Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

घरासमोरून दुचाकी लंपास

$
0
0

घरासमोरून दुचाकी लंपास

कोल्हापूर

शनिवार पेठेत घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. तीन मे रोजी दुपारी दोन ते रात्री आठच्या दरम्यान हा प्रकार घडला. शिवप्रसाद भाऊसाहेब पाटील (वय २८, रा. शनिवार पेठ) यांनी याबाबत लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांनी त्यांची दुचाकी घरासमोर रस्त्याकडेला लॉक करून लावली होती. दुपारी ते घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्री परत आल्यानंतर त्यांना दुचाकी दिसली नाही. आसपास शोध घेऊनही दुचाकी सापडली नसल्याने त्यांनी सोमवारी (ता. २८) लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

.....................

दोन ठिकाणी मोबाइल चोरी

कोल्हापूर

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी मोबाइल चोरी झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. शासकीय विश्रामगृहातील नवीन सूट क्रमांक १२ मधून अज्ञात चोरट्याने १० हजार रुपये किंमतीचा मोबाइल लंपास केला. हा प्रकार शनिवारी (ता. २६) दुपारी चारच्या सुमारास घडला. याबाबत सतीश एकनाथ लाड (वय २७, रा. सातार्डे, ता. पन्हाळा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. रविवारी (ता. २७) रात्री आठच्या सुमारास शाहूपुरीत पाच बंगला परिसरातील भाजी मंडईत मोबाइल चोरीची घटना घडली. सुनील शिदलिंगाप्पा बंदी (वय ४२, रा. राजारामपुरी, ५ वी गल्ली) यांच्या शर्टच्या खिशातील मोबाइल अज्ञात चोरट्याने लांबवला. १० हजार रुपये किंमतीच्या मोबाइलची चोरी झाल्याची फिर्याद बंदी यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधन- २

$
0
0

अंजली जाधव

कोल्हापूर

उत्तरेश्वर पेठ येथील अंजना मुरलीधर जाधव (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, जावई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३०) सकाळी आहे.

००

शाम राजाज्ञा

कोल्हापूर

आर. के. नगरा येथील शाम दामोदर राजाज्ञा (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३०) सकाळी नऊ वाजता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२८ लाखांचे मद्य जप्त

$
0
0

२८ लाखांचे मद्य जप्त

आजरा-गडहिंग्लज मार्गावर हिरलगे फाट्याजवळ कारवाई

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याचा महसूल चुकवून गोवा बनावटीचे मद्य कोल्हापूर जिल्ह्यात घेऊन येणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. २८ लाख २७ हजार ६८० रुपयांच्या मद्यासह टेम्पो असा ३४ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. टेम्पोचालक फिरोज अहमद शेख (वय ४०, रा. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला पथकाने अटक केली. आजरा-गडहिंग्लज मार्गावर हिरलगे फाटा येथे सोमवारी (ता. २८) संध्याकाळी ही कारवाई केली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा बनावटीचे मद्य आंबोलीमार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणार असल्याची माहिती गडहिंग्लज येथील निरीक्षक पी. आर. पाटील यांना मिळाली होती. यानुसार सोमवारी संध्याकाळी गडहिंग्लज ते आंबोली मार्गावर संशयित वाहनांची तपासणी सुरू होती. हिरलगे फाटा येथे पाटील यांच्या पथकाला संशयास्पद टेम्पो (एम.एच. ०७ पी. ०४९५) आढळला. टेम्पो थांबवून तपासणी केली असता, यात गोवा बनावटीच्या मद्याचे ४७१ बॉक्स आढळले. याची किंमत २८ लाख २७ हजार ६८० रुपये इतकी आहे. टेम्पोसह ३४ लाख ७७ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून, चालक फिरोज शेख याला अटक केली.

गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारा संशयित शेख हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहे. दीड वर्षांपूर्वी ४७ लाख रुपये किमतीच्या मद्याची वाहतूक करताना तो सापडला होता. तेव्हा तो टेम्पोचालक म्हणून काम करीत होता. दीड वर्षात त्याने स्वत:च्या मालकीचा टेम्पो खरेदी केला असून, याच टेम्पोतून मद्यतस्करी केली जात होती. त्याने कोणाकडून मद्याची खरेदी केली, त्याचबरोबर गडहिंग्लज आणि कोल्हापूर येथे कोणाला विक्री केली जाणार होती याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्याच्यावर हद्दपारीच्या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असल्याचे अधीक्षक गणेश पाटील यांनी सांगितले. उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गडहिंग्लजचे निरीक्षक पी. आर. पाटील, डी. एस. कोळी, एस. एस. कोळी, जे. एस. पाटील, एस. आर. ठोंबरे, राजेंद्र कोळी, आदींनी ही कारवाई केली. गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारे रॅकेट मोडून काढण्यासाठी विशेष नियोजन केले असल्याचे उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त यशवंत पोवार यांनी सांगितले.

..........

चौकट

वादळी पावसात चेकनाका ओलांडला

सावंतवाडीकडून येणारी चोरटी मद्यवाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिन्यापासून आंबोली येथे घाटाच्या सुरुवातीलाच नवीन चेकनाका सुरू केला आहे. सोमवारी दुपारी वादळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी सुरक्षित ठिकाणी गेले होते. याचा फायदा घेत शेख याने चेकनाका ओलांडला. हिरलगे फाटा येथे टेम्पो सापडला नसता, तर मोठा मद्यसाठा जिल्ह्यात वितरीत झाला असता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गेंजगे, माणगावे, सौंदलगे प्रथम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्सतर्फे 'पक्षी वाचवा' उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत खुल्या गटात पद्मजा गेंजगे, आठवी ते पदवीधर गटात दिव्या माणगावे, पहिली ते सातवी गटात अक्षरा सौंदलगे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. चित्रकला स्पर्धेत पहिली ते चौथी गटात हर्षिता सुतार, पाचवी ते सातवी गटात जय भडगावे आणि आठवी ते दहावी गटात चैतन्य गुळवणीने प्रथम क्रमांक मिळविला. चित्रकला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशांत जाधव, महमंदअली मुजावर यांनी काम पाहिले. निबंध स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून कुमार पुजारी, संजय सौंदलगे यांनी काम पाहिले. 'महाराष्ट्र टाइम्स' च्या वतीने पक्षी वाचवा मोहिमेंतर्गत या स्पर्धा झाल्या.

पक्षी वाचवा निबंध स्पर्धेचा अनुक्रमे निकाल असा (खुला गट) : पद्मजा गेंजगे, के. डी. हराळे, मैत्राली खटावकर, आठवी ते पदवीधर गट : दिव्या माणगावे ( पाराशर हायस्कूल, नवे पारगाव), रेवती ढवळशंख ( शहाजी छत्रपती कॉलेज ),स्नेहल गेंजगे (वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग) पहिली ते सातवी गट : अक्षरा सौंदलगे ( वाय. पी. पोवार विद्यालय, मुक्त सैनिक वसाहत), प्राची कल्याणकर ( महावीर इंग्लिश मीडियम स्कूल, कळंबा), अंबिका गेंजगे ( चाटे सीबीएसई स्कूल) चित्रकला स्पर्धेचा अनुक्रमे निकाल : आठवी ते दहावी गट- चैतन्य गुळवणी, स्वात्विक जाधव (पट्टणकोडोली), श्रेया कदम, सिद्धी भोसले, श्रृती माणगावे (नवे पारगाव). पाचवी ते सातवी गट : जय भडगावे. प्रथमेश भोसले, अथर्व चौगुले, करण सुतार, प्राची कल्याणकर. पहिली ते चौथी गट : हर्षिता सुतार, अनुश्री साळी, वैदेही गुळवणी, निधी नार्वेकर, अंबिका गेंजगे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ग्रीन आर्मी’ करणार वृक्षांचे संवर्धन

$
0
0

'ग्रीन आर्मी' करणार वृक्षसंवर्धन

वृक्ष संवर्धनासाठी सहकारी संस्थांची मदत; जिल्ह्यात दहा हजार नोंदणी

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात विशेषत: कोल्हापूर जिल्हा सहकार पंढरी म्हणून राज्यात ओळख आहे. सहकारी संस्थांनी येथे निर्माण केलेल्या घट्ट झाळ्यामुळे लाखो व्यक्ती एकमेंकाशी जोडली गेली आहेत. सहकारातील या ऋणानुबंधाचा फायदा राज्य सरकारच्या वृक्ष लागवड मोहिमेसाठी करुन घेण्यात येणार आहे. जुलैमध्ये होणाऱ्या वृक्ष लागवड मोहिमेमध्ये लावण्यात येणाऱ्या रोपांचे संवर्धन 'ग्रीन आर्मी'च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ग्रीन आर्मीमध्ये दहा हजार सदस्यांची नोंदणी करण्यात येणार असून याची सर्वस्वी जबाबदारी सहकार विभाग आणि सामाजिक न्याय विभागावर देण्यात आली आहे. त्यानुसार सहकार विभागाने नाव नोंदणीस सुरुवात केली आहे.

बदलते हवामान, वाढणारे तापमान आणि दुष्काळांमुळे होणारे हाल यातून मार्ग काढण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य सरकारने 'हरित महाराष्ट्र' संकल्पनेतंर्गत वृक्ष लागवड मोहीम गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतली आहे. आघाडी सरकारच्या काळात शतकोटी वृक्ष लागवडीमधील परीणामाबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर युती सरकार लावलेल्या वृक्षांचे जतन करण्यासाठी अधिक सजग झाले आहे. तेच ते खड्डे आणि तीच रोपे या वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरेला छेद देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ग्रीन आर्मी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या वर्षीपासून करण्यात आलेल्या रोपांचे जतन 'मनरेगा'तून करण्यात आले. त्याचे अपेक्षित परिणाम समोर आल्यानंतर यामध्ये अधिक लोकसहभाग वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

निर्णयानुसार सहकार विभागाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात ग्रीन आर्मी स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये विशेषत: युवकांबरोबर सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी यांचा यामध्ये समावेश असले. ग्रीन आर्मीमध्ये नोंदणी केलेल्या प्रत्येक व्यक्तीला किमान पाच ते दहा रोपे दत्तक देऊन जतन व संवर्धनाची जबाबदारी देण्यात येईल. जबाबदारी दिलेल्या कार्यकर्त्यांकडून दर १५ दिवसांतून आढावा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सहकारचे झाले पाहता दरवर्षी त्याच-त्याच खड्यात होणारे वृक्षारोपण किमान यावर्षापासून तरी थांबेल, अशी अपेक्षा या निमित्ताने पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

तालुका निहाय नोंदणी अशी

हातकणंगले, गडहिंग्लज, करवीर तालुम्यात प्रत्येकी एक हजार. कोल्हापूर शहर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भूदरगड, आजरा, चंदगड, शिरोळमध्ये प्रत्येकी ७५०. गगनबावडा, कागलमध्ये प्रत्येकी ५००

सामाजिक कार्यामध्ये लोकसहभा महत्त्वाचा असतो. राज्य सरकारची वृक्ष लागवड मोहीम असली, तरी त्यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असल्याने ग्रीन आर्मीची स्थापन करण्यात येणार आहे. ग्रीन आर्मीमध्ये नोंदणी झालेल्या प्रत्येक सदस्यांने पाच रोपांची जबाबदारी स्वीकारल्यास त्याचे चांगले परिमाण दिसून येथील.

अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आश्वासनांचा भुलभुलैय्या, सामान्यांची होरपळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर पंधरा लाखांचा भरणा, इंधन दरवाढीवर नियंत्रण, सर्वांसाठी घर अशा आकर्षक योजनांना सामान्य जनता आकर्षित झाली. 'अच्छे दिना'चे स्वप्न दाखविले. भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आले. मात्र या सरकारच्या गेल्या चार वर्षांच्या कारकीर्दीत सामान्यांच्या नशिबी मात्र अच्छे दिन आलेच नाहीत. उलट इंधन दरवाढ, स्वयंपाकाच्या गॅस दरवाढीच्या झळांनी सामान्यांची होरपळ सुरुच आहे. इंधनाच्या रोज वाढणाऱ्या किमतीमुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडले. वाढती महागाई, उपलब्ध उत्पन्न आणि महिन्याच्या बजेटचा ताळमेळ घालताना गृहिणी मेटाकुटीस येत आहेत. स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर ३५० वरुन ८०० रुपयांपर्यंत पोहचला आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक कोटी घराची निर्मिती झाल्याची सरकारी आकडेवारी आहे. नऊ लाख आणि बारा लाख रुपयांपर्यंतच्या घरासाठीच्या कर्जाला व्याजदरात अनुक्रमे चार टक्के आणि तीन टक्के सवलतीची घोषणा केली आहे. कोल्हापूर महापालिकेकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन ठिकाणचे प्रस्ताव सादर झाले आहेत. मात्र अद्याप एकही घर साकारले नाही. जनधन योजनेमुळे सामान्य माणसाचा बँकिंग व्यवहारांशी संपर्क आला. पण, मोठा गाजावाजा करत प्रत्येक नागरिकांच्या बँक खात्यावर पंधरा लाखांचा भरणा करण्याची घोषणा हवेतच विरली. सरकारची ही घोषणा फसवी असल्याची लोकांची भावना झाली असून, नागरिकांतून संताप वाढू लागला आहे. इंधन दरवाढीचा परिणाम सर्वच घटकांवर झाला. प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, विद्यार्थी वाहतुकीवर थेट परिणाम होऊन पालकांच्या खिशाला कात्री लागत आहे. जीएसटी आणि नोटबंदीच्या कालावधीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. जीएसटीचा भारही अंतिमत: सामान्यांवर पडला आहे. खरेदीपासून हॉटेलिंगपर्यंत जादा पैसे मोजावे लागत आहेत.

इंधन दरवाढीचा फटका सर्वच वाहनधारकांना बसला. कोल्हापूर शहरात रिक्षा व्यावसायिकांची संख्या साधारणपणे ७,००० च्या आसपास आहे. त्यापैकी ६,५०० रिक्षा रस्त्यावर धावतात. पेट्रोल आणि गॅस दरवाढ आणि देखभाल दुरुस्तीच्या खर्चामुळे व्यावसायिकांना हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे मुळातच प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुन्हा भाडेवाढ केल्यास प्रवासी आणखी घटतील, अशी भीती रिक्षा व्यावसायिकांना वाटते आहे. कोल्हापूर शहरात जवळपास ३००० रिक्षा व्यावसायिक वडाप वाहतूक करतात. तर मीटर रिक्षा व्यावसायिकांची संख्या २७०० आहे. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा व्यावसायिकांची संख्या ८०० च्या आसपास आहे. आता शाळा सुरू होतील. साहजिकच या इंधनदरवाढीमुळे पालकांनाही भुर्दंड सोसावा लागणार आहे.

...........................

इंधन दरवाढीवर दृष्टिक्षेप

कालावधी पेट्रोल डिझेल

एक नोव्हेंबर २०१७ ७६.४४ ५९.६५

एक डिसेंबर २०१७ ७६.८५ ६०.५३

३१ डिसेंबर २०१७ ७७.९७ ६२.५१

एक फेब्रुवारी २०१८ ८०.९५ ६७.२९

एक मार्च २०१८ ७९.७० ६५.६७

एक एप्रिल २०१८ ८१.७१ ६७.९४

२८ मे २०१८ ८६.२५ ७३.००

........................................................

नागरिकांनी प्रचंड अपेक्षा ठेवून या सरकारला निवडून दिले होते. पण, सरकारला गेल्या चार वर्षांच्या कालावधीत या अपेक्षांची पूर्तता करता आली नाही. यामुळे सामान्य माणूस त्रासून गेला आहे. तेलांच्या रोज वाढणाऱ्या किमती, रोजगाराची उपलब्धता या प्रश्नावर सरकार लोकांच्या अपेक्षेला खरे उतरले नाही. देशाला विकासाच्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी नुसत्या घोषणांची गरज नाही तर तशी कृती आवश्यक आहे. सामान्य नागरिक आणि महिला सक्षमीकरणाच्या हिताचे निर्णय घ्यायला पाहिजेत.

श्रध्दा पाटील, गृहिणी

.....................

निवडणुकीच्या प्रचारावेळी महागाई रोखणार, काळा पैसा उघडा करणार, भ्रष्टाचार बंद रोखणार, अशा आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला. या आश्वासनांना भुलून नागरिकांनी भाजपला मतदान केले. 'ना खाऊंगा, ना खाने दूँगा'असे म्हणणाऱ्या मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासला. भाज्या आणि कडधान्यांचे दर गगनाला भिडले. भ्रष्टाचार बंद झाला नाही. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. भ्रष्टाचार रोखता आलेला नाही.

लता लोहार, गृहिणी

.....

पहिल्यांदा नोटबंदी आणि नंतर जीएसटी अंमलबजावणीमुळे किरकोळ दुकानदारांचे हाल झाले. व्यवसायाला बसलेल्या फटक्यातून सावरायला वर्ष लागले. सरकार व्यापार, व्यवसायविषयक नवीन कायद्याची अंमलबजावणी करताना पहिल्यांदा लहानसहान व्यवसायिकांवर लक्ष्य करते. राज्यात आठ लाख किराणा दुकानदारांची नोंद होती. मात्र गेल्या काही वर्षात विविध प्रकारची आव्हाने, जाचक अटी, नियमावली आणि मॉल संस्कृतीमुळे तीन लाख व्यावसायिक कमी झाले.

सुशील कोरडे, किराणा व्यावसायिक

.......................

चार वर्षानंतरही सामान्य नागरिकांच्या खात्यावर जे पंधरा लाख रुपये जमा होणार होते ते झाली नाहीत. याचा अर्थ भाजप नेत्यांची ही आश्वासने निराधारच होती. नोटबंदीने छोट्या व्यावसायिक गोत्यात आले. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढणाऱ्या किमती, पेट्रोलचे गगनाला भिडणारे दर यामुळे भ्रमनिरास झाला. सर्वच वस्तूंची भाववाढ होत असल्यामुळे महिन्याचा घरखर्च चालविताना गृहिणींची त्रेधातिरपीठ उडत आहेत. सरकारच्या घोषणा फसव्या आहेत.

वंदना पाटील, खानावळ चालक

..................

या सरकारने पायाभूत सुविधांवर भर दिला. जीएसटी कराचा धाडसी निर्णय घेतला. त्याचवेळी नवी करप्रणाली, नोटबंदीमुळे अर्थकारण पूर्ण कोलमडले. व्यापार, उद्योग व्यवसायात मंदी आली. बँकिंगवर परिणाम झाला. पेट्रोलियम पदार्थ लवकरात लवकर सेवाकराखाली आणल्यास दरावर नियंत्रण राहील. मोदी सरकारचा चार वर्षाचा कारभार म्हणजे पन्नास टक्के यश, पन्नास टक्के अपयश असे म्हणावे लागले.

सुनील गाताडे, व्यावसायिक

....................

सरकारचा विकासकामांचा दावा.....

जनधन योजनेंतर्गत देशात ३१ कोटी ५२ लाख बँक खाती उघडली

गरिबांच्या दारी बँकेची सेवा, टपाल खात्याची इंडियन पोस्टल पेमेंट बँक

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत दरवर्षी बारा रुपयांत १३ कोटी २३ लाख लोकांचा विमा

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सात कोटी २५ लाख शौचालये

८० कोटीपेक्षा जास्त लोकांसाठी अन्नसुरक्षेची हमी

४३१ योजनांच्या लाभार्थींच्या बँक खात्यात ३,६५,९९६ कोटी रुपये जमा

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एक कोटी घरांची निर्मिती

.....................................

कोल्हापुरातील चित्र.....

जनधन योजनेंतर्गत कोल्हापुरात ११, २८, ०६५ इतकी शून्य बॅलन्स खाती उघडली

दोन हजारापेक्षा जास्त लोकसंख्येच्या गावातील ज्या नागरिकांची बँक खाती नाहीत, अशांची खाती सुरु

रुपे डेबीट कार्ड वाटपाची संख्या १०,२६, ५३९ इतकी आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिकेकडून प्रस्ताव सादर

वीस लाख खातेदाराच्या घराच्या दारापर्यंत बँकिंग पोहचविण्याचे ध्येय

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोल्हापूर जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून घोषित

कोल्हापुरातील ८०० जणांना वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी मदत

महापालिका व शेल्टर असोसिएटसमार्फत ५०० शौचालये बांधली

कोल्हापुरातील १६,६७० कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये नाहीत

.......................

स्वच्छता अभियानात नंबर, वास्तव वेगळेच

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहर आणि जिल्हा हागणदारीमुक्त म्हणून घोषित केला आहे. कोल्हापूर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरली. महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी १५ हजाराचे अनुदान दिले जाते. शिवाय महापालिकेने शेल्टर असोसिएटसतर्फे ठिकठिकाणी शौचालये बांधली. मात्र आजही कोल्हापुरात अनेक ठिकाणी 'डर्टी पिक्चर' दिसते. विविध भागातील झोपडपट्टी परिसरात मुलांना उघड्यावर शौचास बसविले जाते. शहरात सार्वजनिक शौचालयांची संख्या ३२४ च्या आसपास आहे. १६,६७० कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये नाहीत. जिल्ह्यातील अनेक मोठ्या शहरातही हेच चित्र आहे. मुरगूड, कागल, पन्हाळा, पेठ वडगाव, मलकापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड आणि गडहिंग्लज ही शहरे हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा सरकारकडून केली आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे.

..................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंडा पार्कात होणार ऑक्सिजन पार्क

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : शेंडा पार्कात ९० एकरांत ४० हजार रोपांची लागवड होणार आहे. एकाच ठिकाणी मोठ्या संखेने वृक्षलागवड होणार असल्याने शेंडा पार्कात ऑक्सिजन पार्क साकारणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षारोपण होणार असून, शेंडा पार्कात ४० हजार खड्डे काढण्यात आले आहेत.

वाढत्या शहरीकरणामुळे इमारतींचे जंगल वाढत आहे. रिकाम्या जागा कमी होत असल्याने शहरातील हिरवळ कमी झाली आहे. यावर उपाय म्हणून वृक्ष लागवड करून शहरात ऑक्सिजन पार्क साकारण्याचे काम सामाजिक वनीकरण विभागाकडून सुरू आहे. कोल्हापूर शहरात सध्या केवळ शेंडा पार्क परिसरात प्रशस्त जागेची उलब्धता आहे. यातील कृषी महाविद्यालयाच्या जागेत वृक्षारोपण करण्याची परवानगी सामाजिक वनीकरणचे विभागीय वन अधिकारी दीपक खाडे यांनी कृषी महाविद्यालयाकडे मागितली केली होती. महाविद्यालयाने परवानगी दिल्याने शेंडा पार्कात ९० एकरांत ४० हजार रोपांची लागवड होणार आहे. यंदा राज्य सरकारने १३ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाला २ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यापैकी ४० हजार रोपांची लागवड शेंडा पार्कात केली जाणार आहे, तर उर्वरित वृक्षलागवड जिल्ह्यात विविध ठिकाणी होणार आहे.

वृक्ष लागवडीसाठी शेंडा पार्कात खड्डे काढण्याचे काम सुरू होते. गेल्या पंधरा दिवसात जेसीबीच्या साहायाने ४० हजार खड्डे काढण्यात आले. दोन बाय दोन फूट आकाराचे खड्डे दीड ते दोन फूट खोल आहेत. प्रत्येक खड्ड्यांमध्ये चार फुटांचे अंतर आहे. भटक्या जनावरांपासून रोपांचे संरक्षण करण्यासाठी ९० एकर जागेच्या सभोवती चार ते पाच फूट खोलीची चर मारली आहे. वृक्ष लागवडीनंतर सलग तीन वर्षे रोपांची निगा राखली जाणार आहे. यासाठी पाण्याचीही व्यवस्था केली आहे. रोपांसाठी खड्डे काढण्यापासून ते तीन वर्षे त्यांची देखभाल करण्यासाठी प्रत्येक रोपाचा ४४६ रुपये खर्च आहे. रोपांच्या देखभालीसाठी तीन वर्षात १ कोटी ७८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहेत. दोन लाख उद्दिष्टांपैकी उर्वरित १ लाख ६० हजार रोपांसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी नियोजन केले आहे.

सध्या शहरात शिवाजी विद्यापीठाचा अपवाद सोडल्यास एकाच ठिकाणी कुठेही एक हजारांहून अधिक झाडे नाहीत. झाडे लावण्यासाठी पुरेसी जागाही उपलब्ध नाही. सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेंडा पार्कात एकाच वेळी ४० हजार रोपांची लागवड होणार आहे. जून महिन्यात वृक्षारोपणाचे काम सुरू होईल. येणाऱ्या तीन ते चार वर्षात शेंडा पार्क हिरवागर्द होईल. यामुळे हवा प्रदूषण कमी होण्यासह ऑक्सिजनचे प्रमाणही वाढेल. हा ऑक्सिजन पार्क कोल्हापूरकरांना उर्जा देणारा ठरेल, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी दीपक खाडे यांनी दिली.

देशी वृक्षांची होणार लागवड

शेंडा पार्कात वड, पिंपळ, करंज, चिंच, आंबा, लिंब, फणस, आवळा, आपटा, बहावा, उंबर, कोकम, अर्जुन, कदंब, बकुळ, शंकासूर, मॉन्जियम, रेन ट्री, आदी प्रकारच्या रोपांची लागवड होणार आहे. दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि सावलीसह फळे देणाऱ्या रोपांचे छोटे सदाहरित जंगल निर्माण होणार असल्याने पक्ष्यांसाठी हा नैसर्गिक अधिवास तयार होईल.

शेंडा पार्कचे रुप पालटणार

सध्या शेंडा पार्क परिसरात कुष्टधाम, वैद्यकीय महाविद्यालयाचे वसतिगृह, चेतना मतिमंद विकास शाळा आणि कृषी संशोधन केंद्र आहे. या परिसरात अनेक सरकारी कार्यालयांसाठी जागेची मागणी होत आहे. मात्र, अद्याप यातील एकाही कार्यालयासाठी सरकारने परवानगी दिलेली नाही. कृषी महाविद्यालयाकडे मालकी असलेल्या रिकाम्या माळावर ऑक्सिजन पार्क साकारणार असल्याने संपूर्ण शेंडा पार्कचे रुप पालटणार आहे.

००००००००००

यंदा सामाजिक वनीकरण विभागाने ५ लाखांहून अधिक वृक्षारोपण करण्याचा निश्चय केला आहे. नेहमी आम्ही जंगलांसह ग्रामीण भागात वृक्षलागवड करून त्यांची निगा राखतो. यावेळी कृषी महाविद्यालयाच्या सहमतीमुळे शहरासाठी ऑक्सिजन पार्क साकारत आहे. कोल्हापूरसाठी ही भविष्याची तरतूद ठरेल.

दीपक खाडे, विभागीय अधिकारी, सामाजिक वनीकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांकडून २ कोटींवर ढपल्याचा डाव

$
0
0

कोट्यवधींच्या ढपल्याचा डाव

७० प्राध्यापकांच्या वैयक्तिक सरकार मान्यतेचा दर तीन लाखांवर

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात पाच जिल्ह्यांतील ज्युनिअर कॉलेजच्या ७० प्राध्यापकांना वैयक्तिक सरकारमान्यता देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी प्रत्येक प्राध्यापकाकडून तीन ते चार लाखांप्रमाणे दोन कोटींवर ढपला मारण्याचा डाव शिक्षणक्षेत्रात विशेष चर्चेत आला आहे. नोकरीतून पायउतार होताना जाता जाता साहेबांनी हात मारण्याचे केलेले नियोजन संबंधित प्राध्यापकांना कर्जबाजारी करून गेले आहे. परिणामी ७० प्राध्यापकांची मान्यता वादात अडकण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने २००४ पासून ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक भरती बंदी केली. तरीही रिक्त जागेवर संस्थाचालकांनी देणगीच्या गोंडस नावाखाली कमीत कमी १० ते १५ लाख उकळून प्राध्यापक म्हणून गरजू बेरोजगारांची निवड केली. त्यास शिक्षण प्रशासनाची मान्यता नसल्याने ते बिनपगारी काम करतात. अद्याप अतिरिक्त प्राध्यापकांच्या समायोजनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. यामुळे संस्था चालकांनी लाखोंची देणगी घेऊन निवडलेल्या संबंधित प्राध्यापकांचे भवितव्य अंधकारमय आहे. असे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला ना हरकत दाखला देत उपसंचालक प्रशासनाने वैयक्तिक सरकारी मान्यता देण्यासाठी ७० प्राध्यापक निवडले. त्यांच्या कागदपत्रांची छाननी २२ ते २४ मे अखेर विशेष शिबिरात करण्यात आली.

दरम्यान, प्राध्यापक भरती बंदी असताना वैयक्तिक मान्यता देण्याची प्रक्रिया कशी राबवली जात आहे, मान्यता वरिष्ठस्तरावर अमान्य ठरली तर असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. तरीही उपसंचालक कार्यालयातून मान्यता मिळाल्यानंतर पगार सुरू होईल, या आशेपोटी साहेबांना ढपल्याचे ३ ते ४ लाख देण्यासाठी प्राध्यापकांनी प्रसंगी कर्ज काढून पैशाची जुळवाजुळव केली आहे. संस्थाचालकांना पैसे देण्यासाठी आधीच कर्जाचा डोंगर असताना पुन्हा मान्यतेसाठी द्यावे लागत असलेल्या पैशामुळे त्यांना प्रचंड आर्थिक झळ बसली आहे. वसुलीच्या विरोधात लाचलुचत विभागाकडे तक्रार केल्यास किंवा कुणासमोर वाच्यता केल्यास कायमचे नोकरीवर पाणी सोडावे लागण्याच्या भीतीने प्राध्यापक मुकाट्याने सर्व प्रकार सहन करीत आहेत.

----------------

चौकट

पूर्णवेळ नियुक्त्या

दोन मे २०१२ नंतर संस्थाचालकांनी शिक्षण प्रशासनाचा ना हरकत दाखला न घेता निवडलेल्या ७० प्राध्यापकांना पूर्णवेळ मान्यता देण्यात येणार आहे. त्यासाठी उपसंचालक कार्यालयाने त्यांना ना हरकत दाखल्यासह मान्यता देण्यासाठी संस्थाचालकांकडून रोस्टर, रिक्त जागांची संख्या, विद्यार्थी प्रवेश संख्येच्या माहितीचा आधार घेतला आहे. सरकारने अधिकृतपणे अजूनही प्राध्यापक भरती बंदी उठवली नसताना ढपल्यासाठी वैयक्तिक मान्यता दिली जात आहे का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

-----------------------------------

मान्यतेचे एकूण प्रस्ताव

७०

कोल्हापूर जिल्हा

३२

कोल्हापूर शहर

रत्नागिरी

सिंधुदूर्ग

१४

सातारा

१२

सांगली

-------------------------

कोट

'शिक्षण उपसंचालक कार्यालयात ७० ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांना मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एका प्राध्यापकांकडून तीन ते चार लाखांचा ढपला पाडला जात आहे. जाता जाता साहेब हात मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे कुरूकलीतील भोगावती कॉलेजमध्ये नऊ प्राध्यापकांना बेकायदेशीर मान्यता देऊ नये. मान्यता दिल्यास उपसंचालक कार्यालयासमोर आत्मदहन करू.

सुरेश बेलेकर, अन्यायग्रस्त प्राध्यापक

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शियेत कामधेनू दूध संस्थेवरवैधमापनचा छापा

$
0
0

म. टा. प्रतिनधी, कोल्हापूर

इलेक्ट्रॉनिक वजनकाट्यावरील दूध खरेदी बंद करुन प्रमाणित मापाद्वारे दूध खरेदी करण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्यास वैधमापनशास्त्र विभागाने सुरुवात केली. मंगळवारी विभागाने शिये (ता. करवीर) येथील कामधेनू दूध संस्थेवर कारवाई करताना इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त करून संस्थेवर खातेअंतर्गत गुन्हा दाखल केला. निरीक्षक अरविंद महाजन यांनी कारवाई केली. कारवाईमुळे जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वैधमापनशास्त्र विभागात गोंधळ घालत निष्क्रीय कार्यपद्धतीचा निषेध व्यक्त करत सहायक नियंत्रक नरेंद्रसिंह मोहनसिंह यांना हार घातला होता. यावेळी कार्यालयात शाब्दिक खडाजंगी झाली होती. आंदोलनानंतर मात्र मंगळवारपासून वैधमापनशास्त्र विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली.

सकाळी शिये येथील कामधेनू दूध संस्थेवर कारवाई करताना इलेक्ट्रॉनिक वजन काटा जप्त केला. महाराष्ट्र वैधमापनशास्त्र नियम २०११ चे कलम १५ 'ड' नुसार कारवाई करण्यात आली. संस्थेकडून याबाबत योग्य खुलास प्राप्त न झाल्यास हे प्रकरण न्यायालयात पाठवण्यात येणार आहे. 'इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारे दूध खरेदी करु नये, अशा सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. मुदत देवूनही इलेक्ट्रॉनिक वजन काट्यांचा वापर होत असल्याने मंगळवारपासून कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याचे विभागाचे निरीक्षक अरविंद महाजन यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागल यांना अभिवादन

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेतर्फे भाई माधवराव बागल यांची जयंती साजरी करण्यात आली. शाहू मिल समोरील चौकातील बागल यांच्या पुतळयास महापौर शोभा बोंद्रे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी नगरसेवक संदीप कवाळे, माजी नगरसेवक शिवाजी कवाळे, उपशहर अभियंता आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता मिलिंद जाधव, बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अॅड. अशोक साळोखे, प्रा. एन. एस. पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी योग शिबिर

$
0
0

कोल्हापूर: येथील वनौषधी विद्यापीठातर्फे एक जून ते दहा जून या कालावधीत महिलासाठी विशेष योग चिकित्सा शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात महिलांच्या विविध प्रकाच्या तक्रारीवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. योगासने, प्राणायम, ध्यान, योगनिद्रा याविषयी मार्गदर्शन केले जाईल. रोज सकाळी सात ते ८.३० या वेळेत शिबिर होणार आहे. अधिक माहितीसाठी आयुर्वेद पंचकर्म सेंटर, टीव्हीएस शोरुम शेजारी लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे संपर्क साधवा, असे आवाहन संस्थेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलींचीही ‘परफेक्ट कीक’

$
0
0

वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेमुळे मिळाली संधी

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet-sachinpMT

कोल्हापूर : फुटबॉल स्पर्धेचा हंगाम सुरु झाल्यावर लहान मुल ते आबालवृद्धांची उपस्थिती स्टेडियमवर असते. पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धांना आवर्जून प्रतिसाद असतो. यंदा मात्र नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापुरातील महिला खेळाडूंना चांगली संधी मिळाली. या स्पर्धांना भरभरून प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील १५ शाळांतील ८० मुली सहभागी झाल्या होता. बोलीद्वारे(ऑक्शन) या खेळाडूंची निवड छत्रपती शिवकन्या, महाराष्ट्र क्वीन्स, मल्टी वॉरीअर्स, आर.आर. चॅलेंजर्स आणि जाधव इंडस्ट्रीज या संघात करण्यात आली. सहभागी मुली कोल्हापूरसह आजूबाजूच्या शाळेतील उदयोन्मुख फुटबॉल खेळाडू म्हणून नाव कमावत आहेत.

अनुभव कमी पण जिद्द मोठी

स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेल्या खेळाडूंच्या सोबत खेळावयाचे असल्याने स्पर्धेपूर्वी स्थानिक खेळाडूंच्यात थोडेसे दडपण होते पण संपूर्ण स्पर्धेत कोल्हापूरच्या मुलीनी समन्वय साधत सुरेख खेळ केला. आक्रमक चढाया, बचावफळी पोखरणे, उत्कृष्टरित्या पास देणे असा कौशल्यपूर्ण खेळ यानिमित्ताने क्रीडाशौकिनांना अनुभवायला मिळाला. पुरेसा अनुभव पाठीशी नसतानाही जिद्दीच्या जोरावर सर्वोत्कृष्ट खेळ करत अनेक वैयक्तिक बक्षिसे या नवोदित खेळाडूंनी पटकावली.

दोन लाखांपर्यंतची बक्षिसे

पुरुष फुटबॉल स्पर्धेतील बक्षिसांची रक्कम लाखाच्या घरात असते. यावेळी वुमेन्स फुटबॉल लीग स्पर्धेतही दीड लाख रुपयापर्यंतची बक्षिसे देण्यात आली. आपल्या खेळाडूंचा सुरेख खेळ अनुभवताना अनेकांनी सामन्यावेळी रोख राक्म स्वरूपात वैयक्तिक बक्षिसे मैदानावर दिली. क्रीडारसिकांनी दिलेल्या पाठबळामुळे मुलींचा खेळ बहरण्यास मदत झाली.

कुटुंबियांचे पाठबळ

संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आवर्जून मैदानावर उपस्थित राहत होते. त्यांनी दिलेल्या पाठबळ आणि पाठिंब्यामुळे मुलींना मोठा आधार वाटला. अनेक पालक आपल्या मुलीचा खेळ पाहण्यासाठी उशिरापर्यंत मैदानावर थांबत होते. मुलीही फुटबॉल चांगला खेळू शकतात याचा अभिमान पालकांच्या चेहऱ्यावर जाणवत होता.

महिलांना फुटबॉल खेळाला उत्तेजन मिळावे, यासाठी कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशनच्यावतीने यापुढे प्रयत्न केले जाणार आहेत. गुणवत्तापूर्ण खेळाडूंची निवड करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोल्हापूरच्या मातीत गुणवत्ता ठासून भरली आहे त्याला पायाभूत सुविधांची जोड दिल्यास कोल्हापूरच्या मुलीही फुटबॉल खेळात नावलौकिक मिळवतील.

मधुरिमाराजे छत्रपती, अध्यक्षा, कोल्हापूर वुमेन्स फुटबॉल क्लब

राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंसोबत खेळायचे असल्याने सुरुवातीला मनावर थोडेसे दडपण होते. पण अनुभवी खेळाडूंनी आम्हांला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने आमच्या खेळात सुधारणा झाली. ताकद आणि बुद्धी यांचा समन्वय साधत खेळ करावयाचे प्रशिक्षण या स्पर्धेमुळे आम्हांला लाभले. आता राज्याबाहेर जाऊन खेळ करू शकू, असा आत्मविश्वास मिळाला आहे.

मृदूल शिंदे, फुटबॉल खेळाडू

या स्पर्धेत खेळल्यामुळे आम्हांला आमच्यातील उणिवांची जाणीव झाली. खेळात पुढे जाण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची माहिती मिळाली. कोल्हापुरात अशा स्पर्धा होत राहिल्या तर इथल्या स्थानिक खेळाडू चांगले नाव कमावू शकतील.

अनुष्का खतकर, फुटबॉल खेळाडू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिजिओथेरिपीची मात्रा...

$
0
0

राहुल मगदूम

रोटरी क्लब ऑफ शिरोली, एमआयडीसीच्यावतीने टाकाळा परिसरातील कोरगावकर हॉलमध्ये सुरू रोटरी क्लब ऑफ शिरोली फिजिओथेरपी सेंटर नुकतेच सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये अत्याधुनिक उपचार करण्यात येत असून मशीनवरील उपचारासाठी नाममात्र दरात याठिकाणी उपचार केले जातात. शहरातील खासगी फिजिओथेरिपी सेंटरचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने सर्वसामान्य नागरिक, महिला तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना त्याचा फायदा होत आहे.

भौतिकोपचार म्हणजेच फिजिओथेरपी उपचार म्हटल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या उपचार पद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. या उपचारामुळे होणारे परिमाण हे तात्पुरते नसून आजाराला मुळापासून नष्ट करतात. उपचारानंतरही कायमचा आराम देतात.

फक्त मेंदू व हाडांच्या आजारावर फिजिओथेरपी उपचार उपलब्ध आहेत, असे नसून वेगवेगळ्या फुफुसांच्या व श्वसनच्या आजारावरही ही उपचार पद्धती उपयोगी येते. वयोमानानुसार होणाऱ्या हाडांची झिजेमुळे स्नायूंची ताकद वाढविणे गरजेचे असते. अशावेळी फिजिओथेरपीमधील वेगवेगळे व्यायाम फायदेशीर ठरतात.

मेंदूच्या वेगवेगळ्या आजारामुळे हातापायांमध्ये येणारा अशक्तपणा, अर्धांगवायूमुळे बंद झालेली हातापायांची हालचाल, पायातून येणाऱ्या कळा, सायटिका(मुंग्या येणे), पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी,मणक्याचे विकार, मज्जातंतूंचे आजार, खेळाडूना खेळतांना होणाऱ्या दुखापती, संधिवात, स्नायूंना झालेली दुखापत मधुमेहामुळे जखडलेला खांदा तसेच विविध शस्त्रक्रिया झाल्यानंतर बंद झालेली हालचाल अशा निरनिराळ्या दुखण्यांमध्ये फिजिओथेरेपी उपचार उपयुक्त ठरतात व सकारात्मक परिणाम दाखवतात स्त्रियांना प्रसूतपूर्व व प्रसुतीनंतरचे फिजिओथेरपीचे व्यायाम दिले जातात. अर्धांगवायूमुळे अर्ध्या चेहऱ्याची हालचाल बंद होते अशावेळी स्टिम्युलेटर उपचाराने चेहऱ्याची हालचाल पुन्हा आधीसारखी सुरू होते. मेंदूच्या अनेक आजारावर फिजिओथेरपी उपचार फायदेशीर ठरते

रोटरी फिजियोथेरपी सेंटरमध्ये डॉ. प्रीयल माने यांच्या मार्गदर्शनाखाली अर्धांगवायू तसेच बोट, मनगट, मांडी, हाताचे, खाद्यांचे व्यायाम, यासाठी पॅरलेल बार, ट्रक्शन मशीन, अल्ट्रा साऊंड थेरपी, लहान मुलांचा बॅलेन्स बोर्ड, अपघात झालेल्या गुडघ्यासाठी सीपीएम मशीन, कंबर दुखी, पाठ-मानदुखीसाठी शॉर्ट वेव डायथर्मी, शिरांचे दुखणे यासाठी आधुनिक इंटर फेरोन्शियल थेरपी यांच्यासह पॅराफिन वॅक्स व हॉट मॉईस्ट पॅक अशा विविध उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा सकाळी दहा ते सात वाजेपर्यंत येथे उपलब्ध आहेत.

कोल्हापूर शहर व उपनगरमध्ये फिजिओथेरपीचे अत्याधुनिक सेंटर हवे. आता रोटरी सेंटरमध्ये अल्प दरात सेवा मिळते आहे. पण आजारी नागरिकांना तेथे येण्यासाठी प्रवासासाठी खर्च सोसावा लागतो. फिजिओथेरपी सेंटरसाठी कोल्हापूर महानगरपालिका जर शहर व उपनगर परिसरात जागा देत असेल तर आम्ही आणखी आठ ते दहा सेंटर रोटरी इंटरनॅशनल कडून फंड घेऊन अशी सेंटर शहरात उभा करू शकतो.

मोहन मुल्हेरकर, उद्योजक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगडला अडीच लाख शिवभक्त जाणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुर्गराज किल्ले रायगडावर दरवर्षी सहा जून रोजी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. राज्याभिषेक सोहळ्यातंर्गत ५ ते ६ रोजी रायगडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून सोहळ्यास देशभरातून सुमारे अडीच लाख शिवभक्त उपस्थित राहतील, असा दावा अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी केला.

सावंत म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून १६७४ रोजी झाला. हा राज्याभिषेक दिन राष्ट्रीय सण म्हणून समिती साजरा करत आहे. सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. एक जून रोजी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेतून सोहळ्याला सुरुवात होईल. पाच जून पासून मुख्य सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या दिवसी सायंकाळी २१ गावातील सरपंच यांच्या हस्ते गड पूजन करण्यात येणार आहे. गडाच्या मुख्य सदरेवर रात्री ७.३० वाजता शाहीर रंगराव पाटील यांचा 'मुद्रा मुद्राय राजते' कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्री आठ ते नऊ या वेळेत खासदार संभाजीराजे छत्रपती संवाद साधणार आहेत. शाहीर आलम बागणीकर, रंगराव पाटील, सुरेश जाधव, राजेंद्र कांबळे व आझाद नायकवडी यांचा शाहिरी कार्यक्रम होणार आहे.'

'सहा जून रोजी सकाळी सहा वाजता ध्वजपूजनाने कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे शिवरायांच्या पुतळ्यास अभिषेक घालतील. सकाळी १० वाजता मेघडंबरीतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक अर्पण केल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. दोन दिवसांत मर्दानी खेळ, कीर्तन, जागर व काकड आरती आदी कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. शिवभक्तांची अन्नछत्राच्या माध्यमातून भोजन व अल्पोपहाराची सोय केली आहे.'

हेमंत साळोखे म्हणाले, 'राज्याभिषेक सोहळ्याचे मुख्य दोन दिवस असले, तरी तीन जूनपासून अन्नछत्र सुरू करण्यात येणार आहे. पाचाड व रायगडावर अन्नछत्र दिवसभर सुरू राहणार आहे. शिवभक्तांना पाण्याची कोणतीही कमरता जाणवणार नसून यासाठी पाचशे लिटर क्षमतेच्या चार पाण्याच्या टाक्या उभारल्या आहेत. पत्रकार बैठकीस माजी नगरसेवक विनायक फाळके, अमर पाटील, उदय घोरपडे, आझाद नायकवडी, मकरंद ऐतवडे, गणी आजरेकर, संजय पवार आदी उपस्थित होते.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅसचा स्फोट होऊन ९ जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरला गळती लागल्यानंतर आग विझवताना फ्रिजमधील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ९ जण जखमी झाले. जखमींमध्ये दोन. महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. शिरोली एमआयडीसी येथील माळवाडी परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली. सर्व जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

महेंद्र कृष्णा पाटील (वय २२) कृष्णा केदारी पाटील (वय ५२, घर मालक ) मारुती शिवाजी सुतार (वय ३८) दिनकर शंकर जाधव (वय ५०), सुधाराणी दराप्पा काडगोंड (वय २२) श्रावणी दराप्पा काडगोंड (वय २ ) निल्लवा हणमंत काडगोंड ( ४८), निलेश सहदेव अडाव्ह (२८) सर्व रा. माळवाडी पाटील यांच्या घरी कुळ म्हणून) अशी जखमींची नावे आहेत.

बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुधाराणी काडगोंड ह्या घरात चहा बनवत असताना अचानक गॅस लिकेज होऊन त्याचा भडका उडाला. तेव्हा त्या ओरडत बाहेर धावत आल्या. तेव्हा बाजूला घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या घर मालकाचा मुलगा खाली धावत आला. तो व इतर लोक गॅस विजवण्यासाठी गॅस टाकीवर वाळू व माती टाकत होते. तेव्हा अचानक स्वयंपाक घरात असणाऱ्या फ्रीजमध्ये असणाऱ्या गॅस टाकीचा स्फोट झाला . यामध्ये २ वर्षाच्या लहान बाळासह ९जण जखमी झाले. काही जखमींना तात्काळ सीपीआर येथे उपचारासाठी दाखल केले .तर दोघाना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक तिरूपती काकडे यांनी सीपीआर येथे येऊन घटनेची माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूर जिल्हा बँकेचं संचालक मंडळ बरखास्त

$
0
0

सोलापूर:

एनपीएमध्ये वाढ, तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप तसेच थकबाकीची वसुली न करणे आदींसह इतर अनेक कारणांमुळं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सरकारने ही कारवाई केली आहे.

काही वर्षांपूर्वी बँकेच्या संचालकांनी तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप केले. त्यामुळे नाबार्डने नाराजी व्यक्त करत कारभार सुधारा, अशा शब्दांत खडसावले होते. तसेच थकबाकी वसुली करण्याचे आदेश दिले होते. कारभार सुधारलाच नाही, शिवाय थकबाकी वसुलीही झाली नाही. बड्या नेत्यांचे कारखाने आणि संस्थांकडे शेकडो कोटींची थकबाकी असून, बँकेच्या एनपीएमध्ये कमालीची वाढ झाली. परिणामी बँकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली.

बँकेची ठप्प झालेली कर्जवाटप प्रक्रिया, एनपीएत झालेली वाढ आणि थकबाकी वसुली न होणे तसेच तारण मालमत्तेपेक्षा अधिक कर्जवाटप यांसह इतर कारणांमुळे राज्य सरकारनं अखेर बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं. सहकार कायद्यातील कलम ११० अ अंतर्गत ही कारवाई केली आहे. दरम्यान, बँकेवर प्रशासक नियुक्त केला असून, सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हान देणारे शिक्षणमंत्री तावडेच बनावट

$
0
0

कोल्हापूर

शाळा बंदच्या सरकार निर्णयाचा अपप्रचार करणाऱ्या डाव्यांना खुल्या चर्चेसाठी बिंदू चौकात येण्याचे आव्हान १५ दिवसापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आले त्यावेळी दिले होते. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे हे आव्हान स्वीकारून त्यांना चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण दिले, स्मरणपत्रही पाठवले. बुधवारी बिंदू चौकात सायंकाळी साडे पाचपासून दीड तास त्यांची प्रतिक्षा केली. ते आले नाहीत, शेवटी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खुर्चीवर त्यांचा फोटो ठेवला. त्यासमेार चहाचा कप ठेवून अनोखा पाहुणचार केला. शिक्षणमंत्री तावडेच खोटे आव्हान देऊन दिशाभूल केल्याचा आरोप कृती समितीतर्फे करून अभिनव कार्यक्रमाची सांगता केली.

दहा पटाच्या शाळा बंद करणे, शिक्षणाचे कंपनीकरण करण्याच्या विरोधात कृती समितीतर्फे विविध टप्प्यावर आंदोलन केले जात आहे. दीड महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांचा दबाव जुगारून शिक्षण क्षेत्रातील विविध घटक एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या सरकार विरोधी घडामोडी जिव्हारी लागल्याने शिक्षणमंत्री तावडे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर डावे लोक दिशाभूल करीत असल्याची टीका केली होती. त्यांनी बिंदू चौकात खुल्या चर्चेसाठी येण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारून बिंदू चौकात येण्यासंबंधी पत्रव्यवहार केले. पंधरा दिवस प्रतीक्षा केली. पुन्हा स्मरण पत्र पाठवले. बिंदू चौकात साडेपाच वाजता कृती समितीचे पदाधिकारी एकत्र येत त्यांची दीड तास प्रतिक्षा केली. ते न आल्याने त्यांच्यावर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका केली. कोल्हापूरकरांना खोटी आव्हाने देऊ नका, सत्तेचा वापर चांगल्या कामासाठी करा, असा सल्लाही देण्यात आला. यावेळी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भरत रसाळे, गिरीश फोंडे, गणी आजरेकर, बाबासाहेब देवकर, संतोष आयरे, राजेंद्र पाटील, उमेश देसाई, दिलीप माने, किशोर माने, लाला गायकवाड आदी उपस्थित होते.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमपीएसीत कोल्हापूर विभागातील सात जणांचा झेंन्डा

$
0
0

फोटो

.............

एमपीएससीतही

मुलींची बाजी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यामध्ये कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यातील सातजण उत्तीर्ण झाले. शिवाजी पेठेतील ऐश्वर्या आनंद गिरी यांची तहसिलदारपदी निवड झाली.

त्याचबरोबर तहसीलदारपदी श्रीधर बाजीराव पाटील यांची निवड झाली. ते भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडीचे आहेत. विजयश्री धनंजय चंदनशी यांची फायनान्स अॅन्ड अकौंटटपदी निवड झाली.त्या सोलापूर जिल्ह्यातील सोनके गावच्या आहेत. पन्हाळा तालुक्यातील कळे येथीत राजश्री संपतराव देसाई यांची मुख्याधिकारीपदी निवड झाली. शीतल अंबाना बंडगर यांची तहसीलदारपदी निवड झाली. त्या सांगली जिल्ह्यातील वसुंबे गावच्या आहेत. समरजित बळवंत पाटील यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली असून ते राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वरचे आहेत. तर सातारच्या शंकर देवीदास खांडरे यांची मुख्याध्याकारीपदी निवड झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१७ पोलिसांच्या बदल्या

$
0
0

२१७ पोलिसांच्या बदल्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकाच पोलिस ठाण्यात पाच वर्ष सेवाकाल पूर्ण झालेल्या आणि विनंती असा एकूण २१७ पोलिसांच्या बदल्यांचा आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारी (ता. ३०) रात्री काढला. यात विनंतीनुसार १६०, तर प्रशासकीय बदलीनंतर कौटुंबिक आणि शारीरिक अडचणींमुळे झालेल्या ५३ बदल्या, आयजींच्या अधिकारातील चार अशा एकूण २१७ बदल्यांची प्रक्रिया पार पडली. आठवड्याभरात बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश अधीक्षकांनी दिले आहेत.

पाच वर्षांची सेवा एकाच ठिकाणी बजावल्यानंतर पोलिसांच्या प्रशासकीय बदल्या होतात. मात्र, पोलिसांना त्यांच्या इच्छेनुसार आणि घरगुती अडचणी, आरोग्याच्या तक्रारी यामुळे विनंती बदल्यांची प्रक्रिया गेल्या चार-पाच वर्षांपासून राबवली जात आहे. यंदा सहाशेहून अधिक अर्ज विनंती बदलीसाठी आले होते. काही कर्मचाऱ्यांना समोर बोलवून तर काहींना व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संपर्क साधून मते जाणून घेतली. त्यानुसार बदल्यांची प्रक्रिया राबवण्यात आली. पहिल्या टप्प्यात अडीचशे प्रशासकीय बदल्या झाल्या होत्या. बदल्यांची दुसरी यादी बुधवारी सायंकाळी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये विनंती बदल्यानुसार सहायक फौजदार १८, पोलिस हवालदार ३१, पोलिस नाईक -४०, पोलिस कॉन्स्टेबल -७१ अशा १६० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर प्रशासकीय बदल्यांनंतर वैयक्तिक अडचणीमुळे झालेल्या बदल्यांमध्ये सहायक फौजदार १, हवालदार १४, पोलिस नाईक १८, पोलिस शिपाई २० अशा ५३ कर्मचाऱ्यांच्या समावेश आहे. आयजींच्या अधिकारातील ४ बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक वैष्णवी सुरेश पाटील यांची मुख्यालयातून मुंबईत राज्य गुप्तवार्ता विभागात बदली झाली, तर सात सहायक पोलिस निरीक्षकांची परिक्षेत्रात बदली झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिका चौकात आत्मदहनाचा प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वमालकीच्या जागेत कुळाकडून सुरु असलेले बांधकाम थांबवावे या मागणीसाठी जागृतीनगर येथील सखुबाई यशवंत सांगावकर या वृध्देने महापालिका चौकात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलिसांनी प्रसंगावधान राखत वृध्देला ताब्यात घेतले तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा घडवून आणली. आत्मदहन करण्याच्या प्रयत्नाने महापालिका प्रशासन यंत्रणा हडबडली. प्रशासनाने, तत्काळ नगररचना विभागाला चौकशी व संबंधितावर कारवाईचे आदेश दिले.

जागृतीनगर हौसिंग सोसायटी सागरमाळ येथे सांगावकर यांच्या मालकीचे घर आहे. घरात काही वर्षांपासून अनुसया काटकर या कूळ म्हणून राहत आहेत. मात्र काटकर यांनी कसलीही परवानगी न घेता अवैधरित्या बांधकाम सुरु केल्याची तक्रार सांगावकर यांनी २६ मार्च रोजी महापालिकेकडे केली होती. त्या बांधकामावर ३० मे पर्यंत कारवाई झाली नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास त्या महापालिकेत आल्या असता पोलिसांनी मध्यस्थी केली. अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांच्यासोबत चर्चा केली. त्या अनधिकृत बांधकामाचा पंचनामा करुन पोलिस बंदोबस्तात बांधकाम पाडण्याची सूचना नगररचना विभागाला केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images