्थ्यांकडून १०० टक्के फी वसूल करणाऱ्या कॉलेज प्रशासन किंवा संस्थाचालकांवर कारवाई करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच या संस्थांचे अनुदान रोखण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

डॉ. अजय साळी, उच्चशिक्षण सहसंचालक

००००

या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठ प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील. जर सरकारकडून या योजनेबाबत स्पष्टता दिली नसेल तर त्यासाठी पुढाकार घेतला जाईल. लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

००००

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जोपर्यंत या शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नाही तोपर्यंत हा मुद्दा आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरण्यात येणार आहे. तातडीने कार्यवाही न झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

संजय पवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभर पावसाचीरिपरिप कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोमवारी काही अंशी पावसाने उघडीप घेतल्यानंतर मंगळवारी उघडीप मिळेल या शक्यतेवर पावसाने पाणी फेरले. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. गगनबावडा तालुक्यात ३८.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वारणा नदीतून वाहून गेलेल्या जयश्री संभाजी पाटील (वय ३२, रा. भादोले, ता. हातकणंगले) या विवाहितेचा मृतदेह खोची (ता. हातकणंगले) येथे सापडल्याची माहिती जिल्हा आपत्ती कक्षाने दिली.

शहर व उपनगरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरू असून, धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. राधानगरी धरणाचा तीन व सहाव्या क्रमांकाचा असे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. धरणातून ४४५६ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातून ४७००, तर वारणा धरणातून ४६३८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीपात्रातील पाण्याची पातळी स्थिर आहे. जिल्ह्यातील ४८ बंधारे पाण्याखाली आहेत. कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवर राजाराम बंधाऱ्याजवळील पाण्याची पातळी ३२.९ इंच आहे. दिवसभर तीन इंचाने पाणी उतरले आहे. मंगळवारी सकाळी पाणीपातळी ३३ फूट होती.

गेल्या चोवीस तासांत मंगळवारी सकाळी आठपर्यंत झालेला पाऊस मि.मी.मध्ये असा : गगनबावडा ३८.५०, हातकणंगले ४.२५, शिरोळ २.७१, पन्हाळा ८.४३, शाहूवाडी ३५.३३, राधानगरी २६.९७, करवीर ८.५४, कागल ११.४३, गडहिंग्लज ८.७१, भुदरगड २४.८०, आजरा १४.२५, चंदगड २५.६७.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आमदार समितीचा दौरा

$
0
0

कोल्हापूर

महाराष्ट्र विधान मंडळ अंदाज समिती शुक्रवारी (ता.२४) व शनिवारी (ता.२५) दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहे. आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत २४ आमदार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध विकासकामांसाठी आलेला निधी आणि त्याचा वापर याची तपासणी या समितीकडून होणार आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, अन्न व नागरी पुरवठा, महसूल, वन विभाग, अन्न व औषध प्रशासन, वैद्यकीय विभाग, उद्योग, उर्जा, कामगार, ग्रामीण विकास, सहकार व पणण, पाणी पुरवठा, पर्यावरण स्वच्छता, आदी विभागांना दिलेला निधी, खर्च झालेला निधी, कामांचा दर्जा याची तपासणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानमंडळ अंदाज समिती उद्या कोल्हापूरात

$
0
0

विधानमंडळ अंदाज समिती उद्या कोल्हापूरात

कोल्हापूर

विधान मंडळ अंदाज समिती गुरुवारी (ता.२३) कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये राज्यातील २५ आमदार सहभागी होणार आहेत. ही समिती जिल्हा परिषद, महानगरपालिकेला भेट देऊन विकासकामांसाठी खर्च केलेल्या निधीबाबत माहिती घेणार आहेत. अंदाज समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाची विभागणी केली. तसेच समिती सदस्यांना मदत करण्यासाठी अधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियतीचा आघात अन् मदतीचा हात

$
0
0

लोगो : शुभवार्ता

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का, वीज कोसळणे किंवा वाहन अपघातातून एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास कुटुंबावर जणू आभाळच कोसळते. कर्त्या पुरुषाचा अशा दुर्दैवी निधन झाल्यानंतर कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होते. अशा शेतकऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू केली असून, दोन वर्षांत २२९ शेतकऱ्यांच्या कुटुंबाला अपघात विमा मिळाला आहे. त्यामुळे ही योजना नियतीचा आघात अन् सरकाच्या मदतीचा हात अशीच ठरली आहे.

शेती व्यवसाय करताना अनेक शेतकऱ्यांवर अपघाती मृत्यू ओढवतो. विजेचा धक्का, सर्पदंश, विंचू दंश, विज पडणे, पूर याचबरोबर रस्ते अपघातात अपंगत्व अथवा मृत्यू होतो. घरातील कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाच्या वाट्याला हालपेष्टा येतात. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक कुचंबणा होते. अशा कुटुंबाना आर्थिक मदत देण्यासाठी २००८ पासून राज्य सरकारच्या वतीने शेतकरी अपघात विमा सुरू केली. सात-बारा उताऱ्यावर नोंद आणि ज्यांचे वय दहा ते ७५ वर्षे आहे, अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना एक लाख रुपयांची मदत देण्यात येते. प्रथम ही योजना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविली जात होती.

२०१६ पासून या योजनेला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना असे नामकरण करून योजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारच्या कृषी विभागाला दिले. तसेच एक लाखाऐवजी दोन लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला. योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार प्रति शेतकरी ३४ रुपयांप्रमाणे विमा कंपनीला दरवर्षी रक्कम जमा करत आहे. सरकारने सुरू केलेल्या योजनेचा लाभ जिल्ह्यातील २२९ मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना झाला असून, त्यांना प्रत्येकी दोन लाखांची मदत दिली आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी २०१५-१६ मध्ये १५६ प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी १२१ प्रस्ताव मंजूर झाले आहेत, तर २०१६-१७ वर्षात १३४ पैकी १०८ प्रस्तावांना मंजुरी देऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला. ऑगस्ट २०१८ पर्यंत ३४ प्रस्ताव दाखल केले असून यापैकी सहा प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. प्रस्ताव मंजूर होण्याचे प्रमाण जास्त असले, तरी ज्यांची कागदपत्रे अपुरी किंवा सात-बारा उताऱ्यावर नोंद नसल्याने दोन वर्षांत ४२ प्रस्ताव नामंजूर झाले आहेत.

०००

वाहन परवाना आवश्यक

गेल्या काही वर्षांत यांत्रिक शेतीकडे शेतकऱ्यांच्या कल चांगलाच वाढला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी ट्रॅक्टर, रोटावेटर व अन्य वाहने चालवत आहेत, पण त्यांच्याकडे वाहन परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रस्ताव नामंजूर झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाची कास धरताना स्वत:च्या काळजीसाठी वाहन परवाना घावा असे, आवाहन कृषी विभागाच्यावतीने केले आहे.

०००

थेट वारसांचा समावेश करावा

योजनेचा लाभ केवळ सात-बारा उताऱ्यावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो. प्रत्यक्षात बहुतांश कुटुंबात शेतीचे मालक वयोवृद्ध आई-वडील असतात. पण त्यांची मुले, सुना, नातवंडे शेती कसत असतात. अशा व्यक्तींचा जर अपघाती मृत्यू झाल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या योजनेत थेट वारसांचा समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून केली जात आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेवारस वाहनांच्या मालकांवर कृपादृष्टी

$
0
0

नाममात्र शुल्कात जप्त केलेली वाहने परत मूळ मालकाच्या ताब्यात

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी बेवारस वाहने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केली. जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांना जरब बसावी व वाहतुकीतील अडथळा दूर व्हावा यासाठी प्रशासनाने मोठ्या दंडाची तरतूद केली. पण महासभेत दंडाची रक्कम निम्म्याने कमी करुन वाहनधारकांवर कृष्पादृष्टी दाखवल्याचे निदर्शनास आले आहे. जप्त केलेली वाहने नाममात्र शुल्क भरुन वाहनधारकांना परत देण्यास सुरुवात झाली आहे.

वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी पार्किंग केलेल्या वाहनांमुळे शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. याबाबत नागरिकांतून मोठ्या प्रमाणात महापालिकेकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. पण धूळखात पडलेल्या वाहनांवर शहर वाहतूक अथवा महापालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा वारंवार बोजवारा उडत होता. वारंवारची वाहतूक कोंडी आणि तक्रारीमुळे अशी बेवारस वाहने ताब्यात घेण्यात निर्णय घेतला. अशा वाहनांची महापालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवस पाहणी केली. त्यानंतर अतिक्रमण विभाग व वाहतूक पोलिस यांनी मार्च २०१८ पासून रस्त्यावरील वाहने क्रेनच्या सहायाने जप्त करण्यास सुरुवात केली. पाच महिन्यात महापालिकेने ६९ वाहने जप्त करुन बुद्ध गार्डन येथील केएमटी वर्कशॉपमध्ये ठेवली.

वाहने जप्त केल्यानंतर प्रशासनाने तीनचाकी वाहनांसाठी चार हजार, चारचाकीसाठी पाच हजार तर अवजड वाहनांसाठी दहा हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केला. दंडाचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला. मात्र एक जून रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हाच दंड निम्म्याने कमी करत अनुक्रमे एक हजार, १,५०० व पाच हजार केला. स्थायीने प्रस्ताव महासभेला सादर केला. महासभेने उपसूचनेसह प्रस्तावाला मंजुरी देताना हा दंड पुन्हा ७५०, १,२०० व १,५०० रुपये कमी केला. २० जुलै रोजी झालेल्या महासभेतील निर्णयानंतर मंगळवारपासून (ता. १४) जप्त केलेली २२ वाहने मालकांकडून नाममात्र शुल्क घेऊन ताब्यात देण्यास सुरुवात केली आहे. ताब्यात घेतलेली वाहने पुन्हा रस्त्यावर पार्किंग केली जाणार असल्याने वाहतुकीचा वारंवार बट्ट्याबोळ होणार आहे. त्याचा त्रास मात्र इतर वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांना होणार आहे. जप्त केलेली वाहने नाममात्र शुल्क घेऊन ताब्यात दिल्याने महापालिकेला मात्र आपल्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

..........

चौकट

खर्चापेक्षा दंडाची रक्कम निम्मी

अनेक दिवस पार्किंग केलेली वाहने जप्त करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी सलग दोन दिवस पाहणी करतात. वाहनांचे फोटो काढून वाहन हटवण्याच्या सूचना करतात. सूचनेची अंमलबजावणी न केल्यास वाहन जप्त केले जाते. यासाठी महापालिकेला क्रेनसाठी दिवसाला २,१५० रुपये भाडे द्यावे लागते. दिवसभराच्या कारवाईसाठी महापालिकेला दोन कर्मचाऱ्यांचे वेतन व क्रेन भाडे असा सुमारे ३,५०० रुपये खर्च येतो. त्यामुळे प्रशासनाने खर्चापेक्षा जास्त दंड लागू करण्याचा प्रस्ताव तयार केला. पण खर्चापेक्षा दंडाची रक्कम निम्म्याने कमी करुन अशा वाहनधारकांवर लोकप्रतिनिधींनी कशासाठी कृपादृष्टी दाखवली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

............

माजी पदाधिकाऱ्याचे आकांडतांडव

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील पार्किंग केलेली वाहने ताब्यात घेण्यास सुरुवात केल्यानंतर मंगळवार पेठेतील एका माजी उपमहापौरांचे वाहन जप्त केले. वाहन जप्त केल्यानंतर या माजी लोकप्रतिनिधींनी आपले वाहन स्वत:च्या जागेत असल्याचे सांगत महापालिका कर्मचाऱ्यांशी चांगलीच हुज्जत घातली. पण कर्मचाऱ्यांनी पार्किंग केलेल्या वाहनांचे फोटो दाखवल्यानंतर ते शांत झाले आणि ठरलेले शुल्क जमा करुन वाहन ताब्यात घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लिंगायत संघर्ष समिती आणि जिल्हा लिंगायत समाजाच्यावतीने दसरा चौकात लिंगायत धर्मास अल्पसंख्याक धर्माचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला ग्रामीण भागातून वाढता पाठिंबा मिळत आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्ड्याण्णवर, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन आबिटकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनीही धरणे धरली.

मंगळवारी गडहिंग्लज, खोची, चंदूर, दत्तवाड, पिरळे, निमगाव, पट्टणकोडोली, माणगाव, गारगोटी, आणूर, कडलगे, माद्याळ, हेब्बाळ, दुंडगे, हनिनमाळ, भडगाव येथील कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी आमदार संध्यादेवी कुपेकर व डॉ. नंदा बाभूळकर, स्वाभिमानीचे राजेंद्र गड्ड्याण्णवर, बी.एन. पाटील मुगळीकर यांनी भेट दिली. तसेच अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे राजेभोसले, नूतन संचालक सुशांत शेलार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील डॉ. चंद्रकांत खानारे, केशवराव नगरे, सोमनाथ पाचाभाई यांच्यासह वालचंदनगर येथील संतोष वाळके यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. इंदापूर तालुक्यातील शंभरहून अधिक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images