Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

$
0
0

बुडालेल्या तरुणाचा

मृतदेह सापडला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलावाशेजारी पतौडी खणीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सोमवारी (ता. २८) सकाळी सापडला. ब्रिजेश कुमार गुप्ता (वय २१, मूळ रा. बासदेवपूर, जि. गाजीपूर, उत्तर प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी तो मित्रासह पोहण्यासाठी पतौडी खणीत गेला होता. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला.

ब्रिजेश गुप्ता हा विनोद गुप्ता या मित्रासह कामासाठी उत्तर प्रदेशातून कोल्हापुरात आला होता. हे दोघे जवाहरनगर परिसरात खोली भाड्याने घेऊन राहत होते. रविवारी संध्याकाळी ते दोघे पोहण्यासाठी पतौडी खणीत गेले. दोघांनाही पोहता येत नव्हते. ब्रिजेश हा हवेची ट्युब घेऊन खणीत उतरला. आत गेल्यानंतर ट्युब हातातून सुटल्याने तो बुडाला. मित्राने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी खणीकडे धाव घेतली. त्यांनी अग्निशामक दलास याची माहिती दिली. रविवारी रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दल आणि व्हाईट आर्मीच्या जवानांकडून शोधमोहीम सुरू होती. मात्र, मृतदेह सापडला नव्हता. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यानंतर गुप्ता याचा मृतदेह सापडला. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंचगंगा प्रदूषणप्रश्नी महानगरपालिकेवर मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषणात कोल्हापूर शहरातील सांडपाण्याचा मोठा वाटा आहे. थेट सांडपाणी नदीत मिसळत आहे. परिणामी नदीकाठावरील गावांना दूषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नदीकाठावरील संबंधित गावातील ग्रामस्थ पुढील आठवड्यात महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघेल. त्याच्या प्राथमिक नियोजनासाठी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत मोर्चा भव्य काढण्याचा निर्णय झाला.

पंचगंगेतील पाणी पातळी खालावली आहे. प्रदूषणामुळे नदीतील जलचर प्राण्यांचा मृत्यू होत आहे. नदीकाठावरील गावांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. संबंधित गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे काठावरील गावांतील लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. नदीतील वाहते पाणी कमी झाल्याने सांडपाण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. शहरातील सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्यात महानगरपालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. हायकोर्टाने आदेश देऊनही प्रदूषण रोखण्यासाठीच्या ठोस उपाय योजना करून घेण्याकडे जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळाने सोयीस्करपणे दूर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ नदीकाठावरील ग्रामस्थ मोर्चा काढणार आहेत. मोर्चा नियोजनाच्या बैठकीस हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, राजू मगदूम, अरूण माळी, अजीम मुजावर, पिंटू मुरमकर आदी उपस्थित होते.

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइन योजना

$
0
0

पान ३ मेन

...............

फाइल फोटो

........

काम जीकेसीचे, अभिप्राय युनिटीचा

'सल्लागार'ला मिळेना वेळ, मुदतवाढीसाठी अभिप्रायची प्रतिक्षा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजना ३१ मे पर्यंत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांनी मागितलेली मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. कंपनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार योजनेचे काम अजून चाळीस टक्के शिल्लक आहे. कंपनीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाने २४ मे रोजी या योजनेचे सल्लागार युनिटी कंपनीला तत्काळ म्हणणे सादर करण्याची सूचना केली. कंपनीला मुदतवाढ का द्यायची यासंदर्भात कारणमीमांसा कराव्यात अशा स्पष्ट सूचना आहेत. मात्र मे महिना संपत आला तरी अद्याप युनिटीकडून अभिप्राय सादर झाला नाही. युनिटी कंपनीची पाइपलाइन योजनेविषयी पुन्हा एकदा अनास्था आणि चालढकल सुरु असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिका प्रशासन, ठेकेदार कंपनीची ३१ डिसेंबर २०१८ पर्यंतची मागणी मान्य करते की नव्याने अटी घालते यावर योजना कधी कार्यान्वित होणार हे अवलंबून आहे.

२६ ऑगस्ट २०१४ रोजी योजनेच्या कामाचे उद्घाटन झाले. २७ महिन्यात योजना पूर्ण करण्याची मुदत होती. आणि त्यानंतर तीन महिने योजनेच्या चाचणीसाठी असा करार झाला होता. मात्र मुदतीच्या २७ महिन्याच्या कालावधीत योजनेचे केवळ ३५ टक्के काम पूर्ण झाले. कामाच्या सध्यस्थितीविषयी सांगताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'पाइपलाइन कामासाठी आवश्यक सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. एकूण ५२ किलो मीटर पाइपलाइनपैकी आतापर्यंत ३७ किलो मीटर पाइपलाइन टाकण्यात आली आहे. सोळांकूर ते धरणापर्यंतच्या बारा किमीच्या पाइपलाइनचे काम सध्या सुरु आहे. सोळांकूर गावातून जवळपास दीड किमी पाइपलाइन प्रस्तावित आहे. मात्र ग्रामस्थांच्या विरोधामुळे गावातील काम बंद आहे. पुईखडी येथील जलशुध्दीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. '

युनिटी सल्लागार कंपनीच्या कामाविषयी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने यापूर्वीच आक्षेप नोंदविले आहेत. तरीही प्रशासनाची युनिटीवर मेहेरनजर कशासाठी असा सवाल नगरसेवक करत आहेत. काळम्मावाडी धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ४८८ कोटी रुपयांची महत्वाकांक्षी योजना आखली. ठेकेदार जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीयापूर्वी मे २०१८ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत कंपनीला दिली होती. मात्र विविध प्रकारच्या परवान्यांना लागलेला विलंब, धरण परिसरातील पाण्याच्या साठ्यामुळे जॅकवेलच्या कामात उदभवलेले अडथळे यामुळे कंपनीने डिसेंबर २०१८ पर्यंत योजनेच्या कामासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी महापालिका प्रशासनाला केली आहे. महापालिका प्रशासनाने, २४ मे रोजी पाइपलाइन कामाच्या मुदतवाढीच्या मुद्यावरुन योजनेचे सल्लागार युनिटी कंपनीला म्हणणे मांडण्यास कळविले आहे.

.................

योजनेतील महत्वाची प्रस्तावित कामे

मौजे राजापूर ते पुईखडीपर्यंत ५२.९७ किमी पाइपलाइन

(आतापर्यंत ३७ किमी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण)

सोळाकूंर ते धरणापर्यंत बारा किमी पाइपलाइनचे काम सुरु

पुईखडी येथे ८० दश लक्ष लिटर्स क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्राचे काम सुरु

काळम्मावाडी धरणाच्या उजव्या तिरावर इनटेक वेल, जॅकवेल व पंपहाऊस

जॅकवेलचे अजून नऊ मीटर खोदाई शिल्लक

पपिंग मशिनरी : ९४० अश्वशक्ती क्षमता

दाब नलिका : १८०० मि व्यासाची लोखंडी दाबनलिका १०० मीटर

..............

कंपनीला रोज पाच हजाराचा दंड

जीकेसी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने २२ नोव्हेंबर २०१६ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मुदत होती. त्यानंतर तीन महिन्याच्या कालावधीत म्हणजे फेब्रुवारी २०१७ अखेर चाचणी घेऊन योजना कार्यान्वित करायची होती. मात्र मुदतीत योजना पूर्ण झाली नाही. म्हणून कंपनीने मुदतवाढ मागितली. महापालिका प्रशासनाने त्यांना ३१ मे २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली. आतापर्यंत सुमारे ६० टक्के काम झाल्याचा कंपनीचा दावा आहे. उर्वरित कामासाठी कंपनीने पुन्हा महापालिकेला पत्र देऊन डिसेंबर २०१८ अखेर मुदतवाढ मागितली आहे. त्यावरुन अजून निर्णय प्रलंबित आहे. दरम्यान मुदतीत योजना कार्यान्वित न केल्यामुळे कंपनीला नोव्हेंबर २०१६ पासून दंडात्मक कारवाई सुरु आहे.

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर उपमहापौरांचा कार्यालयीन प्रवेश

$
0
0

महापौर-उपमहापौरांचा

आज कार्यालयीन प्रवेश

कोल्हापूर

महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत यांचा मंगळवारी (ता.२९) सकाळी ११ वाजता महापालिकेत कार्यालयीन प्रवेश होणार आहे. याप्रसंगी प्रतिमा सतेज पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नविद मुश्रीफ व आयुक्त अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, प्रभाग समिती सभापती व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शुक्रवारी प्रकाशन

$
0
0

कोल्हापूर : येथील सुषमा कडोलकर यांच्या 'सुम्या' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन एक जून रोजी होणार आहे. शिवाजी उद्यमनगर येथील रामभाई सामाणी हॉल येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सिनेदिग्दर्शक यशवंत भालकर, लेखिका सोनाली नवांगुळ, चित्रकार संजय शेलार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवल क्लबला पुरस्कार

$
0
0

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडून सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्थेचा पुरस्कार गायन समाज देवल क्लबला जाहीर झाला आहे. मुलूंड येथे होणाऱ्या नाट्यसंमेलनात १४ जून रोजी पुरस्कार वितरण होणार आहे. यानिमित्त नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे गायन समाज देवल क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार 'गायन'ला मिळाल्याबद्दल नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुईंगडे, प्रमुख कार्यवाह प्रफुल्ल महाजन यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांचा सत्कार झालाा. याप्रसंगी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे संचालक प्रा. डॉ. शशिकांत चौधरी, आनंद कुलकर्णी, गिरीश महाजन, हेमसुवर्णा मिरजकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौर्य प्रशिक्षण वर्ग

$
0
0

कोल्हापूर: 'कार्यकर्त्यांनी निष्ठा, सेवा, सचोटी चातुर्य या त्रिसुत्रीचा अवलंब करुन काम केल्यास उत्कृष्ट संघटक बनू शकतो, त्यासाठी शौर्य प्रशिक्षण वर्ग उपयुक्त ठरेल.'असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यातर्फे आयोजित शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पाटील यांनी, यावेळी त्यांनी गिरणी कामगाराचा मुलगा ते राज्याचा महसूलमंत्रिपदापर्यंतचा प्रवास उलगडला. 'विहिंप'चे कैलास काईंगडे यांनी प्रास्ताविक केले. राजाभाऊ चौधरी यांनी स्वागत केले. विहिंपचे शहरमंत्री श्रीकांत पोतनीस यांनी परिचय करुन दिला. अॅड. सुधीर जोशी-वंदूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन अशोक रामचंदानी, संभाजी साळुंखे, रणजित आयरेकर, महेश कामत, रिंकू सोनार, सुधीर सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्याख्याने, मिरवणुकीने होणार सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवरायांचे कार्य व चरित्र जगासमोर जावे यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे २९ मे ते सहा जून या कालावधीत करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला घेण्यात येत आहे. हा सोहळा लोकोत्सोव म्हणून साजरा होणार आहे. सहा जूनला सायंकाळी साडेचार वाजता भव्य शिवराज्याभिषेक मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार बैठकीत दिली.

मुळीक म्हणाले, 'मिरवणुकीला मंगळवार पेठ येथील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून सुरुवात होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री, खासदार, आमदार, महापौर,उपमहापौर, ज्येष्ठ इतिहास संशोधक, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक, जिल्ह्यातील विविध संस्था व पक्षाचे पदाधिकारी यांना निमंत्रित केले आहे. मिरवणूक मार्ग कोळेकर तिकटी, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे शिवाजी पुतळा असा असेल. विविध राष्ट्रपुरुषांचे ऐतिहासिक प्रेरणादायी फलक, तसेच शिवकालीन व सद्यपरिस्थितीवर आधारित सामाजिक प्रबोधनात्मक फलकांचा समावेश मिरवणुकीत असणार आहे. हा सोहळा डॉल्बीमुक्त असणार असून यात धनगरी ढोल, लेझीम, मर्दानी खेळ, वारकरी पथक, शिवकालीन वेशभूषेचा समावेश केला जाणार आहे.

यावेळी शैलेजा भोसले, चंद्रकांत चव्हाण, शशिकांत पाटील, शंकराव शेळके, एकनाथ जगदाळे, प्रकाश पाटील, शरद साळुंखे, उत्तम पोवार, शिरीष जाधव आदी उपस्थित होते.

'ही तर शिवभक्तांची फसवणूक'

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सरकारने जाहीर केलेले ६०० कोटी कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, 'शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत जे मोठे झाले त्यांच्यात कृतिशीलता अजिबात दिसत नाही. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाची अजून एक वीटही रचण्यात आलेली नाही ही शिवभक्तांची सरकारने केलेली फसवणूक आहे,' असा आरोपही त्यांनी केला.

असे होतील कार्यक्रम

२९ मे : चित्रकार धीरज सुतार यांच्या छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राचे प्रकाशन.

३० मे : अवयवदान जनजागृतीसाठी प्रबोधनात्मक उपक्रम व अवयवदान केलेल्या अमर पाटील यांच्या

कुटुंबियांची निगवे गावी भेट व सांत्वन.

३१ मे : शाखाअंतर्गत वृक्षारोपण

शिवराज्याभिषेक व्याख्यानमाला

१ जून : ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे

विषय : मराठा कालचा आणि आजचा

२ जून : नाबार्ड माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात

विषय : वर्तमानाच्या शोधात छत्रपती शिवाजी

३ जून : आरपीएफ कमिशनर देवेंद्र कासार

व्याख्यानाचा विषय : राष्ट्रनिर्मातेः छत्रपती शिवाजी महाराज

वेळ व ठिकाण:

राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक वेळ : सायंकाळी ७. ३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दरवाढीचा भडका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या काही दिवसांपासून दररोज होत असलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहे. खर्चाचा ताळमेळ घालताना त्याला कसरत करावी लागत आहे, याच मुद्द्याला हात घालून सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने तर चक्क दुचाकींचा प्रतिकात्मक अंत्यविधी करण्यात केला. शिवसेनेच्यावतीने कावळा नाका येथे जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको आंदोलन केले.

फोटो आहे.

राष्ट्रवादीतर्फे दुचाकींचा

प्रतिकात्मक अंत्यविधी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तीन दुचाकींवर पांढरे कापड झाकत गुलाल टाकून प्रतिकात्मक अंत्यविधी करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हवालदील झाली आहे. सामान्यांना जगणं असह्य झाले आहे. याकडे सरकारचे लक्ष नसल्याचे आरोप करत दरवाढीच्या निषेधार्थ महावीर गार्डनपासून दुपारी साडे बारावाजता मोर्चाला प्रारंभ झाला. टांगा, सायकल, दुचाकी ढकलत कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालवर आला. तेथे कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी केली. 'वाढले पेट्रोल, वाढली महागाई, सरकार लुटतय,जनतेची कमाई', 'माणसे मेली, अन गाड्याही मेल्या', 'अरे कसले हे सरकार, अबकी बार लांबूनच नमस्कार', 'चांदा ते बांदा पेट्रोलने केला सर्वांचा वांदा' असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. शिष्टमंडळातर्फे पेट्रोल, डिझेल दरवाढ मागे घेण्यासंबंधीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.

पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, शेतकरी संघाचे संचालक जी. डी. पाटील, भोगावती साखर कारखान्याचे संचालक सुनील कारंडे, शिवाजी देसाई, दत्ता गाडवे, सुरेश पाटील, राजाराम कासार, सुनील परीट, किरण पाटील आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्वाधिक प्रलंबित गुन्हे पुणे ग्रामीणमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची संख्या कोल्हापूर परिक्षेत्रात वाढत आहे. यात सर्वाधिक ६३३६ प्रलंबित गुन्हे गुणे ग्रामीणमध्ये आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात कमी ४६२ गुन्हे प्रलंबित आहेत. परिक्षेत्रात कोल्हापूर जिल्हा गुन्ह्यांची उकल करण्यातही आघाडीवर आहे. दरम्यान, राज्यातील इतर परिक्षेत्रांच्या तुलनेत गुन्हे नोंदवून घेण्याचे प्रमाण कोल्हापूर परिक्षेत्रात अधिक असल्याने प्रलंबित गुन्ह्यांची संख्या जास्त दिसत असल्याचे अधिकारी सांगतात.

राज्यातील मुंबईनंतर सर्वात महत्त्वाचे परिक्षेत्र म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचा उल्लेख केला जातो. या परिक्षेत्रात गेल्या वर्षभरात ५३ हजारांहून अधिक गुन्हे दाखल झाले. यातील सर्वाधिक २६७२० गुन्हे पुणे ग्रामीणमध्ये दाखल झाले आहेत. यापैकी एक वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांची संख्या ६३३६ इतकी आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील एकूण गुन्ह्यांच्या तुलनेत पुणे ग्रामीणमध्ये ५० टक्के गुन्हे नोंद होतात. यानंतर सोलापूर ग्रामीणमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९४३० गुन्ह्यांपैकी ११२७ प्रलंबित आहेत. सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षात सर्वात कमी ५२०० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यातील ८३७ प्रलंबित आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ६७२२ गुन्ह्यांची नोंद झाली असून, यापैकी ४६२ गुन्हे प्रलंबित आहेत. परिक्षेत्रात सर्वात कमी प्रलंबित गुन्हे कोल्हापुरात आहेत.

राज्याच्या तुलनेत मात्र कोल्हापूर परिक्षेत्र प्रलंबित गन्ह्यात आघाडीवर आहे.

'कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्हे दाखल करून घेतले जातात. ऑनलाइन गुन्हे नोंद करण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय कायदा सुव्यवस्थेसाठी अनेकदा पोलिस स्वत:हून फिर्यादी बनून गुन्हे दाखल करतात. गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असले तरीही गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात कोल्हापूर परिक्षेत्र आघाडीवर आहे,' अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

..म्हणून गावकऱ्यांचं विहीरीतच आमरण उपोषण

$
0
0

पंढरपूर :
गावातील बोअरवेलमधून विहीरीत पाणी देण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्याने त्याचा खाजगी वापर सुरु केल्याचा निषेध करण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील उंबरगावचे गावकरी दोन दिवसांपासून चक्क विहिरीतच आमरण उपोषणाला बसले आहेत.

उंबरगाव ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक बोअर खणली होती. या बोअरमधून गावाच्या विहीरीत पाणी सोडून गावाला पाणीपुरवठा केला जात होता . मात्र गावातील एका ग्रामपंचायत सदस्याने या बोअरला कुलूप ठोकलं. बोअरचा खाजगी वापर त्यानेसुरू केला. यामुळे गावाला मिळणारं पाणी बंद झालं असा गावकऱ्यांचा आरोप आहे. याचा विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी गावातील खोल विहिरीत आमरण उपोषण सुरु केलंय.या उपोषणाला दोन दिवस झाले तरी प्रशासन मात्र अजूनही झोपलेलंच आहे. प्रशासन लक्ष देत नाही आणि ग्राम सदस्यावर कारवाई होत नाही म्हणून गावकरी संतप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगीबाबत बैठक...

$
0
0

दीड हजारांवर घरात डेंगीचे डास

महापालिकेत पदाधिकारी, अधिकाऱ्यांची बैठक, डेंगीला आळा घालण्यासाठी प्रभावी उपाय आखण्याची सूचना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डेंगीला आळा घालण्यासाठी शहरात आरोग्य विभागाची ३०० पथके कार्यरत आहेत. शहरातील ७७६०८ घरांचे सर्व्हेक्षण झाले असून यामध्ये १६३० घरांमध्ये डास व आळया सापडल्या आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत ५२ लोकांना डेंगीची लागण झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. डेंगीला प्रतिबंध करण्यासाठी आतापर्यंत शहरात १४०१ टायर्स जप्त केल्या आहेत. तसेच २३,८२० व्हेंट पाइपला जाळी बसविली आहे. आरोग्य विभागाकडे किटकनाशके व जंतुनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती दिली.

महापौर शोभा बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात बैठक झाली. डेंगीबाबत सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, आरोग्यनिरीक्षकांनी प्रत्येक प्रभागात स्वच्छता राखावी अशा सूचना केल्या. अधिकाऱ्यांनी मोबाइल बंद ठेवू नयेत असेही त्यांनी बजावले. उपमहापौर महेश सावंत यांनी शहरातील झोपडपट्टी व गरीब गरजू रुग्णांना अल्पदरात औषधोपचाराच्या सुविधा पुरवाव्यात अशी सूचना केली. आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील यांनी आरोग्य उपाययोजनांची माहिती दिली. भागामध्ये तापाच्या संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेण्यासाठी आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे सांगितले. याप्रसंगी परिवहन समिती सभापती राहुल चव्हाण, प्राथमिक शिक्षण समिती सभापती वनिता देठे, महिला व बाल कल्याण समिती सभापती सुरेखा शहा, प्रभाग समिती सभापती शोभा कवाळे, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर आदी उपस्थित होते.

.............

पाच जूनपर्यंत नाल्यांची सफाई

सभागृह नेता दिलीप पवार यांनी शहरामध्ये नालसफाई सुरु आहे का अशी विचारणा केली. मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील यांनी शहरातील नाल्यांची सफाई सुरु असल्याचे सांगितले. ते म्हणाले,' कर्मचाऱ्यांकडून छोट्या ४७६ नाल्यांपैकी ४२० नाल्यांची सफाई झाली आहे. जेसीबीच्या साहाय्याने करण्यात येणाऱ्या ३३६ नाल्यांपैकी १७७ नाल्यांची सफाई झाली आहे. गोमती व जयंती नाल्यांची पोकलॅनद्वारे १३ कि.मी पैकी साडे सात किमीचे काम पूर्ण केले आहे. उर्वरीत सर्व नाल्यांची पाच जूनपर्यंत सफाई पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच प्रत्येक प्रभागात आठवडयातून दोन वेळा धूर फवारणी व पंधरा दिवसातून एकदा औषध फवारणी सुरु आहे.

..........................

काय खबरदारी घ्यावी

घरामध्ये वापरासाठी भरुन ठेवलेली पाण्याची भांडी नीट झाकून ठेवावीत.

पाण्याची भांडी आठवड्यातून एक वेळा कोरडी ठेवावीत.

डासांपासून संरक्षणासाठी लांब हाताचे व पायघोळ कपडे वापरावेत.

नारळाच्या करवंट्या, टायरची वेळीच विल्हेवाट लावावी.

फ्रिजच्या मागील जाळया स्वच्छ ठेवाव्यात.

झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये.

.................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यतस्कर होणार हद्दपार

$
0
0

फाइल फोटों

..............

पान ३ मेन

..................

मद्यतस्कर होणार हद्दपार

कोल्हापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १० मद्यतस्कर रडारवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात होणारी गोवा बनावटीची मद्यतस्करी रोखण्यासाठी रेकॉर्डवरील तस्करांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे. यात कोल्हापूरसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहा सराईतांचा समावेश आहे. या कारवाईमुळे मद्यतस्करांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या १४ महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने तस्करीतील ३ कोटी ८३ लाखांचे मद्य जप्त केले.

महामार्गांवरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी सुप्रीम कोर्टाने १ एप्रिल २०१७ पासून महामार्गांवरील ५०० मीटर अंतरातील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिले होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मद्यतस्करी वाढली आहे. विशेषत: गोवा बनावटीच्या मद्याची छुपी वाहतूक वाढली असून, चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा हे तीन तालुके मद्यतस्करीचे अड्डे बनले आहेत. गोव्यात कमी किंमतीत मिळणारे मद्य खरेदी करून महाराष्ट्राचा महसूल बुडवून ते आणले जाते. गोव्यात खरेदी केलेल्या पाच लाख रुपयांच्या मद्याची महाराष्ट्रात काळ्या बाजारातील किंमत सुमारे २५ लाख इतकी आहे. याशिवाय वाहतुकीसाठी ५० हजारांपासून १ लाखापर्यंत रक्कम दिली जाते. गोवा बनावटीच्या मद्यातून मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असल्याने तस्करीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या १४ महिन्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने ३ कोटी ८३ लाख रुपयांचे मद्य पकडले. या कारवाईत १३६ वाहने जप्त करून १०२५ आरोपींना अटक केली. यापैकी काही तस्कर वारंवार या गुन्ह्यात सापडत आहेत. अशा तस्करांना रोखण्यासाठी हद्दपारीच्या कारवाया केल्या जाणार आहेत. यासाठी सराईत तस्करांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त यशवंत पोवार यांनी दिले आहेत.

हद्दपारीचा पहिला प्रस्ताव फिरोज अहमद शेख (वय ४०, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याच्यावर दाखल केला जाणार आहे. शेख हा २०१६ मध्ये गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करताना गडहिंग्लजच्या पथकाला सापडला होता. त्याने ४७ लाखांच्या मद्याची अवैध वाहतूक केली होती. यानंतर तो पुन्हा २८ लाखांच्या मद्याची तस्करी करताना पथकाला सापडला आहे. याशिवाय गोवा-सावंतवाडी-कोल्हापूर या मार्गावरील तस्करीतही त्याचा अनेकदा सहभाग आढळला आहे. त्यामुळे शेख याच्यावर हद्दपारीची कारवाई होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील काही तस्करही राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रडारवर आहेत. मद्याचा अवैध साठा करून विक्रीसाठी त्याची छुपी वाहतूक करणारे दहाहून अधिक सराईत तस्कर या तीन तालुक्यात कार्यरत आहेत. लवकरच त्यांच्यावरही हद्दपारीची कारवाई होणार आहे. या कारवाईमुळे मद्यतस्करांचे रॅकेट उद्धवस्त होण्यास मदत होणार आहे.

...............

चौकट

१४ महिन्यात ३ कोटी ८३ लाखांचे मद्य जप्त

एप्रिल २०१७ ते मार्च २०१८

कारवाया - १८३५

मद्यसाठा - २ कोटी ५३ लाख

जप्त वाहने - १३६

अटक आरोपी - १०२५

एप्रिल २०१८ ते मे २०१८

कारवाया - ३३२

जप्त मद्यसाठा - १ कोटी ३० लाख

जप्त वाहने - ३०

अटक आरोपी - १६०

..............

चौकट

मद्य तस्करीत तरुणांचा सहभाग

मद्य तस्करीत तरुणांचा सहभाग वाढल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. वाहन चालवणे, मद्याचे बॉक्स भरणे आणि उतरण्याचे काम करणारे अनेक तरुण कारवाईत सापडत आहेत. कमी वेळेत त्यांना अवैध कामाचे हजारो रुपये मिळतात, त्यामुळे तरुणाईला बेकायदेशीर कामाची चटक लागली आहे. गोव्यातून मद्य खरेदी करून सावंतवाडी परिसरात साठा करणारेही काही तरुण राज्य उत्पादन शुल्कच्या रडारवर आले आहेत. अवैध कमात गुंतलेल्या तरुणांमुळे गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे.

.............

कोट

'तस्करीच्या मद्याची विक्रीदेखील अवैध पद्धतीनेच केली जाते. यात काही संशयित वारंवार सापडत असल्याने त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. यानुसार ८ ते १० तस्करांवर हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे तस्करीचे रॅकेट मोडून काढता येईल.

गणेश पाटील, अधीक्षक, उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सासरवाडीला जाण्यासाठी चोरली बुलेट

$
0
0

(फोटो आहे)

सासूरवाडीला जाण्यासाठी चोरली बुलेट

उच्चशिक्षित तरुण अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अधिक महिन्याच्या वाणासाठी पत्नीसह सासूरवाडीला जाण्यासाठी बुलेट चोरणाऱ्या तरुणास पोलिसांनी मंगळवारी (ता. २९) अटक केली. जयदीप शहाजी पाटील (वय २२, सध्या रा. कळंबा, मूळ रा. कुरळप, जि. सांगली) असे चोरट्याचे नाव आहे. त्याने शनिवारी (ता. २६) सकाळी कावळा नाका येथील बुलेटच्या वर्कशॉपमधून पंडित बापू सुतार (४८, रा. शेंडूर, ता. कागल) यांची बुलेट चोरली होती.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेंडूर येथील पंडित सुतार यांचा मुलगा अवधूत आणि भाचा हे दोघे शनिवारी सकाळी बुलेट (एम.एच. ०९ ई.एच. ६५३५) दुरुस्तीसाठी कावळा नाका येथील वर्कशॉपमध्ये आले होते. वर्कशॉपमध्ये बुलेट लावून थांबले असता, एक तरुण आला. दुरुस्ती करण्याआधी बुलेट चालवून पाहतो, असे म्हणत त्याने चावी घेतली. यानंतर बुलेट घेऊन गेलेला तरुण परतलाच नाही. अर्धा तास उलटूनही तो परत येत नसल्याचे पाहून अवधूतने वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. यावेळी कर्मचाऱ्यांशिवाय दुसरीच व्यक्ती बुलेट घेऊन गेल्याचे लक्षात आले. तीन दिवस शोध घेतल्यानंतर पंडित सुतार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात बुलेट चोरीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी २६ तारखेचे कावळा नाका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बुलेट घेऊन जाणारा तरुण हॉकी स्टेडियमकडून कळंब्याच्या दिशेने गेल्याचे दिसले. यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शोध घेतला. कळंब्यातील अंबाई हॉलच्या मागे भाड्याने खोली घेऊन राहणारा संशयित जयदीप पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बुलेटबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बुलेट चोरल्याची कबुली दिली.

लग्नानंतर पहिलाच अधिक महिना असल्याने सासूरवाडीला जाण्यासाठी बुलेट चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. बुलेट चोरल्यानंतर त्याने नंबरप्लेट बदलली, आरसे काढले. पत्नीला घेऊन शनिवारीच सातारा जिल्ह्यातील मोरेवाडी (ता. सातारा) येथील सासूरवाडीत गेला. नवीन बुलेट घेतल्याचे सांगितल्याने सासूरवाडीत बुलेटचे पूजनही झाले. सोमवारी तो पुन्हा कोल्हापुरात आला. जयदीप हा पत्नीसह गणपतीपुळे येथे एका जहाज कंपनीत काम करीत होता. चार महिन्यांपूर्वी दोघांनीही नोकरी सोडली. सध्या तो कोल्हापुरात टिंबर मार्केट परिसरात अत्तर विक्रीचे काम करतो. अधिक महिन्यातील वाण घेण्यासाठी ऐटीत सासूरवाडीला जायचे होते, त्यामुळे बुलेट चोरल्याची कबुली त्याने दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील एक लाख रुपये किंमतीची बुलेट हस्तगत केली. एलसीबीचे निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज आठरे, सचिन पंडित, राजेंद्र सानप, हावलदार रमेश डोईफोडे, अजय काळे आदींच्या पथकाने चोरट्यास पकडले.

..............

चौकट

पहिल्याच प्रयत्नात पोलिसांच्या जाळ्यात

जयदीप पाटील आणि त्याच्या पत्नीचे बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचे आई-वडील कुरळपमध्ये राहतात. वडील सरकारी नोकरीतून निवृत्त झाले आहेत, तर आई गृहिणी आहे. जयदीप पत्नीसह गणपतीपुळे येथे खासगी कंपनीत काम करीत होता. नोकरी सोडून दोघेही कोल्हापुरात आले होते. वर्षापूर्वी या दोघांनी प्रेमविवाह केला आहे. लग्नानंतर पहिलाच अधिक महिना असल्याने ऐटीत सासूरवाडीला जाण्याचे नियोजन त्याने केले होते. हेच नियोजन त्याच्या अंगलट आले आणि चोरीच्या पहिल्याच प्रयत्नात पोलिस कोठडीची हवा खावी लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेतील अधिकारी महिलेकडून ९ लाखांची फसवणूक

$
0
0

बँकेतील अधिकारी महिलेकडून

९ लाखांची फसवणूक

फिनो पेमेंट्स बँक प्रशासनाने केला गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कळंबा येथील फिनो पेमेंट्स बँकेच्या शाखाधिकारी महिलेनेच सुमारे नऊ लाख रुपये बँकेच्या खात्यावरून काढून स्वत:च्या फायद्याकरिता वापरले. या प्रकरणी पल्लवी सुधीर जगताप (मूळ रा. पंदारे जगताप वस्ती, पुणे, सध्या रा. कळंबा) या महिलेवर बँक प्रशासनाने मंगळवारी (ता. २९) करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा (ता. करवीर) येथे फिनो पेमेंट्स बँकेची शाखा आहे. या ठिकाणी शाखाधिकारी म्हणून पल्लवी जगताप काम पाहते. ती कळंबा येथे दत्तात्रय हवालदार यांच्या घरी भाड्याने राहते. बँकेचे सर्व व्यवहार तिच्या सहीने होतात. ११ ते १९ मे दरम्यान शाखाधिकारी जगताप हिने फिनो फायनान्स खात्यावरील ६ लाख ८७ हजार ५७० रुपये व फिनो पेमेंट्स खात्यावरील २ लाख ६ हजार रुपये असे एकूण ८ लाख ९३ हजार ८४९ रुपये बँकेच्या खात्यावर न भरता आपल्या स्वत:च्या फायद्याकरिता वापरले. हा प्रकार बँक प्रशासनाच्या लक्षात येताच बँकेचे मुंबई शाखेतील अधिकारी प्रभाकर तांडेल (रा. कुर्ला, पश्चिम मुंबई) यांनी मंगळवारी करवीर पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक दिलीप जाधव अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन तालुके क्षयमुक्तकरण्याचे उद्दिष्ट

$
0
0

डॉ. कुणाल खेमनार यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक मोहिम राबवण्यात येत आहे. यंदा पन्हाळा, गगनबावडा दोन तालुके क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी मंगळवारी केली. क्षयरूग्ण शोध विशेष मोहिम उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कागलकर हाऊस सभागृहात हा कार्यक्रम झाला.

डॉ. खेमनार म्हणाले, 'क्षयरोग शोध विशेष मोहिमेतर्गंत १ लाख ४७ हजार लोकांपर्यंत पोहचण्याचे नियोजन केले आहे. त्यामध्ये झोपडपट्टी, स्थलांतरीत, दुर्गम परिसरात सर्व्हे केले जाईल. सर्व्हेसाठी आरोग्य प्रशासनाने १३८ पथके तैनात केली आहेत. जिल्ह्यात २०१३ ते २०१६ पर्यंत १३ हजार ६०३ क्षयरोग रूग्ण आढळून आले. २०१७ मध्ये त्यामध्ये २ हजार ८९३ नविन रूग्णांची भर पडली. ३०४ रूग्ण गंभीर आहेत. जिल्हयातील क्षयरोग रूग्णांची संख्या कमी करण्यासाठी पहिल्या टप्यात सर्व्हे होईल. सप्टेंबर, डिसेंबर महिन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यात रूग्णांची नोंदणी केली जाईल.

प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांनी प्रास्ताविक केले. मागील वर्षी क्षयरोग रूग्ण शोध मोहिमेत उल्लेखनिय कामगिरी केलेले अधिकारी, कर्मचारी, आशा कार्यकर्त्या यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसी कदम, जिल्हा परिषद सदस्या पुष्पा आळतेकर आदी उपस्थित होते.

------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत शाळांतप्रवेश न घेण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात अनधिकृत प्राथमिक शाळांत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी प्रसिध्दी पत्रकातून केले आहे. दरम्यान, शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईक यांच्या नावे असलेल्या बहिरेवाडीतील शाळेतही अनधिकृत वर्ग सुरू आहेत. यासह अनधिकृत शाळांना एक लाखांची दंडात्मक कारवाईचे सरकारचे आदेश आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी चौगुले यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

अनधिकृत शाळा व वर्ग सुरू असलेल्या शाळांची नावे अशी : विद्याभवन इंग्लिश मिडियम स्कूल, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल (उजळाईवाडी, ता. करवीर), जिनियस पब्लिक स्कूल (भुये, ता. करवीर), यश इंग्रजी मिडियम स्कूल (पेठवडगाव, ता. हातकणंगले), सेंट ॲन्स इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानप्रबोधीनी इंग्लिश मिडियम स्कूल (बाचणी, ता. कागल), जे. पी. नाईक ग्लोबल स्कूल (बहिरेवाडी, ता. आजरा), एस. एन. इंग्लिश मिडियम स्कूल (आजरा), रोझरी इंग्लिश स्कूल, (वाटंगी, ता. आजरा), शिवराज इंग्लिश स्कूल (गडहिंग्लज), हिरण्यकेशी (नूल, ता. गडहिंग्लज), प्रेमांगण इंग्लिश स्कूल (हेरे, ता. चंदगड), वि. मं. यशोदा इंग्लिश मिडियम स्कूल (सावर्डे, ता. पन्हाळा), प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल, राधाबाई शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल (कोल्हापूर), विद्यांजली प्राथमिक विद्यालय (कोंडीग्रे, ता. शिरोळ), केंद्रीय प्राथमिक शाळा (शाहूवाडी), किलबिल विद्यामंदिर, खतीजा सेमी-उर्दू (गडहिंग्लज).

--------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी

$
0
0

गांधीनगर ,उचगाव परिसरात

डेंगीचे रुग्ण आढळल्याने खळबळ

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा,

करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे वाधवानी कुटुंबातील तिघांना आणि उचगांव पैकी निगडेवाडी येथे सात ते आठजणांना डेंगीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्याचबरोबर तापाचे १० ते १५ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने अर्धवट गटर्स ठेवल्याने पाणी तुंबून राहिल्यामुळे ही परिस्थिती उदभवल्याचे स्थानिकांनी सांगितले.

गांधीनगर येथील निरंकारी कॉलनीतील वाधवानी कुटुंबातील तिघांवर खासगी रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहेत . गांधीनगर येथील अस्वच्छतेमुळे आणखी रुग्ण वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, उचगांव ग्रामपंचायतीने धूरफवारणी व परिसर स्वछता सुरू केली आहे. आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेतले असून निगडेवाडी परिसरात गटारीचे पाणी तुंबून राहिल्याने त्या पाण्यात अळ्या झाल्या आहेत .परिसरात बोअरचे पाणी जास्त वापरले जाते . अशुद्ध पाणी साचून ते जमिनीत मुरते. हे पाणी बोअरव्दारे वापरल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. येथील मोरे, निगडे, राशिवडे कुटुंबियांतील सुमारे १० ते १५ रुग्ण ताप, उलट्यांनी त्रस्त आहेत. तर डेंगीचे आठ रूग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे.

निगडेवाडी येथे एका मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरु असून येथे ५० कामगार काम करतात . याठिकाणी कंपाऊंडला लागूनच मोठी संडास टाकी बांधली आहे. त्याचे पाणी रस्त्यावर वाहून जमिनीत मुरत असल्याची स्थानिकांची तक्रार आल्यानंतर ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरु केल्याचे सरपंच मालूताई काळे यांनी सांगितले . दरम्यान, गटारीचे पाणी निचरा करून नवीन गटारी बांधाव्यात, अशी मागणी निगडेवाडी ग्रामस्थांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डायरी-

$
0
0

परिषद: सम्यक प्रतिष्ठान व सन्मान महिला फाउंडेशनच्यावतीने चिंतन परिषद, स्थळ: राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर, वेळ: सकाळी ११ वा.

व्याख्यान: कोल्हापूर चित्पावन संघाच्यावतीने व्याख्यान, व्याख्यात्या: कांचनताई परुळेकर, स्थळ: तुळजाभवानी संकुल मंगळवार पेठ, कोल्हापूर, वेळ: दुपारी ४ वा.

आरती: श्री अखिल भारतीय पू- वैष्णव परिषदेच्यावतीने अधिक मासनिमित्त आरती, स्थळ: बाळकृष्ण हवेली मंदिर नागाळा पार्क, कोल्हापूर, वेळ: सायं. ६.३० वा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामीण टपालसेवेला फटका

$
0
0

फाइल फोटो

.............

संपामुळे लाखांहून अधिक टपाल पडून

डाकसेवकांचा सलग आठव्या दिवशी संप सुरूच

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण डाकसेवकांचा सलग आठव्या दिवशी संप सुरू असल्याने टपालसेवा पूर्णपणे विस्कळित झाली आहे. टपाल खात्याकडे पर्यायी सक्षम व्यवस्था नसल्याने ग्रामीण भागात टपाल पोहोचलेले नाहीत. रेल्वे मेल शॉर्टिगकडून (आरएमएस) जिल्ह्यात पाठविलेले टपाल विभागीय पोस्ट कार्यालयातच पडून आहेत. एक लाखांहून अधिक टपाल ४२५ विभागीय पोस्ट कार्यालयात अद्याप पडून आहेत.

शाखा डाकपाल आणि डाकसेवकांचे कामे थांबल्याने त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. डॉ. कमलेशचंद्र कमिटीच्या सर्व सकारात्मक शिफरशी त्वरित लागू कराव्यात, या मागणीसाठी डाकसेवकांचा देशव्यापी संप सुरू आहे. संपाचा आठवा दिवस असून जिल्ह्यातील ८०० डाकसेवक सहभागी झाले आहेत. ऑल इंडिया ग्रामीण डाक सेवक युनियन (एआयजीडीएसयू) आणि नॅशनल युनियन ग्रामीण डाकसेवक युनियन (एनयूजीडीएस) या दोन संघटनांच्या नेतृत्वाखाली संप सुरू आहे. शाखा डाकपालांकडून पोस्ट खात्याची बचत खाती, रिकरिंगसह अन्य खात्यावरील देवघेवीचा व्यवहार केला जातो. डाकपाल संपात सहभागी झाल्याने पोस्टाचे आर्थिक व्यवहार कोलमडले आहेत. डाकसेवक नसल्याने ग्रामीण भागातील टपाल व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आरएमएसकडून आलेली पत्रे, रजिस्टर्स, स्पीड पोस्ट, चेकबुक, आरटीओ स्मार्ट कार्ड, पासपोर्टसह अन्य टपाल विभागीय कार्यालयात पडून आहेत. मात्र वाटपासाठी कर्मचारी नसल्याचे चित्र आहे. प्रत्येक गावांत दररोज सरासरी १५० टपालांचे वितरण केले जाते. जिल्ह्यातील १२ तालुक्यांत लाखाहून अधिक टपाल पडून आहे. या टपाल कामाचे आउटसोर्सिंगही करता येत नसल्याने नागरिकांची महत्वाची पत्रे मिळालेली नाहीत. डाकसेवकांच्या मागण्यांसाठी दिल्ली येथे कामगार आयुक्तालयाने दोन्ही संघटनांच्या झालेल्या बैठकीतही तोडगा निघालेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images