Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पेन्शनची बतावणी करून इचलकरंजीत वृद्धेची फसवणूक

$
0
0
मुलगीची पेन्शन मंजूर झाली असल्याची बतावणी करुन ७० वर्षीय वृद्धेकडील सुमारे ७८ हजार रुपये किंमतीची सोन्याची मोहनमाळ चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शनिवारी घडली. याबाबतची तक्रार श्रीमती शालाबाई वसंत मोरे (रा. मुक्त सैनिक सोसायटी, शहापूर रोड) यांनी गावभाग पोलिसांत दिली आहे.

बाजार समितीमध्ये थेट गूळ विक्री केंद्र

$
0
0
‘शहरी मध्यमवर्गीय ग्राहकांना जरुरीप्रमाणे गूळ मिळावा व शेतकऱ्यांनाही किरकोळ स्वरुपात व्यापार करता यावा यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने ‘थेट गूळ विक्री केंद्र’ ७ डिसेंबरपासून सुरु करणार आहे.

जाचक अटी कशासाठी?

$
0
0
देवदासी, वेश्यांची मुले अनैतिक संबंधातून जन्मलेली असतात, त्यामुळे ती वडिलांच्या नावाऐवजी आईचे नाव व आडनाव लावतात. अशा मुलांच्या भवितव्याचा विचार करून सरकारने बालसंगोपन तसेच संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे.

मिशन गोल्ड ते तांदूळ महोत्सव

$
0
0
जिल्ह्याच्या विकासाचा केंद्रबिंदू असणाऱ्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास आता जिल्हास्तरावरच प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी दिली जाते. राज्य सरकारने जिल्हा नियोजन समित्यांनाही व्यापक अधिकार दिल्याने आता जिल्हा नियोजन समित्याही सर्वार्थाने सक्षम आणि बळकट बनल्या आहेत.

वैराग्यातही विवेकानंदांकडून सतत समाजाचाच विचार

$
0
0
सुखवस्तू जगण्याचा मोह टाळून स्वामी विवेकानंदानी आपल्या विद्वत्तेला नम्रता आणि शालीनतेची जोड देत जीवननिष्ठा जपली, त्यातूनच त्यांचे प्रभावी व्यक्तीमत्व घडले,’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. शरच्चंद्र देगलूरकर यांनी केले.

तोडफोड झाली; केली कोणी?

$
0
0
शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात स्कोडा कारवर शुक्रवारी रात्री झालेल्या सशस्त्र हल्ल्याचे गूढ कायम असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. टोलला विरोध केल्याबद्दल ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून कारची तोडफोड केल्याची फिर्याद कारचालक जयराज धनराज चव्हाण (वय २८, रा. चिंतामणी अपार्टमेंट, शिंदे अंगण, संभाजीनगर परिसर) यांनी दिली आहे.

उद्योजकांनी जायचे कुठे ?

$
0
0
गुजरात, कर्नाटक आदी राज्यातील वीजदर हे महाराष्ट्रापेक्षा प्रतीयुनिट एक ते अडीच रुपये स्वस्त आहेत. सर्वात महागडा वीजदर महाराष्ट्रात असल्याने उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत.

पुरस्कारांची पाठराखण

$
0
0
जेव्हा एखाद्याला पुरस्काराची घोषणा होते, त्यावेळी त्याचा काळ आणि कर्तृत्व सर्वसामान्य माणसाच्या समोर असते. त्याला बाधा येऊ नये असेच प्रत्येकाला वाटत असते. अशावेळी पुरस्कार देणाऱ्यांची जबाबदारी आणखीनच वाढत असते.

शाहू समाधीसाठी मायावतींकडे झोळी

$
0
0
शाहू जन्मस्थळ विकासाची जशी उपेक्षा होत आहे तशी नियोजित समाधीस्थळाचीही होऊ नये, अशी अपेक्षा कोल्हापूरकर करत असतानाच कामाच्या प्रारंभीच महापालिकेला उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्याकडे निधीसाठी झोळी पसरण्याची वेळ आली आहे.

'उद्योजकांनो, हात पसरू नका!'

$
0
0
‘उद्योजक व्यवसाय कर, व्हॅट, टॅक्स या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कर राज्यसरकारला देतो. ही रक्कम कोट्यवधी रुपयांची आहे. मात्र, औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १० ते १५ कोटींसाठी उद्योजकांना राज्यकर्त्यांसमोर हात पसरावे लागतात, हे योग्य नाही.

प्रेझेंट पाकिटांवर चोरट्यांचा डल्ला

$
0
0
शहरातील तीन मंगल कार्यालयात शनिवारी चोरट्यांनी प्रेझेंट पाकिटांवरच डल्ला मारला. नातलग व आप्तेष्टांनी विवाहाप्रित्यर्थ दिलेली अंदाजे ४५ हजार रूपये असलेली प्रेझेंट पाकीटे चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लाहोरिया खून: एक जाळ्यात

$
0
0
मुंबईल बांधकाम व्यावसायिक सुनिलकुमार लाहोरिया यांच्या खुनातील प्रमुख आरोपी फरार असलेले अर्किटेक्ट अनुराग गर्ग यांचा अंगरक्षक शिवाजी शंकर यादव (वय ३०, रा. शिरगांव, ता. शाहूवाडी) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी पकडले.

जिल्ह्यात इतरत्रही मंडलिक फॉर्म्युला

$
0
0
पहिली उचल २६५० रुपये दोन टप्प्यांत जाहीर करून खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या फॉर्म्युल्याची री ओढत सर्व कारखाने सुरू झाले. दर जाहीर करताना दत्त-शिरोळ, जवाहर, शरद, आजरा, गडहिंग्लज, कुंभी-कासारी, आदी कारखान्यांनी २२५०+४०० अशी पहिल्या हप्त्याची घोषणा केली.

टायर जाळणाऱ्यांना ५ लाखांचा दंड?

$
0
0
आंदोलनात निषेध करताना टायर जाळून पर्यावरणाची हानी करणाऱ्या राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांना प्रति टायर पाच लाखाचा दंड करा, अशी याचिका राज्यातील १४ वकिलांनी पुण्यातील नॅशनल ग्रीन ट्रॅब्युनल (हरित लवाद) पश्चिम विभागीय खंडपीठाकडे दाखल केली.

कांदा, टोमॅटोची घसरण

$
0
0
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला झालेली सुरुवात व सोमवारी (ता. १६) होणाऱ्या रेणुका यात्रेनिमित्त लागणाऱ्या दुरडी, सूप, शिबडी व हारा या साहित्यांची बाजारपेठेत रेलचेल झाली आहे.

कॅमेऱ्याला सलाम

$
0
0
कलातपस्वी आनंदराव पेंटर यांच्या महत्त्वाकांक्षेनुसार त्यांचे बंधू कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी १ डिसेंबर १९१९ रोजी कोल्हापुरात चित्रपट निर्मितीला प्रारंभ केला.

मौलिक आशयाचे प्रभावी सादरीकरण

$
0
0
राज्य नाट्य स्पर्धेचा समारोप भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र निर्मित ‘ढोलताशे’ या नाटकाने झाला. चं. प्र. देशपांडे लिखित ‘ढोलताशे’ हे नाटक गर्दी आणि त्या विरोधातला एकटा माणूस यांच्यातील वैचारिक द्वंद्व फारच प्रभावीपणे व्यक्त करतं.

अस्वस्थ घुसमटीची चकचकीत मांडणी

$
0
0
अनुभवांची घटनांची केवळ वास्तववादी मांडणी अनेकदा फसवी असते. उत्तम कला अनुभवांचे निव्वळ वास्तववादी चित्रणात रमत नाही. वास्तवाला अनेक स्तर असतात, गुंते असतात, नाना तऱ्हा असतात. केवळ वरवरच्या मांडणीत हे गुंते गमावण्याची दाट शक्यता असते.

संवाद आणि तंत्रज्ञान

$
0
0
‘सलग सात तास आम्ही गप्पा मारत होतो. असंख्य विषयांवर. वेळ कसा गेला कळलेच नाही. तसा दादा माणूस आहे तो त्याच्या क्षेत्रात पण किती जमिनीवर आहे आणि किती सहज आहे ! वीस-पंचवीस वर्षांनंतर शाळेतला किंवा गल्लीतला जुना जिवलग मित्र भेटावा आणि कडकडून मिठी मारून झकास गप्पा रंगाव्यात अशाप्रकाराचेच काहीतरी झाल्यासारखे वाटत होते.

हेमलकसातील प्रकाशवाटा

$
0
0
कसंबसं अंग झाकण्यापुरता कपडा, काट्याकुट्याच्या वाटा तुडवत जळण आणण्यासाठी होणारी पायपीट, कुपोषणाने बोन्साय झालेलं बालपण आणि नागरी सुविधा म्हणजे काय याचा अर्थही माहित नाही अशा परिस्थितीत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्यानंतर डॉ. प्रकाश, डॉ. मंदा आणि अलीकडच्या अनिकेत व डॉ. दिगंत आमटे या सेवाभावी पिढ्यांनी सेवाव्रत सुरू ठेवले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images