Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा सुरुवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तब्बल महिन्यानंतर मुंबई ते कोल्हापूर विमानसेवेला रविवारी पुन्हा सुरुवात झाली. विमानसेवा सुरळीतपणे चालू ठेवली नाही तर एअर डेक्कन कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत कंपनीने विमानसेवा चालू केली आहे. दरम्यान, बंद पडलेली विमानसेवा सुरु व्हावी यासाठी विविध पातळीवर प्रयत्न चालू होते.

२०११ पासून बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू होण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रयत्न केले. 'उडान'योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला प्रारंभ झाला. मात्र अडीच तीन महिन्याच्या सेवेनंतर २६ जून रोजी विमानसेवा पुन्हा बंद पडली. बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरु करण्यासाठी दोन्ही खासदारांनी, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, राज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याशी चर्चा केली. कंपनीमार्फत यापूर्वी दोनदा विमानसेवा सुरु करण्याविषयी कळविले. मात्र काही कारणास्तव विमानाचे उड्डाण काही होऊ शकले नव्हते.

दोन दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या पत्रकात, 'एअर डेक्कन कंपनी २९ जुलैनंतर कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरळीत चालू ठेवली नाही तर त्यांचा करार रद्द केले जाईल. आणि एअर इंडियाचा उपक्रम असलेल्या एअर अलायन्सला कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा ठेका दिला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिल्याचे पत्रकांत म्हटले आहे.' एअर इंडिया एअर अलायन्सच्या माध्यमातून मोठ्या शहरातून छोट्या शहरात सेवा देते. एअर डेक्कन कंपनीने विमानसेवेत चालढकल केली तर दुसरा पर्याय कोल्हापूरसाठी उपलब्ध असणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. दरम्यान, एअर डेक्कनने या साऱ्या प्रकाराची गंभीर दखल घेत रविवारपासून विमानसेवेला पुन्हा प्रारंभ केला. मुंबई ते कोल्हापूर हे विमान दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येथील विमानतळावर दाखल झाले. पंधरा मिनिटाच्या विश्रांतीनंतर ते परत मुंबईकडे रवाना झाले.

.............

'गो इंडिगो'चीही तयारी

एअर डेक्कन कंपनीकडून विमानसेवेत सातत्याने चालढकल सुरु असल्यामुळे त्या कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याची प्रक्रिया केंद्रीय पातळीवरुन सुरू आहे. एअर डेक्कनसोबतचा करार रद्द झाल्यास दुसरीकडे गो इंडिगो, स्पाइसजेट आणि एअर अलायन्स या कंपन्यांनी कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा देण्याची तयारी दर्शविली असल्याचेही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. दरम्यान, 'गो इंडिगो'कडून कोल्हापूर ते तिरुपती दरम्यान विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात नजीकच्या काळात चाचणी होणार आहे.

...........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराईत गुन्हेगाराचा लक्षतीर्थमध्ये धिंगाणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लुटमार, मारामारी, चोरी असे विविध गुन्हे दाखल असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने गेल्या दोन दिवसांपासून लक्षतीर्थ वसाहतीमध्ये खुलेआम कुऱ्हाड घेऊन धिंगाणा घातला आहे. तो मद्यधुंद अवस्थेत महिला, तेथील रहिवाशांना अश्लिल शिवीगाळ करीत आहे. परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असल्याने पोलिसांनी स्वत:हून त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दोन दिवसापूर्वी संबंधित गुन्हेगाराने मद्यधुंद अवस्थेत अंगावरील कपडे काढून हातात कुऱ्हाड घेऊन रस्त्यावर धिंगाणा घातला. त्याने या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहने थांबवली. तासभर त्याचा दंगा सुरू होता. यावेळी त्याने भागातील महिलांसह तरुणांना शिवीगाळ केली. तरीही लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलिसांविरोधात संताप व्यक्त होत आहे. हा सराईत गुन्हेगार लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहतो. गल्लीतील महिला, तरुण यांसह पोलिसांची नाव घेऊनही तो अर्वाच्च शिवीगाळ केली. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने भागातील नागरिकांनी पोलिसांत तक्रार दिलेली नाही. या गुन्हेगारावर आतापर्यंत दाखल असलेली कलमे पाहता त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी पुरेशी आहेत. मात्र, तो पोलिसांचा खबऱ्या म्हणूनही काम करीत असल्याने त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे, भावना रहिवाशांत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधीमंडळ अंदाजसमितीचा दौरा रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधीमंडळ अंदाज समितीचा नियोजित आज, सोमवारी दि. ३० आणि ३१ जुलै रोजीचा जिल्हा दौरा रद्द झाला. सकल मराठा समाजाने दौऱ्याला विरोध केला होता. समिती २९ आमदार आहेत. ते दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणार होते. समितीचे अध्यक्ष, आमदार अनिल कदम यांचे स्वीय सहायक दौऱ्याच्या तयारीसाठी शनिवारी दाखल झाले होते. दरम्यान, आरक्षणप्रश्नी मराठा समाज आंदोलन करीत आहे. सरकार विरोधात प्रचंड असंतोष आहे. यापार्श्वभूमीवर समितीच्या दौऱ्यास विरोध झाला. विरोध डावलून आल्यास कोल्हापुरी हिसका दाखवण्याचा इशाराही सकल मराठा समाजातर्फे देण्याला आला होता. त्याचा धसका घेत समितीचा दौरा रद्द करण्यात आला. यामुळे दौऱ्याच्या खर्चासाठी विविध विभागाकडून पैसे वसुली थांबल्याने संबंधीत अधिकारी आनंदात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणप्रश्नी भामटे, घानवडेत बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

भामटे (ता. करवीर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर रास्ता रोको करून मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला. जवळपास दोन तास आंदोलन सुरू राहिल्यामुळे राज्यमार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

यावेळी शिवाजी देसाई म्हणाले, 'सर्वसामान्यांना त्रास व्हावा म्हणून मराठा मोर्चे काढत नाहीत. रक्त सांडण्याअगोदर सरकारने मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा.' सुशील मगदूम, डॉ. इंद्रजित पाटील यांची भाषणे झाली. यावेळी सरपंच सुरेश पाटील, अमर देसाई, विलास पाटील सर्जेराव कांबळे, डॉ. संजीव देसाई, सरदार पाटील, जोतिराम पाटील, विशाल देसाई, रघुनाथ आळवेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

घानवडेत टायर पेटवून निषेध

घानवडे, मांजरवाड, चव्हाणवाडी (ता. करवीर) येथे सर्वपक्षीय सकल मराठा बांधवांच्यावतीने मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी उत्स्फूर्तपणे गावातून फेरी काढली. मोर्चा घानवडे येथील चौकात आल्यावर युवक कार्यकर्त्यांनी टायर पेटवून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत घानवडेच्या वतीने मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवस गाव बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मोर्चात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी पांडुरग चव्हाण, साताप्पा चौगले, विलास पाटील, रमेश पाटील, मधुकर पाटील, के. बी. पाटील बी. के. पाटील, योगेश पाटील, मुकेश जाधव, आदींसह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

गारगोटीत आजपासून ठियया

गारगोटी : सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गारगोटीत तहसील कार्यालयासमोर सोमवार (ता.३०) पासून ठिय्या आंदोलन सुरू करणार असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजाला आरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य असून सरकार टाळाटाळ करत आहे. तरी या ठिय्या आंदोलनात गारगोटी शहरातील सर्व राजकीय पक्षांनी, संघटनांनी व तरुण मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. यावेळी बाजीराव चव्हाण, संदीप वरंडेकर, माजी उपसरपंच अरुण शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, संग्रामसिंह सावंत, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकलवरून पडल्याने तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

औरवाड-गौरवाड रस्त्यावरील वळणावर मोटारसायकलवरून पडल्याने एकजण जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाला. त्यास उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. शिवानंद सदाशिव वाळके (वय ३१, परमानंदवाडी, ता. रायबाग, जि. बेळगाव) असे मृताचे नाव आहे. अपघाताची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : शिवानंद वाळके व परशुराम कबनुरे मोटारसायकलवरून कोल्हापूरला गेले होते. तेथील काम आटोपून नृसिंहवाडीमार्गे परमानंदवाडीकडे निघाले होते. औरवाड-गौरवाड मार्गावर आले असता पहिल्या वळणावर रात्रीच्या सुमारास ते मोटारसायकलसह पडले. गंभीर दुखापत झाल्याने शिवानंद जागीच ठार झाले, तर परशुराम जखमी झाला. अपघाताची वर्दी श्रीकांत बसाप्पा करोशी यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी भेट दिली. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षींना ‘भारतरत्न’साठी लोक चळवळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी लोकचळवळ उभारणार आहे. केंद्र सरकारवर जनमताचा रेटा निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील संस्था, विकास सोसायट्या, सार्वजनिक तरुण मंडळे, शाळा, कॉलेजांसह नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे हिंदी व इंग्रजीतून पत्रे लिहावीत'असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. २५ ऑगस्टपर्यंत सगळी पत्रे संकलित करून ती एकत्रित पंतप्रधानांना दिली जातील असे त्यांनी सांगितले.

राजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न पुरस्कारांनी सन्मानित करावे यासाठी राज्यातील खासदारांच्या शिष्टमंडळासह पंतप्रधांनांची भेट घेणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. 'संसदेत भारतरत्न पुरस्कारासंदर्भात सूचना मांडल्यानंतर देशातील अनेक खासदारांनी त्याला पाठिंबा दिला. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही याला समर्थन दिले आहे. भारतरत्न पुरस्काराच्या मागणीसंदर्भात राज्य सरकारकडील प्रकिया पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचार कार्याचा देशभर प्रभाव आहे. देशभरातील खासदारांनी भारतरत्नसाठी समर्थन द्यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रत्येक खासदाराशी पत्राने संपर्क साधला जाईल. प्रत्येकाला इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार लिखित इंग्रजी भाषेतील 'राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' भेट देणार आहे. शिवाय प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री, आमदार, खासदारांशी पत्रव्यवहार करून समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.'

तर गती वाढेल

'शाहू महाराजांना भारतरत्न किताब द्यावा अशी विनंती करणारे पत्र किंवा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांच्याकडे पाठवायचे आहेत. जनमताचा रेटा वाढला तर या प्रक्रियेला गती लाभेल' असेही महाडिक म्हणाले. त्यासाठी तालीम संस्था, तरुण मंडळे, नागरिकांनी वैयक्तिक स्तरावरही पत्रे लिहावीत. ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत तसा ठराव करुन पत्रे सादर करावीत. जिल्ह्यातील सेवाभावी संस्था, सहकारी संस्था, बँका, पतसंस्था, विकास सोसायट्या, शाळा, कॉलेज, दूध संस्थांनी २५ ऑगस्ट २०१८ पर्यंत त्यासंदर्भातील पत्रे खासदार धनंजय महाडिक संपर्क कार्यालय, राजेश मोटर्ससमोर, कावळा नाका येथे जमा करावीत. समर्थनासाठी दसरा चौक येथून सह्यांची मोहिम राबविणार आहे.

- ५४४ खासदारांना शाहू गौरव ग्रंथ भेट देणार

- शहर व जिल्ह्यात भारतरत्नसाठी सह्यांची मोहीम राबविणार

- भारतरत्नसाठी पंतप्रधानांची भेट घेणार, मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार

- देशभरातील आमदार, विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेमनार यांचा आज सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांचा जिल्हा परिषदेच्यावतीने सोमवारी (ता. ३० जुलै) सत्काराचे आयोजन केले आहे. खेमनार यांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत असताना नाविन्यपूर्ण योजना राबविल्या होत्या. सीईओपदावरुन त्यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली झाली आहे. त्यांच्या जिल्हा परिषदेतील कारकिर्दीबद्दल सत्काराचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मारहाणप्रकरणी गुन्हा

$
0
0

हातकणंगले : हातकणंगले येथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून शनिवारी झालेल्या तुंबळ हाणामारीप्रकरणी रविवारी महेंद्र अर्जुन मोरे (वय २२, रा. हातकणंगले) यांच्या फिर्यादीवरून तब्बल २६ जणांवर हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे संशयित आरोपींची संख्या ५० ते ६० पोहोचली असून कोणालाही अटक केलेली नाही. शनिवारी सचिन वगरे व रोहित कांबळे या दोघांत किरकोळ कारणावरून झालेल्या वादावादाने तुबंळ हाणामारी होऊन दोन महिलांसह एकूण आठजण जखमी झाले आहेत, यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चाकूहल्ल्यात तरुण जखमी

$
0
0

कोल्हापूर : येथील उमा चित्रपटगृह ते सावित्रीबाई फुले रुग्णालय रस्त्यावर राजेश सावंत या तरुणावर रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एकाने चाकूहल्ला केला. त्यात राजेश जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. सागर कदम नावाच्या तरुणाने हा हल्ला केल्याचे राजेशचे म्हणणे आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनपूट क्रेडिट रक्कम परिपत्रकात बदल करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

उद्योजकांचे होणारे कोट्यवधींचे नुकसान टाळण्यासाठी ३१ जुलै २०१८ रोजी शिल्लक असलेली इनपूट क्रेडिटची रक्कम उद्योजकांना पुढेही वापरता यावी, असा बदल परिपत्रकात तातडीने करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थमंत्री पीयूष गोयल यांना इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने देण्यात आले.

सध्या वस्त्रोद्योगात वापरल्या जाणाऱ्या पॉलिस्टर सुतावर १२ टक्के जीएसटी लागत आहे. त्याच्यापासून तयार होणाऱ्या कापडावर पाच टक्के जीएसटी लागत आहे. त्यामुळे यंत्रमाग उद्योजकांची जीएसटीच्या फरकातील रक्कम इनपूट क्रेडिटच्या रूपाने सरकारकडे जमा होत असून, ती कोट्यवधीच्या घरात आहे. इनपूट क्रेडिटट रकमेचा परतावा मिळण्यासंदर्भात इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनसह इतर संघटनांनी ही बाब जीएसटी कौन्सिलच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिली आहे. याचाच परिपाक म्हणून २१ जुलै २०१८ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या जीएसटी कौन्सिल मिटिंगमध्ये या विषयावर चर्चा होऊन शिल्लक इनपूट टॅक्स क्रेडिट रकमेचा परतावा उद्योजकांना मिळेल असा निर्णय झाला असून, तो स्वागर्ताह आहे. पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीसंदर्भात जे परिपत्रक काढले आहे, त्यामध्ये शिल्लक इनपूट क्रेडिट रक्कम ३१ जुलैपर्यंत न वापरल्यास बुडीत होईल असा उल्लेख आहे. त्यामुळे उद्योजकांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान होणार आहे.

०००००

त्यासाठी शिल्लक असलेली इनपुट क्रेडीटची रक्कम उद्योजकांना ३१ जुलैनंतरही वापरता यावी असा बदल परिपत्रकामध्ये करावा अशी मागणी केली असल्याची माहिती दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जीएसटी कमिशनर कोल्हापूर यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबुरी की नवीन पत्ते?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यानंतर के. पी. पाटील यांच्या गोटात उत्साह वाढला असून, ए. वाय. पाटील यांचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. पवार यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदासाठी आदेश झाला असून, विधानसभा उमेदवारीबाबत काही निर्णय दिलेला नाही, असे ए. वाय. पाटील यांनी रविवारी सांगितले. त्यामुळे ते निवडणुकीसाठी सबुरीने घेणार की नवीन पत्ते खोलणार हे आगामी काळात दिसून येणार आहे. या हालचालींमुळे राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातील शह-काटशहाचा खेळ मात्र रंगण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

ए. वाय. पाटील आणि के. पी. पाटील यांच्यात उमेदवारीवरून जोरदार चुरस निर्माण झाली आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांनी बिद्री साखर कारखाना निवडणूक जिंकून आपल्या गटाचे बळ वाढवले आहे. मित्रगटांच्या मदतीने गारगोटी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली. त्यामुळे के. पी. पाटील समर्थक निवडणुकीची हवा करण्यात आघाडीवर आहेत.

त्यांचे मेहुणे असलेले ए. वाय. पाटील यांनी पंचवीस वर्षांत राजकारणात दबदबा वाढवला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उतरून विजय मिळवण्यासाठी त्यांनी वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रत्येक निवडणुकीत सावध पवित्रा घेत बेरजेचे राजकारण करत परिस्थिती हाताळली आहे. भोगावती निवडणुकीत काँग्रेस गटाचा विश्वास संपादन केला आहे. भोगावती परिसरातील सर्व गावांत प्रबळ गट ए. वाय. पाटील यांच्या बाजूने दिसत आहेत. के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यांनी निवडणुकीची जोरदार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी मिळवून निवडणूक जिंकायचीच या इराद्याने ए. वाय. यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. पण निवडणुकीची वेळ आल्यानंतर पाहू, असे ए. वाय. पाटील यांची भूमिका आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची धुरा पुन्हा विश्वासाने सोपवली आहे. शरद पवार जो निर्णय देतील तो मान्यच करावा लागेल, पण विधानसभा उमेदवारीविषयी कोणताही निर्णय किंवा मार्गदर्शन झालेले नाही, असे सांगितले आहे. यातून विधानसभा उमेदवारीबाबत ए. वाय. पाटील अजूनही आशावादी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीतील एकाकडून युवतीवर बलात्कार

$
0
0

कोल्हापूर : दिल्लीतील एकाने येथील एका युवतीशी प्रेमसंबंध जुळवत सात महिन्यांपासून विविध ठिकाणी नेत बलात्कार केल्याचा गुन्हा रविवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी धर्मेंद्र रामविलास निषाद (रा. मंगोलपुरी, नवी दिल्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सांगितले की, पीडित युवती महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. धमेंद्रशी तिची एका लग्नात ओळख झाली. ओळखीतून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. यातून ५ ऑक्टोबर २०१७ ते २३ मे २०१८ अखेर धमेंद्रने पनवेलजवळील माथेरान आणि व्हीनस कॉर्नर हॉटेलमधील रूममध्ये तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार केला. फोटोमध्ये बदल करून बदनामी करतो, वडिलांना ठार मारतो असे तो धमकी देता होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे. लग्नाचा बनाव करून फसवणूक केल्याचाही आरोप तिने केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरीत भरदिवसा चोरी

$
0
0

कोल्हापूर : येथील शाहूपुरीतील रत्नदीप हौसिंग सोसायटीतील सौरभ दीपक शहा यांच्या घरातून मोबाइल, लॅपटॉप, बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली. रविवारी सकाळी साडेआठ ते ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी सांगितले की, शहा यांच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यातून प्रवेश केलेल्या चोराने टेबलवर ठेवलेला लॅपटॉप, दोन मोबाइल, चेकबुक असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी शहा यांनी शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षण आंदोलनाला महेश जाधवांचा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी एका पत्रकाद्वारे पाठिंबा दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनात सुरुवातीपासून सहभागी आहे. यापुढीलही आंदोलनात सक्रीय सहभाग राहणार आहे असे त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, आंदोलनाला सर्व पक्ष, संघटना, तालीम संस्था एकत्र येऊन पाठिंबा देत आहेत हे कोल्हापूरचे एक वेगळेपण आहे. येथे नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन केले आहेत. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, सरकारने घटनेत बदल करावा अशी योग्य मागणी केली आहे. त्यांचा अनुभव व सल्ला समाजाला प्रेरक ठरेल. सरकार व भाजप मराठा समाज आरक्षण या विषयावर अत्यंत गंभीर आहे. त्याचमुळे गेली पंधरा वर्षे जी मागणी धिम्यागतीने केवळ चर्चेत होती, ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशलपणे निर्णय घेतल्याने शेवटच्या टप्प्यात आली आहे. सरकारने २७०० पानांचे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर करून, १६ टक्के आरक्षण देण्यासंबधी मनोदय केला आहे. सरकारने मागासवर्गीय आयोगास ताबडतोब व्यवस्था देऊन अहवाल देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवाल येताच तत्काळ निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मराठा आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन बोलावण्याचे निश्चित केले आहे. आरक्षण प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लक्ष घातले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Maratha Protest: सोलापूर बंदला हिंसक वळण

$
0
0

सोलापूर:

मराठा आरक्षणासाठी आज पुकारण्यात आलेल्या सोलापूर बंदला हिंसक वळण लागलंय. सोलापुरात कडकडीत बंद सुरू असताना जमावाने पोलीस उपायुक्तांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर या जमावाने पोलिसांवरही दगडफेक सुरू केल्याने पोलिसांनी या जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. त्यामुळे आंदोलक आणखीनच आक्रमक झाल्याने या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड सुरू केल्याने सोलापूरमध्ये तणावाची निर्माण झाला आहे.

बंदच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिवहन सेवेच्या बसेसही बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात शंभर टक्के बंद सुरू असताना आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाने मोठा मोर्चा काढला. शेकडो मराठा तरुण पांजरपोळ चौकात आणि शिवाजी चौकात एकत्र जमा झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. तर पार्क चौकात काही आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनांवर आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांवर दगडफेक केली. यावेळी पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले यांच्या गाडीलाही जमावांनी टार्गेट केलं. जमावाने केलेल्या दगडफेकीत चौगुले यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव तर पांगवलाच शिवाय कोम्बिंग ऑपरेशन करून अनेकांना ताब्यात घेतले. दुपारच्या सुमारास झालेल्या दगडफेकीचे पडसाद संपूर्ण शहरात उमटले. काही ठिकाणी टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. तसेच आंदोलन चिघळू नये म्हणून पोलिसांनी मराठा संघटनांच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून इतरांचीही धरपकड केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सुरू केलेल्या या धरपकडीमुळे सोलापुरात तणाव निर्माण झाला असून चौकाचौकात जमून कार्यकर्ते पोलिसांचा निषेध नोंदवत आहेत.

सकाळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी दिलीप कोल्हे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, सिद्धाप्पा कलशेट्टी, दास शेळके, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, चेतन नरोटे, श्रीकांत घाडगे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, विजय पुकाळे, सचिन महामुनी, बाळासाहेब गायकवाड, मतीन बागवान आदी शिवाजी चौकात एकत्र आले. त्यांनी फेरी काढून बंदचे आवाहन केले. मात्र जमावबंदीचे कारण पुढे करत पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. दरम्यान, सकाळी १० वाजल्यापासून सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते शिवाजी पुतळ्याजवळ जमले. तेथे त्यांनी 'एक मराठा लाख मराठा', 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. माजी आमदार दिलीप माने, पुरुषोत्तम बरडे, माउली पवार, राजन जाधव, लहू गायकवाड, चंद्रकांत वानकर , संतोष पवार, भाऊ रोडगे, प्रवीण डोंगरे, मनोहर सपाटे, दत्ता गणेशकर, सुहास कदम, लता ढेरे, सुनील शेळके, शाम शिंदे, ज्ञानेश्वर सपाटे आदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

बीड: केज तालुक्यातील धनेगावफाटा येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला होता

नाशिक: शिवसेनेचे देवळालीचे आमदार योगेश घोलप यांच्या घरासमोर मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला.

औरंगाबाद: मुकुंदवाडी येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला. तर जालन्यात आंदोलकांनी मोठा मोर्चा काढला होता.

कोल्हापूर: मराठा आंदोलकांनी प्रतिकात्मक फाशी आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवला

यवतमाळ: मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक मोहन भोयर यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बळ द्या पंखांना .. महाराष्ट्र टाइम्स चा उपक्रम…

$
0
0

दहावीचं वर्ष हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण. या वळणावर अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळत असते; पण हे प्रत्येकाच्याच आयुष्यात घडतं असं नाही. नियतीचा अडथळा अनेकांच्या या वळणाला बांध घालतो. अचाट बुद्धिमत्ता असूनही आर्थिक पाठबळ नसल्याने पुढील शिक्षण घेणे त्यांना परवडत नाही. त्यांचे शिक्षण थांबते. या कळ्या उमलण्याआधीच कोमेजतात.याला आपणासारख्या दानशूरांच्या सहकार्याने ‘महाराष्ट्र टाइम्स’ने ठोस उत्तर शोधले आहे. ‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून! गरिबीचे चटके सोसत ज्या मुलांनी दहावीच्या परीक्षेत लखलखीत यश मिळवले, अशा मुलांच्या डोळ्यांत उच्चशिक्षण घेण्याची स्वप्ने तरळत आहेत. हे स्वप्न ‘मटा हेल्पलाइन’च्या उपक्रमातून सत्यात उतरविण्याचा महाराष्ट्र टाइम्सचा संकल्प आहे. त्याला साथ हवी आहे आपल्या दातृत्वाची.‘बळ द्या पंखांना’ या उपक्रमातून ‘महाराष्ट्र टाइम्स’ संवेदनशील समाजाला साद घालत आहे. त्याला गेली पाच वर्षे आपला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षीही तो मिळेल, असा विश्वास वाटतो. आपण चेकच्या माध्यमातून ही मदत करू शकता.

चेक यातील कोणत्याही नावाने काढू शकाल…

१ सानिका सोकासने २ स्वप्नील शिंदे ३ आसावरी खोत ४ शिवम मोरे ५ संजीवनी आपटे ५ ऋतुजा सासुलकर ६ प्रगती पडवळ ७ प्रगती पडवळ ८ शिवानी वड्ड ९ रेहाना फणीबंद १० वैष्णवी जाधव ११ रितेश डोलारे

चेक पाठवण्याचा पत्ता..

महाराष्ट्र टाइम्स, गुलमोहोर रेसीडन्सी, नागाळा पार्क, कोल्हापूर
अधिक माहितीसाठी संपर्क : गुरुबाळ माळी ८५५१०१४०४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकीलांच्या पाठींब्याने आंदोलन तीव्र

$
0
0

मराठा आरक्षणप्रश्नी जिल्हा बार असोसिएशनच्या ३५०० वकीलांचा पाठिंबा, प्रतिकात्मक फाशी,

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बार असोसिएशनच्या ३५०० वकीलांनी मराठा सकल समाजाच्या ठिय्या आंदोलनाला पाठींबा दिल्याने जिल्ह्यातील कोर्टाचे काम सोमवारी ठप्प झाले. मूकबधिरांनी हावभावाद्वारे दिलेल्या पाठींब्याने आंदोलक हेलावून गेले. खासदार राजू शेट्टी, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह अनेक गावचे ग्रामस्थ, संघटना, संस्थांच्या पाठींब्याने आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. सलग सहाव्या दिवशी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागरिक व कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने दसरा चौकातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने ठिय्या आंदोलनाला अध्यक्ष प्रशांत चिटणीस यांच्या नेतृत्वाखाली पाठिंबा देत दसरा चौकात धरणे धरली. जिल्ह्यातील ३५०० वकील कोर्ट कामापासून अलिप्त राहिल्याने कोर्टाचे काम ठप्प झाले. सोमवारी जिल्हा न्याय संकुलात अंदाजे साडेचार हजारहून अधिक प्रकरणांवर कामकाज झाले नाही. आंदोलनात बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंदराव जाधव, सचिव सुशांत गुडाळकर, सहसचिव तेहजीज नदाफ, लोकल ऑडिटर धैर्यशील पवार, महिला प्रतिनिधी मनीषा पाटील, स्वाती तानवडे, ज्येष्ठ वकील के.ए. कापसे, महादेवराव आडगुळे, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, प्रकाश मोरे, प्रशांत शिंदे यांच्यासह वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले. करवीर तालुक्यातील निगवे, हळदी परिसरातील २५ गावचे ग्रामस्थ, खेबवडे, भुयेवाडी, हणंमतवाडी, शिंगणापूर, वरणगे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले . विविध समाजातील संस्था, संघटनांनी आंदोलनाला पाठींबा दिल्याने दसरा चौक कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदशनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

.................

प्रतिकात्मक फाशीपासून आंदोलकांना रोखले

सकल मराठा समाजाने सोमवारी प्रतिकात्मक फाशी आंदोलनाची घोषणा केली होती. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दिलीप देसाई, हर्षल सुर्वे, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर चौघेजण तोंडावर काळे बुरखे घालून फाशीसाठी तयार झाले. यावेळी बार असोसिएशनच्या वकीलांनी शेवटची इच्छा कोणती? अशी विचारणा केली असता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर वकिलांनी त्यांना फाशीपासून रोखत यापुढे कुठल्याही मराठा समाजाच्या तरुणाने फाशी घ्यायची नाही तर आरक्षण देण्यास विलंब करणाऱ्या राज्यकर्त्यांना फाशी द्यायची असा निर्णय देवून चौघा कार्यकर्त्यांना फाशीपासून रोखण्यात आले. प्रतिकात्मक फाशी आंदोलनाद्वारे मराठा समाजातील युवकांनी आरक्षण मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी आंदोलन करण्यात आल्याची माहिती वकील व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिली.

.......................

कोट

'मराठा समाजाने ५७ मोर्चे शांततेत काढून जगापुढे आदर्श ठेवला. मागासवर्गीय आयोग, न्यायालयाचे कारण सांगून मराठा समाजाला राज्य सरकार आरक्षण देण्याचे टाळत आहे. पण आता मराठा समाजाने हातात काठ्या घेतल्यावर राज्य सरकार जागे झाले आहे. आरक्षणप्रश्नी एक दिवस विशेष अधिवेशन घेणार अशी घोषणा राज्य सरकारने केली असली तरी तारीख जाहीर केलेली नाही.

जयवंतराव आवळे,माजी खासदार

.............

'मराठा समाजाचे आरक्षण हे समतेच्या तत्वासाठी सुरु असून जिल्ह्यातील साडेतीन हजार वकीलांनी कोर्ट कामापासून अलिप्त राहत पाठिंबा दिला आहे. आंदोलनकाळात कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांप्रश्नी कोर्टात बचाव करण्याची जबाबदारी खंडपीठ कृती समितीच्या सहा जिल्ह्यातील वकीलांनी घेतली आहे. तसेच हायकोर्टालाही मराठा आरक्षण प्रश्नावरील सुनावणी वेगाने घेण्यासाठी पत्र पाठवले आहे.

अॅड प्रशांत चिटणीस, अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन

................

'आंदोलनात फूट फोडण्यासाठी अनेक सूर्याजी पिसाळ काम करत आहेत. मराठा समाजाला आघाडी सरकारने आरक्षण दिल्यानंतर सुप्रीम कोर्टात कोणत्या व्यक्तीने याचिका दाखल केली, त्याच्या मागचा सूत्रधार कोण याचाही अभ्यास करण्याची गरज आहे.

अॅड. शिवाजीराव राणे, माजी अध्यक्ष, जिल्हा बार असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगवडेत हार्डवेअरमध्ये चोरी

$
0
0

सांगवडेत हार्डवेअरमध्ये चोरी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर तालुक्यातील सांगवडे येथे ओम ट्रेडर्स हार्डवेअर या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार रविवारी (ता. २९) सकाळी उघडकीस आला. दुकानमालक श्रीकांत अण्णा चौगले (वय ४९, रा. वसगडे, ता. करवीर) यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

सांगवडे गावच्या हद्दीत गट नंबर १९९ मध्ये ओम ट्रेडर्स हार्डवेअर हे चौगले यांचे दुकान आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास नेहमीप्रमाणे चौगले दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आठच्या सुमारास परिसरातील लोकांना दुकानाचे शटर उचकटल्याचे दिसले. या घटनेची माहिती मिळताच दुकानमालक चौगले घटनास्थळी आले. चोरट्यांनी आतील फरशी कटिंग व्हील, फरशी मोल्डिंग, सेंट्रिंग पाना, स्क्रू बॉक्स, पेंटर टेप, विविध आकाराच्या ताडपदरी असा सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात चोरी

$
0
0

बांधकाम व्यावसायिकाच्या

कार्यालयात चोरी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम आणि दीड तोळ्याची चेन असा सुमारे ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथे शुक्रवारी रात्री ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान चोरीचा हा प्रकार घडला. याबाबत बांधकाम व्यावसायिक अर्जुन यशवंत नलवडे (वय ६१, रा. द्रविड बोळ, महाद्वार रोड) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

अर्जुन नलवडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. २७ जुलैला ते रात्री आठच्या सुमारास मिरजकर तिकटी येथील कार्यालय बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते कार्यालय उघडण्यासाठी आले असता, मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. आतील तिजोरी तोडून त्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन व रोकड अज्ञाताने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी सोमवारी (ता. ३०) जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी मिरजकर तिकटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, चोरट्याचा शोध सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानवी हक्क आयोगाच्या सुनावणीत १५ तक्रारी

$
0
0

(फोटो आहे)

मानवी हक्क आयोगाच्या

सुनावणीत १५ तक्रारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याच्या मानवी हक्क आयोगाचे प्रभारी अध्यक्ष भगवंतराव मोरे यांच्यासमोर सोमवारी (ता. ३०) पोलिस अधीक्षक कार्यालयात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील १५ तक्रारींची सुनावणी झाली. मोरे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकूण तातडीने तक्रारी निर्गत करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

मानवी हक्कांचे संवर्धन व्हावे यासाठी मानवी हक्क आयोगाकडून विशेष प्रयत्न केले जातात. पोलिस दलासह कारागृह प्रशासनाच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राज्य मानवी हक्क आयोगाकडून विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य मानवी हक्क आयोगाचे प्रभारी अध्यक्ष भगवंतराव मोरे सोमवारी कोल्हापुरात आले होते. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी मोरे यांचे स्वागत केले. पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात मोरे यांच्यासमोर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १५ तक्रारींवर सुनावणी झाली. यात कोल्हापूर जिल्हा पोलिस व कारागृहाशी संबंधित तक्रारींचा समावेश होता. सुनावणीदरम्यान प्रभारी अध्यक्ष मोरे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकूण घेतले. तक्रारींबाबत त्यांनी संबंधित विभागप्रमुखांकडून खुलासा घेतला. तक्रारदारांना तातडीने न्याय मिळावा, यासाठी त्यांनी तक्रारदारांसह संबंधित विभागप्रमुखांशीही सविस्तर चर्चा केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील तक्रारदार उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images