Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वादळाने साडेसहा कोटींचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वादळी वारे आणि वळीव पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यात दोन दिवसांत सहा कोटी ३७ लाख २७ हजार ३०० नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. या पावसात दोन महिलांचा मृत्यू झाला. इचलकरंजी शहरात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (१०) व बुधवारी (११) वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. हातकणंगले तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. इचलकरंजीत ५० घरे व एक मॉल पडल्याने सर्वाधिक दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तारदाळमध्ये ६० घरे आणि दोन फळबागांनाही फटका बसला. हातकणंगले गावात ४८ गावांची पडझड झाली तर हुपरीमध्ये चार तर रुईमध्ये १९ घरे कोसळली. खोतवाडी, माणगाव, चंदूर, बिरदेवाडी, कुंभोज, रुई, साजणी, अतिग्रे, हेर्ले, हालोंडी, माले मुडशिंगी गावातही मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. हातकणंगलेत ३५४ गावांना फटका बसला असून तीन कोटी ९० लाख, २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

शिरोळ तालुक्यातील जांभळी गावातील ग्रीन हाऊसचे मोठे नुकसान झाले. या तालुक्यातील ५२९ घरांचे पत्रे उडणे, घर पडल्यामुळे एक कोटी ६७ लाख, १० हजार, १०० रुपयांचे नुकसान झाले आहे. राधानगरी तालुक्यातील घोटवडे ग्रामपंचायतीची इमारत पडली. तालुक्यातील २२३ गावांना फटका बसला असून २३ लाख, ३७ हजार, २०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

आजरा येथील धनगरवाड्यावर वीज पडून दोन म्हशी व रेडूक मयत झाले. तसेच सात घरे पडली आहेत. चंदगड तालुक्यातील लिटवाडी येथील लक्ष्मण वसंत चव्हाण यांची १५ गुंठ्यातील केळीची बाग जमीनदोस्त झाली असून शेतीचे सात लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. चंदगडमधील ७३ घरे पडली आहे.

तालुका घरांची संख्या नुकसान रक्कम

हातकणंगले ३५४ ३ कोटी ९० लाख २५ हजार

शिरोळ ५२९ १ कोटी ६७ लाख १० हजार १००

शाहूवाडी १ २० हजार

राधानगरी २२३ २३ लाख ३७ हजार २००

करवीर ३२ ६ लाख २१ हजार

गडहिंग्लज २ २ लाख २४ हजार

भुदरगड १७ ३ लाख १४ हजार

आजरा ७ ३ लाख ८० हजार

चंदगड ७३ ३३ लाख १५ हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिंगल क्राइम

$
0
0

गळफास घेऊन

तरुणाची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सम्राटनगर येथील शांती अपार्टमेंटमध्ये राहणारा संकेश शशिकांत चव्हाण (वय २१) या तरुणाने शुक्रवारी (ता. ११) रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. संकेशने गळफास घेतल्याचे लक्षात येताच नातेवाइकांनी त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

चक्कर आल्यामुळे प्रवाशाचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मध्यवर्ती बस स्थानकात कोल्हापूर-गडहिंग्लज बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशास चक्कर आली. चालक व वाहकाने त्याला अत्यवस्थ अवस्थेत तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. प्रसाद रामचंद्र पोतदार (वय ३९, रा. चौगले गल्ली, कागल) असे मृताचे नाव आहे. सीपीआर पोलिस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

दुचाकी घसरून तरुण जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात राहुल बंडोपंत पाटील (वय २५, रा. वाघवे, ता. पन्हाळा) हा तरुण जखमी झाला. माणगाव फाटा येथे शनिवारी (ता. १२) सकाळी हा अपघात झाला. राहुल पाटील याला हात, पाय व डोक्यास गंभीर इजा झाली आहे. परिसरातील नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

दुचाकी अपघातात दोघे जखमी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाल्याजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. राहुल नागेश येडगे (वय २४) आणि राजाराम विष्णू भिसे (४८, रा. दोघेही भेंडवडे, ता. हातकणंगले) अशी जखमींची नावे आहेत. दोघांनाही डोके व हातास इजा झाली आहे. त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज संमेलन

$
0
0

दिव्यांग साहित्य

संमेलन आज

कोल्हापूर : प्रतिष्ठा फाउंडेशनच्यावतीने नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे पहिले दिव्यांग साहित्य संमेलन रविवारी (ता. १३) आयोजित केले आहे. ज्येष्ठ अंध साहित्यिक चंद्रकांत देशमुख संमेलनाचे अध्यक्ष असून खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन सकाळी १० वाजता होणार आहे. स्वागताध्यक्षपदी जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने आहेत. संमेलनाला आमदार उल्हास पाटील, माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे, तहसीलदार गजानन गुरव, ऑल इंडिया सूतगिरणी फेडरेशनचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, श्रीदत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, धनाजीराव जगदाळे आदी उपस्थित राहणार आहेत. समर्थ सद्‌गुरु महादबा पाटील महाराज ट्रस्टच्या नवीन इमारतीत सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत संमेलन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगांच्या गडगडाटांसह दमदार पाऊस

$
0
0

पहाटेच्या पावसाने दिवसभर वातावरणात गारवा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुरुवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसानंतर शनिवारी पहाटे ढगांच्या गडगडाटांसह दमदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सकाळी सव्वापाच वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभराच्या पावसाने सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. सकाळी सव्वा नऊ वाजेपर्यंत पावसाच्या तुरळक सरी पडत होत्या. पहाटे झालेल्या पावसांमुळे अधूनमधून सूर्यदर्शन झाले असले, तरी दिवसभर ढगाळ वातारवण होते.

गुरुवारी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावली होती. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे घरांची पडझड होण्याबरोबरच वीजपुरवठ्यावरीह परिणाम झाला. गुरुवारी पाऊस पडल्याने शुक्रवारी वातावरणामध्ये प्रचंड उष्मा वाढला होता. रात्रीही उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. शनिवारी पहाटे सव्वापाचच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तास ते दीड तास पावसाने अनेक ठिकाणी झोडपून काढले. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला, तरी सकाळी सव्वा नऊपर्यंत पावसाच्या तुरळक सरी पडत होत्या.

पहाटे झालेल्या पावसांमुळे अनेक सखल भागात पाणी साचले होते. सकाळी साडेदहाच्या सुमाराला सूर्यदर्शन झाले असले, तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोत जिल्हाध्यक्ष

$
0
0

कोल्हापूर : संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा अध्यक्षपदी शिवाजी खोत, उपाध्यक्षपदी के. एन. पाटील, कार्याध्यक्ष प्रवीण पाटील, शहर अध्यक्षपदी चेतन पाटील यांची प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव पाटील यांची निवड झाली. अन्य पदाधिकारी : करवीर अध्यक्ष सागर भंगे, हातकणंगले तालुका अध्यक्ष अमोल परीट, उपाध्यक्ष अमोल चव्हाण, शाहूवाडी अध्यक्ष नाथा पाटील, पन्हाळा अध्यक्ष राहुल पाटील, राधानगरी अध्यक्ष संदीप भोसले. भुदरगड अध्यक्ष मानसिंग देसाई, उपाध्यक्ष संतोष जाधव, इचलकरंजी शहर अध्यक्ष मोसीन मणेर, जिल्हा प्रवक्तापदी संपतराव चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख आर्यन म्हातुगडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचा शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करण्याचा डाव

$
0
0

शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करण्याचा डाव

साखर आयातीप्रश्नी तीव्र प्रतिक्रिया; साखर उद्योगात नाराजी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील ऊस उत्पादक आणि साखर कारखाने आर्थिक संकटात असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाकिस्तानातून लाखो मेट्रिक टन साखर आयात केली आहे. शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला उद्ध्वस्थ करणाऱ्या निर्णयाविरोधात साखर उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सहकाराबरोबरच शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करण्याचे हे भाजप सरकारचे षडयंत्र आहे, अशी टीका करण्यात आली.

देशाची एकूण साखरेची गरज २५० लाख मेट्रिक टन आहे. यावर्षी बंपर उत्पादन झाले असून हंगामामध्ये ३१६ लाख टन साखर शिल्लक आहे. तसेच गेल्यावर्षीच्या हंगामातील ४५ लाख टन साखर शिल्लक आहे. देशाच्या एकूण गरजेपेक्षा शंभर लाख टन साखर शिल्लक असताना पाकिस्तानची साखर का आयात करण्यात आली आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

साखरेला बाजारपेठेत मागणी नसताना आणि दर अत्यंत कमी झालेले असताना आयात साखरेमुळे साखर दरात पुन्हा घसरण होणार आहे. त्याचा फटका साखर उद्योगाला पर्यायाने ऊस उत्पादकांना बसणार आहे. उत्पादकांची देणी थकीत असताना बँकांची कर्जेही थकीत गेली आहेत. उत्पादित झालेली ७५ ते ९० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. साखर विक्री झालेली नसल्याने बँकांची कर्जे थकीत जाऊन बँका एनपीएमध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. साखर आयात निर्णयाने कारखानदारींसह बँकांही अडचणीत येणार आहेत.

हंगामामध्ये बाजारातील साखरेचा दर ३,२०० क्विंटल निश्चित करून कृषीमूल्य आयोगाने एफआरपी जाहीर केली होती. मात्र सध्या बाजारपेठेत साखरेचा दर २,५०० पर्यंत उतरला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत १,९०० रुपये दर झाला आहे. त्यामुळे कारखान्यांना कोटा ठरवून देवूनही साखर निर्यात करता येत नाही. साखर उद्योगासमोर असे बिकट आव्हान असताना पाकिस्तानातून साखर आयात करुन आगीत तेल ओतण्याचा प्रकार केंद्र सरकारने केला आहे.

साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहे. बुधवारी (ता. १६) याबाबतची बैठक होणार असताना बैठकीपुर्वीच साखर आयात केल्याने साखर उद्योगासमोर धर्मसंकट निर्माण झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या समवेत पवार यांची होणाऱ्या बैठकीकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

तज्ज्ञानी दिलेले पर्याय

एफआरपीवेळी असणारा साखर दर स्थिर ठेवा

४० लाख टन बफर स्टॉक करा

निर्यात कोट्यामध्ये वाढ करा

पाच वर्षांपूर्वी दिलेल्या कर्जांचे पुर्नगठण आवश्यक

हंगामापूर्वी आयात-निर्यात धोरण ठरवा

आयात साखरेवर बहिष्कार टाका

दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये टोमॅटोचा दर वाढल्यानंतर भारतातून टोमॅटो आयात करण्यास विरोध केला. अशीच संधी असताना सर्जिकल स्ट्राइकवरुन स्वत:चा पाठ थोपटून घेणाऱ्या भाजप सरकारने पाकिस्तानातून साखर आयात करून आपली देशभक्ती दाखवून दिली आहे. सातत्याने देशभक्तीचे गोडवे गाणारे भाजप नेते या निर्णयावर एक शब्दही बोलत नाहीत. साखर आयात करून भाजप सरकारने शेतकरी व उत्पादकांवर सर्जिकल स्ट्राइक करुन संपूर्ण ग्रामीण भागाला उद्ध्वस्थ करण्याचे षडयंत्र यशस्वी केले आहे.

खासदार राजू शेट्टी

.............

देशात मोठ्या प्रमाणात साखर शिल्लक असताना आणि दर ढासळलेले असताना साखर आयात करण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. हजारो कोटी रुपयांची एफआरपी थकीत असताना बँकांमध्ये अपुरा दुरावा निर्माण झालेला असाना केंद्र सरकारने साखर उद्योगाला मदत करण्याऐवजी पाकिस्तानातून साखर निर्यात करण्याचा निर्णयाचा निषेध करत आहे. भाजप सरकारचे शेतकरी आणि देशविरोधी धोरण असून याची सरकारला शरम वाटायला हवी होती. २६/११ हल्ल्याची जाहीर कबुली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान देत असताना साखर आयात करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे उत्पादक, कारखाने, बँका आणि ग्रामीण अर्थवस्थाच उद्ध्वस्थ होणार आहे.

आमदार हसन मुश्रीफ

................

पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या वल्गना करायच्या आणि एकीकडे साखर आयात करण्याचा निर्णय घ्यायचा हा भाजप सरकारचा दुटप्पी आणि देशाच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. देशातंर्गत साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाले आहेत. त्यामुळे उत्पादकांची एफआरपी थकीत गेली आहेत. बँकांची कर्जे थकीत गेली असल्याने बँका एनपीएमध्ये जाणार आहेत. अशा अडचणीत असलेल्या बँकांवर प्रशासक नियुक्त करुन बँका व साखर आयात करून कारखानदारी पर्यायाने शेतकऱ्यांना उद्ध्वस्थ करायचे धोरण भाजपने घेतले आहे. एखाद्या खेळांमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना शिवसेना मज्जाव करते, पण साखर आयात करताना कोणताही विरोध करत नाही. या दोन्ही पक्षांना बँका आणि साखर उद्योग मोडीत काढायचा आहे.

पी. एन. पाटील, चेअरमन भोगावती कारखाना

..............

साखर आयात करण्याचा निर्णय अत्यंत आश्चर्यकार आहे. यावर्षीच्या हंगामामध्ये ३१६ लाख टन साखर उत्पादित झाली असून गतवर्षी ४५ लाख टन साखर शिल्लक अशी ३५६ लाख टन साखर देशात आहे. देशाची गरज २५० लाख टन असताना साखर आयात करण्याचा निर्णय दुर्दैवी असाच आहे. यावर्षी उत्पादित साखरेपैकी कारखान्यांकडे ७५ ते ९० टक्के साखर शिल्लक असताना मदत करण्याऐवजी साखर उद्योगाला अडचणीत आणणारा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशाच्या इतिहासात प्रथमच साखर उद्योगासमोर महाभंयकर स्थिती निर्माण झाली आहे.

पी. जी. मेढे, मानद कार्यकारी संचालक, राजाराम कारखाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्ववयीन वाहनचालकांच्या२५ पालकांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात विनापरवाना वाहन चालविणाऱ्या २५ अल्पवयीन मुलांवर रविवारी शहरवाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असूनत्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सोमवारी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.

अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून प्रबोधन करण्यात येत आहे. तरीही अल्पवयीन मुले शाळा, कॉलेज व क्लासला दुचाकी घेऊन जातात. अशा अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात येत आहे. रविवारी पोलिसांनी २५ अल्पवयीन मुलांवर कारवाई केली. त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. सोमवारी (ता. १४) त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. गेल्या महिनाभरात २०० पालकांवर कारवाई केल्याची माहिती शहरवाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर हालचाली

$
0
0

महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार?

महापौर निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांमधील हालचाली वेगावल्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदासाठी काँग्रेस आघाडीसारखी भाजप, ताराराणी आघाडीमध्येही इच्छुकांची यादी वाढू लागली आहे. भाजप- ताराराणी आघाडीमधील दोन्ही पक्षांमध्ये उमेदवारांची संख्या असली तरी यंदा महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार निवडणूक रिंगणात राहण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उमेदवाराची निश्चिती करण्यात येत असल्याची चर्चा असल्याने ताराराणी आघाडीला यावेळी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

भाजप व ताराराणी आघाडीच्यावतीने यंदा ताकदीने निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यादृष्टीने चाचपणी सुरू आहे. भाजपच्या जयश्री जाधव यांचे नाव प्रथमपासून चर्चेत आहे. पण निवडणूक जवळ येईल, तशी उमेदवारांची यादी वाढू लागली आहे. भाजपमधीलच सविता भालकर, उमा इंगळे, ताराराणी आघाडीतील रुपाराणी निकम, तेजस्विनी इंगवले, स्मिता माने यांचीही नावे चर्चेला येऊ लागली आहेत. इच्छुकांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यातून असंतोषाला चालना मिळू नये यासाठी भाजप आघाडीकडून सावध भूमिका घेण्यात येत आहे. त्यासाठी भाजपचा उमेदवार निवडणूक लढवेल, असे संकेत दिले जात आहेत. भाजपचा उमेदवार देण्यापाठीमागे जिल्हा परिषदेच्या राजकारणाचाही संदर्भ जोडला जात असल्याचे समजते. सर्व पातळीवर प्रयत्न केले जात असल्याने महापौर झाल्यास भाजपचा व्हावा, अशी यापाठीमागील भूमिका दिसून येते. यामुळे ताराराणी आघाडीतील तेजस्विनी इंगवले, रुपाराणी निकम, स्मिता माने या इच्छुकांना एक पाऊल पाठीमागे घ्यावे लागेल, असे सध्या दिसते. रविकिरण इंगवले व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांची मैत्री पाहता इंगवले यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या पारड्यात शिवसेनेची मते मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप आघाडीला आणखी चार ते पाच नगरसेवकांची तजवीज करावी लागेल. पण भाजपचा उमेदवार निवडणूक लढणार असेल तर दहा नगरसेवकांची आवश्यकता लागणार आहे. त्याचाही विचार करावा लागणार आहे.

काँग्रेसमध्ये शोभा बोंद्रे, इंदुमती माने, उमा बनछोडे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर, जयश्री चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. सर्व उमेदवार या सभागृहात प्रथमच निवडून आले आहेत. पण सर्वांची महापौर बनण्याची तीव्र इच्छा आहे. आता नाही तर कधीच नाही, असे सांगत जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी इशाऱ्याचे संकेतही देण्यात येत आहेत. पुढील अडीच वर्षामध्ये काँग्रेसकडे दोनवेळा महापौरपद व एकदा स्थायी सभापतिपद येणार आहे. त्यामुळे सध्याच्या अस्वस्थतेच्या वातावरणात जे नगरसेवक संयम बाळगतील, त्यांनाच पुढील कालावधीतील पदांची संधी मिळेल, अशी शक्यता आहे. स्वत:चाच विचार केल्यास भविष्यातील साऱ्या संधीतून पत्ता कापला जाईल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांनाही विचारपूर्वक वाटचाल करावी लागणार आहे. महापौरपदाबरोबरच उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे अशोक जाधव यांनी प्रयत्न चालवले आहेत. सध्या महापौरपद काँग्रेसकडे असल्याने उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. पण यावेळी अपवाद म्हणून दोन्ही पदे काँग्रेसला मिळावीत असे त्यांचे प्रयत्न आहेत. याबाबत त्यांनी नेत्यांकडेही गाऱ्हाणे मांडल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दागिन्यांची पर्स चोरीस

$
0
0

शिवाजी पुतळा

चौकातून पर्स चोरीस

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी पुतळा केएमटी बस स्टॉपजवळ दोन तोळे वजनाचे दागिने असल्याची पर्स चोरीस गेली. माया विलास शिंदे (वय ४१, रा. मडिलगे, ता. आजरा) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

माया शिंदे या कोल्हापुरात काही कामानिमित्त आल्या होत्या. काम झाल्यानंतर गावाकडे जाण्यासाठी त्या मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाण्यासाठी शिवाजी चौकातील केएमटी बसस्टॉपवर बसची वाट पहात होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांची पर्स चोरुन नेली. पर्समध्ये दोन तोळे वजनाचा सोन्याचा नेकलेस होता. माया शिंदे यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पर्स चोरीची फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राचार्य भरती बंदी उठवली

$
0
0

सिंगल फोटो

........................

प्राध्यापक भरतीप्रक्रीया लवकरच

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची माहिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सरकारने प्राचार्य भरती बंदी उठवली आहे. त्याची भरती प्रक्रिया केली जात आहे. बंदी असलेली प्राध्यापक भरती सुरू करण्यासाठी वित्त विभागाकडे फाईल पाठवली आहे. 'वित्त'चा अहवाल आल्यानंतर लवकरच कार्यवाही केली जाईल. ग्रामीण विकास यंत्रणेतील कर्मचारी बदलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांची नेमकी आकडेवारी निश्चित होईल. त्यानंतर रिक्त शिक्षकांच्या जागा भरल्या जातील', असे आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिवाजी विद्यापीठात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिले.

तावडे म्हणाले, 'काँग्रेस सरकार असल्यापासून अनुदानाच्या प्रतीक्षेतील शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय झाला. संबंधित शाळांना अनुदानही मिळत आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने पुढील अनुदानही दिले जाईल. पाच टक्क्यांप्रमाणे वेतनेतर अनुदानही शाळांना दिले जाते. चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी आतंरराष्ट्रीय महाराष्ट्र शिक्षण मंडळाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गंत येत्या १५ जूनपासून राज्यात ओजस शाळा सुरू होतील. दहा ते ११ शैक्षणिक संस्था एकत्र करून क्लस्टर विद्यापीठ केले जाईल. त्यासाठी रयतसह अनेक संस्थांच्या आलेल्या प्रस्तावांना राष्ट्रीय उच्च शिक्षण विभागातून मान्यता मिळेल. क्लस्टर विद्यापीठातून एकाचवेळी विद्यार्थ्यास वेगवेगळे अभ्यासक्रम शिकता येणार आहे. शिक्षक नोकरीसाठी टीईटी परीक्षा उतीर्ण होणे ही पात्रता आहे. उत्तीर्ण होणाऱ्या सर्वांनाच नोकरी देणे सरकारला बंधनकारक नाही. यामुळे टीईटी दिल्यानंतर बेरोजगारीची वेळ येते, असे म्हणणे चुकीचे आहे. डीएड, बीएड प्रवेशाच्या जाहिरामध्ये शिक्षक भरतीस वाव नाही, असे लिहिण्याची सक्ती केली होती. त्यावर माझ्यावर टीका झाली. त्यानंतर सक्ती मागे घेतली. त्रुटी दूर केल्याने यावर्षी विद्यार्थ्यांच्या खात्यावर ऑनलाइन शिष्यवृत्ती जमा होण्यास कोणतीही अडचण नाही.'

------

दहा टक्केच अभियांत्रिकीकडे

मंत्री तावडे म्हणाले, 'कल चाचणीत दहा टक्केच विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे असल्याचे स्पष्ट झाले. कल नसतानाही आई, वडिलांच्या अपेक्षा, आग्रहामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे अपेक्षित गुणवत्ता नसते. ते बेरोजगार होतात. सत्तर टक्के विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे एकतर्फी कल दिला. यावरून कलसंबंधी विद्यार्थ्यांमधील स्पष्टतेचा विचार पालकांनी केला पाहिजे. मोफत शिक्षणाचा हक्क कायद्यात (आरटीई) ६ ते १४ वयोगटातील शिक्षणाची जबादारी निश्चित केली आहे. त्या कायद्यात दुरूस्ती झाल्यानंतरच पूर्व प्राथमिक म्हणजे बालवाडी शिक्षण सरकारी शिक्षण विभागाच्या अखत्यारित येईल. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अभ्यासक्रम तयार केला आहे.'

----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती....मंत्र्यांचा वेळ खाल्ला

$
0
0

अवती भवती...

०००

मंत्र्यांचा वेळ खाल्ला...!

पालकमंत्र्यांचा कोल्हापुरात धावता दौरा असतो. प्रत्येक कार्यक्रम वेळेत व्हावा याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. रविवारी चिमासाहेब चौकात चिमासाहेब स्मृती उद्यानाचा कार्यक्रम वेळेत सुरू झाला. पालकमंत्र्यांनी वेळही भरपूर दिला. स्वागतानंतर उत्साही कार्यकर्त्याने लांबलचक भाषण करत उपस्थितांना नावाप्रमाणेच चांगलाच 'प्रसाद' दिला. कार्यकर्त्याने भाषणाची रजा घेतल्यानंतर बारमधील भाजपच्या माजी 'पॉवरबाज' वकिलाने ह्याने 'मंत्र्यांचा वेळ खाल्ला' अशी कोटी केली. पालकमंत्र्यांना भाषणाचे कौतुक करताना कार्यकर्त्याचे वयच कळत नाही. त्यांनी त्याला 'देवानंद' अशी उपमा दिली. कार्यकर्त्याचे भाषण जास्त लांबल्याने पालकमंत्र्यांनीही मोजकेच भाषण करून ते कराडला रवाना झाले. पण कार्यक्रम संपल्यावर कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भाषणाची चर्चा सुरू होती.

संकलन : सतीश घाटगे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्दिष्टपूर्तीवरच पगारवाढ, पदोन्नती

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा बँकेची कर्जपुरवठ्यात एकाधिकारशाही असताना ठेवींचे प्रमाण कमी असणे ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने भूषणावह बाब नाही. ग्राहक हेच दैवत मानून बँकेच्या व्यवसायवृद्धीसाठी ग्राहकांच्या दारात जा, ग्राहक बँकेकडे येईल, या मस्तीत राहू नका. मार्केटिंगचा आधार घेत आगामी आर्थिक वर्षात व्यवसायवृद्धीची उद्दिष्टपूर्ती करा, उद्दिष्टपूर्ती न झाल्यास पदोन्नती आणि वेतनवाढ मिळणार नाही,' असा इशारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी कर्मचाऱ्यांना दिला. गतवर्षात बँकेने केलेल्या उद्दिष्टपूर्तीनिमित्त आयोजित बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रम बँकेच्या प्रधान कार्यालयात झाला.

अध्यक्ष मुश्रीफ म्हणाले, 'सत्तेवर आल्यानंतर बँकेचा ३०० कोटींचा संचित तोटा कमी केला. यामुळे सभासदांना आठ टक्के लाभांश आणि कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के बोनस देण्यात येणार आहे. पण गतवर्षी ठेवींची उद्दिष्टपूर्ती झाली नाही. व्यक्तिगत कर्जपुरवठ्यामुळे बँकेच्या नफ्यात वाढ झाली असली, तरी ठेवी वाढविण्यासाठी वर्षअखेरीस प्रयत्न करणे ही चांगली बाब नाही. जिल्ह्याची एकूण ठेव क्षमता ३० हजार कोटींची असताना जिल्हा बँकेत केवळ चार हजार कोटी, तर इतर बँकांमध्ये २६ हजार कोटींच्या ठेवी ठेवल्या जातात. पीक कर्जवाटपात ८० टक्के वाटा जिल्हा बँकेचा असताना ठेवींमध्ये नगण्य प्रमाण चिंताजनक आहे. पीककर्ज वाटपानंतर केंद्र व राज्य सरकारकडून व्याज परतावा वेळेत मिळत नसल्याने वर्षाला ३२ कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. यातून मार्ग काढताना बँकेचा व्यवसाय वाढवण्यासाठी ग्राहकांचा शोध घेण्याची आवश्यकता आहे.'

ते पुढे म्हणाले, 'नोटाबंदी, जीएसटी व रेरा कायद्यामुळे बँकिंग व्यवसाय मंदीच्या काळातून जात आहे. तरीही बँकेने चांगला व्यवसाय केला. नोटाबंदीच्या काळात ३५० कोटींच्या नोटा स्वीकारण्यास आरबीआयने मनाई केली. या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घ्यावी लागली. अपात्र कर्जमाफी आणि नोटाबंदीतील जुन्या नोटा घेण्यासाठी लढाई सुरू आहे. त्यामुळे कोर्ट-कचेरीवर मोठा खर्च होत असला, तरी व्यवस्थापन खर्च कमी करुन यावर मार्ग काढला आहे. पण अद्यापही बँकेला रोकड टंचाईला सामोरे जावे लागत आहे.'

संचालक पी. जी. शिंदे कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावताना म्हणाले, 'उद्दिष्टपूर्तीमधून शंभर टक्के कौतुकाला प्राप्त आहात का? पुढील आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट पूर्ण करणार की दहा वर्षांचा कारभार तसाच करणार?, सरकार व बँकेने काढलेल्या परिपत्रकांचा वेगवेगळा अर्थ काढणारे बँक निरीक्षक व डीओ आत्मपरीक्षण करणा का? कर्मचाऱ्यांचा गोपनीय अहवाल लिहिताना माफीचे साक्षीदार होणार का? असा प्रश्नांचा भडीमार करत सर्वसामान्य घटकांपर्यंत बँकेच्या योजना पोहोचवल्यास राज्यात आदर्शवत बँक ठरेल, यासाठी सर्व सचंलाक पाठीशी राहतील'

कर्मचाऱ्यांच्या वतीने मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीईओ डॉ. ए. बी. माने यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. यावेळी डी. एस. कालेकर, रणवीर चव्हाण, एस. एस. उपाध्ये, पंडित चव्हाण यांनी आपल्या विभागाचा आढावा घेतला. कौतुक सोहळ्यास संचालिका निवेदिता माने, संचालक विलासराव गाताडे, आर. के. पोवार, प्रताप माने आदी उपस्थित होते. जी. एम. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संचालिका उदयानी साळुंखे यांनी आभार मानले.

................

पॉइंटर

स्थानिक पातळीवर रोकड टंचाई दूर करा

कर्जासाठी जिल्हा बँक, तर ठेवीसाठी इतर बँका

दैनंदिन व अनुकंपावरील कर्मचाऱ्यांचा प्रश्न लवकरच मार्गी

पिग्मी एजंट नेमण्याचा विचार

दोन हजारांची नोट पुन्हा बँकेत येत नाही

थकीत संस्थांची वसुली होणार

सुवर्ण बचत व वसंत वर्षा ठेव योजना सुरू

००००

चौकट...

२०१८-१९ चे उद्दिष्ट

तपशील उद्दिष्ट

भाग भांडवल १९० कोटी

ठेवी सहा हजार कोटी

कर्जे चार हजार ४०० कोटी

नफा शंभर कोटी

एनपीए तीन टक्क्यांपेक्षा कमी

सीआरएआर १५ टक्के

०००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती...

$
0
0

एकदाच काय ते भाडेदर ठरवा

खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची आर्थिक लूट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासगी आराम बसच्या प्रतिनिधींनी आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीसाठी बहुतांश आलेल्यांमध्ये बसचे मालक नसून एजंटांचा समावेश अधिक होता. त्यावेळी संतापलेल्या प्रतिनिधींनी आरटीओसमोर मागण्या मांडल्या. ते म्हणाले, 'सरकारने दीडपट भाडेदर आकारणीची सूचना केली आहे. त्याचा मोठा फटका ट्रॅव्हल्सचालकांना बसला आहे. आरटीओ प्रतिप्रवासी भाडेदर ठरवत नाही, तर प्रवासी दीडपटापेक्षा अधिक भाडे देत नाही. त्यामुळे प्रवासी आणि ट्रॅव्हल्सचालकांत वाद होत आहेत. त्यामुळे काय ते एकदाच भाडेदर ठरवून टाका, उगाच प्रवासी आणि आमचा सारखा वाद नको.' या मागणीवर आरटीओ अधिकारी म्हणाले, 'लवकरच भाडेदर निश्चित केली जाईल. त्याबाबत तुम्ही काहीच काळजी करू नका. येत्या काही दिवसांत ट्रॅव्हल्स मालकांची बैठक घेऊ.' त्या वेळी अधिकाऱ्याने दिलेल्या प्रतिउत्तराने शिष्टमंडळाने पळ काढला.

संकलन : सचिन यादव

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवयवदान चळवळीला हवे बळ

$
0
0

अवयवदान लोगो

Sachin.Yadav@timesgroup.com

Tweet:@sachinyadavMT

कोल्हापूर : पुणे विभागात विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीकडे (झेडटीसीसी) गेल्या सहा वर्षांत १३३ जणांनी ३४५ अवयवदान केल्याची आकडेवारी आहे. कोल्हापुरातही अवयवदान चळवळीला बळ देण्यासाठी अमर पाटील या तरुणाने हृदय, किडनी आणि यकृत दान केले. या चळवळीला आणखी बळ देण्याची गरज आहे. अवयदानामुळे सहा वर्षांत ३२० हून अधिक जणांचे जीव वाचले आहेत. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी महाअवयवदान अभियान राबविल्यास इच्छुक दात्यांचा 'डाटा' तयार होऊ शकतो. त्यामुळे अवयवदानाचा मार्ग आणखी सुकर होऊ शकतो. पुणे विभागात अवयव प्रत्यारोपणासाठी पाच हजारांहून अधिक जणांची मागणी आहे.

दरवर्षी रस्ते अपघातात १.४ लाख लोकांचा मृत्यू होतो. या सर्व लोकांकडून अवयवदान झाल्यास किडनीसह इतर बहुतांश अवयवांची गरज पूर्ण होऊ शकते. अवयवदानाबाबत जनजागृती व योग्य समन्वय नसल्याने अत्यल्प प्रमाणात अवयवदान होत आहे. अजूनही केवळ १० ते १५ टक्के 'ब्रेन डेड' रुग्णांकडूनच किडनीदान होते. इतर ८० ते ८५ टक्के प्रत्यारोपणाच्या केसेस 'लाइव्ह डोनर'कडून होतात. या स्थितीत 'ब्रेन डेड' म्हणजेच 'कॅडेव्हर ट्रान्सप्लांट'चे प्रमाण वाढल्याशिवाय अवयवांची गरज पूर्ण होऊ शकत नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. १०० किडनीच्या रुग्णांपैकी केवळ एका रुग्णाला किडनी मिळत असल्याचे झेडटीसीसी समिती सांगते. किडनीदानाचे प्रमाणही एक टक्क्याहून जास्त नाही. इतर अवयवांच्या दानाचे प्रमाणही एक टक्क्यापर्यंत आहे.

कोल्हापुरात अॅस्टर आधारचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले यांच्या मार्गदर्शनाखालील चौदा डॉक्टरांच्या पथकाने अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी यशस्वी प्रक्रिया ५ मे रोजी झाली. निगवे खालसा (ता. करवीर) येथील अमर पांडुरंग पाटील (वय ३१) या तरुणाचा 'ब्रेन डेड' झाला होता. त्याने अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयवदान केले. ग्रीन कॉरिडॉर करून पहिल्यांदाच मुंबई आणि पुणे येथे प्रत्यारोपणासाठी अवयव पाठविण्यात आले. अमरने स्प्रे पेंटिंगचा व्यवसाय करीत असतानाच अवयदानाची माहिती घेतली होती. कोल्हापुरातून प्रयोगशील आणि नव्या बदलांचे स्वागत करणाऱ्या अवयवदान चळवळीला नवे बळ मिळाले. अजूनही या चळवळीला अधिक बळ देण्याची गरज आहे. झेडटीसीसीच्या पुणे विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, नाशिक, सोलापूर, पुणे, नगर आणि धुळे जिल्हा आहे. अपघातांची वाढती संख्या आणि अवयव प्रत्यारोपणाची मागणी पाहता अवयवदानाला कमी प्रतिसाद आहे.

००

अशी होते प्रक्रिया...

रुग्ण दाखल झालेल्या हॉस्पिटलकडून संबंधित रुग्णाची माहिती झेडटीसीसीला दिली जाते. या समितीकडून संबंधित हॉस्पिटलला अवयवदान करण्यासाठी लागणारी मान्यता, रुग्णाची माहिती, गरज असलेल्या रुग्णाची माहिती, रक्तगट, डॉक्टरांचा अहवाल, रुग्णाची तसेच कुटुंबाची संमती, आदीची तपासणी केली जाते. समितीने मान्यता दिल्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. प्राधान्यक्रमानुसार रुग्णाने केलेली मागणी, हॉस्पिटलची नावे समितीच्या संकेतस्थळावर जाहीर केली जातात. त्याची माहिती हॉस्पिटलला दिली जाते. एक ते दोन दिवसांच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. अवयवदान करणाऱ्याचे आणि प्रत्यारोपण करणाऱ्या रुग्णाचे नाव गुप्त ठेवले जाते. प्रत्यारोपणाचा सर्व खर्च रुग्णाकडून केला जातो.

०००

अवयवदान १ जानेवारी ते २० एप्रिल २०१८

किडनी २४

लिव्हर १७

हृदय ४

फुफुप्स १

स्वादुपिंड १

डोळे २६

त्वचा ४

हात २

००

असे होऊ शकते अवयवदान...

जिवंतपणी...

एक मूत्रपिंड

लिव्हरचा काही भाग

फुफ्फुसाचा काही भाग

आतड्यांचा काही भाग

स्वादुपिंडाचा काही भाग

००

'ब्रेन डेथ' झाल्यानंतर...

दोन्ही मूत्रपिंड

हृदयाच्या झडपा

हृदय

आतडे

संपूर्ण यकृत

संपूर्ण फुफ्फुस

जोड उती

त्वचा

संपूर्ण स्वादुपिंड

००

मृत्यूनंतर...

देहदान

नेत्रदान (४ ते ६ तासांत)

त्वचादान (६ तासांत)

००

प्रबोधन आणि जनजागृतीची मोहीम सुरू आहे. अवयवदान चळवळीला आणखी बळ देण्याची गरज आहे. त्यासाठी समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापुरात सुरू झालेल्या चळवळीचे स्वागत आहे.

स्वाती गोखले, समन्वयक, प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समिती

००

वर्ष अवयवदानकर्ते किडनीदान लिव्हर हृदय

२०१२ ३ ६ १ -

२०१३ १० १८ ६ -

२०१४ ८ १३ ८ -

२०१५ १६ ३० १२ १

२०१६ ५९ ८३ ६० ६

२०१७ ३७ ५६ ३४ १०

एकूण १३३ २०६ १२१ १७

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवती भवती..

$
0
0

अवती भवती...

'राष्ट्रवादी' नव्हे 'कृती समिती'

शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक आहेत. पक्षाचा मेळावा असो की, कार्यकर्त्यांची बैठक. पक्षाचे नाव घेऊनच ते भाषणाची सुरुवात करतात. नुकतेच पर्यायी पुलाच्या बांधकामासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी व कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी निमंत्रकांनी 'कोल्हापूर शहर व जिल्हा' असे म्हणत भाषणाची सुरुवात केली. नेहमीच्या भाषणाच्या सवयीनुसार ते 'कोल्हापूर शहर व जिल्हा' म्हटल्यानंतर 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' म्हणतात की काय, अशी शंका साऱ्यांच्याच मनात निर्माण झाली. उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना, 'राष्ट्रवादी' नको 'कृती समिती' म्हणा असे सुचविले. त्यावर निमंत्रकांनी, 'अरे, मी चाळीस वर्षे समाजकारण, राजकारणात आहे. कुठे काय बोलावे यासंबंधी भान आहे. येथे मी राष्ट्रवादीचा नाही तर कृती समितीचा पदाधिकारी आहे', असे उत्तर दिले. पर्यायी पुलावरून बैठकीचे वातावरण गंभीर असताना 'राष्ट्रवादी की कृती समिती' यावरून बैठकीत हास्याची लकेर उमटली.

संकलन : आप्पासाहेब माळी

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू

$
0
0

विजेच्या धक्क्याने कामगाचा मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाकरे (ता. करवीर) येथे विजेचा धक्का बसून रमेश सायबू कांबळे (वय ५५, रा. वेस नारायण गल्ली, पंढरपूर, जि. सोलापूर) या वीटभट्टीवरील कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

वाकरे येथील परशुराम सूर्यवंशी यांच्या वीटभट्टीवर कांबळे काम करतात. रविवारी सकाळी ते वाकेश्वर मंदिराजवळील वीटभट्टीकडे जात असताना रस्त्यांवर लोंबकळणाऱ्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने ते कोसळले. त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मंगळवारी व बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे परिसरातील अनेक विद्युत तारा तुटल्या होत्या. त्यापैकी एका तुटलेल्या तारेचा त्यांना धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवा जागर परिषद ...

$
0
0

फोटो

.........

'राज्यघटना बदलण्याचा कुटील डाव'

पन्हाळ्यात युवा जागर परिषदेचे समारोप

म.टा. वृत्तसेवा, पन्हाळा

'सध्याचे राज्यकर्ते राज्यघटना बदलण्याचा कुटील डाव करीत आहेत. तो हाणून पाडण्याचे काम युवकांच्या हातात आहे. अन्यथा सरकारचा हा डाव सफल झाला तर सर्वप्रथम महिलाच त्याचा बळी ठरतील,' असे प्रतिपादन आनंद मेणसे (बेळगाव) यांनी केले. पन्हाळा येथील संजीवन इंजनिअरींग महाविद्यालयात सुरु असलेल्या कॉ. गोविंदराव पानसरे युवा जागर शिबिरात 'व्यक्ती आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उमा पानसरे होत्या.

मेणसे म्हणाले, 'आजची राजकीय परिस्थिती व भवताल समजण्यासाठी तरुणांनी मनुस्मृती पुस्तक वाचणे गरजेचे आहे. सध्याच्या सरकारने राजकीय सामाजिक धुव्रीकारण सुरु केले आहे. मुस्लिम,दलित,कम्युनिस्ट यांना समाजव्यवस्थेपासून बाजूला फेकणे हा सरकारचा उद्देश आहे. महिलांनी निर्णय प्रक्रियेत,राजकारणात येता कामा नये अशी भूमिका या नव्या व्यवस्थेत आहे, त्यामुळे एकूणच समाजव्यस्थेला हा मोठा धोका आहे.'

प्रा.हिमांशु स्मार्त 'माणूस,समाज आणि कला' या विषयावर बोलताना म्हणाले, 'मानवाच्या जीवनात कला ही सकारात्मकता निर्माण करते. कला ही तुमच्या जीवनात पुनरावृत्ती करते. कलेचे काम सेंद्रीय खतासारखे असते. खत ज्याप्रमाणे जमिनीला सुपीक बनविते, त्याचप्रमाणे कला ही जीवन समृध्द करते.'

दत्ता देसाई (पुणे) 'माझे जगण्याचे नवे पर्याय ' या विषयावर बोलताना म्हणाले, ' मी काय करणार आहे हाच पर्याय घेवून वाटचाल करणे गरजेचे आहे. ' सायंकाळीच्या सत्रात मेघा पानसरे व मंजुश्री पवार यांनी लघुपट प्रदर्शनाव्दारे 'लिंगभाव : मैत्री-प्रेमविवाह' याबाबत विवेचन केले. तीन दिवस सुरु असलेल्या शिबिरात कोल्हापूरसह सांगली,सातारा,बेळगाव,कराड,पुणे आदी भागातून सुमारे ३०० हून अधिक शिबिरार्थी सहभागी झाले होते. समारोप कार्यक्रमात प्रश्नोत्तरे झाली. शिबिरार्थी सहभागींना ज्योती कांबळे लिखित 'कॉ. गोविंदराव पानसरे जीवन आणि कार्य' पुस्तक देण्यात आले. सुशील लाड यांनी आभार मानले.

..............

फोटो ओळ-

पन्हाळा येथे युवा जागर शिबिरात बोलताना आनंद मेणसे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णधवल चित्रांचा अद्भुत आविष्कार

$
0
0

फोटो आहे..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंग-रेषांच्या माध्यमाचा वापर करून कुंचल्यातून रेखाटलेली रंगीबेरंगी चित्रे पाहण्यासाठी नेहमीच मनमोहक असतात. अशाच कलेचा आविष्कार क्रोकवील व एरोग्राफीच्या माध्यमातून कृष्णधवलमध्ये पाहायला मिळतो. पशुपक्षी, पाने व फुलांचा कृष्णधवलमधील हा अद्भुत चित्रांचा आविष्कार शाहू स्मारक भवनमध्ये प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अधिकारी विजय फडणीस यांनी रेखाटलेल्या प्रदर्शनाचे रविवारी उद्घाटन झाले. बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. मीरा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शाचे उद्घाटन झाले. त्यानंतर प्रदर्शन पाहण्यासाठी खुले झाले.

अनेक चित्रकार आपल्या कुंचल्यातून रंगाची उधळण करत निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे, वास्तुचित्रे नेहमीच साकारतात. सद्य:स्थितीत रंगाची मुक्त उधळण होत असताना फडणीस यांनी मात्र कृष्णधवलमध्ये आपली कलाकृती साकारली आहे. पशुपक्षांच्या अद्भुत हालचाली रेखाचित्रांतून रेखाटल्या आहेत. गुलाब, जास्वंद आणि विविध वृक्षवेलींची कृष्णधवलमधील पाने तितकीच आकर्षक दिसत आहेत. पेन्सिल आणि बॉलपेनचा वापर करून तयार केलेल्या ४५ आकर्षक फ्रेम प्रदर्शनामध्ये मांडण्यात आल्या आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेले हौशी कलाकार या अद्भुत कलाकृतींची माहिती घेत होते. 'सार्वजिनक बांधकाम विभागात कार्यरत असताना रेखी व रेषांवर चांगले प्रभुत्व होते. निवृत्तीनंतर आईचे आजारपण सांभाळत असताना रेखाचित्रे काढण्यास सुरुवात झाली. विरंगुळ्यातून एक आकर्षक कलाकृती तयार झाली असल्याचे चित्रकार विजय फडणीस यांनी सांगितले.'

शाहू स्मारक कलादालन येथे १९ मेपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी सातपर्यंत प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. उद्घाटन समारंभास नलुताई भागवत, जी. एस. माजगावकर, योगेश आठल्ये, उषाताई आठल्ये, विनायकराव धर्माधिकारी, अनिल मोहिते, नारायण सुतार, जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रा. चेतन जगताप, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रशांत सॅलियन, आदी उपस्थित होते. विप्रा आठल्ये यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरती बंदीविरोधात प्राध्यापक उद्या उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यापीठ व अनुदानित कॉलेजमधील प्राध्यापक भरतीबाबत राज्य सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या बंदीविरोधात राज्यातील नेट, सेट व पीएचडीधारक मंगळवारी (ता. १५) मुंबई येथील आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणीक उपोषण करणार आहेत.

राज्यात विविध विद्यापीठे व अनुदानित कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापकांच्या हजारो जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमुळे राज्यातील उच्च शिक्षणातील दर्जा व गुणवत्तेवर परिणाम झालेला असताना भरतीवर सरकारने बंदी आणली आहे. प्राध्यापक पदासाठी पात्रताधारक अनेक सेट, नेट व पीएचडी पदवीधारक असताना त्यांना नवीन भरती नसल्याने बेरोजगारीचे जीवन जगावे लागत आहे. याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन, विनंती अर्ज दिले आहेत. तसेच आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेधही केला आहे. तरीही अद्याप भरती बंदचा निर्णय अद्याप रद्द करण्यात आलेला नाही. आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून आझाद मैदानावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

उपोषणामध्ये संदीप पाथ्रीकर, संतोष भोसले, इब्राहीम मुलाणी, शिवाजी देसाई आदी प्राध्यापकांसह राज्यातील सेट, नेट व पीएचडीधारक सहभागी होणार आहेत. उपोषणामध्ये शिवाजी विद्यापीठ संलग्न कॉलेजमधील पात्रताधारकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. किशोर खिलारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळा बिले घरपोच

$
0
0

आठवड्याभरात पोस्टाने पाठविण्याची प्रक्रिया सुरू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळ्याची बिले पोस्टाने घरपोच पाठविण्याची पद्धत, मुदतीत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना सवलती यामुळे गेल्या काही वर्षांत घरफाळा विभागाने वसुली व उत्पन्न वाढीत बाजी मारली. गेल्या आर्थिक वर्षात जवळपास ५२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला बिले पोस्टाने पाठविल्यामुळे घरफाळाचा भरणा मुदतीत होत आहे. यंदाही पोस्टाने बिले पाठविण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे, येत्या आठवडाभरात ही बिले घरपोच होणार आहेत. शिवाय महापालिकेच्या संकेतस्थळावर घरफाळा भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

एक एप्रिल ते जून या कालावधीत घरफाळा बिल भरणाऱ्या मिळकतधारकांना बिलात सहा टक्के सवलतीची योजना गेल्या दोन वर्षांत राबवली होती. या योजनेंतर्गत एक एप्रिल ते जून २०१७ या कालावधीत ६२ हजार ५३८ मिळकतधारकांनी घरफाळा जमा केला होता. सवलत योजनेंर्गत ९३ लाख, २६ हजार २५८ रुपयांची सवलत मिळाली आहे.मार्च २०१८ अखेर जवळपास ५२ कोटी रुपयांचा महसूल जमा करत घरफाळा विभागाने उत्पन्नात बाजी मारली. मुदतीत घरफाळा भरणाऱ्या मिळकतधारकांना बिलात चार ते सहा टक्क्यापर्यंत सवलत दिली जाते. कोल्हापूर शहरातील मिळकतधारकांची संख्या एक लाख ४१ हजाराच्या आसपास आहे.

घरफाळा विभाग हा महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख कणा समजला जातो. जकात आणि त्यापाठोपाठ एलबीटी बंद झाल्यानंतर प्रशासनाची सगळी भिस्त घरफाळा उत्पन्नावर राहिली. तत्कालिन आयुक्त पी. शिवशंकर यांनी घरफाळा बिले पोस्टाने घरपोच राबविण्याची पद्धत अंमलात आणली. पूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्याकरवी बिले वितरीत केली जायची. मात्र अनेकदा बिले गहाळ झाल्याची, मुदतीत बिले उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घरफाळा बिले पोस्टाने पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात घरफाळा विभागाच्या उत्पन्नात भर पडली.

घरफाळा विभागातर्फे यंदाची बिले ही तयार केली आहेत. ए, बी, सी. डी आणि ई वॉर्डनिहाय घरफाळा बिले पोस्टाद्वारे पोहोच करण्यात येणार आहेत. येत्या आठवडाभरात ही बिले नागरिकांना उपलब्ध होतील.

..............

ऑनलाइनवर सव्वा महिन्यांनी बिले

एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होतो. एक एप्रिल ते ३०जून या कालावधीत बिलाचा भरणा केल्यास बिलात सहा टक्के सवलत मिळते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक मिळकतधारक मुदतीत बिलाचा भरणा करतात. नवीन आर्थिक वर्ष सुरू होऊन दीड महिने होत असताना बिले अद्याप मिळाली नाहीत तसेच मे महिन्याच्या दहा तारखेपर्यंत घरफाळ्याची बिले ऑनलाइन उपलब्ध नव्हती अशा तक्रारी काही मिळकतधारकांनी केल्या. या संदर्भात घरफाळा विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला चार दिवसांपासून घरफाळा बिले ऑनलाइन उपलब्ध केले आहेत. शिवाय पोस्टाने पाठविण्यात येणाऱ्या बिलांची छपाई सुरू असल्याचे सांगितले. मात्र कर निर्धारक दिवाकर कारंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images