Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘स्वाभिमानी’च्या पाठिंब्यासाठी साताऱ्यात सत्याग्रह आंदोलन

$
0
0
उसाला पहिली उचल तीन हजार रुपये मिळाली पाहिजे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून साताऱ्यात तहसीलदार कार्यालयासमोर विविध संघटनांनी एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन केले.

जनजीवन पूर्वपदावर

$
0
0
उसदराच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रात त्यातही आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या कराडमध्ये सुरू असलेले आंदोलन संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी एक जानेवारीपर्यंत स्थगित केल्याने गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची धग शुक्रवारी सायंकाळी विझली.

जयसिंगपुरात दुसऱ्या दिवशीही बंद

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४८ तासाचा महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने सलग दुसऱ्या दिवशी जयसिंगपुरात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवले. बंदमुळे शहरात काही प्रमाणात दुधाची टंचाई निर्माण झाली.

भुदरगडमध्ये परि‌स्थिती सुरळीत

$
0
0
आज दिवसभर ऊस दराचे आंदोलन भुदरगड तालुक्यात शांततेत पार पडले. काल संध्याकाळी खासदार राजू शेट्टी आणि खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या ऊस दराबाबतच्या बैठकीत २००० व ४५० अशी कोंडी फुटल्यानंतर शुक्रवार सकाळपासूनच आंदोलनाला मरगळ आल्याचे जाणवत होते.

चंदगडमध्ये चौघांवर गुन्हे

$
0
0
बंदला दुसऱ्या दिवशी चंदगड तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. चंदगडमध्ये व्यापाऱ्यांनी उत्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभागी झाले होते. शिनोळी येथे काही अज्ञातांनी वडापच्या ट्रॅक्सवर दगडफेक केली.

‘भोगावती’ सुरू करण्याबाबत आज बैठक

$
0
0
खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देत आपले आंदोलन आज तात्पुरत्या स्वरुपात मागे घेतल्याची घोषणा केली. भोगावती साखर कारखान्याची शुक्रवारची सभा शनिवारी घेण्यात येणार असून दर निश्चित करण्यात येणार आहे.

गडहिंग्लजमध्ये ९ जणांना अटक

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ४८ तास बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आज गडहिंग्लज तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बंद पाळण्यात आला. जमावबंदीचा आदेश असताना रस्त्यावर लाकडी ओडके व टायर पेटवून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सतरा जणांविरोधात नेसरी पोलिसात गुन्हा दाखल झाला.

कागलमध्ये धुमश्चक्री

$
0
0
ऊसदराबाबत बंदच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनाला सिद्धनेर्ली (नदी किनारा) येथे हिंसक वळण लागले. नदी किनारा ते बामणी दरम्यान रस्त्यावर मोठे दगड टाकून तसेच झाडे आडवी पाडून वाहतूक बंद करण्यात आली.

दुर्दैवाचा फेरा चुकला नाही

$
0
0
बी.एड् करून शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले मात्र, नोकरी मिळाली नाही. पण त्याने निराश न होता हेमर शुगरमध्ये पॅनमनची नोकरी स्वीकारली. मात्र, दुर्दैवाचा फेरा येथेही चुकला नाही.

पदवीच्या मुलांना प्रशिक्षण

$
0
0
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी शोधाशोध करावी लागते. त्यामुळे वय वाढत जाते आणि नोकरी हातात नाही त्यामुळे हतबलता वाढत जाते. यावर उपाय म्हणून बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मात्र हुशार असणाऱ्या मुलांना नोकरीच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

भारतीयांचा स्त्रीविषयक दृष्ट‌िकोन अन्यायी

$
0
0
‘ज्या ठिकाणी स्त्री शक्तीपीठ आहे, जिथे स्त्रीला पूजले जाते अशा कोल्हापूरमध्ये स्त्री भ्रूणहत्या व ‌स्त्र‌ियांवरील होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. एकूणच भारतीयांचा स्त्री विषयक दृष्टीकोन अन्यायी आहे,’ असे मत लेखिका सुनीला सोवनि यांनी व्यक्त केले.

‘त्या’ विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा

$
0
0
ऊसदरप्रश्नी सुरू असलेल्या आंदोलनामुळे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्याना गुरूवारी आणि शुक्रवारी परीक्षा देता आली नाही, त्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे.

प्रशासकामार्फत पंचगंगा प्रदूषणमुक्ती करा

$
0
0
‘पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी वेळोवेळी आदेश देऊनही जर महापालिका दुर्लक्षच करत असेल तर आदेशांचे कागदी घोडे नाचविण्यापेक्षा महापालिका बरखास्त करून विशेष कालावधीत प्रशासक नेमून पंचगंगा प्रदूषणमुक्त करावी लागेल,’ असा संतप्त शेरा शुक्रवारी हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी मारला.

शेतकरी संघटनेत दरावरून फूट पडेल

$
0
0
कृषीमंत्री शरद पवार यांना ऊसदराचे श्रेय मिळू नये यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी राजकीय हेतूने खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्याशी तडजोड केली आहे. शेतकऱ्यांना किमान २३०० रुपये दर मिळाला पाहिजे होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि संघटनेलाही ही तडजोड मान्य नाही, असे दाखवून शेट्टींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

खराब रस्त्याचा केला वाढदिवस

$
0
0
गेली सहा वर्षे नागरिकांची हाडे खिळखिळी करणारा, वाहनांचे पार्ट सैल करणाऱ्या व गटारींअभावी पाण्याच्या डबक्यांचे साम्राज्य पसरलेल्या वाय. पी. पोवार नगर ते जवाहरनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचा ​शिवसेनेने वाढदिवस साजरा केला.

रंकाळा दुर्गंधीप्रश्नी प्रशासन धारेवर

$
0
0
महापालिकेच्यावतीने न्यायालयात व्यवस्थित कागदपत्रे हजर केली नसल्याने तावडे हॉटेल परिसरातील बांधकामांबाबत महापालिकेच्या विरोधात ​आदेश झाला. त्याला प्रशासनच कारणीभूत असल्याचा जोरदार आरोप करत रंकाळ्याच्या पाण्याला पुन्हा दुर्गंधी सुटली आहे, यावरुनही शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासन हातावर हात धरुन बसल्याची टीकेची झोड उठवली.

रस्त्यासाठी १५ वर्षे टोलवाटोलवी

$
0
0
पॅचवर्कची ठिगळे लावून लावून डांबराखालची खडी वर आलेल्या जिल्हा परिषद ते आरटीओ कार्यालयापर्यंतच्या रस्ते दुरूस्तीसाठी अपेक्षित असलेल्या १५ लाखांच्या कामासाठी गेल्या १५ वर्षापासून फक्त टंगळामंगळच सुरू आहे. एक वर्षाचा हमी कालावधी संपल्यानंतर बांधकाम विभागाकडून देण्यात आलेला नवा प्रस्तावही गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडून आहे.

कोल्हापुरी गुळाला ‘GI’ जाहीर

$
0
0
कोल्हापुरी गुळाला जिऑग्राफिकल इंडिकेशन मिळाल्याने ‘कोल्हापुरी गूळ’ या ब्रॅंडला आता कायद्याने संरक्षण मिळाले असून जिल्ह्यातील २५ हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच कोल्हापुरी गूळ या नावाने कोणताही गूळ ग्राहकांच्या माथी मारणाऱ्यांवर नियंत्रण येवू शकणार आहे.

ऊस दर आंदोलन स्थगित

$
0
0
‘उसाला विनाकपात पहिली उचल २६५० रुपये द्या, अन्यथा आमचा ऊस फुकट न्या आणि साखर कारखाने खुशाल सुरू करा,’ असे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदराचे आंदोलन स्थगित केल्याची घोषणा शुक्रवारी सांगलीत केली.

ऊसदरासाठी चढाओढ

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठीचे आंदोलन मागे घेताच खासदार सदाशिवराव मंडलिक आणि राजू शेट्टी यांच्यातील तडजोडीपेक्षा अधिक दर देण्याची चढाओढ कारखानदारांमध्ये लागली आहे. जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी दर जाहीर करून गळीत सुरू केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images