Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आता माघार घेणार नाही

$
0
0
शेतकऱ्यांनी आग्रह केल्यामुळे छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम उद्यापासून (ता. २९) कोणत्याही परिस्थितीत सुरू कराणारच असा निर्धार अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी केला आहे. मंगळवारी सभासदांच्या मेळाव्यात निर्णय घेण्यात आल्यानंतर बुधवारी काही कार्यकर्त्यांनी तोही बंद करण्याचे आवहान केले होते.

दुसरा हप्ता न दिल्यास ‘आजरा’ बंद

$
0
0
सध्या ऊसदराच्या प्रश्नावरून साखर कारखान्यातील गळीत हंगाम बंद आहे. पहिल्या उचलीबाबतचा तोडगा निघेपर्यंत त्यामध्ये बदल होणार नसल्याचा पुनरूच्चार करतानाच आजरा कारखान्याने केवळ यावर्षीच्या पहिल्या उचलीचाच प्रश्न नव्हे, तर गेल्या वर्षीच्या हंगामातील दुसऱ्या हप्त्याचा प्रश्न सोडविल्याशिवाय धुराडे पेटू न देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यसचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर यांनी दिला.

ऐनापूर येथे ३५ हजारांची चोरी

$
0
0
ऐनापूर (ता.गडहिंग्लज) येथील के.आय.एम.हायस्कूलमधील खोलीचा बंद दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार मुख्याध्यापक जोमाकांत भीमा पाटील (वय ४५) हे काल शाळा सुटल्यानंतर शाळेतील खोलीला कुलूप लावून घरी गेले.

चंदगडमध्ये पुन्हा हत्तींचा वावर

$
0
0
उमगाव पैकी माळी (ता. चंदगड) परीसरात चार हत्ती व लहान पिल्लू दाखल झाल्याने परीसरातील शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मोठे नुकसान केले आहे. या हत्तींनी उच्छाद मांडला असून परिसरातील शेतकरी भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

होसूर येथे विवाहितेची आत्महत्या

$
0
0
होसूर (ता. चंदगड) येथील विवाहिता सरीता आप्पाजी पाटील (२३, रा. होसूर) हिने सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. १५ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेची फिर्याद मंगळवारी विवाहितेचे वडील मारुती नारायण हुंदरे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे सरीता हिचा आप्पाजी बाबू पाटील यांच्याशी तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह विवाह झाला होता.

जयसिंगपुरात सहा फ्लॅट फोडले

$
0
0
जयसिंगपूर येथे पहिल्या गल्लीत चैतन्य व एसपी हेरीटेज या दोन अर्पामेंटमध्ये चोरट्यांनी तब्बल सहा फ्लॅट फोडले. बुधवारी पहाटे सहा चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

गुऱ्हाळघरांनाही आर्थिक पॅकेज द्या

$
0
0
गुळाला मिळणाऱ्या सध्याच्या दरामुळे त्याचा उत्पादन खर्चसुद्धा निघणे मुश्कील बनले आहे. ग्रामीण भागात अनेकांना रोजगार उपलब्ध करुन देणाऱ्या या व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी साखर उद्योगाप्रमाणे केंद्र व राज्यानी आर्थिक पॅकेज द्यावे आणि गुऱ्हाळघरांना औद्योगिक दराप्रमाणे आकारण्यात येणारे वीज बिल शेतीपूरक व्यवसाय म्हणून आकारण्यात यावे, अशी मागणी गूळ उत्पादकांच्या मेळाव्यात करण्यात आली.

व्यवस्थेविरोधात बोलणे गुन्हा आहे?

$
0
0
‘समाजव्यवस्थेने माणूसपण आणि जगणं नाकारलेल्या वंचित घटकांतील लोकांना माणूस म्हणून घडविण्याचे, त्यांना माणूसपण देऊन समाजात उभे करण्याचे कार्य ‘उपरा’कार लक्ष्मण माने करीत आहेत. माने यांचे कार्य आणि लेखन हे महाराष्ट्राच्या प्रागतिक विचार व ​आचार समूहांचा प्रातिनिधिक स्वर आहे. ते व्यवस्थेच्या विरोधात आणि व्यवस्थेसंबंधी निर्भीडपणे मांडणी करीत आहेत.

पंचगंगा प्रदूषणमुक्ती लांबणार

$
0
0
पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्ततेच्या दिशेने पावले टाकणाऱ्या महापालिकेची धाव सध्या फक्त निम्म्यापर्यंतही पोहचलेली नाही. जयंती नाल्यावरील उपसा केंद्र व नवीन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) जानेवारीत जरी सुरु झाला तरी पूर्णपणे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दुधाळी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, बापट कॅम्प व लाईन बाजार उपसा केंद्रांच्या उभारणीचा अजून पत्ता नाही.

कोल्हापूरभोवतीही ‘स्कायस्क्रेपर’

$
0
0
महापालिका क्षेत्रातील एफएसआय व टीडीआर पद्धती ग्रामीण भागातही लागू झाल्याने बहुमजली इमारत बांधकामांचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिका क्षेत्र वगळता सर्वत्र एकच सुधारित प्रमाणित विकास नियंत्रण नियमावली लागू केल्याने विकासाला चालना मिळून निमशहरी भागांनाही शहरी लुक मिळणार आहे.

‘पंचगंगा’ चे कार्यालय पेटविले

$
0
0
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासमवेत दिल्ली येथे झालेल्या बैठकीत ऊसदराबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. याचे पडसाद जयसिंगपुरात उमटले. संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जयसिंगपुरात पंचगंगा साखर कारखान्याचे विभागीय शेती कार्यालय पेटविले. तसेच तीन एसटीवर दगडफेक केली.

दोन दिवस ‘बंद’

$
0
0
पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत ऊसदराविषयी चर्चाच झाली नाही, असा गौप्यस्फोट करत ऊसदराबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारला आणखी दोन दिवसांची मुदत दिल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले. सरकार या प्रकरणी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही शेट्टी यांनी केला.

सोलापूर जिल्हा अशांत घोषित

$
0
0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी पुकारलेल्या ४८ तासाच्या बंदला सोलापूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. आज सकाळ पासून पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत फिरताना दिसत होते.

आव्हान २१ कोटी वसुलीचे

$
0
0
रस्त्यांची रखडलेली कामे, आरोग्य सेवांकडे होत असलेले दुर्लक्ष, मूलभूत सुविधांशिवाय अन्य सुविधांचा विचारही महापालिका केवळ निधीच्या उपलब्धतेअभावी करत नाही. एकीकडे निधी नाही म्हणून विकासकामे पुढे ढकलली जात असताना २१ कोटींवर पोहोचलेली थकबाकी प्रशासनाला डोकेदुखी ठरत आहे.

मुंबईच्या ‘नासिओ’ला अपंगमित्र पुरस्कार

$
0
0
हेल्पर्स ऑफ दि हॅण्डीकॅप्ड संस्थेच्यावतीने देण्यात येणारा अपंग मित्र पुरस्कार मुंबईच्या नॅशनल सोसायटी फॉर इक्वल अॅपॉर्चनिटीज फॉर हॅण्डीकॅप्ड संस्थेला तर भरारी पुरस्कार पुण्यातील चार्टर्ड अकौंटंट अमोल देशमुख यांना जाहीर झाला आहे.

मोबाइल टीचर देणार अपंगांना प्रशिक्षण

$
0
0
जिल्हा परिषदेच्या वतीने अपंग मुलांना शिक्षण देण्यासाठी ‘मोबाइल टीचर्स’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. या मोबाइल टीचर्सना पुन्हा कार्यप्रवण करण्यात येणार आहे.

खासगी शाळांना वेतनेतर अनुदान मिळणार

$
0
0
राज्यातील खासगी शाळांच्या वेतनेतर अनुदानासाठी २५ कोटींचा निधी प्रस्तावित केला आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर अनुदान शाळांकडे वर्ग करण्यात येईल.

जैन पंचमची महासभा होणार

$
0
0
जैन पंचम प्रवर्गाच्या आरक्षणासह अखिल भारतीय जैन पंचम समाज महासभा स्थापन करण्याचा निर्णय समाजाच्या बैठकीत घेण्यात आला. शुक्रवार पेठेतील श्रीलक्ष्मीसेन जैनमठ येथे बैठक झाली.

महाडिक युवाशक्तीतर्फे निर्धार यात्रा

$
0
0
समाजातील गरजू व निराधार, दुर्बलांना आधार देण्यासाठी व युवकांना समाजविकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी धनंजय महाडिक युवाशक्तीच्यावतीने निर्धार यात्रा सुरू करण्यात आली आहे.

तेरा दिवस प्रेमाचे: वाट चुकलेली कॉमेडी

$
0
0
संज्ञांचा घोळ आणि संकल्पनामधील सुस्पष्टतेचा अभाव यामुळे अनेकदा अभिव्यक्तीचं तारू भरकटतं. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या आनंद म्हसवेकर लिखित नाटकांची मुख्य गोचीही हीच आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images