Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डेमोक्रेटिक पार्टी ऑफइंडियातर्फे धरणे आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले तालुक्यातील कवठेसारचे पोलिस पाटील नंदकुमार पाटील यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप करत डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियातर्फे सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

अत्याचाराबाबत पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिस पाटलाने त्या कुटुंबाचे अपहरण केले. अपहरण केलेल्या तिघांचा जयसिंगपूर पोलिस शोध घेत नाहीत. तिघांचाही घातपात झाल्याचा संशय आहे. भादोलीतील एका मातंग समाजातील महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला. त्यातील आरोपींवर कडक कारवाई झालेली नाही. दिवसेंदिवस अल्पसंख्याक, दलित कुटुंबावर अत्याचार वाढत आहेत. त्यांना असुरक्षित वाटत आहे. कवठेसार येथील संशयित पाटील यास तातडीने अटक करावी, अपहरणातील आरोपीला शोधून काढण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पीडित कुटुंबास पोलिस संरक्षण द्यावे या मागण्याही करण्यात आल्या. आंदोलनात नंदकुमार नांगरे, बाबासाहेब फाळके, प्रा. सुकुमार कांबळे, सतिश भंडारे आदी सहभागी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूरपरिस्थितीत मदतीसाठीसहा रबरी बोटी दाखल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर परिस्थितीत अडचणीतील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलातंर करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागात सोमवारी सहा ओबीएम रबरी बोटी दाखल झाल्या आहेत. पेट्रोलवर चालणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त या बोटी आहेत. मंगळवारी राजाराम तलावात प्रात्यक्षिक घेऊन गरज असलेल्या ठिकाणी या बोटी पाठविण्यात येईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पूरपरिस्थितीवेळी काठावरील गावात पाणी घुसते. काही गावे, वाड्यांचा संपर्क तुटतो. अशावेळी यांत्रिक बोटीची आवश्यकता भासते. यामुळेच जिल्हा प्रशासनाने सहा बोटी खरेदी केल्या आहेत. त्या शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, कागल, करवीर तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या या बोटींची क्षमता दहा माणसाची आहे. बोटी रबरी असल्याने वाहतुकीसाठी सोयीच्या आहेत. अतिपावसामुळे झाडे उन्मळून पडतात. झाड रस्त्यावर पडल्यानंतर वाहतूक बंद होते. ते झाड त्वरित बाजूला काढण्यासाठी प्रत्येक तालुक्याला एकप्रमाणे वुड कटर देण्यात येणार आहे. याशिवाय पूरपरिस्थितीवेळी नजर ठेवण्यासाठी एक ड्रोन कॅमेरा खरेदी करण्यात येणार आहे.

-----------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची घोषणा दोन दिवसात

$
0
0

\B

प्रदेशाध्यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती

\B

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इच्छुकांची वाढती संख्या आणि प्रत्येकाचा शहराध्यक्षपदासाठी प्रबळ दावा यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष निवडीवरुन निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत: पुढाकार घेतला. पाटील यांनी सोमवारी कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर येऊन पाचही इच्छुकांच्या स्वतंत्रपणे मुलाखती घेतल्या. तसेच पक्षाचे जिल्ह्याचे नेते व आमदार हसन मुश्रीफ आणि जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्याशी चर्चा केली. पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करुन येत्या काही दिवसात जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षपदाची निवडी जाहीर केल्या जातील, असे त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केले. याप्रसंगी शहराध्यक्षपदासाठी पाचही इच्छुकांनी पुन्हा दावा केल्यामुळे पेच कायम राहिला आहे.

माजी महापौर आर. के. पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजू लाटकर, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास, माजी नगरसेवक अनिल कदम, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे हे शहराध्यक्ष पदाच्या रिंगणात आहेत. एप्रिल महिन्यात शहराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली होती. मात्र इच्छुकांची संख्या वाढल्याने गेल्या दोन महिन्यापासून शहराध्यक्षपद रिक्त आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पाटील हे सोमवारी कोल्हापुरात दाखल झाले. आमदार मुश्रीफ यांच्या नागाळा पार्कातील निवासस्थानी त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांशी संवाद साधला. तसेच शहराध्यक्षपदासाठी इच्छुक पाचही जणांची स्वतंत्रपणे मुलाखत घेतली. प्रत्येकाने पक्षासाठी दिलेल्या योगदानाचा दाखला देत शहराध्यक्षपदासाठी दावा कायम ठेवला. प्रत्येकाची दहा ते पंधरा मिनिटे स्वतंत्रपणे मुलाखत घेतली. यानंतर सर्वांची एकत्रित बैठक झाली. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी ए.वाय. पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीचा प्रस्ताव जिल्हा कार्यकारिणीने यापूर्वीच प्रदेश कार्यकारिणीकडे सादर केला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडीच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक आहे.

..........

गेल्यावेळी निवडून येऊनही बाजूला का केले ?

'राष्ट्रवादी शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेल्या वेळेला मी रितसर निवडून आलो होतो. पक्षाचे निरीक्षक इद्रिस नायकवडी यांनी निवडीचे पत्रही दिले होते. मात्र त्यानंतर मला शहराध्यक्षपदावरुन बाजूला करुन दुसऱ्यांना संधी दिली. मी निवडून आलो असतानाही मला त्यावेळी का बाजूला केले याचे कारण काही समजले नाही', अशा शब्दांत माजी महापौर आर. के. पोवार यांनी आपल्या भावना मांडल्या. पक्ष स्थापनेपासून सक्रिय, विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्यामुळे पुन्हा शहराध्यक्षपदी संधी मिळावी अशी मागणी केली.

........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदाधिकारी बदलाची शक्यता कमीच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापतिपदाच्या बदलासंदर्भात सोमवारी (ता. २३) आयोजित बैठक झाली नाही. बैठक लांबणीवर पडल्याने सभापती बदलाची शक्यता कमी असल्याची चर्चा सदस्यांमध्ये आहे. दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत चार दिवसांत सत्तारुढ आघाडी घटकातील पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापन करताना पदाधिकाऱ्यांना सव्वा वर्षासाठी संधी असा फॉर्म्युला ठरला होता. सव्वा वर्षाचा कालावधी संपल्यामुळे जिल्हा परिषदेत पदाधिकारी बदलासाठी इच्छुक प्रयत्नशील आहेत. उपाध्यक्ष आणि शिक्षण समिती सभापती ही दोन्ही पदे शिवसेनेकडे आहेत. सध्या आमदार चंद्रदीप नरके गटाचे सदस्य सर्जेराव पाटील हे उपाध्यक्ष तर माजी आमदार संजय घाटगे गटाचे सदस्य अंबरिश घाटगे हे शिक्षण समिती सभापती आहेत. यापूर्वी महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी बदल करण्यात आला. मात्र सद्यस्थितीत अन्य पदाधिकारी बदल संभवत नसल्याचे काही सदस्यांचे म्हणणे आहे. उपाध्यक्ष आणि शिक्षण समिती सभापतींचा राजीनामा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणानगरात गुणवंतांचा सत्कार

$
0
0

वारणानगरात गुणवंतांचा सत्कार

म. टा. वृत्तसेवा शिराळा

वारणानगरच्या सुराज्य फाउंडेशनच्यावतीने युपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून यशस्वी झालेल्या गुणवंतांचा व्हीजन २०१८ गौरव सोहळा यावर्षी २८ जुलैला वारणानगर येथे होणार असल्याची माहिती सुराज्य फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी सुराज्य फाउंडेशनचे बी. टी. साळोखे, दिनेश पाटील, जीवनकुमार शिंदे, बी. टी. पायमल उपस्थित होते. वारणा समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे संस्थापक असलेल्या या संस्थेमार्फत गेली ११ वर्षे या व्हिजन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रातील शंभरहून अधिक विद्यार्थी यावर्षी परीक्षेत यशस्वी झाले आहेत. विविध जिल्ह्यांतील तीसहून अधिक यशवंत उपस्थित राहणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. शनिवारी २८ जुलैला दुपारी १२ वाजता कार्यक्रम होणार आहे. गुणवंतांना कोल्हापुरी फेटा, स्मृतीचिन्ह देऊन कोरे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडगावमध्ये मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

$
0
0

वडगावमध्ये मुस्लिम समाजाचा मूक मोर्चा

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

वडगाव (ता. हातकणंगले) येथील निलोफर मुबारक बारगीर या विद्यार्थिनीने गेल्या आठवड्यात लातूर महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. निलोफरवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ गावातील मुस्लिम समाज व सर्वपक्षीयांच्यावतीने मूकमोर्चा काढून निषेध करण्यात आला.

वडगाव येथील विद्यार्थिनी निलोफर ही लातूर येथील त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शिकत होती. तेथील संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे १७ जुलै रोजी निलोफरने महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली. तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून निलोफरला न्याय मिळावा या मागणीसाठी वडगावमधील मुस्लिम समाज, सर्वपक्षीयांच्यावतीने गावातील प्रमुख मार्गावरून मूकमोर्चा काढून कॉलेज प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी शब्बीर हजारी, डॉ. आमिर हजारी, रांझा पटेल, आमिर हमजा हजारी, अलिम हजारी, बाळासाहेब बारगीर, हिंमत बारगीर, सरपंच काशीनाथ कांबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे, निवास शेंडगे, डॉ. विजय गोरड, प्रकाश कांबरे, नितिन घोरपडे आदींसह मुस्लीम समाजातील महिला-पुरुष, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर कोटींची उलाढाल ठप्प

$
0
0

\Bवाहतूकदार करणार गनिमी काव्याने आंदोलन \B, सरकारी धान्य वाहतूकही रोखणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाची तीव्रता वाढली असून, यापुढे गनिमी काव्याने आंदोलन होणार आहे. रात्रीच्या वेळेत होणारी मालवाहतूक रोखण्यासाठी आंदोलक रस्त्यावर उतरले असून वाहतूक ठप्प झाल्याने सुमारे १०० कोटींची उलाढाल थांबली आहे. सरकारी धान्य वाहतूकही रोखण्याचा इशारा आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या आंदोलनामुळे टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंधनाचे दर कमी करण्यासह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट असोसिएशनमार्फत शुक्रवारपासून (ता. २०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. गेल्या दोन दिवसात या आंदोलनाची तीव्रता वाढली असून, आंदोलकांकडून महामार्गावरील मालवाहतूक रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोकुळ शिरगाव येथे रविवारी चाळीस ते पन्नास ट्रकच्या चाकांमधील हवा सोडली. यावर पोलिसांनी २० ते २५ आंदोलकांवर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी रात्री उशिरा शाहू मार्केट यार्डमधून जाणारे दोन ट्रक आंदोलकांनी अडवले. या दोन्ही ट्रकच्या चाकांमधील हवा सोडून आंदोलकांनी ट्रकचालकांना दमदाटी केली. पुणे-बेंगळुरू महामार्गावर विकासवाडी येथे वाहने अडवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला होता, मात्र पोलिसांनी अटकाव केल्याने आता गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनने घेतला आहे. याबाबत सोमवारी संध्याकाळी शाहूपुरीतील कार्यालयात बैठक घेण्यात आली. पोलिसांचा दबाव झुगारून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी या बैठकीत व्यक्त केला.

चक्काजाम आंदोलनामुळे बहुतांश वाहतूक थंडवली आहे. महामार्गांवर अवजड वाहनांची संख्या अगदीच कमी आहे. अत्यावश्यक सेवेतील दूध, औषधे आणि भाजीपाल्याची वाहने वगळता अन्य वाहनांची संख्या कमी आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापारी संघटनांनी दिली. विशेषत: कोल्हापुरातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणारी साखर, गूळ, खाद्यतेल, कडधान्यांची वाहतूक ठप्प आहे. याशिवाय औद्योगिक वसाहतींमधून बाहेर जाणाऱ्या धातूच्या वस्तूंची वाहतूकही ठप्प आहे. सिमेंट, कापड यालाही मोठा फटका बसला आहे. आणखी काही दिवस वाहतूक बंद राहिल्यास टंचाईच्या झळा सोसव्या लागतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी सकाळी धान्य व्यापाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील धान्यसाठ्याचा आढावा घेतला.

.............

चौकट

... तर बोंब मारो आंदोलन

आंदोलन सुरू असतानाही ट्रक भरणाऱ्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांना आंदोलकांनी लक्ष्य केले आहे. अशा ट्रान्सपोर्ट कंपन्यांना १० हजार, तर ट्रक मालकाला ५ हजारांचा दंड केला जाणार आहे. त्याचबरोबर संबंधित ट्रान्सपोर्ट कंपनीच्या दारात जाऊन बोंब मारो आंदोलन, मालकाच्या तोंडाला काळे फासणे असे आंदोलन करण्याचा निर्णय लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला.

चौकट

चेंबर ऑफ कॉमर्सचा पाठिंबा

वाहतूकदारांच्या चक्काजाम आंदोलनाला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. पाठिंब्याचे पत्र सोमवारी लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनला मिळाले. याशिवाय खासगी ट्रॅव्हल्स चालक-मालकांनीही आंदोलनाला पाठिंबा दिल्याची माहिती लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी दिली.

...............

कोट

'आंदोलनातील पहिले दोन दिवस वाहतूक सुरू राहिल्याने टंचाई जाणवली नाही. मात्र, रविवारपासून माल वाहतूक बंद आहे. तीन ते चार दिवस पुरेल इतकाच साठा व्यापाऱ्यांकडे आहे. आणखी काही दिवस वाहतूक बंद राहिल्यास टंचाईची स्थिती निर्माण होणार. वाहतूक बंद असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहारही बंद आहेत.

सदानंद कोरगावकर, पदाधिकारी, व्यापारी असोसिएशन

...........

कोट

' बांधकाम साहित्याची उलाढाल मोठी असते. गेल्या दोन दिवसात सिमेंटचे ट्रक आलेच नाहीत. पाऊस उघडल्याने सिमेंटची मागणी वाढत आहे. गोडाऊनमधील सिमेंटचा साठा चार ते पाच दिवस पुरेल इतकाच आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास बांधकामांवर याचा परिणाम होऊ शकतो.

उत्तम जाधव, सिमेंट वितरक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज मुंबईत बैठक

$
0
0

आज मुंबईत बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्या तपासाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. २४) राज्याच्या गृह विभागाचे अप्पर सचिव राजीव जैन बैठक घेणार आहेत. या बैठकीला एसआयटीचे तपास अधिकारी अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे हजर राहणार आहेत. पानसरे यांची हत्या होऊन सव्वातीन वर्षे उलटली तरीही या गुन्ह्यातील शस्त्र आणि वाहनांचा शोध लागलेला नाही. दोन संशयितांना अटक केली होती, मात्र त्यांनाही जामीन मंजूर झाला आहे. या तुलनेत कर्नाटक पोलिसांनी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील सात संशयितांना अटक केल्याने पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अप्पर सचिवांकडून तपासातील प्रगती, हायकोर्टात दाखल असलेले अर्ज, कर्नाटकातील संशयितांचा महाराष्ट्रातील हत्यांशी असलेल्या संबंधावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खांडसरीवर हल्ला

$
0
0

जैनापूरमध्ये खांडसरीवर

शेतकर्‍यांचा हल्लाबोल

व्यवस्थापकास कोंडले, कार्यालयात तोडफोड

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

गेल्या गळीत हंगामातील सुमारे साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रकमेची ऊस बिले थकित असल्याने जैनापूर (ता. शिरोळ) येथील शिवम खांडसरीवर शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. कारखान्याच्या व्यवस्थापकास कोडून घालून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. एक ऑगस्टपासून बिले देवू, अशी ग्वाही मिळाल्यानंतर आंदोलक परतले.

जैनापूर येथे शिवम् इंडियन क्विझीन प्रा. लि.ची खांडसरी आहे. येथे शिरोळ तालुक्यातील शेतकरी ऊस गाळपासाठी पाठवितात. सन २०१७-१८च्या गळीत हंगामात शेवटच्या महिन्यात गाळपासाठी आलेल्या उसाची बिले अद्याप खांडसरी व्यवस्थापनाने शेतकर्‍यांना दिलेली नाहीत. शेतकर्‍यांची थकित रक्कम साडेतीन कोटी रुपयांहून अधिक आहे. ऊस बिलासाठी यापूर्वी परिसरातील शेतकर्‍यांनी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनेही केली. त्यावेळी व्यवस्थापनाने शेतकर्‍यांना धनादेशही दिले. मात्र खांडसरीच्या बँक खात्यावर पैसे नसल्याने धनादेश वठले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.

दरम्यान सोमवारी संतप्त शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते खांडसरीच्या कार्यालयात आले. त्यांनी व्यवस्थापक एम. जी. देशमुख यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करीत त्यांना धारेवर धरले. थकित बिले केव्हा मिळणार?, धनादेश का वठले नाहीत? असा जाब विचारला. त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने शेतकर्‍यांनी त्यांना कार्यालयातच कोंडून घातले. काही संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाच्या खिडक्या फोडल्या. सुमारे एक तासाहून अधिक काळ हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे वातावरण ताणवपूर्ण बनले होते.

अखेर आंदोलकांनी कारखान्याचे अध्यक्ष संजय केडवे यांच्याशी संपर्क साधला. एक ऑगस्टपासून शेतकर्‍यांना बिले अदा केली जातील असे त्यांनी सांगितले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, स्वस्तिक पाटील, सागर चिपरगे, श्रीकांत पाटील, भरत डाळे, जयकुमार पाराज, प्रकाश केरीमाने, पै. विठ्ठल मोरे, पिरगोंड पाटील, महिला आघाडीच्या सरिता भवरे, मिलिंद साखरपे यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Maharashtra Bandh: 'काही पेड लोक मराठा आंदोलनात घुसले'

$
0
0

सांगली:

मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झालेले असतानाच महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसली असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे. पाटील यांच्या या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून मराठा समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.

सांगली येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे धक्कादायक विधान केलं आहे. 'मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसली आहेत. त्यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे. हे आंदोलन बदनाम करायचे आहे,' असा आरोप करतानाच 'आरक्षण देणं आता न्यायालयाच्या हातात आहे. त्यामुळे जे आपल्या हातात नाही त्यासाठी आंदोलन करून काहीही उपयोग होणार नाही. तरीही मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळणार असेल तर गाड्या फोडा. पण यामुळे समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे हे सुद्धा लक्षात घ्या,' असं पाटील म्हणाले.

आंदोलन करून, गाड्या फोडून काहीही साध्य होणार नसल्याचं सांगतानाच आंदोलकांशी चर्चा करायला सरकार तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.' हे निवडणूक वर्ष असल्यानं या काळात हिंसक आंदोलनासारखे प्रकार वाढणार आहेत. त्यामुळे खऱ्या आंदोलकांनी या हिंसक प्रवृत्तींना आणि पेड आंदोलकांना बाजूला सारलं पाहिजे,' असंही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित्रावर प्राणघातक हल्ला

$
0
0

म. टा . वृत्तसेवा शिराळा

बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे आर्थिक वादातून दोघा जिवलग मित्रांमध्ये हाणामारी होऊन एकावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजता घडली. या घटनेत मयूर रंगराव सीद (वय २२, रा. बिरदेवनगर, नवे पारगाव, ता. हातकणंगले) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर वारणानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील संशयित हल्लेखोर हृषिकेश शिवाजी धर्मे (वय २२, रा. घुणकी) व अविराज साठे (रा. बहिरेवाडी) या दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे गंठण लंपास

$
0
0

कोल्हापूर

गर्दीचा फायदा घेऊन टेंबलाइवाडी येथे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेचे तीन तोळ्याचे गंठण अज्ञाताने लंपास केले. मंगल महादेव गुंजळे (वय ६०, रा. गजानन महाराजनगर, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. गजानन महाराज नगर परिसरातील गुंजळे या टेंबलाइवाडी येथे देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शनासाठी मोठी गर्दी होती, या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञाताने तीन तोळ्याचे ७० हजार रुपये किंमतीचे गंठण लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दूध आंदोलनातील काळे बोके शोधू: सदाभाऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी सुरु झालेले आंदोलन दूध संघांना पाच रुपये अनुदान दिल्यानंतर कसे थांबले, आंदोलनातील नेत्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात करुन दूध संघांतील लोकांची घरे भरण्यासाठी आंदोलन केले', असा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता पत्रकार परिषदेत केला. दूध दरवाढ आंदोलनातील 'काळे बोके' शोधण्यासाठी रयत क्रांती संघटना जनजागृती व आंदोलन करणार असून दूध संघांनी प्रतिलिटर २८ रुपये दर द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

कृषी राज्यमंत्री खोत म्हणाले, 'दूध संकलन बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होणार म्हणून माझ्यासारख्या शेतकरी दूध उत्पादकांना आनंद झाला होता. मात्र चोर चोर मावसभाऊ, आपण सारे वाटून खाऊ, या भूमिकेवर आंदोलन थांबल्याचा संशय येत आहे. हे आंदोलन दूध उत्पादकांसाठी होते की दूध संघांसाठी होते हा संशय निर्माण झाला आहे. दूध उत्पादकाच्या खात्यावर पाच रुपये अनुदान मिळावे, ही मागणी असताना कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील दूध संघांना फक्त दोन रुपये वाढ द्यावी लागणार आहे. गोकुळ, वारणा, स्वाभिमानी यांचा दूध खरेदी दर प्रतिलिटर २३ रुपये असताना त्यांनी आंदोलनातील मागणीप्रमाणे दूध उत्पादकांना २८ रुपये प्रतिलिटर दर दिला पाहिजे.'

ते पुढे म्हणाले,' खासदार शेट्टींच्या जवळ असलेले लोक पुण्यवान असतात. त्यांच्यापासून दूर गेल्यावर ते अपवित्र होतात. स्वत:च्या राजकारणासाठी ते अनेक कुरापती काढतात. निवडणूक जवळ आली की भावनिक आंदोलन केली जातात. त्यासाठी एकाला जवळ करायचे आणि दुसऱ्याला लांब ढकलून आपण खासदार म्हणून निवडून कसे येवू हे पाहिले जाते. त्यांच्यापासून लांब गेले रघुनाथदादा पाटील, उल्हास पाटील आणी मी वाईट आहे, असे सांगितले जाते. पुण्यवान कोण आणि अपवित्र कोण हे आता जनताच ठरवेल.'

हातकणंगले लोकसभा लढण्यास तयार

मंत्री खोत म्हणाले, 'पन्नास टक्के नफा असलेल्या दूध व्यवसायात दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी रयत क्रांती संघटना सुरेश सासने यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात आंदोलनास सुरुवात करणार आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा घरचा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिला तर भाजपकडून निवडणूक लढवण्यास मी तयार आहे. माढा लोकसभा निवडणुकीत चार लाख ८० हजार मते मिळवली होती.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णवाहिकेतच दिला तिने बाळाला जन्म

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

आपटी (ता. पन्हाळा) येथील स्वप्नाली बिडकर यांना १०८ रुग्णवाहिकेतून प्रसूतीसाठी दवाखान्यात नेत असताना बोरपाडळे-कोडोली रोडवरील खड्ड्याच्या धक्क्यामुळे रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली

१०८ रुग्णवाहिकेचे डॉक्टर अभिजित जाधव यांना मंगळवारी पहाटे पाच वाजता प्रसूतीसंदर्भात कॉल आला, त्यावेळी त्यांनी ताबडतोब आपटी येथे वीस मिनिटांत रुग्णवाहिकेसह धाव घेतली. आपटी येथील गर्भवती स्वप्नाली अरविंद बिडकर यांना रुग्णवाहिकेतून घेऊन दवाखान्यात जात असताना त्यांना तीव्र वेदना होत असल्याने रुग्णवाहिका सुसाट धावत होती. बोरपाडळे ते कोडोलीदरम्यान रुग्णवाहिका येत असताना रस्त्यातील खड्ड्यांमुळे बिडकर यांना वेदना वाढतच होत्या आणि रक्तस्राव होत होता, त्यावेळी बोरपाडळे येथील आदर्श घरकुल योजनेजवळच्या वसाहतीजवळ रुग्णवाहिका आली असता रस्त्यातील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे वेळेअगोदर बिडकर यांची रुग्णवाहिकेत प्रसूती झाली. डॉक्टरांनी बोरपाडळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नेऊन आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सना बोलावून बिडकर यांची सुखरूप प्रसूती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डवरी समाजाचा ‘आक्रोश’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुलं चोरणारी टोळी समजून राईनपाडा (धुळे) येथे समाजाच्या पाच नागरिकांची हत्या करणाऱ्या गुंडांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी नाथपंथी डवरी गोसावी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. गुल्ह्यात सहभागी असलेल्या नागरिकांवर त्वरित कारवाई करण्यासाठी खटला जलदगती न्यायालयाकडे वर्ग करून सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे शिष्टमंडळाने केली.

निवेदनात म्हटले आहे, 'राज्यातील भटक्या नाथपंथी डवरी गोसावी समाज प्रामुख्याने देवभक्ती करत निरनिराळ्या लोककलांची जोपासना करत गावोगावी फरत असतात. गरिबीवर मात करण्यासाठी फिरणाऱ्या लोकांना राईनपाडा येथे समाजाच्या पाच लोकांची अमानुषपणे हत्या केली. राईनपाड्यातील या हत्याकांडामुळे सर्वच समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. समाजाला न्याय मिळण्यासाठी हत्याकांडात सहभागी आरोपींना त्वरित अटक करून फाशी द्यावी, तसेच हा खटला जलदगती न्यायालयाकडे वर्ग करावा. खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून अॅड. निकम यांची नियुक्ती करण्याबरोबरच हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या वारसांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी २५ लाखांची मदत करावी.'

तत्पूर्वी डवरी समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चाला दसरा चौक येथून सुरुवात झाली. मोर्चा दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रवेशद्वारजवळ मोर्चा अडविण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी सुभेदार नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनाच देणार यावर ठाम राहत शिष्टमंडळ सुमारे तासभर त्यांची प्रतीक्षा करत थांबले. ते तासाभरानंतर सुभेदार आल्यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन सादर केले. सुभेदार यांनी आपल्या मागण्या सरकारकडे पाठवून चार दिवसांत याबाबत निर्णय देण्याचे आश्वासन दिले.

मोर्चात दादा जगताप, डॉ. रवींद्र माळी, अण्णा शिंदे, एकनाथ माळी, एकनाथ शिंदे, सखाराम चव्हाण, उदय जगताप यांच्यासह कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा जिल्ह्यातील नाथपंती डवरी गोसावी समाजाचे हजारो नागरिक सहभागी झाले होते.

चौकट

डवरी समाजाच्या मोर्चासाठी तीन जिल्ह्यांतील हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. दसरा चौकात सकाळी अकरापासून समाजबांधवानी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. लांबून आलेल्या सर्व समाजबांधवांच्या भोजनाची व्यवस्था मुस्लिम बोर्डिंग परिसरात केली होती. अत्यंत शिस्तबद्ध काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये आबालवृद्धांची मोठी संख्या होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अवकाश संशोधनातभोसलेंचे मोठे योगदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशाच्या अवकाश संशोधनात आर. व्ही. भोसले यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करायला हवे. त्यासाठी पाठपुरावा करणे आपले नैतिक कर्तव्य आहे,' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले लिखित 'स्मृतितरंग' पुस्तक प्रकाशन समारंभात ते मंगळवारी बोलत होते. प्रकाशन सोहळा जि.प. कर्मचारी सभागृहात पार पडला.

डॉ. शिर्के म्हणाले, 'अवकाश संशोधनात गाढा अभ्यास असलेले व्यक्तिमत्त्व कोल्हापूरला लाभले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घ्यायला आपण काही प्रमाणात कमी पडलो आहे. अवकाश संशोधनात त्यांनी केलेल्या कार्याचे प्रतिबिंब त्यांच्या स्मृतितरंग पुस्तकात आढळते. शिवाजी विद्यापीठ आणि इस्रो अवकाश संशोधन केंद्राचे नाते घट्ट करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. पन्हाळ्यावर स्पेस सेंटर सुरू करण्यात त्यांचा पुढाकार महत्त्वाचा होता. आपल्या ज्ञानाचा फायदा भावी पिढ्यांना व्हावा या हेतूने त्यांनी आयुष्यभर विनामूल्य ज्ञानदानाचे काम केले. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे. संशोधन करू पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी स्मृतितरंग पुस्तक दिशादर्शक ठरेल.'

डॉ. आर. व्ही. भोसले म्हणाले, 'संशोधनाच्या माध्यमातून जगभरात प्रवास केला, पण कोल्हापूरची ओढ कायम राहिली. यानिमित्ताने ती ओढ पूर्ण झाली. अवकाश संशोधनात कोल्हापूरचा सहभाग वाढला पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा आनंद होत आहे. शिवाजी विद्यापीठात अवकाश संशोधनात पदव्युत्तर शिक्षण घेऊन अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेले अनेक विद्यार्थी तयार झाले आहेत. यापुढेही अवकाश संशोधनासाठी कार्यरत राहणार आहे.'

यावेळी 'गोकुळ'चे संचालक अरुण नरके, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, विजयाताई भोसले, शिवाजी विद्यापीठ भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. एस. पाटील, पी. टी. पाटील, मराठी विज्ञान परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पवार, सुरेश शिपूरकर, सुभाष देसाई, स्मृतिका पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलमध्ये रात्रीतनऊ ठिकाणी चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

येथे सोमवारी रात्रीत नऊ ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. दोन मेडिकल दुकाने, बिअर शॉपी, बेकरी, एक बझार, पानपट्टी, मोबाइल शॉपी, कापड दुकान, आदी ठिकाणी चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांच्या ऐवजासह चोरट्यांनी डल्ला मारला. रात्री अडीचच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला आहे. अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. एका रात्रीत नऊ ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे कागल पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे.

पोलिस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, बसस्थानकास लागून असलेल्या पार्वती फुड्समध्ये शटर उचकटून एकाने आत प्रवेश केला. बाहेर दोघेजण उभे राहून टेहाळणी करीत होते. चोरट्यांनी डोक्यास कापड गुंडाळले होते. हातात कॅरिबॅग, पाठीवर सॅग त्यात चोरी करण्याचे साहित्य असल्याचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. शेजारी असलेल्या ऑरेंज मोबाईल शॉपी फोडून रोख रक्कम व उंची किमतीचे तीन मोबाइल हँडसेट लांबवले. बाजूलाच असलेल्या कृष्णराज बिअर शॉपीचे शटरच्या मध्यभागी असलेले लॉक खोदकाम करून काढले. आत प्रवेश करून गल्ल्यातील रोख रक्कम व बिअरचे बॉक्स लांबविले. खर्डेकर चौकातील साई बझार व कृष्णा मेडिकलकडे चोरट्यांनी मोर्चा वळविला. तेथील रोख रक्कम व हँडसेटवर डल्ला मारला. चोरट्यांनी माळ भागावरील जयसिंगराव पार्कातील मराठा चॅरिटेबल ट्रस्ट येथील स्वरूप मेडिकल व कपिश कॉटन या दोन दुकानांवर हात मारला. गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली. रिंगरोडवरील नाईक यांचे पानपट्टीचे दुकान फोडून रोख रक्कम लांबवली. जयसिंगराव पार्क येथील अमोल चव्हान यांच्या दारातील पल्सर मोटारसायकल चोरट्यांनी पसार केली आहे.

एकाच रात्रीत नऊ ठिकाणी चोऱ्या करून चोरट्यांनी सुमारे लाख रुपयांचा डल्ला मारून धुमाकूळ घातला आहे. कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, मोबाइल शॉपीतून चोरीस गेलेल्या मोबाइलच्या आधारे चोरट्यांपर्यंत पोहोचू. लवकरच त्यांना जेरबंद करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य, साखर वाहतूक ठप्प

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाहतूकदारांच्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अन्नधान्य आणि साखरेची वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी मंगळवारी अन्नधान्य आणि साखरेची वाहतूक करणारा एकही ट्रक रस्त्यावर आला नाही. याशिवाय कोल्हापुरातून कोकणात जाणारी वाहतूकही बंद असल्याने कोकणात अन्नधान्यांची टंचाई उद्भवणार आहे. दरम्यान, आंदोलकांनी कागल येथे कर्नाटकातून येणारे २० ट्रक अडवून परत पाठवले.

इंधन दरातील वाढ तीन महिन्यातून एकदा करावी, टोल वसुलीची प्रक्रिया पारदर्शक करावी, थर्ड पार्टी विमा प्रीमियममध्ये होणारी वाढ रद्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनमार्फत शुक्रवारपासून (ता. २०) देशव्यापी चक्काजाम आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात अन्नधान्य आणि साखरेचा एकही ट्रक रस्त्यावर धावू शकला नाही. शिवाय फळे, कांदे, बटाटे आणि रेशनिंगच्या धान्य वितरणावरही याचा परिणाम झाला. कांदा आणि बटाट्याचे केवळ ९ ट्रक मंगळवारी कोल्हापुरात आले. फळांच्या १८ ट्रकची आवक झाली, तर पेट्रोल आणि डिझेलची आवकही मंदावली आहे. रेशनिंगचे धान्य वितरण करणारी वाहने अडवण्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर्स असोसिएसनने दिला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रेशनिंगच्या धान्य वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे जाणवले. रेशनिंगच्या धान्याचे नियमित ५० ट्रक जिल्ह्यात येतात. या तुलनेत मंगळवारी ३० ट्रक पोहोचले आहेत. मात्र, जिल्ह्यांतर्गत वितरण व्यवस्था सुरळीत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी दिली.

कोल्हापुरातून कोकणात रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. आन्नधान्य, खाद्यतेल, सिमेंट, बांधकाम साहित्य, कापड, फळे यांचा पुरवठा कोल्हापुरातून होतो. वाहतूकदारांच्या संपामुळे खरेदी-विक्रीची उलाढाल ठप्प असल्याने कोल्हापुरातून कोकणात जाणारी मालवाहतूक बंद आहे. याचा परिणाम कोकणातील बाजारपेठेत जाणवणार आहे. याशिवाय कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतींमध्येही टंचाईची स्थिती निर्माण झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सुमारे सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापारी आणि उद्योजकांच्या संघटनांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी मराठा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. जिल्ह्यात सात एसटी बसेसची मोडतोड करण्यात आली आली. स्टेशन रोड, बसस्थानक परिसरात किरकोळ दगडफेक करण्यात आली. रंकाळा टॉवरजवळ टायर पेटवून रस्त्यावर टाकण्यात आली. मराठा समाजातील युवकांनी दुपारी बाराच्या सुमारास शहरातून रॅली काढून बंदसाठी आवाहन केले. त्यानंतर काही ठिकाणी सुरू असलेली दुकानेही तातडीने बंद झाली. अनेक व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला. परिणामी शहरातील उलाढाल थांबली. बंदचा शहर आणि जिल्ह्यांतर्गत बससेवेवरही परिणाम झाला. नेहमी गजबजलेल्या सीबीएस परिसरात शुकशुकाट होता.

आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवारपासून दसरा चौकात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. या माध्यमातून मराठा समाजाने पुन्हा एकदा आरक्षणासाठी वज्रमूठ आवळली. दसरा चौकात भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आक्रमक भूमिका घेण्यात येईल, प्रसंगी मंत्री आणि आमदारांच्या घरासमोरही ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

ठिय्या सुरू करण्याआधी शहर आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने दसरा चौकात जमू लागले. यादरम्यान चौकाचौकांत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन सुरू झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरात फिरुन बंदचे आवाहन केले. त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बंद करण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मोडतोड आणि जमावबंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दिवसभरात शहरातील ३३ युवकांना ताब्यात घेतले. त्यातील सहाजणांवर जमावबंदीचा आदेश भंग केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, दसरा चौकातील ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी भेट देऊन पाठींबा दिला. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, महापौर शोभा बोंद्रे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक आदींनी पाठिंबा दिला. भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलनस्थळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, दिलीप देसाई, सचिन तोडकर, जयेश कदम, गणी आजरेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी दिवसभर थांबून होते.

आज बंद नाही

कोल्हापुरात आज (बुधवारी) बंद असल्याचे मेसेज सोशल मीडियातून फिरत आहेत. ते चुकीचे आहेत. बुधवारी सर्व व्यवहार सुरळीत राहतील, असे मराठा आंदोलनाचे दिलीप देसाई यांनी 'मटा'शी बोलताना स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलिवडेत वाघाच्या हल्यात म्हैस ठार

$
0
0

चंदगड : कलिवडे (ता. चंदगड) येथील ऐतिहासिक किल्ले कलानंदीगडाच्या पायथ्याशी पट्टेरी वाघाने चरत असलेल्या म्हशीवर हल्ला केला. त्यात म्हैस जागीच ठार झाली, तर दुसरी म्हौस गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बाजारभावाप्रमाणे दोन्ही म्हशींचे एक लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कलिवडे येथील भैरू म्हाकू जानकर व गोविंद म्हाकू जानकर जनावरे चारण्यासाठी किल्ले कलानंदीगडाच्या दक्षिणेकडे असलेल्या गायरानात गेले होते. दोघांच्याही म्हशी चरत असताना जंगलातील झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेरी वाघाने म्हशींवर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पाटणे वनक्षेत्रपाल एम. एन. परब, वनपाल दयानंद पाटील यांनी पंचनामे केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images