Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राशिवडे, मडिलगेत डेंगीचे पाच रुग्ण

$
0
0

राधानगरी : राशिवडे बुद्रुक (ता. राधानगरी) येथे चार, तर मडिलगे बुद्रुकमध्ये एक डेंगीचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. चार दिवसांपासून आरोग्य विभागाची नऊ पथके व १८ कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गाव पिंजून काढून स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे, तर दक्षता म्हणून प्रतिबंधक औषधांची फवारणी ताबडतोब केली जाणार आहे.

राशिवडेतील एका वसतिगृहात पंधरा दिवसांपूर्वी डेंगीचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर पाठोपाठ तीन संशयित रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची धावपळ उडाली आहे. जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे परसात स्वच्छता नसल्याचे आढळून आले, तर एका घराच्या दारातच टायरमध्ये डेंगीच्या अळ्या सापडल्या तसेच इंदिरानगरात दोन घरांच्या टेरेसवर साचलेल्या पाण्यात डेंगीसदृश अळ्या सापडल्या. तर पिंपरी कॉर्नर येथील एका घरामध्ये आरोग्य विभाच्या कर्मचाऱ्यांना डेंगीच्या अळ्या सापडल्या.

दरम्यान, मडिलगे बुदुक (ता. भुदरगड) येथे डेंगीचा रुग्ण आढळल्यामुळे डॉक्टरांसह शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. डेंगीचा रुग्ण आढळल्यामुळे नागरिकांत घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. परंतु नागरिकांनी न घाबरता तत्काळ उपचार घेण्यासाठी आरोग्य केंद्रात यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर हावळ यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तरुणाची आत्महत्या

$
0
0

जयसिंगपूर : गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेश बाबासाहेब कवठेकर (वय १९) असे त्याचे नाव आहे. जीवे मारण्याच्या धमकीस कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. घटनेची नोंद कागवाड (कर्नाटक) पोलिस ठाण्यात झाली आहे. गणेशवाडी येथील बाबासाहेब शंकर कवठेकर यांची गणेशवाडी-कागवाड रस्त्यालगत कर्नाटकच्या हद्दीत शेती आहे. त्यांचा धाकटा मुलगा नीलेश कर्नाटकात आयटीआयच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. मंगळवारी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी तो घराबाहेर पडला. आई-वडिलांनी शेतात आलेल्या नीलेशची विचारपूस केली व जनावरांचे दूध घेऊन ते गणेशवाडीकडे घरी परतले. दरम्यान, निलेशने शेतातील घरात तुळईला दोरीने गळफास घेतला. वडील परत शेतात आले असता आत्महत्येची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी कागवाड पोलिस ठाण्यात घटनेची वर्दी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा जप्त

$
0
0

कागल : कसबा सांगाव (ता. कागल) येथे मंगळवारी अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत श्री पान शॉपमधून सुमारे २८३६ रुपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या पदार्थांत गोवा, राज, कोल्हापुरी, आर.एम.डी, ९९सेंटेड गुटखा तसेच जे.एम.पान मसाला,व्ही १, के १, मिराज सुंगधित तंबाखू, आदी प्रतिबंधक पदार्थ ताब्यात घेतले. कारवाईनंतर हेगडे यांची पानपट्टी बंद करण्याचे आदेश दिल्याचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणातील सहाजणांना जामीन मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारत राखीव बटालियनाच्या जवानांकडून ४० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी संशयित असलेल्या सहा संशयित आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला. जिल्हा न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी झाली.

संशयित असलेल्या सहाजणांना २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या प्रकरणातील डीवायएसपी मनोहर गवळी वगळता पाच संशयितांवर निलंबनाची कारवाई झाली होती. संशयित निरीक्षक मधुकर सकट, उपनिरीक्षक रमेश शिरगुप्पे, हजेरी मेजर सहायक फौजदार आनंदा पाटील, कॉन्स्टेबल प्रविण कोळी, लिपिक राजकुमार जाधव यांना जामीन मिळाला आहे. दर सोमवारी सकाळी अकरा ते दोन या वेळेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात हजर राहण्यासह फिर्यादी पक्षाचा पुरावा न फोडणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय जिल्ह्याबाहेर जाऊ नये, असा आदेश दिला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा अहवाल बटालियन आणि लाचलुचपत विभागाच्या महासंचालकांना पाठविला होता. भारत राखीव बटालियन क्रमांक तीनच्या कसबा बावडा येथील कार्यालयात जवानांकडून लाच घेताना सहाजणांना रंगेहात पकडले होते. या सर्व संशयितांनी आहार भत्ता, हजेरीत सूट, निलंबन टाळण्यासाठी आणि पतंसस्थेतून कर्ज मंजुरीसाठी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या सर्वांना अटक करुन गुन्हा दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना पाच दिवसांची कोठडी सुनावली होती. या प्रकरणी बटालियनमधील खेळाडू सहायक फौजदाराने फिर्याद दाखल केली होती. या सर्व प्रकरणात ज्या व्यक्तिच्या नावावर लाचेचे पैसे ट्रान्स्फर करण्यात आले. त्याची अद्याप चौकशी सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठाच्या जागेची प्रशासनाकडून पाहणी

$
0
0

शेंडा पार्कात २८ एकर जागा उपलब्ध

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासाठी कृती समितीने मागणी केलेल्या शेंडा पार्क येथील जागेची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा प्रशासन आणि खंडपीठ कृती समितीने संयुक्तपणे मंगळवारी केली. सर्किट बेंचसाठी २८ एकर जागा मिळू शकते, मात्र त्यासाठी आरोग्य विभागाची समंती मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी कृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली. या पाहणीचा अहवाल ३१ जुलैपूर्वी जिल्हा प्रशासन विभागीय कार्यालयाकडे पाठविणार आहे.

खंडपीठ कृती समितीने कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी शेंडा पार्कातील गट क्रमांक ५८९ ते ७०९ येथील ७५ एकर जागेची मागणी केली होती. राज्य सरकारने केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने या जागेचा अहवाल तयार करुन विभागीय आयुक्तांना सादर केला होता. या प्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयाने या अहवालात १५ त्रुटी काढल्या. या पूर्ण करुन जिल्हाधिकारी कार्यालयाने तत्काळ हा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोल्हापुरात झालेल्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या जागेची पाहणी करुन जागेचा ना हरकत दाखला, अभिप्राय देण्याच्या सूचनाही केल्या. त्यानुसार प्रशासनाने मंगळवारी दुपारी चार वाजता जागेची पाहणी केली.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांत सचिन इथापे, नायब तहसीलदार अपर्णा मोरे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी शेंडा पार्कातील जागेची पाहणी केली. मागणी केलेल्या जागेत प्रत्यक्ष नकाशाप्रमाणे जागा, जागेचा नकाशा, सात बारा, मोजणी नकाशाची कागदपत्रे तपासण्यात आली. यावेळी जिल्हा विधी अधिकारी वैभव इनामदार, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. आनंद जाधव, सचिव अॅड. सुशांत गुडाळकर, सहसचिव अॅड तेहजीन नदाफ, माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. विजय पाटील, अॅड. प्रसाद रुकडीकर, अॅड. विजय मालेकर, अॅड. संजय मुळे, अॅड. तेजगोंडा पाटील आदी उपस्थित होते.

..

२८ एकर जागा उपलब्ध

शेंडा पार्कातील गट क्रमांक ५८९ आणि ७०९ येथे सुमारे १२० एकर जागा उपलब्ध असून खंडपीठ कृती समितीने ७५ एकर जागेची मागणी केली आहे. उपलब्ध असलेल्या जागेत काही जागा वैद्यकीय महाविद्यालय, कृषी विद्यापीठ, शाहू विद्यालय, चेतना अपंग विद्यालय, कुष्ठरोगासह आरोग्य विभागातील १४ कार्यालयांसाठी प्रस्तावित आहे. आरोग्य विभागाची समंती मिळाल्यास खंडपीठाच्या जागेचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चक्काजामुळे बाजारात टंचाई

$
0
0

(फोटो आहे)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट असोसिएशनमार्फत सुरू असलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनामुळे जिल्ह्यातील अन्नधान्य आणि साखरेची वाहतूक ठप्प झाली आहे. सर्वच औद्योगिक वसाहतींमधील काम ३० टक्क्यांनी कमी झाले, तर कांदा-बटाट्याची केवळ २२ टक्के आवक झाली आहे. फळांची आवकही २० टक्क्यांवर आल्याने बाजारात टंचाईचा धोका वाढला आहे. दरम्यान, आंदोलकांनी मंगळवारी कर्नाटकातून येणारे ट्रक कागलमधूनच परत पाठवले.

इंधनाचे दर कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी वाहतूकदारांचे शुक्रवारपासून (ता. २०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी महामार्गांवरील अवजड वाहतूक ९० टक्के बंद असल्याचा दावा कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने केला आहे. आंदोलकांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर कागल येथे कर्नाटकातून येणारे २० ट्रक अडवून माघारी पाठवले. जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवेतील दूध, औषधे आणि भाजीपाल्याचीच वाहतूक सुरू असल्याची माहिती जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अन्नधान्य आणि साखरेची वाहतूक करणाऱ्या एकाही ट्रकची वाहतूक झालेली नाही. रोज अन्नधान्याचे ५ ट्रक आणि साखरेचे ७ ट्रक येतात. मंगळवारी संध्याकाळपर्यंत यातील एकाही ट्रकची आवक झाली नाही. कांदा-बटाट्याचे केवळ ९ ट्रक आले, तर फळांचे १८ ट्रक आले. दूध आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीवर मात्र फारसा परिणाम झालेला नाही.

चक्कजाम आंदोलनाचा फटका कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींनाही बसला आहे. एमआयडीसींमध्ये रोज कच्च्या मालाचे २०० ट्रक येतात. गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, कर्नाटक, राजस्थान येथून येणारा कच्चा माल पोहोचलेला नाही. याशिवाय तयार माल गोडावूनमध्ये असल्याने ३० टक्के काम थांबविण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे. आणखी चार दिवस वाहतूक बंद राहिल्यास कच्च्या मालाची टंचाई निर्माण होऊन काही कारखाने बंद राहतील, अशी माहिती स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली. या आंदोलनाचा मोठा फटका इचलकरंजीतील कापड उद्योगाला बसत आहे. कापूस, सुताच्या गाठी आणि कापड यांची उलाढाल मंदावली आहे. आणखी तीन ते चार दिवस हीच स्थिती कायम राहिल्यास रोजची कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबणार आहे. दरम्यान, वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनाला मंगळवारी धान्य व्यापारी असोसिएशनसह डिझेल, पेट्रोल विक्रेत्यांनीही पाठिंबा दिला.

०००

डिझेल विक्री ७० टक्के घटली

वाहतूकदारांच्या आंदोलनाचा फटका डिझेल विक्रीला बसला आहे. जिल्ह्यात २५० पेट्रोल पंप आहेत. यातील महामार्गावरील पंपांवरून होणाऱ्या डिझेल विक्रीत कमालीची घट झाली. केवळ ३० टक्के डिझेल विक्री झाली आहे. एक दिवस पेट्रोल-डिझेल खरेदी बंद ठेवून चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्याचा विचार राज्य स्तरावर इंधन विक्रेत्यांकडून सुरू होता. मात्र, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत याबाबत अंतिम निर्णय झाला नाही. खरेदी बंदचा निर्णय झाल्यास जिल्हा प्रशासनाला पूर्वकल्पना देऊन याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली.

०००

जिल्ह्यातील वाहतुकीची स्थिती

प्रकार सामान्य स्थितीतील आवक (ट्रक) मंगळवारची आवक टक्केवारी

अन्नधान्य ५ ० ०

साखर ७ ० ०

दूध ६० ५० ८३

कांदा-बटाटा ४० ९ २२

फळे ९३ १८ १९

पेट्रोल-डिझेल १९५ १४४ ७४

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहाजणांवर गुन्हे दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात जमावबंदी, रास्ता रोको, रस्त्यावर टायरी पेटविल्याप्रकरणी पोलिसांनी सहाजणांवर मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. त्यासह एकूण ३३ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. रणजित पांडुरंग मोरसकर (वय ३७, रा. १३०९, ए वॉर्ड, रंकाळा टॉवर), नंदकुमार आनंदराव यादव (वय ५० रा. १९६९ ए वॉऱ्, रंकाळा टॉवर), गणेश आनंदराव सुतार (वय ३७, रा. २०२१ ए वॉर्ड, रंकाळा टॉवर), शुभम सुरेश लोहार (वय २१, रा. २३ ए वॉर्ड, रंकाळा टॉवर), विजय विष्णू लोहार (वय ३३ रा. २३, ए वॉर्ड, रंकाळा टॉवर), महेश अशोक लोहार (वय ३३ रा. २३, ए वॉर्ड, जाऊळाचा गणपतीशेजारी) अशी त्यांची नावे आहेत. रंकाळा टॉवर येथील क्रांती बॉईज मंडळाचे हे सर्व कार्यकर्ते आहेत. या सर्व संशयितांनी रंकाळा टॉवर या ठिकाणी रंकाळा ते गगनबावडा रोडवर बेकायदेशीरपणे जमाव जमवून रस्त्यावर टायरी पेटविल्या. घोषणाबाजी करुन वाहतुकीला अडथळा केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल सुहास पोवार यांनी फिर्याद दाखल केली. जुना राजवाडा पोलिसांनी राहुल इंगवले, परेश भोसलेसह १३ जणांना ताब्यात घेतले. बिनखांबी गणेश मंदिर येथे परेश भोसले, राहुल रावसाहेब इंगवले, निरंजन पाटील, संजय कुरळे, राकेश दत्तात्रय माने, आकाश नवरुखे, अभिजित सूर्यंवंशी यांना ताब्यात घेऊन दुपारी सोडून दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कीटकनाशक दुर्घटनेतील कुटुंबाला पाच लाखांची मदत

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet : satishgMT

कोल्हापूर : शेतात कीटकनाशक फवारणी करीत असताना विषबाधा झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारने या संदर्भात अधिसूचना काढली असून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

विदर्भात बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला होता. बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत व्हावी, अशी मागणी सातत्याने होत होती. यासाठी नागपूर खंडपीठात २०१७ मध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार सरकारने कीटकनाशक फवारणी करताना झालेल्या विषबाधेत मृत्युमुखी पडणाऱ्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी २००४ मध्ये काढलेल्या अध्यादेशात सुधारणा केली आहे. जुन्या अध्यादेशानुसार दहशतवादी व नक्षलवादी कारवायांत मृत्युमुखी पडलेल्या व जखमींना मदत दिली होती. या आदेशात सुधारणा करत शेतात कीटकनाशक फवारणी करत असताना विषबाधा होणारी दुर्घटना, सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या चेंगराचेंगरीच्या घटना, निवासी इमारती कोसळण्याच्या घटनांमध्ये बाधित होणाऱ्या आपदग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी ऊस व भाजीपाल्यावर कीड पडू नये यासाठी कीटकनाशकांची फवारणी करतात. उसावर लोकरी मावा, शेंडा मुरगुळणारी अळी, हुमणी, नदीकाठावरील शेतात पाने खाणारी अळी, जमिनीला बुरशी आल्यावर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. अनेक कंपन्याची कीटकनाशके प्रमाणित नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. कीटकनाशक फवारणी करताना बूट, प्लास्टिक कोट, डोळ्याला गॉगल, हॅन्डग्लोव्हज, टोपी घालण्याची सूचना केलेली असते. अनेकवेळा ही सूचना पाळली जात नाही. काहीवेळा कीटकनाशकांचा नायनाट करण्यासाठी दोन कीटकनाशके एकत्र करून डोस दिला जातो.

कीटकनाशके नाकावाटे फुफ्फुस व रक्तात जाऊन विषबाधा होते. अशावेळी वेळेत उपचार झाल्यास शेतकरी बरा होतो, पण तत्काळ व वेळेत उपचार न झाल्याने विषबाधेमुळे दगावण्याच्या घटना घडतात. जिल्ह्यात अनेक शेतकरी यापूर्वी कीटकनाशकांच्या फवारणीत मृत्युमुखी पडले आहेत. अशा घटनांत मृत्युमुखी पडलेल्यांना यापूर्वी कोणतीही मदत मिळत नव्हती. पण आता सरकारने अशा घटनेनील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. फवारणी करताना डोळे, कानावर परिणाम होऊन अवयव निकामी झाल्यास ५० हजार ते दोन लाख रुपयांची मदत मिळू शकते. पण अशी मदत मिळवण्यासाठी सरकारने अटी घातल्या आहेत. मृत्यूचे कारण प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. मृत व्यक्ती पोलिसांकडील गुन्ह्यात आरोपी नसावा, अशी अट घातली आहे. वस्तुस्थिती व कागदपत्रांची छाननी करून मदत देण्याचे आधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

००००००

सरकारने मदत देण्याचा आदेश काढला असला तरी त्याची अंमलबजावणी कशी होते यावर बरेच अवलंबून आहे. पण मदतीपेक्षा शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घेण्याची गरज आहे. तसेच प्रमाणित नसणाऱ्या कीटकनाशक कंपन्यावर कारवाई केली पाहिजे.

सुधाकर चव्हाण, शेतकरी

००००

बोंडअळीवरील कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने अध्यादेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून केली जाईल.

संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

००००

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधा झाल्यावर शेतकऱ्यांना उलट्या होतात. उलट्या झाल्यानंतर बाधित व्यक्तीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करावे. सध्या उपचाराच्या चांगल्या सुविधा असल्याने विषबाधेपासून शेतकरी वाचण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.

डॉ. प्रवीण नाईक

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरक्षण आमच्या हक्काचे...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक दिली, त्याला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे', 'फडणवीस सरकार चले जाव' अशा घोषणा देत जिल्ह्यातून मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम, रास्ता रोको, रस्त्यात टायर पेटविल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. हातकणंगले येथे सांगली-कोल्हापूर मार्गावर चक्काजाम केला. यावेळी जमावाने पाच बसची तोडफोड केली. तसेच मजले खिंड येथे दोन बस फोडल्या. एसटी, वडाप सेवा बंद झाल्याने शाळा, महाविद्यालये बंद होती. अपवाद वगळता बंद शांततेत पार पडला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

००००

कागलमध्ये शंभर टक्के प्रतिसाद

कागल : बंदला कागलमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. आंदोलकांनी दुकाने बंद न करणाऱ्या एका दुकानावर दगडफेक केली. तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. एसटी, केएमटी वाहतूक बंद केल्याने नोकरदार, विद्यार्थ्यांचे व प्रवाशांचे हाल झाले. नगरसेवक नितीन दिंडे, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, संभाजी ब्रिगेडचे नितीन काळबर, किरण मुळीक, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, नगरसेवक विशाल पाटील, नाना बरकाळे, सागर घाटगे आदींच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीयांनी शहरात फिरून बंदचे आवाहन केले. बहुतांशी व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. माळभागावरील टायर दुकानमालकाने आंदोलकांबरोबर हुज्जत घातली. संतप्त आंदोलकांनी दारात उभ्या असलेल्या कारवर दगडफेक करून काचा फोडल्या. यामध्ये तीन कारचे नुकसान झाले. एसटी, केएमटी बसेस तसेच वडापची वाहने बंद झाल्याने शाळा, महाविद्यालये बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या गावी परतणे मुश्कील झाले.

००००

हातकणंगलेत पाच बस फोडल्या

हातकणंगले : हातकणंगले येथे सांगली-कोल्हापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले, तर तालुक्यातील अनेक गावांत कडकडीत बंद पाळून सरकारचा निषेध व्यक्त केला. सकाळी नऊ वाजल्यापासून युवक हातात भगवे ध्वज घेऊन सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा देत रस्त्यावर उतरले. आक्रमक युवकांनी पाच बसेसवर दगडफेक करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. इचलकरंजीसह अन्य आगारांनी बससेवा तत्काळ थांबविण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांना सुमारे दोन तास त्रास भोगावा लागला. हातकणंगलेत पाच तिकटीवरून सरकारविरोधात घोषणा देत मोठा जमाव हातकणंगले पेठा भागावर येऊन चक्काजाम आंदोलनास सुरुवात केली. यावेळी अनेक वाहने दोन्ही बाजूला अडविण्यात आल्याने महामार्गावर मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या. मात्र, गडहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व जयसिंगपूर उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे, हातकणंगले पोलिस निरीक्षक एस. एल. डुबल यांनी मराठा समाजातील आंदोलकांशी चर्चा करून महामार्ग वाहतुकीस मोकळा केला.

०००००००

पेठवडगावात निषेध मोर्चा

हातकणंगले : पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथे मराठा समाजाचे कार्यकर्ते शिवाजी चौकात एकत्र जमले. यावेळी डॉ. अभय यादव, संजय शिंदे, संतोष ताईगडे, हणमंतराव पाटील, सत्त्वशील जाधव, सुनील हुक्केरी आदींची भाषणे झाली. समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद न करता दुकाने सुरू करावीत असे आवाहन केले. त्यामुळे वडगाव शहरातील दिवसभर व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. आंदोलनात राजन शेटे, राजाराम यादव, अभिनंदन सालपे, धनाजी केर्लेकर, अजय शिंदे, सतीश पन्हाळकर, आदी उपस्थित होते.

००००

चंदगडमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको

चंदगड : बंदचे चंदगड तालुक्याही तीव्र पडसाद उमटले. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हलकर्णी फाटा, पाटणे फाटा, चंदगड, अडकूर, तुर्केवाडी, कारवे, कोवाड व शिनोळी फाटा या प्रमुख बाजारपेठा बंद करून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी गावागावातील व्यवहार बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. चंदगड शहरात नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजी चौकात रास्ता रोको करून आंदोलकांनी मोर्चाने जाऊन तहसीलदार शिवाजी शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिले. हलकर्णी फाटा येथे संदीप पाटील, संदीप नांदवेडकर, पिनू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हलकर्णी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.

दरम्यान, मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी पुन्हा एकदा पेटून उठण्याची वेळ आली आहे. त्यासाठी चंदगड तालुक्यातून भक्कम लढा उभारण्याची गरज आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या नियोजनासाठी व दिशा देण्यासाठी रविवारी (ता.२९) व्ही. के. चव्हाण महाविद्यालयाच्या हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता नियोजन बैठक आयोजित केली आहे. बैठक समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे केले आहे.

००००

इचलकरंजीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : बंदला इचलकरंजीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. किरकोळ प्रकार वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंदचे आवाहन करत युवक दुचाकीसह रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे काही काळ एसटी, रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात निदर्शने करण्यात आली. चौकात मोठा जमाव एकत्र आल्यानंतर एसटी बससेवा बंद ठेवली. त्यामुळे शेकडो प्रवाशी बसस्थानकातच खोळंबले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चौकाचौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. बंद कालावधीत आंदोलकांनी बसेसवर दगडफेक करू नये, अशा सूचना समन्वयकांनी दिल्याने दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

०००००००००

तमदलगे खिंडीत दोन बसची तोडफोड

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली मार्गावर तमदलगे खिंडीत दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत चालक संपत शिवाजी भोई यांनी जयसिंगपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. दुपारी एसटी (एम.एच. १४ बीएल ४१६०) विजापूरहून कुडाळकडे जात होती, तर एसटी (एम.एच.१४ बीटी ३१०१) पंढरपूरहून कोल्हापूरकडे जात होती. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही बसेस तमदलगे खिंडीत अडविण्यात आल्या. प्रवाशांना खाली उतरवून एसटीवर दगडफेक केली. यामध्ये काचा फुटल्या आहेत.

००००००००००००००

कोडोली-वारणात शांततेत बंद

शिराळा : पन्हाळा तालुक्यातील कोडोली व वारणानगर येथे सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शांततेत बंद पाळण्यात आला. गावातून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार कडकडीत बंद होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून कोडोली-वारणातील मुख्य रस्त्यावर दुचाकी रॅली काढून बंदचे आवाहन केले. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. यावेळी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेच्या मार्गाने पाळला.

०००००

गडहिंग्लज, भोगावती आज बंद

गडहिंग्लज : मंगळवारी गडहिंग्लजमध्ये बंदला अल्प प्रतिसाद लाभला. महागाव (ता. गडहिंग्लज) येथे व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. किराणा दुकानदारांसह संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. नूल येथे बसस्थानक परिसरात सरकारचा निषेध करण्यात आला. दरम्यान, सकल मराठा समाजातर्फे उद्या (बुधवार) गडहिंग्लज बंदची हाक दिली आहे. शहरातील सर्व व्यवहाराबरोबरच शाळा-महाविद्यालये व बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा आशयाचे निवेदन नागेश चौगुले यांनी प्रसिद्धीस दिले आहे. बुधवारी सर्व मराठा बांधव सकाळी दहा वाजता दसरा चौकात एकत्र येऊन निषेध नोंदविण्यात येणार आहे.

आज भोगावती बंद

राधानगरी : मराठा समाज आरक्षण प्रश्नाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी भोगावती साखर कारखाना व्यापार मित्र मंडळाने बाजारपेठ बंद राहणार असल्याची माहिती व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे. मंगळवारी भोगावती, राशिवडे, राधानगरी येथील बाजारपेठा सुरू होत्या. मात्र, सरवडे, सोळंकूर येथील बाजारपेठा बंद होत्या. व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. सरवडे, सोळंकूर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंगळवारी गुरुवंदना संगीत मैफल

$
0
0

'प्रतिज्ञा' तर्फे मंगळवारी

गुरुवंदना संगीत मैफल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था आणि स्वरअविनाशी यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्य परिवारातर्फे गुरुपौर्णिमेचे आौचित्य साधून गुरुवंदना संगीत मैफिलींचे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. ३१) देवल क्लब येथे सकाळी नऊ व सायंकाळी पाच वाजता अशा दोन सत्रात मैफील होणार आहे, अशी माहिती डॉ. आनंद धर्माधिकारी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

डॉ. धर्माधिकारी म्हणाले, 'संगीत मैफिलीमध्ये शुभम खंडाळकर , विनय रामदासन, देविका पणशीकर, अश्विनी पुरोहित, सौरभ काडगावकर (पुणे), अच्युत जोशी (अमेरिका), राधिका जोशी (बेंगळूरु) यांचे गायन होणार आहे. गिरीधर कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी यांची तबला साथ असून संवादिनी साथ रोहित मराठे व अमित साळोखे करणार आहेत. रमेश सुतार ध्वनीसंयोज, नेपथ्य मिलिंद अष्टेकर व प्रकाशयोजनेची जबाबदारी रोहन घोरपडे यांच्याकडे देण्यात आली आहे.'

प्रशांत जोशी म्हणाले, 'मैफिलींसाठी प्रवेश मूल्य ऐच्छिक असून संगीत मैफिलींतून जमा होणारी रक्कम शास्त्रीय संगीत शिकू इच्छित असणाऱ्या पण आर्थिक परिस्थितीअभावी शास्त्रीय संगीत शिक्षण घेऊ शकत नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांचे शुल्क देण्यासाठी दिली जाणार आहे.' गुरुवंदना मैफिलीस पंडित रघुनंदन पणशीकर, अरुण कुलकर्णी, डॉ. भारती वैशंपायन आदी उपस्थित राहणार आहेत. पत्रकार बैठकीस सुधीर अलगौडर, प्रसाद कुलकर्णी, सतीश साळोखे, बाळासाहेब कदम, रमेश सुतार, महेश सोनुले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दैनंदिन व्यवहाराची नोंद आवश्यकच

$
0
0

किराणा आणि भुसारी व्यापारी असोसिएशनचे चर्चासत्र

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जीएसटीला सामोरे जाताना किरकोळ दुकानदार व व्यावसायिकांनी दैनंदिन व्यवहाराची नोंद ठेवणे ही काळाची गरज आहे', असे प्रतिपादन एनबीडी इन्फोटेकचे अभिजीत भोसले यांनी केले. किराणा आणि भुसारी व्यापारी असोसिएशनने आयोजित केलेल्या टॅली सॉफ्टवेअर प्रणालीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे सचिव किरण शहा व खजिनदार बबन महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्यमनगर येथील रामभाई सामाणी सभागृहात चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी अभिजित भोसले यांनी किरकोळ व्यापारी व दुकानदारांसाठी जीएसटीतील नवीन तरतुदीची माहिती दिली. दैनंदिन व्यवहाराची नोंद ठेवण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'देशात पाच कोटीपर्यंत व्यवहार करणारे ९३ टक्के व्यावसायिक आहेत. सरकारने या व्यावसायिकांवर लक्ष केंद्रीत करुन त्यांना जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी पावले उचलली आहेत. नवीन उपाययोजनेत पाच कोटी रुपयांपर्यंत व्यवहार करणाऱ्या व्यापारी व दुकानदारांना रिटर्न भरण्यातील अडचणी दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रोजच्या रोज व्यवहार करण्यासाठी संगणकीय प्रणाली वापरणे ही काळाची गरज ठरणार आहे.' त्यासाठी टॅली सॉफ्टवेअरमधील यंत्रणेची माहिती भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर गायकवाडचा अर्ज फेटाळला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आणि जामिनावर बाहेर असलेल्या समीर गायकवाडने एका साक्षीदार विरोधात दाखल केलेला तपासी अर्ज मंगळवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. या प्रकरणी गायकवाडने दोन वेळा खासगी फिर्याद दाखल केली होती.

पानसरे हत्या प्रकरणातील एक साक्षीदार हा पूर्वी शस्त्रास्त्रांची विक्री करत असल्याने त्याला आरोपी करावे, अशी खासगी फिर्याद समीर गायकडवाडने जुना राजवाडा पोलिसांत दिली होती. या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात झाली होती. या न्यायालयाने हा तपासी अर्ज फेटाळल्यानंतर गायकवाडने या विरोधात जिल्हा न्यायालयात अपील केले होते. याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांच्या न्यायालयात दोन वेळा झाली. पुन्हा मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर निंबाळकर यांनी गायकवाडचा तपासी अर्ज नामंजूर केला. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. ए. एम. पिरजादे आणि साडविलकर यांच्यातर्फे अॅड. क्षीतिज सामंत, अॅड. प्रशांत सामंत यांनी काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिप्रियाच्या इंजिनचे चाक घसरले

$
0
0

हरिप्रियाच्या इंजिनचे

चाक घसरले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तिरुपती-कोल्हापूर या हरिप्रिया एक्सप्रेसच्या इंजिनचे चाक रुळावरून घसरले. हा प्रकार मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडला. चालकाने तातडीने जागेवरच इंजिन थांबवले. यानंतर अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर इंजिन रुळावर आणण्यात यश आले. दरम्यान, दुसरे इंजिन जोडून हरिप्रिया एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली.

तिरुपतीहून येणारी हरिप्रिया एक्सप्रेस सोमवारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमध्ये दाखल झाली होती. मंगळवारी सकाळी पुन्हा ही एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर आणली जात होती. यावेळी प्लॅटफॉर्म नंबर एकवर इंजिनचे चाक रुळावरून घसरले. हा प्रकार लक्षात येताच चालकाने इंजिन थांबवले. यानंतर चालकाने घटनेची माहिती स्टेशन प्रबंधकांना कळवली. मिरज जंक्शन येथील ५० कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे विशेष पथक कोल्हापूर रेल्वे स्थानकात दाखल झाले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर इंजिन पुन्हा रुळावर घेण्यात यश आले. दरम्यान, दुसरे इंजिन जोडून हरिप्रिया एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात आली. इंजिनीअर एल. व्ही. जाधव, वाहतूक अधिकारी विवेक कुमार, स्टेशन प्रबंधक ऑस्टिन फर्नांडिस, आदींनी इंजिन रुळावर घेण्याचे काम केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध दरवाढ अंमलबजावणी एक ऑगस्टपासून

$
0
0

दूध दरवाढ अंमलबजावणी

एक ऑगस्टपासून

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची अंमलबजावणी एक ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. मुंबई येथे दुग्ध आयुक्त कार्यालय व राज्यातील दूध संघ प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर २५ रुपये दर द्यावा, असा आदेश राज्य सरकारने काढला आहे. या संदर्भात धोरण ठरवण्याबाबत मुंबईत बैठक झाली. यावेळी दुग्ध आयुक्त आर.डी. शिंदे यांनी सरकारच्या अध्यादेशाची माहिती देत दूध संघ प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले. गायीच्या दुधापासून एक किलो पावडर तयार केल्यानंतर पाच रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच दूध उत्पादकाला प्रतिलिटर २५ रुपये दर दिला पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले. दूध दरवाढीची अंमलबजावणी २१ जुलैपासून करण्यास तांत्रिक अडचणी येणार असल्याने एक ऑगस्टपासून दरवाढीची अंमलबजावणी करण्याची दूध संघाची आयुक्तांनी मान्य केली. ३.५ फॅट व ८.५ एसएनपीच्यावरील गायीच्या दुधाला ३० पैसे जादा देण्याचे मान्य करण्यात आले. तसेच ग्राहकाला दर्जेदार दूध उपलब्ध करुन देण्यासंदर्भात दूध संघ प्रतिनिधींच्यात चर्चा झाली. दुधातील फॅट, प्रोटिन्ससह अन्य पोषक मूल्यांची माहिती दूध पिशवीवर देण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यात आला. बैठकीला महानंदचे अध्यक्ष विनायक पाटील, जिल्हा दूध संघ गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह राज्यातील २०० दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता मूक नव्हे ‘ठोक आंदोलन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजास आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर ५८ मोर्चे शांततेत काढले. तरीही सरकार आरक्षण देण्यासंबंधी दिरंगाई करीत असल्याची भावना मराठा समाजात झाली. म्हणून मंगळवारपासून दसरा चौकात भव्य मंडप उभारून ठिय्या आंदोलन सुरू केले असून मूक नव्हे ठोक आंदोलन अशी भूमिका घेत समाज आक्रमक झाला आहे. परिणामी आंदोलनाची पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. आरक्षणाचा लढा व्यापक, तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात, जिल्हयात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

आरक्षणासाठी औरंगाबाद येथील आंदोलक तरूणाने जलसमाधी घेतली. त्यानंतर पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूर शहर, जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. सात बसेसवर दगडफेक करून उद्रेक व्यक्त करण्यात आला. शहरात युवकांनी बंदसाठी आवाहन करण्यासाठी काढलेल्या रॅलीदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मराठा समाजाचे अनेक गट स्वतंत्रपणे मोटारसायकल रॅली काढून आवाहन करत होते. हातात भगवे ध्वज, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले. यामुळे शहरातील बंदला प्रतिसाद मिळाला.

दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी दिवसभर मोठी गर्दी राहिली. यामुळे चौकातील रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जवळच सीपीआर असल्याने रूग्णवाहिकेची वर्दळ राहिली. मात्र रूग्णवाहिका आल्यानंतर त्याला आंदोलकांनी वाट करून दिली. त्यामुळे रूग्ण उपचाराला व्यत्यय आला नाही. आंदोलनाच्या ठिकाणी शाहिरी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे गाऊन स्फूर्तीदायक वातावरण निर्माण केले. बुधवारपासून आंदोलन व्यापक, तीव्र करण्याचे नियोजन आयोजकांनी केले आहे. त्यासाठी सायंकाळी आयोजकांनी बैठक घेत व्यूहरचना केली. व्यासपीठावरील फलकावर 'मूक' शब्दावर फुली मारून 'मराठा ठोक आंदोलन' असे केलेले वाक्य लक्षवेधी ठरले.

आंदोलनात माजी आमदार सुरेश साळोखे, उपमहापौर महेश सावंत, शिवसेनेचे विजय देवणे, चंद्रकांत जाधव, शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने, सत्यजित कदम, संजय मोहिते, प्रा. जयंत पाटील, अॅड. गुलाबराव घोरपडे, काँग्रेसचे सुरेश कुराडे, रिया पाटील, पी. जी. मांढरे, अॅड. प्रकाश मोरे, किशोर घाटगे, फत्तेसिंह सावंत, राजू सावंत, उत्तम जाधव, शाहीर दिलीप सावंत, स्वप्निल पार्टे, रणजित आयरेकर, संदीप पाटील, बंडा साळुंखे, संजय पोवार, सरिता मोरे, रविकिरण इंगवले, चारूशिला चव्हाण आदींनी पाठिंबा दिला.

-----------

पोलिस छावणीचे स्वरूप

दसरा चौकातील आंदोलनस्थळी पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. साध्या गणवेशातील पोलिस गोपनीयपणे हालचालींवर लक्ष ठेवून होते. सायंकाळी पाचनंतर बंदोबस्त कमी करण्यात आला. मात्र आंदोलकांवर नजर ठेवण्यासाठी दोन पोलिस वाहने थांबून होती.

--------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीरपत्नी असल्याचा अभिमान

$
0
0

कारगिल विजय दिन ... लोगो

......................

कारगिल युध्दातील शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लग्न होऊन दोन महिने झाले होते. संसाराची स्वप्नं डोळ्यासमोर तरळत होती. कारगिल युध्दाला सुरुवात झाली होती. पती सैन्यदलात नोकरीस असल्याने ११ जून रोजी ते देशसेवा करण्यासाठी परतले. १९ जूनला सेवेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी सुखरुपणपणे पोहचल्याचे पत्रही पाठविले. मात्र २८ जून रोजी त्यांना वीरमरण आलं, आणि त्यांच्या ख्याली खुशालीचं पत्र त्यानंतर पोहचलं. सुरुवातीला काही महिने प्रचंड टेन्शनखाली होते. पण आपला पती देशसेवा करताना शहीद झालाय, सीमेच्या संरक्षणासाठी हौतात्म्य पत्करलेय. अभिमान वाटतोय, वीरपत्नी असल्याचा,' ही भावना आहे, वीरपत्नी श्रीमती सविता अशोक बिरंजे यांची.

कारगील युध्द होऊन १९ वर्षे झाली. २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा होतो. या विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला शहीद जवानांच्या कुटुंबांशी 'महाराष्ट्र टाइम्स' ने संवाद साधला. कारगिल युध्दात गडहिंग्लज तालुक्यातील वैरागवाडी येथील अशोक बाबूराव बिरंजे आणि पन्हाळा तालुक्यातील कळे येथील मच्छिंद्र रामचंद्र देसाई यांनी प्राणांची आहुती दिली. गावकऱ्यांनी वेगवेगळया माध्यमातून या दोन्ही जवानांच्या स्मृती जपल्या आहेत. १९ व्या 'विजय दिना'च्या निमित्ताने सर्वत्र कारगिल युध्दातील वीरांचे स्मरण केले जाते. कारगील युध्दात शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना गावकऱ्यांनी एकत्र येऊन स्मारके साकारली. शहीद जवानांच्या नावांनी वाचनालये सुरू केली. गावच्या प्रवेशव्दाराला शहीद जवानांचे नाव देऊन अभिवादन केले आहे. कारगील युध्दात शहीद झालेले अशोक बिरंजे हे जिल्ह्यातील पहिले जवान.

त्यांच्या स्मृती जपताना कुटुंबीयांनी समाजाकडून मिळालेल्या मदतीतून गावात स्मारक उभारले आहे. शहीद जवान बिरंजे यांचा ६५ किलो वजनाचा पंचधातूचा पुतळा तयार केला आहे. 'विजय दिवसा'च्या पूर्वसंध्येला वीरपत्नी सविता यांनी अशोक बिरंजे यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या, 'माहेर व सासर अशा दोन्ही कुटुंबांत सैनिकी वारसा लाभलेला. २५ एप्रिल १९९९ रोजी आमचा विवाह झाला होता. कारगिल युध्द सुरू असल्याने ११ जूनला पुन्हा पती सैन्यात परतले. त्यावेळी मोबाइल नव्हते. गावात दोन, तीन कुटुंबांकडे फोनची सुविधा. पती सैन्यात परतल्यानंतर त्यांनी पत्रही पाठविले होते. २८ जून रोजी त्यांना शत्रूशी लढताना हौतात्म्य आले. सोमवारी ही घटना घडली होती. मात्र युध्दात त्यांनी गोळी लागून जखमी झाले आहेत इतकीच माहिती आम्हाला दिली. गुरुवारी पार्थिव गावात आणल्यानंतर पती शहीद झाल्याचे समजले आणि खूप मोठा धक्का बसला. मात्र कुटुंबांचे पाठबळ, समाजाची साथ यामुळे मानसिक आधार लाभला.वीरपत्नी म्हणून सर्वत्र आदर मिळतो. वीरपत्नी असल्याचा अभिमान वाटतो.'

..........

राज्यातील २५ जवान शहीद

पाकिस्तानने १९९९ मध्ये भारतीय हद्दीत प्रवेश करुन महत्वाची ठाणी बळकावली होती. कारगिल सेक्टरसारख्या अतिउंचावरील प्रदेशातील पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी हुसकावून लावण्यासाठी भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय'मोहिम राबवली. जवळपास तीन महिने चाललेल्या या युध्दात भारतीय जवानांनी पराक्रमाची शर्थ करत घुसखोरांना हुसकावून लावले. सर्व ठाण्यांवर तिरंगा फडकाविला. 'ऑपरेशन विजय'मोहीम फत्ते करण्यासाठी ५४३ भारतीय अधिकारी व जवानांनी प्राणांची आहुती दिली. महाराष्ट्रातील २५ जवानांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्य निधी कार्यालयातर्फे लोक अदालतीचे आयोजन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाकडून 'निधी आपके निकट' या लोक अदालतीचे आयोजन केले आहे. १० ऑगस्टला कोल्हापुरात ताराबाई पार्कातील भविष्य निधी कार्यालयात ही लोक अदालत होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना किंवा संस्थांना पेन्शनसंदर्भात काही तक्रार असेल तर, त्यांनी सहायक भविष्य निधी आयुक्त यांच्या नावे ३१ जुलैअखेर तक्रारी सादर कराव्यात. तक्रारीच्या लखोट्यावर 'निधी आपके निकट' असा उल्लेख करावा. १० जुलैला सकाळी साडेदहा ते एक या वेळेत वैयक्तिक कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल. दुपारी तीन ते चार या वेळेत आस्थापनांच्या प्रतिनिधींच्या तक्रारींचे निवारण होईल, तर दुपारनंतर चार ते पाच या वेळेत सवलतप्राप्त आस्थापनांचे मालक आणि प्रतिनिधींच्या तक्रारींचे निवारण केले जाणार आहे. संबंधितांनी जुलैअखेर तक्रारी पाठवून लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त मुकुल पाटगावकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशी बंद शांततेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी बुधवारी ठिकठिकाणी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन केल्याने वाहतूक सेवा विस्कळीत झाली. आंदोलकांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच औरंगाबाद येथे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून निषेध मोर्चे काढले. हुपरीत १६९ मराठा आमदारांना प्रतीकात्मक जलसमाधी दिली, तसेच जयसिंगपूरमध्ये ठिय्या आंदोलन करून सरकारचा निषेध केला. मुरगूड शहरात रॅली काढून राधानगरी-निपाणी मार्गावर रास्ता रोको केला. गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंद पाळून, तसेच सांगरूळ फाटा, हळदी तसेच भोगावती येथे रास्ता रोको करून सरकारचा निषेध व्यक्त केला. मात्र, कोठेही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला.

मराठा आरक्षणप्रश्‍नी प्रसंगी

आमदारकीचा राजीनामा

आमदार उल्हास पाटील यांचा सरकारला इशारा

जयसिंगपूर : आरक्षणप्रश्‍नी जयसिंगपुरात मराठा समाजबांधवांनी धरणे आंदोलन केले. आक्रमक आंदोलकांनी क्रांती चौकात ठिय्या मारला. आंदोलनादरम्यान एकवटलेले आंदोलक पाऊस पडूनही रस्त्यावरून हटले नाहीत. शिरोळ तालुक्यातील विविध पक्ष, संघटनांच्या प्रमुखांनी आंदोलनास्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. 'आजवर सरकारने लाखा-लाखांचे मूकमोर्चे बघितले. शांततामय मार्गाने मोर्चा काढता येतो, हे सरकारने अनुभवले. मात्र, तरीही सरकारला जाग येत नाही. सरकारने मराठा समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये. मराठ्यांना त्यांचा आरक्षणाचा अधिकार देऊन टाकावा. सत्ताधारी पक्षात असलो, तरी वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी प्रसंगी आमदारकीचा राजीनामा देऊ,' असा सरकारला इशारा देऊन शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

सकाळी नऊपासूनच शहर व परिसरातील मराठा युवक व कार्यकर्ते क्रांती चौकात जमण्यास सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्यास वंदन करून जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाची सुरुवात झाली. नगरसेवक सर्जेराव पवार यांनी धरणे आंदोलनाबाबतची भूमिका विशद केली. ठिय्या आंदोलनामुळे क्रांती चौकातून जाणारी वाहतूक अन्य मार्गांनी वळविण्यात आली होती. जयसिंगपूर गोंधळी समाजाच्या वतीने देवीचा जागर घालण्यात आला.

आंदोलनास 'शरद'चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, 'दत्त'चे अध्यक्ष गणपतराव पाटील, सुरेश पाटील, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजय मगदूम, धनगर समाजोन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अशोक कोळेकर, डॉ. अतीक पटेल, भाजपचे जिल्हा परिषद राजवर्धन नाईक-निंबाळकर, नगराध्यक्षा डॉ. नीता माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मिलिंद साखरपे, संतोष कांदेकर, बबन यादव आदींनी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, विठ्ठल मोरे, सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह पंचक्रोशीतील मराठा समाजबांधव उपस्थित होते.

०००००

फोटो...

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दसरा चौकात सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.

गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंद

गडहिंग्लज : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दसरा चौकात सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. नागरिकांनी दिवसभर सर्व व्यवहार बंद करीत आंदोलनाला पाठींबा दिला. तसेच शहरातील बहुतांश शाळा-महाविद्यालयांसह एसटी वाहतूक दिवसभर बंद ठेवली. शहरातील भडगाव पुलावर रस्ता रोको करण्यात आला. सकाळी साडेदहा वाजता शहरातील दसरा चौक परिसरात आंदोलनकर्ते दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात झाली. यावेळी सकल मराठा समाजातर्फे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोरी, नागेश चौगुले, नाभिक संघटनेचे चंद्रकांत शिंदे, प्राथमिक शिक्षक संघाचे संजय चाळक, किरण कदम, अॅड. दिग्विजय कुराडे, सोमगोंडा आरबोळे, बसवराज आजरी, राजेंद्र गड्यान्नावर, राजेंद्र तारळे, महेश सलवादे आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जैन संघटना, निंगुडगे व सरोळी ग्रामस्थ, आदींसह विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.

०००००

१६९ मराठा आमदारांना

प्रतीकात्मक जलसमाधी

हातकणंगले : हुपरी (ता. हातकणंगले) येथे सकल मराठा समाजातर्फे जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून राज्यातील १६९ आमदारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करून सूर्य तलावात त्यांना प्रतीकात्मक जलसमाधी दिली तसेच शहरातून मोर्चा काढून फडणवीस सरकारचा निषेध केला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भव्य मोर्चा व मराठा समाजाच्या आमदारांना प्रतीकात्मक जलसमाधी या अनोख्या आंदोलनाची चर्चा परिसरात झाली. सकाळी गावभागातील डॉ. सुभाषचंद्र बोस पुतळ्यासमोर हजारो समाजबांधव जमले. यावेळी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून मान्यवरांनी मराठा समाजाच्या १६९ आमदारांनी आरक्षणासाठी काय केले, हा प्रश्न उपस्थित करून तत्काळ खुर्च्या खाली करण्याचे आवाहन केले व आरक्षण देण्यास टाळाटाळ करणाऱ्या फडणवीस सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यानंतर आंदोलक मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून नवीन बसस्थानकाशेजारी असलेल्या सूर्य तलावावर आल्यानंतर १६९ मराठा आमदारांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जलसमाधी देऊन शंखध्वनी करत जय भवानी-जय शिवाजी, एक मराठा-लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

आंदोलनात नेताजी निकम, शिवाजी शिंदे, दिनकरराव ससे, राजू पिंपळगावकर, विनायक विभूते, राहुल मोरबाळे, नितीन गायकवाड, भरत मेथे, घनश्याम गायकवाड, मोहन वाईंगडे, प्रतापसिंह देसाई, लालासाहेब देसाई, शीतल घोरपडे, जयराम गायकवाड, अमित नरके, शिवराज नाईक, पोपट नाईक, अरुण गायकवाड, अमित गायकवाड

आदींसह हजारो मराठा बांधव उपस्थित होते. आंदोलनाला ज्येष्ठ नेते महावीर गाट, रिपाइंचे राज्य सचिव मंगलराव माळगे, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे,पक्षप्रतोद भरतराव लठ्ठे, शिवसेना शहरप्रमुख अमोल देशपांडे, भाजपचे शहराध्यक्ष सुदर्शन खाडे, विद्याधर कांबळे, नगरसेवक दौलतराव पाटील, ऋतुजा गोंधळी, गणेश वाईंगडे, आदींसह सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंदवला.

दरम्यान, हातकणंगले येथे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार कार्यालयासमोर सरकारचा निषेध करून दिवसभर ठिय्या आंदोलन केले. दुपारी जागेवरच जेवण करून भरपावसात आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. यावेळी हातकणंगले मराठा समाजातील सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होते.

०००००००

सांगरूळ फाटा, हळदीत रास्ता रोको

कुडित्रे : कुंभी साखर कारखान्याजवळील कोपार्डे येथील सांगरूळ फाट्यावर तसेच हळदी येथील शिवाजी चौकात सकल मराठा बांधवांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रास्ता रोको करून बंद पुकारण्यात आला. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प होते. कोपार्डे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर सांगरूळ फाट्यावर कोपार्डे व पंचक्रोशीतील मराठा समाजाच्या युवकांनी सांगरूळ फाट्यावर एकत्र येऊन अर्धा तास रास्ता रोको केला. पोलिसांनी विनंती केल्याने युवकांनी बंदचे आव्हान करत कुंभी-कासारी कारखान्यापर्यंत मोर्चा काढला. दरम्यान, परिसरातील शाळा, महाविद्यालये तसेच सर्व दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी कुंभी कारखान्याचे संचालक विलास पाटील, कुडित्रेचे सरपंच विजय पाटील, शिवसेना शाखाप्रमुख केतन पाटील यांची भाषणे झाली. मोर्चात बाजीराव देवाळकर, कोपार्डेचे उपसरपंच व्ही. जी. पाटील, सदस्य धनाजी पाटील, श्रीधर पाटील, शरद पाटील, पोपट शिंदे, युवराज पाटील, जालिंदर पाटील, सरदार पाटील, आदींसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हळदी येथे सकाळी दहा वाजता सकल मराठा बांधवांनी एकत्र येत मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. काही वेळ रास्ता रोको करून हळदी बंदची हाक दिली. त्यानुसार दिवसभर बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवून १०० टक्के बंद पाळण्यात आला. महाविद्यालयीन युवक-युवतींचा विशेष सहभाग होता. यावेळी संजयसिंह जाधव, भोगावती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, भोगावतीचे संचालक शिवाजी कारंडे, करवीर पंचायत समिती सदस्या अश्विनी धोत्रे, बाबासाहेब पाटील, पंकज पाटील, सचिन पाटील, निवास पाटील. आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००००००

मुरगूडमध्ये राधानगरी-निपाणी मार्ग रोखला

कागल ः मंगळवारी आठवडा बाजार असल्याने लोकांची गैरसोय नको म्हणून कालचा बंद मागे घेऊन बुधवारी मुरगूडात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शहरातून भव्य ठोक मोर्चा काढण्यात आला. सुमारे एक तास राधानगरी-निपाणी मार्गावर रास्ता रोको करुन सरकारविरोधातील आपला रोष व्यक्त केला. बंद शांततेत पार पडला. सकाळी अकरा वाजता नगरपालिकेसमोरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आणि आंदोलनात बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सुरुवात झाली. मोर्चेकर्‍यांनी सरकारच्या विरोधातील तीव्र शब्दात निषेधाच्या घोषणा दिल्या. मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने अन्याय झाल्याची संतप्त भावना समाजातील तरुण वर्गाच्या आक्रोशातून स्पष्ट जाणवत होती. मोर्चा एसटी बसस्थानक ते मुख्य बाजारपेठेतून नाका क्र. १ पर्यंत आल्यानंतर निपाणी -राधानगरी मार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको केला. त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगाही लागल्या होत्या. मोर्चात समाधान हेंदळकर, दिग्विजय चव्हाण, संतोष भोसले, संजय भारमल, पांडुरंग चव्हाण, जोतीराम सूर्यवंशी, राजू चव्हाण, डॉ दत्ता कदम, आदींसह नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्ष नामदेव मेंडके पक्ष प्रतोद जयसिंग भोसले, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळे आजी-माजी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

००००००००००००

भोगावती, राशिवडेत उत्स्फूर्त बंद

राधानगरी : भोगावती कारखाना परिसरात सर्व बाजार पेठ बंद करण्यात आल्या. मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भोगावती व्यापारी मंडळाने बंद ची हाक दिली होती. सकाळी नऊ वाजता परिसरातील गावातील कार्यकर्ते भोगावती कारखाना स्थळावर दाखल झाले आणि घोषणा दिल्या. ठिकपुर्ली-परिते फाट्यावर भोगावती येथील व्यापारी मंडळाचे सदस्य आणि सकल मराठा समाज कार्यकर्ते आक्रमक पवित्रा घेऊन सुमारे दोन तास कोल्हापूर-राधानगरी मार्गावरील वाहतूक रोखली. त्यामुळे भोगावती, राधानगरी, कोकण आणि ठिकपुर्ली मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. तालुक्यातील राशिवडे येथील मोठी बाजारपेठ बंद करून आणि गावातील सर्व व्यवहार ठप्प करून मराठा समाजाला आरक्षण आंदोलनास पाठिंबा दिला. सरवडे, सोळंकूर, कसबा वाळवे येथे मंगळवारी बंद पाळला.

०००००००

मराठा आरक्षणासाठी आज

चंदगड शहर, अडकूर बंद

चंदगड : सकल मराठा ठोक मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणाचा लढा तालुक्यातून उभारण्यासाठी व इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २६) चंदगड शहर व अडकूर बंद ठेवण्याचा निर्णय पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारचा चंदगड आठवडा बाजार बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेल्पलाइन कोट : महेश यादव, क्रिडाई

$
0
0

'अनेक गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांकडे केवळ पैसे नसल्याने शिक्षण पूर्ण होत नाही. अनेकांचे शिक्षण घेण्याचे स्वप्न अपुरे राहते. अशा विद्यार्थ्यांना आपल्या उत्पन्नातील किमान एक टक्का रक्कम प्रत्येकाने देण्याची गरज आहे. सामाजिक बांधलिकी म्हणून मदत केल्यास या विद्यार्थ्यांना आयुष्य उभे करण्याचे मोलाचे दान ठरणार आहे. अनेक संस्था, संघटना आणि वैयक्तिक पातळीवरही मदत करण्याची गरज आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'चा 'बळ द्या पंखांना' हा उपक्रम समाजमनात दातृत्वाचे बीज पेरणारा आहे.

महेश यादव, अध्यक्ष, क्रिडाई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेला खोडा

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी आणि मालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेची घोषणा केली. ग्रामीण भागातील अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जाहीर केलेल्या योजनेमध्ये जिल्ह्यातून दाखल झालेल्या १२० प्रस्तावांपैकी केवळ आठ प्रस्तावांना मान्यता दिली. मान्यता दिलेल्या प्रस्तावांना अद्याप कृषी विभागाकडून मंजुरी पत्रांची प्रतीक्षा असताना २०१८-१९ मध्ये पुन्हा नव्याने १४१ प्रस्ताव दाखल झाल्याने दोन्ही वर्षांचा प्रस्ताव धूळखात पडल्याने एकप्रकारे मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेला खोडा निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागातील युवकांनी लघू उद्योग करावा आणि दर्जदार कृषी मालाची गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना जाहीर केली. सोयाबिन, काजू, बेदाणे, काजू, राईस मिल यासाह टोमॅटोपासून सॉसनिर्मिती उद्योगाचा समावेश होता. दहा लाखांपासून ५० लाखांच्या प्रक्रिया उद्योगांसाठी ३० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडील हे अनुदान मशिनरीसाठी ६०, तर बांधकामासाठी ४० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानाची टक्केवारी जास्त असल्याने जिल्ह्यातून २०१७-१८ या पहिल्याच वर्षी तब्बल १२०, तर राज्यातून २०० प्रस्ताव दाखल झाले.

जिल्ह्यातून दाखल झालेल्या १२० प्रस्तावांपैकी केवळ आठ प्रस्तावांना कृषी आयुक्तालयाने मंजुरी दिली आहे. आठ प्रस्तावांना मंजुरी दिली असली, तरी त्यांना अद्याप मंजुरी पत्रे मिळालेली नाहीत. उर्वरित प्रस्तावांचे काय झाले याची माहिती कोणत्याच प्रस्ताव दाखल करणाऱ्या व्यक्तीला नाही. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी मोठ्याप्रमाणात प्रस्ताव दाखल झाल्याने कृषी विभागाने नंतर अनेक अटींचा समावेश केला. अटी लावण्यापूर्वीच प्रस्ताव थेट आयुक्त कार्यालयात दाखल झाल्याने त्रुटी दूर कशा पूर्ण करायच्या याची माहितीच नाही. त्यामुळे अनेक प्रस्तावधारक कृषी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत. २०१७-१८ चे प्रस्ताव अद्याप निकालात निघाले नसताना पुन्हा २०१८-१९ साठी नव्याने प्रस्ताव दाखल झाल्याने दाखल झालेल्या प्रस्तावांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

००

सरकारला सहकारी बँकांचे वावडे

अन्नप्रक्रिया उद्योगासाठी ३० टक्के अनुदान असलेल्या योजनेचा प्रस्ताव सादर करताना बँकांची शिफारसपत्रे देणे अनिवार्य आहे. अन्नप्रक्रिया उद्योग प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडित व्यवसाय असल्याने ९९ टक्के प्रस्तावांना जिल्हा बँक अथवा अन्य सहकारी बँकांची शिफारस पत्रे जोडली आहे. अशी शिफारस पत्रे जोडलेल्या प्रस्तावांवर पुन्हा विचार करण्यात येणार आहे. ज्या प्रस्तावांना राष्ट्रीयीकृत बँकांची शिफारस पत्रे जोडली आहेत, असे प्रस्तावच मंजूर केल्याने सरकारला सहकारी बँकांचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images