Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कडगावमध्ये टेम्पोच्या धडकेत शेतकरी ठार

$
0
0
आंदोलकांपासून बचाव करण्यासाठी दूध टेम्पो मागे घेत असताना मागील चाकात सापडून विलास गोविंद पाटील (वय ५८, रा. दत्तमंदिर जवळ, कडगाव, ता.गडहिंग्लज) या शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत झाला.

कोल्हापुरातील मैलामिश्र‌ित पाणी रोखा

$
0
0
कोल्हापूर शहरातील थेट पंचगंगेगत मिसळणारे मैलामिश्रीत सांडपाणी रोखण्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात आणि तसेच संबंधितांना आदेश व्हावेत, अशी मागणी इचलकरंजी नगरपालिकेच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय पोवार यांच्याकडे केली.

दरवाढीप्रश्नी उद्योजक आक्रमक

$
0
0
औद्योगिक वापराच्या वीजदरवाढीवर तीन डिसेंबरला राज्य सरकारची बैठक आहे, त्यात समाधानकारक तोडगा न निघाल्यास १० डिसेंबरला संपूर्ण राज्यातील उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत.

एसटीचा थांबा साताऱ्यातच

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला जिल्ह्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला असून, कराड तालुक्यात कडकडीत बंद आहे. त्यामुळे कराड, कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी सातारा आगारात थांबवण्यात आल्या आहेत.

शाळा इमारतींवर मैदाने सवलतीत

$
0
0
फारसा उपयोग नसलेल्या मैदानांसाठी शाळांबरोबर रेडिरेकनरच्या दराने भाडे भरावे लागणार असल्याने इच्छुकांनी तिसऱ्या टेंडरनंतरही पाठ फिरवल्याने महापालिकेने आता मैदानांच्या रेडिरेकनरप्रमाणे होणाऱ्या भाड्यामध्ये तब्बल ९० टक्के सवलत दिली आहे.

इचलकरंजीत स्वच्छता मोहीम

$
0
0
पंचगंगेच्या दूषित पाण्यामुळे व काविळीचे रुग्ण आढळल्यानंतर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. इचलकरंजीतीले काविळीची साथ उद्भवण्यास कोल्हापूर महानगरपालिकेचे मैलायुक्त सांडपाणीच कारणीभूत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

ट्रॅक्टरखाली सापडून मुलगा ठार

$
0
0
ट्रॅक्टरमध्ये चढत असताना हात निसटून पडल्याने चाकाखाली सापडून पोहाळे तर्फ बोरगाव येथे शाळकरी मुलगा ठार झाला. हृ‌िषकेश दगडू पाटील (वय १५) असे त्याचे नाव आहे.

बंदला उत्तम प्रतिसाद

$
0
0
ऊसदर आंदोलनाची व्याप्ती वाढतच असून, गुरुवारी सांगली जिल्ह्यातील सव्वाशे गावांनी स्वतःहून गाव बंद ठेवून आंदोलनात उडी घेतली आहे.

पळून जाणाऱ्या प्रेमीयुगांची संख्या वा

$
0
0
प्रेमविवाहास विरोध होत असल्याने ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ स्टाईलने घर सोडून प्रियकरासमवेत पळून जाणाऱ्या तरुणींचे प्रमाण जास्त असल्याचे पोलिस रेकॉर्डवरुन दिसून आले आहे.

‘जितो’चा रविवारी पदग्रहण सोहळा

$
0
0
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो) या देशव्यापी संघटनेच्या कोल्हापूर विभागाच्या नूतन चेअरमनपदी नेमचंद संघवी यांच्यासह नवीन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा एक डिसेंबर रोजी होणार आहे.

ऊस आंदोलन तोडग्याच्या दिशेने

$
0
0
ऊसाला चांगला दर मिळावा यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे खासदार सदाशिवराव मंडलिक व राजू शेट्टी यांच्यात गुरुवारी रात्री झालेल्या चर्चेत तोडग्याच्या ‌दिशेने पाऊल पडले असून, आंदोलनाबाबत आज, शुक्रवारी सायंकाळी भूमिका जाहीर करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

‘फार्मसी’मध्ये नॅनो टेक्नॉलॉजीला महत्त्व

$
0
0
‘औषधी निर्माण क्षेत्रामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानास नजीकच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे’ असे मत मोनाद नॅनोटक (मुंबई) या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधुरी शेरॉन यांनी व्यक्त केले.

पाचशे कर्मचारी पुन्हा कामगार संघात

$
0
0
इंटक प्रणित कोल्हापूर महापालिका कर्मचारी संघ या बिगर मान्यताप्राप्त युनियनकडे गेलेले महापालिकेतील ५०० कर्मचारी मान्यताप्राप्त महानगरपालिका कर्मचारी संघाकडे परत आले. त्यांनी जाहीर प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याने कर्मचाऱ्यांचा मेळावा घेऊन प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

सहकाराला बदनाम करण्याच्या वृत्तीत वाढ

$
0
0
सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी काहीजण सहकार क्षेत्रामध्ये येत आहेत. सहकारामध्ये संस्थेपेक्षा व्यक्ती लोकप्रिय झाल्याने संस्था मोडकळीस येत आहेत. यामुळे सहकार क्षेत्र बदनाम होत असून बदनाम करणाऱ्या वृत्तीमध्ये वाढ होत आहे.

सशक्त आशयाचा प्रयोग

$
0
0
कोणत्याही कलेच्या प्रगतीसाठी नुसता देदीर्यमान इतिहास पाठीशी असून भागत नाही. एकदा का अशा चमचमणाऱ्या इतिहासाने डोळे दिपून घेतले की एक आंधळेपण येऊन वर्तमानाच्या खुंटलेल्या वाढीकडे, अपुरेपणाकडे लक्ष राहत नाही. तथाकथित भव्य इतिहासाने सोनेरी अक्षरांची पाने सजतील पण वर्तमानातले कोरे हताशपण छळत राहील.

बँकिंग व्यवस्था

$
0
0
रिझर्व्ह बँकेचे तिमाही पतधोरण हा तसा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर वाटणारा विषय, पण कुतूहलाचा विषय. बँकिंग, त्याचे कामकाज, धोरणे यांचे परिणाम व्यवहारात जाणवत असतात.

बारावी ऑनलाइनसाठी शिक्षण मंडळ सज्ज

$
0
0
बारावी परीक्षेचे फॉर्म ऑनलाइन भरुन घेण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सज्ज झाले आहे. कोल्हापूर विभागात बारावी परीक्षा शाखेत दहा कर्मचारी ऑफलाइन फॉर्म घेण्यासाठी नियुक्त केले आहेत.

केपीएलचा थरार

$
0
0
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केपीएल टी-२० चा थरार उद्या (रविवार)पासून सुरू होणार आहे. पूर्णपणे व्यवसायिक असलेल्या या स्पर्धेसाठी सहा संघातील प्रत्येकी १५ खेळाडूंची नोंदणी प्रकिया पूर्ण झाली आहे.

वेलकम टू कोल्हापूर

$
0
0
‌वीकेंड म्हटले की भटकंती, नाइट ‍आउट, सिनेमा, पार्टी, ट्रेकिंग असे उपक्रम आलेच. मात्र हिवाळ्यातील काही वी‌केंड पक्ष्यांसोबत घालवणे हाही एक वेगळा अनुभव ठरतो. सुदैवाने पक्ष‌ी निरीक्षणासाठी ठिय्या मारून बसता येईल असे स्पॉट शहर आणि परिसरात नक्कीच आहेत.

वाळवा तालुक्यात राजू शेट्टींचा निषेध

$
0
0
‘राज्यातील शेतकऱ्यांना उसाची पहिली उचल ३००० रुपये मिळवून देऊ, अशी आशा दाखवणारे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी कोणातरी एका साखर कारखान्याशी २२०० रुपयांनी सेटलमेंट करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो,’ अशी भावना व्यक्त करीत वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी इस्लामपूर येथे तहसीलदार रूपाली सरनोबत यांना निवदेन दिले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images