Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राजारामपुरीतूनदुचाकीची चोरी

$
0
0

कोल्हापूर : राजारामपुरी सहाव्या गल्लीतील अजय अनिल साळोखे यांची आपल्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. २२ ते २६ मे या कालावधीत ही चोरी झाली. याबाबतची फिर्याद साळोखे यांनी राजारामपुरी पोलिसात दिली आहे.

---------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साप्ताहिक बाजारभाव

$
0
0

साप्ताहिक बाजारभाव

आंबा स्वस्त, कोथिंबीर कडाडली

अतिरिक्त उत्पादनामुळे पालेभाज्यांची कवडीमोलाने विक्री

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वयपांकघरात फोडणीसाठी लागणारा कांदा स्वस्त झाला आहे. कांदा १० रुपये किलो झाला असून बाजारपेठेसह उपनगरांत कांद्याची टेम्पोतून विक्री होत आहे. उत्पादन अधिक झाल्याने देवगड, रत्नागिरी, पायरी, कर्नाटकचे आंबे बाजारपेठेत दाखल झाले असून आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. ६० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत आंबा विक्री होत आहे. फळांचे दर स्थिर असून कोथिंबीर मात्र २० रुपये प्रतिपेंडी झाली आहे.

कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल झाला आहे. परिणामी प्रती १० रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने पालेभाज्यांची आवक चांगली झाली आहे. परिणामी या आठवड्यातही भाजीपाला कवडीमोल झाला आहे. मेथी, पालक, शेपू, पोकळा या भाज्या प्रतिपेंडी १० रुपये दराने विक्री होत आहे. कोथिंबिरीचा दर मात्र वाढलेला आहे. वांगी, दोडक्याच्या प्रतिकिलो दरातही १० रुपयांची वाढ झाली आहे. फळांचे दर या आठवड्यात स्थिर आहेत. गेल्या आठवड्यात ३० रुपये प्रतिकिलो असलेली काकडीही महागली असून, ५० रुपये दर झाला आहे. भाजीपाल्याच्या दरातही प्रचंड घसरण झाली. फ्लॉवर आणि कोबी कवडीमोल ठरला आहे. फ्लॉवर, कोबीचा गड्डा १० रुपये, टोमॅटो १५ रुपये किलो झाला आहे. रत्नागिरी, गुजरात आणि कर्नाटकातून आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. कोकण हापूस, लालबाग, रायवळ, तोतापुरी, मद्रास हापूस, पायरी आंब्याची आवक वाढली आहे. प्रतिडझनासह दोन ते पाच डझनांचा दरही आवाक्यात आला आहे. ८० ते ४०० रुपयांपर्यंत प्रतवारीनुसार आंबा पेटीची विक्री होत आहे.

००

फळभाज्यांचे दर ( प्रतिकिलो)

वांगी ५० रुपये

टोमॅटो १५ रु.

भेंडी ४० रु.

ढबू मिरची ४० रु.

जवार गवारी ५० रु.

दोडका ६० ते ८० रु.

ओली मिरची ४० रु.

गाजर ४० रु.

काकडी ५० रु.

कांदा १० ते १२ रु.

बटाटा २५ रु.

लसूण ४० रु.

आले ८० रु.

००

पालेभाजी दर (पेंडी रुपयांत)

मेथी १०रु.

पालक १० रु.

शेपू १० रु.

कोथिंबीर २० रु.

००

फळांचे दर (प्रतिकिलो दर)

संत्री १०० रु.

मोसंबी ४० रु.

डाळिंब २० ते ४० रु.

सफरचंद १८० ते २०० रु.

चिकू ४० रु.

केळी २५ ते ३० रु. डझन

जवारी केळी ४० ते ५० रु.

आंबा १०० ते ५०० रु. डझन

०००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कार्यशाळेत स्वसंरक्षणाचे धडे

$
0
0

फोटो आहे

महिला कार्यशाळेत स्वसंरक्षणाचे धडे

महाराष्ट्र टाइम्स व वुशू असोसिएशनच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वर्दळीची ठिकाणे, कॉलेज परिसर किंवा तत्सम ठिकाणी महिलांना छेडछाडीली नेहमीच सामोरे जावे लागते. पण महिला जर सक्षम असतील, तर अशा विचित्र प्रसंगापासून स्वत:चा बचाव करु शकतात. हाच संदेश शनिवारी झालेल्या कार्यशाळेतून महिलांना मिळाला.

महाराष्ट्र टाइम्स आणि वुशू असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट यांच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी महिलांकडे असलेल्या साहित्यातून स्वत:चा बचाव करण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले. शाहूपुरी पंचमुखी गणेश मंदिर सांस्कृतिक हॉल येथे पार पडलेल्या कार्यशाळेला पाच वर्षांपासून ज्येष्ठ महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यशाळेचे उद्घाटन नगरसेविका पूजा नाइकनवरे यांच्या हस्ते झाल्यानंतर प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. मुख्य प्रशिक्षक व वुशू असोसिएशनचे सतीश वडणगेकर यांनी प्रात्यक्षिकांसह स्वसंरक्षणाचे धडे दिले. मनाली नवत्रे, रेवती पाटील, भाग्यश्री पाटील व मेघना परिट यांनीही सहभागी महिला व मुलींना मार्गदर्शन केले. स्पर्धेच्या युगात महिलांना कोणतेच क्षेत्र वर्ज राहिलेले नाही. त्यामुळे त्यांचा नेहमीच सार्वजनिक ठिकाणी वावर असतो. विशेषत: वर्दळीच्या ठिकाणी अचानक हल्ला किंवा छेडछाड झाल्यास त्यापासून बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अचानक झालेल्या हल्ल्याच्या प्रसंगी पाणी बॉटल, स्टेशनरी साहित्य, खेकडा पीन, बांगड्या, छत्री व ओढणीचा वापर करुन आपली सुटका कशी करुन घ्यावी याची प्रात्यक्षिके दाखवली. लिफ्ट, गार्डन, बाजारपेठ अशा सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक वस्तूचा कशा पद्धतीने वापर करावा याबाबतचे प्रशिक्षण सहभागी महिलांनी जाणून घेतले. सुमारे दोन तास झालेल्या कार्यशाळेत ८८ मुली व महिला सहभागी झाल्या .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर परिसरातविजेच्या धक्याने गोंधळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर, उपनगरात रविवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने अंबाबाई मंदिरातील गणेश मंदिराजवळ विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ठिणग्या पडल्या. यामुळे लोखंडी ॲंगलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका महिलेसह, चार वर्षाची मुलगी, विक्रेत्यास धक्का बसला. या प्रकाराने मंदिर परिसरात गोंधळ उडाला. तिघांवर प्राथमिक कक्षात उपचार करण्यात आले.

दुपारी तीन वाजता विजांच्या कडकडासह पावसाला सुरुवात झाली. मंदिरात दर्शन रांगेत भाविकांची मोठी गर्दी होती. दर्शन घेऊन जाणारे भाविक गणपती मंदिराजवळ आश्रयाला थांबले होते. वारा आणि पावसामुळे विद्युत वाहिन्यातून ठिणग्या पडल्या. या ठिणग्यांमुळे लोखंडी अँगलमध्ये विद्युत प्रवाह उतरला. तेथून जाणाऱ्या एका भाविक महिलेस विजेचा धक्का बसला. त्या महिलेने चार वर्षाच्या बालिकेस पकडल्याने तिलाही शॉक लागला. तेथून जाणाऱ्या एका विक्रेत्यालाही विजेचा धक्का बसला. ते खाली कोसळल्याने गोंधळ निर्माण झाला. विजेच्या धक्काने तिघांनाही मंदिर परिसरातील प्राथमिक आरोग्य कक्षात उपचारासाठी दाखल केले. उपचार केल्यानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या निगरणाखाली ठेवण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना पाठवण्यात आले. मंदिर आवारात धोकादायक वायरिंगमुळे हा प्रकार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आइस्क्रीम मेकिंग वर्कशॉप

$
0
0

आइस्क्रीम कार्यशाळेत

निर्मितीची गोडी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आइस्क्रीम हा प्रत्येकाचा आवडीचा खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या फ्लेवरमधील आइस्क्रीमचा आस्वाद लुटण्यासाठी बच्चे कंपनीसह सीनिअर मंडळीही पुढे सरसावतात. उन्हाच्या वाढत्या तडाख्यात शरीराला थंडावा देणाऱ्या या पदार्थाची रेसिपी कार्यशाळा शनिवारी झाली. लहान मुलांपासून महिलापर्यंत साऱ्यांनीच आइस्क्रीम रेसिपी कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब आणि उज्ज्वलाज् कुकिंग क्लासेस' यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आइस्क्रीम रेसिपी कार्यशाळा आयोजित केली होती. स्टेशन रोडवरील अवीक कॉम्प्लेक्समधील उज्ज्वलाज् कुकिंग क्लासेस येथे कार्यशाळा झाली. उज्ज्वलाज् कुकिंग क्लासेस संचालिका उज्ज्वला भोसले यांनी लहान मुले व महिलांना आइस्क्रीम बनविण्याची प्रात्यक्षिके दाखवली. वेगवेगळ्या फ्लेवरचे आइस्क्रीम बनविण्यासाठी टीप्स दिल्या.

सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी आयोजित कार्यशाळेत क्रीम ऑफ फ्रूट, फ्रूट चाट, आइसगोला, कोल्ड कॉफी, कॅडबी, लस्सी, ओरिओ शेक, नॅचरल शेक बनविण्याची प्रात्यक्षिके दाखवली. दुसऱ्या सत्रात महिलासाठी कार्यशाळा झाली.यामध्ये अर्धा लिटर दुधापासून दोन किलो आइस्क्रीम, फ्रूट सलाड, मिल्क शेक, नॅचरल शेक, कुल्फी, नॅचरल आइस्क्रीम बनविण्याचे प्रशिक्षण दिले. कार्यशाळेत सहभागी मुलांनी आइस्क्रीम बनविण्याची पद्धत, आवश्यक साहित्य याविषयीची माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांना आइस्क्रीम बनविण्याचा आनंद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र टाइम्स, गार्डन्स क्लब आयोजित 'उद्यान स्वच्छता' मोहिमेत पर्यावरण अभ्यासक रमेश शहा यांनी खतनिर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांनी स्वत:च्या घरात खतनिर्मिती करत वृक्षारोपण केले आहे.

यावेळी बोलताना शहा म्हणाले, 'शास्त्रीय पद्धतीने कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास कचऱ्याच्या समस्येवर मात करता येईल. घरातल्या कचऱ्याची घरातच शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यातून घरच्या घरी खत तयार करता येते. या खताचा वापर फुलझाडांसाठी करता येतो आणि त्यामुळे उपयुक्त फळे आणि भाज्यांचा मळा फुलवता येतो. यासाठी एक बादली घेऊन तिच्या तळाला छोटेखानी आणि वेगवेगळ्या अंतरावर भोके करत रोजचा सगळा कचरा त्या बादलीत साठवावा. तो साठवताना बादलीच्या तळाशी विटांचा चुरा, नारळाच्या शेंड्य़ा लावाव्यात. त्यात काही प्रमाणात शेणखत टाकून रोजचा कचरा साठवावा. साधारणपणे दोन ते तीन आठवडय़ांत उत्तम खत तयार होते. या खताचा वापर किचनमध्ये किंवा परसात लावलेल्या झाडांसाठी करता येतो. वापरात असलेल्या बादलीच्या तळाला भोके असल्याने त्यातून हवा खेळती राहते कचऱ्याची दुर्गंधी येत नाही. सर्वांनी एकत्र येत कचरा निर्मूलनासाठी प्रयत्न केल्यास कचऱ्याचे कोंडाळे शहरातून हद्दपार होतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नाची गरज आहे असेही ते म्हणाले. यावेळी संगीता कोकितकर यांनी अपार्टमेंटसाठी कचऱ्याचे वर्गीकरण तसेच त्यातून कंपोस्ट खतनिर्मिती कशी करावी याची सविस्तर माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

$
0
0

'ब्राह्मण समाजाने समाजकार्यात

प्रभावीपणे एकत्र यावे'

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नोकरीपेक्षा उद्योग, व्यवसायात युवकांनी सहभागी होऊन नोकरी देणाऱ्या यंत्रणा उभ्या कराव्यात. तसेच ब्राह्मण समाजाने राष्ट्रीय समाजकार्यात प्रभावीपणे एकत्र येण्याची गरज आहे,'असे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केले. ब्राह्मण भवनची उभारणी, तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करण्याबाबतचा ठराव यावेळी करण्यात आला.

ब्राह्मण सभा करवीरच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ व ब्राह्मण सभा करवीरतर्फे संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, शुक्ल, यजुर्वेद, कृष्ण यजुर्वेद, माध्व मंडळ, पुरोहित संघटना, उद्योजक संघटना अशा विविध ४० संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. महासंघाचे राष्ट्रीय महासचिव शाम जोशी, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, अॅड. विवेक शुल्क, आनंद दवे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

प्रा. पांडूरंग यज्ञोपावित यांनी ठराव मांडले. यामध्ये ब्राह्मण महासंघ व सहयोगी संघटनांनी महासंघाच्या कार्यात सहभागी होणे, ब्राह्मण भवनची उभारणीचा ठराव मंजूर केले. कोल्हापूर चित्पावन संघाचे सचिव दत्ता कानेटकर, कऱ्हाडे संघाचे मिलिंद पावनगडकर, अवधूत जोशी, स्वानंद कुलकर्णी, अॅड.राधिका कुलकर्णी यांनी चर्चेत सहभाग घेतला. नंदकुमार मराठे यांनी स्वागत केले. आदित्य मैंदरगीकर यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी देविदास सबनीस, सुधीर सरदेसाई, उदय गोसावी, श्रीकृष्ण कुलकर्णी, ए. के. कुलकर्णी, शरद फडके, केदार पारगांवकर, मनीषा वाडीकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्र उद्यानासाठी दहा लाखापर्यंतचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र टाइम्स, गार्डन्स क्लब आयोजित 'उद्यान स्वच्छता' मोहिमेप्रसंगी नगरसेवक अर्जुन माने यांनी महाराष्ट्र उद्यानाच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामासाठी साडेसात लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच सभागृह नेता दिलीप पोवार यांनी ऐच्छिक बजेटमधून तत्काळ दोन लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. या निधीमुळे उद्यानाच्या विकासासाठी हातभार लागणार आहे. या निधीच्या माध्यमातून गार्डन्स क्लबच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र उद्यानाच्या विकासासाठी, सुशोभिकरणासाठी काम केले जाणार आहे.

सद्यस्थितीत उद्यानात पदपथ करण्याची गरज आहे. उजव्या बाजूच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. उद्यानात सुरक्षिततेच्या अनुषंगाने चांगल्या दर्जाच्या संरक्षक भिंतीची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, उद्यानातील दिवे, चांगल्या प्रकारे बैठक व्यवस्था करता येईल. तसेच जवळच उद्यानाच्या जागेतील ड्रेनेजच्या पाण्याची गळती आहे ती या उपलब्ध निधीच्या माध्यमातून दूर करता येईल.

यावेळी बोलताना सभागृह नेता पोवार म्हणाले, 'महानगरपालिकेच्यावतीने शहरातील उद्यानांच्या विकासासाठी ठोस कृतिकार्यक्रम राबविण्यात यावा यासाठी प्रयत्न करणार आहे. 'महाराष्ट्र उद्यान' हे मध्यवर्ती असल्याने त्याचा संपूर्ण विकास करत एक नवा आदर्श निर्माण करू. कचरा निर्मूलन ही प्रक्रिया व्यापक स्वरुपात होण्यासाठी समाजाच्या व शासनाच्या सहकार्याने कार्यरत राहू.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अंबाबाई मंदिर परिसरातूनखिसेकापू महिलेस अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेतील भाविकाच्या खिशातील ६०० रुपये चोरल्याच्या आरोपावरून शिल्पा महावीर समगनवर (वय : ३०, रा. गवानी, ता. चिकोडी, जि. बेळगाव) हिला पोलिसांनी अटक केली. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही कारवाई झाली.

पोलिसांनी सांगितले की, अल्मीन गुलाबरब्बानी अली (रा. शनिवार पेठ, राजेबागस्वार दर्गा, कोल्हापूर) हे भवानीमंडपात दर्शन रांगेत थांबले होते. दर्शन रांगेतून जात असताना गर्दीचा फायदा घेत पाठीमागे असलेल्या शिल्पाने अल्मीन यांच्या पँन्टच्या खिशात हात घालून ६०० रुपये चोरले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राजवाडा पोलिसात त्यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. चोरीचे ६०० रुपये तिच्याकडून जप्त करण्यात आले. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमृत योजनेविरोधात दोन जूनला रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इचलकरंजी अमृत योजनेला विरोध व पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा जागर करण्यासाठी २जून रोजी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तीन ठिकाणाहून मोटारसायकलीचा सुरुवात होऊन वारणाानगर येथे समारोप होणार असल्याची माहिती डॉ. एन. डी. पाटील व आमदार उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच जून महिन्यात शेतकऱ्यांची पाणी परिषद आयोजित केले जाणार आहे.

इचलकरंजी अमृत योजना विरोधी कृती समिती व महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनतर्फे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची व्याप्ती व लोकांमध्ये नदी स्वच्छतेचा जागर असा उद्देश ठेवून मोटारसायकल रॅलीचे नियोजन केले आहे. त्यादिवशी सकाळी शिरोळ येथून एका रॅलीला प्रारंभ होईल. शिरोळ, दानोळी, कुंभोज, वडगाव, वाठार ते किणीपर्यंत रॅली येईल. त्याचवेळी सांगली जिल्ह्यातील समडोळी, कवठेपिरान, ढवळी, तांदूळवाडी ते किणी अशी रॅली निघेल. किणी येथून दोन्ही रॅली एकत्रितपणे वारणानगरकडे रवाना होतील. शाहूवाडी येथूनही रॅली निघणार आहे.

..........

शेतकऱ्यांची पाणी परिषद

इचलकरंजी अमृत योजनेला कृती समितीचा विरोध कायम आहे. कृती समिती, इरिगेशन फेडरेशनतर्फे वारणा नदीतील पाणी साठा वाचविण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पाणी परिषद घेतली जाईल. इचलकरंजी अमृत योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नजीकच्या काळात बैठक होण्याची शक्यता आहे. त्या बैठकीनंतर पाणी परिषदेचा कार्यक्रम निश्चित होईल असे फेडरेशनचे विक्रांत पाटील-किणीकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बैलगाडी, सायकलीसह जनआंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करून सरकारने सर्वसामान्यांना महागाईच्या आगीत ढकलले आहे. शहरात टोलचे जनआंदोलन उभे करण्यात आले. त्याच धर्तीवर बैलगाडी, सायकली घेऊन इंधन दरवाढीच्या विरोधात शहरात मोठे जनआंदोलन उभे केले जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या आंदोलनाची येत्या तीन दिवसांत तारीख जाहीर केली जाईल. इंधन दरवाढ मागे घेण्यास सरकारला भाग पाडू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृतीसमितीच्या रविवारी झालेल्या बैठकीत दिला. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मिरजकर तिकटी येथे आंदोलनाच्या पूर्वतयारीची बैठक झाली. अध्यक्षस्थानी महापौर शोभा बोंद्रे होत्या.

महापौर बोंद्रे म्हणाल्या, 'महापालिकेतील सर्व नगरसेवक इंधन दरवाढीच्या विरोधात ठामपणे उभे राहतील. दरवाढ कमी करण्यासाठी ठरावही केला जाईल. दरवाढीची मोठी झळ महिलांना बसते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग राहील.' उपमहापौर महेश सावंत म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आंदोलनात सक्रियपणे सहभागी होतील. जनआंदोलन उभारण्यासाठी राष्ट्रवादी सातत्याने कार्यरत राहणार आहे.'

समितीचे निमंत्रक आर. के. पवार, बाबा पार्टे यांनी टोल आंदोलनाप्रमाणेच इंधन दरवाढीविरोधात आंदोलन केले जाईल. जनआंदोलनाची जागृती केली पाहिजे. बैलगाडीवर दुचाकी ठेऊन इंधन दरवाढीचा निषेध केला पाहिजे, असे सांगितले.

अॅड. प्रकाश मोरे म्हणाले, 'इंधनावरील विविध कराचे ओझे ग्राहकांवर लादले गेले आहे. क्रूड ऑइलच्या दरात वाढ झाल्याचे भासवून दर दोन दिवसाला दरवाढ केली जात आहे. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे.'

माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा देवकर, प्रा. जयंत पाटील म्हणाले यांनी 'केंद्र आणि राज्य सरकारने करात भरघोस सवलत देण्याची गरज आहे. या आंदोलनाची जनजागृती पेठा आणि उपनगरात झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भाकपचे दिलीप पोवार म्हणाले, 'दरवाढीच्या विरोधात सर्वच पक्षांनी संघटितपणे लढा दिला पाहिजे. जोपर्यंत इंधनाचे दर कमी झाल्याचे लेखी आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आंदोलनात सातत्य ठेवले पाहिजे.

शिवसेनेचे किशोर घाटगे, मनसचे राजू जाधव, काँग्रेसचे संपतराव पाटील, उद्योजक पारस ओसवाल, सभागृह नेता दिलीप पोवार, माजी महापौर विक्रम जरग, अशोक भंडारे, जयकुमार शिंदे, अनिल चव्हाण यांची भाषणे झाली. बैठकीत मुख्य चौक, पेठा आणि उपनगरात जनजागृती केली जाणार असून त्याची जबाबदारी कार्यकर्त्यांवर सोपविली. यावेळी समितीतर्फे नूतन महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार अॅड. महादेवराव आडगुळे यांच्या हस्ते करण्यात आला. अशोक पोवार यांनी आभार मानले.

सर्वपक्षीय आले का...

काँग्रेसचे संपतराव पाटील म्हणाले, 'ही सर्वपक्षीय बैठक आहे का? सर्व पक्षाचे पदाधिकारी या बैठकीसाठी आलेला नाहीत. भाजप आणि अन्य मित्रपक्षांचे लोक दिसत नाही. त्यामुळे ही बैठक सर्वपक्षीय असे म्हणता येणार नाही.' त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सदस्य आर. के. पवार म्हणाले, 'या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सर्व पक्षाचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना निमंत्रण दिले होते. समितीने आपली जबाबदारी पार पाडली आहे. जे पक्ष आलेले नाहीत, त्यांना इंधन दरवाढीची झळ पोहोचलेली दिसत नाही. या दरवाढीच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होतील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम तरुणांनी घट्ट केली सामाजिक वीण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी पुण्याहून आलेल्या महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. सोबत असलेल्या सर्वच महिला घाबरल्या. याचवेळी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचे तरुण धावले. त्यांनी अत्यवस्थ महिलेला उपचारासाठी दाखल केले. दुर्दैवाने उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या महिलांना धीर देण्यापासून ते उत्तरीय तपासणी करून मृतदेह पुण्याला पाठवण्यापर्यंत सर्व धावपळ मुस्लिम तरुणांनी केले. रात्रभर याच कामात असल्याने ३० ते ३५ तरुणांना सोमवारी पहाटे केवळ चहा घेऊन रोजा धरला. या घटनेने पुन्हा एकदा कोल्हापुरातील सामाजिक सलोखा समोर आला.

पुण्यातील १२ महिला रविवारी (ता. २७) मिनीबसमधून देवदर्शनासाठी बाहेर पडल्या होत्या. गणपतीपुळे येथे दर्शन घेतल्यानंतर रात्री त्या कोल्हापुरात पोहोचल्या. बिंदू चौकात मिनीबस पार्क करून त्या अंबाबाईच्या देवळात दर्शनासाठी गेल्या. रात्री पावणेदहाच्या सुमारास त्या पुन्हा बिंदू चौकात येताच यातील लता कमळकर (वय ६२, रा. पुणे) या महिलेच्या छातीत तीव्र कळ आली. अंगाला घाम फुटला. त्यांची अवस्था पाहून सोबतच्या महिला घाबरल्या. पुढे काय करायचे हे कोणालाच सुचत नव्हते. याचवेळी कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटीचा एक सदस्य बिंदू चौकातून पुढे निघाला होता. महिलांची तारांबळ पाहून त्याने विचारपूस केली. अत्यवस्थ महिलेला पाहताच हृदयविकाराचा झटका आल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने मित्रांना फोन करून या घटनेची माहिती दिली. काही मिनिटांत चार-पाच मित्र बिंदू चौकात आले. त्यांनी घाबरलेल्या महिलांना धीर देत तातडीने मिनीबस खासगी रुग्णालयात नेली.

रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी उपचार सुरू केले. दरम्यान, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सोबतच्या महिला घाबरल्या होत्या. काही वेळातच लता कमळकर दगावल्याची माहिती डॉक्टरांनी देताच या महिलांना दुसरा धक्का बसला. अनोळखी ठिकाण, अनोळखी माणसं आणि मैत्रिणीचा अनपेक्षित मृत्यू याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. काहींनी तर रुग्णालयातच हंबरडा फोडला. यावेळी बैतुलमाल कमिटीच्या तरुणांनी महिलांना सावरले. 'काळजी करू नका. कोल्हापुरात आम्ही मदतीत जात-धर्म पाहत नाही. आम्ही तुमच्यासोबत आहे. आपण तुमच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देऊन बोलवून घेऊ.' असे त्यांनी सांगितले. रोजाचा महिना, नमाजाची वेळ हे सगळे बाजुला ठेवून ३०-३५ मुस्लिम तरुण पुण्याहून आलेल्या महिलांच्या मदतीसाठी धावले. खासगी रुग्णालयातून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये हलवला. दरम्यान, पुण्यातील नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. पहाटे पाचच्या सुमारास उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्यांनी मृतदेह पाठवण्यासाठी शववाहिकेची व्यवस्था केली. नातेवाइकांसोबत आधी महिलांना पाठवले. यानंतर मृतदेह पुण्याला पाठवला. कमळकर या अमेरिकेत मुलाकडे राहत होत्या. देवदर्शनासाठी त्या पुण्यातील नातेवाइकांकडे आल्या होत्या.

रात्रभर सीपीआरच्या आवारात थांबलेल्या तरुणांना बाहेरही पडता आले नाही. रोजा असल्याने पहाटे साडेचारच्या आतच जेवणे गरजेचे होते, मात्र संकटकाळात महिलांना सोडून जाणे योग्य नाही. त्यामुळे सीपीआरच्या बाहेर एका टपरीवरच तरुणांनी चहा घेतला. आणि चहावरच उपवास सुरू केला. जात-धर्म याच्या पलीकडे जाऊन रमजानच्या महिन्यात या तरुणांनी केलेली धडपड कोल्हापूरच्या जातीय सलोख्याची वीण अधिक घट्ट करणारी ठरली आहे.

बैतुलमाल कमिटीचे सामाजिक काम

कोल्हापूर जिल्हा बैतुलमाल कमिटी ही सर्वसामन्यांनी दिलेल्या मदतीच्या आधारे वर्षभर सामाजिक काम करते. कमिटी जिल्ह्यात १४० गरजू कुटुंबांना दर महिन्याला मदत करते. १०० रुग्णांना औषधे देते, तर निराधार ६० वृद्धांचा सांभाळ केला जातो. प्रत्येक वर्षी विविध जाती-धर्मातील ५० ते ६० अनाथ मुलींचे विवाह लावून देण्याचेही काम बैतुल कमिटी करते. सामजिक कामात नेहमीच अग्रेसर असलेल्या बैतुल कमिटीने पुन्हा एकदा त्यांच्या कामाने कोल्हापूरचा सामजिक सलोखा स्पष्ट केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वित्त विभागावरही कारवाई

$
0
0

जि.प.तील औषध घोटाळाप्रकरणी सीईओंचे आदेश

लोगो: मटा पाठपुरावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे केलेल्या औषध खरेदीमधील घोटाळ्यात वित्त विभागाला क्लिनचीट देण्याच्या हालचाली सुरू होत्या. त्यासंबंधीचे वृत्त महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केले होते. वित्त विभागातील दोषी नामानिराळे राहण्यासाठी धडपडत असल्याकडे प्रकाशझोत टाकला होता. त्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी वित्तमधीलही दोषींना कारवाईच्या कक्षेत घेण्याचे आदेश सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र आडसूळ यांना दिले आहेत. यामुळे आरोग्यासह वित्तमधीलही दोषींना कारवाईसाठी नोटीस बजावण्यात येणार आहे.

'मटा'ने महिन्यापूर्वी जि. प. आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या औषध खरेदीमधील घोटाळा चव्हाट्यावर आणला होता. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पाटील, औषध निर्माण अधिकारी बी. डी. चौगले यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणातील कनिष्ठ लेखा अधिकारी बर्डे, सांखिकी लेखा अधिकारी व्ही. एस. व्हटकर, कक्ष अधिकारी उदय गोडवे, प्रभारी कक्ष अधिकारी एम. बी. चौगुले यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. दरम्यान, अंतिम मंजुरीसाठी वित्त विभागाकडे फाइल्स गेल्याचे चौकशी अहवालात स्पष्ट झाले. तरीही वित्त मधील दोषींना कारवाईच्या कक्षेत घेण्यात आले नव्हते. अंतिम चौकशी अहवालात अर्थ विषयक दोष निश्चित वित्त विभागाने केले. त्यांनी आपल्या विभागातील दोषींना बाजूला ठेवून आरोग्य विभागातील दोषींना शोधून ठपका ठेवला. हा प्रकारही लपून राहिला नाही. वित्तमधील दोषींवरही कारवाईची मागणी होऊ लागली. त्यामुळे वित्तमधील दोषींनाही कारवाईसाठी नोटीस देण्यात येणार आहे. नोटीसीला उत्तर दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. परिणामी वित्तमधील दोषींना क्लिन चीट देण्याचा डाव उधळला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस करणार १० हजार वृक्षलागवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या शतकोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत यंदा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या आवारात दहा हजार वृक्षांची लागवड होणार आहे. शहरातील पोलिस ठाण्यांच्या परिसरात वृक्षारोपणासाठी जागा नसल्याने पोलिस मुख्यालयासह ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांच्या आवारात मोठ्या संखेने वृक्षारोपण होणार आहे. यामुळे पोलिस ठाणी ऑक्सिजन पार्क बनतील, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

राज्य सरकारकडून सर्व कार्यालये, ग्रामपंचायत, महानगरपालिका आदींना जून महिन्यात वृक्षारोपण करण्याची सक्ती केली जाते. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात पोलिस दलानेही सहभाग घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत पोलिस मुख्यालयात लावलेल्या रोपांची अपेक्षित वाढ झाली आहे. यंदा पोलिस मुख्यालयासह ३१ पोलिस ठाण्यांच्या आवारात १० हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट पोलिस दलाने ठेवले आहे. यासाठी ग्रामीण भागातील पोलिस ठाण्यांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याकडे वृक्षारोपणासाठी जागेची कमतरता आहे. त्यामुळे पोलिस मुख्यालयासह ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या आवारात वृक्षारोपणासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम सुरू होईल. यासाठी सध्या खड्डे काढण्याचे काम सुरू आहे. वेळेत रोपांची उपलब्धता व्हावी यासाठी सामाजिक वनीकरण, वनविभाग, खासगी नर्सरींमधून व्यवस्था केल्याचे पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी गोळीबार मैदान येथे केलेल्या वृक्षलागवडीतील वृक्ष जळून गेले आहेत. असे प्रकार होऊ नयेत, यासाठी पाण्याची व्यवस्था आणि रोपांच्या सुरक्षेची काळजी घेऊनच वृक्षारोपण केले जावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरातत्व विभागाकडून मोजमाप

$
0
0

पर्यायी शिवाजी पुलासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाच्या बांधकामासाठी पुन्हा एकदा प्रशासकीय पातळीवरुन हालचाली वेगावल्या आहेत. पुरातत्व विभागाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांनी सोमवारी पर्यायी पूल परिसराची पाहणी केली. पर्यायी पुलाचे काम पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील जागेत आहे की १०० मीटर क्षेत्राच्या बाहेर यासाठी जागेचे मोजमाप घेतले. १०० मीटर क्षेत्राबाहेर जागा असल्यास पर्यायी पुलाच्या बांधकामाचा मार्ग सुकर होणार आहे. जागेच्या मोजमापचा अहवाल पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तत्काळ सादर करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान जिल्हा प्रशासनामार्फतही विधी व न्याय विभाग आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे अत्यावश्यक सेवा म्हणून पर्यायी पुलाच्या बांधकामाला परवानगी मिळावी यासाठी पत्रव्यवहार केला आहे. यामुळे पर्यायी पुलासंदर्भात लवकरच निर्णय होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जुन्या शिवाजी पुलाचे आयुष्यमान संपल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सध्या या पुलावरुन अवजड वाहनांची वाहतूक बंद आहे. पर्यायी पुलाचे काम जलदगतीने करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान पुरातत्व विभागाची मान्यता नसल्यामुळे गेली अडीच वर्षे पर्यायी पुलाचे काम रखडले होते.

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते, राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, कोल्हापूर शहर व जिल्हा हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर आणि पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची सर्किट हाऊस येथे बैठक झाली. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पर्यायी पुलाचे काम तत्काळ पूर्ण कसे होईल, या अनुषंगाने चर्चा केली. या बैठकीनंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा निंबाळकर यांनी पर्यायी पूल परिसराची पाहणी केली. पर्यायी पुलाचे काम सुरु असलेले ठिकाण, ब्रम्हपुरी टेकडी, पुरातत्व विभागाच्या अखत्यारितील जागा या साऱ्याबाबत चर्चा झाली. यानंतर पुरातत्व विभागाकडून पर्यायी पुलाच्या कामाच्या ठिकाणची मोजमापे घेण्यात आली. पाण्याचा हौद, लाइन आऊटचे मोजमाप घेतले. प्रत्यक्ष बांधकाम होणारे ठिकाण किती अंतरावर आहे हे सुद्धा तपासले. त्याचा अहवाल पुरातत्व विभागाला सादर होणार आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र पाठवून १५ दिवसांत पर्यायी पुलाच्या बांधकामाला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. या कालावधीत पुरातत्व विभागाचे काही म्हणणे प्राप्त झाले नाही कसलीही तक्रार नाही, असे समजून पुलाच्या कामाला सुरुवात करू असे पत्रात म्हटले आहे.

................................

लाइन आऊटचे काम पूर्ण, बुधवारी खोदकाम

पर्यायी पुलाच्या शहराकडील बाजूने प्रत्यक्ष बांधकाम होणार आहे. नदीपात्रात गाळा न उभारता सध्या सपाटीकरण केलेल्या जागेत बांधकाम होणार आहे. याठिकाणी करावयाच्या बांधकामासाठी लाइन आऊट आखली आहे. तसेच कंत्राटदारांने बांधकाम विभागाकडे डिझाइन मागितले आहे. नवीन होणारा गाळा चाळीस मीटरचा की ४७ मीटरचा असेल हे नवीन डिझाइनवर अवलंबून राहील. दरम्यान सपाटीकरण केलेल्या जागेवर होणाऱ्या अबुटमेंटसाठी बुधवारी खोदाईला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. कंत्राटदारांनी यासाठी आवश्यक मशिनरी पर्यायी पूल परिसरात तैनात केल्या आहेत. पर्यायी पुलाच्या कामासाठी कोल्हापुरात आंदोलन झाले आहे. प्रत्यक्ष बांधकामाला तत्काळ सुरुवात केली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयाला ठाळे ठोकण्याचा इशारा कृती समितीने दिला होता. जिल्हा व पोलिस प्रशासनाने पुढाकार घेऊन बांधकामाला सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीचे दोघे तरुण आंब्याजवळ ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

तालुक्यातील आंबा-विशाळगड मार्गावरील केम्बुर्णेवाडी गावाजवळच्या वळणावर झालेल्या ट्रक व मोटारसायकलच्या भीषण अपघातात सांगलीच्या दोघा महाविद्यालयीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. राहुल दिगंबर कांबळे (वय २२, रा.विश्रामबाग, सांगली) व धोंडीराम तुकाराम शेजुळ (वय २४, रा. अष्टविनायक नगर, सांगली) अशी मृतांची नावे आहेत. अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. शाहूवाडी पोलिसांत या अपघाताची नोंद झाली आहे.

पोलिस आणि घटनास्थळी मिळालेली अधिक माहिती अशी की, राहुल दिगंबर कांबळे आणि धोंडीराम तुकाराम शेजुळ हे दोघे अन्य मित्रांबरोबर सोमवारी (ता.२८) सकाळी नऊ वाजता सांगलीहून हिरो होंडा (एमएच १० बीडब्ल्यू ८५९३) या मोटारसायकलवरून विशाळगड (ता. शाहूवाडी) येथे देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी आंबा-विशाळगड मार्गावरील केम्बुर्णेवाडी गावाजवळच्या वळणावर आंब्याकडे निघालेल्या ट्रकने (एमएच ०८ एएच २१०३) त्यांच्या मोटारसायकलला समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात मोटारसायकलवरील राहुल व धोंडीराम यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. अतिरक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अपघात एवढा भीषण होता की, मोटारसायकलवरून आपटून धोंडीराम ट्रकच्या पुढील चाकात सापडून जागीच गतप्राण झाला होता. तर डोक्याला जबर मार लागून राहुल निपचीत पडला होता. सोबतच्या अन्य मित्रांनी त्याला आंबा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रस्त्यावर रक्ताचा सडा पसरल्याने अपघातस्थळावरील चित्र मन हेलावून टाकणारे होते. या भीषण घटनेमुळे राहुल आणि तुकारामचे मित्र भयभीत झाले होते. ट्रकचालक सुरेश भोजे (रा. करंजारी, ता. संगमेश्वर) याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृत राहुलचे आईवडील मुंबई पोलिस दलात आहेत. त्याला एक भाऊ आहे. तर धोंडीरामचे आईवडील कुपवाड एमआयडीसीत हमाली करून उदरनिर्वाह चालवतात. दोघेही महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेहांचे विच्छेदन करून सायंकाळी उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वशिलेबाजांना कारणे दाखवा नोटीस

$
0
0

पान ५ मेन

.....................

वशिलेबाजांना कारणे दाखवा

बदलीप्रकरणी सहकार आयुक्तांचा अधिकाऱ्यांना दणका

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

राज्य सरकारच्या विविध विभागाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू असताना सहकार,पणन व वस्त्रद्योग विभागाचे आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी सहकार विभागातील अधिकाऱ्यांना चांगलाच झटका दिला. बदली प्रक्रिया सुरू असताना राजकीय व्यक्तींची शिफारसर पत्रे आणल्याने राज्यातील १४ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आयुक्तांच्या या कारवाईमुळे सहकार विभागात ठाण मांडून बसलेल्या किंवा हव्या त्या ठिकाणी वर्णी लावण्यासाठी 'देव पाण्यात घातलेल्या' अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

एप्रिल ते जून महिन्यामध्ये राज्य सरकारच्या सर्व विभागातील बदल्या केल्या जातात. बदलीस प्राप्त असलेल्या अधिकाऱ्यांची सहकार विभागाने यादीही तयार केली. यादी तयार झाल्यानंतर डॉ. झाडे यांनी सरकारच्या मार्गदर्शनानुसार समुपदेशनाद्वारे बदली प्रक्रिया राबवण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी डॉ. झाडे यांनी 'आई-वडील व स्वत:चे आजारपण, मुलांचे शिक्षण आदी खरी-खोटी किंवा तकलादू कारणे सांगायची नाहीत. तसेच एखादा अधिकारी वैद्यकीय रजेवर गेल्यास स्वत: वैद्यकीय तपासणी करुन चौकशी करणार असल्याचा इशारा दिला. तसेच बदलीसाठी कोणत्याही राजकीय व्यक्तींचे शिफारस पत्रे आणल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. तसेच अशी शिफारस पत्रे आणल्यास कारवाई करण्याचा सज्जड दम दोन आठवड्यांपूर्वी डॉ. झाडे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे दिला होता. तरीही बदलीसाठी शिफारस पत्रे आणलेल्या अधिकाऱ्यांना चांगलाच झटका आयुक्तांनी दिला आहे.

सहकार आयुक्तांकडे सहायक निबंधक, निबंधक, विभागीय सहनिबंधक, अप्पर निबंधक, उपनिबंधक, सरकारी लेखापरीक्षकांच्या बदली करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यात सहायक निबंधकांची बदल्यांची प्रक्रिया राबवली. बदली दरम्यान राज्यातील १४ अधिकाऱ्यांनी हव्या त्या ठिकाणी बदली करण्यासाठी विविध कारणे देत राजकीय व्यक्तींची शिफारस पत्रे दिली. सूचना करुनही अशी शिफारस पत्रे आणलेल्या अधिकाऱ्यांना आयुक्त डॉ. झाडे यांनी कारणे दाखवा नोटीस दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे बदली प्रक्रियेत असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अद्याप उपनिबंधक, विभागीय निबंधक पदांची बदली प्रक्रिया अपू्र्ण असल्याने हव्या त्या ठिकाणी वर्णी लावण्यासाठी इच्छुक असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे.

चौकट

राजकीय वशिलेबाजीला 'ब्रेक'

सहकार, पणन, वस्त्रउद्योग किंवा अन्य सरकारी सेवेतील बदली करण्याचे अधिकार त्या-त्या विभागाच्या मंत्र्यांना होते. त्यासाठी प्रत्येक विभागाच्या ओएसडींची शिफारस घेतली जात होती. बदल्या करताना बहुतांशवेळा हव्या त्या ठिकाणी वर्णी लावण्यासाठी अधिकारी हात सैल सोडत असल्याची अनेकदा चर्चा होत राहिली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मात्र बदल्यांचे अधिकार आयुक्त व सचिवांना दिले आहेत. त्यामुळे पूर्णपणे वशिलेबाजी थांबली असे म्हणता येत नसले तरी वशिलेबाजीचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे. पण अधिकाऱ्यांची अद्याप तशी मानसिकता बदललेली नसल्याने अजूनही राजकीय नेत्यांची शिफारस पत्रे घेवून येत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसे आंदोलन महिला बचत गट

$
0
0

मनसेचे उपोषण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका महिला बचत गटांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी बँकेचे नियम, अटी, कागदपत्रे पुर्ततेच्या नावाखाली सरकारच्या योजनांना हरताळ फासण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीयकृत बँकांच्या या अन्याकारी धोरणांच्या विरोधात महालक्ष्मी बचत गट व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु करण्यात आले.

यावेळी बोलताना महिला बचत गटाचे नेते राजू जाधव म्हणाले, 'जिल्ह्यात परप्रांतीय फायनान्स कंपन्या व काही फायनान्स कंपनीच्या नावाखाली सावकारी करणारे २५ ते ४० टक्के व्याजाप्रमाणे महिला बचत गटांना लुटण्याचा प्रकार करत आहेत. असे चित्र असतानाही राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांचे हिटलरशाही पध्दतीचे वागणे बदलत नाही. मोठ्या उद्योगपतींना कर्जे दिली जातात मात्र बचत गटाच्या महिलांना कर्ज देताना टाळाटाळ केली जाते. या अन्यायकारी धोरणाचा निषेध म्हणून हे आमरण उपोषण करण्यात येत आहे.'

उपोषणात महालक्ष्मी महिला बचत गटाच्या गीता कांबळे,विनायक पोवार, उषाताई जाधव, मेघा साठे, सुनिता कणगांवकर, रचना पोवार,सुनिता गोंधळी, सुनंदा पोवार, भारती कागलकर, अर्चना कागलकर आदी महिला सहभागी झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत बांधकाम व्यावसायिकाकडून गंडा

$
0
0

(फोटो आहे)

इचलकरंजीत बांधकाम व्यावसायिकाकडून गंडा

दोन कोटींची फसवणूक करून पलायन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकातील बांधकाम व्यावसायिकाने इचलकरंजीत घरांच्या बांधकामासाठी पैसे घेऊन ३० जणांची फस‌वणूक केली. सुमारे दोन कोटी रुपयांचा गंडा घालून कादर गुडासाब सनदी (वय ४०, रा. दुग्द्याळ, ता. गोकाक, जि. बेळगाव) याने पलायन केल्याने फसवणूक झालेल्या नागरिकांनी सोमवारी (ता. २८) पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून या गुन्ह्याचा तपास सुरू असून, फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इचलकरंजीत कमी खर्चात घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून कादर सनदी या बांधकाम व्यावसायिकाने गंडा घातला. त्याने सुरुवातीला दोन घरांचे बांधकाम केले. यानंतर कमी खर्चात घरे बांधून देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे घेतले. गेल्या दीड वर्षांपासून त्याने ३० घरांचे बांधकाम सुरू केले होते. जमा-खर्चाचे काम पाहण्यासाठी त्याने इचलकरंजीतील एका निवृत्त सैनिकाची नियुक्ती केली. निवृत्त सैनिकाच्याच बँक खात्याचा वापर त्याने सर्व व्यवहारांसाठी केला. विशेष म्हणजे त्याने बहुतांश रक्कम रोख स्वरुपात स्वीकारली आहे. बांधकामांसाठी त्याने ३० जणांकडून प्रत्येकी ५ ते १५ लाखांची रक्कम घेतली. यातील एकाही घराचे काम पूर्ण झालेले नाही. बांधकाम मजुरांसह वाळू, सिमेंट, खडी, सळी विक्रेत्यांचेही लाखो रुपये त्याने थकवले आहेत. कर्नाटकातून मजूर घेऊन येतो, असे सांगून ७ मे रोजी त्याने पळ काढला. यानंतर त्याचा मोबाइल नंबर स्विचऑफ लागत आहे.

बांधकाम साहित्य विक्रेत्यांसह अर्धवट काम राहिलेल्या घरमालकांनी कादर सनदी याच्या मू‌ळ गावी जाऊन त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. यानंतर १० मे रोजी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सनदी बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम घेऊन त्याने पळ कढल्याने घरमालक, मजूर आणि बांधकाम साहित्य विक्रेते अस्वस्थ झाले आहेत. फसवणूक झालेल्या घरमालकांसह मजुरांनी सोमवारी पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली. अधीक्षक मोहिते यांनी फस‌वणुकीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे.

.........

चौकट

संशयिताला स्थानिकांची मदत?

फसवणूक करणारा संशयित कादर सनदी याने स्वत:च्या बँक खात्यावरून एकही व्यवहार केलेला नाही. यासाठी त्याने स्थानिकांच्या बँक खात्यांचा आधार घेतला. याशिवाय तो बेपत्ता असल्यापासून इचलकरंजीतील दोघांनी त्याचा शोध घेऊ नका, असा सल्ला फसवणूक झालेल्या नागरिकांना दिला आहे. सनदी याचे आर्थिक व्यवहार पाहणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.

............

कोट

' फसवणुकीची सर्व माहिती घेतली असून, संशयित कादर सनदी याचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक करून चौकशी केली जाईल. त्याने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.

राजेंद्र शेडे, उपअधीक्षक, आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकारीतून तरुणावर चाकू हल्ला

$
0
0

खासगी सावकारीतून

तरुणावर चाकू हल्ला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी तिघांनी तरुणावर चाकू हल्ला केला. इचलकरंजीतील लालनगर भागात सोमवारी (ता. २८) दुपारी हा प्रकार घडला. यात सिध्दार्थ अनिल कांबळे (वय २७, रा. लालनगर, कामगार चाळ) हा तरुण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.

इचलकरंजीतील कामगार चाळीत राहणाऱ्या सिध्दार्थ कांबळे याने वर्षभरापूर्वी तिघा खासगी सावकारांकडून दरमहा १५ ते २० टक्के व्याजाने अडीच लाख रुपये घेतले होते. व्याजाने घेतलेले पैसे आणि त्याचे व्याज देता आले नसल्याने वसुलीसाठी खासगी सावकारांकडून तगादा सुरू होता. सावकारांच्या त्रासाला कंटाळून त्याने यापूर्वी विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सोमवारी दुपारी सिध्दार्थ हा पंचगंगा नदीघाटावर पोहण्यासाठी गेला होता. ही माहिती तिघा खासगी सावकारांना समजल्यावर ते दुचाकीवरून तेथे पोहोचले. त्यांनी सिध्दार्थला व्याज व मूळ रक्कम देण्यासाठी धमकावले. तिघांनी सिद्धार्थला काठी व दगडाने मारहाण केली. यातील एकाने सिद्धार्थच्या पोटावर चाकूने वार केला. तो खाली पडल्यानंतर तिघांनीही पळ काढला. यानंतर परिसरातील तरुणांनी जखमी सिद्धार्थला उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्याला पुढील उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. तीन सावकारांनी मारहाण करून चाकूहल्ला केल्याची माहिती जखमी सिद्धार्थने पोलिसांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images