Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘कोल्हापुरातील अनुभवाची शिदोरी मोलाची’

$
0
0

जिल्हाधिकारीपदासाठी खेमनार यांना कोल्हापूरकरांच्या शुभेच्छा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सभागृहात पदाधिकारी आणि अधिकारी आमने-सामने आले की बऱ्याचदा कामकाजातील त्रुटी, प्रशासकीय कामकाजावरुन टीकेची झोड असे चित्र पाहावयास मिळते. मात्र, सोमवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात अधिकाऱ्यांवर कौतुकवर्षाव आणि भविष्यकालीन वाटचालीला शुभेच्छा संदेश असा कार्यक्रम रंगला. शाब्दिक कोट्या, हास्य विनोदाची जोड अशा वातावरणात माजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांचा निरोप समारंभ रंगला. भविष्यात खेमनार यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पदावर संधी मिळावी अशी सदिच्छा सभागृहाने व्यक्त केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्या हस्ते अंबाबाईची मूर्ती देऊन खेमनार यांचा सत्कार झाला.

खेमनार यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रेमाने भारावून गेलेल्या खेमनार यांनी 'कोल्हापुरात खूप काही शिकायला मिळालं, येथील अनुभवाची शिदोरी आयुष्यभर पुरणारी आहे. कोल्हापूरच्या नागरिकांनी भरभरुन प्रेम दिले. सगळयांची साथ मिळाल्यामुळे सकारात्मक काम करु शकलो. सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचवू शकलो या साऱ्याचे श्रेय कोल्हापूरलाच आहे. भविष्यात रेशन कार्ड काढून कोल्हापुरात स्थायिक व्हायला आवडेल' अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

उपसभापती पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे, गटनेते अरुण इंगवले, सदस्य राजवर्धन निंबाळकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, वित्त व लेखाअधिकारी संजय राजमाने, 'करवीर'चे माजी सभापती प्रदीप झांबरे यांनी डॉ. खेमनार यांच्या कामकाज पद्धतीविषयी गौरवोद्गार काढले. डिजिटल शाळा, झिरो पेंडन्सी, दिव्यांग उन्नती अभियान, प्लास्टिकबंदीचा निर्णय, क्रिडा स्पर्धा अशा विविध योजना आणि उपक्रमांची यशस्विता ही खेमणार यांच्या कुशल नेतृत्व व सकारात्मक काम करण्याच्या वृत्तीमुळे शक्य झाल्याचे सगळयांनी प्राजंळपणे सांगितले.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी स्वागत केले. प्रा. संजय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्य लेखावित्त अधिकारी राहूल कदम यांनी आभार मानले. बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, महिला व बालकल्याण समिती सभापती वंदना मगदूम, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

समाजासाठी कार्यरत राहणार

कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी स्वेच्छानिवृत्ती निर्णय मागे घ्यावा अशी विनंती काहींनी केली. याप्रसंगी देशमुख यांनी डॉ. खेमनार यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. 'स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. भविष्यात शेतकरी आणि समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहीन' अशी ग्वाही खेमनार यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दूध दोन रुपयांनी महाग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा दूध उत्पादक संघा (गोकुळ)ने गाय आणि म्हशीच्या दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर विक्री दरातही दोन रुपयांनी वाढ केल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. आज, बुधवारपासूनच विक्री दराची अंमलबजावणी होणार असून नागरिकांना ५२ रुपये प्रतिलिटर दूध खरेदी करावे लागणार आहे.

गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वानंतर दूध संकलन बंद आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने गायीच्या दुधाचा २५ रुपये लिटर निश्चित केला. त्याची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. दूध दराच्या निश्चितीसाठी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची मंगळवारी बैठक झाली. बैठकीत गाय व म्हशीच्या दूध खरेदी व विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला.

गाय दूध दर खरेदी दर प्रतिलिटर खरेदी दर २३ रुपयांवरुन २५ रुपयांवर नेण्यात आला तर म्हैस दूध दर ३६ रुपये ३० पैशावरुन ३८ रुपये ३० पैसे करण्यात आला. खरेदीदरात वाढ केल्याने विक्रीदरात दोन रुपये वाढ धरण्यात आली आहे. शहर व जिल्ह्यात म्हैस दूध विक्री दर ५० रुपयांवर ५२ रुपये प्रतिलिटर होणार आहे. तर गायीचा दूध दर लिटर ३८ रुपयांवर ४० रुपये विक्री दर होणार आहे. मुंबईत गाय दूध विक्री दर ४३ रुपयांवर ४५ रुपयार्यंत ती म्हशीच्या दूध दराची विक्री ५६ रुपये प्रतिलिटर होणार आहे.

०००००

गायीचा खरेदी दर (लिटरमध्ये)

सध्याचा वाढीव

२३ रुपये २५ रुपये

विक्री दर मुंबई

४३ रुपये ४५ रुपये

म्हैस दूध खरेदी दर

३६ रुपये ३० पैसे ३८ रुपये ३० पैसे

विक्री दर कोल्हापूर

५० रुपये ५२ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गैरहजर राहणारे महापालिकेचे सहा कर्मचारी निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सतत गैरहजर राहिलेल्या महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत थेट सेवतून निलंबित करण्यात आले. खातेनिहाय चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.

निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्य विभागाच्या चंद्रकांत दत्तात्रय डकरे (मुकादम),चांदणी शंकर लाखे, चंद्रगुप्त अनिल घावरे, उदय जयवंत कांबळे, संजय शामराव पाटील, संतोष बाळासो इंगवले या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेने नोटिसी देवून समज दिली होती. त्यानंतरही सतत गैरहजर राहिल्याने त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान कर्मचाऱ्यांना नोटीस देवून खुलासा करण्याचे आदेश दिले. पण कर्मचाऱ्यांनी खुलासा सादर न केल्याने चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना दोषी ठरवले. त्याबाबतचा अहवाल प्रशासनाला सादर केल्यानंतर दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळे, बाजारभोगावमध्ये रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

कळे (ता. पन्हाळा) येथे सकल मराठा समाजाकडून आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करून चक्का जाम करण्यात आला. आंदोलनामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्ता एक तास बंद राहिला. तसेच बाजारभोगाव-कळे, पुनाळ-कळे हा मार्गही आंदोलकांनी बंद केल्यामुळे सर्वत्र चक्का जाम झाला होता. बंदला सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन पाठिंबा दिल्याने सर्वत्र शांतता होती. कळे येथे धर्मराज मंदिरपासून सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, नितीन पाटील, वसंत पाटील, रवी पाटील आदी उपस्थित होते. सकल मराठा मोर्चाचे नियोजन सुदर्शन पाटील, संग्राम पाटील, शुभांगी साळवी, राहुल बाडे, बाजीराव नाईक यांनी केले. संभाजी पाटील यांनी सूत्रसंचलन केले. मनोज पाटील यांनी आभार मानले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथे पुकारलेल्या सर्वपक्षीय बंदला उत्स्फूर्त मिळाला. या बंदला जांभळी व कासारी खोऱ्यातील सर्व लोकांनी प्रतिसाद दिला. येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठेमधील व्यवहार बंद करून पाठिंबा दिला. सकाळी दहाच्या सुमाराला बाजारभोगाव येथे बाजारपेठेमधील मुख्य चौकात परिसरातील सर्वपक्षीय समाजातील नेते व कार्यकर्ते जमा झाले. बाजारभोगावचे सरपंच नितीन पाटील म्हणाले, 'मराठा समाजाने आरक्षणाबाबत राज्यभर ५८ मूक मोर्चे काढून जागृती केली. तरीपण सरकारला जाग आली नाही. आता तीव्र आंदोलने सुरू आहेत. सरकारने तातडीने घटना दुरूस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.' काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर यांनी आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाची गळपेची होत असून गुणवत्ता असुनही मुलांची पिछेहाट होत आहे असे सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शाखाध्यक्ष बळीराम पाटील, पन्हाळा गुरव समाज तालुकाध्यक्ष दामोदर यांनीही मनोगत व्यक्त केले. बाजारपेठेमधून निषेध मोर्चा काढण्यात आला. बाजारभोगावचे उपसरपंच रोहन गुरव, काँग्रेस सनियंत्रण समिती पन्हाळा तालुकाध्यक्ष सुनील पाटील (पुनाळ), किसरूळचे उपसरपंच अरूण तळेकर, शिवसेनेचे युवराज पाटील, काटेभोगावचे माजी सरपंच विश्वास आंग्रे, नितीन हिर्डेकर, मातंग समाजाचे कार्यकर्ते बाळासाहेब खवळे, मुस्लिम समाजातील गुलाब गडकरी, प्रभाकर कामेरकर, संदीप पाटील, अमर धनवडे, महादेव शिंदे,अभिजित गांधी, चेतन मोहिते, प्रभाकर पाटील, मारूती पाटील (माळपुडे), आनंदा यादव, दीपक मुगडे, रावसाहेब पाटील उपस्थित होते.

मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी बाजारभोगाव येथे सर्वपक्षीय बंदला पुकारण्यात आला.

कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर मराठा समाजाने रास्ता रोको केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढीविरोधात २७ हजार हरकती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरण कंपनीच्या प्रस्तावित वीज दरवाढीवरुन कोल्हापूर जिल्ह्यातून प्रचंड विरोध उमटला आहे. वीज दरवाढीला रस्त्यावर उतरुन विरोध नोंदविताना नागरिक, शेतकऱ्यांनी आणि विविध संस्थांनी महावितरण व राज्य विद्युत नियामक आयोगावर हरकतींचा पाऊस पडला आहे. मंगळवारअखेर जिल्ह्यातून हजारो हरकती नोंदविल्या आहेत. इरिगेशन फेडरेशनच्या म्हणण्यानुसार १७ हजार हरकती दाखल झाल्या आहेत. तर आमदार सतेज पाटील यांनीही नागरिकांना हरकती दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत ११ हजार हरकती नोंदविल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

पुणे विभागातील हरकतीवर नऊ ऑगस्टला पुण्यात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने प्रस्तावित वीज दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन सुरू केले आहे. फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दरवाढीच्या परिपत्रकाची नुकतीच होळी करण्यात आली. महावितरणची प्रस्तावित वीज दरवाढ ही अन्यायी असल्याचे फेडरेशनचे म्हणणे आहे. 'वास्तविक महावितरणला दरवर्षी वीज दरवाढ करता येत नाही. नियामक आयोगाने २०१६ मध्ये चार वर्षासाठी वीजदर निश्चित केले होते. मात्र आयोगाच्या नियमावलीला फाटा देत महावितरणने सलग तिसऱ्या वर्षी दरवाढीचा प्रस्ताव आणला आहे. त्याला विरोध करण्यासाठी ई मेल आणि पोस्टाव्दारे या हरकती दाखल केल्या आहेत. 'अशी माहिती कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.

१७ लाख कृषीपंपधारकांना मीटर नाही

राज्यात सुमारे ४० लाख कृषीपंपधारक आहेत. यापैकी साधारणपणे १८ लाख कृषीपंपधारक पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. कृषीपंपासाठी वीज मीटर लावून आकारणी केली जाते. दुसरीकडे राज्यातील अन्य भागातील विशेषत: विदर्भ, मराठवाडा येथे कृषीपंपासाटी मीटरने आकारणी केली नाही. नियामक आयोगाने महावितरणला २०२२ पर्यंत सगळ्या कृषीपंपांना मीटर लावून वीज आकारणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महावितरणचे कामकाज अतिशय संथ सुरू आहे. त्याचा फटका इतर ग्राहकांना सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत.

............................

वीज दरवाढीमुळे राज्यातील अडीच कोटी वीज ग्राहकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातल औद्योगिक वीजदर २५ ते ३५ टक्के जास्त आहे. प्रस्तावित दरवाढीमुळे ते दीडपटीपेक्षा अधिक होईल. त्यामुळे उद्योगांना राष्ट्रीय आणि जागतिक स्पर्धेत टिकाव धरता येणार नाही. कृषी पंपांच्या वीजदरातही ३५ ते ४० टक्के वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. या विरोधात नागरिकांनी मोठ्या संख्येने हरकती नोंदविल्या आहेत.

- आमदार सतेज पाटील

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रास्ता रोकोसह महाआरती

$
0
0

गंगावेशेत मानवी साखळी द्वारे आरक्षणाचा जागर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अंबाबाईचा गोंधळ घालून साकडे घालण्यात आले. संयुक्त शुक्रवार पेठेने गंगावेशेत मानवी साखळी करुन आरक्षणाचा निर्धार केला तर संयुक्त रविवार पेठेने ओढ्यावरील सिद्धिविनायक मंदिरात महाआरती केली. दरम्यान, आंबेडकरी चळवळीतील संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, कोल्हापूर प्रेस क्लब आणि करवीर पत्रकार संघ तसेच ग्रामीण भागातील संघटनांनी ठिय्या आंदोलनाला भेट देवून पाठिंबा दिला.

मराठा क्रांती संघटनेच्यावतीने महाद्वार चौकात आरक्षणाच्या मागणीसाठी अंबाबाईचा गोंधळ घालून जागर घालण्यात आला. तसेच महापौर शोभा बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी अंबाबाई ओटी भरुन राज्य सरकारला सुबुद्धी देण्यासाठी साकडे घातले. दसरा चौकातील सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संयुक्त शुक्रवार पेठेतील नागरिकांनी मस्कुती तलाव येथील दत्त मंदिरापासून रॅली काढली. आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत रॅली गंगावेश चौकात आली. यावेळी कार्यकर्तांनी मानवी साखळी करुन आरक्षण मागणीसाठी लढा देण्याचा निर्धार केला. अर्धा तासाहून अधिक काळ रास्ता रोको आंदोलन केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली. त्यानंतर पापाची तिकटी, माळकर तिकटी, सीपीआर चौकातून रॅली दसरा चौकात आल्यावर ठिय्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आला. रॅलीत नगरसेविका माधवी गवंडी, माजी नगरसेवक उदय जगताप, प्रकाश गवंडी, सतीश पाटील धरपणकर, किशोर घाटगे, श्रीधर गाडगीळ, अरुण पाटील यांच्यासह कागदी गल्ली, धनवडे गल्ली, मस्कुती तलाव, पंचगंगा तालीम परिसरातील नागरिक व महिला सहभागी झाल्या होत्या.

दिवसभर विविध संघटना व संस्थांनी आंदोलनाला पाठींबा दिला. सीपीआर हॉस्पिटल आणि राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय हॉस्पिटलमधील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच करवीर तालुक्यातील आंबेवाडी, वाकरे पन्हाळा तालुक्यातील यवलूज ग्रामस्थ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

०००००

आंदोलनात सहभागी झालेल्या संस्था

ज्योतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्था वाकरे, प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समिती, महाराष्ट्र पोलिस बॉईज संस्था, शिवसेना अपंग सहाय्य संस्था, साखर कामगार युनियन, सकल मराठा समाज किणी, कोल्हापूर क्षात्र पुरोहित मंडल, वाकरे विकास सेवा संस्था, छत्रपती शिवाजी तरुण मंडळ टेंबलाईवाडी उचगाव, दत्त सहकारी संस्था वाकरे, अजितभाई युवा मंच शिवाजी पेठ, जन आंदोलन, शिक्षण प्रसारक मंडळ, गोखले कॉलेज, सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर, जिल्हा इरिगेशन फेडरेशन.

०००००

आंबेडकरी चळवळीचा पाठिंबा

ठिय्या आंदोलनाला आंबेडकरी चळवळीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. त्यामध्ये प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, दगडू भास्कर, प्रा. विश्वास देशमुख, सुभाष देसाई, बाळासाहेब भोसले, भाऊसाहेब काळे, सोमनाथ घोडेगाव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

................

संयुक्त रविवार पेठेची महाआरती

अंगारकी संकष्टीचे औचित्य साधताना आरक्षणाच्या मागणीसाठी संयुक्त रविवार पेठेच्यावतीने सिद्धिविनायक मंदिर परिसरातील रस्त्यावर गणेश मूर्तीची आरती करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक अजित मोरे, राजू यादव, बाळासाहेब मुधोळकर, पूजा भोर, संजय कदम, अजित गायकवाड, गजानन तोडकर, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे, अशोक भोसले, इंद्रजित नलवडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात क्राइम

$
0
0

ऑफिस फोडून चोरी

कोल्हापूर

मिरजकर तिकटी येथील सिद्धीविनायक भवन येथील ऑफिस फोडून ८४ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला. त्याबाबतची फिर्याद अर्जुन नलवडे (रा. द्रविड बोळ, बी वॉर्ड, महाद्वार रोड) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. नलवडे यांचे सिद्धीविनायक भवन येथे ऑफिस आहे. सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तिजोरी फोडून सोन्याची एका चेनसह सुमारे ३४ हजार रुपयांची रक्कम लंपास केली.

................

चोरीचा प्रयत्न फसला

कोल्हापूर

सायरन वाजल्याने गणेशवाडी (ता. करवीर) येथील देना बँक शाखेतील चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्याने सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास शटर उचलून बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र सायरन वाजल्याने पळ काढला. त्याबाबतची फिर्यांद सुरेश देसाई यांनी करवीर पोलिसांत दिली.

..............

मोटारसायकल चोरली

कोल्हापूर

शिवाजी पुतळा ते पापाची तिकटी रोडदरम्यान चोरट्याने हिरो होंडा मोटारसायकल (क्रमांक एम एच ०७, ई८०६) लंपास केली. मोटारसायकलच्या डिकीत १५ हजार रुपये होते. याबाबची फिर्याद रोहन निंबाळकर (वय २६, रा. फणसवाडी, ता. भुदरगड) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटरसायकल चोरट्याकडून सहा दुचाकी जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बनावट किल्लीच्या सहाय्याने दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोरटा विक्रम विष्णू तेजम (वय ३२, रा. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या मागे, कपूर वसाहत, कदमवाडी) याला जुना राजवाडा पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे १ लाख ६० हजार रुपयांच्या सहा दुचाकी जप्त केल्या.

शहर आणि उपनगरात पार्क केलेल्या मोटारसायकल चोरण्यात या चोरट्याचा हातखंडा होता. बनावट किल्लीच्या सहाय्याने अवघ्या दोन मिनिटांत मोटारसायकलची चोरी करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी महेश शंकर वड्ड (रा. नेर्ली ता. करवीर) हे महाद्वार रोडवर कामानिमित्त आले होते. ते आपली दुचाकी पार्किंग करुन खरेदीसाठी गेले. खरेदी करुन आल्यानंतर दुचाकी नसल्याचे निदर्शनास आले. याबाबतची फिर्यांद त्यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. याप्रकरणी पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. तेजम हा चोरीची मोटारसायकल घेऊन ध्यानचंद हॉकी स्टेडियम ते गोखले कॉलेज या रोडवर आल्याची माहिती कळाली. पोलिसांनी सापळा रचला. दुपारी चोरटा या रोडवर आल्यानंतर त्याला वाहनासह ताब्यात घेतले. त्याने तपासात महाद्वार रोडवरुन वाहन चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून तपासणी केला असता शहर आणि उपनगर परिसरातून सहा दुचाकी गाड्या चोरल्याची स्पष्ट कबुली दिली. सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस नाईक एकनाथ चौगले, परशुराम गुजरे, प्रीतम मिठारी, सचिन देसाई, हणमंत कुंभार, रूपेश कुंभार आदींनी कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डॉ. पाटील यांची निवड

$
0
0

संशोधन मंडळ सदस्यपदी

डॉ. अरुण पाटील यांची निवड

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन मंडळाच्या सदस्यपदी डॉ. अरूण शिंदे यांची निवड झाली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी ही निवड केली. डॉ. पाटील हे आष्टा येथील आर्ट्स, कॉमर्स कॉलेजमध्ये भूगोल विषयाचे विभागप्रमुख आहेत. ते शिवाजी विद्यापीठ भूगोल संघाचे अध्यक्ष आणि राज्य भूगोलशास्त्र परिषदेचे कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. विद्यापीठात भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सात वर्षे काम केले आहे. सध्या ते भूगोल आणि भूगर्भशास्त्र मंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. निवडीनंतर त्यांचे कासेगाव शिक्षणसंस्थेचे सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर, प्राचार्य डॉ. विलास काळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवदास आज पदभार स्वीकारणार

$
0
0

शिवदास आज पदभार स्वीकारणार

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास हे बुधवारी पदभार स्वीकारणार आहेत. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव सादर केला होता. राज्य सरकारने त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून या संदर्भात जिल्हा परिषदेला कळविले आहे. या रिक्त जागेवर शिवदास यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक कामांविरोधात शिक्षक आक्रमक

$
0
0

निवडणूक कामांविरोधात शिक्षक आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षकांना निवडणुकांचे अतिरिक्त काम लावू नये, असा आदेश मुंबई हायकोर्टाने देऊनही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या कामासाठी हजर राहण्याच्या नोटिसा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून आल्या आहेत. याविरोधात शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (ता. ४) मोर्चा काढण्यात येणार आहे.

शिक्षकांवर निवडणुकांच्या कामांचा ताण पडत असल्याने याविरोधात शिक्षकांनी अनेकदा आंदोलने केली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकांचे काम लावू नये, असा अंतरिम आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहे. मात्र, या आदेशाकडे दुर्लक्ष करून उपविभागीय अधिकाऱ्यांकडून फौजदारी कारवाईची भीती दाखवून बीएलओ कामांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याविरोधात कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ आणि टीडीएफ या संघटना एकवटल्या आहेत. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.

गेल्या १८ वर्षांपासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे, तर सहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने शाळेत पुरेसे कर्मचारी नाहीत. अशा स्थितीत शिक्षकांना सक्तीने निवडणुकांचे काम करावे लागत असेल तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? असा सवाल शिक्षक संघटनांनी उपस्थित केला. शालेय कामकाज सांभाळून निवडणुकांचे काम करणे शक्य नाही. उपविभागीय अधिकाऱ्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामांची सक्ती करू नये, अशी भूमिका शिक्षक संघटनांनी निवेदनातून मांडली आहे. याबाबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. शनिवारी साडेअकराच्या सुमारास शिक्षकांनी महावीर उद्यानात उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना अध्यक्ष राजेश वरक, मुख्याध्यापक संघाचे सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, एस. डी. लाड, वसंतराव देशमुख, उदय पाटील, जयंत आसगावकर, सी. एम. गायकवाड, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी ग्राहकांचे दर पुरवठा आकारापेक्षा कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील कृषी ग्राहकांचे वीजदर हे सरासरी पुरवठा आकाराच्या ५० टक्क्यापेक्षाही कमी आहे.यामुळे क्रॉस सबसिडी सर्वात जास्त आहे. राष्ट्रीय वीजदर धोरण २०१६ मधील क्रॉस सबसिडी कमी करण्याच्या मुख्य तरतुदीनुसार कृषी वर्गवारीच्या दरात वाढ प्रस्तावित केली आहे. यामुळे महावितरणचा वीज दरवाढीचा प्रस्ताव योग्य असल्याचे पत्रक कंपनीने प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकांत पुढे म्हटले आहे, 'महावितरण मीटर व बिलिंगसह विविध क्षेत्रात कठोर परिश्रम करुन वितरण हानी कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरुन वीजखर्च कमी होऊन महसुलात वाढ होईल. वितरण क्षेत्रात महावितरणच्या ग्राहकांना त्याचा फायदा होईल. आयोगाने बहुवार्षिक वीजदर आदेशात सूचना केल्याप्रमाणे महवितरण वितरण हानी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. २००६-०७ या वर्षातील सुरुवातीची ३०.०२ वितरण हानी कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १३.९२ टक्क्यांवर आणली आहे. सध्या महावितरणचा स्थिर खर्च हा एकूण खर्चाच्या ५५ टक्के आहे. आयोगाने मंजूर करुन दिलेल्या स्थिर आकारातून येणारा महसूल हा एकूण महसुलाच्या फक्त पंधरा टक्के आहे. त्यामुळे 'महावितरण'ने स्थिर आकारात वाढ प्रस्तावित केली आहे. वार्षिक महसुलीची गरज व अपेक्षित महसूल यातील तफावत भरून काढण्यासाठ विविध वर्गवारीची वीजदर वाढ आयोगामार्फत ठरविली जाते. त्यातील तफावतीला महसुली तूट असे संबोधले जाते. परंती महसुली तूट म्हणजे महावितरण कंपनीचा तोटा नाही. महावितरणची लेखापध्दती ही अॅक्युरल पध्दतीवर आधारित आहे. महावितरणची बिलिंग केलेली संपूर्ण रक्कम प्रत्यक्षात वसुली झाली नसली तरीही महसूल म्हणून विचारात घेतली जाते. लेखातत्वानुसार बिलिंग केलेली संपूर्ण रक्कम महसुलामध्ये विचारात घेतल्याने थकबाकीची महसुली तुटीवर किंवा वीजदर वाढीवर कुठलाही परिणाम होत नाही' असे पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन सराईत चोरट्या महिलांना अटक

$
0
0

बारा तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कपड्याच्या दुकानातून चोरीला गेलेल्या ७३ हजार रुपयांच्या चोरीचा राजारामपुरी पोलिसांनी बारा तासांत छडा लावला. या प्रकरणी रेकॉर्डवरील दोन सराईत महिला चोरट्यांना अटक केली. लता बापू पाटोळे (वय ४०) व राजश्री दत्ता नाईक (वय २८, दोघीही रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत. राजारामपुरी दुसरी गल्ली येथील नागेशकर हाईटस् मध्ये राहणाऱ्या वसुधा कुलकर्णी यांचे राजारामपुरी तिसरी गल्ली येथे विमल विहार अपार्टमेंटसमोर वेदीराज लेडीज शॉपीचे रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. रविवारी रात्री या बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ७३ हजार ७०२ रुपयांचा माल लंपास केला होता. राजारामपुरी पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला होता. पोलिस कॉन्स्टेबल गौरव चौगले यांना ही चोरी राजेंद्रनगरातील दोन महिलांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी सापळा रचला. या दोघींच्या घराची झडती घेतली असता कपड्याच्या दुकानातून चोरीला गेलेला सर्व माल या ठिकाणी आढळला. ही कारवाई पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस. बी. हुडुरके, पोलिस हवालदार अशोक पाटील, संजय जाधव, निवास पाटील, अमोल अवघडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरुंदवाडमध्ये एलईडी पथदिवे बसवणार

$
0
0

कुरुंदवाडमध्ये एलईडी पथदिवे बसविणार

नगरपालिकेच्या सभेत विविध विकासकामांना मंजुरी

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कुरुंदवाड शहरात वीज बचतीसाठी एलईडी पथदिवे बसविण्याचा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. नगरपालिकेच्या आरक्षित जागेवरील आरक्षण उठवून त्याठिकाणी झोपडपट्टी घोषित करणे, तसेच सरकारकडे परत गेलेला निधी परत मिळविण्यासाठी फेरप्रस्ताव पाठविण्यास सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते.

स्थायी समितीतील विषय पालिका सभागृहात घेण्यात यावेत, जेणेकरून नवीन सदस्यांना याची माहिती मिळेल. तसेच प्रत्येक महिन्याला पालिकेची सभा व्हावी, अशी मागणी रामचंद्र डांगे यांनी केली. नगरपालिकेच्या गट नं. ४७८ तबक उद्यान परिसर, शिकलगार वसाहत, कोरवी वसाहत आदी ठिकाणच्या जागेवर आरक्षण उठवून झोपडपट्टी घोषित करावी, नगरपालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी हद्दवाढ प्रस्ताव पाठविण्यात यावा, नवीन सुधारित नळपाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारास सभागृहापुढे बोलावावे आदी विषयावर सभेत चर्चा झाली. एचडीपीई टेलपीसचा अतिरिक्त खर्चाची बाब म्हणून मंजूरी देण्यात आली. तिर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत विकासकामांना मुदतवाढ घेण्याबरोबरच या योजनांवर खर्च न झालेला निधी सरकारकडे परत गेलेला आहे. सदरचा निधी पुन्हा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

दुर्गामाता मंदिर ते शिरढोण रस्ता यापैकी उर्वरीत २० टक्के रस्त्याच्या हद्दीबाबत वाद आहे. भूमी अभिलेखकडून मोजणी करून पुढील काम ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत करून घ्यावे, जिल्हा नियोजन समितीकडे दलितेत्तर योजना, नगरोत्थान योजना, अग्निशमन योजना, लोकशाही आण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेतंर्गत २०१९-२०२० करिता निधी मागणीचा प्रस्ताव चर्चा करून पाठविण्याचा ठराव सभेत करण्यात आला. उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, रामचंद्र डांगे, बांधकाम सभापती सुनील चव्हाण, उदय डांगे, दीपक गायकवाड, अभिजित पाटील, जवाहर पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला. सुजाता मालवेकर, पाणी पुरवठा सभापती फारूख जमादार, नर्गिस बारगीर, मुमताज बागवान, गीता बालगकोटे, जरीना गोलंदाज, सुशिला भबिरे, सुजाता डांगे, स्नेहल कांबळे, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, जलअभियंता अमन मोमीन, महादेव आंबी, नामदेव धातुंडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत वाहन पासिंगसाठी जागा देणार

$
0
0

वाहन पासिंग ट्रॅकबाबत

परिवहन मंत्र्यांशी चर्चा

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'हातकणंगले व शिरोळ तालुक्यासाठी वाहन पासिंग ट्रॅक सुरू करण्याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यासाठी तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या जागेचा प्रस्ताव दिला जाणार आहे. त्यावर आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आवश्यक ती मदत करावी अशा सूचना रावते यांनी संबंधितांना दिल्या आहेत', अशी माहिती माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली.

हातकणंगले व शिरोळ तालुक्यात वाहनांची संख्या मोठी आहे. वाहनांच्या पासिंगसाठी कोल्हापुरातील मोरेवाडी येथे जावे लागते. पासिंगवेळी वाहनात काही दोष आढळल्यास संपूर्ण दिवस वाया जातो. त्यामुळे रिक्षा व टेम्पो मालकांचे जवळपास दोन ते तीन दिवस वाया जात असल्याने त्यांना ते परवडणारे नाही. त्यामुळे हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील वाहनधारकांसाठी केएटीपी येथे वाहन पासिंग ट्रॅक करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन गत आठवड्यात रिक्षा चालक-मालक, मालवाहतूक टेम्पो कृती समितीच्यावतीने प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना देण्यात आले आहे. या संदर्भात माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री रावते यांची मुंबई येथे मंगळवारी भेट घेतली.

यावेळी, प्रादेशिक परिवहन विभागाने इचलकरंजी शहरतील पंचवटी चित्रमंदिर परिसरात असलेल्या जागेत आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणेने सज्ज अशा कॉम्पॅक्ट रुममध्ये वाहन पासिंगचे काम करणेचे निश्चित केले आहे. परंतु ही जागा उपलब्ध होऊन संपूर्ण यंत्रणा अस्तित्वात येऊन हे केंद्र सुरु होण्यासाठी किमान सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या हजारो छोट्या वाहनधारकांना पासिंगसाठी कोल्हापूर येथील मोरेवाडी येथे जावे लागेल. हे टाळण्यासाठी आम्ही तात्पुरती सोय म्हणून आपल्याकडे जागा उपलब्ध करुन देण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे केएटीपी येथे २०२ एकरमध्ये असलेल्या इंडस्ट्रीयल इस्टेटमधील जागा देणेस संस्था तयार असून त्याठिकाणी वाहन पासिंग ट्रॅकसाठी असलेल्या नियमांचे पालन होऊ शकेल. याठिकाणी २५० मीटरचा ट्रॅक सरळ रेषेत विनाअडथळा होऊ शकतो. त्याचप्रमाणे या जागेवर सीसीटिव्हीची उपलब्धता करून देणेची तयारी केएटीपी संस्थेने दाखविली असल्याचे सांगितले.

त्यावर परिवहन मंत्री रावते यांनी यासंदर्भात प्रादेशिक परिवहन विभागाचे आयुक्तांशी चर्चा करुन जागा संदर्भातील प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले. शिष्टमंडळात नंदा साळुंखे, प्रकाश लोखंडे, अशोक कोलप, दशरथ मोहिते, रामचंद्र जाधव, आण्णा पांडव, अल्ताफ शेख, सुधाकर गलांडे, साताप्पा आदमापुरे, मल्लिकार्जुन बिल्लुर, दिलीप कांबळे, सचिन मस्के, अनिल बमण्णावर आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डंपरच्या धडकेत एक ठार

$
0
0

डंपरच्या धडकेत

मोटरसायकलस्वार ठार

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

भरधाव डंपरने समोरुन धडक दिल्याने झालेल्या अपघातात रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील मोटारसायकलस्वार तरुण जागीच ठार झाला. आदिक सखाराम पाटील (वय ४१) असे त्याचे नाव आहे. हा अपघात सकाळी इचलकरंजी-हुपरी रोडवरील माणकापूर गावानजीक एस कॉर्नरवर येथे घडला. अपघातानंतर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांनी सांगितले की, आदिक पाटील हा अंगारकी संकष्टी निमित्त इचलकरंजीतील पंचगंगा नदीघाटावरील वरद विनायक मंदिरात दर्शनासाठी बुलेटवरून (एमएच ०९ सीसी ३६३६) आला होता. दर्शन घेवून रेंदाळकडे परतताना एस कॉर्नर परिसरात मोटरसायकला डंपरने (एमएच ०९ इ ६७७७) जोराची धडक दिली. रस्त्यावर आपटल्याने आदीक जागीच ठार झाला. घटनास्थळी रक्ताचे थारोळे होते. अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केले. अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करुन, मृतदेह शवविच्छेनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत यंत्रमागधारकांना दमदाटी

$
0
0

महावितरणकडून बिलासाठी

यंत्रमागधारकांना दमदाटी

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून चुकीच्या पध्दतीने व दमदाटीकरुन यंत्रमागधारकांकडून वीजबिलाची वसुली करण्याचे प्रकार घडत आहेत. याप्रकरणी यंत्रमागधारक जागृती संघटनेच्यावतीने कार्यकारी अभियंता कोळी यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून यंत्रमागधारकांना बेकायदेशीरपणे कायद्याचा धाक दाखवून दमदाटी करुन जबरदस्तीने वीज बिलाची वसूली केली जात आहे. वीज बिल भरण्याच्या शेवट तारखेच्या दुसऱ्याच दिवशी कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली जात आहे. याप्रश्नी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांच्या नेतृत्त्वाखाली पदाधिकार्यांनी महावितरण चे कार्यकारी अभियंता कोळी यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांचा भड़ीमार केला. यंत्रमागधारकांना जो नाहक त्रास दिला जात आहे तो निदर्शनास आणून दिला. अशा प्रकारची बेकायदेशीर कारवाई पुन्हा झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. या प्रश्नी कार्यकारी अभियंता कोळी यांनी, समस्या ऐकून यापुढे अशी समस्या उद्भवणार नाही अशी ग्वाही दिली. शिष्टमंडळात सूरज दुबे, भानुदास वीर, प्रविण कदम, दीपक भांबरे, सचिन कांबळे, महेश दुधाणे, उमेश लाड, संदीप आवटे, प्रशांत आळंदे, सचिन मांगलेकर, अनिकेत लोले, शितल डोंगरे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणसंस्थेला नोटीस

$
0
0

अतिक्रमण हटविण्याबाबत

शैक्षणिक संस्थेला नोटीस

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

सरकारी जागेत अतिक्रमण करून केलेले बांधकाम त्वरीत काढून घ्यावे अशी नोटीस जयसिंगपूर नगरपालिकेने येथील शिक्षण संस्थेला बजावली आहे. मंगळवारी सायंकाळी मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. यानंतर एक महिन्याच्या आत बांधकाम काढून घेण्याबाबत संस्थेस नोटीस दिली. शहरातील सरकारी जागेत संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ धरणगुत्ती या संस्थेकडून अतिक्रमण करून शौचालय, बाथरूमचे बांधकाम सुरू असल्याबाबतची तक्रार बहुजन रयत संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सकटे यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. या बांधकामामुळे नगरपालिका नोकर सोसायटीतील नागरिकांसह चर्चमध्ये येणार्‍या भाविकांना त्रास होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने बांधकाम पाडावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सकटे यांनी दिला होता. यानंतर पालिकेच्या पथकाने पाहणी करून नोटीस बजावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्तांचा ७ ऑगस्टला संसदेवर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील खासगी, निमसरकारी, सहकार क्षेत्रातील सेवानिवृत्तांच्या पेन्शनवाढीसाठी केंद्र सरकार विरोधात ७ ऑगस्टला दिल्लीतील संसदेवर ई. पी. एस. १९९५ पेन्शनरांच्या राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे देशव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. संसद भवनावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने पेन्शनरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे महाराष्ट्र समन्वयक दिलीप पाटील, राष्ट्रीय सदस्य शिवाजी देसावळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, 'दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रिटवरून मोर्चा सुरू होईल. भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी तीन महिन्यात पेन्शनवाढ करतो असे आश्वासन दिले होते. सत्तेवर येऊन चार वर्षे झाली तरी पेन्शनवाढ केलेली नाही. कोशियारी समितीचा अहवाल लागू करा, पेन्शन धोरणात बदल, पुनर्रचना करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल लागू करा, खासगी क्षेत्रातील पेन्शनराची पेन्शन वाढवावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासााठी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश येंडे, कार्याध्यक्ष भीमराव डोंगरे, उपाध्यक्ष पुंडलिक पांडे, सचिव प्रकाश पाठक यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे.' पत्रकार परिषदेस वारणा साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष महादेव बच्चे, सचिव मधुकर पोवार, पंडित जाधव, महादेव पाटील, विजय कांबळे आदी उपस्थित होते

-------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे लंपास केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुगारात पैसे जिंकले आहे, असे सांगून पंधरा हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. त्याबाबतची फिर्याद सनी पवन महाराज (वय २६ रा. अथर्व संकुल, न्यू शाहूपुरी) यांनी पोलिसांत दिली. या प्रकरणी अविनाश सकट, अमर माने, शामराव कांबळे, नवनाथ सकट (सर्व रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. सोमवारी सकाळी महाजन हे सातारा येथे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात थांबले होते. त्यावेळी बसस्थानकासमोरील महाराजा हॉटेलजवळ छत्री आणि टेबलवर चष्मा आणि घड्याळे या वस्तू ठेऊन जुगार सुरु होता. हा जुगार पाहत असताना या वस्तू तु्म्ही जिंकल्या असल्याचे सांगत चौघांनी महाजन यांना पैसे दाखविण्यास सांगितले. पैसे दाखवित असतानाच त्यांच्या हातातील पैसे जबरदस्तीने काढून घेऊन या चौघांनी पळ काढला. या प्रकरणी चौघाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images