Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अॅडव्हेंचर कॅम्प सुरू

$
0
0

कोल्हापूर : दि कोल्हापूर अॅडव्हेंचर अँड माउंटेनिअरिंग फाउंडेशनमार्फत कॅसल रॉक अॅडव्हेंचर कॅम्प २१ मेअखेर होत आहे. कर्नाटक आणि गोव्याच्या सीमांवर काली नदीच्या किनारी आणि घनदाट जंगलातील कॅम्पचा अनोखा अनुभव यातून मिळणार आहे. कोल्हापूरपासून २०० किलोमीटर अंतरावरील हा परिसर दांडेलीचे जंगल म्हणूनही ओळखला जातो. टायगर रिसॉर्ट म्हणून याची ख्याती असल्याने वाघ, बिबटे, हत्ती, अस्वल या प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास या परिसरात आहे. कॅम्पमध्ये ट्रेकिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, रायफल शूटिंग, नाइट ट्रेक यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पलूस कारखाना सुरूकरण्याचे आश्वासन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी दिली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सहकारमंत्री देशमुख यांची कोल्हापूरच्या विश्रामगृहावर भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

पलूस कारखाना पाच हंगाम बंद आहे. कारखान्याची एका कंपनीला झालेली विक्री प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखील झालेल्या लढ्यानंतर रोखण्यात आली. कारखान्याचा ताबा राज्य बॅँकेकडे आहे. विक्री रद्द झाल्यानंतर तो सभासदांची मालकी ठेवून चालवायला देणे, भाडेतत्त्वावर देणे यासाठी राज्य बॅँकेने काहीही केलेले नाही. या पार्श्वभूमीवर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील, कारखाना बचाव समितीचे संजय संकपाळ-पाटील यांना प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली देशमुख यांची भेट घेतली. त्यावेळी याबाबत चर्चा करून सहकारमंत्री देशमुख यांनी आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रिय पर्यटन मंत्री अफ्लोंन्स यांची आज रायगडला भेट

$
0
0

पर्यटनमंत्री अल्फोन्स

आज रायगडावर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्रीय पर्यटन मंत्री अल्फोन्स आज शनिवारी (ता. १९) रायगड किल्ल्याला भेट देणार असून गडावरील विकास कामांची पाहणी करणार आहेत, अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. त्यांच्यासमवेत राज्याचे पर्यटनमंत्री जयप्रकाश रावळही रायगडावर येणार आहेत.

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर विकास कामे सुरू आहेत. गडावर अनेक ठिकाणी उत्खनन सुरू असून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तसेच गडाच्या प्रदर्शन मार्गावरील फरसबंदीचे कामही सुरू आहे. केंद्रीय मंत्री अल्फोन्स हे सर्व कामांची पाहणी करणार आहेत. रायगडच्या विकास कामासाठी ६०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. रायगडावर अर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, उज्ज्वल नागेशकर यांच्यासह तज्ज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयलिग स्पर्धा निवडचाचणीस ६३३ खेळाडूंचा सहभाग

$
0
0

आयलिग स्पर्धा निवडचाचणी ६३३ खेळाडू सहभागी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी यांच्यावतीने आयलीग स्पर्धेसाठी आयोजित करण्यात आलेल्या निवड चाचणीला उंदड प्रतिसाद लाभला. अंडर १२, अंडर १५, अंडर १८ या वयोगट निवड चाचणीसाठी ६३३ खेळाडू सहभागी झाले होते. कोल्हापूरसह सांगली, सातारा, बेळगांव, निपाणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून खेळाडू आले होते.

शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय फुटबॉल संघातील खेळाडू अनिकेत जाधव, निखिल कदम, राष्ट्रीय महिला खेळाडू मृदुला शिंदे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे उपस्थित होते. अंडर १२ साठी १९३, अंडर १५ वयोगटासाठी २२७ तर अंडर १८ वयोगटासाठी २१३ खेळाडूंनी चाचणी दिली. १४ मे पर्यंत निवड चाचणी होणार असून स्पेनचे प्रशिक्षक फिलिप्स सरोगाथी प्रशिक्षण देणार आहेत. यावेळी क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, पंच संघटना अध्यक्ष श्रीनिवास जाधव, नगरसेवक संभाजी जाधव अदि उपस्थित होते.

फोटो आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाध्यक्षपदी प्रा. पाटील

$
0
0

कोल्हापूर : अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती महाराष्ट्र शाखेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष समन्वयकपदी प्रा. संजय बाळगोंडा पाटील (अब्दुल लाट) यांची निवड करण्यात आली आहे. राज्याध्यक्ष अॅड माधवराव पाटील टाकळीकर व डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्रीय समन्वयक अॅड अविनाश भोशीकर यांनी प्रा. पाटील यांच्या निवडीची घोषणा जाहीर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचखोरांना चार दिवस पोलिस कोठडी

$
0
0

(फोटो आहे)

लाचखोरांना चार दिवस कोठडी

घाडगे आणि मुल्ला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारणारा तहसीलदार आणि दोन तलाठ्यांना कोर्टाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडी सुनावताच तलाठी मनोज आण्णासो भोजे (वय ४२), शमशहाद दस्तगीर मुल्ला (४३, रा. दोघेही कसबा सांगाव) आणि तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे (४४, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) यांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी केल्यानंतर यातील दोघांना उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, लाचखोरांच्या आवाजाचे नमुने घेतले असून, त्यांच्या घरझडतीत महत्त्वाच्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

कागल तालुक्यातील सुळकूड येथे जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच घेताना तलाठी मनोज भोजे, शमशहाद मुल्ला आणि तहसीलदार किशोर घाडगे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. १७) अटक केली. लाचखोरांना शुक्रवारी जिल्हा कोर्टात हजर केले असता, जिल्हा न्यायाधीश क्रमांक चार ए. एम. शेटे यांनी तिघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोठडी सुनावताच लाचखोरांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या. तलाठी मुल्ला हिला चक्कर आली, तर तहसीलदार घाडगे आणि तलाठी भोजे यांनीही रक्तदाब वाढल्याच्या तक्रारी सुरू केल्या. पोलिसांनी लाचखोरांना वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये दाखल केले. तपासणीनंतर तहसीलदार घाडगे आणि तलाठी शमशहाद मुल्ला यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटकेतील लाचखोरांची चौकशी सुरू केली असून, शुक्रवारी सकाळी तिघांचे आवाजाचे नमुने घेतले. याशिवाय तक्रारदार संजय धोंडिराम जगताप यांनी तलाठ्याकडे सादर केलेला अर्जही पोलिसांनी जप्त केला. तक्रारदार आणि तलाठी यांच्यात लाचेबद्दल मोबाइलवरून बोलणे झाले होते. याचे रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाले आहे. दरम्यान, लाचखोरांच्या घरांची झडती घेतली असून, बँक खात्यांचे तपशील, घरातील किमती वस्तूंची खरेदी, त्यांच्या नावावरील स्थावर मालमत्ता याची पोलिसांनी चौकशी केली. यात काही महत्त्वाची माहिती हाती लागल्याचे उपअधीक्षक गिरीष गोडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लाचखोरांच्या वतीने अॅड. शिवाजीराव राणे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्या वतीने वकील एन. बी. आयरेकर यांनी काम पाहिले. यावेळी कोर्टासह सीपीआरच्या आवारात लाचखोरांच्या मित्रांसह नातेवाईकांनी गर्दी केली होती.

कोठडी टाळण्यासाठी प्रकृतीची कारणे

लाचेची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे कोर्टात जामीन मंजूर होईल, अशी अपेक्षा लाचखोरांना होती. प्रत्यक्षात मात्र सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद करीत लाचखोरांची कोठडी गरजेची असल्याचे न्यायाधीशांना पटवून दिले. यामुळे तिघांनाही पोलिस कोठडी मिळाली. अनपेक्षितपणे कोठडी मिळताच लाचखोरांनी प्रकृतीच्या तक्रारी सुरू केल्या. यातील दोघांनी पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी उपचारांचा आधार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप विरोधातकाँग्रेस रस्त्यावर

$
0
0

फोटो आहे.

दाभोळकर कॉर्नरला जोरदार निदर्शने

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकात बहुमत नसताना भाजप सत्तेचा गैरवापर करून सरकार स्थापन केल्याचा आरोप करीत येथील जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते शुक्रवारी दाभोळकर कॉर्नरवर रस्त्यावर उतरले. तब्बल अर्धातास पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुख्य रस्त्यावर निदर्शने केल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

'लोकशाही अन नैतिकतेच्या भाजप मारते पोकळ गप्पा, लोकशाहीचा खून पाडून मुख्यमंत्री होतात येडियुरप्पा', 'मुंह मे लोकतंत्र बगल मे तानाशाही, भाजपने धुडकावली भारताची लोकशाही', 'संसदेत शिरताना करतात वाकून शिरसाष्टांग नमस्कार, प्रत्यक्षात मात्र त्यांच्या मनात लोकशाहीचा प्रचंड तिरस्कार', 'गोवा, मणिपूर, मेघालयात संधी बहूमत असलेल्या आघाडीची, मग कर्नाटकात का रहावे काँग्रेस जेडीएसने पिछाडीला', 'बहुमतासाठी नाहीत आमदार ११२, भाजपने लोकशाहीचे वाजवले तीन तेरा' अशा आशयाचे फलक हातात घेऊन पदाधिकारी, कार्यकर्ते दुपारी सव्वा बारा वाजता दाभोळकर कॉर्नरवरील सिग्नलला आले. तेथे रस्त्यावरच ठिय्या मारून भाजप आणि मोदीच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी आमदार सतेज पाटील, नगरसेवक दिलीप पोवार, माजी महापौर अर्जुन माने, तौफिक मुल्लानी, करवीरचे सभापती प्रदीप झांबरे, एस. के. माळी, सचिन चव्हाण, तौफिक मुल्लाणी, विक्रम जरग, एस. के. माळी, संध्या घोटणे, सरला पाटील, अंजना रेडेकर, प्रल्हाद चव्हाण, सुरेश कुराडे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५०० शिक्षकांच्याजिल्हातर्गंत बदली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील साडेतीन हजार शिक्षकांच्या शुक्रवारी जिल्ह्यांतर्गंत बदल्या करण्यात आल्या. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने बदली पोर्टलवरून ऑनलाइन बदल्याचे आदेश निघून त्याबाबतच्या ऑर्डरही देण्यात आल्या. बदली झालेल्यांत पती, पत्नी एकत्रिकरण, ५३ वर्षांवरील, सुगम, दुर्गममधील शिक्षक, मुख्याध्यापकांचा सामावेश आहे.

गेल्यावर्षी पहिल्यांदाच सुगम, दूर्गम या नव्या नियमानुसार ऑनलाइन बदलीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र सुगम मधील शिक्षक संघटनांच्या माध्यमातून कोर्टात गेले. परिणामी बदली प्रक्रिया रखडली. शालेय वर्ष निम्मे संपल्यामुळे गेल्यावर्षी बदल्या झाल्या नाहीत. यावर्षी बदली पोर्टलवर २० शाळांचे पर्याय देण्यात आले होते. त्यामधील आपल्याला हवी असलेल्या शाळेची निवड करून माहिती अपलोड करण्याचे आवाहन शिक्षकांना केले होते. त्यानुसार माहिती अपलोड करण्यात आली. सोमवारी बदलीचे आदेश निघणार होते. मात्र पोर्टलला व्यत्यय आला. गुरुवारी पोर्टलवरून बदल्या झाल्या. पंचायत समिती पातळीवर रात्री उशिरा आणि शुक्रवारी संबंधित शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले.

तालुकानिहाय बदली झालेल्या शिक्षकांची संख्या

करवीर : ५११

हातकणंगले : ३८४

कागल : २९२

आजरा : २०२

भुदरगड : २६३

चंदगड : ३३८

गडहिंग्लज : २५७

गगनबावडा : ५६

पन्हाळा : ३६३

राधानगरी : ३१४

शाहूवाडी : ३०२

शिरोळ : ३९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उद्यापासून चार दिवसमोदी सरकार पोलखोल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी वाढली आहे. भ्रष्टाचार, महागाईने उचांक गाठला आहे. त्या विरोधात सर्व डावे, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी लोकशाही शक्ती एकत्र येऊन २० ते २३ मे दरम्यान जन एकता, जन अधिकार आंदोलनच्या नावाने मोदी सरकारके चार साल, पोल खोल, हल्ला बोलसाठी जाहीर सभांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतीश कांबळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शंकर पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे बाबूराव कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'कंपन्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेतल्या जात आहेत. सार्वजनिक उद्योगांवर गंडांतर आले आहे. याउलट खासगी कंपन्यांची भरभराट केली जात आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांवर हल्ले वाढत आहेत. अशा मोदी सरकारच्या कामगिरीचा पोलखोल करण्यासाठी २०ला सीबीएस, २१ ला मिरजकर तिकटी, २२ ला उभा मारुती चौकात सायंकाळी सहा वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे. २३ ला सायंकाळी पाच वाजता बिंदू चौकातून मोटारसायकल रॅली काढण्यात येईल. त्यामध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. यावेळी रघुनाथ कांबळे, सुवर्णा तळेकर, सुनील पाटील, रमेश वडणगेकर आदी उपस्थित होते.

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यांवरील पांढरे पट्टे गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वयंसेवी संस्थांसह पोलिसांकडून वाहतूक नियमांचे प्रबोधन सुरू असताना वाहतूक शिस्तीसाठी आवश्यक सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. ट्राफिक सिग्नलवरील झेब्रा क्रॉसिंग, पार्किंगचे पट्टे, नो पार्किंगचे फलक यासह काही चौकातील ट्राफिक सिग्नलही बंद आहेत. पोलिस आणि स्वयंसेवी संस्थांनी वाहनधारकांच्या प्रबोधनासाठी पुढाकार घेतला आहे. याला पाठबळ देण्यासाठी महापालिका प्रशासनाने सुविधांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

वाहतूक शिस्तीसाठी वाहनधारकांच्या स्वयंशिस्तीसह सुविधाही गरजेच्या आहेत. खड्डेमुक्त रस्ते, अद्ययावत ट्राफिक सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक आणि सूचना फलक नसतील तर वाहतुकीला शिस्त लागत नाही. शहरातील कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी स्वसंयेवी संस्थांसह वाहतूक नियमांची माहिती वाहनधारकांपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुरू केली आहे. झेब्रा क्रॉसिंगवर थांबू नका, रस्त्याची डावी बाजू रिकामी ठेवा, नो पार्किंगमध्ये वाहने पार्क करू नका, सिग्नलचे नियम पाळा, बस स्टॉप आणि रिक्षा स्टॉपसाठी राखीव जागांवर खासही वाहने पार्क करू नका असे सूचनाफलक घेऊन वाहनधारकांचे प्रबोधन केले जात आहे. आठवड्यापासून सुरू असलेल्या या मोहिमेला अपेक्षित प्रतिसादही मिळत आहे. मात्र, सुविधांअभावी वाहनधारकांना नियम पाळण्यात अडचणी येत आहेत. शहरातील सर्वच चौकांमधील झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे गायब झाले आहेत. सिग्नलला नेमके कुठे थांबायचे? असा प्रश्न वाहनधारकांना पडतो.

अनेक चौकात फळविक्रेते, फेरीवाले आणि रिक्षा स्टॉपच्या अतिक्रमणामुळे रस्त्यांची डावी बाजू रिकामी राहत नाही. काही चौकात वाहतूक पोलिसांनी बॅरिकेड्स लावून डावी बाजू रिकामी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी सूचना फलकांची गरज आहे. पार्किंगच्या ठिकाणांवर पट्टे असतील तर वाहनधारक शिस्तीने वाहने पार्क करतात. पट्टे आणि सूचना फलक नसल्यामुळे प्रत्येकजण सोयीने वाहनांचे पार्किंग करतो. सम-विषम तारखांना पार्किंग करण्याचे फलक अपवादानेच दिसतात. नो पार्किंगच्या फलकांसह मोठ्या वाहनांसाठी कोणत्या ठिकाणी आणि किती अंतरावर पार्किंग सुविधी उपलब्ध आहे, याची माहिती देणारे फलक जागोजागी आवश्यक आहेत. वाहतूक नियमांचे फलक करण्याचा आग्रह धरताना सुविधा देणे हे महापालिका, पोलिसांचे कर्तव्य आहे. आवश्यक सुविधा आणि वाहनधारकांची स्वयंशिस्त यामुळे वाहतूक कोंडीवर मात करणे शक्य आहे.

महापौरांनी करावी आश्वासनांची पूर्तता

वाहनधारकांच्या प्रबोधन मोहिमेचे उद्घाटन करताना कावळा नाका येथे महापौर स्वाती यवलुजे उपस्थित होत्या. त्यांनी स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराचे कौतुक करीत महापालिकेकडून आवश्यक मदत पुरवण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करणे गरजेचे आहे. रस्त्यांवर पांढरे पट्टे मारणे, सूचनाफलक आणि ट्राफिक सिग्नल यंत्रणा अद्ययावत केल्यास वाहतूक शिस्तीसाठी याची मदत होणार आहे.

रस्त्यांवर पट्टे मारण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनही वेळेत पट्टे मारले जात नाहीत. पार्किंग झोनमध्येही अशीच स्थिती आहे. महापालिका प्रशासनाकडून सुविधा दिल्या जात नसल्याने वाहतूक पोलिस आणि वाहनधारकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. पाऊस सुरू होण्यापूर्वी रस्त्यांवर पांढरे पट्टे मारावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अशोक धुमाळ, वाहतूक निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन पोलिसांचे निलंबन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या कोठडीतून आरोपींनी पलायन केल्याप्रकरणी ड्युटीवरील तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सहायक फौजदार विश्वास बळवंत शेडगे, पोलिस नाईक महेंद्र नामदेव पाटील (बक्कल नंबर ९२०) आणि श्रीकांत बापू दाभोलकर (बक्कल नंबर १०३५) अशी निलंबितांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी (ता. १८) रात्री उशिरा निलंबनाचे आदेश काढले. शिवाय पोलिस निरीक्षक अनिल गाडे यांच्यासह ड्युटीवरील अन्य पोलिसांचीही चौकशी होणार आहे.

शाहूवाडी पोलिस ठाण्याने वाटमारीच्या गुन्ह्यात अटक केलेले सूरजा-गोंद्या टोळीतील चौघांना कोर्टाने २० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीच्या सुरक्षेसाठी गुरुवारी रात्री सहायक फौजदार विश्वास शेडगेंसह पोलिस नाईक महेंद्र पाटील आणि श्रीकांत दाभोलकर हे तिघे होते. यावेळी पोलिस नाईक सुरेश ढवळे ठाणे अंमलदार होते. ड्युटीवरील पोलिसांकडे रात्रभर कोठडीसमोर पहारा देण्याची जबाबदारी होती. मात्र, प्रत्यक्षात हे तिघेही ठाण्यात अन्य ठिकाणी झोपले होते. पहाटे पाचच्या सुमारास कोठडीत आरोपी नसल्याचे लक्षात येताच पोलिसांची झोप उडाली. कोठडीचे ग्रील वाकवून आरोपींनी पलायन केले होते.

दरम्यान, शाहूवाडी उपविभागाचे उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनेची चौकशी केल्यानंतर कोठडी गार्डचे तिन्ही पोलिस दोषी आढळले. पहारा देण्याऐवजी पोलिस अन्य ठिकाणी जाऊन झोपल्यानेच आरोपींनी पलायन केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. याबाबतचा अहवाल त्यांनी रात्री अधीक्षक संजय मोहिते यांना सादर केला. यानुसार अधीक्षक मोहिते यांनी रात्री उशिरा शेडगे, पाटील आणि दाभोलकर या तिघांचे निलंबन केले. याशिवाय शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गाडे यांच्यासह ड्युटीवरील सर्वच पोलिसांची चौकशी होणार आहे. उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अधीक्षक मोहिते यांनी दिली.

पोलिस झोपले आरोपी पळाले

पोलिस कोठडीतील सर्व आरोपींची जबाबदारी पोलिस ठाण्याची असते. काही आरोपी भावनेच्या भरात कोठडीतच जिवाचे बरेवाईट करून घेण्याचा धोका असते. शिवाय काही आरोपी पळूनही जाण्याचा प्रयत्न करतात. असे प्रकार टाळण्यासाठी एका पोलिस कोठडीसाठी तीन पोलिस गार्ड लावले जाते. कोठडीसमोर खडा पहारा देण्याची त्यांची जबाबदारी असते. शाहूवाडी ठाण्यातील तिन्ही पोलिस अन्य ठिकाणी झोपले होते. आरोपींनी गेल्या चार दिवसात पोलिसांच्या कार्यशैलीचा अंदाज घेऊनच पलायन केले. झोपाळू पोलिसांमुळेच आरोपी पळाल्याची चर्चा सुरू आहे

वर्षात १३ पोलिसांचे निलंबन

मे २०१७ पासून जिल्ह्यात १३ पोलिसांचे निलंबन करण्यात आले. यात लाचखोरीसह कर्तव्यात कसूर करणे आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांचा समावेश आहे. आरोपी पलायनप्रकरणी आणखी काही पोलिसांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांना पाठीशी घातले जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करून पोलिस दलातील वाईट प्रवृत्ती रोखली जाईल, असे अधीक्षक मोहिते यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूद्र खोराटेचे यश

$
0
0

फोटो आहे.

कोल्हापूर : येथील प्रायव्हेट हायस्कूलचा विद्यार्थी रूद्र सदानंद खोराटे याने इंडियन टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक मिळवला. त्याने ९३ टक्के गुण मिळवले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीचे आवाहन

$
0
0

कोल्हापूर : येथील टेंबलाईवाडी मंदिराजवळील आलिया इम्रान अत्तार (वय ४) हिला थॅलेसेमिया आजार झाला आहे. तिच्यावर तामिळनाडू येथील सी. एम. सी हॉस्पिटलमध्ये बोनमॅरो ट्रान्सप्लांट उपचार करण्यात येणार आहे. तिला लहान भाऊ बोनमॅरो देणार आहे. या उपचारासाठी २० लाख खर्च येणार आहे. यापैकी १३ लाख सरकारकडून मिळाले आहेत. उर्वरित सात लाखांसाठी समाजातील दानशूर संस्था, व्यक्तींनी मदत करावे, असे आवाहन समवेदना मेडिकल फाउंडेशनतर्फे पत्रकातून करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीची साखर ठेवायची कोठे?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने साखर कारखान्यांकडील साखर खरेदी केली तर घेतलेली साखर ठेवायची कोठे? त्यामुळे साखर खरेदीचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे सहकारी मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. पण सहकार मंत्री देशमुख यांनी प्रतिक्विंटल ३,२०० रुपये दराने कारखान्यांकडील साखर खरेदीचा निर्णय मार्च महिन्यात जाहीर केला होता. पण शुक्रवारी घेतलेली साखर ठेवायची कोठे असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या घोषणेवरून घूमजाव केले.

हुपरी (ता. हातकणंगले) येथे नियोजित कार्यक्रमासाठी मंत्री देशमुख कोल्हापुरात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्य सरकारने साखर खरेदी करण्याची घोषणा केली होती. याबाबत बोलताना ते म्हणाले, 'साखर खरेदी करून ठेवायची कोठे, अशा प्रश्न उपस्थित होणार आहे. यामुळे आहे तेथेच साखर ठेवावी लागणार आहे. अतिरिक्त साखरेमुळे निर्माण झालेल्या समस्येवर उपाय म्हणून साखरेवर पुन्हा जीएसटी लावून त्यातून अनुदान देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावर्षीपेक्षा पुढील गळीत हंगात साखर उद्योगासमोर अधिक समस्या उभ्या राहणार आहेत. त्यामुळे त्यासाठी आतापासून नियोजन व्हायला हवे.'

तीन महिन्यांपूर्वी सरकारने साखर खरेदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे कारखानदारांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण होते. पण साखर ठेवण्यास जागा नसल्याने साखर खरेदीचा प्रश्नच देशमुख यांनी निकालात काढल्याने कारखानदारांसमोर आणखी अडचणी वाढणार आहेत.

'सेबी'ने लोकमंगलवर आणलेल्या निर्बंधांबाबत बोलताना देशमुख म्हणाले, 'हा प्रश्न फक्त लोकमंगल अॅग्रो कंपनीपूरता मर्यादित नसून, राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचा आहे. कारखाना सुरू करताना आम्ही गावोगावी जाऊन भागभांडवल जमा केले. वास्तविक २५ पेक्षा अधिक लोकांकडून भागभांडवल घेता येत नसल्याची माहिती कारखान्याच्या चार्टर्ड अकाउंटंटनी सांगितली नाही. त्यामुळे भागभांडवल गोळा केले. 'सेबी'च्या नोटिशीमुळे फारसा फरक पडणार नसून शेतकऱ्यांची घेतलेली रक्कम व्याजासह त्यांना परत करावी लागणार आहे. अशा नोटिसा सर्वच खासगी कारखान्यांना आल्या आहेत.'

यावेळी विभागीय सहनिबंधक (लेखापरीक्षण) तुषार काकडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, सातारा जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, जिल्ह विशे, लेखापरीक्षक धनंजय पाटील, करवीरचे निबंधक सुनील धायगुडे यांच्यासह सहकार विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

०००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नावे वगळली

$
0
0

दक्षिण,उत्तरमधील

१३ हजार नावे वगळली

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघातील १३ हजार ४५२ मतदारांची नावे फोटो नाहीत तसेच स्थलांतरित अशा कारणास्तव वगळण्यात आल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातील १२ हजार, तर करवीर मतदारसंघामधील १७०० मतदारांची नावे मृत, दुबार, फोटो उपलब्ध नाहीत या कारणांन मतदार वगळली. आवाहन करूनही फोटो न दिल्याने ही नावे वगळली आहेत. नावांची यादी कोल्हापूर महापालिका (निवडणूक विभाग) व तहसील कार्यालय करवीर निवडणूक शाखा, भवानी मंडप येथे पाहण्यास उपलब्ध आहे.

ज्या मतदारांची नावे वगळली आहेत व त्यांना मतदारयादीत नाव समाविष्ट करावयाचे आहे, त्यांनी विहीत नमुन्यात परिपूर्ण (नमुना नं. ६) अर्ज कोल्हापूर महापालिका (निवडणूक विभाग) व करवीर तहसीलदार कार्यालय निवडणूक शाखा, भवानी मंडप येथे सादर करावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोजगार मेळावा चौकट...

$
0
0

२३,७३९

नोंदणी केलेले उमेदवार

१२२

मेळाव्यात सहभागी कंपन्या

१७,२६९

उमेदवारांनी दिल्या मुलाखती

९५३९

रोजगाराच्या संधी

३,९३६

उमेदवारांची पुढील फेरीसाठी मुलाखत

१६९८

उमेदवारांना ऑफर लेटर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोजगार मेळावा

$
0
0

५५०० उमेदवारांना नोकरीची संधी

विद्यापीठातील महारोजगार मेळाव्यास प्रतिसाद; १७ हजारांवर उमेदवारांनी दिली मुलाखत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चेहऱ्यावर हलकासा तणाव, हातात प्रमाणपत्र असलेल्या फाइल्स, फॉर्मल कपड्यांच्या वेशभूषेसह मुलाखतीत काय प्रश्न विचारले जातील?, नोकरी कुठे मिळेल, पगार किती असेल? आपली निवड होईल का? अशा असंख्य प्रश्नांसह साडेनऊ हजारांहून अधिक रोजगार संधींसाठी सुमारे १७ हजार २६९ उमेदवारांनी मुलाखत दिली. यातील साडेपाच हजारांहून अधिक जणांना नोकरीची संधी मिळाली. शिवाजी विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि मध्यवर्ती रोजगार कक्ष यांच्यातर्फे शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. विद्यापीठ परिसराला रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने यात्रेचे स्वरूप आले होते.

माहिती तंत्रज्ञान, बी.पी.ओ., सेवा क्षेत्र, एच.आर., विपणन, विक्री, बँकिंग, फायनान्स विमा, अन्य वित्तीय संस्था, वस्त्रोद्योग, टेलिकॉम, अभियांत्रिकी, आदींसह रिक्रुटिंगच्या क्षेत्रांत काम करणाऱ्या सुमारे १२२ कंपन्यांनी विविध ९,५३९ पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. काही कंपन्यांनी लेखी तसेच ऑनलाइन परीक्षाही घेतल्या. या पदांसाठी यापूर्वीच दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन व ऑफलाइन नावनोंदणी केली होती. सकाळपासूनच विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पॉट नोंदणीसाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने ५० नोंदणी कक्ष सुरू केले होते. मेळाव्यासाठी एकूण २३ हजार ७६९ उमेदवारांनी नोंदणी केली. नोंदणी केलेल्या उमेदवारांना विविध कंपन्या व त्यांच्या मुलाखत कक्षाची माहिती पत्रकाद्वारे तसेच ठिकठिकाणी माहिती फलकांद्वारे उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना थेट मुलाखतीच्या ठिकाणी जाता आले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, वनस्पतीशास्त्र, भूगोल, मानव्यविद्या इमारत, वि.स. खांडेकर भाषा भवन, गणित आणि तंत्रज्ञान अशा नऊ विविध अधिविभागांमध्ये विविध कंपन्यांसाठी क्षेत्रनिहाय मुलाखतींची व्यवस्था केल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी न होता रोजगार मेळाव्याची प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्याचप्रमाणे लोककला केंद्रात ३० विविध संस्थांनी स्टॉल्स उभारून सुमारे ६५०० उमेदवारांना विविध ५० कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण दिले.

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते रोजगार व कौशल्य महामेळाव्याचे फीत कापून उद्घाटन झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. भारती पाटील, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. गजानन राशिनकर यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

०००००

मुलींचा सहभाग लक्षणीय

मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय होती. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने मुली मुलाखतीसाठी आल्या होत्या. मास्टर्स डिग्री ते डिप्लोमा अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणींनी मेळाव्यामध्ये आत्मविश्वासाने मुलाखती दिल्या.

००००

चोख व्यवस्था

विद्यापीठाचा सुरक्षा विभाग तसेच कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे तसेच पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था केल्यामुळे वाहतूक समस्या उद्भवली नाही. अग्निशमन बंब व प्राथमिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज अँम्ब्युलन्सचीही स्थानिक प्रशासनाच्या वतीने व्यवस्था केली होती. विद्यापीठाने उमेदवारांना पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली होती.

००००

कोट....

महारोजगार मेळाव्यात सहभागी झाल्याने नोकरीच्या संधी कुठे आहेत याची नेमकी माहिती मिळाली. अनेकदा शैक्षणिक पात्रता असूनही नोकऱ्या कुठे उपलब्ध आहेत याची माहिती तरुणांपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे नोकरीपासून वंचित राहावे लागते. मेळाव्यामुळे माहितीचा संग्रह उपलब्ध झाला.

श्रीकांत माळी, कलाशाखा विद्यार्थी

मुलाखत देताना थोडे दडपण होते. फ्रेशर असूनही कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या सहकार्यामुळे मुलाखत चांगल्याप्रकारे पार पडली. विद्यापीठ प्रशासनाने वाहतूक व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली होती. नोकरीसाठी मुलाखतीला जाताना नेमकी काय तयारी करावी, याची सखोल माहिती मिळाली.

प्राची कुलकर्णी, रसायनशास्त्र विद्यार्थिनी

ग्रामीण भागातून मुलाखतीसाठी येणाऱ्या मुलींमध्ये काही प्रमाणात गोंधळलेली अवस्था असते. अशावेळी पालक या नात्याने आम्ही त्यांच्यासोबत येण्यास प्राधान्य दिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी एकाच छताखाली मिळाल्याने त्याचा फायदा तरुणांना नक्कीच होईल.

अर्जुन घुले, पालक, मौजे सांगाव

महारोजगार मेळाव्यासाठी महिनाभर आधीपासून तयारी सुरू होती. चांगल्या दर्जाचे उमेदवार मुलाखतीत पाहायला मिळाले. आमच्याकडे आधीच उमेदवारांची माहिती उपलब्ध झाल्याने उमेदवार निवडणे सोपे झाले. चांगले संभाषण कौशल्य, संगणक ज्ञान आणि विषयाचे सखोल ज्ञान असल्यास नोकरी मिळवणे सहजसोपे आहे.

प्रवीण कुंभोजकर, कंपनी प्रतिनिधी

०००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे नगरसेवक एकमेकांना भिडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षाच्या नेहरूनगर प्रभागाच्या नगरसेविका अश्विनी अरुण बारामते आणि स्वीकृत नगरसेवक किरण नकाते यांच्यामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून धुमसत असलेला वाद शनिवारी उफाळला. प्रभागातील कामासाठी जेसीबी मागणीवरून शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचे पर्यवसान एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, अंगावर धावून जाणे, धक्काधुक्कीपर्यंत झाले. दोन्ही सदस्यांनी पदाचे भान विसरून रस्त्यावरच एकमेकांचा उद्धार केला.

अखेर प्रभागातील नागरिकांनीच त्यामध्ये हस्तक्षेप करत दोघांना बाजूला केल्यामुळे अनर्थ टळला. प्रभागातील वर्चस्वाद हे त्यामागील प्रमुख कारण असल्याची चर्चा घटनास्थळी होती. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे रस्त्यावरच भाजप नगरसेवकांचा गोंधळ सुरू होता. भाजपच्या नेत्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांना सूचना केल्या आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही. नेत्यांनी सूचना केल्यामुळे स्टेशन बाहेरच प्रकरण मिटवले.

गजानन महाराजनगर भागातील कामासाठी नकाते यांनी वर्कशॉपकडे जेसीबीची मागणी केली होती. त्याचवेळी बारामते यांनीही प्रभागात जेसीबी पाठविण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली. पहिल्यांदा कुणाच्या भागात जेसीबीद्वारे काम करायचे यावरुन वादाला सुरुवात झाली. नकाते यांचे भाऊ अमर नकाते यांनी बारामते यांच्या निवासस्थानाजवळ जाऊन जेसीबी देण्यात अडथळा का, असा जाब विचारला. दरम्यानच्या काळात नगरसेवक नकाते तेथे दाखल झाले. जेसीबीवरुन सुरू झालेला वाद विधानपरिषदेतील अर्थकारणापर्यंत पोहोचला. पैसे खाल्ल्याचे आरोपही झाले. गोंधळ वाढत जाऊन दोन्ही सदस्य व त्यांचे नातेवाईक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, हमरीतुमरीमुळे भागात तणाव निर्माण झाला होता.

नगरसेविका बारामते म्हणाल्या, 'प्रभागातील विकासकामांवरून नकाते सातत्याने हस्पक्षेप करून त्रास देतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नेतेमंडळींकडे केली आहे. प्रभागातील विकासकामांसाठी आम्ही प्रयत्नशील आहे.' नगरसेवक नकाते म्हणाले, 'महापालिकेच्या निवडणुकीत बारामतेंच्या विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र गेल्या अडीच वर्षांत बारामते या निम्म्या प्रभागात फिरकल्या नाहीत. विकासकामांचा फंड कुठे वापरला याचा हिशेब द्यावा.'

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात २५ पासून स्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या विविध भागांतील डेंगीसदृश रुग्णांची संख्या वाढत आहे. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्याची टीका सर्वसाधारण सभागृहात झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने २५ मेपासून मोहीम हाती घेण्याचे ठरविले. नालेसफाई, सांडपाणी साठण्याच्या ठिकाणी धूर फवारणी, टायर जप्ती, बेसमेंट स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.

आयुक्त अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून आणि संभाव्य पूरस्थितीसाठी पूर्वतयारीचा आढावा घेतला. 'पावसाळ्यापूर्वी औषधांचा साठा, वाहने सुस्थितीत ठेवावीत. अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून आपत्कालीन स्थितीत कार्यरत राहण्याच्या सूचना केल्या. पुराच्या कालावधीत नागरिकांना स्थलांतरित करावयाच्या ठिकाणी सर्व सुविधा, भोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. पावसाळ्यापूर्वी कार्यशाळा अधीक्षकांनी वर्कशॉपकडील वाहने व अत्यावश्यक मशिनरीची दुरुस्ती करावी असे त्यांनी स्पष्ट केले.

................

६९ प्रभागांत नालेसफाई

२५ मेपासून संपूर्ण शहरात टायर जप्ती, टॉयलेटच्या पाइपला कापड बांधणे, बेसमेंट स्वच्छता, गप्पी अळी सोडण्याच्या कार्यक्रमाचे प्रभागनिहाय नियोजन केल्याचे मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत ६९ प्रभागांतील नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित बारा प्रभागांतील नाले सफाईचे काम आठ दिवसांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी महापालिकेकडील अग्निशमन यंत्रणेची माहिती दिली. याशिवाय वेगळी तीन दक्षता पथके, २४ तास एक नियंत्रण कक्ष सुरु राहील. एका पथकामध्ये एक स्टेशन ऑफिसर व चार फायरमनचा समावेश आहे.

मलेरिया, डेंगीसारख्या रोगांवरील नियंत्रणासाठी आवश्यक औषधे व कीटकनाशकांचा साठा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्य स्वच्छता व वैद्यकीय पथकांची स्थापना व मोबाइल युनिटच्या व्यवस्थेची माहिती आरोग्य अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली.

...................

पॉइंटर...

पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती

बेसमेंटमध्ये पाणी साचून रहात असल्यास संबंधितांवर दंड आकारणी

पूर येणाऱ्या ठिकाणच्या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्याची सूचना

चेंबर, मॅनहोलवर कव्हर घालण्याचे आदेश

आरोग्य विभागाकडील कर्मचारी शहरातील प्रत्येक घरामध्ये जाऊन पाहणी करणार

.............................................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्थिक मदत

$
0
0

कोल्हापूर : येथील ट्रान्सप्लांटस हेल्प द पुअर फाउंडेशनतर्फे गरजूंना अवयव प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे़ अवयवदानासंबंधी प्रबोधनही करण्यात येणार आहे. आर्थिक वर्षात २०० कुटुंबांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. चार लहान मुलांना मदत देऊन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक सी. वाय. पाल यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिली.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images